Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आजची तिथी

मंगळवार,
ज्येष्ठ कृष्ण पक्ष प्रतिपदा,२१ जून २०१६
कलियुग वर्ष ५११८

विनम्र अभिवादन

डॉ. हेडगेवार स्मृतीदिन


दैनिक डाउनलोड करा

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या ४ दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली !

डॉ. तावडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
     पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २० जून या दिवशी न्यायमूर्ती व्ही.बी. गुळवे-पाटील यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) अधिवक्ता डी.बी. राजू यांनी ४ दिवसांच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. या मागणीवर सनातन संस्थेचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी शासकीय अधिवक्त्यांचा युक्तीवाद खोडून काढून त्यांनी सडेतोड केलेल्या प्रतिवादामुळे न्यायालयाने डॉ. तावडे यांना न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश दिला.
कोल्हापूर पोलिसांकडून डॉ. तावडे यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न !
     डॉ. तावडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर कोल्हापूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी अमृत देशमुख यांनी डॉ. तावडे यांचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयात आवेदन सादर केले. त्यावर न्यायालयाने डॉ. तावडे यांना आधी कारागृहात पाठवावे, त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी चौकशी करावी. त्यापूर्वी पोलिसांनी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट केले.

पाकमध्ये ॐ हे चिन्ह छापलेल्या चपलांची विक्री, हिंदूंचा तीव्र विरोध !

पाकमधील धर्मांधांचा हिंदुद्वेष !
हिंदूंनो, पाकला ॐचे विडंबन रोखायला लावण्यासाठी केंद्रशासनाला भाग पाडा !
     नवी देहली - पाकमधील तांडो आदम शहरात असणार्‍या फरमान अहमद की जेब या दुकानात ॐ हे चिन्ह असलेल्या चपलांची सर्रास विक्री केली जात आहे. यास पाकच्या सिंध प्रांतातील हिंदूंनी विरोध दर्शवला आहे. पाकमधील हिंदु नेते डॉ. रमेश कुमार वंकावानी म्हणाले, तांडो आदम शहरात गेल्या ३ वर्षांपासून ईदच्या काळात हिंदूंसाठी पवित्र असलेले चिन्ह छापलेल्या वस्तूंची विक्री केली जात असून त्यामागे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, हा एकमेव उद्देश आहे. आम्ही याविरोधात ऑनलाईन मोहीम राबवून अशा चपलांची विक्री त्वरित थांबावी, अशी मागणी करत आहोत. शासनाने अशा चपलांची विक्री न थांबवल्यास प्रसंगी हिंदु तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतील.

संरक्षण क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस मान्यता

     नवी देहली - केंद्रसरकारकडून संरक्षण क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. सरकारकडून संरक्षण क्षेत्रासह औषधनिर्मिती आणि नागरी उड्डाण क्षेत्रातही १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीलाही मान्यता देण्यात आली.

हिंदूंचे स्थलांतर होणे वेदनादायी ! - सरसंघचालक

     जोधपूर - देशातील काही भागांमध्ये हिंदूंचे स्थलांतर होत असल्याचे वृत्त वेदनादायी आणि व्यथित करणारे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त जोधपूर येथे स्वयंसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते पुढे म्हणाले, अशा लोकांच्या मनामधील निराशेची भावना दूर करून हा देश आणि ही भूमी आपली असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये रुजवणे, हे आपले दायित्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परकियांच्या सततच्या आक्रमणामुळे हिंदूंंमधील भीती आणि निराशा प्रचंड प्रमाणात वाढली होती; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंना एकत्रित करून त्यांच्यामध्ये त्याग आणि राष्ट्र्रवादाची भावना प्रज्वलित केली. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संघही हिंदु समुदायास एकत्र आणून बलिष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहे.

आम्हाला बाबरी मशीद पाडतांना कुणी रोखू शकले नाही, राममंदिर बांधण्यापासून कोण रोखणार ? - भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ

     लक्ष्मणपुरी (लखनौ) - अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीद पाडतांना आम्हाला कुणी रोखू शकले नाही, राममंदिर बांधण्यापासून कोण रोखणार ?, असा प्रश्‍न भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. १९ जून या दिवशी बस्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या रामकथेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार योगी आदित्यनाथ यांनी तथाकथित समाजसेविका मदर तेरेसा यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, मदर तेरेसा समाजसेवेच्या नावावर धर्मांतर करत होत्या. आजही सेवेच्या नावावर तेच उद्योग चालू आहेत. त्यांचे सहकारी भारताचे ख्रिस्तीकरण करण्याचे काम करत होते. ख्रिस्ती मिशनर्‍यांनी कसे ख्रिस्तीकरण केले आहे, हे झारखंड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय या राज्यांमध्ये जाऊन बघा.
आता पुरस्कारवापसी का नाही ?
     कैराना येथून होत असलेल्या हिंदु धर्मियांच्या स्थलांतराविषयीही आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, हिंदू कधीपर्यंत स्थलांतर करणार आहेत आणि ते जाणार तरी कुठे ? पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून हिंदूंना पळवून लावण्यात आले तेव्हा कुणी असहिष्णुतेच्या गोष्टी का केल्या नाहीत ? किंवा पुरस्कार का परत केले नाहीत ?

मद्यबंदीशिवाय योग निरर्थक ! - नितीशकुमार

     पाटलीपुत्र (पाटणा) - मद्यावर बंदी घातल्याशिवाय योगाची मोहीन निरर्थक आहे, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी येथे केले. ते पुढे म्हणाले, योग ही नैसर्गिक उपचारपद्धत आहे. मद्यपानापासून लांब रहाणे, हा योगासने करण्याचा पहिला नियम आहे. योगदिन आणि मद्यविक्री एकाच वेळी केली जाऊ शकत नाही. खर्‍या आव्हानांवर केंद्र सरकार काहीही उपाययोजना करत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी किमान भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये तरी मद्यपानावर बंदी आणावी.

आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होणार !

     नवी देहली - देशभरात २१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार आहे. २१ जून हा आंतरराष्ट्र्रीय योगदिन घोषित झाल्यानंतरचा हा दुसरा योगदिन आहे. योगदिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चंदीगडमध्ये होणार आहे. या वेळी पंतप्रधान मोदी स्वत: योग करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ओझर (जिल्हा पुणे) येथील श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगराच्या दरडी कोसळण्याची शक्यता

लेण्याद्री डोंगराच्या रक्षणासाठी पुरातत्व विभाग आणि राज्यशासन काही प्रयत्न करेल का ?
     ओझर - श्री अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी डोंगरामधील लेण्यांमध्ये लक्षावधी भाविक जातात. त्या डोंगरावर दर्शन मार्गाने जाणार्‍या ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
१. लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मक गणेश मंदिरावर असलेला डोंगर आणि खडक यांची ऊन, वारा अन पाऊस यांमुळे झीज झाली असून त्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत.
२. पावसाळ्यात या भेगा आणि खडकाच्या कपारी यांमध्ये पाणी मुरून डोंगराच्या दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर्शनरांगेच्या वरती डोंगरात एक झाड असून तेही कोणत्याही क्षणी उन्मळून पडून अपघात होऊ शकतो.
३. उपाययोजना करण्याविषयी श्री लेण्याद्री देवस्थानने जुन्नर येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना विनंती आवेदन (अर्ज) पाठवूून कळवले आहे. (ही स्थिती पुरातत्व विभागाला दिसत नाही का ? उपाययोजनांसाठी आवेदन करण्याची आवश्यकता का भासावी ? - संपादक)

हिंदूंच्या रक्षणासाठी कार्यरत असणारे बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा केंद्रसरकारने नाकारला !

     भारत शासनाचा हिंदुद्वेष ! मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !      गोवा येथे १९ ते २५ जून या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात प्रतिवर्षी भारतातील हिंदुत्वनिष्ठांसह नेपाळ, बांगलादेश येथील हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठही सहभागी होतात. बांगलादेशमधून बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. रवींद्र घोष हे प्रतिवर्षी या हिंदू अधिवेशनात सहभागी होत असतात; मात्र या वर्षी श्री. घोष यांना या अधिवेशनासाठी भारतात येण्यासाठी भारत शासनाकडून व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

हिंदु राष्ट्रात न्यायालयीन प्रक्रियेत सर्वांना समान न्याय असेल ! - अधिवक्ता विष्णुशंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस, लखनौ (उत्तरप्रदेश)

अधिवक्ता विष्णुशंकर जैन
रामनाथी, गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन
     विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - आज कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल १९,२५,२९,३० कलमाचा उपयोग व्यक्तीनुरूप पालटले जात आहे. श्री. कमलेश तिवारी यांनी इस्लामविषयी कथित धर्मभावना दुखवणारे वक्तव्य केल्याविषयी त्यांना रासुका कायद्याखाली अटक करून गेले ७ महिने अवैधपणे कारागृहात टाकले आहे; मात्र त्याच वेळी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे वक्तव्य करूनही आझम खान आणि अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर मात्र कारवाई करण्यात आली नाही आणि त्यांना जामीनही देण्यात आला. आज काही विधीतज्ञ केशवानंद भारती खटल्याच्या आधारे संविधानाच्या मूळ ढाच्यात पालट करण्यात येणार नाही, असे सांगतात. प्रत्यक्षात या खटल्यातील १३ न्यायमूर्तींपैकी केवळ एका न्यायमूर्तींनी तो निष्कर्ष मांडला होता. अशी सूत्रे हिंदूंना अंधारात ठेवण्यासाठी उपयोगात आणली जातात. हिंदु राष्ट्रात न्यायालयीन प्रक्रियेतील हा खोटेपणा टाळला जाईल आणि सर्वांना समान न्याय मिळेल, असे प्रतिपादन लखनौ (उत्तरप्रदेश) येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टीसचे अधिवक्ता श्री. विष्णुशंकर जैन यांनी केले. ते पहिल्या दिवसाच्या धर्मरक्षणासाठी न्यायालयीन स्तरावर करावयाचे प्रभावी कार्य आणि वैचारिक मार्गदर्शन या सत्रात बोलत होते. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक श्री. नीलेश सांगोलकर यांनी परिषदेच्या यशस्वी कार्याचा वार्षिक आढावा मांडला.

लव्ह जिहाद हे हिंदूंची जननशक्ती नष्ट करण्याचे षड्यंत्र ! - अर्पणा रामतीर्थकर

    पुणे - हिंदु स्त्रिया धर्माचरण करत नसल्याने धर्म धोक्यात आला आहे. वर्ष १९४७ मध्ये इंग्रज भारत सोडून जातांना त्यांनी काळे इंग्रज अर्थात भारतियांना इंग्रजाळलेले करून गेले. आजच्या स्त्रिया स्वत:च धर्माचे पालन करत नसल्यानेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या १ लक्ष ७५ सहस्र मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या. हिंदूंची जननशक्तीच नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे. सध्या धर्माचे तत्त्वज्ञान आईलाच शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. शिवराज्याभिषेकदिन आणि हिंदु साम्राज्यदिनाच्या निमित्ताने १८ जून या दिवशी येथील मंगळवार पेठेतील धर्माभिमानी तरुणांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी स्वरूपवर्धिनी संस्थेच्या मुलांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर केले.
क्षणचित्र - कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात उपलब्ध असलेला लव्ह जिहादची माहिती सांगणारा ग्रंथ अनेकांनी खरेदी केला.

मनसेच्या मोर्च्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या वाहनावर दगडफेक !

     इचलकरंजी - येथे शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वतीने शहरातील विविध प्रश्‍नांसाठी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्च्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, तसेच पोलिसांच्या अंगावर कचरा फेकण्यात आला. शहरातील कचरा समस्या, भटक्या कुत्र्यांची समस्या अशा विविध विषयांवर लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. (शहरातील नागरी प्रश्‍नांसाठी वाचा फोडणे आवश्यक आहे; मात्र त्या वेळी अधिकार्‍यांच्या गाडीवर दडफेक, तसेच अन्य अयोग्य कृती राजकीय पक्षांकडून अपेक्षित नाहीत ! तसेच राजकीय पक्षांना टोकाची पावले का उचलावी लागतात, याचाही विचार प्रशासनाने करणे अपेक्षित आहे ! - संपादक)

देशभक्तांच्या चरित्राचा अभ्यासक्रमात समावेश करावा ! - व्यंकय्या नायडू

सत्ता हाती असतांना असे बोलणे नव्हे, तर कृती करणे अपेक्षित आहे !
     पुणे - भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये लोकमान्य टिळक, सरदार पटेल, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदन मोहन मालवीय अशा थोर स्वातंत्र्यसेनानींचे मोठे योगदान आहे; परंतु दुर्दैवाने त्यांना इतिहासात पुरेसे स्थान देण्यात आलेले नाही. ही उणीव दूर करून नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये देशभक्तांच्या चरित्राचा समावेश केला पाहिजे. त्या दृष्टीने आपण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले. (केवळ चर्चा करून उपयोगी नाही, तर त्यावर लगेचच कार्यवाही कशी होईल, यासाठी केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, अशी देशभक्तांची अपेक्षा आहे. - संपादक) लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या गर्जनेच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
     या वेळी नायडू यांच्या हस्ते लोकमान्यांची सिंहगर्जना - वेध एका शतकाचा या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
देहलीतील महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारणार ! - मुख्यमंत्री
      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वराज्य गर्जनेच्या शतकपूर्तीनिमित्ताने देहलीतील महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात येईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात लोकमान्य टिळकांनी केलेली स्वराज्याची घोषणा आणि तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या गर्जनेने पराभूत मानसिकतेत असलेल्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातून स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झाली.

हिंदूंना आतंकवादी ठरवणारे कैराना येथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविषयी ब्रही काढत नाहीत ! - सुनील कदम

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
     ठाणे, २० जून (वार्ता.) हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असतांनासुद्धा उत्तरप्रदेश येथील कैरानामधून ३४६ हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, हे दुर्दैवी आहे. हिंदूंच्या मतावर निवडून आलेल्या केंद्रसरकारने कैराना येथील हिंदूंचे पुनर्वसन करावे आणि संरक्षण द्यावे. १९९० साली काश्मिरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले होते. तेव्हापासून एकही हिंदु विस्थापित काश्मीरमध्ये जाऊ शकला नाही. आज देशात असहिष्णुतेच्या नावाने आकाडतांडव करणारे आणि हिंदूंना आतंकवादी ठरवणारे कैराना येथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविषयी ब्रही काढत नाहीत. प्रसारमाध्यमे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कैरानातील हिंदूंना न्याय मिळेपर्यंत सर्वांनी संघटितपणे लढा द्यायला हवा, असे प्रतिपादन या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. हे आंदोलन ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सायं. ५ वाजता हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात ५० हिंदुत्ववाद्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

कार्‍होळ (जिल्हा संभाजीनगर) येथील शाळेत शिक्षकच नसल्याने ग्रामस्थांकडून शाळेला कुलूप !

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांमुळे स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही अशी स्थिती उद्भवणे, हे लज्जास्पद !
    संभाजीनगर - येथील कार्‍होळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १५ जून या दिवशी शाळेला कुलूप लावले.
     या वेळी सरपंच रुक्मिणीबाई खलसे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या त्या शाळेत इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत वर्ग असून विद्यार्थी संख्या १७२ आहे. शाळेस ८ शिक्षकांची मान्यता असून प्रत्यक्षात फक्त ५ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी एकच शिक्षिका उपस्थित होत्या, तर अन्य शिक्षिका आल्याच नाहीत. आतापर्यंत गेल्या १० वर्षांत २० शिक्षिकांना नियुक्ती देण्यात आली असून त्यापैकी शाळेत कोणीच आले नाही. (आतापर्यंत ही गोष्ट कोणाच्याही लक्षात कशी आली नाही ? यावरून शिक्षण विभागाचा पाट्याटाकू आणि दायित्वशून्य कारभार दिसून येतो. - संपादक) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता खालावत चालली असून शाळेला कायमस्वरूपी शिक्षक द्यावे. अन्यथा शाळेचे कुलूप उघडणार नाही, अशी चेतावणीही या वेळी खलसे, उपसरपंच कुशावर्ताबाई राऊत आणि ग्रामस्थ यांनी दिली आहे.

सनातनची साधिका कु. ऋतुजा कणसे हिचे एम्.बी.ए. परीक्षेत सुयश

    
कु. ऋतुजा कणसे
सातारा - येथील सनातनचे साधक दांपत्य सौ. आणि श्री. विजय कणसे यांची कन्या कु. ऋतुजा कणसे हिने एम्.बी.ए. परीक्षेमध्ये ६४ प्रतिशत गुण मिळवून सुयश प्राप्त केले आहे.
     कु. ऋतुजाने एम्.बी.ए. मध्ये फायनान्स हा विषय घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. सौ. विजया आणि श्री. विजय कणसे १९९६ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. साधनेच्या बैठकीमुळे कु. ऋतुजावर लहानपणापासूनच साधनेचे संस्कार होण्यास सहाय्य झालेे. नियमित प्रार्थना, नामजप आणि देवाने प्रामाणिकपणे करून घेतलेले प्रयत्न यामुळेच, हे यश प्राप्त झाले असल्याचा कृतज्ञतापूर्वक विचार कु. ऋतुजाने व्यक्त करून दाखवला.

तळेगाव येथील कु. अभिषेक खेडकर याचे शालांत परीक्षेत सुयश !

     तळेगाव (जिल्हा पुणे) - येथील सनातनच्या साधिका सौ. हेमलता खेडकर यांचा मुलगा कु. अभिषेक शिवदत्त खेडकर याला याला सीबीएसई बोर्डाच्या १० वी च्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले आहेत. परिक्षेच्यावेळी तो प्रार्थना आणि नामजप करत असे.

देश बदलला म्हणतात; पण परिस्थिती पालटलेली नाही - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

   
  मुंबई - जन्मोजन्मी हीच मराठी माती, हिंदुत्व आणि हेच राज्य मिळूदे, असे व्रत करा. ज्या मातीत शिवराय जन्मले त्याच मातीत आपण जन्मलो हे केवढे मोठे भाग्य आहे.
     शिवराज्याभिषेकाचा सोहळा पहायला छान वाटतो, पण त्या आधी त्यांनी कितीतरी भोगले. जिवावरची संकटे झेलत औरंगजेबाच्या नाकावर टिचून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांनंतर मुसलमानांनाना येथे येण्यासाठी २७ वर्षे लढावे लागले. शिवसैनिकांना गुंड म्हटले, तरी आमच्यासाठी आम्ही मावळे आहोत; गुंड असते, तर शिवसेना ५० वर्षे जगली नसती. आम्हाला रिजनल पक्ष म्हटले जातेे; पण आम्ही ओरिजनल आहोत. देश बदलला म्हणतात, पण परिस्थिती पालटलेली नाही. चीनची घुसखोरी तशीच चालू आहे. पाकिस्तानची आक्रमणेे चालूच आहेत, असे प्रतिपादन शिवसेनापक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील द्वितीय दिवशीचा वृत्तांत आणि क्षणचित्रे

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधना करणे आवश्यक ! 
- पू. नंदकुमार जाधव, प्रसारसेवक, सनातन संस्था 
     साधना केल्यानेच आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्व कळू शकते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्म-अधर्माच्या संघर्षात साधना करणे आवश्यक आहे. पांडवांनी जसे भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतले, त्याप्रमाणे आपणही भगवंताचे साहाय्य घेतले, तरच आपल्याला धर्मकार्यात यश प्राप्त होईल. त्याकरता कार्याला ईश्‍वराचे अधिष्ठान आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना साधनेचे महत्त्व विषद करतांना केले. 

अकोला येथे हिंदुत्ववाद्यांवर होणार्‍या छळाच्या विरोधात निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     अकोला - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना मुद्दामहून अडकवून त्यांना छळणारे उत्तरदायी पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी. वर्ष २०११ पासून हा खटला मुद्दामहून प्रलंबित ठेवणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई करावी. सर्व खटले द्रुतगती न्यायालयात चालवून साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदू यांना न्याय द्यावा, या मागण्यांसाठी येथील निवासी जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
      काश्मीरमधील हरिपर्वत या टेकडीचे कोह-ए-मारन नामकरण करणे, योगातून ॐ चा उच्चार वगळणे, साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांचा झालेला छळ यांचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत, श्री. अविनाश मोरे सनातन संस्थेच्या सौ. मेघा जोशी आणि सौ. शुभांगी कुळकर्णी उपस्थित होते.

मंचर (जिल्हा पुणे) येथे एक टन गोमांस पकडले, २ धर्मांधांना अटक

गोवंश हत्या रोखण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही आवश्यक !
      मंचर, २० जून - मंचर पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी येथील पुणे-नाशिक महामार्गावर एका पिकअप चारचाकी गाडीतून नेले जाणारे १ टन गोमांस शासनाधीन केले. या प्रकरणी युनूस हुसेन शेख आणि इमाम खलील खान यांंना अटक करून त्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला आहे.
    १८ जून या दिवशी रात्री जुन्नरकडून मुंबईकडे एक पिकअप चारचाकी वाहन गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती मंचर शहरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. (गोमांस पकडून देणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर एकत्रितरित्या ही कारवाई करण्यात आली.

आघाडी शासनाच्या भूखंड वाटपाविषयीची श्‍वेतपत्रिका काढा !

राज्यात स्वतःच्या पक्षाचे शासन असतांना अशी मागणी करावी लागणे, हे लज्जास्पद !
भाजप प्रदेश कार्यकारिणीची ठरावाद्वारे मागणी
     पुणे, २० जून - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनामधील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई चालू आहे. त्याशिवाय त्या शासनाच्या कालखंडात झालेल्या भूखंड वाटपाचीही सखोल चौकशी करून राज्य शासनाने श्‍वेतपत्रिका प्रकाशित करावी, अशी मागणी करणारा ठराव भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये १९ जून या दिवशी संमत करण्यात आल्याची माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. (ज्या वेळी भूखंड घोटाळा झाला, हे माहिती झाले त्याच वेळी त्यासाठी भाजपने आंदोलन का केले नाही ? - संपादक)

मंगळवेढ्यातील (जिल्हा सोलापूर) सनातनचा साधक प्रथमेश वठारे याचे दहावीच्या परिक्षेत सुयश

   
कु. प्रथमेश वठारे
  मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) - येथील नुतन मराठी विद्यालयात शिकणारा आणि सनातनच्या साधिका सौ. वैशाली पांडुरंग वठारे यांचा मुलगा प्रथमेश वठारे याला दहावीच्या परिक्षेत ८९ प्रतिशत गुण मिळाले आहेत.
    कु. प्रथमेश अभ्यास करण्यापूर्वी श्रीगणेश आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना करत असे. तो सध्या दैनिक वितरणाची सेवा करत आहे. काही प्रासंगिक सेवा असतील तर त्यातही तो सहभाग घेतो. हे यश गुरुकृपेमुळेच मिळाले आहे, असे त्याने सांगितले. प.पू. गुरुदेवांवर त्याची श्रद्धा आहे.

निर्दोष साध्वींवर अत्याचार करणारे पोलीस अधिकारी आणि राज्यकर्ते यांवर कठोर कारवाई करा ! - पंकज बागुल, हिंदु जनजागृती समिती

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 

     धुळे - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १५ मे २०१६ या दिवशी न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचे नाव वगळण्यात आले आहे. या आरोपपत्रानुसार साध्वीजी आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. गेली ८ वर्षे या सर्वांना कारागृहात डांबून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांच्या सहकार्‍यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबून अनन्वित अत्याचार करणारे अधिकारी अन् संबंधित राज्यकर्ते यांना कठोर शासन करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल यांनी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. 

शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दैनिक सनातन प्रभातचा सत्कार !

डावीकडून शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री. प्रवीण केणे, 
सनातन संस्थेचे श्री. केशव वाळके, सत्कार करतांना 
शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख श्री. विजय पाटील, 
श्री. किरण पाटील
      मुंबई - शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त १९ जून या दिवशी आयरेगाव, डोंबिवली (पूर्व) येथील वार्ड क्रमांक ६६ मधील शिवसेना विभागीय कार्यालयातील माजी विभाग प्रमुख श्री. विजय पाटील यांच्या हस्ते दैनिक सनातन प्रभातचा सत्कार करण्यात आला. सनातन संस्थेचे श्री. केशव वाळके यांनी हा सत्कार स्वीकारला. दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु संघटनाचे कार्य चांगले वाढत आहे. यासाठी हा सत्कार करण्यात येत आहे, असे माजी शाखा प्रमुख श्री. काका तोडणकर यांनी सांगितले. तसेच उपविभाग प्रमुख श्री. प्रवीण केणे, श्री. किरण पाटील आणि शिवसेनेच्या महिला आणि युवकसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते.

हिंदूंना वेठीस धरण्याच्या पाशवी वृत्तीला रोखण्यासाठी हिंदूंनी वज्रमूठ वळण्याची हीच वेळ ! - अधिवक्ता देवदास शिंदे

सनातन संस्थेच्या समर्थनार्थ पिंपरी (जिल्हा पुणे) येथे संतश्री 
आसारामजी बापू साधक परिवाराच्या वतीने आंदोलन 
डावीकडून सर्वश्री शंभू गवारे, पराग गोखले,
अर्जुन मिरगणे, देवदास शिंदे, अनंत कोर्‍हाळे
       पिंपरी, २० जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने खोटे पुरावे उभे केले आहेत. १५ मिनिटांत हिंदूंना संपवण्याची धमकी देणार्‍यांवर कारवाई करण्याचे धैर्य केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमध्ये नाही. ज्या ९० कोटी निरपराध हिंदूंना वारंवार आतंकवादी ठरवले जात आहे, ते खरोखरच आतंकवादी झाले, तर अत्याचार करायला एक तरी माणूस शिल्लक राहील का, याचा अन्वेषण यंत्रणांनी विचार करावा. अशाच प्रकारे जर हिंदूंवर अन्याय होत राहिला, तर हिंदूंच्या भावनांचा स्फोट झाल्याशिवाय रहाणार नाही. सनातन संस्थेचे साधक त्यांची व्यक्तीगत साधना करून राष्ट्र आणि धर्म यांच्या सेवेचे कार्य करत आहेत. निरपराध साधकांना छळल्याचे परिणाम शासन आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांना भोगायला लागल्याशिवाय रहाणार नाहीत.

फलक प्रसिद्धीकरता

पाकमध्ये ॐ छापलेल्या चपलांची विक्री !
     पाकमधील तांडो आदम शहरात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी ॐ हे चिन्ह असलेल्या चपलांची विक्री केली जात आहे. ३ वर्षांपासून रमझानमध्ये अशा पद्धतीने वस्तूंची विक्री केली जात आहे.

हिंदू तेजा जाग रे !

जागो ! : पाकिस्तान के तांडो आदम शहरमें ॐ चिन्ह लिखे हुए चप्पलोंकी बिक्री की जा रही है ।
     क्या भारतके हिंदुत्वनिष्ठ इसका विरोध करेंगे ?
Jago !
: Pakistan ke Tando Adam shaharme Om chinha likhe huye chappalonki bikri ki ja rahi hai !
     Kya Bharat ke Hindutvanisth isaka virodh karenge ?

अधिवक्ता उद्बोधन सत्राचा उर्वरित वृत्तांत

हिंदूंनी धर्म समजून घेणे, हाच हिंदूंच्या दुःस्थितीवरील उपाय ! 
- अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अध्यक्ष तथा संस्थापक विश्‍वस्त, बुद्धीमत्ता समूह, उत्तरप्रदेश 

     भारत हा पूर्वी विश्‍वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के असणारे अल्पसंख्य ८० टक्के हिंदूंवर कुरघोड्या करतात; कारण हिंदूंनी धर्म समजून घेतला नाही. या देशात अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे संरक्षण होते; कारण ते संघटित आहेत. आज आपल्याकडे एखादा मुलगा गुंड बनला, तरी पालकांना त्याचे वैषम्य वाटत नाही; मात्र धर्मासाठी पूर्णवेळ कार्य करू लागला की, त्याचे वाईट वाटते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. 

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

       १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
डावीकडून गाजियाबाद, उत्तरप्रदेश येथील वैदिक उपासना पीठाच्या संस्थापिका
पू. तनुजा ठाकुर, नवी देहली येथील वैदिक उपासना पीठाच्या श्रीमती अन्तिमा गोयल आणि
श्री. रवि गोयल यांना दैनिक सनातन प्रभातविषयी माहिती सांगतांना सनातनच्या सौ. मंगला मराठे.
डावीकडून ठाणे, महाराष्ट्र येथील हिंदी भाषिक जनता परिषदेचे उपाध्यक्ष श्री. हरिशंकर पांडे,
ठाणे, महाराष्ट्र येथील स्वराज्य हिंदूसेनेचे अध्यक्ष श्री. सुशील चंद्रभान तिवारी, मंगळुरू,
कर्नाटक येथील अ‍ॅड् उमेश मेगुडी यांना ग्रंथांविषयी माहिती सांगतांना सनातनच्या कु. सायली वाघुळदे

ईश्‍वरी अधिष्ठान आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे हिंदू अधिवेशनात अनेक अडथळे येऊनही अधिवेशन उत्तमरित्या पार पडणार !

ज्योतिषांनी ग्रहस्थितीनुसार वर्तवलेले पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे भाकीत !
सौ. प्राजक्ता जोशी 
ज्योतिष फलित विशारद
१. ईश्‍वरी नियोजन आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे 
हे हिंदू अधिवेशन अविस्मरणीय होईल !
     रामनाथी, गोवा येथे १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत सात दिवसीय पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. ईश्‍वर नियोजित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी होणार्‍या या अधिवेशनापूर्वीपासूनच अनेक अडथळे येतील, तरीही केवळ ईश्‍वरी नियोजन, महर्षींचे आणि संतांचे मार्गदर्शन यामुळे हे हिंदू अधिवेशन अविस्मरणीय होईल. देश-विदेशात धर्मकार्याची किर्ती पसरेल. 
२. अधिवेशन काळातील ग्रहस्थितीच्या वर्णनावरून व्यष्टी 
आणि समष्टी साधनेचे, तसेच दानाचे महत्त्व
२ अ. अयन संधीकालातील दानाचे महत्त्व : हे अधिवेशन दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या दरम्यान होणार आहे, म्हणजेच अधिवेशनाचा हा काळ अयन संधीकाल आहे. संधीकाळात केलेल्या साधनेचे आणि दानाचे महत्त्व सर्वाधिक असून त्याचे फल अधिक पटींनी मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. दान हे सत्पात्री असावे आणि त्याचा योग्य विनियोग व्हावा, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी हिंदु धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेसाठीच्या या धर्मकार्याला दान केल्यास खर्‍या अर्थाने दानधर्म घडेलच आणि साधनेचे फळही मिळेल.

हिंदु विधीज्ञ परिषदेमुळे हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी कोणी नसते, या समजाला तडा गेला ! - अधिवक्ता नीलेश सांगोलकर

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील प्रथम दिवशीचे हिंदु अधिवक्त्यांचे उद्बोधन सत्र !
अधिवक्ता नीलेश सांगोलकर
       पहिल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात स्थापन झालेल्या आणि गेली ५ वर्षे अथकपणे कार्यरत असलेल्या हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील आढावा अधिवेशनाच्या प्रथम दिवशी मांडण्यात आला. तो येथे देत आहोत. 
१. भिवंडी-निजामपूर येथील पशूवधगृह बंद केले !
     मुंबईजवळील भिवंडी-निजामपूर येथील इदगाह पशूवधगृहाच्या विरोधात गेल्या वर्षापासून आमचा न्यायालयीन लढा चालू होता. या लढ्याची फलनिष्पत्ती म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे पशूवधगृह बंद केले. इतकेच नव्हे, तर या इदगाह पशूवधगृहाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशांचे पालन केले नाही आणि प्रदूषणाला वेळीच आळा घातला नाही; म्हणून प्रदूषण मंडळाने आपल्या अधिकार्‍याला निलंबित केले, ही या लढ्याची मोठी फलनिष्पत्ती आहे, असे आम्ही मानतो.

धर्मरक्षण आणि हिदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिदु जनजागृती समितीने केलेले प्रभावी कार्य !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील द्वितीय दिवशीचे सत्र : हिंदुत्वनिष्ठांचे 
संघटितपणे आणि प्रसारमाध्यमांद्वारे होणारे कार्य
श्री. सुनील घनवट
      पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या द्वितीय दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केलेले प्रभावी कार्य ! याविषयी केलेल्या मार्गदर्शनाचा सारांश येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मजागृती सभा आणि त्यातून उभी 
राहिलेली धर्मरक्षणाची आंदोलने !
    बंधूंनो, वर्ष २००७ पासून आजपर्यंत हिंदु जनजागृती समितीने १० राज्यांत ११०० जाहीर हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी केल्या आहेत. या वर्षी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील हिंदु धर्मजागृती सभेला तर विक्रमी २५ सहस्र हिंदूंचीउपस्थिती होती.
       समितीने अशा सभा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांत घेतल्या आहेत.

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित 
कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता ! 
पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, 
वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
       १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. ही वृत्ते त्यांना कोण पुरवत होते, हा प्रश्‍न आहेच आणि ती वृत्ते जर केंद्रीय अन्वेषण विभाग पुरवत होता, तर या विषयाचे गांभीर्य पाहून त्याने पत्रकार परिषद का घेतली नाही ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. या कथित वृत्तांतील असत्यकथन काळाच्या ओघात उघडे पडेलच; मात्र या कालावधीत सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.
     धर्महीनतेमुळे जगात किंमत शून्य असलेले हिंदू कुठे आणि धर्मपालनाने जगाला भारी ठरलेले मुसलमान कुठे !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
आज आंतरराष्ट्रीय योगदिन !
      हिंदु जनजागृती समितीचे कार्य शासनापेक्षा चांगले आहे. या कार्याचे कोणतेही मोजमाप करता येत नाही. या कार्यासाठी मी हिंदु जनजागृती समितीचा आजन्म आभारी आहे ! 
- श्री. गौरीश केळकर, भटवाडी, शिरोडा, गोवा.

भारतियांना भिकेला लावणारे आसुरी वृत्तीचे इंग्रज !

     गांधीवादी लेखक धर्मपाल म्हणतात की, इंग्रजांनी पुढील प्रमुख गैरमार्गांचा अवलंब करत भारताची मोठी हानी केली. त्यांनी येथील अमूल्य अशी नैसर्गिक आणि अन्य संपत्ती लुटून नेली. त्यामुळे सामान्य माणूस भिकेला लागला, तसेच त्यांनी अनेकांना कुमार्गाला लावले. या संदर्भात वॉरन हेस्टिंग याचा लेखी पुरावा देऊन त्यांनी पुढे सांगितले, आमची धोरणे आणि आम्ही केलेल्या कारवाया यांमुळे भारतात अंदाधुंदी माजली. त्यामुळे सैनिक आणि पोलीसही चोर अन् दरोडेखोर बनले ! इंग्रजांनी भारताला जाणूनबुजून कलंकित केले. 
- विश्‍वास पाटील (साप्ताहिक लोकजागर, २८.९.२०१२)

गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक

    https://4.bp.blogspot.com/-7XeJobrfpvI/V0sa6dyxNiI/AAAAAAACATg/Qf7mpUW0Xw0YJOjb2bi8ZASPVmvPet-GgCKgB/s1600/SS_bodhchinha.jpg 
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो.
     हिंदु धर्मासाठी भारताबाहेरून आर्थिक वा इतर कोणतीही मदत येणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या दृष्टीने विचार केला, तर हिंदूंना स्वबळावर उभे रहाण्याशिवाय पर्याय नाही ! (लोकजागर)

धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्यासाठी भगवंताने घेतलेल्या अवतारी अस्तित्वाचे गूढ जाणणारे खरे भक्त आणि भगवंताच्या अवतार कार्यातील लीला !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ... 
१. श्रीकृष्णाच्या वेळी तो परमात्मा आहे, असे फारच थोड्यांना ठाऊक असणे : अवतार धारण केल्यावर भगवंताचे अवतारत्व त्याचे निःसीम भक्त ओळखत असत. श्रीकृष्णाच्या वेळी तो परमात्मा आहे, असे फारच थोड्यांना ठाऊक होते. जे भक्त आणि ऋषि होते, ज्यांचे अंतःकरण साधना अन् भक्तीभाव यांद्वारे शुद्ध झाले होते, अशांनाच श्रीकृष्ण परमात्मा आहे, याची जाणीव होती.
२. गोपी या राम अवतारातील ऋषीच असून रामाच्या दर्शनाने त्यांचा भाव दाटून न आल्याने त्यांना आनंदाचे आस्वादन घेता न येणे, त्यामुळे रामाने त्यांना श्रीकृष्ण अवतारात गोपींच्या जन्माद्वारे आनंदाचे आस्वादन देणे : गोकुळातील गोपी या राम अवतारातील ऋषीच होत्या. त्या वेळी रामानेच त्यांना आशीर्वाद दिला होता की, मी तुमचा कृष्णावतारात उद्धार करीन; कारण रामावतारात असलेल्या ऋषींना राम हा परमात्मा आहे, अवतार आहे, हे कळले होते; परंतु त्यांच्या तपश्‍चर्येमुळे ते इतके शुष्क झाले होते की, रामाच्या दर्शनाने त्यांचा भाव दाटून आला नाही. त्यामुळे त्यांना आनंदाचे आस्वादन घेता आले नाही. त्यामुळे रामाने त्यांना पुढच्या जन्मात, म्हणजे श्रीकृष्ण अवतारात गोपींच्या जन्माद्वारे आनंदाचे आस्वादन दिले; म्हणूनच गोपी रूपामध्ये त्यांना श्रीकृष्णाची प्रचीती घेता आली आणि त्या श्रीकृष्णाकडे आकृष्ट झाल्या.

मेनराय कुटुंब - सनातनचे एक आदर्श कुटुंब !

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

बालपणापासून देवाशी बोलणारी, लाघवीपणाने सर्वांवर प्रेम करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. सानवी निखिल क्षीरसागर (वय ८ वर्षे) !

कु. सानवी क्षीरसागर
      २१.६.२०१६ या दिवशी नागपूर येथील बालसाधिका कु. सानवी निखिल क्षीरसागर हिचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये अन् अन्य माहिती पुढे देत आहोत.
कु. सानवी क्षीरसागर हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन गोकुळाकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपण
१ अ. केलेली साधना : या काळात माझ्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी पोटाला प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र असलेले पदक बांधलेे होते, तसेच देवघरातील प.पू. गुरुदेवांच्या प्रतिमेची मी नियमित पूजा करत असे.
१ आ. झालेले त्रास : मला पुष्कळ उलट्या होत. आधुनिक वैद्यांनी मला ५ व्या मासापासून कोणतीही हालचाल न करता पूर्ण आराम करायला सांगितले होते. पलंगाखाली विटा ठेवून मला झोपायला सांगितले होते. त्या वेळी सतत देवा, तूच माझ्या बाळाचे रक्षण कर, अशी प्रार्थना होत असे. या काळात माझा कुलदेवतेचा नामजप होत होता.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्यांना त्यांच्या उद्दिष्टपूर्तीच्या संदर्भात महर्षींचे आश्‍वस्त करणारे बोल !

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
नाडीशास्त्रात आम्ही जे रामराज्याच्या 
संदर्भात लिहिले आहे, ते खरे होणारच आहे, 
असा विश्‍वास महर्षींनी साधकांना उदाहरणातून देणे 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
         रामराज्य आणि साधकांचे रक्षण यासंदर्भात आम्ही जे लिहिले आहे, ते होणारच आहे; कारण आम्ही सप्तर्षि म्हणजे शंकरच. आम्ही जेव्हा हे सर्व लिहिले, तेव्हा सर्व देवता त्यांच्या परिवारासोबत येथे उपस्थित होत्या. त्या वेळी आम्ही आमच्या भावाश्रूंनी देवांचे चरण धुतले आहेत, तर देव तुमच्यासाठी आम्ही लिहिले आहे, ते नाही का करणार ?
१९.६.२०१६ या दिवशी सुरू होणार्‍या 
हिंदू अधिवेशनाविषयी महर्षींचे भाष्य
अ. महर्षींनी हिंदु अधिवेशनासाठी जमलेल्या सर्वांना अधिवेशन चांगलेच होणार !, असा आशीर्वाद देणे : तुम्ही तेथे (पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात) आता काहीतरी अध्यात्म आणि राष्ट्र एकत्रित येऊन मोठा उत्सव साजरा करत आहात. (यातून महर्षींना म्हणायचे आहे की, हिंदु अधिवेशनाच्या निमित्ताने अध्यात्म जगणारे साधक आणि विविध प्रांतातून आलेले राष्ट्रप्रेमी रामनाथीच्या भूमीत एकत्र जमले आहेत. - सौ. गाडगीळ) हे सर्व ठीक व्हावे आणि सर्व जण सुखरूप घरी जावेत, असे तुम्हालाही (साधकांना) वाटते ना ? हे सर्व जण देवासाठी एकत्र जमत आहेत, तर त्यांना कशाची आली आहे चिंता. सर्व ठीक होणार आहे, असे त्यांना सांगा. हा उत्सव चांगल्या पद्धतीनेच साजरा होणार, यात शंका नाही !
        (संदर्भ : सप्तर्षि नाडीपट्टीवाचन क्रमांक ८४, १७.६.२०१६, चेन्नई, तमिळनाडू.)

साधकांना सूचना

प्रतिदिन कपाळावर कुंकू लावा !
       महर्षींनी साधकांना कपाळावर कुंकू लावण्याचे महत्त्व पटवून देणे आणि कुंकू लावल्यामुळेच पुढे येणार्‍या आपत्काळात तुमचे रक्षण होणार आहे, असे सांगणे : कलियुगात मनुष्य काय करतो, तर तोंडवळ्याला लावण्यासाठी सौंदर्यप्रसाधने उपयोगात आणतो. तो तोंडवळ्याला फेशियलही करून घेतो. तो विविध प्रकारची पावडर आणि क्रीम वापरतो. तसेच काही वेळा तोंडवळा सुंदर दिसावा, यासाठी प्लास्टिक सर्जरीही करून घेतो; परंतु त्याला हे कळतच नाही की, कपाळावर केवळ कुंकू लावल्यानेच हे सर्व शक्य होऊ शकते. देवाने एवढे सुंदर कुंकू दिले आहे की, इतर काही करण्याची आवश्यकताच नाही. घर म्हणजे समोर रांगोळी हवी आणि कपाळ म्हणजे कुंकू हवे. हे नसेल, तर तुमच्याकडे लक्ष्मी येणारच नाही आणि उलट अनिष्ट शक्ती जवळ येतात. गेल्या वर्षी दिल्लीला झालेल्या नाडीवाचनातही साधकांना आम्ही कुंकू लावण्याविषयी सांगितले होते. गोव्यात गुरूंच्या समोर नाडीवाचन होतांना त्यांच्याही कपाळावर कुंकू होते, मग साधकांच्या कपाळावर कुंकू का नसते ?

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रथम दिवशी एरव्ही अल्प फुले लागत असलेल्या झाडांनाही भरपूर फुले आल्याचे लक्षात येणे

       १९.६.२०१६ या दिवशी सकाळी आश्रमासाठी फुले आणण्याच्या सेवेला लागवडीत गेल्यावर तेथे एरव्ही अल्प फुले लागत असलेल्या झाडांनाही भरपूर फुले आल्याचे दिसले. नेहमी १ - २ फुले लागत असलेली झाडे भरपूर फुलांनी बहरलेली होती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, आज पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा प्रथम दिवस असल्याने झाडांना भरपूर फुले आली असतील !
- श्री. अनिकेत भोळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०१६)

सनातन सांगत असलेल्या सत्याविषयी अत्रिऋषींनी सांगितलेल्या नाडीभविष्याद्वारे प्रचीती येणे

       सनातन संस्थेच्या वतीने माझ्या वडिलांना २०११ आणि आईला २०१३ या वर्षी संत म्हणून घोषित करण्यात आले. माझ्या नाडीभविष्यात अत्रिऋषींनी सांगितले, तुमचा जन्म चांगल्या घरात झाला आहे आणि आई-वडील दोन्हीही संत आहेत. काहींना सनातन संस्था ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी किंवा संत म्हणून घोषित करते, याविषयी विकल्प आहेत. त्याचप्रमाणे काहींना सनातनने हे नव्याने काहीतरी चालू केले आहे, असेही वाटते. या उदाहरणावरून सनातन सांगत असलेल्या सत्याचे इतिहासातही दाखले आहेत, हे लक्षात येते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०१६)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

मनात सतत भगवंताचेच विचार असल्यावर लवकर अंतर्मुख होऊन देवाकडे जायला सुलभ होणे

        दिवसभर सेवा करत असतांना आपल्या मनात बहिर्मुखतेचे विचार असतात. खरेतर आपण सतत अंतर्मुख राहून विचार केला पाहिजे, उदा. आपण संत्री किंवा केळी खाण्यासाठी घेतांना आपल्या मनात संत्री किंवा केळ्याच्या आतील भाग खायचा, असा विचार असतो, त्याप्रमाणेच आपल्या मनात सतत भगवंताचेच विचार असले पाहिजेत, म्हणजे आपल्याला लवकर अंतर्मुख होऊन देवाकडे जाता येईल. यासाठी प्रयत्न करावेत. - प.पू. पांडे महाराज
(संग्राहक - श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१०.२०१५))

सनातन संस्था अथवा समिती यांच्याविषयी प्रसारमाध्यमांकडून प्रसारित होणार्‍या मानहानीकारक वृत्तांची माहिती तत्परतेने कळवा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !
     डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर विविध राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही वृत्तवाहिन्या अन् नियतकालिके यांच्याकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी मानहानीकारक वृत्ते प्रसारित केली जात आहेत. साधकांनी अशा अपप्रचारामुळे किंचितही डगमगून जाऊ नये. सदर नियतकालिकाचा एक अंक विकत घ्यावा. या वृत्ताविषयी कायदेशीर कारवाई होेऊ शकते का, हे कायदेतज्ञांकडून जाणून घेण्यासाठी संबंधित वृत्ताचे छायाचित्र काढून व्हॉट्स अ‍ॅपवरून श्री. शिवाजी वटकर यांना (संपर्क क्रमांक ८४५१००६१११) पाठवावे. त्यासोबत नियतकालिक आणि आवृत्तीचे नाव, प्रसिद्धी दिनांक, पृष्ठ क्रमांक आदी माहिती कळवावी. शक्य असल्यास सदर वृत्त स्कॅन करून इ-मेलने (hjs.karya@gmail.com) पाठवावे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंक कुठे पाठवायचा, हे संबंधित साधकांना कळवले जाईल.
सनातनच्या विरोधात प्रचार करणार्‍या प्रसारमाध्यमांची माहिती कळवा !
     सनातनचा अपप्रचार करणारे वार्तांकन वाहिन्यांवर दाखवले जात असल्यास किंवा वृत्तपत्रांतून अपप्रचार होत असल्यास त्याविषयी त्वरित नजिकच्या दैनिक कार्यालयात कळवावे. त्यामुळे अशा वृत्तांचे खंडण करणे सोपे होईल.
दूरभाष क्रमांक : ०८३२-२३१२७१२
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.
२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपत्काळात साधनेचे महत्त्व

       स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ हा अध्यात्मातील एक सिद्धांत असल्याने इतकी वर्षे मी साधकांना स्थूलदेहाचे व्यायाम करण्यास सांगत नसे. त्याऐवजी देहापेक्षा सूक्ष्म असलेले मन आणि बुद्धी यांना प्रथम सात्त्विक बनवण्याकडे आणि नंतर त्यांचा लय करण्यासाठी साधना करण्यास सांगत असे.
       आता हे लक्षात आले की, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी स्थूलदेह (शरीर) सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी साधकांनी प्रतिदिन व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे वाईट शक्तींचे आवरण जाण्यासही साहाय्य होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, 
स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास 
तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     योग दिवस प्रतिदिन साजरा करा, असे सरकार सांगत नाही; कारण त्याला जनतेच्या आरोग्याची आणि आध्यात्मिक उन्नतीची काळजी नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
     सनातनचे साधक एक दिवस नाही, तर ३६५ दिवस योग म्हणजे साधना करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमार्थ म्हणजे काय ? 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
स्वार्थाची (स्वचा अर्थ जाणून घ्यायची) पराकाष्ठा, म्हणजे परमार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

योगातील हिंदुत्व टिकवण्याचे आव्हान !

संपादकीय 
       आज आंतरराष्ट्रीय योगदिन ! आजच्या दिवशी केवळ भारतभरच नव्हे, तर जगभरात ठिकठिकाणी योगदिन साजरा केला जाईल. मागील काही दशकात भारतात व्यायाम संस्कृती अल्प होत चालली होती. त्या काळात योगाचार्य अय्यंगार आणि त्यानंतरच्या काळात योगऋषी रामदेवबाबा यांनी घराघरांत योग पोहोचवला. रामदेवबाबांनी भारतभर ठिकठिकाणी शिबिरे घेऊन लोकांना सोपी आणि सुलभ आसने दाखवली. त्यांच्या अभिनव अशा शैलीद्वारे त्यांनी योगाविषयी लोकांच्या मनात रूची निर्माण केली. याचा परिणाम भारतभरात योगाचे पुनरुज्जीवन झाले. भाजप सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरून योगाचा प्रसार केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn