Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

महर्षि याज्ञवाल्क्य यांची आज जयंती

मलेशियातील २ मंदिरांवर एकाच आठवड्यात आक्रमणे !

  • बांगलादेशप्रमाणे आता मलेशियातील हिंदूंनीही बहुसंख्य हिंदूंचा देश असणार्‍या भारताच्या पंतप्रधानांकडे सुरक्षेची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यात आल्यावर अन्य धर्मियांचे काय होणार ?, असा प्रश्‍न विचारणारे कधी इस्लामी राष्ट्रांत हिंदूंचे आणि त्यांच्या धर्मस्थळांचे काय होत आहे, याकडे लक्ष का देत नाहीत आणि त्यावर तोंड का उघडत नाहीत ?
    पेनांग (मलेशिया) - येथील पेनांटी इस्टेट, अरा कुडा येथे असलेल्या श्री धर्म मुनिशेश्‍वर मंदिरावर १० जूनला मध्यरात्री धर्मांधांनी आक्रमण करून मंदिराची विटंबना केली. गेल्याच आठवड्यात येथून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुथूमरीयाम्मा मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण केले होते. आताच्या घटनेत धर्मांधांनी एका मोठ्या दगडाने देवतांच्या मूर्ती फोडल्या. या दोन्ही मंदिरांचे व्यवस्थापन एकच समिती पहाते.
   पोलिसांनी दोन्ही घटनांची दखल घेतली असून अन्वेषण चालू आहे, असे सांगितले. तसेच पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. पेनांग प्रांताचे उपमुख्यमंत्री पी. रामसामी यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. ४ जून या दिवशी मुथूमरीयाम्मा मंदिरावर झालेल्या आक्रमणात २ मूर्ती भंग झाल्या होत्या. या मूर्तींचे पुनर्निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री लिम गूआन इंग यांनी १ लक्ष ६० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याचे मान्य केले आहे.

बालभारतीच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्‍या आणि अन्य गंभीर चुका करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा ! - हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

सातारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील मागणी 
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
       सातारा, १३ जून (वार्ता.) - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे. पुस्तकातील नकाशात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा पाण्याच्या खाली दाखवण्यात आली आहे, तसेच भारताची राजधानी देहली ज्या यमुना नदीच्या काठावर वसली आहे, त्या तिरावर न दाखवता तिच्या विरुद्ध तीरावर दाखवण्यात आली आहे. अशा विकृत नकाशांमुळे विद्यार्थ्यांपर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचत आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय मानचित्रांचा अवमान होऊन जनतेच्या राष्ट्रभावना दुखावल्या गेल्या आहेत. हा प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये असे चुकीचे नकाशे आणि माहिती अंतर्भूत करून राष्ट्राचा अवमान करणारे शिक्षणतज्ञ, त्याला संमती देणारे अशा सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच सुधारित पुस्तक विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित करण्यात यावे. या सुधारित आवृत्तीचा व्यय दोषींकडून वसूल करावा, अशी मागणी सातारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.

हिंदुत्वनिष्ठांनो, खोटे पुरावे निर्माण करून हिंदुत्वाला, म्हणजे सनातनला दडपणार्‍या अन्वेषण यंत्रणांपासून सावधान !

    सनातनचे साधक डॉ. विरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेचा आणि त्यानंतरच्या चौकशीचा वृत्तांत विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहे. यात वरिष्ठांनी प्रोजेक्ट दाभोलकर उपक्रमावर डॉ. तावडे यांची नियुक्ती केली होती, डॉ. तावडे यांनी शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी काही जणांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, डॉ. तावडे डॉ. दाभोलकरांच्या विरोधात बोलले होते, डॉ. तावडे यांना हिंदु राष्ट्रासाठी १५००० जणांचे सैन्य उभारायचे होते आदी माहिती अन्वेषण यंत्रणांना प्राप्त झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. खर्‍या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येत नसेल, तर खोटे पुरावे निर्माण करून निरपराध नागरिकांना अडवण्यात अन्वेषण यंत्रणा वाक्बगार असतात, हे आतापर्यंत अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. तसेच या प्रकरणातही झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांमधून सनातनच्या अधिकाधिक निष्पाप साधकांना अडकवण्याचा अन्वेषण यंत्रणांचा हेतू स्पष्ट होतो. त्यासाठी -
१. इ-मेलमधील मजकूर हस्ताक्षरासारखा नसतो. अन्वेषण यंत्रणांकडे असलेल्या व्यवस्थेद्वारे ते कोणाचाही इ-मेल कुठेही उघडू शकतात. त्याचा वापर करून हवे तसे पुरावे निर्माण करू शकतात, तसेच निरपराधीत्व सिद्ध करणारे इ-मेल नष्ट करू शकतात.
२. अन्वेषण यंत्रणा कोणाही अनोळखी व्यक्तीला उभे करू शकतात. त्यांच्यावर दबाव आणून वा पैसे देऊन डॉ. तावडे माझ्याकडे आले होते. त्यांनी माझ्याकडे शस्त्रांची मागणी केली, ते हिंसक कारवायांचे नियोजन करत असतांना मी पाहिले, त्या दिवशी ते त्या शहरात होते आदि न घडलेले प्रसंग वदवून पुरावा निर्माण करू शकतात.
३. इ-मेलमधील एखाद्या सरळ संभाषणाचा स्वत:ला हवा तसा अर्थ काढून तो न्यायालयासमोर सादर करू शकतात.

काळा पैसा आणण्यासाठी केंद्रसरकार पावले उचलत नसल्याने देशातील नागरिक असंतुष्ट ! - योगऋषी रामदेवबाबा

    चंडीगड - काळ्या पैशाच्या सूत्रावर केंद्र सरकार प्रभावी पावले उचलत नसल्याने देशातील नागरिक असंतुष्ट आहेत, अशी टीका योगऋषी रामदेवबाबा यांनी केली आहे.

सनातनचे साधक डॉ. तावडे यांना अटक हा हिंदुत्ववादी संघटनांना दाबण्याचा प्रयत्न ! - श्री. अर्जुन खोतकर, आमदार, शिवसेना, जालना

शिवसेना आणि काही हिंदुत्वनिष्ठ वगळता अन्य पक्ष अन् संघटना 
यांचा एक तरी हिंदुत्ववादी नेता हिंदूंची बाजू घेतो का ?
    जालना - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनचे साधक डॉ. तावडे यांना अटक केल्याच्या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करतांना शिवसेनेचे नेते आणि आमदार श्री. अर्जुन खोतकर म्हणाले, हा हिंदुत्ववादी संघटनांना दाबण्याचा प्रयत्न आहे. आम्ही कुणाची बाजू घेत नाही. कुणी दोषी असेल, त्यांना अवश्य शिक्षा व्हावी; परंतु अशा पद्धतीने हिंदुत्ववाद्यांना विनाकरण त्रास देण्याचा प्रकार आहे.

राणी लक्ष्मीबाईंच्या बलीदानदिनानिमित्त धुळे येथे हिंदु जनजागृती समितीकडून मानवंदना

राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना कु. रागेश्री देशपांडे
        धुळे - आज रणरागिणी झाशीच्या राणीच्या बलीदान दिनानिमित्ताने धुळे येथील झाशी राणी लक्ष्मीबाई चौक येथे सर्व धर्माभिमानी युवती आणि युवक यांनी एकत्र येऊन राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना दिल्या. या वेळी राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरुद्ध रणांगणांवर जो पराक्रम गाजवला, त्याचे स्मरण आज करून देण्यात आले. या वेळी राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुढील काळात हिंदु राष्ट्र स्थापनेपर्यंत राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज राहू. अखेरच्या श्‍वासापर्यंत तन-मन-धन आणि प्रसंगी प्राणही अर्पण करू. धर्मरक्षणाच्या या कार्यातून कधीही माघार घेणार नाही. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू, अशी शपथ सर्व युवक आणि युवती यांनी घेतली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी तेजश्री गायकवाड, पूजा गायकवाड, रूपाली वाडेकर, हर्षदा गायकवाड, शुभांगी परदेशी, रूपाली राठोड, राणी राठोड, सर्वश्री सागर वाडेकर, सुशील अहिरराव, किरण राजपूत, हेमंत थोरात, रोहित वानखेडे, दर्शन गायकवाड, विलास राजपूत, पंकज बागुल हे उपस्थित होते.

चोपडा (जळगाव) येथे गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक गोरक्षक विद्यार्थ्यांनी पकडला !

  • २९ जनावरे मृत झाल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवला !
  • पोलिसांकडून लाठीमार
  • संतप्त जमावाची पोलिसांवर दगडफेक !
ट्रकमधून काढलेला मृत गोवंश
गोवंशियांच्या रक्षणासाठी पोलीस स्वतः कृती करत नाहीत, उलट गोरक्षकांवरच लाठीमार करतात.
पोलिसांच्या अशा वर्तनामुळे जनता संतप्त होत असेल, तर त्याला सर्वस्वी पोलीस उत्तरदायी आहेत !
   चोपडा - गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चोपडा-यावल रस्त्यावरील हॉटेल योगीजवळ अडवला. (गोवंशियांच्या अवैध वाहतुकीविषयी दक्ष राहून त्याविषयी कृती करणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! - संपादक) या ट्रकमध्ये दाटीवाटीने कोंबल्यामुळे २९ जनावरे मृत झाल्याचे आढळले. ही घटना कळल्यावर घटनास्थळी हिंदु संघटनांचे पदाधिकारी, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते आणि सहस्रो नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने तणावाची परिस्थिती झाली. यामुळे पोलिसांनी पाच वेळा जमावावर लाठीमार केला, तर संतप्त जमावानेसुद्धा पोलिसांवर दगडफेक करून ट्रक पेटवून धर्मांध वाहनचालकास मारहाण केली.
संतप्त जमावाने पेटवलेला ट्रक
    धरणगावकडून यावलकडे जाणारा ट्रकमध्ये (क्र. एम्.पी.एच्.एस्. १३२७) काही गायी आणि बैल मृत्यूमुखी पडल्याने या ट्रकमधून दुर्गंधी येत होती. हा ट्रक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हतनुर पाटचारी ते हॉटेल योगीपर्यंत पाठलाग करून अडवला. या ट्रकमध्ये २९ मृत, तर ११ जिवंत जनावरे सापडली. याविषयी कळल्यावर मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. ट्रकमध्ये पुढील बाजूस जय श्रीराम, हनुमानाचे चित्र, तसेच खाली जय श्रीकृष्ण असे लिहिलेले होते. या वेळी जमावाने गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी पोलिसांना जमाव पांगवण्याचे आदेश दिल्याने जमाव अधिक संतप्त झाला आणि दगडफेक झाली. या दगडफेकीत सहपोलीस निरीक्षक आर्.एन्. पवार, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, चोपडा शहराचे साहाय्यक फौजदार वसंत चव्हाण, किरण पाटील हे घायाळ झाले. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचार्‍याला जमावाने चारही बाजूंनी घेरून मारहाण केली. वाहतुकीत घायाळ झालेल्या गुरांवर उपचार करण्यात आले, तसेच आरोग्य निरीक्षक राजेंद्र बाविस्कर यांनी मृत गुरांचे दफन केले.

उत्तेजक सेवनामुळे बंदी असलेली टेनिसपटू मारिया शारापोवा हिच्यावर गोव्यातील इयत्ता ९ वीच्या पाठ्यपुस्तकात धडा !

धडा त्वरित काढून टाकण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी ! 
     पणजी - प्रतिबंधित उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालण्यात आलेल्या रशियाच्या टेनिस खेळाडू मारिया शारापोवा हिच्यावर गोवा राज्यातील इयत्ता ९ वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात धडा आहे. असे अवैध कृत्य करणार्‍या खेळाडूंवर आधारित धड्यामुळे मुलांपुढे चुकीचा आदर्श ठेवला जात आहे. त्यामुळे हा धडा या पाठ्यपुस्तकातून त्वरित वगळावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या विषयी समितीच्या वतीने शिक्षण खात्याला निवेदन दिले जाणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी सांगितले.

(म्हणे) गोव्याच्या नकाशावर मद्य आणि कॅसिनो यांना स्थान !

गोमंतकियांनो, ही स्थाने; नव्हे कलंक नष्ट करून गोमंतकाला भोगभूमी बनण्यापासून वाचवा !
गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडून परशुरामभूमी गोमंतकाचा अवमान !
     पणजी - गोव्याच्या पर्यटन नकाशावर मद्य आणि कॅसिनो यांनाही स्थान आहे, तसेच कॅसिनो व्यवसायामुळे राज्याला महसूल प्राप्त होत आहे, असे मत गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त केले आहे. (मद्य आणि कॅसिनो यांना आताच्या राजकारण्यांमुळे स्थान प्राप्त झाले आहे. ते स्थान नव्हे, तर तो देवभूमी गोमंतकाला लागलेला कलंक आहे ! यापूर्वी जेव्हा गोव्यात मद्य आणि कॅसिनो नव्हते, तेव्हा लोक रहात नव्हते का ? आता महसूलाच्या प्रेमापोटी नव्हे, तर उद्योजकांच्या हितसंबंधांमुळे कॅसिनोशिवाय गोव्याची अर्थव्यवस्था चालू शकत नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे ! - संपादक)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गोवा येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन !

डावीकडून सर्वश्री विजय गावडे, सुनील घनवट (बोलतांना), शंभू गवारे आणि प्रवीण नाईक
  • १९ जूनपासून प्रारंभ !
  • देश-विदेशातील ४१५ हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित रहाणार !

किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) येथे दैनिक सनातन प्रभातचे वयोवृद्ध वितरक शशिकांत जोशी यांच्यावर समाजकंटकांकडून प्राणघातक आक्रमण !

श्री. शशिकांत जोशी
सात महिन्यांत दैनिक सनातन प्रभातच्या वितरकांवर
 सांगली जिल्ह्यात जीवघेणे आक्रमण होण्याची दुसरी घटना !
  • राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करणार्‍या सनातन प्रभातच्या वितरकांवर आक्रमण करणार्‍या समाजकंटकांची मानसिकता काय आहे, हेच यातून दिसून येते ! समाजकंटकांचा वाढता उद्दामपणा पहाता महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था यांचा बोजवारा उडाल्याचेच उघड होते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली), १३ जून (वार्ता.) - येथील दैनिक सनातन प्रभातचे वितरक आणि सनातनचे साधक श्री. शशिकांत जोशी (वय ७२ वर्षे) यांच्यावर १३ जूनला सकाळी ८.२० वाजता दैनिक सनातन प्रभातचे वितरण करत असतांना दोन समाजकंटकांनी प्राणघातक आक्रमण केले. यात समाजकंटकांनी श्री. जोशी यांच्या मानेवर काठीने वेगाने प्रहार केला, तसेच ते खाली पडल्यावर त्यांची पाठ आणि मांडी यांवर काठ्यांनी प्रहार केले. घटना घडल्यावर दोघे समाजकंटक दुचाकीवरून लगेच पळून गेले. यापूर्वीही दैनिक सनातन प्रभातचे कवठेमहांकाळ येथील वितरक श्री. संतोष चव्हाण यांच्यावर २० डिसेंबर २०१५ या दिवशी सकाळी दैनिक वितरण करतांना धर्मांधांच्या जमावाने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात, तसेच पाठीवर प्रहार करून त्यांना घायाळ केले होते. (दैनिक सनातन प्रभातचे वितरक श्री. जोशी यांच्यावर आक्रमण करून समाजकंटकांनी सनातनद्वेषच प्रकट केला आहे! सात महिन्यांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यातच दैनिक सनातन प्रभातच्या वितरकांवर समाजकंटकांचे आक्रमण होते, ही निश्‍चितच हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. या संदर्भात संबंधित समाजकंटकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करतील का ?- संपादक) 
१. नेहमीप्रमाणे श्री. शशिकांत जोशी हे १३ जून या दिवशी सायकलवरून दैनिक सनातन प्रभातचे वितरण करत होते. त्या वेळी तेथे अगोदरच दबा धरून बसलेल्या दोन समाजकंटकांपैकी एकाने जोराने श्री. जोशी यांच्या डोक्यावर काठीने वार केला. श्री. जोशी यांनी अचानक मागे वळून पाहिल्याने हा मार त्यांच्या डोक्याला न बसता मानेवर बसला. (यावरून ही घटना पूर्वनियोजित होती, हेच सिद्ध होते ! - संपादक)
२. या मारामुळे श्री. जोशी खाली कोसळले. कोसळल्यानंतर समाजकंटकांनी त्यांची पाठ, पाय, तसेच शरिराच्या अन्य ठिकाणी काठीने जोराने प्रहार केले. मारामुळे श्री. जोशी यांना पाठीवर जखम होऊन पाठीतून रक्त येऊ लागले.

(म्हणे) गोवा शासनाने मोपा येथील ५ एकर भूमी नौसेनेला कार्यक्रमासाठी देऊ नये !

केवळ राजकारणासाठी नौदलाला भूमी देण्यास विरोध करणारे काँग्रेसचे खासदार शांताराम नाईक !
     पणजी, १३ जून (वार्ता.) - मोपा येथील प्रस्तावित विमानतळाच्या ठिकाणची ५ एकर भूमी नौसेनेला नेव्हल एन्क्लेव्ह या कार्यक्रमासाठी देण्याचा गोवा शासनाचा विचार आहे. ही भूमी देण्यास काँग्रेसचे गोव्यातील राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी विरोध केला आहे. 
    नाईक म्हणाले, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची भूमी भारतीय नौसेनेच्या एका कार्यक्रमाला देण्याचा निर्णय घेऊन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा एकदा गोव्यातील लोकांची फसवणूक केली आहे. गोव्याची मोठ्या प्रमाणातील जागा नौसेनेकडे आहे. यापैकी काही जागा परत घ्यावी, अशी स्थानिकांची मागणी असूनही ती जागा परत घेण्यात आलेली नाही. नौदलाने यापूर्वी गोव्यातील लोकांची सुरक्षेच्या नावाखाली सतावणूक केली आहे. सध्याचे दाबोळी विमानतळ नौदलाच्या कह्यातून घेऊन मोपाचे नवीन विमानतळ नौदलाला दिल्यास चांगले होणार आहे.पंजाबमध्ये सैनिकांच्या कारवाईत २ पाकिस्तानी तस्कर ठार

अमली पदार्थांमुळे पंजाबातील युवक व्यसनाधीन झाल्यानंतर होणारी कारवाई !
     फाजिल्का - पंजाब राज्यातील फाजिल्का येथे १२ जूनच्या सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या २ पाकिस्तानी नागरिकांना ठार केले. या वेळी एक जण घायाळही झाला आहे.
     पाकिस्तानी तस्कर भारतीय सीमेत अमली पदार्थ विकायचे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या तस्करांकडून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या तिघांकडून हेरॉईनची १५ पॅकेट जप्त करण्यात आली आहेत. 
    पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात चालत आहे. पाकमधील तस्कर भारतात अमली पदार्थ आणतात. पंजाबमध्ये युवकांमध्ये अमली पदर्थांच्या व्यसनात प्रचंड वाढ झाली आहे. याच विषयावर उडता पंजाब हा चित्रपट काढण्यात आला आहे; मात्र त्यात ८९ सुधारणा करण्यास केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने सांगितले आहे.१२ जून या दिवशी बिलिव्हर्स सोसायटी संकुलात फिरकलेच नाहीत !

म्हापसा (गोवा) येथील देशमुख सोसायटीतील रहिवाशांचे यश !
देशमुख सोसायटीतील रहिवाशांचे अभिनंदन !
हिंदूंनो, असेच संघटितपणे आणि चिकाटीने लढा देऊन बिलिव्हर्सवाल्यांचे धर्मांतराचे षड्यंत्र हाणून पाडा ! 
     म्हापसा - फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड कॉ-ओप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी संकुलात बिलिव्हर्सना प्रार्थना करू न देण्याचा निर्धार केला आहे. सलग तिसर्‍या रविवारी नागरिकांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे १२ जून या दिवशी बिलिव्हर्स संकुलाकडे फिरकलेच नसल्याने बिलिव्हर्सची प्रार्थना होऊ शकली नाही.
    देशमुख सोसायटी ही पूर्णत: निवास स्वरूपाची असल्याने बिलिव्हर्सच्या अनधिकृत प्रार्थनांना सोसायटीतील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. संकुलात चाललेल्या बिलिव्हर्सच्या प्रार्थनांच्या विरोधात रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून बार्देश तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी चालू असल्याने संकुलात बिलिव्हर्सना प्रार्थना घेण्यास उपजिल्हाधिकार्‍यांनी स्थगिती आदेश दिला आहे. तरीही बिलिव्हर्स संकुलात प्रार्थना घेत असल्याने संतप्त रहिवाशांनी मागील दोन रविवार संकुलाचे प्रवेशद्वार बंद करून बिलिव्हर्सना आत येऊन प्रार्थना करण्यापासून रोखले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी देशमुख सोसायटीतील रहिवाशांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला होता. तरीही चिकाटीने लढा देत रहिवाशांनी बिलिव्हर्सच्या प्रार्थना बंद पाडण्यात यश मिळवले. रहिवाशांनी रविवार, १२ जून या दिवशीही सोसायटीचे प्रवेशद्वार सकाळी बंद केले होते; मात्र बिलिव्हर्स फिरकलेच नाहीत.

पुरावा काहीच नाही, तरीही सनातनच्या विरोधात आरडाओरडा चालूच ! - अभिनेते शरद पोंक्षे

श्री. शरद पोंक्षे
सामाजिक संकेतस्थळावरून व्यक्त होत असलेला एका हिंदूच्या मनातील उद्वेग !
    सकाळी एका वृत्तवाहिनीवर नेहमीचीच चर्चा चालू होती, सनातनवर बंदी आणावी का ? सूत्रसंचालकाच्या तोंडवळ्यावर हास्य होते; कारण ते हिंदुसंघटनेविरुद्ध बोलत होते. असा आनंद नेहमीच पहायला मिळतो. एवढी वर्षे सनातनवर बंदीची मागणी होत आहे; पण हाती काहीच लागत नाही. साध्वी प्रज्ञासिंह गेली ८ वर्षे कारागृहात आहे; पण तिच्या वाया गेलेल्या आयुष्याविषयी कुणीही गळा काढतांना दिसले नाही. मुसलमानांची वर्षे फुकट गेली, तर दिवसभर त्यांच्या मुलाखती झाल्या. त्यात त्यांच्यावर किती भयानक अन्याय झाला, हे दाखवण्यात येत होते. त्याला कुणी विरोध करत नाही. मग तोच न्याय हिंदूंना का नाही ? हा पक्षपातीपणा झाला. पत्रकारितेचे पावित्र्य राखा ! दाभोलकरांच्या खुनाविषयी सीबीआयने संशयित म्हणून तावडे यांना कोठडीत घेतले आहे. त्यांच्यावरील गुन्हा, पुरावा काहीच सिद्ध झालेले नाही. तरीही आरडाओरडा चालूच आहे. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर तो ज्या संस्थेशी निगडित आहे, त्या संस्थेवर बंदीची मागणी कशी होते ? संस्थेने गुन्हा करायचा आदेश दिला असेल, तर बंदीची मागणी योग्य आहे. सनातनच्या साधकांवर आरोप झाले की, हे बंदीची मागणी करून मोकळे. मग हाच नियम सर्वांना लावा. भुजबळ आत गेले. आता करा त्यांच्या पक्षाच्या विरोधात बंदीची मागणी.संजय दत्तचा गुन्हाही सिद्ध झाला होता, मग त्याच्या चित्रपटसृष्टीवर बंदीची मागणी का करत नाही ? कारण हिंमत नाही ! ती नाही; कारण त्या पक्षाचे प्रमुख बड्या आसामी असतात.

पत्रकार आणि आपचे नेते आशिष खेतान यांची मुक्ताफळे !

आशिष खेतान हे स्वतः पत्रकार आहेत आणि ते लैंगिक शोषणाचे आरोपी तरुण तेजपाल यांचे सहकारी 
होते, त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानांवरून त्यांच्याकडून सनातनवर करण्यात आलेले आरोप खोटे 
आहेत, असेच म्हणावे लागेल ! 
पत्रकार खोटारडे आणि दारुडे असतात ! 
      मुंबई - पत्रकार खोटारडे आणि दारुडे असतात, त्यांना आधीच्या मालकांनी काढून टाकल्याने ते पत्रकारितेच्या नावाखाली सूड घेतात, असे उद्गार वादग्रस्त पत्रकार आणि आताचे आपचे नेते आशिष खेतान यांनी काढले आहेत. फौंटनलिंक नावाच्या संकेतस्थळाने आम आदमी पार्टी आणि त्यांचे देहलीतील सरकार यांतील भ्रष्टाचार उघड केल्याने आशिष खेतान संतप्त झाले असून त्यांनी पत्रकारांवर आगपाखड केली. फौंटनलिंक नावाच्या संकेतस्थळाने आपमध्ये उघड उघड चाललेला भ्रष्टाचार, त्यांच्या आमदारांची नाराजी, प्रसारमाध्यमांवर आणला जाणारा दबाव आणि आपविषयी नकारात्मक बातम्या प्रसारित होऊ नयेत म्हणून वापरलेल्या क्लृप्त्या उघड केल्या आहेत.

श्री. शशिकांत जोशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या आक्रमणाच्या संदर्भात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करा ! - समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

संशयितांना तत्काळ शोधून काढण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश 
 निवेदन देतांना (डावीकडे) पोलीस अधीक्षक
श्री. दत्तात्रय शिंदे आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी
     सांगली, १३ जून (वार्ता.) - येथील दैनिक सनातन प्रभातचे वितरण करणारे वितरक आणि सनातन संस्थेचे साधक श्री. शशिकांत जोशी (वय ७२ वर्षे) यांच्यावर १३ जून या दिवशी सकाळी ८.२० वाजता दैनिक सनातन प्रभातचे वितरण करत असतांना दोन संशयित धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी श्री. शशिकांत जोशी हे हिंदु धर्मप्रसार करणारी संघटना सनातन संस्थेशी निगडीत आहेत म्हणूनच हे आक्रमण करण्यात आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, तरी या प्रकरणात सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सांगली येथील पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना १३ जून या दिवशी देण्यात आले.

रा.स्व. संघाच्या सदस्यांना केंद्रातील शासकीय नोकरी करण्यावरील बंदी मोदी शासनाने हटवली !

     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जमात-ए-इस्लामी या संघटनांचे सदस्य असलेल्यांना गेली पाच दशके केंद्रातील शासकीय नोकरी करण्यावर असलेली बंदी मोदी शासनाने हटवली आहे. केंद्रशासनाने उपरोल्लेखित संघटनांच्या सदस्यांना केंद्रशासनात नोकरी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे म्हटले आहे.
१. गोव्यात मुरगाव येथील भारतीय जकात खात्याच्या आयुक्ताने जकात खात्यात नोकरी भरतीसंदर्भातील अर्जात अर्जदाराला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा जमात-ए-इस्लामी या संघटनांचे सदस्य नसल्याचे लिहून देण्यास सांगण्यात आले होते.
२. या प्रकारामुळे हे प्रकरण उघडकीस आले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गोवा येथे 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशना'चे आयोजन !

गोवा येथे १९ जूनपासून चालू होणार हिंदु अधिवेशन ! 
     पुणे, १३ जून (वार्ता.) - प्रभावी हिंदूसंघटनाद्वारे हिंदूंचा आवाज बुलंद करण्यासाठी, तसेच सर्वकल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी गोवा येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. 

'ॐ' शिवाय योगाला काही महत्त्वच नाही ! - अनुप शुक्ला, मानवहित सेवा संस्थान

     भिवंडी, १३ जून (वार्ता.) - 'ॐ' एक निराकार आणि निर्विकार अक्षर आहे. 'ॐ' स्वतःतच सामावला आहे. अनेक देशातील लोकांनी 'ॐ' ला सामावून घेतले आहे. १५६ देशांत योग केला जातो; पण त्याला कुणीच विरोध करत नाही. मुसलमान देशांतही 'ॐ' ला विरोध होत नाही. मग आपल्याच देशात असे का होते ? प्रत्येक वेळी धर्माला मध्येे आणले जाते. सर्वांसाठी हितकारक असलेल्या गोष्टींनाच विरोध का ? 'ॐ' विना योगाभ्यासाला महत्त्व नाही, असे मार्गदर्शन मानवहित सेवा संस्थानचे श्री. अनुप शुक्ला यांनी शिवाजी चौक, भिवंडी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. या वेळी ११० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. योगदिनी 'ॐ'चे उच्चारण बंधनकारक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. 

फुटीरतावाद्यांच्या विरोधामुळे पवित्र गुफेऐवजी श्रीनगरमध्ये अभिनव गुप्त संदेश यात्रा पूर्ण !

काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप सरकारचे राज्य कि फुटीरतावाद्यांचे ? 
     श्रीनगर - १० जून या दिवशी अभिनव गुप्त संदेश यात्रा काश्मीरमधील बडगामच्या बीरवाह स्थित संत अभिनव गुप्त यांची पवित्र तपोभूमी असणार्‍या गुफेच्या ठिकाणाऐवजी श्रीनगर येथील दल सरोवराजवळ असलेल्या जब्रवान पर्वतावरील ज्येष्ठा मंदिरात पूर्ण करण्यात आली. या यात्रेला फुटीरतावाद्यांनी विरोध केल्याने ही यात्रा मूळ ठिकाणी पूर्ण करण्यात आली नाही. 
१. बडगाम प्रशासनाने या दिवशी संपूर्ण क्षेत्र सील केल्याने पवित्र गुफेच्या ठिकाणी यात्रेतील कोणीही जाऊ शकले नाही.

लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे इमामवाड्यासमोर चित्रीकरण केल्याने ५० मुसलमानांच्या आक्रमणात अभिनेता कुणाल खेमू घायाळ !

धार्मिक भावना दुखावल्यावर मुसलमान थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू निवेदने देतात, 
यावरून कोण सहिष्णु आहेत, हे पुरोगामी आणि ढोंगी निधर्मी सांगतील का ? 
धार्मिक भावना दुखावल्याचा मुसलमानांचा दावा ! 
     लक्ष्मणपुरी - उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील इमामवाड्यासमोर ११ जूनला एका गाण्याचे चित्रीकरण चालू असतांना ५० मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात अभिनेता कुणाल खेमू घायाळ झाले. तसेच चित्रीकरणाचे कॅमरे तोडण्यात आले. मुसलमानांचे म्हणणे होते की, इमामवाड्याच्या बाहेरील नौबतखाण्यात अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणारे चित्रीकरण करण्यात येऊ नये. 
      आक्रमणापूर्वी मुसलमानांनी चित्रीकरणाच्या वेळी वाद घालून विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी आक्रमण केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या चित्रीकरणाची अनुमती घेण्यात आली नव्हती. घटनेनंतर येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाची निदर्शने
निदर्शनामध्ये सहभागी हिंदु धर्माभिमानी
     नंदुरबार (वार्ता.) - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचा खोटे आरोप लादून आठ वर्षे सतत अमानुष छळ करणारे तत्कालीन अधिकारी आणि राज्यकर्ते यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यांसह विविध मागण्यांसाठी १२ जून २०१६ या दिवशी सकाळी १० वाजता येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. नंदुरबार तहसील कार्यालयाजवळ नेहरू पुतळ्यासमोर ही निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी मागण्या आणि घोषणा यांचे विविध फलक झळकवत घोषणा दिल्या. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात हाणामारी अन् दगडफेक

रुग्णवाहिका आणि दुचाकी यांची तोडफोड 
     नगर - येथे शहराच्या तोफखाना भागात रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दगडफेक होऊन वाहनांची मोडतोड करण्यात आली. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने आक्षेप घेतला. त्यानंतर काठ्या आणि तलवारी यांच्या साहाय्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर वार केले. (यावरून हा प्रकार पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होते ! - संपादक) या वेळी झालेल्या दगडफेकीत रस्त्यावरील दुचाकींची मोडतोड झाली. यात एका रुग्णवाहिकेचाही समावेश होता. दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांवर एकमेकांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (दोन्ही पक्षांचा उद्दामपणा जाणा ! - संपादक)

पुण्यातील खडकी बाजार आणि वाकड येथे गाड्यांची तोडफोड

पुण्यात सातत्याने होणार्‍या वाहन तोडफोडीच्या घटना, म्हणजे
 पोलीस आणि कायदा-सुव्यवस्था बासनात गुंडाळून ठेवल्यासारखेच आहे. 
     पुणे, १३ जून - येथील खडकी बाजार भागातील इंदिरानगर आणि वाकड येथील नखातेनगर येथे ११ जून या दिवशी रात्री दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहने अशा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 
१. इंदिरानगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या तरूणांच्या एका टोळक्याने परिसरात उभ्या असलेल्या १० हून अधिक चारचाकी वाहनांची तोडफोड केली. खडकी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना आरोपींची ओळख पटली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

राज्यातील देवस्थानांच्या ठिकाणी मद्यबंदी करा ! - नगर जिल्हा दारूबंदी कृती समितीची मागणी

     नगर, १३ जून - राज्यातील शिर्डी, श्री शनिशिंगणापूर, श्री त्र्यंबकेश्‍वर अशा देवस्थानच्या ठिकाणी मद्यबंदी करण्यात यावी, अशी मागणी नगर जिल्हा दारूबंदी कृती समितीने केली आहे. (तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्यबंदी करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या नगर जिल्हा दारूबंदी कृती समितीचे अभिनंदन ! - संपादक) समितीचे अध्यक्ष बाबा सोनावणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. 

परळी-वैजनाथ (बीड) येथील तहसीलदारांना कार्यालयात डांबून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बंदीची मागणी केल्यास चुकीचे काय ?
     बीड, १३ जून - राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जून या दिवशी परळी वैजनाथ येथे केलेल्या आंदोलनाच्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांसह इतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप लावून तहसीलदारांना डांबून ठेवले होते. (आंदोलनासाठी सनदशीर मार्गांचा अवलंब न करणारा पक्ष आणि त्यांचे नेते यांच्याकडून कायद्याचे राज्य मिळेल का ? - संपादक) त्या प्रकरणी तहसीलदार कडावकर यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याप्रमाणे धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकार्‍यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी परळी न्यायालयातही दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे. 

उत्तरप्रदेशातील ३ संतांनी पंतप्रधान, सरसंघचालक आणि प्रवीण तोगाडिया यांना रक्ताने पत्र लिहिले !

हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न !
     गाजियाबाद (उत्तरप्रदेश) - देशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांकडे लक्ष वेधण्यासाठी देहलीच्या कालिका शक्तिपीठाचे महंत श्री सुरेंद्रनाथ अवधूत, गाजियाबादच्या श्री दुधेश्‍वरनाथ मठाचे संत स्वामी नारायण गिरीजी महाराज आणि डासना येथील यती नरसिंहानंद सरस्वती यांनी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि विश्‍व हिंदु परिषदेचे डॉ. प्रवीण तोगाडिया यांना पत्र लिहिले आहे. 
१. पत्रामध्ये समान नागरी कायदा आणि कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. 
२. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येमुळेच हिंदूंना धर्मांधांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. म्हणून शासनाने तात्काळ हे कायदे बनवायला हवेत.

हरियाणामध्ये शालेय शिक्षकांना जीन्स घालण्यास बंदी

हरियाणा शासनाचा अभिनंदनीय निर्णय !
शिक्षक संघाचा विरोध
     चंदीगड - हरियाणा राज्यातील प्राथमिक शिक्षण विभाग संचालकांनी शालेय शिक्षकांना कामाच्या वेळात जीन्स न घालण्याचा आणि औपचारिक पोशाख परिधान करण्याचा आदेश दिला आहे. हरियाणा विद्यालय शिक्षक संघाने या आदेशाची कठोर शब्दांत निषेध केला आहे. तसेच या आदेशाला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यशासनाने स्वतःचे अपयश लपवून ठेवण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे, असा आरोप केला आहे. 
    संघाचे अध्यक्ष वजीरसिंह म्हणाले की, शिक्षकांसाठी ड्रेसकोडचा हा आदेश चुकीचा आहे. शिक्षकांनी काय परिधान करायचे आणि काय नाही, याचा निर्णय त्यांच्यावर सोडला पाहिजे. शिक्षकाचे काम शिकवणे आहे. (शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, तेच जर भारतीय संस्कृतीच्या विरोधात वागत असतील, तर विद्यार्थी कोणते संस्कार घेतील ? शिक्षकांच्या अशा मानसिकतेमुळेच आज शिक्षणाचा स्तर घसरला आहे. - संपादक) तो जीन्स अथवा धोतर परिधान करूनही शिकवू शकतो. (धोतर परिधान करून शिकवू शकतो, तर शिकवत का नाही ? जीन्सच कशाला हवी ? आणि आता किती शिक्षक धोतर घालून शिकवतात ? - संपादक)

पाटलीपुत्र (बिहार) येथे गोमांस खाण्यासाठी आणि मुसलमान बनण्यासाठी हिंदु महिलेवर पती आणि कुटुंब यांजकडून बळजोरी !

दादरीवरून ऊर बडवणारे अशा घटनांवर तोंड उघडणार नाहीत ! 
मुसलमान कुटुंबियांचा स'र्वधर्मसमभाव' ! 
     पाटलीपुत्र (बिहार) - येथे मुसलमान व्यक्तीशी विवाह केलेल्या एका हिंदु महिलेवर तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबियांनी गोमांस खाण्यासाठी आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी करण्याची घटना घडली आहे. या महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यावर दोघांना अटक करण्यात आली आहे. 
     जर गोमांस खाल्ले नाही आणि इस्लाम स्वीकारला नाही, तर अश्‍लील व्हीडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याची धमकी या महिलेला देण्यात आली होती. कोलकात्यामध्ये रहाणार्‍या या महिलेने पाटलीपुत्रातील फुलवारी भागात रहाणार्‍या आसिफ याच्याशी लग्न केले होते.

सनातन प्रभातचे अँड्रॉईड अ‍ॅप वापरणार्‍यांसाठी सूचना !

     सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे सनातन प्रभातचे अँड्रॉईड अ‍ॅप 'गुगल प्ले-स्टोअर' वर बंद आहे. हे अ‍ॅप बंद असल्याने बर्‍याच वाचकांची गैरसोय होत आहे. यासाठी तात्कालीक पर्याय म्हणून वाचक पुढील लिंकवरील 'एपीके' धारीका (dainiksanatanprabhat.apk) डाऊनलोड करून सनातन प्रभात मधील बातम्या अँड्रॉईड भ्रमणभाषवर वाचू शकतात. https://goo.gl/WPCr89 
टीप : वरील अ‍ॅप इंस्टॉल करण्यापूर्वी आधीचा अ‍ॅप अनइंस्टॉल करावा. इंस्टॉल करतांना अडचण येत असल्यास भ्रमणभाषच्या 'सेटींग्स' मधील 'Unknown sources' हा पर्याय चालू करावा.

महिला मॉडेलवर जोडीदार धर्मांधाकडून लैंगिक अत्याचार

'लिव्ह इन रिलेशनशिप'चे दुष्परिणाम जाणा ! 
     मुंबई - एक मॉडेल महिला तिचा मित्र धर्मांध अरमान ताहीर याच्या समवेत रहात होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर विवाहाला नकार दिला. (समाजव्यवस्था झुगारून स्वैराचाराचा पुरस्कार करणार्‍या महिलांनी यातून धडा घ्यावा ! - संपादक) या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पुण्याच्या धरणसाखळीमध्ये केवळ २.१५ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणीसाठा

       पिंपरी, १३ जून - पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीत सध्या केवळ २.१५ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. (पाण्याचे वाढते दुर्भिक्ष ! - संपादक) पावसाळा चालू होऊन काही दिवस झाले; परंतु पावसाने अद्याप उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची आकडेवारी लक्षात घेता तातडीने पाणी पुरवठा विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्या समवेत पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली.

हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र अरब देशांमध्ये रचले जात आहे ! - साध्वी प्राची, विहिंप

     नवी देहली - लव्ह जिहादचे षड्यंत्र अरब देशांमध्ये रचले जात आहे. हिंदु मुलींशी विवाह करून त्यांना मुसलमान बनवण्यासाठी अरब देश मुसलमान युवकांना भरपूर पैसा देत आहेत, असे विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. साध्वी प्राची यांनी मुसलमान युवकांना ब्राह्मण मुलीशी विवाह केल्यास ७ लाख, वैश्य मुलीशी विवाह केल्यास ५ लाख, क्षत्रिय मुलीशी विवाह ३ लाख, शूद्र मुलीशी विवाह केल्यास २ लाख रुपये मिळतात, अशी माहितीही दिली आहे. हिंदूंनी अरब देशांच्या अशा प्रकारच्या कारवायांपासून वाचण्यासाठी हिंदु स्त्रियांचे रक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अधिवक्ता असणार्‍या हिंदु युवतीवर बलात्कार !

तिने प्रेम केले त्याने विश्‍वासघात केला ! 
उत्तरप्रदेशातील माजी पोलीस अधीक्षकाच्या मुलाचा लव्ह जिहाद !
     आग्रा - येथील माजी पोलीस अधीक्षकाचा मुलगा असणार्‍या सोहेल याने अधिवक्ता असणार्‍या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी त्याने तिचे धर्मपरिवर्तन करून मुसलमान बनवले होते आणि तिच्याशी साखरपुडा केला होता. 
     २००७ मध्ये या दोघांची एकमेकांशी ओळख झाल्यावर सोहेलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीने लग्न करण्याचे विचारल्यावर त्याने धर्मपरिवर्तन करण्यास सांगितले. तिने धर्मपरिवर्तन केल्यावर त्याने साखरपूडा केला आणि मग तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी सोहेल, त्याचे वडील अशफाक अहमद, त्यांची पत्नी आणि जावई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मंदिरांवरच सरकारचे नियंत्रण का ? या विषयावरील ऑनलाइन याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात येणार !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अशा विषयांवर हिंदूंना झगडावे लागते, 
याहून अधिक लज्जास्पद काय असेल ?
      बेंगळुरू - सरकार हिंदु मंदिरांचाच पैसा कह्यात का घेते ? अन्य धार्मिक संघटनांचा का नाही ?, या विषयावरील ऑनलाइन याचिका चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे. कालांतराने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. बेंगळुरू येथील हिंदु धर्माभिमानी मीना नारायण यांनी जनतेकडून समर्थन प्राप्त व्हावे, यासाठी सदर याचिका संकेतस्थळावर ठेवली आहे. (मीना नारायण या धर्माभिमानी हिंदु महिलेचे अभिनंदन ! असा धर्माभिमान किती हिंदूंमध्ये आहे ? - संपादक)
      या याचिकेच्या माध्यमातून निष्क्रीय हिंदू आणि हिंदुद्रोही सरकारच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यात आले आहे. याचिकेतील काही निवडक सूत्रे खालीलप्रमाणे 
१. हिंदु मंदिरांचा पैसा मंदिरांच्याच विकासासाठी मिळत नाही. तो पैसा राज्यसरकारकडे जातो. असे असेल, तर मशीद आणि चर्च यांना यांमधून सूट का ? हे पालटण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंनी ज्योतिष विद्येचे प्राणपणाने रक्षण करावे !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या 
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
ज्योतिषाचार्य श्री. राजेंद्र शर्मा, मुंबई, महाराष्ट्र
    रामनाथी, गोवा येथे ११ ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात मुंबई येथील ज्योतिषाचार्य श्री. राजेंद्र शर्मा यांनी ज्योतिषशास्त्राविषयी अपप्रचार खोडून काढणे, हे धर्मरक्षणच ! या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
     ज्योतिषशास्त्राला वेदांचे नेत्र असे म्हटले गेले आहे. ज्योतिषशास्त्र हा धर्म आणि अध्यात्म यांचा एक स्तंभ आहे; मात्र आज काही तथाकथित धर्मशास्त्रीच ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा ठरवत आहेत. शास्त्र हे ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे. हिंदु धर्मातील कुठल्याही शास्त्राविषयीचे कुणाचेही अज्ञान हे त्या शास्त्राचे महत्त्व कधीही न्यून करू शकत नाही. वेदांमध्ये असे म्हटले आहे, इतर शास्त्रांना विरोध असू शकतो; पण चिकित्साशास्त्र, मंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ही पदोपदी विश्‍वास ठेवण्यायोग्य शास्त्रे आहेत. ज्योतिषशास्त्र हे एक प्रकारे वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कार्यही करते. त्यामुळे मनुष्याला भविष्यातील नियोजन करण्यास साहाय्य होते. असे असतांना ज्योतिषशास्त्राविषयी अपप्रचार करून त्यावर सातत्याने आघात करण्याचा प्रयत्न केला जातोे. हा अपप्रचार खोडून काढून आपली प्राचीन शास्त्रे आणि प्रमाणित विद्या यांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे.

लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू दे, तरच यशस्वी व्हाल !

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
द्रोणाचार्यांनी झाडाच्या फांदीवर बांधलेल्या 
मातीच्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्यास सांगून 
पक्ष्यावर नेम धरल्यावर काय दिसते, असे 
प्रत्येकाला विचारणे
     द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्येचे (बाण मारण्याचे) शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य प्रवीण होऊ लागले. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी आणला आणि तो एका झाडाच्या फांदीवर बांधला. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले. 
     द्रोणाचार्य : झाडावरचा तो पक्षी बघा. बाण मारून त्याच्या डोळ्याचा वेध कोण घेऊ शकेल, ते पाहूया. (युधिष्ठिराला पाहून) पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड. त्या पक्ष्यावर नेम धर.

जोहार राजपुतान्यातील गौरवशाली परंपरा

      रणांगणावर क्षात्रवृत्ती जागृत होऊन लढण्यासाठी स्फूर्ती मिळावी, यासाठी गर्जावयाच्या जय हरहर या शब्दाचा अपभ्रंश, म्हणजे जोहार हा शब्द. देव, देश आणि धर्म यांच्यावर संकट आले असता, त्यांच्या रक्षणासाठी युद्धसज्ज होतांना मागचे सर्व पाश सोडून जाण्याच्या निकराच्या प्रसंगी उच्चारावयाचा हा महामंत्रच आहे. शत्रूकडून स्त्रियांची विटंबना होऊ नये, यासाठी सर्व लहान-थोर स्त्रियांनी पेटत्या अग्नीत उडी टाकून आत्मसमर्पण करायचे आणि पुरुषांनी युद्धात निकराने लढायचे, अशी राजपुतान्यातील गौरवशाली परंपरा म्हणजे जोहार.
१. पहिला जोहार (ख्रिस्ताब्द १३०३)
     अल्लाउद्दीन खिलजीने चितोडचा राणा भीमसिंह याची राणी पद्मिनी हिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तिच्या अभिलाषेेने प्रचंड सैन्यानिशी चितोडवर स्वारी केली. भीमसिंहाला जयाची निश्‍चिती वाटेना. तेव्हा सर्व योद्ध्यांनी आपल्या स्त्रिया, सुना, मुली यांना अग्नी पेटवून दिला. त्या अग्नीत पद्मिनीसह सहस्त्रो स्त्रियांनी उड्या टाकून प्राणार्पण केले. नंतर पुरुषांनी प्राणपणाने लढूून आत्मसमर्पण केले. चितोड येथे झालेला हा पहिला जोहार.

बेशिस्त वाहतूक नेते मृत्यूच्या दारात !

     देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी पायाभूत सुविधांसमवेत दळणवळणाचे मोठे जाळे असणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने देशात रस्ते, महामार्गाचे मोठे जाळे विणले गेले. खेडी मुख्य रस्त्यांंना जोडली गेली. अनेक शहरे महामार्गांनी एकमेकांशी जोडली गेली. देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे ही दोन शहरे २००२ मध्ये द्रुतगती महामार्गाने एकमेकांना जोडली गेली. देशातील गतीमान महामार्गापैकी एक म्हणून मुंबई-पुणे महामार्गाची नोंद होते. या महामार्गामुळे अनेक लाभ झाले, तसे तोटेही. लाभ हे की वाहतूक गतीमान झाली आणि दळणवळण करणेही सोयीचे झाले, लोकांचा प्रवासाचा वेळ वाचला. पूर्वी मुंबई-पुणे या प्रवासाला चार-पाच तास लागायचे, आता दीड-दोन तासांत मुंबईतून पुण्यात आणि पुण्यातून मुंबईत पोचणे शक्य झाले. प्रवासी वाहतुकीसमवेच मालवाहतुकीसाठीही हा महामार्ग सोयीचा झाला. त्यामुळे या महामार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. या महामार्गावरून आता प्रतिदिन ४०-५० सहस्र वाहने धावत आहेत. ताशी किमी ८० इतकी वेगमर्यादा वाहनांना घालून दिली असली, तरी १२०, १४० या गतीने या महामार्गावरून वाहने धावत आहेत.

स्त्री रक्षण आणि स्त्रीत्वाची जपणूक यांकडे सर्वाधिक लक्ष देणारा हिंदु धर्म !

       बुधकौशिकविरचित श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये सीताशक्ती: असा शब्दप्रयोग आहे. महाभारताचे युद्ध घडले, ते द्रौपदीचे मोकळे केस कृष्णाने डोळ्याआड होऊ दिले नाहीत म्हणून. आपले गेलेले राज्य परत मिळवण्याची इच्छा पांडवांच्या मनांत उत्पन्न केली ती कुंतीने. शहाजीराजांनी विश्‍वासाने बालशिवाजी सोपवला तो जिजाबाईच्या हातात, जिने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची क्षमता त्याच्यात निर्माण केली. आपणाला भावाबहिणींचे नाते आठवते, तेव्हा समोर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई उभी ठाकतात. वहिनी म्हटल्यावर हात जोडले जातात, ते स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकरांच्या येसूवहिनीला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

असे घडवले प.पू. गुरुदेवांनी ध्वनीचित्र-चकती सिद्ध करण्याच्या सेवेच्या माध्यमातून !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त... 
         वर्ष १९९८ मध्ये सनातनच्या संपर्कात आल्यानंतर प.पू. गुरुदेवांनी दिवसाचा अधिकाधिक काळ सत्मध्ये जावा आणि साधना व्हावी, यांसाठी विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. आरंभी समाजात प्रसार करण्याची सेवा होती. त्यानंतर आश्रमात वास्तव्याला आले, तेव्हा दैनिक सनातन प्रभातच्या विभागात सेवा करण्याची संधी मिळाली. पुढे देवद आश्रमाचा स्वागतकक्ष, संकलन, हिंदी मासिक आणि सरतेशेवटी ध्वनीचित्रीकरण विभागात सेवा करण्याची संधी दिली. एवढ्या वर्षांच्या साधनाप्रवासाच्या काळात प्रत्येक वेळी प.पू. गुरुदेवांनी साधकांच्या माध्यमातून अनेक सूत्रे शिकवून, अपार कष्ट घेऊन आणि प्रसंगी टाकीचे घाव घालून आम्हाला घडवत आहेत. प.पू. गुरुमाऊलीच्या या जिवावरील प्रीतीला उपमा नाही. माझा ध्वनीचित्रीकरण विभागातील सेवेला आरंभ कसा झाला ?, याविषयीची काही सूत्रे येथे देत आहे.
१. ध्यानी-मनी नसतांना 
ध्वनीचित्र-चकती सिद्ध करण्याची सेवा मिळणे
         वर्ष २००४ च्या गुरुपौर्णिमेपूर्वी मी नुकतीच देवद आश्रमात आले होते. त्या वेळी सनातनचा ध्वनीचित्रीकरण विभाग अगदी लहानसा होता. त्या विभागात जेमतेम चार साधक होते. गुरुपौर्णिमेनंतर एके दिवशी ध्यानी-मनी नसतांना ध्वनीचित्रीकरण विभागातील साधक श्री. दिनेश शिंदे यांनी अकस्मात्पणे सांगितले, धार्मिक कृती कशा कराव्यात, या विषयावरील ध्वनी-चित्रचकती सिद्ध करावयाची आहे. त्यासाठी तुमचे साहाय्य घेण्यास सांगितले आहे. हे ऐकल्यानंतर प्रश्‍न पडला, ध्वनी-चित्रीकरणाच्या सेवेत मी काय साहाय्य करणार ? मला तर त्यातील काहीच येत नाही. नाही म्हणायला व्यावहारिक जीवनातला थोडाफार अनुभव गाठीशी होता.

साधना करणार्‍या साधकांच्या घरी सात्त्विक वातावरण असल्याने अशा सात्त्विक ठिकाणी प्राणी येतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले भोपाळ येथील देशमुख कुटुंबीय !

१. घरातील प्रत्येक खोलीत ३ - ४ फुलपाखरे, अशी १५ - २० फुलपाखरे घरात येऊ लागणे : फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ - २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ - ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ - २० फुलपाखरे असायची. स्नानगृह, स्वयंपाकघर असे सर्व ठिकाणी त्यांचा वावर असायचा.
२. घरात खारी येऊ लागणे आणि शेजार्‍यांकडे कुणाकडे त्या येत असल्याचे पाहिले नसणे : फुलपाखरे घरात येण्याआधी नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ मध्ये आमच्या घरात खारी यायच्या. त्यांचा काही त्रास नव्हता; पण त्यांतील एक खार घरातच मेली. यापूर्वी त्या कधी घरात आलेल्या नव्हत्या. तसेच त्या शेजार्‍यांकडे कुणाकडेच आलेल्या आम्ही पाहिले नव्हते.
३. घरात पुष्कळ पाली होणे आणि त्या भूमीवरही चालतांना दिसणे : सध्या घरात पुष्कळ पाली झाल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य हे की, सर्वसाधारणपणे पाली भिंतीवर असतात; पण या पाली भूमीवरही चालतांना आम्हाला दिसतात.

घरात येत असलेली फुलपाखरे काही कारणाने मरू लागल्याने त्याचे वाईट वाटून ती घरी न येण्यासाठी प्रार्थना करणे; पण त्यामुळे एका आध्यात्मिक घटनेला मुकल्याची चूक केल्याचे संतांनी सांगणे

कु. निधी देशमुख
१. घरातील प्रत्येक खोलीत ३ - ४ फुलपाखरे, अशी १५ - २० फुलपाखरे घरात येऊ लागणे : फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ - २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ - ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ - २० फुलपाखरे असायची. स्नानगृह, स्वयंपाकघर अशा सर्व ठिकाणी त्यांचा वावर असायचा. कपडे घालायला कपड्यांची घडी उघडली की, त्यातून फुलपाखरू बाहेर पडायचे. फुलपाखरांचे हे दृश्य पुष्कळ आनंददायी असायचे.
२. घरात पंख्याला धडकून आणि पायाखाली येऊन फुलपाखरे मरू लागणे, फुलपाखरे घरात येऊन मरतात, हे मनाला बरे न वाटल्यामुळे घरात गोमूत्र शिंपडून प्रार्थना करणे आणि त्यानंतर फुलपाखरे घरात यायचीच बंद होणे : नंतर नंतर मात्र ती फुलपाखरे पंख्याला धडकून मरायची किंवा त्यांना उडता येत नसल्याने ती भूमीवर चालत असतांना पायाखाली यायची. प्रतिदिन मेलेली फुलपाखरे उचलून केरात टाकावी लागायची. त्यामुळे आपल्याला जरी त्यांच्या येण्याने आनंद होत असला, तरी ती घरात येऊन मरतात, हे बरे नाही, असे आम्हाला वाटू लागले. याच काळात माझा भाऊ निषादही घरी आला होता. त्यालासुद्धा फुलपाखरे घरी येऊन मरतात, हे चांगले वाटले नाही. त्यामुळे आम्ही घरात गोमूत्र शिंपडून देवाला प्रार्थना केली आणि त्यानंतर फुलपाखरे घरात यायचीच बंद झाली.

जीवनाचे सार्थक होण्यासाठी स्वला विसरून प्रयत्न करून देवाची कृपा प्राप्त करूया !

कु. आरती सुतार
       साधकांनो, आपत्काळ असाच वाढत जाणार आहे. त्याला घाबरून पाऊल मागे न टाकता त्यावर मात करायला शिका. प्रयत्न तेथे यश हे नेहमी लक्षात ठेवून सातत्याने प्रयत्न होतील, याकडे लक्ष द्या. सध्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढतच चालले आहेत. त्यावर प्रयत्न करून मात करणे, हाच एकमेव उपाय आहे.
१. काळानुसार होत असलेल्या 
विविध त्रासांना सामोरे जायला हवे
       चाकरी करावी असे वाटणे, शिक्षण घ्यावेसे वाटणे, निराशा येणे, आश्रमात राहू नये, असे वाटणे, एकटेपणा वाटणे, काहीच करू नये, असे वाटणे, मनाचा अनावश्यक संघर्ष होणे, शारीरिक त्रासात वाढ होणे, असे त्रास काळानुसार होणारच आहेत; म्हणून याला घाबरून मागे फिरायचे कि त्याला सामोरे जायचे ?, याचा विचार तुम्हीच करा. या स्थितीत एखादी व्यक्ती असती, तर तिने काय केले असते ? ती व्यक्ती घाबरली असती कि तिच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले असते ?, हे पहायला हवे.

प्रेमळ, जिज्ञासू आणि धर्माचरण करणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सातारा येथील कु. यशराज देशमुख (वय ७ वर्षे) !

कु. यशराज देशमुख
१. प्रेमभाव
अ. यशराज सर्वांशी प्रेमाने वागतो. तो कधीही कोणावरही रागवत नाही. मी त्याला कधी रागावले, तर तो लगेच दुसर्‍या क्षणाला विसरून जातो आणि प्रेमाने बोलतो.
आ. तो शाळेतही सर्वांशी प्रेमाने आणि मिळूनमिसळून वागत असल्यामुळे सर्वांचा लाडका आहे.
इ. त्याला दिलेला खाऊ तो सर्वांना देऊन मगच खातो.
२. इतरांना साहाय्य करणे
अ. यशराज वर्गातील मुलांकडे एखादी वस्तू नसेल, तर त्याच्याकडे असलेली वस्तू देतो. त्याच्या एका मित्राची आई इतरांच्या घरातील कामे करते. यशराजसाठी एखादी वस्तू घेतली आणि त्या मित्राकडे ती वस्तू नसेल, तर तो ती मित्राला देतो.
आ. तो मला घरकामात साहाय्य करतो आणि त्याच्या लहान बहिणीला सांभाळतो.

संत ज्ञानेश्‍वरांनी चांगदेवांच्या भेटीसाठी जातांना भिंत चालवण्यामागचे अध्यात्मशास्त्र !

श्री. राम होनप
        एखाद्या प्रसंगी विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट पद्धतीने दैवी शक्ती प्रगट होते. ही प्रक्रिया बुद्धीला कळत नाही. त्यामुळे माणूस त्याला चमत्कार म्हणतो, उदा. संत ज्ञानेश्‍वरांनी चांगदेवांच्या भेटीसाठी जातांना भिंत चालवली. भिंत चालवण्यापूर्वी तिच्यात ९६ प्रतिशत पृथ्वीतत्त्व आणि ४ प्रतिशत अन्य चार तत्त्वे होती. ज्या वेळी संत ज्ञानेश्‍वरांच्या संकल्पाने भिंत चालू लागली, त्या वेळी भिंतीतील पंचतत्त्वाचे प्रमाण पुढीलप्रमाणे होते. 
        पृथ्वीतत्त्व जडतेला कारक आहे. जडतेमुळे भिंतीला गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतो. त्यामुळे पृथ्वी भिंतींला स्वतःकडे खेचते. ज्ञानेश्‍वरांनी केलेल्या संकल्पामुळे वायूतत्त्वाचे अधिक्य निर्माण होऊन भिंत हलकी झाली आणि ती एखाद्या पक्ष्याप्रमाणे हवेत विहार करू शकली.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (११.२.२०१६)

साधकांनो, संतांनी बनवलेला महाप्रसाद अधिकाधिक कृतज्ञताभावाने ग्रहण करा !

श्री. रूपेश गोकर्ण
       सनातनच्या सर्व आश्रमांमध्ये किंवा प्रसारात संतांसाठी साधकच स्वयंपाक बनवतात; परंतु रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात श्री अन्नपूर्णामातेप्रमाणे असणार्‍या सनातनच्या संत पू. रेखाताई काणकोणकर या आश्रमातील संत आणि साधक यांच्यासाठी स्वयंपाक बनवतात. हे रामनाथी आश्रमाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. साधकांनो, ईश्‍वराचे सगुण रूप असणार्‍या संतांच्या हातून बनलेला चैतन्यमय महाप्रसाद ग्रहण करण्याचे भाग्य मिळत असल्याने प्रतिदिन तो अधिकाधिक कृृतज्ञताभावाने ग्रहण करूया !
- श्री. रूपेश गोकर्ण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१६)

प.पू. दास महाराज यांना मौन साधनेसाठी डॉ. विल्फ्रेड यांच्याकडून शुभेच्छा !

प.पू. दास महाराज
        साधकांची साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी प.पू. दास महाराज यांना त्यांचे गुरु प.पू. श्रीधर स्वामींनी १४.२.२०१६ या दिवशी पहाटे ३ ते ४ या वेळेत स्वप्नदृष्टांत देऊन एक वर्ष मौन साधना करण्याची आज्ञा केली. ३.३.२०१६ पासून महाराजांनी मौनव्रत चालू केले. हे डॉ. विल्फ्रेड यांना समजल्यावर त्यांनी महाराजांना या व्रतासाठी शुभेच्छा दिल्या.
        २००७ या वर्षी प.पू. दास महाराजांना मोठा अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा उजवा पाय गुडघ्याच्या खालच्या बाजूने पूर्णपणे तुटला होता. केवळ चामड्याचा काही भाग चिकटलेला होता. महाराजांनी स्वतःच तो पाय उचलला आणि त्यांना रुग्णालयात आणले होते. तेव्हा डॉक्टर विल्फ्रेड यांनी रशियन तंत्राचा उपयोग करून पुन्हा पायाची जोडणी करण्याची किमया केली होती. भारतातील पाय जोडण्याची शस्त्रक्रिया करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता आणि तो यशस्वी झाला होता. त्यामुळे डॉ. विल्फ्रेड यांचा रशियामध्ये डॉक्टरांच्या सभेत मोठा सत्कार करण्यात आला होता. तेव्हापासून डॉ. विल्फ्रेड यांची प.पू. दास महाराजांवर श्रद्धा निर्माण झाली होती. त्यामुळे ते महाराजांच्या पायाची नियमित आणि आनंदाने पडताळणी करतात.

काळ आणि काळाचे मापन

प.पू. परशराम पांडे
       १२.१.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पृ. क्र. ६ वर सतत वर्तमानकाळात रहाण्यास शिकवणारे महर्षि । या मथळ्याखाली पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यातील ५ व्या सूत्रात आयुष्यात प्रत्येक क्षणच आता परीक्षेचा झाला आहे. प.पू. डॉक्टर सतत वर्तमानात रहा !, असे पूर्वी का सांगत होते, याचा आता उलगडा झाला. ना भूतकाळाचा विचार, ना भविष्याचा असे झाले, तरच मनोलय आणि बुद्धीलय होतो आणि निर्विचार स्थितीत रहाता आल्याने प्रत्येक गोष्टीप्रती साक्षीभाव निर्माण होतो, असे महत्त्वाचे सूत्र यातून शिकायला मिळते. हे सूत्र वाचल्यावर प.पू. पांडे महाराज यांनी त्याविषयी केलेले सविस्तर स्पष्टीकरण पुढे देत आहोत.
१. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन काळांमध्ये वर्तमानकाळ हाच मुख्य काळ असणे : आपण काळाचे तीन प्रकार करतो. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. वास्तविक भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला वर्तमानकाळ, तर भविष्यकाळ म्हणजे येऊ घातलेला (पुढे येणारा) वर्तमानकाळ. या दोन्हींमध्ये वर्तमानकाळ हाच काळ मुख्य आहे; परंतु भेद जाणण्यासाठी आपण त्याला होऊन गेल्यामुळे भूतकाळ आणि येणारा म्हणून भविष्यकाळ, असे संबोधतो. तसेच ओळखण्यासाठी काल, आज आणि उद्या असेही म्हणतो.

दहावीच्या परीक्षेत सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. वृषाली मेणकर
कु. वृषाली मेणकर हिला ९४.२ प्रतिशत गुण ! 
        सांगली, १३ जून (वार्ता.) - मिरज येथील अल्फोन्सा शाळेची विद्यार्थिनी कु. वृषाली अजित मेणकर हिला दहावीच्या परीक्षेत ९४.२ प्रतिशत गुण पडले आहेत. कु. वृषाली अभ्यास करण्याच्या अगोदर श्रीगणेश, श्री सरस्वती देवी, तसेच श्रीकृष्ण यांना प्रार्थना करत असे, तसेच परीक्षेअगोदरही वरील देवतांना प्रार्थना केल्याचा लाभ झाला.
       ----------------------------------------
कु. स्वरम जाधव
 सिटी हायस्कूल (सांगली) - येथील कु. स्वरम वैभव जाधव याला ९६.८ प्रतिशत गुण मिळाले असून संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. कु. स्वरम हा सिटी हायस्कूलमध्ये प्रथम आला आहे. कु. स्वरम हा अभ्यास करण्यापूर्वी श्रीकृष्णाला माझ्या भोवती तुझ्या नामजपाचे संरक्षण कवच निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना करत असे, तसेच श्रीगणेश आणि श्रीसरस्वती देवी यांना प्रार्थना करून अभ्यास करत असे. कु. स्वरम याने त्याच्या यशाचे श्रेय आई, वडील, आजी आणि सर्व गुरुजनांना दिले आहे.

मधुर पावा !

अधिवक्त्या (सौ.) श्रुति भट
सनातन असे श्रीकृष्णपावा ।
अती मधुर मधुर पावा ।
त्या मधुर पाव्यावरती ।
प.पू. डॉक्टरांनी मधुर
सेवाराग आळवावा ।
अन् अद्भुत मधुर
मग चमत्कार दिसावा ॥ १ ॥
सृष्टीतील श्रीकृष्णसेवक सारे ।
मधुर त्या स्वरांप्रती ।
शीघ्र घेती धावा ।
तिथेचि त्या सकलांसी ।
मिळे मधुर मधुर विसावा ॥ २ ॥
       काही जण पैसेदेऊन दुसर्‍याला मारायला सांगतात; मात्र सरकारमधील हिंदू हिंदूंचेच पैसे मुसलमानांना देऊन हिंदूंनाच अप्रत्यक्षपणे मारायला साहाय्य करतात !

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्र आणि धर्मजागृतीचे कार्य 
करणार्‍यांवर आक्रमण करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !
       सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथील सनातन संस्थेचे ७२ वर्षीय साधक श्री. शशिकांत जोशी यांच्यावर १३ जूनला दैनिक सनातन प्रभातचे वितरण करत असतांना २ समाजकंटकांनी प्राणघातक आक्रमण केले. त्यांच्यावर काठ्यांनी प्रहार करण्यात आला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Hindutvanishtha Dainik Sanatan Prabhatka vitaran karnewale 72 varshiy vyaktipar hindudweshiyoka akraman.
Hinduhitka virodh karnewalehi Asahishnu hai
जागो ! : हिन्दुत्वनिष्ठ दैनिक सनातन प्रभात का वितरण करनेवाले ७२ वर्षीय व्यक्ती पर हिन्दूद्वेषियों का आक्रमण.
हिन्दूहित का विरोध करनेवाले ही असहिष्णु हैं !

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे विषयांपेक्षा 
विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक

कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
परमेश्‍वराशी संपर्क साधण्याएवढी पुण्याई अभावानेच आढळते; म्हणूनच सद्गुरु आवश्यक आहेत;
मात्र त्यांच्याशी संपूर्णपणे एकनिष्ठ रहावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बांगलादेशी हिंदूंना अभय द्या !

संपादकीय 
      बांगलादेशात सध्या धर्मांध आणि इसिसचे आतंकवादी यांनी हिंदूंचा वंशसंहार चालवला आहे. त्यामुळे तेथील हतबल हिंदूंनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदर पसरला आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आता मोदी यांनीच प्रयत्न करावेत, असे त्यांना वाटते. ही मागणी त्यांनी करणे सहाजिकच आहे. जगभरात विखुरलेल्या हिंदूंसाठी भारत हे पितृ राष्ट्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्यावर भारताने पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी स्वाभाविक भावना त्यांच्यात असते. बांगलादेशातील हिंदूंप्रमाणे पाकमधील हिंदूही त्यांना भारतात आश्रय मिळावा, यासाठी आस लावून बसले आहेत. काही दिवसांपूर्वी मलेशियातील हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी केली होती. ख्रिस्ती, मुसलमान यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्रे आहेत; मात्र हिंदूंसाठी नाही.

जिहादला नाकारण्याचा आत्मघात !

संपादकीय 
      अमेरिकेतील ओरलँडो येथील समलैंगिक लोकांच्या क्लबवर जिहादी आतंकवाद्याने केलेल्या आक्रमणात ५० जण ठार झाले. ९/११ नंतर अमेरिकेवर झालेले हे सर्वांत मोठे आतंकवादी आक्रमण. असे असले, तरी यात मोठा भेद म्हणजे ९/११ चे आक्रमण हे बाहेरील लोकांनी अमेरिकेत घुसून केलेले आक्रमण होते, तर ओरलँडो येथील नरसंहार हा अमेरिकेतील जिहादी नागरिकाने केला आहे. सीएन्एन् वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार पीटर बर्गन यांनी याविषयी विस्तृत विश्‍लेषण केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn