Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज देशबंधू चित्तरंजन दास स्मृतीदिन

जम्मूमध्ये इसिसच्या विचाराने प्रभावित असणार्‍या यासिर अल्फाजकडून शिवपिंडीचा अवमान !

  • जम्मू-काश्मीरच्या भाजप-पीडीपी सरकारच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
  • अशा घटना घडू नयेत; म्हणूनच हिंदूंनी भाजपला निवडून दिले आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
  • शिवपिंडीवरील कलशाला मारली लाथ ! शिवपिंड ओलांडली !
  • हिंदुद्वेषी जम्मू पोलिसांकडून तक्रार करणार्‍या मंदिराच्या पुजार्‍याला मारहाण
   जम्मू - १४ जून या दिवशी जम्मूतील जानीपूर येथे असणार्‍या शंभू मंदिरात एका धर्मांधाने प्रवेश करून तेथे तोडफोड केली, तसेच शिवपिंडीवरील कलशाला लाथ मारून तो खाली पाडला. शिवपिंड ओलांडली, तसेच येथे पूजा करणार्‍या महिलांचा विनयभंगही केला. त्याला मंदिरातील दोघांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. तो डोडा येथील रहाणारा असून त्याचे नाव यासिर अल्फाज, असे आहे. तो इसिसच्या विचारांनी प्रभावित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसचा प्रमुख बगदादी ठार झाल्याचे वृत्त आल्यानंतर अल्फाजने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले. या घटनेची माहिती मिळताच हिंदू मोठ्या संख्येने जमा झाले. लोकांनी जाळपोळ केली; तसेच रस्ताबंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर येथे तणाव निर्माण झाला. यामुळे येथे संचारबंदी लागू करण्यात आली, तसेच येथील इंटरनेट आणि भ्रमणभाष सुविधाही बंद ठेवण्यात आल्या.
    जम्मूमध्ये नेहमीच मंदिरांवर आक्रमण आणि अवमान केल्याच्या घटना घडत असतात; मात्र प्रशासन या घटनांविषयी निष्क्रीय रहाते, असा आरोप येथील हिंदूंनी केला.

हिंदु राष्ट्र म्हणजे सनातन धर्म राज्य !

१. महर्षींचा संदेश : हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरावा. (जीवनाडीपट्टी क्र. ८२, वाचनस्थळ - हॉटेल विजय पार्क, चेन्नई, तमिळनाडू) (८.६.२०१६)
२. महर्षींची नम्रता : नाडीवाचनामध्ये महर्षि मला म्हणतात, परम गुरुजींना विचारा की, हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द उपयोगात आणू शकतो का ? (जीवनाडीपट्टी क्र. ८२, वाचनस्थळ - हॉटेल विजय पार्क, चेन्नई, तमिळनाडू) (८.६.२०१६)
त्यांच्या या विचारण्यावरून त्यांच्यातील नम्रता लक्षात येते. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (८.६.२०१६)
३. महर्षींनी हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरण्यास सांगणे आणि प.पू. डॉक्टरांनी तसे ३ - ४ वर्षांपूर्वी सांगणे ! : सनातन हा मूळ धर्म आहे. काळाच्या ओघात त्याचे हिंदु असे नाव प्रचलित झाले. सिंधू नदीच्या काठी रहातात, ते हिंदू, अशी हिंदू शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. याविषयी ३ - ४ वर्षांपूर्वी बोलतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, सध्या हिंदु धर्म असे नाव प्रचलित असले, तरी त्याचे मूळ नाव सनातन धर्म असे आहे. आपण सध्या प्रचलित आहे म्हणून हिंदु धर्म असा उल्लेख करू; पण पुढे हिंदु राष्ट्रात सनातन धर्म असाच उल्लेख प्रचलित करू. आता महर्षींनी दिलेला संदेशही तशाच अर्थाचा आहे.

धारवाड (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची गळा चिरून हत्या !

  • हिंदूंनो, इसिसच्या आतंकवाद्यांकडून करण्यात येते, तशी हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शी दिसत असल्याने सतर्क रहा !
  • काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! या घटनांविषयी पुरो(अधो)गामी आवाज उठवत नाहीत, हे लक्षात घ्या ! 
    बेंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे नेते योगेश गौडा यांची अज्ञातांनी १५ जूनला सकाळी गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश सकाळी व्यायामशाळेत जाण्यासाठी निघाले असता आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. पोलीस या आक्रमणकर्त्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठी येथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे.

सनातन संस्थेला संकेतस्थळांच्या माध्यमाद्वारे हिंदूंकडून लक्षणीय पाठिंबा

प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या हिंदूंचे आभार !
    अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तथाकथित पुरो(अधो)गामी संघटना यांनी सनातन संस्थेवर बंदी आणा ! अशी ओरड चालू केली आहे. त्यानंतर अन्य दैनिकांच्या संकेतस्थळांवर त्या मागणीचा खरपूस समाचार हिंदूंनी सडेतोड उत्तर आणि योग्य प्रतिवाद देऊन केला आहे. त्यातून त्यांनी सनातन संस्थेला पाठिंबाच दर्शवला आहे. सदर प्रतिक्रिया या (अंध)श्रद्धा निर्मूलनवाले आणि पुरो(अधो)गामी संघटना यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणार्‍या आहेत. त्या प्रतिक्रिया आम्ही आमच्या वाचकांसाठी देत येथे आहोत.
१. आधी आरोप सिद्ध करून दाखवा, मग बंदीविषयी बोला ! - शैलेश पाटील
    अंनिस ही क्रमांक १ ची शेपूट खाली घालणारी संस्था आहे. त्यांना देशात केवळ हिंदु हा एकच धर्म दिसतो. हिंदूंची सहनशक्ती खूप असल्याने असल्या संस्था जिवंत राहिल्या आहेत. त्यांची हिंमत असेल, तर त्यांनी ख्रिस्ती आणि मुसलमान या धर्मांतील अंधश्रद्धांना विरोध करून दाखवावा. बाकी गोष्ट राहिली सनातनची, तर त्यांच्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा, मगच बंदीविषयी बोला.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

माहिती मिळवण्याच्या उद्देशाने येणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींपासून सतर्क रहा !
    डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सी.बी.आय.कडून) सनातनच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध वृत्तवाहिन्यांवरून विपर्यस्त वृत्ते प्रसारित करून सनातन आणि समिती यांची नाहक अपकीर्ती केली जात आहे. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी सेवाकेंद्रे, तसेच साधकांच्या घरी जाऊन किंवा दूरभाषवरून साधकांना विविध प्रश्‍न विचारून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी या प्रतिनिधीचे नाव आणि ते कोणत्या वृत्तवाहिनीकडून आले आहेत, हे साधकांनी जाणून घ्यावे. या प्रतिनिधींना माहिती दिली की, ते वृत्तवाहिन्यांवरून विपर्यस्त वृत्त प्रसारित करत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे साधकांनी त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये. या प्रतिनिधींना कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांना सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना ०७७७५८५८३८७ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करण्यास सांगावे.

कोल्लम (केरळ) न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण घायाळ

साम्यवाद्यांचे राज्य असणार्‍या केरळमध्ये बॉम्बस्फोट 
झाल्यावर पुरोगामी(अधोगामी) तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
    कोल्लम (केरळ) - १५ जूनला सकाळी येथील न्यायालयाबाहेर झालेल्या अल्पक्षमतेच्या बॉम्बस्फोटात एक जण घायाळ झाला. येथे उभ्या करण्यात आलेल्या एका जीपमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी १० टायमर्स आणि बॅटर्‍या जप्त केल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा स्फोट जरी अल्पक्षमतेचा असला, तरी सापडलेल्या टायमर्समुळे ही गंभीर घटना आहे. प्राथमिक चौकशीत हा स्टील पाईम बॉम्ब होता, अशी माहिती मिळाली आहे.

बंगाल, तेलंगण आणि तमिळनाडू नंतर आता आंध्रप्रदेश सरकारकडून १० लाख मुसलमानांना ६० कोटी रुपये खर्च करून रमझान भेट !

सौदी अरेबियासारख्या इस्लामी देशांत हिंदूंना त्यांचे सणही साजरे 
करण्यावर बंदी असते, तर भारतात अल्पसंख्यकांचे लाड पुरवले जातात !
    भाग्यनगर - आंध्रप्रदेशमध्ये दारिद्य्र रेषेखालील शिधापत्रिका असणार्‍या १० लाख मुसलमानांना रमझाननिमित्त भेट देण्याचा निर्णय चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम सरकारने घेतला आहे. यासाठी ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भेटीमध्ये ५ किलो गहू, २ किलो साखर, १ किलो शेवया आणि १०० ग्रॅम तूप या वस्तूंचा समावेश आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत शिधावाटप दुकानांतून या वस्तू मिळणार आहेत. आंध्रप्रदेश सरकारने जानेवारी २०१५ पासून विविध धर्मांतील नागरिकांना भेटवस्तू देण्यासाठी आतापर्यंत ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामध्ये संक्रांतीनिमित्त भेटवस्तू तसेच नाताळानिमित्त भेटवस्तूंचा समावेश होता.

गोव्यातील मटका जुगाराविषयी सखोल चौकशी करा ! - उच्च न्यायालयाचा गोवा पोलिसांना आदेश

असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? 
पोलीस स्वत:हून का कारवाई करत नाहीत ?
      पणजी, १५ जून (वार्ता.) - गोव्यात मोठ्या प्रमाणात चालणार्‍या मटका या जुगाराविषयी सखोल चौकशी करा आणि या जुगाराचा स्रोत शोधून काढा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपिठाने १३ जून या दिवशी गोवा पोलिसांना दिला यापुढील चौकशीचा अहवाल दोन आठवड्यांत देण्यास न्यायालयाने सांगितले. सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी मटका प्रकरणात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हा आदेश न्यायालयाने दिला.
     न्यायमूर्ती एफ्.एम्. रेईश आणि नूतन सरदेसाई यांच्या खंडपिठाने आदेश देतांना पोलिसांच्या संथ गतीने चालणार्‍या चौकशीविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. मटक्यासंबंधी गुन्हा शाखेने सादर केलेला चौकशी अहवाल व्यवस्थित नसल्याचा शेरा न्यायालयाने मारला.

दुहेरी नागरिकत्व स्वीकारणार्‍यांनी देश सोडावा ! - स्वातंत्र्यसैनिक संघटना

गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाचे प्रकरण
      मडगाव (गोवा) - दुहेरी नागरिकत्व स्वीकारणार्‍यांनी भारतीय नागरिकत्व त्यागून हा देश सोडला पाहिजे, अशी चेतावणी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत केंकरे यांनी केले आहे. क्रांतीदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत दुहेरी नागरिकत्वाला अनुसरून विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देतांना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक केंकरे यांनी ही चेतावणी दिली.गोवा पोलीस आणि वेश्या व्यावसायिक यांचे साटेलोटे ! - विष्णु वाघ, उपसभापती

अशा पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात शासनाने तात्काळ कारवाई करावी !
     पणजी - वेश्याव्यवसाय गोव्यासाठी एक धोका झाला आहे. या व्यवसायामध्ये पोलीस अधिकारी आणि वेश्या व्यावसायिक यांचे साटेलोटे आहे, असा आरोप करत माझ्याकडे जी माहिती आहे, ती मी गोवा पोलिसांना द्यायला सिद्ध आहे, असे प्रतिपादन गोवा विधानसभेचे उपसभापती विष्णु वाघ यांनी व्यक्त केले आहे. (ती माहिती आतापर्यंत का दिली नाही ? सत्ता हाताशी असतांना भ्रष्ट आणि कर्तव्यचुकार पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई का केली नाही ? - संपादक)
    उपसभापती वाघ यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, वेश्याव्यवसाय हा गोव्यासाठी एक धोका आहे आणि यामुळे गोव्याचे नाव अपकीर्त होत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, काही पोलीस अधिकारी वेश्या व्यवसायासाठी साहाय्य करत आहेत. शासनाने हा प्रश्‍न गांभीर्याने घेतला पाहिजे.

गोव्यातील नायजेरियन पर्यटक ऑनलाईन फसवणूक प्रकरणांमध्येही बहुसंख्य

राज्यातील गुन्हेगारीत भर घालणार्‍या नायजेरियन पर्यटकांना आता हद्दपार करायला हवे !
     पणजी (गोवा) - नायजेरियन नागरिक राज्यात अमली पदार्थ व्यवसायात अग्रेसर असल्याचे उघड असले, तरी हे नागरिक ऑनलाईन फसवणूक प्रकरणांमध्येही पुढे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
    रायबंदर येथील सायबर क्राईम विभागाकडे वर्ष २०१४ ते आतापर्यंत ऑनलाईन फसवणुकीसंबंधी एकूण १५ प्रकरणे नोंद झाली आहेत. यांमध्ये सोडत (लॉटरी), संगणकीय पत्र (इमेल), रोजगार, वधू-वर सूचक मंडळ किंवा सामाजिक प्रसारमाध्यमे यांना अनुसरून करण्यात आलेली फसवणूक यांचा समावेश आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत घोळ : फेरमूल्यांकनात गुणांची मोठी तफावत उजेडात

जे शिक्षणमंडळ उत्तरपत्रिकाही धड तपासू शकत नाही, ते विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ?
     पणजी (गोवा) - मागील शैक्षणिक वर्षाअखेर गोव्यातील १२ वीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका तपासणीत यंदा मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे उजेडात आले आहे. फेरमूल्यांकनाची मागणी करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना दहा ते वीस गुण जास्त मिळाले आहेत. सर्वाधिक घोळ इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीत आणि यामागोमाग मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास आदी विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीतही झालेला आहे.
   प्राप्त माहितीनुसार, फेरमूल्यांकनात प्रचंड गुणवाढ झाल्याने शाळेत आधी प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी दुसर्‍या स्थानावर जाणे, द्वितीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक येणे असे हास्यास्पद; परंतु अत्यंत गंभीर प्रकार घडले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनाची मागणी केलेली नाही, त्यांच्यावर घोर अन्याय झाल्याची भावना अनेकांमध्ये आहे. शिक्षण मंडळाने यंदा १२ वीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संगणकाच्या साहाय्याने केले आहे आणि संगणकाधारित मूल्यांकन पद्धत यंदा अत्यंत घाईगडबडीने अमलात आणल्याचा आरोप होत आहे. 
    १२ वी परीक्षेच्या फेरमूल्यांकनात झालेल्या गोंधळाची राज्य प्राचार्य मंचने गंभीर दखल घेतल्याची माहिती मंचने दिली आहे.

धारावी येथील महाकाली मंदिर पाडण्याची प्रक्रिया तूर्तास रहित

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधाचा परिणाम !
    मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्या तीव्र विरोधामुळे येथील धारावी धोबीघाट नाल्यावरील अवैध महाकाली मंदिर पाडणे पाडण्याचे महानगरपालिकेला रहित करावे लागले; मात्र लवकरच कडक पोलीस बंदोबस्तात हे मंदिर पाडणार असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. याआधीही मंदिर पाडण्यास हिंदु गोरक्षा समितीने विरोध करून धारावी बंदची हाक दिली होती; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अवैध बांधकामांमुळे नालेसफाईत अडथळे येत असल्याचे कारण महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुढे करण्यात आले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येणार होती.

आयुर्वैद्य बालाजी तांबे यांच्यावर सरकारकडून गुन्हा प्रविष्ट !

हिंदुत्ववाद्यांचे हे शासन आयुर्वेदाची निर्मिती करणार्‍या
 प्राचीन ऋषीमुनींवरही उद्या ठपका ठेवण्यास मागे-पुढे पहाणार नाही, हे जाणा ! 
     नगर - पुत्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याचे कारण पुढे करून प्रसिद्ध आयुर्वैद्यतज्ञ बालाजी तांबे यांच्यावर राज्य सरकारने संगमनेरच्या न्यायालयात गुन्हा प्रविष्ट केला आहे. 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकातून पुत्रप्राप्तीचा उपाय सुचवणारे लेखक बालाजी तांबे यांच्यासह प्रकाशक आणि विक्रेते यांच्यावरसुद्धा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (पुत्रप्राप्तीचे विविध उपाय आयुर्वेदात प्राचीन काळी ऋषिमुनींनी लिहून ठेवले आहेत. त्या ज्ञानाचा उल्लेख श्री. तांबे यांनी त्यांच्या ग्रंथात केला. यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीचा प्रसार केला आणि लिंगनिवडीविषयी प्रसार करण्याचा त्यांचा हेतू आहेे, असा निष्कर्ष काढणे कितपत योग्य ? - संपादक) बालाजी तांबे आणि संबंधितांवर प्रविष्ट केलेला गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. 

संसदेतही राममंदिरासाठी कायदा केला जावा ! - डॉ. प्रवीण तोगडिया

केंद्रात स्वसंघटनेचे आणि हिंदुत्ववादी पक्षाचे शासन असतांना 
डॉ. तोगडिया यांनी राममंदिर उभारण्यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्यक आहे !
    संभाजीनगर, १५ जून - भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात राममंदिरांचे सूत्र नसले, तरी हिंदूंच्या अजेंड्यावर राममंदिर आहे आणि ते उभारणारच. कायदेशीर मार्गाने हा प्रश्‍न सोडवला जावा, यासाठी संसदेतही राममंदिरासाठी कायदा केला जावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली. येथील इंडिया हेल्थ लाईन अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी तोगडिया आले होते. त्या वेळी पत्रकारांनी राममंदिर उभारणीसंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

धर्माभिमान्यांना धक्काबुक्की करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

संस्कृत श्‍लोक आणि भगवा रंग असलेल्या
 पुस्तकांचे वितरण करून हिंदूंना फसवणारे धूर्त ख्रिस्ती ! 
     वाशी (नवी मुंबई), १५ जून (वार्ता.) - येथील रेल्वेस्थानकावर भगव्या रंगातील येशूची पुस्तके वितरित करून धर्मप्रचार करण्याचा ख्रिस्त्यांचा कुटील डाव धर्माभिमानी हिंदूंनी हाणून पाडला. (कावेबाज ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा कुटील डाव हाणून पाडणारे धर्माभिमानी हेच हिंदु धर्माची शक्ती आहेत ! - संपादक) या वेळी अरेरावी करत धर्माभिमान्यांना धक्काबुक्की करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे प्रविष्ट केले आहेत. 

तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांत अधिवेशनाविषयी पत्रकार परिषदांद्वारे जागृती !

अखिल भारतीय पंचम हिंदू अधिवेशन
    भाग्यनगर/मंगळुरू - भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांतील १२५ पेक्षा अधिक हिंदु संघटनांचे ४१५ पेक्षा अधिक प्रतिनिधी रामनाथी, गोवा येथे एकत्र जमून हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेविषयी कृतीधोरण आखणार आहेत. मागील ४ वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा ५ व्या वर्षी आयोजित अखिल भारतीय पंचम हिंदू अधिवेशनाला प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या अधिवेशनाची सर्व सिद्धता पूर्ण झाली आहे. या अधिवेशनाविषयी दक्षिण भारतातील हिंदूंना अवगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी १४ जून या दिवशी भाग्यनगर (तेलंगण) आणि मंगळुरू (कर्नाटक) येथे पत्रकार परिषदा घेतल्या.
आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यांतून २७ हिंदुत्ववादी सहभागी होणार !
    भाग्यनगर येथील सोमाजीगुडा पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी मागील ४ अधिवेशनांतील फलनिष्पत्ती आणि आता होणार्‍या हिंदु अधिवेशनाच्या स्वरुपाविषयी माहिती दिली. आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांतून २७ कृतीशील हिंदुत्ववादी या अधिवेशनात सहभागी होणार, अशी माहिती श्री. जनार्दन यांनी दिली. या पत्रकार परिषदेत तेलंगण राज्यातील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. टी.एन्. मुरारी, गोरक्षा दलाचे श्री. ए. नरेश आणि शक्ती केंद्राचे संस्थापक तथा लेखक डॉ. के.वि. सीतारामय्या आणि हिंदुत्ववादी श्री. अर्जुन उपस्थित होते.

विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपूल दीड वर्षात पूर्ण होणार

    सांगली, १५ जून (वार्ता.) - अनेक वर्षे वाहतुकीची कोंडी करणार्‍या विश्रामबाग-वारणाली रेल्वे फाटकाची अडवणूक आता लवकरच संपणार आहे. विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास प्रारंभ झाला आहे. २० कोटी रुपये व्यय अपेक्षित असलेला हा पूल येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक विभागाचे उपअभियंता राजेंद्र मोगली यांनी दिली.
    या संदर्भात आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, सांगली-कुपवाड रस्त्यावर या रेल्वे फाटकाचा अडथळा होता. या रेल्वेमार्गावर प्रतिदिन ५२ फेर्‍या होतात. त्यामुळे इतक्या वेळा हे फाटक उघडण्यास आणि बंद करण्यास रेल्वे यंत्रणेचा व्यय होत असे. तसेच नागरिकांना प्रत्येक वेळी थांबावे लागत असून इंधन आणि वेळ वाया जात असे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी त्याला निधी आणि संमती देऊन त्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे या पुलाचे काम चालू झाले आहे. ते लवकरच पूर्ण केले जाईल.

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथील हिंदु धर्मजागृती सभेत सनातन संस्था-निर्मित ग्रंथांचे प्रकाशन


     भुसावळ - येथे नुकत्याच झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत सनातन संस्था निर्मित विकार निर्मूलनासाठी नामजप भाग १ आणि भाग २ या ग्रंथांचे संत आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

धारावी येथील महाकाली मंदिर पाडण्याची प्रक्रिया तूर्तास रहित

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधाचा परिणाम !
    मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्या तीव्र विरोधामुळे येथील धारावी धोबीघाट नाल्यावरील अवैध महाकाली मंदिर पाडणे पाडण्याचे महानगरपालिकेला रहित करावे लागले; मात्र लवकरच कडक पोलीस बंदोबस्तात हे मंदिर पाडणार असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. याआधीही मंदिर पाडण्यास हिंदु गोरक्षा समितीने विरोध करून धारावी बंदची हाक दिली होती; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अवैध बांधकामांमुळे नालेसफाईत अडथळे येत असल्याचे कारण महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुढे करण्यात आले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येणार होती.

(म्हणे) भारतात इस्लामनेच हिंदूंच्या जीवनात शिष्टाचार आणला !

१४०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि आतंकवाद हीच ओळख असलेल्या इस्लाम धर्माने सृष्टीच्या निर्मितीपासून असणार्‍या हिंदु धर्मियांना शिष्टाचार शिकवण्याचा दावा करणे हास्यास्पदच !
मुसलमानबहुल मलेशियातील विश्‍वविद्यालयाचा अजब शोध ! 
      कुआलालंपूर - मलेशियातील युनिर्व्हसिटी तिच्या टेक्नॉलजी मलेशिया या विश्‍वविद्यालयाने अभ्यासक्रमात भारतातील हिंदूंना अस्वच्छ आणि घाणेरडे म्हटले आहे. तसेच भारतात इस्लामनेच हिंदूंच्या जीवनात शिष्टाचार आणला, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मलेशियातील हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. अभ्यासक्रमातील या संदर्भातील काही भाग संकेतस्थळांवरही पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातून त्यावर टीका होऊ लागली आहे. मलेशियाचे उपशिक्षण मंत्री पी. कमलनाथन् यांनी हे प्रकरण पुढे आणले. त्यांनी म्हटले आहे की, विश्‍वविद्यालयाने जाणीवपूवर्क हिंदूंचे विकृत चित्रण केले आहे. कमलनाथन् यांनी फेसबूकवर पोस्ट करतांना लिहिले आहे की, मी विश्‍वविद्यालयाच्या कुलपतींशी चर्चा केली आहे. त्यांनी त्यांची चूक स्वीकारली आहे.

महिला बंदिवानांकडून सिद्ध केलेले लाडू श्री महालक्ष्मी मंदिरात प्रसाद म्हणून वाटप करण्यास प्रारंभ !

हिंदुत्ववाद्यांचा विरोध डावलून सिद्ध केलेले लाडू 
भाविकांना देणे हे एकप्रकारचे देवस्थान समितीचे पापच !     
     कोल्हापूर, १५ जून (वार्ता.) - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने १४ जूनपासून महालक्ष्मी मंदिरात लाडू प्रसाद वाटपाचा प्रारंभ झाला. कळंबा कारागृहातील बंदिवानांनी हे लाडू बनवले असून तेथे पश्‍चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते लाडू बनवण्याच्या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री महालक्ष्मीला ओटी आणि नैवेद्य अर्पण करून मंदिरात भाविकांना लाडूप्रसादाचे वाटप चालू झाले. महिला कैद्यांकडून लाडू सिद्ध करवून घेण्यास हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असतांनाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हट्टापोटी देवस्थान समितीने असा चुकीचा निर्णय घेतल्याविषयी हिंदुत्ववाद्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

कु. ऋतुजा कुलकर्णी हिचे अभियांत्रिकी परिक्षेतील सुयश !

    पुणे - सनातन संस्थेचे साधक श्री. विश्‍वास कुलकर्णी आणि सौ. वैदेही कुलकर्णी यांची मुलगी कु. ऋतुजा कुलकर्णी हिला अभियांत्रिकी परिक्षेत ७५.५ प्रतिशत गुण मिळाले आहेत. कु. ऋतुजा पुणे येथील व्हिआयटी महाविद्यालयात शिकत होती. हे यश श्रीकृष्णाच्या कृपेने मिळाल्याचे तिने सांगितले.

न्यायालये खरंच समाजाला न्याय देतात का ? - विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम

न्याययंत्रणा आणि केंद्रशासन याविषयी विचार करील का ?
     नगर, १५ जून - महाराष्ट्र शासनाने समाजाच्या हितासाठी डान्स बार बंदीचा कायदा केला; पण सर्वोच्च न्यायालयाने राज्यशासनाचा कायदा रहित करून तरुणांचे संसार उद्ध्वस्त करणार्‍या डान्स बारला पुन्हा अनुमती देण्याचा आदेश दिला. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा देशोधडीला लागणार आहेत. अशा परिस्थितीत न्यायालये खरंच समाजाला न्याय देतात का ?, असा प्रश्‍न विशेष शासकीय अधिवक्ता आणि पद्मश्री पुरस्कार मिळालेले उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला. नगर जिल्ह्यातील टाकळीभान येथे श्रीरामपूर तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती दीपक पटारे आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ११७ विधवांना शिवणयंत्रांचे विनामूल्य वाटप निकम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अधिवक्ता उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, विजय मल्ल्यांसारखे लोक अब्जावधींचे कर्ज घेऊन देशाबाहेर पलायन करतात; पण शासन त्यांचे काही करू शकत नाही. शेतकर्‍यांच्या भीषण परिस्थितीत शासनाने त्यांच्या कर्जाविषयी सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे.

रमझानमधील रोजावर बंदी घालणार्‍या चीनच्या विरोधात माकप शांत ! - रमेश चेन्निथाला, काँग्रेस, केरळ

एकीकडे योगदिनाला ॐ म्हणणे बंधनकारक असल्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयावर भगवेकरणाचा 
आरोप करणारे साम्यवादी, चीनच्या मुसलमानविरोधी भूमिकेकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक 
करतात, हे लक्षात घ्या !
     थिरुवनंतपुरम् - रमझान मासातील रोजावर साम्यवादी चिनी शासनाने घातलेल्या बंदीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय अथवा राज्यस्तरीय नेतृत्वाची शांतता आश्‍चर्यकारक आहे, असे केरळचे काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथाला यांनी म्हटले आहे. (यातून माकपची दुटप्पी भूमिका दिसून येते. अर्थात् मुसलमानांविषयी कळवळा असलेल्या धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेसचे हे वक्तव्य काही नवीन नाही ! - संपादक)
    ते पुढे म्हणाले की, चीनच्या या निर्णयाचा जागतिक स्तरावर मुसलमान विरोध करत आहेत. चीनवर साम्यवाद्यांचे राज्य आहे. भारतातील साम्यवादी पक्ष आणि संघटना चीनमधील साम्यवाद्यांचे अनुकरण करतात; परंतु चीनच्या या निर्णयाच्या विरोधात मात्र काहीच का बोलत नाहीत ? जे साम्यवादी प्रत्येक सूत्रावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतात, ते आता शांत आहेत.

शौचालय आणि स्वच्छतागृहे तातडीने उभे करा ! - बजरंग दल

...अन्यथा महापालिकेच्या दारात प्रतिकात्मक शौचालय पूजन आंदोलन करणार ! 
     कोल्हापूर, १५ जून (वार्ता.) - श्री अंबाबाई मंदिरात येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यात मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत असलेले शौचालय पाडल्यानंतर प्रशासनाने त्यासाठी अन्य कोणतीही उपाययोजना केलेली नाही. वास्तविक भाविकांसाठी सर्व सोयींनीयुक्त पक्के शौचालय उभारणे आवश्यक होते. यातून प्रशासनाची काम चुकवेगिरी दिसून येते. तरी प्रशासनाने येत्या आठ दिवसांत त्याविषयी ठोस निर्णय न घेतल्यास २० जून या दिवशी महापालिकेच्या दारात प्रतिकात्मक 'संडास पूजन आणि टमरेल फेको' आंदोलन करणार आणि त्या वेळी होणार्‍या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन उत्तरदायी असेल, अशी चेतावणी बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (जी गोष्ट बजरंग दल आणि अन्य संघटना यांच्या लक्षात येते, ती महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? अवैध शौचालय पाडल्यावर तात्काळ अन्य शौचालयाची व्यवस्था करणे अपेक्षित असतांना ती न करणारे प्रशासन भाविकांच्या सोयींचा काहीच विचार करत नाही, हेच लक्षात येते ! भाविकांनो, अशा प्रशासनास जाब विचारा ! - संपादक) 

पावसासाठी पर्जन्ययज्ञ करा ! - करवीरपीठाधीश्‍वर स्वामी विद्यानृसिंह भारती

पावसासाठी पर्जन्ययज्ञ करा, हे हिंदुत्ववादी सरकारला सांगावे लागते, हे लज्जास्पद ! 
     संभाजीनगर - राज्यभरात दुष्काळी परिस्थितीनंतर पावसाळाही लांबल्याने अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पाऊस हवा असेल, तर सरकारने 'पर्जन्ययज्ञ करावा', असा सल्ला करवीरपीठाधीश्‍वर स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी दिला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त येथे संत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी स्वामी विद्यानृसिंह भारती बोलत होते. 'राज्यातील जलयुक्त शिवाराचे काम उत्तम झाले आहे', असेही शंकराचार्य या वेळी म्हणाले. 

कोंढवा (जिल्हा पुणे) येथील मदरशातील उस्तादाने मुलावर केले लैंगिक अत्याचार

हिंदूंचे आश्रम आणि संत यांच्या विरोधात नाहक कंठशोष करणार्‍या 
दूरचित्रवाहिन्या मदरशांमधून केल्या जाणार्‍या या अपप्रकारच्या विरोधात मूग गिळून गप्प का ?

     पुणे, १५ जून - येथील कोंढवा भागातील एका मदरशातील उस्तादाने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी उस्ताद हफिज इसरार आणि मदरशाचे संचालक मुफ्ती शाहिद, मौलाना तौसिफ आणि मालक मुफ्ती शाकिर यांच्या विरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.
    वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी सांगितले की, मूळचा खेड (जिल्हा पुणे) येथील रहिवासी असलेला हा पीडित मुलगा त्या मदरशामध्ये १० वीमध्ये शिकत होता. एप्रिल मासात उस्तादाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि ही गोष्ट कोणाला सांगू नये; म्हणून या उस्तादाने मुलाला कुराणाची शपथ घ्यायला लावली होती. त्या मुलाने हा प्रकार संचालकांसह मालकाला सांगूनही त्यांनी कारवाई केली नाही. १० वीचा निकाल लागल्यानंतर तो घरी गेला, तेव्हा त्याने वडिलांना उपरोक्त माहिती दिली.

(म्हणे) 'सनातन आणि हिंदु जनजागृती समितीची चौकशी व्हावी !' - 'अंनिस'चे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन

कायम हिंदु धर्माच्या विरोधात कार्य करणार्‍या 'अंनिस'वर प्रथम बंदी घाला ! 
     कोल्हापूर, १५ जून (वार्ता.) - ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका निवेदनाद्वारे अपर पोलीस अधीक्षक नीलेश बारी यांच्याकडे केली आहे. (सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घालण्याइतपत पोलिसांकडे पुरावे नसतांना केवळ या दोन्ही संस्थांच्या द्वेषापोटी अंनिसवाले अशी मागणी करत आहेत. खरेतर या दोन्ही संस्थांची अपर्कीती केली म्हणून अंनिसच्या दोषी पदाधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक) 

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा ! - हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

    सातारा, १५ जून (वार्ता.) - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची नावे वगळली आहेत. तत्कालीन आतंकवादविरोधी पथक आणि राज्यकर्ते यांनी त्यांचा अमानुष छळ केल्याचे यातून स्पष्ट होते. याला उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी, या आणि अन्य मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख यांना देण्यात आले.
    या मागण्यांसाठी १२ जून या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते.

सनातन प्रभातचे अँड्रॉईड अ‍ॅप वापरणार्‍यांसाठी सूचना !

     सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे सनातन प्रभातचे अँड्रॉईड अ‍ॅप 'गुगल प्ले-स्टोअर'वर बंद आहे. हे अ‍ॅप बंद असल्याने बर्‍याच वाचकांची गैरसोय होत आहे. यासाठी तात्कालिक पर्याय म्हणून वाचक पुढील लिंकवरील 'एपीके' धारिका (dainiksanatanprabhat.apk) डाऊनलोड करून सनातन प्रभातमधील बातम्या अँड्रॉईड भ्रमणभाषवर वाचू शकतात. https://goo.gl/WPCr89 
     टीप : वरील अ‍ॅप 'इन्स्टॉल' (install) करण्यापूर्वी आधीचा अ‍ॅप अनइन्स्टॉल (Uninstall) करावा. इन्स्टॉल करतांना अडचण येत असल्यास भ्रमणभाषच्या 'सेटींग्स' मधील 'Unknown sources' हा पर्याय वापरावा.

(म्हणे) 'सनातन संस्थेवर बंदी घालून गोव्यातील संस्थेचे मुख्यालय त्वरित बंद करावे !'

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सनातन संस्थेसारख्या 
हिंदुत्ववादी संघटनेचा बळी देण्याची मागणी करणारी नि(अ)धर्मी काँग्रेस ! 
 काँग्रेसचे प्रवक्ता सुनील कवठणकर आणि ट्रोजन डिमेलो यांचा सनातनद्वेष 
'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही', त्याप्रमाणे भ्रष्ट काँग्रेसवाल्यांनी 
मागणी केली; म्हणून अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेचे कार्य थांबणार नाही ! 
     पणजी, १५ जून (वार्ता.) - सनातन संस्थेला आतंकवादी संघटना घोषित करून सनातन संस्थेवर बंदी घालावी आणि गोव्यात असलेले संस्थेचे मुख्यालय त्वरित बंद करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ता सुनील कवठणकर यांनी केली. या वेळी उपस्थित असलेले प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनीही अशी मागणी केली. (राष्ट्रप्रेमी सनातनवर चिखलफेक करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी आधी स्वतःच्या पायाखाली काय जळत आहे, ते पहावे ! भ्रष्टाचाराने गेली ६ दशके अख्खा देश लुटून खाल्ल्यानंतर आता यांना देशप्रेमाचे भरते आले आहे. - संपादक) 

भारतातील मुसलमान युवकांना इसिसमध्ये भरती करणार्‍या फिलिपिन्समधील महिलेच्या शोधात भारतीय अन्वेषण यंत्रणा !

     नवी देहली - भारतीय अन्वेषण यंत्रणा इस्लामिक स्टेटमध्ये भारतातील मुसलमान युवकांची भरती करून त्यांना इसिसचे मुख्य ठिकाण असणार्‍या सिरियामध्ये पाठवण्याचे काम करणार्‍या महिलेच्या शोधात आहे. केरन आयशा असे या महिलेचे नाव आहे. ही महिला फिलिपिन्स येथे रहाते. आतापर्यंत तिने अनेक भारतीय मुसलमान युवकांना इसिसमध्ये भरती केले आहे. 
१. नुकतेच पकडण्यात आलेले इसिसचे भारतातील आतंकवादी महंमद सिराजुद्दीन आणि महंमद नासीर यांच्या संपर्कात असलेल्या केरन हिची विस्तृत माहिती आणि तिच्या विरोधातील पुरावे देण्याची मागणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) फिलिपिन्स शासनाकडे केली आहे.

इसिसकडून जम्मू-काश्मीरसाठी वेगळे चलन बनवण्याचा प्रयत्न !

      नवी देहली - जम्मू-काश्मीरसाठी वेगळे चलन बनवण्याचा इसिसचा प्रयत्न होता, असे समोर आले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेल्या इसिसच्या काही आतंकवाद्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. 
   आरोपपत्रात म्हटले आहे की, अटक केलेल्या सिराजुद्दीन याने सिरियामध्ये जाऊन प्रगत प्रशिक्षण घेऊन भारतात परतण्याची सिद्धता चालवली होती. काश्मीरपासून भारत आणि पाकिस्तान यांना दूर ठेवणे आणि तेथे खिलाफतची राजवट प्रस्थापित करण्याची योजना सिराजुद्दीन याने बनवली होती. काश्मीरसाठी वेगळे चलन बनवण्याची त्याची योजना होती. काश्मीरसाठी तयार करण्यात येणार्‍या चलनी नोटांवर इसिस आपले काश्मीरमध्ये स्वागत करते, अशी अक्षरे कोरण्यात येणार होती.हनुमंताला ३०० किलो केकचा नैवेद्य !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंकडून होणार्‍या चुका ! 
     कर्णावती (गुजरात) - येथील शाहीबाग येथे असलेल्या कॅम्प परिसरातील हनुमान मंदिरात श्री हनुमानाला ३०० किलो मावाच्या केकचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. या वेळी मोठ्या संख्येने हनुमानभक्त उपस्थित होते.

कुपवाडामध्ये चकमकीत एक सैनिक हुतात्मा !

     श्रीनगर - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात १५ जूनला सकाळी झालेल्या चकमकीत एक सैनिक हुतात्मा झाला, तर ४ सैनिक घायाळ झाले. तसेच सैनिकांच्या गोळीबारात एक आतंकवादी ठार झाला. (भारताच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे आतंकवाद्यांच्या उच्चाटनासाठी आणि सैनिकांच्या रक्षणासाठी काही करतील का ? संपादक)

मुंबई येथे आंदोलन

विषय : उत्तरप्रदेशच्या कैरानामधील बहुसंख्य धर्मांधांच्या अत्याचारांमुळे ३४६ हिंदु परिवारांचे पलायन ! 
दिनांक : गुरुवार, दिनांक १६ जून २०१६ 
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता 
स्थळ : दादर रेल्वे स्थानकाबाहेर, सुविधा दुकानासमोर, दादर पश्‍चिम. 
संपर्क क्र. : ९९२०२०८९५८ 

हिंदूंनो, संपूर्ण देशात हिंदू अल्पसंख्यांक झाले, 
तर पाक आणि बांगलादेश येथे हिंदूंची जी स्थिती आहे, 
तीच भारतातही होईल, हे लक्षात घेवून आंदोलनात सहभागी व्हा ! 

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत हिंदु एकता विशेषांक

 दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
हिंदु एकता विशेषांक 

प्रसिद्धी दिनांक : १९ जून २०१६, 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
१८ जूनला दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

मी हिंदु असल्याने पाक क्रिकेट मंडळाचे माझ्याकडे दुर्लक्ष !

भारतात एखाद्या खेळाडूने मी मुसलमान असल्याने माझ्यावर अन्याय होत आहे, असे म्हटल्यावर 
एकजात सर्व निधर्मीवादी त्याच्या समर्थनार्थ पुढे येतात; मात्र पाकमधील हिंदु खेळाडूच्या समर्थनार्थ 
कोणीही पुढे येत नाही, हा सर्वधर्मसमभाव होय !
पाकमधील हिंदु क्रिकेट खेळाडू दानिश कनेरियाची खंत ! 
     नवी देहली - पाक क्रिकेट मंडळ मला आरोपमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही. जेवढे प्रयत्न तिने नियमबाह्य पद्धतीने अन्य खेळाडूंना आरोपमुक्त करण्यासाठी केले तेवढे प्रयत्न माझ्यासाठी केले नाहीत. एका गुन्हेगाराला समर्थन दिले जाते; मात्र माझ्यासारख्या निरपराध्यासाठी काहीही प्रयत्न होत नाही. तेव्हा लक्षात येते की, मला मी हिंदु होण्याची शिक्षा मिळत आहे, अशी भावना पाकमधील एकमेव हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी व्यक्त केली आहे.

नेपाळला हिंदु राष्ट्र बनवणे आणि राममंदिर उभारणे हे उद्देश

ऑक्टोबर मासात नेपाळमध्ये विराट हिंदू संमेलन !
     गोरखपूर (उत्तरप्रदेश) - विश्‍व हिंदू महासंघाचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष संहिताशास्त्री अर्जुनप्रसाद बसतोला यांनी भाजपचे खासदार आणि महासंघाच्या भारतातील शाखेचे अध्यक्ष योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या वेळी योगी आदित्यनाथ यांनी काठमांडू येथे २० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित होणार्‍या विराट हिंदू संमेलनाला संमती दिली. 
१. या संमेलनात जगभरातील १०० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापूर्वी वर्ष १९८८ मध्ये असे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचा उद्देश नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवणे आणि सर्व प्रतिनिधींकडून राममंदिराच्या संदर्भात निर्णय घेणे, हे आहेत. 
२. नेपाळी नागरिक असणारे बसतोला म्हणाले की, आम्ही सर्व प्रतिनिधींचा निर्णय ऐकल्यावर राममंदिराच्या सूत्रावर महासंघाचे मत समोर ठेवू. आम्हाला आशा आहे की, मोदी यांच्या शासनकाळात राममंदिराचा प्रश्‍न सोडवला जाईल. 
३. नेपाळविषयी बसतोला म्हणाले की, महासंघाला देशातील शासनाचे समर्थन मिळाले आहे. शासनाने या संमेलनाला २० लाख रुपयांचे साहाय्य केले आहे. शासन नेपाळला पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी रस घेत आहे.

फरिदाबाद (हरियाणा) येथे युवक चरित्र निर्माण शिबिरात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

     फरिदाबाद (हरियाणा) - येथे केंद्रीय आर्य युवक परिषद, फरिदाबादच्या वतीने श्रद्धा मंदिर विद्यालयात आयोजित युवक चरित्र निर्माण शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. एक आठवड्याच्या या शिबिरात फरिदाबाद आणि शेजारील गावांतील युवकांनी सहभाग घेतला. यात त्यांना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट, लाठी काठी, योगासन इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी सौ. संदीप कौर यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
१. शिबिरात युवकांना मार्गदर्शन करतांना सौ. संदीप कौर म्हणाल्या की, लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य नष्ट होत आहे. त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, तणाव मुक्तीसाठी अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांचे वर्ग आयोजित करतात.

हुबळी (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखा आणि गुरुप्रभा ट्रस्ट यांच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन साजरा !

प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना डावीकडून
सौ.विदुला हळदीपूरकर आणि सौ. संध्या दीक्षित
      हुबळी (कर्नाटक) १५ जून, (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समिती आणि गुरुप्रभा ट्रस्ट यांच्या वतीने ११ जून या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन साजरा करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर आयोजित कार्यक्रमाचा आरंभ रणरागिणी शाखेच्या धारवाड जिल्हा समन्वयक सौ. विदुला हळदीपूर आणि संस्कार भारतीच्या प्रचारक सौ. संध्या दीक्षित यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून करण्यात आला.
     या वेळी सौ. हळदीपूर म्हणाल्या, आज महिलांनी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण टाळून हिंदु धर्मातील मूल्यांचे आणि परंपरेचे पालन करायला हवे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घेऊन धर्मपालन आणि राष्ट्ररक्षण करण्यास सिद्ध रहायला हवे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासारख्या काही पुरोगामी महिला स्वत:ला कथित समान अधिकार मिळण्यासाठी शबरीमला मंदिरासारख्या मंदिरांच्या गाभार्‍यात जाण्याची आक्रमक मागणी करतात. या महिलांनी हिंदु धर्माचे आणि त्याने प्रतिपादलेल्या गौरवशाली परंपरेचे महत्त्व जाणून घ्यायला हवे.

यवतमाळ आणि वणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

    यवतमाळ - वणी येथील तहसील चौक आणि यवतमाळ येथील दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन पार पडले. या वेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांचा अनन्वित छळ करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, बालभारतीच्या इयत्ता ६ वीच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशातून वगळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, काश्मीरमधील हिंदूंच्या हरि पर्वत टेकडीचे कोह-ए-मारन नामकरण रहित करावे, या मागण्या करण्यात आल्या. यात वारकरी संप्रदाय, हिंदु महासभा, योग वेदांत सेवा समिती यांचेे कार्यकर्ते सहभागी झाले. या वेळी ३०० ते ३२० जणांनी निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या.

धर्मनिरपेक्षतावादाची (सेक्युलरिझम्ची) निरर्थकता !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या 
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
डॉ. नील माधव दास, संस्थापक,
तरुण हिंदू, झारखंड
     रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने आपण गेल्या वर्षीच्या चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील वक्त्यांनी विविध विषयांवर मांडलेली सूत्रे पाहिली. आज तृतीय हिंदु अधिवेशनात झारखंड येथील तरुण हिंदू संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी धर्मनिरपेक्षतावादाची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! या विषयावर केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
१. भारत आणि भारतातील हिंदू यांच्यासाठी धर्मनिरपेक्षतावाद घातक !
     धर्मनिरपेक्षतावाद हा केवळ निरर्थकच नव्हे, तर भारत आणि हिंदू यांच्यासाठी घातकही आहे. आज देश आणि धर्म यांच्या झालेल्या दूरवस्थेचे मूळ धर्मनिरपेक्षतावादातच सापडेल. धर्मनिरपेक्षतावाद हा सेक्युलर या शब्दाद्वारेच अधिक अभिव्यक्त होतो.

मुले घडवणार्‍या शाळा हव्यात !

     मुलांच्या शाळा आता लवकरच चालू होतील. त्या पार्श्‍वभूमीवर विविध शाळा आणि शिकवण्या यांच्या विज्ञापनपत्रांचे विविध संस्थांकडून जागोजागी वाटप होत आहे. आमच्या शाळेमध्ये पोहणे, व्यायाम, कला, संगीत, अभ्यास इत्यादी सार्‍याच विषयांचे शिक्षण दिले जाईल असा सर्रास त्या पत्रकांमध्ये विविध प्रकारे त्या शाळांची वैशिष्ट्य सांगणारे उल्लेख त्या पत्रकामध्ये असतात. पालकांनाही आपले पाल्य सर्वगुणसंपन्न व्हावे, असे वाटत असते. या स्पर्धेच्या जगात त्याने कुठेही मागे पडू नये; म्हणून त्यांची धडपड चालू असते. अगदी पावणेदोन वर्षाच्या बालकापासून शाळांमध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यायोगे त्याचा स्पर्धेच्या जगात प्रवेश होतो. ही स्पर्धा पुढची २५ ते ३० वर्षे अविरत चालू असते.

आश्रयाला आलेल्या कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्यास सिद्ध झालेला शिबी राजा !

बालकांसाठी परिपाठ !
बोधकथा
ससाण्याच्या भयाने थरथरणार्‍या कबुतराला राजाने आश्रय देणे आणि स्वतःच्या 
शरिरातील कबुतराच्या वजनाइतके मांस देण्यास सिद्ध होणे
      फार पूर्वी शिबी नावाचा एक राजा होता. तो फार दयाळू आणि न्यायी होता. साहाय्यासाठी कुणी आले, तर राजा त्याला साहाय्य केल्याविना रहात नसे. एकदा एक कबुतर उडत-उडत राजसभेत बसलेल्या शिबी राजासमोर आले. ते भीतीने थरथर कापू लागले. शिबीने प्रेमाने त्याला जवळ घेतले. तेवढ्यात एक क्रूर ससाणा उडत-उडत तेथे आला. तो शिबीला म्हणाला, महाराज, माझे कबुतर मला द्या. शिबी म्हणाला, हे कबुतर माझ्या आश्रयाला आले आहे. ते मी तुला दिले, तर तू त्याला खाऊन टाकशील. त्यामुळे मला पाप लागेल. ससाणा म्हणाला, मला फार भूक लागली आहे. हे कबुतर माझे अन्न आहे. ते अन्न तुम्ही लुबाडले, तर मी मरून जाईन. त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार ? राजा म्हणाला, तू दुसरे कोणतेही अन्न माग. मी देईन. ससाणा म्हणाला, ठीक आहे. त्या कबुतराच्या वजनाइतके मांस तुमच्या शरिरातून कापून द्या. राजाने ते मान्य केले.

सैराटसारखे आयुष्य उद्ध्वस्त न करता ईश्‍वर आणि राष्ट्र यांवर प्रेम करा !

सैराट चित्रपटातील कलाकारांना पहाण्यासाठी तरुणांचा 
गोंधळ आणि पोलिसांचा लाठीमार ! 
    सैराट हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचे वेड तरुण पिढीला लागले आहे. मध्यंतरी चित्रपटातील कलाकार जेथे जातील, तेथे त्यांना पहाण्यासाठी तरुण पुष्कळ गर्दी करायचे. तेथे पोलिसांना लाठीमारही करावा लागायचा. नाशिक येथे तर त्यांना पहाण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती. चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट हे गाणे लागल्यावर चित्रपटगृहातच तरुण नाचू लागतात. यावरून या चित्रपटाने तरुणांना किती वेड लावले आहे, हे लक्षात येते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

     आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. स्त्रिया आणि मुली यांवर बलात्कार ओळखीच्या माध्यमातूनच होतात. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मुलींना मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य
२. मुलामुलींची अतिरेकी मैत्री
३. मुलींची संख्या अल्प झाल्याने अनेक मुलांचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे ते असे चुकीचे मार्ग शोधतात.
(संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, एप्रिल २०१३)

हिंदु राष्ट्राची पहाट पहायची असेल, तर संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू-काश्मीरच्या भाजप-पीडीपी सरकारच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
    १४ जूनला जम्मूतील शंभू मंदिरात यासिर अल्फाज याने प्रवेश करून तेथे तोडफोड केली. तसेच शिवपिंडीवरील कलशाला लाथ मारून ते खाली पाडले. शिवपिंड ओलांडली. तसेच पूजा करणार्‍या महिलांचा विनयभंगही केला.

हिंदू तेजा जाग रे !

जागो ! : कर्नाटकमें भाजपा नेता योगेश गौडा की गला काटकर हत्या !
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी की हत्याआेंपर चिल्लानेवाले इस घटनापर मौन !

Jago ! : Karnatak me BJP Neta Yogesh Gouda ki gala katkar hatya !
Dabholkar, Pansare, Kaburgi ki hatyaonpar chilanewale is ghatnapar maun !

अपेक्षाविरहित झाल्याने आणि परिस्थिती स्वीकारल्याने आनंद मिळतो, तसेच त्यागात अधिक आनंद आहे, ते अनुभवणे

१. प.पू. डॉक्टरांनी माझ्याशी बोलावे, मला दर्शन द्यावे, अशी अपेक्षा असणे : मी साधनेत आल्यापासून प.पू. डॉक्टरांनी माझ्याशी बोलावे, मला दर्शन द्यावे, अशी माझी अपेक्षा होती. तसे न झाल्यास मला पुष्कळ प्रतिक्रिया येत असत. बुद्धीने माझे विचार चुकीचे आहेत, हे कळूनसुद्धा त्यावर मात करता येत नसे. ही अपेक्षा मागच्या जन्मीच्या काही संस्कारांमुळे झालेली असावी, असे मला वाटत आहे. त्यात मला आध्यात्मिक त्रास असल्याने प.पू. डॉक्टरांचे दर्शन मिळाले नाही की, नकारात्मक विचार येऊन आध्यात्मिक त्रास वाढत असे आणि त्यातून बाहेर पडणे कठीण होत असे.
२. अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन सोहळ्यात प्रत्यक्षात सहभागी नसूनही आनंद मिळाल्यामुळे अपेक्षा न्यून होणे : मी पूर्वी विदेश विभागात सेवा करत होते. विदेशी साधकांना अनेक सोहळ्यांत प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी असते. त्यामुळे मीही सोहळ्यांत सहभागी होत असे. आता मी गुजराती विभागात सेवा करते. काही मासांपूर्वी प.पू. डॉक्टरांनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. त्या वेळी मी त्या सोहळ्यात प्रत्यक्षात सहभागी नसूनही त्या क्षणी प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून आश्रमातील माझ्या खोलीत देवपूजा करतांना माझ्याकडून जयघोष करवून घेतला, याचा मला आनंद वाटला. अशा प्रकारे अपेक्षेविरहित आणि परिस्थिती स्वीकारल्याने आनंद मिळतो, त्यागात अधिक आनंद आहे, हे मी अनुभवले.

रमण महर्षि आणि प.पू. डॉक्टर यांच्यातील साम्य

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ... 
       वर्ष १९३७ मध्ये एकदा बाबू राजेंद्र प्रसाद, श्री. जमनालाल बजाज आणि इतर काहीजण भगवान रमण महर्षींच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांच्यात त्या वेळी पुढीलप्रमाणे प्रश्‍नोत्तरे झाली. त्या वेळी सर्वांच्या वतीने श्री. बजाज यांनी महर्षींना प्रश्‍न विचारले. महर्षींनी त्यांच्या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे आणि परात्पर गुरु प.पू. डॉक्टर साधकांना करत असलेले मार्गदर्शन एकच असल्याने ईश्‍वरी तत्त्व कसे कार्य करते हे लक्षात येते. तसेच संत दिसती वेगळाले, परि वृत्तीते मिळाले, या उक्तीची प्रचीती येते.

सौ. क्षिप्रा जुवेकर यांना विविध संतांनी स्वप्नात येऊन दोष आणि चुका दाखवणे

१. साधनेत अधोगती होऊ नये, 
यासाठी संतांनी स्वप्नात चुका दाखवणे 
सौ. क्षिप्रा जुवेकर
      गेल्या काही मासांपासून (महिन्यांपासून) श्रीकृष्णाच्या कृपेने स्वप्नांच्या माध्यमातून संत मार्गदर्शन करतात. यावरून माझी साधना व्हावी, ही तळमळ माझ्याहून संतांनाच अधिक आहे, हे शिकायला मिळते. संतांच्या व्यापकतेमुळे स्वप्नातही ते माझ्या चुका दाखवून माझी अधोगती होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात.
२. संतांनी मार्गदर्शन केलेली काही स्वप्ने
पू. बिंदाताई
संतांनी स्वप्नाच्या माध्यमातून गृहीत धरणे, हा दोष लक्षात आणून देणे आणि सतर्कता वाढवण्यास सांगणे : एकदा मला स्वप्नात पुढील दृश्य दिसले. आश्रमात एक हत्ती आणला होता. त्याच्यासाठी वैरण खरेदी करण्यासाठी ज्यांनी हा हत्ती आश्रमाला दिला, त्यांच्याकडे चाकरी करणारी एक स्त्री जाणार होती. पू. बिंदाताईंनी त्या स्त्रीसमवेत मी आणि श्री. प्रशांत जुवेकर (यजमान) यांना पाठवले. ती स्त्री पेठेत जाऊन हत्तीसाठी वैरण खरेदी करतांना तिला त्यातील सगळे ठाऊक आहे, असे मी गृहीत धरले. गृहीत धरणे या माझ्यातील दोषांमुळे माझे तिच्याकडे लक्ष नव्हते. काही वेळानंतर काहीतरी चुकत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्या स्त्रीजवळ गेल्यावर माझ्या लक्षात आले की, ती स्त्री आवश्यकतेनुसार खरेदी करत नव्हती. मग मी पुढील खरेदी इतरांना विचारून आणि अभ्यास करून केली. मी आश्रमात परत आल्यावर पू. बिंदाताईंना हा प्रसंग सांगितला. तेव्हा त्यांनी मला माझ्यातील दोष लक्षात यावेत आणि मी शिकावे, यासाठीच त्या स्त्रीसमवेत मला पाठवल्याचे सांगितले. माझ्यात सतर्कता वाढावी, यासाठीच हा प्रसंग घडला. या दोषांकडे दुर्लक्ष केले, तर येणार्‍या काळात हानी होऊ शकते, हे त्यांनी लक्षात आणून दिले. मी झोपेतून उठल्यानंतर अजूनही हे स्वप्न माझ्या पूर्णपणे लक्षात आहे आणि हा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे, असे मला वाटते. श्रीकृष्णाच्या कृपेनेच हा दोष माझ्या लक्षात आला.

कार्यकर्त्याकडून साधकाकडे जाण्याचा साधनेचा प्रवास

१. कार्यकर्ता आणि साधक
२. अंतर्मुखता वाढवण्यासाठी 
मनाच्या अभ्यासाची आवश्यकता
२ अ. मनाचा अभ्यास कसा करावा ? : मनाचा अभ्यास करतांना पुढील तीन घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.
२ अ १. कर्माचे स्वरूप : देवाची सेवा

संतांच्या दर्शनाने आणि अस्तित्वाने डोक्यावरून पदर घ्यावासा वाटणे अन् प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेली कारणमीमांसा

सौ. रेखा जाखोटिया
      सनातनच्या देवद आश्रमात माझी रहाती खोली प.पू. पांडे महाराजांच्या खोलीच्या शेजारीच आहे. प.पू. पांडे महाराज महाप्रसादानंतर खोलीबाहेरील मार्गिकेत शतपावली घालतात. मागील आठवड्यात त्यांना पाहिल्यावर अचानक मला डोक्यावरून पदर घ्यावासा वाटायचा. दोन-तीन वेळा असे झाले. मग लक्षात यायचे की, माझ्या ओढणीला पीन लावलेली आहे. त्यामुळे पदर घ्यायला अडचण येत आहे. तरीही त्यांना पाहिले की, हात मात्र नकळतपणे पदराकडे जायचे. ही गोष्ट मी प.पू. महाराजांना सांगितल्यावर ते म्हणाले, डोक्यावर पदर घेणे सौजन्याचे आणि शालीनतेचे लक्षण आहे. त्यामुळे आपले संरक्षणही होते. चांगले आहे. बघा, तुम्हाला देवाकडून संकेत मिळाला आहे. पदर घेत जा. रुमाल वापरला, तरी चालेल.
- सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.३.२०१६)

देवाशी बोलत अनुसंधानात रहाणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् महर्लोकातून जन्माला आलेली संभाजीनगर येथील चि. आर्या उमेश भडगांवकर (वय ३ वर्षे) !

चि. आर्या भडगांवकर
       चि. आर्या उमेश भडगांवकर हिचा वाढदिवस ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशी (१६.६.२०१६) या दिवशी आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. आर्या हिला सनातन परिवाराकडून 
वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. गरोदर काकूच्या पोटाला आर्याचा पाय चुकून लागल्यावर बाळ वेगाने फिरल्याचे जाणवणे आणि तेव्हापासून काकूला बाळाच्या हालचाली जाणवू लागणे : कु. आर्या १९ मासांची (महिन्यांची) असतांना तिची लहान काकू गरोदर होती. तिला पाचवा मास (महिना) चालू होता. तेव्हा आर्याचा पाय तिच्या काकूच्या पोटाला चुकून लागला. त्या वेळी तिच्या काकूला पोटातील बाळ वेगाने फिरल्याचे जाणवले. तेव्हापासून काकूला बाळाच्या पोटातील हालचाली जाणवायला लागल्या. पोटाला पाय लागला; म्हणून आर्याने काकूच्या पोटाला हात लावून विचारले, बाळा, तुला लागले नाही ना ?

डोळे मिटून प्रार्थना करत असतांना सभोवती घडणार्‍या सर्व गोष्टी म्हणजे माया आहे, अशी जाणीव होऊन अलिप्तपणा येणे आणि मन एकाग्र होऊन ध्यान लागणे

      ३०.३.२०१५ ते १५.४.२०१५ या कालावधीत मी दिवसभरात डोळे मिटून प्रार्थना करत असतांना माझ्या सभोवती घडणार्‍या सर्व गोष्टी म्हणजे माया आहे, अशी जाणीव होऊन एक प्रकारचा अलिप्तपणा येत होता. त्या वेळी मन एकाग्र होऊन ध्यान लागत होते. ही जाणीव दिवसभरात बराच वेळ टिकून रहात होती.
- सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०१५)

मनात सतत भगवंताचेच विचार असल्यावर लवकर अंतर्मुख होऊन देवाकडे जायला सुलभ होणे

प.पू. पांडे महाराज
      दिवसभर सेवा करत असतांना आपल्या मनात बहिर्मुखतेचे विचार असतात. खरेतर आपण सतत अंतर्मुख राहून विचार केला पाहिजे, उदा. आपण संत्री किंवा केळी खाण्यासाठी घेतांना आपल्या मनात संत्री किंवा केळ्याच्या आतील भाग खायचा, असा विचार असतो, त्याप्रमाणेच आपल्या मनात सतत भगवंताचेच विचार असले पाहिजेत, म्हणजे आपल्याला लवकर अंतर्मुख होऊन देवाकडे जाता येईल. यासाठी प्रयत्न करावेत. 
- प.पू. पांडे महाराज (संग्राहक - श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१०.२०१५))

रुग्णाईत अवस्थेत साधनेसाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी पू. राजेंद्र शिंदे यांंनी त्यांच्या मुलीला सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे

पू. राजेंद्र शिंदे
        मला पाठदुखीचा त्रास चालू झाला आणि माझ्या मनाचा संघर्ष होऊ लागला. माझी सेवा अन् साधना होत नाही. माझी सेवेची तळमळ अल्प पडते का ? आपण भावनेपोटी सेवा करतो कि तळमळ आहे म्हणून सेवा करायचे विचार येतात?, असे अनेक उलट-सुलट विचार माझ्या मनात येत होते. या विचारांमुळे मनात द्वंदही होत होते. माझ्या या विचारांवरून लक्षात आले की, माझ्या वयाच्या अनेक साधकांच्या मनाचा असाच संघर्ष होत असतो. याविषयी मी पू. राजेंद्रदादांशी (माझ्या बाबांशी) बोलले. तेव्हा त्यांनी मला पुढील मार्गदर्शक सूत्रे सांगितली आणि माझ्या मनातील द्वंद्व दूर झाले.
१. दुखण्याच्या स्वरूपानुसार विश्रांती घेणे योग्य असणे
        आपले आरोग्य चांगले असेल, तरच आपण साधना करू शकतोे. त्यामुळे आपल्या शरिराची काळजी घेणे, ही साधनाच आहे. आपल्याला कोणता आजार आहे, यावरही साधना अवलंबून असते. माझा दात दुखत असेल, तरी मी सेवा करू शकते; कारण सेवा करतांना दुखण्याचे भान अल्प होते; परंतु जर मला पाठदुखी अथवा कटिचे (कमरेचे) दुखणे आहे आणि तीव्र वेदनांमुळे मला बसणे शक्य नाही, तेव्हा विश्रांती घेणे अन् शरिराची काळजी घेणे आवश्यकच आहे.

मनात जेवढे अधिक विचार साठवू, तेवढे वाईट शक्ती त्यावर नियंत्रण घेऊन साधकांना त्रास देत असणे; म्हणून मनमोकळेपणाने बोलायला हवे

       एक दिवस पू. (सौ.) बिंदाताईंचा सत्संग होता. त्यात त्यांनी साधक मनमोकळेपणाने बोलत नाहीत, असे सांगितले. तेव्हा मलाही बोलायला जमेल का ?, असा विचार आला. पू. ताईंनी सगळ्यांना सांगितले, ज्यांना असे वाटते, त्यांनी हात वर करा. तेव्हा पुष्कळ साधकांनी हात वर केले आणि मनमोकळेपणाने बोलता का येत नाही ?, त्याविषयी वेगवेगळे विचार सांगितले. त्यामुळे सगळ्यांकडून वेगवेगळे दृष्टीकोन शिकायला मिळाले. पू. ताई म्हणाल्या, मनात जेवढे अधिक विचार साठवाल, तेवढे वाईट शक्ती त्यांवर नियंत्रण घेऊन साधकांना त्रास देतात; म्हणून काही मनात आल्यावर लगेच विचारून घेतले पाहिजे किंवा साधकांना सांगितले पाहिजे, नाहीतर दोघांचीही हानी होते. नंतर मला पुष्कळ हलके वाटले आणि मनावरचा ताणही निघून गेला.
- सौ. पुष्पा शंकरराव बारई, नागपूर (५.५.२०१६)

पू. (डॉ.) पिंगळेकाकांचे मार्गदर्शन रहित झाल्याचे समजल्यावर साधकाने देवाकडे खंत व्यक्त करून प्रार्थना केल्यानंतर पू. काकांचे मार्गदर्शन ठरल्याप्रमाणे होणे

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
        १५.७.२०१५ या दिवशी पू. (डॉ.) पिंगळेकाकांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील पुरुष साधकांसाठी ठेवले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील साधकांना निरोप दिले. त्या दिवशी सकाळी उत्तरदायी साधकांनी भ्रमणभाष करून (पू.) काकांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आजचे मार्गदर्शन रहित करा, असे सांगितले.
१. पू. (डॉ.) पिंगळेकाकांचे मार्गदर्शन रहित झाल्याविषयीची खंत देवाकडे व्यक्त करत असतांना देवाने मार्गदर्शन होणार असल्याचे सांगणे : हे ऐकून मला धक्का बसला आणि माझे देवाला देवा, मी कुठेे न्यून पडलो ? माझी साधना, तळमळ आणि भाव न्यून झाला का ? साधकांना आता व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन मिळणार नाही का ? पू. काका येऊ शकत नाहीत, तर उन्नत साधक आणि जिल्हासेवकांचे तरी मार्गदर्शन ठेवूया, असे सांगणे होत असतांना देवाने मला पू. काका मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.

देवदमधील सनातन आश्रम आणि संकुल येथे, मी हिंदु राष्ट्र अनुभवते !

काय वर्णावी महती, देवद येथील सनातन आश्रमाची ।
माझ्या गुरूंचा वास, येथे जाणवे सगुण-निर्गुणातूनी ॥ १ ॥
चराचरांत शिकायला मिळाली मज, महती या आश्रमाची ।
शब्दही अपुरे पडती, महती वर्णायासी ॥ २ ॥
सर्व जण धडपडतात, सर्वांना पुढे नेण्यासाठी ।
गुरूंना अपेक्षित अशी व्यष्टी-समष्टी साधना होण्यासाठी ॥ ३ ॥
दुर्मिळ लाभ, हा संतसहवासाचा ।
त्वरित मिळे लाभ, मज संतचैतन्याचा ॥ ४ ॥

विष्णुदासांची हरिकथा !

सोनियाच्या दिनी आज । साधक झाले विष्णुदास ॥ १ ॥
पंढरीचा पांडुरंग । झाला विश्‍वाचा मायबाप ॥ २ ॥
इंद्रायणी वाहते भरभरून । भरा भक्तीभावाचे पात्र ॥ ३ ॥
अवतार विष्णूचा जागृत झाला । अधर्म नाहिसा झाला ॥ ४ ॥
धर्मतेज उजळूनी । प्रत्येक मानवाचा उद्धार केला ॥ ५ ॥
कार्य संपवून श्रीहरीने । केले वैकुंठी प्रस्थान ॥ ६ ॥
गात महिमा कलियुगात ।
हरिकथा सांगत होते । विष्णूचे विष्णुदास ॥ ७ ॥
शरणागत,
- सौ. वर्षा ठकार, पुणे (२९.५.२०१६)

ओळखीची गंमत !

श्री. राम होनप
      आमचे नाशिक येथील रहाते घर विकण्याची प्रक्रिया चालू असल्याचे प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, घर विकल्यावर तुमची नाशिकची ओळख संपली. तुम्ही इथले होणार. हे सूत्र मी पू. गाडगीळकाकूंना सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या, आता आपल्याला केवळ त्यांचीच, म्हणजे देवाची ओळख हवी. तेथे उपस्थित असलेल्या साधिका कु. कल्याणी गांगण याविषयी म्हणाली, आपण जन्मोजन्मी ओळखीच करत आलो आहोत. हे ऐकून पू. गाडगीळकाका म्हणाले, एवढे करूनही आपण अनोळखीच राहिलो. हे ऐकून तेथील सर्वजण हसू लागले. - श्री. राम होनप, गोवा. (२५.१२.२०१५)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
    बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

      जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात. मग ते उत्तम प्रकारे तत्त्वबोध देऊन संसाररूपी दुःखसागरातून त्या शिष्यांचा उद्धार करतात. - आद्यशंकराचार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
तन, मन, धन आणि अहं यांचा त्याग झाला अन् ईश्‍वराप्रती 
भाव अन् भक्ती वाढली की, ईश्‍वराची कृपा होते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा ज्ञानी 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. 
त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राष्ट्रघातकी आम आदमी पक्ष !

संपादकीय 
     आम आदमी पार्टी अर्थात् आपचे अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांची साथ सोडून पक्षाची स्थापना केली, तेव्हा त्यांचा पक्ष भ्रष्टाचारविरहित आणि कार्यक्षमरितीने काम करेल, असे सांगितले होते. भाजपच्या काही घोडचुकांमुळे आणि जनतेला दिलेल्या खोट्या आश्‍वासनांवर आपने एकहाती देहलीवर सत्ता मिळवली; मात्र दीड वर्षांच्या कालावधीत आपची कुकृत्ये पहाता या पक्षाची वाटचाल काँग्रेसच्याच दिशेने होत असल्याचे समोर येत आहे. नैतिकता, भ्रष्टाचार मुक्तता आणि साधन-शुचिता यांच्या मोठमोठ्या गप्पा मारणार्‍या आप या राजकीय पक्षाच्या विश्‍वासार्हतेचा बुरखा त्यांच्याच पक्षातील २१ आमदारांना मिळणार्‍या लाभाच्या पदामुळे टराटरा फाटला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn