Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उत्तरप्रदेशच्या दधेडू कलां येथे रविदास मंदिरात ध्वनीक्षेपकावरून आरती ऐकवल्याने धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण !

मुसलमानप्रेमी समाजवादी पक्षाच्या राज्यात धर्मांधांचा आतंकवाद आणि असुरक्षित हिंदू !
  • मंदिरातील ध्वनीक्षेपक तोडले 
  • मंदिरावर दगडफेक
  • दलित हिंदूंच्या घरावर आक्रमण
     देशातील बहुसंख्य हिंदू आवश्यकता नसतांनाही अनेक वर्षांपासून प्रतिदिन ५ वेळा अजान ऐकत आहेत; मात्र त्यांनी कधी असे आक्रमण केले नाही, ही त्यांची सहिष्णुता नाही का ?
     धर्मांध, हिंदूंवर ते हिंदू असल्याने आक्रमण करतात, मग ते दलित असो कि सवर्ण; हे धर्मांधांशी मैत्री करणारे नेते लक्षात घेतील का ?
    
       चरथावल/मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - दधेडू कलां गावात रमझानच्या पहिल्या दिवशी धर्मांधांकडून येथील रविदास मंदिरावर आक्रमण करण्यात आले. मंदिरातील ध्वनीक्षेपक तोडण्यात आले. तसेच मंदिरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीसफाटा येथे पोचल्याने मोठी दुर्घटना टळली. सायंकाळी अजानच्या वेळी मंदिरातील आरतीही चालू झाल्याने आणि ती ध्वनीक्षेपकावरून ऐकवण्यात आल्याने हे आक्रमण करण्यात आले.

(म्हणे) हिंदूंच्या स्वतंत्र वसाहतींवर आक्रमण करू ! - हिजबुल मुजाहिदीन

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणार नसल्याचे स्पष्टीकरण !
काश्मीरमध्ये भाजप-पिडीपीचे आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतांना जिहादी आतंकवादी
अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे धाडस कसे करू शकतात, असा प्रश्‍न हिंदूंना पडत आहे !
--------------------------
      स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते की, जेथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तेथे
धर्मांधांकडून त्यांच्यावर आक्रमण झाले, तर जेथे धर्मांध अल्पसंख्यांक आहेत, तेथील
बहुसंख्य हिंदूंनी त्यांना धडा शिकवला, तरच अल्पसंख्य हिंदूंचे रक्षण होईल !
 
  

      श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बरहान वानी याचा ६ मिनिटांचा एक व्हीडिओ प्रसारित झाला आहे. यात त्याने धमकी देतांना म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर राज्यातील सुरक्षा दले, सैनिकांच्या वसाहती आणि हिंदूंंसाठीच्या स्वतंत्र वसाहती यांना लक्ष्य करण्यात येईल; मात्र याच वेळी राज्यात होणार्‍या अमरनाथ यात्रेस लक्ष्य करणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. बरहान काश्मीरच्या त्राल येथील रहिवासी आहे. २०१० मध्ये १० वीची परीक्षा देण्याऐवजी तो घर सोडून हिजबूल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला.

जयपूरमध्ये मेट्रो रेल्वेमार्गासाठी हिंदूंच्या विरोधानंतरही आणखी एक प्राचीन मंदिर पाडले !

भाजपच्या राज्यातील हिंदूंच्या मंदिरांवरील संकट !
   
  जयपूर - येथील मेट्रो रेल्वेसाठी ८ जूनला गौरीशंकर महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर पाडण्यात आले. या वेळी स्थानिक हिंदूंनी त्याचा मोठा विरोध केला; मात्र पोलिसांनी हिंदूंचा विरोध मोडून काढून हे मंदिर पाडले. काही हिंदूंना पोलिसांनी अटकही केली. यापूर्वी २०० वर्षे जुने असणारे रोजगारेश्‍वर मंदिरही अशाच पद्धतीने पाडण्यात आले होते. त्याला झालेल्या विरोधामुळे हे मंदिर शासनाला पुन्हा बांधून द्यावे लागत आहे. राज्याचे मंत्री राजपाल सिंह शेखावत यांनी म्हटले की, येथे मेट्रो स्थानक बांधल्यानंतर शासनाकडून पुन्हा या ठिकाणी मंदिर बांधण्यात येईल. मंदिर तोडल्याच्या विरोधात येथील धरोहर बचाओ समिती ९ जूनपासून येथे आंदोलन करणार आहे. प्रशासनाने याविषयी म्हटले होते की, आम्ही त्रिवेणीधाम पीठाधीश्‍वर नारायणदासजी महाराज यांच्या स्वीकृतीनेच मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला होता; मात्र नारायणदासजी महाराज यांनी स्पष्ट केले की, मी अशी कोणतीही अनुमती दिलेली नव्हती.

नायजेरियन पर्यटकांवर बंदी घाला ! - रवि नाईक

सत्ता हातात असतांना नायजेरियन पर्यटकांच्या समस्येवर नाईक 
यांनी काय केले, हेही त्यांनी जनतेला सांगावे ! 
     पणजी, ८ जून (वार्ता.) - नायजेरियन पर्यटक गोवा राज्यात, तसेच इतर भागांत उपद्रव करत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अशा लोकांची गोव्याला आवश्यकता नाही. या लोकांवर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री रवि नाईक यांनी केली. या वेळी नायजेरियन पर्यटकांचा त्यांनी निग्रो अशा वर्णभेदवाचक शब्दांत उल्लेख केला. नाईक म्हणाले, आम्हाला गोव्यात नायजेरियातील पर्यटक नकोत. बेंगळुरू येथे आम आदमी पक्षाचे नेते आणि नायजेरियन पर्यटक यांत हाणामारी झाली आहे. हे लोक जातील तेथे समस्या निर्माण करतात. केंद्रशासनाने या नायजेरियातील लोकांवर बंदी घातली पाहिजे.

हिंदूंच्या विरोधानंतर २४ तासांत अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळावरून होणारी हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या पायपुसण्यांची विक्री थांबली !

हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम !
     नवी देहली - विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे जगातील सर्वांत मोठे संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या पायपुसण्यांची विक्री हिंदूंच्या तीव्र विरोधापुढे शरण जाऊन २४ घंट्यांच्या आत थांबवली. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला होता. ट्विटरवरून बायकॉट अ‍ॅमेझॉन नावाचा ट्रेंड चालू करून त्याद्वारे अ‍ॅमेझॉनवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.

गुजरातमध्ये स्वामीनारायणाच्या मूर्तीला संघाचा गणवेश घातला !

धर्मशिक्षणाच्या अभावाचा दुष्परिणाम !
    
संघाचा गणवेश घातलेली स्वामीनारायण यांची मूर्ती
      कर्णावती (अहमदाबाद) - गुजरातच्या सुरत शहरातील लस्काना भागात स्वामीनारायण मंदिराच्या व्यवस्थापनाने मंदिरातील भगवान स्वामीनारायणाच्या मूर्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश घातला आहे. संघाच्या गणवेशातील स्वामीनारायणाच्या मूर्तीचे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित होत आहे. त्यामुळे व्यवस्थापनावर टीका होत आहे. काँग्रेसनेही यावर टीका केली आहे (काँग्रेसने सत्तेत असतांना हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचाच हा परिणाम आहे. - संपादक); मात्र संघाकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
      या मंदिरात काही दिवसांपूर्वी दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने संघाचा गणवेश देवाच्या चरणी अर्पण केला. मंदिर व्यवस्थापनाच्या पदाधिकार्‍यांनी लगेचच देवाच्या मूर्तीला हा गणवेश घातला. सोबतच एक राष्ट्रध्वजही मूर्तीच्या हातात दिला. मंदिर व्यवस्थापनातील स्वामी विश्‍वप्रकाशजी यांनी म्हटले आहे की, भगवान स्वामीनारायणाच्या मूर्तीला वेगवेगळा गणवेश घालण्याची आमची पद्धत आहे. त्याला अनुसरूनच आम्ही संघाचा गणवेश घातला होता. त्यामागे उजव्या विचारसरणीचा प्रचार करण्याचा किंवा अन्य कोणताही अन्य हेतू नाही. यातून वाद निर्माण होईल अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. (मंदिरातील व्यवस्थापनालाही धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

गोमेकॉतील त्रुटींच्या अन्वेषणासाठी नेमलेल्या आयोगाने योग्य प्रकारे कामकाज करावे !

अशी मागणी का करावी लागते ? चौकशी योग्य प्रकारे होत नसेल, तर आयोग नेमण्याचे नाटक कशाला ? 
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ता दुर्गादास कामत यांची मागणी
     पणजी, ८ जून (वार्ता.) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉच्या) रुग्णालयातील अयोग्य कारभार आणि त्रुटी आदींविषयी चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या आयोगाकडून या संदर्भातील चौकशी गांभीर्याने केली जात नाही. आयोगाने नि:पक्षपाती चौकशी केली नाही, तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यकर्ते सचिवालय आणि आरोग्य खाते यांच्या विरोधात आवाज उठवतील, अशी चेतावणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ता दुर्गादास कामत यांनी दिली.
    या वेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अधिवक्ता तन्वीर खतीब आणि अल्पसंख्यांक विभागाचे निमंत्रक फिरोझ खान या वेळी उपस्थित होते.

गोवा शासनाने परिणाम भोगण्यास सिद्ध व्हावे ! - भारतीय भाषा सुरक्षा मंचची चेतावणी

    पणजी, ८ जून (वार्ता.) - इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांना दिलेले अनुदान रहित करण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचने सरकारला दिलेली मुदत ६ जून या दिवशी संपली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान सरकारने नवीन शालेय वर्षात चालूच ठेवले आहे. आता सरकारने परिणाम भोगावे, असे भाभासुमंने म्हटले आहे. 
    नूतन शालेय वर्षात सरकारने माध्यम धोरणात पालट करून इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करावे. ही मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याची, तसेच निवडणुकीच्या वेळी सरकारच्या विरोधात कृती करण्याची चेतावणी भाभासुमंकडून देण्यात आली होती. ही मुदत वाढवून २ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्याचाही विचार मागे झाला होता; मात्र सरकार मंचच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आल्यामुळे मुदत वाढवून न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारच्या निषेधार्थ १८ जून या दिवशी राज्यभर उपोषण 
     १८ जून या दिवशी मंचने राज्यभर सरकारच्या निषेधार्थ उपोषणाचे आवाहन केले आहे. या दिवशी अनेक ठिकाणी लाक्षणिक उपोषण करून शासनाचा निषेध केला जाणार आहे. सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालणे, निषेध झेंडे दाखवणे, असे मंचच्या आंदोलनाचे स्वरूप असणार आहे.

लाल दिव्याची गाडी न वापरण्याचा गोव्याच्या लोकायुक्तांचा निर्णय

     पणजी, ८ जून (वार्ता.) - लोकायुक्तांनी लाल दिवा असलेली गाडी वापरावी का, याविषयी चर्चा चालू होताच पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती असलेले लोकायुक्त पी.के. मिश्रा यांनी लाल दिवा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनाला लाल दिवा नकोच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 
   गोवा लोकायुक्त कायद्याच्या कलम ६ नुसार गोव्याच्या लोकायुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा दर्जा आहे. त्यांचे वेतन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे वेतनही समान आहे. ३ जुलै २०१४ या दिवशी गोवा शासनाने प्रसारित केलेल्या अधिसूचनेत लाल दिव्याचे वाहन कोण वापरू शकते, ते स्पष्ट केलेले आहे. त्यात लोकायुक्तांचे नाव नसले तरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जर लाल दिवा वापरू शकतात, तर गोवा लोकायुक्तही लाल दिव्याची गाडी वापरण्यास पात्र ठरतात, असे अनेकांचे मत आहे. लोकायुक्त मिश्रा हे वाहनास लाल दिवा वापरत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता अधिवक्ता आयरिश रॉड्रीग्स यांच्याकडून आल्यानंतर लाल दिवा वापरला नाही; म्हणून काही बिघडत नाही, अशी भूमिका मिश्रा यांनी घेतली आणि लाल दिव्याची गाडी वापरणे स्वत:हून बंद केले.
तक्रारींवर सुनावणीस प्रारंभ 
गेल्या चार वर्षांत शासकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार, तसेच पंचायत स्तरावरील गैरव्यवहारांविषयी लोकायुक्तांच्या कार्यालयाकडे आलेल्या सर्व २२ तक्रारीसंदर्भात सुनावणी घेणे ६ जूनपासून चालू झाले.

गोव्यासारखा समान नागरी कायदा राष्ट्रीय पातळीवर का नसावा ? - बी.एन्. देशमुख, निवृत्त न्यायमूर्ती

     पणजी - समान नागरी कायदा गोव्यात पूर्वीपासून अस्तित्वात आहे. या छोट्याशा राज्यात जर हा कायदा असू शकतो, तर तो या देशात का राबवला जाऊ शकत नाही ?, असा प्रश्‍न औरंगाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एन्. देशमुख यांनी केला आहे. आविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूरच्या वतीने संस्कृती भवन सभागृहात कै. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलतांना निवृत्त न्यायाधीश देशमुख यांनी हा प्रश्‍न केला. या वेळी व्यासपिठावर आविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पवार, वरळी-मुंबईचे आमदार सुनील शिंदे आदींची उपस्थिती होती. 
     निवृत्त न्यायाधीश देशमुख यांनी पुढे म्हटले, समाजात नवीन आदर्श शोधून त्यांना प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने उपरोल्लेखित पुरस्काराचे महत्त्व आहे. या वेळी इतरांचीही भाषणे झाली.अहिंदूंची मते मिळवण्यासाठी आम आदमी पक्षाकडून सनातन संस्थेची अपकीर्ती !

- श्री. आनंदराव नागवेकर, आपचे सदस्य, तथा संचालक, अ‍ॅन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, गोवा
    
श्री. आनंदराव नागवेकर
मी आम आदमी पक्षाचा सदस्य असलो, तरी सनातन संस्थेला माझा पाठिंबा आहे. अहिंदूंची मते मिळवण्यासाठी आम आदमी पक्षाचे काही सदस्य सनातनची अपकीर्ती करत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. सनातनच्या साधकांनी काहीच चुकीचे केलेले नाही. आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडे गोव्यासाठी काहीच कृतीधोरण नसल्यामुळे प्रसिद्धीसाठी ते सनातन संस्थेला अपकीर्त करत आहेत.

जयललिता, चंद्रशेखर राव यांच्यानंतर ममता (बानो) बॅनर्जी यांच्याकडून मुसलमानांसाठी रमझाननिमित्त २२ कोटी रुपये खर्च करून अल्पदरात खाद्यपदार्थांचे पाकीट !

हिंदूंच्या सणांच्या वेळी या सरकारकडून हिंदूंना भेट का देण्यात येत नाही ?
     कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे सरकार रमझानच्या काळात सर्व शिधावाटप केंद्रांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात मुसलमानांना विशेष खाद्य पदार्थांचे पाकीट देणार आहे. तसेच याच काळात २ रुपये किलोने तांदूळही देण्यात येणार आहेत. यासाठी २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
     राज्याच्या अन्नपुरवठामंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांनी सांगितले की, एका मासात दोन वेळा दोन पाकिटे देण्यात येतील. ही पाकिटे केवळ मुसलमानांनाच नाही, तर सर्व नागरिकांना विकत मिळू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले; मात्र याचे मूल्य किती असणार हे अजून घोषित करण्यात आलेले नाही. मल्लिक म्हणाल्या की, या पाकिटात अर्धा किलो साखर, एक किलो मैदा, चणे आणि अन्य खाद्य सामग्री असेल. याचे मूल्य बाहेरील दरापेक्षा अल्प असेल. ही योजना ६ जुलैपर्यंत असणार आहे.

राजीव गांधी इन्स्टिट्यूटच्या इमारतीच्या बांधकामाचे पैसे थकवल्यावरून सोनिया गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल !

जनतेला लुबाडणे हेच एकमेव काम करणारी काँग्रेस !
     तिरुवनंतपुरम् (केरळ) - केरळमधील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज्च्या इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकाचे पैसे थकवल्याच्या प्रकरणी कंत्राटदार, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रमेश चेन्नीथला, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी, केरळ काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष व्ही.एम्. सुधीरन् या ३ काँग्रेसी नेत्यांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसर्स हिथर कन्स्ट्रक्शन या आस्थापनाने हा गुन्हा दाखल केला आहे. केरळ काँग्रेसने थिरुवनंतपुरम् येथे इन्स्टिट्यूट बनवण्यासाठी या आस्थापनाला कंत्राट दिले होते. इन्स्टिट्यूटचे काम पूर्ण होऊन आणि त्याचे उद्घाटन होऊन ३ वर्षे लोटली; पण त्या कामाचा थकीत मोबदला आस्थापनला अजूनही न मिळाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पाकिस्तानने जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करावी ! - अमेरिकेची पाकला चेतावणी

पाकमध्ये जिहादी आतंकवाद निर्माण होऊन तो वाढत असेपर्यंत
 अमेरिकेनेच पाकला साहाय्य केले, हे भारत कसा विसरू शकतो ?
     वॉशिंग्टन - आतंकवादाच्या विरोधात पाक त्याच्या दायित्वापासून पळू शकत नाही. पाकने आतंकवाद्यांच्या विरोधातील लढाईत प्रामाणिकपणे साथ दिली पाहिजे, अशी चेतावणी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रमुख एड्वर्ड राईस यांनी दिली आहे.
     राईस म्हणाले की, पाकने पठाणकोट आक्रमणाच्या संदर्भात गांभीर्याने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणातील आतंकवाद्यांवर खटला चालवण्यास अडचण येत असेल, तर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवावा. पाकने देशातील ६०० देवबंद शाळांवर कारवाई करून त्या बंद केल्या पाहिजेत. या शाळांना आखाती देशांतून पैसा मिळत आहे. या शाळांतूनच जिहादी आतंकवादी निर्माण होत आहेत. पाकला आता यांच्यावर कारवाई न करण्यासाठी कोणतीही सूट दिली जाणार नाही, हे त्याने लक्षात घ्यावे.

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवेल, असा संशोधकांचा निष्कर्ष

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून लोकांना वाचवण्यासाठी गाय वाचली पाहिजे ! 
देशातील सहस्रो पशूवधगृहांच्या संकटातून तिला वाचवण्यासाठी केंद्रशासनाने 
प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
      ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवू शकते, असे करनाल (पंजाब) येथील राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानने आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनांतून आणि मागील ५ वर्षांपासून एन्आयसीआर्ए (नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रेसीलिएंट अ‍ॅग्रीकल्चर)च्या प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनाचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे. 
१. या संशोधनातून विदेशी आणि संकरित जातीच्या दूध देणार्‍या प्राण्यांपेक्षा देशी गायींमध्ये अधिक तापमान सहन करण्याची क्षमता आहे आणि जल-वायू परिवर्तनाचा त्यांच्यावर अल्प प्रभाव पडतो, या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे. 

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुले करावे !

श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीची मागणी 
निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     कोल्हापूर, ८ जून (वार्ता.) - ६ जून या दिवशी शिवसेनेच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ते पाडण्यात आले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भक्तांच्या धार्मिक भावना न दुखावता आता या कुंडावरील उर्वरित बांधकाम पाडून मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी श्री महालक्ष्मी भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आली. 

नवी मुंबई येथील डेली न्यूज बॅण्ड या दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांची रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

    
आश्रमातील विविध सेवांची माहिती जाणून
घेतांना श्री दिनेश कामत आणि त्यांचा परिवार
रामनाथी (गोवा) - नवी मुंबईतून प्रकाशित होणारे डेली न्यूज बॅण्ड या इंग्रजी दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांनी नुकतीच गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र-धर्मविषयक सेवांची माहिती जाणून घेतली.
     आश्रम पाहिल्यानंतर अभिप्राय देतांना श्री. कामत म्हणाले, आश्रमातील साधकांच्या सहवासात राहिल्यामुळे मला आध्यात्मिकदृष्ट्या धन्य वाटले. आश्रमातील प्रत्येक साधकातील प्रेमाचा आणि आदराचा भाव पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा अविस्मरणीय अनुभव आहे.
     श्री. कामत यांचा मुलगा श्री. जयेश कामत याने सांगितले, आश्रमात आल्यानंतर इतर कुठेही न मिळणारे समाधान मिळाले आणि शांतता अनुभवता आली. आमचा आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला.

ख्रिस्ती धर्मातही दलितांच्या पदरी भेदभावच !

पुरोगामी ख्रिस्त्यांचा खरा चेहरा उघड !
      चेन्नई - हिंदु धर्मात होणार्‍या भेदभावाला कंटाळून ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्‍या तमिळनाडूतील सहस्रो दलितांच्या पदरी शेवटी कॅथलिक आणि प्रोटेस्टन्ट या दोन्ही चर्चमध्ये भेदभावाचीच वागणूक पदरी पडत आहे, असे थादम थेडी या संस्थेने कॅथलिक चर्चमधील दलित ख्रिस्ती या विषयावरील केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले निष्कर्ष प्रकाशित केले आहेत. तमिळनाडूतील एकूण ३९ लक्ष ६४ सहस्र ३६० दलितांपैकी २२ लक्ष ४० सहस्र ७२६ दलितांनी ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले आहे. त्यांना चर्चच्या व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान देण्यात आले नाही. तमिळनाडूतील एकूण १८ आर्चबिशपपैकी केवळ २ आर्चबिशप दलित आहेत. अनेक चर्चमध्ये दलितांसाठी वेगळी कब्रस्थाने आणि शववाहिन्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना चर्चमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुख्य मार्गांचा अवलंब करता येत नाही. चर्चच्या अनेक विधीमध्ये दलितांना प्रवेश देण्यात येत नाही.

केरळ राज्यात हिंदू होत आहेत अल्पसंख्य, तर मुसलमान बहुसंख्य !

     २० व्या शतकात भारतातील ज्या राज्यांत हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने रोडावली. अशा उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, आसाम, बंगाल, राजस्थानमधील मेवात आणि केरळ राज्य आघाडीवर आहे. यातील केरळचा आढावा पुढे देत आहोत.
१. वर्ष १९०१ पासून केरळ राज्यातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांची लोकसंख्या भारताच्या इतर भागांच्या तुलनेत अनेक पतीने वाढली आहे.
२. १९०१ मध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या १३.८ टक्के होती ती वर्ष १९६१ मध्ये वाढून २१.२ टक्के झाली होती. नंतर मात्र ती न्यून होऊन सध्या १८.४ टक्के आहे.
३. १९०१ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या १७.३ टक्के होती ती ख्रिस्ताब्द २०११ मध्ये वाढून २६.६ टक्के झाली आहे. यापैकी बहुतेक वाढ १९६१ नंतर झालेली आहे.

कागदावरच्या उपाययोजना नको ! - मुख्यमंत्री

द्रुतगती महामार्गावरील अपघातांवरून मुख्यमंत्री अधिकार्‍यांवर संतप्त ! 
 रस्ते अपघातात वारंवार विक्रम करणारे देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र ! 
     मुंबई, ८ जून (वार्ता.) - यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांवरून संतप्त झालेल्या मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांची खरडपट्टी काढली. या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. अनेक उपाययोजना केल्याचे तुम्ही सातत्याने सांगता; मात्र तुमच्या उपाययोजना केवळ कागदावरच असून लोकांचे जीव वाचवू न शकणार्‍या असल्या कागदोपत्री उपाययोजना काय कामाच्या ? तुमचे हात कोणी बांधले आहेत ? वाहन चालवण्यासाठी कायदे आहेत याचा धाक लोकांमध्ये कधी निर्माण होणार, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले. (अपघाताच्या घटनेस कारणीभूत असणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून संपूर्ण हानीभरपाई आणि शिक्षा देण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर अधिकारी योग्य वळणावर येतील. अनेक वर्षे काम करत असलेले संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना अजूनही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते, हे लज्जास्पद आहे. - संपादक) 

अधिकार्‍यांच्या मताबाहेर जाऊन मंत्र्यांनी नियमबाह्य कामे करू नयेत ! - मुख्यमंत्री

असे सांगावे न लागणेच अपेक्षित आहे ! 
एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाईवरून धडा घेण्याची सूचना 
     मुंबई, ८ जून (वार्ता.) - पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे त्यागपत्र घेऊन करण्यात आलेल्या कठोर कारवाईतून बोध घ्या, अशी चेतावणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ७ जून या दिवशी रात्री भाजपच्या मंत्र्यांना दिली. भाजपच्या मंत्र्यांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून धारिकेवर अधिकारी आणि सचिव यांना डावलून कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी ताकीदच देण्यात आली आहे. खडसे यांच्या त्यागपत्राच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजप मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावली होती. त्या वेळी ते बोलत होते. 

कल्याण आधारवाडी कारागृहातील बंदीवानाकडील भ्रमणभाष आणि सीमकार्ड शासनाधीन

कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा !
     कल्याण - येथील आधारवाडी कारागृहातील बंदीवान देवेंद्र जगताप उपाख्य जेडी याच्याकडील एक भ्रमणभाष आणि २ सीमकार्ड शासनाधीन करण्यात आली आहेत. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. याआधीही त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या खोलीच्या शौचालयाच्या भिंतीवर काठीने ठोकल्यावर एक लादी खाली पडली. त्याखाली असलेल्या २ मीटर खड्डयात त्याने वरील साहित्य लपवले होते. (बंदीवानाला खड्डा खोदण्यासाठी साहाय्य करणार्‍या संबंधितांचीही याप्रकरणी चौकशी व्हायला हवी ! - संपादक)

पाकिस्तान ड्रोनच्या साहाय्याने भारतावर अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत ! - हाफिज सईद याची धमकी

जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात ठोस कृती करत नसल्याने असे 
आतंकवादी भारताच्या विरोधात असे फुत्कार सोडतात ! 
पाक वार्ता
     इस्लामाबाद - पाक ड्रोनच्या साहाय्याने भारतावर अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे, असे वक्तव्य मुंबई आक्रमणाचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदने येथील एका सभेमध्ये केले आहे. पाकिस्तानला १९७१ च्या दशकातील देश समजू नये. पाक अणूऊर्जेत सक्षम असल्याने प्रत्येक आक्रमण परतवू शकतो, अशी धमकीही त्याने दिली आहे. अमेरिका आणि भारत हे पाकिस्तावर ड्रोन आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहेत. असे झाल्यास पाकिस्तान त्याचे सडेतोड उत्तर देईल, असे सांगत हाफिजने अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांना ही धमकी दिली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या ५ मासांत ४७२ लाचखोरांना पकडले

राज्यातील वाढती लाचखोरी ! लाचखोरांना कठोर 
शासन करणे आणि 'स्वच्छ प्रशासन' यांसाठी 'हिंदु राष्ट्र'च आवश्यक ! 
     सोलापूर, ८ जून - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात जानेवारी ते मे २०१६ या ५ मासांच्या कालावधीत ४७२ लाचखोरांना पकडले आहे. यामध्ये महसूल विभागाचे १४५, तर पोलीस खात्यातील १३८ जणांना लाच घेतांना पकडण्यात आले आहे. त्या लाचखोरांकडून सुमारे १० कोटी ९० लक्ष ६ सहस्र २५३ रुपये एवढी मालमत्ता शासनाधीन करण्यात आली आहे. विभागाने केलेल्या कारवाईत पुणे विभागामध्ये सर्वाधिक ८३ जणांना, तर मुंबई विभागात सर्वात अल्प, म्हणजे ३७ जणांना लाच घेतांना पकडले आहे. 

पिंपरी पालिकेतील शहर सुधारणा समिती आणि अधिकारी यांचा म्हैसूर-बेंगळुरू दौरा

फलनिष्पत्तीशून्य दौर्‍यांचे आयोजन 
करणार्‍या अशा पक्षांना येत्या निवडणुकीत घरी बसवा ! 
     पिंपरी (जिल्हा पुणे), ८ जून - पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी स्पेन, जर्मनी, सिक्कीम, केरळ या ठिकाणचे दौरे केले आणि त्याची फलनिष्पत्ती शून्य असल्यावरून बरीच टीका झाली. असे असतांनाही आता पालिकेतील शहर सुधारणा समिती आणि अधिकारी यांचा म्हैसूर आणि बेंगळुरू येथे ८ दिवसांचा दौरा आयोजित केला आहे. स्थायी समितीने ७ जून या दिवशी झालेल्या बैठकीत उपरोक्त दौर्‍यासाठी ७ लक्ष रुपयांच्या व्ययास संमती दिली आहे. त्यामुळे नागरिक आणि पालिकेतील विरोधक यांच्या विरोधाला जुमानत नसल्याचे सत्ताधार्‍यांनी दाखवून दिले. 

भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात तीन बालके घायाळ !

बालकांच्या जिवाशी खेळणारे निष्क्रीय आणि दायित्वशून्य महापालिका प्रशासन ! 
     सांगली, ८ जून (वार्ता.) - आठ कुत्र्यांनी संजयनगर परिसरात तीन बालकांवर आक्रमण करत त्यांना घायाळ केले. घायाळ बालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या बालकांच्या हातापायांना चावा घेतल्याने ही बालके गंभीर घायाळ झाली आहेत. गत महिन्यात विश्रामबाग परिसरातील सरस्वतीनगर भागात सहा वर्षीय बालिका सुंदरी भारती हिच्यावर कुत्र्यांनी आक्रमण करून तिला ठार मारल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडल्याने नागरिकांत महापालिका प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संताप दिसून आला. संपूर्ण महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भटकी कुत्री विशेषत: लहान मुलांना लक्ष्य करत आहेत. महापालिका प्रशासन काहीच करत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी आता लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (भटक्या कुत्र्याने एका बालिकेचा जीव घेतल्यानंतर कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तात्काळ ठोस पावले उचलली असती, तर परत अशी घटना घडली नसती. वारंवार घडणार्‍या घटनांविषयी योग्य त्या उपाययोजना न करणार्‍या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात उद्या नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ? - संपादक)

पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन लक्ष रुपयांचा दंड !

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा आदेश 
     पुणे, ८ जून - शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत असणार्‍या मुळा-मुठा नदीपात्रात सांडपाणी आणि दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. (श्री गणेशमूर्तीचे विसर्जन आणि स्मशानातील राख नदीत टाकल्याप्रकरणी धर्मद्रोही आरोळी ठोकणारे तथाकथित पर्यावरणवादी आता कोठे आहेत ? प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडण्याविषयी ते आता पालिकेवर दबाव आणतील का ? - संपादक) असे असले तरीही त्याविषयी प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपिठाने पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांना प्रत्येकी २ लक्ष रुपयांचा दंड आकारला आहे. (यावरून पालिका आणि प्रदूषण मंडळ यांना नदीच्या प्रदूषणाविषयी किती कळवळा आहे, हेच स्पष्ट होते. - संपादक) शहरातील मैलापाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याची तक्रार करणारी याचिका पर्यावरणप्रेमी सुभाष पाटील यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रविष्ट केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायाधिकरणाने हे आदेश दिले आहेत. या याचिकेत पालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसह इतर विभागांना प्रतिवादी केले आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंना असहिष्णू संबोधणारे अशा घटनांना सहिष्णुतेतून झालेले आक्रमण समजतात का ?
     उत्तरप्रदेशच्या चरथावल येथील दधेडू कलां गावात रमझानच्या पहिल्या दिवशी धर्मांधांकडून रविदास मंदिरावर आक्रमण करण्यात आले. मंदिरातील ध्वनीक्षेपक तोडण्यात आले. तसेच मंदिरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Uttar Pradeshke Dudhedu Kala gavme Dharmandhone Ravidas Mandirpar pathrav kar mandir ka speaker tod diya.
     Kya ab secularwadi ise Sahishnuta kahenge ?
जागो !
: उत्तरप्रदेश के दधेडू कलां गांव में धर्मांधों ने रविदास मंदिर पर पथराव कर मंदिर का स्पीकर तोड दिया.
      क्या अब सेक्युलरवादी इसे सहिष्णुता कहेंगे ?
     पाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळवणे, हाच आहे. युद्ध करून त्यांना ते साध्य न झाल्याने हसके लिया पाकिस्तान, घुसके लेंगे हिंदुस्तान असे म्हणत हा जिहादी प्रकार त्यांनी चालवला आहे. - श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना.

(म्हणे) मला पकडण्यासाठी तत्कालीन भाजप शासनाने तालिबानला पैसे देण्याचे ठरवले होते ! - मौलाना अझहर मसूद

     इस्लामाबाद - पठाणकोट आक्रमणाचा सूत्रधार आणि जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरने कंदहार येथील विमान अपहरण प्रकरणी माहिती उघड करतांना दावा केला आहे की, त्याला दुसर्‍यांदा पकडण्यासाठी भारताने तालिबान सरकारला पैशाचे आमीष दाखवले होते. यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि भाजपचे नेते जसवंत सिंह यांनी तालिबानचे प्रमुख मुल्ला अख्तर मंसूर यांची भेट घेतली होती. जैशचे मुखपत्र असणार्‍या साप्ताहिक अल-कलाममधून अझहरने हा दावा केला आहे. 
     १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आयसी-८१४ विमान आंतकवाद्यांनी अपहरण करून कंदहार येथे नेले होते. विमानातील प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारने मसूद अझहरसह ५ आतंकवाद्यांची सुटका केली होती.
भारतीय अधिकार्‍यांनी दावा फेटाळला 
     रॉचे माजी प्रमुख ए.एस्. दौलत यांनी अझहरचा दावा फेटळला आहे. भारत शासनाने तालिबानला कोणतेही आमीष दाखवले नसल्याचे दौलत यांनी म्हटले आहे.हुबळी (कर्नाटक) येथील गुरुस्वामीजी यांच्या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

कार्यक्रमात उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन
करतांना श्री. प्रमोद मुतालिक (वर्तुळात)
     हुबळी (कर्नाटक) - येथे शबरीमाला अय्यप्पा सेवा समाज यांच्या वतीने ५ जून २०१६ या दिवशी श्री शिवराम गुरुस्वामीजी यांनी चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांंनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर आणि श्रीराम सेनेचे श्री. प्रमोद मुतालिक हे उपस्थित होते. 
    चर्चासत्रामध्ये बोलतांना सौ. हळदीपूर म्हणाल्या, मंदिरांमधील पावित्र्य टिकवल्यासच धार्मिक परंपरांचे रक्षण होऊ शकते; मात्र मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तृप्ती देसाई, विद्या बाळ आणि वनिता गुट्टे यांच्यासारख्या महिला हिंदु धर्म आणि परंपरा यांचा अनादर करत त्या नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मामध्ये स्त्रीला देवीचे रूप समजून तिचा आदर केला जातो. त्यामुळे हिंदु धर्मामध्ये असमानता असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. काही ठराविक मंदिरे सोडल्यास अन्य मंदिरांमध्ये स्त्रियांना गाभार्‍यात प्रवेश आहे. शबरीमला मंदिर हे जागृत मंदिर असल्याने १० ते ५० वर्षांपर्यंतच्या स्त्रियांना धर्म परंपरेनुसार तेथे प्रवेश करण्यास बंदी आहे. यामुळे तृप्ती देसाई यांच्या शबरीमाला अयप्पा मंदिरात प्रवेश करण्याला हिंदु जनजागृती समिती तीव्र विरोध केला आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांवर कारवाई करणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीची हत्या !

     ढाका - बांगलादेशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मांधांकडून दोघांची हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात एका पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीचा समावेश आहे. या हत्यांचे दायित्व इसिसकडून घेण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून धर्मनिरेपक्षतावादी ब्लॉग लिहिणार्‍या लेखकांच्या हत्या होत आहे. त्यांच्या आणि हिंदूंच्या हत्या याच साधर्म्य आहे का, हे पाहिले जात आहे. 
१. बांगलादेशच्या उत्तर-पश्‍चिमी भागात एका ख्रिस्ती दुकानदाराची हत्या करण्यात आली. 
२. या हत्येच्या काही घंट्यांपूर्वी चटगाव येथे बालू अख्तर या पोलीस अधिकार्‍याची पत्नी महमुदा बेगम यांची हत्या करण्यात आली. 
३. त्या त्यांच्या मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवण्यास जात असतांना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली, तसेच चाकूने वार करण्यात आले. 
४. बालू अख्तर यांनी धर्मांधांच्या विरोधात कारवाई केल्याने त्यांच्या पत्नीला ठार करण्यात आले.

तमिळनाडू पोलिसांनी कावेरी नदीच्या पात्रातून देवतांच्या मूर्ती कह्यात घेतल्या !

     त्रिची - थिरुवेरम्बुर पोलिसांनी कावेरी नदीच्या पात्रातून देवतांच्या अनेक मूर्ती कह्यात घेतल्या. या मूर्ती देवळांतून परदेशात विक्री करण्यासाठी चोरल्या असाव्यात, असा पोलिसांचा तर्क आहे. पोलिसांनी मूर्ती तस्करांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेला घाबरून तस्करांनी या मूर्ती नदीच्या पात्रात टाकून दिल्या असाव्यात.
     स्थानिक कोळी कावेरी नदीत मच्छीमारी करत असतांना त्यांना या मूर्ती आढळून आल्या आणि त्यांनी तसे पोलिसांना कळवले. पोलिसांना ७ मूर्ती हस्तगत करण्यात यश मिळवले. त्यातील सर्वांत मोठी मूर्ती अडीच फूट उंच असून ती अम्मान देवीची आहे. या व्यतिरिक्त मनमदन, नंदी यांच्या आणि स्वामीच्या अंगाशी खेटून बसलेली अमाबळ देवतेची मूर्ती इत्यादींचा यात समावेश आहे. या मूर्ती आजूबाजूच्या देवळातून चोरल्या आहेत. या मूर्तींना अभिषेक म्हणून घालण्यात आलेल्या तेलाचा थर मूर्तीवर आढळून आला. पोलिसांनी मूर्तींची निर्माण तारीख पडताळण्यासाठी पुरातन विभागाचे साहाय्य मागितले आहे.

विद्येचे माहेरघर म्हणवणार्‍या पुणे शहराच्या महापालिकेचे संकेतस्थळ मराठीमध्ये उपलब्ध नाही !

पुणे महापालिकेकडून मराठीची उपेक्षा ! 
     पुणे, ८ जून (वार्ता.) - पुणे शहराची 'विद्येचे माहेरघर', 'पूर्वेकडील ऑक्सफर्ड', 'माहिती तंत्रज्ञानाचे जाळे असणारे', 'प्रमाणभाषा बोलणार्‍या मराठीजनांचे शहर' म्हणून ओळख ! पण केवळ शाब्दिकदृष्ट्या मराठीचे गुणगान करणारे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून कृतीच्या स्तरावर मात्र वेगवेगळ्या विभागांत मराठीची उपेक्षा होत असलेली आढळून येते. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही याचा अनुभव येतो. महानगरपालिकेचे संकेतस्थळ केवळ इंग्रजी भाषेमध्ये असून काही ठिकाणी केवळ मराठी पर्याय देण्यात आले असले, तरी अंतर्गत पर्यायांवर मात्र इंग्रजी भाषेतीलच माहिती उपलब्ध असल्याचे आढळून येते. मराठी संकेतस्थळ बनवण्याचे काम पूर्ण होऊनही लालफितीच्या कारभारात ते अडकल्याने नागरिकांसाठी ते उपलब्ध होऊ शकले नाही, अशी खेदजनक माहितीही या प्रकरणी मिळाली. 

नगर येथील पुणे बसस्थानक तीन रात्रींपासून अंधारात

महावितरण विभागाचा कूर्मगती कारभार ! 
     नगर, ८ जून - येथील स्वस्तिक चौकातील राज्य परिवहन मंडळाच्या पुणे बसस्थानक क्रमांक ३ वर ५ जून या दिवशी झालेल्या वादळी पावसात वीजवाहक 'सर्व्हिस केबल' तुटली. त्यामुळे बसस्थानक ३ रात्री अंधारात होते. या काळात चोर्‍या होण्याची भीती वाढली होती, तसेच येथील वाहतूक नियंत्रक आणि वाहक यांना मेणबत्तीच्या उजेडात काम करावे लागले. 

सोलापूर येथे जुगाराच्या अड्ड्यावर धाड घालून ३० लक्ष रुपये कह्यात

     सोलापूर, ८ जून - गुळवंची गावात चालणार्‍या जुगाराच्या अड्ड्यावर पहाटेच्या वेळी धाड घालून सोलापूर पोलिसांनी ३० लक्ष रुपये कह्यात घेतले, तसेच २८ जणांना अटक केली. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (व्यसनाधिनता रोखण्यासाठी धडक कारवाई करण्याच्या जोडीला समाजाला सुसंस्कारांचे धडेही द्यायला हवेत, तरच अयोग्य गोष्टींचे समूळ उच्चाटन होऊ शकेल. - संपादक)
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
 काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन विशेषांक 

प्रसिद्धी दिनांक : १२ जून २०१६ 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
११ जून या दिवशी दुपारी ३.३० पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

आसामसह देशभरातील हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदुत्वरक्षणाची आवश्यकता !

रामनाथी, गोवा येथे १९ जून ते २५ जून या कालावधीत होणार्‍या 
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...
श्री. शिब शंकर कुंडू, केंद्रीय संघटन सचिव,
हिंदु युवा मंच, आसाम
       रामनाथी, गोवा येथे १९ जून ते २५ जून २०१६ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात आसाम येथील हिंदु युवा मंचचे केंद्रीय संघटन सचिव श्री. शिब शंकर कुंडू यांनी आसाम येथील हिंदु युवा मंचचे हिंदुत्वरक्षणाचे कार्य या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
    मी त्याच आसामचा आहे, जेथे एका हातात बायबल आणि दुसर्‍या हातात रायफल घेऊन ख्रिस्त्यांनी मागास अन् आदिवासी बंधूंना ख्रिस्ती पंथात धर्मांतरित केले. त्याच आसाममधील काही जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मुसलमान रहातात.

अयोध्या येथे रामजन्मभूमीस्थळी श्रीरामाचे दर्शन घेतांना आलेले अनुभव

       संपूर्ण विश्‍वाला आदर्श असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या अयोध्या येथील जन्मभूमीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही मंदिर बांधता न येणे, ही प्रभु श्रीरामाची नव्हे, तर समस्त हिंदूंची शोकांतिका आहे. १५ एप्रिल २०१६ या दिवशी मुंबई येथील श्री. दीप्तेेश पाटील आणि त्यांचे मित्र यांनी अयोध्या येथे रामजन्मूभीच्या येथे जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. या वेळी श्रीरामाविषयीच्या भक्तीभावामुळे त्यांनी अनुभवलेली पवित्रता आणि दुसर्‍या बाजूला राज्यकर्त्यांच्या कमालीच्या उदासीनतेमुळे अयोध्येसारख्या आध्यात्मिक क्षेत्राची असलेली दुःस्थितीही श्री. पाटील यांनी मांडली आहे.

वाचकांच्या विशेष मागणीवरून बालवाचकांसाठीचे नियमित सदर !

बालकांसाठी परिपाठ !
     उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुट्टीतील परिपाठ ! हे सदर प्रसिद्ध करण्यात आले. यातून विविध बोधकथा, लेख आदी माध्यमांतून सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी माहिती दिली गेली. आता सुट्टीचा कालावधी संपत आला असला, तरी वाचकांच्या विशेष मागणीवरून हे सदर नियमित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सदर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण होण्यास साहाय्यभूत ठरो, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना !

कारागृहात असे होऊ देणारे देशातील असे प्रकार कधी रोखू शकतील का ? उत्तरदायींना फाशी द्या !

      बिहारच्या आरा आणि समस्तीपूर या कारागृहांत प्रशासनाने घातलेल्या धाडीतून भ्रमणभाष, सीमकार्ड, भ्रमणभाष प्रभारक (मोबाईल चार्जर) यांसह अनेक आक्षेपार्ह वस्तू शासनाधीन केल्या. काही दिवसांपूर्वी राज्यातील सीवान येथील कारागृहातही अशा प्रकारे धाड टाकून आक्षेपार्ह वस्तू शासनाधीन करण्यात आल्या होत्या.

मेनका गांधी यांचा हास्यास्पद उपाय !

     गोहत्या थांबवण्यासाठी सर्वांनी इंटरनेटच्या माध्यमातून विरोध दर्शवायला हवा, असे आवाहन भाजपच्या केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी नागरिकांना केलेे.

सर्वान् नमामी ।

     चंद्रभागा नदी अविरत निर्मळ वहात रहावी, यासाठी नमामी चंद्रभागा अभियान चालवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाऊन केली. केंद्रशासनाच्या नमामी गंगे या प्रकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर नमामी प्राधिकरण स्थापन करण्यात येत असल्याचे सांगत कलशपूजन करून त्यांनी या अभियानाचा शुभारंभ केला. हा उपक्रम जरी स्तुत्य असला, तरी तो लालफितीत अडकला नाही, म्हणजे मिळवले ! कारण आतापर्यंत नद्यांच्या शुद्धीकरणासाठी सर्वपक्षीय राज्यकर्त्यांकडून घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला असला, तरी नद्यांच्या वाटेला केवळ गाळच आला आहे.

कुठे काही सहस्र लोक ठार झाल्यावर मुसलमान अतिरेकी संघटनांचा तीव्र निषेध करणारी अमेरिका आणि कुठे अतिरेक्यांच्या आक्रमणात लक्षावधी भारतीय ठार झाल्यावरही शांत असणारे संवेदनाशून्य भारतीय सरकार !

     अमेरिकेच्या जागतिक व्यापार संघटनेच्या ११० मजली इमारतीवर मुसलमान अतिरेकी संघटनांनी विमानांची टक्कर मारून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यांत २० सहस्र लोक ठार झाले. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटॅगॉन या प्रचंड कार्यालयावरही हल्ला केला.
     अमेरिकेचे २० सहस्र लोक ठार झाले, याचा अमेरिका तीव्र निषेध व्यक्त करत आहे. याच अतिरेक्यांनी भारतांतील सुमारे एक लक्ष लोकांची हत्या केली. तेव्हा त्याचा भारत सरकारला संताप येत नाही. या दोन राष्ट्रांच्या प्रवृत्तींतील हा भेद आहे. (सुराज्य पथ, १५.९.२००१)

पोलिसांची कार्यक्षमता ! पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणार्‍या तृप्ती देसाई यांना ३ घंट्यांनी (तासांनी) अटक ! असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?

     महालक्ष्मी मंदिर गाभारा प्रवेशाच्या वेळी मारहाण करणार्‍यांना अटक करा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही तृप्ती देसाई यांनी जमावबंदीचा आदेश धुडकावून कार्यकर्त्यांसह जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन केले. देसाई यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या निलंबनाचीही मागणी केली. ३ घंटे (तास) चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्या सर्वांना अटक केली.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) हिंदूंनो, या संदर्भात हिंदुत्ववादी संघटना एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! त्यांच्यावर अवलंबून न रहाता स्वत:च कृतीशील व्हा !

१. हॉलीवूडमधील फॉक्स मुव्हीज्ने निर्मित केलेल्या एक्स-मेन : अपोकॅलीप्स या चित्रपटात श्रीकृष्ण या हिंदूंच्या उपास्य देवतेला एका अमानवी स्वरूपात दाखवून त्याचे विडंबन करण्यात आले होते. या प्रकरणी अमेरिकेतील अनेक हिंदूंनी तेथील फोरम फॉर हिंदू अवेकनिंग या हिंदुत्ववादी संघटनेशी आणि येथील हिंदु नेते राजन झेद यांच्याशी संपर्क साधला अन् हे विडंबन थांबवण्यासाठी मोहीम राबवण्याची मागणी केली. त्यानंतर या संघटनेने या चित्रपट निर्मात्याशी पत्राद्वारे संपर्क साधला. त्याला प्रतिसाद म्हणून ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आणि चित्रपटाचे निर्देशक ब्रायन सिंगर यांनी २७ मे या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून श्रीकृष्णाचे विडंबन असलेली दृश्ये वगळण्याचा निर्णय घेतला.
२. विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला आहे. ट्विटर वरून बायकॉट अ‍ॅमेझॉन नावाचा ट्रेंड चालू करून त्याद्वारे अ‍ॅमेझॉनवर टीकेची झोड उठाण्यात येत आहे. एका घंट्यात १२ सहस्र लोकांनी वरील संकेतस्थळाच्या विरोधात ट्विट केले.
      पाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळवणे, हाच आहे. युद्ध करून त्यांना ते साध्य न झाल्याने हसके लिया पाकिस्तान, घुसके लेंगे हिंदुस्तान असे म्हणत हा जिहादी प्रकार त्यांनी चालवला आहे. - श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना.

संस्कृत बोलायला शिकवणारे संस्कृत संभाषण वर्ग

    
संस्कृत ही देववाणी ! ही देववाणी क्लिष्ट आहे, केवळ ब्राह्मणांची आहे इथपासून ते ही भाषा मृत आहे असे अनेक मिथ्यारोप संस्कृत संदर्भात केले गेले. आज विदेशात संस्कृत भाषा अभ्यासली जाते; पण भारतात संस्कृत शिकण्यासाठीची कृतीशील तळमळ म्हणावी तितकी दिसून येत नाही. संस्कृतविषयी अनास्था पहायला मिळत असली, तरी ही अनास्था उत्साहामध्ये परिवर्तित होतांना आढळून येत आहे. निमित्त आहे संस्कृत भारती संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या संस्कृत संभाषण वर्गांचे ! संस्कृत पाठ करायला नव्हे, तर संस्कृत बोलायला शिकवणार्‍या संस्कृत संभाषण वर्गांविषयी...
देववाणी जनवाणी व्हावी म्हणून ....
     संस्कृत भारती संस्थेच्या वतीने संस्कृतचा प्रसार, प्रचार आणि संवर्धन व्हावे, यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. संस्कृत संभाषण वर्ग हा या उपक्रमांमधील महत्त्वाचा उपक्रम. १० दिवस २ घंटे चालणार्‍या या निःशुल्क वर्गांमध्ये संस्कृत बोलायला शिकवले जाते. दैनंदिन व्यवहारात लागणार्‍या वस्तूंची संस्कृत नावे, वाक्ये यांची या वर्गांमधून माहिती करून दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे वर्ग चालू झाल्यापासून संपेपर्यंत शिक्षिका विद्यार्थ्यांशी केवळ संस्कृतमधूनच संवाद साधतात. या वर्गासाठी ना वयाची अट ना शिक्षणाची ! पहिलीतील विद्यार्थ्यापासून निवृत्त ज्येष्ठ नागरिकही या वर्गांमध्ये सहभागी होऊन संस्कृत शिकू शकतात. देववाणी संस्कृत जनवाणी व्हावी, या उद्देशाने संस्कृतभारतीचे कार्यकर्ते सेवाभावाने हे वर्ग घेतात.

मम हृदयी कोण हे भासे !

 पू. संदीप आळशी
परमपूज्य सांगती भजा श्रीकृष्णाला ।
परि साधक अंतरी आठवती परमपूज्यांना ॥

श्रीकृष्णाच्या लीला साधका मोहविती ।
परि साधक मुखी परमपूज्यांची महती गाती ॥

दुःखात साधक श्रीकृष्णाचा धावा करिती ।
परि अंती परमपूज्य हे नाव मुखी येती ॥

युगानुयुगे श्रीकृष्णाचे नाव अमर राही ।
साधकांच्या हृदयी परमपूज्य हे नाव कोरलेले राही ॥
     प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे, आपल्या कृपेमुळेच आमची साधना चालू आहे. केवळ याच जन्मात नव्हे, तर जन्मोजन्मी आम्हाला आपल्या चरणांशी स्थान देऊन आमचा उद्धार करा.
- (पू.) श्री. संदीप आळशी (१५.४.२०१६)

रामनाथी नावाच्या जहाजातून भवसागर पार करवून घेणारे प.पू. डॉक्टर !

सौ. नीलिमा सप्तर्षि
      मला सतत आज आपण रामनाथी नावाच्या बोटीत बसलो आहोत, असा भास होत आहे. सागरी लाटांनी बोट जशी हेलकावे घेतेे, तसेच आपणही दोष आणि अहं यांच्या धक्क्यांनी हेलकावे खात आहोत. एकदा बोटीत बसलो की, ठिकाण येईपर्यंत आपल्याला लाटांच्या धक्क्यांनी डोलतच रहावे लागते, त्याप्रमाणे रामनाथी बोटीत बसल्यावर भवसागर पार करण्यास आपले दोष आणि अहं अडथळा आणतात, स्वस्थ बसू देत नाहीत, तसेच मन निर्विचार होऊच देत नाहीत. सागरी लाटांप्रमाणे ते वर-खाली डोलत असते. तोल जातो कि काय ?, असे वाटते. या दोषांच्या लाटा शांत झाल्यावर समजावे की, आता आपले ठिकाण जवळ आले आहे. लगेच कप्तानाच्या (प.पू. डॉक्टरांच्या) माध्यमातून उतरण्याचे ठिकाण जवळ आल्याची सूचना मिळते. मन शांत, निर्विचार आणि आनंदी होते. कप्तानाला (प.पू. डॉक्टरांना) मनोमन कृतज्ञता व्यक्त होते; कारण त्यांनीच या विशाल भवसागरातून जहाज अलगद पैलतिरी आणलेले असते. अशा या रामनाथी जहाजात मी बसले आहे, याची आज सारखी जाणीव होत आहे. 
     जहाजात बसणार्‍यांना सूचना : मध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका; कारण भोवताली मायासागर आहे. 
- सौ. नीलिमा सप्तर्षि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०१६)

प.पू. डॉक्टरांचे मन हे देवाचेच मन असल्याचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगणे

     गेल्या काही दिवसांपूर्वी योगतज्ञ दादाजींनी प.पू. डॉक्टरांची तातडीने भेट घेतली. त्यासाठी योगतज्ञ दादाजी मुंबईहून विमानाने मडगाव, गोवा येथे आले आणि भेटीनंतर पुन्हा निघून गेले. तेव्हा प.पू. डॉक्टर योगतज्ञ दादाजींना म्हणाले, दादाजी, तुमच्यानंतर मी कुणाला विचारायचे ? आम्हाला कोण मार्गदर्शन करणार ? यावर प.पू. दादाजी दोन मिनिटे डोळे मिटून थांबले आणि नंतर ते प.पू. डॉक्टरांना म्हणाले, तुमच्या मनालाच विचारा, तुमचे मन म्हणजे देवाचेच मन आहे. - पू. (सौ.) अंजली गाडगीळ (१.४.२०१५)

सनातन संस्थेच्या कार्याला ईश्‍वर काहीच अल्प पडू देणार नाही, या प.पू. डॉक्टरांच्या वाक्याची साधक घेत असलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...
पू. पृथ्वीराज हजारे
     वर्ष १९९३ मध्ये ईश्‍वरी कृपेनेच मी संस्थेच्या संपर्कात आलो. गेली २३ वर्षे संस्थेचे कार्य जवळून बघण्याची आणि कार्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला लाभली. या २३ वर्षांत संस्थेचे कार्य अनेक पटींनी वाढले. आश्रमांची निर्मिती झाली, आश्रमात पूर्णवेळ साधकांची संख्या वाढत गेली आणि मागील ४ वर्षे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हे सर्व करत असतांना कधी आर्थिक अडचण निर्माण झाली, असे कधीच झाले नाही, हा विचार मनात चालू असतांनाच एक प्रसंग आठवला.
     वर्ष १९९३ ची गुरुपौर्णिमा होती. स्थळ गोव्यातील श्री रामनाथ देवस्थान हे होते. तीन दिवसांचा कार्यक्रम होता. प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांची (प.पू. बाबांची) गुरुपौर्णिमा ! संस्थेने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. अंदाजपत्रक (बजेट) ठरले. नियोजन झाले आणि कार्यक्रम पार पडला. तिसर्‍या दिवशी परत जातांना प.पू. बाबा म्हणाले, अशी गुरुपौर्णिमा पूर्वी कधी झाली नाही आणि पुढे कधी होणार नाही. गुरुपौर्णिमा उत्कृष्ट झाल्याची पावती प.पू. बाबांनी दिली.

गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक

  
   गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्‍वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.

परब्रह्म परमात्मास्वरूप प्रगटले ।

परब्रह्म परमात्मास्वरूप प्रगटले ।
आत्मज्ञान देऊन त्यांनी आम्हा घडवले ।
चैतन्याची अनुभूती घ्यावया त्यांनी आम्हा शिकवले ।
गुरुदेवरूपी कृष्ण कलियुगी प्रगटले ॥ १ ॥

प्रेमाचे सागर असलेल्या प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांत प्रेमभाव निर्माण केल्यामुळे पृथ्वीवर निश्‍चितच रामराज्य येेणार, याची साधिकेने घेतलेली प्रचीती !

Add caption
१. मुल्की सेवाकेंद्रातील साधकांचा प्रेमभाव पाहून गहिवरून येेणे 
      इवलेसे रोप लावियेले दारी, त्याचा वेलु गेला गगनावरी, याची अनुभूती मला ३.४.२०१६ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या सौ. शालिनीताई मराठे यांनी लिहिलेल्या लेखात आली. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीची अनुभूती मी स्वतः घेतली आहे. श्रीकृष्णाच्या कृपेने मी मुल्की आणि मंगळुरू येथील सनातनच्या सेवाकेंद्रात गेले. जेव्हा मी मुल्की स्थानकावर पोचले, तेव्हा सुरेंद्रदादा मला सेवाकेंद्रात नेण्यासाठी आले होते. सेवाकेंद्रात पोचेपर्यंत काळोख झाला होता. सेवाकेंद्रात साधकांनी माझे पुष्कळ प्रेमाने स्वागत केले. ते पाहून मला गहिवरून आले. सगळे साधक माझी प्रेमाने विचारपूस करत होते. काकू, प्रवासात त्रास नाही ना झाला ?, असे साधक प्रेमाने विचारत होते. कुणीतरी मला प्यायला पाणी दिले, तसेच बसायला आसंदी दिली. एवढा प्रेमभाव माझ्या आयुष्यात मी प्रथमच अनुभवत होते. रात्री महाप्रसादाच्या वेळी साधिकांनी मला विचारले, काकू, तुम्हाला भात चालतो का ? तुम्हाला नाचणीची भाकरी आवडते का ? एका साधिकेने अंथरूण-पांघरूण दिले. प्यायला तांब्याभर पाणी देऊन अजून काही लागले, तर सांगा, असे तिने सांगितले. प्रत्येक साधक केवळ साहाय्यच करत होता.

श्री अन्नपूर्णादेवीच्या संदर्भात कु. योगिता पालन यांना आलेल्या अनुभूती

१. भोजनकक्षात श्री अन्नपूर्णादेवी साधिकेसाठी जेवणाचे ताट
 घेऊन आल्याचे जाणवणे आणि तिला पाहून भावजागृती होणे 
     वर्ष २०१४ मध्ये मी रामनाथी आश्रमात आले. आल्यावर सायंकाळी भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी मी श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करण्यासाठी हात जोडले. तेव्हा देवी जेवणाचे ताट घेऊन मला ते देण्यासाठी माझ्यासमोर उभी आहे, असे मला स्पष्टपणे जाणवले. तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि अंगावर अलंकार होते. तिचे डोळे माझ्याकडेच प्रेमाने बघत आहेत आणि खरोखरच ती माझ्यासाठीच आली आहे, असे मला आतून जाणवत होते. त्या वेळी मला पुष्कळ भरून आले आणि या आपत्काळात कोणतेही कष्ट न घेता मला तिच्याकडून हा प्रसाद मिळत आहे, याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती. 
      त्या वेळी हे अन्न देवाचा प्रसाद म्हणून माझ्याकडून ग्रहण केला जाऊन त्यातून मला शक्ती आणि चैतन्य मिळू दे आणि ती गुरुसेवेसाठीच वापरली जाऊ दे, अशी माझ्याकडून प्रार्थना झाली. तेव्हापासून काही दिवसांपर्यंत मला जेवणाच्या दोन्ही वेळा देवी ताट घेऊन माझ्यासमोर उभी आहे, असे जाणवायचे.

देव आणि मनुष्य यांचा कार्य करण्यातील भेद !

श्री. राम होनप
     देव मौनातून (न बोलता) सर्व कार्य करतो, याउलट मनुष्याचे बोलल्याविना काही काम होत नाही. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०१६)

शाहूवाडी येथील कु. अथर्व प्रसाद याला ९१.६० टक्के गुण !

     
कु. अथर्व प्रसाद
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) - येथील सनातनचे साधक श्री. प्रसाद कुलकर्णी आणि सौ. पूजा कुलकर्णी यांचा मुलगा कु. अथर्व प्रसाद याला इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.६० टक्के गुण मिळाले आहेत. तो १० वीचे शिक्षण घेत असतांना १ वर्ष दैनिक सनातन प्रभातचे अंक मलकापूर ते शाहूवाडी येथे नियमित पोेच करणे आणि प्रासंगिक वितरणाची सेवा करत असे.
     प.पू. डॉक्टर आठवले यांचे आशीर्वाद असल्याने ग्रामीण भागात असूनही हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. भविष्यात संशोधन क्षेत्रात सेवा करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.

रामनाथी आश्रमात साधनेसाठी रहायला आल्यावर आमूलाग्र पालट होऊन अनेक गुणांनी प्रगल्भ झालेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वैभवी झरकर (वय ११ वर्षे) !

कु. वैभवी झरकर
    ज्येष्ठ शुक्ल पक्ष पंचमी (९.६.२०१६) या दिवशी कु. वैभवी झरकर हिचा वाढदिवस आहे.  त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेले घरी असतांनाचे तिचे वागणे आणि आश्रमात साधनेसाठी आल्यानंतर तिच्यामध्ये झालेला आमूलाग्र पालट येथे देत आहोत. साधनेने जीवन कसे पालटते याचे कु. वैभवी एक आदर्श उदाहरण असल्याचे सर्वांनाच लक्षात येईल. 
कु. वैभवी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
    केवळ ११ वर्षे वयाच्या वैभवीची येथे दिलेली वैशिष्ट्ये वाचून वैभवी ही जगातील ८ वे आश्‍चर्य आहे, असे वाटले. रामनाथी आश्रमात केवळ २ वर्षे राहून तिच्यात एवढा पालट झाला, याचे कारण हे की, तिच्या आईने तिच्यावर बीजरूपाने केलेले संस्कार. यामुळे आणि निरीक्षणक्षमतेमुळे वैभवीबरोबर तिच्या आईचेही कौतुक वाटते. दोघी साधनेत अशीच प्रगती करोत, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. घरून रामनाथी आश्रमात साधनेसाठी येण्यापूर्वी कु. वैभवीमध्ये
असलेले दोष आणि त्यामुळे तिच्या आईचे मन अस्वस्थ होणे
१ अ. सकाळी लवकर उठायचा आणि आवरायचा आळस करणे : ती सकाळी कधीच वेळेवर उठत नसे. शाळा दुपारी १२.३० वाजता असल्याने ती नेहमी उशिरा उठत असे. कधी कधी तिला बळेच उठवून स्नानगृहात घेऊन जावे लागत असे. तिला दात घासण्यास सांगावे लागे. कुठल्याही कृती ती कधीच वेळेवर करत नसे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत.
 तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे
 त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

व्यक्तीच्या सद्गुणाकडे लक्ष द्या ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला सद्गुण असतोच. त्याच्याकडेच लक्ष द्यावे. दोष दृष्टीआड करावेत, म्हणजे जग सुंदर दिसते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

मानवाची प्रगती कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसलेले विज्ञान !
    
परात्पर गुरु डॉ. आठवले
पाश्‍चात्त्यांचे विज्ञान सांगते, आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे. प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता. त्रेता आणि द्वापर युगांत त्याची थोडी अधोगती होत गेली. आता कलियुगाच्या आरंभीच त्याची परमावधीची अधोगती झाली आहे. कलियुगाच्या उरलेल्या सुमारे ४ लक्ष २६ सहस्र वर्षांत त्याची किती अधोगती होईल, याची कल्पनाही करता येत नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पुन्हा दगाफटका !

संपादकीय 
      पठाणकोट आक्रमणानंतर पाकच्या अन्वेषण यंत्रणेचा चमू भारतात येऊन पाहणी करून गेला. या आक्रमणात आमचा हात नाहीच, अशी भूमिका पाकने प्रथम घेतली होती; पण अमेरिकेने डोळे वटारताच पाकने काहीतरी करण्याचे नाटक केले. हा चमू भारतात पाठवणे, हे या नाटकाचे उपकथानक म्हणावे लागेल. या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी पाकची यंत्रणा भारतात आल्यानंतर साहजिकच भारताचीही अन्वेषण यंत्रणा पाकमध्ये जाणार, हे निश्‍चित होते; पण पाकने पुन्हा दगाफटका केला. पाकने भारतीय यंत्रणांना अद्यापपर्यंत पाकमध्ये येण्यास अनुमतीच दिलेली नाही. परराष्ट्र नीतीच्या दृष्टीने यापेक्षा मोठा नामुष्कीजनक पराभव आणखी कोणता असू शकतो ? पाक भारतीय यंत्रणांना पाकमध्ये येण्याची अनुमती देईल, याकडे भारत अजूनही आशेने डोळे लावून बसला आहे. एकीकडे पंतप्रधान विविध देशांत जाऊन भारताच्या आंतरराष्ट्रीय गरजा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करत असतांना दुसरीकडे मात्र भारताचा शेजारी राष्ट्र असलेला पाक भारताला जुमानायला सिद्ध नसल्याचे विरोधाभासी चित्र सध्या पहावयास मिळत आहे. या दगाफटक्याला शासन कसे उत्तर देणार आहे, हा खरा प्रश्‍न आहे.

बुडत्या जहाजातील प्रवासी !

संपादकीय
      काँग्रेसमधील कुणा नेत्याने त्यागपत्र दिले नाही, असा दिवस अलीकडे गेला नसेल. काँग्रेसला मे २०१४ पासून प्रतिदिन एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपासून चालू झालेली पराभवाची मालिका माता-पुत्राच्या पक्षाला अद्याप खंडित करता आलेली नाही. पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यांदेखत देहली, हरियाणा, महाराष्ट्र, बिहार, आसाम, बंगाल, केरळ, तमिळनाडू अशी एका मागोमाग एक राज्ये काँग्रेसच्या हातून निसटत गेली. एकेकाळी देशातील जवळपास सर्वच राज्यांत सत्ता असलेल्या या पक्षाचे साम्राज्य आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या राज्यांत शिल्लक राहिले आहे. खरे तर पराभवानंतर प्रत्येकच राजकीय पक्ष दाखवण्यासाठी का होईना; पण आत्मचिंतन करतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn