Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


कोटी कोटी प्रणाम !

कोटी कोटी प्रणाम !

पू. गोळवलकर गुरुजी पुण्यस्मरण (दिनांकानुसार)

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे मंत्रीपदांचे त्यागपत्र

मुंबई, ४ जून - भोसरी (पुणे) येथील भूखंड अवैधरित्या खरेदी करणे, कुख्यात माफिया दाऊद इब्राहीम याच्याशी भ्रमणभाषवरील संभाषण आणि अन्य काही प्रकरणांमध्ये आरोप झालेले महसूलमंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सर्व मंत्रीपदांचे त्यागपत्र दिले आहे.

खडसे यांनी ४ जून या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आपले त्यागपत्र सुपूर्द केले. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेसुद्धा वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. खडसे यांनी आपल्याकडे असलेल्या महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री या सर्व पदांचे त्यागपत्र दिले आहे. खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर त्यांचे त्यागपत्र घ्यावे आणि त्यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी आपच्या नेत्या अंजली दमानिया याही ३ जूनपासून मुंबई येथे उपोषणासाठी बसल्या आहेत. खडसे यांच्या त्यागपत्रानंतर महसूल मंत्रालयाचा कार्यभार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे समजते.

गुरुपौर्णिमेला ४४ दिवस शिल्लक

जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधिपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात. मग ते उत्तम प्रकारे तत्त्वबोध देऊन संसाररूपी दुःखसागरातून त्या शिष्यांचा उद्धार करतात.
- आद्यशंकराचार्य

जिल्हाधिकार्‍यांनी त्यागपत्र देण्याची श्री अंबाबाई भक्त समितीची मागणी !

श्री महालक्ष्मीच्या मूर्तीच्या रासायनिक प्रकियेतील गंभीर चुका आणि देवस्थानची अपकीर्ती करणे

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हे मनमानी कारभार करत असल्यामुळे त्यांच्या कारभाराला हिंदुत्ववाद्यांसह सर्व भाविकही कंटाळले आहेत. श्री महालक्ष्मी मंदिरात प्रसादासाठी देण्यात येणारे लाडू कारागृहातील महिला कैद्यांकडून बनवून घेणारे जिल्हाधिकारी उद्या महिला कैद्यांनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पूजाही करावी, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटायला नको. ही स्थिती येऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित होऊन अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवायला हवा. धर्मद्रोही निर्णय घेणार्‍यांवर कठोर कारवाई होऊन मंदिरे भक्तांच्या कह्यात मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

‘हॅकर’ मनीष भंगाळे चौकशीसाठी जळगावात !

      जळगाव, ४ जून (वार्ता.) - कुख्यात दाऊद इब्राहीम याच्या कराचीतील घरातून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या क्रमांकावर दूरध्वनी केल्याचा दावा करणारा 'इथिकल हॅकर' मनीष भंगाळे सध्या येथे चौकशीसाठी बोलावल्यामुळे आला आहे. दाऊद भारतातून एक मोठी रक्कम भाजप शासनाच्या डोळ्यांदेखत दुबई येथे घेऊन जाणार असल्याचा दावासुद्धा मनीष याने केला आहे. विशेष म्हणजे मनीष आपल्या महत्त्वाकांक्षी 'प्रोजेक्टस्'ची 'ब्ल्यूप्रिंट' लवकरच प्रसिद्धीमाध्यमांसमोर मांडणार आहे. ब्ल्यूप्रिंटमुळे देशात प्रचंड खळबळ उडणार आहे. अनेक राजकीय नेते आणि दिग्गजही अडचणीत येतील, असे मनीष भंगाळे याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अजय देवगण यांच्या शिवाय चित्रपटाच्या विरोधात तक्रार

     अभिनेता अजय देवगण यांच्या शिवाय या चित्रपटातून भगवान शिवाचा अवमान करण्यात आला आहे, असा आरोप करून अजय देवगण आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात देहली येथील मनमोहन शर्मा नावाच्या अधिवक्त्यांनी तिलक नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. (देवतांच्या अवमानाच्या संदर्भात तात्काळ कृती करणारे अधिवक्ता मनमोहन शर्मा यांचे अभिनंदन ! - संपादक)
(हे वृत्त रविवारच्या वाचकांसाठी पुनर्प्रसिद्ध केले आहे.)

ईश्‍वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात भेद नाही !

भृगुसंहितेच्या फलादेशानेही दिली परात्पर 
गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाची ग्वाही ! 
१. डॉ. विशाल शर्मा यांचा सत्कार करतांना
२. पू. डॉ. मुकुल गाडगीळ, सोबत ३. श्री. गौरव सेठी,
४. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ५. पू. (सौ.) अंजली गाडगीळ
         रामनाथी, ४ जून (वार्ता.) - परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखा पवित्र आत्मा जगात कुठेही नाही. ईश्‍वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात कोणताही भेद नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हा अंतिम जन्म आहे. ते ईश्‍वराचे पूर्ण रूप असून ते सक्षम आहेत, असे होशियारपूर, पंजाब येथील भृगुसंहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून महर्षि भुगू यांनी सांगितले. यापूर्वी अनेक संत, तसेच इरोड, तमिळनाडू येथील जीवनाडीचा अर्थ उलगडून सांगणारे संत पू. डॉ. ॐ उलगनाथन् आदींनी केलेल्या नाडीपट्टीवाचनात परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतार असल्याचे सांगितले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या भृगुसंहितेच्या फलादेशानेही पुन्हा एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाची ग्वाही दिली आणि साधकांचा आनंद द्विगुणीत झाला !

महर्षींच्या आदेशानुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात साधकांच्या रक्षणासाठी श्री बगलामुखी ब्रह्मास्त्रयाग संपन्न !

पूर्णाहुतीच्या वेळी यज्ञकुंडाला नमस्कार करतांना पू. (सौ.) बिंदा 
सिंगबाळ, महर्षींच्या आज्ञेने वेलचीचा हार घातलेले परात्पर गुरु 
डॉ. आठवले, पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि वेदमूर्ती केतन शहाणे
       रामनाथी - महर्षींनी ३० मे या दिवशी नाडीपट्टीवाचनाद्वारे केलेल्या आदेशानुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ३१ मे या दिवशी सकाळी श्री बगलामुखी ब्रह्मास्त्रयाग करण्यात आला. सर्व साधकांचे कल्याण व्हावे, शत्रूभयनिवारण व्हावे आणि संकटांचा परिहार व्हावा, यासाठी हा विशेष याग महर्षींनी करण्यास सांगितला होता. सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या यजमानपदाखाली हा याग करण्यात आला. पूर्णाहुतीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, पू. डॉ. ॐ उलगनाथन्, तसेच यागाच्या वेळी प.पू. दास महाराज, त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, पू. सदानंद (बाबा) नाईक उपस्थित होते. महर्षींच्या आदेशानुसार सनातनच्या साधक पुरोहित पाठशाळेतील ब्रह्मवृंदाने या यागाचे पौरोहित्य केले.

वायूप्रदूषण

     वायूप्रदूषण अनेक रोगांना कारणीभूत ठरणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रतीवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात.
२. वायूप्रदूषण मापणारे यंत्र 
    प्रदूषकांची हवेेतील पातळी मोजून ती हवा श्‍वसनास योग्य कि अयोग्य ते ठरवले जाते. यात एअर-गोचे एक एअरमीटर येते. त्यात हवेतील हानीकारक घटक मोजले जाते. त्यानंतर एल्ईडी प्रकाशतात. जेवढे एलईडी प्रकाशित होतील, तेवढ्या प्रमाणात हवा प्रदूषित समजली जाते. अल्प एल्ईडी प्रकाशित झाले, तर हवा अल्प प्रदूषित आहे, असे समजतात आणि जास्त एल्ईडी प्रकाशित झाल्यास हवा जास्त प्रदूषित आहे, असे समजले जाते.

वायूप्रदूषणाची भीषणता

१. वाहनांमधून विद्युतनिर्मिती करणार्‍या केंद्रांमधूनही काजळीचे सूक्ष्म कण बाहेर पडतात. हवा प्रदूषित करतात. हवेमधील काजळीच्या सूक्ष्म कणांच्या दीर्घकाळ संपर्कामध्ये आल्यास फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयाचे अन्य विकारसुद्धा जडण्याची शक्यता असते. - श्रीराम सिधये, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, मार्च २००२
२. वाहनांमुळे होणारा प्रदूषणाचा प्रश्‍न तर जगभर भेडसावतच आहे आणि त्याचा सजीव अन् निर्जीव या दोहोंवर परिणाम होत आहे. कोलकाता येथे प्रदूषणामुळे भर दुपारी संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण असते आणि तासा-दोन तासांत कपडे मळतात.

एका अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांची स्थानिकांना दमदाटी आणि अश्‍लाघ्य वर्तन !

एका जिल्ह्यातील सनातनच्या साधकाच्या घरात एका अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी विनाअनुमती घुसल्याचे प्रकरण!
 
 इमारतीत रहाणार्‍या एका व्यक्तीचा सदरा (शर्ट) पकडून ओढून बाहेर काढले आणि चौकशी केली !
१. असे उद्धट अधिकारी आपले रक्षण करू शकतील, असा विश्‍वास जनतेला कधीतरी वाटेल का ?
२. कसे बोलावे, याचे प्रशिक्षणही नसलेले अधिकारी देशाला न्यायाचे राज्य काय देणार ?

एका जिल्ह्यातील सनातनच्या एका साधकाच्या घराची झडती घेण्यासाठी नुकतेच एका अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी गेले होते. त्या वेळी त्यांनी साधकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या बंद असलेल्या घरात जाऊन घराची झडती घेतली.

या संदर्भात आजूबाजूच्या लोकांनी त्यांना या अधिकार्‍यांविषयी झालेले प्रसंग सांगितले. ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. सकाळी ६.१५ ते ७ या वेळेत या अन्वेषण यंत्रणेेचे ५-६ अधिकारी आले. ते हिंदी भाषिक असल्याने आजूबाजूच्या लोकांकडे हिंदी भाषेत साधकाविषयी चौकशी करू लागले.

जागतिक वायूप्रदूषण : कारणे, होणारे रोग आणि भयावह जीवितहानी !

१. जगात भारत आणि चीन या देशांवर वायूप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होणे 
     जगात प्रत्येक ८ वा मृत्यू हा वायूप्रदूषणामुळे होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार संपूर्ण जगात एका दशकात घरात आणि बाहेर प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण ४ पट वाढले. प्रतिवर्षी प्रदूषणामुळे ८० लक्ष लोकांचे मृत्यू होत आहेत. जगात वायूप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्ये भारत आणि चीन यांचा समावेश आहे.
२. वर्ष २००० च्या तुलनेत वायू प्रदूषणामध्ये ६ पट वाढ होणे 
    एंबियन्ट एअर पोल्यूशनच्या अहवालात ९१ देशांतील १ सहस्र ६०० शहरांचा आढावा देण्यात आला आहे. त्यामध्ये वर्ष २००० च्या तुलनेत वायू प्रदूषणामध्ये ६ पट वाढ झाली आहे.

वायूप्रदूषणामुळे होणारी अपरिमित हानी !

१. शारीरिकदृष्ट्या 
अ. फटाके फोडले जातात, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी धूरही होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत दम्याच्या रुग्णांत वाढ होते.
आ. फटाक्यांमुळे वातावरणात पसरणारा विषारी वायू सर्वच नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असतो.
२. पर्यावरणदृष्ट्या
अ. फटाक्यांमुळे केवळ पैशांचा अपव्यय होतो, असे नाही, तर पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ आणि धूर या अनिष्टकारक गोष्टी विनाकारण निर्माण होतात.

दिलीप पाटीदार बेपत्ता प्रकरणी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांच्या विरोधात इंदूर न्यायालयाचे अटक वॉरंट !

     वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी इंदूर येथून दिलीप पाटीदार यांना महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी पकडून नेले होते; मात्र नंतर त्यांचा काहीच पत्ता नाही. यासंदर्भात पाटीदार यांच्या भावाकडून इंदूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने या पथकातील तत्कालीन अधिकारी राजेश मोरे आणि राजेंद्र घुले यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. त्यांना ३ जूनला न्यायालयात उपस्थित रहाण्यास बजावले आहे. तसेच हे प्रकरण समाप्त करण्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा अहवालही न्यायालयाने फेटाळला आहे. 

(म्हणे) संबंध सुधारण्यासाठी लाहोरला गेलो होतो ! - नरेंद्र मोदी

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
इतिहासापासून काही न शिकणारे पंतप्रधान मोदी भारताचे भले करू शकतील का ?
     पाकिस्तान हा आपला शेजारी देश असून त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याची शासनाची इच्छा आहे. त्याच हेतूने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मी शपथविधी सोहळ्याला बोलावले होते आणि मध्यंतरी मैत्रीसाठी स्वतःहून पुढाकार घेत लाहोरलाही गेलो होतो, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. केंद्रशासनाला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेच्या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे.फटाक्यांविषयीचे परराष्ट्रांचे स्तुत्य धोरण !

१. अमेरिका : अमेरिकेसारख्या सुधारलेल्या विकसित देशात आवाज करणार्‍या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यात आले आहे. तेथे केवळ शोभेची, उदा. आवाज न करता केवळ प्रकाश देणारे फटाके उडवण्यास अनुमती आहे. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. प्रसंगोपात्र आवाज करणारे फटाके वाजवायचे असल्यास विशेष अनुमती घ्यावी लागते. अशी अनुमती देतांना कुणासही धोका होणार नाही, अशा ठिकाणी वस्तीपासून दूर हे फटाके उडवण्याची अनुमती दिली जाते. तसेच ही अनुमती देतांना तिथे अग्नीशामक दलाची व्यवस्था आहे कि नाही, हे आधी पाहिले जाते. आपणाकडे असे किती दक्षतेचे उपाय योजले जातात ?
२. न्यूझीलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम या देशांत केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास अनुमती आहे. या धर्तीवर भारतातही असे दंडविधान होणे आवश्यक आहे.

वृक्षतोडीमुळे वायूप्रदूषणावर होणारा परिणाम

१. वृक्षतोडीची भयावहता ! 
     वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्रत्येक मासाला (महिन्याला) ९९ प्रतिशत प्रस्ताव केवळ वृक्षतोडीची अनुमती मागण्यासाठी येत असतात. 
२. पृथ्वीच्या बाह्य आणि आंतरिक भागांत आढळून येणारा तापमानातील 
प्रचंड भेद मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरणे 
     पृथ्वीच्या पोटातील उष्णता ही सूर्याच्या पृष्ठभागावरच्या उष्णतेशी स्पर्श करू शकेल इतकी आहे. पृथ्वीचा गाभा ६ सहस्र अंश सेल्सिअस इतका तप्त आहे; मात्र तिच्या पृष्ठभागाचे तापमान त्या तुलनेत अतिशय अल्प आहे. पृथ्वीच्या या बाह्य आणि आंतरिक भागांत आढळून येणारा हा तापमानातील प्रचंड भेद अनेक मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरतो.

फलक प्रसिद्धीकरता

भारतासह जगभरातील विविध देशांतील मंदिरे असुरक्षित !

मलेशियाच्या पेनांगमधील मुथुमारियाम्मन् मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करत देवतांच्या ४ मूर्ती तोडल्या. तेथील उपमुख्यमंत्री पी. रामासामी यांनी या आक्रमणामागे धार्मिक ध्रुवीकरणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. गेल्याच मासात इपोह येथील मंदिरातल्या मूर्तीही तोडण्यात आल्या होत्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Dharmandhone Penang, Malaysiake Muthumariyamman mandirpe akraman kar devtaonki 4 murtiya todi.
Musalmanbahul deshki is asahishnutapar ab sab chup kyon?

जागो ! :
धर्मांधों ने पेनांग, मलेशिया के मुथुमारियाम्मन् मंदिर पर आक्रमण कर देवताआें की ४ मूर्तियां तोडीं.
मुसलमानबहुल देश की इस असहिष्णुता पर अब सब चुप क्यों ?

हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन हाच पर्यावरण रक्षणाचा उपाय

श्री. संतोष गरुड
      प्रतिवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. यासाठी जगभर विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित केली जातात. यामध्ये पर्यावरणाचा र्‍हास रोखण्याचा संदेश दिला जातो; पण असा दिवस साजरा करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार पर्यावरणप्रेमींनी करावा. खर्‍या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखातून पर्यावरणप्रेमींच्या अंत:करणात हा प्रकाश निर्माण व्हावा, हीच निसर्गदेवाच्या चरणी प्रार्थना !

सनातन वेदधर्मात प्रदूषण निवारणार्थ सांगितलेला उपाय

१. मानवी वृत्ती सत्त्वप्रधान होण्यातच प्रदूषणाचा अंत असणे : हे सर्व जगत जगन्नियंत्या ईश्‍वराच्या संकल्पापासून निर्माण झाले आहे; म्हणून जसजसा मनुष्य सत्त्वगुणाकडे वाटचाल करत असतो, तसतसे त्याच्या संकल्पाला सत्यत्व येत जाऊन त्याचे प्रारब्ध ऐहिक सुखाच्या दृष्टीने त्याला अनुकूल होतेे. त्यामुळे मानवाची वृत्ती सत्त्वप्रधान होण्यातच प्रदूषणाचा अंत आहे, असे ओघानेच सिद्ध होते.
२. प्रदूषण निवारण्यासाठी यज्ञाची आवश्यकता असणे : प्रदूषण निवारणार्थ यज्ञाची आवश्यकता आहे. त्या यज्ञाचे निश्‍चित असे स्वरूप सनातन वेदधर्मच सांगू शकतो. यासाठी सर्व हिंदु धर्मियांनी त्याचे आचरण करून सर्व जगाला त्याची शिकवण द्यायला हवी, तरच या कार्याला यथार्थ आकार आला, असे म्हणता येईल.
- प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (वर्ष १९९१)

प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि त्यांवरील उपाय

१. मानवाच्या वैचारिक प्रदूषणाने प्राणवायू नष्ट होणे 
     परदेशातील काही व्यक्ती संशोधनासाठी भारतात आल्या होत्या. पू. अरुणकाकांनी त्यांना सांगितले, वातावरणातील सध्याचे प्रदूषण सातत्याने वाढत आहे. सध्या ८५ टक्के प्राणवायू नष्ट होऊन १५ टक्के प्राणवायू शिल्लक राहिलेला आहे. मानवाच्या वैचारिक प्रदूषणाने प्राणवायू नष्ट झाला आहे. ही खरोखरच विश्‍वाच्या दृष्टीने घातक गोष्ट आहे.
२. सभोवतालचे वातावरण संस्कारित करणे
     परदेशी संशोधकांनी यावर काय उपाय योजले पाहिजेत ?, असे पू. काकांना विचारले. प.पू. काकांनी सांगितले, सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून प्रत्येकाने जप-तप-अनुष्ठानाने आपल्या सभोवतालचे वातावरण संस्कारित केले पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींनी सातत्याने याग करून पृथ्वीवरील वातावरण संस्कारित ठेवले. सात्त्विक असे तीळ, तूप आणि समिधा यांचे अग्निनारायणाला हवन देऊन वातावरण शुद्ध केले.

मनुस्मृतीला विरोध करणार्‍यांनी मनुस्मृति अभ्यासावी !

अधिवक्त्या सौ. श्रुती भट
      भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्याआधी सहस्रो वर्षे मनुस्मृति लिहिली गेली आहे. महर्षि मनु यांनी वेदांचा अभ्यास करून कायदा-सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांसाठी मनुस्मृति हा ग्रंथ लिहिला. वर्ष १७९४ मध्ये विल्यम जोन्स या इंग्रजाने मनुस्मृतीचा अनुवाद इंग्रजीत केला. मनुचे आकर्षण असणार्‍या या व्यक्तीच्या लंडन येथील सेंट पॉल कॅथेड्रल मध्ये असलेल्या पुतळ्याच्या हातात मनुस्मृति हा ग्रंथ दाखवण्यात आला आहे. जगामध्ये अजूनही मनुस्मृति हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या प्रकाशकांनी नुकताच मनुस्मृतीवरील तौलनिक आणि संशोधनपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला. पॅट्रिक ऑॅलिवेल या भारतीय वंशाच्या अमेरिकन अभ्यासकाने हा ग्रंथ संपादित केला आहे.

हुतात्म्यांची स्मृती म्हणून वृक्ष लावणारा आणि त्या माध्यमातून प्रदूषण टाळणारा इस्राईल !

     इस्राईलहून जयश्री आली होती, ती सांगत होती, १९४८ मध्ये तो देश स्वतंत्र झाला. त्या वेळी तिथे केवळ वैराण होते. जमिनीखाली खडक आणि मुरूम होते. या खडकाळ भूमीवर त्यांनी नवराष्ट्र उभे केले. हुतात्म्याचे स्मारक म्हणून ज्यूंनी झाडे लावायची ठरवले. क्रांतीविरांचे स्मरण, स्वजनांचे प्रेम, देशभक्तांचा अभिमान, विद्वानांचा आदर व्यक्त करायला त्यांची स्मृती टिकवण्यासाठी त्यांनी झाडे लावली आणि जोपासना केली. वृक्षाच्या रूपाने त्यांनी त्यांच्या उत्कट भावना प्रकट केल्या. छोटा इस्राईल; पण आज ६०० पेक्षा अधिक दाट जंगले आहेत. ११ अब्जाहून अधिक वृक्ष आहेत. त्यांच्या शहीद वनात ६० लक्ष वृक्ष आहेत. ती ६० लक्ष शहिदांची स्मृती आहे. अशी स्मृतीवृक्षांची छाया सर्व देशभर आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, सप्टेंबर २००८) वातावरण शुद्ध ठेवण्यासाठीचेे निसर्गाचे उपाय

१. वनस्पती : सजीव प्राणी प्राणवायू घेतो आणि कार्बाम्लयुक्त (दूषित) वायू बाहेर टाकतो. हा दूषित वायू वातावरणात नेहमी जास्त प्रमाणात राहू नये; म्हणून वृक्ष-वेली कार्बाम्लयुक्त वायूचे भक्षण करतात आणि प्राणवायू बाहेर टाकतात. 
     तुळस मोठ्या प्रमाणात प्राणवायूचे प्रसारण करते. वृक्षांपासून पाऊस पडायला साहाय्य होते.
२. गाय : गायीपासून बाहेर पडणारे तत्त्व शुद्ध असते; म्हणून गायींना संरक्षण देऊन त्यांचे पालन व वर्धन करायला सांगितले आहे. गायीचे शेण व गोमूत्र वातावरण शुद्ध करते.
३. पृथ्वी : पृथ्वीवरील मातीसुद्धा वातावरण शुद्धीचे काम करते.
४. जल : जलतत्त्व शुद्धीकरणाचे काम करते.
५. अग्नी : पंचमहाभूतामध्ये अग्नीतत्त्व हे दूषिताला नाहीसे करून शुद्ध स्वरूपात वातावरण ठेवते.
६. आकाश : आकाशाचा व्याप मुद्दाम विशाल स्वरूपात ठेवला आहे, ज्यामुळे पृथ्वीवरून जाणारा दूषित वायू वर गेल्यावर तो त्यात सामावून जाऊन वातावरण शुद्ध रहाते.
- प.पू. परशराम पांडे महाराज (१२.२.२००६)

सोमयागामुळे परिसरातील कार्बन डायऑक्साइड आणि जिवाणू यांचे प्रमाण न्यून होणे, ही यज्ञयागावर टीका करणार्‍यांना चपराक !

     रत्नागिरी शहरातील पटवर्धनवाडी, मारुति मंदिर येथे १६.१.२०१५ ते २१.१.२०१५ या कालावधीत माणगाव, सिंधुदुर्ग येथील श्री वासुदेवानंद स्वामीसमर्थ जनकल्याण न्यासाच्या वतीने महासोमयागाचे आयोजन करण्यात आले होते. सोमयागाचा वातावरणावर कोणता परिणाम होतोे, याचा अभ्यास करण्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने प्रा. मयुर देसाई आणि प्रा. विजय गुरव यांनी यज्ञाच्या पहिल्या दिवसापासून यज्ञाच्या ठराविक अंतरावर वैज्ञानिक मोजमाप करणारी यंत्रे बसवून वातावरणातील हवेमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण पडताळले. ज्वलनामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढते; मात्र होमहवन करूनही या परिसरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण न्यून होत गेल्याचे वैज्ञानिक प्रयोगातून आढळून आले. जीवशास्त्र विभागाने सोमयागाच्या परिसरातील हवेतील जिवाणूंच्या पालटणार्‍या प्रमाणाचा अभ्यास प्रा. डॉ. कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला. यामध्ये सोमयागाच्या परिसरात यज्ञाच्या आधी आढळलेल्या जिवाणूंचे प्रमाण यज्ञाच्या नंतर न्यून झाल्याचे आढळून आले.

सर्व कृत्रिम घटक हानीकारक असणे आणि उद्योगांमुळे वायूप्रदूषण होऊन जीवनशक्तीचा र्‍हास होणे

      रंगीत उपनेत्र (चष्मा), विद्युत्अणूचे (इलेक्ट्रॉनिक) घड्याळ इत्यादी वस्तू, तसेच रसायनयुक्त जालिकापत्र (टिश्यू पेपर) यांचा उपयोग केल्याने प्राणशक्ती क्षीण होते. उंच टाचेची पादत्राणे घातल्याने जीवनशक्ती क्षीण होते. बहुधा सर्व सुगंधित द्रव्ये (परफयूम्स) कृत्रिम असल्याने हानीकारक असतात, असे सिद्ध झाले आहे. बर्फाचे थंड पाणी पियाल्यानेही पचनशक्ती क्षीण होते. कोणत्याही फलोरोसेंट लाईटकडे किंवा प्रकाशनलिकेकडे (ट्यूबलाईटकडे) पाहिल्याने जीवनशक्ती क्षीण होते. उद्योगांमुळे वायूमंडळात जवळजवळ ३५ लाख रसायने मिश्रित झालेली आहेत. त्यामुळे निर्माण होणार्‍या वायूप्रदूषणानेही जीवनशक्तीचा र्‍हास होतो. (ऋषीप्रसाद, सप्टेंबर २००८)

अतीनील किरणांपासून सजीव सृष्टीचे रक्षण होण्यासाठी ओझोन वायूचे रक्षण करा !

१. शेतात अन् कारखान्यात वापरली जाणारी ९० रसायने, विशेषत: वातानुकूलित यंत्रांतून बाहेर येणारे वायू आणि आग विझवण्यासाठी वापरले जाणारे वायू यांमुळे ओझोनच्या थराला हानी पोचणे : ओझोन वायूचे रेणू अत्यंत अस्थिर असतात. ते ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून बनलेले असतात. पृथ्वीच्या वातावरणापासून १५ कि.मी. ते ५० कि.मी. अंतरावर हा ओझोनचा थर पसरलेला असतो आणि तो सूर्यापासून येणार्‍या अतीनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करतो.
     शेतात अन् कारखान्यांत वापरल्या जाणार्‍या ९० रसायनांमुळे, विशेषतः वातानुकूलित यंत्रांतून बाहेर येणारे वायू आणि आग विझवण्यासाठी वापरले जाणारे वायू हे ओझोनच्या थराला हानी पोचवतात. या वायूंमध्ये क्लोरो-फ्लोरो कार्बन, हॅलोन्स, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादी वायूंचा प्रामुख्याने समावेश आहे.

हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांवर आलेले संकट !

         हवेच्या प्रदूषणामुळे माणूस त्रस्त झाला, तर तो निषेध करू शकतो; परंतु याच प्रदूषणामुळे पक्ष्यांवर जी संकटे येत आहेत, त्याचे काय ?
१. प्रदूषणामुळे पक्ष्यांचा पिसारा, तसेच त्यांचे चमकदार रंग न्यून होतात. 
२. चमकदार रंगीत पिसारा ही अनेक पक्ष्यांची संवादाची भाषा असते.
३. पक्ष्यांचे रंग हे कॅरेटोनॉर्सडस् या रसायनामुळे चमकदार होतात. हे रसायन पक्षी सिद्ध करू शकत नाहीत. ते त्यांना अन्नातूनच मिळवावे लागते.
४. हे रसायन अन्नातून पक्ष्यांना मिळवून देणारे हिरवे सुरवंट हवेच्या प्रदूषणामुळे पक्ष्यांना हवे त्या प्रमाणात मिळत नाहीत आणि मिळालेच, तर प्रदूषणामुळे कॅरेटोनॉईडस् रंग सिद्ध होण्याची प्रक्रिया बिघडते. 
५. वैज्ञानिकांना असेही दिसले की, पक्ष्यांचे आकारही प्रदूषणामुळे लहान झाले आहेत.
- टॅपिओ ईव्हा, वैज्ञानिक, तुर्कू विद्यापीठ, फिनलँड.

गंगेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगीरथ व्हा !

गंगादशहराच्या निमित्ताने...
      ५ जून ते १४ जून २०१६ या कालावधीत गंगादशहरा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने गंगेची महती, आध्यात्मिक रहस्य, धार्मिक अधिष्ठान आणि गंगादशहरा व्रताचे फळ यासंदर्भातील विवेचन येथे देत आहोत. 
१. गंगा म्हणजे तीर्थदेवता ! 
     गंगा ही केवळ नदी नसून ती श्रेष्ठतम तीर्थदेवता आहे. त्यामुळे भारतियांसाठी गंगा प्राणांहूनही प्रिय ठरते. भाविकांची पापे धुण्याचे आध्यात्मिक कार्य ईश्‍वरानेच तिला वाटून दिलेले आहे. गंगा स्नानाने शुद्ध करते, तर नर्मदा नुसत्या दर्शनानेच मानवाला शुद्ध करते.
॥ ओझोन प्रसन्न ॥
       आमच्या येथे मिथेनबाबा यांच्या कृपेवरून आणि सरकारच्या निष्क्रीयतेने...
चि. विश्‍व
(श्री. आणि सौ. ब्रह्मांड यांचा सुपुत्र)
याचा विवाह
चि.सौ.कां. जागतिक तापमान वाढ 
(श्री. आणि सौ. प्रदूषण यांची कुपुत्री)
हिच्याशी
       त्रासदायक सूर्यकिरणात, प्रचंड धुरात आणि कचर्‍याच्या वर्षावात दुपारी १२ वाजून १२ मिनिटांच्या शुभ (?) मुहूर्तावर पार पडत आहे. तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून वधूस बर्फ आणि वरास ५ किलो झाडे-झुडपे आणि गवत द्यावे, ही विनंती.
          प्रमुख उपस्थिती                                                   आमंत्रक
१. श्री. झाडतोडे                                                            १. श्री. शिकारी 
२. सौ. विनाशकारी                                                         २. श्री. स्क्रबर (दादा)
स्थळ : हरितगृह कार्यालय, 
घन कचरा चौक, प्लास्टिक रोड, वायूपूर, पृथ्वी.
घातक परिवार : आरोग्यघातक वायू औष्णिक कचरा, हरितगृहवायू, रबर
टीप : अहेर म्हणून १ सिलेंडर भरून ऑक्सिजन आणावा.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
(संकल्पना : चरणसेवक, चि. वरद भोंग (वय १४ वर्षेे), नगर, महाराष्ट्र. 
     वायूप्रदूषणाची वाढती भीषणता कोवळ्या वयाच्या मुलांनाही किती प्रकर्षाने जाणवते, हे वरील उपरोधिकपणे सिद्ध केलेल्या लग्नपत्रिकेवरून लक्षात येईल ! जे १४ वर्षे वयाच्या मुलाला समजते, ते सरकारला समजत नाही, हे खेदजनक आहे. प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी वृक्षतोड, ई कचरा, धुराचे वाढते प्रमाण यांवर आळा घालण्यासाठी सरकारने आतातरी प्रयत्न करावेत आणि नागरिकांना मोकळा श्‍वास घेता येईल, अशी वातावरणनिर्मिती करून समाजकर्तव्य पार पाडावे !

हिमालयाच्या दुरवस्थेतून प्रतिबिंबीत होणारी भारताची दुरवस्था !

आज ५ जून या जागतिक 
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने... 
        १९६५-६६ या काळात हिमालयाचा परिसर जंगलांनी व्यापलेला होता. आता तेथील गर्द झाडी लुप्त होऊन हिमालयातील डोंगर बोडके झाले आहेत. गेल्या काही दशकांत हिमालयातील प्रचंड जंगलतोड, नद्यांवरील धरणे आदींचे पर्यावरणीय दुष्परिणाम, अयोग्य शिक्षणपद्धती, तसेच आरोग्य, अन्य नागरी सुविधा, संरक्षण आदी सर्वच गोष्टींमध्ये शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष यांमुळेे स्थानिकांची ससेहोलपट झाली. तसेच देशाचीही हानी झाली. हिमालयाच्या या दुःस्थितीचे डॉ. विलास आठवले (प.पू. डॉक्टरांचे कनिष्ठ बंधू) यांनी केलेले वर्णन येथे देत आहोत.
मुंबईतील प्रत्येक नागरिक प्रदूषणामुळे प्रतिदिन ११ सिगारेटइतका धूर श्‍वसनावाटे शरिरात ओढत असतो !

विषारी हवा

     एक प्राध्यापक मित्र सांगत होते, न्यूयॉर्क, टोकियो, लंडन अशा मोठ्या शहराची हवा विलक्षण विषारी बनली आहे. माणूस सहन करू शकेल, यापेक्षा तीन पटींनी अधिक विष वातावरणात आहे, तरीही माणूस जगतो. इतके विष अंगवळणी पडले आहे. सवयीने वळण पडले आहे, विष पचवण्याची त्याची क्षमता वाढली आहे. मुंबईच्या हवेतही दोनपट विष नक्कीच आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २००८) वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी...

      विशेषांक वेळेत मिळावा, यासाठी छपाई लवकर करावी लागल्यामुळे आम्ही वाचकांना ताज्या घडामोडींची वृत्ते देऊ शकलो नाही. जागेअभावी काही नियमित सदरे प्रसिद्ध करू शकलो नाही, याची नोंद घ्यावी. - संपादक

गोमातेसाठी वृद्धाश्रम !

श्री. सुधाकर चपळगावकर
       वेत (जननक्षमता) बंद झालेली गाय सांभाळणे परवडत नाही, अशी हाकाटी नव्याने चालू झालेली दिसत आहे. गो-पालन हे आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण कसे होऊ शकते, यापूर्वी यावर सर्वत्र शास्त्रीय चर्चा होऊन, अनेक राज्यांनी गोवंश हत्याबंदीसाठी कायदे केलेले आहेत.
१. भारतीय उपचारपद्धतीमध्ये पंचगव्याचे (दूध, तूप, दही, गोमय आणि गो-अर्क यांचे) महत्त्व आपण अनेक वर्षांपासून जाणतो. अनेक आयुर्वेदाचार्य पंचगव्याचा वापर उपचार पद्धतीमध्ये करत आहेत. स्नानाचे साबण, शॅम्पू, फरशी स्वच्छ करण्याचे रसायन, गोरस-पाकासारखी बिस्किटे, अनेक व्याधींवर उपयुक्त असलेला गो-अर्क, त्वचेसंबंधीच्या व्याधी दूर करणारे गोमय, उदबत्ती इत्यादी अनेक वस्तू आकर्षक वेष्टनासह बाजारात उपलब्ध होत आहेत.
२. मधल्या काळातील, गायीच्या संकरातून बाहेर पडण्यासाठी शासनाने उचललेली पावले गो-वंशाच्या उपचारकेेंद्रातून दिसून येत आहेत. अशा वेळी वेत बंद झालेली गाय पाळणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशी हाकाटी नव्याने चालू झालेली पाहून कोणालाही आश्‍चर्य वाटेल.

'अ‍ॅन्ड्रॉईड सनातन पंचांग २०१६' ला आतापर्यंत मिळालेला भरघोस प्रतिसाद !

- श्री. महेश ननावरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा संकल्प पूर्ण होण्याची घटिका जवळ आली असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी 
वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने ३१ मे या दिवशी 
झालेल्या नाडीवाचनातून महर्षींनी वर्णिलेली त्यांची महती
३१ मे या दिवशी झालेल्या नाडीवाचनाच्या वेळी उपस्थित डावीकडून
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. दिवाकर आगवणे (मागे),
श्री. विनायक शानबाग, पू. डॉ. ॐ उलघनाथन् (नाडीवाचन करतांना) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले
       परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या उपस्थितीत ३० मे या दिवशी झालेल्या नाडीवाचनानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे ३१.५.२०१६ या दिवशी नाडीवाचन क्रमांक ८१ करण्यात आले. या नाडीवाचनाच्या वेळी महर्षि वसिष्ठ आणि महर्षि विश्‍वामित्र यांच्यात झालेल्या संवादातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची थोरवी वर्णन करण्यात आली. या संवादातील आणि नाडीवाचनातील निवडक सूत्रे येथे देत आहोत.

जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सिंहासनाधिष्ठित परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याचा त्या सिंहासनावर झालेला परिणाम दर्शवणारी यू.टी.एस्. या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

     महर्षींनी नाडीपट्टीद्वारे केलेल्या मार्गदर्शनानुसार २९.५.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सव वर्षारंभाचा सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याच्या वेळी ते महर्षींच्या आज्ञेने सिंहासनावर विराजमान झाले होते. अत्यंत उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांमधील स्पंदनांचा त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर काय परिणाम होतो ? हे जाणण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले सिंहासनावर बसण्यापूर्वी आणि ते विधीसाठी साधारण ३ घंटे सिंहासनावर आसनस्थ झाल्यानंतर सिंहासनातून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. लक्ष्मी राऊळ हिने काढलेल्या भावपूर्ण चित्रांची सौ. उमा रविचंद्रन् यांनी उलगडलेली वैशिष्ट्ये !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. लक्ष्मी 
राऊळ हिने विविध रूपांतील श्रीकृष्णाची काढलेली 
आणि भक्त अन् भगवंत यांचे नाते दर्शवणारी भावपूर्ण चित्रे
        भगवंताची बोलकी आणि जिवंतपणा दर्शवणारी चित्रे रेखाटणे, हे आध्यात्मिक स्तरावरील कौशल्यच आहे. कोणत्याही साधकाची भावजागृती होईल, अशी ही सुंदर चित्रे रेखाटणार्‍या कु. लक्ष्मी राऊळ हिच्या अंतरंगातील देवाप्रतीच्या भावाची आपल्याला यातून प्रचीती येते ! भगवंताशी भक्ताचे असलेले सख्यभक्तीचे नाते आणि त्यातील आनंद या चित्रांमधून अनुभवूया !
आपल्या प्रिय भक्तांसाठी बासरीवादन करणारा श्रीकृष्ण
भक्त सांगत असलेले ऐकण्यासाठी थोडी पुढे झुकलेली श्री विठ्ठलमूर्ती
श्रीकृष्णाची पूजा करून नंतर त्याच्याशी रास खेळतांना गोपी
मने परमानंदाने भरलेली असल्यामुळे श्रीकृष्णालाच अन्न अर्पण करणारे गोप-सवंगडी
        आलेख्य (चित्र काढणे) ही ६४ कलांमधील एक कला आहे. ईश्‍वरप्राप्तीच्या अनेक साधनांपैकी कला हे ईश्‍वरप्राप्तीचे एक साधन आहे. कोणत्याही कलेचे शिक्षण न घेता केवळ देवाप्रती असणार्‍या उत्कट भावाच्या साहाय्याने दैवी (सात्त्विक) बालके कलाकृती साकारतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु. लक्ष्मी राऊळ (वय १७ वर्षे) हिने भगवान श्रीकृष्णाची काही चित्रे रेखाटली आहेत. त्यांच्या माध्यमातून तिच्यातील असामान्यत्व, साधनेतील व्यष्टी आणि समष्टी भाव दिसून येतो. तिच्या या चित्रांची सनातनच्या अन्य एक साधक-चित्रकार ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. उमा रविचंदन् यांना जाणवलेली वैशिष्ट्ये त्यांच्या शब्दांत येथे जाणून घेऊया.

सौ. उमाक्कांचे लिखाण भावपूर्ण असल्याने त्याचे भाषांतर करतांना आपोआप भावजागृती होऊन मनाला एक वेगळीच आनंदावस्था प्राप्त होणे

सौ. उमा रविचंद्रन्
       सौ. उमाक्कांचे लिखाण एवढे भावपूर्ण असते की, या आणि यापूवींही त्यांच्या धारिकांचे भाषांतर करतांना आपोआप भावजागृती होते. मनाला एक वेगळीच आनंदावस्था प्राप्त होते आणि जणूकाही मीही ते सर्व अनुभवत आहे, असे वाटते. वरून सोपे, साधे दिसणार्‍या चित्रात काय काय दडलेले आहे, याचा उलगडा त्यांच्या भावपूर्ण लिखाणातून होतो.
       इतर धारिकांचे भाषांतर करतांना काही वेळा कंटाळा येतो, शब्द सुचत नाहीत किंवा शब्दकोषाचे साहाय्य घ्यावेे लागते; परंतु उमाक्कांच्या धारिकेचे भाषांतर करतांना ते सहजतेने आणि आनंदाने पूर्ण होते. उमाक्का समोर उभ्या राहून ही अनुभूती मला सांगत आहेत, असे वाटते. अशी सेवा दिल्याविषयीप.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता !
       चित्र क्र.२ मधील फुलांसाठी भगवान आणि भक्त वेगळे नाहीत, असे एक वाक्य आहे. हा भावाचा परमोच्च बिंदू आहे, असे मला वाटले. देवा, मलाही या फुलांप्रमाणेच बनता येऊ दे. प्रत्येक साधकात मला तुझे रूप पहाता येऊदे, हीच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.
- सौ. श्रुति सहकारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१२.२०१५)

दूरदर्शनवरील (टीव्ही) कार्यक्रम पाहिल्यामुळे जाणवलेले दुष्परिणाम आणि शिकायला मिळालेली सूत्रे

      ३१.३.२०१४ या दिवशी मी दूरदर्शनवरील एक मालिका पहाण्यासाठी २ घंटे व्यर्थ घालविले. ही चूक माझ्यातील साधनेसंदर्भात गांभीर्य नसणे या स्वभावदोषामुळे झाली. ही चूक होतांना मला श्रीकृष्णाच्या कृपेने लक्षात येत होते की, मी वेळ घालवून मोठी चूक करत आहे; पण मी मनाविरुद्ध जाऊ शकले नाही. या प्रसंगातून मला जे त्रास जाणवले आणि त्याचे जे दुष्परिणाम लक्षात आले, ते साधना म्हणून लिहून देण्याचा प्रयत्न करत आहे. 
१. मनातील मायेचे विचार वाढले. 
२. जीवनातील २ घंटे वाया गेले. 
३. मन संपूर्णपणे असत्मध्ये गुंतले गेले.

प्रत्येक सेकंदाला होत असलेले वातावरणातील विचारांचे प्रदूषण आणि त्यावर साधना करणे हाच एकमेव पर्याय !

     जगाची लोकसंख्या ६०० कोटींच्या वर आहे. प्रत्येक सेकंदाला माणसाच्या मनात एक विचार येतो आणि तो वातावरणात मिसळतो. दुसर्‍या सेकंदाला दुसरा विचार येतो याप्रमाणे प्रत्येक सेकंदाला ६०० कोटी विचार वातावरणात जातात. सर्वसाधारण मानवात २० टक्के सत्त्वगुण, ३० टक्के रजोगुण, तर ५० टक्के तमोगुण असतो. त्यामुळे प्रत्येक सेकंदाला १२० कोटी सात्त्विक विचार आणि ४८० कोटी राजसिक अन् तामसिक विचार वातावरणात पसरतात. त्यामुळे कलियुगातील वातावरण साधनेला प्रतिकूल झाले आहे. 
     हे प्रदूषण घालवण्याचा उपाय म्हणजे लोकांनी धर्मशिक्षण घेऊन, साधना करून आपली आणि समाजाची सात्त्विकता वाढवणे हाच आहे. 
- पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले, मुंबई (२५.५.२०११)


हिंदूंनो, संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांमागील सामर्थ्य जाणा !

दैनिकाच्या विशेषांकाच्या छपाईत येणारे 
अडथळे संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक 
उपायांमुळे त्वरित दूर होऊन छपाई सुरळीत होणे
      दैनिक सनातन प्रभातने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला. या अंकाची छपाई एका नामांकित छापखान्यात करण्यात आली; मात्र ही छपाई चालू असतांना २ - ३ वेळा कागद तुटल्यामुळे छपाईत अडथळे आले. अत्याधुनिक यंत्रणा असतांनाही कागद तुटत असल्याचे पाहून तेथे सेवेसाठी गेलेल्या साधकांना ही समस्या सुटण्यासाठी आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. त्यानंतर साधकांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांना ही समस्या सांगितल्यावर त्यांनी त्वरित एक नामजप सांगून अन्य आध्यात्मिक उपाय सुचवले. संतांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी जप आणि आध्यात्मिक उपाय केल्यावर छपाईतील अडथळे दूर होऊन पुढील छपाई सुरळीत पार पडली. यातून हेच लक्षात येते की, केवळ अत्याधुनिक यंत्रणा असून काही उपयोग नाही, तर कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिक सामर्थ्याची आवश्यकता आहे. विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ कसे आहे, याचे हे एक उदाहरण होय. त्यामुळे कार्यातील अडथळे वेळीच दूर होऊन ते कार्यही यशस्वी होते, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

फसव्या ई-मेलविषयी (फेक मेलविषयी) सावधानता बाळगा !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

२३.४.२०१६ या दिवशी मला एका अत्यंत परिचित व्यक्तीचा ई-मेल आला. या ई-मेलमध्ये त्या व्यक्तीने मला तुम्हाला काही धारिका ई-मेल करायच्या आहेत; परंतु त्या ई-मेलला अ‍ॅटॅच होत नसल्याने मी अमुक एका संकेतस्थळावर ठेवल्या आहेत, असा निरोप लिहिला होता. निरोपाखाली त्या संकेतस्थळाची लिंक होती. या लिंकवर क्लिक केल्यावर एका संकेतस्थळाचे पान उघडले. या पानावर तुम्हाला या धारिका पहायच्या असल्यास तुमचा ई-मेल पत्ता आणि पासवर्ड यात लिहा, असे लिहिले होते.

ज्या परिचित व्यक्तीकडून हा ई-मेल आला होता, त्यांना संपर्क करून मी त्यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी हा ई-मेल पाठवला नसल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने असे अनेक ई-मेल त्या दिवशी इतरांनाही गेल्याचे त्यांनी सांगितले. अधिक शोध घेतल्यावर ज्या संकेतस्थळावर धारिका ठेवल्याची लिंक मला आली होती, ते संकेतस्थळ कोणाच्याही ई-मेल खात्यावरून फसवे ई-मेल करण्याची सुविधा पुरवते, असे लक्षात आले.

अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !

अधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशुरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे. या धर्मदानावर आयकर कायदा, १९६१ नुसार ८०जी(५) खाली आयकरात सूट मिळू शकते. अर्पणदाते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. धनादेश हिंदु जनजागृती समितीच्या नावे स्वीकारले जातील.

धर्मदानासाठी विवरण

बँकेचे नाव : Bank of Maharashtra शाखेचे नाव : शिवशाही सोलापूर

बचत खाते क्रमांक : 60167682010 बचत खात्याचे नाव : हिंदु जनजागृती समिती

आयएफ्एस्सी क्रमांक : MAHB0000668

विशेष सूचना : धर्मदान म्हणून बँकेत निधी जमा केल्यानंतर त्यासंबंधीची तपशीलवार माहिती accsamiti@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावी किंवा श्री. सुरजित माथुर यांना ०८४५१००६०७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना, तसेच वाचक आणि हिंदुत्ववादी यांना विनंती

एखादे वृत्त किंवा अन्य महत्त्वाचे लिखाण हिंदीत भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा 
वापर न करता हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील लिखाणाचा वापर करा !
       दैनिक सनातन प्रभातमध्ये राष्ट्र आणि धर्म विषयक वृत्ते, तसेच अन्य महत्त्वपूर्ण लिखाण प्रतिदिन प्रसिद्ध होत असते. हे लिखाण देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांच्यापर्यंत पोचण्यासाठी वाचक आणि हिंदुत्ववादी ते हिंदीत भाषांतर करून व्हॉट्स अ‍ॅप किंवा सामाजिक संकेतस्थळांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) पाठवत असतात; मात्र काहीजण हे लिखाण हिंदीत भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटर या संगणकीय प्रणालीचा वापर करतात. या संगणकीय प्रणालीचा वापर करून केलेल्या भाषांतराची वाक्यरचना अर्थपूर्ण होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एखादे वृत्त अशा पद्धतीने भाषांतर करून पाठवल्यास त्याची वाक्यरचना अयोग्य पद्धतीने होऊन त्यातून चुकीचा अर्थ ध्वनीत होतो. त्यामुळे गुगल ट्रान्सलेटरचा वापर करण्याचे टाळावे. अशी वृत्ते किंवा लिखाण हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळांवर त्या दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी हिंदीतून प्रसिद्ध होत असते. त्यामुळे ही वृत्ते कॉपी करून सामाजिक संकेतस्थळांद्वारे सर्वांना पाठवावीत. एखादे वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले नसल्यास ते वृत्त हिंदी जाणणार्‍या व्यक्तीकडून भाषांतर करून पाठवावे. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन विशेषांक

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : १२ जून २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ जून या
दिवशी दुपारी ३.३० पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - वैशाख कृष्ण पक्ष चतुर्दशी (४.६.२०१६) सकाळी ११.५० वाजता
समाप्ती - वैशाख अमावास्या (५.६.२०१६) सकाळी ८.३० वाजता
आज अमावास्या आहे.
न एषा तर्केण मति: आपनेया 
प्रोक्ता अन्येन एव सुज्ञानाय, प्रेष्ठ।
यां त्वम् आप: सत्यधृति: बत असि त्वादृग्
नो भूयात् नचिकेत: प्रष्टा ॥ (कठोपनिषद् १.२.९)
       अर्थ : यमराज म्हणतो, हे प्रियतमा (नचिकेता) ! तुला जे हे ज्ञान (मजकडून) प्राप्त झाले आहे, ते स्वत:च्या तर्काने प्राप्त होणे शक्य नाही. दुसर्‍याकडून (गुरूकडून) सांगितले, तरच ते चांगले समजते. खरोखर तू सत्याची सदृढ निष्ठा बाळगणारा आहेस. तुझ्यासारखा (जिज्ञासू) प्रश्‍न विचारणाराच आम्हाला हवा असावा (मिळावा).

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.

१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.

१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता: तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.

१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेले ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

हा अंक संग्रही ठेवा !
     साधकांनी दैनिक सनातन प्रभातचा वायूप्रदूषण आणि उपाय विशेषांक वितरकांकडे जमा करावा. वितरकांनी ते अंक सनातन प्रभातच्या कार्यालयात जमा करावेत. ज्या वाचकांना अंक वाचून झाल्यानंतर जमा करायचे असतील, त्यांनी ते सनातन प्रभातच्या वितरकांकडे जमा करावेत.

या काळातील एकमेवाद्वितीय प.पू. डॉक्टर !

(पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले
       आदर्श अवताराप्रमाणे विश्‍वकल्याणासाठी सगुण कार्याची अत्याधिक तळमळ आणि ईश्‍वराप्रमाणे निर्गुणाशी तादात्म्य पावण्याची क्षमता असलेले प.पू. डॉक्टर हे या काळातील एकमेवाद्वितीय आहेत, यात दुमत असू शकत नाही.
- (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. 
--------------------------------------------
       परात्पर गुरु झाल्यावरही त्यांनी निर्माण केलेल्या गुरुकृपायोगाप्रमाणे त्यांनी अहंनिर्मूलन आणि देवतांचे गुण अंगीकृत करण्यासाठी गुणसंवर्धन साधना चालू ठेवली आहे. गुरु असूनही जन्मभर आदर्श शिष्याप्रमाणे साधना चालू ठेवावी लागते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प.पू. डॉक्टर. त्यांनी साधकांसमोर हा आदर्श ठेवला आहे.
- (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास

गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.

भावार्थ : 'गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे', यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. 'गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे', यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.

(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)
साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना 'श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले', असे संबोधण्यास सांगितले असण्याचा अर्थ लक्षात घ्या !

सप्तर्षी जीवनाडीतील मजकूर सांगणार्‍या महर्षींनी मला 'श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले', असे संबोधण्यास सांगितले आहे. साधकांना ही अपूर्व गोष्ट वाटेल. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, काही संतांना 'अनंत श्री', असे संबोधतात. त्यांच्या मानाने मी कोठेच नाही, हे लक्षात घ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवलेपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात गुन्हेगार कोण आहे, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.

- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोन पिढ्यांत भारतीय पर्यावरणाचा सर्वनाश करून पुढील कित्येक पिढ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे स्वार्थी सर्वपक्षीय राज्यकर्ते !

परात्पर गुरु डॉ. आठवले
      पर्यावरणात वनस्पती, मानव आणि पशू-पक्षी हे सजीक घटक आणि वायू, पाणी (जलाशय, नद्या इत्यादी) आणि भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटकाला देवतासमान पुजणार्‍या हिंदु संस्कृतीमुळे ते लाखो वर्षे सुरक्षित होते; मात्र स्वातंत्र्यानंतर निधर्मी भारतात त्यांची विनाशाच्या दिशेने वेगाने वाटचाल चालू झाली. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. 
१. वृक्षांचा नाश (भूमी आणि वायू प्रदूषित होण्याचे कारण) 
     एकेकाळी भारतात सर्वत्र वनराई असायच्या. लाकडाच्या मोहापायी राज्यकर्त्यांनी इतकी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे की, देश उजाड झाला आहे. वृक्षांमुळे वायूचे शुद्धीकरण व्हायचे. आता वृक्षच नसल्यामुळे प्रदूषित हवाच घ्यावी लागते. वृक्षांमुळे निर्माण होणार्‍या गारव्याने पृथ्वीवरील वायूमान थंड असायचे. आता ते तापमान ग्लोबल वार्मिंगच्या रूपात वाढत आहे. वृक्षांचा नाश केल्याने देशातील भूमीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

प्रत्येक कृती परमेश्‍वरी कार्य म्हणून करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्‍वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्‍वर आपल्यापासून फार दूर नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


सत्तेचे राजकारण !

संपादकीय 
      तमिळनाडूचे जयललिता सरकार रमझानच्या काळात राज्यातील तीन सहस्र मशिदींना विनामूल्य तांदूळ देणार आहे, तर तेलंगण शासन मुसलमानांना नवीन कपडे आणि इफ्तार पार्टी यांसाठी २६ कोटी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री ५ कोटी रुपये खर्च करणार आहेत. मुसलमानांचे सण साजरे होण्यासाठी देशातील या दोन राज्यांनी दाखवलेली ही आत्मियता आहे. त्यांचे अनुकरण देशातील उरलेली राज्येही करतील, यात शंका नाही. मुसलमानांना मिळणारे शासकीय उत्तेजन आणि साहाय्य पाहून कुणा हिंदूंनी त्यांच्या सणावारी शासकीय साहाय्य मागितले, तर त्यात नवल असे काही नसेल.

बांगलादेशींची घुसखोरी थांबणार ?

संपादकीय 
      भारत आणि बांगलादेश यांच्यातील आसाम राज्याशी निगडित असलेली २२३ किलो मीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा येत्या वर्षभरात पूर्णपणे सीलबंद करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सीमा बंद करण्याचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी आशा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. आसाम विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी भाजपच्या घोषणापत्रात बांगलादेशमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारत-बांगलादेश सीमा संपूर्णपणे सीलबंद करण्याचे सूत्र मांडले गेले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn