Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती

हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करणार ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

 • हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ जूनपासून गोव्यात पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन !
 • हिंदुहिताच्या कार्यक्रमांना बळकटी देण्यासाठी २२ राज्यांतील संघटनांचा सहभाग !  
 • गोवा, मुंबई आणि हुबळ्ळी (कर्नाटक) येथे पत्रकार परिषद
डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे
प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे,
हिंदु महासभेचे श्री. शिवप्रसाद जोशी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश ताकभाते
       पणजी (गोवा) - हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गोमंतकाच्या पावनभूमीत हिंदुत्वाचे राष्ट्रव्यापी संघटन आकार घेऊ लागले आहे. गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर या वर्षीही १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदु संघटनांचे ४०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. या संघटना मंदिररक्षण, संस्कृतीरक्षण, गोरक्षा, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद या समस्यांविषयी प्रबोधन आदी क्षेत्रांत कार्य करत आहेत.

दोन आठवड्यांत शासनाने म्हणणे न मांडल्यास धाराशीव येथील जिल्हाधिकार्‍यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

 • न्यायालयाला असा आदेश द्यावे लागणे, हे शासन आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !  
 • हिंदु विधीज्ञ परिषदेचा लढा !
 • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकाळात तुळजापूर देवस्थान समितीकडील २६५ एकर भूमीचा अपहार झाल्याचे प्रकरण
       संभाजीनगर, १६ जून (वार्ता.) - अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर भूमीचा अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या संदर्भात ७ वर्षे कोणतीच कार्यवाही न झाल्याने हिंदु विधीज्ञ परिषदेने उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपिठासमोर संबंधितांवर कारवाई होण्यासाठी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर गतवेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गृह, महसूल आणि न्याय विभागाच्या सचिवांना, तर धाराशीव आणि तुळजापूर येथील जिल्हाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावूनही न्यायालयात उपस्थित न झाल्याने दोन आठवड्यांत या संदर्भात उत्तर न दिल्यास धाराशीव येथील जिल्हाधिकार्‍यांना न्यायालयात उपस्थित रहावे लागेल, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी आणि सदस्य अधिवक्ता श्री. उमेश भडगावकर हे न्यायालयात बाजू मांडत आहेत. (उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शासनाचे संबंधित अधिकारी न्यायालयात उपस्थित रहात नाहीत, याचा अर्थ शासकीय अधिकारी किती उद्दाम झाले आहेत, हेच पुढे येते. अशा प्रशासनाकडून पारदर्शक कारभाराची काय अपेक्षा करणार ? - संपादक)

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले पाऊल ! - श्री. अभय वर्तक

डावीकडून हिंदुत्ववादी श्री. वैभव राऊत, हिंदु जनजागृती समितीचे
वैद्य उदय धुरी आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक
        मुंबई - रामनाथी, गोवा येथे होणार्‍या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी येथील मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि गेली ३ वर्षे सातत्याने हिंदू अधिवेशनात सहभागी होणारे हिंदुत्ववादी श्री. वैभव राऊत हे उपस्थित होते. प्रारंभी वैद्य उदय धुरी यांनी अधिवेशनाविषयी माहिती दिली. त्यानंतर इतरांनीही अधिवेशनाविषयी विचार मांडले. या वेळी अभय वर्तक म्हणाले, सध्या अनेक हिंदुत्ववादी संघटना विविध अडचणींतून जात आहेत. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनेच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. या अधिवेशनात सहभागी होत असलेल्या प्रत्येक संघटनेचा उद्देश हिंदु राष्ट्राची स्थापना यासाठी परावर्तीत होत आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून प्रभावी हिंदूसंघटनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या संघटनांच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य होत आहे. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा आणि कार्याचे नियोजन होत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांची फलनिष्पत्ती वाढत आहे. अधिवेशनामध्ये जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी होत आहेत, त्यांमध्ये संघटनात्मक भावना जागृत होत आहे. सर्व हिंदुत्ववादी संघटनांना अधिवेशनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळत आहे.

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या सीबीआय कोठडीत २० जूनपर्यंत वाढ

       पुणे, १६ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची कोठडी १६ जून या दिवशी संपल्याने त्यांना येथील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (सीबीआयच्या) न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी अन्वेषण विभागाचे अधिवक्ता डी.बी. राजू यांनी डॉ. तावडे यांना आणखी ८ दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली; परंतु सनातनचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी या मागणीला प्रखर विरोध दर्शवल्यामुळे न्यायमूर्ती व्ही.पी. गुळवे-पाटील यांनी डॉ. तावडे यांना ४ दिवसांची, म्हणजेच २० जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
       शासकीय अधिवक्ता डी.बी. राजू यांनी सीबीआय कोठडी वाढीची मागणी करतांना म्हटले की, डॉ. तावडे हे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला अन्वेषणात सहकार्य करत नाहीत, तसेच ते १४ आणि १५ जून या दिवशी आजारी असल्याकारणाने त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी प्रविष्ट केले होते.

डॉ. दाभोलकर, कलबुर्गी आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या हे काँग्रेसचेच सुनियोजित षड्यंत्र ! - श्री. प्रमोद मुतालिक

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. प्रमोद मुतालिक
       हुब्बळ्ळी (कर्नाटक) - येथे हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेस श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, सनातन संस्थेचे श्री. कुबेरगौडा एस्. कल्लनगौडर, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद आणि धारवाड जिल्ह्याचे समिती समन्वयक श्री. अशोक भोज यांनी संबोधित केले. या वेळी बोलतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, नरेंद्र दाभोलकर, एम्.एम्. कलबुर्गी आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या हे काँग्रेसचेच सुनियोजित षड्यंत्र आहे.
       यातील दोन हत्या काँग्रेसच्या सत्ताकाळात झाल्या असूनही काँग्रेसने त्यांचे खरे मारेकरी शोधण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. या तिघांचे खरे मारेकरी शोधण्यासाठी भाजप शासनाने प्रामाणिकपणे शोधकार्य हातात घ्यायला हवे. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही केंद्रातील भाजप शासनावर यासाठी दबाव आणणार आहोत.
       परिषदेला २० वर्तमानपत्रांचे पत्रकार आणि कर्नाटक राज्यस्तरीय आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांचे एकूण १२ प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी पूर्वी उपचार घेतलेल्या दंतरोगतज्ञांची आणि एका साधक डॉक्टरचीही चौकशी !

हास्यास्पद चौकशी 
करणारा केंद्रीय अन्वेषण विभाग !
      केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर खून प्रकरणात संशयित म्हणून अटक केली आहे. डॉ. तावडे यांनी पूर्वी एका जिल्ह्यात दातांचे उपचार घेतले होते. हे उपचार जिथे घेतले, तिथे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी जाऊन उपचार करणार्‍या दंतरोगतज्ञांची चौकशी केली, तसेच तेथे कार्यरत असणार्‍या एका साधक डॉक्टरांविषयीही चौकशी केली. (एखाद्या संशयिताने ज्या दंतरोगतज्ञांकडे उपचार घेतले, त्यांची चौकशी करून काय मिळणार आहे ? अकारण त्रास देण्यासाठीच केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी असे करतात, असे वाटल्यास त्यात वावगे काय ? - संपादक)

सनातनच्या निष्पाप साधकांची या अग्निदिव्यातून निर्दोष सुटका होईल ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

पू. डॉ. चारूदत्त पिंगळे
      पणजी, १६ जून (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या संदर्भात अटक करण्यात आलेले सनातनचे साधक हे निर्दोष आहेत, याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे. ज्या पद्धतीने मडगाव स्फोटासंदर्भात साधकांनी अग्निपरीक्षा दिली आणि त्यांची निर्दोष सुटका झाली, तशी या सर्व आरोपांतून आमच्या साधकांची सुटका होईल, याची आम्हाला खात्री आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. 
     सनातन संस्कृती मानवता शिकवते असे तुम्ही म्हणता, मग तुमचे सदस्य डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचा खून आणि मडगावचा स्फोट यांसारख्या हिंसेत कसे सहभागी असतात ? असा प्रश्‍न एका पत्रकाराने गोवा येथे हिंदु अधिवेशनासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला असता हे प्रतिपादन पू. डॉ. पिंगळे यांनी केले. पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, सनातनच्या साधकांवर केवळ आरोप आहेत. समीर गायकवाड याला पानसरे यांच्या खुनाच्या संदर्भात अटक केल्यानंतर ८ महिन्यांत कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत. पोलिसांकडे पुरावे आहेत, तर त्यांनी ते पुरावे द्यावेत. हे खटले जलदगतीने (फास्ट टॅ्रकवर) चालवण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे. यातून सत्य बाहेर येईल.

अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करणार्‍या चिनी सैनिकांसमवेत भारतीय सैनिकांचा संघर्ष !

चिनी सैनिकांना रोखणार्‍या भारतीय सैनिकांचे अभिनंदन; मात्र भारतात 
घुसण्याचे धाडस होणार नाही, असा धडा चीनला शिकवायला हवा !
     नवी देहली - अरुणाचल प्रदेशातील सीमेवरून चिनी सैन्याने भारतात घुसखोरी करण्याची घटना समोर आली होती. या वेळी २७६ चिनी सैनिक घुसले असता त्यांना भारतीय सैनिकांनी अडवल्यावर दोन्ही सैनिकांमध्ये मारामारी झाली. त्यानंतर चिनी सैनिक माघारी गेले. गेल्या आठवड्यात ही घुसखोरी झाली होती. मात्र हाणामारीची माहिती आता उघड झाली आहे. शंकरतिक्री परिसरात ४ ठिकाणांवरून ही घुसखोरी करण्यात आली होती. 
     या घटनेमुळे तणाव वाढल्यावर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे ४ अधिकारी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. त्यांनी भारताच्या कमांडिंग ऑफिसरची भेट घेतली आणि चॉकलेट भेट दिले. त्यानंतर तणाव कमी होऊन चिनी सैनिक माघारी फिरले. याविषयी बोलतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू म्हणाले की, चॉकलेटची देवाणघेवाण झाल्यानंतर सीमेवरील झटापट थांबली आहे. (विश्‍वासघातकी चीनने दिलेल्या चॉकलेटवर भारताने कोणताही विश्‍वास ठेवू नये ! - संपादक)

डॉ. दाभोलकरांनी केलेला घोटाळा लपवण्यासाठी सनातनवर आरोप ! - अधिवक्ता पुनाळेकर

      पुणे - येथे पत्रकारांशी बोलतांना अधिवक्ता पुनाळेकर म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी परिवर्तन या संस्थेसाठी नक्षलवाद्यांचे पैसे घेतले आहेत. त्या संस्थेमध्ये त्यांनी घोटाळा केला असून तो लपवण्यासाठी दाभोलकर कुटुंबियांकडून सनातनवर आरोप करण्यात येत आहेत. याविषयी आम्ही न्यायालयात पुरावे दिले असून डॉ. दाभोलकर यांची हत्या नक्षलवाद्यांनीच केली असण्याची शक्यता आहे.
(म्हणे) परिवर्तन संस्थेवर केलेले आरोप हास्यास्पद !
डॉ. हमीद दाभोलकर यांचा कांगावा !
      पत्रकारांशी बोलतांना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, पुनाळेकर यांनी परिवर्तन संस्थेवर केलेले आरोप खोटे असून ते हास्यास्पद आहेत. यामुळे पुनाळेकर हे आपली पत अल्प करून घेत आहेत. (परिवर्तन संस्थेवर केलेले आरोप खोटे असतील, तर ते हमीद दाभोलकर यांनी सिद्ध करून दाखवावे ! आरोपावर साधा खुलासाही देऊ न शकणार्‍या हमीद दाभोलकर यांनी अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावर आरोप करणे, हे हास्यास्पद आहे ! - संपादक) अंनिस आणि परिवर्तन या दोन्ही संस्था अन् त्यांचे कार्यही वेगळे आहे. 
क्षणचित्र : अधिवक्ता पुनाळेकर हे पत्रकारांशी बोलत असतांना समाजातील एका व्यक्तीनेही परिवर्तन संस्थेच्या पुराव्यांविषयी प्रश्‍न विचारला. त्याचे अधिवक्ता पुनाळेकर यांनी उत्तर दिले. नंतर प्रत्यक्षात ती व्यक्ती अंनिसची कार्यकर्ता असल्याचे समजले.

औंध रस्त्यावरील (पुणे) एका दगडखाणीत शिधापत्रिकेवरील धान्याची १०० पोती आढळली

      पुणे, १६ जून - येथील औंध रस्त्यावरील पाटील-पडळ वस्तीजवळील एका दगडखाणीत शिधापत्रिकेवर देण्यात येणारे आणि चांगल्या स्थितीत असलेल्या गहू आणि तांदूळ यांची सुमारे १०० पोती आढळून आली. ही पोती कोणी आणि का टाकली, याविषयी अन्नधान्य वितरण विभागाकडून तपास करून गुन्हा प्रविष्ट करण्यात येणार आहे. (या प्रकरणी विभागाने लवकरात लवकर तपास पूर्ण करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक) धान्याचा काळाबाजार लपवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार ११ जून या दिवशी रात्री घडला आहे.
१. स्थानिक नागरिकाननी १२ जून या दिवशी त्या भागात पाहणी केली. त्या वेळी अनेक पोती फुटलेली होती आणि तांदूळ-गहू एकत्र झाला होता. त्या पोत्यांवर शासकीय शिक्केही दिसून आले. (यावरून शासकीय धान्य वितरक घोटाळे करत आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. - संपादक)

धर्मांतराचे प्रकार थांबवा ! - शिवसेना नेते आनंद शिरगावकर

हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याचे धाडस केवळ शिवसेनाच करते ! 
     म्हापसा, १६ जून (वार्ता.) - बिलिव्हर्सवाल्यांनी चालवलेला खेळ थांबवावा अन्यथा शिवसेनेला तिच्या पद्धतीने हे प्रकार रोखावे लागतील. गरीब, गरजू आणि श्रद्धाळू लोकांना हेरून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न शिवसेना कदापि सहन करणार नाही, अशी चेतावणी गोवा शिवसेना नेते आनंद शिरगावकर यांनी दिली आहे.
      म्हापसा येथे झालेल्या प्रकाराचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. शिवगावकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गरिबांच्या साधेपणाचा लाभ उठवून त्यांच्यावर बिलिव्हर्स त्यांच्या धर्माचा, त्या विचारांचा प्रभाव पाडण्याचा आणि त्यांची फसवणूक करण्याचा धंदा करत आहेत. तो प्रथम बंद करावा. स्वत:ला संतांची उपमा देऊन प्रार्थना आणि उपदेश देणे बंद करावे.

हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सिद्ध होणे आवश्यक ! - प्रा. गजानन नेरकर

कैराना (उत्तरप्रदेश) येथील हिंदूंच्या तात्काळ पुनर्वसनाची हिंदु जनजागृती समितीची मागणी
पुणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
     पुणे, १६ जून (वार्ता.) - बहुसंख्य असूनही हिंदूंना त्यांचे अधिकार मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते; कारण हिंदूंना आतापर्यंत सर्वधर्मसमभावाची भूल देण्यात आली आहे. लव्ह जिहाद करून हिंदु युवतींना फसवणे, लोकसंख्या अथवा वस्ती वाढवून हिंदूंना अल्पसंख्य करणे, हे धर्मांधांचे षड्यंंत्र आहे. आज हिंदुत्ववादी म्हणवणारे शासनही काँग्रेसला लाजवेल, अशा पद्धतीने हिंदूंशी व्यवहार करत आहे. हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे काळाची आवश्यकता आहे. हिंदु महासभेचे पथक लवकरच कैराना येथील हिंदूंच्या साहाय्यासाठी जाईल, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे राज्य संघटक प्रा. गजानन नेरकर यांनी केले. उत्तरप्रदेशातील कैराना येथील धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्या हिंदु कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे, तसेच त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ जून या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. त्यात ते बोलत होते.

राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्केच पाणीसाठा

      पुणे, १६ जून - मोसमी पाऊस लांबल्याने शेतकरी आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळाच्या तीव्र झळा बसलेल्या मराठवाड्यात १ टक्क्यापेक्षा अल्प पाण्याचा साठा शिल्लक आहे.

बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता !

बांगलादेशातील हिंदूंसाठी जगात कोणीच वाली नाही का ? 
     ढाका - व्हॉईस ऑफ जस्टीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही. वर्ष १९७१ च्या बांगलादेश मुक्तीलढ्याच्या वेळी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला. त्या वेळी बांगलादेशमध्ये लाखो हिंदूंची हत्या करण्यात आली, तर अनेकांनी बांगलादेशमधून पलायन केले. आजही बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ चालूच आहे. एवढेच नव्हे, तर भारताविषयी सहानुभूती असल्याचा आरोप करत बांगलादेशमधील हिंदूंवर आक्रमणे करण्यात येत आहेत.
     सदर वृत्तात पुढे म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये धर्मस्वातंत्र्य नाही. बांगलादेशी हिंदू प्रतिदिन त्यांच्या देशातून भारतात पलायन करत आहेत. शेजारचा हिंदुबहुल भारत बांगलादेशी हिंदूंच्या व्यथेविषयी एक शब्दही बोलत नाही. (आपल्या धर्मबांधवांच्या यातनांकडे दुर्लक्ष करणार्‍या भारतीय हिंदूंना आणि बहुसंख्यांक हिंदूंच्या मतांवर निवडून येणार्‍या सत्ताधार्‍यांना हे लज्जास्पद नव्हे का ? - संपादक)

शीखविरोधी दंगलीचे खटले पुन्हा नव्याने चालू होणार !

३३ वर्षांत दंगलीचे खटलेही अंतिम टप्प्यांपर्यंत चालू ठेवू न शकणे लोकशाहीची निरर्थकता दर्शवते !
     नवी देहली - केंद्रशासनाच्या विशेष चौकशी पथकाने इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात उसळलेल्या दंगलीशी संबंधित ७५ खटले पुन्हा नव्याने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१. या दंगलीच्या आरोपावरून ५८७ गुन्हे नोंदवले गेले. यांपैकी २४१ गुन्हे ज्यांच्या विरोधात घडले, ते फिर्यादी तक्रार करण्यासाठी अथवा साक्षीपुरावे सादर करण्यासाठी पुढे आले नाहीत. अंतत: या गुन्ह्यांचा तपास बंद करावा लागला. 
२. वर्ष २००६ मध्ये १ आणि २०१३ मध्ये ४ खटले पुन्हा नव्याने चालू करण्यात आले. त्यात ३५ आरोपींना शिक्षा झाली. तथापि २३५ गुन्ह्यांशी संबंधित खटले आजही बंद आहेत. त्यातील ७५ खटले पुन्हा नव्याने चालू करण्यात येणार आहेत. 
३. खटल्यातील साक्षीदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, यासाठी विशेष चौकशी पथक लवकरच एक विज्ञापन प्रसिद्ध करणार आहे.

तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्यामुळे अणू पुरवठादार देशांच्या गटात भारताला स्थान मिळाले नाही ! - महाराजकृष्ण रसगोत्रा, माजी विदेश सचिव

नेहरू यांच्यामुळे भारताची किती हानी झाली आहे, हे नेहरूप्रेमी भारतियांच्या लक्षात येईल तो सुदिन !
     नवी देहली - भारताचे तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ् केनेडी यांनी अणू पुरवठादार देशांच्या गटात भारताला सहभागी करून घेण्यासाठी प्रस्ताव दिला होता; मात्र नेहरूंनी त्याला विरोध केला. अन्यथा आज भारताला यासाठी श्रम घेण्याची आवश्यकता भासली नसती, असे प्रतिपादन भारताचे माजी विदेश सचिव महाराजकृष्ण रसगोत्रा यांनी केले. 
     १९६४ मध्ये चीनने अणू चाचणी केल्याच्या आधी अमेरिकेने भारताला अणू चाचणी करण्यासाठी साहाय्य करण्याचाही प्रस्ताव दिला होता, असेही रसगोत्रा यांनी म्हटले आहे. जर नेहरू यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असता, तर भारत १९६२ च्या युद्धालाही रोखू शकला असता आणि त्यानंतरचे १९६५ च्या पाकबरोबरील युद्धही झाले नसते.

जळगाव येथे दिंडीला अडवणार्‍या धर्मांधाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

हिंदूंनो, तुमच्या धर्मपरंपरांमध्ये अडथळा आणणार्‍या धर्मांधांच्या विरोधात संघटित व्हा !
     सावदा (जिल्हा जळगाव) - तालुक्यातील चिनावल या गावी दिगंबर महाराज वारकरी शिक्षण संस्थेची पायी दिंडी खानापूरहून येथे येत असतांना धर्मांध शे. वाहेद अब्दुल समद याने ती अडवली. 
   या प्रकरणी त्याच्या विरोधात सरपंचांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. खानापूर येथून अरुण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून या दिवशी दिंडी येत होती. या वेळी वाहेद याने दिंडी बंद करा, असे म्हणत धक्काबुक्की केली. वाहेदवर कारवाई करण्याची मागणी भक्तांनी केली आहे. (केवळ मागणी नको, तर कारवाई होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक)

नगर पोलिसांकडून विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञापन, कारवाईची मागणी !

राजकारण्यांच्या अनुनयाची इतरांप्रमाणे आता पोलिसांनाही लागण !
     नगर - विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्हा पोलीस आणि लोणी पोलीस ठाणे यांच्या वतीने देण्यात आलेल्या विज्ञापनात पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांचे छायाचित्र आहे. तसेच विज्ञापनात सुसंस्कृत व्यक्तिमत्व लोकसेवेतून निर्माण झालेला कर्तबगार नेता, असा उल्लेखही करण्यात आला आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यकर्ते श्याम असावा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस दलाने औचित्यभंग केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

छगन भुजबळ आणि पुतण्या समीर यांच्या विरोधात प्रोडक्शन वॉरंट !

     मुंबई, १६ जून (वार्ता.) - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना विशेष न्यायालयाने २२ जून या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे (प्रोडक्शन वॉरंट) निर्देश दिले. त्यानुसार काका-पुतण्या त्या दिवशी विशेष न्यायालयात उपस्थित रहाणार आहेत. शासकीय अधिवक्ता प्रदीप घरात म्हणाले की, भुजबळ काका-पुतण्या दोघेही मनी लाँडरिंग प्रकरणी कारागृहात आहेत. २२ जून या दिवशी त्यांना उपस्थित करण्यात येईल. न्यायालयात उपस्थित झाल्यास त्यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट बजवावे, अशी मागणी न्यायालयात केली आहे.

इशरतजहाँ प्रकरणाची माहिती मागणार्‍या अर्जदाराला नागरिकत्व सिद्ध करण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा आदेश !

     नवी देहली - माहिती अधिकाराच्या अंतर्गत इशरतजहाँ चकमक प्रकरणाच्या माहितीची विचारणा करणार्‍या अर्जदाराला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्वत:चे भारतीय नागरिकत्त्व सिद्ध करण्याचा आदेश दिल्याचे समोर आले आहे. 
     या प्रकरणाच्या गहाळ झालेल्या धारिका (फाईल्स)च्या चौकशीसाठी सध्या एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालासंबंधी संबंधित अर्जदार अजय दुबे यांच्याकडून विचारणा करण्यात आली होती. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच सार्वजनिक माहिती अधिकार्‍याकडून नागरिकत्त्वाचा पुरावा मागितला जातो.या घटनेमुळे माहितीचा स्रोत आणि पारदर्शकतेत अडथळा आणण्याचा प्रकार सरकारकडून होत असल्याचे अर्जदार अजय दुबे यांनी सांगितले.

चिदंबरम् यांच्या काळातच इशरतजहाँ प्रकरणातील धारिका गहाळ !- केंद्रीय गृहमंत्रालय

गहाळ झाल्या कि गहाळ केल्या, याचा शोध का घेण्यात आला नाही ?
     नवी देहली - जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या इशरतजहाँ प्रकरणातील धारिका माजी गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या काळात गहाळ झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकरणाविषयी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने १५ जूनला सादर केलेल्या अहवालात ही कागदपत्रे १८ ते २८ सप्टेंबर २००९ या काळात गहाळ झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणासंदर्भातील गहाळ झालेल्या ५ कागदपत्रांपैकी केवळ एकच धारिका शोधण्यात यश आले असल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव मेहऋषी यांनी दिली. इसिसने २०१४ मध्ये अपहरण केलेल्या ३९ भारतीय कामगारांना ठार केल्याची शक्यता !

       बगदाद - इराकमध्ये इसिसच्या आतंकवाद्यांनी अपहरण केलेल्या ३९ भारतीय कामगारांची हत्या करण्यात आल्याचे कुर्दिश ऑफिशियल्स या गुप्तचर संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. १५ जून २०१४ या दिवशी एकूण ४० भारतियांचे मोसुल शहरामधून अपहरण करण्यात आले होते. यातील हरजीत मसीह नावाचा कामगार इसिसच्या तावडीतून जीव वाचवून पळाला होता; मात्र अन्य कामगारांचे काय झाले, याची कोणतीही माहिती नंतर मिळाली नव्हती. या संदर्भात भारत सरकारने सातत्याने ते जिवंत असल्याचे म्हटले होते आणि आताही या अहवालानंतर तसेच म्हटले आहे.

पाकमध्ये वाहिनीवरून थेट प्रक्षेपित होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी मुसलमान व्यक्तीकडून बलात्कार करण्याची धमकी !

पाकमधील अराजकता !
     इस्लामाबाद - पाकमधील एका खाजगी वृत्तवाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येत असलेल्या कार्यक्रमात एका मुसलमानाने एका महिलेला अश्‍लील शिवीगाळ करण्याबरोबरच बलात्काराची धमकी दिल्याची घटना घडली. 
    वृत्तवाहिनीवर जातीभेदावरून होणार्‍या हत्यांच्या विषयावर चर्चा चालू होती. यात निवेदीकेसह महिला अधिकार कार्यकर्ती आणि अन्य ३ जण सहभागी झाले होते. काही वेळानंतर चर्चा वादग्रस्त होऊ लागली. एका मुसलमान व्यक्तीने चालू कार्यक्रमातच महिला अधिकार कार्यकर्त्या मारवी सरमद यांना अश्‍लील शिवीगाळ करत बलात्काराची धमकी देत आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम संपल्यानंतर सरमद यांनी मारगल्ला पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली.


नगर येथील हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख दिगंबर गेंट्याल यांना २ वर्षे स्थानांतराची (तडीपार) शिक्षा

धार्मिक दंगलींमध्ये धर्मांधांना स्थानांतर (तडीपार) केल्याचे कधी ऐकले आहे का ?
     नगर, १६ जून - हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख दिगंबर गेंट्याल यांना नगर, बीड, पुणे, संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर अशा ६ जिल्ह्यांतून २ वर्षे कालावधीसाठी स्थानांतराची (तडीपार) शिक्षा उपविभागीय अधिकारी वामन कदम यांनी सुनावली आहे. (हिंदुत्ववादी शासन असलेल्या राज्यात हिंदुत्ववाद्यांवर कारवाई होणे अपेक्षित नाही. - संपादक) गेंट्याल यांच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, शस्त्रास्त्र कायदा भंग करणे आणि गेल्या वर्षी रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक होऊन झालेल्या दंगलीतील गुन्हे या पार्श्‍वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्याने ही कारवाई प्रस्तावित केली होती. 
     गेंट्याल यांच्यावर वर्ष २०१० पासून कोतवाली पोलीस ठाण्यात आणि तोफखाना पोलीस ठाण्यात अनुक्रमे २ अन् ४ गुन्हे प्रविष्ट आहेत. त्यातील एका गुन्ह्यात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली असून ३ गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत.पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनानिमित्त जळगाव येथे पत्रकार परिषद !

डावीकडून अधिवक्ता गोविंद तिवारी, पू. नंदकुमार
जाधव आणि श्री. विनय पाटील
     जळगाव - हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी (सनातन धर्म राज्य) हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन उभे करण्याच्या उद्देशाने १९ जून ते २५ जून या कालावधीत गोवा राज्यात पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशन प्रारंभ होत आहे. अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील १२५ हून अधिक हिंदु संघटनांचे ४१५ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहातील. ते हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्‍चित करतील, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव आणि हिंदु महासभेचे अधिवक्ता गोविंद तिवारी हे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात अब्जावधी रुपयांचा लॉटरी घोटाळा !

अब्जावधी रुपयांचे घोटाळे करून राज्याला आर्थिक संकटात 
टाकणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री ! 
      मुंबई, १६ जून - परराज्यातील ऑनलाईन लॉटरी विक्रेत्यांनी अब्जावधी रुपयांचा कर बुडवला असून या प्रकरणाची सुई माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे असल्याचा आरोप माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात वर्ष २००२ मध्ये मेगाविन ऑनलाईन लॉटरी चालू केली. वर्ष २००३ मध्ये परराज्यातील लॉटरी आल्यानंतर ही लॉटरी बंद करण्यात आली. सरकाराने लॉटरी बंद केल्याचा लाभ उठवत परराज्यातील लॉटरी चालकांनी वर्ष २००६-२००७ या कालावधीत एका ड्रॉच्या नावाखाली अनेक ड्रॉ काढले. यात सरकारचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडाला असतांना त्याकडे तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे.

काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमध्ये ७५ वर्षांनंतर साजरा केला कुंभमेळा !

सहस्रावधी काश्मिरी हिंदूंची उपस्थिती !
     श्रीनगर - शहरापासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या झेलम आणि सिंध नद्यांच्या संगमावर काश्मिरी हिंदूंनी ७५ वर्षांनंतर कुंभमेळा साजरा केला. या सोहळ्यात सहस्रावधी काश्मिरी हिंदूंनी पवित्र स्नान केले. 
    कुंभमेळ्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारने जय्यत सिद्धता केली होती. सरकारच्या वतीने वाहतूक, सुरक्षा आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. झेलमच्या दोन्ही तिरांवर भाजपच्या वतीने सहाय्यकक्ष उभारण्यात आले होते. स्थानिक मुस्लिमांनानी हिंदूच्या सेवेसाठी होड्या सिद्ध ठेवल्या होत्या. फुले, फळे, भाज्या आणि इतर साहित्य यांच्या विक्रीचे तात्पुरते स्टॉल नदीकिनारी उभारण्यात आले होते.
     या विषयी जम्मू येथील डॉ. बन्सीलाल शर्मा म्हणाले, ७५ वर्षांनी हा क्षण आला आहे. प्रतीक्षा आणि प्रार्थना यांच्या बळावर एक दिवस आम्ही पुन्हा स्वतःच्या गावी येऊ, अशी आशा आहे. डॉ. बन्सीलाल शर्मा मे १९९० मध्ये काश्मीरमधून विस्थापित झाले. काश्मीरमधून विस्थापित झालेले ते शेवटचे हिंदु समजले जातात. तथापि त्यांनी त्यांची काश्मीर खोर्‍यातील त्राल येथील स्थावर मालमत्ता अद्याप विकलेली नाही.पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवादात मारल्या गेलेल्या ३० सहस्र हिंदूंना न्याय द्या ! - राष्ट्रवादी शिवसेना

हिंदूंच्या किती संघटना आणि पक्ष अशी मागणी करतात ? 
    नवी देहली - १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या चौकशीसाठी ज्याप्रमाणे विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे वर्ष १९७८ पासून पंजाबमधील खलिस्तानी आतंकवाद्यांकडून मारल्या गेलेल्या ३० सहस्र हिंदूंना न्याय देण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयभगवान गोयल यांनी केली आहे. त्यांनी राष्ट्र्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे.

मुसलमानांना वेगळी वागणूक नको ! - बराक ओबामा

     वॉशिंग्टन - आतंकवाद रोखण्यासाठी मशिदी आणि मुसलमान यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मागणीवर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला अशी अमेरिका नको आहे. मुसलमान असणार्‍या अमेरिकी नागरिकांना वेगळी वागणूक दिल्यामुळे अमेरिका आणि मुसलमान जगत यांच्यातील भेद आणखी वाढून देश उलटपक्षी अधिक असुरक्षित बनेल, असे ओबामा म्हणाले.

बिहारमध्ये बारावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र अवघ्या पाच लाख रुपयांत !

बिहारमधून शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाकडे आता देशातील जनता संशयानेच पाहील !
बिहारमधील जंगलराज ! 
     पाटलीपुत्र - बिहारमधील १२ वीत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा घोटाळा बाहेर आल्यानंतर त्यातील प्रकरणे आता बाहेर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी ५ लाख रुपयांत बारावी उत्तीर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र विकत होते, अशी माहिती विशेष चौकशी पथकाच्या चौकशीतून समोर आली आहे. या प्रमाणपत्रासाठी परीक्षेला बसणे सक्तीचे नव्हते, अशी माहिती आरोपींनी दिली. बिहार शालांत परीक्षा केंद्राचे संचालक लालकेश्‍वर प्रसाद सिंह आणि त्यांची पत्नी, तसेच जनता दल संयुक्तच्या आमदार उषा सिन्हा हे या प्रकरणात फरार आहेत. (यांचे राजकीय लागेबांधे असल्यामुळेच पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, असेच जनतेला वाटते ! - संपादक)पुणे शहरात ५ मासांत घरफोडीचे ४८७ गुन्हे प्रविष्ट

चोरांसाठी सुरक्षित आणि पोलिसांचे अस्तित्व नसलेले पुणे शहर, असे म्हटल्यास वावगे ते काय ?
     पुणे, १६ जून - जानेवारी ते मे २०१६ या ५ मासांत शहरात घरफोडीचे ४८७ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी ८ कोटी ४८ लक्ष रुपयांचा ऐवज पळवला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी.आर्. पाटील यांनी दिली. 
     ते पुढे म्हणाले की, पुणे शहराच्या विविध भागांत असलेल्या वसाहतींची पाहणी करून अशा वसाहतींमध्ये दिवसाढवळ्या टापटीप कपडे परिधान केलेले चोरटे शिरतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढते. अनेक जण सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जातात. त्या वेळी चोरटे कुलूप तोडून घरांमधील ऐवज लंपास करतात. सोसायट्यांनी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्यास घरफोड्यांना आळा घालणे शक्य होईल. (याचसमवेत पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवल्यास आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवल्यास घरफोड्यांना आळा बसेल. यासाठी पोलीस प्रशासन कोणती उपाययोजना करणार का ? - संपादक)मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; वाहतुकीचा खोळंबा

      पुणे, १६ जून (वार्ता.) - सकाळी ७ वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ओडोशी बोगद्याजवळ ४ वाहनांचा विचित्र अपघात झाला; मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये १ जण किरकोळ घायाळ झाला आहे. पक्षातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आप च्या प्रवक्त्या अलका लांबा निलंबित !

    नवी देहली - पक्षातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून देहलीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या अलका लांबा यांना पदावरून २ वर्षांसाठी निलंबित केले आहे. 
१. देहलीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांच्यावर झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी परिवहन मंत्रालयाचे दायित्व सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात यावे, असे अलका लांबा यांनी म्हटले होते. गोपाल राय यांनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.
२. पक्षाने केलेल्या या कारवाईवर लांबा यांनी ट्विट केले आहे की, मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती असून पक्षाच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करते. अनावधनाने माझ्याकडून चूक झाली असेल, तर मी नक्कीच पश्‍चाताप करीन. माझ्यामुळे पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी लढाईला धक्का बसेल, अशा माझा उद्देश नाही.


बसपच्या मायावती निवडणुकीच्या तिकिटासाठी ६ ते १० कोटी रुपये मागतात ! - बसपचे आमदार राजेश त्रिपाठी यांचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पक्ष चालवणार्‍या पुरोगाम्यांचे खरे स्वरूप !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - बहुजन समाज पक्षाच्या अध्याक्षा मायावती उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यासाठी पैसे मागत आहे, असा आरोप पक्षाच्या नेत्यांकडूनच होऊ लागला आहे. 
१. काही दिवसांपूर्वी माहोबाचे आमदार राज नारायण भुदौलिया यांनी पक्षात तिकीट मिळवण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप करत पक्षत्याग केला होता. 
२. आता दोन वेळा निवडणूक जिंकलेल्या चिल्लुपार विधानसभा क्षेत्रातील आमदार राजेश त्रिपाठी यांनीही तोच आरोप केला आहे. मायावती तिकीटवाटपासाठी पैसे मागत आहेत. ६ ते १० कोटी घेऊन त्या तिकीट विकत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
३. गोरखपूर जिल्ह्यातील हरिशंकर तिवारी यांना मायावती यांनी झुकते माप दिल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. जिल्ह्यात दहशत निर्माण करणारे तिवारी हे त्यांचेे पुत्र विनय यांच्यासाठी चिल्लुपार जागेसाठी तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्रिपाठी यांनीच २००७ च्या निवडणुकीत तिवारी यांना पराभूत केले होते.


आर्ट ऑफ लिव्हींग योगदिनी १०० हून अधिक देशांत कार्यक्रम करणार !

      मुंबई - आर्ट ऑफ लिव्हींग २१ जूनला होणार्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशी जगभरातील १०० देशांत कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर स्वत: ब्रुसेल्समध्ये युरोपीय संसदेत योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. येथे ते खासदारांना ध्यान लावण्यास शिकवणार आहेत. देहली येथील कार्यक्रमांमध्ये २० सहस्रांहून अधिक, तर मुंबई १६ सहस्र ५०० जण सहभागी होण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये १८ नरभक्षक सिंहांच्या विरोधात हत्येचा खटला चालवण्यात येणार !

गुजरात पोलिसांचा विनोदी उपक्रम ! 
     कर्णावती - गुजरातमधील सासण गिर येथे १८ नरभक्षक सिंहांच्या विरोधात खटला चालवण्यात येणार आहे. या सिंहांना पकडून पिंजर्‍यात बंदीस्त करण्यात आले आहे. त्यांना या गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. निर्दोष सुटले, तर त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात येईल. या सिंहांनी ४ जणांना ठार केले होते, तर ६ जणांना घायाळ केले होते. यातील सर्वच सिंह हिंस्र नाहीत. हिंस्र सिंहांची पडताळणी करण्यात येणार आहे. न्यायालयात सिंहांची बाजू कोण मांडणार, हे मात्र पोलिसांकडून स्पष्ट झालेले नाही.

इंदूर (तेलंगण) येथे गणपति मंदिरात सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन

      इंदूर (तेलंगण) - येथील सार्वजनिक गणपति मंदिरात नुकतेच सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथील नगरसेवक श्री. वानी आणि मंदिराचे अध्यक्ष श्री. गणेश यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थानिक धर्माभिमानी हिंदु श्री. घनःश्याम व्यास, श्री. जुगल किशोर पाण्डेय, अधिवक्ता शरत चन्द्र, ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री. भूपती राव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नेला तुकाराम उपस्थित होते.

तमिळनाडूत ५० भटक्या कुत्र्यांना जाळले !

     चेन्नई - तमिळनाडूतील किझामूर गावात ५० भटक्या कुत्र्यांना जाळून ठार केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्यांना मारण्याआधी त्यांच्या जेवणात किटकनाशक औषध मिसळण्यात आले होते. मेंढ्या, बकरे यांच्यावर कुत्र्यांनी आक्रमण केल्यांच्या रागातून काही गावकर्‍यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.भारताला जागतिक भागीदार बनवण्यास अमेरिकेचा नकार !

     वॉशिंग्टन - भारताला संरक्षण क्षेत्रातील जागतिक भागीदार असे विशेष स्थान देण्याच्या संदर्भातील तरतूद असलेले विधेयक अमेरिकेमधील सिनेटने १५ जून या दिवशी फेटाळून लावले. (अमेरिकेशी मैत्री असल्याचा बुडबुडा फुटला ! - संपादक)

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वाटले कोट्यवधी रुपये !

       अमेरिकेसारख्या मोठ्या ख्रिस्तीबहुल राष्ट्रांतही चर्चच्या दुरुस्तीसाठी एकही पैसा दिला जात नाही; मात्र हिंदुबहुल देशात बहुसंख्य हिंदूंच्या करातून जमा झालेला पैसा अशा कामावर उधळण्यात येत आहे. दुसरीकडे कर्नाटकात हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यात येत आहे. अनेक मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडली जात आहेत. अनेक जीर्ण मंदिरांची दुरुस्ती करण्यासाठी सरकार पैसे देत नाही. निधर्मी भारतात काँग्रेसकडून केला जाणारा हा भेदभाव निधर्मी म्हणायचा का ?
       माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकारने चर्चना कोट्यवधी रुपयांचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती, नूतनीकरण आणि ख्रिस्ती समाज सभागृह बांधण्यासाठी देण्यात आले आहेत.
१. २६ मार्च २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाकडून चर्चला किती रुपये देण्यात आले, या संदर्भात ४ प्रश्‍न विचारण्यात आले होते. यात चर्चच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून प्रतिवर्षी किती रुपये दिले गेले, ज्यांना अशा कामासाठी पैसे देण्यात आले त्यांची नावे, नवीन चर्चना प्रतिवर्षी किती पैसे देण्यात आले आणि त्यांची नावे, असे प्रश्‍न विचारण्यात आले होते.

सनातनवर बंदी घालण्याशी मी सहमत नाही ! - तुषार गांधी, म. गांधी यांचे पणतू

      मुंबई - बंदी संस्कृतीला माझा विरोध आहे. त्यामुळं सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीशीही मी सहमत नाही. अशा संस्थांवर बंदी घालण्याऐवजी त्यांच्यावर खटले दाखल करून केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना द्यायला हवी, असे ट्विट म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे.

गोरक्षणाचे कार्य करतांना श्रीकृष्णाने धर्मांधांच्या आक्रमणापासून वाचवल्याचा आलेला अनुभव !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या 
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
श्री. मध्वराज आचार्य, अध्यक्ष,
वीर सावरकर संघ आणि कर्नाटक
करावली संस्कृत संघ
      रामनाथी, गोवा येथे ११ जून ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात कर्नाटक येथील वीर सावरकर संघ आणि कर्नाटक करावली संस्कृत संघ यांचे अध्यक्ष श्री. मध्वराज आचार्य यांनी गोरक्षणाचे कार्य करतांना ईश्‍वरी कृपेचा आलेला अनुभव सांगितला. तो त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१. गोरक्षणाविषयी जागृती केल्यामुळेच पशूवधगृहात नेण्यात 
येणार्‍या गायींची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सुटका !
      कर्नाटक राज्यातील करावली परिसरात गोरक्षणासाठी मी पुष्कळ काम केले, तसेच अधिवेशनही घेतले. गावागावांतून गोरक्षणाचे महत्त्व सांगितले. एकदा काही ट्रकमध्ये २०० गायी भरून त्यांना पशूवधगृहात नेले जात असतांना ते ट्रक आमच्या हिंदुत्ववादी युवकांनी अडवले. ट्रक अडवल्याच्या ठिकाणी एक सहस्रहून अधिक मुसलमान एकत्रित आले होते. तेथे त्यांनी मला बोलावले. मी तेथील एका अधिकार्‍याच्या जीपमध्ये बसून गेलो. त्या लोकांच्या मधोमध आमची जीप उभी होती. चारही बाजूला मुसलमानच होते. तेथे त्या ट्रकमधील गायींना सोडून देण्यात आले होते.

सनातनवरील बंदी विषयीच्या प्रश्‍नावरून मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना रोखले !

      पुणे - वाघोलीत जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी विविध प्रश्‍नांसमवेत डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेशी संबंधित दोघांना अटक झाली आहे. त्यामुळे या संस्थेवर बंदी घालणार का ? असा प्रश्‍न विचारला असता श्री. फडणवीस यांनी पत्रकारांना रोखले. एखादा दिवस शाळेसाठी ठेवा. राजकारण रोज असते. आजचा दिवस बेटी पढाओचा आहे. त्यासाठी कृपया वेळ द्या, असे सांगत फडणवीस यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आरंभले पाहिजे !

श्री. त्यागराजन्, संस्थापक,
हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडी),
कन्याकुमारी, तमिळनाडू
१. तमिळनाडूत राष्ट्रभाषा हिंदीवर बंदी असल्याने हिंदी भाषा 
शिकण्यास इच्छुकांसाठी श्रीरामजी विद्या केंद्र ही शाळा चालू 
करण्यास प्रेरणा मिळणे !
     कन्याकुमारी हे ठिकाण तमिळनाडूच्या दक्षिण टोकाला आहे. द्रविडीयन पार्टी आणि डी.एम्.के. (द्रविड मुनेत्र कळघम्) या दोन्ही पक्षांच्या फोडा आणि झोडा या अंतर्गत हेतूने अनुक्रमे अण्णादुराई आणि करूणानिधी यांनी सत्तेत असतांना तमिळनाडूत राष्ट्रभाषा हिंदीवर बंदी आणली. परिणामी हिंदी भाषा शिकण्यास इच्छुक असलेल्यांनाही ती शिकणे अशक्य झाले. त्यामुळे मी २३ वर्षांपूर्वी हिंदी विषय सक्तीचा असलेली श्रीरामजी विद्या केंद्र ही शाळा चालू करण्यास प्रेरित झालो. कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये असलेल्या या शाळेत आध्यात्मिक प्रवचन, थिरूविल्लाक्कु पूजा, असे विविध धर्मजागृतीपर उपक्रमांचे आयोजनही केले जाते.

मुसलमानांचे लाड केवळ भारतातच !

     तमिळनाडूत जयललिता, तेलंगणात चंद्रशेखरराव यांच्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बनर्जी यांच्याकडून मुसलमानांसाठी रमझाननिमित्त २२ कोटी रुपये व्यय करून अल्पदरात खाद्यपदार्थांचे पाकीट देण्यात येणार आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएस्एन्एल्)कडून यानिमित्त सवलतीची विशेष योजना घोषित करण्यात आली. हिंदूंच्या सणांच्या वेळी या शासनांकडून हिंदूंना भेट का देण्यात येत नाही ? भेट द्यायची आहे, तर ती सर्वांनाच देण्यात आली पाहिजे. फक्त मुसलमानांनाच ती देण्यात येऊन शासन जाणीवपूर्वक धार्मिक वाद पसरवत आहे.

राज्यकर्त्यांनो, शत्रूराष्ट्राला धडा शिकवणेच योग्य आहे, हे जाणून कृती करा !

श्री. संदीप जगताप
१. शत्रूने आक्रमण करून देशवासियांचे रक्त सांडल्यावर केवळ पुरावे 
देण्यापेक्षा प्रतिशोध घेतला असता, तर अन्य आक्रमणे टळली असती !
     पठाणकोट आक्रमणात शत्रूने आमच्या भूमीत येऊन आमच्या देशवासियांचे रक्त सांडले. यावर आमच्या राज्यकर्त्यांनी काय केले ? अन्वेषण करून पुरावे पाठवले आणि भेट म्हणून स्वीकारली. अन्वेषण पथकातील अधिकार्‍याची हत्या ! नंतर नेहमीप्रमाणे पाकने ते पुरावे नाकारले, तो भाग निराळाच !
      या आमच्या भारतावर होणारी आक्रमणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. २६/११ सारखे मोठे आक्रमण झाले; मात्र भारताने पुरावे सादर करण्यापलीकडे काहीही केले नाही. त्याचाच परिणाम म्हणजे ही पुढे होणारी आक्रमणे आहेत. पुरावे कुणाला सादर करावेत आणि कुणाला मातीत पुरावे ?, एवढाही भेद न जाणणारे सरकार राजनीतीशून्य कि स्वार्थपरायण !

हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता !

श्री. अरविंद पानसरे

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथम मांडण्यात आलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना पुढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या निधर्मी राज्यप्रणालीत विरुन गेली; कारण काँग्रेसने एकगठ्ठा मतांचे राजकारण करण्यासाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे त्याचबरोबर हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे भारत देशातून समूळ उच्चाटणे असा एककलमी कार्यक्रम हाती घेतला. त्यातून हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारणे म्हणजे राष्ट्रद्रोहच होय, अशी हिंदुद्वेषी परिस्थिती राजकीय आणि सामाजिक पातळीवर निर्माण करण्यात आली. असे असतांनाही सनातन संस्थेने दोन-अडीच दशकापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापनेची घोषणा केली. अशी नुसती घोषणा करून सनातन थांबले नाही, तर देशातील हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी जोमाने कार्याला आरंभ केला. १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणारे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हे त्याचेच फलित आहे.

विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता नामदेवांना गुरूंकडे पाठवणे

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
गुरूंचे महत्त्व
१. गोरा कुंभारांनी संतमंडळींच्या डोक्यावर एकेक थापटी मारून त्यांची परीक्षा घेणे : एकदा सर्व संतमंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, सर्व संतांची परीक्षा घ्या. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एकेक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे गाल फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ? नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. 
२. विठ्ठलाने नामदेवांना विसोबा खेचरांकडे पाठवणे : नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, मुक्ताई-गोरोबा म्हणताहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. विसोबा खेचर नावाच्या माझ्या भक्ताकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
हिंदु एकता विशेषांक 
प्रसिद्धी दिनांक : १९ जून २०१६, पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १८ जूनला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

कुठे काही सहस्र लोक ठार झाल्यावर मुस्लिम अतिरेकी संघटनांचा तीव्र निषेध करणारी अमेरिका आणि कुठे अतिरेक्यांच्या आक्रमणात लक्षावधी भारतीय ठार झाल्यावरही शांत असणारे संवेदनाशून्य भारतीय सरकार !

     अमेरिकेच्या जागतिक व्यापार संघटनेच्या ११० मजली इमारतीवर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी विमानांची टक्कर मारून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यांत २० सहस्र लोक ठार झाले. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटॅगॉन या प्रचंड कार्यालयावरही आक्रमण केले. 
     अमेरिकेचे २० सहस्र लोक ठार झाले, याचा अमेरिका तीव्र निषेध व्यक्त करत आहे. याच अतिरेक्यांनी भारतांतील एक लक्ष लोकांची हत्या केली. तेव्हा त्याचा भारत सरकारला संताप येत नाही. या दोन राष्ट्रांच्या प्रवृत्तींतील हा भेद आहे. (सुराज्य पथ, १५.९.२००१)


     हा देश जोपर्यंत देशभक्तीचा सागर होत नाही, तोपर्यंत हे राष्ट्र म्हणून टिकणे शक्य नाही.- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान साधनेत आल्यावर श्री. वाल्मिक भुकन यांच्यात गुरुकृपेने झालेले पालट

श्री. वाल्मिक भुकन
१. स्वप्नात आणि प्रत्यक्षात गुरुदेवांचे झालेले दर्शन 
१ अ. स्वप्नात प.पू. डॉक्टर घरी आल्याचे दिसणे आणि त्यांचे दर्शन घेतल्यावर किती भावपूर्ण दर्शन घेतोस !, असे त्यांनी सांगणे : मी साधनेला आरंभ केल्यानंतर प.पू. डॉक्टरांची काही छायाचित्रे पाहिली होती; मात्र प्रत्यक्षात त्यांचे दर्शन झाले नव्हते. वर्ष २०१४ मध्ये एकदा ते माझ्या स्वप्नात आले. स्वप्नात ते मार्गावरून चालत आमच्या घराकडे येत होते. मी आमच्या घराच्या गच्चीत खाटेवर झोपलो होतो. त्या वेळी मला अचानक जाग आली आणि पाहिले, तर प.पू. डॉक्टर माझ्याकडे येत होते. मी त्यांना तसाच बघत खाटेवर बसलो. अचानक माझ्या मनात विचार आला, अरे ! प.पू. डॉक्टर आले आहेत. उठून त्यांना सामोरे जायला हवे. मी उठून जरा पुढे गेलो; पण घरातील इतर कुणी बाहेर आले नव्हते. मी तिथेच त्यांचे दर्शन घेतले. तेव्हा ते हसून मला म्हणाले, किती भावपूर्ण दर्शन घेतोस रे ! आणि मला जाग आली.
१ आ. पूर्णवेळ साधना करू लागल्यावर प.पू. डॉक्टरांचे प्रत्यक्ष दर्शन होणे, स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच ते असणे आणि देवाने योग्य ठिकाणी आणल्याची जाणीव होणे : त्यानंतर काही दिवसांनी मी पूर्णवेळ साधक झालो. एके दिवशी प.पू. डॉक्टरांची प्रथमच प्रत्यक्ष भेट झाली. त्या वेळी लक्षात आले, अरे ! हेच ते माझ्या स्वप्नात आलेले प.पू. डॉक्टर (गुरुदेव) ! त्यांनी पांढरी बंडी आणि पायजमा परिधान केला होता. मला ते स्वप्नातही याच वेशात दिसले होते आणि प्रत्यक्ष भेटीतही तोच वेश होता ! त्यांना पाहिल्यावर देवाने मला योग्य ठिकाणी आणले आहे, याची मनाला जाणीव झाली. 
२. पूर्वीचे स्वभावदोष आणि आता गुरुकृपेने त्यांत झालेले पालट
२ अ. सामान्य मुलांप्रमाणे भविष्याचे विचार असणे : शिक्षण चालू असतांना अन्य मुलांप्रमाणेच माझ्या मनातही चांगली नोकरी असावी. मोठे घर बांधावे. सुंदर बायको असावी, असे भविष्याचे विचार असायचे. 
     आता मात्र मला केवळ साधना करावीशी वाटते.
२ आ. रागीटपणा : साधनेत येण्यापूर्वी मी अतिशय रागीट स्वभावाचा होतो. माझा तोंडवळा नेहमी रागीट असायचा. घरामध्ये मी सर्वांत लहान; पण घरातील सर्वजण मला कामे सांगायला घाबरायचे. आमच्या वहिनी तर म्हणायच्या, वाल्मिकला काम सांगायला मला भीती वाटते.

महर्षींनी सांगितलेला नामजप भावपूर्ण होण्यासाठी साधिकेला सुचलेले विचार !

     एकदा मी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा नामजप करत असतांना माझ्या मनात पुढील विचार आला. 
१. ॐ निसर्गदेवो भव ।, असे म्हणत असतांना रामनाथी आश्रमातील शरणागत भावात झुकलेली झाडे डोळ्यांसमोर आणायची.
२. ॐ वेदम् प्रमाणम् ।, असे म्हणत असतांना रामनाथी आश्रमातील ग्रंथसंपदा डोळ्यांसमोर आणायची.
३. हरि ॐ जयमे जयम् ।, असे म्हणत असतांना रामनाथी आश्रमावर स्थापन केलेले कळस डोळ्यांसमोर आणायचे.
४. जय गुरुदेव । असे म्हणत असतांना प.पू. डॉक्टरांचे चरण आठवायचे.
     श्रीगुरूंनी असा भाव ठेवून नामजप करण्याचा प्रयत्न करायला सुचवल्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !
- सौ. शिल्पा उमेश पानसे, शिरवळ, (२४.५.२०१६) 

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

कु. प्रतिमा लोणे यांना रामनाथी आश्रमात येतांना आणि आल्यावर आलेल्या अनुभूती

                                       रामनाथी आश्रमाचे माहात्म्य

१. आश्रमात येण्यापूर्वी
१ अ. आश्रमात येण्याच्या आदल्या दिवशी शारीरिक त्रास होणे आणि प्रार्थना केल्यावर त्रास न्यून होणे : ९.३.२०१६ या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी मला निघायचे होते. ८.३.२०१६ या दिवशी सकाळपासून अचानक मला जुलाब चालू झाले. पोटही पुष्कळ प्रमाणात दुखत होते. काहीही खाल्ले, तरी पचत नव्हते. मी श्रीकृष्णाला कळकळीने प्रार्थना करत होते, देवा, सनातनच्या रामनाथी आश्रमात जाण्याची संधी पुष्कळ दिवसांनी मिळाली आहे. आता तूच मला आश्रमात घेऊन चल. श्रीकृष्णा, जे काही होईल ते तुला अपेक्षित असेच होऊ दे. दुसर्‍या दिवशीही श्रीकृष्णाच्या चरणी मी सातत्याने अशाच प्रार्थना करत होते. काही घंट्यांनी माझी पोटदुखी पूर्णपणे थांबली आणि आश्रमात येतांना मला कसलाच त्रास झाला नाही.
२. आश्रमात आल्यावर 
२ अ. नामजप करतांना घरी निरर्थक विचार येणे आणि आश्रमात आध्यात्मिक त्रासांचे प्रमाण न्यून होणे : मी घरी नामजपाला बसल्यावर माझ्या मनात अनेक निरर्थक विचार येतात किंवा मन एकाग्र न होता कुठेतरी भरकटतेे अन् जांभया येण्यास प्रारंभ होतोे. त्यामुळे नामजप करू नयेे, असे वाटतेे. रामनाथी आश्रमात आल्यावर प्रत्येक वेळी मी ध्यानमंदिरात आणि उपायांच्या खोलीत नामजप करतांना मन एकाग्र होऊ लागले. जांभया येणे, तसेच इतर त्रासांंचे प्रमाणही पुष्कळ न्यून झाले.

एकाच वेळी सजीव-निर्जीव सृष्टीवर परिणाम करणारे प.पू. डॉक्टरांचे अद्भुत कार्य !

   
श्री. शंकर नरुटे
 वर्ष २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी रामनाथी आश्रमाच्या पायाभरणीचा, तसेच लागवड विभागात अनेक प्रकारची रोपे लावण्याचा शुभारंभ एकाच वेळी चालू केला. दिवसेंदिवस दोन्हीकडील कार्य वृद्धिंगत होतांना दिसत आहे. 
१. संख्येत वाढ 
     दिवसेंदिवस आश्रमातील साधकसंख्येत वाढ होत आहे, तसेच लागवड विभागातील वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षवेलींच्या संख्येतही वाढ होत आहे. 
२. आश्रमातील साधकांचे घडणे आणि 
लागवड विभागात सुंदर फळाफुलांचे लगडणे
      आश्रमातील साधक, भिंती, दारे, खिडक्या, वृक्षवेली आणि माती यांच्यावर प.पू. डॉक्टरांची समान कृपादृष्टी असते. आश्रमात शिशु, बाल, किशोर, तरुण, प्रौढ, वयस्कर, संत आणि देश-विदेशांतील साधक रहातात. लागवडीत आंबा, आवळा, चिकू, काजू, नारळ, कोकम इत्यादी नाना प्रकारचे लहानमोठे वृक्ष मोहरतात, तसेच विविध रंगांनी नटलेली, मनमोहक अन् सुगंधी फुलेही फुलतात. आश्रमात साधक घडतात, त्यांच्यात गुणवृद्धी होते. लागवड विभागात सुगंधी फुले येतात. तेथील फळे रसरशीत अन् मधुरसभरीत असतात. त्या फळाफुलांतील चैतन्य सर्व आश्रमांत पोचवले जाते. (लागवडीतील फळे सर्व आश्रमांमध्ये पाठवली जातात.) 

गुरुदेव, सत्वर साधकां तव चरणी घ्यावे ।

सौ. अंजली कणगलेकर
संतांची ती मती गुंगली । 
ऋषिमुनींची वाचा शिणली ।
वेदांची ती वाणी थकली । 
सर्वही म्हणती नेती नेती ॥ १ ॥ 
अशा परब्रह्म परमात्म्याचे । 
म्या पामरेे काय वर्णन करावे ? ।
ही तर असती भावसुमने । 
कृतज्ञता अन् शरणागतीने ॥ २ ॥ 
अर्पुनी चरणी प्रार्थिते । 
करूनी कंदन असुरांचे ।
स्थापुनी ईश्‍वरी राज्याते । 
स्थित करावे धर्माते ।
मानवतेला उद्धारावे अन् सत्वर साधकां तव चरणी घ्यावे ॥ ३ ॥ 
- सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.४.२०१६) 

प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...
१. २८.५.२०१६ या दिवशी मला निरुत्साह, थकवा आणि अशक्तपणा या माध्यमांतून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास जाणवत होता. प.पू. डॉक्टरांचा अमृतमहोत्सव सोहळा संपन्न होणार, या गोष्टीचा वाईट शक्तींना पुष्कळ राग येत असल्याचे मला जाणवले. 
२. २९.५.२०१६ या दिवशी कार्यक्रमाच्या वेळी प.पू. डॉक्टर कार्यक्रमस्थळी आले. सिंहासनावर आसनस्थ होण्यापूर्वी ते काही क्षण खाली उभे होते आणि तेव्हा एक साधक बिरुदावली म्हणत होते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या वर साधारण अर्धा मीटर अंतरावर २ - ३ सेकंदासाठी काहीतरी आल्याचे आढळले. जणू आकाश उघडल्याप्रमाणे मला सूक्ष्मातून देवदेवता प्रगटून त्या पुष्पवृष्टी करत असल्याचे वाटले. हे सर्व इतक्या जलद गतीने घडले की, ते दृश्य मला स्पष्टपणे दिसले नाही. 
३. त्यानंतर एका वर्तुळात निळ्या रंगाचे आणि साधारण अर्धा मीटर आकार असलेले ॐ दिसले. हे दृश्यही जलद गतीने दिसल्याने ते अस्पष्ट होते; मात्र त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. 
४. त्यानंतर प.पू. डॉक्टर सिंहासनावर आसनस्थ झाले, तेव्हा साक्षात् श्रीराम सिंहासनावर बसला आहे, असे वाटत होते.

श्रीकृष्णाची ओढ असणारी, समजूतदार अन् प्रक्रियेचेे गांभीर्य असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कु. केतकी राकेश शिंपी (वय ७ वर्षे) !

कु. केतकी शिंपी
१. दैवी बालक म्हणून सत्कार झाल्यापासून पालट जाणवणे 
     वर्ष २०१५ मधील गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते कु. केतकीचा दैवी बालक म्हणून सत्कार झाला. तेव्हापासून तिच्यात पुष्कळ पालट जाणवायला लागला आहे. तिला कृष्णाची ओढ लागली आहे, असे वाटते. 
२. आश्रमात कृष्णाला भेटायला जाणार 
असून तेथे पुष्कळ दिवस रहाणार असल्याचे सांगणे 
     ५.८.२०१५ या दिवशी माझ्यात आणि केतकीत पुढीलप्रमाणे संवाद झाला. 
कु. केतकी : आई, मला तुला महत्त्वाचे विचारायचे आहे.
मी : विचार. 
कु. केतकी : आज तुझा नामजप किती झाला ? 
मी : नाही झाला. 
कु. केतकी : आज मी शाळेत गेल्यावर तुला माझी आठवण येत होती का ? 
मी : हो. (मला तिची खरंच आठवण येत होती.)
कु. केतकी : मलाही तुझी आठवण येत होती. तुझी आठवण आली म्हणजे मी दु:खी होते. 
मी : अशा वेळी तू कृष्णाचे स्मरण कर. 
कु. केतकी : मला तर जायचेच आहे आश्रमात माझ्या कृष्णाला (प.पू. डॉक्टरांना) भेटायला ! तेव्हासुद्धा तुला माझी आठवण येईल का ? 
मी : मी आणि तुझे बाबाही येऊ तुझ्यासमवेत आश्रमात राहायला.
कु. केतकी : तुला जितके दिवस राहायचे तितके दिवस रहा. 
मी : तू किती दिवस रहाणार आश्रमात ?
कु. केतकी : मी माझ्या कृष्णाकडे १०० दिवस रहाणार. 
(कु. केतकीला ठाऊक असलेला १०० हा सगळ्यात मोठा आकडा होता.) 

सर्वांठायी प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व असल्याची आलेली प्रचीती !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
१. साधनेच्या प्रारंभी प.पू. डॉक्टर आपल्यासमवेत
 आहेत का ?, असा शोध घेणे आणि संत झाल्यावर
साधकांमध्ये प.पू. डॉक्टर आहेतच, याची अनुभूती येणे 
     साधनेच्या प्रारंभी मी प.पू. डॉक्टर किंवा भगवान श्रीकृष्ण आपल्यासमवेत आहेत का ?, असा शोध घेत होतो. संत झाल्यानंतर प.पू. डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण माझ्या हृदयात असून प्रत्येक प्रसंग अन् प्रार्थना यांना तेच धावून येतात, असे अनुभवायला येत असे. गेल्या दीड वर्षात साधकांमध्येसुद्धा प.पू. डॉक्टर किंवा भगवान श्रीकृष्ण आहेतच, याची अनुभूती आली. बर्‍याच वेळा बैठकांमध्ये किंवा चुकांच्या सत्संगाच्या वेळी साधकांकडून जे चांगलेे किंवा भावपूर्ण होते, ते लक्षात येते. तेव्हा त्यांच्यातील ईश्‍वरी अंशाला माझा मानस नमस्कार व्हायचा. साधकांच्या चुका पुढे आल्यास माझ्यातील ईश्‍वराचा अंश साधकांमधील ईश्‍वराच्या अंशाभोवती आलेले त्रासदायक आवरण घालवण्यासाठी चुका सांगणे आणि दाखवणे इत्यादी करत असल्याचे अनुभवायला येत होते. 
२. समाजातील व्यक्तींमध्ये ईश्‍वराचा अंश असून ईश्‍वर त्यांच्या माध्यमातून
 साहाय्य करून श्री गुरूंचे कार्य पूर्णत्वास नेत असल्याची अनुभूती येणे 
     गेल्या तीन मासांपासून (महिन्यांपासून) समाजातील व्यक्तींमध्ये ईश्‍वराचा अंश असून ईश्‍वर त्यांच्या माध्यमातूनसुद्धा साधक आणि मला साहाय्य करून आमच्या श्री गुरूंचे कार्य पूर्णत्वास नेत आहे, याची अनुभूती येते. अन्य मनुष्यातील ईश्‍वरी अंशाला ज्या त्रासदायक आवरणाने ग्रासले आहे, ते दूर करण्यासाठी प.पू. डॉक्टर, संत आणि साधक यांच्या माध्यमातून समष्टीचा उद्धार करत असल्याची जाणीव व्हायला लागली. 

एका श्रद्धावानाने बुद्धीप्रामाण्यवादी मित्राशी केलेल्या गुजगोष्टी !

 
सौ. शालिनी मराठे
अरे बुद्धीप्रामाण्यवादी मित्रा, वाद कसले घालतोस ।
इतरांचे न ऐकता, आपलेच घोडे पुढे दामटतोस । 
नेहमी ईश्‍वर कुठे आहे दाखवा ? असे म्हणतोस ।
जे बुद्धीला समजत नाही, त्याचे अस्तित्व नाकारतोस ।
अशी कशी रे तुझी ही आडमुठी बुद्धी ॥ १ ॥
तू ज्या बुद्धीने मोठे ज्ञान-विज्ञान सांगतोस ।
ती बुद्धी हेच ईश्‍वराचे सूक्ष्म अस्तित्व दर्शवते । 
ही साधी गोष्ट तुला कशी कळत नाही ।
तरीही तू स्वतःला फार मोठा बुद्धीमान समजतोस ।
असा कसा रे तू, निद्राधीन झालेला प्रबुद्ध ॥२ ॥
अरे ! वसंत ऋतूत सर्व वृक्षांना भरपूर पाने-फुले येतात ।
पण निवडुंगाला एकही पान नसते, यांत वसंत ऋतूचा काय दोष । 
आमच्यासारखे कोट्यवधी आहेत श्रद्धाळू जन ।
त्यांना श्रद्धा-भक्तीभाव यांमुळे ईश्‍वराचे अस्तित्व जाणवते ।
मग तुला श्रद्धा नि ईश्‍वर कळत नाही, 
तर यात इतरांचा काय दोष ॥ ३ ॥

काश्मीरमध्ये हिंदूंवर प्रतिदिन अत्याचार होत असतांना मेहबुबा मुफ्ती यांचा देखावा !

       काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीर खोर्‍यात कायमचे परत आणण्यासाठी त्यांच्या मनात विश्‍वास निर्माण करणे आवश्यक असून सध्याची स्थिती पहाता ते काश्मीरमध्ये राहू शकतील, अशी परिस्थिती नाही; मात्र काश्मिरी हिंदूंविना काश्मीर अपूर्ण आहे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. त्यांनी श्रीनगरपासून २५ किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध क्षीर(खीर) भवानी मंदिरात जाऊन देवीची पूजाही केली. पूजा संपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे तिरुपति येथे बालाजीच्या दर्शनाला गेल्यानंतर हुंडीत लक्ष्मी-नारायणाची सुवर्णमुद्रा अर्पण करतांना आलेली अनुभूती

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. सनातनवर येणारी संकटे दूर होण्यासाठी, तसेच प.पू. डॉक्टरांचे 
आरोग्य सुधारावे आणि साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे, यांसाठी
महर्षींनी तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनाला जाऊन लक्ष्मी-नारायणाची
 प्रतिमा असलेली सुवर्णमुद्रा हुंडीत अर्पण करण्यास सांगणे 
     सनातनवर येणारी संकटे दूर होण्यासाठी, तसेच प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे आणि साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे, यांसाठी महर्षींनी तिरुपति येथे बालाजीच्या दर्शनाला जाऊन तेथील हुंडीत लक्ष्मी-नारायणाची प्रतिमा असलेली सुवर्णमुद्रा अर्पण करण्यास सांगितले होते. 
     महर्षींनी आम्हाला १२ आणि १३ जून २०१६ या दिवशी बालाजीच्या दर्शनाला जाण्यास सांगितले; पण आधी आम्हाला त्यांनी वैदिश्‍वरन् येथे जाऊन यज्ञ करू आणि मग पुढचे तिरुपतीच्या बालाजीच्या दर्शनाचे पाहू, असा आधीच्या नाडीवाचनात संदेश दिला होता. आता अचानकच आम्हाला १२ आणि १३ जून या दिवशी तिरुपति येथे जाण्यास सांगितले. यावरून लक्षात आले, काळ सतत पालटत असतो आणि त्याप्रमाणे संकटेही येत असतात; म्हणून सतत वर्तमानातच रहावे लागते. महर्षि आम्हाला हेच यातून शिकवत आहेत.

धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना जागृत करणारा हिंदु धर्मरक्षणाविषयी ग्रंथ

धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !
 • हिंदूंच्या वंशनाशासाठी छळ, बळ, कपट, प्रलोभने
 • आदींद्वारे नियोजनबद्धरित्या होत असलेले धर्मांतर !
 • भारतास पूर्वेचा रोम व मुगलीस्थान करण्याचा कट
 • धर्मांतराच्या डावपेचांच्या प्रतिकारार्थ दिशादर्शन !
 • हिंदूंनो, अद्वितीय अशा हिंदु धर्माचे प्रचारक बना !
संपर्क : ९३२२३ १५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता 
SanatanShop.com वर उपलब्ध !
       आज हिंदु धर्म नष्ट होऊन सर्वत्र भोगसंस्कृती येईल कि काय, ही माझी शंका हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या कार्यामुळे मिटली आहे !
- ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

फलक प्रसिद्धीकरता

विश्‍वकल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या 
स्थापनेस हातभार लावून आपले धर्मकर्तव्य बजावा !
       हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी फोंडा, गोवा येथे १९ ते २५ जून या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदु संघटनांचे ४०० पेक्षा अधिक प्रतिनिधी निर्धार करणार आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Hindu Rashtra sthapanahetu Goame Akhil Bharatiya Hindu Adhiveshanka ayojan,161 Hindu sanghatanoka sahbhag
Hinduo, apne shaharme bhi aisa adhiveshan le!
जागो ! : हिन्दू राष्ट्र स्थापना हेतु गोवा में अखिल भारतीय हिन्दू अधिवेशन का आयोजन. १६१ हिन्दू संगठनों का सहभाग.
हिन्दुओ, अपने शहर में भी ऐसा अधिवेशन लें !

गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक

       श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला, तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.
        धर्म आचरणार्‍या संतांचा उपयोग आपण पायपोसासारखा करतो, याची शुद्ध थोरामोठ्यांच्या मनाच्या तळाशीदेखील आढळायची नाही ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वराची उपासना सोडू नये
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
कितीही संकटांशी सामना करावा लागला, तरी परमेश्‍वरी उपासना सोडू नये. 
हताश होऊ नये. उपासनाच आपल्याला तारते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

   
प.पू. परशराम पांडे
आपण दिवसभर कार्य करत असतो; मात्र दिवसभर इतरांसाठी, दुसर्‍यांसाठी ते केल्याने समष्टी साधना होते. स्त्रीची सेवा चारही वर्णांतून होते. स्त्री दुसर्‍यांसाठी जगते. तिचे जीवन हे समष्टी जीवन आहे. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१०.२०१४) 


अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न

संपादकीय
      नवी मुंबई येथील दिघा येथील अनधिकृत इमारतींवर पावसाळा संपेपर्यंत हातोडा चालवू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आणि दिघावासियांचे संकट पुढे ढकलले गेले आहे. दिघा येथे थोडथोडक्या नव्हे, तर ९९ इमारती अनधिकृत इमारती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम्आयडीसी), सिडको आदींच्या जागेवर उभ्या आहेत.
    पिंपरी, चिंचवड, ठाणे यांसह आज महाराष्ट्रात सर्वत्रच अनधिकृत बांधकामांची भयंकर बजबजपुरी झाली आहे. तिचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की, हतबलतेने जानेवारी २०१६ पर्यंतची सर्वच अनधिकृत बांधकामे बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारून नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी १२ मार्च या दिवशी केली होती; परंतु या संदर्भातील निश्‍चित धोरण अजून आखले गेलेले नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn