Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शासकीय भूमी लाटणार्‍या संस्थांवर कारवाईची तपशीलवार माहिती द्या !

  • मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र शासनाला आदेश
  • हिंदु विधीज्ञ परिषदेचे सुयश !
  • हिंदु विधीज्ञ परिषदेच्या जनहित याचिकेमुळे शासनाने एकूण ३ सहस्र ६३२ हेक्टर भूमी परत घेतली ! 
  • शरद पवारांच्या शिक्षण संस्थेला १ रुपया वार्षिक भाड्यात ३० वर्षांसाठी दिली होती २ हेक्टर भूमी !
   मुंबई - शासकीय भूमी कवडीमोलाने राजकीय पक्षांच्या संस्थांना दिल्याच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १४ जून या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्या. अभय ओक आणि न्या. सय्यद यांच्या द्विसदस्यीय खंडपिठाने, महाराष्ट्र शासनाने खंडपिठाला दिलेली माहिती अपुरी असल्याचे ताशेरे ओढत तपशीलवार माहिती देण्याचा आदेश दिला.
    छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन सोसायटीसह नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील अशा अनेक राजकीय नेत्यांच्या संस्थांना शासनाच्या जमिनी दिल्या गेल्या होत्या. ज्यांत नियमांचे उल्लंघन झाले होते. त्यांनी शासनाच्या जमिनी अनधिकृतरित्या वापरल्या, हे भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी (कॅगने) उघडकीस आणले होते. शासकीय भूमी कवडीमोलाने राजकीय पक्षांच्या संस्थांना दिल्या जातात. त्यातून शासनाची पर्यायाने जनतेची लूट होते. त्यामुळे हे व्यवहार पारदर्शकपणे झाले पाहिजेत. जनतेला ते माहीत असले पाहिजेत. यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

चीनच्या २५० सैनिकांची अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी !

  • दिवसाढवळ्या चीनचे सैनिक भारतात घुसखोरी करत असतांना भारतीय सैन्य काय करत असते ? त्यांची घुसखोरी भारतीय सैन्याला अपमानास्पद नाही का ?
इटानगर - चीनच्या सैन्याने ९ जून या दिवशी अरुणाचल प्रदेशमधील कामेंग जिल्ह्यातील यांगस्ते येथे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे २५० सैनिक या घुसखोरीत सामील होते; मात्र ३ घंट्यातच ते माघारीही फिरले, अशी माहिती भारतीय सैन्याच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. अरुणाचलमध्ये चीनच्या घुसखोरीची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. यापूर्वीही चीनने अनेकदा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे. अरुणाचल हा स्वतःचा भाग असल्याचा चीनचा अनेक वर्षांपासूनचा दावा आहे.

(म्हणे) एन्एस्जीमध्ये भारताला घेतल्यास पाकला धोका ! - चीनचा कांगावा

    बीजिंग - अणू पुरवठादार देशांच्या गटात भारताच्या समावेशाला चीनने विरोध केला आहे. त्याचसमवेत आता चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रात म्हटले आहे की, असे काही झाल्यास भारताकडून पाकची कुरापत काढल्यासारखे होऊन त्यांच्यात अण्वस्त्रस्पर्धा वाढीला लागेलच, पण तसेच चीनच्या राष्ट्रीय हितालाही बाधा उत्पन्न होईल.

मशिदी आणि मुसलमान यांच्यावर लक्ष ठेवल्यासच आक्रमणे थांबतील ! - डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी !

  • हिंदुत्ववादी नव्हे, तर अमेरिकेतील राजकीय नेता अशी मागणी करतो, हे भारतातील पुरो(अधो)गामी आणि ढोंगी निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
  • आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे नेहमीचे तुणतुणे वाजणार्‍यांना ट्रम्प यांची चपराक !
    वॉशिंग्टन/नवी देहली - अमेरिकेत मुसलमानांना प्रवेश करण्यास बंदी घातली पाहिजे, हे माझे म्हणणे पुन्हा खरे ठरले आहे. मशिदी आणि मुसलमान यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे, तरच आतंकवादी आक्रमणे थांबतील, असा पुनर्रुच्चार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
   डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस हिंदु सेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता म्हणाले, या प्रकारच्या आतंकवादाचा त्रास भारतालाही होत असल्याने ट्रम्प यांची ही भूमिका पुष्कळ महत्त्वाची आहे. ट्रम्प बहुमताने निवडून येऊन इस्लामी आतंकवादाला नष्ट करतील.

बांगलादेशात ८ सहस्र ५०० जिहादी अटकेत !

   ढाका - अल्पसंख्यांकांवरील आक्रमणे रोखण्यासाठी बांगलादेशातील आतंकवादी आणि जिहादी यांच्याविरोधात चालू असलेल्या मोहिमेतून पोलिसांनी ११९ संशयित आतंकवाद्यांसह ८ सहस्र ५०० हून अधिक जिहाद्यांना अटक केली आहे.

१७ जून यादिवशी सनातन संस्थेची पत्रकार परिषद

सनातनविरोधी खोट्या कथा रचणार्‍यांचे कारस्थान उघड करणार !
    मुंबई - सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यानंतर अद्याप मुख्य अन्वेषणा यंत्रणा सीबीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसतांना त्यांच्या सूत्रांचा हवाला देऊन काही प्रसारमाध्यमांतून खोट्या कथा रचून त्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सर्व कथा कशा खोट्या आहेत, हे सर्व पत्रकारांसमोर पुराव्यांसह आणण्यासाठी शुक्रवार, १७ जून २०१६ या दिवशी सनातन संस्था आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अधिवक्त्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकार परिषदेत सनातनच्या अपकीर्तीचे कारस्थान उघडकीस आणणारे सज्जड पुरावे आम्ही एकत्रितपणे पत्रकारांसमोर मांडू. यामुळे या प्रकरणातील संपूर्ण सत्य पत्रकारांसमोर येईल. तसेच काही निवडक सनातन विरोधक आणि काही सुपारीबाज पत्रकार यांचे बिंग उघड होईल, असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले.

लाभाच्या पदामुळे देहलीतील आम आदमी पक्षाचे २१ आमदार अपात्र होण्याची शक्यता !

  • सनातन संस्था हिंदूंसाठी कलंक आहे, असे म्हणणारे आपचे नेते आशिष खेतान आता तोंड का उघडत नाहीत कि भ्रष्टाचारी मंत्री आणि अपात्र आमदार हा त्यांच्या पक्षाचा गौरव आहे, असे ते समजतात ?
  • केजरीवाल यांच्याकडून आमदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न !
   नवी देहली - देहली विधानसभेतील ७० पैकी ६७ आमदार असलेल्या आम आदमी पक्षाच्या २१ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या २१ आमदारांना संतुष्ट करण्यासाठी केजरीवाल शासनाकडून लाभाचे पद देण्यात आले होते.
    अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, हे जाणून देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लाभाच्या पदाचे विधेयक संमत करून राष्ट्रपतींकडे पाठवले होते; मात्र राष्ट्रपतींनी ते फेटाळून लावल्याने आमदारांना अपात्र करण्यात येणार असल्याचे एकाअर्थी निश्‍चित झाले आहे. याही स्थितीत केजरीवाल त्यांच्या आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, या २१ आमदारांपैकी कुणालाही एक पैसा दिला नाही. सर्व विनामूल्य काम करत होतेे. (असा प्रकार अन्य पक्षांच्या आमदारांकडून झाला असता, तर केजरीवाल यांनी असेच विधान केले असते का ? आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कारटं अशा पद्धतीने वागणारे ढोंगी केजरीवाल ! - संपादक)

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

सनातन संस्था अथवा समिती यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या मानहानीकारक वृत्तांची माहिती तत्परतेने कळवा !
   सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सदर नियतकालिकाचा एक अंक विकत घ्यावा. अशा वृत्ताविषयी कायदेशीर कारवाई करता होेऊ शकते का, हे कायदेतज्ञांकडून जाणून घेण्यासाठी संबंधित वृत्ताचे छायाचित्र काढून व्हॉट्स अ‍ॅपवरून श्री. शिवाजी वटकर यांना (संपर्क क्रमांक ८४५१००६१११) पाठवावे. त्यासोबत नियतकालिक आणि आवृत्तीचे नाव, प्रसिद्धी दिनांक, पृष्ठ क्रमांक आदी माहिती कळवावी. शक्य असल्यास सदर वृत्त स्कॅन करून इ-मेलने (hjs.karya@gmail.com) पाठवावे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंक कुठे पाठवायचा, हे संबंधित साधकांना कळवले जाईल.

तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांत अधिवेशनाविषयी पत्रकार परिषदांद्वारे जागृती !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन 
डावीकडून श्री. ए. नरेश, श्री. अर्जुन, श्री. चेतन जनार्दन, टी.एन्. मुरारी आणि डॉ. के.वि. सीतारामय्या
सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

गुन्हेगार आणि घोटाळेबाज यांचा भरणा असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा कांगावा !

(म्हणे) सनातनवर बंदी घालावी ! - राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
    सनातनवर बंदी घालावी, त्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकावे, त्यांच्या साधकांची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना दिली. (दोन्ही काँग्रेसचे सरकार सत्तेवर असतांना ते बंदी घालू शकले नाही, कारण सनातन संस्थेच्या विरोधात देशातील कुठल्याच पोलीस ठाण्यात साधा गुन्हाही दाखल नाही. आता सत्तेतून पायउतार झाल्यावर सनातनवर बंदीची मागणी म्हणजे अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचेच राजकारण आहे. - संपादक)
(म्हणे) तरुणांना एकत्र करून फौज का निर्माण करायची होती ? - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
    डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येचे धागेदोरे ज्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत आहेत, त्यांचे नेमके काय कटकारस्थान आहे ? कशाकरिता यांना तरुणांना एकत्रित करून फौज निर्माण करायची होती ?, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या वडगाव मावळ येथील मेळाव्यात उपस्थित केला.

बाबरी मशीद आणि गुजरात दंगल यांचा सूड घेण्यासाठी मुसलमान तरुण अल् कायद्यात भरती झाले ! - देहली पोलीस

गेल्या १ सहस्र २०० वर्षांत आक्रमणकारी मुसलमानांनी हिंदूंवर अगणित अत्याचार केले आहेत, 
त्याचा सूड घेण्याचे हिंदूंनी ठरवले, तर देशात काय होईल, याचा विचार जिहादी करतील का ? 
     नवी देहली - भारतातील मुसलमान तरुण बाबरी मशीद तोडफोड आणि गुजरातमधील दंगल यांचा सूड घेण्यासाठी अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी झाले, असे देहली पोलिसांनी येथील न्यायालयात सांगितले. या तरुणांपैकी काही जण जिहाद करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये गेले आणि तेथे त्यांनी जमात-उद-दवा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकी-उर्-रहमान लख्वी आणि इतर काही आतंकवादी यांची भेट घेतली, असे पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात १७ जणांवर आरोपपत्र दाखल करतांना म्हटले आहे.

भारत पाटणकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करा !

सनातनद्वेष्टे भारत पाटणकर यांनी सनातनला धमकी दिल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठांची मागणी 
     पुणे, १४ जून (वार्ता.) - सनातनद्वेष्टेे कथित पुरोगामी भारत पाटणकर यांनी सनातनला उघड उघड धमकी देत सनातनचे 'कोम्बिंग ऑपरेशन' करण्याची धमकी दिली आहे. भारत पाटणकर यांची अनेक आंदोलने हिंसक पद्धतीने झालेली आहेत. धरणांतील पाणी सोडण्यासाठी अथवा बंद करण्यासाठी त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या संघटनेवर अनेक गुन्हेही प्रविष्ट झालेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सनातनला दिलेल्या गंभीर धमकीप्रकरणी भारत पाटणकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून त्यांना आणि त्यांचे सहकारी यांंना जिल्हाबंदी घोषित करावी, या मागणीचे निवेदन स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णु जगताप यांना दिले. श्री. जगताप यांनी या वेळी संपूर्ण सहकार्य करण्याचे, तसेच आवश्यकता लागेल, त्या वेळी सनातनच्या कार्यालयाला सुरक्षा पुरवण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना बावधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निखिल वेडे-पाटील, धर्मरक्षक गटाचे अध्यक्ष श्री. ऋषिकेश पवार, हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर रूपदे, सनातन संस्थेचे श्री. हेमंत शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि समितीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा घातल्याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे !

'हरि ओम सेवा समिती'ची उपजिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी 
उपजिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना 'हरि ओम सेवा समिती'चे कार्यकर्ते
     पुणे, १४ जून (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी पुणे येथील सौ. कांचन अकोलकर यांच्या घरावर अवैधरित्या छापा घातला. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा घातल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी श्री आसाराम बापू साधक परिवाराच्या वतीने करण्यात आली. 'हरि ओम सेवा समिती'च्या वतीने या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर अशाप्रकारे अवैधरित्या छापा घालणार्‍या तपास अधिकार्‍यांना निलंबित करावे, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वाटले कोट्यवधी रुपये !

अमेरिकेसारख्या मोठ्या ख्रिस्तीबहुल राष्ट्रांत चर्चच्या दुरुस्तीसाठी एकही पैसा दिला जात नाही; मात्र 
हिंदुबहुल देशात बहुसंख्य हिंदूंच्या करातून जमा झालेला पैसा ख्रिस्त्यांवर उधळण्यात येत आहे. 
दुसरीकडे कर्नाटकात हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यात येत आहे. अनेक मंदिरांना अनधिकृत
ठरवून पाडले जात आहे. अनेक जीर्ण मंदिरांची दुरुस्ती करण्यासाठी सरकार पैसे देत नाही. 
निधर्मी भारतात काँग्रेसकडून केला जाणारा हा भेदभाव निधर्मी म्हणायचा का ? 
      बेंगळुरू - माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकारने चर्चना कोट्यवधी रुपयांचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती, नूतनीकरण आणि ख्रिस्ती समाज सभागृह बांधण्यासाठी देण्यात आले आहेत. 
१. २६ मार्च २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाकडून चर्चला किती रुपये देण्यात आले, या संदर्भात ४ प्रश्‍न विचारण्यात आले होते. यात चर्चच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून प्रतिवर्षी किती रुपये दिले गेले, ज्यांना अशा कामासाठी पैसे देण्यात आले त्यांची नावे, नवीन चर्चना प्रतिवर्षी किती पैसे देण्यात आले आणि त्यांची नावे, असे प्रश्‍न विचारण्यात आले होते.

हिंदु महिलांनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श ठेवायला हवा ! - सौ. सुनीता दीक्षित

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीप्रणित 'रणरागिणी' 
शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस वीरश्रीयुक्त वातावरणात प्रारंभ ! 
दीपप्रज्वलन करतांना रणरागिणी शाखेच्या
सौ. सुनीता दीक्षित आणि समवेत समितीच्या सौ. राजश्री तिवारी
     बार्शी (जिल्हा सोलापूर) - राष्ट्र-धर्म रक्षणासाठी हिंदु महिलांनी धर्माचरणी व्हावे, धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे, यासाठी चित्रपटांतील अभिनेत्रींचा नव्हे, तर ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवायला हवा, असे मत रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. सुनीता दीक्षित यांनी व्यक्त केले. या वेळी अश्‍लीलता, 'लव्ह जिहाद', धर्मपरंपरांना विरोध यांसारख्या धर्मावरील आघातांच्या विरोधात रणरागिणींनी रणशिंग फुंकले. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या व्यापक ध्येयाने प्रेरित होऊन रणरागिणीच्या बार्शी शाखेच्या धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ झाला. या वेळी भारताला पुन्हा विश्‍वगुरुपदी विराजमान करण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत रहाण्याची शपथ रणरागिणींनी घेतली. हा कार्यक्रम १२ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता पार पडला. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी उपस्थित होत्या. 

निर्दोष साध्वींवर अत्याचार करणारे पोलीस अधिकारी आणि राज्यकर्ते यांच्यावर कठोर कारवाई करा ! - कु. पूजा जाधव, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने निदर्शने      जळगाव - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १३ मे २०१६ या दिवशी न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांचे नाव वगळण्यात आले आहे. या आरोपपत्रानुसार साध्वी आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. गेली ८ वर्षे त्यांना कारागृहात डांबून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. साध्वींना धर्मभ्रष्ट करण्यापासून कर्करोगावर उपचारही मिळू न देण्यापर्यंत अमानुष छळ केला. मालेगाव स्फोटाच्या अन्वेषणाचे प्रकरण हे मोठे षड्यंत्र आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि त्यांना कारवाई करण्यास भाग पाडणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संबंधित सर्व राज्यकर्ते यांच्या विरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. पूजा जाधव यांनी केली. या वेळी उपस्थित हिंदुत्ववाद्यांनीही या मागणीला अनुमोदन दिले.

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने जत तालुक्यात दोन मास चाराडेपो !

    सांगली, १४ जून (वार्ता.) - विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने जत तालुक्यात अर्कळवाडी आणि घाटनांद्रे येथे दोन महिने चाराडेपो चालवण्यात येत आहे. जिल्ह्यात असलेली तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि गोवंशांची घटणारी संख्या पाहून हा उपक्रम चालवला जात आहे. गेल्या दोन महिन्यांत ५५ लक्ष रुपयांहून अधिक रुपयांचा चारा खरेदी करून प्रतिदिन ४०० गुरांना चारा वाटप करण्यात आले. यात सकस पशुखाद्यही पुरवण्यात आले होते. या उपक्रमात विहिंपचे सर्वश्री श्रीराम कुलकर्णी, राजाभाऊ पडसलगीकर, सतीश गोरे, विवेक काळे, सचिन कदम, संजय कुलकर्णी, अभिजित घुले यांसह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार श्री. सुधीर गाडगीळ, सांगली अर्बन बँक, पु.ना. गाडगीळ पेढी यांचे सहकार्य लाभले.

जगातील एकमेव संस्कृत दैनिक सुधर्मा बंद होण्याच्या मार्गावर !

एकीकडे पाश्‍चात्त्य लोक संस्कृतचे महत्त्व जाणून तिचे शिक्षण घेत आहेत, तर दुसरीकडे 
संस्कृतचे उगमस्थान असणार्‍या भारतातच संस्कृतच्या संदर्भात दिसणारी उदासीनता दुर्दैवी आहे ! 
संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विशेष पावले उचलली पाहिजेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     नवी देहली - भारतातील सर्व भाषांची जननी असणार्‍या संस्कृतला काँग्रेसने मृत भाषा ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संस्कृत भाषा अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातच जगभरात संस्कृत भाषेतील एकमेव दैनिक असणारे सुधर्मा बंद होण्याच्या स्थितीत आहे. 
१. वर्ष १९७० मध्ये कर्नाटकच्या म्हैसूर येथून संस्कृतचे विद्वान कलाले नांदुर वरदराज अय्यंगार यांनी याचा प्रारंभ केला होता.

बेंगळुरूमध्ये शिखा ठेवल्यामुळे हिंदु विद्यार्थ्याला कॉन्व्हेंटने शाळेमधून काढले !

भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, त्याला वेगळे हिंदु राष्ट्र करण्याची आवश्यकता नाही, असे काही हिंदुत्ववादी 
पक्ष म्हणतात, तर मग हिंदूंच्याच देशात हिंदूंना त्यांच्या धर्मपरंपरा पाळण्यास अन्य धर्मीय विरोध का 
करतात, हे ते सांगतील का ? 
हा आहे ख्रिस्त्यांचा सर्वधर्मसमभाव ! अशा घटना रोखण्यासाठीच 
हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता आहे !
     बेंगळुरू - येथील सेंट विन्सेट पलॉटी या कॉन्व्हेंट शाळेत मंजुनाथ बी.सी. यांच्या कु. विष्णु या शिशुवर्गात शिकणार्‍या मुलाला शाळेतून काढण्यात आले. कु. विष्णु याने शिखा ठेवल्याने त्याला काढण्यात आले. मंजुनाथ यांनी शाळेच्या प्रचार्यांकडे मुलाला शाळेतून का काढले ?, असे विचारल्यावर त्यांनी वरील कारण सांगितले. जर त्याला शाळेत शिकायचे असेल, तर त्याला शिखा कापावी लागेल. त्यावर मंजुनाथ म्हणाले की, माझा मुलगा ३ वर्षांचा आहे. आमच्या परंपरेनुसार ५ वर्षांनंतर त्याचे केस कापले जातील. असे सांगितल्यावरही कु. विष्णु याला शाळेत घेण्यात आले नाही.

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस घंटे सतर्क रहा ! - नूतन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे

     सांगली, १४ जून (वार्ता.) - जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे धंदे चालू असतील, त्या ठाण्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस घंटे सतर्क रहा, अशा सूचना सर्व अधिकार्‍यांना दिल्या आहेत, अशी माहिती सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांना दिली. 

इसिसचा प्रमुख बगदादी अमेरिकेच्या आक्रमणात ठार !

बराक ओबामांशी मैत्री करणारे केंद्रातील शासन अमेरिकेप्रमाणे 
पाकमधील जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात अशी कृती कधी करणार ? 
     रोम - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्याने उत्तर सीरियामधील रक्का शहराजवळ केलेल्या वायूदलाच्या कारवाईत इसिसचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. इराणी सरकारी माध्यमे आणि तुर्कस्तानमधील वृत्तसंस्थांनी इसिसच्या अल अमाक या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. रमझानच्या ५ व्या दिवशी तो ठार झाला.

सनातनच्या 'विकार-निर्मूलनासाठी विविध उपचार पद्धती' या ग्रंथमालिकेच्या निर्मितीकार्यात साहाय्याची आवश्यकता !

     आगामी भीषण आपत्काळाचे गांभीर्य ओळखून सनातन संस्था 'विकार-निर्मूलनासाठी विविध उपचार पद्धती' ही ग्रंथमालिका प्रकाशित करत आहे. या ग्रंथमालिकेत दैवी चिकित्सांचाही अंतर्भाव करण्यासाठी त्यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कावीळ, नागिण, पोटाचे विकार, वंध्यत्व, मूतखडा, विषबाधा आदी विकारांवर दैवी चिकित्सा, तसेच दैवी चिकित्सा करणारे यांविषयी माहिती असल्यास अवश्य कळवावे. यासाठी वैद्य मेघराज पराडकर यांना संपर्क करावा. 
संपर्क क्रमांक : ९४०४९५६०७४ 
email : sanatan.sanjeevani@gmail.com 

ग्रंथनिर्मितीच्या धर्मसेवेत सहभागी होऊन ईश्‍वरी कृपा मिळवा !

महिलांच्या चुकीच्या वेशभूषेमुळे इराणमधील नद्या कोरड्या पडत आहेत ! - मौलवीचा दावा

      तेहरान - महिलांच्या चुकीच्या वेशभूषेमुळे इराणमधल्या निसर्गावर त्याचा परिमाण होत असून नद्या कोरड्या पडत आहेत, असा दावा इस्लामिक रिपब्लिकचे ज्येष्ठ मौलवी सय्यद युसूफ तबाताबी नेजद यांनी केला आहे. 
      मौलवी पुढे म्हणाले की, दूरसंपर्क मंत्रालयाने हे सर्व प्रकार तातडीने रोखले पाहिजेत. आवश्यकता भासल्यास या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पोलीस बळाचाही वापर करायला हवा. (समाज अधर्माचरणी असेल, तर त्याचा परिणाम निसर्गावर होतो, असे हिंदु धर्मात म्हटले आहे ! - संपादक )

गोवा येथे होणार्‍या 'अखिल भारतीय हिंदु अधिवेशना'च्या निमित्त पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी झालेली प्रश्‍नोत्तरे

     पुणे येथे १३ जून २०१६ या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेले प्रश्‍न आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिलेली उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत. 

प्रश्‍न : आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांचा समाजाला थेट असा काय लाभ झाला आहे ? 
उत्तर : हिंदु अधिवेशनांच्या माध्यमातून देशभरातील हिंदूंचे प्रभावी संघटन उभे रहात असून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात स्थानिक ठिकाणी आंदोलने, सभा आदी माध्यमांतून आवाज उठवला जात आहे. या अधिवेशनांची फलनिष्पत्ती म्हणजे हिंदू त्यांच्यावर होणार्‍या आघातांविषयी जागृत होऊ लागले आहेत. ठिकठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा घेतल्या जात आहेत. अधिवेशनांमुळेच गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाला. बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या संदर्भात जेव्हा राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला, त्या वेळी बांगलादेशातील राजदूतांनी याची नोंद घेऊन हिंदूंच्या भावना तेथील शासनाला कळवल्या. लव्ह जिहादकडे पूर्वी केवळ प्रेमप्रकरण म्हणून पाहिले जात होते. अधिवेशनांच्या माध्यमातून झालेल्या जागृतीमुळे 'लव्ह जिहाद'कडे आता 'हिंदु धर्माच्या विरोधातील षड्यंत्र' म्हणून पाहिले जाऊ लागले. कृतीशील झालेल्या हिंदूंमुळे पांडववाडा (जि. जळगाव) सर्वसामान्यांसाठी खुला झाला. राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात झालेली जागृती म्हणजे सर्वसामान्य हिंदूंना झालेला लाभच आहे. 

पुणे येथे निदर्शने

कैराना, उत्तरप्रदेश येथून हिंदूंचे सातत्याने होणारे 
विस्थापन थांबावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती 
आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने पुणे येथे निदर्शने 

आंदोलनाचे स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, विधानभवन, पुणे. 
वार आणि दिनांक - बुधवार, १५ जून २०१६ 
वेळ - दुपारी ४ ते सायं. ६

हिंदु एकता विशेषांक

 दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
हिंदु एकता विशेषांक 

 प्रसिद्धी दिनांक : १९ जून २०१६, 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
१८ जूनला दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

चुकून भारतात आलेल्या पाकिस्तानी मुलांना भारतीय सैन्याने मिठाई देऊन परत पाठवले !

पाकने असे कधी केले असते का ? पाकच्या नागरिकांना भारतियांनी कितीही चांगली 
वागणूक दिली, तरी पाकने भारताशी सातत्याने कृतघ्नपणाच केला आहे.
     अमृतसर - येथील अजनालामध्ये पाकमधून चुकून आलेल्या तीन मुलांवर सीमा सुरक्षा दलाने कोणतीही कारवाई न करता मिठाई आणि भेटवस्तू देऊन पाकिस्तानमध्ये परत पाठवल्याची घटना समोर आली आहे. 
१. दुचाकीवरून नातेवाइकांकडे जाणारे आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अर्शद (वय १२) हे तिघे रस्ता चुकल्याने थेट सीमा ओलांडून भारतात आले. भारताच्या सीमेवर या तिघांना सीमा सुरक्षा दलाने कह्यात घेतले. चौकशीत ते चुकून भारतात आल्याचे लक्षात आले. भारताने याची माहिती पाक अधिकार्‍यांना दिली. 
२. कमांडर सी.पी. मीणा यांनी सांगितले की, रमजान चालू असल्याने आम्ही या मुलांना मिठाई आणि भेटवस्तूसुद्धा दिल्या. तसेच रमजानचा उपवास असल्याने त्यांनी काही खाल्ले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना जेवणाबरोबरच चॉकलेट्सही दिले. ही मुले पाकिस्तानमध्ये परत जातांना त्यांनी भारताविषयीच्या चांगल्या आठवणी घेऊन जाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न केले. 
३. पाकमधील फैसलाबादमध्ये रहाणारा आमिर म्हणाला की, मी भारतीय सैन्याने दिलेल्या वागणुकीमुळे भारावून गेलो आहे. ज्या सैनिकांनी आम्हाला पकडले त्यांनी जेवण तर दिलेच, तसेच काय हवे नको याची काळजीही घेतली. आमच्या सरकारनेही भारतियांबरोबर असेच वागायला हवेे.

काश्मिरी हिंदूंविना काश्मीर अपूर्ण आहे ! - मेहबूबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी क्षीरभवानी देवीची पूजा केली !
     श्रीनगर - काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीर खोर्‍यात कायमचे परत आणण्यासाठी त्यांच्या मनात विश्‍वास निर्माण करणे आवश्यक असून सध्याची स्थिती पहाता ते काश्मीरमध्ये राहू शकतील, अशी परिस्थिती नाही; मात्र काश्मिरी हिंदूंविना काश्मीर अपूर्ण आहे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. त्यांनी श्रीनगरपासून २५ किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध क्षीर(खीर)भवानी मंदिरात जाऊन देवीची पूजाही केली. पूजा संपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

२१ जूनच्या योगदिनी ॐ बंधनकारक करणे आणि काश्मीरचे होणारे 
इस्लामीकरण रोखणे यांसाठी देहलीत राष्ट्रीय हिंदू आंदोलन ! 
जंतरमंतर येथे आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
     नवी देहली - देहलीच्या जंतरमंतर येथे १२ जून या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी २१ जूनच्या योगदिनी ॐ उच्चारणे बंधनकारक करावे आणि काश्मीरचे होणारे इस्लामीकरण रोखावे, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाच्या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी खोट्या आरोपांतर्गत साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली. या वेळी वैदिक उपासना पीठ, अखंड भारत मोर्चा, भारत रक्षा मंच, योग वेदांत सेवा समिती, हिंदु डिफेंस लीग, सनातन संस्था, आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग होता.

उडुपी (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिदू आंदोलन !

उडुपी येथील आंदोलनात सहभागी
झालेले धर्माभिमानी
     उडुपी (कर्नाटक) - येथील बसस्थानकाजवळ १२ जूनला सकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्री. विजयकुमार यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. या आंदोलनात उडुपी येथील हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. दिनेश नायक, पेलत्तुरू महालिंगेश्‍वर देवस्थानाचे मुख्याधिकारी श्री. रमेश पेलत्तुरू यांच्यासह अनेक धर्माभिमानी, तसेच ११ जिज्ञासू स्वयंप्रेरणेने आंदोलनात सहभागी झाले होते. 
क्षणचित्रे
१. सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असूनही आंदोलनाला प्रारंभ होण्याच्या २० मिनिटे आधी पाऊस पूर्णपणे थांबला होता.
२. रस्त्यावरून जाणारे ८ पुरुष आणि ३ हितचिंतक महिला स्वयंप्रेरणेने आंदोलनात सहभागी झाल्या.

फलक प्रसिद्धीकरता

धूर्त चीनच्या २५० सैनिकांची घुसखोरी भारतीय सैन्याला अपमानास्पद नाही का ?
   चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या २५० सैनिकांनी ९ जून या दिवशी अरुणाचल प्रदेशमधील यांगस्ते येथे घुसखोरी केली. ते ३ घंट्यात माघारी फिरले. चीनने अनेकदा भारतीय सीमेत घुसखोरी केली असून तो अरुणाचलवर दावाही करत आलेला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 250 Chini sainikone 9 Juneko ArunachalPradeshke Yangasteme ghuspaith ki thi. Arunachalpar Chin dava karta raha hai.
Chinke davpench Bharat kab samjhega
जागो ! : २५० चीनी सैनिकों ने ९ जून को अरुणाचल प्रदेश के यांगस्ते में घुसपैठ की थी. अरुणाचल पर चीन दावा करता रहा है.
चीन के दांवपेंच भारत कब समझेगा ?

हिंदु संघटनांनी उद्देशपूर्तीसाठी समर्पित भावाने कार्य करण्याची आवश्यकता !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या 
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
श्री. सच्चिदानंद चतुर्वेदी, संपादक,
हिंदू रायटर्स फोरम
      रामनाथी, गोवा येथे ११ ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात पाटणा, बिहार येथील हिंदू रायटर्स फोरमचे संपादक श्री. सच्चिदानंद चतुर्वेदी यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु संघटनांच्या कार्याची दिशा ! या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच हिंदूंच्या 
रक्षणासाठीचा उपाय !
    आज आपण आपले अस्तित्व टिकवण्याच्या संकटातून जात आहोत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विचाराकडेच आपण हिंदूंच्या रक्षणासाठीचा उपाय म्हणून पाहिले पाहिजे. जगातील कोणतीही व्यक्ती किंवा समुदाय यांच्या जीवनात आपल्या अस्तित्वापेक्षा अधिक असा कोणताही इतर विचार असू शकत नाही आणि आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी संघर्षाहून अधिक दुसरे कुठले काम असू शकत नाही. एक काळ असा होता की, जेव्हा हिंदु समाज जगातील सर्वांत मोठ्या भूभागावर आपली संस्कृती आणि जीवनमूल्ये यांसह सुखाने जीवन व्यतीत करत होता.

भक्तीच्या बळावर समर्थ रामदासस्वामी यांना वाघिणीचे दूध आणून देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
समर्थ रामदासस्वामींनी त्यांच्या आजारावरील उपाय 
म्हणून वाघिणीचे दूध आणण्यास सांगितल्यावर छत्रपती 
शिवाजी महाराजांनी भक्तीच्या बळावर दूध आणून देणे
    छत्रपती शिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. समर्थ दर्शनार्थ कितीही कष्ट पडले, तरी त्याची खंत ते मानत नसत. 
      त्यांनी समर्थांचा पुष्कळ शोध घेतला. दिवस मावळला, तरी त्यांना त्यांच्या ठिकाणाचा शोध लागला नाही. शेवटी काही सेवकांसह ते मशाली घेऊन निघाले. घोर जंगल असल्यामुळे सेवकांची आणि त्यांची चुकामूक होऊन ते एकटेच फिरू लागले. इतक्यात एका गुहेतून जोरजोरात विव्हळण्याचा स्वर ऐकू आला. तो स्वर समर्थांचाच वाटल्याने ते त्या गुहेत शिरले.

हिदु जनजागृती समितीचा कोकण विभागाचा (मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांचा) एप्रिल २०१६ मधील प्रसारकार्याचा आढावा !

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी
     मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्माभिमान्यांना वैयक्तिक संपर्क, राष्ट्रपुरुषांची जयंती, नववर्ष आणि धार्मिक उत्सव या निमित्ताने केलेल्या प्रसारामुळे धर्मकार्य वाढण्यास साहाय्य झाले. या जिल्ह्यांचा एप्रिल २०१६ मधील धर्मकार्याचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. 
१. जिल्हा - मुंबई 
१ अ. अयोध्येत रामनवमीला पूजनाचा विशेष अधिकार मिळावा, यासाठी 
६९ धर्माभिमान्यांनी स्वाक्षरी चळवळ राबवून गोळा केल्या 
५० सहस्र स्वाक्षर्‍या !
      अयोध्येत रामनवमीला पूजनाचा विशेष अधिकार मिळावा, यासाठी मुंबईतील ६९ धर्माभिमान्यांनी हिंदूंची मोठ्या प्रमाणावर जागृती करत स्वाक्षरी चळवळ राबवली. ३० मार्च ते १४ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत ५० सहस्रांहून अधिक स्वाक्षर्‍या मिळवल्या, तसेच त्या संदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून असलेलेे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सादर केलेे. यामध्ये हिंदु धर्मजागृती सभा आणि धर्मशिक्षणवर्ग यांच्या माध्यमातून कृतीशील झालेल्या धर्माभिमान्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी १७ एप्रिलच्या दैनिक सनातन प्रभातच्या आतंकवादविरोधी विशेषांकासाठी प्रायोजक मिळवून १५ सहस्रांहून अधिक हिंदूंपर्यंत या अंकांचे वितरण केले. विविध संस्था, मंदिरे आणि घरोघरी जाऊन स्वाक्षर्‍या घेणार्‍या या धर्मप्रेमींचे प्रयत्न पुढे देत आहोत.

कर्नाटक राज्यामधील उत्तर कन्नड जिल्ह्याच्या शिरसी येथील सनातनच्या साधिका सौ. सुशीला रायकर यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. सुशीला रायकर (वय ६० वर्षे) (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना
६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. काशिनाथ प्रभु

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

श्री. अंजेश कणगलेकर यांना नामजप करतांना साधकाच्या मीपणाचा लय करण्याच्या संदर्भात ईश्‍वराने सुचवलेली प्रक्रिया

श्री. अंजेश कणगलेकर
१. शुद्धीकरण सत्संग झाल्यानंतर स्वतःतील मीपणाची जाणीव होणे : अनेक वर्षांपासून मला सकाळी लवकर उठून जप करण्याची इच्छा होती; पण पुष्कळ प्रयत्न करूनही ते जमत नव्हते. शुद्धीकरण सत्संग झाल्यानंतर जणू मला प्रतिदिन सकाळी उठायची सवय आहेच, अशी जाग येऊ लागली. देव कशी गंमत करतो ? माझी इच्छा होती ती ! त्यामध्ये मीपणा अधिक होता. आता शरणागत भावामुळे स्वेच्छा लयाला गेली आणि देवाची इच्छा कार्यरत होऊन प्रतिदिन पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळात जप करण्याची माझ्यात ओढ निर्माण झाली आणि देवाच्या कृपेमुळे ते होऊ लागले.
२. नामजप करतांना ईश्‍वराने साधकाच्या मीचा लय होण्याच्या संदर्भातील आठ टप्प्यांच्या शब्दांची शृंखला सुचवणे : नेहमीप्रमाणे ४.५.२०१४ या दिवशी मी जपाला बसलो होतो. प्रार्थना केली आणि जप चालू झाला. अकस्मात् मनात शब्दांचा पाऊस पडू लागला. लक्ष दिल्यावर जाणवले की, या शब्दात काहीतरी शृृृंंखलाबद्ध आहे. प्रयत्नपूर्वक शब्दांचा ओघ थांबवला आणि कागद-लेखणी घेतली. पुन्हा डोळे मिटून बसताक्षणी पहिल्या शब्दापासून ते शब्द पुन्हा प्रवाहित होऊ लागले. त्याचा क्रम पुढीलप्रमाणे होता.

परिपूर्ण सेवेचा आदर्श स्वतःच्या कृतीतून इतरांसमोर ठेवणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ... 
१. पार्सलमध्ये पदपथांवर लावायच्या कापडी फलकांसमवेत ते फलक बांधण्यासाठी लागणार्‍या सुतळीही ठेवणे : सांगलीत सनातन संस्थेचे कार्य वर्ष १९९३ नंतर चालू झाले. त्या काळात प्रसारासाठी कापडी फलक वापरले जायचे. त्यासाठी, तसेच प्रसारासाठी अन्य साहित्यही लागायचे. प.पू. डॉक्टर हे साहित्य मुंबईहून पाठवत असत. त्यांच्याकडून आलेले पार्सल परिपूर्ण असे, म्हणजे संबंधित साहित्य ज्या कारणासाठी वापरले जाणार आहे, त्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य त्या पार्सलमध्ये असायचे, उदा. पदपथांवर लावायच्या कापडी फलकांसमवेत ते फलक बांधण्यासाठी लागणार्‍या सुतळ्याही पार्सलमध्ये असायच्या.

गुरुसेवेची प्रचंड तळमळ असणारे आणि प्रेमाने साधकांची मने जिंकून आश्रम स्तरावरील स्वच्छता-सेवेचे कठीण दायित्व कुशलतेने निभावणारेे श्री. कुशल गुरव !

श्री. कुशल गुरव
१. नम्रता
      कुशलदादा काका, मला साहाय्य हवे आहे. तुम्ही करू शकता का ?, असे विचारतात. तेव्हा त्यांचे हे बोलणे ऐकूनच त्यांच्याप्रती प्रीती निर्माण होते.
२. हसतमुख राहून इतरांकडून सेवा करवून घेणे
      मला ते करत असलेल्या सेवेविषयी अल्प माहिती आहे. इतरांकडून सेवा करवून घेणे कठीण आहे, असे मला काही वेळा वाटते; परंतु कुशलदादा सतत हसतमुख राहून बोलतात आणि इतरांकडून सेवा करवून घेतात.
३. साधकांकडून सेवा करवून घेणे
३ अ. साधकांना न चिडता सेवेची आठवण करून देणे : काही साधकांना अनेक वेळा सेवेची आठवण करून द्यावी लागते, तरीही दादा न चिडता त्यांना सेवेची आठवण करून देतात. सेवा करण्याविषयी संबंधित साधकाला आठवण कशी करून द्यायची ?, ते मला दादांकडून शिकायला मिळाले.

प.पू. डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलतांना त्यांनी प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर अन्नपूर्णामातेचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगणे अन् त्याच रात्री महर्षींनीही सर्व साधकांना तशीच आज्ञा देणे

कु. कनकमहालक्ष्मी देवकर
       ८.५.२०१६ या दिवशी सकाळी मी प्रसाद (अल्पाहार) ग्रहण करतांना आणि ताटली-चमचा धुऊन पुसतांना प.पू. डॉक्टरांसमवेत सूक्ष्मातून बोलत होते. ते मला सूक्ष्मातून म्हणाले, देवाच्या कृपेने आपल्याला प्रसाद आणि महाप्रसाद मिळत आहे. त्यामुळे आपण अन्नपूर्णामातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. आजपासून आपण कृतज्ञता व्यक्त करूनच स्वयंपाकघरातून बाहेर पडूया. तेव्हा मी तसे केले; मात्र नंतर दुपारी आणि रात्री महाप्रसाद ग्रहण करतांना अन् ताट-वाटी पुसतांना माझे देवाशी अनुसंधान नव्हते अन् मी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. रात्री ९.४० वाजता विनुताताईने (सौ. विनुता शेट्टी यांनी) मला सांगितले, महर्षींनी सर्व साधकांना प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करायची आज्ञा दिली आहे. त्या वेळी मला दुपारी आणि रात्री अनुसंधानात नसल्याने कृतज्ञता व्यक्त करायला विसरले, असे आठवले.
       देवा, मला क्षमा कर. माझ्यातील स्वभावदोषांमुळे मी अनुसंधान टिकवून ठेवण्यात न्यून पडते, तरीही तू मला साहाय्य करत आहेस. त्यामुळे मी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. या प्रसंगातून अनुसंधान किती महत्त्वाचे आहे आणि या अनुसंधानामुळेच आपल्याला सर्वकाही कळणार आहे, हे तूच माझ्या लक्षात आणून दिले. या अज्ञानी जिवाला तू इथपर्यंत आणलेस, त्यासाठीही मी अनंत कोटी कृतज्ञ आहे !
- प.पू. गुरुदेवांच्या चरणधुळीतला एक कण होण्याचा प्रयत्न करणारी,
कु. कनकमहालक्ष्मी देवकर, भाग्यनगर, तेलंगणा. (८.५.२०१६)

एक साधिकेने स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने तिला झालेले लाभ !

१. मुलीकडून असलेल्या अनेक 
अपेक्षांमुळे कित्येक दिवस घुसमट होणे आणि 
संतांच्या सत्संगामुळे मनाला पुष्कळ शांतता मिळणे
        माझी इतरांकडून असलेल्या अनेक अपेक्षांमुळे कित्येक दिवस घुसमट होत होती. मी मुलीसमवेत रहात असूनही माझी ही स्थिती होती आणि माझ्या या स्थितीला मी मुलीला उत्तरदायी ठरवत होते. एके दिवशी एका संतांना भेटून मी माझ्या मनाची स्थिती सांगितली आणि त्यांना म्हणाले, माझ्या मनात आश्रमात रहाण्याचा विचार येत आहे. मी कुठल्याही आश्रमात जायला सिद्ध आहे. तेव्हा संतांनी सर्व ऐकून घेतले आणि मला म्हणाले, तुम्ही घरातील प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाण्यास शिका. तुम्ही आश्रमात रहायला येऊ शकता; पण तुमच्यातील स्वभावदोषांमुळे आश्रमात रहायला आल्यावरही तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यांनी असे सांगितल्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ शांतता मिळाली.

हिंदु धर्मजागृती सभेत एका धर्माभिमान्याने विचारलेल्या द्रौपदीला पाच पती कसे होते, या प्रश्‍नाचे गुरुकृपेने धर्मशास्त्रसुसंगत उत्तर देता येणे

श्री. व्यंकटेश अय्यांगार
        कर्नाटक राज्यातील एका धर्मजागृती सभेत एका धर्माभिमान्याने मला एक प्रश्‍न विचारला, द्रौपदीला पाच पती होते आणि तुम्ही म्हणता की, हिंदु धर्म महान आहे. मग तुम्ही याचे समर्थन कसे करता ? क्षणभर मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली, आता तुम्हीच या प्रश्‍नाचे उत्तर द्या. त्यानंतर माझ्याकडून त्या प्रश्‍नाचे पुढीलप्रमाणे उत्तर दिले गेले. तुम्ही पाच पांडवांना एकमेकांपासून निराळे समजले आहे; पण प्रत्यक्षात ते निराळे नाहीत. पांडव हे पंचभौतिक तत्त्वांचे प्रतीक आहेत.
१. धर्मराज : आकाशतत्त्व
२. भीमसेन : वायुतत्त्व
३. अर्जुन : अग्नितत्त्व
४. सहदेव : आपतत्त्व
५. नकुल : पृथ्वीतत्त्व

प्रार्थनेचे सिद्ध झालेले बुद्धीअगम्य सामर्थ्य !

        एक व्यक्ती सतत चिंतित असायची. त्याच्या एका मित्राने त्याला सुचवले की, कर्म करण्याबरोबर प्रार्थनाही कर. तो मित्र प्रतिदिन प्रार्थना करायचा. तो म्हणायचा, माझ्याकडे पुष्कळ समस्या आहेत; परंतु मी प्रार्थना करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यास सक्षम आहे.
१. चिकित्सातज्ञ डॉक्टर लॅरी डॉसन यांनी १३० 
प्रसंगांचे अध्ययन करून प्रार्थना केल्यावर निश्‍चितपणे 
काही अद्भुत परिणाम दिसतात हा निष्कर्ष काढणे
        चिकित्सातज्ञ डॉक्टर लॅरी डॉसन यांनी प्रार्थना या विषयावर हिलिंग वड्र्र्स - द पॉवर ऑफ प्रेयर अ‍ॅण्ड द प्रॅक्टिस ऑफ मेडीसिन हे अतिशय सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्यांनी वरील उदाहरणाप्रमाणे १३० प्रसंगांचे अध्ययन करून सांगितले आहे की, प्रयोगशाळेत नियंत्रित परिस्थितीत प्रार्थना केल्यावर निश्‍चितपणे काही अद्भुत परिणाम दिसतात. डॉ. डॉसन सांगतात की, प्रार्थना केल्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास न्यून झाले कि नाही, याची जाणीव होते. ईश्‍वरी कृपेने शारीरिक त्रास न्यून होतात; परंतु एखाद्या वेळी प्रार्थना करूनही शारीरिक त्रास उणावला नाही, तरीही हा त्रास स्वीकारण्याची शक्ती व्यक्तीला मिळालेली असते.

नामजप आणि उपाय नियमित करणारी अन् सेवेची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोपरगाव येथील कु. ईश्‍वरी राजेश तांबे (वय ६ वर्षे) !

कु. ईश्‍वरी तांबे
        कोपरगाव येथील कु. ईश्‍वरी राजेश तांबे हिच्या आई-वडिलांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
       गर्भारपणात मी रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणत असे. मी दिवसभर नामजप करत असे आणि भजने ऐकत असे. त्यामुळे मला उत्साही वाटायचे. याचा गर्भावर चांगला परिणाम होऊन गर्भाची हालचाल जाणवायची. मी गरोदरपणी २ धर्मजागृती सभांना गेले होते. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळाला. धर्मजागृती सभेतील भाषण ऐकतांना गर्भही ते भाषण ऐकत आहे, असे वाटायचे, तसेच गरोदरपणी पंढरपूरला माहेरी गेल्यावर मला विठ्ठलाच्या मंदिरात जावेसे वाटायचे.
       मी आपले मूल जन्मापूर्वी या ग्रंथात दिल्याप्रमाणे गर्भावर संस्कार केलेे.
२. जन्म ते ३ वर्ष
२ अ. प्रत्येक प्रसंगाशी जुळवून घेणे : कु. ईश्‍वरी ४ मासांची (महिन्यांची) झाल्यावर मी महाविद्यालयात चाकरीसाठी जाऊ लागले. ती तिच्या आजीजवळ रहायची. तेव्हा ती आजीला कोणताही त्रास देत नसे. तिला लहानपणापासून प्रत्येक प्रसंगाशी जुळवून घेण्याची सवय आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीविष्णु यांच्याविषयी प्रत्येकी दोन दिवसांच्या अंतराने कु. सुप्रिया जठार यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. २.५.२०१६ या दिवशी मला आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवू लागले. थोड्या वेळाने त्यांच्या ठिकाणी शंख, चक्र, गदा आणि पद्म (कमळ) धारण केलेला श्रीविष्णु असल्याचे स्पष्टपणे जाणवले.
२. दोन दिवसांनी काही कारणास्तव मी आश्रमातील कला मंदिरात गेले. तेथे उभ्या अवस्थेतील श्रीविष्णूचे चित्र आहे. मी त्याकडे आकर्षिले गेले. तेव्हा श्रीविष्णु मला त्या दिवशी तो मीच होतो, असे सांगत असल्याचे जाणवले.
३. नंतर दोन दिवसांनी एक सूक्ष्म-चित्रासंबंधी इंग्रजी लिखाण भाषांतरासाठी माझ्याकडे आले, तेही श्रीविष्णूचेच होते.
       गुरुमाऊली, वरील गोष्टी योगायोग नसून हे ईश्‍वरी नियोजन होते, असे मला वाटते. तेव्हापासून माझ्या डोळ्यांसमोर श्रीविष्णूचेच रूप असते. माझ्याकडून होणार्‍या प्रार्थना, कृतज्ञता, आत्मनिवेदन सर्वकाही श्रीविष्णूलाच केले जाते. माझ्याकडून श्रीविष्णूला विष्णुमाऊली असे म्हटले जात आहे.
       गुरुमाऊली, मला काही कळत नाही. आपणच मार्गदर्शन करावे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
- कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०१६)
श्री. राम होनप
       माणूस देव आणि धर्म यांना वश झाल्यास (अनुसंधानात राहिल्यास) अन्य वशीकरणाला तो वश होत नाही. (बळी पडत नाही.) - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०१६)

पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांचा भोळा भाव !

      एकदा पू. काकांच्या पायाला एकाच ठिकाणी दोन वेळा ठेच लागली होती. त्या वेळी आम्ही पू. काकांना म्हटले, पू. काका आपण पायाला लाल दोरा बांधूया का ? परत लागणार नाही. पू. काकांनी लगेच पायाला लाल धागा विभूती लावून बांधला. प्रत्यक्षात पू. काकांना आम्ही सांगितलेल्या उपायांची काहीच आवश्यकता नसतांनाही पू. काकांनी तो उपाय तत्परतेने आणि भोळ्या भावाने केला.
- कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.५.२०१६)

साधकांनो, चुका सांगणार्‍या साधकांप्रती कृतज्ञताभाव वाढवा आणि मनात येणार्‍या अयोग्य विचारांवर मात करा !

पू. (कु.) स्वाती खाडये
       बर्‍याच वेळा व्यष्टी आढावे, कार्यबैठका, सत्संग आदींच्या माध्यमातून साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्यात येते. या चुका सांगण्यामागे साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन साधकांना साधनेत साहाय्य व्हावे, हा एकमेव हेतू असतो; परंतु बर्‍याचदा साधकांच्या मनात चुका सांगणार्‍यांविषयी अयोग्य प्रतिक्रिया निर्माण होतात अथवा नकारात्मक विचारप्रक्रिया होत असते. मनात निर्माण होणार्‍या असे अयोग्य विचार आणि प्रतिक्रिया यांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनांच्या सोबतीला चुका सांगणार्‍या साधकाचा त्यामागील उद्देश समजून घेऊन भावाची जोड दिल्यास योग्य उपाययोजना काढण्यास साहाय्य होईल. या अनुषंगाने साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. दायित्व असलेल्या साधकांना आपली क्षमता ठाऊक असते. आपण आपल्या क्षमतेनुसार करत आहोत अथवा नाही, हे ते आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. त्यामुळे ते आपल्याला साधनेत पुढे जाण्यासाठी आपली क्षमता वापरण्याच्या दृष्टीने चुका सांगून साहाय्य करत असतात.
२. ज्यांच्याकडून पालट करण्याची, सुधारणा करण्याची अपेक्षा असते, त्यांनाच चुका सांगितल्या जातात.

जळगाव येथील दैनिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. नंदा देवगडे यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. नंदा देवगडे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव
   जळगाव, १४ जून (वार्ता.) - येथील दैनिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. नंदा देवगडे यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे आनंददायी वृत्त पू. नंदकुमार जाधव यांनी येथील भावसोहळ्यात घोषित केले. या वेळी सौ. देवगडेआजी आणि श्री. देवगडेआजोबा यांची भावजागृती झाली.
पातळी घोषित झाल्यावर प.पू. डॉक्टरांचे माझ्याकडे लक्ष असल्याचे समजले ! - सौ. देवगडेआजी
   मनोगत व्यक्त करतांना सौ. देवगडेआजी म्हणाल्या, मी काहीच केले नाही, तरी माझी आध्यात्मिक उन्नती कशी झाली ? मला वाटायचे माझ्याकडे प.पू. डॉक्टरांचे लक्ष आहे कि नाही ? आता लक्षात आले की, त्यांचे माझ्याकडे लक्ष आहे. मला आध्यात्मिक उन्नती इत्यादी वगैरे काही समजत नाही.
    सौ. देवगडेआजींची पातळी घोषित झाल्यावर देवगडेआजोबांनी सद्गदित होऊन पू. जाधवकाकांची गळाभेट घेतली. आजोबा म्हणाले, मला काही बोलता येत नाही; पण आनंद झाला. सर्व प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच झाले.

प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणार्‍या आणि श्रीकृष्णावर निस्सीम भक्ती असणार्‍या जळगाव येथील सौ. नंदा देवगडेआजी (वय ७८ वर्षे) !

    ऑगस्ट २०१५ मध्ये मी प.पू. पांडे महाराज यांच्या मेहुण्याच्या पत्नी (भावजय) आणि दैनिक सनातन प्रभातच्या नियमित वाचक असलेल्या जळगाव येथील सौ. नंदा देवगडेआजींच्या (वय ७८ वर्षे) घरी गेले होते. त्यांच्याशी बोलतांना त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्येे आणि त्यांना आलेले अनुभव पुढे देत आहे.
१. प.पू. पांडे महाराजांनी सांगितल्यानुसार साधनेला आरंभ करणे : साधनेविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या, मला साधनेविषयी काहीही ठाऊक नव्हते. नेहमी पूजाअर्चा करणे आणि नैमित्तिक कर्मकांड एवढेच करत होते. प.पू. पांडे महाराजांनी मला नामजप करायला आणि दैनिक सनातन प्रभात वाचायला सांगितले. तेव्हापासून मी नामजप करू लागले आणि दैनिक वाचते अन् मला यातून पुष्कळ आनंद मिळतो. 
२. वैयक्तिक अडचणींमुळे जळगाव आश्रमात रहाणे शक्य नसल्याची खंत वाटणे; पण ती परिस्थिती आनंदाने स्वीकारून नामजपाकडे लक्ष देणे : आजी म्हणाल्या, मला जळगावच्या आश्रमात रहाण्याची तीव्र इच्छा आहे. आश्रमातच आपला अंत व्हावा, असेही वाटते. माझी पायदुखी आणि घरी हे (पती) एकटे रहात असल्याने घरी रहावे लागते. आश्रमात रहाणे शक्य नाही; म्हणून मला कधीकधी रडायलाही येते; पण देवाने जेथे ठेवले आहे, तेथे आनंदाने रहायचे आणि आश्रमात रहाणे आपल्या नशिबात नाही, असा विचार करते अन् नामजपाकडे अधिक लक्ष देते.

देवाप्रती भोळा भाव असणार्‍या आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. जयमाला पडवळकाकू !

सौ. जयमाला पडवळ
       देवद आश्रमातील धान्य विभागात सौ. पडवळकाकू सेवा करतात. एक दिवस त्या मला नमस्कार करू लागल्या; म्हणून मी त्यांना म्हणाले, काय हो, तुमच्याकडे आनंदाची बातमी दिसते. त्यावर काकू हो म्हणाल्या. त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ प्रतिशत झाल्याचे घोषित केले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. मी आणि पडवळकाकू मालखरेआजींकडे एकत्र रहातो. काकूंकडून जेवढे गुण घ्यावेत, तेवढे थोडे आहे. काकूंमधे भोळा भाव आहे आणि त्या प्रेमळ आहेत. मला त्यांचा सहवास कायम मिळो, अशी मी श्रीकृष्णचरणी प्रार्थना करते.
- सौ. सुलोचना जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.४.२०१६)

कृष्णच सर्व काही करत असल्याने सगळे काही कृष्णमय आहे - प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज
        ५.१०.२०१५ या दिवशी मी प.पू. पांडे महाराजांच्या सेवेसाठी गेलो असतांना यज्ञेशदादा (श्री. यज्ञेश सावंत) तेथे आला. त्या वेळी प.पू. पांडे महाराज आणि यज्ञेशदादा यांच्यात पुढील संभाषण झाले.
साधक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील विधी व्यवस्थित झाल्याचे श्रेय प.पू. पांडे महाराजांना देत असतांना त्यांनी देवच सर्व करत असतांना दुसर्‍याचे कौतुक न करता देवानेच केले, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे सांगणे
प.पू. पांडे महाराज : सर्व विधी व्यवस्थित झाले का ? (यज्ञेशदादा काही विधी करण्यासाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे गेला होता.)
यज्ञेशदादा : आपल्या कृपेने सर्व विधी व्यवस्थित झाले.
प.पू. पांडे महाराज : मी काय केले; म्हणून तू मला मधे घेत आहेस. मी काहीच केले नाही.
यज्ञेशदादा : होय बाबा. तुमच्यामुळेच झाले.
प.पू. पांडे महाराज : अरे, देव आहे ना ! त्यानेच सर्व केले. सर्व काही देवाने केले असतांना तू मी केले, असे का म्हणतोस? त्यामुळे देव म्हणेल, अरे, मी केले आणि हा दुसर्‍याचे कौतुक करतोय !, असे आपण उगाचच दुसर्‍याचे कौतुक केले, तर त्याचे आपल्याला पाप लागते; म्हणून सतत देवाने केले. देवच करतो, असे म्हणायचे. सतत कृष्णाचेच कौतुक करायचे; कारण तेच सत्य आहे. देवच करत असतो; म्हणून कृष्णाने केले. कृष्णच करतो. सगळे काही कृष्णमय आहे, असा विचार सतत करावा आणि त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.
- श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१०.२०१५)

प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाच्या निमित्ताने केलेल्या विविध यागांच्या वेळी ठेवलेल्या ४ यंत्रांच्या संदर्भात आलेली प्रचीती

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१. प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाच्या निमित्ताने केलेल्या विविध यागांच्या वेळी देवतास्थापनेच्या स्थानी ठेवलेली ४ यंत्रे त्या यागांच्या शक्तीने भारित झाली असल्याने महर्षींनी त्यांतील एकेक यंत्र ध्यानमंदिर, प.पू. डॉक्टरांची खोली, पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेली खोली आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ रहात असलेली खोली येथे ठेवण्यास सांगणे : २९.५.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी अमृतमहोत्सवी (७५ व्या) वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या आदल्या दिवसापासून प.पू. डॉक्टरांसाठी सुदर्शन याग, नवग्रह याग आणि आयुष्यवृद्धीसाठी होम करण्यात आला. यांसाठी केलेल्या देवतास्थापनेमध्ये ठेवण्यासाठी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी पितळेच्या पत्र्यावर यंत्राचा ठसा उमटवलेली ४ यंत्रे आणली होती. त्याप्रमाणे ती तेथे ठेवण्यात आली. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी नंतर सांगितले, झालेल्या यागांची सर्व शक्ती त्या यंत्रांमध्ये आली आहे. महर्षींच्या आदेशाप्रमाणे त्यांतील एकेक यंत्र आश्रमाच्या ध्यानमंदिरात, प.पू. डॉक्टरांच्या खोलीत, पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या खोलीत आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ रहात असलेल्या खोलीत ठेवायची आहेत. त्या यंत्रांची नावे ते नंतर सांगणार आहेत.

बसलो आम्ही प.पू. डॉक्टरांच्या हृदयात !

श्री. अशोक कुलकर्णी
बसलो आम्ही प.पू. डॉक्टरांच्या हृदयात ।
शांत वाटत आहे आत ॥
वैकुंठच वसला आहे त्यात ।
काय वर्णन करू गुरुराया, हे तर शब्दापलीकडले ॥ १ ॥
हृदयात आहे या, भगवान श्रीकृष्णाचा वास ।
विश्‍वातील सर्व सूत्रे चालतात येथूनच ॥
ठरत आहे कलियुगातील रणनीती ।
आहेत सोबत भगवान शंकर आणि ब्रह्मदेव ॥ २ ॥
बालपणीच्या आठवणी भगवान श्रीकृष्णाच्या ।
दिसत आहेत हृदयात या ॥
होत आहे भावजागृती ।
पाहूनी सौख्य श्रीहरीचे ॥ ३ ॥
प.पू. डॉक्टर याच अवस्थेत ठेवावे आम्हाला ।

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता !
    सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५२००१२०३ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
   मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
संप्रदायात न अडकता हिंदु धर्म आणि राष्ट्र 
यांचा व्यापक विचार करणे आवश्यक
   भारतातील अनेक हिंदू आज विविध संप्रदायांमध्ये अडकलेले आहेत. वैद्यकीय शास्त्रानुसार जसे सर्वांना अनेक रोगांसाठी एकच औषध देता येत नाही, तसेच संप्रदायात सर्वांसाठी एकच साधना सांगितल्यास त्यांना पुरेसा लाभ होत नाही. यासाठी संप्रदायात न अडकता हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचा व्यापक विचार करून कार्य केले पाहिजे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक

    मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत 
त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


चीनची आगळीकता कि भारताची सहनशीलता ?

संपादकीय 
       चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तब्बल २५० सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील कामेंग जिल्ह्यातील यांगस्ते येथे घुसखोरी केल्याचे उघड झाले. त्यांना हाकलायला भारतीय सैन्याला ३ घंट्यांहून अधिक काळ लागला. शत्रूराष्ट्राचे सैन्य देशात घुसखोरी करून ३ घंट्यांहून अधिक काळ तळ ठोकून रहाते, यावरून त्यांची सिद्धता किती आहे, हे स्पष्ट होते. अरुणाचलप्रदेशमध्ये घुसखोरी करण्याची चीनची जशी ही पहिली वेळ नाही, तशी भारत शासनाने ही घुसखोरी सहन करण्याचीही पहिली वेळ नाही. गेल्या दोन वर्षांत चिनी सैनिकांनी लडाख सीमेचे दोन वेळा उल्लंघन केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn