Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

योगदिनाला सूर्यनमस्कार घालणे आणि ॐ चा उच्चार करणे बंधनकारक नाही ! - भाजप शासनाचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक

     योगासनांतून ॐ काढणे म्हणजे शरिरातून प्राण काढून घेण्यासारखे आहे. म्हणजेच योगदिन साजरा करतांना योगातील प्राणच काढून घेतल्याने साजर्‍या केल्या जाणार्‍या दिनाला योगदिन ऐवजी योगदीनच म्हणावे लागेल !
     नवी देहली - या वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनाला सूर्यनमस्कार घालणे आणि ॐ चा उच्चार करणे बंधनकारक नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले आहे. नाईक यांनी हेही स्पष्ट केले की, योगामध्ये ॐ च्या उच्चाराविना योग अपूर्ण असला, तरी त्याचा उच्चार करणे बंधनकारक नसेल. आम्ही आशा करतो की, लोक ते समजून घेतील. नाईक यांनी हे सूत्र अधिक स्पष्ट करतांना सांगितले की, गेल्या वर्षीही सूर्यनमस्कारचा समावेश करण्यात आला नव्हता. हे कठीण आसन आहे आणि ४५ मिनिटांत सर्व आसने करणे योगासनाला आरंभ करणार्‍यांना शक्य होत नाही. तसेच काही मुसलमान संघटनांनीही याला विरोध केला होता. (विरोधाला जुमानतांना योगाच्यासाचे मर्मच नष्ट झाले त्याचे काय ? - संपादक)

भारताचे शेजारील राष्ट्र म्हणजे जिहादी आतंकवाद्यांचा अड्डा !

पाकचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेच्या संसदेत पाकवर टीका
भारताच्या शेजारील देश पाकिस्तान आतंकवाद्यांचा अड्डा असल्याचेे जगजाहीर
आहे; मात्र त्यावर कारवाई करण्याचे धाडस भारत सरकार करत नाही, हे आश्‍चर्यकारक !
     वॉशिंग्टन - भारताच्या शेजारी असलेला देश हाच जिहादी आतंकवाद्यांचा अड्डा आहे. आतंकवाद्यांविषयी सहानुभूती असणार्‍या आणि त्यांचे समर्थन करणार्‍या अशा देशांना एकटे पाडले पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे नाव न घेता केले. आतंकवादाचा धर्माशी संबंध जोडता येणार नाही. आतंकवाद हा आतंकवादच असतो. इसिस, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आदी आतंकवादी संघटनांची विचारप्रणाली हिंसाचार हीच आहे. अशा संघटनांचा निःपात केला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
४५ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी विविध विषयावर मते मांडली. तेे म्हणाले की,

छत्तीसगडमध्ये १०० नक्षलवाद्यांचे आयटीबीपीच्या सैनिकांवर आक्रमण !

काँग्रेसच्या सत्ताकाळात फोफावलेल्या नक्षलवादावर नवीन
सरकारच्या २ वर्षांच्या काळातही ठोस कारवाई न झाल्याचाच परिणाम !
    रायपूर (छत्तीसगड) - कोंडागावात भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) दलाच्या तळावर ७ जूनच्या रात्री १०० नक्षलवाद्यांनी आक्रमण केले. जवळपास ३ घंटे दोघांमध्ये चकमक चालू होती. या वेळी नक्षलवाद्यांकडून ४ रॉकेटही सोडण्यात आली. पोलीसदलाच्या सैनिकांनी नक्षलवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सैनिकांची कोणतीही हानी झाली नाही.

भाजपच्या राज्यातही रा.स्व. संघाशी संबंधित असणार्‍यांना शासकीय नोकरी नाही ?

गोव्यात सीमा शुल्क खात्याने निवड झालेल्या
तरुणांकडून घेतले रा.स्व. संघाला अपमानित करणारे शपथपत्र !
     जयपूर - केंद्रात आणि देशातील काही राज्यांत भाजपचे शासन आहे; मात्र या राज्यांत, तसेच केंद्रीय नोकर्‍यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणार्‍या तरुणांना जणू नोकरी मिळणार नाही, असे शपथपत्राच्या स्वरूपावरून ध्वनित होते. प्रत्यक्षात असा कोणताही नियम नसला, तरी संघाच्या कार्यकर्त्यांना नोकरी न देण्याचा अलिखित नियम काँग्रेसच्या काळापासून रूढ झालेला आहे. नियमानुसार केवळ केंद्र किंवा राज्याच्या नोकरीत असतांना संघाच्या कार्यात सहभाग घेण्याविषयी प्रतिबंध आहे. तसेच सीमा शुल्क विभागाच्या निरीक्षकपदाची निवड करतांना निवड झालेल्या तरुणांकडून ते संघाचे स्वयंसेवक नाहीत किंवा अन्य कोणत्याही कायदाद्रोही कृत्य करणार्‍या संघटनांचे सदस्य नाहीत, असे शपथपत्र लिहून घेण्याची घटना समोर आली आहे.

भारत मुसलमानमुक्त बनवणार ! - साध्वी प्राची

  • साध्वींच्या विरोधात दोन ठिकाणी गुन्ह्यांची नोंद
  • जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ
      नवी देहली - भारत काँग्रेसमुक्त झाला आहे, आता त्याला मुसलमानमुक्त करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे विधान साध्वी प्राची यांनी केले आहे. या त्यांच्या विधानाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
१. साध्वी प्राची यांच्या विधानाचे सूत्र जम्मू-काश्मीर विधानसभेतही चर्चेसाठी घेण्यात आले. नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार शहनाज गनिया यांनी या विधानाचा निषेध केला. त्याला काँग्रेसच्या आमदारांनीही समर्थन दिले.
२. आमदार म्हणाले की, हे विधान अयोग्य आहे. मुसलमानही या देशाचा एक भाग आहेत. त्यांना कुणीही या देशापासून अलिप्त करू शकत नाहीत. या वेळी गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

सातारा येथे सोमेश्‍वरदेवाच्या मंदिरातील चांदीच्या पिंडीची चोरी !

ग्रामस्थांचा एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय !
     हिंदूंनो, केवळ गाव बंद ठेवून काही साध्य होणार नाही, तर मंदिरांतील चोरीच्या घटना रोखण्यासाठी आता प्रभावी हिंदूसंघटनाविना पर्याय नाही, हे जाणा !
     गुरसाळे (तालुका खटाव, जिल्हा सातारा) - येथील जागृत सोमेश्‍वरदेवाच्या मंदिराचे कुलुप काढून अज्ञात चोरट्याने ८ जून या दिवशी साडेतीन किलो वजनाची चांदीची पिंड चोरून नेली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मूर्तीची किंमत ३ लाख ५० सहस्र रुपये आहे. पहाटे ५ वाजता पुजारी बळीराम वाघ मंदिरात आल्यावर त्यांना पिंडीची चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी चोराचा माग काढण्यासाठी श्‍वानपथक आणि ठसेतज्ञ यांचे साहाय्य घेतले; पण त्यांना काहीच पुरावा मिळाला नाही.

अमरावतीत धर्मांधांकडून शिवसैनिकाची सशस्त्र आक्रमणाद्वारे हत्या !

धर्मांधांचा उच्छाद ! हिंदूंनो, तुम्ही भारतात रहाता कि पाकमध्ये ?
अशा बातम्या वाचून झोपू नका, तर स्वतःचे रक्षण होण्यासाठी संघटित व्हा !
     अमरावती - शहरातील अकोली रस्ता येथे १८ ते २० धर्मांधांनी एका शिवसैनिकावर चाकू, गुप्ती आणि तलवारीने आक्रमण करून त्यांची नुकतीच हत्या केली. सुरेंद्र वासुदेव वानखडे असे मृत शिवसैनिकाचे नाव असून ते शिवसेनेचे युवा कार्यकर्ते होते. या आक्रमणात त्यांचे बंधू रवींद्र हे गंभीर घायाळ झाले. या प्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अकोलीच्या घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १७ आरोपींना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनुसार ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले जाते. (धर्मांध सशस्त्र होऊन हिंदूंची हत्या करतात, हे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचे लक्षण आहे ! - संपादक)

रमझाननिमित्त बीएस्एन्एल्ची सवलतीची विशेष योजना !

  • निधर्मी भारतातील धार्मिक भेदभाव करणारे दूरसंचार खाते ! हिंदूंनी वैध मार्गाने याचा जाब विचारायला हवा !
  • हिंदूंच्या सणांच्या वेळेस दुप्पट दर आकारून हिंदूंची लूट करणारे बीएस्एन्एल् अन्य धर्मियांच्या वेळेस मात्र विशेष योजना आखून त्यांना सवलती देते !
     मुंबई - ६ जूनपासून चालू झालेल्या रमझान मासाच्या निमित्ताने भारत संचार निगम लिमिटेड (बीएस्एन्एल्)कडून विशेष योजना घोषित करण्यात आली. या योजनेनुसार एखाद्या बीएस्एन्एल् सिमकार्ड धारकाने ७८६ रुपयांचे रिचार्ज केले, तर त्याला ७८६ एमबी (मेगाबाईट) डाटा वापरण्यास मिळणार आहे. तसेच ७८६ लघुसंदेश पाठवणे आणि ६०० रुपयांचा टॉक टाईम मिळणार आहे. ही सुविधा ६ जूनपासून ६ जुलैपर्यंत असणार आहे.

उडता पंजाब चित्रपटावरून आम आदमी पक्षाचे राजकारण ! - खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, भाजप

     नवी देहली - उडता पंजाब चित्रपटावरून निर्माण झालेला वाद म्हणजे पंजाबमधील आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी आम आदमी पक्षाचे राजकारण आहे, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे. या संदर्भात डॉ. स्वामी म्हणाले, हा चित्रपट अयोग्य वेळी आला आहे. या चित्रपटातून पंजाब शासन अमली पदार्थांच्या गैरवापराला उत्तरदायी असल्याचे दिसत आहे. अमली पदार्थ ही एक मोठी समस्या, यात काहीही शंका नाही. कोण म्हणतो ही समस्या अकालीने चालू केली ? ती काँग्रेससमवेत चालू झाली.

अनधिकृत बांधकामे वैध करण्यासाठी गोवा शासनाची दोन निराळी विधेयके

अनधिकृत बांधकामे कायदेशीर केली, तर उद्या कोणी अनुमती घेईल का ? जे कायद्याच्या 
चौकटीत राहून बांधकामे करतात, त्यांच्यावर शासनाने केलेला हा अन्यायच आहे !
     पणजी, ९ जून (वार्ता.) - राज्यातील अनधिकृत बांधकामे कायदेशीर करण्यासंदर्भात शासनाने दोन वेगवेगळी विधेयके सिद्ध केली आहेत. ही विधेयके विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडली जातील, असे महसूल खाते सांभाळणारे गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ७ जून या दिवशी सांगितले.
      डिसोझा पुढे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही जी आश्‍वासने दिली होती, त्याची पूर्तता केली जाईल. जी अनधिकृत बांधकामे उभी राहिली, त्यांना कायदेशीर रूप देण्याची प्रक्रिया निवडणुकीपूर्वीच चालू होईल. अनेक लोकांनी स्वत:च्या खाजगी भूमीत अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र विधेयक बनवण्यात आले आहे, तसेच काही जणांनी सरकारी आणि कोमुनिदादच्या भूमीत अनधिकृत घरे बांधली आहेत. त्यांच्यासाठीही वेगळे विधेयक बनवण्यात आले आहे. पूर्वी सर्व बांधकामांसाठी एकच विधेयक होते. आता दोन स्वतंत्र विधेयके आल्याने कायदेशीर अडचणी दूर होतील. (अनधिकृत बांधकामे करणार्‍यांना शिक्षा करून ती पडणे, हेच सुशासन आहे ! बांधकामे अधिकृत होण्यासाठी अनधिकृत बांधकामे कायदेशीर करणे, हे केवळ भारतातच घडू शकते ! - संपादक)

मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी राजभाषा या मागण्यांना गोवा प्रजा पक्षाचा पाठिंबा !

      पणजी, ९ जून (वार्ता.) - भावी पिढीच्या भवितव्यासाठी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण होणे आवश्यक आहे. मातृभाषेतून शिक्षण होणे आणि मराठी गोव्याची राजभाषा होणे या दोन्ही मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे गोवा प्रजा पक्षाने पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषित केले. या वेळी पक्षाचे नेते प्रकाश फडते उपस्थित होते. 
     याच वर्षी नव्याने स्थापन झालेल्या या पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले, गोव्याची प्रतिमा सर्वच क्षेत्रांत डागाळत चालली आहे. गोमंतकियांना स्वाभिमानाने जगण्यासाठी पुन्हा लढा द्यावा लागणार आहे. गोव्याच्या प्रतिमेला विविध गैरव्यवहारांपासून दूर ठेवण्यात शासन अपयशी ठरत आहे.

अमली पदार्थ विकणार्‍या नायजेरियाच्या नागरिकाला म्हापसा (गोवा) येथे अटक

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन नागरिकांवर शासनाने तात्काळ बंदी घालावी !
     पणजी - अमली पदार्थ विक्री करणार्‍या एका नायजेरियन नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाने पेडे, म्हापसा येथून पकडले. त्याच्याकडून १ लक्ष ६ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव जॉन्सन ऑगुगा आक्साफॉर (वय ३४ वर्षे ) असे आहे. त्याच्याकडून एल्एस्डी आणि गांजा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

गिरी, म्हापसा येथे अल्पवयीन युवती आणि तिची आजी यांवर अ‍ॅसिड आक्रमण

आता रहात्या घरीही नागरिक असुरक्षित !
गोवा राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
      म्हापसा, ९ जून (वार्ता.) - एक १६ वर्षांची अल्पवयीन युवती आणि तिची आजी यांच्यावर गिरी, म्हापसा येथे ८ जूनच्या सकाळी रहात्या घरी खिडकीतून अ‍ॅसिड आक्रमण करण्यात आले. या अ‍ॅसिड आक्रमणात गंभीररित्या जखमी झालेल्या या दोघींना म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
    युवती आणि तिची आजी खिडकीच्या बाजूला झोपले असतांना सकाळी हे आक्रमण करण्यात आले. युवतीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ संशयित युवकांना कह्यात घेतले आहे.

गोव्यात पाल्यांना सरकारी प्राथमिक शाळांपेक्षा अनुदानित खाजगी शाळांमध्ये पाठवण्याचा पालकांचा कल

सरकारी शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता अत्यल्प असल्याचाच हा परिणाम आहे ! 
      पणजी (गोवा) - राज्याच्या शिक्षण खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०१५-२०१६ या मागील शैक्षणिक वर्षामध्ये पालकांचा आपल्या पाल्यांना सरकारी प्राथमिक शाळांपेक्षा अनुदानित शाळांमध्ये पाठवण्याकडे कल होता.
     शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री पार्सेकर हे प्रतिनिधीत्व करत असलेल्या पेडणे तालुक्यात ७३ सरकारी प्राथमिक शाळा आहेत आणि शाळांची ही संख्या तालुक्यातील अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांपेक्षा तिप्पट आहे, तरीही सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येपेक्षा ४०० ने कमी होती. तिसवाडी तालुक्यात ४० सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १ सहस्र ६५७ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, तर अनुदानित शाळांमध्ये ६ सहस्र विद्यार्थ्यांनी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये ४ सहस्र ४५ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.

बिहारमध्ये २०० नीलगायींना ठार करण्यावरून मेनका गांधी आणि प्रकाश जावडेकर या केंद्रीय मंत्र्यांमध्ये वाद !

   पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारमध्ये शासनाकडून नीलगायींना उपद्रवी प्राणी घोषित करून २०० हून अधिक नीलगायींना ठार करण्यात आले आहे. यावरून केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी वन आणि पर्यावरण मंत्रालयावर टीका केली आहे. यावर स्पष्टीकरण देतांना केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत बिहारच्या ३९ जिल्ह्यांत नीलगायींना ठार करण्याची अनुमती असल्याचे सांगितलेे.
१. केंद्रशासनाच्या नव्या सूचनेनुसार शेतीला उपद्रवी ठरणार्‍या जंगली प्राण्यांना राज्यशासन उपद्रवी प्राणी ठरवू शकते. तसेच अशा प्राण्यांना ठार करण्याची अनुमती देण्यात येते; पण हा प्राणी शेतात आला असेल तरच त्याला ठार करता येते.

पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथील जायकवाडी धरणाच्या सुरक्षा भिंतीला तडे

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष 
     पैठण, ९ जून - आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण असा नावलौकिक असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाची सुरक्षा भिंत आणि त्या लगतचा रस्ता यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. धरणावरील डांबरीकरणाचा रस्ताही जागोजागी खचत चालला आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

जेजुरी (जिल्हा पुणे) येथे श्री मार्तंड देवस्थानच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

विश्‍वस्त मंडळ तातडीने बरखास्त करण्याची मागणी 
     जेजुरी, ९ जून - सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या येथील श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या श्री मार्तंड देवस्थानचे विश्‍वस्त मंडळ मनमानी कारभार करत आहे. तसेच भाविकांना सोयीसुविधा देण्यात मंडळ अपयशी ठरल्यामुळे विश्‍वस्त मंडळ तातडीने बरखास्त करावे, या मागणीसाठी शहर नागरिक हक्क कृती समितीच्या वतीने जेजुरी गडाच्या पायथ्याशी ८ जून या दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. (देवस्थानच्या कारभाराविरोधात आंदोलन करणार्‍या शहर नागरिक हक्क कृती समितीचे अभिनंदन ! - संपादक) जेजुरीच्या नगराध्यक्षा सुरेखा सोनवणे आणि अखिल गुरव संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अण्णा शिंदे यांच्या उपस्थितीत सायंकाळी हे उपोषण सोडण्यात आले. 

सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आपल्याला विसर ! - पू. संभाजी भिडेगुरुजी

     राहुरी (जिल्हा नगर), ९ जून - जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्तता पाहिजे असल्यास संत आणि महात्मे यांच्या सहवासात जा. आज धम आणि राष्ट्र निष्ठा जतन करून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या स्वार्थासाठी कुणापुढेही झुकण्याच्या वृत्तीमुळेच आपल्यावर अनेक परकीयांची आक्रमणे झाली. आपल्यातील लोभी (लालची) वृत्तीमुळे इतिहासातील अनेक लढायांमध्ये आपल्याला हार पत्करावी लागली. हुतात्म्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युवकांनी जगावे. सद्यस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आपल्याला विसर पडत चालल्याची खंत श्री शिवप्रतिष्ठानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी व्यक्त केली. 

ओडिशा राज्यातून प्रतिदिन ४ सहस्र गोवंश हत्येसाठी राज्याबाहेर जातो !

गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच यांनी पत्रकार परिषदेत उघड केलेली माहिती
      भुवनेश्‍वर - देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्‍या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. 
१. ओडिशा राज्यातून प्रत्येक दिवशी ४ सहस्र गोवंशाची हत्येसाठी तस्करी होते. बालासोर या सीमा नाक्यावरून राज्याबाहेर तस्करी होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

देहू, आळंदी आणि पंढरपूर या ठिकाणी मद्यबंदी करा ! - खासदार अमर साबळे

तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखण्यासाठी शासन काही कृती करेल का ? 
     पुणे - गुजरातच्या धर्तीवर आणि चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्र परिसरात पूर्णपणे मद्यबंदी करावी, अशी मागणी भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे. (तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखण्यासाठी मद्यबंदीची मागणी करणार्‍या अमर साबळे यांचे अभिनंदन ! साबळे यांनी राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य आणि मांसाहार यांच्या विक्रीवर बंदी करण्याची मागणी करावी, अशी भक्तांची अपेक्षा ! - संपादक) आपण प्रमुख वारकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे साबळे यांनी सांगितले. 

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांत हाणामारी !

हाणामारी करणारे कार्यकर्ते असणारा पक्ष जनतेला दिशा काय देणार ? 
     सांगली, ९ जून (वार्ता.) - येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ९ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेवटी जयंत पाटील यांचे भाषण झाल्यावर कार्यकर्त्यांच्या दोन गटांत किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसन दोन गटांत हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन कार्यकर्ते घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (ज्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या मेळाव्यातच हाणामारी करतात, असा पक्ष जनतेला न्यायाचे राज्य कधी देऊ शकेल का ? - संपादक)

वाई येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

     सातारा, ९ जून (वार्ता.) - गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करणारा आयशर ट्रक वाई येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर रायगाव फाट्याजवळ पकडला. हा ट्रक भुईंज पोलिसांच्या कह्यात दिला असून त्यांच्यावर गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करण्यासंबंधिची कलमे लावून गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. 

तलवार हातात घेऊनच राममंदिर बनेल ! - साध्वी देवा ठाकूर

     बाडमेर (राजस्थान) - राममंदिरासाठी आता रक्त अर्पण करावे लागेल. केवळ भजन कीर्तन करून काही होणार नाही, तर राममंदिर बनवण्यासाठी तलवार हाती घ्यावी लागेल. धर्मासाठी प्राण देणे ही काही नवी गोष्ट नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय हिंदु महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि देवा फाउंडेशनच्या संस्थापक साध्वी देवा ठाकूर यांनी येथे केले. मुझफ्फरनगर जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांसमवेत रोजा पाळला !

धर्माभिमानाच्या अभावामुळे किंवा मुसलमान बंदीवानांच्या दबावामुळे हिंदु बंदीवान अशा प्रकारे 
रोजा पाळतात. हिंदु बंदीवान बहुसंख्य असलेल्या किती कारागृहांत मुसलमान हिंदूंचे सण पाळतात ? 
     मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - येथील जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांंनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांंसोबत रमझान मासाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रोजा पाळला, अशी माहिती कारागृह अधीक्षक सतीश त्रिपाठी यांनी दिली. प्रशासनाने प्रसारित केलेल्या नवीन माहितीनुसार रोजा पाळणार्‍या हिंदु बंदीवानांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे. (हिंदूंना यासाठी बळजोरी करण्यात आली कि त्यांनी स्वखुशीने रोजा पाळला ? मुसलमानांनी हिंदु बंदीवानांसोबत हिंदूचा सण कारागृहात साजरा केला, अशी घटना कधी घडली आहे का ? - संपादक)

जगभरातील ७२ देशांतील कारागृहात आहेत ६ सहस्र ८०४ भारतीय नागरिक !

      जम्मू - जवळ जवळ ६ सहस्र ८०४ भारतीय नागरिक जगभरातील ७२ देशांतील कारागृहांमध्ये आहेत. यांपैकी ४१ टक्क्यांपेक्षा अधिक कैदी केवळ सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात या देशांतील कारागृहामध्ये आहेत. २०१३ पासून ४९ भारतीय नागरिक विविध देशांच्या कारागृहांमध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. जम्मूस्थित रमण शर्मा यांनी माहिती अधिकार कायद्याखाली केलेल्या अर्जाला अनुसरून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती पुरवली आहे.
१. या विषयीच्या आकडेवारीनुसार सौदी अरबच्या कारागृहांमध्ये सर्वांत अधिक १ सहस्र ६९६ भारतीय कैदी आहेत. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातच्या कारागृहात १ सहस्र १४३, तर नेपाळच्या कारागृहात ८५९ भारतीय कैदी आहेत. 

२० दिवसांत अखलाखच्या कुटुंबाविरुद्ध कारवाई करा ! - गावकर्‍यांची चेतावणी

      दादरी (उत्तरप्रदेश) - दादरीतील गोमांस प्रकरणात गावकर्‍यांकडून महापंचायत घेण्यात आली. त्यात महंमद अखलाखच्या कुटुंबाविरुद्ध २० दिवसांत कारवाई करा अन्यथा जनप्रक्षोभ आवरता येणार नाही, अशी चेतावणी गावकर्‍यांनी दिली आहे. 
      काही दिवसांपूर्वी महंमद अखलाखच्या घरात गोमांसच असल्याचा अहवाल मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सादर केला होता. त्यामुळे आता गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी अखलाखच्या कुटुंबियांविरुद्ध गोहत्या आणि गोमांस सेवनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देणार नसेल, तर आम्हालाच काहीतरी पाऊल उचलणे भाग पडेल, असेही गावकर्‍यांनी म्हटले आहे.पुण्यात सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे ५ वर्षांपासून धूळखात

गृह विभागातील प्रशासन गतीमान करण्यासाठी भाजप शासन प्रयत्न करेल का ?
     पुणे, ९ जून - शहरातील सायबर गुन्ह्यांची टक्केवारी ही वाढतच आहे. ती रोखणे आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणे, यांसाठी वर्ष २०११ मध्ये स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता; परंतु हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. (अशा प्रकारे लालफितीचा कारभार चालू राहिल्यास पोलीस प्रशासन सायबर गुन्हेगारीला आळा कसा घालणार ? - संपादक) या पार्श्‍वभूमीवर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यात स्वतंत्र पोलीस ठाणे कधी होणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अनेक प्रभाग नागरिक नागरी सुविधांपासून वंचित ! - स्थायी समिती सदस्यांची तक्रार

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रशासन !
   सांगली, ९ जून (वार्ता.) - प्रभागात कचरा उचलला न जाणे, सफाई कामगार वेळेवर न येणे, स्वच्छता वेळेवर न होणे, गुंठेवारी प्रभागात चिखल साचल्याने नागरिकांना त्रास होणे, अशा असुविधा आहेत, तसेच अन्य सुविधांपासूनही नागरिक वंचित आहेत. याकडे प्रशासन गांभीर्याने पहात नाही, अशी तक्रार स्थायी समितीच्या सभेत सर्वच सदस्यांनी केली. यावर नवीन सफाई कर्मचार्‍यांची भरती होईपर्यंत चार मास मानधनावर ५० कर्मचारी नियुक्त करून त्यांच्याकडून स्वच्छता करून घेण्यात येईल, असे आदेश स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी सभेत प्रशासनास दिले. (जर प्रशासन नागरिकांना या सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरत असेल, तर प्रशासकीय अधिकारी गलेलठ्ठ वेतन घेऊन नेमके काम काय करतात ? - संपादक)

ज्योतिबा देवस्थानच्या परिसराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता !

     कोल्हापूर, ९ जून (वार्ता.) - श्री क्षेत्र ज्योतिबा परिसराच्या विकासासाठी १५५ कोटी रुपयांचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्याच्या २५ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला ६ जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय पर्यटन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखड्याविषयी लवकरच व्यापक बैठक घेऊन लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सूचना विचारात घेऊन व्यापक आराखडा सिद्ध करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माणगाव परिसर विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यातील ५ कोटी रुपयांच्या कामांनाही मान्यता देण्यात आली. 
     या निधीतून दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, वाहनतळ, स्वच्छतागृह, कॉम्प्लेक्स, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामे करण्यात येणार आहे. माणगाव परिसराचा १०० कोटी रुपयांचा विकास आराखडा सिद्ध करण्यात आला आहे.

हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशाचा निर्णय २८ जूनला होणार

     मुंबई - मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देण्याविषयीचा निर्णय उच्च न्यायालयात २८ जून या दिवशी होणार आहे. मुसलमान महिलांना मक्का, मदिना, नजफ आदी धार्मिक स्थळांवर प्रवेश आहे; मात्र हाजी अली दर्ग्यात एका विशिष्ट ठिकाणापर्यंतच प्रवेश आहे. वर्ष २०११ पर्यंत या दर्ग्यात महिलांना प्रवेश दिला जात होता; मात्र दर्ग्याचे विश्‍वस्त पालटल्यानंतर महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली. या प्रवेशबंदीच्या विरोधात 'भारतीय मुस्लिम महिला आंदोलन'ने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर ९ जूनला निर्णय अपेक्षित होता; मात्र तो आता २८ जूनला होणार आहे.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह १५ जणांना अटक आणि सुटका !

मनकर्णिका कुंडावरील शौचालय तोडल्याचे प्रकरण 
 असे धर्माभिमानी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक सर्वत्र हवेत ! 
     कोल्हापूर, ९ जून (वार्ता.) - जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय पाडल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्यासह १५ शिवसैनिकांना जुना राजवाडा पोलिसांनी ८ जून या दिवशी अटक करून न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. ६ जून या दिवशी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुर्लक्ष केल्याने श्री. क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना घेऊन शौचालय तोडून टाकले. या दिवशी दुपारी कोणीच तक्रार प्रविष्ट न केल्यामुळे पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते; मात्र त्या दिवशी रात्री पोलिसांनी श्री. राजेश क्षीरसागर यांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट केले होते. काही कारणास्तव श्री. राजेश क्षीरसागर हे मुंबई येथे गेल्यामुळे पोलिसांनी ७ जून या दिवशी १० शिवसैनिकांना अटक करून त्यांची २० सहस्र रुपयांच्या जामिनावर सुटका केली होती. ८ जून या दिवशी मुंबईहून श्री. क्षीरसागर परत आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.

युती शासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे तीन वर्षांनी पुन्हा काँग्रेसचीच सत्ता - काँग्रेसचे नेते आमदार नारायण राणे

      कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) - गेल्या २० मासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणला कोणी वाली नाही, असे समजून शिवसेना-भाजप युती सरकारने विकास प्रक्रिया ठप्प केली आहे. विकासकामांना निधी नाही, पाटबंधारे प्रकल्प रखडले आहेत, रस्ते, चिपी विमानतळ, सी- वर्ल्ड अशी सर्वच कामे ठप्प झाली आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रसरकारने दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विज्ञापने दिली, मात्र अच्छे दिन आणि न्यून झालेली महागाई कुठेच दिसत नाही. सर्वच खात्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे; मात्र केवळ एकनाथ खडसे त्याला बळी पडले. युती शासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे तीन वर्षांनी पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येईल, असे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार तथा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (भ्रष्टाचार हेच प्रमुख मिळकतीचे साधन असलेल्या काँग्रेसवाल्यांना इतरांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलण्याचा काय अधिकार ? - संपादक)
      विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आल्यावर जिल्ह्यात प्रथमच आलेले राणे यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. त्यानंतर कणकवली येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी राणे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून खडसेंची विकेट गेली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या तीन-चार तक्रारी खडसेंविरुद्ध करण्यात आल्या. एकापाठोपाठ एक झालेल्या आरोपांमुळे यामागे षड्यंत्राचा वास येतो.

तमिळनाडू येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सत्संगाचे आयोजन !

      तमिळनाडू - येथील करणीश्‍वर मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त नुकताच एक विशेष सत्संग घेण्यात आला. या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या ठिकाणी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मंदिरात नियमित सत्संग घेण्यासाठी मंदिरातील पुजार्‍यांनी हिंदु जनजागृती समितीला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

देहली न्यायालयाने अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या विरोधातील गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारीचा अर्ज फेटाळला !

हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या जात असतांना न्याय मिळण्यासाठी 
आता हिंदूंनी कोणाकडे आशेने बघावे ?
बिग बॉस ९च्या कार्यक्रमाच्या ध्वनीचित्रीकरणाच्या वेळी मंदिराच्या 
सेटवर अभिनेत्यांनी बूट घालण्याचे प्रकरण 
      नवी देहली - बिग बॉस ९ या दूरचित्रवाणीवर (टीव्हीवर) दाखवण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या ध्वनीचित्रीकरणाच्या वेळी (शूटिंगच्या वेळी) मंदिराच्या सेटवर शाहरुख खान आणि सलमान खान या अभिनेत्यांनी बूट घातले होते. या संदर्भात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचा अर्ज देहलीतील तीस हजारी न्यायालयात दाखल करण्यात आला होता; परंतु ६ जून या दिवशी न्यायालयाने तो फेटाळला. 
       या प्रकरणात पोलिसांनी या आधी सांगितले होते की, सदर कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या तात्पुरत्या मंदिराच्या सेटवर दोघा अभिनेत्यांनी बूट घातले होते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा कोणाचाही जाणीवपूर्वक उद्देश नव्हता. त्यामुळे संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही. (मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याची ओरड झाली असती, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ? - संपादक)

जगातील सर्व मुसलमानांना ख्रिस्ती बनवणे हे ख्रिस्त्यांचे ध्येय आहे ! - व्हॅटिकन चर्च

भारतातील ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करतात. त्यावर मौन 
बाळगणारे ढोंगी निधर्मी यावर तरी तोंड उघडतील का ? 
      व्हॅटिकन (रोम) - जगातील सर्व चर्चंना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट असलेले व्हॅटीकन चर्चचे अधिकारी कर्ट कोच यांनी म्हटले आहे की, जगातील सर्व मुसलमानांना ख्रिस्ती बनवणे हे ख्रिस्त्यांचे ध्येय आहे. ते केंब्रिज विश्‍वविद्यालयात आयोजित एका आंतरधर्मीय बैठकीत बोलत होते.
      कोच म्हणाले की, ख्रिस्त्यांनी ज्यू धर्मियांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न करू नयेत; कारण ज्यू धर्म ख्रिस्ती धर्माला आईसारखा आहे; मात्र ज्यू वगळून उर्वरित सर्व गैर ख्रिस्त्यांना ख्रिस्ती धर्मात आणणे हे ख्रिस्त्यांचे ध्येय असले पाहिजे. त्यात ख्रिस्त्यांवर अत्याचार करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांचाही समावेश आहे.

रस्त्यावर व्यवसायासाठी अनुज्ञप्ती देण्यास बंदी असतांना पालिकेकडून दुकानांना अवैध अनुमती

पुणे महानगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार ! 
     पुणे, ९ जून - शहराच्या विविध भागांतील २९ रस्त्यांवर व्यावसायिक वापरासाठी दुकानांना बांधकामाची अनुज्ञप्ती देता येत नसतांनाही त्याची अनुमती प्रशासनाने दिल्याचे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ८ जून या दिवशी उघडकीस आले. त्यावर महापौर प्रशांत जगताप यांनी येत्या मासात या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी या संदर्भात लेखी प्रश्‍न विचारला होता. त्यातून हा अपप्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाची पुढील ५ दिवसांत चौकशी करून अहवाल देणार असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. 

हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी श्रीमती स्वाती महाडिक लवकरच लष्करात !

प्रसिद्धीसाठी आंदोलनाचे स्टंट करणार्‍या 
तृप्ती देसाई स्वाती महाडिक यांच्याकडून शिकतील का ? 
     सातारा, ९ जून (वार्ता.) - काश्मीर येथील कुपवाडा जिल्ह्यातील जंगलामध्ये देशाचे रक्षण करतांना आतंकवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक धारातीर्थी पडले होते. त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या वेळी त्यांच्या वीरपत्नी श्रीमती स्वाती महाडिक यांनी हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवासमोर आपण आणि आपली मुले लष्करातच भरती होऊन देश सेवा करणार असल्याची प्रतिज्ञा केली होती. आज ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरवत श्रीमती स्वाती महाडिक या 'सर्व्हिस सिलेक्शन बोर्डा'ची खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. आता चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण अकादमीत होणार्‍या आणखी कठोर आणि खडतर प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या आहेत. या प्रशिक्षणानंतर त्या लष्कराच्या '२१ पॅरा स्पेशल फोर्स'मध्ये अधिकारी म्हणून दाखल होणार आहोत.

लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र अग्रेसर !

धर्मांधाकडून हिंदु घर मालकाला मारहाण आणि ठार मारण्याची धमकी ! 
     धुळे - येथील साक्रीरोड भागातील राहुल राजेंद्र मोहिते यांचे घर इसाक शेख यांनी गहाण ठेवले. ते त्यांना सोडण्यास सांगितले असता त्यांनी घरमालक श्री. मोहिते यांना मारहाण केली, तसेच अपशब्द वापरून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीवरून शेख यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

राणी लक्ष्मीबाई बलिदान दिनानिमित्त...

हिंदु जनजागृती समितीप्रणीत महिला शाखा 
रणरागिणीच्या वतीने धर्म आणि परंपरा रक्षण चळवळीचा प्रारंभ ! 

वार आणि दिनांक : शनिवार, ११ जून २०१६ 
वेळ : सायंकाळी ६ 
स्थळ : श्री संत राम मारुति मंदिर, राम मारुति चौक, 
शारदा मंदिर शाळेजवळ, लाल चौकी, कल्याण (पश्‍चिम) 
संपर्क : ९३२२०१५५३३ 

भगिनींनो, अबला नको रणरागिणी बना ! 
मोठ्या संख्येने सहभागी व्हा !
 भगिनींनो, राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श 
ठेवून राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ रणरागिणी बना ।

'काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन' विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 

'काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन' विशेषांक 

प्रसिद्धी दिनांक : १२ जून २०१६ 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
११ जून या दिवशी दुपारी ३.३० पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

२६/११ च्या मुंबईवरील आक्रमणात पाकचा हात ! - चीनची स्वीकृती

      बीजिंग - मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणात पाकचा हात होता, हे चीनने पहिल्यांदाच स्वीकारले आहे. चीनची शासकीय वृत्तवाहिनी सीसीटीव्ही ९ वरून एक वृत्तचित्र प्रसारित करण्यात आले होते. त्यात लश्कर-ए-तोयबा आणि पाकमधील त्याच्या समर्थकांविषयी दाखवण्यात आले होते. त्यात या आक्रमणाचाही उल्लेख होता आणि त्यासाठी पाकला उत्तरदायी ठरवण्यात आले होते. लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी आणि पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या सूत्रधारांनी या आक्रमणात कशी भूमिका बजावली, हेही माहितीपटात दाखवण्यात आले होते. (भारतविरोधी कारवाया करणार्‍या धूर्त चीनने हे मान्य केले, तरी यासाठी प्रायश्‍चित घेण्याविषयी तो पाकवर दबाव आणेल, याची शक्यता अल्पच ! - संपादक)

नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत ! - नेपाळचे उपपंतप्रधान

     काकारविट्टा (नेपाळ) - नेपाळचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी नेपाळचे अध्यक्ष कमल थापा यांनी हिंदु राष्ट्र पुनर्स्थापनेच्या आपल्या ध्येयाशी कटीबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे. हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ६ जून या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
     थापा पुढे बोलतांना म्हणाले की, हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने नेपाळच्या संविधानात संशोधन करता येऊ शकते. कार्यक्रमाला संबोधित करतांना राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी नेपाळचे महासचिव राजेंद्र लिंगदेन यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच जातीय एकात्मता आणि धार्मिक सहिष्णुतेचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे सांगितले. (केवळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच धार्मिक सहिष्णुता निर्माण होऊ शकते, यातूनच हिंदु धर्माची सर्वसमावेशकता आणि अद्वितियत्व दिसून येते ! - संपादक)

इंडोनेशियाला ६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का

     मतराम - इंडोनेशियाच्या लोंबूक या बेटास ८ जून या दिवशी ६.२ या रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच सुनामीची चेतावणी देण्यात आलेली नाही. या भूकंपाचे धक्के ३-४ सेकंदांपर्यंत जाणवत राहिले. भूकंपामुळे भयभीत झालेले नागरिक तातडीने घराबाहेर पडले. इंडोनेशियास ७ जूनलाही शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला होता. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती.

देहलीतील देहली पब्लिक लाइब्ररीमध्ये सेंटर फॉर गूड गर्व्हनन्सकडून मंदिरांची दुर्दशा : कारण आणि उपाय या विषयावर व्याख्यान !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही मार्गदर्शन !
गोरक्षेच्या संदर्भात विषय मांडतांना हिंदु जनजागृती
समितीचे श्री. कार्तिक साळुंखे
      देहली - येथील देहली पब्लिक लाइब्ररीच्या सभागृहात मंदिरांची दुर्दशा : कारण और उपाय या विषयावर सेंटर फॉर गूड गर्व्हनन्स या संस्थेकडून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. लालबाबू गुप्ता यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या व्याख्यानासाठी देशातील १५ जिल्ह्यांतून सदस्य आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे देहली येथील कार्यकर्ते श्री. कार्तिक साळुंखे आणि सनातन संस्थेचे श्री. सुदर्शन गुप्ता उपस्थित होते. श्री. साळुंखे यांनीही या विषयावर मार्गदर्शन केले.

भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी गोव्यवस्थेवर भर देणे आवश्यक !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्‍या पंचम 
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
आचार्य जितेंद्र आर्य, स्वदेशी मठ,
उज्जैन, मध्यप्रदेश
      रामनाथी, गोवा येथे ११ जून ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात उज्जैन, मध्यप्रदेश येथील स्वदेशी मठचे आचार्य जितेंद्र आर्य यांनी गोपालनाद्वारे स्वदेशीचे कार्य आणि त्याचा प्रसार या विषयावर अनुभवकथन केले. या वेळी त्यांनी मांडलेली सूत्रे येथे देत आहोत.
     गोमातेमुळे संपूर्ण जगाचे रक्षण होईल. ३५० वर्षांपूर्वी भारतात मोठ्या प्रमाणात सोने होते. ते लुटारूंनी लुटून नेले. १ सहस्र वर्षे या देशाला मोगलांनी लुटले; पण तरीही या देशातील सोने अल्प झाले नाही. त्यानंतर आलेल्या कपटी इंग्रजांनी मात्र या देशातील शिक्षणव्यवस्थाच नष्ट करून टाकली. तेव्हापासून आपली परंपरा, सभ्यता आणि संपन्नता नष्ट झाली. या गोष्टीचा आणि गोमातेचा काय संबंध ?, असे काही जणांना वाटेल; पण संबंध आहे.

भारतीय सैन्यदलाची युद्धातील घोषवाक्ये !

      युद्धात असणारी घोषवाक्ये सैनिकांना जीवनमरणाच्या अखेरच्या युद्धात स्फूर्ती देतात. ही घोषवाक्ये परंपरेनुसार आलेली आहेत. त्यांचे मूळ धर्माशी आहे. इतिहासातील घोषवाक्ये, भारतीय सैन्यातील विविध तुकडींची घोषवाक्ये आदींविषयी पुढे माहिती देत आहोत. 
१. भारतीय सैन्याच्या १७ बटालियन्सचा समावेश असलेल्या बिहार रेजिमेंटचे युद्धातील घोषवाक्य आहे जय बजरंग बली. बिहारी बिसराईट्ससाठी बिरसा मुंडा की जय हे युद्धातील घोषवाक्य आहे. झारखंड आणि छोटा नागपूर या विभागांतील आदिवासी सैनिकांचे युद्धातील घोषवाक्यही बिरसा मुंडा की जय हे आहे. 
२. राजपुताना राईफल्सच्या १९ बटालियन्सचे युद्धातील घोषवाक्य आहे राजा रामचंद्र की जय. रजपूत, क्षत्रिय आणि ठाकूर सैनिकांकडून हे घोषवाक्य उच्चारले जाते. 

मुलांनो, नियोजनकौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा !

बालकांसाठी परिपाठ !
१. नियोजन
      नियोजनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण उदाहरणादाखल शाम आणि राम यांची अनुक्रमे नियोजनाचा अभाव अन् सुयोग्य नियोजन यांमुळे झालेली स्थिती पाहू या.
१ अ. श्यामची नियोजनाच्या अभावामुळे झालेली स्थिती : शाम मनाला येईल त्याप्रमाणे कृती करतो, म्हणजे सगळे नियोजनाविना करतो. त्यामुळे प्रत्येक काम पूर्ण करण्यास त्याला अधिक वेळ लागतो. परिणामी त्याचा वेळ वाया जातो. दिवसभरात आपण आणखी काय करू शकतो, याचे त्याच्याकडून चिंतन होत नाही. किती वेळात किती कामे पूर्ण करू शकण्याची त्याची क्षमता आहे, हे तो ओळखू शकत नाही. त्यामुळे क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही आणि तो अपयशी ठरतो.

भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांचा (?) पैसा !

      प्रतिवर्षी शासनाचे गृहमंत्रालय स्वयंसेवी संस्थांमधील विदेशी चलनाचा सहभाग या मथळ्याखाली अहवाल प्रसिद्ध करते. त्यातील पृष्ठ क्र. २० वर १५ सर्वोच्च देणगीदार संस्थांची नावे देण्यात आली आहेत. त्यात ८ ख्रिस्ती आणि ७ निधर्मी असून त्यांपैकी गोस्पेल फेलोशिप ट्रस्ट इंडिया ही अमेरिकी संस्था मिशनर्‍यांना साहाय्य करते आणि भारतीय मंत्र्यांना आश्‍वासन देते की, देवाचे (म्हणजे धर्मांतराचे ! - संकलक) काम करण्यासाठी विश्‍वासाने बक्षिसे दिलेली आहेत. गॉस्पेल फॉर एशिया या टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या संस्थेचे ध्येय ज्या लोकांनी येशूप्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा ५० लाख खेड्यांपर्यंत आणि २७० कोटी लोकांपर्यंत पोचणे हे आहे. (त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)

व्यक्तीतील अहंभाव अल्प करण्यास साहाय्यभूत ठरणारा वृद्धापकाळ !

      उतारवयात सर्वांत अधिक काही जाणवत असेल, तर जगात घडत असलेले भौतिक, मानसिक आणि व्यवहारिक पालट. तुम्ही निवृत झालेले असता; पण जग मात्र तरुण आणि जोषात असते. जगाचे काही न अडता सारे व्यवहार कसे व्यवस्थित चाललेले असतात. त्याचे तुम्हाला वैषम्य वाटत नाही; पण या जगात पदाचे महत्त्व किती मोठे आहे, याचा साक्षात्कार झाल्यामुळे आता आपण किती लहान आहोत ?, ते समजते. तुम्ही पदावर असतांना जे लाभार्थी तुमच्या सभोवती घोटाळायचे, ते आता नव्या मंडळींच्या मागे लागले आहेत, ते पाहून ही जगरहाटी अशीच आहे, याचे स्मरण होऊन तुम्हाला मनातल्या मनात हसायला येते. जुने ते सोने, ही म्हण आठवते आणि तुम्ही मनाशी म्हणता, अगदी खरे; पण चौदा कॅरटचे सोने. (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१५)

हिंदूंनो, संघटित होऊन रामायण-महाभारत घडवा !

       सांप्रत सारे विश्‍व असुरांच्या कारवायांनी ग्रासले आहे. स्वार्थ साधण्यासाठी अमेरिका जगात दादागिरी करत आहे, तर जग इस्लाममय करण्याच्या ईर्ष्येने जिहादी संघटना आतंकवादी कृत्ये करून, रक्ताचे सडे शिंपून जगाला भयभीत करत आहेत. त्यात पाकिस्तान सहभागी आहेच. भारतातील या पाकिस्तानी नि तत्सम इतर उपद्रवांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आपले शासनकर्ते काहीही करतांना दिसत नाहीत. सारे धोरण केवळ बचावाचे नि शेपूट घालूपणाचे. त्यामुळे येथील अहिंदू आक्रमक होऊन शासनकर्त्या राजकीय पक्षांना मतपेटीचा धाक दाखवत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन रामायण-महाभारत घडवण्याची वेळ आली आहे. या महान कार्यात आपण अंतःकरणपूर्वक सहभागी होऊया ! - द.स. हर्षे. (मासिक स्वातंत्र्यवीर दीपावली २००६) लोकशाहीचा पोरखेळ थांबणार का ?

       काही दिवसांपूर्वी पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम या केरळ आणि पुदुचरी निवडणूक झाली. येत्या वषार्र्त गोवा आणि गुजरात या राज्यांच्या, तसेच मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा काही महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल अप्रत्यक्षरित्या राजकीय पक्षांनी वाजवला आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा निवडणुकांचे वारे वाहू लागते, तेव्हा तेव्हा पक्षांतर्गत बंडाळी आणि पक्ष सोडण्याचे प्रकार वाढू लागतात. राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचे तथाकथित नेते अथवा उमेदवार याला अपवाद नाहीत. सर्वच पक्षांमध्ये असे आयाराम-गयाराम वाढत असून त्यांनी पक्ष आणि राजकारण हे धर्मशाळेसारखेच चालवले आहे. असे अनेक आयाराम-गयाराम हे पक्ष पालटतांना व्यक्तीनिष्ठेला महत्त्व देत पक्षाला तिलांजली देत पक्षनिष्ठा खुंटीला टांगूनच राजकारण करत असतात.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या सणांच्या दिवशी दुप्पट दर आकारणार्‍या बीएस्एन्एल्ची धर्मनिरपेक्षता जाणा !
   ६ जूनपासून चालू झालेल्या रमझान मासाच्या निमित्ताने बीएस्एन्एल्कडून विशेष योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेनुसार ७८६ रुपयांच्या रिचार्जवर ७८६ एम्.बी. (मेगाबाईट) डाटा, ७८६ लघुसंदेश (एस्.एम्.एस्) आणि ६०० रुपयांचा टॉक टाईम मिळणार आहे.

भारतात हिंदूंना कायदा आहे, तर धर्मांधांना फायदा आहे !

     या देशातील लांगूलचालनाच्या राजकारणामुळेच एकही गुन्हा दाखल न झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह कारागृहात खितपत पडल्या आहेत, तर ५७ विविध आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल असणारे जामा मशिदीचे इमाम बुखारी उजळ माथ्याने फिरत आहेत. 
- श्री. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन न्यूज वृत्तवाहिनी.       आज हिंदु धर्म नष्ट होऊन सर्वत्र भोगसंस्कृती येईल कि काय, ही माझी शंका हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या कार्यामुळे मिटली आहे ! - ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Ramazanpar BSNLdwara Rs.786 ke rechargepar 786MB data,786 SMS,Rs.600 talktimeki yojna.
Hindu tyoharopar dogune paise lenewali BSNLki Dharmanirpekshata !
जागो ! : रमजान पर बीएस्एन्एल् द्वारा ७८६ रुपयों के रिचार्ज पर ७८६ एम्बी डेटा, ७८६ एस्एम्एस् और ६०० रुपयों के टॉकटाईम की योजना.
हिन्दू त्यौहारों पर दोगुने पैसे लेनेवाली बीएस्एन्एल् की धर्मनिरपेक्षता !

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्‍वरीतील ओवी आणि सप्तर्षींनी सांगितलेला नवीन मंत्रजप यांतील प.पू. पांडे महाराज यांनी विदित केलेले साम्य !

प.पू. पांडे महाराज
१. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि सप्तर्षि यांनी सांगितलेले मंत्र
१ अ. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये लिहिलेली ओवी : नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ 
१ आ. सप्तर्षींनी नाडीवाचनाद्वारे साधकांसाठी दिलेला मंत्र : ॐ निसर्ग देवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ॥
२. सप्तर्षींनी सध्या सर्व साधकांसाठी दिलेला मंत्र आणि संत 
ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहितांना आरंभी लिहिलेली ओवी 
यांमध्ये असलेले विलक्षण साम्य 
      सप्तर्षींनी सध्या जो मंत्र दिला आहे, तो मंत्र आणि संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहितांना आरंभी लिहिलेली ओवी यामध्ये विलक्षण साम्य आहे.

व्यष्टी साधनेचे तळमळीने प्रयत्न करणार्‍या आणि कठीण परिस्थितीतही शांत अन् स्थिर रहाणार्‍या नागपूर येथील सौ. नीलिमा बेंद्रे (वय ७६ वर्षे) !

मी सौ. नीलिमा बेंद्रेकाकूंना वर्ष २००१ मध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी प्रथम पाहिले. त्या वेळी सनातनचे साधक श्री. राजहंसकाका यांच्या घराच्या बाजूलाच संस्थेचे सेवाकेंद्र होते. आम्ही नुकताच साधनेला प्रारंभ केला होता. सर्व साधकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आगाशीत एकत्रित येऊन प.पू. भक्तराज महाराजांची अनेक भजने म्हटली. भजनांच्या माध्यमातून आमची सतत भावजागृती होत होती. प.पू. बाबांची भजने झाल्यावर सौ. बेंद्रेकाकूंनी भावपूर्ण गीत म्हटल्याने माझी भावजागृती झाली. त्या वेळेपासून सौ. काकू माझ्या नेहमीच स्मरणात राहिल्या.
१. वयाचा विचार न करता दायित्व घेऊन गुरुसेवा तळमळीने करणे
   बेंद्रेकाकू दहा वर्षांपूर्वी प्रसार, सत्संग, विज्ञापने आणि अर्पण गोळा करणे आदी सेवा करत होत्या. या सेवा करतांना त्यांनी वयाचा कोणताही विचार केला नाही. त्यानंतर एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, अन्य जिल्ह्यांमध्ये हिंदु धर्मजागृती सभांच्या सेवेसाठी जाणे, या सेवा त्या करत. पूर्वी बेंद्रेकाका सेवा करत नसल्याने त्याचे त्यांना थोडे वाईट वाटायचे. गुरुकृपेने तेही सेवेमध्ये सहभागी झाले. त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद झाला.
२. स्वतःची रहाती सदनिका आणि सर्व साहित्य सेवाकेंद्रासाठी अर्पण करणे
नागपूर शहरातील जयप्रकाश नगरमधील सेवाकेंद्र बंद होऊन ते बेंद्रेकाकांच्या जुन्या सदनिकेत चालू झाले. त्यांनी नियमित वापरात असणारी भांडी, फर्निचर, दूरदर्शन संच इत्यादी सर्व साहित्य सेवाकेंद्रातच ठेवले आणि ते नवीन सदनिकेत रहाण्यास गेले. यामुळे बाहेरगावाहून सेवेसाठी येणार्‍या साधकांच्या निवासाची सोय झाली. या सर्व प्रसंगांत बेंद्रेकाकांना काकूंची पूर्णपणे साथ होती. त्या सतत आनंदात असत. धर्मरथाचे साधक, हिवाळी अधिवेशनासाठी येणारे साधक, पत्रकार, संत आणि उन्नत साधक, हे सतत येत राहिल्यामुळे या सेवाकेंद्रात पुष्कळ प्रसन्न वाटते.

मुकांबिकादेवी १७.३.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांना शक्ती देतांना प.पू. डॉक्टरांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि त्या सूक्ष्म-परीक्षणात आनंद आणि दुःख देणारी अशी दोन्ही प्रकारची दृश्ये दिसणे, हे युद्धसदृश स्थिती जवळ आल्याचे लक्षण असणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...
१. मुकांबिकादेवी १७.३.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांना
शक्ती देतांना प.पू. डॉक्टरांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण
    १७.३.२०१६ या दिवशी सायं. ६.३० ते ७ या कालावधीत पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे कोलूर, उडुपी, कर्नाटक येथील मुकांबिकादेवीच्या दर्शनास जाणार होते. त्या वेळी ही देवी तिची शक्ती मला देणार होती.
सायं. ६.३५ (आरंभ) : मन निर्विचार झाले.
६.४० : आनंद जाणवला.
६.४३ : तोफांचे गोळे माझ्या डोक्यावरून वेगात पुढे जात होते. सुदर्शनचक्रे वेगाने जवळ येऊन वेगात डोक्यावरून पुढे जात होती.
६.४४ : पंजासारखी यंत्रे माझ्या दिशेने वेगाने येतांना त्यांचा स्फोट होत होता.
६.४५ : निरनिराळ्या आकारांतील हत्यारे वेगात जवळ येऊन बाजूने जात होती.
६.४६ : डावीकडे फांदीवर बसलेला एक मोर दिसला आणि आनंद जाणवला.
६.४७ : समोर एक उघडझाप करणारा पडदा दिसला.
६.४८ : काळोखात वेदनेने ओरडणारे ३ - ४ तोंडवळे दिसले.
६.५० : वादळ दिसले.
६.५१ : दुरून एका ठिकाणाहून माझ्याकडे प्रकाशझोत येत आहेत.
६.५२ : आनंद, निसर्गात झाडे वाढत आहेत.
६.५३ : दूर अणूबॉम्बसारखे आक्रमण होऊन त्यातून निघालेला काळा धूर आकाशात जात आहे.
६.५४ : वाईट तोंडवळे आणि पंजे पुसट होत चालले.
६.५५ : आनंदाने फटाके फोडल्यासारखे दिसले. (आवाज ऐकू आला नाही.) पक्षी वेगाने उडत आहेत. पंख फडफडवत आहे.

जगाचा भार वाहे श्रीहरि ।

श्री. अविनाश जाधव
जगाचा भार वाहे श्रीहरि (टीप १) ।
कशाला काळजी करू ॥ १ ॥ 

साधकांना तो फुलासारखा सांभाळतो ।
अन् त्यांना साधनेची गोडी लावतो ॥ २ ॥ 
 
वाईट शक्तींच्या त्रासांपासून मुक्त करतो ।
मायेतही ब्रह्म तोच दाखवतो ॥ ३ ॥ 

अहं-दोषही तोच घालवतो ।
अर्थ आणि काम तोच करवून घेतो ॥ ४ ॥ 

प्रत्येकाच्या हृदयी तो वसतो ।
प्रत्येक जण त्याची अनुभूती घेतो ॥ ५ ॥ 

तो वाहे जगाचा भार डोक्यावरी ।
असा हा आमचा श्रीहरि ॥ ६ ॥ 

कितीही देह झिजवले श्रीहरि चरणी ।
अल्प अन् अल्पच..., असे या भूवरी ।
असा आमचा श्रीहरि, वाहे जगाचा भार डोक्यावरी ॥ ७ ॥
- श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
टीप १ - प.पू. डॉक्टर

इतरांना साहाय्य करणे आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील सौ. जयमाला पडवळ (वय ६१ वर्षे) !

सौ. जयमाला पडवळ
देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील धान्य विभागात दायित्व घेऊन सेवा करणार्‍या साधिका सौ. जयमाला पडवळकाकू यांनी नुकतीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. एप्रिल २०१६ मध्ये त्यांच्याकडून सहसाधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. सतत आनंदी आणि उत्साही असणे
अ. काकू आणि मी खोलीत एकत्र रहात होतो. त्या वेळी त्या नेहमी आनंदी असायच्या. - सौ. संध्या डोंगरे
आ. सौ. पडवळकाकूंना कितीही त्रास होत असला, तरी त्या नेहमी आनंदी आणि उत्साही असतात. त्या कधीच स्वतःला त्रास होत आहे, असे दर्शवत नाहीत.
२. सेवेची तळमळ असणे
अ. काकूंकडे धान्य-विभागातील सेवेचे दायित्व आहे. काकू विभागात असल्यावर मला कोणत्याच गोष्टीकडे पहावे लागत नाही. तेव्हा मला पडवळकाकू आहेत, तर त्या सेवा परिपूर्ण करणार, असा त्यांच्याविषयी विश्‍वास वाटतो.
आ. काकूंना कटीदुखीचा (कंबरदुखीचा) त्रास आहे. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) त्यांना ओझे उचलायचे नाही, असे सांगितले आहे; तरीसुद्धा काकू या दुखण्याविषयी कोणतीही तक्रार किंवा बाऊ न करता धान्य-विभागात झोकून देऊन सेवा करतात. - कु. सविता जाधव

स्वतः ज्ञानी असूनही कृतज्ञता आणि शरणागत भाव यांचा संगम असलेले प.पू. पांडे महाराज !

       परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चालू असलेल्या लेखमालेत कलियुगातील मानवाला निष्काम कर्मयोगाद्वारे.... हा प.पू. पांडे महाराज यांनी लिहिलेले लेख प.पू. डॉक्टरांना आवडल्याचे मी प.पू. पांडे महाराजांना भ्रमणभाषद्वारे कळवले. तेव्हा ते म्हणाले, प.पू. डॉक्टरांना लेख आवडले, हे ऐकून मला खूप खूप खूप आनंद आनंद आनंद (त्रिवार आनंद) झाला. प.पू. डॉक्टरच माझ्या अंतरंगात वसलेले असल्यामुळे काही पात्रता नसतांनाही या लेखांचे लिखाण त्यांनीच माझ्याकडून करवून घेतले. त्यामुळेच ते अधिक चांगले झाले आहेत, असे प.पू. डॉक्टरांना सांगा. 
       कृतज्ञता आणि शरणागत भाव यांचा संगम असलेले प.पू. पांडे महाराज यांचे हे बोल ऐकून माझा भाव जागृत झाला. 
- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०१६)

भगवान श्रीधरस्वामी यांनी प.पू. दास महाराज यांना १ वर्षभर मौनव्रत धारण करण्यास स्वप्नदृष्टांताद्वारे सांगितल्याविषयी लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचल्यावर जाणवलेली सूत्रे

श्री. दत्तात्रेय पटवर्धन
      प.पू. दास महाराज यांना त्यांचे पूर्वीचे गुरु भगवान श्रीधरस्वामी यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे केलेल्या मार्गदर्शनासंबंधी लेख २.३.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचला. त्यावरून प.पू. दास महाराज २.३.२०१६ या दिवसापासून १ वर्ष मौन धारण करणार आहेत, असे लक्षात आले. तेव्हा आपल्याला १ वर्ष प.पू. दास महाराजांशी काही बोलता येणार नाही, असा विचार माझ्या मनात आला आणि त्या सायंकाळी ७.३० वाजता मी प.पू. दास महाराजांना दूरभाषद्वारे संपर्क केला. तेव्हा मला लेख वाचल्यावर प्र्रकर्षाने जाणवलेली पुढील सूत्रे मी प.पू. महाराजांना सांगितली.
१. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) नेहमी म्हणतात, स्थुलापेक्षा सूक्ष्म हे अधिक श्रेष्ठ आणि सामर्थ्यशाली असते. हा स्वप्नदृष्टांत असल्यामुळे तो सूक्ष्म आहे आणि ईश्‍वराचे कार्य हे सूक्ष्मातून होत असते अन् त्याचे परिणामस्वरूप म्हणून नंतर ते आपल्याला स्थुलातून अनुभवावयास मिळते.

काळानुसार ऋषी आणि संत यांचे ज्ञानकार्य

श्री. राम होनप
१. अन्य युगांत ऋषींनी समाजातील उपजत
भावामुळे भावासंबंधीचे ज्ञानकार्य अल्प प्रमाणात करणे
    कलियुगाच्या व्यतिरिक्त अन्य (सत्य, त्रेता आणि द्वापर) युगांत सर्वसाधारण व्यक्तीतही थोडा-अधिक प्रमाणात भाव होता. त्या काळी ऋषींचे कार्य ज्ञानप्रधान होते. ऋषींना प्राप्त झालेल्या ज्ञानामध्ये भावाविषयीचे ज्ञान अत्यल्प प्रमाणात होते. समाजातील भाव असलेल्या विभूतींना ऋषींच्या ज्ञानाची जोड मिळाली. त्यामुळे अशा विभूती दैवी कार्य करू शकल्या. ऋषींनी मनुष्यजीवन उत्तमरित्या जगता यावे, यासाठी ज्ञानाचे भांडार उघडे केले. मुळात अन्य युगांत भावाचे प्रमाण उपजत असल्याने ऋषींनी भावासंबंधीचे कार्य कलियुगातील संतांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात केले. 

हिंदु धर्मजागृती सभेकरता नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. दादा दामले
१. हिंदु धर्मजागृती सभेकरता नामजप करायचा आहे, असा निरोप मिळणे
    ५.३.२०१६ या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका साधकाचा मला दूरभाष आला आणि त्याने सांगितले, ६.३.२०१६ या दिवशी होणार्‍या धर्मजागृती सभेच्या यशाकरता आज रात्रीपासून नामजप करणे आवश्यक आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले, मी नामजप करतो.
२. रात्री नामजप करतांना नामजपाशी एकरूप होणे आणि 
संपूर्ण वेळ प.पू. गुरुदेवांच्या सान्निध्यातच असल्याचे जाणवणे
    रात्री जेवण करून ९ वाजता बसून नामजप करण्यास आरंभ केला. त्या वेळी मी नामजपाशी एवढा एकरूप झालो की, रात्री १ वाजता मी भानावर आलो. सदर ४ घंट्यांत मी नामजपात एवढा रंगून गेलो होतो की, मला वेळेचे भान नव्हते. मी कुठेतरी आनंदमय अन् समाधानकारक वातावरणात होतो. त्या वेळी मी संपूर्ण वेळ प.पू. गुरुदेवांच्या सान्निध्यातच होतो. त्यानंतर मी पहुडून नामजप करू लागलो. थोड्या वेळाने विश्रांती घेऊन पुन्हा नामजपाला बसावे, असे मला वाटू लागले. सुमारे साडेतीन घंटे विश्रांती घेऊन मी पुन्हा नामजपाला बसलो. जसे पूर्वीच्या ४ घंट्यांच्या नामजपाच्या वेळी आनंदात होतो, तसाच आनंद सकाळी ६ वाजेपर्यंतही जाणवत होता. दुसर्‍या दिवशीही तसाच आनंदात नामजप झाला.
३. प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याला आरंभ झाल्याची आनंददायक वार्ता वाचायला मिळणे
     ७.३.२०१६ या दिवशी सकाळी दार उघडून दैनिक सनातन प्रभात घेतले आणि उघडले. त्यात परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अवतारी कार्याला आरंभ ही आनंददायक वार्ता वाचायला मिळाली. त्या आठवणीतच दुपारी १२ पर्यंत होतो.

देवाची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा पनवेल येथील कु. सोहम् कुलदीप वैती (वय ८ वर्षे) !

कु. सोहम् वैती
     कु. सोहम् कुलदीप वैती याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. लाघवी आणि हुशार 
     सोहम् पुष्कळ लाघवी आणि हुशार आहे. तो कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. त्याला शास्त्र (सायन्स) हा विषय अधिक आवडतो. तो शालेय शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती करत आहे. त्याला A+, म्हणजे ९० ते ९५ टक्के गुण मिळतात.
२. जिज्ञासा 
      एकदा मी त्याला श्रीविष्णूच्या दशावतारांविषयी सांगत होते. तेव्हा प्रत्येक अवताराची कथा तो अगदी मनापासून ऐकत होता आणि मधेमधे प्रश्‍नही विचारत होता. त्याला गूढ गोष्टींविषयी फार कुतूहल आणि त्या जाणून घेण्याविषयी उत्कंठा असते.

तळमळीने आणि मनापासून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून स्वतःत पालट करणार्‍या वर्धा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुनंदा हरणे (वय ४६ वर्षे) !

सौ. सुनंदा हरणे
      वर्धा येथील साधिका सौ. सुनंदा हरणे (वय ४६ वर्षे) गेल्या १३ वर्षांपासून साधना करत आहेत. त्यांच्याविषयी वर्धा आणि यवतमाळ येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 
१. शिकण्याची वृत्ती असणे 
     सेवेसाठी सर्व यायला हवे, असा त्यांचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे त्यांनी संगणक, गाडी, भ्रमणभाष इAत्यादी चिकाटीने शिकून घेतले. त्यांनी श्रीगुरूंना अपेक्षित अशी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकून घेतली आणि याविषयी साधकांना सांगतांना त्या सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.
२. तत्त्वनिष्ठ असणे 
     साधकांशी बोलतांना प.पू. गुरुदेवांना काय अपेक्षित आहे, याचा विचार करून बोलतात. दृष्टीकोन देतांनाही मानसिक स्तरावर न देता आध्यात्मिक स्तरावर देतात. - सौ. वनिता किरसान आणि सौ. भार्गवी क्षीरसागर, वर्धा

आश्रमातून घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे वातावरणातील अनिष्ट शक्तींचा शरिराला थेट स्पर्श होत आहे, असे न जाणवणे आणि आश्रमातील चैतन्याच्या कवचामुळे आश्रमाच्या बाहेर गेल्यानंतरही स्वतःचे रक्षण होत असल्याचे साधिकेच्या लक्षात येणे

    नुकतीच मी १५ दिवसांसाठी आश्रमातून घरी गेले होते. यापूर्वी जेव्हा जेव्हा मी घरी गेले होते, तेव्हा चार दिवसांनंतर वातावरणात अनिष्ट शक्तींचा कल्लोळ चालू आहे. अनिष्ट स्पंदने माझ्या शरिरावर आदळत आहेत. एकाच वेळी बर्‍याच अनिष्ट शक्ती माझ्या शरिराच्या वेगवेगळ्या भागांना घासून जात आहेत, असे मला दिवसभर जाणवत असे. त्या वेळी शरिराच्या त्या त्या भागाला अगदी हलका विजेचा धक्का बसल्यासारखे वाटे. काही वेळा एखाद्या व्यक्तीने आपल्याला अचानक ढकलले, तर शरीर जसे हालेल आणि मनाला एक प्रकारचा धक्का बसेल, तसे होत असे. रात्री किंवा दुपारी झोपले असतांना मोठी वाईट शक्ती माझ्या शरिराच्या कोणत्याही भागातून शरिरामध्ये शिरत आहे, याची स्पष्ट जाणीव होत असे. या वेळी मात्र घरी गेले असतांना अनिष्ट शक्तींचा नेहमीप्रमाणे शरिराला थेट स्पर्श होत असल्याचे जाणवले नाही.

देवा मला भेट ना !

कु. श्रावणी पेठकर
देवा मला भेट ना ।
तुझे रूप दाखव ना ॥ १ ।
सुंदर तुझे रूप असे ।
मनी माझ्या तूच असे ॥ २ ॥
माता पिता तूच रे ।
सुखात तू, दुःखात तू ।
सर्वस्व तूच तू ॥ ३ ॥
देवा मला भेट ना ।
तुझ्या कुशीत घे ना ॥ ४ ॥

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता !
     सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५२००१२०३ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

गुरुपौर्णिमेला ३९ दिवस शिल्लक

     
चंदनाप्रमाणे गुरु प्रभुकार्यासाठी स्वत:ला झिजवून जगात सुगंध पसरवतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     जेथे काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीवधाच्या खोट्या आरोपावरून कारागृहात ठेवले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली, तेथे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही करतात, यात आश्‍चर्य ते काय ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

काळानुसार साधनेचे ध्येय

१. संपत्काळ : मोक्षप्राप्ती
२. आपत्काळ : साधना करता येण्यासाठी जिवंत रहाणे
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकांनी अहंकार बाळगू नये !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
साधकांनी मी, माझे, माझ्यासाठी हा अहंकार न ठेवल्यास हितावह ठरते. 
अहंकार हा साधकांच्या प्रगतीमधील फार मोठा अडथळा आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

केअर टेकरनेच केला घात !

संपादकीय 
      एकट्या, निराधार वृद्धांची काळजी घेण्यासाठी केअर टेकर नावाचे आस्थापन उदयास येणे, ही भारतियांसाठी अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. वयोवृद्धांच्या आधाराने चालणार्‍या भारतीय कुटुंब संस्कृतीची ही भयावह दुरवस्था आहे. ठाणे येथील एका वृद्ध गृहस्थांची काळजी घेण्यासाठी या आस्थापनाचा कर्मचारी त्यांच्याकडे रहायचा; परंतु त्याने अयोग्य सेवा केल्याने त्या वृद्ध गृहस्थांनी त्याची आस्थापनाकडे तक्रार केल्यावर आस्थापनाने दुसर्‍या मुलाला रहायला पाठवले. त्यानंतर त्या पहिल्या मुलाने ते वृद्ध गृहस्थ आणि तो नवीन केअर टेकर मुलगा दोघांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. वृद्धाश्रम, केअर टेकरसारखी आस्थापने निर्माण करावी लागणे, या माध्यमातून भारतीय संस्कृतीची अधोगती समोर येत असतांनाच आता त्यांच्याकडूनही अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना होणे, हे भारतात वृद्ध नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण करणारे आहे. ही सारी स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्राचीच प्रतीक्षा आहे.

आतंकवादाच्या विरोधातील एल्गार !

संपादकीय
      अमेरिकेने तिच्या देशातील शस्त्रांचा साठा विकण्यासाठी आणि भावी महासत्ता होणार्‍या भारतावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच जुन्या अखंड रशियाच्या महासत्तेला शह देण्याच्या अनुषंगाने पाकमधील आतंकवाद पोसला. हा इतिहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाऊक नाही, असे नव्हे. या पार्श्‍वभूमीवर एक काळ मोदींना नाकारणार्‍या आणि त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालेल्या अमेरिकेत पंतप्रधान मोदींनी अशी काही चक्रे गेल्या दोन वर्षांत फिरवली आहेत की, आज अमेरिकेत ते जेवढ्या वेळा जातात तेवढ्या वेळा त्यांचे केवळ उत्साहाने स्वागतच होते असे नाही, तर अमेरिकी आणि अनिवासी भारतीय या दोघांची मने जिंकूनच ते प्रत्येक वेळी माघारी येतात. अमेरिकेच्या काँग्रेसच्या बैठकीत ८ जूनला रात्री त्यांनी केलेल्या भाषणानेही परत एकदा त्यांनी तेथील लोकप्रतिनिधींची मने जिंकली आहेत, असे चित्र दिसत आहे. या वेळी त्यांनी आतंकवादाच्या विरोधात भाष्य केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn