Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आजची तिथी

बुधवार,
ज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वितीया,२२ जून २०१६
कलियुग वर्ष ५११८

दैनिक डाउनलोड करा

हिंदूंसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी हवी ! - सुभाष चक्रवर्ती

हिंदू अधिवेशनस्थळी झालेल्या पत्रकार 
परिषदेद्वारे विदेशातील हिंदूंच्या व्यथा उजेडात 
डावीकडून श्री. चेतन राजहंस, श्री. राहुल कौल, श्री. सुभाष
चक्रवर्ती, श्री. निरंजन ओझा आणि श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्
       रामनाथी, २१ जून (वार्ता.) - पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीपासून तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. त्यानंतर वर्ष १९७१ मध्ये भारत शासनाने पूर्व पाकिस्तानचा स्वतंत्र बांगलादेश बनवल्यानंतरही हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढच झाली. त्यामुळे कोट्यवधी बांगलादेशी हिंदूंनी भारतात पलायन केले. अखंड भारताचे अविभाज्य घटक असलेल्या या हिंदूंसाठी भारत शासनाने बांगलादेशात स्वतंत्र भूमी (होमलॅण्ड) निर्माण करण्यासाठी दबाव आणावा, अशी मागणी बांगलादेशातील हिंदूंच्या समस्यांवर आवाज उठवणारे निखिल बंग नागरिक संघ या संघटनेचे सचिव श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनस्थळी २१ जून २०१६ या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी नेपाळमधील फोरम ऑफ नेपालीज् मीडियाचे (नेपाळी प्रसारमाध्यम मंच) अध्यक्ष प्रा. निरंजन ओझा, श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्, युथ फॉर पनून कश्मीर (आपले काश्मीर)चे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे 
प्रथम उद्दिष्ट ठरेल ! - राहुल कौल, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे
श्री. राहुल कौल
       विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागल्यानंतर आज कैरानामधून हिंदूंना पळून जावे लागत आहे. काश्मीरसारखी स्थिती भारतात सर्वत्र येऊ शकत नाही, असे म्हणणार्‍यांना यावरून धर्मांधांचा धोका लक्षात आला असेलच ! आज काश्मीर हे सूत्र सत्ताधार्‍यांसाठी ना खाऊ शकतो, ना गिळू शकतो, असे बनले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ करत असतांना त्याकरता पहिले उद्दिष्ट म्हणून विस्थापित काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तसे झाले, तर ते सहजसाध्य असे उद्दिष्ट ठरू शकते. त्याकरता आम्ही २७ डिसेंबर २०१६ या दिवशी देशभरात आंदोलन करणार आहोत. त्यानंतर शासनाने काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन न केल्यास १९ जानेवारी २०१७ या दिवशी सर्व देशभरातील हिंदूंनी काश्मीरमध्ये जाऊन रहायचे, असे आंदोलन छेडूया, असे आवाहन पुणे येथील युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांनी केले. या आवाहनाला उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद देत याविषयी कृतीशील नियोजन करण्याचे आश्‍वासन दिले. ते २१ जूनला अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील विविध राज्यांतील हिंदूंची असुरक्षितता या सत्रात बोलत होते.
श्री. राहुल कौल यांनी काश्मीरच्या 
दुःस्थितीविषयी केलेले विश्‍लेषण !
१. काश्मीरमधील हिंदूंच्या विस्थापनाचा प्रश्‍न हे देशभरातील हिंदूंना जोडणारे सूत्र आहे.
२. भाजपने काश्मीरमध्ये पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टी (पीडीपी) म्हणजे विघटनवाद्यांशी युती केली आहे. ही युती करतांना काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाविषयी स्वतः निर्णय घेणार, असे पीडीपीने सांगितले आहे. हा निर्णय म्हणजे काश्मिरी हिंदूंच्या मारेकर्‍यांच्या हाती सत्ता देण्यासारखाच आहे.

केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर परमात्म्याशी एकरूपता साधणे म्हणजे योग ! - डॉ. कौशिक चंद्र मल्लिक, सदस्य, शास्त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात योगदिनाच्या 
निमित्ताने ॐसह योग करण्याविषयी प्रबोधन ! 
डॉ. कौशिक चंद्र मल्लिक
       रामनाथी, २१ जून (वार्ता.) - केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर परमात्म्याशी एकरूपता साधणे म्हणजे योग आहे, असे प्रतिपादन कोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचारसभेचे सदस्य डॉ. कौशिक चंद्र मल्लिक यांनी केले. रामनाथी, गोवा येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने ॐसह योग करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
       डॉ. मल्लिक पुढे म्हणाले, २१ जून या दिवशी उत्तरायणाचा अंत होतो आणि दक्षिणायनाला प्रारंभ होतोे. शुभारंभ करण्यासाठी हा आदर्श दिवस आहे. शासनाकडून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. योगाचा आरंभ होऊ शकतो, अंत नाही. योग ही एक दिवस नव्हे, तर वर्षभर करण्याची गोष्ट आहे. योग हा हिंदु संस्कृतीचा भाग असतांना तो केवळ हिंदूंचा नाही, तर सर्वांचा आहे, असे भासवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नामस्मरणासह योग केल्यानेच त्याचा लाभ होतो. केवळ शारीरिक स्तरावर योग केल्यास लाभ होत नाही. परमात्म्याशी एकरूपता साधणे, हा योग आहे. केवळ शारीरिक व्यायाम करणे हा योग नाही. योग ही ईश्‍वराशी भेट आहे. योगाचा योग्य पद्धतीने अभ्यास केला, तर आपल्यासाठी देवाचे दार उघडू शकते. देवाचे दार उघडले जात नसेल, तर तो योग नाही. योगामुळे व्यक्ती परमपदावर पोचू शकते.

हिंदूंनो, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कठोर व्हा ! - पंकज आंबेरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

कोपरखैरणे (नवी मुंबई) 
येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
      कोपरखैरणे, २१ जून (वार्ता.) - मी आणि माझे अशी हिंदूंची नरकमय विचारसरणी बनली आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र संकटात आहे. त्यामुळे हिंदूंनो जागे व्हा. मुळमुळीतपणा सोडा. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कठोर व्हा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंकज आंबेरकर यांनी केले. येथे १९ जूनला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, हिंदू राष्ट्रसेना, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र वितरक सेवा आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाचे सूत्रसंचालन हिंदू राष्ट्रसेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड यांनी केले. या वेळी समितीचे सर्वश्री नीलेश देशमुख आणि सुमित सागवेकर यांनीही मार्गदर्शन केले.

यवतमाळ येथे धर्मांधांकडून वारकर्‍यांच्या दिंड्यांवर दगडफेक !

  • कठोर कारवाई अभावी मुजोर झालेले धर्मांध ! हिंदूंच्या मिरवणुका, उत्सवांचे मांडव यांच्यासह आता धर्मांधांकडून वारकर्‍यांच्या दिंड्यांवरही आक्रमण !
  • अनेक वारकरी घायाळ ! ५ धर्मांधांना अटक
  • वारकर्‍यांवरील आक्रमणाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !
      यवतमाळ - येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात धर्मांधांनी वर्धा ते पंढरपूर पायी जाणार्‍या वारकर्‍यांच्या २ दिंड्यांवर २० जून या दिवशी सायंकाळी दगडफेक केली. यात अनेक वारकरी घायाळ झाले आहेत. या प्रकरणी ५ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.
१. आषाढी वारीसाठी वर्ध्याहून श्री गजानन महाराज पायी दिंडी सोहळा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली पायदळ आषाढी वारी दिंडी सोहळा या २ दिंड्या पंढरपूरला जात होत्या.

काश्मिरी पंडितांना निर्वासित करून हिंदूंची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर नष्ट करण्याचे षड्यंत्र ! - डॉ. सुजित यादव

नालासोपारा येथील राष्ट्रीय हिंदू 
आंदोलनात ८० हून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग ! 
         नालासोपारा, २० जून (वार्ता.) - केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववाद्यांची सत्ता असूनही हिंदूंवरील अत्याचार थांबलेले नाहीत. आम्हालाही विकास हवा आहे; मात्र हिंदूंच्या भावनांचा मान राखूनच तो व्हायला हवा. काश्मिरी पंडितांचा काश्मीरमध्ये परतण्याचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. काश्मिरी पंडितांना निर्वासित करून हिंदूंची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन धर्माभिमानी डॉ. सुजित यादव यांनी केले. १८ जून या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात शिवसेना, भाजप, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू गोवंश रक्षा समिती, ब्राह्मण महासंघ, बजरंग सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे ८० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

(म्हणे) योग धार्मिक कर्मकांड नाही ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

       योग हे हिंदु धर्माने (सनातन धर्माने) दिलेले शास्त्र आहे. योग हा ईश्‍वरप्राप्ती करून देणारा मार्ग आहे. द्वापर युगात ध्यान योग ही ईश्‍वरप्राप्तीची साधना होती. योगासने केल्याने शरिराला उत्तम आरोग्य लाभते. योग ही हिंदु धर्माची देण असून जीवनात त्याचा वापर अपरिहार्य आहे.
       चंडीगड (पंजाब) -
ईहलोकातून परलोकात गेल्यानंतर काय प्राप्त होईल, हे सगळे सांगतात; मात्र योग परलोकाविषयी सांगत नाही. मृत्यूनंतर काय मिळेल, याविषयी योग सांगत नाही. हे धार्मिक कर्मकांड नाही. हे आरोग्याला निरोगी आणि सृदृढ करते. या जन्मात काय मिळेल, हे त्याचे विज्ञान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. २१ जूनला येथील कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मोदी यांच्यासह ३० सहस्र लोकांनी योगासने केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी उपस्थित होते.

अमरावती येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

कार्यक्रमाला उपस्थित शिवप्रेमी
      अमरावती - येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जूनला येथे शिवराज्याभिषेक दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु जनजागृती समितीनेही सहभाग घेतला. या वेळी स्थानिक शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधीवत मंत्रोच्चार करून अभिषेक घालण्यात आला. समितीचे श्री. योगेश मालोकार यांनी हा दिवस तिथीनुसार साजरा करण्याचे आणि हिंदु धर्मावर होणारे आघात यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दोन धारकर्‍यांची मलेशिया येथे आयोजित होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेसाठी निवड करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाला साहाय्य करणार्‍या धर्मप्रेमींचा सत्कार करण्यात आला.

सनातनवर बंदी घालण्याआधी इस्लामवर बंदी घालणार का ? - भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर

सनातनवर ऊठसूट बंदीची 
मागणी करणारे याचे उत्तर देतील का ?
      पंढरपूर - आज इस्लामच्या नावाखाली जगात प्रचंड नरसंहार चालू आहे. आपल्या देशात प्रतिदिन बॉम्बस्फोट होत आहेत. शेकडो माणसे मरत आहेत. इस्लामच्या नावाखाली पाकिस्तानमध्ये, बांगलादेशामध्ये सहस्रावधी हिंदू मरत आहेत, बाटवले जात आहेत. मंदिरे-मूर्ती उद्ध्वस्त होत आहेत. आपल्या देशाला इस्लामी आतंकवाद्यांनी घेरले आहे. हा आतंकवाद थांबवायचा असेल, तर इस्लामवर बंदी घालणार का ? ते योग्य होईल का ?, असा परखड प्रश्‍न भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी उपस्थित केला.
भागवताचार्य उत्पात पुढे म्हणाले,
१. दाभोलकर, पानसरे खून खटल्यातील संशयित आरोपी सनातन संस्थेचे साधक आहेत; म्हणून सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, म्हणजे गांधीवधातील आरोपी संघ स्वयंसेवक होते; म्हणून संघावर बंदी घातली होती, त्यासारखे अविचाराचे होईल.

गांधीनगर येथील वाहतुकीस शिस्त लावा ! - शिवसेनेचे अनिल उपाख्य राजू यादव यांचे निवेदन

        गांधीनगर-कोल्हापूर, २१ जून (वार्ता.) - गांधीनगर ही पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठी आणि अग्रेसर बाजारपेठ आहे. त्यामुळे गांधीनगर येथे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटक, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून सहस्रो वाहने येतात. तसेच स्थानिक वाहनेही रस्त्यावर उभे रहातात. यामुळे वळीवडे, चिंचवाड आणि गांधीनगर येथे जाणार्‍या रहिवाशांना त्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत, तसेच भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी गांधीनगर येथे अवजड वाहनांना सकाळी ११ च्या अगोदर आणि रात्री ८ नंतर रस्त्यावरून वाहतुकीस प्रवेश द्यावा, ठिकठिकाणी वाहतुकीचे दिशादर्शन फलक लावून गांधीनगर येथील वाहतुकीस शिस्त लावावी, या मागणीसाठीचे निवेदन शिवसेनेचे करवीरतालुका प्रमुख अनिल उपाख्य राजू यादव यांनी गांधीनगर येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या वेळी सर्वश्री संजय पवार, सुजित चव्हाण, दुगेश लिंग्रस, शिवाजी जाधव, कमलाकर जगदाळे, रवी चौगुले, राजेश सचदेव, अनिकेत शिंदे, सागर माने, आेंकार जोशी यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. (जी गोष्ट शिवसैनिकांच्या लक्षात येते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? असे दायित्वशून्य प्रशासन नागरिकांच्या समस्या काय सोडवणार ? - संपादक)

भारतमातेचा जयजयकार करण्याची लाज कशाला वाटली पाहिजे ? - व्यंकैय्या नायडू

       पुणे, २१ जून (वार्ता.) - भारत हा केवळ देश नसून ती आमची माता आहे, मातेचा जयजयकार करतांना कशाची लाज वाटली पाहिजे, तसेच ज्यांनी पुरस्कार वापसी केली, ते पुरस्काराच्या पात्रतेचे नसल्यानेच त्यांनी पुरस्कार परत दिले आहेत, असे सडेतोड प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केले. (पुरस्कार वापसी करणारे आणि भारतमाता की जय याला विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक) भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने १८ जून या दिवशी येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी समिती बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांसह भाजपचे अनेक मंत्री, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध 
केल्यास पदाचा त्याग करीन ! - मुख्यमंत्री
       या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपच्या मंत्र्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे लक्ष्य करत आहेत. त्यांनी शासनाचे लाटलेले भूखंड आधी परत करावेत आणि मग भाजपच्या मंत्र्यांवर आरोप करावेत. गोबेल्स नीती वापरून जनतेला गोंधळात टाकण्याचे काम काँग्रेस करत आहे. आपल्या शासनाच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केल्यास मी पदाचा त्याग करीन.

धर्मवीरांचे स्मरण हे हिंदु राष्ट्राची प्रेरणा ठरेल ! - प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

विक्रोळी येथे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी ! 
श्री. प्रसाद वडके (डावीकडे) यांचा सत्कार
करतांना शिवसेनेचे आमदार श्री. सुनील राऊत
     विक्रोळी, २१ जून (वार्ता.) - साधना, संघर्ष आणि संघटन करून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि धर्मवीर शंभूराजांनी प्राणांचे बलीदान देऊन त्याचे रक्षण केले. शंभूराजांचे बलीदान वाया जाऊ नये, यासाठी तरुणांनी पराक्रमाची कास धरावी. धर्मवीरांच्या त्यागाचे स्मरण उद्याच्या हिंदु राष्ट्राची प्रेरणा ठरेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील नवमहाराष्ट्र व्यायाम शाळेच्या सभागृहात १७ जून या दिवशी धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार श्री. सुनील राऊत आणि अन्य पदाधिकारी, नवमहाराष्ट्र व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. अनंत पाताडे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. प्रमोद दळवी यांसह ५० धर्माभिमानी उपस्थित होते. 

(म्हणे) डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना शासनकर्त्यांचा पाठिंबा !

डॉ. बाबा आढाव यांचा जावईशोध
    पुणे - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना सध्या राज्यात असणार्‍या शासनाचा पाठिंबा आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केला. (यावरून आढाव यांचा अन्वेषण यंत्रणा आणि न्याययंत्रणा यांच्यावर विश्‍वास नाही, असा अर्थ कुणी काढल्यास त्यात नवल काय ? - संपादक) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० जून या दिवशी ३४ मास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील महर्षी शिंदे पुलावर अंनिसच्या वतीने आयोजित निषेध कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुक्ता दाभोलकर, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख, आम आदमी पक्षाचे सुभाष वारे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी, तसेच अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जामखेड (जिल्हा नगर) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा

    जामखेड, २१ जून - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जून या दिवशी भव्य शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती येथून काढण्यात आली.
    या वेळी शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिष्ठित २० फुटी भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये शुभ्र अश्‍वांवर आरूढ पारंपरिक वेशभूषेतील मुलामुलींचेे पथक, पारंपरिक वाद्यवादन, बॅण्ड आणि ढोल आदी पथके सहभागी झाली होती, तसेच काही धारकर्‍यांनी मल्लखांब आणि लाठी फिरवणे यांचे साहसी प्रकार करून दाखवले. एकूण या कार्यक्रमाच्या आयोजनात सर्वश्री महेश निमोणकर, सरनोबत, आप्पा कार्ले, मंगेश आजबे, बिभीषण धनवडे, तात्याराम पोकळे, रमेश आजबे, गणेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

हिंदूंचा प्राचीन मौल्यवान ठेवा जतन करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - अनिल धीर, भारत रक्षा मंच

'विविध राज्यांतील हिंदूंची असुरक्षितता' या सत्राचा उर्वरित वृत्तांत 
प्राचीन देवळांसह जगभरातील लोकांनी लुटलेल्या वस्तू परत आणण्याचे आवाहन ! 
     विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - इंग्रजांनी भारतातील विविध मौल्यवान वस्तू आपल्या देशात नेण्यासाठी वर्ष १८५० मध्ये 'केंद्रीय पुरातत्त्व विभागा'ची स्थापना केली. त्यानंतर भारत स्वतंत्र होऊनही आजही त्यांचे कार्य इंग्रजांनी बनवलेल्या नियमांच्या आधारेच चालू आहे. त्यामुळे हा विभाग हिंदूंचा प्राचीन ठेवा, वास्तूं यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ओडिशातील कोणार्कचे सूर्यमंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर यांनाही याचा फटका बसला आहे. हिंदूंच्या पुरातन वास्तू, वस्तू आदींच्या जतनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे, असे प्रतिपादन ओडिशातील 'भारत रक्षा मंच'चे राष्ट्रीय महासचिव श्री. अनिल धीर यांनी केले. 

शिवराज्य संघटनेच्या वतीने ग्रंथ आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन यांचे आयोजन

छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य
    पिंपरी (जिल्हा पुणे), २१ जून (वार्ता.) - छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि शिवराज्याभिषेक दिन यांचे औचित्य साधून येथील शिवराज्य संघटनेच्या वतीने ग्रंथ विक्री आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन यांचे आयोजन केले होते. निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ या ठिकाणी १९ जून या दिवशी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत झालेल्या प्रदर्शनास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयीची पुस्तके, त्यांच्या प्रतिमा, धार्मिक आणि ऐतिहासिक ध्वनीचित्रचकती प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि क्रांतीकारकांवरील छायाचित्र प्रदर्शनही लावले होते. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील एकमेव ३ डी पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले होते.

नानाविध माध्यमांतून हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर !

     गेले तीन दिवस येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विचारमंथन चालू आहे. विविध प्रांतांतील हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या प्रांतातील समस्या, हिंदुत्वरक्षणासाठी केलेले प्रयत्न आदींविषयी उपस्थितांना अत्यंत आर्ततेने अवगत करत आहेत. उद्बोधन सत्र, फलकांचे प्रदर्शन, गटचर्चांतून प्रत्यक्ष कृती योजना आदी नानाविध माध्यमांद्वारे येथे हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर चालू आहे. त्याचा सचित्र आढावा... 
एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकतांना उपस्थित धर्माभिमानी

सनातन संस्था, हिंदु जनजागरण समिती यांवर त्वरित बंदी घाला ! - अंनिस आणि पुरोगामी संघटना यांचे निवेदन

सनातन संस्था अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्यावर अद्याप 
कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना अंनिस आणि पुरोगामी संघटनांची कावकाव...
    सांगली, २१ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागरण समितीची नावे पुढे आली आहेत. (हिंदु जनजागरण समिती नव्हे, तर हिंदु जनजागृती समिती होय ! हिंदुत्ववादी संघटनेचे नावही सरळ घेता न येणारे बंदीची मागणी करतात ! - संपादक) या संस्थांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विविध पुरोगामी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. (पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष ! - संपादक)

राज्यातील ध्वनीआलेख शास्त्र (सोनोग्राफी) सेवा बंद !

    पुणे, २१ जून - गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएन्डीटी) कायद्यात तातडीने सुधारणा करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेले राज्यव्यापी बंद आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय इंडियन रेडीओलॉजीस्ट इमेजिंग असोसिएशनने २० जून या दिवशी घेतला आहे. (असे आंदोलन करून सर्वसामान्य रुग्णांना वेठीस धरण्यापेक्षा अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब आंदोलनकर्त्यांनी करावा. - संपादक) या मागणीसाठी २२ जून या दिवशी मुंबईतील आझाद मैदान येथे महारॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यात राज्यातील सर्व क्ष-किरण तज्ञही (रेडीओलॉजिस्ट) सहभागी होतील, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
    पुणे महानगरपालिकेतील प्राधिकृत अधिकारी यांचे स्थानांतर आणि गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायद्यात सुधारणा या प्रमुख मागणीसाठी गेल्या ७ दिवसांपासून येथील ध्वनिआलेख शास्त्र आणि क्ष-किरण तपासणी (एक्स-रे) सेवा बंद ठेवली आहे. त्या दृष्टीने पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि महापौर प्रशांत जगताप यांच्याशी चर्चेच्या अनेकदा फेर्‍या होऊनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यव्यापी बंद चालू ठेवण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी दिली आहे.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील तृतीय दिवशीचा वृत्तांत आणि क्षणचित्रे

संस्कृतीशी समरस होणे म्हणजे स्वदेशी ! - गव्यसिद्धाचार्य
 डॉ. निरंजन वर्मा, गुरुकुलपति, पंचगव्य गुरुकुलम् कांचीपुरम्, तमिळनाडू
     विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - पंचमहाभूतांचे संतुलन ठेवून जगणे स्वदेशी आहे. केवळ देशात निर्माण झालेली वस्तू उपयोगात आणणे म्हणजे स्वदेशी स्वीकारणे नाही, तर या देशाच्या भूगोलाशी जुळवून घेणेे स्वदेशी आहे. येथील भूगोल हे आमचे राष्ट्र आहे. जेथे आपण रहातो, तेथील पंचमहाभूतांशी संतुलन ठेवून जीवन जगणे हे स्वदेशी आहे. येथील संस्कृतीशी समरस होणे स्वदेशी आहे, असे प्रतिपादन गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा यांनी गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी प्रथम सत्रात केले. 

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

     १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. 
डावीकडून श्री. सुब्रत सामल, सदस्य, भारतीय गोसंवर्धन आणि अनुसंधान संस्थान,
खोरधा, ओडिशा; श्री. अजीत रथ, सदस्य, गोसेवा धाम, खोरधा, ओडिशा; अधिवक्ता
बिभूति भूषण पलेई, जिल्हा सचिव, प्रज्ञान क्रियायोग मिशन, सुंदरगड, ओडिशा; श्री.
जयराज ठाकुर, संस्थापक सदस्य, हिन्दू सेना, सुंदरगड, ओडिशा; 
श्री. नीलकंठ महान्ती,
ओडिशा राज्य सामाजिक समरसता विभाग सेवक, विश्‍व हिंदु परिषद, सुंदरगड, ओडिशा;
श्री. प्रेम प्रकाश कुमार, सुंदरगड, ओडिशा; श्री. संदीप दास, जिल्हा संयोजक, राजगंगपूर,
बजरंग दल, सुरेंद्रनगर, ओडिशा; अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा, राज्य अध्यक्ष, बिश्‍वो गो सुरख्या
बाहिनी, कटक, ओडिशा आणि दैनिकाविषयी माहिती सांगतांना सनातनच्या कु. दीपा तिवाडी

हिंदु धर्म जगभरात पोचवण्यात एस्.एस्.आर्.एफ्.ला यश ! - पू. सिरियाक वाले, एस्.एस्.आर्.एफ्

पू. सिरियाक वाले
* संकेतस्थळाद्वारे प्रतिमास ९ लक्ष जणांना धर्मशिक्षण
* कार्यशाळांद्वारे जिज्ञासूंमध्ये आध्यात्मिक परिवर्तन
     जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळेच हिंदु धर्म जगभरात पोचवण्यात स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनला (एस्.एस्.आर्.एफ्.ला) यश येत आहे, अशी कृतज्ञता एस्.एस्.आर्.एफ्चे पू. सिरियाक वाले यांनी व्यक्त केली. 
पू. सिरियाक वाले म्हणाले की, 
१. हिंदु धर्माविषयी ६०० हून अधिक लेखांना प्रसिद्धी देणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्च्या संकेतस्थळाला प्रतिमास ९ लक्ष जिज्ञासू भेट देतात.

सांप्रदायिकांनो, हिंदु राष्ट्र-निर्मितीचे साक्षीदार नव्हे, भागीदार बना ! - पू. तनुजा ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, वैदिक उपासना पीठ

सांप्रदायिक ऐक्याविषयीच्या सत्रामध्ये दुमदुमला वैश्‍विक संघटनाचा उद्घोष
विविध संप्रदायांतील संतांनी त्यांच्या अर्जुनरूपी शिष्याला हिंदु राष्ट्र-स्थापनेचा वसा देण्याचे आवाहन !
पू. तनुजा ठाकूर
      विद्याधिराज सभागृह, रामनाथी (वार्ता.) - आज देशातील ९० कोटी हिंदूंपैकी ८५ टक्के हिंदू हे कोणत्या-ना-कोणत्या संप्रदायानुसार अल्पाधिक प्रमाणात साधना करत आहेत. त्यामुळे संप्रदायांचे ऐक्य झाले, तर या देशात हिंदु राष्ट्र येण्यासाठी आवश्यक जनमत सहज सिद्ध होऊ शकते. माझे सर्व संप्रदायांच्या प्रमुख संतांना आवाहन आहे की, आता तुम्ही हिंदु राष्ट्रासाठी तुमचे अर्जुन, हरिहर-बुक्कराय, चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासम असलेले शिष्य द्या ! त्यांना हिंदु-राष्ट्रासाठी समर्पित करा; कारण राष्ट्र टिकले, तर हिंदु धर्म टिकेल. हिंदु धर्म टिकला, तर सांप्रदायिक टिकतील; कारण त्यांच्यात आणि हिंदु धर्मात अद्वैत आहे. सांप्रदायिकांनो, सद्यस्थितीतील संधीकालाचा लाभ करून घ्या ! हिंदु राष्ट्र-निर्मितीचे साक्षीदार नव्हे, भागीदार बना !, असे विद्युल्लतेसम सळसळते मार्गदर्शन गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील वैदिक उपासना पिठाच्या पू. तनुजा ठाकूर यांनी केले. त्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २० जून या दिवशी सायंकाळच्या सांप्रदायिक ऐक्याशी संबंधित सत्रामध्ये बोलत होत्या.

सनातन हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ; मात्र हिंदूंचे धर्माचरण अत्यावश्यक ! - पू. साध्वी रेखाबहनजी, गुजरात

पू. साध्वी रेखाबहनजी
       सनातन हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ आहे. विश्‍वाला गणित देणारे श्रीनिवासन् रामानुजाचार्य, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य भारतीय संस्कृतीनेच दिले. त्यामुळेच अमेरिकेतील विद्यापिठांत गीता शिकवली जाते. फ्रेंच शास्त्रज्ञ अ‍ॅन्टोनी डेव्हिस हा ॐकारातून येणार्‍या मोठ्या ऊर्जेमुळे चकित होतो. आज पाश्‍चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजी बापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत तुलसीपूजन, गोरक्षण इत्यादींचे आयोजन करण्याची कल्पना मांडली. हिंदु पद्धतीनुसार सण साजरे करणे, आदिवासी भागातील हिंदूंना आधार देणे, व्यसनमुक्ती आदींचे प्रयोजन केले आहे. हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ आहे; मात्र त्याचे आचरण केले नाही, तर हिंदु धर्म होता, असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठीच हिंदु धर्माचे आचरण करणे, हे अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन संत श्री आसारामजीबापू यांच्या शिष्या पू. साध्वी रेखाबहनजी यांनी केले. पू. रेखाबहनजी यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी संत श्री आसारामजीबापू यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याच्या लहान-लहान ध्वनीचित्रचकत्या दाखवल्याने विषय परिणामकारक झाला.

हिंदु राष्ट्रासाठी हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा अपरिहार्य ! - ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील द्वितीय दिवशीचा वृत्तांत
ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल,
अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
      विद्याधिराज सभागृह, रामनाथी (वार्ता.) - देशातील एन्डीटीव्ही, टाइम्स, सीएन्एन्-आयबीएन्, स्टार, हिंदुस्थान टाईम्स आदी माध्यमसमूह ही विदेशातील ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात माध्यमांमध्ये कितीही माहिती दिली, तरी त्यांना योग्य प्रसिद्धी दिली जात नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करत असतांना हिंदुद्रोही माध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा देणे अपरिहार्य आहे. तो लढा प्रामाणिकपणे आणि धर्महिताच्या दृष्टीकोनातून दिल्यास आपण यशस्वी होऊ शकतो, असे अनुभवकथन लष्कर-ए-हिंदचे अध्यक्ष तथा हिंदुस्थान नॅशनल पार्टीचे अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले.

सेल्फी आणि मृत्यू !

      नुकतीच मुंबईच्या एका समुद्र किनार्‍यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाने त्याचा जीव गमावल्याची घटना घडली. या आधीही अनेक वेळा सेल्फीच्या वेडापायी अनेकांना अशा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. भारतात मोठ्या संख्येने असणारा युवावर्ग एकीकडे पब संस्कृती, चंगळवाद यात गडलेला दिसतो, तर दुसरीकडे असे नाहक बळी जात आहेत. ही चिंता करण्याजोगी स्थिती नाही का ? भारतापुढे आज काय कमी समस्या आहेत ? एकीकडे आपण भारताला विकसीत राष्ट्र बनवण्याच्या वल्गना करतो, तर दुसरीकडे हे असे हकनाक बळी जात आहेत. हे म्हणजे हाती पायी खोडी त्याला कोण काय करी ? असे झाले.

हिंदूंनी आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगला पाहिजे ! - प्रा. शिवकुमार ओझा, ठाणे

        आज हिंदीसह विविध भाषांचा प्रसार केला जातो; मात्र आपल्या भाषांमध्ये अनेक गुण असतांना हे प्रसारक ते गुण सांगू शकत नाहीत. मुलांना शाळांमध्ये हिंदीचे गुण शिकवले गेले पाहिजे. या गुणांचे ज्ञान झाल्यावर मुलांमध्ये भाषेविषयी स्वाभिमान जागृत होईल. हिंदु संस्कृती प्रकट होण्याचे मुख्य माध्यम भाषाच असते. हे माध्यमच मजबूत हवे. आपल्या कुठल्याही प्राचीन ग्रंथांमध्ये संभवत:, कदाचित् अशा शब्दांचा वापर दिसून येत नाही; कारण हिंदु संस्कृतीतील ज्ञान निश्‍चयात्मक आहे. याउलट पाश्‍चात्यांचे ज्ञान संशयात्मक बुद्धीचे असल्यामुळे त्यांच्या ग्रंथांमध्ये ठिकठिकाणी संभवत: कदाचित् यांसारख्या शब्दांचा उपयोग केल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंदूंनी आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगला पाहिजे. हिंदु संस्कृती जीवनाचे ध्येय सुनिश्‍चित करते. ही संस्कृती धर्माचे स्वरूप स्पष्ट करते. त्याचबरोबर सृष्टीतील प्रमुख तत्त्वांचे ज्ञानही स्पष्ट करते. ही संस्कृती शाश्‍वत तत्त्वांच्या आधारावर असल्याने ती सनातन आहे, शाश्‍वत आहे, ती नष्ट होत नाही. 

हिंदूंची फसवणूक करणार्‍या राजकीय पक्षांना भुलू नका ! - जीतेंद्र ठाकूर, हिंदु महासभा, उत्तरप्रदेश

जीतेंद्र ठाकूर,
हिंदु महासभा, उत्तरप्रदेश
      धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेत वसंतपंचमीला श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास मज्जाव केला जातो. धर्मांधांना तेथे नमाजपठण करू दिले जाते. नेहमी हिंदूंवर लाठीमार केला जातो. या वर्षी मात्र आम्ही नियोजनबद्धरित्या वसंतपंचमीला हिंदूंवर लाठीमार होऊ नये, यासाठी २५ जानेवारीपासून आंदोलनाला प्रारंभ केला. त्यामुळे जनजागृती झाली आणि हिंदूंवर लाठीमार झाला नाही. तेथे जगद्गुरु शंकराचार्य श्री नरेंद्रानंद सरस्वती आले; मात्र त्यांना काही राजकीय पक्षांच्या हिंदु संघटनांनीच विरोध केला. ते पाहून आम्ही चक्रावून गेलो; मात्र आम्ही निर्धार केला होता. आम्ही माध्यमांसमोर गेलो, तेव्हा स्थानिक पोलिसांवर दबाव आला आणि त्यांनी मुसलमानांना त्यांच्या १ च्या वेळेपूर्वी १२ वाजताच नमाजपठण करून त्यांचे चित्रीकरण करून घेतले.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात संत आणि मान्यवर यांच्या हस्ते ग्रंथप्रकाशन

संतश्री आसारामजीबापू आश्रमाच्या आसाराम बापू खतरा या साजिश या ग्रंथाचे प्रकाशन
करतांना डावीकडून पू. तनुजा ठाकूर, पू. रेखाबहनजी, श्री. प्रदीप खेमका आणि पू. सिरियाक वाले
सनातनच्या भोंदू साधूंमुळे होणारी धर्महानी या ग्रंथाच्या हिंदी भाषेतील आवृत्तीचे प्रकाशन
करतांना डावीकडून पू. तनुजा ठाकूर, पू. रेखाबहनजी, श्री. प्रदीप खेमका आणि पू. सिरियाक वाले

अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पत्रलेखनाद्वारे हिंदु धर्मासाठी योगदान द्या ! - के.व्ही. रमणमूर्ती, तेलंगणा

 के.व्ही. रमणमूर्ती, तेलंगणा
      हिंदूंची देवळे, त्यांच्यावरील धर्मांधांचे छुपे आक्रमण, देवळांची दुरवस्था आदींच्या संदर्भातील प्रश्‍नांची हिंदूंना चांगली जाण असते; मात्र त्या संदर्भात योग्य कृती करतांना त्यांच्याकडून गल्लत होते. मलाही आपल्या देवळांच्या संदर्भात काही समस्या दिसल्या. तेव्हा मी त्या समस्येचा पूर्ण अभ्यास केला. त्या संदर्भात आवश्यक तेथे माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली. त्यानंतर त्या समस्येच्या संदर्भात सहजसोपे वर्णन करणारे पत्र वृत्तपत्रांना दिले आणि तेच पत्र कात्रणांसह मुख्यमंत्री अन् शासकीय अधिकारी यांना पाठवले. त्यामुळे हिंदूंच्या अनेक समस्यांवर मुख्यमंत्र्यांनीही योग्य ती कार्यवाही केली; म्हणजे अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पत्रलेखनाद्वारे हिंदु धर्मासाठी मोठे योगदान देता येऊ शकते, असा विश्‍वास रंगा रेड्डी (तेलंगणा) येथील श्री. के.व्ही. रमणमूर्ती यांनी व्यक्त केला. भाषणाच्या शेवटी श्री. रमणमूर्ती यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !, असे निक्षून सांगितले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदूंच्या रक्षणासाठी कार्यरत असणारे बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा केंद्रसरकारने नाकारला !

भारत शासनाचा हिंदुद्वेष ! मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !
    गोवा येथे १९ ते २५ जून या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात प्रतिवर्षी भारतातील हिंदुत्वनिष्ठांसह नेपाळ, बांगलादेश येथील हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठही सहभागी होतात. बांगलादेशमधून बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. रवींद्र घोष हे प्रतिवर्षी या हिंदू अधिवेशनात सहभागी होत असतात; मात्र या वर्षी श्री. घोष यांना या अधिवेशनासाठी भारतात येण्यासाठी भारत शासनाकडून व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

    स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या सर फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे. त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत. 
(लोकजागर, वर्ष २ रे, अंक ४०, १२ एप्रिल २०१३)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. मुसलमान आणि ख्रिश्‍चनांसाठी त्यांचे स्वतंत्र निधी असतांना मंदिर निधी त्यांचेसाठी का वापरले जातात? 
२. भारताचा अविभाज्य भाग असण्याच्या बाबतीत महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तरप्रदेश या राज्यांपेक्षा जम्मू-काश्मीर राज्य वेगळे कसे ? त्याच्या घटनेत कलम ३७० का ?
३. ज्या खिलाफत चळवळीशी भारताचा काहीही संबंध नाही, त्या चळवळीला गांधींनी पाठिंबा का दिला आणि त्यामुळे त्यांना वा भारताला काय मिळाले?
      घर, संस्कृती आणि देवालय हे हिंदु समाजाचे केंद्रबिंदू आहेत. सद्यस्थितीत ही जीवनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे अराष्ट्रीयतेचे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. ते दूर करण्यासाठी धार्मिकता आणि राष्ट्रीयता यांची सांगड घालावी लागेल. तरच आपण हिंदु म्हणून जगू शकू ! - प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोवा

तत्त्वावर आधारित हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
१. अध्यात्मातील तत्त्वांचे महत्त्व
     अध्यात्मात, तसेच विज्ञानातही काही तत्त्वांचा अंगीकार केलेला असतो आणि त्या तत्त्वांवर आधारित ते कार्य करत असतात. विज्ञानाची तत्त्वे वारंवार आणि स्थळ काळानुसार पालटतात; परंतु अध्यात्माची तत्त्वे स्थळकालातीत असतात. अनादि कालापासून आलेली अध्यात्मातील तत्त्वे आजही लागू पडतात आणि पुढेही लागू पडतील. 
१ अ. अध्यात्मात कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वाचे महत्त्व !
    गुरु हेही एक तत्त्व आहे. या तत्त्वानेच काही संत आणि गुरु यांची निर्मिती केली आहे. देहधारी गुरु कितीही असले, तरी ते सर्व एकाच गुरुतत्त्वाने एकमेकांशी जोडलेले असतात. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. ते ऐकण्याचे, वाचण्याचे किंवा बघण्याचे शास्त्र नाही. जो तत्त्वाधारित साधना करतो, त्याला हे तत्त्व प्रगतीकडे घेऊन जाते. तत्त्वाचे कार्य चुकांविरहित असून व्यक्तीचे आचार, विचार आणि प्रयत्न यांवरच ते त्याला साधनेचे फळ देते. त्यात कोणत्याही प्रकारची चूक होणे शक्य नाही. मनुष्याच्या जीवनात ही साधनेची तत्त्वेच कार्यरत असल्याने त्याची पुढची साधना, तसेच जन्म, प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, आवड-नावड, वासना, इष्ट-अनिष्ट या गोष्टी त्यावरच निर्धारित असतात. व्यक्तीने केलेल्या कर्माप्रमाणे त्याला फळ मिळते.

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

  • एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता !
  • पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
    १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. ही वृत्ते त्यांना कोण पुरवत होते, हा प्रश्‍न आहेच आणि ती वृत्ते जर केंद्रीय अन्वेषण विभाग पुरवत होता, तर या विषयाचे गांभीर्य पाहून त्याने पत्रकार परिषद का घेतली नाही ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. या कथित वृत्तांतील असत्यकथन काळाच्या ओघात उघडे पडेलच; मात्र या कालावधीत सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.

पू. भगवंतकुमार आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय नामजप करत असलेल्या वेळेत नामजप करण्यापूर्वी अन् नामजप करतांना साधिकेला झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

पू. भगवंतकुमार मेनराय
पू. सूरजकांता मेनराय 
१. नामजपाला जाण्यापूर्वी 
अ. नामजपाला जायचे म्हटले की, मन अस्वस्थ होत होते. 
आ. नामजपाला जाऊच नये, असे विचार मनात येत होते किंवा मन काहीतरी कारण सांगत होते. 
इ. त्या वेळी संपूर्ण जागृतावस्था नाही, तर ग्लानी असायची. 
२. नामजपाच्या खोलीत गेल्यावर 
अ. नामजपाच्या खोलीत गेल्यावर शारीरिक त्रास असह्य होणे आणि त्या ठिकाणचे चैतन्य सहन न होणे

नेतृत्वगुण आणि प्रेमभाव या गुणांनी युक्त असलेले अन् इतरांच्या आनंदात आनंद घेणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रमानंद गौडा !

श्री. रमानंद गौडा
श्री. यशवंत कणगलेकर
१. कन्नड ग्रंथासाठी विज्ञापने घेण्याचे नियोजन करणे आणि सेवेमधील अडचणी विचारून त्यावर उपाययोजना सांगणे 
   १.१२.२०१५ या दिवशी मी सेवेनिमित्त मंगळुरू येथे पोचलो. सेवेविषयी निश्‍चित बोलणे झाले नव्हते. श्री. रमानंद गौडा यांनी मला येण्याचा निरोप देतांना सांगितले होते, काका, तुम्ही कर्नाटक दौर्‍यावर या. तुम्ही आल्यानंतर तुमचा लाभ कसा करून घेऊ शकतो, हे आम्ही ठरवू. मी पोचण्यापूर्वी रमानंदअण्णा माझी वाट पाहत होते. त्यांना जिल्ह्यात सेवेसाठी जायचे होते. वेळ अल्प होता. माझे नियोजन करण्यासाठी ते थांबले होते. मी आल्याचे समजताच ते माझ्या खोलीत आले. माझी विचारपूस करून त्यांनी नियोजन काय करू शकतो?, याविषयी विचारणा केली. आगामी कन्नड ग्रंथांसाठी विज्ञापन घेण्याचे ठरले. सेवेच्या अनुषंगाने कार्यपद्धतीप्रमाणे लेखा विभागाला विचारून उडुपी जिल्ह्यात सेवेला जाण्याची माझी व्यवस्था केली आणि ते सेवेला निघून गेले. प्रत्येक रात्री त्यांचा भ्रमणभाष यायचा आणि अडचणी विचारून ते त्यावर उपाययोजनाही सांगत होते.

ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्रातील भारतरत्नाचा सत्कार !
प्रा. शिवकुमार ओझा (डावीकडे) यांचा सत्कार
करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा, २० जून (वार्ता.) - हिंदु संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणारे ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा (वय ८३ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी सर्वांना देण्यात आली. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन प्रा. ओझा यांचा सत्कार केला. भगवान श्रीकृष्णाने केलेल्या या कृपेसाठी उपस्थित सर्व धर्माभिमान्यांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.

पू. (सौ.) मेनरायकाकूंच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सौ. श्रुति सहकारी
१. पू. (सौ.) मेनरायकाकूंच्या जागी एक देवता तारक रूपात दिसणे, ती पद्मावतीदेवी असल्याचे जाणवणे, श्रीसूक्तातील काही ओळी आठवणे आणि मानसरित्या प्रत्येक नामजपासमवेत एकेक कमळ तिच्या चरणी वाहणे : २५.७.२०१५ या दिवशी पू. (सौ.) मेनरायकाकू नामजप करत असतांना मी तेथे नामजप करण्यासाठी बसले होते. त्यांच्याकडून आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होतांना आणि आनंदाचे तुषार उडतांना दिसले. त्यानंतर त्यांच्या जागी एक देवता तारक रूपात दिसून ती पद्मावतीदेवी असल्याचे जाणवले. ती एका कमळांनी भरलेल्या तळ्यात बसलेली होती. त्यानंतर मला श्रीसूक्तातील काही ओळी आठवल्या. देवाला मी तिच्या चरणी कोणती फुले वाहू ?, असे विचारल्यावर कमळांनी भरलेली टोपली बाजूला दिसली. मानसरित्या प्रत्येक नामजपासमवेत एकेक कमळ तिच्या चरणी वाहिले.

गुरुपौर्णिमा मास २०१६

     १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

स्वभाषाभिमान आणि साधनेचे गांभीर्य असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रत्नागिरी येथील कु. अथर्व संजय माने (वय ८ वर्षे)

कु. अथर्व माने
१. आश्रमात साधकांनी फलकावर मराठीत चुका लिहिल्याचे पाहून 
मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करणे 
      हिंदु अधिवेशनाच्या सेवेसाठी कु. अथर्व आईसोबत रामनाथी आश्रमात गोवा येथे गेला होता. त्या वेळी सर्व साधक स्वतःच्या चुका फलकावर मराठीत लिहितात. ते पाहून अथर्वने मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. या आधी तीन वर्षे अथर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. देवाची इच्छा म्हणून अथर्व म्हणत असेल, असा विचार करून आम्ही जून २०१५ मध्ये त्याचे नाव इंग्रजी माध्यमातून मराठी शाळेत घातले.

प्रधान गुणानुसार जिज्ञासेचे प्रकार !

१. सात्त्विक जिज्ञासा 
     सात्त्विक जिज्ञासा म्हणजे ईश्‍वरप्राप्तीच्या ओढीने निर्माण झालेले प्रश्‍न. या प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यामुळे ईश्‍वरप्राप्तीतील अडथळे दूर होऊन कार्यसिद्धी होते. 
२. राजसिक जिज्ञासा 
     राजसिक जिज्ञासा म्हणजे बुद्धीची भूक भागवण्याकरिता किंवा लौकिकदृष्ट्या मानाचे स्थान मिळण्यासाठी ज्ञान मिळवणे.
३. तामसिक जिज्ञासा 
     तामसिक जिज्ञासा म्हणजे दुसर्‍याची हानी करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवण्याची धडपड. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१६)५ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे www.Hindujagruti.org वर ऑनलाईन प्रसारण !

    अधिवेशनातील महत्त्वाची सत्रे www.HinduJagruti.org/summit या हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या मार्गिकेवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. आज (२२ जून या दिवशी) होणार्‍या प्रक्षेपणातील उद्बोधन सत्रांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी ९.४५ ते ११.०५ : राष्ट्ररक्षण
सकाळी ११.०५ ते १२.३० : हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांविषयी उद्बोधन सत्र
सायं. २.३० ते ४.०० : हिंदुत्ववाद्यांचे मनोगत
सायं. ५.३० ते ८.०० : हिंदु राष्ट्राची स्थापना
टीप : वरील थेट प्रक्षेपणाच्या वेळा या संभाव्य रूपरेषेनुसार ठरवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये परिस्थितीनुसार पालटही होऊ शकतो.

साधकांना सूचना

        पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

साधकांनो, संशयास्पद व्यक्ती आपल्या कार्यक्रमांमध्ये येऊन हेरगिरी करत असल्यामुळे सतर्कता बाळगा !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या परिसरात संशयास्पद व्यक्तींचा वावर !
१. अधिवेशनाच्या प्रथम दिवशी एका व्यक्तीने हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगून हिंदू अधिवेशनामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे तिचा प्रयत्न फसला. नंतर तीच व्यक्ती श्री रामनाथ देवस्थानच्या निवासी खोलीत थांबल्याचे आढळून आले. ती व्यक्ती कर्नाटकमधून आल्याचे समजले.
२. अधिवेशनाच्या प्रथम दिवशी एक व्यक्ती त्यांच्या परिचयाचा एका हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता अधिवेशनाला आल्याचे सांगत होती, तसेच ती व्यक्ती त्या कार्यकर्त्याविषयी इतरांकडेही विचारणा करत होती.
३. नाशिक येथील एक हिंदुत्ववादी यांना अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी नकार कळवण्यात आला होता. तरीही ते अधिवेशनस्थळी आले हाते. त्यांना परत पाठवण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

यवतमाळ येथे धर्मांधांकडून 
वारकर्‍यांच्या दिंड्यांवर दगडफेक !
       यवतमाळ (महाराष्ट्र) येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आर्टीओ) परिसरात धर्मांधांनी वर्धा ते पंढरपूर पायी जाणार्‍या वारकर्‍यांच्या २ दिंड्यांवर २० जून या दिवशी सायंकाळी दगडफेक केली. यात अनेक वारकरी घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

जागो ! : महाराष्ट्र के यवतमाल में पंढरपूर जा रहे तीर्थयात्रीयोंपर कट्टरपंथीयोंने की पत्थरबाजी में कई तीर्थयात्री घायल हुए ।
क्या यह पाकिस्तान है ?
Jago ! : Maharashtra ke Yavatmal me Pandharpur ja rahe tirthyatriyonpar kattarpanthione ki patharbaji me kai tirthyatri ghayal hue !
Kya ye pakistan hai ?

गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्लक

       स्वतःच्या गुरुपणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला गुरुपद प्राप्त करून देतात.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २२ जून या दिवशी हाताळले जाणारे विषय !

सकाळी ९.४५ ते ११
उद्बोधन सत्र : राष्ट्ररक्षण
१. आपत्कालिन परिस्थितीतील व्यवस्थापन शिकण्याची आवश्यकता
२. चेन्नईतील महापुराच्या वेळी पीडितांना साहाय्य करतांना आलेले अनुभव
३. राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने पिछाडीवर असलेले हिंदू आणि उपाययोजना
४. बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना विरोध आणि उपाययोजना
सकाळी ११ ते १२.३०
उद्बोधन सत्र : विविध राज्यांतील असुरक्षित हिंदू
१. उस्मानिया विद्यापिठातील गोमांस मेजवानीच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचे यश
२. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रसारमाध्यमांसमोर हिंदुत्वाची बाजू मांडण्यासाठी हिंदु धर्माचे प्रवक्ता व्हा !
३. हिंदु राष्ट्रातील धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था कशी असेल ?
४. समान सूत्री कर्यक्रमात येणार्‍या अडचणी आणि त्यांचे निवारण

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
योगाचा अर्थही ज्ञात नसलेले 
शासन साजरा करत आहे, योगदिन !
योगश्‍चित्तवृत्तीनिरोधः ।, (पातञ्जलयोगदर्शन, पाद १, सूत्र २)
अर्थ : चित्तवृत्तींचा निरोध करणे, म्हणजे योग. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास मनातील संस्कार नष्ट करणे, म्हणजे योग.
       अशी योगाची व्याख्या आहे. चित्तवृत्तींना विरोध करण्यासाठी स्वतः साधना करावी लागते आणि जनतेलाही शिकवावी लागते. हेही ज्ञात नसलेले शासनकर्ते एक दिवस योग साजरा करून हिंदूंचे काय भले करणार ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनातील वादळे नकोत !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
समुद्रातील वादळ थोड्या काळात नाहीसे होते; पण मनातील वादळ एकदा निर्माण झाले की, 
ते आवरणे कठीण ! म्हणून मनातील ही वादळे निर्माण होऊ न देणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

महागाईवर ठोस उपाययोजना कधी ?

संपादकीय
      भारतात जवळपास सर्वच वर्गांतील लोक जेवणात कोणत्या ना कोणत्या प्रकारची डाळ वापरतात आणि ती आता जीवनावश्यक वस्तूही झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव वाढतच असल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहे. विशेषकरून तूरडाळीवर तर सध्या साठेबाजांचेच नियंत्रण असून ही डाळ मध्ये मध्ये प्रतिकिलो १६० रुपयांचाही टप्पा गाठते. डाळीची कमतरता असल्याने शासनाने आफ्रिका आणि म्यानमार येथून डाळ आयात करणे, डाळीची स्वत:च विक्री करणे, अशा उपाययोजना करण्यासाठी शासनाची धडपड आहे; मात्र डाळींचे भाव स्थिर ठेवणे, ही खरी उपाययोजना असून त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न हवेत. सध्याही स्वस्त धान्य दुकानांतून धान्य मिळतेच; मात्र त्याचा दर्जा, गुणवत्ता आणि उपलब्धता यांचा विचार करता त्याचा लाभ मर्यादित क्षेत्रांपुरताच दिसून येतो.

चित्रपटांच्या माध्यमातून नैतिक मूल्य उद्ध्वस्त करण्याचा डाव !

संपादकीय
     अनुराग कश्यपचा नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला उडता पंजाब हा चित्रपट केंद्रीय परीक्षण मंडळाने अयोग्य भाषेचा अधिक वापर, हिंसाचार आणि पंजाबचे अयोग्य चित्रण या कारणांमुळे संमत केला नव्हता. यानंतर अनुराग कश्यप यांनी उच्च न्यायालयात जाऊन संमती मिळवली. या निमित्ताने चित्रपट परीनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर) असावे कि नसावे, मंडळाला चित्रपट अडवण्याचे काय अधिकार, यावर चर्चा चालू झाली आहे. गेल्या १० वर्षांत चित्रपटांचा सर्वच स्तरांवर खालावलेला दर्जा पहाता एकूणच भारतीय संस्कृती, सभ्यता, नीतीमूल्ये झपाट्याने मोडीत काढण्यासाठीच रचले जात असलेले एक व्यापक षड्यंत्र आहे, असेच म्हणावे लागेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn