Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

राणी लक्ष्मीबाई बलीदानदिन

उत्तरप्रदेशच्या कैरानामधील बहुसंख्य धर्मांधांच्या अत्याचारांमुळे ३४६ हिंदु परिवारांचे पलायन !

  • उत्तरप्रदेश दुसरे काश्मीर होण्याच्या मार्गावर !
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते की, जेथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तेथे धर्मांधांकडून त्यांच्यावर आक्रमण झाले, तर जेथे धर्मांध अल्पसंख्यांक आहेत, तेथील बहुसंख्य हिंदूंनी त्यांना धडा शिकवला, तरच अल्पसंख्य हिंदूंचे रक्षण होईल !
  • संपूर्ण देशात हिंदू अल्पसंख्यांक झाले, तर पाक आणि बांगलादेश येथे हिंदूंची जी स्थिती आहे, तीच भारतातही होईल, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
   लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना विधानसभा क्षेत्रात धर्मांधांच्या अत्याचारांमुळे गेल्या २ वर्षांत ३४६ हिंदु परिवारांनी पलायन केले आहे. एकेकाळी ५४ टक्के असणारे मुसलमान येथे आता ९२ टक्के झाले आहेत, अशी माहिती झी न्यूज वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे. या संदर्भात शामलीचे भाजपचे खासदार हुकूम सिंह यांनी विधान केले आहे.
शामली नगरपालिका परिषदेच्या सभागृहात पत्रकारांशी बोलतांना खासदार हुकूम सिंह यांनी म्हटले आहे की,
१. कैरानामधून ३४६ हिंदु परिवारांना पलायन करावे लागले, तर उर्वरित हिंदू जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
२. यापूर्वी केवळ २५० हिंदु परिवारांच्या पलायनाची माहिती होती; मात्र त्यात आता वाढ झाली आहे. पलायन करणार्‍या हिंदु परिवारांची सूची करण्यात आली आहे.

बांगलादेशात धर्मांधांकडून आणखी एका हिंदूची हत्या !

  • भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यात आल्यावर अन्य धर्मियांचे काय होणार ?, असा प्रश्‍न विचारणारे कधी इस्लामी राष्ट्रांत हिंदूंचे काय होत आहे, याकडे लक्ष का देत नाहीत आणि त्यावर तोंड का उघडत नाहीत ?
  • हिंदूंनो, बांगलादेशात हिंदूंचा होत असलेला शिरच्छेद उद्या भारतातही होऊ लागण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • जगभरात कार्य करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना याविरोधात काहीच का बोलत नाहीत ?
  • हिंदूंनो, अशा बातम्या वाचून झोपू नका, तर स्वरक्षणार्थ संघटित व्हा !
   ढाका - तीन दिवसांपूर्वी बांगलादेशात एका ७० वर्षीय हिंदु पुजार्‍याची हत्या झाल्यानंतर आता एका ६२ वर्षीय हिंदूची हत्या करण्यात आली आहे. नित्यरंजन पांडे असे या हिंदूचे नाव असून ते येथील एका आश्रमातील कर्मचारी होते. यापूर्वी अशा पद्धतीने झालेल्या हिंदूंच्या हत्यांवरून इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या झाल्याची शंका वर्तवण्यात येत आहे.
१. नित्यरंजन पांडे हे हिमायतपूर येथील ठाकूर अनुकूल चंद्र सत्संग परमतीर्थ आश्रमाचे कर्मचारी होते. गेल्या ४० वर्षांपासून ते आश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत होते. ९ जूनला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता काही अज्ञातांनी त्यांना रोखून त्यांच्या मानेवर धारदार शस्त्रांनी वार केले.
२. जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत जिहादी धर्मांधांनी ४० लोकांची हत्या केली आहे. (५ महिन्यांत ४० लोकांची हत्या होत असतांनाही तेथील पुरोगामी देशात असहिष्णुता वाढल्याची ओरड का करत नाहीत कि तेथे पुरोगामी म्हणून कोणीच नाही ? - संपादक)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ जूनपासून गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन ! - हिंदु जनजागृती समिती

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन २०१६
  • फरीदाबाद (हरियाणा) येथे पत्रकार परिषद
  • हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृती कार्यक्रम ठरणार !
  • देश-विदेशातील १२५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ४१५ हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार !
पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. अजित पटवा, अधिवक्ता श्री. प्रशांत पटेल,
श्री. सुरेश मुंजाल (बोलतांना), कु. कृतिका खत्री आणि अधिवक्त्या श्रीमती चेतना शर्मा
    फरीदाबाद -
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करण्यासाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पंजाब आणि हरियाणा राज्य समन्वयक श्री. सुरेश मुंजाल यांनी येथे दिली. अधिवेशनाचे यंदाचे ५ वे वर्ष आहे.
   या अधिवेशनाची सविस्तर माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० जून या दिवशी फरीदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी फरीदाबाद येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. अजित पटवा, हिंदु लीगल सेल या संघटनेचे सचिव तथा प्रवक्ता अधिवक्ता श्री. प्रशांत पटेल, सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री आणि हिंदु स्वाभिमान या संघटनेच्या राष्ट्र्रीय अध्यक्षा अधिवक्त्या श्रीमती चेतना शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.

भारत पाटणकर यांच्या विरोधात महाराष्ट्र आणि गोवा येथे तक्रार !

पोलीस निरीक्षक पी.ए. चौगुले यांच्याकडे तक्रार अर्ज देतांना
सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
तथाकथित पुरोगामी डॉ. भारत पाटणकर यांनी सनातनला धमकी दिल्याचे प्रकरण
सनातनच्या सेवाकेंद्राचे पोलिसांकडून पूर्णपणे रक्षण केले जाईल ! 
- पोलीस निरीक्षक पी.ए. चौगुले, शाहूपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर
    कोल्हापूर, १० जून (वार्ता.) - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांच्या शोधासाठी १२ जूनला सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमात कोम्बिंग ऑपरेशन करणार आहोत, अशी उघड धमकी तथाकथित पुरोगामी डॉ. भारत पाटणकर यांनी ७ जूनला दिली आहे. या प्रकरणी डॉ. पाटणकर यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार सनातन संस्थेने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी, गृहराज्यमंत्री या सर्वांकडे केली आहे.

पाककडून बनावट भारतीय नोटांचे वितरण चालूच !

सुरक्षायंत्रणांना संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात अपयश !
पाकशी मैत्री करणार्‍यांना चपराक ! बनावट नोटांवर आळा
घालू न शकणारे सरकार देशासमोरील अन्य समस्या कशा सोडवणार ?
    नवी देहली - देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा व्यवसाय पसरत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन प्रयत्न करत आहे; मात्र त्यांना यश आलेले नाही. याअनुषंगाने केंद्र आणि राज्य सुरक्षा दलांकडून माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी विशेष समन्वय समूहाचा गट निर्माण करण्यात आला आहे.
१. भारताच्या चलनामध्ये प्रत्येक १० लाख नोटांमध्ये २५० नोटा बनावट आहेत. मागील मासामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या एका बैठकीमध्ये शासनाला नोटांवर नवीन नक्षी अंतर्भूत करण्याविषयी प्रस्ताव देण्यात आला होता. भारताची अर्थव्यवस्था चलनी नोटांवर आधारित असल्याने त्यामध्ये बनावट नोटांचा वाढणारा धोका लक्षात घेऊन हा प्रस्ताव दिल्याचे केंद्रीय मंडळाचे म्हणणे आहे.

देशात शाकाहाराकडे लोकांचा वाढता प्रवाह !

शाकाहार आरोग्यदृष्ट्या लाभदायक असण्यासह
 मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायक आहे !
    नवी देहली - शाकाहारी अन्नपदार्थ आरोग्यासाठी लाभाचे ठरत असल्याने देशातील शाकाहारींचे प्रमाण वेगाने वाढत आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या मांसाहारी आहे; परंतु हे प्रमाण दिवसेंदिवस न्यून होत असल्याचे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. वर्ष २०१४ मध्ये केलेले सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून नागरिकांच्या खाद्य सेवनाविषयीच्या सवयीही समोर आल्या आहेत.
१. या अहवालानुसार वर्ष २००४ मध्ये देशातील एकूण लोकसंख्येपैकी ७५ टक्के नागरिक मांसाहारी होते. वर्ष २०१४ मध्ये हे प्रमाण ७० टक्क्यांवर आले असले, तरी भारतीय लोकांची कोंबडी आणि मासे खाण्याची संख्या वाढत आहे. 

देशात काम न करणार्‍यांमध्ये मुसलमानांची संख्या सर्वाधिक !

भारतात बहुसंख्य हिंदू काम करून कर भरतात; मात्र
 हे पैसे काम न करणार्‍या अल्पसंख्यांकांवर उधळले जातात !
    नवी देहली - जनगणना विभागाने दिलेल्या नवीन माहितीनुसार देशात काम न करणार्‍यांमध्ये मुसलमानांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. ज्या भारतियांचे अर्थव्यवस्थेत कोणतेही योगदान नसते, त्यांची जनगणना विभागाच्या वतीने सूची बनवण्यात येते. यात बेरोजगार, घरकाम करणारे आणि शेतात काम करणारे यांचा समावेश आहे.
१. देशात मुसलमानांची लोकसंख्या १७ कोटी २२ लाख आहे. यांतील ६७.४२ टक्के म्हणजे ११ कोटी ६१ लाख मुसलमानांना काम न करणार्‍यांच्या सूचीमध्ये दाखवण्यात आले आहे.  

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉरच्या) नियमावलीत लवकरच पालट करणार ! - अरुण जेटली, केंद्रीयमंत्री

    नवी देहली - उडता पंजाब चित्रपटाच्या संदर्भात केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने केलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे की, चित्रपटाचे परिनिरीक्षण करण्याचे नियम अधिकाधिक उदार असायला हवेत. त्या दृष्टीने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या नियमावलीत लवकरच अमूलाग्र पालट केले जातील.
    जेटली पुढे म्हणाले की, चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र देण्याच्या सध्याच्या पद्धतीवर मी समाधानी नाही. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी याविषयी एक परिपूर्ण अहवाल शासनाला दिला आहे. त्याचा पहिला भाग माझ्यापर्यंत आला असून त्यावर विचार चालू आहे. काही दिवसांतच महत्त्वपूर्ण पालटांची घोषणा केली जाईल.
    जेटली यांनी असेही स्पष्ट केले की,  ज्याला आपण सेन्सॉर बोर्ड म्हणतो, ते प्रत्यक्षात प्रमाणपत्र मंडळ आहे. तसेच त्याच्याही पुढे लवाद आहेच. मंडळाच्या कामावर तुम्हाला आक्षेप असेल, तर लवादाकडे दाद मागता येते.

पत्नी काळी होती म्हणून जाळले !

बंगालमध्ये मुसलमान आणि त्याचे कुटुंबीय यांचे क्रौर्य
अशा क्रूरकर्म्यांना शरीयतनुसार देहदंडाची शिक्षा का देण्यात येऊ नये ?
    वीरभूम (बंगाल) - येथील सोमेरा बीबी या २२ वर्षीय विवाहितेला ती काळी असल्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. सोमेरा हिने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीत याविषयी माहिती दिली.
    नासीर याने ३ वर्षांपूर्वी १ लाख रोख आणि काही भूमीच्या बदल्यात सोमेराशी लग्न केले होते; परंतु सोमेराचा रंग काळा असल्याने नासीर आणि त्याचे कुटुंबीय तिला सतत त्रास देत असत. आमच्या मुलाला तुझ्यापेक्षा चांगली, गोरी मुलगी हवी होती. तुला येथे राहायचे असेल तर आईवडिलांकडून पैसे आण, अशी मागणी त्यांच्याकडून जात होती. सोमेराच्या आई-वडिलांनी मुलीसाठी अनेकदा पैशाच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर नासीर याच्या कुटुंबियांनी घर बांधण्यासाठी तिच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली. ती  शक्य नसल्याने सोमेराने त्यांना विरोध केला. त्यामुळं संतापलेला नासीर आणि तिचे कुटुंबीय यांनी तिला एका खोलीत कोंडले आणि अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.

पराभवांमुळे निर्माण झालेल्या पैशांच्या टंचाईमुळे इसिसच्या उत्पन्नाची स्थिती अत्यंत बिकट !

    मोसूल - इसिसच्या होत असलेल्या पराभवामुळे इसिसची उत्पन्नाची स्थिती अत्यंत बिकट असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांवरून प्रसारित होत आहेत. गेल्या वर्षी जून मासामध्ये इसिसचे ८० मिलियन डॉलर (५३४ कोटी रुपये) उत्पन्न होते. आता मार्च २०१६ पर्यंत त्याच्यामध्ये घट होऊन ५६ मिलियन डॉलर (३७४ कोटी रुपये) राहिले आहे. जून २०१५ मध्ये इसिसच्या कह्यात असलेल्या क्षेत्रामध्ये ९० लाख लोक होते. आता ते ६० लाख झाले आहेत. पैशाच्या तुटवड्यामुळे इसिसने त्याच्या आतंकवाद्यांचे वेतन अर्धे केले आहे. आर्थिक टंचाईसह इसिसची त्याच्या नियंत्रणातील क्षेत्रावरील पकडही ढिली होत चालली आहे.

उच्च न्यायालयात स्थगिती असल्याने पुढील सुनावणी २४ जून या दिवशी

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
     कोल्हापूर, १० जून (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात यावर २३ जून या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे, त्यामुळे कोल्हापूर येथील सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांना केली. ही विनंती न्यायाधिशांनी मान्य करत कोल्हापूर येथील पुढील सुनावणी २४ जून या दिवशी होईल, असे सांगितले. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. विशेष शासकीय अधिवक्ता हर्षद निंबाळकर हेही सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांनी उच्च न्यायालयाचा स्थगितीचा आदेश न्यायालयात सादर केला. श्री. समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी बाजू मांडली. श्री. समीर गायकवाड पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उपस्थित होते.

जपानने मध्यरात्री चीनच्या राजदूताला उठवून खडसवले !

जपानच्या समुद्र सीमेत चिनी युद्धनौकेने प्रवेश केल्याचा परिणाम !
जपानप्रमाणे चीनला खडसवण्याचे धाडस भारत कधी दाखवील का ?
    टोकियो - चीनच्या पूर्वेकडील समुद्रामध्ये असणार्‍या जपानच्या अधिकारातील सेंकाकु बेटांजवळ चीनच्या युद्धनौकेने मध्यरात्री प्रवेश केला. यामुळे जपानचे उप विदेश मंत्री अकिताका सैकी यांनी मध्यरात्रीच देशातील चीनच्या चेंग योंगहुआ या राजदूताला उठवून त्याला खडसवले. यानंतर चीनच्या युद्ध नौका माघारी वळल्याची घटना नुकतीच घडली. या वेळी याच भागामध्ये काही रशियन नौकाही आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बेटांवर चीनचाही दावा असून चीनकडून या बेटांचे नामकरण दिआयु असे करण्यात आले आहे.

काबूलमध्ये भारतीय महिलेचे अपहरण !

    काबूल - आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क या आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करणार्‍या ज्यूडिथ डिसोझा या भारतीय महिलेचे काबूलमधून अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डिसोझा कोलकात्यातील रहिवासी आहे. भारतीय दुतावासाने महिलेच्या अपहरणाचे सूत्र अफगाणिस्तान प्रशासनासमोर मांडले आहे. अपहरणकर्त्याच्या तावडीतून महिलेला सुखरूप सुटका करण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. दुसरीकडे आखाती देश रियाधमध्येही एका भारतीय महिलेला बंधक बनवल्याचे वृत्त आहे.

चीनची पाकमध्ये ६० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक

    बीजिंग - पाकिस्तानातील रेल्वेच्या जाळ्याचा दर्जा वाढवणे आणि इराणला जोडणारी महत्त्वाची वायूवाहिनी (गॅस पाइपलाइन) उभारण्यासाठी चीन त्या देशात सुमारे ६० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

छोटा राजनला ठार मारण्यासाठी आलेल्या दाऊद इब्राहिम टोळीच्या ४ गुंडांना अटक !

    नवी देहली - कुख्यात गुंड छोटा राजनची हत्या करण्यासाठी आलेल्या ४ गुंडांना देहली पोलिसांनी अटक केली आहे. हे चारही गुंड दाऊद इब्राहिम टोळीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून ९ एम्एम्च्या बंदुका आणि रोख रक्कम जप्त केली आहे. चारही गुंड देहली, नोएडा आणि एन्सीआर् परिसरात रहाणारे होते. छोटा राजनला कारागृहामध्ये घुसून किंवा त्याला न्यायालयात उपस्थित केले जाते, त्यावेळी ठार करण्याचा त्यांचा कट होता.

देशात प्रतिदिन रस्त्यांवरील अपघातांत ४०० जणांचा मृत्यू होतो !

स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनीही रस्त्यांवरील
अपघातास आळा घातला जात नाही, हे संतापजनक !
    नवी देहली - सदोष मार्गांमुळे देशात प्रतिदिन रस्त्यांवरील अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गेल्या २ वर्षांत प्रामाणिक प्रयत्न करूनही फार काही पालट झाला नाही, अशी स्वीकृतीही त्यांनी दिली. तसेच यापुढे असे आम्ही होऊ देणार नाही. या अहवालामुळे मला खूपच वेदना होत आहेत, असेही ते म्हणाले. भारतातील रस्ते अपघाताविषयीचा वर्ष २०१५ चा अहवाल सार्वजनिक करतांना ते बोलत होते. २०१५ मध्ये झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी ७७.१२ टक्के अपघातांना चालकाची चूक कारणीभूत आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देहलीत सुधारगृहातील १२ मुलींवर अधीक्षकाकडून लैंगिक अत्याचार

अशा नराधमावर तात्काळ खटला चालवून
त्याला भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
    नवी देहली - येथील बालसुधार गृहातील ८ ते १० वयोगटातील १२ मुलींवर सुधारगृहातील अधीक्षकानेच लैगिंक अत्याचार केल्याचे उघड झाले असून या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. या गंभीर प्रकरणात या अधीक्षकाने या अत्याचारांची छायाचित्रे तसेच व्हिडिओही रेकॉर्ड केल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा खनीकर्म अधिकारी अभय भोगी यांच्याकडून बॉक्साईट उत्खनन कामात भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेनेचा आरोप !

अजय भोगी यांना शिवसेना जिल्हाप्रमुखांनी खडसवले !
 
खनीकर्म अधिकारी भोगी यांना अकार्यक्षम काम केल्याचे मानपत्र देतांना शिवसैनिक
    कोल्हापूर, १० जून (वार्ता.) - जिल्ह्यात बॉक्साईट उत्खनन होत आहे. त्यापैकी पंडितराव माईन्स अ‍ॅण्ड मिनरल्स प्रा. लिमिटेड मु.पो. मिणचे यांचा महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांनी उत्खननास दिलेला परवाना (अनुज्ञप्त पत्र) ३१ मार्च २०१५ या दिवशी संपला आहे. तरीही १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत १० सहस्र पास अनधिकृतपणे जिल्हा खनीकर्म अधिकारी यांनी दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हा खनीकर्म अधिकारी अभय भोगी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने ८ जून या दिवशी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी ८ जून या दिवशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संजय पवार आणि विजय देवणे यांनी जिल्हा खनीकर्म कार्यालयात भोगी यांना धारेवर धरून चांगलेच खडसवले. या वेळी भोगी यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पवार आणि देवणे हे तीव्र संतप्त झाले. त्यांनी दोन दिवसांत या प्रकरणाची सविस्तर माहिती न दिल्यास भोगी यांच्या तोंडाला काळे फासण्याची त्यांनी चेतावणी दिली. या वेळी शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

कर्नल पुरोहित यांच्या जामिनासाठी खालच्या न्यायालयात दाद मागा ! - मुंबई उच्च न्यायालय

     मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना जामीन नाकारला असून जामिनासाठी खालच्या न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे योग्य न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात येईल, असे कर्नल पुरोहित यांचे अधिवक्ता श्रीकांत शिवडे यांनी सांगितले.
१. जामिनासाठी केलेल्या याचिकेची सुनावणी न्या. नरेश पाटील यांच्या समोर चालू असतांना त्यांना कर्नल पुरोहित आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत शासकीय अधिवक्ता संदेश पाटील यांनी ऐकवली. 
२. या ध्वनिफितीत हिंदू जागरण संघटनेचा उल्लेख होता. जेव्हा न्यायमूर्तींनी या संघटनेची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केली आहे का?, असा प्रश्‍न विचारला असता नकारार्थी उत्तर आले. अशी चौकशी आतंकवादविरोधी पथकानेही केली नव्हती, असे सांगण्यात आले.

डॉ. पाटणकर यांनी कोम्बिंग ऑपरेशनद्वारे प्रथम देशातील आतंकवाद आणि नक्षलवाद नष्ट करावा ! - मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत डावीकडून अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, श्री. मनोज खाडये (बोलतांना),
आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे,
हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी, धर्माभिमानी श्री. रणजीत आयरेकर
कोल्हापूर, १० जून (वार्ता.) - श्रमिक मुक्तीदलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी यापूर्वी सनातन संस्थेला कोम्बिंग ऑपरेशन करण्याची धमकी देऊन आपल्या हिंसक प्रवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार असून डॉ. पाटणकर यांना कोल्हापूर जिल्हाबंदी करण्यात यावी. डॉ. पाटणकर यांच्याकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेपेक्षाही कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे एवढे प्रगत तंत्रज्ञान आणि शक्ती आहे, तर त्यांनी देशात वाढत चाललेला आतंकवाद, नक्षलवाद, धर्मद्रोही आणि राष्ट्रदोही यांच्या विरोधात शोधमोहीम राबवून आतंकवाद आणि नक्षलवाद नष्ट करावा, असे जाहीर आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी १० जून या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. येथील हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात दुपारी १२ वाजता ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी सनातनचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी आणि धर्माभिमानी श्री. रणजीत आयरेकर उपस्थित होते.

बीड येथे विजेच्या तारेचा स्पर्श होऊन तिघांचा मृत्यू

महावितरणच्या गलथानपणाचे बळी !
      बीड - तालुक्यातील बाळापूर येथे वीजेचा प्रवाह उतरलेल्या तारेला चिटकून एकाच कुटुंबातील तिघांचा मुत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि दोन मुले यांचा समावेश आहे. बाळापूर येथील नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ जूनला रात्री ही घटना घडली. 
    बाळापूर येथील सुरवसे कुटुंबातील बाबासाहेब नाना सुरवसे, सुभाष बाबासाहेब सुरवसे व अशोक बाबासाहेब सुरवसे यांचा तारेला चिटकून मृत्यू झाला. कपडे वाळत टाकलेल्या तारेवर वीजेची तार पडली होती. तारेवरील कपडे घेण्यासाठी गेलेल्यांना विजेचा धक्का लागला. सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे २६ गोवंशांची मुक्तता, दोन धर्मांध अटकेत

गोवंशियांचे रक्षण आणि गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही यांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !
      सिल्लोड, १० जून - गोरक्षक मनोज मोरेल्लु यानी दिलेल्या माहितीवरून येथील आंबेडकर चौकात अवैधरित्या बोरगाव बाजार येथून भाग्यनगरकडेे २६ गोवंश घेऊन जाणारा एक कंटेनर सिल्लोड पोलिसांनी ८ जून या दिवशी पकडला. या प्रकरणी मनोज मोरेल्लु यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून मो. मोहसिन मो. आसिफ आणि मो. शादाब मो. मुंतजीर यांना अटक केली आहे. सदर कंटेनर हा सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात जमा केला असून गोवंशांना पोलिसांनी पळशी येथील गोशाळेत जमा करण्यात आले आहे. सदरचा कंटेनर पकडण्यासाठी मनोज मोरेल्लु यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पोलिसांना साहाय्य केले. (गोवंश रक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या मनोज मोरेल्लु आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन ! - संपादक)

पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांना मारहाण

कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नसल्याचे द्योतक !
      पुणे, १० जून - सहकारनगर-२ येथील पालिकेच्या सांस्कृतिक केंद्र दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांना काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. (जिथे नगरसेवकच असुरक्षित असतील, तिथे सर्वसामान्य किती सुरक्षित असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) ही घटना ९ जून या दिवशी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 
१. पालिकेने ३० लक्ष रुपये व्यय करून सांस्कृतिक केंद्र बांधले आहे. त्याची २ मासांपूर्वी काही तरुणांनी नासधूस केली होती. त्या दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी सुभाष जगताप आणि अधिकारी गेले होते. 
२. त्या वेळी काही जण केंद्राच्या परिसरात क्रिकेट खेळत होते. जगताप यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या टोळक्याने जगताप यांच्यासह इतरांना शिवीगाळ केली. काही जण जगताप यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना मारहाणही केली.

मिरज येथे धर्मांध पोलिसाकडून महिला पोलिसावर बलात्कार

असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? 
     मिरज - येथील गांधी चौक पोलीस ठाण्यातील एका महिला पोलिसावर तेथीलच धर्मांध पोलीस वसीम मुसा अत्तर याने बलात्कार केला आहे. (आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनी वासनांध धर्मांधांचा चौरंगाच केला असता ! - संपादक)
     जानेवारी २०१५ ते २९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत त्याने सांगलीतील अनेक वसतीगृहांमध्ये तिच्यावर बलात्कार केला. वसीमची आई आणि भाऊ यांनीही तिला काही दिवसांपूर्वी अपशब्द उच्चारून मारहाण केली, तसेच धमकी दिली. याविषयी तिने केलेल्या तक्रारीनंतर वसीम, त्याची आई आणि भाऊ यांच्या विरोधातही गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (संबंधितांना कठोरात कठोर शासन होणे आवश्यक ! - संपादक)

सनातनच्या साधक पाल्यांचे १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सुयश

कु. महेश सावळेकर
कु. अमित वीरकर
कु. पूर्वा करकरे
 
 
कु. महेश याला ९२ टक्के, तर कु. पूर्वा हिला ९१ टक्के गुण ! 
कोल्हापूर, १० जून (वार्ता.) - येथील सानेगुरुजी वसाहत येथे रहाणार्‍या सनातनच्या साधिका सौ. सुनंदा सुहास सावळकर यांचा मुलगा कु. महेश याला इयत्ता १०वीच्या परीक्षेत ९२.२० टक्के इतके गुण मिळाले आहेत.
कु. महेश हा प्रासंगिक सेवा, प्रार्थना आणि उपाय करत होता. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच मला यश मिळाले आहे, असे त्याने सांगितले. भविष्यात राष्ट्रीयीकृत अधिकोषात अधिकारी होण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
    कु. पूर्वा मंदार करकरे हिला इयत्ता १०वीच्या परीक्षेत ९१.४० टक्के इतके गुण मिळाले आहेत. यशाविषयी कु. पूर्वा म्हणाली की, मी अभ्यासाला बसण्यापूर्वी गुरूंच्या चरणी वेळोवेळी प्रार्थना, भावपूर्ण नामजप करत होते. त्यामुळे मला याचा लाभ झाला. तसेच मला आई, बाबा, आजी आणि शिक्षक यांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभले. त्यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला. गुरूंच्या कृपेमुळे मला हे यश मिळाले आहे. त्याविषयी गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.

पुणे महानगरपालिकेने महत्त्वाच्या चर्चेसाठी बोलावलेल्या विशेष सभेत अवघे ७ नगरसेवक उपस्थित

यावरून पालिकेच्या सदस्यांना जनतेचे प्रश्‍न आणि चौकशी समित्यांचे 
अहवाल यांविषयी किती कळवळा आहे, हेच दिसून येते !
      पुणे, १० जून - महानगरपालिकेच्या विविध खात्यांची प्रलंबित कामे, तसेच चौकशी समितींच्या ३६ अहवालांवर चर्चा करण्यासाठी ८ जून या दिवशी एक विशेष सभा बोलावण्यात आली होती. या विशेष सभेला केवळ ७ नगरसेवक उपस्थित राहिल्यामुळे ही सभा अक्षरशः गुंडाळावी लागली. (या प्रकरणी सभा आयोजनासाठी झालेला व्यय पालिका प्रशासन अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांकडून वसूल करेल का ? - संपादक) ही विशेष सभा २ मास पुढे ढकलण्यात आली आहे.
१. पालिकेच्या सभागृहात सभेला आरंभ झाला, त्या वेळी सभेला आवश्यक एवढी पुरेशी गणसंख्या नसल्याचे सूत्र भाजपचे गटनेता गणेश बीडकर यांनी मांडले. तेव्हा महापौर प्रशांत जगताप यांनी कामकाज चालू करण्याविषयी सांगितले.

गोव्यात सिनेतारका, मॉडेल्स् यांचा सहभाग असलेले सेक्स रॅकेट उघडकीस

गोव्यात फोफावलेला वेश्याव्यवसाय नष्ट 
करण्यासाठी शासन काय प्रयत्न करणार आहे ?
    पणजी - सिनेतारका, मॉडेल्स् यांचा सहभाग असलेले सेक्स रॅकेट गोवा पोलिसांनी उघडकीस आणले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कश्यप यांनी ९ जून या दिवशी येथे पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणारा मुंबईस्थित आनंदकुमार यांच्यासह ४ वेश्यांना रायबंदर येथे अटक करण्यात आली आहे. येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने या पाचही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी एका मुलीची सुटका करण्यात आली आहे.

मराठीप्रेमींचे वास्को (गोवा) येथे जोशी चौकात भर पावसात लाक्षणिक उपोषण !

पाऊसही मराठीप्रेमींच्या निर्धाराला थांबवू शकला नाही !
    पणजी, १० जून (वार्ता.) - मराठी राजभाषा व्हावी, यासाठी मराठीप्रेमींनी भर पावसाळ्यातही आंदोलन तीव्र केले आहे. शासनाने येत्या विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषा विधेयक संमत करून मराठीला राजभाषेला दर्जा द्यावा, या मागणीसाठी राजभाषा समितीच्या सदस्य तथा मराठीप्रेमी यांनी वास्को येथील जोशी चौकात ८ जून या दिवशी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

विश्रांतवाडी (जिल्हा पुणे) येथील बालसुधारगृहातून ५ मुले काळजीवाहकाला (केअरटेकर) मारहाण करून पसार

राज्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी गृह विभाग आणि शासन काही प्रयत्न करेल का ?
     पुणे, १० जून - विश्रांतवाडी येथील बालसुधारगृहातील ५ अल्पवयीन गुन्हेगार मुलांनी जितेंद्र रासकर आणि पी.व्ही. कोरे या २ काळजीवाहकांचे (केअरटेकर) हातपाय बांधून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना खोलीत डांबून ते ५ जण पसार झाले. ही घटना ८ जून या दिवशी सायंकाळी घडली. हीच ५ मुले यापूर्वीही नाशिक येथील बालसुधारगृहातूनही पसार झाली होती. (यावरून कायद्याचा धाक संपला आहे, असे वाटल्यास चुकीचे काय ? - संपादक) पसार झालेल्या मुलांविषयी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती बालसुधारगृहाचे अधीक्षक शरद कुर्हाडे यांनी दिली. 
१. ती सर्व मुले पुणे जिल्ह्यातील असून त्यांच्यावर गेल्या ३ वर्षांपासून बाल न्यायालयात खटले चालू आहेत. (कूर्मगतीने चालणारी न्यायप्रणाली ! - संपादक) 
२. सायंकाळी बालसुधारगृहातील सर्व मुलांना जेवणासाठी सोडले, त्या वेळी त्या ५ जणांनी उपरोक्त अपप्रकार केला. त्यानंतर त्यांनी सुधारगृहाच्या मागील बाजूस असलेल्या उंच भिंतीवरून उड्या टाकून पलायन केले.


लव्ह जिहाद बॉम्बस्फोटापेक्षा अधिक घातक ! - समीर दरेकर

     कराड (जिल्हा सातारा) - हिंदु मुलीना फसवून तिच्या सहमतीने अथवा बलपूर्वक धर्मांतर केले जात आहे. एखाद्या बॉम्बस्फोटापेक्षा लव्ह जिहाद अधिक घातक झाला आहे, असे परखड मत श्री. समीर दरेकर यांनी कृष्णामाई मंगल कार्यालय, कराड येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने नुकत्याच आयोजित कराडमध्ये लव्ह जिहाद आणि सध्याचा हिंदु समाज या कार्यक्रमात व्यक्त केले.
     ते पुढे म्हणाले की, लव्ह जिहाद हे असंवैधानिक आहे. लव्ह जिहाद आपल्या घरी घडणार नाही, असे कोणी समजू नये. हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांच्या मुलीसुद्धा फसल्या आहेत. मुसलमान मुलीही लव्ह जिहाद करतात आणि मुलांना धर्मांतर करण्यास भाग पडतात. आपल्या मुलांना गीता, रामायणाचे शिक्षण द्याच; परंतु समवेत कुराणमधील काही पूर्वाध (मक्का) आणि उत्तरार्ध (मदीना) यांतील सुरह आणि आयात यांची माहिती द्या म्हणजे आपली मुले त्यांच्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत. यानंतर त्यांनी लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींची काही उदाहरणे दिली. या वेळी २०० धर्माभिमानी उपस्थित होते.

सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकास लाच घेतांना अटक

     सोलापूर - ना-हरकत प्रमाणपत्र सिद्ध करून देण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील दुय्यम चिटणीस शाखेतील संतोष चंदर लाखात या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ जून या दिवशी अटक केली. याविषयी सदर बझार पोलिसात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. तरच इतरांवर वचक बसेल. - संपादक)

वन खात्याकडून बेडकांची शिकार करणार्‍यांवर कारवाई

    पणजी, १० जून (वार्ता.) - गोवा राज्याच्या वन खात्याच्या अधिकार्‍यांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत बेडकांना पकडून त्यांना विकण्यासाठी नेणार्‍या ५ जणांना अटक केली. पारोडा आणि चंद्रावाडो, फातोर्डा येथे केलेल्या कारवाईत १०० बेडकांची सुटका करण्यात आली. मान्सूनमध्ये बाहेर पडणार्‍या बेडकांची शिकार करून त्यांना खाण्याचे प्रकार गोव्यात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात घडतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने घेतला एक बळी !

    सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. ८ जूनला दुपारनंतर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सायंकाळनंतरही पावसाची रिपरिप चालू होती. यावर्षी कधी नव्हे ती जिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसली. किनारपट्टी भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. दमदार मान्सूनपूर्व पावसाने मात्र सार्‍यांनाच दिलासा मिळाला आहे. वातावरणातही चांगलाच थंडावा निर्माण झाला आहे. बळीराजाने पेरणीची कामे वेगाने हाती घेतली असून येत्या दोन दिवसांत हा पाऊस आणखी जोरदारपणे पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

नायजेरियन नागरिकांचे गोव्यात स्वागत ! - पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सिरीयन शरणार्थींना युरोपीय देश नाकारत आहेत, तर आम्ही 
नायजेरियन नागरिकांना येथील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी पायघड्या घालत आहोत !
नवी देहली - नायजेरियन नागरिकांसह सर्व परदेशी नागरिकांचे गोव्यात स्वागत आहे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले आहे. 
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना पुढे म्हटले की, गोवा शासन प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देण्यास कटीबद्ध आहे.

व्हीटीपीएम्एस् यंत्रणा समुद्रातील जहाजांवरील आतंकवादी आणि तस्करीसंबंधी कारवायांवर लक्ष ठेवणार

    पणजी - व्हेसल ट्रॅफीक अ‍ॅण्ड पोर्ट मॅनेजमेंट सीस्टम (व्हीटीपीएम्एस्) यंत्रणा समुद्रातील जहाजांवरील आतंकवादी आणि तस्करीसंबंधी कारवायांवर लक्ष ठेवणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान विभागातील अधिकार्‍याने दिली आहे.
    गोव्यातील समुद्रकिनारपट्टीवर आतंकवादी आणि तस्करीसंबंधी कारवाया होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उपरोल्लेखित यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे, तसेच अशी यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव बंदर कप्तान विभागाने गोवा शासनाला दिला आहे. या नवीन यंत्रणेमुळे मालाची वाहतूक करणार्‍या आंतरराष्ट्रीय जहाजांना विनाअडथळा जलवाहतूक करण्यास ही यंत्रणा साहाय्य करणार आहे. या यंत्रणेमुळे गोव्यातील किनारपट्टीला पूर्ण सुरक्षा मिळणार आहे. 

चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ मर्चंट याच्याकडून बलात्कार झाल्याची अभिनेत्रीची तक्रार !

    मुंबई - हिंदी चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ मर्चंट याने अमली पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप एका ३२ वर्षीय अभिनेत्रीने केला आहे. यासंदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात अल्ताफ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मर्चंट याने या तरुणीला तो मनसेचा पदाधिकारी असून राज ठाकरे आणि अन्य नेत्यांची त्याची जवळीक असल्याचे सांगत चित्रपटांत काम देण्याचे आमीष दाखवले होते.

सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी दत्तात्रय शिंदे

    सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या पाठोपाठ जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचेही तडकाफडकी स्थानांतर झाले आहे. शिंदे यांचे सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी स्थानांतर झाले असून त्यांच्या जागी सांगलीचे पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्‍नावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला खडसवले !

    मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविषयीच्या एका याचिकेवर सुनावणी करतांना राज्य शासनाला खडसावले.
    वर्ष २०१३ मध्ये सांगली जिल्ह्यात कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुलाचे वडील मारुती हाले यांनी मिरज महानगरपालिकेकडून २० लाख रुपयांची हानी भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत त्याचे जनहित याचिकेत रूपांतर केले. तसेच राज्य आणि केंद्र शासनाने भटक्या कुत्र्यांविषयी काय उपाययोजना केली, याविषयी माहिती ४ आठवड्यांत सादर करण्यास सांगितले.

हिंदूंनो, तुमचा प्रत्येक अमूल्य क्षण हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी कारणी लावा !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या पंचम 
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
डॉ. गंगाराम तिवारी, राष्ट्रीय
अध्यक्ष, वैदिक सनातन धर्म आणि
राष्ट्र रक्षा मंच, अयोध्या,
उत्तरप्रदेश
.
      रामनाथी, गोवा येथे ११ जून ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात अयोध्या येथील वैदिक सनातन धर्म आणि राष्ट्र रक्षा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गंगाराम तिवारी यांनी मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
     आपल्या देशाचे दुर्दैव की, १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी सत्तेच्या लोभापोटी तत्कालीन राज्यकर्त्यांनी राष्ट्राचा विश्‍वासघात केला आणि सत्ता हस्तांतरणाच्या कराराच्या माध्यमातून तडजोड करून देशाला पुन्हा पारतंत्र्यात ढकलले. आजही या सत्ता हस्तांतरणाचीच शपथ घेऊन केंद्र आणि राज्य शासनांमध्ये मंत्री, राज्यमंत्री आदी सत्तेत बसतात.

रणचंडिका झाशीची राणी

राणी लक्ष्मीबाई बलीदानदिनाच्या निमित्ताने...
१. वीर, पराक्रमी योद्धा ! 
      झाशीची राणी सर्वोत्कृष्ठ होती आणि तिच्याएवढा धैर्यवान योद्धा आपण बघितला नाही, असे ज्याच्याविरुद्ध समरांगणावर तिचा शेवटचा संग्राम झाला, त्या सेनापती सर ह्यू रोजने म्हटले आहे. झाशीची राणी बालपणी भातुकली खेळली नाही. ती मर्दानी खेळात रमे आणि ही आवड तिने आपल्या मैत्रिणींमध्ये अशी संक्रमित केली की, पहाता पहाता स्त्रियांची युद्धकुशल पलटण उभी राहिली. झाशीच्या स्वातंत्र्यासाठी ही पलटण लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली तीन महिने प्राण तळहातावर घेऊन लढत होती. राणी मल्लखांबावरील कसरती नियमितपणे आणि सफाईदारपणे करत असे. त्यामुळे शरिराचा समतोल सांभाळण्याच्या कलेत ती पारंगत झाली. त्या काळातील अतिशय थोड्या अश्‍वपारख्यामंध्ये तिची गणना होत असे.

मोरोपंतांची लहानगी चिमुकली । इतिहासात अजरामर झाली ॥

     ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी (११.६.२०१६) या दिवशी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून ही काव्यसुमनांजली समर्पित करत आहोत.
वाराणसीच्या तीर्थस्थानी, मोरोपंतांच्या निवासस्थानी ।
१८२८ सालच्या जन्मदिनी,
पृथ्वीवर अवतरली एक रणरागिणी ॥ १ ॥

आकाशातली परी भूवरी आली,
तिच्या आगमनाने फुले बहरली ।
कोवळ्या वयात मातृसुखाला मुकली,
तरी मनुताई नाही हिरमुसली ॥ २ ॥

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

१. साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांच्या सहकार्‍यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबून अनन्वित अत्याचार करणारे अधिकारी अन् संबंधित राज्यकर्ते यांना कठोर शासन करण्यात यावे. 
२. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ॐ चे उच्चारण सक्तीचे करण्यात यावे.
३. महाराष्ट्र राज्याच्या बालभारतीच्या सहावीच्या इयत्तेसाठी असलेल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारताच्या नकाशात अरुणाचल प्रदेश न दाखवणार्‍यांवर कारवाई करण्यात व्हावी.
स्थळ - शिवाजी चौक, भिवंडी
दिनांक - रविवार, १२ जून २०१६, सायंकाळी ५ वाजता
संपर्क क्र. - ९९८७०२७४२७
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा सीएन्जी पुरवठा बंद करणार !

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची चेतावणी
    पुणे, १० जून - पुणे महानगर परिवहन महामंडळ सीएन्जी पुरवठा करणार्‍या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची (एम्एन्जीएल्) २१ कोटी रुपयांची थकबाकी देणे बाकी आहे. १५ जूनपर्यंत ती न दिल्यास सीएन्जीचा पुरवठा बंद करण्याची चेतावणी एम्एन्जीएल्ने दिली आहे. (आणखी किती जणांची थकबाकी देणे बाकी आहेत, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : १२ जून २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ जून या 
दिवशी दुपारी ३.३० पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

चैतन्यरूपी प्राणवायू देणारी मंदिरे !

     मानवाला मंदिरांतून चैतन्यरूपी प्राणवायू (ऑक्सिजन) मिळत आहे; म्हणून माणूस जिवंत आहे, अन्यथा तो रज-तमाच्या वाढत्या आक्रमणात कधीच गुदमरून मेला असता.- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१.२०१६)

सनातनच्या विकार-निर्मूलनासाठी विविध उपचार पद्धती या ग्रंथमालिकेच्या निर्मितीकार्यात साहाय्याची आवश्यकता !

       आगामी भीषण आपत्काळाचे गांभीर्य ओळखून सनातन संस्था विकार-निर्मूलनासाठी विविध उपचार पद्धती ही ग्रंथमालिका प्रकाशित करत आहे. या ग्रंथमालिकेत दैवी चिकित्सांचाही अंतर्भाव करण्यासाठी त्यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कावीळ, नागिण, पोटाचे विकार, वंध्यत्व, मूतखडा, विषबाधा आदी विकारांवर दैवी चिकित्सा, तसेच दैवी चिकित्सा करणारे यांविषयी माहिती असल्यास अवश्य कळवावे. 
यासाठी संपर्क करा : ९४०४९५६०७४ 
ग्रंथनिर्मितीच्या धर्मसेवेत सहभागी होऊन ईश्‍वरी कृपा मिळवा !

मुसलमानांना संघाची भीती का वाटत नाही, याचा संघवाल्यांनी विचार करणे आवश्यक !

    संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील गारखेडा परिसरातील मोकळ्या मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरवली म्हणून शिवीगाळ, मारहाण करत धमक्या दिल्याच्या प्रकरणी संशयित ख्वाजा अमीन सैय्यद लतीफ याचा अटकपूर्व जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला. ७ फेब्रुवारीला रात्री येथील फोस्टर शाळेजवळील मैदानातील संघाची शाखा संपल्यानंतर स्वयंसेवक गप्पा मारत असतांना दुचाकीवरून २ धर्मांध आले आणि त्यांनी शाखा का भरवता, असे विचारत स्वयंसेवकांना शिवीगाळ आणि मारहाण करून धमक्याही दिल्या होत्या.

अशा पोलिसांनाच बडतर्फ करून आजन्म कारागृहात ठेवा !

    राजस्थानच्या प्रतापगड येथे गोतस्करांना पकडून मारहाण केल्याच्या प्रकरणी बजरंग दलाच्या १० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कार्यकर्त्यांनी गोतस्करी करणारे ट्रक पकडून १०२ गोवंशांची सुटका केली होती आणि वाहन चालकांना मारहाण केली होती. सुटका करण्यात आलेल्या गोवंशापैकी ४ जणांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता.

नायजेरियाचे नागरिक देशात प्रवासी म्हणून येत असल्यास मुदत संपल्यावर ते जातात कि नाही, इकडे पोलीस लक्ष का देत नाहीत ? कि पोलिसांना त्यांच्याकडून हप्ते मिळतात ?

    गोव्यात अमली पदार्थ विक्री करणार्‍या एका नायजेरियन नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाने पेडे, म्हापसा येथे पकडले. त्याच्याकडून १ लक्ष ६ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव जॉन्सन ऑगुगा आक्साफॉर (वय ३४ वर्षे) असे आहे. त्याच्याकडून एल्एस्डी आणि गांजा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

फलक प्रसिद्धीकरता

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या वर्ष १९९०च्या इतिहासाची आता उत्तरप्रदेशमध्ये पृनरावृत्ती !
उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना विधानसभा क्षेत्रात धर्मांधांच्या अत्याचारांमुळे गेल्या २ वर्षांत ३४६ हिंदु परिवारांनी पलायन केले आहे. एकेकाळी येथे अनुमाने ४५ टक्के असणारे हिंदु आता ८ टक्क्यांवर आले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 UPke Shamli jileke Kairaname dharmandhoke atyacharose pidit 346 Hindu parivaroka palayan
Kashmiri Hinduoke vanshvicchedke itihaaski kya ye punravrutti?
जागो !
उत्तरप्रदेश के शामली जिले के कैराना में धर्मांधों के अत्याचारों से पीडित ३४६ हिन्दू परिवारों का पलायन.
कश्मीरी हिन्दुआें के वंशविच्छेद के इतिहास की क्या ये पुनरावृत्ति ?

प.पू. डॉक्टरांचा जन्म झालेल्या खोलीत गेल्यावर शून्यात प्रवेश केल्याप्रमाणे आणि खोलीत पुष्कळ प्रकाशाचा प्रवाह असल्याचे जाणवणे अन् नामजप करतांना मन लवकर एकाग्र होऊन निर्विचार होणे

पू. के. उमेश शेणै
१. प.पू. डॉक्टरांच्या जन्मस्थळी जात असतांना तीर्थक्षेत्री 
जात आहोत, असे जाणवून मन प्रफुल्लित होणे 
     २.४.२०१६ या दिवशी श्रीगुरुकृपेने मला पू. गडकरीकाका आणि श्री. रंजन देसाई यांच्यासमवेत प.पू. गुरुदेवांच्या नागोठणे येथील जन्मस्थळी जाण्याचे मोठे भाग्य प्राप्त झाले. तेथे जात असतांना आपण एका मोठ्या तीर्थक्षेत्री जात आहोत, या भावाने मन प्रफुल्लित झाले होते. 
२. प.पू. गुरुदेवांचा जन्म झालेल्या खोलीतील स्पंदने आणि घरातील 
अन्य खोल्यांतील स्पंदने यातील भेद ठळकपणे लक्षात येणे 
     आम्ही प.पू. गुरुदेवांच्या जन्म झालेल्या खोलीत गेलो. तेव्हा त्या खोलीतील स्पंदने आणि घरातील अन्य खोल्यांतील स्पंंदने यातील भेद ठळकपणे लक्षात आला. मी खोलीच्या आत प्रवेश केल्यावर मला शून्यात प्रवेश केल्याप्रमाणे आणि खोलीत प्रकाशाचा पुष्कळ प्रवाह असल्याचे जाणवले. त्या खोलीत अजूनही प.पू. गुरुदेवांचे चैतन्य जाणवते. श्री. नाना वर्तकांनी भक्तीभावाने ती खोली व्यवस्थित ठेवल्यामुळे तेथील चैतन्य टिकून आहे, असे जाणवते. मी त्या खोलीत नामजप करत असतांना मन लवकर एकाग्र होऊन निर्विचार झाले.
- (पू.) श्री. के. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१६)

रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतर झालेले पालट

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...
पू. बाबा (सदानंद) नाईक
परात्पर गुरु डॉ. आठवले
     रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५११८ (२९.५.२०१६) या दिवशी महर्षींच्या आशीर्वादाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव साजरा झाला. 
१. रामनाथी आश्रमात झालेले पालट : रामनाथी आश्रम, आश्रमातील वातावरण आणि साधक यांवरील काळ्या शक्तीचे आवरण न्यून (कमी) झाले आहे. त्याचप्रमाणे आश्रमातील चैतन्यात वाढ झाली आहे.

भारतीय राज्यकर्ते धर्माभिमान शिकतील का ?

   नुकतेच चीनने त्यांच्या देशातील मुसलमानांना सांगितले की, इस्लामचे अनुकरण करू नका. त्यापेक्षा मार्क्सवादी विचारसरणीचा अवलंब करा. त्यावर मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार हाफिज सईद याने टीका केली आहे. चीनने पाकिस्तानला सर्व परिस्थितीत साथ दिली आहे; पण अशी कुठलीही टिप्पणी जी आमच्या इस्लाम धर्माच्या भावना दुखावत असेल, तर ती आम्ही खपवून घेणार नाही.

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. डॉक्टर या दोघांच्या ठिकाणी शिवाचे दर्शन झाल्याने दोघेही केवळ देहाने वेगळे असून आतून ते एकच असल्याची अनुभूती येणे

प.पू. आबा उपाध्ये
      ६.६.२०१६ या दिवशी प.पू. आबा उपाध्ये यांनी रामनाथी आश्रमातील सर्व साधकांना दर्शन देऊन साधकांच्या आज्ञाचक्रावर विभूती लावली. त्यांचे दर्शन घेतांना त्यांच्या चरणांकडे पाहिल्यावर त्या ठिकाणी शिवाचे चरण दिसले. प्रत्यक्षात प.पू. आबा यांनी चरण खाली सोडलेले होते; परंतु त्यांचे चरण शिवाने ध्यानाच्या वेळी मांडी घातलेली असते, त्याप्रमाणे दिसले. त्याच क्षणी माझे डोळे आपोआप मिटले गेले. तेव्हा मी शिवलोकात असून तेथे देवतांचा कार्यक्रम आहे आणि मी नर्तकीच्या वेशात शिवाला पुष्प अर्पण करून नमस्कार करत आहे, असे दृश्य दिसले. काही क्षणांनी डोळे उघडल्यावर मला ज्या ठिकाणी विभूती लावली होती, तेथे अग्नी प्रज्वलित झाल्याचे जाणवून स्थुलातून काही क्षण डोळे चुरचुरले.
     प.पू. आबांच्या ठिकाणी आज ज्याप्रमाणे शिवाचे दर्शन झाले, तसेच दर्शन प.पू. डॉक्टरांच्या ठिकाणी वर्ष २००३ मध्ये प.पू. डॉक्टर मिरजेला असतांना झाले होते. त्यामुळे प.पू. आबा आणि प.पू. डॉक्टर केवळ देहानेच वेगळे असून ते एकच आहेत, असे जाणवले. 
       प.पू. डॉक्टर, तुम्हीच माझे श्रीविष्णु, तुम्हीच माझे शिव, तुम्हीच माझे सर्वस्व आहात !
- डॉ. (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अंतर्मुख होऊन सर्वत्र भगवंत पाहिल्यास चिरंतन सत्याची प्राप्ती होईल ! - प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज
१. मन अस्थिर किंवा दुःखी का होते ? 
     मन भगवंताला भेटण्यासाठी अस्वस्थ असते. आनंद मिळवणे, हा मनाचा स्थायीभाव आहे. त्याला शाश्‍वताची अभिलाषा आहे. त्यामुळे चित्तामध्ये स्थित असलेली ही धारणा उद्रेक पावते आणि प्रभावी होऊन चित्तावरील अन्य संस्कारांना दाबते.
२. मानव आनंद अशाश्‍वत गोष्टींमध्ये शोधत असल्याने भरकटत असणे 
     सध्याचा मानव मात्र हा आनंद अशाश्‍वत गोष्टींमध्ये शोधत आहे आणि भरकटत आहे. वातावरणात असलेले शाश्‍वत सत्य तोे पाहू शकत नाही. त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. याचे त्याला दुःख आहे. भगवंतानेही भक्तीचा आस्वाद घेण्यासाठी द्वैतात येऊन राधा साकार केली आणि भक्तीतील आनंदाचे रसस्वादन केले.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सौ. नागरबाई शिवाजी खंडागळे (वय ६० वर्षे) आणि श्री. शिवाजी खंडागळे (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के पातळी !

डावीकडून श्री. शिवाजी खंडागळे, पू. (कु.) स्वाती खाडये
आणि सौ. नागरबाई खंडागळे
     बार्शी (जिल्हा सोलापूर), १० जून (वार्ता.) - सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या येथील सौ. नागरबाई शिवाजी खंडागळे (वय ६० वर्षे) आणि भाव अन् श्रद्धा यांच्या बळावर श्री. शिवाजी खंडागळे (वय ७६ वर्षे) यांनी ६१ टक्के पातळी गाठल्याचे सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमात घोषित केले. तेव्हा उपस्थितांची भावजागृती झाली. या वेळी त्यांची मुलगी आणि रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारी कु. रुक्मिणी खंडागळे हीसुद्धा उपस्थित होती. रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. मनीषा वाघमारे याही श्री. आणि सौ. खंडागळे यांच्या कन्या आहेत. पू. (कु.) स्वाती खाडये यांनी श्री. आणि सौ. खंडागळे यांना प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

जीवन गेले त्यांचे सारे, आमुच्या उद्धरणी !

कु. मधुरा मोहन चतुर्भुज
सनातन धर्म पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ।
एक महान विभूती अवतरली ॥
तिचे नाव आहे परम पू्ज्य डॉक्टर गुरुमाऊली ॥ १ ॥

अनेक संतांना संघटित करून ।
अनेक हिंदूंना राष्ट्र-धर्माप्रती कर्तव्याची जाणीव देऊन ।
अनेक निरपराध भक्तांना न्याय देऊन ।
सूक्ष्म-जगतातील लढा 
घेतला सहजपणे जिंकून ॥ २ ॥

नामानिराळेपणा हा त्यांच्यातला मोठा सद्गुण ।
सारे जण करती त्यांचे कौतुक भरभरून ॥
कलियुगात असा साधू अवतरला ।
ज्याने साधकांना वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण संकटात टाकला ॥ ३ ॥

श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले&.जय गुरुदेव । हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती !

Add caption
      २९.५.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांचा अमृतमहोत्सवी वर्षारंभ सोहळा झाला. त्या दिवशी साधकांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले&.जय गुरुदेव । हा नामजप करायला सांगितला होता. तो करतांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. आरंभी वैखरीतून नामजप होणे आणि नंतर आतमध्ये पोकळीत 
नामजप चालू असल्याचे जाणवणे अन् ध्यान लागणे 
     प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र समोर ठेवून त्याकडे बघत नामजप करतांना आरंभी तो वैखरीतून होत होता. थोड्या वेळात डोळे मिटायला लागले आणि ध्यान लागले. नामजप आतमध्ये पोकळीत चालू होता. तेव्हा मन निर्विचार झाले होते आणि अतिशय शांत वाटत होते.

एखादी वस्तू उपयोगात आणायची असल्यास ती सुसंस्कारित करून आणि देवाला अर्पण करूनच उपयोगात आणा !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     आपण पेठेतून (बाजारातून) जेव्हा एखादी वस्तू (कपडे, अन्नपदार्थ इत्यादी काहीही) आणतो, तेव्हा ती तशीच उपयोगात न आणता तिच्यावर योग्य ते संस्कार करूनच तिचा विनियोग करावा. याचे कारण म्हणजे ती वस्तू निर्माण होतांना तिला अनेकांचे हात लागलेले असतात. ती वस्तू जेव्हा पेठेत येते, तेव्हाही तिला अनेकांचा स्पर्श होतो. माणसामध्ये विविध भावना असल्याने तो जेव्हा त्या वस्तूला स्पर्श करतो, तेव्हा त्याच्यातील भावनांचा त्या वस्तूवर परिणाम होतो. कुणाच्या कशा भावना असतात, हे आपल्याला ठाऊक नसते. माणसातील रज-तमाचाही त्या वस्तूवर परिणाम होतो, तसेच वातावरणातील दुष्ट शक्तींचाही त्या वस्तूवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपण पेठेतून आणलेल्या वस्तूवर योग्य ते संस्कार करतो, तेव्हा त्या वस्तूवरील कुसंस्कार निघून जाण्यास साहाय्य होते. वस्तू पुढीलप्रकारे सुसंस्कारित करू शकतो.

प.पू. डॉक्टरांनी साधक आणि समाज यांच्या उद्धारासाठी निर्माण केलेल्या ध्वनीचित्रीकरण विभागाचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अर्थ अन् त्याचे सूक्ष्म स्तरावरील कार्य !

श्री. दिनेश शिंदे
१. ध्वनीचित्रीकरण या शब्दाचा अर्थ : ध्वनी + चित्र ध्वनी म्हणजे नाद आणि नाद म्हणजे आकाश अन् आकाश म्हणजे जवळ जवळ निर्गुण. 
चित्र म्हणजे रूप आणि रूप म्हणजे तेज, 
तेज म्हणजे सगुण. आकाश म्हणजे मन, तेज म्हणजे चैतन्य.
२. आकाशतत्त्व निर्गुण स्तरावर कार्य करते ! : विभागातून निर्माण झालेल्या ध्वनीचित्र-चकत्या ऐकून व्यक्तीच्या मनावरील रज-तमाचे आवरण निघून तिला धर्माचरण करण्यास प्रवृत्त करते किंवा ते करण्याची जाणीव निर्माण करते, तसेच समाजाच्या उत्थानासाठी निर्गुण स्तरावर कार्य करते.
३. चित्र सगुण स्तरावर कार्य करते : चित्र म्हणजे निर्गुण अवस्थेत असलेल्या धर्माचरणाच्या योग्य कृतींचे सगुणामध्ये रूपांतर करून द्रष्टा दृश्यवशात् बद्धः । म्हणजे द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो, या उक्तीनुसार आकाशतत्त्वाच्या माध्यमातून जागृत झालेल्या समाजमनाला कृती करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे समाजात कृतीच्या स्तरावर धर्माचरणाला आरंभ होऊन समाज सात्त्विक होऊन ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीस हातभार लागतो. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजातील रज-तमाचे आकाश आणि तेज या तत्त्वांच्या साहाय्याने निर्दालन होते आणि समाजाला धर्माचरणासाठी प्रवृत्त करते.

साधकांना मायेत न ठेवता ईश्‍वराशी एकरूप कसे व्हायचे, हे शिकवणार्‍या प.पू. डॉक्टरांनी भावाची निर्मिती आणि भावजागृती यांसंदर्भात सांगितलेेली सूत्रे

श्री. रूपेश गोकर्ण
१. प.पू. डॉक्टरांना मसाज करतांना वैकुंठात श्रीविष्णूच्या 
चरणांना मर्दन करत आहे, असे जाणवणे 
     मी गेल्या १ मासापासून प.पू. डॉक्टरांच्या पायांना मर्दन (मसाज) करत आहे. ही सेवा करतांना मी वैकुंठात साक्षात् श्रीविष्णूच्या चरणांजवळ असून त्याला मर्दन करत आहे, असे मला जाणवतेे. आरंभी सेवा करतांना मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा माझी प्रार्थनाही होत होती. मी प.पू. डॉक्टरांना तसे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, जसा भाव, तसा देव दिसतो !
२. भाव न्यून होत आहे, असे वाटल्यावर प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले कारण 
      काही कालावधीनंतर माझा भाव न्यून होत आहे, असे मला जाणवले. यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, या स्थितीला भावात चढउतार होत असतो; म्हणून तसे वाटते. मन निर्विचार स्थितीत राहिल्यावर आनंद जाणवतो. आपल्यात पालट होत असतो.

भावपूर्ण सेवा केल्यामुळे श्री. रूपेश गोकर्ण यांना आलेल्या अनुभूती !

१. पू. (सौ.) बिंदाताई यांच्या खोलीची स्वच्छता करतांना आनंद मिळणे
      मला पू. (सौ.) बिंदाताई सेवा करत असलेल्या खोलीची स्वच्छता करण्याची सेवा मिळाली. पू. बिंदाताईंची खोली एखाद्या देवळाप्रमाणे वाटते. भक्तांना देवळात गेल्यावर जसे चैतन्य आणि आनंद मिळतो, त्याचप्रमाणे पू. बिंदाताईंच्या खोलीत गेल्यावर साधकांना चैतन्य आणि आनंद मिळतो. खोलीतील चैतन्य टिकून रहाण्यासाठी मी खोलीची सतत स्वच्छता करतो.
२. शहाळ्याचे पाणी देण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
अ. ३१.१०.२०१५ या दिवशी शहाळे सोलत असतांना मी प.पू. डॉक्टरांसाठी शहाळे सोलत आहे, तसेच शहाळ्यातील पाणी भांड्यात ओतत असतांना प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण करत आहे, असा भाव ठेवला. त्यामुळे मला ही सेवा अल्प वेळेत करता आली.

शांत, समजूतदार आणि अंगी नम्रता असलेली, तसेच शिकण्याची अन् स्वीकारण्याची वृत्ती असलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वैभवी झरकर (वय ११ वर्षे) !

कु. वैभवी झरकर 
१. शांत आणि समजूतदार 
     वैभवी शांत स्वभावाची आणि समजूतदार आहे. तिचे बोलणे शांत असते. ती कधीही उच्च स्वरात बोलत नाही. तिचे सर्वांशीच चांगले जमतेे. तिच्यासमवेत असणार्‍या बालसाधकांमध्ये एकमेकांत काही कुरबुरी झाल्या, तर ती मोठ्या कुशलतेने त्या सोडवते आणि सर्वांना शांत करते. 
२. शिकण्याची वृत्ती 
अ. आधी तिला स्वतःच्या वेण्या घालता येत नव्हत्या. एकदा मी तिला सांगितले, वैभवी, तुला तुझ्या वेण्या घालणे, केस धुणे आणि स्वतःचे स्वतः आवरणे आले पाहिजे. तेव्हा तिने मनावर घेऊन सर्व गोष्टी अल्प वेळेत शिकून घेतल्या. 
आ. तिला खोलीतील केर काढायला शिकवल्यावर तिने ते लगेच शिकून खोलीतील केर व्यवस्थित काढला.

संतांनी केलेल्या संकल्पाची साधकाला आलेली प्रचीती !

     काही दिवसांपासून मी नोकरी करावी, असा आग्रह मला कुटुंबियांकडून होत होता; परंतु माझी नोकरी करण्याची इच्छा नव्हती. घरच्यांच्या आग्रहासाठी २ - ३ मास (महिने) नोकरी करून परत पूर्णवेळ सेवेसाठी येईन, असे मी उत्तरदायी साधकांना सांगितले. तेव्हा त्यांनी निर्णय दुसर्‍या दिवशी कळवतो, असे सांगितले. तेव्हापासून मी डोळे मिटल्याक्षणी प.पू. डॉक्टर आणि पू. (सौ.) बिंदाताई यांचे चरण दिसायचे. त्यांचे चरण धरून प्रार्थना होत होती, मी कुठेही जाणार नाही. मला तुमची कृपा आणि प्रेम पाहिजे. तुमचे चरण पाहिजे. मला सतत तुमच्या चरणी ठेवून घ्या.

शाळेचा एक विद्यार्थी अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि वैयक्तिक साधना यांसाठी आश्रमात राहून शिक्षण घेणार, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे सांगणार्‍या मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ !

सौ. सारिका आय्या
१. शाळेच्या मुख्याध्यापिकेला खरे कारण सांगितले, तर विश्‍वला 
दाखला मिळणार नाही असे वाटल्याने यजमानांनी गोव्यात 
स्थानांतर (बदली) झाले आहे, असे सांगणे 
     माझा मुलगा कु. विश्‍व नवीन मराठी शाळा, नारायणपेठ, पुणे येथे शिकत होता. माझा गोवा येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचा आणि विश्‍वचा आश्रमात राहून शिक्षण घेण्याचा निर्णय झाला. तेव्हा पुढील शिक्षणासाठी त्याचेे त्या शाळेतील नाव काढून गोवा येथील शाळेत घालायचे होते. त्यासाठी त्याचा शाळेचा दाखला घेण्यासाठी माझे यजमान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांना भेटले. आम्हा दोघांना खरे कारण सांगितले, तर शाळेतून दाखला मिळणार नाही, असे वाटले; म्हणून यजमानांनी आमचे गोव्यात स्थानांतर (बदली) झाले आहे, असे खोटे सांगून विश्‍वचा दाखला मागितला; परंतु शाळेची वेळ संपल्यामुळे बाईंनी दुसर्‍या दिवशी शाळेत बोलावले.

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता !
    सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५२००१२०३ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत


     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
    भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले
संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत गोदान देणे ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना गोदान देणे नव्हे, तर गोरक्षण करणे महत्त्वाचे आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला ३८ दिवस शिल्लक

  
   बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा !
    गुणग्राहकता हा सद्गुण अंगीकारून दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा.  
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकला असे नमवा !

 
   पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचा चौथा दौरा नुकताच आटोपला. त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यावर नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत त्यांनी अमेरिकेला चार वेळा भेट दिली. त्यांची प्रत्येक अमेरिका भेट जागतिक पातळीवर गाजली, अमेरिकी लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले, देशाच्या शासनाला एका भक्कम पाठिंब्याची जाणीव झाली आणि त्याचबरोबर शत्रूराष्ट्र पाकचा पोटशूळ उठला.

गोव्यातील 'नायजेरियन' समस्या !

     ३१ ऑक्टोबर २०१३ या दिवशी गोव्यातील पर्वरी परिसरात नायजेरियन नागरिकांनी पोलीस आणि स्थानिक रहिवाशी यांना रस्त्यावर मारहाण केली अन् तीन घंटे रस्ता अडवून ठेवला. अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेले हे नायजेरियन नागरिक होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. आज तब्बल तीन वर्षांनंतर ५२ नायजेरियन नागरिकांवर पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची सिद्धता झाली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn