Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


आज वटपौर्णिमा !


नवी मुंबई येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

दिनांक - १९ जून २०१६, वेळ - सायं. ५ ते ७ वाजता
स्थळ - गुलाब सन्स डेअरीच्या बाजूला, सेक्टर -१५, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९
भ्रमणभाष - ८४५१००६३९०

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या (सनातन धर्म राज्याच्या) यज्ञात तन-मन-धन यांची आहुती द्या !

भारताच्या स्वातंत्र्ययज्ञात स्वप्राणांची आहुती देऊन क्रांतीसमिधा बनलेले राष्ट्रपुरुष हेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यासमोरील खरे आदर्श आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) पहायला जिवंत असेन कि नसेन, हे मला ज्ञात नसतांनाही त्यासाठी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्रासाठी (सनातन धर्म राज्यासाठी) कार्यरत रहाणे आवश्यक आहे.
'वेळेवर केलेले योग्य कार्य मोठे फळ देते', असे योगवसिष्ठामध्ये सांगितले आहे. सध्या हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी (सनातन धर्म राज्यासाठी) आवश्यक कार्य करण्यासाठी काळ पूरक आहे. कालमाहात्म्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होणारच आहे. या ८ वर्षांच्या कालावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) तर स्थापन होईलच; पण त्यासह प्रत्येकाला साधनेचे फळही मिळेल.
हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या (सनातन धर्म राज्याच्या) यज्ञात तन-मन-धन यांची आहुती द्या ! भगवान श्रीकृष्ण तुम्हाला 'हिंदु राष्ट्र' (सनातन धर्म राज्य) देईलच !
- (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

आजपासून रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ !

रामनाथी (गोवा) - गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर यावर्षीही फोंडा, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

आज १९ जूनला विविध संतांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा शुभारंभ होत आहे. यामध्ये संतांचे अमूल्य मार्गदर्शन होईल. या अधिवेशनास भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. अधिवेशनाचे थेट प्रसारण संकेतस्थळाद्वारे होणार असल्याने जगभरातील हिंदू या अधिवेशनाशी जोडलेले असतील. २५ जूनपर्यंत चालणार्‍या या अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या अनुषंगाने विचारविनिमय होणार आहे. आसेतुहिमाचल हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पंचम अधिवेशन मैलाचा दगड ठरणार आहे.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या विशेषांकाला हार्दिक शुभेच्छा !


सावरकरांना देशद्रोही म्हणणार्‍या सोनिया आणि राहुल गांधी यांना नोटीस !

क्रांतीकारकांचा अवमान केल्यावरून देशासाठी कोणताही त्याग न केलेल्यांना न्यायालयाने कठोर शिक्षा करावी, अशीच देशप्रेमींची मागणी आहे !

नवी देहली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउन्टवरून 'गद्दार' म्हटल्याचे ट्विट करण्यात आल्यामुळे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनी नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून ४८ घंट्यांच्या आत याच ट्विटर अकाउन्टवरून वीर सावरकर आणि त्यांच्या कुटुंबियांची विनाअट क्षमा मागावी, अशी मागणीही नोटिशीत करण्यात आली आहे.
५, २२ आणि २३ मार्च २०१६ या दिवशी काँग्रेस पक्षाच्या '@INCIndia' या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गद्दार म्हणण्यात आले होते. या सर्व ट्विट्सचा तपशील या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. भगतसिंह यांच्या पुण्यतिथीला करण्यात आलेल्या एका ट्विटवर विशेष आक्षेप घेण्यात आला आहे. भगतसिंह यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरोधात युद्ध पुकारले, तर विनायक दामोदर सावरकर यांनी मात्र दयेची भीक मागितली. गुलाम बनून रहाण्यात धन्यता मानली, असा उल्लेख या ट्विटमध्ये आहे.

शिवछत्रपतींप्रमाणे गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करून हिदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेचे ध्येय साकार करा !

पू. संदीप आळशी
राष्ट्र अन् धर्म प्रेमींनो,
'हिंदू अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'शिवराज्याभिषेकदिन' साजरा होणे, हा योगायोग नसून जणू ईश्‍वरी नियोजनच आहे ! १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेणार्‍या शिवरायांकडे धन, सैन्य, गडकोट आदी काही नव्हते. हिंदु रयतेचा विश्‍वास आणि प्रेम यांतून उभे राहिलेले मावळ्यांचे संघटन आणि कुलदेवी श्री भवानीदेवीचा आशीर्वाद, ही शिवाजी महाराजांच्या विजयाची बलस्थाने होती. महाराजांची जगदंबेवरील गाढ श्रद्धा अन् भक्ती यांमुळे जगदंबेने महाराज आणि स्वराज्य यांवरील संकटे स्वतःच्या ढालीवर झेलली. पुढे गुरु समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांमुळे महाराजांनी हिंदवी स्वराज्य प्रत्यक्ष साकार केले.
आज हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेच्या एकाच ध्येयाने कृतीशील झालेले राष्ट्र अन् धर्म प्रेमी एकवटले आहेत. राष्ट्र अन् धर्म प्रेमींनी साधना केली आणि साधना म्हणूनच राष्ट्र-धर्म कार्य केले, तर त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्र होईल, तसेच शिवछत्रपतींमुळे जसे हिंदु धर्माला (सनातन धर्माला) राजसिंहासन लाभले, तसेच आताही लाभेल !'
- (पू.) श्री. संदीप आळशी (१६.६.२०१६)

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेच्या संदर्भातील घटनाक्रम

१ जून : १. सनातनचा देवद आश्रम, तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि पुण्यातील सारंग अकोलकर यांचे घर यांवर सीबीआयच्या धाडी
२. सीबाआयने धाडी घालण्यापूर्वीच आशिष खेतान यांचा 'डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन असल्याचा कट' असा फुसका दावा
२ जून : सनातनच्या साधकांना अटक करा म्हणून अंनिसची पुणे येथे पत्रकार परिषद
३ जून : कोल्हापूर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर अनधिकृत छापे टाकणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांना निलंबित करा !
५ जून : आशिष खेतान यांची सनातन संस्थेवर बंदी घालण्याची ट्विटद्वारे मागणी
७ जून : सनातनचे कोंबिंग ऑपरेशन करण्याची भरत पाटणकर यांची धमकी
१० जून : भरत पाटणकर यांच्या विरोधात सनातनची तक्रार

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांच्या सहभागाविषयीच्या कथित वृत्तांना प्रसिद्धी !

ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांना कोण आणि कुठल्या हेतूने पुरवत आहे ?
मुंबई - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये पोलीस अधिकार्‍यांचाच सहभाग असल्याचा संशय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) प्रसिद्धीमाध्यमांकडे व्यक्त केला आहे. या प्रकरणी सीबीआय दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याची चौकशी करत आहे, असे वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले आहे.
रमाबाई आंबेडकर नगर दंगल प्रकरणी जन्मठेप झालेल्या आणि सध्या जामिनावर सुटलेल्या निवृत्त पोलीस अधिकार्‍याने फरार आरोपी सारंग अकोलकर, रुद्र पाटील, विनय पवार आणि प्रवीण निमकर या सनातनच्या साधकांना प्रशिक्षण दिल्याचा संशय केंद्रीय अन्वेषण विभागाला आहे, तसेच डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेल्या रिव्हॉल्वरच्या संदर्भात पोलीस अधिकार्‍यांनी साहाय्य केल्याचा संशय आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
सध्या सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याने सनातनवर काय कारवाई चालू आहे, याची माहिती सनातनला दिल्याचा आरोपही सीबीआयने केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथे अज्ञात व्यक्तीकडून श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना

हिंदूंनो, देवतांची विटंबना कुठपर्यंत सहन करणार ? देवतांच्या मूर्तींच्या सुरक्षिततेसाठी 'हिंदु राष्ट्र' (सनातन धर्म राज्य) स्थापा !

पैठण, १८ जून - शहरापासून जवळच असलेल्या सोनवाडी या गावामध्ये १७ जून या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने श्रीराम मंदिरामधील श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना केली आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी गावकर्‍यांना भेटून आरोपींचा लवकर शोध घेऊन त्यांना कह्यात घेण्याचे अश्‍वासन दिले. (नुसते आश्‍वासन उपयोगी नाही, तर आरोपीला पकडून कठोर कारवाई होईपर्यंत या प्रकरणाचा गावकर्‍यांनी पाठपुरावा करावा. - संपादक)
१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मधुकर काळे या व्यक्तीने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. काळे हे नित्यनियमाप्रमाणे सकाळी १० वाजता दर्शनासाठी गेले असता त्यांना श्रीरामाच्या हातातील धनुष्यबाण तोडल्याचे आढळून आले.
२. ही माहिती गावकर्‍यांना कळताच मंदिर परिसरात मोठा जमाव जमा झाला.
३. मूर्तीची विटंबना केलेल्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम २९५ प्रमाणे गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पुण्यात लष्कराच्या अधिकार्‍याचे अपहरण करून लुटण्याचा प्रयत्न

पुणे, १८ जून - येथील सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित उपहारगृहामध्ये मेजवानी करून घरी निघालेल्या लष्कराच्या अधिकार्‍याचे एका अज्ञात टोळक्याने अपहरण करून लुटण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. (कायदा आणि पोलीस यांचे अस्तित्व संपलेले असुरक्षित पुणे, असे म्हटल्यास वावगे काय ? - संपादक)

(म्हणे) 'सीबीआयच्या अधिवक्त्यांना साहाय्य करण्यासाठी आमचा अधिवक्ता नियुक्त करण्यास अनुमती द्यावी !'

डॉ. हमीद दाभोलकर यांचे न्यायालयात आवेदन !

उद्या हमीद दाभोलकर 'या प्रकरणाचे अन्वेषण आम्ही करतो', असे म्हणाले, तर आश्‍चर्य वाटायला नको!

पुणे, १८ जून - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिवक्त्यांना न्यायालयात उपस्थित राहून साहाय्य करण्यासाठी आमच्याकडून अधिवक्ता नियुक्त करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी करणारे आवेदन अधिवक्ता अभय नेवगी यांनी डॉ. हमीद दाभोलकर यांच्या वतीने न्यायालयाकडे केली आहे. (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिवक्ता हे प्रकरण हाताळण्यास सक्षम नाहीत, असे हमीद दाभोलकर यांना वाटते का ? - संपादक) या आवेदनावर न्यायालयाने अन्वेषण यंत्रणा आणि आरोपीचे अधिवक्ता यांना बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्यावर निर्णय देण्यात येणार आहे.

या आवेदनाविषयी डॉ. हमीद यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाशी निगडित असल्याने यात आम्ही सहभागी होऊ शकतो. कायद्यात तशी तरतूद आहे. न्यायालयीन प्रक्रियेत आम्हालाही स्थान मिळेल आणि सीबीआयलाही साहाय्य करता येईल. (हमीद दाभोलकर यांचा शासनावर विश्‍वास नसल्याने त्यांची ही वैयक्तिक स्तरावर तपासात ढवळाढवळ चालू आहे, असे समजायचे का ? - संपादक)

सनातनच्या समर्थनार्थ 'पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू साधक परिवारा'च्या वतीने १९ जून या दिवशी पिंपरी (जिल्हा पुणे) येथे आंदोलन

प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या 'पूज्यपाद संतश्री आसारामबापू साधक परिवारा'चे आभार

पिंपरी, १८ जून (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यापासून कथित पुरोगामी आणि हिंदुत्वद्वेष्टे यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेला भक्कम पाठिंबा दर्शवत सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना झालेली अन्यायपूर्ण अटक यांच्या विरोधात संतश्री आसारामबापूजी साधक परिवाराच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. १९ जून या दिवशी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सायंकाळी ५ वाजता हे आंदोलन होईल.

सनातनवर बंदी आणण्याइतपत पुरावे मिळाल्यास आवश्यक ते पाऊल उचलू ! - मुख्यमंत्री

मुंबई, १८ जून - सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव या आधीच्या राज्यशासनाने पाठवला होता; परंतु केंद्रशासनाने पुरेशा पुराव्याअभावी निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बंदी आणण्याइतपत वस्तुतः पुरावे मिळाल्यास आमचे शासन राजधर्माचे पालन करून सनातनवर बंदी घालण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ जून या दिवशी एका कार्यक्रमात केले.

(म्हणे) 'डॉ. आठवले यांना अटक करा !'

वर्तक आणि पुनाळेकर यांनाही अटक करण्याची मागणी

सनातनद्वेषाने पछाडलेल्या पुरो(अधो)गामी संघटनांचा थयथयाट चालूच !

कोल्हापूर - डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनचे प्रमुख (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, प्रवक्ता अभय वर्तक आणि अधिवक्ते संजीव पुनाळेकर यांच्यावर देशद्रोहासह मारेकर्‍यांना चिथावणी, खुनाच्या कटात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग या प्रकरणी गुन्हे प्रविष्ट करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पुरो(अधो)गामी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी १७ जून या दिवशी एका निवेदनाद्वारे पोलिसांना केली. (धादांत खोटे आरोप करून संतांची आणि साधकांची अपकीर्ती केल्याविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! - संपादक)

जलसंपदामंत्री गिरीश महाजन जमीन खरेदीवरून वादात !

     भुसावळ (जिल्हा जळगाव) - तापीपूर्णा साखर कारखाना काढण्याच्या नावाखाली २००२ मध्ये करण्यात आलेल्या जमीन खरेदीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वैयक्तिक नावावर पाच एकर जमीन अवघ्या एक लाख अकरा सहस्र रुपयांमध्ये विकत घेतली; मात्र या साखर कारखान्याची नोंदणी झाली नाही. तसेच हा कारखानाही कधी अस्तित्वात आला नाही. या भूमी खरेदीचा उल्लेख गिरीष महाजन यांच्या शपथपत्रातही नाही. ही भूमी कारखान्याची असल्याच्या समजुतीतून ती शपथपत्रात दाखवायचे अनवधानाने राहूनच गेले, असे स्पष्टीकरण महाजन यांनी याविषयी दिले आहे.

दादरी प्रकरणावरून आकांडतांडव करणारी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता
बेंगळुरूतील सेंट विन्सेंट पलॉटी या कॉन्व्हेंट शाळेत शिकणारा कु. विष्णु याने शिखा ठेवल्याने त्याला शाळेतून काढण्यात आले. यावर मुलाच्या वडिलांनी आमच्या परंपरेनुसार ५ वर्षांनंतर त्याचे केस कापू, असे सांगूनही त्याला शाळेत घेतले नाही.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 3 varshiya vidyarthidwara shikha rakhneke karan Bengaluruke ek Convent schoolne use nikala.
Ab Secularwadi is dharmandhatapar muh nahi kholenge !

जागो ! : ३ वर्षीय विद्यार्थी द्वारा शिखा रखने के कारण बेंगळुरु के एक कॉन्वेंट स्कूल ने उसे निकाला.
अब सेक्युलरवादी इस धर्मांधता पर मुंह नहीं खोलेंगे !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

       समाजात विवाह, उपनयन यांसारखे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असे धार्मिक विधी, एखाद्या आस्थापनाने त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेली कार्यशाळा, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेले कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात. या सगळ्यांचा वातावरणावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. वातावरणावर सकारात्मक परिणाम करणारे कार्यक्रम व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी, तर नकारात्मक परिणाम करणारे कार्यक्रम हानीकारक असतात.

हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी समाजातून उपस्थित होणारे प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

श्री. रमेश शिंदे
      अखिल भारतीय हिंदू अधिवेशन ! हिंदुत्ववादी संघटना, नेते, विचारवंत, लेखक, उद्योजक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची (सनातन धर्म राज्याची) दिशा देणारे एकमेव व्यासपीठ ! हिंदु जनजागृती समितीने अन्य समविचारी संघटनांना समवेत घेऊन वर्ष २०१२ पासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आरंभले. येत्या आजपासून चालू होणारे हे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन ! आतापर्यंत ५ देशांतील आणि भारतातील २२ राज्यांतील २०० हून अधिक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सात दिवस पूर्णवेळ या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक विविध विषयांवर उद्बोधन करण्यात येते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच नव्हे, तर नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया आदी देशांतील हिंदूंच्या समस्या आणि त्यांवरील उपाययोजना यांवर सखोल चिंतन केले जाते. वर्षागणिक या अधिवेशनाला जोडले जाणार्‍यांची संख्या वाढत असून आतापर्यंत ९ राज्यांत ५० हून अधिक प्रांतीय हिंदू अधिवेशने यशस्वीरित्या पार पडली आहेत. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होणार असल्याचा संत आणि महर्षि यांचा संकल्प आहेच. तो सिद्धीस नेण्यासाठी येथे येणारा प्रत्येक हिंदु या कार्यात सक्रीयपणे स्वतःचे योगदान देत आहे. भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हे हिंदू अधिवेशन मोलाचे कार्य करत आहे.

प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा धर्म आहे, तसा भारताला का असू नये ? - प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला संतांचे शुभाशीर्वाद !
पू. (सौ). मंगला उपाध्ये आणि प.पू. आबा उपाध्ये
      हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने संदेश देण्याविषयी सांगितले असता क्षणभर वाटले की, आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसांकडे संदेश मागणे, म्हणजे आम्हाला हे किती मोठेपण दिले ! या मानासाठी योग्य संदेश देणे आवश्यक आहे. तो संदेश...
      हिंदु राज्य (हिंदु राष्ट्र) येणे आवश्यक आहे. प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा धर्म आहे, तसा आम्हाला का असू नये ? भारत निधर्मी आहे, हे आजपर्यंत चालत आलेले उद्दिष्ट आहे, हे योग्यच आहे; पण त्याचप्रमाणे हिंदु राज्य हे निधर्मीच असेल; पण सार्‍या धर्माला हिंदु कायदाच पाळावा लागेल. (हिंदु राष्ट्रही निधर्मीच, म्हणजे सर्वांना समान न्याय देणारे असेल, असे प.पू. आबा यांना म्हणायचे आहे. - संकलक)

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित होणे, ही आनंदाची गोष्ट ! - प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास)

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने संतसंदेश
     गोव्यामध्ये १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत ५ वे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे, ही आनंदाची बाब होय ! १८ ते २३ जूनच्या दरम्यानच श्री क्षेत्र पुष्कर येथे होत असलेल्या वेद अध्यापक शिबिरात मी पूर्णवेळ सहभागी असल्यामुळे या अधिवेशनाचा लाभ घेऊ शकत नाही.
     श्रद्धेय डॉ. जयंतराव आठवले यांच्या मार्गदर्शनाने साधकांच्या वैयक्तिक साधनेपासून राष्ट्राच्या पुरुषार्थ जागरणाचे अनेक उपक्रम सनातन संस्था समर्थपणे पार पाडत आहे, ही अभिनंदनीय बाब होय ! हिंदु धर्माचा संपूर्ण विचार आणि इतिहास हा मानवतावादी अन् विश्‍वप्रेमी आहे. त्यामुळे विश्‍वकल्याणासाठी हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र बलशाली होण्याच्या सर्व पैलूंवर विचार होवो अन् सनातनवर केल्या जाणार्‍या कुत्सित आरोपांचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी ही सामग्री प्रकाशात येवो, ही अपेक्षा !
     अधिवेशन आनंदोत्साहात पार पडून ते सर्वांसाठी स्फूर्तीदायी ठरो, ही शुभकामना ! इति !

प.पू. गुरुदेव श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले यांना अपेक्षित असे हिंदु राष्ट्र लवकरच यावे, हीच श्री विश्‍वदर्शन देवतेच्या चरणी प्रार्थना ! - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
     हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती अव्याहतपणे हिंदुत्वाचे कार्य करत आहेत. हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांना मिळत असलेल्या यशामुळे साधकांकडून आणखी जोमाने प्रयत्न होत आहेत. या यशामुळे साधकांचा कार्य करण्याचा निश्‍चय आणि उत्साह वाढत आहे. कितीही अडचणी आल्या, तरी या कार्याला सदैव श्री विश्‍वदर्शन देवतेचा अखंड शुभाशीर्वाद आहे. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी संदेश द्यायला मी काही थोर मनुष्य नाही. अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी साक्षात् श्री विष्णूंचा श्रीश्रीजयंत अवतार घेतलेले प.पू. डॉ. आठवले यांचा आशीर्वाद आहे. प.पू. गुरुदेव श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले यांना अपेक्षित असे हिंदु राष्ट्र लवकरच यावे, हीच श्री विश्‍वदर्शन देवतेच्या चरणी प्रार्थना ! 
॥ हिंदु राष्ट्रदेवताये नम: ॥

सनातन धर्मराज्याची पुनर्स्थापना करणे ही काळाची आवश्यकता ! - कांची कामकोटी पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती

कांची कामकोटी पीठाधीश्‍वर
स्वामी जयेंद्र सरस्वती
 
      सनातन धर्म हे चिरंतन सत्य आहे. सनातन धर्म ही आपली पूर्वापार चालत आलेली जीवनपद्धत आहे. सनातन धर्म हेच आपल्या भारताचे खरे राष्ट्रीयत्व आहे. हे राष्ट्रीयत्व विविध समाजातील लोकांना एका छत्राखाली आणते. हे राष्ट्रीयत्व भारतीय नागरिकांमध्ये जननी जन्मभूमिश्‍च स्वर्गादपि गरीयसी । म्हणजे जननी (आई) आणि जन्मभूमी या दोघी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशी धारणा निर्माण करते. सनातन धर्म केवळ मानवांचीच नव्हे, तर प्रत्येक जिवाची काळजी घेतो. हिंदु राष्ट्रवाद हा आपला देशाचा धर्म आहे. सनातन धर्मराज्याची पुनर्स्थापना करणे ही काळाची आवश्यकता आहे.
     आपली मातृभूमी ही पुण्यभूमी आहे. ही तपोभूमी संस्कृती, वारसा आणि संस्कार यांनी समृद्ध आहे. या मातृभूमीतील प्रत्येक तंतू आणि पेशी यांमध्ये चैतन्याची स्पंदने आहेत. येथील प्रत्येक वृक्ष, नदी, प्राणी आणि पर्वत पवित्र आहे. यामुळेच आपल्या मातृभूमीकडे जतन करण्याजोगा आणि संपूर्ण जगाला देण्याजोगा संदेश आहे. हिंदु राष्ट्रवाद हा केवळ मानवजातीच्या कल्याणासाठीच सीमित नसून याची व्याप्ती सर्व प्राणीमात्रांपर्यंत आहे. संपूर्ण जगाचा आध्यात्मिक गुरु हे उच्च स्थान हिंदु राष्ट्रवादाला आहे.

हिंदुत्वनिष्ठांनो, खोटे पुरावे निर्माण करून हिंदुत्वाला, म्हणजे सनातनला दडपणार्‍या अन्वेषण यंत्रणांपासून सावधान !

     सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेचा आणि त्यानंतरच्या चौकशीचा वृत्तांत विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहे. यात वरिष्ठांनी प्रोजेक्ट दाभोलकर उपक्रमावर डॉ. तावडे यांची नियुक्ती केली होती, डॉ. तावडे यांनी शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी काही जणांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, डॉ. तावडे डॉ. दाभोलकरांच्या विरोधात बोलले होते, डॉ. तावडे यांना हिंदु राष्ट्रासाठी १५ सहस्त्र जणांचे सैन्य उभारायचे होते आदी माहिती अन्वेषण यंत्रणांना प्राप्त झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. खर्‍या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येत नसेल, तर खोटे पुरावे निर्माण करून निरपराध नागरिकांना अडवण्यात अन्वेषण यंत्रणा वाक्बगार असतात, हे आतापर्यंत अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. तसेच या प्रकरणातही झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांमधून सनातनच्या अधिकाधिक निष्पाप साधकांना अडकवण्याचा अन्वेषण यंत्रणांचा हेतू स्पष्ट होतो. त्यासाठी -
१. इ-मेलमधील मजकूर हस्ताक्षरासारखा नसतो. अन्वेषण यंत्रणांकडे असलेल्या व्यवस्थेद्वारे ते कोणाचाही इ-मेल कुठेही उघडू शकतात. त्याचा वापर करून हवे तसे पुरावे निर्माण करू शकतात, तसेच निरपराधीत्व सिद्ध करणारे इ-मेल नष्ट करू शकतात.

६ दिवस सनातनची यथेच्छ अपकीर्ती करणार्‍या वृत्तवाहिन्यांनी सनातनच्या पत्रकार परिषदेला अत्यल्प प्रसिद्धी का दिली ?

     सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यापासून म्हणजे १० ते १६ जून या ६ दिवसांच्या कालावधीत वृत्तवाहिन्यांनी त्यांच्यावर आणि सनातनवर बेछूट आरोप केले. वाहिन्यांवरून विविध प्रकारची वृत्ते आणि तळटीपा कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता दाखवल्या जात होत्या. काही वाहिन्यांनी तर त्याविषयीची कथानके रचून कार्यक्रमही सादर केले, तसेच वृत्तवाहिन्यांनी त्यांना अटक होण्याच्या अनुषंगाने आणि सनातनवर बंदी घालण्याच्या विषयाच्या संदर्भात चर्चासत्रांचेही आयोजन केले होते. म्हणजे एकंदरितच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपी मिळाला असे समजून या विषयाला वृत्तवाहिन्यांनी प्राधान्य दिले; मात्र ज्या सनातन संस्थेवर आणि तिचे विविध साधक यांच्यावर वाटेल तसे आरोप करून त्यांची अपकीर्ती करण्यात आली, त्या सनातन संस्थेने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी १७ जून या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सीबीआय खोटे साक्षीदार सादर करत असल्याचे पुरावे सनातनने सादर केले; मात्र वाहिन्यांच्या प्रतिनिधींना थेट प्रक्षेपण करण्याची सुविधा उपलब्ध असतांनाही ते वृत्त दाखवले नाही. नंतरही अगदी अत्यल्प प्रसिद्धी दिली. डॉ. तावडे यांच्या अटकेनंतर या वाहिन्यांचे पत्रकार ४-५ दिवस सनातनच्या देवद येथील आश्रमाच्या बाहेर बाईट घेण्यासाठी खोळंबलेले असायचे. त्यांना या प्रकरणाच्या संदर्भात सविस्तर खुलासा करणारी माहिती पत्रकार परिषदेद्वारे मिळूनही त्यांनी त्याला उचित प्रसिद्धी दिली नाही. यामुळे अनेकांनी त्यांच्या मनात उपस्थित झालेल्या पुढील शंका आम्हाला विचारल्या -
१. भाजपने तर प्रसारमाध्यमांवर सनातनची पत्रकार परिषद न दाखवण्याविषयी अंकुश ठेवला नव्हता ना ?
२. वाहिन्यांनी या प्रकरणी सनातनला प्रसिद्धी द्यायची नाही, हे एकत्रित ठरवले का ?
३. सीबीआयचा फोलपणा उघड होणार असल्याने त्याने माध्यमांना याविषयी प्रसिद्धी न देण्याविषयी सांगितले का ?

सनातन संस्था आणि सनातनचे साधक यांच्या चौकशीच्या संदर्भात त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करणारे सत्य !

१. आतापर्यंत एटीएस्, एन्आयए, एस्आयटी आणि सीबीआय या अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या ८०० साधकांची चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
२. मडगाव स्फोट प्रकरणातून सनातनच्या ६ साधकांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्या वेळी न्यायदानाच्या प्रतीत न्यायाधिशांनी, हा प्रथमदर्शी अहवालच संशयाच्या भोवर्‍यात आहे आणि सनातन संस्थेला गुंतवण्यासाठीच यात तोडमोड (मॅनिप्युलेशन) करण्यात आली आहे, असे म्हटले आहे.
३. समीर गायकवाड यांना १६ सप्टेंबर २०१५ या दिवशी पानसरे हत्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना अटक करून ८ महिने होऊनही अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी खरे मारेकरी शोधायचेच नाहीत, असे वाटते, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१५ ला ओढले.

प्रसारमाध्यमांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकाला अटक झाल्यानंतर (ऑनलाईन तसेच वृत्तपत्रे यांत) दिलेली विपर्यस्त वृत्ते !

 •  वीरेंद्र तावडेच्या घरात सापडली राक्षसांची यादी - महाराष्ट्र टाइम्स, १७.६.२०१६
 •  वीरेंद्रसिंह तावडे हाच हत्येचा सूत्रधार - महाराष्ट्र टाइम्स, १४.६.२०१६
 •  मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंग तावडे - लोकमत, १४.६.२०१६
 •  दाभोलकर खून प्रकरणात तावडेच मुख्य सूत्रधार ? - लोकसत्ता, १४.६.२०१६
 •  तावडे-अकोलकरला उभारायची होती फौज - महाराष्ट्र टाइम्स, १३.६.२०१६
 •  दाभोलकरांवर लक्ष केंद्रित करा... - सकाळ, १७.६.२०१६
 •  कट्टर हल्लेखोरांच्या शोधात होता तावडे - सकाळ, १६.६.२०१६
 •  दाभोलकर हत्याकांड : सीबीआय चौकशीत वीरेंद्र तावडेचा असहकार - लोकसत्ता, १६.६.२०१६
 •  सारंग अकोलकरच मारेकरी - लोकमत, १५.६.२०१६
 •  सारंग अकोलकरनेच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या ? - लोकमत, १३.६.२०१६
 •  सारंग अकोलकरनेच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या ? - पुढारी, १५.६.२०१६
 •  सारंग अकोलकरनेच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या - प्रहार, १५.६.२०१६
 •  तावडे-आकोलकरला शस्त्रांचा कारखाना सुरू करायचा होता : सीबीआय - एबीपी माझा, १३.६.२०१६
सनातनचे साधक वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यानंतर प्रसिद्ध
 होत असलेल्या कथित वृत्तांमधील धादांत खोटी आणि हास्यास्पद विधाने !
१. डॉ. तावडे सनातनचे पगारदार नोकर होते !
२. तावडे यांचा दवाखाना कळंबोली येथे होता !
३. तावडे त्यांच्या पत्नीचा छळ करत होते आणि संस्थेच्या कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेत नव्हते !

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आणि दिव्यानुभूती देणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन म्हणजे ईश्‍वराचेच एक नियोजन !

श्री. मानव बुद्धदेव
       मला गोवा येथे ११ ते १७.६.२०१५ या कालावधीत झालेल्या चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. याचे कारण हिंदू अधिवेशन हे हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले ईश्‍वराचेच नियोजन असल्याचे मला पदोपदी जाणवत होते. गुरुकृपेने अधिवेशन ही माझ्याकरता एक दिव्यानुभूती ठरली.
१. आश्रमदर्शनाच्या वेळी अवर्णनीय 
आनंद मिळून चैतन्य जाणवणे
       अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रामनाथी आश्रम दर्शनाचा योग आला. त्या वेळी मला चैतन्य जाणवून अवर्णनीय आनंद होत होता. आश्रमातील सर्व साधक-साधिकांच्या तोंडवळ्यावरील तेज अन् स्मितहास्य हे आश्रमातील त्यांच्या वास्तव्याची फलनिष्पत्तीच सहजपणे सांगत होते.
चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांशी
चर्चा करतांना सनातन संस्थेचे १. पू. नंदकुमार जाधव

हिंदु राष्ट्रातील प्रजा !

     हिंदु राष्ट्रातील प्रजा धर्माचरणी, नीतीमान आणि राष्ट्रहितदक्ष असेल. प्रजा अधिकार मागणारी नसेल, तर कर्तव्ये पार पाडणारी असेल. त्यामुळे हिंदु राष्ट्रात मोर्चे, आंदोलने, संप, बंद असणार नाहीत.
सौ. अवनी संदीप आळशी
      सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधिका सौ. अवनी संदीप आळशी यांचा वटपौर्णिमा (१९.६.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे.
सौ. अवनी आळशी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभेच्छा !
     सौ. अवनी आळशी यांची त्यांचे पती सनातनचे संत पू. संदीप आळशी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे खरेच गांभीर्य आहे का ?

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना १० जूनला केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर चालू झाली एकामागून एक दाभोलकर हत्या प्रकरणाविषयीच्या कथित वृत्तांची मालिका... अगदी 'डॉ. तावडेच या कटाचे सूत्रधार आहेत', 'सनातननेच हा कट रचला' येथपासून ते 'अकोलकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या' येथपर्यंत विविध कथित वृत्ते नित्य नव्या दमाने वाहिन्या, संकेतस्थळे, वृत्तपत्रे यांतून पुढे येत होती. १० जूननंतर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील एक एक गूढ उकलत असल्याप्रमाणे जणू प्रसारमाध्यमांनी वातावरणनिर्मिती केली. ही वृत्ते त्यांना नेमके कोण पुरवत होते ? अर्थातच केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सूत्रधाराशिवाय दुसरा पर्याय नव्हता ! जर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला नित्य नवी माहिती मिळत होती आणि अर्थातच सर्वांकडून प्रचंड दबाव असतांना तीन वर्षांनंतर या प्रकरणाचे काहीतरी धागेदोरे उलगडत होते, तर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने स्वतःच पत्रकार परिषद घेऊन सर्व सूत्रे एकदाच का सांगितली नाहीत ? प्रतिदिन थोडी थोडी माहिती प्रसिद्धीमाध्यमांना पुरवण्यामागे नेमका काय उद्देश होता ? यामुळे या सर्व प्रकरणाविषयी साशंकता निर्माण होण्यास वाव मिळतो. तसेच अन्वेषण यंत्रणेला या प्रकरणाचे अपेक्षित गांभीर्य आहे कि निवळ डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी कोणाला तरी पकडल्याचे पुढे करून तपास पुढे जात असल्याचे भासवायचे आहे, असाही प्रश्‍न पडतो.

हिंदूंनो, धर्माचरण आणि साधना करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पात्र व्हा !

     धर्माचरण आणि साधना केल्याने हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कळल्यानंतरच खरा धर्माभिमान निर्माण होऊन समाज, राष्ट्र अन् धर्म यांचे खरे हित साधण्यासाठी प्रयत्न होतात. धर्माचरण आणि साधना केल्यामुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्‍यांनी धर्महानी केल्यास ती त्यास विरोध करते; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य धर्माचरण आणि साधना करणारी व्यक्तीच करू शकते.

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ प्रकाशित !

विकार-निर्मूलनासाठी नामजप 
भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र
भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !
        संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील विकार-निर्मूलनासाठी नामजप (२ भाग) या नूतन ग्रंथाचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत. १२ जून या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या लेखाच्या पूर्वार्धात विकारांनुसार विविध नामजपांविषयी आपण जाणून घेतले. आज त्यापुढील भाग पाहूया.

'ॐ' चे महत्त्व

१. 'ॐ' चे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे प्रयोग !

प्रयोग १ : 'A' या इंग्रजी अक्षराचा २ मिनिटे उच्चार करून काय वाटते, हे अनुभवा अन् नंतर पुढील भाग वाचा.
प्रयोग २ : 'ओऽम्' या संस्कृत अक्षराचा २ मिनिटे उच्चार करून काय वाटते, हे अनुभवा अन् नंतर पुढील भाग वाचा.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण श्रीरामाच्या वानरसेनेतील वानरांप्रमाणे सहभागी होत आहोत, हा भाव ठेवा !

     असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासह आपलाही उद्धार होईल; नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी आपला अहंभाव जागृत असल्यास आपला उद्धार होणार नाही !

डॉ. तावडे यांच्याविरोधात खोटी साक्ष देऊन स्वतःचे दुष्कृत्य लपवण्याचा घोटाळेबहाद्दर साडविलकर यांचा डाव !

डॉ. तावडे यांच्यावरील कथित आरोपांचे प्रकरण !
१. काय आहे चांदीच्या रथाचा घोटाळा ?
     साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानात प्रतीवर्षी चैत्र महिन्यात ज्योतिबाच्या यात्रेच्या दुसर्‍या दिवशी रथोत्सव साजरा होण्याची परंपरा वर्ष १९१४ पासून चालू झाली आहे. गेली अनेक वर्षे हा रथ लाकडाचा होता. वर्ष २०११ मध्ये हा रथ चांदीचा बनवला गेला.
      हा चांदीचा रथ बनवतांना भ्रष्टाचार झाला आहे. याविषयी गैरव्यवहार झाला असल्याचा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी वर्ष २०१२ मध्येच दिला होता; परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संगनमताने हा व्यवहार होत असल्यामुळे वर्ष २०१२ नंतरही यावर काहीही कारवाई झालेली नाही.
२. महालक्ष्मी देवस्थानातील चांदीचा रथ बनवण्याच्या संदर्भात लक्षात आलेला घोटाळा
अ. श्री महालक्ष्मीच्या चांदीच्या रथाचे कंत्राट वर्ष २०१२ मध्येच संजय साडविलकर यांना टेंडर न काढताच देऊन टाकले.
आ. त्याचा टंच (सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात, तर चांदीची शुद्धता टंचमध्ये मोजतात) किती असावा, त्याविषयी काहीही ठरवले नाही.
इ. महालक्ष्मी देवस्थानने चांदीचा रथ बनवतांना परस्परच कामगार ठरवले आणि त्यांना २८३ किलो चांदी दिली.
ई. आगाऊ रक्कम (अ‍ॅडव्हान्स) २ लाख रुपये दिले.
उ. कर्णावती (अहमदाबाद) येथून नियमबाह्य रितीने २० किलोहून अधिक चांदी विकत घेतली. एकूणच प्रक्रिया नियमबाह्य होती.
ऊ. अंबाबाईसाठी ४५२ किलो चांदीत रथ बनवल्याचे देवस्थान समिती सांगत आहे. याउलट समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी २८३ किलो चांदी रथासाठी उपलब्ध होती आणि आणखी २० किलो चांदी खरेदी करून रथ बनवल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नेमके खरे कोणाचे म्हणायचे ?अशी परिस्थिती सध्या आहे.
ए. साडविलकर यांना २८३ किलो चांदी दिली; परंतु त्या दिलेल्या चांदीची शुद्धता किती आणि साडविलकर यांच्याकडून आलेल्या चांदीच्या पत्र्याची शुद्धता किती, हे तपासलेच गेले नाही. साडविलकर ही व्यक्ती स्वत:च भ्रष्ट असून त्यांनी कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील चांदीच्या रथाच्या कंत्राटात चांदी खाल्ल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हिंदूंनो, धर्माचरण करा आणि धर्मरक्षणासाठी संघटित व्हा !


ॐ चे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारा प्रयोग आणि आलेली अनुभूती

योगातून ॐ वगळणार्‍या शासनाने ॐ चे आध्यात्मिक सामर्थ्य समजून घ्यावे !
ॐ चे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी मी पुढील प्रयोग केले. 
१. प्रयोग
१ अ. प्रयोग १ : खालील ओळींचा ॐ विरहीत उच्चार केल्यावर काय जाणवते ? 
१ आ. प्रयोग २ : खालील ओळींचा ॐसहीत उच्चार केल्यावर काय जाणवले ? 
     ॐ शान्तिप्रियः प्रसन्नात्मा प्रशान्तः प्रशमप्रियः । 
     ॐ उदारकर्मा सुनयः सुवर्चा वर्चसोज्ज्वलः ॥ - सूर्यसहस्त्रनामस्तोत्र

पृष्ठ २ वरील प्रयोगाचे उत्तर

१ अ. प्रयोगाचे उत्तर 
प्रयोग १ : A या इंग्रजी अक्षराचा २ मिनिटे उच्चार करतांना काही क्षणांतच डोके जड होते. 
प्रयोग २ : ओऽम् या संस्कृत अक्षराचा २ मिनिटे उच्चार करतांना मनाला शांत वाटून आनंद जाणवतो, तसेच देहामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण होते. 
     अशा प्रकारे ओऽम् ची तुलना जगातील कोणत्याही भाषेतील कोणत्याही अक्षराशी केली, तरी हेच उत्तर येते, हे अनुभवता येईल.
२. ॐकाराचे महत्त्व 
२ अ. ॐ चा उच्चार करतांना केवळ तेव्हाच आनंद किंवा शांती जाणवते असे नाही, तर त्याच्या पुढील ३ - ४ शब्द म्हणतांनाही तसे जाणवते. 
२ आ. पूर्णत्व प्राप्त करून देणार्‍या ॐकाराचे दिव्यत्व ! : अनेक ऋषी-मुनींनी निर्गुण, निराकार असलेला ब्रह्मांडातील नाद ध्यानधारणेतून ग्रहण केला आणि त्याला सगुण, साकार रूप दिले. या ॐकारातून अक्षरब्रह्माची निर्मिती झाली आणि त्यातून संस्कृत भाषा निर्माण झाली. ॐकार हा सर्वव्यापक आणि स्वस्वरूप असल्यामुळे परिपूर्ण आहे, तसेच तो पूर्णत्व प्राप्त करून देणारा आहे. ॐकार म्हणजे देवाने परिपूर्णतेची दिलेली प्रत्यक्ष अनुभूती आहे.

महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या आयुष्यवृद्धीसाठी आणि साधकांसाठी चेन्नई येथे आयुष्यहोम, सुदर्शन होम अन् नक्षत्रहोम संपन्न

    
चेन्नई - सप्तर्षि जीवनाडीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आयुष्यवृद्धीसाठी आणि साधकांसाठी ९ जून २०१६ या दिवशी आयुष्यहोम, सुदर्शनहोम अन् नक्षत्रहोम केला. यज्ञाचे पौरोहित्य ईरोडचे गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सहपुरोहित यांनी केले. या यज्ञाचा संकल्प सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते झाला. या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या पत्नी सौ. ॐ पवित्रा, नाडीभक्त श्री. आणि सौ. लक्ष्मीपती अन् त्यांचा मुलगा श्री. रघुराम हेही उपस्थित होते.

हिंदुत्वासाठी शिवसेना

 आहेत देशात दोन सेना ।
भारतीय सेनेनंतर, हिंदूंसाठी शिवसेना ॥
जन्म झाला तुझा हिंदुहृदयसम्राटांच्या मनातून ।
घडवले लक्षावधी शिवसैनिकांना तुझ्या मुशीतून ॥ १ ॥
केलास तू देशभर हिंदुत्वाचा हुंकार ।
राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही झाले पसार ॥ २ ॥
करण्या हिंदुराष्ट्राचा पुन्हा टणत्कार ।
जय जय शिवप्रभूंचा गर्जू दे ललकार ॥ ३ ॥
 
सनातन परिवाराकडून शिवसेनेच्या
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा !

भगवंताने आरंभलेल्या अवतारी कार्यात सर्वस्व समर्पित करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि मनुष्यजन्मात उद्धार करून घ्या ! - प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज
      ५ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर हिंदु धर्माभिमानी, संत आणि साधक यांना सविनय नमस्कार ! आपण सर्व हिंदु राष्ट्र निर्मितीला साहाय्यभूत होण्यासाठी येथे एकत्रित आला आहात. त्या दृष्टीने या कार्यात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. त्यासाठी भगवंताचे नियोजन काय आहे, हे समजून घेऊया.
१. चैतन्याचे पुनरुत्थान करण्यासाठी काय कराल ?
१ अ. हिंदूंनी आपल्या चैतन्यमय शक्तीकेंद्रांचे महत्त्व जाणून त्यांचे रक्षण करणे ही खर्‍या अर्थाने पूजा होय ! : हिंदूंनी देवाची पूजा म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. ज्यामध्ये पूज्यत्व आहे, चैतन्यमय शक्ती आहे, ज्यामुळे वातावरणातील रज-तमात्मक विघातक शक्तीचा नाश होतो, अशी कृती म्हणजे पूजा होय. तीर्थक्षेत्रे, गंगादी नद्या अशी शक्तीकेंद्रे पूजनीय आहेत. त्यांचे जतन करणे, त्यांना संरक्षण देणे, ही खर्‍या अर्थाने पूजा आहे. अशा चैतन्यमय शक्तीकेंद्रांच्या सान्निध्यात आल्यावर मानवाला आनंद मिळतो; म्हणून मूर्तीपूजेसाठी देवळांची निर्मिती झाली.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी देवतांच्या चरणी प्रार्थना !

    
श्री रामनाथदेवाच्या चरणी श्रीफळ अर्पण करतांना श्री. प्रकाश नाईक,
 डावीकडून श्री. घनश्याम गावडे आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई
     फोंडा (गोवा) रामनाथी, फोंडा, गोवा येथे १९ जून ते २५ जून २०१६ या कालावधीत होणारे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडू दे, हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊ देत आणि अधिवेशनाला अपेक्षित यश लाभू दे, अशी प्रार्थना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ जून या दिवशी रामनाथी येथील श्री रामनाथदेव आणि कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी यांच्या चरणी करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई, श्री. घनश्याम गावडे, श्री. प्रकाश नाईक, श्री. शिवदत्त नाडकर्णी आणि सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर उपस्थित होते. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी होणार्‍या या अधिवेशनात देश-विदेशांतील १६१ हून अधिक हिंदु संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ - ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१९.६.२०१६) दुपारी ३.३१ वाजता
समाप्ती - ज्येष्ठ पौर्णिमा (२०.६.२०१६) दुपारी ४.३२ वाजता

उद्या पौर्णिमा आहे.

देवतांच्या भावपूर्ण आणि योग्य उच्चारांच्या नामजपांप्रमाणे तुम्हीही नामजप करा अन् देवतांच्या तत्त्वांचा अधिक लाभ मिळवा

१. सनातन संस्थेच्या www.sanatan.org या संकेतस्थळावर काही नामजप उपलब्ध आहेत. यांपैकी आवश्यक नामजप डाऊनलोड करा !
२. सनातन-निर्मित नामजपांच्या ध्वनीचकत्या (ऑडीओ सीडी) मराठी आणि हिंदी भाषांत उपलब्ध !
       शिव, श्री गणपति, दत्त, श्रीराम, हनुमान, श्रीकृष्ण आणि श्री दुर्गादेवीसहित अन्य देवी यांचे नामजप, तसेच त्या त्या देवतेच्या उपासनेमागील शास्त्रही उपलब्ध !
(ध्वनीचकत्या मिळण्यासाठी संपर्क : ९३२२३१५३१७)

नेहमीच्या तुलनेत गुरुतत्त्वाचा सहस्रपट लाभ करून देणार्‍या गुरुपौर्णिमेच्या सेवेत अधिकाधिक जणांनी सहभागी होऊन गुरुकृपेस पात्र व्हावे !

वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी यांना गुरुपौर्णिमेनिमित्त सेवेची सुवर्णसंधी ! 

गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांसाठी अनमोल अशी पर्वणीच ! गुरुऋणातून काही अंशी तरी मुक्तता व्हावी, यासाठी साधक तन, मन आणि धन यांचा त्याग करून गुरुपौर्णिमा महोत्सवातील पूर्वसिद्धतेच्या सेवा झोकून देऊन करण्याचा प्रयत्न करतात. या निमित्ताने सेवा आणि त्याग करणार्‍याला नेहमीच्या तुलनेत गुरुतत्त्वाचा सहस्रपट लाभ होत असतो.
यंदा १९.७.२०१६ या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने अनेक सेवा उपलब्ध असून वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी हेसुद्धा या सेवांत त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार सहभागी होऊ शकतात. अशा सर्व इच्छुकांनी वितरक अथवा स्थानिक साधकांशी लवकरात लवकर संपर्क साधून या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्यावा !

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि 
वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता 
SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७

गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.

माहिती मिळवण्याच्या उद्देशाने येणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींपासून सतर्क रहा !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना
      डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सी.बी.आय.कडून) सनातनच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध वृत्तवाहिन्यांवरून विपर्यस्त वृत्ते प्रसारित करून सनातन आणि समिती यांची नाहक अपकीर्ती केली जात आहे. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी सेवाकेंद्रे, तसेच साधकांच्या घरी जाऊन किंवा दूरभाषवरून साधकांना विविध प्रश्‍न विचारून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी या प्रतिनिधीचे नाव आणि ते कोणत्या वृत्तवाहिनीकडून आले आहेत, हे साधकांनी जाणून घ्यावे. या प्रतिनिधींना माहिती दिली की, ते वृत्तवाहिन्यांवरून विपर्यस्त वृत्त प्रसारित करत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे साधकांनी त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये. या प्रतिनिधींना कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांना सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना ०७७७५८५८३८७ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करण्यास सांगावे.

ग्रंथात सांगितलेली मुद्रा-उपायपद्धत ही हिंदु धर्मातील ज्ञानावर आधारित !

        मानवाच्या हाताची पाच बोटे ही पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक बोट आणि त्याच्याशी संबंधित महाभूत याविषयी आम्ही सांगितलेली माहिती शारदातिलक (अध्याय २३, श्‍लोक १०६ वरील टीका) आणि स्वरविज्ञान या ग्रंथांत दिलेल्या माहितीप्रमाणेच आहे.
        मुद्रा करून तिचा शरिराच्या कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी किंवा विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करणे, हा आम्ही सांगितलेल्या उपायपद्धतीचा एक भाग आहे. प्राचीन काळापासून मंत्रयोगात मातृकान्यास करण्यास सांगितले आहे. त्यातही पाच बोटे आणि तळवा यांनी शरिराच्या विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितले आहे. (संदर्भग्रंथ : भारतीय संस्कृतिकोश, खंड ४ आणि ७)
        अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. त्यामध्ये प्रयोगशीलता आणि सृजनशीलता आहे. हिंदु धर्मातील ज्ञानाचा उपयोग करतांनाच आम्ही जिज्ञासु वृत्तीने अभ्यास केला. विविध मुद्रा, न्यास आणि नामजप यांच्या संदर्भात स्वतः प्रयोग केले आणि अनुभव घेतला. अनेक साधकांनीही या उपायपद्धतीने प्रयोग केले. या उपायपद्धतीचे लाभ लक्षात आल्याने आता ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांसमोर ही उपायपद्धत प्रस्तुत केली आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती

१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते.
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही.
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते.
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे.

भावार्थ : येथे 'प्रेम' हा शब्द 'प्रीती', म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मकतेतील शक्ती !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
घडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

आदर्श राज्याची पायाभरणी !

संपादकीय
      पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आज रामनाथी, फोंडा येथील रामनाथ मंदिराच्या विद्याधिराज सभागृहात चालू होत आहे. वर्ष २०१२ च्या जून मासात पहिले अखिल भारतीय हिंदू अधिवेशन भरले, तेव्हापासून प्रतिवर्षी सातत्याने ते भरत असून त्यातच त्याच्या यशस्वीतेचे गमक आहे. या अधिवेशनाची आवश्यकता का भासली ? जागतिक लोकसंख्येत हिंदूंच्या लोकसंख्येचा हिस्सा किरकोळ नाही, तरीही जगातील २०० देशांत एकही हिंदु देश नाही. देश नाही ते नाही, हिंदूंवर होणारे अत्याचार मात्र विलक्षण तीव्रतेचे ! हिंदूंचा वंश जणू जगाच्या नकाशावरून पुसून टाकायचे षड्यंत्रच ! या अधिवेशनाच्या निमित्ताने देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठ एकत्र येत असतात आणि हिंदु धर्म आणि धर्मीय यांच्यावर होणारे आघात तसेच हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना या सूत्रांवर चर्चा करत असतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn