Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे २४ वे संत
पू. नंदकुमार जाधव यांचा आज वाढदिवस !

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण

जसे धर्मद्रोह्यांच्या आरोपांतून कांची पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती निर्दोष सुटले, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील आरोपही खोटे ठरले, त्याप्रमाणे आगामी काळात सनातनचेही निर्दोषत्व सिद्ध होईल !

पुणे, ११ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) अधिकार्‍यांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना १० जून या दिवशी अटक केली होती. ११ जून या दिवशी डॉ. तावडे यांना येथील सीबीआय विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी न्यायमूर्ती एन्.एन्. शेख यांनी डॉ. तावडे यांना ५ दिवसांची (१६ जूनपर्यंत) पोलीस कोठडी दिली. केंद्रीय अन्वेषण विभागाने डॉ. तावडे यांची ७ दिवसांची कोठडी मागितली होती; मात्र अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी त्या विरोधात केलेल्या जोरदार युक्तीवादामुळे डॉ. तावडे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

सनातनचा नाहक बळी दिला जात आहे ! - अभय वर्तक

डावीकडून श्री. अरविंद पानसरे, बोलतांना श्री. अभय वर्तक आणि श्री. सुनील घनवट
सनातन संस्थेची मुंबई येथे पत्रकार परिषद सत्तापालट होऊनही पुरोगाम्यांच्या दबावापोटी होणारा हिंदुत्ववाद्यांचा छळ चालूच !

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या अटकेला ८ वर्षांनंतर अन्वेषण यंत्रणांनी त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत, असे सांगितले; मडगाव बाँबस्फोट प्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना ४ वर्षांनी निर्दोष मुक्त केले; पानसरे हत्या प्रकरणी श्री. समीर गायकवाड यांना अटक करून ८ मास (महिने) झाले, तरी अजून एकही पुरावा तपास यंत्रणांकडे नाही, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई चालू आहे; अशातच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यात आली. यातून पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेला सॉफ्ट टार्गेट समजून तिचा नाहक बळी देणे भाजपच्या शासनकाळातही चालूच आहे. एकूणच केंद्रात आणि राज्यात सत्तापालट झाला; मात्र हिंदुत्ववाद्यांचा छळ अद्याप थांबलेला नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. यामुळे देशातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आमच्याकडे सरकारच्या या धोरणाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली आहे, असे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

(म्हणे) 'मोदी शासन सनातनवर बंदी आणून जयंत आठवले यांना कारागृहात पाठवील !'

पत्रकारितेला कलंक असलेल्या 'तेहेलका'मध्ये काम केलेले 
पत्रकार तथा आपचे नेते आशिष खेतान यांचा सनातनद्वेष चालूच !
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, हे सनातनला संपवण्याचा 
विडा उचललेल्या धर्मद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यावे !
    मुंबई - सनातन संस्था ही एक आतंकवादी संघटना असून ही संस्था म्हणजे हिंदु समाजाला लागलेला बट्टा आहे. मोदी शासन सनातनवर बंदी आणून सनातनला नष्ट करील आणि जयंत आठवले (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले), तसेच सनातनचे इतर यांना कारागृहात पाठवेल, असे ट्विट प्रखर सनातनद्वेष्टे आणि आम आदमी पक्षाच्या वतीने निवडणूक हरलेले नेते आशिष खेतान यांनी केले आहे. (राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ कार्य करणार्‍या सनातन संस्थेला आतंकवादी संबोधणार्‍या आशिष खेतान यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! - संपादक ) 
१ जून या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमात पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा हात आहे, असे ट्विट केले होते.

आशिष खेतान यांचा आम आदमी पक्ष हाच राष्ट्र आणि धर्म यांवर कलंक !

आशिष खेतान यांनी हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेवर 'सनातन हा हिंदु धर्मावर लागलेला कलंक आहे', अशी टीका केली. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. वर्तक म्हणाले, "आशिष खेतान यांच्या आम आदमी पक्षाने जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा देणार्‍यांचे उघड समर्थन केले आहे. त्यामुळे आप हाच खर्‍या अर्थाने या देशाला लागलेला कलंक आहे. याशिवाय आपच्या एका आमदारावर बलात्काराचा आरोप असून सध्या तो फरार आहे. अशा बलात्कारी आमदाराचा समावेश असलेला पक्ष हा समाजासाठीही कलंकच आहे. या फरार बलात्कारी आमदाराचा शोध घेण्यासाठी खेतान यांनी कोणते प्रयत्न केले ? त्यामुळे सनातन संस्थेसारख्या हिंदु धर्मासाठी आहोरात्र झटणार्‍या संस्थेला अशा कलंकित पक्षाचे नेते असलेल्या आशिष खेतान यांच्या प्रमाणपत्राची काडीचीही आवश्यकता नाही."

सनातनच्या आश्रमात 'कोम्बिंग ऑपरेशन' करण्याची धमकी देणार्‍या डॉ. भारत पाटणकर यांना पोलिसांकडून नोटीस !

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सनातनच्या आश्रमात घुसून 'कोम्बिंग ऑपरेशन' करण्याची धमकी नुकतीच दिली होती. त्या संदर्भात सनातनने पोलिसांना निवेदन दिले होते. या निवेदनानंतर पोलिसांनी डॉ. भारत पाटणकर यांना नोटीस दिली. ११ जून या दिवशी येथील शाहू स्मारक येथे दुपारी २ वाजता श्रमिक मुक्ती दल आणि समविचार पक्ष यांच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ही नोटीस देण्यात आल्याचे समजते.

वाचा उद्याच्या अंकात
(म्हणे) श्रमिक मुक्ती दलामुळे सनातनच्या आरोपी साधकांना पकडण्यात पोलिसांना यश ! - डॉ. भारत पाटणकर

ईश्‍वरी राज्याची प्रतिकृती असलेला सनातनचा प्रत्येक आश्रम म्हणजे व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण !

सौ. सुषमा कुलकर्णी
    माझ्या मनात रामराज्याविषयीचे विचार येत होते. रामराज्यात कुणीही खोटे बोलत नव्हते. कुणीही चोर्‍यामार्‍या आणि लबाडी करत नव्हते. लोकांमध्ये असूया, हेवेदावे आणि द्वेष नव्हता. सर्व प्रजा साधी आणि सरळमार्गी होती. सर्व प्रजा देवावर नितांत श्रद्धा असणारी आणि ईशचिंतनात मग्न, म्हणजे साधनारत होती.
    या राज्यात कुणी कोणतेही कर्म करत असले, तरी त्याचे अंतिम ध्येय ईश्‍वरप्राप्तीच होते. त्यामुळे त्यांना कसलीही चिंता, काळजी किंवा लालसा नव्हती; म्हणून प्रजा अत्यंत समाधानी आणि आनंदी होती. मग विचार आला की, जर असे असेल, तर ईश्‍वरी राज्य येण्याची वाट का पहातोय आपण ? सनातन आश्रमात ईश्‍वरी राज्यच तर आहे. 'अशी स्थिती कुठे पहायला मिळेल ?', असा विचार करत असतांना सनातनच्या आश्रमांविषयी विचार मनात आले.

१. सनातन संस्थेची आदर्श आश्रम जीवनपद्धती !
१ अ. सनातनच्या सर्वच आश्रमांतील साधक प्रेमळ, गुणी आणि आचारधर्माचे पालन करणारे असणे : सनातनच्या कुठल्याही आश्रमात जा. सनातनच्या एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात आलो आहोत, असे मुळीच जाणवत नाही; कारण सर्व साधक अत्यंत प्रेमळ, गुणी आणि आचारधर्माचे पालन करणारे आहेत. त्यामुळे वेगळेपणा वाटत नाही. प.पू. डॉक्टरांनी साधकांना तसे घडवले आहे आणि तसे बाळकडूही पाजले आहे.

सनातन आश्रम आणि साधक यांच्या रक्षणासाठी आलेल्या धर्मप्रेमींचे आभार !

'सनातनविरोधकांनी सनातनच्या आश्रमात जाऊन 'कोम्बिंग ऑपरेशन' करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर सनातनच्या साधकांचे रक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी धर्मप्रेमी उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीत रक्षणासाठी येणार्‍या अशा धर्मप्रेमींचा सनातनला नेहमीच आधार वाटतो. पोलीस जरी रक्षणासाठी असले आणि त्या वेळी आक्रमण झाले, तर पोलीस सनातनने चिथवले; म्हणून हे आक्रमण झाले, असे सांगून विरोधकांसह सनातनच्या साधकांवरही गुन्हे प्रविष्ट करतील. त्यामुळे सनातनला पोलिसांपेक्षा धर्मप्रेमीच अधिक विश्‍वासार्ह वाटतात.

बांगलादेशात सहिष्णू हिंदूंच्या विरोधातील असहिष्णुता कोणाला का दिसत नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

काही दिवसांपूर्वी बांगलादेशात एका ७० वर्षीय हिंदु पुजार्‍याची हत्या झाल्यानंतर आता नित्यरंजन पांडे नावाच्या एका ६० वर्षीय हिंदूची हत्या करण्यात आली आहे. जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत धर्मांधांनी ४० लोकांची हत्या केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Janvari 2016se Bangladeshme jihadiyodwara 40 nirdosh Hinduonki nirmam hatya. - Hinduonko Asahishnu kehkar unhe apmanit karnewale Secularwadi ab chup kyu?

जागो ! : जनवरी २०१६ से बांग्लादेश में जिहादियों द्वारा ४० निर्दोष हिन्दुआें की निर्मम हत्या. - हिन्दुआें को असहिष्णु कहकर उन्हें अपमानित करनेवालें सेक्युलरवादी अब चुप क्यों ?


- काश्मीरमधील हिंदू तेथे परत गेले नाहीत, तर काश्मीर आमचे कधीच होऊ शकणार नाही ! - श्री. अजय च्रोंगु, अध्यक्ष, पनून कश्मीर

- भारतात एका बांगलादेशातीलच नाही; तर अखिल विश्‍वातील हिंदूंना आधार देऊ ! - आचार्य योगेश शास्त्री, वैदिक प्रवक्ता, आर्य समाज, बंगाल.

शरणार्थी हिंदूंना त्वरित भारताचे नागरिकत्व प्रदान केले जावे !

श्री. अनिल धीर, राष्ट्रीय
महासचिव, भारत रक्षा मंच,
ओडिशा
      स्वतंत्र भारतात शरणार्थी हिंदूंची समस्या सदोदित दुर्लक्षितच राहिली. या समस्येची व्याप्ती आणि भीषणता श्री. अनिल धीर यांनी द्वितीय अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात मांडली. ती लेखस्वरूपात येथे देत आहोत. 
१. जगातील सर्वाधिक शरणार्थी भारतात ! 
     शरणार्थींची समस्या अनेक देशांत आहे; परंतु यु.एन्.एफ्.सी आर्. (युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज्)कडून आलेल्या अधिकृृत आकडेवारीनुसार सर्वाधिक शरणार्थी भारतात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे फारच अल्प लोकांना ठाऊक आहे. त्यानंतर वर्ष १९५१ मध्ये यु.एन्.ओ. (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन)ची शरणार्थींसाठी करार सभा (कनव्हेंशन ऑन रेफ्युजीस) झाली आणि वर्ष १९५७ मध्ये करार-मसुदा सिद्ध करण्यात आला. यु.एन्.ओ.च्या करारातील निकषांनुसार भारत यात सहभागी होऊ शकत नव्हता. आज आम्ही (भारत) त्यांचे सभासद नाही आणि त्यांच्या करारालाही बांधील नाही. असे असतांनाही आज जगातील सर्वाधिक शरणार्थी भारतात आहेत. शरणार्थी भारतात येण्याचे सत्र वर्ष ७६१ पासून म्हणजे पारशी भारतात आले, तेव्हापासून चालू झाले.

काश्मीर प्रश्‍नाची भीषणता !

वर्ष २००३ मधील काश्मीर दौर्‍यावरील विदारक अनुभव
- डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार, मुंबई. 
डॉ. सच्चिदानंद शेवडे
मुल्ला आणि मौलवी यांनी काश्मीरलाच पाकिस्तान संबोधून 
आबालवृद्धांपर्यंत केलेला चुकीचा प्रसार ! 
     पहलगाम येथे बस थांबल्यावर मी उतरलो. काही भीक मागणारी मुले तेथे जमा झाली होती. त्यातील एकाला मी विचारले, बेटा, कुठे रहातोस ? तो म्हणाला, पाकिस्तानात ! त्याचे उत्तर ऐकून मी सुन्न झालो. एवढा लहान मुलगा मला पाकिस्तानात रहातो, असे सांगत होता. मी त्याला विचारले, तुझे पाकिस्तान आहे तरी कुठे ? त्याने तेथून दिसणार्‍या जवळच्या टेकडीकडे बोट दाखवून सांगितले, ते समोर ! तिथल्या गावातील हा मुलगा होता. मी त्याला म्हणालो, तुला कुणी सांगितले की, हे पाकिस्तान आहे ? त्यावर तो म्हणाला, आई-वडिलांनी आणि आमच्याकडे येणार्‍या मुल्ला-मौलवींनी ! वर्ष १९९० पासून काश्मीरमध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार येथून मुल्ला-मौलवी यांचे जाणे चालू झाले होते. त्यांचा प्रचार कसा असतो, ते पहा. त्या मुलाला म्हटले, कधी तरी आपल्या देशाचा नकाशा पहा आणि समजून घे की, पहलगाम पाकिस्तानपासून किती लांब आहे ते ! तर तो म्हणाला, तुम्ही काहीही म्हणा; पण आम्ही पाकिस्तानातच रहातो.

जिहादी आतंकवाद्यांच्या विळख्यातील काश्मीरमधील हिंदूंची दु:स्थिती !

     काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्य, तर हिंदू अल्पसंख्य आहेत. तेथील मुसलमानांची लोकसंख्या ९७ टक्के, तर काश्मीरच्या खोर्‍यात हिंदू आणि शीख यांची एकत्रित लोकसंख्या केवळ २.५ टक्के आहे. तेथे बौद्धांची संख्याही अत्यल्पच आहे. आतंकवादामुळे तेथील ३.५ लाख काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले आहे. ते आजही हालाखीचे जीवन जगत आहेत. या धगधगत्या समस्येवर साप्ताहिक चित्रलेखाने प्रकाशझोत टाकला. हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

पनून काश्मीरची स्थापना : ऐतिहासिक दिन !

     आपद् परिस्थितीमध्ये आलेले जिवंत अनुभवच निर्वासितांना दिशा दाखवू शकतात. ते अनुभव विस्मृतीत गेल्यास तो समाज इतिहासाच्या विस्मृतीत जातो, या सिद्धांताचे प्रमाण देत २९.१२.१९९१ या दिवशी काश्मीरमधील निर्वासित हिंदू पनून काश्मीर या संघटनेद्वारे एकत्र आले. काश्मीरमध्ये स्वगृही परतण्यासाठीची ठोस दिशा या दिवशी ठरवण्यात आली. त्यामुळेच काश्मिरी हिंदूंच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
१. काश्मिरी हिंदूंसमोरील ३ प्रकारची आव्हाने !
अ. जोपर्यंत भारत आतंकवादावर स्थायीस्वरूपी तोडगा काढत नाही, तोपर्यंत काश्मिरी पंडितांचे काश्मीरमध्ये परतणे आणि त्यांचे पुनर्वसन हे स्वप्नच राहील. 
आ. काश्मीर खोर्‍यात वाढत जाणारे सामाजिक आणि राजकीय तालिबानीकरण
इ. निर्वासित काश्मिरींची आर्थिक प्रगती
     हिंदूंनो, ही आव्हाने परतवण्यासाठी सर्वपक्षीय राज्यकर्ते काही करणार नाहीत, याची निश्‍चिती बाळगा आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हा !
- डॉ. अजय श्रृंगू, अध्यक्ष, पनून काश्मीर. (इंग्रजी मासिक काश्मीर सेंटीनल, अंक क्रमांक १२.१२.२००७)

काश्मीर समस्या - राज्यकर्त्यांच्या नेभळटपणामुळे निर्माण केलेला सीमाप्रश्‍न !

     स्वातंत्र्यप्राप्तीपासून धगधगत असलेली काश्मीरची समस्या, हे भारतीय राज्यकर्त्यांच्या स्वप्नाळू राज्यकर्त्यांची परराष्ट्रनीतीचे आणि नेभळटपणाचे फलित आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांत हा प्रश्‍न नेऊन ही समस्या गुंतागुंतीची बनवली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने काश्मीरचा तीन पंचमांश भाग गमावला. काश्मीरचा उर्वरित दोन पंचमांश भाग भारतात ठेवण्यासाठी १९४७ पासून आतापर्यंत भारताचे अनुमाने ५० सहस्र कोटी रुपये व्यय झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या क्षेत्रफळाच्या स्वरूपातील आकडेवारी पुढे दिली आहे. 
१. जम्मू-काश्मीरचे एकूण क्षेत्रफळ : २,२२,२३६ चौ.कि.मी.
२. भारतातील क्षेत्रफळ : १,०१,३८७ चौ.कि.मी.
३. पाकव्याप्त काश्मीरचे क्षेत्रफळ : ७८,११४ चौ.कि.मी.
४. चीनव्याप्त काश्मीरचे क्षेत्रफळ : ३७,५५५ चौ.कि.मी.
५. पाकिस्तानने चीनला दिलेली भूमी : ५,१८० चौ.कि.मी.
    गेल्या ६-७ दशकांत काश्मीरच्या तीन पंचमांश भागाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारताला काही करता आले नाही, हे लज्जास्पद आहे !

काश्मीरमधील १९ जानेवारी १९९० या दिवशीची विदारक घटना !

      आतापर्यंत सगळ्यात मोठी घटना ६० ते ६५ वर्षे हिंदु समाजाच्या विरुद्ध काश्मीरच्या संदर्भात झाली आहे. १९ जानेवारी १९९० या दिवशी तेथील सर्व हिंदूंना पळवून लावले आणि मंदिरे तोडली. साधारण ५०० हिंदूंना मारण्यात आले. पुष्कळ अनैतिक कृत्येही घडली. महत्त्वाचे म्हणजे हे कुणी आतंकवाद्यांनी केले नाही, तर तेथील सामान्य मुसलमान जनतेने मशिदीतून हिंदूंना सांगितले, हा देश तुम्ही सोडून जा. येथे तुमची आवश्यकता नाही. तुमची आई, बहीण आणि मुली यांना येथे सोडून जा. त्यांची मात्र आम्हाला आवश्यकता आहे.-

हिंदूंनो, काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा सूडाग्नी सतत धगधगत ठेवा !

    संविधानानुसार जम्मू आणि काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असतांना, तसेच त्या ठिकाणी सैन्य असतांनाही १९.१.१९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंचे जे विस्थापन झाले, ते घडलेच कसे ? स्वातंत्र्य मिळून ४३ वर्षे झाल्यानंतर काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंचे झालेले विस्थापन हा भारताचा फार मोठा पराभव आहे. हिटलरने ७० लक्ष ज्यूंचा संहार केला होता. त्या अन्यायाची धग तेवत ठेवत ज्यू नेहमी स्वाभिमानाने नेक्स्ट इयर जेरुसलेम (पुढच्या वर्षी जेरुसलेमला भेटू) म्हणत असत. त्याप्रमाणे आपणही आता पुढच्या वर्षी श्रीनगरला भेटू, असे म्हणूया. - श्री. अविनाश धर्माधिकारी, निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक

गोवा येथे 'पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना'च्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

हिंदु राष्ट्राचा उद्घोष आणि हिंदु संघटनांचे राष्ट्रीय व्यासपीठ !

श्री. अरविंद पानसरे
रामनाथी, गोवा येथे १९ जून ते २५ जून २०१६ या कालावधीत
 होणार्‍या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
     हिंदु राष्ट्र ! स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटणारे हे भक्कम सत्य स्वातंत्र्यानंतर मात्र विस्मरणात गेलेला शब्द बनला ! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले. परिणामी जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र असले, तरी हिंदूंचे एकही मानाचे राष्ट्र या विश्‍वमंडळात नाही. त्यामुळेच हिंदु संस्कृती आणि सनातन धर्म यांचा वारसा सांगणारे आणि जपणारे भारतवर्ष हे हिंदु राष्ट्र म्हणून उद्घोषित व्हावे, या निखळ हेतूने गोवा येथे गेली ४ वर्षे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित केले जात आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात कार्यरत लहान-मोठ्या हिंदूंच्या संघटना आणि हिंदु धर्मातील संप्रदाय यांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित असतात. १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे सात दिवसीय पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडणार आहे.
श्री. अरविंद पानसरे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशातील हिंदु संघटना, संप्रदाय, संस्था यांचे संघटन करणारे हिंदू अधिवेशन !
     वर्ष २०१२ ते २०१५ या कालावधीत झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या हेतूने भारताच्या कानाकोपर्‍यांतून हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येणे, हे अत्यंत आश्‍चर्यकारक आणि एखाद्या चमत्कारापेक्षा वेगळे नव्हतेे ! या अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश येथूनही हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी प्रतीवर्षीप्रमाणे हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. हिंदु संघटनांचा हा वाढता प्रतिसाद, ही अधिवेशनाची खरी फलनिष्पत्ती आहे.

काश्मीरचे अनुभवलेले भीषण वास्तव

      मध्यंतरी मी आणि माझे यजमान आम्ही काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलो होतो. सृष्टीसौंदर्याचे नंदनवन आणि ऋषीमुनींची तपोभूमी असलेल्या काश्मीरला जाणार असल्याने आम्ही आनंदी होतो. तेथे आधी भेट दिलेल्यांची मते, तसेच तेथील सुरक्षितता यांविषयी आम्ही संकेतस्थळाच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न केला. तेथे पर्यटक म्हणून जाण्यास काहीच धोका नसल्याचे अनेकांनी सांगितल्यावर आम्ही तेथे जाण्याचे अंतिम केले. काश्मीरला गेल्यावर आलेले अनुभव येथे देत आहे. 
१. ४ दिवसांच्या तेथील वास्तव्यात आम्हाला आम्ही काश्मीरमध्ये नव्हे, तर पाकिस्तानातच रहात असल्याचे वाटले; कारण तेथील दुकानांच्या पाट्या, तसेच रस्त्यांच्या नावांच्या पाट्या हिरव्या रंगाच्या होत्या. 
२. आम्हाला भेटलेल्या एकाही व्यक्तीचे नाव हिंदु नव्हते. तेथील संघटना जवळपास सगळ्या शिकारा इस्लाम नावाच्या होत्या.

शासनाच्या लेखी हिंदु निर्वासित नव्हे, तर विस्थापित !

     पाकव्याप्त काश्मीरमधील निर्वासितांचे सर्वांत मोठे सूत्र हे आहे की, शासन त्यांना निर्वासित मानतच नाही, तर विस्थापित मानते आणि कुठल्याही निर्वासितांना मिळणार्‍या लाभासाठी त्यांना पात्र समजत नाही. 
निर्वासित हिंदु कुटुंबांची नोंद न करण्यासाठी हास्यास्पद कारणे देणारे शासन ! 
     निर्वासित हिंदु कुटुंबांची नोंद न करण्यासाठी शासनाने पुढील कारणे दिली -
१. पाकव्याप्त काश्मीरमधून आश्रयार्थ आल्यानंतर जी कुटुंबे शिबिरांत रहाण्याऐवजी नातेवाइकांच्या घरी राहिली, त्यांची नोंद करण्यात आली नाही. 
२. ज्या कुटुंबास प्रमुख नाही, म्हणजे तो मारला गेेला आहे किंवा हरवला आहे, अशा कुटुंबाची नोंद करण्यात आली नाही. 
३. पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहात असतांना ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न ३०० रुपयांपेक्षा अधिक होेते, अशा कुटुंबांना शासनाचे साहाय्य मिळू शकत नाही.
४. सप्टेंबर १९४७ ते डिसेंबर १९५० या काळात जी कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत, मात्र नंतर स्थलांतरित झाली, त्यांचीही नोंद केली गेली नाही.

काश्मिरी हिंदूंचे भयाण वास्तव !

काश्मीरप्रमाणे आता पूर्वेकडील राज्यांतूनही हिंदूंना निर्वासित होण्यास 
भाग पाडणारे हिंदुद्वेष्टे तत्कालीन काँग्रेस सरकार !
      पूर्वेच्या अनेक प्रांतात आज हिंदूंच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करू देत नाहीत. त्यांचे दहन करू देत नाही. त्यांना पूजा-अर्चाही करू देत नाही. तेथील मंदिरे तोडून टाकली आहेत. मंदिरांची संख्या पुष्कळ अल्प झाली आहे. त्यामुळे नवीन मंदिरांची निर्मिती तर दूरच ! - श्री. अनिल धीर, विशेष प्रतिनिधी, उदय इंडिया तथा भाजपचे ओडिशातील प्रसिद्धीप्रमुख (२०.१.२०१३)
काश्मिरी हिंदूंच्या नावावर निधी गोळा करून 
त्याचा जिहादसाठी वापर करणारे 
धर्मांध मुसलमान ! 
     नवी देहली येथील काश्मिरी निर्वासित छावणीतील निर्वासितांसाठी आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन करत काही काश्मिरी तरुण नवी देहली शहरात फिरतांना दिसत आहेत. याची माहिती पनून कश्मीर संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. नवी देहलीतील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये काश्मिरी निर्वासित हिंदू रहात नाहीत. तेथे मुसलमानांची वस्ती आहे. त्यामुळे हे तरुण जिहादी आतंकवाद्यांसाठी कार्य करत असल्याचा संशय पनून कश्मीरच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

काश्मीरपाठोपाठ आता मिझोरामध्येही हिंदूंवर निर्वासित म्हणून जगण्याची वेळ येणे, हा तत्कालीन काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष्टेपणा !

१. आसाम आणि त्रिपुरा येथे हिजबुल मुजाहिद्दीन, एल्.टी.टी.ई., जे.इ.एम्. या संघटनांची बांगलादेशमधून पुष्कळ घुसखोरी होत आहे.
२. ईशान्येतील इतर ५ राज्ये तर ख्रिस्तीबहुल झाली आहेत. मिझोराम राज्य संकेतस्थळावर सांगते की, आमचे राज्य ख्रिस्ती आहे. तेथे ९९ टक्के ख्रिस्ती आहेत.
३. मणिपूर येथील रियांग जमातीचे लोक हिंदू होते. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा; म्हणून त्यांच्यावर दबाव आणून त्यांची घरे जाळली, त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार केले, त्यांची लूटमार केली.

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंच्या रहाण्यानेच हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्ण होईल !

    ज्या प्रकारे यहुदींनी २ सहस्र ५०० वर्षांपर्यंत त्यांच्या मनात मातृभूमीत परतण्याची आशा आणि विचार जिवंत ठेवला अन् त्यात यशस्वी झाले. त्याच प्रकारे आम्हाला येणार्‍या पिढीच्या मनात हा विचार जागृत ठेवायचा आहे. यासाठी या २५ व्या वर्षात प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या घरी अमरनाथ मंदिर आणि मार्तंड मंदिर यांचा दगड असला पाहिजे. त्यामुळे या दगडाची पूजा करतांना एक दिवस आपल्याला काश्मीरमध्ये जायचे आहे आणि आपली भूमी परत घ्यायची आहे, याची जाणीव आपल्या पिढीमध्ये सतत तेवत राहील. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या रहाण्यानेच हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्ण होईल.- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

पाकिस्तानी वा बांगलादेशी घुसखोरांना भारताचे नागरिकत्व देणारे; पण पाकिस्तान सोडून आलेल्या हिंदूंना व्हिसाची मुदत संपल्याचे सांगून अत्याचार सहन करत मरण्यासाठी पाकिस्तानात पाठवणारे तत्कालीन भारत सरकार !

       पाकिस्तानात रहाणारे हिंदु जीव मुठीत धरून जगत आहेत. आता तर त्यांनी पाकिस्तान सोडून हिंदुस्थानात आसरा घेतला आहे. त्यांना धीर देण्यासाठी शासनाकडून कोणीही पुढे आलेले नाही. उद्या या हिंदूंना निर्बंधांचा आधार घेत तुमची व्हिसाची मुदत संपल्याने तुम्हाला या देशात रहाता येणार नाही, तुम्ही इथून जा, असे सरकार सांगेल; पण अशा प्रकारे ते पाकिस्तानी वा बांगलादेशी घुसखोरांना सांगत नाही. त्यांच्यासाठी शिधापत्रिका (रेशनकार्ड), आधारकार्ड, निवासाची सोय, मतदार सूचीत नाव समाविष्ट करून मतदानाचा अधिकार मिळवून देणे इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जातात; पण आपल्या धर्मबांधवांच्या पेकाटात लाथ घालून पाकिस्तानात अत्याचार सहन करण्यासाठी आणि मरण्यासाठी पाठवले जाईल ! - श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : धर्मभास्कर, जुलै २०१३)

हिंदूंना मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणारे मुसलमानप्रेमी काश्मीर शासन !

      ६६ वर्षे होऊन गेल्यानंतरही तेथील हिंदू राज्यातील नावडते प्रवेशकर्तेच ठरले आहेत. कारण - 
१. जम्मू आणि काश्मीरमधील दंडविधाने (कायदे) हिंदु निर्वासित आणि त्यांचे वारस यांना राज्याचे नागरिक म्हणून किंवा राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी म्हणून ओळखत नाहीत. 
२. निर्वासित हिंदू काश्मीर राज्यात संपत्ती खरेदी करू शकत नाहीत.
३. त्यांच्यापैकी पात्र असलेल्या काही हिंदूंची नावे लोकसभा निवडणुकांच्या मतदान सूचीत आहेत; मात्र ते काश्मीर राज्य विधानसभेसाठी मतदार नाहीत. तसेच ते पंचायत किंवा विधानसभेच्या निवडणुकीतही मतदान करू शकत नाहीत वा निवडणूक लढवू शकत नाहीत. 
४. निर्वासितांच्या मुलांना व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नाही. युवकांना शासकीय नोकर्‍याही मिळू शकत नाही. 
५. निर्वासितांपैकी ७५ टक्के हिंदू अनुसूचित जाती-जमातीतील आहेत. तरीही त्यांना अनुसूचित जातीसाठी मिळणारे लाभही मिळू शकत नाहीत.


-

विस्थापित होतांनाच्या भयाण काळरात्रीचे पीडित काश्मिरी हिंदूने केलेले हृदयद्रावक वर्णन !

     ती एक अशी काळोखी रात्र होती. तिच्या अंध:कारात त्या वेळी मी काही समजू शकलो नाही. ७ वर्षांच्या मुलाला हे अनुमान लावणे कठीण होते की, आजच्यानंतर त्याच्याच राष्ट्रात तो एक विस्थापित म्हणून ओळखला जाईल. 
     रात्रीचे १०.३० वाजले होते. दुर्गम कुपवाडा येथील एका गावातील तीन हिंदु कुटुंबीय आपले अत्यावश्यक सामान आवरत होते. ते कुठे सुटीचा आनंद उपभोगण्याकरता म्हणून हे सर्व करत नव्हते, तर आपल्या कुटुंबाला जिवंत ठेवण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न होता. आमच्याही घरामध्ये एका वेगळ्याच प्रकारचे दृश्य होते. तेव्हा घरासमोर एक ट्रक येऊन उभा राहिला आणि वडिलांनी आम्हा सर्वांना त्या ट्रकमध्ये जाऊन बसण्यास सांगितले. काही सामान आणि आम्ही तीन कुटुंबांमधील लोक ट्रकमध्ये चढलो. त्यातील कंडक्टरने लगेचच ट्रक पाठीमागून पूर्णपणे बंदिस्त केला. मी सातत्याने विचारत असूनही कोणीही काहीही सांगायला तयार नव्हते की, आम्ही कुठे जात आहोत. त्या वेळी कदाचित वडिलांसाठीही हा एक मोठा प्रश्‍नच होता. रात्रीच्या काळोखात आमचा ट्रक भरधाव धावत होता. त्या स्थितीचे अनुमान लावणे मला शक्य झाले नाही.

पाकिस्तानातून निर्वासित म्हणून भारतात आलेल्या एका हिंदु कुटुंबाची परवड !

भारतात परत येण्यासाठी तिकिटाची व्यवस्था होईपर्यंत सर्व काही तेथेच 
सोडून कराचीत जीव मुठीत घेऊन रहावे लागणारे हिंदु कुटुंब 
     कराचीत दंगे चालू झाल्यावर अधिकोष (बँका), डाक घर इत्यादींची जाळपोळ चालू झाली. घराच्या बाहेर पडणे कठीण झाले. अधिकोषातून पैसे काढून आणू शकत नव्हतो. पारशी लोकांना मुसलमानांपासून धोका नव्हता. कराची सोडायची म्हटले, तर रेल्वेने जाता येत नव्हते; कारण हिंदूंना गाडी थांबवून बाहेर ओढून मारून टाकायचे. त्यामुळे आम्ही बोटीने किंवा विमानाने जाण्याचा विचार केला; परंतु त्याचीही एक मासाची तिकिटे खपून गेली होती. अशा परिस्थितीत तिकीटे मिळेपर्यंत आमची रहाण्याची व्यवस्था वडिलांच्या शाळेत तिसर्‍या माळ्यावर केली गेली. आम्ही आमचे सामानाने भरलेले घर तसेच सोडून केवळ प्रतिदिनच्या जुन्या कपड्यासहित घराच्या बाहेर पडलो. सोलो मास्तरांनी आम्हाला त्यांच्या चारचाकी वाहनामधून शाळेत सोडले.
आपल्याच देशात शरणार्थी म्हणून काश्मिरी पंडित किती दिवस भटकणार आहेत ? जोपर्यंत तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरावर नियंत्रण मिळवता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणीही विचारणार नाही. त्यामुळे आजपासूनच पुन्हा काश्मीरमध्ये जाण्याची सिद्धता चालू करा.
- श्री. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

काश्मीरमधील हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये पाठवणे, ही हिंदु राष्ट्राची पायाभरणी ठरेल !

श्री. राहुल कौल, राष्ट्रीय 
समन्वयक, पनून कश्मीर
     रामनाथी, गोवा येथे ११ जून ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात पनून कश्मीर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांनी काश्मिरी हिंदूंच्या घरवापसीसाठी हिंदु राष्ट्राची स्थापनाच आवश्यक या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. 

१. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्येच पुनर्वसन करण्यासाठी 
पनून कश्मीर (आपले काश्मीर) संघटनेची स्थापना !
     काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनानंतर वर्ष १९९१ मध्ये पनून कश्मीर (आपले काश्मीर) हे काश्मिरी हिंदूंचे पहिले संघटन निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंना आतापर्यंत ६ वेळा काश्मीर सोडावे लागले आहे. ७ व्या वेळी काश्मीर सोडावे लागल्यानंतर मात्र काश्मिरी हिंदूंमधील धुरिणांनी आपल्या संदर्भात या घटना सतत होतील का ?, काश्मीरमधील हिंदू अशाच प्रकारे दाबले जातील का ?, असा विचार केला. तेव्हा काश्मिरी हिंदूंच्या संघटनाचे महत्त्व अधोरेखित होऊन पनून कश्मीर ही संघटना अस्तित्वात आली. पनून कश्मीर कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय विचारधारा यांच्याशी बांधील नाही. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्येच पुनर्वसन झाले पाहिजे, या एकाच मागणीसाठी आमची ही संघटना काम करत आहे. तथापि काश्मीरमध्ये ४० ते ५० लाख मुसलमान रहात असून मागील अनुभव पहाता काश्मिरी हिंदूंना त्यांच्यात रहाणे अशक्य आहे. आम्हाला काश्मीरमधील मुसलमानांसमवेत मिळून-मिसळून रहाण्याचे सल्ले दिले जातात; मात्र हा प्रयोग आम्ही ६ वेळा करून पाहिला आहे. तो अयशस्वी झाला.

काश्मीर समस्या ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेचे फळ !

     मागील २४ वर्षांत राज्यकर्त्यांची निष्क्रीयता, मतांचे राजकारण आणि नालायकता या तीन गोष्टींमुळे देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आज जे काश्मीरमध्ये झाले, ते केवळ देशावरील संकटांचा आरसा आहे. अशी परिस्थिती उद्या संपूर्ण भारतात निर्माण होईल. आम्ही मागील २४ वर्षांपासून विस्थापित जीवन जगत आहोत. आमचे दुर्दैव हेच की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असे सांगणारा एकही पंतप्रधान भारताला लाभला नाही. काश्मीर समस्या ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेचे फळ आहे. - डॉ. अग्निशेखर, विस्थापित काश्मिरी हिंदू -
योगी आदित्यनाथ
     काश्मीरमधून ३ लाख ५० सहस्र हिंदूंना विस्थापित केले गेले. तथापि काँग्रेसने याविषयी संसदेत चर्चा तर सोडाच; पण आजपर्यंत एकदाही साधा निषेधही केलेला नाही. - योगी आदित्यनाथ, खासदार, भाजप, गोरखपूर -

एका विस्थापित काश्मिरी हिंदूचे मनोगत !

     मी विस्थापित आहे, ही काल्पनिक गोष्ट नसून मी माझ्या समाजाचा एक त्रास भोगलेला (पीडित) अनुभवी घटक आहे ! : मी विस्थापित आहे, ही काही काल्पनिक गोष्ट नाही. मी माझ्या समाजाचा एक त्रास भोगलेला (पीडित) अनुभवी घटक आहे. माझे मूळ पवित्र सतीसरच्या पायथ्याशी आहे. माझे अस्तित्व त्रिवेणी संगमातच आहे. भारतीय संस्कृती, बौद्ध विहार आणि मार्तण्डचे भग्नावशेष हे सर्व माझ्या मनःपटलावर सुवर्ण अक्षरांत कोरले गेले आहेत. राजतरंगिणी आणि वाख हे ग्रंथ माझ्या पूर्वजांची देणगी आहे. शंकराचार्यांचा हरि पर्वतावरील शंखनिनाद, क्षीरभवानी येथील अष्टमीचा दिवस, पवित्र अमरनाथ गुहेकडे यात्रेसाठी हिमशिखराच्या दिशेने पायवाटेने गटागटाने चालत असलेले सहस्रो दर्शनेच्छुक भाविक, अलौकिक छटांनी नटलेला शेषनाग आणि येथील जलप्रवाह यांपैकी कोणत्याही गोष्टींचा मला विसर पडलेला नाही.

पाकमधील हिंदु निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यास नकार देणारे; मात्र पाक आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड इत्यादी सुविधा देणारे हिंदुद्वेष्टे तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्ते !

    बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर पाकमध्ये हिंदूंवर आक्रमण झाले. त्यामुळे हिंदूंनी तेथून पलायन करून भारतातील पंजाबमध्ये आश्रय घेतला होता. आम्हाला भारतीय नागरिकत्व द्यावे किंवा दीर्घकालीन व्हिसा संमत करावा अशी या निर्वासितांची मागणी आहे. १० सहस्रांपेक्षा अधिक पाकिस्तानी हिंदु नागरिक भारतात विविध निर्वासितांच्या छावण्यांमध्ये वास्तव्य करून आहेत. शासनाने त्यांना दीर्घकालीन व्हिसा देण्यास नकार दिला आहे. - श्री. उपानंद ब्रह्मचारी, संपादक, हिंदु एक्झीस्टन्स (९.८.२०१३)
निर्वासित हिंदूंची क्रूर थट्टा करणारे धर्मांध तत्कालीन शासन ! : १९८१ मध्ये काश्मीर शासनाने सहस्रो हिंदु निर्वासितांना त्यांच्या रहिवासी अवस्थेविषयी अप्लिकेशन फॉर्म वाटले; मात्र त्यावर अजून काहीच कार्यवाही झालेली नाही.
     एकट्या काश्मीरमध्ये सहस्रो हिंंदू स्त्रियांवर बलात्कार आणि ९३,००० हून अधिक हिंदूंच्या हत्या केल्या गेल्या आहेत. अतिरेक्यांनी तेथील हिंदूंच्या ९५ टक्के घरांची लूट केली आहे. काश्मिरी हिंदूंकडून १४,४३० उद्योगधंदे आणि दुकाने स्वतःच्या कह्यात घेतली आहेत. त्यांनी हिंदूंच्या शेकडो प्राचीन आणि ऐश्‍वर्यसंपन्न मंदिरांचा विध्वंस करून तेथील देवतांच्या मूर्तींची विटंबना केली आहे. या आतंकवादामुळे ४ लक्ष काश्मिरी हिंदु त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित झाले आहेत. 
- ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर, सोलापूर

असे शिक्षण खाते विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या लायकीचे आहे का ?

     गोवा राज्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकांत मुद्रणाच्या शंभराहून अधिक चुका आहेत. यापूर्वी या चुका काही अभ्यासकांनी शिक्षण खात्याच्या दृष्टीस आणून दिल्या होत्या. यासंदर्भात निवेदनही देण्यात आले होते; मात्र त्या दुरुस्ती करण्यासाठी शासनाने अद्याप ठोस पावले उचलेली नाहीत. नवी देहली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एन्.सी.ई.आर्.टी.) प्रकाशित केलेल्या पाठ्यपुस्तकांचा गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अनुवाद केला आहे; मात्र हा अनुवाद सदोष आहे. या पाठ्यपुस्तकांत व्याकरण, छपाई आदींविषयी चुका आहेत. विशेष म्हणजे मराठी माध्यमातील या पाठ्यपुस्तकांत प्रारंभी छापण्यात आलेली संविधानाची उद्देशिका आणि मूलभूत कर्तव्ये इंग्रजी भाषेत असून त्यांचा मराठी अनुवाद करण्याची साधी तसदीही शिक्षण खात्याने घेतलेली नाही.

राष्ट्रीय हिंदु दिवस म्हणायला सरकार का लाजते ?

     भारतातील प्राचीन सनातन धर्माला पुन्हा नवचैतन्य प्राप्त करून देणारे आदि शंकराचार्य यांचा ११ मे हा जन्मदिवस राष्ट्र्रीय तत्त्वज्ञ दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या विचाराधीन आहे. वर्ष ७८८ मध्ये केरळ राज्यातील कोचीपासून जवळ असलेल्या कलाडी येथे आदि शंकराचार्य यांचा जन्म झाला होता.

पोलिसांची कार्यक्षमता !

पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणार्‍या तृप्ती देसाई यांना ३ घंट्यांनी (तासांनी) अटक ! 
असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?
     महालक्ष्मी मंदिर गाभारा प्रवेशाच्या वेळी मारहाण करणार्‍यांना अटक करा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही तृप्ती देसाई यांनी जमावबंदीचा आदेश धुडकावून कार्यकर्त्यांसह जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन केले. देसाई यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या निलंबनाचीही मागणी केली. ३ घंटे (तास) चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्या सर्वांना अटक केली.-

कारागृहातही मुसलमानांचे राज्य !

      मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांंनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांंसमवेत रमझान मासाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रोजा पाळला, अशी माहिती कारागृह अधीक्षक सतीश त्रिपाठी यांनी दिली. प्रशासनाने प्रसारित केलेल्या नवीन माहितीनुसार रोजा पाळणार्‍या हिंदु बंदीवानांची संख्या आता १०१ वर पोचली आहे. रोजा पाळणार्‍या बंदीवानांसाठी कारागृह व्यवस्थापनाने नमाज पढणे, तसेच सकाळचा अल्पाहार आणि संध्याकाळचा इफ्तार यांसाठी विशेष व्यवस्था केली होती. रोजा ठेवणार्‍यांसाठी फळे, खजूर, ५०० ग्रॅम दूध आणि इतर फराळाचे पदार्थ यांची व्यवस्था कारागृहाच्या वतीने करण्यात आली होती.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणे, हे प्रथम प्राधान्य असल्याचे भाजप सरकारने केवळ सांगून न थांबता त्या दृष्टीने तत्परतेने पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !

     विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुन्हा काश्मीर खोर्‍यात पुनर्वसन करणे, हे भाजप शासनाचे प्रथम प्राधान्य रहाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते खात्याचा कार्यभार सांभाळल्यानंतरच्या समीक्षा बैठकीत या विषयावर झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलत होते. (३१.५.२०१४)

गेली २४ वर्षे काश्मिरी हिंदू स्वतः देशात निर्वासितांचे आयुष्य जगत असतील, तर शांतीचा जयघोष काय कामाचा ?

    आपण शांतीचा जप करतोय. कसली डोंबलाची शांती ? काश्मीरचे हिंदू गेली २४ वर्षे आपल्याच देशात निर्वासिताचे जीणे जगत आहेत. त्याची लाज नसेल, तर शांतीला काय किंमत ? - अरुण रामतीर्थकर, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर.

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन

१. साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांच्या सहकार्‍यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबून अनन्वित अत्याचार करणारे अधिकारी अन् संबंधित राज्यकर्ते यांना कठोर शासन करण्यात यावे.

२. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'ॐ' चे उच्चारण सक्तीचे करण्यात यावे.

३. महाराष्ट्र राज्याच्या बालभारतीच्या सहावीच्या इयत्तेसाठी असलेल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारताच्या नकाशात अरुणाचल प्रदेश न दाखवणार्‍यांवर कारवाई करण्यात व्हावी.

स्थळ - शिवाजी चौक, भिवंडी वेळ - सायंकाळी ५ वाजता
संपर्क क्र. - ९९८७०२७४२७

जम्मू : निर्वासितांची राजधानी !

    जम्मू परिसर हा निर्वासितांची राजधानी म्हणून ओळखला जातो. जम्मूत स्थलांतरित हिंदूंची लोकसंख्या १७ लाखांहून अधिक आहे. हिंदूंच्या कथा असह्य अन् दु:खद आहेत. त्यांनी जम्मूशी असलेल्या भौगोलिक आणि सांस्कृतिक जवळीकीमुळेच काश्मीरमध्ये येण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने नवीन मातृभूमी म्हणून त्यांनी केलेली जम्मू-काश्मीरची निवड त्यांना न संपणार्‍या कष्टप्रद मार्गावर घेऊन गेली.

कालातीत गुरु !

जगद्गुरु आहेत स्थळवाचक ।
कालचक्र गुरु आहेत काळवाचक ॥ १ ॥
आपले परब्रह्म आज शुभदिनी प्रकटले ।
ते आहेत अखंड कालातीत ।
म्हणून आपले गुरु आहेत ।
ना जगद्गुरु ना कालचक्र गुरु ॥ २ ॥
ते तर आहेत ।
सर्वांची व्यष्टी-समष्टी साधना करवून घेत ।
युगानुयुगे धर्मसंस्थापना करणारे
अनंत कालचक्रांचे कालातीत गुरु ॥ ३ ॥
- एक धर्मप्रेमी (२२.५.२०१६)

प.पू. गुरुदेव यांच्या अमृतमहोत्सवाच्या दिवशी दिव्य अस्तित्वाच्या आलेल्या अनुभूती

श्री. संगम बोरकर
१. २९.५.२०१६ या दिवशी सकाळी दैनिक सनातन प्रभातच्या मुखपृष्ठावर गुरुदेवांचे छायाचित्र होते. ते केवळ छायाचित्र नसून साक्षात् प.पू. गुरुदेव आहेत आणि ते त्या चित्रातून बाहेर येऊन बोलत आहेत, असे जाणवत होते. त्या वेळी गुरुदेवांचे ते छायाचित्र सजीव झाले आहे, अशी अनुभूती आली.
२. देवघरातील गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर बसून नामजप करतांना साक्षात् गुरुदेव मोठ्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि त्यांच्या समोर बसून मी नामजप करत असून प्रत्येक नामजप त्यांच्या चरणी पुष्पस्वरूपात अर्पण होत आहे, असे जाणवत होते. त्या वेळी पुष्कळ प्रमाणात भावजागृती होत होती.
३. देवघरातील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहिले, तेव्हा त्या छायाचित्रावर दोन दैवी कण होते.

आत्मानंद मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक असून त्या संदर्भातील सखोल मार्गदर्शन सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी उपलब्ध करून दिलेले असणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...
प.पू. पांडे महाराज
आत्मानंद मिळवण्यासाठी आम्हाला साधना करावी लागेल. साधना करण्यासाठी साधन पाहिजे. भगवंताने त्यासाठी आम्हाला मन-बुद्धीने युक्त असे शरीर दिले आहे. एवढेच नव्हे, तर आमच्या हृदयाच्या ठिकाणी भगवंत अहोरात्र जागृत अवस्थेत साहाय्य करण्यासाठी उभा आहे. त्यानेच ही प्रकृती आणि सृष्टी साधना अन् प्रयोग यांसाठी दिली आहे. आम्ही इतके भाग्यवान आहोत की, लवकर प्रगती व्हावी, यासाठी शास्त्रशुद्ध साधना कशी करावी, याचे योग्य मार्गदर्शन सनातन संस्थेद्वारे उपलब्ध झाले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी यासाठी मार्गदर्शनपर ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत.

इंग्रजी अक्षर, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण अक्षर आणि सात्त्विक पद्धतीने लिहिलेले अक्षर यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

देवनागरी लिपीतील सात्त्विकतेचा अधिकाधिक लाभ 
व्हावा, यासाठी सात्त्विक लेखनपद्धतीचाच वापर करा !
     भाषा हे संवादाचे आणि विचार अन् भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेतील विविध ध्वनींना व्यक्त करणार्‍या लिखित चिन्हांना अक्षर म्हणतात. अक्षरातील रेषांची जाडी, वळण आदींमध्ये पालट करून एकच अक्षर अनेक पद्धतींनी लिहिता येते. अनेक पद्धतींपैकी कोणती लेखनपद्धत सर्वाधिक सात्त्विक आहे ?, हे संत सांगू शकतात.
     इंग्रजी अक्षर, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण (प्रचलित) पद्धतीने लिहिलेल्या अक्षराच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी विकसित केलेल्या (सात्त्विक) पद्धतीने लिहिलेल्या अक्षरातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वायूमंडलावर काय परिणाम होतो ?, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने दोन्ही पद्धतींनी लिहिलेल्या ग या अक्षराच्या छायाचित्रांची पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप
     या चाचणीत इंग्रजी अक्षर G, सर्वसाधारण ग आणि सात्त्विक ग या अक्षरांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही अक्षरांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो, हे या चाचणीद्वारे जाणता आले.

इंग्रजी अक्षर, देवनागरी लिपीतील सर्वसाधारण (प्रचलित) अक्षर आणि सनातन-निर्मित सात्त्विक अक्षर यांची तुलनात्मक स्पंदने दर्शवणारी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली छायाचित्रे

सूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २, ३ अन् ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच अक्षरांची छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ ! : विकार-निर्मूलनासाठी नामजप


भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र
भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !
     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील विकार-निर्मूलनासाठी नामजप (भाग २) या नूतन ग्रंथाचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत.
    ही नामजप उपायपद्धत केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे.
     या ग्रंथाचे दोन्ही भागही वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. (पूर्वार्ध)
----------------------
मनोगत
    मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.
    प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते. नामजपामुळे केवळ विकार बरे होतात असे नाही, तर विकारांमुळे निर्माण होणार्‍या वेदना आणि दुःख सहन करण्याचे मनोबल आणि शक्तीही मिळते.

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५२००१२०३ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

'शेअर्स' आणि 'म्युच्युअल फंड' यांत पैशांची गुंतवणूक केल्याने होणारी संभाव्य आर्थिक हानी लक्षात घेऊन त्यात गुंतवलेेले पैसे लवकरात लवकर काढून घ्या !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

'शेअर्स' आणि 'म्युच्युअल फंड' यांत पैसे गुंतवल्यास त्यातून मिळणारा परतावा (रिटर्न्स) अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवल्यावर मिळणार्‍या व्याजापेक्षा अधिक असतो, या विचाराने अनेक जण त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करतात. बर्‍याच वेळा लाभ तर नाहीच; पण त्यात गुंतवलेली रक्कमही परत मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक हानी झाल्याची उदाहरणे आहेत.

सध्या चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे बर्‍याच आस्थापनांना आर्थिक हानी सोसावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शेअर व्हॅल्यूवर विपरित परिणाम होत असल्याने गुंतवणूकदाराचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांमधील पैसे बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांमध्ये रक्कम गुंतवली असल्यास ती लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक आहे. भविष्यातही त्यात पैशांची गुंतवणूक करू नये.

अंनिसचे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला सनातनला नाहक उत्तरदायी ठरवून पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !

साधकांना सूचना

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य प्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. 'कर नाही, त्याला डर कशाला' या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगात कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.

अक्षर सुंदर आणि सात्त्विक बनवण्यासाठी मार्गदर्शक सनातनचा आगामी ग्रंथ !

सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत
 (देवनागरी अक्षरे म्हणजे संस्कृत, मराठी अन् हिंदी अक्षरे)
    पालक अन् शिक्षक यांनी मुलांकडून अक्षरे गिरवतांनाच त्यांच्यावर चांगले हस्ताक्षर काढण्याचा सुसंस्कार करायला हवा. त्यासाठी अक्षरे सात्त्विक हवीत. ती कशी काढावी, हे प्रस्तुत ग्रंथात दिले आहे. तशी काढणारा अन् वाचणारा यांना त्या अक्षरातून चैतन्य मिळते. तसेच ग्रंथातील धर्मशिक्षण देणारे अक्षरांशी निगडित शब्द अन् शब्दांशी निगडित वाक्ये यांचाही लाभ घ्या !
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना 
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले -

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

गुरुकृपा सतत हवी

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?

माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही

(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)

-

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 

परात्पर गुरु डॉ. आठवले
आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्‍वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्‍वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

न्यूनगंड बाळगू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर 
मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


-

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षारंभ सोहळ्याला राजकारणी, मंत्री उपस्थित नव्हते, तर कार्याला आशीर्वाद देणारे संत, तसेच नाडीवाचक आणि त्यांच्या माध्यमातून सप्तर्षि उपस्थित होते !

     २९ मे २०१६ या दिवशी परात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सवी वर्षारंभ सोहळा पार पडला. या वेळी महर्षींच्या आज्ञेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सप्तर्षि जीवनाडीचे वाचन करणारे इरोड (तमिळनाडू) येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्, पुणे येथील प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरूजी, प.पू.दास महाराज आणि पू.(सौ) लक्ष्मी नाईक यांनी प.पू. डॉक्टरांचा सन्मान केला. तसेच पू. दिव्य जीवनदास महाराज, पू. सुशिला आपटेआजी हे संत या वेळी उपस्थित होते.

समस्यांची सोडवणूक !

संपादकीय 
      पावसाळा जवळ आला आहे. मुंबईसारख्या शहरातील नद्या-नाल्यांची स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, रस्त्यावरील मोठ्या वृक्षांमुळे येऊ शकणारी समस्या अशा विषयांवरील चर्चा सध्या जोरात चालू आहेत. त्यात भटकी जनावरे हासुद्धा समस्येचा एक विषय आहे. भटके कुत्रे आणि गुरे यांचा या गटात समावेश होतो. वर्षभर ही जनावरे रस्त्यावर भटकत असतात आणि रात्रीच्या वेळीही रस्त्यावरच विसावा घेत असतात. त्यामुळे वाहने आणि वाटसरू यांना त्यांचा उपद्रव होत असतो. वाहनांचे अपघात आणि कुत्र्यांनी वाटसरूंचा चावा घेणे, असे घातपाती प्रकार लोकांनी आजपर्यंत अनुभवले आहेत.

चीनशी दोन हात करा !

संपादकीय 
      जपानचे उप विदेशमंत्री अकिताका सैकी यांनी देशातील चीनचे राजदूत चेंग योंगहुआ यांना मध्यरात्रीच उठवून खडसवले. विषय काय होता ? जपानच्या अधिकारातील सेंकाकु बेटांजवळ चीनच्या युद्धनौकेने मध्यरात्री प्रवेश केला, हे त्यासाठी निमित्त ठरले. सागरी सीमा दिवस-रात्र डोळ्यांत तेल घालून जपण्याचे काम जपान करत आहे, हे यातून उघड होते. सागरी सीमा चीनच्या नौकेने तोडली, हे लक्षात येताच जपानने तातडीने त्यावर कृती केली. सीमेविषयीची जपानची शासकीय सतर्कता लक्षात घेण्यासारखी आहे. भारतीय पंतप्रधान मोदी यांनीही कित्येक वर्षांपासून खितपत पडलेला भारत-बांगलादेश सीमावाद काही दिवसांपूर्वी निकालात काढल्याचे आपण पाहिले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn