Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज गोवा क्रांती दिन

विनम्र अभिवादन !

आज शिवराज्याभिषेक दिन

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने उभा केलेला साक्षीदार बोगस आणि भ्रष्टाचारी ! अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

   
डावीकडून वैद्य उदय धुरी, कागदपत्र दाखवतांना श्री. अभय वर्तक, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
  मुंबई - हिंदु विधीज्ञ परिषदेने श्री महालक्ष्मी मंदिर आणि अन्य ३ सहस्र ६६ मंदिरे यांतील भूमींचे, खाणकामाचे, मौल्यवान दागिन्यांचे असे कित्येक घोटाळे बाहेर काढले. त्यात चांदीच्या रथाच्या संदर्भात भ्रष्टाचार झाल्याचेही सूत्र आहे. चांदीच्या रथाच्या कंत्राटात चांदी खाल्ल्याचा आरोप संजय साडविलकर यांच्यावर आहे. हा घोटाळा बाहेर काढल्यावर त्याविषयी सीआयडी चौकशी करावी, यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यात हिंदु जनजागृती समिती, तसेच सनातन संस्थेचेे स्थानिक साधक यांनी साहाय्य केले. त्यामुळे सनातन संस्थेमुळे आपल्या पोटावर पाय येईल आणि आपण कारागृहात जाऊ, अशी भीती अनेकांना वाटत आहे. या भीतीतूनच साडविलकर यांंनी सनातनवर खोटे आरोप करण्याचे काम चालू केले आहे. डॉ. तावडे यांच्याविरोधात खोटे पुरावे देणारे साडविलकर हे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) विकत घेतलेले साक्षीदार आहेत, असा गौप्यस्फोट सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी १७ जून या दिवशी मुंबई प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी हेही उपस्थित होते.

गुलबर्ग हत्याकांड प्रकरणी ११ जणांना जन्मठेप

     नवी देहली - २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी कर्णावती येथील गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने ११ दोषींना जन्मठेप, १२ दोषींना ७ वर्षांचा कारावास; तर उर्वरित एका दोषीस १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या हिंसाचारात ६९ जण ठार झाले होते. यात माजी खासदार एहसान जाफरी यांचा समावेश होता.

बंगालमध्ये ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील आरतीच्या भोंग्यावरून धर्मांधांनी हिंदूंची दुकाने जाळली !

धर्मांधांची वाढती आक्रमणे ही तृणमूल काँग्रेसला वारंवार
 निवडून देणार्‍या हिंदूंना मिळणारी ही शिक्षाच होय !

हिंदूंनो, ममता(बानो) बॅनर्जी यांच्या राज्यात असुरक्षित 
हिंदूंचे रक्षण केंद्रातील सरकारही करणार नाही, हे जाणा !

हिंदूंनो, या बातम्या वाचून झोपू नका, तर हिंदु राष्ट्रासाठी (सनातन धर्म राज्यासाठी) संघटित व्हा !
हिंदूंनी संघटन दाखवून धर्मांधांना पिटाळले !
धर्मांधांना पिटाळून लावणार्‍या हिंदूंचे अभिनंदन !
     मंदिर बाजार (दक्षिण २४ परगणा, बंगाल) - येथील ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील भोंग्यांवरून सकाळी आणि संध्याकाळी ऐकवल्या जाणार्‍या आरतीला रमजान असल्याचे सांगत धर्मांधांनी विरोध केला. त्यांनी मंदिरात घुसून भोंगे काढण्याचा प्रयत्न केला असता हिंदूंनी त्यांना संघटितपणे विरोध केल्याची घटना नुकतीच घडली.
१. रमझान महिन्याच्या ७ जून या पहिल्या दिवशी केशवेश्‍वर मंदिरात सायंकाळची आरती चालू असतांना धर्मांधांचा एक जमाव मंदिरासमोर जमला आणि त्यांनी आरती म्हणण्यास प्रतिबंध केला.
२. त्या आधी मंदिरातील आरती आणि नमाज यांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत होऊन हा प्रश्‍न शांतीच्या मार्गाने सोडवण्यात आला होता. यावर विचार करण्यासाठी १२ जून या दिवशी बाजार समितीचे पदाधिकारी, मंदिराचे सेवक, स्थानिक हिंदू आणि राजकीय पुढारी यांची बैठक चालू असतांना धर्मांधांनी बाजारातील दुकानांत जाळपोळ, लुटालूट करण्यास प्रारंभ केला.

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनानिमित्त वाराणसी, अकोला आणि जळगाव येथे पत्रकार परिषदा !

डावीकडून सौ. प्रतिभा जडी, श्री. श्रीकांत पिसोळकर
आणि कु. निधी बैस
   वाराणसी/अकोला/जळगाव - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यातील रामनाथी, फोंडा येथे पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाची माहिती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, तसेच महाराष्ट्रातील अकोला आणि जळगाव येथे पत्रकार परिषदांचे आयोजन केले होते.
     वाराणसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदु युवा वाहिनीचे वाराणसी जिल्हाध्यक्ष श्री. अंबरीश सिंह, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, सनातन संस्थेच्या सौ. श्रेया प्रभु आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश सिंगबाळ यांनी संबोधित केले.
     अकोला येथील पत्रकार परिषदेला सनातन संस्थेच्या सौ. प्रतिभा जडी, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि समितीच्याच कु. निधी बैस उपस्थित होते.
     जळगाव येथील पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील, सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव आणि हिंदु महासभेचे अधिवक्ता गोविंद तिवारी हे उपस्थित होते.

बांगलादेशमध्ये इसिसच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात हिंदु प्राध्यापक गंभीर घायाळ !

८ सहस्र जिहाद्यांना अटक करूनही बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे चालूच !
     ढाका - सहस्रो जिहाद्यांना अटक केल्यानंतरही बांगलादेशात इसिस समर्थक आतंकवाद्यांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. येथील ५० वर्षीय प्राध्यापक रिपन चक्रवर्ती यांच्या घरात घुसून ३ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.
     पोलिसांनी सांगितले की, नजीमुद्दीन शासकीय विश्‍वविद्यालयात गणित शिकवणारे चक्रवर्ती यांच्या मदारीपूरस्थित घरामध्ये सायंकाळच्या वेळी हे आक्रमण झाले. आतंकवाद्यांनी चक्रवर्ती यांच्या घराचे दार ठोठावले. चक्रवर्ती यांनी दार उडल्यावर त्यांचे डोके, गळा आणि खांदे यांवर आक्रमण केले. चक्रवर्ती यांनी आरडाओराडा केल्यावर शेजार्‍यांनी यातील एकला पकडले, तर बाकीचे दोघे पळून गेले. मदारीपूरचे पोलीस अधीक्षक सरवर हुसैन यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या आक्रमणकर्त्याची चौकशी करण्यात येत आहे. आम्हाला शंका आहे की, तो एखाद्या आतंकवादी संघटनेचा सदस्य असू शकतो.

श्रीनगरमध्ये देशद्रोही फुटीरतावाद्यांनी फडकवला पाक आणि इसिसचा झेंडा !

प्रत्येक शुक्रवारी अशा प्रकारे झेंडे फडकावणार्‍या देशद्रोह्यांवर कारवाई करू 
न शकणारे पीडीपी-भाजप सरकार जनतेचे रक्षण कसे करणार ?
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये देशद्रोही फुटीरतावाद्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी झेंडा फडकवला. काश्मिरी हिंदू आणि सैनिक कॉलनी यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी त्यांनी पाकिस्तान आणि इसिसचा झेंडा फडकवला. या वेळी फुटीरतवादी नेते मीरवाइज उमर फारुखही आंदोलकांसोबत होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाल्या.

जम्मूमध्ये ३ दिवसांत ३ मंदिरांची विटंबना !

काश्मीरप्रमाणे आता जम्मूतही धर्मांध सक्रीय ! 
  • भाजप-पीडीपी सरकारच्या काळात हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! 
  • पुढे हिंदूंवर आक्रमण होऊन त्यांना काश्मिरातील हिंदूंप्रमाणे पलायन करावे लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !
     जम्मू - नानकनगर येथील एका मंदिरात एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून तेथील सामानाची नासधूस केल्याची घटना लक्षात आली आहे. ३ दिवसांपूर्वी जम्मूतील रूपनगर येथील एका मंदिरात अशीच घटना घडली आहे. जम्मू पोलीस उपायुक्त सिमरदीपसिंह यांनी आरोपीला अटक केली असून त्याची ओळख पटली आहे, असे सांगितले. ही घटना घडल्यावर हिंदू मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या घटनेच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी शहरातील दुकाने बंद केली. हिंदूंनी विविध ठिकाणी निषेध आंदोलने केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोचले आणि त्यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिल्यावर आंदोलकांनी आंदोलन थांबवले. ३ दिवसाआधी घडलेल्या घटनेने शहरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. मात्र तेव्हा या संबंधात अटक झालेला आरोपी मनोरुग्ण होता, असे म्हणून पोलिसांनी घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र आता या दोन्ही घटनांचा परस्पराशी काही संबंध आहे का, हे पोलीस तपासून पहात आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील मागणी

     नागपूर - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची नावे वगळली आहेत. खोटे आरोप लादून तत्कालीन आतंकवादविरोधी पथक आणि राज्यकर्ते यांनी साध्वी अन् त्यांचे सहकारी यांचा अमानुष छळ केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या छळाला उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी. २०११ पासून हा खटला मुद्दाम प्रलंबित ठेवणार्‍या एन्आयएच्या अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई करावी. हे सर्व खटले द्रुतगती न्यायालयात चालवून साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदू यांना न्याय द्यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी १४ जून या दिवशी संविधान चौक, नागपूर या ठिकाणी दुपारी ४ ते ६ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

नाशिक येथे हिंदूंवरील अत्याचार दूर होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

    
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदूत्ववादी कार्यकर्ते
नाशिक - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना मुद्दामहून अडकवून त्यांना छळणारे उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी. वर्ष २०११ पासून हा खटला मुद्दाम प्रलंबित ठेवणार्‍या एन्आयएच्या अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई करावी. हे सर्व खटले द्रुतगती न्यायालयात चालवून साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदू यांना न्याय द्यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी १४ जून २०१६ या दिवशी जिल्हाधिकर्‍यांना निवेदन देण्यात आले.
     या वेळी बालभारतीच्या सहावी इयत्तेच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्‍या आणि अन्य गंभीर चुका करणार्‍या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

पाकिस्तानात मुसलमान मुलीशी संबंध असल्याच्या संशयावरून १६ वर्षीय हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !

भारतात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त 
होत असतांना त्याविषयी काही कारवाई होत नाही; मात्र पाकमध्ये
 हिंदु तरुणाने मुसलमान मुलीवर प्रेम केले, तर त्याला ठार केले जाते !
     कराची - सिंध प्रांतातील अब्दुल्ला शहा गावातील विजयकुमार या १६ वर्षीय हिंदु तरुणाची अली हैदर या मुसलमान व्यक्तीने विजयकुमारचे वडील आणि इतर नातेवाइक यांच्या समक्ष भोसकून हत्या केली. विजयकुमार हा सिंध प्रांतातील कोल्ही या आदिवासी समाजाचा होता. त्याचे बलूच समाजातील एका मुलीशी संबंध असल्याचा संशय मुलीच्या नातेवाइकांना होता. बलूच समाजाच्या एका नेत्याने अली हैदर याला विजयकुमार याच्या हत्येची सुपारी दिली होती, असे कळते. ऐन रमझान मासात झालेल्या या हत्येने कोल्ही समाज संतप्त झाला असून त्यांनी बदिन-कराची महामार्गावर आंदोलन करून त्यावरील वाहतूक २ घंटे रोखून धरली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेची दाखल घेऊन ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस निरीक्षकांना दिला आहे.

मुंबई रस्ते घोटाळाप्रकरणी दहा लेखा परीक्षकांना अटक !

     मुंबई - रस्ते घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर्.के. मधानी, रेल्कॉन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड, महावीर रोड इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, जे कुमार, के.आर्. कंस्ट्रक्शन आणि आर्पिएस्केआर् कंस्ट्रक्शन यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (घोटाळेबाज लेखा परीक्षक ! - संपादक)

(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घाला !

संभाजी ब्रिगेडचा कांगावा !
     पुणे, १७ जून - संभाजी ब्रिगेडच्या विरोधात सनातन प्रभातमधून वेळोवेळी विखारी, विकृत आणि धमकीवजा लिखाण केले जाते. (अशी कोणतीही धमकी सनातन प्रभातमधून देण्यात आलेली नसून केवळ वैचारिक प्रतिवाद केला आहे, उलट आतापर्यंत संभाजी ब्रिगेडने अनेक व्याख्याने आणि पुस्तके यांमधून धार्मिक भावना दुखावणारे, विखारी आणि जातीद्वेष पसरवून हिंदूंमध्ये फूट पाडणारे लिखाण केले आहे ! - संपादक) ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांना जिलेटीन स्फोटकासह बंदुकीच्या गोळ्या आणि सनातन प्रभात पेपरची कात्रणे पाठवून धमकी देण्यात आलेली आहे. हे भयानक असून याचा अद्याप शोध लागलेला नाही. तो तपास व्यवस्थित व्हावा, तसेच दाभोलकर-पानसरे हत्येचे सबळ पुरावे लक्षात घेता राज्यशासनाने गुन्हेगारांना पाठीशी न घालता सनातन संस्थेवर तात्काळ बंदी घालावी. (कोणतीही अन्वेषण यंत्रणा अथवा न्याययंत्रणेने सनातनच्या विरोधात कोणतेही आरोप केलेले नसतांना सनातनवर बंदीची मागणी केली जाते, यावरून सनातनद्वेषच प्रकट होतो ! - संपादक) अन्यथा संभाजी ब्रिगेड या विरोधात तीव्र आंदोलन करील, असे मागणीपर निवेदन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना १५ जून या दिवशी दिले.

बांगलादेशातील हिंदूंच्या वाढत्या हत्यांमुळे बांगलादेश सोडून जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वाढ !

बांगलादेशातील हिंदूंचा वंशसंहार होण्याची भारत सरकार वाट पहात आहे का ? 
     ढाका - बांगलादेशातील हिंदूंच्या वाढत्या हत्यांमुळे बांगलादेश सोडून जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वाढ होत आहे. दक्षिण-पश्‍चिम बांगलादेशात आनंद गोपाल गांगुली या ७० वर्षीय पुजार्‍याची ७ जून ला गळा चिरून हत्या करण्यात आली. यानंतर २ दिवसांतच नित्यानंद पांडे या हिंदूची याच पद्धतीने हत्या करण्यात आली. (भारतात तथाकथित असहिष्णुता वाढल्याची टीका करणार्‍या अमेरिकेला बांगलादेशातील हिंदूंची ही दु:स्थिती दिसत नाही का ? - संपादक)

वर्धा येथे राष्ट्रीय आंदोलन !

    
वर्धा - येथे काश्मीरमधील हरि पर्बत या टेकडीचे कोह-ए-मारन नामकरण करणे, योगातून ॐचा उच्चार वगळणे, बालभारतीच्या इयत्ता ६ वीच्या पाठ्यपुस्तकात झालेल्या चुका, साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना झालेल्या छळ या सूत्रांच्या विरोधात वर्धा येथे १५ जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन घेण्यात आले.
     या वेळी भागवताचार्य सौ. लतादेवी तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीकांत पाध्ये, श्रीमती सुमती सरोदे आणि सनातन संस्थेच्या सौ. स्मिता हरदास, सौ. रत्ना हस्ती उपस्थित होत्या. याविषयीचे निवेदन श्री.प्रमोद कदम,अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले.
सौ. लतादेवी तिवारी या वेळी म्हणाल्या
१. योगातून ॐ वगळणे हे चुकीचे आहे. ॐ हे सर्व गोष्टींचे मूळ आहे.
२. बालभारतीच्या इतिहासात नकाशाचे केलेले विकृतीकरण थांबायला हवे. हे जाणूनबुजून केलेले विकृतीकरण आहे. जे भारताशी संबंधित आहे. येथेे संस्कृतीचे जतन व्हायला हवे.

बंदीवानाला चपलेतून गांजा देणार्‍याला अटक

     नाशिक - न्यायालयात आणलेल्या बंदीवानाला नवी चप्पल देण्याच्या बहाण्याने गांजा पुरवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंदीवानाचा भाऊ संतोष लोखंडे (वय ३१ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याआधीही नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी खुनातील एका संशयिताला पाण्याच्या बाटलीतून मद्य पुरवण्याचा प्रयत्न केल्याचा होता.
     संतोष लोखंडे हा भाऊ परवीन लोखंडे याच्यासाठी पिशवीतून चप्पल घेऊन आला. त्यातून त्याने गांजा आणल्याने एका पोलीस कर्मचार्‍याच्या लक्षात आले. त्याने पोलिसांना याविषयी सांगितले. चप्पल कापल्यावर त्यात गांजाच्या पुड्या आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही प्रविष्ट केला आहे.

(म्हणे) तिन्ही पुरोगामी नेत्यांच्या हत्येच्या मागे सनातन संस्था !

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप असणार्‍या राजकारण्यांनी राष्ट्र आणि धर्म 
यांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्‍या सनातन संस्थेवर आरोप करणे हास्यास्पद !
माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा धादांत खोटा आरोप 
     तासगाव (जिल्हा सांगली) - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्या होऊन वर्षे उलटली. आमची सत्ता असतांना आम्हीच सनातन संस्था यामागे असल्याचे शोधून काढले होते; मात्र सत्ता गेल्यावर तपासच फिरला. ही संघटना कोण चालवते, त्यांना पैसा कोण पुरवते, त्यांच्या मागे नेमके कोण आहे, हे पहाणे आवश्यक असतांना शासन त्यासाठी उदासीन आहे; मात्र उच्च न्यायालयाने हे प्रकरण हातात घेतल्यावर या प्रकरणी तपासाला वेग आला आहे. लवकरच यामागील सर्व सूत्रधार बाहेर येतील, असे विधान माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथील एका कार्यक्रमात केले. (डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यावर दीड वर्ष राज्यात आणि केंद्रात काँग्रेस शासन होते. डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाल्यापासून कर्नाटकात काँग्रेस शासनच आहे ! असे आहे, तर काँग्रेस शासनाने या तिन्ही पुरोगामी नेत्यांच्या हत्येचे खरे आरोपी का शोधून काढले नाहीत ? सत्ता गेल्यानंतर तोंडाच्या वाफा दवडून काही उपयोग नाही. ज्यांच्या पक्षातील नेत्यांनी सिंचन घोटाळ्यांसारखे अनेक घोटाळे करून राज्याच्या तिजोरीवर म्हणजेच जनतेच्या पैशांवर डल्ला मारला, त्यांना इतरांवर आरोप करण्याचा काय अधिकार ? - संपादक)

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची भक्तगणांसह उग्र साधना

उग्रसाधनेत सहभागी योगतज्ञ दादाजी वैशंपायन (वर्तुळात) आणि त्यांचे भक्तगण
    नाशिक - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तीर्थक्षेत्रामधील उच्चोच्च ब्रह्मगिरी पर्वताजवळच्या गंगाद्वार या पर्वतावर २२ साधकांनी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्यासह २ दिवसीय उग्र साधना केली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सिंहगड रस्ता शाखेचे उद्घाटन

     पुणे, १७ जून (वार्ता.) - ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी, तसेच उन्नतीसाठी कार्यरत असणार्‍या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सिंहगड रस्ता शाखेचे ११ जून या दिवशी उद्घाटन झाले. माणिकबागेतील सिद्धार्थ कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महासंघाचे अध्यक्ष सर्वश्री विश्‍वजीत देशपांडे, आनंद दवे, लक्ष्मीकांत धडफळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी भाजपच्या अधिवक्त्या ईशानी जोशी यांनी मार्गदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी श्री. विश्‍वजीत देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वांनी संघटित होण्याचे आवाहन केले.

पानसरे कुटुंबीय म्हणतात, पानसरे खून प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवा !

     कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवा, अशी मागणी कॉ. पानसरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील मागणीचे पत्र इमेलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती मेघा पानसरे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. एस्आयटीच्या पथकाच्या तपासात मर्यादा येत असून या तपासावर आम्ही असमाधानी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. (कितीही तपास केला, तरी नेहमीच कॉ. पानरसे आणि डॉ. दाभोलकर कुटुंबिय असमाधानी असतात. सनातनद्वेषाने पछाडल्याने असे होत असून जाणीवपूर्वक सनातन संस्थेला लक्ष्य केले जात आहे ! वास्तविक आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात घालून सनातन संस्थेला न्याय देणे अपेक्षित आहे ! - संपादक)

सोनिया गांधी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित करण्यावरून वाद निर्माण झाल्याने एकाची हत्या !

     जबलपूर (मध्यप्रदेश) - व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केल्याने जबलपूर येथे दोन गटांमध्ये मारामारी झाली. या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर ६ जण घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्यांपैकी ५ जणांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (देवतांचे विडंबन करणारे चित्र प्रसारित झाल्यावर निष्क्रीय रहाणारा समाज राजकीय पक्षाच्या नेत्याच्या विडंबनावरून मात्र सक्रिय होतात ! - संपादक )

पुण्यातील एका सुधारगृहातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

राज्यातील असुरक्षित बनत चाललेली सुधारगृहे !
      पुणे - येथील नाना पेठ भागातील एका सुधारगृहातून २ अल्पवयीन मुलींचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सदर सुधारगृहाच्या प्रमुखांनी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बाल सुधारगृहातील १७ वर्षीय २ अल्पवयीन मुलींना १४ जून या दिवशी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी नेऊन पलायन केले आहे. त्या दोन्ही मुली या पुणे आणि कर्नाटक येथील रहिवासी आहेत.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील चंद्रभागा नदीपात्रात सापडले मानवी अवशेष

दायित्वशून्य पोलीस प्रशासन !
     पंढरपूर - येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात वारी परिवार १२ जून या दिवशी स्वच्छता करत असतांना ५ कवट्या आणि हाडे यांचे सांगाडे आढळून आले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवी अवशेष आढळून आल्याने ते नदीपात्रात कसे आले, याविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे. पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत याची नोंद घेतली नसून त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
      पोलिसांच्या म्हणण्यानुसार, करणी, जादूटोणा करणारे तांत्रिक-मांत्रिकांसह अन्य लोकांनी हे अवशेष नदीत आणून टाकले असावेत. (पोलिसांचा पाट्याटाकूपणा ! - संपादक)

पुणे येथे शिधापत्रिकेवरील २०० पोती गव्हाचा काळाबाजार करणारे तीन जण अटकेत

शिधापत्रिकेवरील धान्याचा काळाबाजार !
     पुणे, १७ जून - शिधापत्रिकेवरील २०० पोती गव्हाचा काळाबाजार करणार्‍या तिघा जणांना येथील खडक पोलिसांनी अटक केली आहे. (अन्न आणि पुरवठा विभाग अन् पोलीस यांनी शिधापत्रिकेवरील धान्याच्या काळाबाजाराच्या मुळाशी जाऊन ही गुन्हेगारी मोडीत काढायला हवी. - संपादक) त्यांची नावे शंकर गायकवाड, अजय मटकर, गोकुळ साबळे अशी असून पोलिसांनी २ लक्ष ९ सहस्र रुपयांचा गहू शासनाधीन केला आहे. या प्रकरणी अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकारी उज्ज्वला सांगळे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. 
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शंकरशेठ रस्त्यावरच्या रेल्वे आरक्षण केंद्रासमोरील मोकळ्या जागेमध्ये आडोशाला काही लोक मालवाहू वाहनामधील धान्याची पोती एका ट्रकमध्ये भरत असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली होती. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे पेठेमध्ये ते वाहन आणि एक ट्रक अडवला. या वाहनांची तपासणी केल्यावर त्यामध्ये शासकीय शिक्का असलेली उपरोक्त पोती आढळून आली.

नगरसेवक काशिफ तानाकी यांच्याकडून स्थायी समिती सभेत ठिय्या आंदोलन आणि सभात्याग

कल्याण येथील मुसलमानांना रमझाननिमित्त पाणी देण्याचे प्रकरण
     कल्याण - येथील सिद्धेश्‍वर आळी प्रभागातील मुसलमानांची पाणी समस्या अल्प करण्यासाठी बोअरवेल निर्माण करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी नगरसेवक काशिफ तानाकी यांनी केली; मात्र प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिले नाही. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्यांना अडचण सांगितल्यावर तानकी यांनी त्यांचे म्हणणे खोटे असल्याचे सांगितले. त्यामुळे तानाकी यांनी स्थायी समितीच्या सभेत ठिय्या आंदोलन केले आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊनही तुम्ही मुसलमानांवर अन्याय करत आहात, अशा शब्दांत शिवसेना-भाजपवर ताशेरे ओढत संतप्तपणे सभात्याग केला. रमझान ईद जवळ येत असल्याने मुसलमानांना पाण्याची अडचण येणार असल्याचे कारण देत त्यांनी बोअरवेलची मागणी केली होती.

मकोकाखाली अटक करण्यात आलेल्या बंदीवानांसमवेत पोलिसांची ओली पार्टी !

पोलीस खात्यासाठी लांच्छनास्पद प्रकार !
     कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) - सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ७ बंदीवानांच्या समवेत पोलिसांनी ओली पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रुग्णालयात धाड टाकल्यावर ३ बंंदीवान गच्चीतून उडी मारून पळून जात होते; मात्र त्या वेळी ते घायाळ झाले. यात मकोकाखाली अटकेत असलेल्या सोम प्रशांत पाटील याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलीस मुख्यालयातील साहाय्यक फौजदार बाबूराव ज्योतिराम चौगुले आणि पोलीस हवालदार मारुती भाऊसो पाटील यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. (बंदीवानांसमवेत ओली पार्टी करणारे पोलीस अन्य गुन्हेगारांना काय पकडणार ? पोलिसांना अटक होणे, हा पोलीस क्षेत्रासाठी काळीमा फासणारा प्रकार आहे. असे नैतिकताहीन पोलीस प्रशासन कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? - संपादक) तसेच मकोकाखाली कैदेत असणारा प्रशांत पाटील याच्यासह दिग्विजय शिवाजीराव पोवार (वय ३७ वर्षे) यालाही अटक केली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्या तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेची मान्यता रहित !

हिंदुद्रोह्यांचे खरे स्वरूप !
     नवी देहली - सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची संस्था सबरंग ट्रस्टची मान्यता रहित करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
    फॉरेन कॉन्ट्रीब्यूशन रेगुलेशन एक्टचे (एफ्सीआर्एचे) उल्लंघन केल्याप्रकरणी ही मान्यता रहित करण्यात आली आहे. तिस्ता आणि त्याचे पती जावेद यांच्या विरोधात परदेशी पैशाचा अपवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा गुजरात पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण विभाग अन्वेषण करत आहेत. गेल्या वर्षी केंद्रीय अन्वेषण विभागाने या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशनकडून तिस्ता सेटलवाड संस्थेसाठी पैसा गोळा करत होती. हा पैसा तिस्ता आणि तिचे पती जावेद व्यक्तीगत खर्चासाठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.मध्यप्रदेशातील गोटेगाव येथे धर्मांधाकडून गायीशी दुष्कर्म

     नरसिंहपूर (मध्यप्रदेश) - येथील गोटेगावातील सूरवारिमध्ये एका धर्मांध युवकाने रात्री गायीशी दुष्कर्म केले. गायीला बांधून त्याने हे कृत्य केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यावर धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर दुसर्‍या दिवशी संतप्त हिंदूंनी गाव बंद करून निषेध केला. (अशा धर्मांधांवर तात्काळ खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा द्यायला हवी ! - संपादक )

अमेरिकेकडून पाकिस्तानला आतंकवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी ८० कोटी डॉलरचे साहाय्य !

अमेरिकेला मित्र बनवण्यात आल्याचे केंद्रसरकार कितीही म्हणत असले आणि पाकला अमेरिकेने 
कितीही दमबाजी केली, तरी ती किती नाटकी आहे, हेच या घटनेवरून लक्षात येते ! अशा विश्‍वासघातकी 
आणि धूर्त अमेरिकेवर भारताने विश्‍वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच होय ! 
     वॉशिंग्टन - अमेरिकेने पाकिस्तानला आतंकवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी ८० कोटी डॉलर (५३ सहस्र कोटी हून अधिक रुपये) देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भारतावर वारंवार आक्रमणे करणार्‍या पाकला साहाय्य करून अमेरिकेने पुन्हा एकदा भारतासोबत प्रतारणा केली आहे. (जो पाक स्वतःच आतंकवाद्यांची निर्मिती करतो, तो कधीतरी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करील का ? हा पैसा आतंकवाद नष्ट करण्यासाठी नव्हे, तर भारताच्या विरोधात कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांना पोसण्यासाठीच दिला गेला आहे ! - संपादक) 
     पाकिस्तानला आर्थिक साहाय्य देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याच्या एक दिवस आधी अमेरिकेने भारताला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव नाकारला होता. भारताला अमेरिकेचे संरक्षण साहाय्यक राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासाठी सादर केलेल्या संशोधन विधेयकाला मान्यता न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव नाकारला होता.

फलक प्रसिद्धीकरता

बहुसंख्य हिंदूंच्या भारतातील असुरक्षित मंदिरे !
     बंगालमधील ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील भोंग्यांवरून सकाळी आणि संध्याकाळी ऐकवल्या जाणार्‍या आरतीला रमजान असल्याचे सांगत धर्मांधांनी विरोध केला. त्यांनी मंदिरात घुसून भोंगे काढण्याचा प्रयत्न केला. हिंदूंनी त्यांना संघटितपणे विरोध केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangalke Keshveshwar mandirme speakerdwara arti laganehetu, Ramzanke nampar dharmandhoka virodh aur akraman. - Hindusangathan ke abhav ka hi yah parinam!

जागो ! : बंगाल के केश्‍वेश्‍वर मंदिर में स्पीकर द्वारा आरती लगाने हेतु, रमजान के नाम पर धर्मांधों का विरोध और आक्रमण. - हिन्दूसंगठन के अभाव का ही यह परिणाम !

पुण्यातून गेल्या ४ मासांत ६८१ तरुण-तरुणी बेपत्ता

सांस्कृतिक शहरातील पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा दुष्परिणाम !
     पुणे, १७ जून - पुण्यात जानेवारी ते एप्रिल २०१६ या ४ मासांच्या काळात १ सहस्र ४९१ जण बेपत्ता झाले आहेत. गेल्या वर्षी याच ४ मासांत १ सहस्र ३४६ जण बेपत्ता झाले होते. यात सर्वांत अधिक प्रमाण १८ ते २५ या वयोगटांतील असून प्रेमप्रकरणात दोघांनीही पळून जाणे किंवा मुलीला फूस लावणे या कारणास्तव बेपत्ता झालेल्यांचे प्रमाण ६८१ आहे. त्यात ४९१ तरुणी, तर १९० तरुण आहेत. तरुणांपेक्षा तरुणींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याने कुटुंबियांसह पोलिसांच्या चिंतेचा विषय झाला आहे. 
     याविषयी गुन्हे शाखेचे उपायुक्त पी.आर्. पाटील यांनी सांगितले की, गेल्या ४ मासांत बेपत्ता झालेल्या १ सहस्र ४९१ जणांपैकी ७३४ जणांचा तपास लागला आहे. त्यामध्ये १८ ते २५ वयोगटातील ५३ तरुण आणि १५६ तरुणी आहेत. अनेकदा हे तरुण-तरुणी परत आल्यानंतर पालकांकडून याची माहिती दिली जात नाही. याशिवाय इतर वयोगटातील नागरिकही बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे.


सांगली आणि विटा येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आज भव्य मिरवणूक !

     सांगली, १७ जून (वार्ता.) - ज्येष्ठ शुद्ध पक्ष त्रयोदशी शके १५५६ या दिवशी पुण्यश्‍लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना वेदमंत्रांच्या घोषात, सप्तसिंधु आणि सप्तनद्यांच्या पवित्र जलांनी राज्याभिषेक करण्यात आला. या दिवशी शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. हा दिवस उगवला नसता, तर १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताकदिन झाले नसते. हे सत्य लक्षात घेऊन सर्व हिंदूंनी शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदवी स्वातंत्र्यदिन महोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. या निमित्ताने सांगली शहर आणि विटा शहर या दोन्ही ठिकाणी सकाळी ६ वाजता छत्रपतींच्या मूर्तीला अभिषेक होईल आणि सायंकाळी ५ वाजता शिवराज्याभिषेकाची भव्य मिरवणूक निघेल. विटा येथे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत. तरी त्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.जेटली काळा पैसा भारतात आणण्यास उत्साही नाहीत !

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका !
     मुंबई - अर्थमंत्री अरुण जेटली अधिवक्ता आहेत. विदेशात ज्यांनी काळा पैसा ठेवला आहे त्यांचा हा काळा पैसा भारतात आणण्यासाठी जेटली यांनी उत्साहाने प्रयत्न केले नाहीत, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे केली. (याविषयी जेटली यांना काय म्हणायचे आहे ? - संपादक) स्वामी असेही म्हणाले की, जर मला सरकार अर्थमंत्री करील, तर मी हे काम केवळ एक आठवड्यात करीन. तसेच ३ वर्षांत प्राप्तीकर समाप्त करीन. 
     डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, आज लोकांना अधिक बचत करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. सध्या राष्ट्रीय बचत दर ३३ प्रतिशतवर आला आहे. तो वाढवून ४० प्रतिशत करण्याची आवश्यकता आहे.ब्रिटनमध्ये दिवसाढवळ्या महिला खासदाराची हत्या !

     लंडन - १६ जूनला ब्रिटनधील लेबर पार्टीच्या ४१ वर्षांच्या खासदार जो कॉक्स यांची एका आक्रमणकर्त्याने ३ गोळ्या झाडून हत्या केली. मारेकर्‍यांना त्यांच्या मृत्यूची खात्री झाली नसल्याने चाकूने कॉक्स यांना भोसकण्यात आले. वेस्टर्न यॉर्कशयरच्या ब्रिस्टल येथील मार्केट स्ट्रीट या रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी त्याच भागातील एका ५२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून शस्त्रही जप्त करण्यात आले. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी या हत्येचा निषेध केला आहे. वर्ष १९९० मध्ये आयरिश रिपब्लिकन्सच्या आक्रमणात मारल्या गेलेल्या इयन गो यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या एखाद्या खासदाराची ही पहिली हत्या आहे.

हिंदु राष्ट्राची राज्यघटना धर्मशास्त्रावर आधारित असणे आवश्यक !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या पंचम 
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
डॉ. शिव नारायण सेन, सचिव,
शास्त्र धर्म प्रचार सभा

       रामनाथी, गोवा येथे ११ जून ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

प्रखर देशप्रेमी आणि स्वाभिमानी महाराणा प्रताप !

बालकांसाठी परिपाठ !
बोधकथा
स्वाभिमान आणि देशप्रेम राखण्यासाठी अकबराचा मांडलिक न होणे
     मोगल बादशहा अकबराशी चालू असलेल्या युद्धामुळे महाराणा प्रताप याला त्याच्या कुटुंबासह अरण्यात बराच काळ कंठावा लागला. जवळ पुरेसे धनधान्य नाही. सतत पळापळ. अशा परिस्थितीत त्याचा स्वाभिमान आणि देशप्रेम अचल होते. त्याचा नातेवाईक राजा मानसिंग हा अकबराचा मांडलिक बनून अकबराच्या दरबारात मोठ्या पदावर आरामात रहात होता. जेव्हा त्याला महाराणा प्रतापच्या हालअपेष्टांविषयी कळले, तेव्हा तो त्याला भेटायला अरण्यात आला. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्याने विषयाला हात घातला, अरे प्रताप, तू येथे हालअपेष्टा काढतो आहेस; म्हणून मी दयाळू अकबर बादशहाशी तुझ्यासंदर्भात बोललो. तू जर बादशहाचा मांडलिक होऊन त्याला सलाम करशील, तर तो तुला क्षमा करील. तुला तुझे पूर्ण राज्य परत मिळेल आणि तू पुन्हा वैभवात राहू शकशील. त्यावर महाराणा प्रतापने त्याच्याकडे घृणास्पद कटाक्ष टाकून म्हटले, मी असे कदापी करणार नाही. त्यावर राजा मानसिंगाने त्याला समजावण्याचे बरेच प्रयत्न केले; पण महाराणा प्रतापचा निर्णय ठाम होता.

हिंदु सैन्याधिपती छत्रपती शिवाजी महाराज !

शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने...
     १० मार्च २०१५ या दिवशी शिवप्रतिष्ठानने आयोजित केलेल्या भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी ४५ हून अधिक वर्षे शिवचरित्रावर अभ्यास केला असून त्यावर जवळजवळ साडेतीन सहस्र पानांहून अधिक लेखन केले आहे. या व्याख्यानामधून श्री. मेहेंदळे यांनी शिवरायांच्या संदर्भातील अफवांचे केलेले सप्रमाण खंडण आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत. 
१. शिवरायांनी कधीही, कुठेही मशीद बांधली नाही !
टीका : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली.
खंडण : अनेक जण प्रश्‍न विचारतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती का ? शिवरायांनी कधीही, कुठेही मशीद बांधलेली नाही. लोकांची समजूत आहे की, त्यांनी मशिदींना इनामे दिली; पण शिवचरित्रविषयक मराठी, फारसी, पोर्तुगीज आदी सर्वच्या सर्व कागदपत्रांमध्ये त्यांच्या संदर्भात तसा कागदाचा एक कपटासुद्धा मिळालेला नाही.

पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाचे प्रसारण करणार्‍या वाहिन्या आणि स्थानिक केबल नेटवर्कस्

     १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनातील विविध सत्रांतील कार्यक्रमांचे प्रसारण स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील वाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे. ज्या वाहिन्या आणि केबल प्रसारक यांनी हे प्रसारण करण्यास अनुमती दिली आहे, त्यांची नावे पुढील सारणीत दिली आहेत. 

आता काश्मीरमध्येच नाही, तर जम्मूमध्येही मंदिरांवर आक्रमण !

     १४ जून या दिवशी जम्मूतील जानीपूर येथे असणार्‍या शंभू मंदिरात एका धर्मांधाने प्रवेश करून तेथे तोडफोड केली, तसेच शिवपिंडीवरील कलशाला लाथ मारून तो खाली पाडला. शिवपिंड ओलांडली, तसेच येथे पूजा करणार्‍या महिलांचा विनयभंगही केला. त्याला मंदिरातील दोघांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. तो डोडा येथील रहाणारा असून त्याचे नाव यासिर अल्फाज, असे आहे. तो इसिसच्या विचारांनी प्रभावित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसचा प्रमुख बगदादी ठार झाल्याचे वृत्त आल्यानंतर अल्फाजने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) 

उपोषणाचा सरकारवर काडीमात्र परिणाम होत नाही, हे भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या लक्षात कसे येत नाही ?

     इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना दिले जाणारे अनुदान बंद करण्याकरता मातृभाषाप्रेमींनी शासनाला दिलेली ६ जून ही मुदत संपली आहे. त्यामुळे या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या भारतीय भाषा सुरक्षा मंचने आंदोलन तीव्र करण्याचे ठरवले आहे. भाभासुमंच्या वतीने १८ जून या दिवशी गोव्यात १९ प्रभागांमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. हा लाक्षणिक उपोषण कार्यक्रम सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. या १९ ठिकाणी मिळून ३ सहस्रांपेक्षा अधिक महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी होतील, असे मंचने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गुरुपौर्णिमेला ३१ दिवस शिल्लक

परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, 
त्याप्रमाणे गुरु केवळ करस्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देतात.

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

हिंदी : www.hindujagruti.org/hindi/ 
वाचा रविवारच्या (१९ जून) हिंदु एकता विशेषांकात

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना 
केलेल्या अटकेच्या संदर्भातील षड्यंत्र उलगडणारे लिखाण
  • डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेचा आणि त्यानंतरचा घटनाक्रम
  • डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या विरोधात साक्ष देणारा साक्षीदार बनावट आणि भ्रष्टाचारी असल्याचे पुरावे
  • प्रसिद्धीमाध्यमांनी धादांत खोटी आणि एकांगी वृत्ते दाखवणे 
  • आणि अन्य लिखाण
     सनातनची अपकीर्ती करणार्‍यांना प्रत्युत्तर देणारे लिखाण अधिकाधिक हिंदुत्ववाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अंकाची वाढीव मागणी त्वरित नोंदवा !
इआरपीत मागणी नोंदवण्याची समयमर्यादा
पश्‍चिम महाराष्ट्र आवृत्ती : शनिवारी सकाळी १० पर्यंत
मुंबई, ठाणे, रायगड आवृत्ती : शनिवारी दु. ३ पर्यंत

केवळ श्रीगुरूंच्या कृपादृष्टीमुळे खडतर प्रारब्धही कसे सुसह्य होऊन भोगता येते, याची साधकाने वेळोवेळी घेतलेली अनुभूती !

श्री. वैभव आफळे
        संतांनी त्रासाविषयी लिहून पाठविण्यास सांगितल्यावर देवाने सुचवले, तसे लिहित गेलो. सूत्रे टंकलेखन करतांना मधे ५ दिवस काही न सुचणे, वाक्यरचना चुकीची टंकलिखित होणे, झोप येणे, असे त्रास झाले. १ वर्षाच्या कालावधीत झालेले त्रास म्हणजे श्रीकृष्णाने या जिवाला दाखवलेली श्रीकृष्णलीलाच आहे. त्यामुळे सूत्रांचे टंकलेखन करतांना भावजागृती होत होती. ही सूत्रे लिहिण्याच्या निमित्ताने या वर्षभराच्या कालावधीतील देवाच्या कृपेची जाणीव झाली. देवाने मला पुनर्जीवनच दिले आहे, असे वाटू लागले. यासाठी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.
        सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करण्यापूर्वीचे जीवन पूर्णपणे मायेतील असल्याने साहजिकच त्या वेळच्या रज-तम वातावरणाचा शरिरावर परिणाम झाला आणि अगदी लहान वयातच उच्च रक्तदाब, गाऊट (एक प्रकारचा संधीवात. यात वात आणि रक्त दूषित झालेले असतात.) हे त्रास होऊ लागले. त्याच वेळी अनेक मोठ्या कौटुंबिक समस्यांना सामोरे जाण्याचे प्रसंग आल्याने या त्रासांत उत्तरोत्तर वाढ झाली आणि मानसिक त्रासही चालू झाले. या काळात प.पू. डॉक्टरांनी आपल्या पंखाखाली घेऊन या जिवाचे रक्षण केले. या १४ वर्षांच्या कालावधीत अनेक शारीरिक आणि कठीण कौटुंबिक त्रासांमधून प.पू. डॉक्टरांनी साधना करून घेतली, ही या क्षुद्र जिवावर असलेली गुरुकृपाच आहे !

श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव हा जयघोष ऐकून चेन्नई येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन् यांना जाणवलेली सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ... 
      सगुण-निर्गुण नाही भेदाभेद, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितले आहे. प्रारंभी प.पू. डॉक्टर म्हणायचे, सगुणात अडकू नका. माझ्यात (माझ्या स्थूल रूपाकडे) अडकू नका. श्रीकृष्णाकडे (निर्गुणाकडे) जा. प.पू. डॉक्टरांचे दर्शन घेणे आणि आश्रमात राहून सेवा करणे, हे सगुण स्तरावरचे झाले. त्यांनीच साधकांना धर्मप्रसाराची समष्टी सेवा करण्यास प्रेरणा दिली. त्यामुळे साधक विविध ठिकाणी करत असलेली धर्मप्रसाराची सेवा, ही निर्गुण स्तरावरची सेवा आहे. श्रीकृष्णाचे (धर्मसंस्थापनाचे) कार्य करणे, हे निर्गुण स्तरावरचे आहे. महर्षींनी मात्र हेच सगुण प.पू. गुरुदेव (प.पू. डॉक्टर) निर्गुण परमेश्‍वराचे अवतार आहेत, असे संपूर्ण जगापुढे घोषित केले. सगुण निर्गुण झाले आहे आणि निर्गुण सगुण झाले आहे. 

देवाने प.पू. डॉक्टरांची चरणसेवा करायला मिळणार असल्याचे एका दृश्यातून दाखवणे आणि त्यानुसार तशी सेवा मिळाल्यावर भावजागृतीसाठी सूचलेली सूत्रे !

श्री. रुपेश गोकर्ण
१. देवाने वर मागण्यासाठी सांगितल्यावर प.पू. डॉक्टरांची चरणसेवा करण्याची संधी हवी असल्याचे सांगणे : एकदा कु. माधुरीताई आमचा आढावा घेत असतांना मला डोळ्यांसमोर पुढील दृश्य दिसले देव म्हणत आहे की, मी तुला दोन वरांपैकी कोणता वर हवा आहे - तुझी आध्यात्मिक प्रगती कि प.पू. डॉक्टरांची सेवा ? मला काय सांगावे ?, हे कळेना. नंतर लगेच मी म्हणालो, मला प.पू. डॉक्टरांची चरणसेवा हवी आहे. दुसरे काही नको.
२. संतांच्या पायांना मर्दन करण्याची सेवा मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटणे : आढावा संपल्यावर एक घंट्यानंतर कु. प्रियांका जोशीताई मला म्हणाल्या, दादा, एक साहाय्य हवे आहे. उद्या प.पू. डॉक्टरांच्या पायांना मर्दन करायची सेवा आहे. तुम्ही निमिषदादांसमवेत जायचे आहे. ते ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. प.पू. गुरुदेव आणि पू. (सौ.) बिंदाताई यांच्या कृपेमुळे मला ही सेवा मिळाली; म्हणून पुष्कळ कृतज्ञताही वाटली.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच रामनाथी आश्रम पहाणार्‍या संपादकांनी सनातनचा आश्रम हे मंदिरच आहे, असे गौरवोद्गार काढणे

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर बसवण्यात येणार्‍या कळसांच्या संदर्भात पू. (सौ.) अंजलीताई गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले होते. त्यात अनेक साधकांना आणि आश्रम पहायला येणार्‍यांना रामनाथी आश्रम हा मंदिरासारखाच वाटतो, असा उल्लेख केला आहे. याविषयीचा माझा एक अनुभव पुढीलप्रमाणे आहे.

देवतांची स्तोत्रे आणि भजने ऐकण्याची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोल्हापूर येथील चि. अनन्या निखिल मुंबारकर (वय १ वर्ष) !

चि. अनन्या मुंबारकर
      ज्येष्ठ शुक्ल पक्ष त्रयोदशी (१८.६.२०१६) या दिवशी कोल्हापूर येथील चि. अनन्या निखिल मुंबारकर हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
चि. अनन्या हिला प्रथम वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. स्तोत्रे आणि भजने म्हणतांना अन् नामजप करतांना बाळाची हालचाल वाढल्याचे जाणवणे : गरोदरपणात मी रामरक्षा, मारुतिस्तोत्र, अथर्वशीर्ष आणि भजने म्हणत असे. मी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचकती नियमित ऐकायचे अन् नामजप करायचे. हे सर्व करत असतांना पोटातील बाळाची हालचाल वाढलेली असायची. स्तोत्रे आणि भजने म्हणण्याची वेळ पालटली, तर ऐकण्यासाठी बाळाची हालचाल वाढली आहे, असे मला जाणवायचे.

सौ. श्रुति सहकारी यांना रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती

सौ. श्रुति सहकारी
१. नामजप करत असतांना एक ज्योत अखंडपणे तेवत असल्याचे जाणवणे आणि ती ज्ञानज्योत असून ईश्‍वरी स्रोताशी जोडलेली आहे, असे आतून उत्तर येणे : २२.७.२०१५ या दिवशी सकाळी ७ वाजता ध्यानमंदिरात डोळे मिटून नामजप करत असतांना मध्यभागी एक ज्योत अखंडपणे तेवत असल्याचे जाणवले आणि ती ज्ञानज्योत असून ईश्‍वरी स्रोताशी जोडलेली आहे, असे आतून उत्तर आले. त्यानंतर नामजप एका लयीत होऊ लागला आणि मनाला शांत वाटले.
२. ध्यानमंदिरात नामजप करत असतांना मध्यभागी एक मोठे ऋषी ध्यानावस्थेत दिसणे, ते विश्‍वामित्र ऋषी असल्याचे जाणवणे आणि पू. मेनरायकाकांच्या माध्यमातून तेच उपाय करत असल्याचा विचार येणे : २४.७.२०१५ या दिवशी रात्री ९ वाजता ध्यानमंदिरात नामजप करत असतांना मध्यभागी एक मोठे ऋषी ध्यानावस्थेत दिसले. ते विश्‍वामित्र ऋषी असल्याचे जाणवलेे. या वेळी अल्प वेळेत नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात उपाय झाल्याचे जाणवले. उपायांच्या खोलीत पू. मेनरायकाकांच्या माध्यमातून तेच उपाय करत असल्याचा विचार आला.

शरिरात गाठी निर्माण होण्याचे श्रीकृष्णाने सांगितलेले आध्यात्मिक कारण

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
       गेल्या काही वर्षांपासून माझ्या मांड्या आणि पोटर्‍या यांमध्ये गाठी झाल्या होत्या. गेली दोन वर्षे जूनमध्ये गोवा येथेे गेलोे असतांना साधक पायांना मर्दन करायचे. त्यामुळे गाठी वितळायच्या. गेल्या उन्हाळ्यात गेलो असतांना आश्रमातील वैद्यांनी वात व्याधी असल्याने मर्दन करून घेण्यास सांगितले होते. गाठी आहेत, तोपर्यंत नियमित शरिराचे मर्दन करवून घ्या, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले होते.
       गेले ७ - ८ मास (महिने) पायांना मर्दन करत असतांना काही गाठी विरघळल्या आणि काही मोठ्या गाठी असल्याचे मर्दन करणार्‍या साधकांच्या लक्षात आले. दोन्ही दंडांमध्ये गाठी असल्याचे जाणवत आहे. १५ दिवसांपूर्वी एका साधकाने दंडाला मर्दन करू का ?, असे विचारले. तेव्हा दोन्ही दंडांत पुष्कळ मोठ्या, कडक आणि वेदनादायी गाठी असल्याचे लक्षात आले. या गाठींमुळे हातांची हालचाल सहजतेने होत नव्हती. या गाठींविषयी ईश्‍वरानेे सांगितले, हे चांगल्या शक्तीचे अकार्यरत रूप आहे. जोपर्यंत या शक्तींची आणि तुमच्या कर्मेंद्रियांच्या कार्याची आवश्यकता नव्हती, तोपर्यंत या गाठी सुप्तावस्थेत तुमच्या कर्मेंद्रियांना अकार्यरत अवस्थेत ठेवत होत्या. आता काळानुसार कर्मेंद्रियांच्या कार्याची आवश्यकता असून शक्तीची आवश्यकता असल्याने मर्दनाच्या माध्यमातून गाठी विरघळून किंवा लक्षात न आलेल्या गाठी दृश्य होऊन चांगल्या शक्ती आणि कर्मेंद्रिये कार्यरत झाली आहेत.
- (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.२.२०१६)

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
इतरांना उत्साही 
करण्यासाठी स्वतः उत्साही रहा !
       दुसर्‍यासाठी चांगले रहाणे आवश्यक आहे. व्यष्टीचा समष्टीवर परिणाम होतो. इतरांसाठी स्वतः उत्साही राहिले पाहिजे. स्वतः उत्साही राहिल्यास इतरांना उत्साह येतो. यासाठी जरी प्रकृती ठीक नसली, तरी तसे दाखवू नये.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१०.२०१४)

मनाने सूक्ष्मातील जाणणे म्हणजे अंतर्मनातील संस्कार केंद्रांचा हस्तक्षेप होऊ न देता रिक्त मनाने सूक्ष्म स्पंदने जाणणे, म्हणजेच मनाच्या पलीकडील जाणणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
       सूक्ष्मातील जाणणे म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील जाणणे. यांतील पंचज्ञानेंद्रियांच्या पलीकडील जाणणे, म्हणजे एखाद्या वस्तूचे रंग, रूप इत्यादी बाह्य गुणधर्म न बघता सूक्ष्मातील गुणधर्म जाणणे. त्यापुढे मनाने मनाच्या पलीकडील जाणणे म्हणजे काय ?, असा प्रश्‍न माझ्या मनाला पडला; कारण आपण एखाद्या गोष्टीचे सूक्ष्म-परीक्षण करतांना मनाला काय जाणवते ?, हे बघतो. त्याचे उत्तर देवाने पुढीलप्रमाणे दिले.
       आपल्या मनामध्ये (अंतर्मनात) वासना केंद्र, आवड-नावड केंद्र, स्वभाव केंद्र इत्यादी संस्कार केंद्रे असतात. त्या केंद्रांमधून आपल्या मनामध्ये विचारतरंग उमटत असतात. जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो, तेव्हाही आपल्या मनामध्ये आपल्या संस्कार केंद्रांनुरूप विचारतरंग मनात उमटतात, उदा. ती वस्तू आपल्याला आवडणारी असेल, तर ती आपल्याला चांगली असल्याचे वाटते. एखाद्या वस्तूविषयी आपल्या मनामध्ये पूर्वग्रह असतात. ती वस्तू बघितल्यावर त्या अनुरूपही आपल्या मनामध्ये विचार येतात. त्यामुळे एखाद्या वस्तूचे सूक्ष्मातील परीक्षण करायचे असेल, तर आपल्याला आपल्या मनात येणार्‍या या विचारांना बाजूला सारून निरपेक्षपणे किंवा साक्षीभावाने त्या वस्तूकडे बघावे लागते. यासाठी आपल्या मनातील संस्कार केंद्रांना पडद्याआड ठेवावे लागते. त्यांचा हस्तक्षेप होऊन चालत नाही. असे करणे म्हणजे मनाच्या पलीकडील जाणणे. यासाठी आपल्याला डोळे बंद करून आपले मन एकाग्र करावे लागते; कारण समोरच्या दृश्यामुळेही मनात विचार येतात. एखाद्याने ५ मिनिटे नामजप केल्यावर त्याचे मन रिक्त होते. तो त्या वस्तूशी एकरूप होऊ शकतो आणि मग त्याला मनाद्वारे त्या वस्तूची सूक्ष्मातील स्पंदने जाणता येतात.

दहावीच्या परीक्षेत सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. शौनक पोवार
शौनक पोवार याला ९३.८० प्रतिशत गुण
     सांगली - मिरज येथील सनातनच्या साधिका श्रीमती पद्मा कोकाटे यांचा नातू चि. शौनक राजेंद्र पोवार याला दहावीच्या परीक्षेत ९३.८० प्रतिशत गुण मिळाले. तो जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याचा महाविद्यालयात तृतीय क्रमांक आला आहे. नियमित प्रार्थना आणि नामजप यांमुळेच हे यश मिळाले, असे चि. शौनक याने सांगितले.

     
कु. वैष्णवी बोंगाळे
     कु. वैष्णवी बोंगाळे हिला ८७.८ प्रतिशत गुण मिळाले असून ती मिरज येथील ज्युबिली कन्या महाविद्यालयाची महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला संस्कृत विषयात ९९ गुण मिळाले आहेत. अभ्यास करतांना प्रार्थना आणि नामजप यांमुळे मन एकाग्र होण्यास लाभ झाला, असे कु. वैष्णवी हिने सांगितले.

अधिक मासात जन्म झालेल्या व्यक्तींनी वाढदिवस प्रतिवर्षी कोणत्या मासात साजरा करावा ?

       ज्यांचा जन्म अधिक मासात (उदा. अधिक भाद्रपद महिन्यात) झाला आहे, त्यांनी ज्या अधिक मासातील तिथीला जन्म झाला आहे, त्या मासातील त्या तिथीला प्रतिवर्षी वाढदिवस साजरा करावा, उदा. एखाद्या व्यक्तीची जन्मतिथी अधिक वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी असेल, तर तिने प्रतिवर्षी वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी वाढदिवस साजरा करावा.

गुरुदेवा, कृतार्थ झालो आम्ही !

जन्मोजन्मीच्या बंधनातूनी मुक्त केले तुम्ही ।
तव चरणांसी देहही अर्पितो आम्ही ॥ १ ॥
या जिवासी सनातन ही ओळख दिली तुम्ही
यास्तव कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही ॥ २ ॥
मीची ओळख पुसूनी आम्हा घेतले चरणांसी ।
गुरुदेवा, कृतार्थ झालो आम्ही ॥ ३ ॥
- गुरुचरणसेवक, श्री. वैभव आफळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.७.२०१४)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१९.६.२०१६) दुपारी ३.३१ वाजता
समाप्ती - ज्येष्ठ पौर्णिमा (२०.६.२०१६) दुपारी ४.३२ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
संतांकडून मिळवायच्या गोष्टी
देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. ज्याला घ्यायचे
 असेल, तो आमच्याकडून सर्वकाही घेऊ शकतो.
भावार्थ : देण्यासाठी आमच्याकडे काही नाही मधील काही शब्द व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. सर्वकाही घेऊ शकतो मधील सर्वकाही अध्यात्माच्या संदर्भातील आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
स्वातंत्र्यापासून एकाही क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे, असे दिसत नाही. ही आहे भारतीय लोकशाहीची ६८ वर्षांची फलनिष्पत्ती. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता लक्षात येते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

नेहमी सत्संगात रहावे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; म्हणूनच आपल्याभोवती 
सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदूंचे भोग !

संपादकीय
      बांगलादेशातील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता, पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवादात मारल्या गेलेल्या ३० सहस्त्र हिंदूंना न्याय द्या, अशा मथळ्याखाली अलीकडेच वृत्तपत्रांतून बातम्या झळकल्या. हिंदूंचा हा संहार म्हणजे काही अपघात नाही. बांगलादेशमध्ये काय चालले आहे ? आज हिंदु पुजार्‍याची हत्या, तर उद्या हिंदु प्राध्यापकाची हत्या, नंतर कुणा हिंदु व्यापार्‍याची हत्या, तर मग हिंदु तरुणीचे अपहरण आणि अत्याचार. ज्या वेगाने या बातम्या येतात, त्याचा विचार करता बांगलादेशमधून जवळपास ५ कोटी हिंदू बेपत्ता होण्याच्या वृत्ताला पुष्टीच मिळते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn