Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

गुरुदेव रानडे यांची आज पुण्यतिथी

बांगलादेशी हिंदूंची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेविषयी दखल घेण्याची विनंती !

बांगलादेशी हिंदूंनी पंतप्रधान मोदी यांना केलेली सुरक्षेविषयीची विनंती मान्य 
करणे बहुसंख्य हिंदूंच्या भारतीय शासनाचे नैतिक कर्तव्य ठरते. त्यासाठी 
अगोदर भारतीय हिंदूही सुरक्षित आहेत, याची खात्री सरकारला करावी लागेल !
    कोलकाता - बांगलादेशमध्ये हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. त्या संदर्भात तेथील हिंदूंनी बहुसंख्य हिंदू असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेविषयी दखल घेण्याची विनंती केली आहे.
१. बांगलादेश हिंदु बुद्धिस्ट ख्रिश्‍चन युनिटी काऊन्सिलचे सरचिटणीस आणि मानवाधिकार कार्यकर्ते राणा दासगुप्ता यांनी म्हटले आहे की, बांगलादेशात धर्मांध आणि जमात संघटना हिंदूंचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला वाटते की, हिंदू बहुसंख्य असल्यामुळे भारताने यासंदर्भात काही केले पाहिजे. आम्हाला पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहेत. त्यांनी पाऊल उचलले पाहिजे आणि बांगलादेश सरकारकडे सूत्र उपस्थित केले पाहिजे. तसेच हिंदूंच्या सुरक्षेची हमी घेतली पाहिजे. भारतीय उपमहाद्वीपमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल, तर हिंदूंचे रक्षण करणे आवश्यक आहे. नाहीतर बांगलादेश कट्टरतावादी देश होईल.

बांगलादेशमध्ये ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक !

हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात बांगलादेश पोलिसांची मोहीम
   ढाका - गेल्या ५ महिन्यांत बांगलादेशात झालेल्या ४० हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांनी मोहीम राबवली असून गेल्या २ दिवसांत देशभरातून ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक करण्यात आली आहे. हिंदूंवर आक्रमण करणार्‍या प्रत्येकाला कठोर शिक्षा करू, असा निर्धार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केला आहे.
१. पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे की, बांगलादेशसारख्या छोट्या देशात गुन्हेगार कुठेही दडून बसले, तरी त्यांना शोधणे तितकेसे अवघड नाही. आमचे पोलीस त्यांना शोधून काढतील आणि हिंसाचाराचा नायनाट करतील.
प्रत्येक गुन्हेगारास आणि बोलवित्या धन्यास कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. अशा वेळी नागरिकांनी निष्क्रीय न रहाता आक्रमणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न करावा. बहुतेक आक्रमणकर्ते दुचाकीवरून येतात. अशा वेळी नागरिकांनी पुढे येऊन त्यांना पकडले पाहिजे. शासन आणि पोलीस तुमच्या पाठीशी असेल.

कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणीही डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची चौकशी करणार ! - अपर पोलीस महासंचालक संजयकुमार

चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा पोलिसांचा प्रकार !
जसे धर्मद्रोह्यांच्या आरोपांतून कांची पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती निर्दोष सुटले, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील आरोपही खोटे ठरले, त्याप्रमाणे आगामी काळात सनातनचेही निर्दोषत्व सिद्ध होईल !
कोल्हापूर, १२ जून (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केलेले आधुनिक वैद्य वीरेंद्रसिंह तावडे यांचा कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असल्याविषयी काही महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाचे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर कॉ. पानसरे हत्येसंबंधी आधुनिक वैद्य तावडे यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहोत, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी ११ जून या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या अन्वेषणावर आम्ही तिन्ही अन्वेषण यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहोत. कॉ. पानसरे हत्येसंबंधी आधुनिक वैद्य तावडे यांच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी करणार आहोत, असे ते म्हणाले.

सनातनच्या आश्रमाला संरक्षण पुरवणार्‍या महाराष्ट्र आणि गोवा पोलिसांचे आभार !

    सनातनविरोधकांनी सनातनच्या आश्रमात घुसून कोम्बिंग ऑपरेशन करण्याची धमकी दिली होती. त्या संदर्भात सनातनविरोधकांना गोव्यात प्रवेशबंदी करावी, तसेच सनातन आश्रमाला संरक्षण पुरवावे, अशी मागणी सनातन संस्थेच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही राज्यांतील पोलिसांनी सनातनच्या विविध आश्रमांना संरक्षण पुरवले. यासाठी पोलिसांचे आभार !

(म्हणे) श्रमिक मुक्ती दलामुळे सनातनच्या आरोपी साधकांना पकडण्यात पोलिसांना यश !

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांची गरळओक
  • ५ सप्टेंबरपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन थांबवले !
  • यावरून पोलीस पुरोगाम्यांच्या हातचे बाहुले असल्याप्रमाणे वागत आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल काय ? पोलिसांवर दबाव आणून राष्ट्र आणि धर्मप्रेमी सनातनला गोवण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदुद्वेष्ट्या पुरोगाम्यांवर भाजप शासन काही कारवाई करणार का कि याकडे दुर्लक्ष करणार ?
    कोल्हापूर, १२ जून (वार्ता.) - ज्या ब्राह्मणी विचारांनी बुद्ध, तुकाराम, ज्ञानोबा, आंबेडकर संपवले, त्यांनीच आज डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांना संपवले आहे. आज आम्हा कष्टकरणार्‍यांचा एकेक नेता अशाच पद्धतीने संपवला जात आहे. ते चळवळीला परवडणारे नाही. आम्ही चौथा खून होऊ देणार नाही. शासनाने आरोपींना पकडण्यासाठी योग्य पाऊल न उचलल्यास आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करणारच आहोत, अशी गरळओक श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली.
    ११ जून या दिवशी येथील शाहू स्मारक येथे दुपारी २ वाजता श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी पक्ष यांच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या मेळाव्यात कॉ. संपत देसाई, अधिवक्ता पंडितराव सडोलीकर, डॉ. ज.रा दाभोळे, मोहन यादव, आनंदराव पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्याला प्रा. विश्‍वासराव देशमुख, डी.के. बोडके, डॉ. सुनील पाटील, नंदकुमार गोंधळी आदी उपस्थित होते.

इफ्तारच्या आधी जेवल्याने पाकमध्ये ९० वर्षीय हिंदु वृद्धाला मारहाण !

भारतातील पुरोगामी आणि निधर्मी यावर काही बोलणार नाहीत; 
कारण मारणारे मुसलमान, तर मार खाणारा हिंदु आहे ! 
पाकमधील मुसलमानांचा सर्वधर्मसमभाव ! 
     इस्लामाबाद - पाकमधील सिंधमध्ये इफ्तारच्या आधी अन्नसेवन केल्यामुळे एका ९० पेक्षा अधिक वय असलेल्या हिंदु नागरिकाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. (इफ्तार हे मुसलमानांचे व्रत आहे. त्याच्याशी हिंदूंचा काहीही संबंध नाही. तरीही पाकमध्ये हिंदूंवर असे अत्याचार करण्यात येतात. भारतात दादरीच्या प्रकरणावरून हिंदूंना असहिष्णु ठरवणारे आणि पुरस्कार परत करणारे पाकमधील या घटनेचा निषेध करणार कि नाही ? कि पाकमधील धर्मांधांना सहिष्णु म्हणणार ? - संपादक)

जेएन्यूतील देशविरोधी घोषणाबाजीचे व्हिडिओ खरे !

     नवी देहली - येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूत) ९ फेब्रुवारीच्या रात्री महंमद अफझलच्या फाशीच्या स्मरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. या वेळी चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रीकरण खरे असल्याचे सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सांगितले आहे. पोलीस आयुक्त (विशेष दल) अरविंद दीप यांनी या संदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे; मात्र अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

गोव्यातील पोर्तुगीज दूतावास देहलीला स्थलांतरित करा ! - सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री, गोवा

अशी प्रखर राष्ट्रप्रेमी मागणी करण्याचे धाडस अन्य नेते दाखवतील का ? 
गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाचे प्रकरण !
श्री. सुदिन ढवळीकर
      पणजी - गोमंतकीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व घेण्यापासून रोखण्यासाठी गोव्यातील पोर्तुगीज दूतावास देहलीला स्थलांतरित करावा, अशी मागणी गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी दुसर्‍यांदा केली आहे. मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी अशी मागणी यापूर्वीही केली होती. दुहेरी नागरिकत्वाच्या विषयावर भाजपने मतांसाठी झुकते माप घेतले असतांना शासनाच्या घटक पक्षातील मगो पक्षाने दुहेरी नागरिकत्व देण्यास विरोध केला आहे. मंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, गोव्यात सध्या अन्य राज्यांतून आलेले ५ लक्ष लोक रहात आहेत. अशा परिस्थितीत गोमंतकीय पोर्तुगीज नागरिकत्व घेत गेले, तर अशाने गोव्यात मूळ गोमंतकीय नागरिक शिल्लक रहाणार नाहीत.

(म्हणे) हिंसेचे समर्थन करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणा !

अंनिसचा कांगावा चालूच !
    सनातनने कधीही हिंसेचे समर्थन केलेले नाही. उलट समाजात शांतता नांदावी, यासाठी सनातन साधनेचे आणि धर्माचरणाचे महत्त्व सर्वांना पटवून सांगते; मात्र हे जाणून न घेता सनातनवर धादांत खोटे आरोप करून अंनिसवालेच वैचारिक आतंकवाद पसरवत आहेत. यासाठी अंनिसवरच आधी कारवाई केली पाहिजे, अशी कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?
    सांगली, १२ जून - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली आहे. त्यामुळे हिंसेचे समर्थन करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणावी, तसेच खुनामागे असणार्‍या मास्टर माईंडला देशासमोर आणावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकाद्वारे केली आहे. (डॉ. दाभोलकर प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉ. तावडे यांच्यावर अद्याप कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. असे असतांना हिंसेचे समर्थन करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणावी, अशी मागणी करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर लावण्याचा प्रकार आहे ! - संपादक)

महिलांच्या प्रवेशाचा आदेश मागे घेण्यासाठीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !
श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण
    मुंबई, १२ जून - श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका ठाणे येथील समाजसेविका सुनीता पाटील यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने १० जून या दिवशी फेटाळून लावली. या वेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाघेला यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाटील यांना अशी याचिका प्रविष्ट करण्याचा अधिकार नाही. ज्या धार्मिकस्थळांंमध्ये पुरुषांना प्रवेश आहे, अशा धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करण्याचा हक्क महिलांनाही आहे. महिलांच्या या हक्काचे रक्षण करण्याचे कर्तव्य राज्यशासनाचे आहे, असा निर्णय सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि अधिवक्त्या नीलिमा वर्तक यांच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिला होता.

बालकांवरील लैंगिक शोषणाचे प्रकार नियंत्रणात ! - दिलीप परुळेकर, पर्यटनमंत्री, गोवा

नियंत्रण नव्हे, तर लैंगिक शोषण होणार नाही, यासाठी शासनाने कृती करावी !
     पणजी, १२ जून (वार्ता.) - पर्यटन व्यवसाय असलेल्या प्रत्येक ठिकाणी बालकांच्या शोषणाचे अपप्रकार चालू असतातच. गोव्यात अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत. बालकांच्या लैंगिक शोषणाविषयीचे (पिडोफिलिया) सत्य कुठलेही पर्यटन व्यवसाय असलेले राष्ट्र नाकारू शकत नाही; मात्र गोव्यात आम्ही असे प्रकार नियंत्रणात आणत आहोत, असे गोव्याचे पर्यटनमंत्री तथा महिला अन् बालकल्याणमंत्री दिलीप परुळेकर म्हणाले. गोवा राज्य बाल अधिकार रक्षण आयोगाच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलतांना मंत्री परुळेकर यांनी हे मत व्यक्त केले.गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

खोतीगाव येथे २००९ या वर्षी दंगा केल्याचे प्रकरण !
     पणजी - खोतीगाव येथील अभयारण्यात २००९ वर्षी दंगा केल्याच्या प्रकरणी गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर आणि अन्य ७ जण यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी १० जून या दिवशी आरोपपत्र दाखल केले आहे.
      काणकोण येथील प्रथम श्रेणी न्यायालयात भारतीय दंडसंहितेचे कलम १४३, १४७, ४ क्रीडामंत्री तवडकर हे काणकोण तालुक्यातील पैंगीण मतदारसंघाचे आमदार आहेत. खोतीगाव अभयारण्यातील वन विभाग अधिकार्‍यांच्या कार्यालयात घुसून वनअधिकार्‍यांच्या कह्यात असलेल्या दोन व्यक्तींना बळजोरीने सोबत घेऊन गेल्याचा क्रीडामंत्री तवडकर आणि अन्य ७ जणांवर आरोप आहे.
कलंकित क्रीडामंत्री तवडकर यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे ! - गोवा फॉरवर्ड पक्ष
     कलंकित झालेले क्रीडामंत्री तवडकर यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे तन्वीर खतीब यांनी म्हटले आहे की, आरोप असलेले मंत्री तवडकर आता मंत्रीमंडळात राहू शकत नाहीत. मंत्री तवडकर यांनी पदाचा त्यागपत्र न दिल्यास मुख्यमंत्री पार्सेकर यांनी त्यांना मंत्रीमंडळातून डच्चू द्यावा.वैष्णोदेवी मंदिरावर आतंकवादी आक्रमणाचे सावट !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
     जम्मू - येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. १० जूनच्या रात्री येथे दोन जणांना सैन्याच्या गणवेशात संशयास्पदरित्या वावरतांना पहाण्यात आल्याने हा आदेश देण्यात आला आहे. हे दोघे सैन्याचा गणवेश उतरवून साधे कपडे घालत असल्याचे पहाण्यात आले. यातील एकाने गणवेश आणि बूट येथे फेकून दिले, तर दुसर्‍याने बॅगेत ठेवले. कदाचित् हे सैनिकही असू शकतील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर सैनिक आणि पोलीस यांना सेवारत नसतांना गणवेश घालून वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी जाऊ नये, असा आदेश देण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून त्या दोघा संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

चारचाकीच्या बोनेटवर कावळा बसल्याने ३५ लाखांची नवीन गाडी घेतली !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अंधश्रद्धा !
  • राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी सिद्धरामय्या प्रयत्नशील आहेत; मात्र प्रत्यक्षात त्यांच्यातच अंधश्रद्धा ठासून भरली आहे, हे या घटनेतून उघड होते !
बेंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या गाडीवर २ जूनच्या दिवशी कावळा बसल्यामुळे ३५ लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युन ही नवी गाडी खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. हा कावळा त्यांच्यासाठी अपशकून असल्याने त्यांनी नवीन गाडी घेण्याचा आदेश दिला. सातत्याने अंधश्रद्धेच्या विरुद्ध बोलणारे सिद्धरामय्या यांच्या या आदेशामुळे कर्नाटकातील नागरिकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र कावळा बसण्याचा आणि गाडी बदलण्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यांच्या मते गाडी ३ वर्षे जुनी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी नवी गाडी घेणे आवश्यक होते.

अमेरिकेतील समलैंगिकांच्या नाइट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात २० जण ठार !

    अमेरिकेतील फ्लोरिडामधील पल्स या समलैंगिकांच्या नाइटक्ल्बमध्ये अज्ञाताकडून झालेल्या गोळीबारात २० हून अधिक जण ठार झाल्याचे वृत्त आहेत.

ॐ चे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारा प्रयोग !

प्रयोग १ : A या इंग्रजी अक्षराचा २ मिनिटे उच्चार करून काय वाटते ? ते अनुभवा अन् नंतर पुढील भाग वाचा.
प्रयोग २ : ओऽम् या संस्कृत अक्षराचा २ मिनिटे उच्चार करून काय वाटते ? ते अनुभवा अन् नंतर पुढील भाग वाचा.
--------------------------
प्रयोग १ चे उत्तर
    A या इंग्रजी अक्षराचा २ मिनिटे उच्चार केल्यावर काही क्षणांतच डोके जड होते.
प्रयोग २ चे उत्तर
    ओऽम् या संस्कृत अक्षराचा २ मिनिटे उच्चार केल्यावर मनाला शांत वाटून आनंद जाणवतो, तसेच देहामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण होते.
अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सध्याच्या शासनकर्त्यांनी चालवलेला खोटेपणा !
    योगक्रियांतून ॐ वगळणार्‍या सध्याच्या शासनकर्त्यांना प्राचीन ऋषिमुनींनी सांगितलेले ॐचे महत्त्व मान्य नाही. त्यांना ऋषिमुनींवर विश्‍वास ठेवायचा नसेल, तर त्यांनी ॐचा हा प्रयोग स्वत: करून त्याचे महत्त्व जाणून घ्यावे. अर्थात्, हे महत्त्व त्यांच्या लक्षात आले, तरी अल्पसंख्यांक दुखावतील म्हणून ते हे सत्य स्वीकारणार नाहीत. डोळे उघडे ठेवून प्रकाश पहायचा आणि अंधार आहे, असे सांगायचे असा प्रकार सध्याच्या शासनकर्त्यांनी चालवला आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

सर्व धर्माचार्य, संत, महंत आणि समस्त वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी ! - हिंदुभूषण श्री. श्यामजी महाराज राठोड

डावीकडून ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड, श्री. सुनील घनवट आणि श्री. अभय वर्तक
पुणे येथे सनातन संस्थेची जाहीर जनसंवाद सभा 
      पुणे, १२ जून (वार्ता.) - आज हिंदु संघटना, त्यांचे कार्यकर्ते आणि संत यांना लक्ष्य केले जात आहे, हे दुर्दैव आहे. या सर्वांमागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. सनातन संस्थेच्या विरोधात जे काही वातावरण निर्माण केले जात आहे, ते हिंदुद्वेषापोटीच ! सनातन संस्था ही राष्ट्रीय आणि धार्मिक भावना जागृत करण्याचे कार्य करत आहे. त्या कार्याचे आम्ही समर्थन करतो. आम्ही सर्व धर्माचार्य, संत, महंत आणि समस्त वारकरी संप्रदाय सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत, असे आश्‍वासक उद्गार राष्ट्रीय युवा क्रांतीकारी, प्रखर हिंदु प्रवक्ता हिंदुभूषण श्री. श्यामजी महाराज राठोड यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने १२ जून या दिवशी येथील वाळवेकर लॉन्समध्ये आयोजित केलेल्या जनसंवाद सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते. या सभेला ३२५ हून अधिक धर्माभिमानी आणि सनातनचे हितचिंतक यांची उपस्थिती होती.

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकमधून हवालामार्गे कोट्यवधी रुपयांचा पुरवठा !

पाकमधील मुशर्रफसारख्या नेत्यांसमवेत बसून मोदी शासनावर टीका करणारे मणिशंकर अय्यर 
यांच्यासारखे काँग्रेसी नेते आणि अन्य पाकप्रेमी पुरोगामी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
पाकच्या विरोधात आणखी किती पुरावे सापडल्यावर सरकार त्याला धडा शिकवणार ?
     नवी देहली - काश्मीरमधील जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी पाक आणि अन्य मध्यपूर्वेतील देशांतून कोट्यवधी रुपये हवालामार्गे काश्मीरमध्ये येत आहेत. फुटीरतावादास प्रोत्साहन आणि काश्मीरमधील नव्या पिढीमध्ये देशविरोधी विचारसरणीचे बीज रोवण्याचे काम या पैशांमधून करण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
१. गेल्या वर्षभरापासून काश्मीरमध्ये फुटीरतावादी गटांकडून भारतविरोधी प्रदर्शन करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्य चिंतित आहे. (आतंकवादाच्या मुळाशी असलेली जिहादी मानसिकता आणि तिला खतपाणी घालणारी विचारसरणी जोपर्यंत नष्ट केली जात नाही, तोपर्यंत काश्मीर अशा प्रकारे धुमसतच राहील, हे भारतीय राज्यकर्त्यांना लक्षात येईल, तो सुदिन ! - संपादक)

राज्यात म्हशींची संख्या ७ लक्ष, तर शेळ्यांची संख्या १२ लक्षाने घटली

गोवंश हत्या बंदीमुळे पशूवधगृहात म्हशींची हत्या !
एक दिवस सर्व प्रकारच्या प्राण्यांची केवळ पुस्तकातील 
चित्रे दाखवण्याची वेळ आल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
    पुणे, १२ जून - राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर सशक्त म्हशींची पशूवधगृहात हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्प दूध आणि भाकड काळ मोठा असल्याने राज्यातील म्हशींच्या संख्येत गेल्या ५ वर्षांत ७ लक्ष, तर शेळ्यांच्या संख्येत १८ टक्के, म्हणजे १२ लक्ष घट झाली आहे. (राज्यातील घटते पशूधन हे चिंताजनक असून त्याच्या संवर्धनासाठी पशुसंवर्धन खाते काही प्रयत्न करणार आहे का ? सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या हितसंवर्धनासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - संपादक)
१. गोवंश हत्या बंदीमुळे सध्या राज्यात बैल, गाय, वासरू यांची हत्या करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मांसासाठी पर्याय म्हणून सध्या म्हैस, पारडू, रेडा या प्राण्यांचा उपयोग होत आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावीच मांसाहार करणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. - संपादक)

पाक समर्थकांकडून ७ भारतीय दूतावासांची संकेतस्थळे हॅक !

सरकारची ढिसाळ ऑनलाइन सुरक्षाव्यवस्था !
     नवी देहली - पाकच्या समर्थकांनी ७ भारतीय दूतावासांची संकेतस्थळे हॅक केली असल्याची खळबळजनक महिती समोर आली आहे. ही माहिती उघड झाल्यावर ७ पैकी ६ संकेतस्थळांवर भारताने नियंत्रण मिळवले असले, तरी ताजकिस्तान येथील भारतीय दूतावासाचे संकेतस्थळ नियंत्रणात घेता येऊ न शकल्याने तूर्तास ते बंद करण्यात आले आहे. दुशान्बे, ताजकिस्तान येथील भारतीय दूतावासाचे संकेतस्थळ आम्ही नियंत्रणात घेतले आहे. भारत सरकारने आमच्या नादाला लागू नये. पाकिस्तानी सेना जिंदाबाद ! पाकची शक्ती अनुभवा !, अशी माहिती हे संकेतस्थळ हॅक करणार्‍यांनी लिहिली होती. 
     अन्य ६ संकेतस्थळांमध्ये अंकारा, तुर्की; एथेन्स, ग्रीस; मेक्सिको सिटी, मेक्सिको; साओ पाओलो, ब्राझिल; बुचारेस्ट, रोमानिया आणि प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका येथील भारतीय दूतावासांच्या संकेतस्थळांचा समावेश आहे. या संकेतस्थळांना आता सरकारने आपल्या नियंत्रणात घेतले आहे.भारत-पाक यांच्यातील शस्त्रसंधींचे उल्लंघन अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून स्वीडनचे अधिकारी नियुक्त !

संयुक्त राष्ट्रांनी उद्दाम पाकला अजूनतरी त्याची जागा दाखवलेली नाही ! 
अशा नियुक्त्यांनी वेगळे काही होईल, अशी आशा नाही ! 
     नवी देहली - भारत-पाक यांच्यातील शस्त्रसंधीचे निरीक्षण करण्याचे काम स्वीडनमधील उच्चस्तरीय सैन्याधिकार्‍यांना मिळाले आहे. स्वीडनचे मेजर जनरल गस्टफ लोदिन यांना संयुक्त राष्ट्राने या कामासाठी प्रमुख म्हणून नेमले आहे. ही नियुक्ती केली आहे. या आधी घानाचे मेजर जनरल डेलाली जॉनसन साकी यांच्याकडे मुख्य सैन्य पर्यवेक्षकाचे दायित्व होते.

छोटा राजन नव्हे, तर हिंदु महासभेचे स्वामी चक्रपाणी यांना मारण्यासाठी आले होते दाऊदचे गुंड !

स्वामी चक्रपाणी यांनी जाळली होती दाऊद इब्राहिमची चारचाकी !
    नवी देहली - कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने छोटा राजन या कुख्यात गुंडाची देहलीच्या तिहार कारागृहात हत्या करण्यासाठी पाठवलेल्या ४ गुंडांना अटक करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते; मात्र चौकशीत हे गुंड छोटा राजन याला नव्हे, तर दाऊदची गाडी लिलावात विकत घेऊन ती सार्वजनिक ठिकाणी जाळणारे हिंदु महासभेचे स्वामी चक्रपाणी यांना ठार करण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर आली आहे. यासाठी या गुंडांना ५ लाख रुपयांची सुपारी दाऊदचा गुंड छोटा शकील याने दिल्याचे उघड झाले आहे. स्वामी यांची हत्या करून देशात दंगली घडवण्याचाही छोटा शकीलचा कट होता. यामागे पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयही आहे.
    स्वामी चक्रपाणी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये मुंबईत झालेल्या लिलावात ही चारचाकी गाडी ३२ सहस्र रुपयांना घेतली होती. आतंकवादाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी स्वामी चक्रपाणी यांनी गाडी जाळल्याचे म्हटले होते.

(म्हणे) सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घाला !

देशात वाढत चाललेल्या आतंकवादाच्या विरोधात साम्यवाद्यांनी कधी आंदोलन केले आहे का ? 
धर्मद्रोही भाकपच्या वतीने निदर्शने 
      कोल्हापूर, १२ जून (वार्ता.) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या हस्तकांवर खुनाच्या आरोपाखाली पोलीस कारवाई होत आहे. अशा धर्मांध आणि देशद्रोही संघटनांवर बंदी घालावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ११ जून या दिवशी मध्यवर्ती बस स्थानकासमोर निदर्शने केली. (केवळ हिंदुद्वेषापोटी साम्यवादी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत ! - संपादक)

(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घाला ! - मुक्ता दाभोलकर यांचा कांगावा

आजपर्यंत कोणतेही न्यायालय अथवा अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्थेला दोषी 
ठरवलेले नसतांना या सर्वांपेक्षा मुक्ता दाभोलकर स्वतःला हुशार समजतात का ?
     सांगली, १२ जून (वार्ता.) - आम्ही न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळेच न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांवर ताशेरे ओढले. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांना तपास करून ठोस पुराव्यांच्या आधारेच सनातनचे डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक केली आहे. सनातन संस्था नेहमीच हिंसाचार आणि आतंकवाद यांना खतपाणी घालते. शासनाकडे जर सनातन संस्थेच्या विरोधात ठोस पुरावे आहेत, तर त्या पुराव्यांकडे शासन कोणत्या नजरेतून पहाते, ते शासनाने स्पष्ट करावे. हे पुरावे ठोस असल्यास सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केली. (आजपर्यंत कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने वा न्यायालयाने कोणत्याही प्रकारणात सनातन संस्था दोषी आहे, असे सांगितले नाही. तसेच आजपर्यंत हिंदुद्वेषातून तत्कालीन काँग्रेस शासनाने सनातन बंदीचे अहवालही ठोस पुरावेच नसल्याने फुसके बार ठरले आहेत. त्यामुळे केवळ सनातन द्वेषातून मुक्ता दाभोलकर यांनी सनातन बंदीचा कांगावा करू नये ! - संपादक)

सनातनच्या मागे संपूर्ण हिंदूंनी उभे राहावे ! - ठाकूर अजयसिंह सेंगर, महाराणा प्रताप बटालियन

प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे ठाकूर अजयसिंह सेंगर यांचे आभार !
     पनवेल - हिंदूंचे शासन यावे; म्हणून हिंदूंनी भाजपला मतदान केले; मात्र आज हिंदूंची मुस्कटदाबी होत आहे. हिंदूंना खोट्या आरोपाखाली अटक केली जात आहे, ही दु:खद बाब आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेचा निषेध महाराणा प्रताप बटालियन या कट्टर हिंदु संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे, असे बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. 
     या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले, डॉ. दाभोलकर अथवा कलबुर्गी हे काही देशातील महान व्यक्तीमत्व नव्हते. त्यांनी हिंदूूंच्या भावना दुखवण्याचे कार्य केले. अशा व्यक्तींकरिता सरकारने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा (सीबीआयचा) उपायोग करू नये. निष्पाप हिंदूंचा कोप हा भाजपला नवी देहली आणि बिहार, तसेच अन्य राज्यांत (निवडणुकीत) भोवला. हिंदूंच्या मतावर निवडून आलेल्यांनी हिंदूंचे हित जोपसावे आणि फाळणीच्या करारानुसार हे राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या आजीचा मृतदेह पुरण्यास केरळच्या चर्चने अनुमती नाकारली !

हिंदूशी विवाह करणार्‍या ख्रिस्ती महिलेचा मरणानंतरही दुःस्वास करणारे ख्रिस्ती म्हणे समतावादी !
     पाटलीपुत्र (पाटणा) - अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या ९४ वर्षीय आजीचे ३ जूनला निधन झाले होते. मधु जोत्सना अखौरी असे नाव असलेल्या प्रियांकाच्या आजी स्वातंत्र्यसैनिक आणि जमदेशपूर शहराच्या माजी आमदार होत्या. ती लग्नापूर्वी मेरी जॉन नावाची ख्रिस्ती महिला होती. तिची अंतिम इच्छा होती की, तिचा मृतदेह तिच्या केरळमधील कोट्टायाम येथील कुमाराकॉम या मूळ गावातील सेंट जॉन अट्टमंगलम् चर्चच्या कब्रस्तानात पुरला जावा. (अन्य धर्मियांनी हिंदु धर्मातील व्यक्तीशी विवाह केला, तरी ते त्यांची त्यांच्या मूळ धर्माशी असलेली नाळ तोडत नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक) यासाठी प्रियांका चोप्राने केरळमध्ये जाऊन या चर्चकडे अनुमती मागितली; मात्र चर्चने अनुमती नाकारल्याने अन्यत्रच्या कब्रस्तानात त्यांचा मृतदेह पुरण्यात आला. ही माहिती स्वतः प्रियांका चोप्राने यांनी दिली. चर्चची ही कृती चुकीची असली, तरी आपण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे प्रियांकाने म्हटले.

काश्मीरवर पाकचे किंवा जिहादी आतंकवाद्यांचे नव्हे, तर केवळ खिलाफतचे राज्य असेल ! - इसिस

     नवी देहली - काश्मीरवर पाकचे किंवा लष्कर-ए-तोयबा आदी जिहादी संघटनांचे नव्हे, तर खिलाफतचे राज्य असेल, असे इस्लामिक स्टेटचे धोरण असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने इसिसच्या अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे म्हटले आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून झालेल्या इसिसच्या आतंकवाद्यांच्या संभाषणात असे सांगण्यात आले आहे, असे या आरोपपत्रात म्हटले आहे. काश्मीर हे इस्लामिक स्टेटचे आहे आणि असेल, असे यात विधान करण्यात आले होते. तसेच आपल्याला काश्मीरसाठी दोघांशी लढावे लागणार आहे. एक म्हणजे काफिरांच्या सैन्याशी (भारतियांशी) आणि दुसरे पाकपुरस्कृत आतंकवाद्यांशी, म्हणजे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिजबुल मुजाहिदीन आदींशी. या संघटना कधीही इसिसमध्ये समाविष्ट होणार नाहीत, असेही या आतंकवाद्यांत संभाषण झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. 
     या आरोपपत्रात असाही उल्लेख आहे की, विश्‍व हिंदु परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या निधनाचा या आतंकवाद्यांनी आनंद साजरा केला होता. ही चांगली बातमी असल्याचे त्यांनी म्हटले होते.आयुर्वेदाला जे सहस्रो वर्षांपासून ज्ञात आहे, ते आता कळणारे पाश्‍चात्त्य संशोधक !

        तूप आणि लोणी यांमुळे हृदयविकार बळावतो, हा आतापर्यंत असलेला समज खोटा ठरवणारे संशोधन केंब्रिज विद्यापीठ आणि ब्रिटीश हार्ट फाउंडेशन यांच्या वैज्ञानिकांनी केले आहे. वैज्ञानिकांनी १८ देशांतील सहा लाख लोकांच्या एकूण संपृक्त मेदाम्लांच्या सेवनाचे प्रमाण पाहिले आणि जैवनिदर्शकाच्या साहाय्याने त्याचे रक्तातील स्थान आणि इतर बाबी तपासल्या असता त्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवत असल्याची बाब खरी नसल्याचे त्यांना दिसून आले. 

इसिसने इराकमधील ३ सहस्र वर्षे प्राचीन बॅबीलॉन संस्कृतीचे मंदिर पाडले !

     बगदाद - पृथ्वीवरील प्राचीन संस्कृतीपैकी एक असणार्‍या बॅबीलॉन संस्कृतीचे एक मंदिर इसिसच्या आतंकवाद्यांनी पाडले. ३ सहस्र वर्षे प्राचीन असणारे हे मंदिर बुध्दीच्या देवतेचे होते, अशी लोकांची श्रद्धा होती. हे मंदिर इराकच्या असीरियन शहराजवळील निमरुद येथे होते. मंदिर पाडल्याचा एक व्हीडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे. मात्र मंदिर कोणत्या दिवशी पाडण्यात आले, हे स्पष्ट झालेले नाही. इसिस, तालिबान आदी जिहादी आतंकवाद्यांनी पुरातन संस्कृतीच्या वास्तू पाडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

युरोपवर अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याचा इसिसचा प्रयत्न !

     लंडन - इसिस युरोपवर अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आहे, असा दावा एका आंतरराष्ट्रीय गटाने केला आहे. यासाठी इसिस सातत्याने अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. इसिसने आतापर्यंत सिरियामध्ये रासायनिक आक्रमणे केली आहेत. त्याच्या पुढे जाऊन अण्वस्त्रांचे आक्रमण करण्याच्या त्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे इसिसकडून फ्रान्समध्ये होणार्‍या युरो चषक फूटबॉल स्पर्धेवरही आक्रमण करण्याची शक्यता आहे. जळगाव येथे हिंदूंच्या विरोधामुळे धर्मांधांनी घरावरील भोंगे काढले !

पोलिसांचे हिंदूंवरच दबावतंत्र !
     धरणगाव (जिल्हा जळगाव) - जांभोरा या धर्मांधांची केवळ १५ घरे असलेल्या गावात एका धर्मांधाने त्याच्या घरावर रात्री २ वाजता भोंगे लावले आणि त्याच्यावर सकाळी बांग देण्यास आरंभ केला. या वेळी गावातील सर्व हिंदूंना त्यांच्या गावात बांगेचा आवाज कसा काय येत आहे, असा प्रश्‍न पडला. गावातील ५०-६० तरुण हिंदु मुलांनी धर्मांधांना त्याविषयी विचारून भोंगे काढण्यास सांगितले; मात्र मुसलमानांनी भोंगे काढण्यास नकार दिला. त्यानंतर हिंदूंनी पोलिसांना बोलावले; मात्र पोलीस हिंदूंचेे ऐकून घेत नव्हते. उलट हिंदु मुलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. हिंदूंना एकत्र येण्यास बंदी करत होते. जमलेल्या सर्व हिंदु मुलांचे चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे काही तरुण घाबरले; पण शेवटी हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे धर्मांधांना भोंगे काढणे भाग पडले

स्त्रियांनो, आपल्या शीलातच श्रेष्ठत्व आणि सौंदर्य आहे, हे जाणा ! - सौ. मीना रावत, महिला राज्य कार्यकारणी सदस्या, पतंजली योग समिती

डावीकडून सौ. नंदिनी सुर्वे, सौ. तन्वी सरमळकर, 
सौ. मीना रावत, कु. प्रतीक्षा कोरगावकर
     कल्याण, १२ जून (वार्ता.) - नारी म्हणजे जो किसी से ना हरी वह नारी म्हणून तिला नारी म्हणतात. शौर्य आणि पराक्रम यांचे स्वरूप झाशीची राणी आहे; पण आजच्या स्त्रिया पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्याने तिला विसरल्या आहेत. आपली भाषा, वेशभूषा या देवीदेवतांप्रमाणे आहेत; पण त्याविषयी समूजन न घेतल्याने आपणच भारतीय संस्कृतीचा अवमान करत आहोत. इतर देशातील लोकांनी आपले अनुकरण केलेले नाही; पण आपण त्यांचे अनुकरण करतो. आपल्या शीलातच श्रेष्ठत्व आणि सौंदर्य आहे, हे लक्षात घ्या, असे मार्गदर्शन पतंजली योग समितीच्या महिला राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. मीना रावत यांनी केले. राणी लक्ष्मीबाई बलीदानदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आयोजित रणरागिणी महिला शाखेचा येथे आरंभ झाला. त्या वेळी सौ. रावत बोलत होत्या. या कार्यक्रमाला १०० महिला उपस्थित होत्या.

सव्वा तीन कोटी ट्विटर अकाऊंटचे पासवर्ड हॅक झाल्याचा दावा !

     वॉशिंग्टन - जगभरातील जवळपास ३ कोटी २८ लाख ट्विटर अकाऊंटचे पासवर्ड हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे. लिकडसोर्स या संकेतस्थळाकडून अशी माहिती देण्यात येत आहे. हॅकरकडे हे पासवर्ड लिखित स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे; मात्र ट्विटरने पासवर्ड हॅक झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. 

हिंदूच शिल्लक राहिले नाहीत, तर विकासाचा उपयोग काय ? - डॉ. प्रवीण तोगडिया यांची केंद्रशासनावर टीका

      भरूच (गुजरात) - विश्‍व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील जंबुसार येथील एका जाहीर सभेत केंद्रशासनावर टीका केली आहे. ते म्हणाले की, तुम्ही बुलेट ट्रेन आणि स्मार्ट सिटी बनवत आहात; मात्र देशात पुढील काळात हिंदूच उरले नाहीत, तर या बुलेट ट्रेनने कोण प्रवास करणार ?, स्मार्ट सिटीमध्ये कोण रहाणार ?, असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. मोदी शासन सत्तेत असल्यामुळे राममंदिरासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सभेत ५० हिंदु युवकांना धर्मरक्षणाची शपथ देऊन त्रिशुळांचे वाटपही करण्यात आले.
डॉ. तोगडिया म्हणाले की, 
१. हिंदु समाजातील पुरुषांमध्ये नपुंसकत्व वाढल्याने हिंदु समाजाच्या लोकसंख्येत घट होत आहे. 
२. हिंदूची लोकसंख्या वाढवण्यासाठी हिंदूंनी स्वतःच्या घरी जाऊन पुरुषत्वाची उपासना करावी. (हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याऐवजी हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्प संख्याबळ असतांनाही पाच पातशाह्यांना पाणी पाजले होते, हे लक्षात घ्यायला हवे ! - संपादक)


गोहत्या रोखता न येणे हे शासनाचे अपयश ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
      मथुरा - उत्तरप्रदेश, हरियाणा या राज्यांतील काही भागांत, तर आसाम आणि बंगाल या राज्यांत प्रतिदिन मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी केली जात आहे. उघडपणे गोहत्या केली जात आहे. गोहत्याबंदी असतांनाही सरकार ते थांबवू शकत नाही, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केली. जर गोहत्येवर प्रतिबंध आहे, तर लोक त्याचे पालन का करत नाहीत ?, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. 
     दादरी प्रकरणात शंकराचार्य म्हणाले की, जेव्हा एखादा ब्राह्मण मारला जातो, तेव्हा सरकारला असहिष्णुता दिसत नाही; मात्र एखादा अल्पसंख्यांक मारला जातो, तेव्हा सर्व ओरडायला लागतात.कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाच्या कार्यवाहीस प्रारंभ

     कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) - रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाची कार्यवाही १० जूनपासून करण्यात आली आहे. सतत कोसळणार्‍या दरडींनी हैराण झालेल्या कोकण रेल्वेने यंदा पावसाळी आव्हानांसाठी सज्जता ठेवली आहे. यात रोहा ते ठोकूर या मार्गावर ९५० रेल्वे कर्मचार्‍यांकडून दिवसरात्र गस्त घातली जात आहे. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे प्रवाशांच्या सोयीसाठी २४ घंटे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. रेल्वे मार्गावरील सर्व धोकादायक कटिंग आणि दरडींच्या ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोकण रेल्वेच्या वेग मर्यादेवरही नियंत्रण आणण्यात आले आहे. दृश्यमानता कमी असेल, तर रेल्वेचा वेग ४० कि.मी. प्रतिघंटा ठेवावा, अशाही सूचना सर्व रेल्वेचालकांना देण्यात आल्या आहेत.

भोपाळ येथे फेसबूकवर हिंदूंच्या देवतांविषयी विडंबनात्मक पोस्ट करणार्‍या मुसलमान युवकांना अटक !

ढोंगी निधर्मीवादी, पुरोगामी अशा घटनांवर कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
     भोपाळ (मध्यप्रदेश) - येथे फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावर हिंदूंच्या देवतांची अवमानकारक पोस्ट केल्याविषयी आणि तिला लाईक (समर्थन देणे) केल्याविषयी अली हसन जफर-उल शेख आणि अब्दुल कय्युम या युवकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. विडंबनात्मक पोस्ट केल्याप्रकरणी भोपाळमध्ये हिंदूंनी निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निदर्शने का करावी लागतात, तक्रार केल्यानंतर पोलीस थेट कारवाई का करत नाहीत ? - संपादक) पोलीस आयुक्त अरविंद सक्सेना यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत, तसेच भा.दं.वि. कलम २९५, १५३ आणि ६६ नुसार कारवाई केली आहे.

देशात मुसलमान विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वाधिक वाढ !

उच्चशिक्षण घेऊनही मुसलमानांमधील काही तरुण जिहादी 
आतंकवादी होतात, याचा विचार केला पाहिजे !
     नवी देहली - देशात ५ ते १९ वर्षे वयोगटातील मुसलमान विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ष २००१ ते २०११ या कालावधीत ३० टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. अन्य धर्मियांच्या तुलनेत ही वाढ सर्वाधिक आहे. यात मुसलमान विद्यार्थिंनींची संख्या अधिक आहे.
ख्रिस्ती युवक सर्वाधिक बेरोजगार 
     देशात २० ते २९ वर्षे वयोगटातील युवकांच्या बेरोजगारांची संख्या २० टक्के आहे. यात सर्वाधिक म्हणजे २६ टक्के ख्रिस्ती युवक आहेत. ते सुशिक्षित असतांनाही ही स्थिती आहे. 


जगभरात हिंदूंना ताठ मानेने जगता यावे, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! - मलेशियातील अल्पसंख्यांक हिंदूंची मागणी

मलेशियातील हिंदूंना जे कळते, ते भारतातील हिंदूंना कळेल तो सुदिन !
     कुआलालंपूर - मलेशियामध्ये भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली जात आहे. येथे अनेक धर्माचे लोक रहात असले, तरी इस्लाम तेथील प्रमुख धर्म आहे. त्यांच्या अत्याचारांना हिंदूंना सामोरे जावे लागत आहेत. यातूनच हिंदूंच्या रक्षणार्थ भारतात हिंदु राष्ट्र स्थापने होणे आवश्यक आहे, असे येथील हिंदूंना वाटत आहेत. 
मलेशिया येथे अल्पसंख्यांक हिंदूंवर झालेले अत्याचार
१. वर्ष २०१० मधील शासनाच्या जनगणनेतील आकडेवारीनुसार येथे मुसलमान ६१.३ टक्के, बौद्ध १९.८ टक्के, ख्रिस्ती ९.२ टक्के, हिंदु ६.३ टक्के तसेच चिनी आणि इतर धर्मांचे १.३ टक्के आहेत. 
२. मलेशिया अधिकृतरित्या इस्लामी देश असूनही तेथे सर्व धर्म मानण्याचे स्वातंत्र्य असल्याचा दावा करत आहे. येथे नुकतीच ७ सहस्र हिंदूंना धर्मांतर करून मुसलमान करण्याची घटना घडल्यानंतर शासकीय ओळखपत्रांमध्ये हिंदूंना मुसलमान दाखवण्यात आले आहे. धर्मांतराची ही केवळ पहिलीच घटना नाही.

फलक प्रसिद्धीकरता

पंतप्रधान मोदी बांगलादेशी हिंदूंच्या नैसर्गिक अपेक्षेला खरे उतरतील का ?
   बांगलादेशमध्ये हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. त्या संदर्भात तेथील हिंदूंनी बहुसंख्य हिंदू असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेविषयी दखल घेण्याची विनंती केली आहे. मोदींकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshi Hinduoki badhte akramanose raksha ho, is hetu vaha ke Hinduone Modijise vinati ki. - Kya Modiji Hinduoke prati apni pratibaddhata dikhayenge?
जागो ! : बांग्लादेशी हिन्दुआें की बढते आक्रमणों से रक्षा हो, इस हेतु वहां के हिन्दुआें ने मोदीजी से विनती की. - क्या मोदीजी हिन्दुआें के प्रति अपनी प्रतिबद्धता दिखाएंगे ?

भूकंपानंतर नेपाळमधील पीडितांच्या असाहाय्यतेचा लाभ घेऊन धर्मांतराचा कट रचणारे अन्य धर्मीय !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या पंचम 
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
वक्ते - डॉ. उपेंद्र डहाके, उपाध्यक्ष,
भारतीय जनता पक्ष,
कल्याण, महाराष्ट्र.
     रामनाथी, गोवा येथे ११ जून ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी देवभूमी नेपाळ साहाय्यता मोहिमेतील अनुभव ! या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१. नेपाळ हे एक हिंदु राष्ट्र असूनही हिंदु संघटनांचे 
साहाय्य मिळण्यास विलंब होणे 
     एप्रिलच्या अखेरीस आणि मे २०१५ या कालावधीत नेपाळमध्ये शक्तीशाली भूकंप झाल्यावर काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे मानवी तस्करी चालू केली. त्यामुळे नेपाळ सीमेवर शासनाने कायदेशीर प्रक्रिया अवलंबली. त्यातील नियम फार जाचक होते. नेपाळ सीमेवर आम्हाला ४ घंटे थांबावे लागले. मी ९.४.२०१५ या दिवशी काठमांडूमध्ये आलो. नंतर आमचे अभियान चालू झाले. नेपाळमध्ये असणार्‍या हिंदुत्ववादी संघटना, उदा. मानवधर्म सेवा समिती, हिंदू जागरण नेपाल, राष्ट्रीय धर्मसभा नेपाल या आपापल्या परीने काम करत होत्या. जेव्हा हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या सर्वांना एकत्र आणण्यात आले. तेव्हा असे जाणवले की, नेपाळ हे एक हिंदु राष्ट्र आहे; पण हिंदुत्वनिष्ठ संघटना साहाय्याला येण्यास विलंब लावतात.

हिंदु जनजागृती समितीचा कोकण विभागाचा (मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा) मार्च २०१६ मधील प्रसारकार्याचा आढावा !

      मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्माभिमान्यांना वैयक्तिक संपर्क, हिंदु धर्मजागृती सभा, धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने प्रसार, वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांत सहभाग आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन यांद्वारे धर्मकार्य वाढण्यास साहाय्य झाले. या जिल्ह्यांचा मार्च मासातील धर्मकार्याचा पुढीलप्रमाणे आहे. 
१. मुंबई जिल्हा
१ अ. धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा धर्मप्रसार 
कार्यातील अनुकरणीय सहभाग !
१ अ १. राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत धर्माभिमान्यांचा अधिकाधिक सहभाग ! : जोगेश्‍वरी येथील हिंदु धर्मजागृती सभेनंतर कृतीशील झालेल्या धर्माभिमान्यांनी १३ मार्च या दिवशी मुंबईतील जोगेश्‍वरी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या सेवेत कृतीशील सहभाग घेतला. पोलिसांकडून अनुमती घेण्याची सेवा सर्वश्री संतोष कदम, मिलिंद कदम आणि सचिन चव्हाण यांनी केली, तर ध्वनीक्षेपक यंत्रणेची व्यवस्था श्री. सचिन चव्हाण यांनी पाहिली. आंदोलनाचा प्रसार सौ. संचिता ठाकूर, सौ. नम्रता सावंत, सर्वश्री सुनील ठाकूर, संजय धुरी, संतोष कदम, मिलिंद कदम, सचिन चव्हाण, महेश दुमरालीया आणि प्रदीप कदम यांनी केला. आंदोलनाच्या सिद्धतेत फलक सिद्ध करणे, फलकप्रसिद्धी, सामाजिक संकेस्थळावर (सोशल मिडियावर) प्रसिद्धी, घोषणा देणे, भाषण देणे, स्वाक्षरी चळवळ राबवणे या सर्व सेवा धर्माभिमान्यांनी केल्या.

मुंबई-पुणे अपघाती महामार्ग

     मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेलच्या शिवकर गावाजवळ खाजगी बसने दोन वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन लहान मुलींसह १७ जणांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे महामार्ग हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यास मानवी चुका, रस्त्यांच्या रचनेसंबंधी काही तांत्रिक गोष्टी कारणीभूत आहेत. वाहतूक विभागाने या महामार्गावरील अपघात क्षेत्राचा अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळास दिलेला आहे. तो देऊनही त्याविषयी त्वरित कार्यवाही होण्यास चालढकलपणा का होत आहे ? याची सर्वप्रथम चौकशी होईल का ? लक्षात आलेल्या अडचणीवर वेळीच मात केली गेली असती, तर आज अडचणींचा ढीग बनून त्याचे ओझे बनले नसते.

मुलांनो, या चांगल्या सवयी अंगी बाणवा !

बालकांसाठी परिपाठ !
अ. खोकतांना आणि शिंकतांना तोंडावर / नाकावर रूमाल धरावा.
आ. मार्गावर (रस्त्यावर) थुंकू नये किंवा घाण टाकू नये.
इ. मिळालेला खाऊ सर्वांना वाटावा, म्हणजे स्वतःच्या सुखात इतरांनाही सहभागी करून घ्यावे.
ई. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ यांचे पालन करावे.
उ. घरातून बाहेर पडतांना प्रत्येक वेळी देवतांना नमस्कार करावा आणि मोठ्या व्यक्तींना कोठे जात आहे, ते सांगावे.
ऊ. कोणी भेटल्यावर हसतमुखाने नमस्कार करावा. सर्वांशी नम्रतेने वागावे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)हिंदुत्व भारताचा आत्माच आहे ! (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)
हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या ! 
English : www.hindujagruti.org, हिंदी : www.hindujagruti.org/hindi/

एकही राज्यकर्ता हिंदूंच्या बाजूने नाही !

हिंदूंसाठी धोक्याची घंटा !
     एकही राज्यकर्ता हिंदूंच्या बाजूने नाही. सर्वजण विकासाची सूत्रे मांडत आहेत. धर्माच्या बाजूने कोणी नाही. अशी भयाण परिस्थिती आहे. हिंदूंमध्ये धर्माचरणाचा अभाव आहे. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. - अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

जिहादी आतंकवाद्यांपासून हिंदूंना आणि कसायांपासून गायींना न वाचवणारे सरकार बेडकांना वाचवण्यासाठी मात्र तत्पर !

   गोवा राज्याच्या वनखात्याच्या अधिकार्‍यांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत बेडूक पकडून ते विकण्यासाठी नेणार्‍या ५ जणांना अटक केली. पारोडा आणि चंद्रावाडो, फातोर्डा येथे केलेल्या कारवाईत १०० बेडकांची सुटका करण्यात आली. मान्सूनमध्ये बाहेर पडणारे बेडूक पकडून ते खाण्याचे प्रकार गोव्यात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात घडतात. हॉटेलमध्ये अशा बेडकांपासून बनवलेले पदार्थ अवैधपणे ठेवले जातात. बेडकांचे रक्षण करण्याविषयी वनखात्याने विशेष जागृती मोहीम राबवली आहे. यासाठी विविध ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. तसेच हत्या करणार्‍यांवर कारवाईही केली जात आहे.

जिवाने कर्तेपणा अर्पण करून प्रार्थना आणि कृतज्ञता यांच्या बळावर अहंकाराचा केलेला पराजय !

सौ. शालिनी मराठे
      दैनिक सनातन प्रभातमध्ये आपले काहीतरी लिखाण आले आहे, असे कळताच अहं उठला आणि धावतच भोजनकक्षात गेला. तेथे दैनिक सनातन प्रभात घेऊन आपला लेख (टीचभर लिखाण) वाचू लागला आणि स्वतःच स्वतःशी म्हणाला, किती छान लिहिले आहे ना मी ! त्याने त्या दिवशी दैनिकातील इतर (संतांचे लेख, चौकटी, अनुभूती, महत्त्वाचे लेख आदींपैकी) एकही ओळ वाचली नाही.
      आज तो ऐटीत चालत होता. साधकांकडे पहातांना कुणी आपल्या लेखाविषयी बोलत आहे का ?, या हेेतूने त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. या दृष्टीने त्याची सतर्कता फारच वाढली होती. कुणीतरी आपल्या लेखाविषयी बोलावे; म्हणून त्याने २ - ३ साधकांना विचारले, आजचे दैनिक फारच छान आहे ना ! वाचले का ? तेव्हा कुणीतरी एका साधिकेने म्हटले, आज तुमचा लेख आला आहे. तेवढ्यानेच उत्साहीत होऊन अहं म्हणाला, तुम्ही वाचला का ? चांगला आहे ना ! मीच लिहिला तो लेख. तो साधिकेच्या अभिप्रायाची वाट पहाण्यासही सिद्ध नव्हता, इतका त्याचा उतावळेपणा वाढला होता.
      त्या वेळी जिवाला आज अहंकार फारच वाढला आहे, हीच वेळ आहे याला खडसवण्याची, नाहीतर हा माझ्या साधनेचे पूर्ण वाटोळे करील, याची जाणीव झाली. तेव्हा जिवाचे अहंशी पुढील संभाषण झाले.

प.पू. डॉक्टरांना हळूवार स्पर्शाच्या आलेल्या अनुभूतीमागील शास्त्र

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त... 
(पू.) सौ. अंजली गाडगीळ
 १. प.पू. डॉक्टरांना पायाला 
हळूवार स्पर्श झाल्याचे ३ वेळा जाणवणे
       आज सकाळी अंघोळ झाल्यावर अंग पुसल्यावर डाव्या पायाच्या घोट्याच्या बाहेरच्या बाजूला घोट्यापासून १२ - १३ सें.मी. वरून घोट्याकडे पिसाचा स्पर्श व्हावा, तसा एक हळूवार स्पर्श झाल्याचे जाणवले. मला वाटले, पाण्याचा ओघळ हळूहळू वरून खाली जात असेल; कारण तशा सावकाश गतीने आणि रूंदीने तो स्पर्श वरून खाली झाला होता. बघितले तर पाय कोरडा होता. तसा स्पर्श एकूण ३ वेळा जाणवला.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
२. अनुभूतीमागील शास्त्र
२ अ. प.पू. डॉक्टरांच्या देहाला झालेला स्पर्श हा दैवी तत्त्वाचा असणे आणि हा स्पर्श त्यांना नवचेतना देऊन त्यांची प्राणशक्ती वाढवणारा असणे आणि यामागील अध्यात्मशास्त्र
२ आ. वायूतत्त्वाच्या माध्यमातून देवतांचे भूतलावर येणे आणि त्यांच्या स्पर्शाचे वैशिष्ट्य
       देवतांचे भूतलावर येणे हे बहुधा वायूतत्त्वाच्या माध्यमातून असते.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रामनाथी आश्रमात ३ कळस स्थापन होण्यामागील कारणाविषयी श्री. श्रीकांत भट यांना ब्रह्मदेवाकडून मिळालेले ज्ञान !

श्री. श्रीकांत भट
१. पांढर्‍या धुराच्या वातावरणात ब्रह्मदेव प्रकट होणे आणि त्या वेळी सर्व इंद्रिये जागृत होऊन ज्ञान मिळणे : १०.५.२०१६ या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यावर माझ्यासमोर अंधुक दिसणार्‍या पांढर्‍या धुराच्या वातावरणात ब्रह्मदेव प्रकटले. मला एकदम गारवा जाणवू लागला. मला ब्रह्मदेवाची मूर्ती अगदीच अस्पष्ट दिसत होती. त्यांच्या हातातील पोथीतून पांढरी प्रकाशरेषा बाहेर पडून तिच्यातून अक्षरे प्रकट होत जाऊन मला शरिराच्या पंचज्ञानेंद्रियांच्या वाटे (एकदम सर्व इंद्रिये भारित होऊन) माहिती मिळू लागली. सर्व इंद्रिये जागृत होऊन एकाग्रतेने माहिती मिळण्याचा असा प्रसंग आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा घडला.
२. सनातनला अक्षय्य वरदान देण्यासाठी ब्रह्मदेवाने कळसाची स्थापना करण्यासाठी अक्षय्य तृतीया या दिवसाची निवड करणे : ब्रह्मदेव म्हणाले, सनातनच्या सर्व साधकांनी आता पृथ्वी आणि आप या दोन्ही तत्त्वांवर जय मिळवला असून उर्वरित ३ तत्त्वांना जिंकण्यासाठीच ३ कळस माझ्याकडून पारितोषिक रूपात सनातनला दिले आहेत. ३ कळस देण्याचे दुसरे महत्त्व असे की, सनातनच्या साधकांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक पादाक्रांत करून सत्ययुगाकडे झेप घेतली आहे. अक्षय्य तृतीयेला सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांपैकी एक दिवसासाठी का होईना, रज आणि तम गुण पृथ्वीवरून न्यून होऊन या दिवशी समष्टी धार्मिक अन् सत्त्व गुणांचे प्राबल्य वाढलेले असते. सनातनला अक्षय वरदान देण्याची कृती (फलित) घडावी; म्हणून अक्षय्य तृतीया हा युगादि तिथीचा मुहूर्त काढला आहे.

देऊळ आणि रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिर यांचे साधिकेला जाणवलेले महत्त्व अन् मानवजातीच्या कल्याणासाठी दोन्हींची असलेली आवश्यकता

१. देवळात गेल्यावर आलेल्या अनुभूती 
सौ. शुभांगी पिंपळे
१ अ. श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळात गेल्यावर देवीला डोळे भरून पहात रहावे आणि तिला मिठी मारावी, असे वाटणे अन् त्याच वेळीे सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी आणि चित्त देवीचा स्पर्श अनुभवत असल्याचे जाणवणे : ६.३.२०१५ या दिवशी मी गोव्यातील श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळात गेले होते. देवळात जातांना मला देवीविषयी ओढ, आत्मीयता, प्रेम आणि आतुरता वाटत होती. देवळात गेल्यावर श्री महालक्ष्मीदेवीला डोळे भरून पहात रहावे. तिला मिठी मारावी आणि त्या वेळी काळ पुढेच जाऊ नये, असे मला वाटत होते. त्याच वेळी माझे सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी आणि चित्त देवीचा स्पर्श अनुभवत आहेत, असे मला जाणवत होते.
१ आ. सभामंडपात बसल्यानंतर सूक्ष्मातून फुलांमध्ये बसल्याचे जाणवून फुलांमधून देवीच्या अस्तित्वाचा सूक्ष्म दैवी गंध अनुभवणे आणि देहाला एक प्रकारचा चैतन्यदायी, थंड आणि सुखद स्पर्श जाणवणे : श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मी डोळे मिटून सभामंडपात बसले होते. त्या वेळी मी देवीच्या जवळ असून सूक्ष्मातून फुलांमध्ये बसले आहे. तसेच माझ्याभोवती सर्वत्र केवळ फुलेच आहेत आणि ती फुले म्हणजे देवीचे तत्त्व आहे, असे मला जाणवले. त्या फुलांतून प्रक्षेपित होणार्‍या देवीच्या अस्तित्वाचा सूक्ष्म दैवी गंध मी अनुभवत होते. तसेच फुलांमधून मला आधार, वात्सल्य, प्रेम आणि सात्त्विकता या सर्वांचीही जाणीव होत होती. देहाला एक प्रकारचा चैतन्यदायी, थंड आणि सुखद स्पर्श होत आहे, असे मला जाणवले. हे सर्व अनुभवतांना मी देवीलाच अनुभवत आहे आणि देवीचे तत्त्व माझ्या श्‍वासातून देहात जात आहे, असे मला वाटत होते.

प्रार्थना करून भाजी अर्पण मागण्यासाठी गेल्यावर सर्वच व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देणे

       १८.४.२०१५ या दिवशी माझ्या मनात आज रत्नागिरी सेवाकेंद्रासाठी भाजी अर्पण मिळवण्यासाठी प्रयत्न करूया, असा तीव्रतेने विचार आला. त्याच वेळी एक साधिका बाजारात जायला निघाली होती. त्यामुळे देवाने माझी बाजारात जाण्याचीही सोय केली. मी बाजारात गेल्यावर तुम्हीच माझ्या मुखातून भाजीवाल्यांशी योग्य ते बोलून घ्या, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. तेव्हा त्या दिवशी ज्यांना आम्ही भेटलो, ते सर्वच सकारात्मक होते. मला सेवा करत असतांना पुष्कळ उत्साह जाणवत होता. कृपा केलीया रघुनाथे, मनी म्हणावे ते होते ।, अशी अनुभूती या वेळी आली.
१. एका भाजीवाल्याने प्रथम भेटीतच आवश्यकतेपेक्षा अधिक भाजी दिली. देव भरभरून देत होता.
२. व्यापार्‍यांना भाजी अर्पणाचे महत्त्व सांगत असतांना समोरच एक हातगाडी चालवणार्‍या भाजीवाल्याने आमचे बोलणे ऐकून २ किलो भाजी अर्पण दिली.
३. प्रार्थना करून गेल्यावर व्यापार्‍याने भाजी अर्पण देण्याचे त्वरित मान्य करणे : २२.४.२०१५ या दिवशी आम्ही भाजी अर्पण मिळवण्यासाठी जात असतांना देवाला देवा, तूच व्यापार्‍यांना दान करण्याची बुद्धी दे. तूच मला त्यांच्याकडे घेऊन चल, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मी एका व्यापार्‍याकडे गेले. तेव्हा त्याने सांगितले, जेव्हा अतिरीक्त भाजी येते, तेव्हा मी तुम्हाला दूरभाष करीन. तुम्ही येऊन भाजी घेऊन जा. आता मी ५ किलो भाजी अर्पण देतो आणि तुम्ही पुन्हा कधी इथे आलात, तर मला भेटून जात जा. तुम्ही शनिवारी आलात, तर मी जमेल तेवढी भाजी देईन.
४. कधीही काही अर्पण न देणार्‍या व्यापार्‍याने त्या दिवशी भाजी अर्पण दिली. त्यासाठी देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
५. एका व्यापार्‍याने खाऊ आणि लोणचे देतो, असे सांगितले.
६. एका व्यापार्‍याने दैनिक सनातन प्रभातमध्ये विज्ञापन देण्याचे मान्य केले.
       प.पू. डॉक्टर, या जिवाकडून प्रत्येक कृती सेवा म्हणून करवून घ्या. हे गुरुदेवा, मला तुमच्या चरणांशी ठेवा, अशी प्रार्थना आहे.
- श्रीमती सुनीता बापट, रत्नागिरी (२.५.२०१५)

समष्टीसाठीची तळमळ असल्याने हिंदी शिकणारी ६६ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेली कु. पूर्ती लोटलीकर (वय ६ वर्षे) !

कु. पूर्ती लोटलीकर
      डोंबिवली येथील बालसाधिका कु. पूर्ती लोटलीकर हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१३.६.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आत्याला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. पूर्ती लोटलीकर हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. समष्टीसाठी हिंदी शिकण्याची तळमळ : कु. पूर्तीची मातृभाषा मराठी असल्यामुळे तिची मुलाखत घेतांना तिला हिंदी येत नसल्यामुळे ती केवळ मुलाखतीच्या ठिकाणी बसून रहाते. तिचे आई-वडील हिंदीमध्ये बोलतात. आपल्यालाही हिंदी यायला हवे आणि पुढे प्रसारात गेल्यानंतर समष्टी साधना करण्यासाठी हिंदी भाषा येणे आवश्यक आहेे; म्हणून पूर्तीने हिंदी बोलायला आरंभ केला आहे. मी भ्रमणभाषवर तिच्याशी मराठीत बोलत असेन, त्या वेळी ती मला तिच्याशी हिंदीत बोलण्याची जाणीव करून देते.

गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या अवतारी कार्याचे विविध पैलू !

पू. सदाशिव (भाऊ) परब
       या कलियुगात जन्म घेऊन अवताराचे महान कार्य करणारे, तीनही लोकांचे तारणहार, तसेच तीनही लोकांतील साधना करणार्‍या जिवांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त करणारी महान विभूती, मोक्षदाती, गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त केलेल्या जिवांकडून शरणागत भावाने नतमस्तक होऊन कोटी कोटी शिरसाष्टांग नमस्कार !
१. गुरुमाऊली, आम्ही पुढे कित्येक जन्म घेऊन गुरुकार्यासाठी देह झिजवला, तरीही तू आमच्यावर करत असलेल्या अनंत उपकारांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही.
२. गुरुमाऊली करत असलेले कार्य पहाता ते केवळ अवतारी पुरुषच करू शकत असणे : गुरुमाऊली, आम्हा साधकांचा उद्धार करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे महान कार्य घडवण्यासाठी तू अवतार घेतला आहेस, हे सिद्ध झाले आहे. सप्तर्षींनी याचे दाखले दिले आहेत. तुझ्या धर्मकार्याचा व्याप पहाता, हे केवळ अवतारी पुरुषच करू शकतो, हेही सिद्ध होत आहे, तसेच तू करत असलेल्या कार्यात अनेक संत-महंत स्थुलातून आणि सूक्ष्मातून सहभागी होत आहेत.

भगवंताच्या समोर कुठलीही वस्तू ठेवल्याने त्याच्या दृष्टीक्षेपाने आणि दैवी तत्त्वाच्या प्रक्षेपणाने तिच्यावरील आवरण निघून जाणे आणि ती वापरण्यास योग्य होणे

प.पू. पांडे महाराज
प्रार्थना केल्याने पदार्थांवरील आवरण नष्ट होऊन ते ग्रहण करणार्‍यास लाभदायक होणे : प्रत्येक वस्तूवर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या माध्यमांतून परिणाम होतात. जशी एक नोट सहस्त्रोंच्या हातातून येते; पण आपल्याला त्याविषयी काही कल्पना नसते. आपण ती हातात घेतल्यावर तिची जी स्पंदने असतात, ती आपल्यावर कार्य करतात. आपण गव्हापासून बनवलेली पोळी खातो; पण त्या गव्हांवर शेतकरी, व्यापारी, दलाल, दुकानदार, निवडणारेे, गहू दळणारे यांच्या विचारांचे संस्कार होतात. त्यानंतर त्याची पोळी बनून ती आपल्यापर्यंत येते. म्हणजे सहस्रो लोकांचे स्पर्श आणि ज्ञान तिच्यात संग्रहित झालेले असते. आपण प्रार्थना केली नाही, तर तिचे परिणाम आपल्यात ग्रहण होऊन ते आपल्यात कार्य करतात. प्रार्थना केली की, ते आवरण निघून जाते. ती भगवंताच्या समोर ठेवायची. त्याच्या दृष्टीक्षेपाने आणि क्षेपणाने तिच्यावरील आवरण निघून जाते. त्यानंतर आपण ती ग्रहण केल्यास ती आपल्याला बाधक होत नाही.

पू. नंदकुमार जाधवकाका यांना पाहिल्यावर कु. मनीषा शिंदे यांची झालेली भावावस्था

वाटे माझी गुरुमाऊली भेटली ।
भगवंता, पू. जाधवकाका यांच्या रूपे ।
कशी कृपाळू तुझी दृष्टी ।
पाहुनी मन माझे सद्गदित झाले ॥ १ ॥
त्यांचे दर्शन घडताक्षणी वाटले ।
देवा, तुला बघण्यास डोळे ।
आतुर होते झाले ॥ २ ॥
त्यांची दृष्टी आणि हास्यातील निरामयता पाहुनी ।
वाटले दर्शन देण्या आली माझी गुरुमाऊली ।
जे हवे, ते मजसी क्षणात देऊन गेली ॥ ३ ॥

पू. नंदकुमार जाधव यांनी भावगीते आणि भक्तीगीते म्हटलेली ध्वनीचित्र-चकती पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती

पू. नंदकुमार जाधव
१. पू. जाधवकाकांनी म्हटलेली भावगीते आणि भक्तीगीते ऐकतांना अखंड भावजागृती होणे : पू. जाधवकाकांनी म्हटलेली भावगीते किंवा भक्तीगीते ऐकतांना माझी अखंड भावजागृती होत होती. मला ती गीते अखंड ऐकतच रहावीत, असे वाटत होते. ते भक्तीगीते इतकी समरस होऊन म्हणत होते की, ऐकणाराही त्या गीतात समरस होत होता.
- श्री. महादेव जाधव, मिरज (१४.३.२०१६)
२. पू. जाधवकाकांनी भजनातील शब्दब्रह्माशी एकरूप होऊन भावपूर्ण स्वरात म्हटलेली भजने ऐकतांना साधिकेला त्यात हरवून गेल्याचे जाणवणे : पू. जाधवकाकांनी म्हटलेली भजने ऐकतांना माझी भावजागृती होत होती. प्रत्येक भजन ऐकतांना मला पू. काका भजनातील शब्दब्रह्माशी एकरूप होऊन, अंतर्मनापासून आणि भावपूर्ण स्वरात भजने म्हणत आहेत, असे जाणवले.
        या जन्मावर, या जगण्यावर... हे भावगीत ऐकतांना आश्रमजीवन डोळ्यांपुढे येत होते आणि स्वतः त्यात हरवून गेल्यासारखे वाटत होते. तेव्हा भावगीतातील भाव हा आपल्या भावावर अवलंबून असतो, असे शिकायला मिळाले.
- श्रीमती लीला घोले, सहकारनगर, पुणे. (१२.३.२०१६)

मुलांची नावे देव-देवतांच्या नावावरून ठेवल्यामुळे होणारा लाभ आणि हानी !

१. लाभ
       मुलांना हाक मारतांना नकळत देवाचे स्मरण घडते. नकळत झालेल्या देवाच्या स्मरणाचाही लाभ होतो, असे धर्मशास्त्र सांगते.
२. हानी
       मुलगा किंवा मुलगी अधर्माचरणी झाली, उदा. भ्रष्टाचारी, खुनी किंवा बलात्कारी, तर देवतांच्या नावाचा अनादर होतो, तसेच धर्महानीही होते. यावर उपाय म्हणजे जे पालक मुलाला धर्माचरणी बनवण्याचे दायित्व घेतात, अशांनीच आपल्या मुलांना देवतांची नावे द्यावीत. अन्यथा अन्य नावे द्यावीत.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०१६)

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता !
    सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५२००१२०३ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
धर्माच्या कार्यासाठी ईश्‍वराचा संकल्प असतोच; मात्र हा संकल्प साध्य होण्यासाठी मी काय केले पाहिजे, याचा विचार करून आपण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती केली पाहिजे. पुढील काळ कठीण असल्याने आपण राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य जोमाने केले पाहिजे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

श्रीहरि (विष्णु), त्रिपुरारी (शिव) ही अनुक्रमे वैष्णव आणि शैव या संप्रदायांनुसार ईश्‍वराचीच नावे आहेत. ईश्‍वराचे मारक रूप काही शिकवण्यासाठी रागावले, तर त्याच वेळी ईश्‍वराचे तारक रूप म्हणजेच गुरु भक्ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्हणजे तारक रूपच रागावले, तर त्यांची क्षमा मागण्यावाचून दुसरा मार्ग नसतो.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे बळ देते. 
परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

निष्काळजीपणा !

संपादकीय
     मुंबईवरील २६/११ चे आक्रमण हा भारताच्या अस्मितेवरील घाला होता. तब्बल दोन दिवस आपल्या सुरक्षायंत्रणांनी कडवी झुंज दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्या वेळी शासनावर चौफेर टीका झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणी सत्ताही गमवावी लागली होती. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून या आतंकवादी आक्रमणाकडे पहाण्याचा इतरांचाही दृष्टीकोन कसा होता, हे उघड झाले आहे. भारतावर एवढे मोठे आतंकवादी आक्रमण झाले, त्या वेळी गृहखात्याचे काही अधिकारी पाकमध्येच थंड हवेच्या ठिकाणांचा आस्वाद घेत असल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये भारत-पाकमध्ये गृहसचिव पातळीवर बोलणी चालू होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn