Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

संत कबीर जयंती

भारताला इस्लामिक स्टेट होण्यापासून रोखायचे असेल, तर हिंदु राष्ट्राचा उद्घोष करा ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
रामनाथी, गोवा येथे ऐतिहासिक पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ !
निनादला शंखनाद पंचम हिंदू अधिवेशनाचा । सनातन धर्म राज्याच्या शाश्‍वत मार्गक्रमणाचा ॥
  • हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्म राज्याची स्थापना करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ अग्रेसर !
  • देश-विदेशांतून १६१ हून अधिक हिंदु संघटनांच्या ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती
     
डावीकडून पू. (कु.) अनुराधा वाडेकर, पू. तनुजा ठाकूर, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे,
 दीपप्रज्वलन करतांना महंत इच्छागिरी महाराज आणि पू. दिव्य जीवनदासजी महाराज
      विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - निधर्मीपणाचा सोस पुरवण्यासाठीच आज सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री जयेंद्र सरस्वतीजी यांच्यावरील सर्व आरोप खोटे ठरले, त्याचप्रमाणे सनातनच्या साधकांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, अशी आम्हाला निश्‍चिती आहे. आज देशासमोर असलेले जिहादी आतंकवादाचे इसिससारखे संकट आणि त्यांचे पाठीराखे पहाता, पुढे निधर्मी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र हा प्रश्‍न निर्माण होणार नाही, तर हिंदु राष्ट्र कि इस्लामी राष्ट्र (इस्लामिक स्टेट) असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. अशा वेळी निधर्मीवाद्यांना धर्म वा अधर्म यांची बाजू घ्यावीच लागेल. त्या आपत्काळात केवळ हिंदु राष्ट्रच सर्वांचे रक्षण करू शकते, त्यामुळे हिंदु राष्ट्राचा आग्रह धरणे, हे प्रत्येक हिंदूचे परमकर्तव्य आहे, असे वज्रनिर्धारी प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

पुरोगाम्यांच्या दबावामुळे अन्वेषण यंत्रणांकडून सनातनसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य केले जात आहे ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

डावीकडून अमृतेश एन्.पी., श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता संजीव
पुनाळेकर (बोलतांना) आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन
     रामनाथी - कोणतेही शासन असले, तरी पुरोगामी तसेच देशद्रोही स्वयंसेवी संघटना यांच्या दबावामुळे सनातनसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अन्वेषण यंत्रणांकडून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेच सनातनच्या निष्पाप साधकांचा डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणी नाहक छळ केला जात आहे. हिंदु विधीज्ञ परिषद खंबीरपणे सनातनच्या पाठीशी उभी असून लवकरच सनातनचे साधक या आरोपांतून निर्दोष सुटतील, असे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सांगितले. रामनाथी, गोवा येथे १९ जूनपासून प्रारंभ झालेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधिवक्ता पुनाळेकर यांनी ही माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे कर्नाटक समन्वयक अधिवक्ता अमृतेश एन्.पी. आणि हिंदू फ्रंट फॉर जस्टिसचे (हिंदू न्याय मंच) अधिवक्ता विष्णु शंकर जैन उपस्थित होते.
     अधिवक्ता पुनाळेकर पुढे म्हणाले, काँग्रेसचे सरकार असतांना हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला. आता भाजपचे सरकार आले, तरीही हिंदूंवर अन्याय होत आहे. केवळ सरकार पालटले; मात्र निधर्मी प्रशासन आणि पोलीस अधिकारी मात्र तसेच आहेत. आज भाजपचे सरकार केंद्रात असतांना सीबीआयच्या कारवायांची संपूर्ण माहिती गृहमंत्र्यांच्या अगोदर आपचा नेता आशीष खेतान याला कशी मिळते? सीबीआयचे अधिकारी या खटल्यातील जी माहिती न्यायालयातही देत नाहीत, त्यापेक्षा अधिक माहिती पत्रकारांना स्वतःचे नाव गुप्त ठेवून का देत आहेत ? हे बदनामीचे षडयंत्र आहे.

अधिवक्ता उद्बोधन सत्र

हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यास जगात शांतता 
नांदेल ! - अधिवक्ता हरिशंकर जैन, अध्यक्ष, हिंदू 
फ्रंट फॉर जस्टिस, लखनौ (लक्ष्मणपुरी), उत्तरप्रदेश 
       देशात निर्माण करण्यात आलेले कायदे अल्पसंख्यांकांना अधिकार देणारे आहेत. या कायद्यांमध्ये हिंदूंच्या संरक्षणासाठी काही नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्यघटनेत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत हिंदूंना न्याय मिळणे कठीण आहे. त्यासाठी जनतेचे संघटन आवश्यक आहे. राज्यघटनेत परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य हिंदूंमध्ये निश्‍चित आहे. देश लुटला गेला, तरी चालेल, त्याचे विभाजन झाले तरी चालेल; पण राज्यकर्ते मतांचे लांगूलचालन सोडण्यास सिद्ध नाहीत. अशा स्थितीत परिवर्तन होण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून रहाणे योग्य नाही. शासन त्याचे कार्य करेल, आपण आपले कार्य केले पाहिजे.
मानवतेचे रक्षण 
करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !
       हिंदूंवर वेगवेगळ्या माध्यमांतून आघात होत आहेत. हिंदूंना कुठेही न्याय मिळत नाही. देशात अधिकतम शाळा ख्रिस्ती आहेत. तेथे वन्दे मातरम्, भारतमाता की जय, आदी म्हणण्यास प्रतिबंध आहे. हिंदूंना त्यांचा धर्म आणि संस्कृती वाचवायची असेल, स्वत:चे रक्षण करायचे असेल, या देशाला वाचवायचे असेल आणि अखिल मानवतेचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. देशाला मानवतेच्या विरोधकांपासून मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्र निर्माण करा.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असणारे बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा केंद्रसरकारने नाकारला !

भारत शासनाचा हिंदुद्वेष ! मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही
 जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; 
मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती
 पालटण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !
      गोवा येथे १९ ते २५ जून या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात प्रतिवर्षी भारतातील हिंदुत्वनिष्ठांसह नेपाळ, बांगलादेश येथील हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठही सहभागी होतात. बांगलादेशमधून बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. रवींद्र घोष हे प्रतिवर्षी या हिंदू अधिवेशनात सहभागी होत असतात; मात्र या वर्षी श्री. घोष यांना या अधिवेशनासाठी भारतात येण्यासाठी भारत शासनाकडून व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील प्रथम दिनाचा वृत्तांत आणि क्षणचित्रे

हिंदु विधीज्ञ परिषदेचे रणझुंजार 
अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा विशेष सत्कार !
केवळ अधिवक्ता नव्हे; हे तर रणझुंजार योद्धा !
महर्षींचे कृपापात्र आपण, निर्भीड धर्मप्रवक्ता ॥
       विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - वर्ष २०१२ मध्ये पहिल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये धर्माभिमानी अधिवक्त्यांच्या संघटनासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर केवळ चारच वर्षांत हिंदु विधीज्ञ परिषदेने धर्माशी संबंधित विविध कार्यात सुयश मिळवले. ६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर तन, मन आणि धनाने हिंदुत्ववाद्यांना न्यायालयीन साहाय्य करतात. सध्या ते त्यांचा ६० टक्के वेळ धर्मकार्यासाठी देत आहेत. त्यांचे हे कार्य समस्त अधिवक्त्यांना प्रेरणा देणारे आहे.
       या यशस्वीतेविषयी परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि सनातन-निर्मित श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

शेतकर्‍यांनी सुसाईड बॉम्ब (मानवी बॉम्ब) बनावे ! - डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा शेतकर्‍यांना सल्ला

 उघडपणे चिथावणी देणार्‍यांवर शासन काय कारवाई करणार ?
     नगर - शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काँग्रेसच्या काळात काही केले गेले नाही आणि आता भाजपच्या काळातही काही उपाय राबवले जातांना दिसत नाहीत. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी सुसाईड बॉम्ब बनावे आणि आत्महत्या करतांना समवेत राजकीय पक्षाच्या नेत्याला घेऊन मरावे, असा सल्ला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला. कॉ. भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानने १८ जून या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

(म्हणे) सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची मडगाव स्फोटाच्या संदर्भातही चौकशी व्हायला हवी !

निधर्मी म्हणून मिरवण्यासाठी सनातनच्या निरपराध 
साधकाचा बळी द्यायला निघालेले भाजपचे आमदार विष्णु वाघ !
       पणजी - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या संदर्भात अटक करण्यात आलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची वर्ष २००९ मधील मडगाव स्फोटाच्या संदर्भातही राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने चौकशी करायला हवी, असे मत भाजपचे आमदार आणि गोवा विधानसभेचे उपसभापती विष्णु सूर्या वाघ यांनी फेसबूक या संकेतस्थळावर टाकले (पोस्ट केले) आहे.
       या पोस्टमध्ये वाघ यांनी म्हटले आहे की, सीबीआयने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली आहे. गोवा पोलिसांनी आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मडगाव स्फोटाच्या संदर्भात डॉ. तावडे यांची चौकशी करण्यास प्रवृत्त करायला हवे. मडगाव स्फोटात हात असल्याचा संशय असलेले सारंग अकोलकर, रुद्र पाटील आणि मलगोंडा पाटील यांच्याशी तावडे यांचे जवळचे संबंध असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या ३ संशयितांपैकी मलगोंडा पाटील याचे स्फोटात निधन झाले आहे. तावडे यांनी मलगोंडा यांना स्फोटाच्या दिवशी संपर्क केला होता. स्फोटापूर्वी तावडे यांना मलगोंडा पाटील यांचे २५ भ्रमणध्वनी आले होते, तर तावडे यांनी १८ वेळा मलगोंडा याला संपर्क केला होता आणि एक लघुसंदेश पाठवला होता. स्फोटाच्या दिवशीसुद्धा दुपारी तावडे यांनी मलगोंडा यांना संपर्क केला आहे. गोवा पोलीस आणि एन्आयए यांनी तावडे यांची या संदर्भात चौकशी का केली नाही ? याविषयी सीबीआयने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. (मलगोंडा यांनी भ्रमणभाषवरून ज्यांना ज्यांना संपर्क केला होता, त्या सर्वांची चौकशी गोवा पोलिसांचे विशेष तपास पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी केली अन् केवळ मलगोंडा यांनी २५ वेळा आणि डॉ. तावडे यांनी १८ वेळा एकमेकांना संपर्क केल्याचे या दोन्ही अन्वेषण यंत्रणांच्या नजरेतून सुटले, या गोष्टीवर कोणीतरी विश्‍वास ठेवील का ? या सर्व कपोलकल्पित गोष्टी प्रसिद्धीमाध्यमे सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि त्यांचा टीआर्पी वाढावा यासाठी देत असतात, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत. - संपादक)

हिंदु विधीज्ञ परिषदेचे रणझुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा हिंदू अधिवेशनात विशेष सत्कार !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर (डावीकडे) यांचा सत्कार करतांना सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव

देशाचे भगवेकरण होणारच ! - भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री राम शंकर कठेरिया

     लक्ष्मणपुरी - देशाच्या गुलामीच्या काळ्या युगातून बाहेर पडण्यासाठी देशाचे भगवेकरण होणे आवश्यक असून कुणाला आवडो अथवा न आवडो, देशाचे भगवेकरण होणारच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर कठेरिया यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३४२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील लखनौ विद्यापिठात हिंदवी स्वराजदिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. कठेरिया पुढे म्हणाले, मुलांना महाराणा प्रताप यांचा इतिहास शिकवायचा नाही, तर काय चंगेज खानचा इतिहास शिकवायचा का ? हिंदवी स्वराजदिन समारोहासारखे कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित केले गेले पाहिजेत.

माझ्याविरुद्ध कुभांड रचले आहे ! - निवृत्त पोलीस निरीक्षक मनोहर कदम

डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयितांना मनोहर कदम यांनी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप
     सातारा - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत माझे नाव घेतले जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आणि वेदनादायी आहे. डॉ. वीरेंद्र तावडे यांना मी कधीही भेटलो नाही, तसेच त्यांच्याशी माझा कधीही संपर्क झालेला नाही. असे असतांना डॉ. तावडे यांच्याशी माझे नाव जोडणे, हे माझ्या विरोधात रचले गेलेले कुभांड आहे. यामागे काही लोकांचा यात सहभाग असून, त्याला अनेक कारणे आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआयकडे) पुरावे असतील, तर ते त्यांनी सादर करावेत. मी दोषी आढळलो, तर मला कोणी शिक्षा करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी स्वत:लाच शिक्षा करून घेईन, अशी प्रतिक्रिया डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात सीबीआयने संशय व्यक्त केलेले निवृत्त पोलीस निरीक्षक मनोहर कदम यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील राऊतवाडी गावात कदम यांचे वास्तव्य असून, दिवसभर वृत्तवाहिन्यांवर चालू असलेल्या वृत्तांमुळे आपण अस्वस्थ झालो असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (उथळ आणि विपर्यस्त वृत्ते प्रसिद्ध करणारी प्रसारमाध्यमे या घटनेतून बोध घेतील का ? - संपादक)

सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्ववादी एकवटले !

  • पक्ष, संघटना, संप्रदाय यांचा भेद बाजूला ठेवून हिंदुत्ववाद्यांची उपस्थिती !
  • पिंपरी (पुणे) येथे संतश्री आसारामबापू साधक परिवाराच्या वतीने आंदोलन
       पिंपरी, १९ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली आहे. या अन्यायपूर्ण अटकेला विरोध करणे, धर्मशिक्षणाद्वारे समाजाला साधनेचा मार्ग उपलब्ध करून देणार्‍या सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवणे आणि तथाकथित पुरो(अधो)गाम्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीला विरोध करणे, यांसाठी संतश्री आसारामबापू साधक परिवाराच्या वतीने येथे तीव्र आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. या आंदोलनामध्ये विविध पक्ष, संघटना, संप्रदाय यांच्या प्रतिनिधींसह ५० हून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले. (हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पद, पक्ष, संघटना यांना विसरून एक हिंदू म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले मान्यवर आणि सर्वांचे आभार ! - संपादक)
आंदोलनामध्ये सहभागी 
आध्यात्मिक संस्था, संघटना आणि पक्ष
       संत श्री आसारामजी बापू साधक परिवार, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदु जनजागृती समिती
(आंदोलनाचे सविस्तर वृत्त लवकरच वाचा)

अंतरंगात दिव्यत्व असेल, तरच देवत्व दिसते ! - करवीरपीठाधीश्‍वर स्वामी विद्यानृसिंह भारती

पुस्तक आणि ध्वनीचित्र चकतीचे प्रकाशन करतांना वर्तुळात करवीरपीठाधिश्‍वर स्वामी विद्यानृसिंह भारती
     पुणे - भवरूपी सागरातून तारून नेते ती यात्रा ! अनेक जण कैलास यात्रेला जाता; मात्र परत आल्यावर तेथील थंडीचे आणि निसर्गाचे वर्णन करतात. यात्रेला जाणार्‍या प्रत्येकालाच देवाचे दर्शन होते असे नाही. अंतरंगात दिव्यत्वाचा भाव असेल, तेव्हाच देवत्व दिसते. तीर्थक्षेत्रांच्या यात्रेतून जी ऊर्जा मिळते, त्यातून भवरूपी संसारातून तरून जाता येते, असे मार्गदर्शन करवीरपीठाधीश्‍वर स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी केले. टिळक स्मारक मंदिर येथे १६ जून या दिवशी सरस्वती बुक कंपनीचे श्री. रमेश कुंदूर लिखित श्री कैलासाचे अंतरंग या चित्रमय पुस्तकाचा आणि ध्वनीचित्रचकतीचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संतसाहित्यिक डॉ. ज्ञानेश्‍वर तांदळे, ॐ श्री शिव साई महाराज, माजी आमदार उल्हास पवार, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. किशोर चव्हाण उपस्थित होते.

हडपसर (पुणे) येथे विक्रीसाठी आणलेले ८०० किलो गोमांस शासनाधीन; ३ धर्मांधांना अटक

सातत्याने होणार्‍या गोवंश हत्या रोखण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही आवश्यक !
      पुणे - येथील हडपसर भागामधील नीलकमल मंगल कार्यालयासमोर ८०० किलो गोमांसाची विक्री करतांना ३ धर्मांधांना गोरक्षक शिवशंकर राजेंंद्र स्वामी यांनी पोलिसांकडे पकडून दिले. त्यांची नावे जावेद युसूफ तांबोळी, वाजीद महंमद आत्तार, कयूम शब्बीर कुरेशी अशी असून खाटीक इम्रान कुरेशी आणि मांस विक्रेता चाचा हे पसार झाले आहेत. या प्रकरणी शिवशंकर स्वामी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला आहे. शासनाधीन करण्यात आलेल्या गोमांसाचे बाजार मूल्य २ लक्ष ४० सहस्र इतके आहे.
विक्रीसाठी आलिशान गाड्यांचा वापर
     या वेळी शासनाधीन करण्यात आलेले गोमांस धर्मांधांनी २ चारचाकी वाहनामधून विक्रीसाठी आणले होते. महाराष्ट्रात गोमांस विक्रीला बंदी असली, तरी चोरट्या पद्धतीने टेम्पो, जीप, पिकअप अशा वाहनांचा वापर केला जातो; मात्र आता गोमांसाच्या वाहतुकीसाठी मागील काही दिवसांपासून आलिशान चारचाकी गाड्यांचा वापर केला जात आहे.

सरकार हिंदुत्वाच्या सूत्रावर अजूनही मागे आणि कमकुवत ! - स्वामी चक्रपाणी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु महासभा

सरकार संतांच्या 
या वक्तव्यातून बोध घेणार का ?
        मुंबई - दोन वर्षे होऊनही हिंदुत्वाच्या सूत्राविषयी सरकार अकार्यक्षम आहे. गोरक्षा होत नाही, ३७० कलम रहित केले नाही, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झालेले नाही, राम मंदिरासाठी आम्ही फास्टट्रॅक कोर्टची मागणी करत आहे ती पूर्ण होत नाही आहे. सरकार हिंदुत्वाच्या अजूनही मागे आहे आणि कमकुवत आहे, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी १८ जून या दिवशी केले. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने दिलेल्या धमकीविषयी विलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पाडली. या पत्रकार परिषदेचे आयोजन ब्राह्मण एकता सेवा समितीचे श्री. अखिलेश तिवारी यांनी केले होते.

काँग्रेसींनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकावर तुझ्यात देव दिसतो असे लिहिले !

     नवी देहली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ४६व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसींनी लावलेल्या शुभेच्छा फलकावर तुझ्यात देव दिसतो. आज देवाचा जन्मदिन, असे लिहिले होते. याशिवाय कार्यकर्त्यांनी गाधींच्या वाढदिवसानिमित्त यज्ञाचेही आयोजन केले होते. (ज्यांंनी संपूर्ण सत्ता केवळ हिंदुद्वेषासाठी खर्ची घातली, त्यांना म्हणजे काँग्रेसींना देव दिसणे, हा त्यांचा पराकोटीचा लाळघोटेपणा ! - संपादक)

पुण्यातील नवी सांगवीमध्ये पुरुषांनीही साजरी केली वटपौर्णिमा

धर्मशिक्षणाच्या अभावी 
जन्महिंदूंकडून केली जाणारी अयोग्य कृती !
        पुणे, १९ जून - वटपौर्णिमा म्हणजे वडाची पूजा करून त्याला सुत गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी पत्नी प्रार्थना करते. हा सण प्रामुख्याने महिला साजरा करतात; पण येथील नवी सांगवीमध्ये पुरुषांनी आपल्या पत्नीचे आयुष्य वाढावे आणि जन्मोजन्मी तीच पत्नी मिळावी, यासाठी वटपौर्णिमेचा सण साजरा केला. नवी सांगवी मानव हक्क संरक्षण समितीच्या वतीने अनेक पुरुषांनी हा सण साजरा केला. या वेळी अनेक महिला आणि त्यांचे पती पूजा करण्यासाठी उपस्थित होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे यांचीही उपस्थिती होती. सदर उपक्रमात मानव हक्क संरक्षण समितीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्रीकांत जोगदंड, भाजप शहर उपाध्यक्ष श्रीनिवास बढे, यांसह संस्थेचे इतर सभासद आणि अनेक नागरिक उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुत्वनिष्ठांना व्हिसा नाकारणारे शासन हे भारताचे की पाकचे ?
     बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणारे बांगलादेश मायनॉरिटी वॉच या संघटनेचे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. रवींद्र घोष हे गोवा येथे चालू असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होणार होते; परंतु भारत शासनाने त्यांना व्हिसा नाकारला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshi Hinduoke liye karyrat Ravindra Ghoshjiko VISA na milnese Goa Hindu Adhiveshanme nahi aa sake.
     Hindutvanishth sarkar Hinduvirodhi kyu ho gai
जागो !
: बांग्लादेशी हिन्दुआें के लिए कार्यरत रवींद्र घोष जी को वीजा न मिलने से वे गोवा हिन्दू अधिवेशन में नहीं आ सके.
     हिन्दुत्वनिष्ठ सरकार हिन्दू-विरोधी क्यों हो गई ?

शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठानची भव्य मिरवणूक

देवदर्शन पदयात्रेत ध्वज हातात घेतलेले
पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे आणि अन्य
      सांगली, १९ जून (वार्ता.) - शिवराज्याभिषेकदिन अर्थात हिंदुसाम्राज्य दिनाच्या निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने भव्य देवदर्शन पदयात्रा (मिरवणूक) काढण्यात आली. मिरवणुकीत हत्ती, ध्वजपथक, रणरागिणी, भगवे ध्वज, भगवे फेटे घातलेले मावळे, सिंहासनाधिष्ठीत श्रीशिवछत्रपतींची मूर्ती यांचा समावेश होता. मारुती चौक येथून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या शिस्तबद्ध आणि इतिहासाची आठवण करून देणार्‍या या यात्रेमुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण सिद्ध झाले होते. या वेळी शिवसेना, भाजप, तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटना, पक्ष यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनेही महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. मिरज शहरात वाळवे गल्ली येथे मंगलमूर्ती गणेशोत्सव मंडळ येथे श्री. चेतन कुलकर्णी यांनी दिनाचे महत्त्व विषद केले. या वेळी सर्वश्री विनोद हिंगमिरे, गणेश मिरजे, निलेश कित्तुरे यांसह अन्य उपस्थित होते.

आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, याची निश्‍चिती बाळगा !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे 
राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता,
हिंदु जनजागृती समिती.
१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांची फलनिष्पत्ती !
१ अ. हिंदु राष्ट्र या शब्दाची राष्ट्रीय स्तरावरील चर्चा, 
हे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे यश ! 
     अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमुळे आज भारतभरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी आशावाद निर्माण झाला आहे. गेली ४ वर्षे आम्ही हिंदु राष्ट्र ही संकल्पना हिंदू अधिवेशनात मांडत आहोत. आता या विषयावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा चालू झाली आहे. हा सातत्याने होत असलेला हिंदु राष्ट्राचा उद्घोष हीच आजचे पुरोगामी आणि सेक्युलर यांची पोटदुखी बनला आहे.
        बंधूंनो, जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे; मग या सूर्यमंडळात हिंदूंचे एक तेजस्वी राष्ट्र का नको ?

कराड (जिल्हा सातारा) येथे शिवराज्याभिषेक उत्साहात

        सातारा, १९ जून (वार्ता.) - श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ३४३ वा शिवराज्याभिषेक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ७ वाजता श्रीदत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला महामस्तकाभिषेक घालण्यात आला. या वेळी वेदोक्त मंत्रपठण करण्यात आले. यानंतर शस्त्रपूजन करून आरती करण्यात आली.
        या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे श्री. विनायक पावसकर, भाजपचे श्री. विष्णू पाटसकर, एकनाथ बागडी, गणेश कापसे, शिवसेनेचे श्री. शशिकांत हाफसे, शशिराज किरपे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोहर जाधव, श्री. मदन सावंत, सनातन संस्थेचे श्री. सुरेंद्र भस्मे, श्री. लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विशाल सामाजिक संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रथम सत्रात हिंदु विधीज्ञ परिषदेचे 
राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेले मार्गदर्शन
अधिवक्ता संजीव
पुनाळेकर
      नमस्कार, ५ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी देशभरातून जमलेल्या प्रत्येक हिंदु प्रतिनिधीच्या मनात हिंदु राष्ट्राची स्थापना कधी आणि कशी होणार ? हा प्रश्‍न आहे. येथे जमलेल्या पत्रकार मित्रांच्या मनातही हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी प्रश्‍न असतील ! हे अधिवेशन हिंदु राष्ट्र स्थापनेची केवळ राणा भीमदेवी गर्जना करण्यासाठी किंवा आदर्शवादी भाषणे एकमेकांना ऐकवण्यासाठी भरवलेले नाही. आपल्याला हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आणायचे आहे. तेही निश्‍चित कालमर्यादेत आणायचे आहे. 
१. निवडणुका आणि त्यातून मिळालेल्या सत्तेची स्थिती !
     हिंदु राष्ट्र म्हणजे सत्ता आणि सत्ता मिळवायची, तर राजकीय पक्ष स्थापून निवडणुका लढवायच्या, अशी सर्वांच्याच मनात हिंदु राष्ट्राच्या संदर्भात ढोबळ कल्पना असते. याच संकल्पनेतून हिंदु राष्ट्राचे ध्येय असणार्‍या विचारसरणीतून अगोदर जनसंघ आणि नंतर भाजप या राजकीय पक्षांची स्थापना झाली. त्यांनीही अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण, संरक्षणाविषयी धोरण, समान नागरी कायदा, कलम ३७०, श्रीराम मंदिर, विदेशातील काळे धन आदींविषयी हिंदु समाज आणि राष्ट्रीयत्व यांच्या हिताच्या घोषणा केल्या. त्यानुसार देशातील जनतेने निधर्मीवाद्यांना कंटाळून आदर्शवाद सांगणार्‍या या हिंदुत्ववाद्यांच्या हाती सत्ता सोपवली. आज या सत्तेला २ वर्षे उलटून गेली.

श्री. रमेश शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मांडलेली विदारक सद्यःस्थिती

श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित 
केलेल्या या प्रश्‍नांची उत्तरे निधर्मी देतील का ?
१. भारताला हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) घोषित करणे असंविधानिक आहे, म्हणणारे पोप जॉन पॉल यांनी संपूर्ण भारताला ख्रिस्ती करा, असे आवाहन केले. तेव्हा कोठे होते ?
२. हिंदु राष्ट्राची मागणी करणे, असंविधानिक म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांना आयएस्आयएस्चे अतिरेकी करत असलेल्या हत्या, त्यांच्या अतिरेक्यांच्या कारवाया या मानवतावादी वाटतात का ?
३. या देशात तीन गांधी आणि दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या झाल्याविषयी आज निधर्मी लोकांकडून कंठशोष केला जातो; मात्र तमिळनाडूतील १२७ हिंदूंच्या हत्या, मृतदेहांच्या छातीवर ७८६ कोरणे, केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या हे सर्व समर्थनीय वाटते का ?

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) हिंदु राष्ट्र स्थापनेच्या निर्धारात्मक कृतीशीलतेची ग्वाही देणारे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन !

      पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हे गेल्या चार अधिवेशनांपासून निराळे ठरणार, याची ग्वाही या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाभली. पू. दिव्य जीवनदासजी महाराज यांनी त्याचे सूतोवाच केले आणि त्या संदर्भातील विश्‍लेषण हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु राष्ट्राची देशभरात पुनर्चर्चा चालू करण्यात या अधिवेशनांचा प्रमुख वाटा आहे. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाची यशस्वीता आणि त्याची शासनाने घेतलेली दखल, याचेही स्मरण श्री. रमेश शिंदे यांनी करून दिले. या अधिवेशनातील श्‍लोक म्हणणे ते अधिवेशनात आलेल्या अडथळ्यांच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी मनःपूर्वक केलेली प्रार्थना आणि प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाच्या कृतीतून व्यक्त होणारा संतांप्रतीचा वंद्य भाव या गोष्टी अधिवेशनाचे वेगळेपण व्यक्त करणार्‍या होत्या. गेली ४ वर्षे हिंदू अधिवेशनांच्या माध्यमातून हिंदुनिष्ठांमध्ये रुजलेल्या धर्मबीजाचे हे फलस्वरूप होते. हिंदुत्वनिष्ठांची ही धर्मनिष्ठाच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या निर्धारात्मक कृतीशीलतेची ग्वाही देणारी होती.

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

  • एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता ! 
  • पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
        १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. ही वृत्ते त्यांना कोण पुरवत होते, हा प्रश्‍न आहेच आणि ती वृत्ते जर केंद्रीय अन्वेषण विभाग पुरवत होता, तर या विषयाचे गांभीर्य पाहून त्याने पत्रकार परिषद का घेतली नाही ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. या कथित वृत्तांतील असत्यकथन काळाच्या ओघात उघडे पडेलच; मात्र या कालावधीत सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.
हिंदु जनजागृती समिती ही अत्यंत मनापासून हिंदुसंघटनाचे काम करत आहे ! - पू. सुनील चिंचोलकर, पुणे

गुरुपौर्णिमेला २९ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे 
केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.

साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासावर न भूतो न भविष्यति असे संशोधन करून साधकांना उपाय सांगणारे एकमेवाद्वितीय प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...
१. प्रार्थना आणि कृतज्ञता
      प.पू. डॉक्टरांविषयी लिहायचे म्हटल्यावर कोणत्या विषयी आणि किती लिहू, असे होते. जो अनादि अनंत आहे, त्याच्याबद्दल किती म्हणून लिहायचे ? सर्वच त्याच्या इच्छेने घडते. जे घडते, ते पूर्ण स्वीकारून त्यातून शिकणे, हेच केवळ करायचे असते आणि हीच खरी साधना असते.
      पू. (सौ.) सखदेवआजींना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासावर उपाय विचारण्याच्या निमित्ताने प.पू. डॉक्टरांशी होत असलेल्या बोलण्यातून त्यांचे अद्वितीयत्व लक्षात येणारी काही सूत्रे त्यांनीच सुचवली. ती वाचून सर्वांची प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धा वाढून त्यांची साधनेत प्रगती होवो, हीच प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना ! ही सूत्रे प.पू. डॉक्टरांनीच लिहून घेतली, याबद्दल त्यांच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन कृतज्ञता व्यक्त करते.

संतांच्या शुभहस्ते ग्रंथप्रकाशन

ग्रंथप्रकाशन करतांना डावीकडून पू. (कु.) अनुराधा वाडेकर, पू. तनुजा ठाकूर,
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, महंत पू. इच्छागिरी महाराज, स्वामी दिव्य जीवनदास महाराज
        सनातनच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार या ग्रंथाच्या इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषांतील आवृत्तीचे प्रकाशन उपस्थित संतांच्या पावनहस्ते करण्यात आले.

प.पू. परशराम पांडे महाराज यांनी प्रतिपादन केलेला गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या आयोजनातील सूक्ष्म भाग

प.पू. परशराम पांडे
     प.पू. डॉक्टरांनी विश्‍वकल्याणासाठी आयोजित केलेली इंद्रसभा (अधिवेशन) म्हणजे भगवंताचे निर्गुणातील विराट कार्य असून सर्वांनी संघटनशक्ती वाढवल्यास महिषासुरमर्दिनीची शक्ती निर्माण होईल !
    गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन म्हणजे इंद्रसभा आहे. त्यासाठी देवतांना निमंत्रित केले जात आहे. ईश्‍वर अवतार घेतो. तेव्हा सर्व सहकार्‍यांना सोबत घेऊन येतो. हे देवाचे नियोजन आहे. धर्मकार्यामुळे त्यांचा उद्धार व्हावा, यासाठी धर्मग्लानी दूर करतांना ईश्‍वरच त्यांना निमंत्रित करतो.
१. इंद्र म्हणजे कोण ? 
     इंद्र म्हणजे सर्व देवांचा राजा ! सदैव विजयी असणारा, सर्व दृष्टीने सामर्थ्यशाली असणारा, मोठमोठ्या संकटांना सामर्थ्याने सामोरे जाऊन सहस्र यज्ञ यशस्वीपणे संपन्न करणारा शतक्रतो (१०० यज्ञ करणारा), वृत्रहन्ता (वृत्र या असुराला मारणारा) असा तो इंद्र ! अशा इंद्राची सभा म्हणजे आजचे हे पंचम अधिवेशन आहे.

ऋषिकेश येथील श्री. गौरीशंकर मोहता यांचा प.पू. डॉक्टरांप्रतीचा भाव !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
       ऋषिकेश येथील गीता भवनचे श्री. गौरीशंकर मोहता रामनाथी आश्रमात गेले होते. आश्रम पाहून झाल्यानंतर त्यांची प.पू. डॉक्टरांशी भेट झाली. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद होऊन कृतज्ञता वाटली. त्यानंतर त्यांच्याशी दूरभाषवर बोलत असतांना एकदम भावविभोर होऊन ते म्हणाले, आज गुरुदेवांचे मला दर्शन झाले. आजचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा आहे. मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते की, एवढी मोठी लॉटरी मला लागेल. मी आश्रमात आलो, तेव्हा माझी अवस्था एका कफल्लक व्यक्तीप्रमाणे होती. गुरुदेवांचे दर्शन झाल्यानंतर मी अरबोपती, खरबोपती झालो, असे मला वाटायला लागले. मला जे हवे होते, ते गुरुदेवांच्या भेटीत मला मिळाले आहे. पू. रामसुखदासजी महाराज आणि पू. श्री. हनुमानप्रसादजी पोद्दार यांच्यानंतर आज गुरुदेवांना भेटून मला आनंद झाला. - (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.२.२०१६)

पू. जयराम जोशी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. अडचणीच्या काळात सकारात्मक रहाण्यास सांगून आधार देणे 
      साधना करण्यासाठी सनातन आश्रमात पूर्णवेळ होऊन मला चार वर्षे झाली. त्या वेळी नातेवाइकांकडून पुष्कळ अडचणी येत होत्या. पू. आबांनी मला पुष्कळ साहाय्य केले. ते मला सतत सकारात्मक रहा. कशाला काळजी करता ? प.पू. डॉक्टर आहेत ना !, असे सांगून आधार देत; म्हणून मी सर्व विसरून जात असे.
२. आबा संत झाल्याचे स्वप्नात दिसणे आणि गुरुपौर्णिमेला त्यांना संत म्हणून घोषित करणे 
      मी कर्‍हाडला होते. तेथे मला स्वप्न पडले. त्यामध्ये आबा संत झालेले दिसले. स्वप्नात प.पू. डॉक्टर मला सांगत होते, काही अडचणी असल्यास आबांना विचार, ते सांगतील. मला रात्री वाईट स्वप्ने पडत आणि जाग आल्यावर झोप लागत नसे; म्हणून मी आधुनिक वैद्यांकडे गेले होते. त्यांनी मला झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे झोप येऊ लागली. गोळ्या न घेतल्यास झोप लागत नव्हती. त्याची भीती वाटत होती. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या काळातच आश्रमात आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आबा संत झाल्याचे घोषित झाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि आनंदाने डोळे अश्रूंनी पाणावले.

पू. जयराम जोशीआजोबांनी स्वकौतुक आणि कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करायला सांगितल्यावर १२ वर्षांची कु. अमृता मुद्गल हिचे झालेले चिंतन !

१. दैनिकात प्रसिद्ध झालेल्या अनुभूतींविषयी साधकांनी कौतुक केल्यावर अहं वाढू नये, 
यासाठी पू. जोशीआजोबांनी स्वतः साधिकेला भ्रमणभाष करणे 
पू. जयराम जोशीआजोबा
      वर्ष २०१५ च्या दिवाळीमध्ये सलग २ - ३ दिवस दैनिक सनातन प्रभातमध्ये माझ्या काही अनुभूती प्रसिद्ध झाल्या. त्या वेळी साधक माझे कौतुक करत होते. तेव्हा मला त्याविषयी काही वाटत नव्हते. ३ - ४ दिवसांनी पू. आजोबांनी मला भ्रमणभाष केला. त्या वेळी आमच्यामध्ये पुढील संवाद झाला.
पू. आजोबा : मी जे सांगत आहे, ते लक्ष देऊन ऐक. हे तुझ्या साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 
पू. आजोबा : २ - ३ दिवस दैनिकात तुझ्या छान छान अनुभूती आल्या आणि साधकांनी तुझे कौतुक केले ना ?
मी : हो.
पू. आजोबा : ते कौतुक देवाचरणी अर्पण कर. स्वकौतुक, कर्तेपणा सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण कर. तुझ्याकडे काहीच ठेवू नकोस. सतत शरण जा. नकळत आपला अहं वाढू शकतो; म्हणून सतत देवाला सांग, मला काहीच येत नाही, सर्वकाही तूच केले आहेस. भगवंता, मी तुला शरण आले आहे. म्हणजे तुझा अहं वाढणार नाही. आता मी जे काही सांगितले, ते मी नव्हे, तर देवानेच सांगितले आहे, हे लक्षात ठेव !

गुरुपौर्णिमा मास २०१६

     १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

भक्तीमार्गातील व्यष्टी आणि समष्टी साधना

१. व्यष्टी साधना 
     ही व्यक्तीगत जीवनाशी संबंधित असते. या साधनेत धार्मिक विधी, पूजा, पोथीपठण, नामजप, मंत्रजप, भावाच्या स्थितीत रहाणे इत्यादी साधना असतात. 
२. समष्टी साधना 
    ही साधना समष्टी, म्हणजे समाज जीवनाशी संबंधित असते. कालमहात्म्यानुसार समाजावर जे अनिष्ट परिणाम होणार असतात, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी ही साधना असते. यात यज्ञयाग, प्रेताग्नि उपासना, एखाद्या ज्योतिर्लिंग किंवा स्वयंभू ठिकाणी पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करणे इत्यादी कर्मकांडे असतात. कर्मकांडांकडे बरेच जण तुच्छतेने पहातात. भगवंताने गीतेत सांगितले आहे, यज्ञानाम् जपयज्ञोऽस्मि ।, म्हणजे यज्ञातील जपयज्ञ मी आहे, हे उदाहरणही काही जण देतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, भगवंताने व्यष्टी साधनेच्या संदर्भात तसे सांगितले आहे. ऋषिमुनी दुष्काळ, भूकंप, नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, तसेच आक्रमक असुरांचे निर्दालन करण्यासाठी यज्ञयागादी समष्टी साधना करतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र आणि सनातन धर्म राज्य यांतील जाणवलेला भेद अन् प.पू. डॉक्टरांची सर्वज्ञता !

सौ. राजश्री खोल्लम
      १६.६.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरण्यास सांगितले आहे, असे वाचले. त्या संदर्भातील लिखाण पुढीलप्रमाणे होते. 
महर्षींनी हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द 
वापरण्यास सांगणे आणि प.पू. डॉक्टरांनी तसे ३ - ४ वर्षांपूर्वी सांगणे ! 
     सनातन हा मूळ धर्म आहे. काळाच्या ओघात त्याचे हिंदु असे नाव प्रचलित झाले. सिंधू नदीच्या काठी रहातात, ते हिंदू, अशी हिंदू शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. याविषयी ३ - ४ वर्षांपूर्वी बोलतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, सध्या हिंदु धर्म असे नाव प्रचलित असले, तरी त्याचे मूळ नाव सनातन धर्म असे आहे. आपण सध्या प्रचलित आहे म्हणून हिंदु धर्म असा उल्लेख करू; पण पुढे हिंदु राष्ट्रात सनातन धर्म असाच उल्लेख प्रचलित करू. आता महर्षींनी दिलेला संदेशही तशाच अर्थाचा आहे. 
     महर्षींनी नाडीपट्टीत सहस्रो वर्षांपूर्वी भविष्य कथन स्वरूपात केलेले लिखाण आणि प.पू. डॉक्टरांनी व्यक्त केलेले वरील विचार यांतील साम्य पहाता त्यांचे त्रिकालज्ञानीत्व लक्षात येते.

तीव्र त्रास असूनही सतत आनंदी रहाणारी आणि भाव असलेली सौ. अवनी संदीप आळशी !

सौ. अवनी आळशी
     सौ. अवनी संदीप आळशी यांचा काल वटपौर्णिमेला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचे पती सनातनचे संत पू. संदीप आळशी यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. 
     हल्ली समाजात एकमेकांचे कौतुक वाटणारे पती-पत्नी शोधून सापडत नाहीत. त्यात सौ. अवनी आळशी यांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्या दोघांचा संसार आनंदाने चालला आहे. पती-पत्नींनी एकमेकांशी कसे वागावे, याचा एक आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून साधकांचा संसार होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या २० जून या दिवशी हाताळले जाणारे विषय !

सकाळी १०.४५ ते १२.३०
उद्बोधन सत्र : हिंदुत्वनिष्ठांचे संघटितपणे आणि प्रसारमाध्यमांद्वारे होणारे कार्य
१. हिंदु जनजागृती समितीने समविचारी संघटनांसह केलेली प्रभावी आंदोलने आणि उपक्रम
२. हिंदुत्वनिष्ठांना संघटित करून राबवलेले उपक्रम
३. धार येथील आंदोलन आणि कुंभपर्व येथे केलेला हिंदु राष्ट्र संकल्पनेचा प्रसार
४. हिंदुत्वाच्या कार्यात प्रसारमाध्यमांचा प्रभावी उपयोग कसा करावा ?

सनातन संस्था अथवा समिती यांच्याविषयी प्रसारमाध्यमांकडून प्रसारित होणार्‍या मानहानीकारक वृत्तांची माहिती तत्परतेने कळवा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !
     डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर विविध राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही वृत्तवाहिन्या अन् नियतकालिके यांच्याकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी मानहानीकारक वृत्ते प्रसारित केली जात आहेत. साधकांनी अशा अपप्रचारामुळे किंचितही डगमगून जाऊ नये. सदर नियतकालिकाचा एक अंक विकत घ्यावा. या वृत्ताविषयी कायदेशीर कारवाई होेऊ शकते का, हे कायदेतज्ञांकडून जाणून घेण्यासाठी संबंधित वृत्ताचे छायाचित्र काढून व्हॉट्स अ‍ॅपवरून श्री. शिवाजी वटकर यांना (संपर्क क्रमांक ८४५१००६१११) पाठवावे. त्यासोबत नियतकालिक आणि आवृत्तीचे नाव, प्रसिद्धी दिनांक, पृष्ठ क्रमांक आदी माहिती कळवावी. शक्य असल्यास सदर वृत्त स्कॅन करून इ-मेलने (hjs.karya@gmail.com) पाठवावे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंक कुठे पाठवायचा, हे संबंधित साधकांना कळवले जाईल.

सनातन प्रभातचे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप वापरणार्‍या वाचकांसाठी सूचना !

सनातन प्रभातचे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप पूर्ववत चालू
       काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेले सनातन प्रभातचे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर पूर्ववत् करण्यात आले आहे. हे अ‍ॅप बंद असल्याने बर्‍याच वाचकांची गैरसोय झाली त्याविषयी क्षमस्व ! वाचक पुढील लिंकवरील एपीके डाऊनलोड करून सनातन प्रभातमधील बातम्या अ‍ॅण्ड्रॉइड भ्रमणभाषवर वाचू शकतात.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dsp.android
टीप : वरील अ‍ॅप इन्स्टॉल (install) करण्यापूर्वी तात्कालीक पर्याय म्हणून दिलेला आधीचा अ‍ॅप अनइन्स्टॉल (Uninstall) करावा.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१९.६.२०१६) दुपारी ३.३१ वाजता
समाप्ती - ज्येष्ठ पौर्णिमा (२०.६.२०१६) दुपारी ४.३२ वाजता
आज पौर्णिमा आहे.
सनातनरूपी सूर्यावरी थुंकू पहाती पुरोगामी । न कळे वेड्यांना थुंकी पडते अधोगामी ॥
कराल तुम्ही खुशाल सहस्रो आरोप रस्त्यावरी । हिंमत असेल, तर चालवून दाखवा खटले सत्वरी ॥
- श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या, 
तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाहीत; म्हणून मी नेहमी आनंदात असतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. 
२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्वारासाठी असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

हिंदू अधिवेशनाची पंचम घडी !

संपादकीय
     हिंदु राष्ट्राचा (सनातन धर्म राज्याचा) उद्घोष सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने घेण्यात येणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे हे पाचवे वर्ष. १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यात होत असलेल्या या पंचम अधिवेशनाच्या चैतन्यमय शुभारंभ आज रामनाथी येथे झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने साधकांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे व्रत फलद्रूप होण्यासाठीचे अविरत अन् सुनियोजित यत्न चालू झाले आहेत. यंदाच्या अधिवेशनाच्या पाचव्या वर्षी देशभरातील १६१ हिंदुत्ववादी आणि धार्मिक संघटनांचा यातील सहभाग हेच दर्शवतो आहे. हे सारे हिंदुत्ववादी उद्याच्या हिंदु राष्ट्राचे भावी शिल्पकारच आहेत आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या प्रयत्नांचा हा इतिहास रचला जात आहे, या व्यापक दृष्टीने पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाकडे पाहिले पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn