Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

शनैश्‍चर जयंती 
 शनिशिंगणापूर येथे आज यात्रा

(म्हणे) सनातनला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न चालू आहे !

  • काँग्रेसला लागलेली घरघर न पहाता निरपराध सनातनवर बंदी आणण्यासाठी जीव तोडून प्रयत्नरत असलेले काँग्रेसी !
  • काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कांगावा !
        कोल्हापूर - काँग्रेसने सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे कागदपत्रे आणि पुरावे यांसह केली होती अन् आजही तीच कायम आहे. या सरकारने अजूनपर्यंत भूमिका मांडलेली नाही; मात्र काहींना दोषमुक्त करून सनातन संस्थेला क्लीन चीट देण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे, असा कांगावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २ जून या दिवशी केला. बंदी घालता येत नसेल, तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करा, असेही चव्हाण उपरोधिकपणे पुढे म्हणाले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांचा चरणस्पर्श

  • प.पू. आबा उपाध्ये यांचा सनातनच्या वतीने सन्मान
  • सनातनच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग या ग्रंथाचे प्रकाशन
डावीकडून पू. (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ,
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि १. प.पू. आबा उपाध्ये अन् २. सौ. मंगला उपाध्ये
यांचे औक्षण करतांना सनातनचे साधक दाम्पत्य श्री. स्नेहल आणि सौ. समृद्धी राऊत
प.पू. आबा उपाध्ये (बसलेले) यांचा सन्मान करतांना
पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि बाजूला बसलेल्या सौ. मंगला उपाध्ये
डावीकडून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. आबा
उपाध्ये, सौ. उपाध्ये यांचा सन्मान करतांना पू.(सौ.) बिंदा सिंगबाळ
      रामनाथी - रामनाथी, गोवा येथील आश्रमातील सनातनच्या साधकांना दोन महान विभूतींच्या भेटीचा आनंद घेण्याचा योग जुळून आला ! परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या भेटीसाठी पुणे येथील थोर संत प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला उपाध्ये यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १ जूनला शुभागमन झाले. त्यांचे २ जून या दिवशी आश्रमदर्शन, तर ३ जून या दिवशी सन्मानसोहळा, ग्रंथप्रकाशन आणि गीतरामायणाचा सोहळा पार पडला.

आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक ठार, तर ७ जण घायाळ !

आतंकवाद्यांच्या आक्रमणात वारंवार सैनिक मरू 
देणारा जगातील एकमेव देश भारत ! अन्य देशांत 
आतंकवादी मरतात, तर भारतात सैनिक मरतात !
       श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बीजबेहरा येथे जिहादी आतंकवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या पथकावर केलेल्या आक्रमणात २ सैनिक ठार झाले, तर ७ जण घायाळ झाले आहेत. या आक्रमणाचे दायित्व हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेने घेतली आहे. आतंकवादी येथील एका शासकीय रुग्णालयात लपून बसले असून रात्री उशिरापर्यंत सैन्यासमवेत त्यांची चकमक चालू होती.

गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर अनधिकृत छापे टाकणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांना निलंबित करा ! - समस्त हिंदुत्ववादी संघटना

सनातन आश्रम आणि साधकांची 
निवासस्थाने येथे छापे घातल्याच्या 
प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर 
जिल्हाधिकार्‍यांसाठी तहसीलदार श्री. दिलीप
सावंत यांना निवेदन सादर करतांना धर्माभिमानी
       कोल्हापूर, ३ जून (वार्ता.) - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) अधिकार्‍यांनी १ जून या दिवशी पहाटे ६ वाजता पुणे येथील सौ. कांचन दिलीप अकोलकर यांच्या घरावर अनधिकृतपणे छापा टाकून घरफोडी करून साहित्य जप्त केले. श्री. अकोलकर यांचा मुलगा सारंग अकोलकर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे. अन्वेषण यंत्रणांकडून हिंदूंना बळी देण्याचे प्रकार थांबवावेत. अन्वेषण यंत्रणेच्या हालचाली एका राजकीय नेत्याकडे कशा गेल्या, याचे अन्वेषण करण्यात यावे. हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातील अन्याय थांबवावा आणि दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर चिटणीस तथा तहसीलदार दिलीप सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

मराठवाड्यात जनावरांचा चारा संपुष्टात

  • दुष्काळाची दाहकता !
  • ४९ लक्षहून अधिक जनावरांचा प्रश्‍न बिकट
        संभाजीनगर, ३ जून - मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे जनावरांना देण्यात येणारा चारा संपला आहे. त्यामुळे दुभत्या ४९ लक्ष ७९ सहस्र जनावरांचा प्रश्‍न बिकट झाला आहे. चारा संपल्याने जनावरांचा सांभाळ करणे शेतकर्‍यांना अवघड जात असून मराठवाड्यामध्ये लवकरात लवकर चारा छावण्या चालू कराव्यात, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहेत.
        येथील धरणेही कोरडीठाक पडलेली आहेत. मराठवाड्यातील ५८ लक्ष नागरिक ३ सहस्र ९०० टँकरवर अवलंबून आहेत. भूगर्भातील पाणी पातळीही ५ मीटरहून अधिक खोलवर गेली आहे.

मथुरेतील हिंसाचारात पोलीस अधीक्षक, पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि २२ आंदोलक ठार

  • या राज्यातील जनतेचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट का लागु करत नाही ?
  • समाजवादी पक्षाच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेला उत्तरप्रदेश !
  • अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या पोलिसांना स्वतंत्र विश्‍वम् भारत सत्याग्रह आंदोलकांकडून विरोध
       मथुरा - जिल्ह्यातील जवाहर बाग येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्वतंत्र विश्‍वम् भारत सत्याग्रह आंदोलकांकडून आक्रमण झाल्याची घटना २ जूनच्या रात्री घडली. या वेळी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात २ पोलीस अधिकारी ठार झाले. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत २२ जण ठार झाले, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. ठार झालेल्या पोलिसांमध्ये पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष कुमार यांचा समावेश आहेत. तसेच महानगर दंडाधिकारी राम अरज यादव यांच्यासह ५ पोलीस घायाळ झाले आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मथुरेतील हिंसाचाराविषयी दूरभाषवरून अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली
१. जवाहर बाग येथील अनधिकृत बांधकामे हटवण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने ही अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम चालू केली होती.

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शुद्धलेखनाच्या असंख्य चुका !

कर्नाटक शासनाचा भोंगळ कारभार !
बेळगाव, ३ जून (वार्ता.) - शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना दिलेल्या मराठी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात शुद्धलेखनाच्या चुका आढळून आल्या आहेत. भाषांतर करतांना पुस्तकांमध्ये चुकीच्या शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. (या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! - संपादक) चुका पाहून शिक्षकांनीही खेद व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत या चुका शिक्षकांना दुरुस्त करून घ्याव्या लागणार आहेत.

१. पुस्तकांचे भाषांतर करतांना शब्दांचा अर्थ आहे तसा देणे आवश्यक असते; मात्र सरकारच्या ठिकाणी सर्कार आणि शारीरिक शिक्षणच्या ठिकाणी शारीरिक शिक्षा यांसह अनेक शब्द चुकीचे दिले आहेत. प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकांमधील पाठांमध्ये पुष्कळ मोठ्या चुका करण्यात आल्या आहेत.

२. मराठीतील तज्ञ शिक्षकांच्या साहाय्याने भाषांतर न करता ते संगणकाच्या आधारे केले जात असल्याने चुका होत आहेत.

एकनाथ खडसे यांच्या बाजूने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली पाठराखण !

पक्षाला फटका न बसण्यासाठी खडसे यांच्यावरील कारवाई टळणार !

मुंबई, ३ जून (विशेष प्रतिनिधी) - भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर तातडीने कोणतीच कारवाई होणार नसल्याचे संकेत ३ जून या दिवशी भाजपकडून देण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे यांनी ३ जून या दिवशी सकाळी जालना येथे खडसे यांची पाठराखण करतांना मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्ष श्री. अमित शहा यांना दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल त्यांच्या बाजूनेच असल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले. गृहनिर्माणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय श्री. प्रकाश मेहता यांनीही खडसे यांच्या पाठीशी पक्ष आणि शासन खंबीरपणे उभा रहाणार असल्याचे म्हटले आहे. या दोघांच्या वक्तव्यानंतर खडसे यांना 'क्लिन चीट' मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेने आतंकवादावरून पाकला फटकारले !

       वॉशिंग्टन - दक्षिण आशिया-आतंकवादाविरुद्ध लढ्यातील एक अग्रेसर भाग या अमेरिकेच्या वर्ष २०१५ च्या अहवालामध्ये आतंकवादी आणि त्यांच्या संघटनांवरील कारवाईसंदर्भात चालवलेल्या चालढकलीविषयी आणि एकूणच गलथानपणावरून पाकिस्तानवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
       आतंकवादी संघटनांच्या लोकांकडून पैसा गोळा करण्याच्या, तसेच आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्योगांवरही पाकिस्तानचे नियंत्रण राहिलेले नाही, असे या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानने स्वदेशात कारवाई करणार्‍या आतंकवाद्यांविरुद्ध कृती केली; परंतु इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणार्‍या आतंकवाद्यांविरुद्ध पाकिस्तानची कृती पुरेशी नसल्याचेही यात म्हटले आहे.

गुंडगिरी, अमली पदार्थांचा व्यापार आणि अनैतिक व्यवहार यांना आळा घालणार ! - सॅमी तावारीस, पोलीस उपअधीक्षक

काणकोण भागात अमली पदार्थ, अनैतिक व्यवहार आणि गुंडगिरी यांमध्ये वाढ झाल्याचे प्रकरण
     काणकोण - तालुक्यात वाढत असलेली गुंडगिरी, अमली पदार्थांचा राजरोस व्यापार आणि अनैतिक व्यवहार यांवर एका मासाच्या कालावधीत आळा घालण्यात येणार असल्याचे आश्‍वासन पोलीस उपअधीक्षक सॅमी तावारीस यांनी पाळोळे येथे ग्रामस्थांना दिले. 
    काणकोण तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनुमाने ७० ते ८० युवकांचा एक गट वावरत असून तो अमली पदार्थ आणि अनैतिक व्यवहार यांमध्ये गुंतलेला आहे. दिवसाढवळ्या तलवारी घेऊन हा गट वावरत असतो, तसेच मिळेल त्यांना मारहाण केली जाते. काणकोण येथील जागरूक नागरिकांनी हे पोलिसांच्या दृष्टीस आणून दिल्यानंतर लोकांची मते जाणून घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत पोलीस उपअधीक्षक तावारीस यांनी उपरोल्लेखित आश्‍वासन दिले. बैठकीत नागरिकांनी पोलिसांकडे काणकोण भागात मागील काही वर्षांपासून काम करणार्‍या पोलिसांचे अन्यत्र स्थानांतर करा, रात्रीची गस्त वाढवा, पाळोळे येथे पोलीस चौकीची स्थापना करा आणि गैरव्यवहारांत गुंतलेल्या युवकांची माहिती गोळा करून त्यांना तडीपार करा अशा मागण्या केल्या. (तलवारी घेऊन एक गट तालुक्यात वावरत असतांना पोलिसांच्या नजरेत कसा काय पडला नाही ? आता लोकांनी सांगितल्यावर तरी पोलिसांनी जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि यामागील मूळ नष्ट करावे, ही जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)

आसाममधील भारत-बांगलादेश सीमा वर्षभरात सीलबंद करणार ! - केंद्रशासन

केंद्रात सत्तेवर आल्यानंतरही हा निर्णय घेण्यास २ वर्षे का लागले, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे !

नवी देहली - भारत आणि बांगलादेश यांच्यातील आसाम राज्यात असलेली २२३ कि.मी. लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा येत्या वर्षभरात पूर्णपणे सीलबंद करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सीमा बंद करण्याचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी आशा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
सीमेपार वहाणार्‍या नद्यांकाठचा भाग सीलबंद करण्यासह अन्य सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणींवर मात करून ही सीमा बंद करण्यात येणार आहे.

तमिळनाडूत जयललिता सरकार रमझानच्या काळात शिरखुर्म्यासाठी ३ सहस्र मशिदींना विनामूल्य तांदूळ देणार !

निधर्मी भारतात कधी हिंदूंच्या सणांच्या वेळी एखाद्या 
शासनाने हिंदूंना विनामूल्य असे काही वाटले आहे का ? 
ढोंगी निधर्मीवादी या निर्णयाचा विरोध करणार नाहीत !
       चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी रमझानच्या मासात शिरखुर्मा बनवण्यासाठी मशिदींना विनामूल्य तांदूळ पुरवण्यात यावा, असा आदेश संबंधित शासकीय यंत्रणांना दिला आहे. पुढील मासात रमझान आरंभ होणार आहे. या मासात राज्यातील ३ सहस्र मशिदींना ४ सहस्र ६०० टन तांदूळ वाटण्यात येणार आहे. वर्ष २००१ मध्ये जयललिता यांनी असाच आदेश काढला होता. या योजनेचे मुसलमानांनी स्वागत केले होते. ही योजना यापुढेही चालूच ठेवण्याची मुसलमान नेत्यांनी केलेली विनंती जयललिता यांनी मान्य केली आहे. यामुळे राज्यावर २ कोटी १४ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.


दुहेरी नागरिकत्व असलेल्यांना लवकरच एका देशाची निवड करावी लागेल !

गोव्यातील दुहेरी नागरिकत्व प्रकरण
     नवी देहली - दुहेरी नागरिकत्वाचा लाभ घेणार्‍या २ लक्ष गोमंतकियांना आता लवकरच भारत किंवा पोर्तुगाल यामधील एका देशाची निवड करावी लागेल. गोव्यातील दुहेरी नागरिकत्व प्रकरणी तोडगा काढण्यासाठी गतवर्षी अतिरिक्त सचिव बी.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एका समितीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने स्वीकारला आहे.
     गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने केंद्रशासन दुहेरी नागरिकत्व प्रकरण धसास लावण्यास इच्छुक असल्याचे एका शासकीय अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले. या शासकीय अधिकार्‍याने पुढे सांगितले की, केंद्रशासनाने उपरोल्लेखित निर्णय घेतल्यास त्याचा फटका २ लक्ष गोमंतकियांना बसणार आहे. पोर्तुगाल शासनाने २ लक्ष गोमंतकियांना पोर्तुगालचे नागरिकत्व दिलेले आहे आणि कायद्यानुसार त्यांचे भारतीय नागरिकत्व समाप्त होत असते. शासन नियुक्त समितीने अहवालात एक प्राधिकरण नेमून दुहेरी नागरिकत्वासंबंधीचे प्रत्येक प्रकरण पारदर्शक पद्धतीने हाताळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दुहेरी नागरिकत्व स्वीकारलेल्यांना आता भारतात रहायचे असेल, तर पोर्तुगीज नागरिकत्वाचा त्याग करावा लागेल किंवा भारतीय व्हिसाची मुदत वाढवून घ्यावी लागेल.इंग्रजी माध्यमांतील शाळांचे अनुदान कायम ठेवणार ! - गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर

ख्रिस्त्यांच्या मतांसाठी इंग्रजीला अनुदान देणार्‍या भाजपला मातृभाषाप्रेमी जनतेने मते का द्यावीत ?
     पणजी, ३ जून (वार्ता.) - गोव्यातील शासन हे पंतप्रधान मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालत आहे. सर्वांचाच विकास व्हायला हवा, यासाठी इंग्रजीचे अनुदान कायम ठेवले जाणार आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. (याचा अर्थ सरकार मातृभाषाप्रेमींना साथ देणार नाही का ? - संपादक) भारतीय भाषा सुरक्षा मंचने इंग्रजीचे अनुदान बंद करण्यासंदर्भात दिलेल्या मुदतीविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. 
     मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण हा या शासनाचा मंत्र आहे. त्याचे समर्थन शासन करत आहे. सर्वांना बरोबर घेऊन जावे, हा मंत्र मोदी शासनाने दिला आहे. गोवा शासन त्याचे पालन करत आहे. इंग्रजीला अनुदान दिलेले आहे आणि ते आता परत मागे घेता येणार नाही.

भाजपला युवाशक्ती दाखवू ! - उदय शिरोडकर

भाभासुमंची पणजी येथे युवा रॅली
     पणजी - प्रादेशिक भाषेतील प्राथमिक शाळांनाच शासकीय अनुदान द्यावे, या मागणीला अनुसरून भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमं) आरंभलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या युवा नेत्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढून याविषयी जागृती केली. या रॅलीनंतर पत्रकारांशी बोलतांना मंचचे युवा कार्यकर्ते उदय शिरोडकर यांनी भाजपला युवाशक्ती दाखवू, अशी चेतावणी दिली. आता जिंकू किंवा मरू या निश्‍चयानेच लढा दिला जाणार असल्याचे शिरोडकर यांनी पुढे म्हटले.

तेलंगण सरकार रमजान मासात इफ्तार आणि कपडेवाटप यांवर २६ कोटी रुपये खर्च करणार

बहुसंख्य हिंदु करदात्यांच्या 
पैशांवर निधर्मी राज्यकर्त्यांचे मुसलमानप्रेम !
       भाग्यनगर - तेलंगणातील तेलंगण राष्ट्रीय समितीच्या सरकारने राज्यातील २०० मशिदींमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्यासाठी आणि गरीब मुसलमानांना कपडे वाटण्यासाठी २६ कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे. या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री महम्मद महमूद अली त्यांच्या निधीतून १० जिल्ह्यांना प्रत्येकी ५० लक्ष रुपये असे एकूण ५ कोटी रुपये देणार आहेत.
       या वर्षी कपडेवाटप करतांना त्यात साडी, कुर्ता, पायजमा, गोल टोपी आणि १ किलो शेवया प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार आहेत. याचा लाभ २ लक्षाहून अधिक मुसलमानांना मिळेल, अशी अपेक्षा सरकारी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदार संघातील ५ मशिदींची निवड करून तेथे सरकारी पैशाने इफ्तार पाटर्या आयोजित करण्यात येणार आहेत.

भारतात मद्यसेवन करणार्‍यांच्या संख्येत ३८ टक्क्यांनी वाढ !

पाश्‍चात्त्यांचे 
अंधानुकरण करणार्‍या भारताची प्रगती !
      नवी देहली - देशातील अनेक राज्यांमध्ये मद्यबंदी असली, तरी देशभरात मद्याच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्याही अधिक आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या नव्या अहवालानुसार भारतात प्रतिदिन १५, तर प्रत्येक ९६ मिनिटाला एका व्यक्तीचा अतिरिक्त मद्यसेवनाने मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यातही महाराष्ट्रात मद्यसेवनाने मृत्यू होणार्‍यांची संख्या ही सर्वाधिक आहे, असे म्हटले आहे. त्यातही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात मद्यसेवन करणार्‍यांची संख्या ३८ टक्क्यांनी वाढली आहे.
१. वर्ष २०१४ मध्ये मद्यसेवनामुळे प्रतिदिन मृत्यू होणार्‍यांची सरासरी संख्या ५ होती. वर्ष २०१५ मध्ये ती १५ झाली आहे.
२. मद्यसेवनामुळे मरणार्‍यांच्या संख्येत महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.

भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीची बैठक तातडीने घेणार ! - जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल

पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांना निवेदन देतांना उजवीकडून श्री. दत्तात्रय वाघुळदे, श्री. जयंत लेकुरवाळे, श्री. विश्‍वनाथ पाटील, अख्तर पिंजारी आणि श्री. सुनील घनवट

जिल्हाधिकारी सौ. रूबल अग्रवाल यांना निवेदन देतांना उजवीकडून कु. प्रतिक्षा कोरगावकर, अख्तर पिंजारी, श्री. विश्‍वनाथ पाटील, श्री. सुनील घनवट
हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या संघटित आंदोलनाचा परिणाम !

जळगाव - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयीची अनास्था, राजकीय हेवेदावे, श्रेयवादाची लढाई आणि नगरपरिषदेचे ढीम्म प्रशासन यामुळे भुसावळ येथे मागील १९ वर्षांपासून पुतळ्याचे काम प्रलंबित राहिले आहे. या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली भुसावळमधील धर्मप्रेमी आणि शिवप्रेमी हिंदूंनी २ जून या दिवशी विराट मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या मोर्च्याचा परिणाम म्हणून जिल्हाधिकारी सौ. रूबल अग्रवाल यांनी प्रलंबित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयीची निर्णयप्रक्रिया पुढे नेण्याच्या दृष्टीने पुतळा समितीची बैठक तातडीने घेणार असल्याचे सांगितले.

वाराणसी येथील हिंदु युवा वाहिनीचे राज्य उपाध्यक्ष मनीष पांडे यांना मारहाण !

हिंदूंनो, अशा आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
घायाळ अवस्थेत असलेले श्री. मनीष पांडे
      वाराणसी - हिंदु युवा वाहिनीचे उत्तरप्रदेश राज्याचे उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याची घटना ३१ मे या दिवशी घडली. हे आक्रमण भूमीच्या प्रकरणावरून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आक्रमण करणार्‍यांनी या वेळी श्री. पांडे यांच्याकडील २५ सहस्र रुपयेही लुटले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी श्री. पांडे यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी श्री. पांडे यांच्या माहितीवरून शानू खान, विकास श्रीवास्तव, गोलू यादव आणि काही अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
हिंदु युवा वाहिनीकडून मारहाणीच्या 
विरोधात आंदोलन !
    या मारहाणीच्या विरोधात २ जून या दिवशी हिंदु युवा वाहिनी आणि विश्‍व हिंदु महासंघ यांच्याकडून निषेध मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली. कारवाई न झाल्यास संघटनेकडून मोठे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली.

न्यायालयात पूर्णवेळ उपस्थित राहा ! - राज्य सरकारचे सरकारी अधिवक्त्यांना निर्देश

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे होऊनही असे सांगावे लागते, हे लज्जास्पद आहे !

मुंबई - सरकारची बाजू मांडणारे सरकारी वकील अनेकदा न्यायालयात अनुपस्थित रहात असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे गैरसोयीसमवेत न्यायाधिशांची अप्रसन्नताही ओढवून घ्यावी लागते. यामुळे या विषयाची गंभीर नोंद घेत या वकिलांनी कार्यालयीन वेळेत आणि कामकाज चालू असेपर्यंत पूर्णवेळ न्यायालयात उपस्थित राहावे, असा शासननिर्णय (जीआर्) राज्यशासनाने नुकताच जारी केला आहे.

विविध कनिष्ठ न्यायालये, तसेच उच्च न्यायालयात सरकार, पोलीस किंवा सरकारी अधिकारी यांची बाजू मांडण्याचे काम सरकारी वकील करतात. ते न्यायालयात उपस्थित नसल्यास सरकारची बाजू मांडली जाणार नाही, हे उघड आहे; किंबहुना अनेकदा तसेच होत असल्याने न्यायालयाच्या रागाचा फटका सरकारला बसतो. अनेकदा सरकारला दंडही भरावा लागतो. न्यायाधीश लेखी आदेशात नाराजी व्यक्त करतात किंवा खटलाही रहित करतात. त्यामुळे सरकारी अधिवक्त्यांच्या अनुपस्थितीची सरकारने गंभीर नोंद घेतली आहे. 

मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भीती घालवण्यासाठी वैदिक गणिताचे घेण्यात येत आहे साहाय्य !

हिंदु धर्माची देणगी असलेल्या वेदांचे वैज्ञानिक महत्त्व !
       भोपाळ - मध्यप्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांची गणित आणि भाषेच्या विषयांमध्ये असलेली कामगिरी राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. एन्सीईआर्टी या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली. या पार्श्‍वभूमीवर आणि मुलांना असलेली गणिताची भीती दूर करण्यासाठी भोपाळमध्ये नुकतेच वैदिक गणिताचे आठवडाभराचे एक शिबीर भरवण्यात आले होते. भोपाळ शहरातील सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेत झालेल्या या शिबीराला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मिळून २९५ जण सहभागी झाले होते. या संदर्भात बोलतांना वैदिक गणिताचे तज्ञ विनय नायर म्हणाले की, वैदिक गणितामुळे बीजगणितातील किचकट वाटणारी समीकरणे काही सेकंदात सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. तसेच वैदिक गणितातील युक्त्यांमुळे गणिते लवकर सोडवण्याबरोबरच मुलांमध्ये असलेल्या गणिताचे भय नष्ट होते. (वेदांना थोतांड म्हणणारे पुरोगामी आता गप्प का ? - संपादक)

छत्तीसगड येथे मंदिर वाचवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र !

मंदिर रक्षणासाठी काँग्रेसने आवाज उठवणे, याला आश्‍चर्यच म्हणावे लागेल. 
अर्थात यामागे काही राजकीय लाभ असल्याचे नाकारता येत नाही !
     रायपूर - येथील एक मंदिर आणि व्यापारी संकुल तोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला विरोध केला जात आहे. व्यापारी संकुल छत्तीसगड विधानसभा अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल आणि त्यांच्या परिवाराचे आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे मंदिर आणि व्यापारी संकुल भूमी बळकावून बांधण्यात आले आहे. सदर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात छत्तीसगडचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सहभागी झाले होते. मंदिर वाचवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. विरोध करण्यासाठी प्रत्येक दिवस प्रार्थना, हस्ताक्षर मोहीम आणि मोर्चे काढले जात आहेत. तसेच सामाजिक संकेतस्थळावरूनही विरोध केला जात आहे. विश्‍व हिंदु परिषद, शिवसेना आणि बजरंग दल यांच्यासहित काही सामाजिक संघटनाही यात सहभागी झाल्या आहेत. भाजपचा अल्पसंख्यांक विभाग मंदिर वाचवण्यासाठी हस्ताक्षर मोहीम चालवत आहे.

५० वर्षांत एकही चोरी न झालेले राजस्थानमधील देवमाली गाव !

हिंदु राष्ट्रातील प्रत्येक गाव असे असेल ! 
     जयपूर - राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील देवमाली गावात एकाही घराला कधी टाळे लावले जात नाही, तरीही गेल्या ५० वर्षांत येथे चोरीची एकही घटना घडल्याची पोलीस ठाण्यात नोंद नाही. 
१. येथील नागरिक घराचे छत बांधण्यासाठी क्राँक्रीट अथवा लोखंडाचा वापर करत नाहीत. त्यांची धारणा आहे की, तसा कोणी प्रयत्न केला, तर गावावर संकट येऊ शकते. 
२. गावातील सर्व घरांमध्ये चुलीवर जेवण बनवले जाते. काही थोड्या घरांमध्येच वीज आहे. 
३. गावाच्या भूमीची नोंदणी भगवान देवनारायण याच्या नावाने करण्यात आलेली आहे. 
४. गावातील सर्व घरे कच्चे आहेत. त्यांना कोणी पक्के करण्याचा प्रयत्न केला, तर ते आठवडाभरही टिकत नाहीत. 
५. गावकरी सांगतात की, त्यांची भगवान देवनारायणावर श्रद्धा आहे. ते त्याच्याच नियमानुसार वागतात. तरुणांनाही या नियमाबाहेर वागण्याची अनुमती नाही. 
६. गावात ८० कुटुंबे आहेत; मात्र कोणीही मद्य किंवा मांसाहार करत नाही.


तिरुपती देवस्थानाजवळ बांधण्यात येणार्‍या इस्लामी विश्‍वविद्यालयाच्या बांधकामाविषयी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज !

    भाग्यनगर (हैद्राबाद) - हैद्राबाद उच्च न्यायालयाने वर्ष २०१३ मध्ये चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती देवस्थानाजवळ बांधण्यात येणार्‍या इस्लामी विश्‍वविद्यालयाचे चालू असलेले बांधकाम थांबवण्यात यावे, असे आदेश दिले होते. परंतु तेथील बांधकाम चालूच आहे. सदर माहिती मिळाल्यावर भाग्यनगर (हैद्राबाद) येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता के.व्ही. रमणमूर्ती यांनी चित्तूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून नवीन बांधकामाविषयी माहिती मागवली आहे. तसेच इस्लामी विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनाने हैद्राबाद उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांनी अद्याप दाखल का केली नाही ?, ते तपासून त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही मागवली आहे. (अधिवक्ता के.व्ही. रमणमूर्ती यांच्यासारखे धर्माभिमानीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय ! त्यांचा आदर्श सर्व धर्माभिमान्यांनी घ्यायला हवा ! - संपादक)

३ कोटी रुपयांच्या चोरीतील आरोपी मैनुद्दीन मुल्ला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार !

पोलिसांची कार्यक्षमता ?

सांगली, ३ जून (वार्ता.) - कोल्हापूर येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक वसाहतीतील ३ कोटी ७ लक्ष रुपयांच्या चोरीप्रकरणी जामिनावर सुटका झालेला प्रमुख आरोपी मैनुद्दीन मुल्ला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मैनुद्दीनची पत्नी निलोफर हिला अटक केली आहे; मात्र पोलिसांना त्यातून विशेष काही हातात लागले नाही. या प्रकरणात दुचाकी गाडी बुलेट आणि सदनिका भेट घेतलेल्या इमरान नदाफ आणि समीर मुल्ला या दोन पोलिसांना निलंबित केले आहे.

कुत्र्यांना दगड मारल्याने ६ जणांविरोधात गुन्हा !

      एकीकडे गेली ७ वर्षे सनातनच्या आश्रमावर दगड फेकणे, पेट्रोल बॉम्ब फेकणे यांसारख्या घटना घडत असतांना त्याविरोधात गुन्हा प्रविष्ट करूनही संबंधितांवर कारवाई होत नाही आणि त्याचे वृत्त प्रसारमाध्यमे देत नाहीत, तर दुसरीकडे कुत्र्यांना दगड मारल्यावर मात्र बातमी होते, यावरून जनतेने काय समजायचे ?
     गुरुग्राम (गुडगाव) - येथील डीएल्एफ् फेज-२ परिसरात भटक्या कुत्र्यांना दगड मारल्याने ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे रहाणार्‍या सोनिया धींगडा यांनी पोलीस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनिया यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या घराजवळ असणार्‍या ८ भटक्या कुत्र्यांना त्याच परिसरात रहाणारे ६ जण दगड मारतात तसेच मारहाणदेखील करतात. या मारहाणीत काही कुत्रे घायाळ झाले असून सोनिया यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी सोनिया यांची तक्रार दाखल करून घेतली आहे.तेलंगण राज्याच्या दुसर्‍या वर्धापनानिमित्त मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना देवतांच्या रूपात दाखवले !

राजकारण्यांना देवतांच्या रूपात दाखवून देवतांचा अनादर करणारे हिंदु धर्मद्रोहीच होत ! 
संकटकाळात ईश्‍वर अशा हिंदूंचे रक्षण करील का ?
     भाग्यनगर (हैद्राबाद) - तेलंगण राज्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (के.सी.आर्.) यांना त्यांच्या समर्थकांनी देवतांच्या रूपात दाखवले. अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांना श्रीराम, तेलंगण गांधी आणि भगीरथाच्या वेशात दाखवून त्यांचे भले मोठे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. 
१. मुख्यमंत्री राव यांनी गावोगावी पाणी पोचवण्याची ३५ सहस्र कोटी रुपयांची योजना घोषित केली आहे. त्याला भगीरथ योजना असे नाव देण्यात आले आहे.

उज्जैन सिंहस्थपर्वात हिंदूंना पर्यावरण आणि स्वच्छता यांवर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून उपदेश !

हिंदूंच्या धार्मिक पर्वात अशाप्रकारे घुसखोरी करणे, हे हिंदूंचे धर्मांतर 
करण्याच्याच कटाचा भाग आहे, हे हिंदूंच्या लक्षात येईल, तो सुदिन !
     उज्जैन - मध्यप्रदेश राज्याचे बिशप सेबास्टियन वडक्कल यांनी उज्जैन सिंहस्थपर्वात सहभागी झालेल्या एक शीख नेता आणि एक हिंदु स्वामी यांची भेट घेऊन त्यांना हिंदूंनी पर्यावरण आणि स्वच्छता पाळण्याच्या आवश्यक या विषयावर उपदेश केला. यावेळी त्यांनी हिंदु धर्मातील अध्यात्म किंवा प्राचीन थोर परंपरा यांवर मात्र बोलण्याचे टाळले. शीख जथ्थेदार ग्यानी गुरुचरण सिंह आणि स्वामी महायोगी पायलट बाबा यांची बिशप यांनी भेट घेतली होती.

कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट होण्यासाठी पुढाकार घ्या !

१. व्यक्तीगत स्तरावर करावयाच्या कृती
अ. इलेक्ट्रॉनिक गजराच्या घडळ्यांपेक्षा पारंपरिक चावीची घड्याळे वापरल्याने प्रतिदिन ४८ ग्रॅम कार्बन वाचेल.
आ. इलेक्ट्रिक टूथब्रशपेक्षा साधा टूथब्रश वापरल्याने ४८ ग्रॅम कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन घटेल.
इ. टे्रडमीलवर चालणे किंवा धावणे यांपेक्षा बागेत किंवा रस्त्यावर व्यायाम करा. त्यामुळे एक किलो कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन घटेल.

जिल्हाधिकारी सैनी यांनी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र देण्याची मागणी

कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मूर्तीच्या रासायनिक लेपाच्या प्रक्रियेमध्ये केलेल्या गंभीर चुका आणि मंदिर प्रश्‍नी वादग्रस्त विषय काढून देवस्थानची अपकिर्ती करून केलेल्या चुकांचे दायित्व स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र मुख्यमंत्र्यांकडे द्यावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी श्री अंबाबाई भक्त समितीने ३ जून या दिवशी जिल्हाधिकार्‍यांना दिली.

इसिसकडून युरोपवर आक्रमण होण्याची भीती ! - अमेरिकेची युरोपमध्ये जाणार्‍या नागरिकांना सावधगिरीची सूचना

      वॉशिंग्टन - अमेरिकेच्या शासनाने युरोपमध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या त्यांच्या नागरिकांना सावध रहाण्याची सूचना दिली आहे. शासनाने म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये युरोपात जाणार्‍या पर्यटकांची गर्दी आतंकवादी आक्रमणाचे लक्ष्य ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणे आणि मोठ्या प्रमाणावर आयोजित होणारे कार्यक्रम उदाहरणार्थ व्यापारी तसेच प्रवासी केंद्रे, प्रसिद्ध उपाहारगृहे, क्रीडा महोत्सव अशा ठिकाणी ही आक्रमणे होऊ शकतात. तसेच १० जून ते १० जुलै या कालावधीत होणारी युरो २०१६ फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा, जुलैच्या अखेरीस होणारी टूर डी फ्रान्स सायकल शर्यत आणि रोमन कॅथॉलिक चर्चचा जागतिक दिन, हे आतंकवादी आक्रमणांच्या योजनांमध्ये समाविष्ट असू शकतात.
      बेल्जियम आणि फ्रान्स येथे नुकत्याच झालेल्या आतंकवादी आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. ही सूचना ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत लागू आहे.दुष्काळामुळे उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील १३ जिल्ह्यांत ३ लक्ष गोवंशियांच्या मृत्यूला केंद्र सरकार उत्तरदायी ! - योगेंद्र यादव यांचा आरोप

     नवी देहली - उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील १३ जिल्ह्यांत दुष्काळामुळे कमीतकमी ३ लक्ष गोवंशियांचा मृत्यू झाला असून याला केंद्र सरकार उत्तरदायी आहे, असा आरोप स्वराज अभियान संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केला आहे. 
यादव यांनी मांडलेली सूत्रे -
१. भाजप सरकार गायीला राष्ट्रमाता म्हणण्यात यावे, तसेच गोहत्या बंदी कायदा व्हावा याविषयी चर्चा करते; परंतु दुष्काळामुळे आणि चार्‍याच्या अभावामुळे गोवंश मृत्युमुखी पडत आहे. त्याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे.

बडोद्यातील (गुजरात) कपुराई येथील स्थानिकांचा तेथे मुसलमानांचे पुनर्वसन करण्यास विरोध !

काश्मीरमधील हिंदूंच्या स्वतंत्र निवासी संकुलाला विरोध करणार्‍यांच्या विरोधात मौन बाळगणारे 
ढोंगी निधर्मीवादी गुजरातच्या घटनेवर मात्र तोंड उघडतील, यात आश्‍चर्य ते काय ! 
     नवी देहली - गुजरातच्या बडोदा शहरातील कपुराई येथे स्थानिक लोकांनी नगरपालिकेला पत्र लिहून ३०० हून अधिक मुसलमानांचे तेथे पुनर्वसन करण्याच्या नगरपालिकेच्या निर्णयाचा विरोध केला आहे. या पत्रात लिहिण्यात आले आहे की, मुसलमानांचे येथे पुनर्वसन केल्यास येथील शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. वाद घालणे आणि शिवीगाळ करणे मुसलमानांच्या दिनचर्येचा भाग असल्याचे मत स्थानिकांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे. ज्या मुसलमानांचे येथे पुनर्वसन केले जात आहे, ते पूर्वी सुलेमान चाळीत रहात होते. ३१८ घरांची ही चाळ झोपडपट्टी मुक्त बडोदा या योजनेअंतर्गत पाडण्यात आली आहे.

सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ३०० फुटांवरून समुद्रात पडल्याने तरुणीचा मृत्यू !

     नवी देहली - कर्नाटकमध्ये सेल्फी (भ्रमणभाष संचातील कॅमेर्‍याद्वारे स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढणे) काढण्याच्या प्रयत्नात प्रणिता मेहता या २१ वर्षीय राजस्थानी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती कायदा विषयाची विद्यार्थिनी होती. मित्र-मैत्रिणींसोबत मे मासाच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी म्हणून ती कर्नाटकातील गोकर्ण समुद्र किनार्‍यावर आली होती. येथील दीपगृहामध्ये वेगळा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना तिचा पाय घसरला आणि ३०० फुटावरून ती थेट समुद्रात पडली. वर्ष २०१५ मध्ये संपूर्ण जगामध्ये सेल्फीच्या नादात सर्वाधिक २७ मृत्यू भारतात झाले होते.चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून भारत व्हिएतनामला ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकणार !

        नवी देहली - भारताने व्हिएतनामला ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांच्या ५ दिवसांच्या दौर्‍यावर जाणार आहेत. व्हिएतनाम गेल्या ५ वर्षांपासून या क्षेपणास्त्राची मागणी करत आहे; मात्र चीनच्या भीतीमुळे तत्कालीन काँग्रेस सरकारने ते विकण्याचा निर्णय घेतला नव्हता.

प्राचीन भारतीय कालगणनेचा पुरस्कार करा !

      हिंदु संस्कृती ही सर्वांत प्राचीन संस्कृती असल्याचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे आपल्याला मिळणार्‍या तिच्यातील विविध कालगणना होत ! सध्या कलियुगातील ५११७ वे वर्ष चालू आहे. इंग्रजांच्या आक्रमणानंतर भारतातही ख्रिस्ती कालगणनेनुसार कालगणना मोजण्याची पद्धत चालू झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची विशिष्ट कालगणना चालू ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि तिने भारतातील प्राचीन विक्रम संवत्सर ही कालगणना स्वीकारली अन् त्यानुसार व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आली; परंतु सध्या सर्वांना याविषयी माहिती नाही, तसेच सर्व जण पाश्‍चात्त्यांच्या प्रभावामुळे इंग्रजी कालगणना वापरतात. राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीकोनातून भारतीय कालगणनेचा पुरस्कार करणारे श्री. मराठे यांची ज्येष्ठ पत्रकार डॉ. दामोदर नेने उपाख्य दादूमिया यांनी घेतलेली मुलाखत येथे पुनर्प्रसिद्ध करत आहोत.

म्हापसा (गोवा) येथील नागरिकांनी इमारतीत बिलिव्हर्सना रोखले !

उद्दाम बिलिव्हर्सवाले ! त्यांना आता प्रशासनाचाही धाक राहिलेला नाही, हेच यावरून लक्षात येते ! 
उपजिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावणी चालू असतांनाही प्रार्थना चालू ठेवल्याने संताप
     म्हापसा - फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी इमारतीत गेली दोन वर्षे अनधिकृतरित्या चालू असलेली बिलिव्हर्सची प्रार्थना रविवार, २९ मे या दिवशी रोखली. या वेळी काही काळ तणाव निर्माण झाला; परंतु नागरिकांनी बिलिव्हर्सच्या प्रार्थनांना विरोध कायम ठेवला. (अनधिकृत धर्मांतराला विरोध करणारे आणि उद्दाम बिलिव्हर्सवाल्यांना जशास तसे उत्तर देणार्‍या देशमुख सोसायटीतील नागरिकांचे अभिनंदन ! - संपादक)

वाचाळवीरांना आवर घालणार का ?

      सध्या बॉलिवूडशी संबंधित वादग्रस्त एआयबी (ऑल इंडिया बकचोद) या रिअ‍ॅलिटी शोमधील वादग्रस्त कलाकार तन्मय भट याने सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर खिल्ली उडवणारे विनोद आणि अश्‍लाघ्य टीका करणारे चलचित्र बनवून प्रसारित केले आहे. यावरून शिवसेना, भाजप आणि मनसे हे पक्ष आक्रमक होऊन त्यांनी पोलिसांकडे भट याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली आहे.

वाचकांच्या विशेष मागणीवरून बालवाचकांसाठीचे नियमित सदर !

बालकांसाठी परिपाठ !
आई-वडील यांचा आदर कसा राखावा ?
       उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुट्टीतील परिपाठ ! हे सदर प्रसिद्ध करण्यात आले. यातून विविध बोधकथा, लेख आदी माध्यमांतून सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी माहिती दिली गेली. आता सुट्टीचा कालावधी संपत आला असला, तरी वाचकांच्या विशेष मागणीवरून हे सदर नियमित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सदर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण होण्यास साहाय्यभूत ठरो, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना !
१. आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती 
यांना वाकून नमस्कार करावा !
     आई-वडील, तसेच घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा.
     मातृदेवो भव । पितृदेवो भव । म्हणजे, माता-पिता हे देवासमान आहेत, अशी आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे.

हिंदूंच्या कररूपी पैशांतून हज यात्रेकरूंना अनुदान !

      आपले शासन मुसलमानांना हजसाठी आणि ख्रिस्त्यांना जेरूसलेम येथे जाण्यासाठी अनुदान देते; परंतु हिंदूंना कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी कर भरावा लागतो. हिंदूंच्या बहुसंख्य देवळांचे सरकारीकरण झाले आहे. त्यांनी अर्पण केलेल्या धनाचा राजकीय आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर केला जातो. देवळांच्या भूमींवर शासन आक्रमण करते; परंतु चर्च आणि मशिदी यांच्या भूमींना हातही लावत नाही; कारण आपल्या घटनेने अल्पसंख्यांकांना त्यांच्या शैक्षणिक आणि धार्मिक संस्था विनामूल्य चालवण्याचे आश्‍वासन दिले आहे; शिवाय त्यांना अनुदानही मिळते. अशा प्रकारे हिंदु करदातेच हज यात्रेकरूंना अनुदान देणारे ठरत नाहीत का ? नाहीतरी तत्कालीन पंतप्रधानांनी म्हटलेच होते की, मुसलमानांचा भारतातील संपत्तीवर पहिला अधिकार आहे ! जय हो धर्मनिरपेक्षता !! जय हो सर्वांसाठी समानता !!! 
(त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)


प.पू. आबा उपाध्ये यांच्या शुभहस्ते सनातनच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग या ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथप्रकाशन करतांना प.पू. आबा उपाध्ये आणि सौ. मंगला उपाध्ये
         प.पू. आबा उपाध्ये यांच्या शुभहस्ते सनातनच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग या नूतन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी या ग्रंथांच्या संकलकांपैकी एक संकलक श्री. चेतन राजहंस यांनी ग्रंथनिर्मितीसंदर्भातील अनुभूतींसह भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. गुरूंच्या कृपेमुळे आणि बळानेच दोन ग्रंथ २० दिवसांच्या अल्प कालावधीत पूर्ण झाले. आमची भावजागृती करण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी ही ग्रंथनिर्मितीची सेवा करवून घेतली. ग्रंथनिर्मिती करतांना डोळ्यांत भावाश्रू यायचे. ग्रंथनिर्मितीत सहभाग असलेल्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून संतांची कार्याप्रती असलेली एकरूपता, तत्परता, भावजागृती, साधनेचे चिरंतन दृष्टीकोन शिकायला मिळाले. संतांच्या चरित्राचे संतांच्या हस्ते प्रकाशन होण्याचा दैवी योग जुळून आला आहे, असे श्री. चेतन राजहंस म्हणाले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

धर्महीनतेमुळे जगात किंमत शून्य असलेले हिंदू कुठे आणि धर्मपालनाने जगाला भारी ठरलेले मुसलमान कुठे !


वायूप्रदूषण आणि उपाय विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 

वायूप्रदूषण आणि उपाय विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ५ जून २०१६

पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ४ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

कलियुगातील मानवाला निष्काम कर्मयोगाद्वारे सत्ययुगात नेणारे अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या कार्याची पार्श्‍वभूमी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त... 
        देवद आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे थोर संत प.पू. पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या अवतारी कार्याचे महत्त्व विशद केले आहे. या लेखांतून त्यांनी भगवंताने केलेली सृष्टीची सुंदर व्यवस्था, काळाच्या प्रभावामुळे त्यात होत गेलेली स्थित्यंतरे, धर्मग्लानीची अवस्था असल्याने हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, इतर पंथियांचे हिंदु धर्मावरील वाढते आक्रमण यांविषयीचा उहापोह केला आहे. अशा काळाच्या पार्श्‍वभूमीवर धर्मग्लानी दूर करण्याचे ईश्‍वर नियोजित कार्य प.पू. डॉक्टरांकडून कशा प्रकारे केले जात आहे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कसे मार्गक्रमण होत आहे, याचे अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन त्यांनी केले आहे.
        या भागात आपण हिंदूंची दयनीय स्थिती, राष्ट्र आणि समाज यांची स्थिती सुधारण्यासाठी आतापर्यंत केले गेलेले असफल प्रयत्न, धर्मग्लानीमुळे देशातील लोकशाहीची असलेली सद्य:स्थिती, काँग्रेस शासनाने निरपराध हिंदु आणि साधूसंत यांच्यावर केलेले अत्याचार अन् या सर्व पार्श्‍वभूमीवर धर्माची घडी घालण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतालाच अवतारी कार्य का चालू करावे लागले ? यांविषयी समजून घेणार आहोत.

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बडोदा येथील चि. मोक्ष अजित संत (वय ३ वर्षे) !

चि. मोक्ष संत
१. प्रसूतीच्या वेळी
१ अ. असह्य वेदना होत असतांना दत्ताचा नामजप लावून कापराचे मंडल घातल्यावर वेदना न्यून होऊन २० मिनिटांतच बाळाचा जन्म होणे : प्रसूतीच्या वेळी मला असह्य वेदना होत होत्या; म्हणून माझ्या आईने (सौ. संध्या आगरकर यांनी) रामनाथी आश्रमात रहात असलेल्या माझ्या मावसबहिणीला (सौ. प्राची मेहता) भ्रमणभाष केला. तिने सांगितल्याप्रमाणे नामजप यंत्रावर दत्ताचा नामजप लावून कापराचे मंडल घातल्याने वेदना न्यून होऊन २० मिनिटांतच बाळाचा जन्म झाला. १५ घंटे बाळंतपणाच्या वेदना सहन करूनही मला मुळीच थकवा जाणवत नव्हता.
१ आ. बाळाचा जन्म शुभदिनी होणे : माझी प्रसूती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित होती. तेव्हा दिवाळीतील अमावास्या असल्यामुळे ते दिवस चांगले नव्हते; परंतु माझी प्रसूती १० दिवस पुढे ढकलली जाऊन बाळाचा जन्म कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी झाला.

भावासंदर्भात एका साधिकेला आलेल्या अनुभूती

१. प्रक्रियेतील इतर साधकांप्रमाणे संतांची भेट न झाल्याने पुष्कळ रडू येणे आणि मुलीकडून संतांचे सूक्ष्मातून दर्शन घेऊन भावजागृतीचे प्रयत्न कसे करायचे ?, हे शिकता येणे : मी ५-६ मासांपासून (महिन्यांपासून) स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेत आहे. प्रक्रियेतील साधकांना अधूनमधून संतांची भेट होत असते; परंतु माझी प्रक्रियेच्या माध्यमातून संतांची भेट झाली नाही. तेव्हा माझे मन अस्वस्थ झाले आणि संतांना भेटण्याचा योग आला नाही; म्हणून मला पुष्कळ रडू आले. तेव्हा मी अमृताला (माझ्या मुलीला) म्हणाले, संत सर्वांना भेटतात; पण मला भेटत नाही की नाही बोलवत. तेव्हा अमृता मला म्हणाली, आपण आपल्या मनाचे चिंतन करून मी प्रयत्न करायला कुठे अल्प पडते ? देवाला अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करते का ? हे पाहूया. स्थुलापेक्षा सूक्ष्मातून दर्शन घेऊया. स्थुलातून एकदाच दर्शन होणार; पण सूक्ष्मातून दिवसभर, प्रत्येक सेकंदाला, मिनिटा-मिनिटाला सतत संतांचे दर्शन मन भरून अनुभवता येणार आणि प्रत्येक श्‍वासात त्यांना साठवून ठेवता येणार. तिचे हे बोलणे ऐकतांना मला पुष्कळ आनंद मिळाला आणि भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करायचे ?, हे मला शिकायला मिळाले.
२. प्रतिदिन आत्मनिवेदन करतांना संतांना दर्शन देण्याविषयी सांगणे आणि प्रत्येक वेळी प्रक्रियेतील साधकांना दर्शन झाल्यानंतर २-३ दिवसांत स्वतःला त्यांचे दर्शन होऊन भाव जागृत होणे : मी प्रत्येक रात्री संतांना आत्मनिवेदन करून दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी सांगते. तेव्हा मी त्यांच्यावर रुसते, फुगते, रडते किंवा हट्ट करते आणि मला एकदा तरी दर्शन द्या, असे अनेक वेळा सांगते. त्यांचे प्रक्रियेतील साधकांना दर्शन झाले की, २-३ दिवसांनी ते मला नकळत दर्शन देतात आणि माझा भाव जागृत होतो.
३. आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या काळात संतांचे दर्शन होऊन कृतज्ञताभाव जागृत होणे : आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या कालावधीत संतांचे दर्शन होत होते. त्यांच्याकडून चैतन्याचा साठा घेऊन मी जात होते. तेव्हा कृतज्ञताभाव जागृत होऊन माझा कंठ दाटून येत होता.
४. भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर एका संतांच्या चरणांचे दर्शन होऊन आपण जसा भाव ठेवू, तसे ईश्‍वर देतो, याची प्रचीती येणे आणि कृतज्ञता व्यक्त होणे : एकदा भावसत्संगामध्ये कु. स्वातीताईने (रामनाथी आश्रमातील व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या साधिका कु. स्वाती गायकवाड यांनी) आम्हाला भाव कसा ठेवायचा ?, ते सांगितले. त्या म्हणाल्या, आपण संतांच्या चरणांजवळ बसलो आहोत. त्यांच्या चरणांतून आपल्याकडे चैतन्य येत आहे, असा भाव ठेवून प्रयत्न करूया. माझ्याकडून तसे प्रयत्न २-३ दिवस झाल्यानंतर एकदा मला एका संतांच्या चरणांचे दर्शन झाले. तेव्हा माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्या वेळी मला आपण जसा भाव ठेवू, तसे ईश्‍वर देत असतो, याची प्रचीती आली.
       माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेतल्यामुळे मी श्रीकृष्णाच्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
- सौ. वैशाली मुदगल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०१६)

मानसपूजेत सगुण रूपातील कृष्णाऐवजी श्रीकृष्णाची पितळ्याची मूर्ती दिसून तिची मनोभावे मानसपूजा होणे आणि मन निर्विचार होऊन ध्यान लागणे

कु. गायत्री बुट्टे
       मी श्रीकृष्णाची मानसपूजा गेल्या काही वर्षांपासून करत आहे. वर्ष २०१५ पर्यंत अशी मानसपूजा करतांना श्रीकृष्ण वृंदावनात प्रत्यक्ष सगुण रूपात दिसायचा. त्याची प्रेमपूर्वक भावपूर्ण पूजा करतांना भावजागृती होऊन मनाला आनंद मिळायचा. जानेवारी २०१६ पासून मानसपूजेत मला सगुण रूपातील श्रीकृष्ण न दिसता त्याऐवजी श्रीकृष्णाची पितळ्याची मूर्ती दिसते. मानसपूजेत दिसणार्‍या श्रीकृष्णाच्या मूर्तीविषयीही मनात तीव्र ओढ, प्रेम आणि आपुलकी जाणवते अन् त्या मूर्तीची मनोभावे पूजा होते. मूर्तीतील चैतन्यमय कृष्णतत्त्वाशी एकरूप होण्याची ओढ आणि तळमळ मनाला असते.
       मूर्तीची मानसपूजा झाल्यावर श्रीकृष्णाच्या मूर्तीला छातीशी लावून ठेवावे, तिला कधीच सोडू नये, असे वाटते. तेव्हा मनातून श्रीकृष्णाची मूर्ती छातीशी लावून ठेवल्यावर मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्वाच्या स्पंदनांवर मन एकाग्र होऊन त्या स्पंदनांवर आलंबन केले जाते. मन निर्विचार होते आणि ध्यान लागते. स्वतःच्या देहाच्या आणि जगाच्या अस्तित्वाचा विसर पडून स्थिरता जाणवते, तसेच शांत वाटते. ध्यानाची ही अवस्था कधीच संपू नये, असे वाटते.
प्रश्‍न : प.पू. डॉक्टर, सगुणातून निर्गुण तत्त्वाकडे जाण्याचा हा टप्पा आहे कि काय आहे ?
उत्तर : हो
- कु. गायत्री बुट्टे, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२४.२.२०१६)

चालविता आणि बोलविता धनी भगवंतच असल्याची आलेली अनुभूती !

श्री. रामानंद परब
       १२.१०.२०१४ या दिवशी प.पू. डॉक्टरांची भेट झाली. त्या वेळी ते म्हणाले, आता तुला खाली वर करता येते आणि बाहेरही जाता येते. पूर्वी चालताही यायचे नाही. किती चांगले आहे ना ? कशी प्रगती होत जाते ना ! यातून सर्वांना स्फूर्ती मिळेल.
१. प्राणशक्ती पुष्कळ अल्प असल्याने चालणे अशक्य होणे आणि भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या कृपेने मागील तीन मासांपासून कशाचाही आधार न घेता चालता येणे : मागील चार वर्षे पुष्कळ वेळा प्राणशक्ती पुष्कळ अल्प असायची. भिंतीचा आधार घेऊन चालायला लागायचे. मध्येच तोल गेल्यासारखेही व्हायचे. तीन वर्षांपूर्वी अनेक मास (महिने) वॉकर घेऊन चालायला लागायचे. काही वेळा चालताच यायचे नाही. तेव्हा कुठे जायचे वा यायचे असेल, तर साधक चाकाच्या आसंदीवरून घेऊन जायचे. नाहीतर आसंदीत बसवून न्यायचे किंवा चारचाकीत उचलून बसवायचे आणि अपेक्षित स्थळी घेऊन जायचे. आता या तीन मासांपासून कशाचाही आधार न घेता चालता येऊ लागले आहे. ही भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांचीच कृपा आहे.

दत्तमाला मंत्रपठण करतांना सभोवतीचे वातावरण चैतन्यमयी वाटून साक्षात् श्रीदत्तगुरु समोर उभे आहेत आणि तेच पठण करवून घेत आहेत, असे जाणवल्याने पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होणे

       ३१.१२.२०१५ या दिवशी मी ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रपठण करायला बसले होते. त्या वेळी माझी प्रार्थना आतून भावपूर्ण होऊ लागली. तेव्हा माझे पूर्ण शरीर स्थिर होऊन मला हलके वाटत होते. मला केवळ दत्तगुरूंचे चित्र आणि मीच ध्यानमंदिरात आहोत, असे जाणवले. मला सभोवतीचे वातावरण चैतन्यमयी वाटत होते. देवतांना वाहिलेली लाल फुलेही चैतन्याने पिवळी झाली आहेत, असे मला जाणवत होते. मंत्रपठण चालू असतांना साक्षात् श्रीदत्तगुरु समोर उभे आहेत आणि तेच मला पठण करण्याचे बळ देत आहेत किंबहुना तेच पठण करवून घेत आहेत, असे जाणवत होते. माझी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
- सौ. निर्मला सारंगधर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१.२०१६)

देव आहे विश्‍वंभर !

सौ. शालिनी मराठे
       एक बुद्धीवादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला म्हणाली, तुमचा देव गाभार्‍यात बसून नैवेद्य खाण्याविना काय काम करतो ? हे वाक्य ऐकून मला त्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव कराविशी वाटली; कारण देव काय काय करतो, ते शब्दांत सांगणे अशक्यच आहे. तेव्हा देवाने मला पुढील ओळी सुचवल्या.
देव पाडतो पाऊस ।
देव धाडतो थंडी-ऊन ।
देव भागवितो भूक ।
देव शमवितो तहान ॥ १ ॥
देव पिकवितो शेत ।
देव वाढवितो झाड ।
देव फुलवितो फूल ।
देव आनंदनिधान ॥ २ ॥

हिंदु संत, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बांधव यांना विनंती !

सिंहस्थ, कुंभ आदी तीर्थक्षेत्रांतील अमृत स्नानासारख्या 
तात्कालिक विषयावरून प्राणत्यागाचा विचार करून स्वतःच्या 
जीवनासह राष्ट्रीय आणि धार्मिक हानी करून घेऊ नका ! 
पू. संदीप आळशी
       सिंहस्थपर्व, कुंभपर्व आदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अमृत (शाही) स्नानाला अनुमती नाकारण्याच्या कारणावरून साधू-संतांकडून प्राणत्यागाची घोषणा केली जाते. सिंहस्थ, कुंभ आदी ठिकाणच्या स्नानासारख्या तात्कालिक विषयावरून अत्यंत दुर्लभ असा आणि पूर्वपुण्याईनेच लाभत असलेला मनुष्यजन्म मातीमोल कशासाठी जाऊ द्यायचा ? हिंदूंच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय अशा सर्वच क्षेत्रांतील सर्व समस्यांवर कायमस्वरूपी आणि दूरगामी असा एकच उपाय आहे अन् तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे. यासाठी हिंदूंचे कृतीशील असे महासंघटन उभारण्याची आज आत्यंतिक निकड आहे. यामध्ये संत, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी बांधव यांचे मोलाचे योगदान असावयास हवे. एवढे मोठे दूरगामी लक्ष्य साध्य करायचे बाकी असतांना एखाद्या तात्कालिक धार्मिक वा राष्ट्रीय विषयावरून प्राणत्याग करणे, म्हणजे स्वतःच्या जीवनासह राष्ट्रीय अन् धार्मिक कार्याचीही अपरिमित हानी करणेच होय. संत, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांचे अनुसरण करणारे अनेक हिंदू असतात; त्यामुळे असे संत आणि धर्मप्रेमी यांनी असा चुकीचा पायंडाही पाडायला नको.
      हिंदूंचे शंकराचार्य आणि धर्माचार्य यांनी यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी त्यांना प्रार्थना आहे !
- (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२६.५.२०१६)

गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक

गुरु सांगतात ते शाश्‍वत सत्य असते.

साधकांना सूचना

       पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - वैशाख कृष्ण पक्ष चतुर्दशी (४.६.२०१६) सकाळी ११.५० वाजता
समाप्ती - वैशाख अमावास्या (५.६.२०१६) सकाळी ८.३० वाजता
उद्या अमावास्या आहे.

साधकांना सूचना

स्वत: विषयी खोटी माहिती सांगून पैसे 
मागणार्‍या संशयित युवकापासून सावधान ! 
       सनातनच्या एका सेवाकेंद्रात नुकताच एक युवक आला होता. प्रथम त्याने आपण भुसावळ येथील असून तेथे सेवा करत असल्याचे सांगितले. या वेळी सेवाकेंद्रातील साधकांनी भुसावळ येथील साधकांकडे या युवकाविषयी चौकशी केली असता, त्याला तेथील साधक ओळखत नसल्याचे समजले. त्यानंतर त्या युवकाला परत पाठवून देण्यात आले आणि पुन्हा इकडे न येण्याविषयी सांगितले. असे असतांनाही हा युवक काही दिवसांनी पुन्हा त्याच सेवाकेंद्रात आला. या युवकाने मी गोव्याहून आलो आहे. मला उज्जैन येथे जायचे आहे; मात्र प्रवासात माझे पैशांचे पाकीट आणि अन्य साहित्य चोरीला गेले. त्यामुळे मला पैसे द्या, असे सांगितले. त्यानंतर साधकांनी त्याला तू कुणाला ओळखतो, त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक दे, असे सांगितल्यावर त्याने कोणतीही माहिती दिली नाही. त्याला साधकांनी त्याची ओळख विचारल्यावर त्याने आपण बुलढाणा येथील असल्याचे पुन्हा खोटे सांगितले. साधकांनी त्याचे पॅनकार्ड पाहिले असता, त्याच्यावर चंद्रकांत एकनाथ शिंदे असे नाव होते.
       हा संशयित युवक अन्य ठिकाणी जाऊन साधकांना खोटी माहिती सांगू शकतो आणि पैसे मागू शकतो. त्यामुळे साधकांनी सतर्क रहावे आणि अशा व्यक्तींविषयी त्वरित उत्तरदायी साधकांना विचारून पुढील निर्णय घ्यावा.

फलक प्रसिद्धीकरता

भाजपच्या केंद्रशासनावर 
भगवेकरणाचा आरोप करणारे आता गप्प का ?
         तेलंगण सरकार रमजान मासानिमित्त राज्यातील २०० मशिदींमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्यासाठी आणि गरीब मुसलमानांना कपडे वाटप करण्यासाठी २६ कोटी रुपये खर्च करणार आहे; तर तमिळनाडू सरकार शिरखुर्म्यासाठी ३ सहस्र मशिदींना विनामूल्य तांदूळ देणार आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
       Ramzanpar Telangana sarkar 200 masjidoko 26 karod rupay aur Tamilnadu sarkar 3000 masjidoko chaval degi
Kathit Bhagvekaranpar chillanewale ab chup kyon
जागो !
       रमजान पर तेलंगना सरकार २०० मस्जिदों को २६ करोड रुपये और तमिलनाडु सरकार ३००० मस्जिदों को चावल देगी.
कथित भगवेकरण पर चिल्लानेवाले अब चुप क्यों ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तात्काळ निष्कर्ष कळतो !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
       माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव हिंदूंमध्ये मोठे झाले नाही; पण सूक्ष्माचे अभ्यासक, सूक्ष्म जाणणारे संत आणि महर्षी यांच्यापर्यंत माझे नाव पोचले. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व 
कर्माविना तुम्हाला गती 
नाही; कारण कर्मालाच गती आहे.
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुळाचाराचे पालन करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
ईश्‍वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. 
कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


गोहत्याबंदीसाठी प्रत्यक्ष कृती !

संपादकीय 
      गोहत्या थांबवण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा, असे आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केले आहे. गोहत्या हे सूत्र भारतियांना नवीन राहिलेले नाही. त्यामुळे आता त्याविषयी मोहीम राबवण्याची कल्पना अनाकलनीय आहे. देशातील गोधन पार लयाला गेले आहे. स्वातंत्र्यानंतरची ती मोठी अधोगती आहे. काँग्र्रेसींनी देशात ६० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राज्यकारभाराला गोहत्येच्या सूत्राशी काही देणेघेणे नव्हते; म्हणून आज ही स्थिती झाली आहे.

मातृभाषेचा अभ्यास करा !

संपादकीय
      दूरचित्रवाहिन्यांवर विविध विषयांवर चर्चासत्रे चालू असतात. सामाजिक समस्या, राजकीय हालचाली, असे या चर्चासत्रांचे विषय असतात. त्या त्या विषयातील निष्णात व्यक्ती सहभागी असलेल्या या चर्चासत्रामधे केवळ व्यक्तीगत मतमांडणी होत असते. देशद्रोह, देशद्रोही, धमर्र्द्रोह, धर्मद्रोही हे शब्द या मंडळींना भयंकर स्वरूपाचे किंवा छातीत धडकी बसणारे वाटतात. हे शब्द वापरणारे लोक सामाजिक बहिष्काराला पात्र आहेत, अशीही या लोकांची धारणा झालेली दिसते. हे दोन्ही शब्दप्रयोग मराठी भाषेतील आहेत. त्यामुळे मराठी भाषा ज्यांची मातृभाषा आहे, अशांना या शब्दांमध्ये काहीतरी भयानक आहे, असे वाटणे हा त्यांचा निवळ भित्रेपणा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn