Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जैश-ए-महंमदकडून आणंद (गुजरात) मधील मंदिरावर आक्रमण करून पुजार्‍यांना ठार करण्याची धमकी !

हिंदूंनो, अशी धमकी मशीद किंवा चर्च यांना 
मिळत नाही, त्यामुळे जिहादी आतंकवाद्यांना धर्म 
असतो आणि ते हिंदूंनाच लक्ष्य करतात, हे सत्य आहे !
        आणंद - गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सारसा गावात असलेल्या कैवाल मंदिराचे पुजारी अविचलदासजी महाराज यांना १ जून या दिवशी दोन पत्रे मिळाली आहेत. यात त्यांना ठार मारण्याची तसेच मंदिर बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्र पाठवणार्‍याने तो जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी असल्याचे म्हटले आहे.
        सत कैवाल एक धार्मिक संप्रदाय असून त्याचे अनुयायी येथे मोठ्या संख्येने रहातात. तसेच अनिवासी भारतीयही या संप्रदायाचे अनुयायी आहेत. हे पत्र गुजराती आणि हिंदी भाषेत लिहिण्यात आले आहे. या मंदिराचे अवलोकन (रेकी) करण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. बाबरी मशीद आणि गुजरात दंगल यांचा सूड उगवण्यासाठी मंदिरावर आक्रमण करण्याचे नियोजन आहे, असे या पत्रात म्हटले आहे. पोलीस आमचे काहीच करू शकत नाहीत आणि मोदीही तुम्हाला वाचवू शकत नाहीत. तुम्हाला माहितच असेल की, सुरतमध्ये प्रवीण तोगाडीया यांच्या नातेवाइकांचे काय झाले ते ?, असेही यात म्हटले आहे.

गुलबर्ग सोसायटीतील हिंसाचाराच्या प्रकरणात २४ जण दोषी, ३६ निर्दोष !

  • ३६ जणांना जो १४ वर्षे मन:स्ताप झाला, त्याची भरपाई काय ?
  • २००२ ची गुजरात दंगल !
       कर्णावती - २००२ मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या वेळी गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीत झालेला हिंसाचार आणि जळीतकांड याप्रकरणी विशेष न्यायालयाने २४ आरोपींना दोषी ठरवले, तर ३६ जणांची निर्दोष सुटका केली. सुमारे १४ वर्षांनंतर या प्रकरणात विशेष न्यायालयाने निकाल दिला. निर्दोष ठरवण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे तत्कालिन स्थानिक नगरसेवक बिपीन पटेल यांचा समावेश आहे.
१. गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीतील हिंसाचारात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांची जमावाने हत्या केली होती. २८ फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या घटनेच्या वेळी सुमारे २० सहस्र जणांच्या जमावाने हे आक्रमण केले होते. या सोसायटीत १० इमारती आणि २९ बंगले होते. सोसायटीमध्ये रहाणारे बहुसंख्य मुसलमानच होते.

सैराट चित्रपटामुळे सातारा जिल्ह्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांना उधाण !

एकाच आठवड्यात दोन घटना उघडकीस
       सातारा, २ जून (वार्ता.) - महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटा सैराटमुळे महाराष्ट्रातील युवक सैरभैर झाले आहेत. त्यातच चित्रपटातील कथानकामुळे हा चित्रपट आंतरजातीय विवाहाला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जुन्या प्रेमप्रकरणातील प्रेयसी आणि प्रियकर आता चित्रपटातील नायक आणि नायिकेप्रमाणे पळून जाऊन विवाह करत आहेत. दुर्दैवाने सातारा जिल्ह्यात या घटनांना उधाण आले असून एकाच आठवड्यात अशा प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये हिंदूंच्या मुली असून मुसलमान समाजातील मुले आहेत. या दोन्ही हिंदू मुली लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत, असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.

रायगडावर ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक 
महोत्सव समितीचे आयोजन 
       पुणे, २ जून - शिवराज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगड येथे येत्या ५ आणि ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सदस्य अमित गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

मलेशियातील १५० वर्षे जुन्या मंदिराची विटंबना, देवतांच्या मूर्ती फोडल्या !

  • जे सरकार भारतातील मंदिरांचे रक्षण करू शकत नाही, ते विदेशातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण काय करणार ?
  • भारतासह जगभरातील विविध देशांतील मंदिरे असुरक्षित !
मंदिरातील मूर्ती फोडून त्या जमिनीवर टाकलेल्या दिसत आहेत.
       क्वालालंपूर (मलेशिया) - मलेशियाच्या पेनांग राज्यात असलेल्या आराकुडा येथील सेबेरांग पेरई सेंट्रल क्षेत्रातील मुथुमारियाम्मन् मंदिरावर काही धर्मांधांनी आक्रमण केले. मंदिरातील ४ देवतांच्या मूर्ती या वेळी तोडण्यात आल्या. पेनांग राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले पी. रामासामी यांनी या आक्रमणामागे राजकारण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मंदिरावर होणारी अशी आक्रमणे धार्मिक ध्रुवीकरणाचा भाग आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. बाला नांबियार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
       देशातील इपोह येथील श्री मुनीश्‍वरन् अम्मन् मंदिरातील मूर्तीही गेल्या मासात तोडण्यात आल्या होत्या.
       वरील चित्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून देवतेच्या मूर्तीची केलेली विटंबना समाजावी, यासाठी छापण्यात आले आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी !

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची नाशिक विश्रामगृहातील कक्ष नोंदणी संशयाच्या भोवर्‍यात

  • तृप्ती देसाई यांचा खोटारडेपणा आणि संशयित कारभार !
  • विश्रामगृहातील मुक्कामासाठी माजी खासदार संभाजी काकडे यांच्या नावाचा वापर
        नाशिक, २ जून - श्री कपालेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेशासाठी आंदोलन करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अन्य महिला आंदोलक यांनी येथील शासकीय विश्रामगृहातील वास्तव्यासाठी माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या नावाचा वापर केला. त्या वेळी माजी खासदार काकडे यांचे स्वीय साहाय्यक असल्याचे भासवणार्‍या व्यक्तीने तसे ओळखपत्र (कार्ड) दर्शवत विश्रामगृहात कक्ष नोंदणी केली होती; परंतु या नोंदणीसाठी पुण्यातील संभाजीराव काकडे यांनी आपण तसे कोणतेही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे विश्रामगृहातील कक्ष नोंदणी संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. (विश्रामगृहातील संबंधित कर्मचार्‍यांनी सदर ओळखपत्राची शहानिशा त्याच वेळी का करून घेतली नाही कि त्यांच्यावर दबाव होता ? या प्रकरणी शासनाने चौकशी करून देसाई यांच्यावर कारवाई करावी, ही सश्रद्ध हिंदूंची अपेक्षा ! - संपादक) २६ मेच्या रात्री तृप्ती देसाई यांना मारहाण झाल्यावर त्या २७ मे या दिवशी नाशिक येथील विश्रामगृहामध्ये थांबल्या होत्या.

(म्हणे) दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनच्या साधकांना तातडीने अटक करा !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुणतुणे
      पुणे, २ जून - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना तातडीने अटक करा, अशा पूर्वग्रहदूषित मागणीचे तुणतुणे अंनिसने पुन्हा एकदा वाजवले आहे. (हा केंद्रीय अन्वेषण विभागावर आणण्यात येणारा दबावच होय ! सातत्याने सनातनवरच कारवाईचा रेटा लावून डॉ. दाभोलकरांच्या खर्‍या मारेकर्‍यांपर्यंत यंत्रणांना पोहचू न देण्याचे हे षड्यंत्र आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल काय ? - संपादक) केंद्रीय अन्वेषण विभागाने शनिवार पेठेतील श्री. सारंग अकोलकर आणि पनवेल येथील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या घरावर छापे घातल्यानंतर दुसर्‍या दिवशी अंनिसच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या प्रसंगी अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) अत्याचाराला बळी पडलेल्या यझिदी महिलांनी शस्त्रे हाती घेतली !

भारतियांनो, तुमच्यावर जिहाद्यांकडून 
अत्याचार होण्यापूर्वी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
इसिसच्या विरोधात शस्त्रसज्ज झालेल्या यझिदी महिला
       बगदाद - इराकच्या पूर्वेस असलेल्या सिंजर शहरावर वर्ष २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) आतंकवाद्यांनी आक्रमण करून सहस्रो यझिदी लोकांची हत्या केली; तसेच सहस्रो महिलांना आणि मुलींना लैंगिक गुलाम म्हणून कह्यात घेतले. त्यांच्यावर भयानक शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. आजही या महिलांना लैंगिक गुलामाचा दर्जा देऊन एखाद्या उपभोग्य वस्तूप्रमाणे विकण्यात येते. या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी शेकडो यझिदी महिलांनी परिवार आणि नातेवाईक यांना तिलांजली दिली आणि शस्त्रे हाती घेतली. सध्या या महिला तुर्कस्थानच्या खुर्द जमातीच्या पेशमेर्गा या महिलांच्या सैन्य तुकडीत सहभागी झाल्या असून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी निकराचा लढा देत आहेत.
१. अनेक यझिदी महिला सैनिक रणांगणावरील हालअपेष्टा सोसून जिद्दीने इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी लढत आहेत. इराकमधील लढाईत मोसुल शहराचा ताबा इस्लामिक स्टेटपासून काढून घेतल्यावर त्यांचा हुरूप अधिक वाढला.

फेसबूकवर श्री कालीमाता देवीच्या संदर्भात अश्‍लील पोस्ट करणार्‍या अब्दुल कय्यूम कुरैशी आणि अली शेख यांना रा.सू.का. कायद्याअंतर्गत अटक !

हिंदूंच्या देवतांचा अनादर करणार्‍यांच्या असहिष्णुतेच्या विरोधात 
ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
     भोपाळ - श्री कालीमाता देवीच्या संदर्भात फेसबूकवर अश्‍लील मजकूर पोस्ट करणार्‍या अब्दुल कय्यूम कुरैशी आणि अली शेख यांच्या विरोधात भोपाळ पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रा.सू.का) कारवाई केली आहे. या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. या पोस्टमुळे येथे जातीय तणाव निर्माण झाला होता.वेळप्रसंगी मराठीप्रेमी निवडणूकही लढवतील ! - गो.रा. ढवळीकर

      वाळपई - आजपर्यंत मराठी राजभाषेसाठी सर्वप्रकारची आंदोलने झाली; मात्र एकाही आंदोलनाला शासनाने किंमत दिली नाही. आम्ही आजही शांततेच्या मार्गाने मराठी राजभाषेसाठी लढा देत आहोत. आता आम्ही हा लढा राजकीय स्वरूपाचा करणार आहोत. शासनाला योग्य धडा शिकवण्यासाठी प्रसंगी येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यास मागेपुढे पहाणार नाही, असे प्रतिपादन मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो.रा. ढवळीकर यांनी केले. 
     आंबेडे, नगरगाव सत्तरी येथील श्री शांतादुर्गा देवस्थान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या श्री ब्रह्मकरमळी सत्तरी येथील मराठी लेखक संदीप केळकर यांच्या कन्यादान या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ढवळीकर बोलत होते. व्यासपिठावर समीक्षक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, अधिवक्ता भालचंद्र मयेकर, प्रा. वृंदा केळकर, लेखक संदीप केळकर, अधिवक्ता शिवाजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

गोमंतकाला विदेशी नागरिक आणि कॅसिनो यांच्या हातात सोपवून रेप कॅपिटल बनवू नका ! - हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा

नायजेरियन नागरिकाने महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण
     पणजी - देवभूमी असलेल्या गोमंतकाला केवळ आर्थिक लाभासाठी कॅसिनो आणि विदेशी पर्यटक यांच्या हातात सोपवून रेप कॅपिटल बनवू नका आणि गोमंतकातील भगिनींना पुन्हा अत्याचारित होऊ देऊ नका, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर यांनी केले आहे. केवळ मंदिरांच्या गाभार्‍यात प्रवेश करून महिलांच्या समान अधिकारांचा आणि स्वातंत्र्याचा पुरोगाम्यांकडून उदो उदो केला जात असतांना, त्यांच्या शीलरक्षणासाठी मात्र कुणी काही करतांना दिसत नाही. कॅसिनो, मद्य आणि अमली पदार्थ यांच्या सारख्या अनैतिक धंद्यांना जेथे उघड साहाय्य केले जाते, तेथे महिला सुरक्षित कशा राहू शकतील ? तेव्हा गोव्यातील भाजप शासनाने त्वरित कॅसिनो आणि अनधिकृतपणे रहाणारे विदेशी नागरिक यांच्यावर कारवाई करून त्यांना प्रतिबंध करावा, अशा मागणीचे प्रसिद्धीपत्रक हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेने प्रसारित केले आहे.

मोरोक्को येथे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कार्यक्रमात अखंड भारताचा नकाशा लावला !

भारताला पुन्हा अखंड बनवण्याचा राष्ट्रप्रेमींचा प्रयत्न आहेच आणि भविष्यात तो पूर्ण होणारच आहे ! 
     रबात (मोरक्को) - मोरोक्को देशाच्या दौर्‍यावर असलेले भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा येथील विद्यापिठात आयोजित करण्यात एका कार्यक्रमाच्या वेळी फलकावर अखंड भारताचा नकाशा लावण्यात आला होता. यात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांना भारतात दाखवण्यात आले होते. आयोजकांना ही चूक वाटून त्यांनी नकाशा झाकण्याचा प्रयत्न केला.

धर्मांधाकडून चलनी नोटांच्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रसार !

लव्ह जिहाद म्हणजे काय, असे विचारणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
     मुंबई - धर्मांधांकडून देशात होत असलेल्या लव्ह जिहादसाठीचा एक वेगळा प्रचार पहायला मिळाला आहे. १० रुपयाच्या चलनी नोटेवर एम्.डी. अस्लम खान, कोटा, असे नाव लिहिलेल्या धर्मांधाकडून यासंदर्भात मजकूर लिहिण्यात आला आहे. त्याद्वारे त्याने हिंदु मुलींना मुसलमान युवकांशी विवाह करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे नोटेवर मजकूर लिहून त्याने कायदाद्रोहही केला आहे.
या नोटेवर पुढील मजकूर लिहिला आहे 
    अल्लाहू अकबर ७८६, हिंदूंच्या मुलींना, बहिणींना प्रार्थना आहे की, त्यांनी मुसलमान मुलांशीच विवाह करावा. जरी तुम्ही देवी-देवतांची पूजा करत असाल, तरी तुम्ही मुसलमान मुलांना जन्माला घालावे.
(हिंदूंनो, लव्ह जिहादच्या अशा प्रकारांपासून सावध रहा ! - संपादक)
    धर्मांधाने चलनी नोटेद्वारे केलेला लव्ह जिहादचा विखारी प्रचार ! (वर्तुळातील मजकूर वाचावा)

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून ५५० तक्रारींपैकी केवळ ४५ प्रकरणांमध्ये गुन्हे प्रविष्ट

पोलिसांची (अ)कार्यक्षमता
 म्हणायची कि चालढकलपणा ?
        पुणे - येथील पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे एटीएम् खात्यातून पैसे चोरणे, क्रेडिट कार्डचा सांकेतिक शब्द चोरून त्याद्वारे खरेदी करणे, सामाजिक संकेतस्थळांवर खोटे खाते उघडून बदनामी करणे किंवा अश्‍लील माहिती टाकणे, अशा अनेक तक्रारी केल्या आहेत. शाखेकडे गेल्या ५ मासांत अशा प्रकारच्या ५५० तक्रारी आल्या असून त्यापैकी १९२ प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांना गुन्हा प्रविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्षात स्थानिक पोलिसांनी गेल्या ५ मासांत केवळ ४५ गुन्हे प्रविष्ट केले आहेत. (या प्रकरणी पोलीस आयुक्त आणि पोलीस प्रशासन संबधित पोलीस ठाणे आणि कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक)

शतप्रतिशत फलनिष्पत्ती देणार्‍या पर्जन्ययागाकडे दुर्लक्ष

यंदाही कृत्रिम पावसासाठी हालचाली !
      पुणे, २ जून - भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली प्रशासनाने चालू केल्या आहेत. या संदर्भातील प्रस्ताव राज्यशासनाच्या आपत्ती विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, मुळशी, टेमघर, चासकमान, भाटघर यांसह जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार असून त्यासाठीचे केंद्र संभाजीनगर येथे असण्याची शक्यता आहे. साहाय्य आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच्. गोविंदराज यांनी काळजी घेण्याचा एक उपाय म्हणून प्रारंभीपासूनच हा प्रयोग राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (पाऊस पडावा, तसेच वातावरणाची शुद्धी व्हावी, यासाठी यज्ञसंस्कृतीत अनेक यज्ञयाग, तसेच विधी सांगण्यात आले आहेत. असे असतांना केवळ पूर्वग्रहदूषितपणामुळे ऋषीमुनींच्या या ज्ञानाच्या ठेव्याकडे दुर्लक्ष करणे आणि आधुनिकतेच्या नावाखाली कृत्रिम पावसाचा आग्रह धरणे म्हणजे स्वतःजवळील सुवर्णमुद्रांकडे दुर्लक्ष करून मातीच्या ठिकर्‍या गोळा करण्यासाठी आटापिटा करण्यासारखे आहे. - संपादक)

लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी आंध्रप्रदेशवर आक्रमण करण्याची शक्यता

      भाग्यनगर - पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आय.एस्.आय.ने लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून आंध्रप्रदेशच्या सागरी किनार्‍यावर आक्रमण करण्याची सिद्धता केली आहे, असा निष्कर्ष भारतीय गुप्तहेर यंत्रणांनी या आतंकवाद्यांच्या दूरध्वनीवरील संभाषणातून काढला आहे. आतंकवाद्यांच्या हिटलिस्टवर विशाखापट्टनम् आणि भारतीय नौदलाचे पूर्व विभागाचे मुख्यालय असल्याचे कळते.
      आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बैठकीत या चेतावणीचा आढावा घेऊन सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिहादी आतंकवादी प्रथमच भारताच्या दक्षिण सागरी तटावर आक्रमण करण्याची सिद्धता करत आहेत. आधी तमिळनाडू त्यांचे लक्ष्य होते; मात्र ते नियोजन बारगळल्याने आता त्यांनी त्यांचे लक्ष आंध्रप्रदेशवर केंद्रीत केले आहे. पोलिसांनी एल्.टी.टी.ई.च्या एका हस्तकाला अटक केल्यावर त्याने दिलेल्या माहितीवरून वरील कट उजेडात आला.

सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न केल्यास २ मासांत पुतळा उभारणे शक्य ! - सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या २ दशकांपासून प्रलंबित 
असलेल्या पुतळ्याच्या उभारणीसाठी भुसावळ येथे भव्य मोर्चा 
२ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती              भुसावळ (जिल्हा जळगाव) - येथील नगरपरिषदेच्या सभागृहाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराजां'चे आहे; पण शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बसवू शकत नाही, असे कसे ? मात्र आता हिंदूंनी यामध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे २ महिन्यांत हा पुतळा बसणारच आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर एका दिवसात पुतळा उभा राहू शकतो. आता 'हिंदु हित की बात' नाही, तर 'जो हिंदु हित का काम करेगा वही भुसावळमे राज करेगा', अशी घोषणा द्यायला हवी, असे खणखणीत प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी २ जून २०१६ या दिवशी भव्य हिंदु मोर्च्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या मोर्च्यात २००० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

संस्कृती देवाणघेवाणीच्या नावाने कोलकात्याच्या दुर्गापूजेला या वर्षी (धूर्त) चिनी रंग !

संंस्कृती देवाणघेवाणीच्या गोंडस नावाखाली अरुणाचल प्रदेशानंतर आता बंगालला 
बळकावण्याचा चीनच्या दूरगामी प्रयत्नाचा हा आरंभ नाही ना ?
भारतीय राज्यकर्त्यांनी यासंदर्भात सतर्कता बाळगायला हवी !
     कोलकाता - शहरातील प्रसिद्ध दुर्गापूजेला या वर्षी चिनी स्पर्श होणार आहे. या वर्षीच्या दुर्गापूजा महोत्सवामध्ये भागीदार होण्याची चीनची योजना आहे. बंगाल आणि चीनमधील दक्षिण-पश्‍चिम भागात असलेल्या युन्नान प्रांतामधील लोकांमध्ये आपापसांत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे. या योजनेखाली बांगलादेश, चीन, भारत आणि म्यानमार या देशांचे नागरिक एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या महोत्सवाच्या वेळी चीन त्याच्या देशातील कुनमिंग शहरातील पर्यटकांना कोलकाता येथे आणणार आहे.

खडसे यांचे केवळ त्यागपत्र नको, तर निश्‍चित कालावधीत चौकशी करावी ! - अंजली दमानिया

     मुंबई, २ जून (वार्ता.) - आम्हाला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे केवळ त्यागपत्र नको, तर लवकर आणि निश्‍चित कालावधीत त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी २ जून या दिवशी स्पष्ट केले. अंजली दमानिया यांनी २ जूनपासून येथील आझाद मैदानावर उपोषण चालू केले. त्या पार्श्‍वभूमीवर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली. अंजली दमानिया यांनी निश्‍चित कालावधीत खडसे यांची चौकशी केली जाईल, हे आश्‍वासन मिळेपर्यंत उपोषण आंदोलनाविषयी माघार घेणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली. अंजली दमानिया यांनी १ जून या दिवशी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांची भेट घेतली होती.

एकनाथ खडसे यांनी आत्मपरीक्षण करावे ! - भाजपचे खासदार सत्यपाल सिंग

     नवी देहली, २ जून (वार्ता.) - 'खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्यावर होणार्‍या आरोपांवरून त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवे', असे भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी म्हटले आहे. एएन्आयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खडसे यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी त्यागपत्र देऊन चौकशीला सामोरे जावे ! - संजय राऊत

     भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर एकनाथ खडसे यांनी त्यागपत्र देऊन चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने २ जून या दिवशी केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार श्री. संजय राऊत हे वृत्तवाहिन्यांशी बोलतांना म्हणाले, "खडसे यांच्यावरील आरोपांमुळे राज्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नैतिकतेच्या दृष्टीने विचार केल्यास भाजप आणि शिवसेनेचे यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची त्यागपत्रे घेतली आहेत. त्यामुळे लोकभावना विचारात घेऊन खडसे यांनी त्यागपत्र दिले पाहिजे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका मांडली पाहिजे. जळगावमधील सुरेश जैन हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सध्या कारागृहात आहेत. मग तोच न्याय खडसे यांना का नाही ?"

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धर्मद्रोही प्रा. कांचा इलय्या यांच्या विरोधात तक्रार !

     भाग्यनगर (हैद्राबाद) - रंगा रेड्डी जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून सरूरनगर पोलिसांनी प्रा. कांचा इलय्या यांच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार केली आहे. विजयवाडा येथे नॅशनलिजम् अ‍ॅन्ड डाइवरजेंट व्यूझ (राष्ट्रवाद आणि विचारांमध्ये विविधता) या विषयावरील एका कार्यक्रमात प्रा. इलय्या यांनी एक व्याख्यान दिले होते. या व्याख्यानामध्ये इलय्या यांनी हिंदूंच्या देवता आणि धर्मग्रंथ यांवर टीका केली होती.

गोहत्या थांबवण्यासाठीच्या मोहिमेत सहभागी व्हा ! - मेनका गांधी

सत्ता असतांना असे आवाहन करण्याऐवजी गोहत्या 
रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     नवी देहली - गोहत्या थांबवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने या संदर्भातील ऑनलाईन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केले आहे. देशभरातील प्राणीसंग्रहालयांवर बंदी घालण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

तरुणांमध्ये राष्ट्रीय इच्छाशक्ती निर्माण करण्याचे देशापुढे आव्हान ! - अजित डोवाल

     पुणे, २ जून (वार्ता.) - देशासाठी काहीही न केलेल्या लोकांनी देश तोडण्याच्या घोषणा दिल्या. अशा घटनांना भारतीय समाज कशा प्रकारे उत्तर देतो, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुणांमध्ये राष्ट्रीय इच्छाशक्ती निर्माण करण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. फुटीरतावाद्यांच्या विरोधात समाजाने रोष व्यक्त न करणे अधिक घातक आहे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि विवेकानंद आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष श्री. अजित डोवाल यांनी केले. ते युथ फॉर डेव्हलपमेंट या संस्थेने आयोजित केलेल्या इंडिया फर्स्ट कार्यक्रमात बोलत होते. इसिसच्या वाढत्या आतंकवादाविषयी ते म्हणाले, "भारतातील काही मुसलमान युवक सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून इसिसशी जोडण्याचा प्रयत्न करत होते; पण त्यांचे समुपदेशन केल्यावर इसिसचा कट उधळून लावण्यात आला."

श्री त्र्यंबकराजाच्या (जिल्हा नाशिक) दर्शनास गर्भगृहात जाण्याऐवजी महिलांचा धर्मपरंपरा जपण्याकडेच कल !

तृप्ती देसाई आणि वनिता गुट्टे यांना सणसणीत चपराक ! 
     नाशिक, २ जून - येथील श्री त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी महिलांना गर्भगृहात जाण्यासाठी अधिकार पुरोगाम्यांच्या दृष्टीकोनातून मिळाला; परंतु या कालावधीत एकाही महिलेने गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यात स्वारस्य दाखवले नाही. याउलट स्थानिक आणि भारतभरातील सहस्रावधी महिलांनी परंपरा पाळण्यातच आत्मानंद मिळत असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. (धर्मपरंपरा जपणार्‍या ग्रामस्थ आणि अन्य महिला यांचे अभिनंदन ! धर्मपरंपरांचे पालन करणार्‍या महिला याच हिंदु धर्माची शक्ती आहेत. - संपादक) 

हिंदूंनो, स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र्र यांविषयी नेहमी जागरूक रहा ! - मंगेश म्हात्रे, हिंदु महासभा

कोपरखैरणे येथे 'नवी मुंबई हिंदु ब्रेन्स' च्या 
वतीने 'हिंदु राष्ट्राची आवश्यकता' या विषयावर चर्चासत्र 
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित होऊन कृतीशील होण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार 
चर्चासत्रात सहभागी धर्माभिमानी
     कोपरखैरणे, २ जून (वार्ता.) - १ सहस्र २०० वर्षे विस्थापित राहिलेल्या यहुदींनी स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न पाहून इस्रायलच्या रूपाने सत्यात आणले. दुसरीकडे स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊनही भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी आकांडतांडव करावा लागत आहे. १ सहस्र ४०० वर्षे इस्लाम आणि २०० वर्षे ख्रिस्ती यांचा छळ सोसूनही हिंदू मात्र शांतच राहिले. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र्र यांविषयी नेहमी जागरूक रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे श्री. मंगेश म्हात्रे यांनी केले. २९ मे या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत येथील सेक्टर १ मधील भारतीय जागरण शाळेत 'नवी मुंबई हिंदू ब्रेन्स'च्या वतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रौद्रशंभो प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती आदी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे ४७ धर्माभिमानी हिंदू बांधव सहभागी झाले होते.

९२ टक्के मुसलमान महिलांचा तलाकला विरोध !

भूमाता ब्रिगेडसारख्या तथाकथित महिलावादी संघटना या महिलांसाठी काही करत का नाहीत 
कि केवळ हिंदूंच्या मंदिरांमध्ये घुसण्याचा स्टंट करणे, एवढेच त्यांचे धोरण आहे ?
     नवी देहली - तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा म्हणून तोंडी तलाक देण्याच्या मुसलमान समाजातील प्रथेला देशातील ९२ टक्के मुसलमान महिलांनी विरोध केला आहे. त्यांनी या प्रथेवर बंदी आणण्याच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवत आतापर्यंत ५० सहस्र मुसलमान महिला आणि पुरुष यांनी यासंदर्भातील याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. पुढील काळात अधिकाधिक लोकांचा पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या नेत्या झाकिया सोमन यांनी व्यक्त केला आहे.

पाकिस्तानी हिंदूंना सुलभरित्या नागरिकत्व मिळण्यासाठी कायद्यात होणार पालट !

हा निर्णय घेण्यासाठी शासनाला २ वर्षे का लागली, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे !
     देहली - पाकमध्ये अत्याचार सहन केल्याने भारतात येणार्‍या पीडित हिंदूंना आता भारताचे नागरिकत्व सुलभरित्या मिळण्यासाठी कायद्यात पालट करण्यात येणार आहे. केंद्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याचा लाभ अफगाणिस्तानातील हिंदू आणि बांगलादेशी हिंदू यांनाही होणार आहे. या पालटामुळे त्यांना अधिकोषात खाते उघडणे, वाहन अनुज्ञप्ती, पॅनकार्ड आणि आधारकार्डही बनवता येणार आहे.आग्रा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून अप्पर जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन

(डावीकडे) अप्पर जिल्हाधिकारी श्री. राजेश श्रीवास्तव 
यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     आग्रा - हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाकडून १ जून या दिवशी अप्पर जिल्हाधिकारी राजेश श्रीवास्तव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री ठाकूर, श्री. संजीव, श्री. शुभम, श्रीमती मोनिका सिंह आणि हिंदू सेनेचे श्री. उत्सव शर्मा, श्री. नवीन भारद्वाज सहभागी होते. या निवेदनात म्हटले आहे की, 
१. देहली विश्‍वविद्यालयाच्या पुस्तकात हुतात्मा भगतसिंह यांना आतंकवादी ठरवणार्‍यांना कठोर शिक्षा करावी. 
२. भूमाता ब्रिगेडसारख्या धर्मद्रोही संघटना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी धर्मद्रोही आंदोलन करत आहे. हे आंदोलन केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी करण्यात येत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत वायूप्रदूषण आणि उपाय विशेषांक


 प्रसिद्धी दिनांक : ५ जून २०१६ 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ४ जून 
या दिवशी दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

साहाय्य मागितल्यास केंद्रीय अन्वेषण विभागाला त्वरित सहकार्य करणार ! - पोलीस अधीक्षक

     कोल्हापूर, २ जून (वार्ता.) - केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करत आहे. त्याच अनुषंगाने त्यांची कारवाई चालू आहे. त्यांच्याकडून छाप्याविषयी अथवा कॉ. पानसरे हत्येच्या अन्वेषणाविषयी सहकार्यासाठी संपर्क साधलेला नाही. जर सीबीआयला अन्वेषण कामात आमचे साहाय्य हवे असेल, तर आम्ही त्यांना ते त्वरित उपलब्ध करून देऊ, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी १ जून या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली. सीबीआयच्या पथकाने पुणे आणि पनवेल येथे कारवाई केली होती. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

मुसलमानांनी भरपूर मुले जन्माला घालावीत ! - ताईत एरदोन, राष्ट्रपती, तुर्कस्थान

यासाठी सांगायला कशाला हवे ? भारतात हे कधीपासून चालू आहे ! एकदा का ही संख्या 
हिंदूंपेक्षा अधिक झाली की, भारत इस्लामिक स्टेटच होणार ! 
     अंकारा (तुर्कस्थान) - मुसलमानांनी कुटुंब नियोजनात सहभागी न होता अधिकाधिक मुले जन्माला घालावीत, असे विधान तुर्कस्थानचे राष्ट्रपती ताईत एरदोन यांनी केले आहे. ते दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलत होते. 
     एरदोन पुढे म्हणाले की, मुले ही ईश्‍वराची देण असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा, तरच मुलांची संख्या वाढवता येईल.
     एरदोन यांच्या विधानाचा महिला संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी निषेध नोंदवला आहे. कोणत्या महिलांनी किती मुले जन्माला घालावीत हा त्या-त्या महिलांचा अधिकार आहे. अधिक मुले जन्माला घालण्यासाठी राष्ट्रपती कोणत्याही महिलेवर दबाव टाकू शकत नाही. कुटुंब नियोजनात कोणी सहभागी व्हावे किंवा कोणी होऊ नये, हे सांगण्याची आवश्यकता नाही.

सद्गुरु सिवया सुब्रमुनिया स्वामी लिखित हिंदु कसे बनावे ? पुस्तकातून हिंदु बनण्यास इच्छुक असणार्‍यांना मार्गदर्शन !

     न्यूयॉर्क - ज्या अहिंदूंना अद्वितीय हिंदु धर्माची दीक्षा घ्यायची आहे, अशांनी हिंदु धर्मात कसा प्रवेश करावा?, याविषयीचे मार्गदर्शन हिंदु कसे बनावे ? या पुस्तकात उदाहरणासह सांगण्यात आले आहे. अमेरिकेत ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेल्या परंतु पुढे सनातन हिंदु धर्म स्वीकारलेल्या सद्गुरु सिवया सुब्रमुनिया स्वामी (पूर्वाश्रमीचे रॉबर्ट हॅन्सेन) हे या पुस्तकाचे लेखक आहेत. 
     या पुस्तकात जगभरातील विविध अहिंदु व्यक्ती आणि कुटुंबांनी अधिकृतरित्या हिंदु धर्म कसा स्वीकारला ?, याविषयी विवेचन करण्यात आले आहे. हिंदु धर्म स्वीकारण्याच्या प्रक्रियेत अंतर्भूत असलेले ६ टप्पे स्वामींनी सुचवले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
१. हिंदु समुदायाशी जोडणे
२. हिंदु धर्म आणि स्वत:च्या मूळ धर्माच्या शिकवणुकीची तुलना करणे
३.आधीच्या धर्मातील मार्गदर्शकांपासून वेगळे होणे
४. अधिकृतरित्या हिंदु नांव स्वीकारणे
५. हिंदु धर्मशास्त्रानुसार स्वत:वर नामकरणाचा संस्कार करून घेणे
६. आधीच्या धर्मापासून वेगळे झाल्याचे आणि हिंदु नामकरण करून घेतल्याची घोषणा करणे
     जन्माने हिंदु असलेल्या, परंतु त्याच्यापासून दुरावलेल्या हिंदूंची उदाहरणे देऊन त्यांनी हिंदु धर्माची शिकवण कशी अंगिकारली हेसुद्धा सदर पुस्तकाद्वारे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील शाळांना १९ हिंदु सणांच्या वैकल्पित सुट्या घोषित !

भारतातील राज्यकर्त्यांना चपराक !
     न्यूयॉर्क - न्यू जर्सी राज्य शिक्षण मंडळाने त्याच्या शाळांच्या वैकल्पित सुट्यात १९ हिंदू सणांचा समावेश केला आहे. तसेच या दिवशी अनुपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांना कोणतेही बक्षीस मिळवण्यास अथवा बक्षिसासाठी आवश्यक अशा परीक्षेत भाग घेण्यासाठी मज्जाव केला जाणार नाही. तसेच या दिवशी शाळेच्या परीक्षा असल्यास हिंदु विद्यार्थ्यासाठी वेगळी अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.

ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ वासनांधांकडून बलात्कार !

मानवजातीला काळीमा फासणारी घटना !
     ब्राझीलिया - ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर किमान ३३ वासनांधांकडून बलात्कार आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे व्हीडिओ बनवून तो सामाजिक संकेतस्थळांवर अपलोड करण्याची घटना घडली आहे. (या वासनांधांना कितीही वेळा फाशी दिली, तरी ती अल्प होय ! - संपादक) रिओ डे जानिएरो परिसरात ही घटना घडली. आरोपींमध्ये पीडित मुलीचा मित्रही (बॉय फ्रेंडही) सहभागी होता. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आणि त्यानंतर ते अपलोड केले. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

दाढी कापल्यास १०० डॉलरचा, तर घट्ट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड !

आर्थिक कंबरडे मोडल्याने इसिस (इस्लामिक स्टेट) वैतागली !
     वॉशिंग्टन - इसिसचे (इस्लामिक स्टेटचे) आर्थिक कंबरडे मोडले आहे. रशिया आणि अमेरिका यांच्या हवाई आक्रमणांमुळे तसेच सिरियाच्या सैन्याच्या कारवायांमुळे इसिसने काबिज केलेला बराचसा भाग तिच्या हातून निसटत चालला आहे. परिणामी संकटात सापडलेल्या इसिसने आता तिच्या नागरिकांवर विविध दंड आकारण्यास आरंभले आहे. नागरिकांनी दाढी कापल्यास १०० डॉलरचा दंड, तर महिलांनी घट्ट कपडे घातल्यास त्यांच्याकडून २५ डॉलरचा दंड आकारला जात आहे. (तथाकथित स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या तृप्ती देसाई यांनी महाराष्ट्रात नव्हे, तर सिरियात जाऊन कार्य करायला हवे. वास्तविक तेथे त्यांची आवश्यकता आहे. अर्थात ज्या मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात घुसण्यास भीतात, त्या सिरियात जाण्याचे धाडस कदापि करणार नाहीत ! - संपादक) अमेरिकेतील आयएच्एस् इंक या संस्थेने या सदर अभ्यास मांडला आहे.

इराणचे नागरिक यावर्षी हजला जाणार नाहीत !

     तेहरान - इराणचे सांस्कृतिक मंत्री अली जन्नती यांनी म्हटले आहे की, यावर्षी इराणच्या नागरिकांना सौदी अरबमधील मक्का येथे पाठवणार नाही. यासाठी त्यांनी सौदी अरबला उत्तरदायी ठरवले आहे. गेल्या वर्षी ६० सहस्र इराणी नागरिक हजला गेले होते. 
    त्या वेळी सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहस्रो हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता आणि यात इराणचे नागरिक सर्वाधिक होते. यासाठी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्ला खेमेनी यांनी सौदी अरबला क्षमा मागण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी क्षमा मागितली नाही आणि यासंदर्भात अहवालही सादर केला नाही. त्यामुळे इराणने वरील निर्णय घेतला आहे. बिहारच्या आरा आणि समस्तीपूर येथील कारागृहांतून भ्रमणभाष सहित अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त !

     आरा/समस्तीपूर - बिहारच्या आरा आणि समस्तीपूर कारागृहांत प्रशासनाने घातलेल्या छाप्यामधून मोबाइल, सीम कार्ड, चार्जर सहित अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील सीवान येथील कारागृहातही अशा प्रकारे छापा मारून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. कारागृहातून काही अपराधांचे कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. (अपराध घडल्यानंतर जागे होणारे पोलीस काय कामाचे ? - संपादक)स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या सरकारी आस्थापनाला १ सहस्र कोटींहून अधिक रुपयांचा तोटा !

     नवी देहली - शासकीय आस्थापन स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडला (सेलला) तब्बल १ सहस्र २३१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्ष २०१४-१५ या आर्थिक वर्षात आस्थापनाला ३३४ कोटींहून अधिक रुपयांचा नफा झाला होता. यंदा मात्र झालेल्या तोट्यामागे विक्रीमध्ये झालेली घट आणि बाजारातील आव्हानात्मक वातावरण कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला, तर आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये सेलला २ सहस्र ९३ कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर २०१५-१६ मध्ये ४ सहस्र १३७ कोटी रुपयांचा तोटा झाला.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा मार्च २०१६ मधील आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा 
१ अ. मार्च २०१६ पर्यंतची विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 
१ आ. संकेतस्थळाला मिळालेले मानांकन
१ आ १. गूगलने दिलेले मानांकन (टीप १) (मार्च २०१६ नुसार) : ३ 
टीप १ : प्रत्येक संकेतस्थळाला गूगल १ ते १० यांपैकी क्रमांक देते. जेवढा क्रमांक जास्त, तेवढे मानांकन (पेज रँक) चांगले.
१ आ २. अलेक्सा क्रमांक (टीप २) (३१.१.२०१६ नुसार) : ७०,४७८
टीप २ : एखाद्या संकेतस्थळाचे अलेक्सा मानांकन जितके अल्प, तेवढे ते संकेतस्थळ अधिक लोकप्रिय समजले जाते. अलेक्सा मानांकन १ लक्षहून अल्प असणे, हे संकेतस्थळ अधिक प्रमाणात लोकप्रिय असल्याचे दर्शक असते.

वाचकांच्या विशेष मागणीवरून बालवाचकांसाठीचे नियमित सदर !

बालकांसाठी परिपाठ !
     उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुट्टीतील परिपाठ ! हे सदर प्रसिद्ध करण्यात आले. यातून विविध बोधकथा, लेख आदी माध्यमांतून सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी माहिती दिली गेली. आता सुट्टीचा कालावधी संपत आला असला, तरी वाचकांच्या विशेष मागणीवरून हे सदर नियमित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सदर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण होण्यास साहाय्यभूत ठरो, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना !
स्वतःच्या प्राणांपेक्षा ग्रंथांना महत्त्व देणारे 
नालंदा विद्यापिठातील विद्यार्थी !
     नालंदा हे शहर भारतातील एक जगविख्यात आणि महान विद्यापीठ होते. हे एक असे विद्याकेंद्र होते की, त्या काळी जगातील सर्व देशांतील कोणी ना कोणी विद्यार्थी तेथे शिकत होता.
   या विद्यापिठाची कीर्ती ऐकून जगप्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग दुर्गम हिमालय पार करून भारतात आला. त्याने नालंदा येथे राहून काही काळ अध्ययन आणि अध्यापनही केले. त्या वेळी तेथील अभ्यासक्रम, धर्म आणि शास्त्र यांचे शिक्षण देणारी कार्यपद्धत, तेथील संपन्न ग्रंथालये हे सर्व पाहून आणि प्रत्यक्ष अनुभव यांतून तो प्रभावित झाला.

भारताच्या नकाशा विधेयकामुळे पाकला पोटशूळ

    हिंदुस्थानच्या नकाशा विधेयकावरून पाकिस्तानचा जळफळाट झाल्याने त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रात धाव घेतली. देशाची भौगोलिक स्थिती नकाशाद्वारे प्रमाणित करणारे विधेयक अद्याप प्राथमिक स्थितीत आहे. तरी पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. जम्मू-काश्मीर हिंदुस्थानने त्याच्या भूभागात दाखवणे त्यांना न पटणारे असल्याने त्यांनी गळा काढण्यास आरंभ केला. संयुक्त राष्ट्रात धाव घेण्यासाठी चीनने पाकला फूस लावल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी दुसर्‍या देशावर विसंबून रहावे लागणार्‍या पाकची म्हणूनच भाडोत्रींचा देश अशीच ओळख आहे.

कु. उत्तरा गोडबोले हिचे १० वीच्या सीबीएस्ई बोर्डाच्या परीक्षेतील यश !

कु. उत्तरा गोडबोले
       नवी मुंबई - येथील नेरुळच्या अपीजय शाळेतील कु. उत्तरा गोडबोले हिला १० वीच्या सीबीएस्ई बोर्डाच्या परीक्षेत ८९.३० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिला ९.४ सीजीपीए असेही गुण मिळाले आहेत. परीक्षेच्या कालावधीत श्रीकृष्णाला प्रार्थना आणि नामजप केल्याने हे यश मिळाल्याचे तिने सांगितले. ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते.

धर्मद्रोह्यांच्या कुकृत्यांच्या परिणामांच्या दोन बाजू !

      अलीकडे दैनिकांत वरचेवर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या संदर्भातील वार्ता झळकत आहेत. तृप्ती देसाई एकापाठोपाठ एक हिंदु मंदिरांच्या गाभार्‍यात प्रवेश करत आहेत. पोलीसही त्यांना साहाय्य करत आहेत. त्या पोलीस यंत्रणेला वेठीस धरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे समाजद्रोही कार्य करतात. धर्मपरंपरा मोडून हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य नष्ट करण्याचा त्यांनी जणू सपाटाच लावला आहे. अशा आशयाच्या वार्ता वाचतांना एकनाथी भागवतातील कलियुगाच्या संदर्भातील एका सूत्राचे स्मरण झाले आणि विचारांची शृंखला चालू झाली. 

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)      स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्वाचे विचार व लोकमान्य टिळक यांचे सर्वसमृद्ध ज्ञान यांची हिंदूंना आवश्यकता आहे ! - कै. मिलिन्द गाडगीळ, ज्येष्ठ युद्धपत्रकार
     आज पापस्तानादी शत्रू पक्षांनी हिंदुस्थानात घुसवलेल्या पंचस्तंभीय घातपाती आणि भ्रष्टाचारी देशद्रोह्यांच्या प्लेगला नष्ट करण्यासाठी, तसेच पवित्र सिंधु नदीला मुक्त करण्यासाठी अखंड बलसंपन्न हिंदुस्थान निर्मिण्याकरता कृतीशील राहूया ! - प्रज्वलंत, (२२.६.२००२)

कलियुगातील मानवाला निष्काम कर्मयोगाद्वारे सत्ययुगात नेणारे अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या कार्याची पार्श्‍वभूमी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...
       देवद आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे थोर संत प.पू. पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या अवतारी कार्याचे महत्त्व विशद केले आहे. या लेखांतून त्यांनी भगवंताने केलेली सृष्टीची सुंदर व्यवस्था, काळाच्या प्रभावामुळे त्यात होत गेलेली स्थित्यंतरे, धर्मग्लानीची अवस्था असल्याने हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, इतर पंथियांचे हिंदु धर्मावरील वाढते आक्रमण यांविषयीचा उहापोह केला आहे. अशा काळाच्या पार्श्‍वभूमीवर धर्मग्लानी दूर करण्याचे ईश्‍वर नियोजित कार्य प.पू. डॉक्टरांकडून कशा प्रकारे केले जात आहे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कसे मार्गक्रमण होत आहे, याचे अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन त्यांनी केले आहे.
       या भागात प.पू. पांडे महाराज यांनी मानवजन्माचा मूळ हेतू, त्यासाठी भगवंताने केलेली सुंदर समाजव्यवस्था आणि त्यात झालेली स्थित्यंतरे, तसेच समाजव्यवस्था खालावण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अन्य घटना यांविषयी केलेले विवेचन आपण पहाणार आहोत.

विविध सेवांच्या माध्यमातून श्रीगुरूंचे मन जिंकणार्‍या आणि त्यांची कृपा अनुभवणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक स्तर असणार्‍या सौ. मनीषा पानसरे !

सौ. मनीषा पानसरे
        आपली आध्यात्मिक पातळी ६० टक्के व्हावी, असे मला कधीच वाटत नव्हते. माझ्या मनात आपण आपले पडद्यामागे राहूनच सेवा करायची, असा विचार असायचा. सहसाधकांना मात्र माझी प्रगती व्हावी, असे पुष्कळ वाटत असे. वर्ष २०१३ च्या गुरुपौर्णिमेला दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आलेली ६० आणि ७० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकांची सूची पहातांना माझ्या मनात विचार येऊन गेला, पुढील वर्षी आपले नाव या सूचीत येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यानंतर मी हा विचार विसरूनही गेले. मी सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर केलेल्या साधनेचा प्रवास येथे देत आहे.
१. वयाच्या १३-१४ वर्षांपर्यंत 
ध्यानाला बसल्यावर गाढ ध्यान लागणे
        १० व्या वर्षापासून घरातील सर्वच जण एका वहीत ॐ नमः शिवाय । हा नामजप कधी ११ वेळा, तर कधी एक पान लिहीत असत. त्याच वेळी बाबांनी मला ध्यान लावायला शिकवले. ध्यान करतांना मला कधी प्रकाश दिसायचा, तर कधी कधी माझे गाढ ध्यान लागून मला हलवल्यावरच जाग यायची. हा नामजप वयाच्या १३-१४ वर्षांपर्यंत चालू होता.

श्री गणेशाच्या महाअभिषेकाच्या वेळी केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि आलेल्या अनुभूती

कु. शिवांजली होसाहोळलू
       उच्छिष्ट गणपति यज्ञानंतर गणपतीला महाअभिषेक करण्यात आला. त्या वेळी आलेल्या अनुभूती, केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. सूक्ष्म-परीक्षण
१ अ. महाअभिषेकाच्या चैतन्याने देह चैतन्यमय होणे : अभिषेक चालू असतांना माझ्या सहस्रारचक्रातून तेजरूपी शक्ती शरिरात प्रवेश करत होती. तेव्हा शरीर आणि सर्व चक्रे एकेक करून भारित झाली आणि माझ्यावरील आवरण निघून जात आहे, असे जाणवले. मला पुष्कळ समाधानी वाटत होते. डोळ्यांना उष्णता जाणवत होती; पण वातावरणात थंड वारा वहात होता. माझ्या शरिराभोवती कवच निर्माण झाल्यासारखे वाटले.
१ आ. प.पू. डॉक्टर शेजारी उभे राहून सूक्ष्म-परीक्षण करायला शिकवत आहेत, असे जाणवणे : सकाळी प.पू. डॉक्टरांनी सुचवले, तूही सूक्ष्म-परीक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजेस. त्यांचे आज्ञापालन करून प्रयत्न केला. अभिषेकाच्या वेळी सतत प.पू. डॉक्टर शेजारी उभे राहून या अपात्र जिवाला मार्गदर्शन करत होते.
१ इ. अभिषेकाच्या वेळी सर्व देवता हा अद्वितीय सोहळा पहाण्यासाठी अवतरल्या आहेत, असे जाणवणे : अभिषेकाच्या वेळी सर्व देवता पृथ्वीवर यज्ञस्थळी हा अद्वितीय सोहळा पहाण्यासाठी अवतरल्या आहेत, असे जाणवले. तेव्हा श्रीराम, सीता आणि हनुमान यांचे अस्तित्व अधिक जाणवत होते. प्रत्यक्षात त्यांच्याच मूर्ती देवघरात ठेवल्या होत्या. प.पू. दास महाराजांच्या आगमनाने चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरला. त्यांच्या माध्यमातून दास हनुमानाचे दर्शन झाले. गणपतीचेही अस्तित्व थोड्या प्रमाणात जाणवले. श्रीविष्णुतत्त्व आणि शिवतत्त्व एकरूप होऊन सर्वत्र प्रक्षेपित होत होते.

मनाने भेटणे या शब्दांतील गंमत !

कु. स्वाती गायकवाड
        एकदा भावसत्संगात एका साधिकेने तिचा मनाने करणे हा अहंचा पैलू तीव्र असून त्या विषयीचे काही प्रसंग सांगितले. एका प्रसंगात ती म्हणाली, प.पू. डॉक्टरांना भेटण्याआधी व्यवस्थापनातील साधकांना कल्पना न देता मी त्यांना मनानेच भेटायचे. असे अनेकदा झाले होते. हे ऐकल्यावर मी तिच्या वाक्यातील गंमत तिला सांगितली. खरंतर देवाला मनानेच भेटायचे असते; पण इथे मनाने भेटणे म्हणजे स्वतःच्या मनानुसार भेटणे, हा अहंचा पैलू होता, तर स्थुलापेक्षा मनातून त्यांना भेटणे हा अधिक सूक्ष्मातील भाग होता.
- कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०१५)

सेवा करण्याची आवड असलेला जळगाव येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. पार्थ योगेश पाटील (वय ८ वर्षे) !

कु. पार्थ पाटील
१. ९ मास ते १ वर्ष
१ अ. प्रेमभाव : कु. पार्थ १० - ११ मासांचा (महिन्यांचा) असतांना दिवाळीत त्याची आई लाडू करत होती. त्या वेळी त्याने खूण करून त्याला खेळवायला आलेल्या शेजारच्या मोठ्या मुलालाही लाडू द्यायला सांगितला.
१ आ. पार्थकडे बघून सर्वांना पुष्कळ आनंद वाटतो.
१ इ. मी त्याला जवळ घेतल्यावर माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे मला जाणवते.

२. १ ते ३ वर्षे
       पार्थ शांत असून ३ वर्षांचा होईपर्यंत त्याने काहीच त्रास दिला नाही. त्याला मंदिरात जाऊन नमस्कार करायला आवडायचे.

गुरु आमुचे हो श्रीजयंत ।

श्री. विनायक शानभाग
       गुढीपाडव्याच्या (८.४.२०१६) दिवशी सकाळी उठल्यापासूनच गुरूंची कीर्ती गाण्याची सेवा मला मिळू दे, अशी सतत प्रार्थना होत होती. सकाळी ९ वाजता श्री गुरुकृपेने पुढील ओळी सुचल्या आणि गुरुदेवांनी चालही सुचवली. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमोर ते गायल्यावर त्यांनी त्यात काही सुधारणा केल्या. ही शब्दसुमने गुरुचरणी अर्पण !
गुरु आमुचे हो श्रीजयंत ।
ज्याला नाही आदि-अंत ॥ धृ.॥
त्याची लीला वर्णिती ऋषिगण ।
पहाण्या त्याला वाट पहाती देवगण ॥
वैकुंठातून आले ते आम्हासाठी ।
नेहमी असत ते भक्तांपाठी ॥ १ ॥

अंगण झाडणे, सडा घालणे, रांगोळी काढणे आणि शेणाचा सडा अथवा शेणाने सारवणे यांतून घडत असलेली स्वभावदोष अन् अहंनिर्मूलन प्रक्रिया !

        या संदर्भात श्रीकृष्णाने ८.८.२०१५ या दिवशी सकाळी सुचवलेे विचार पुढीलप्रमाणे आहेत.
१. घराचे अंगण म्हणजे घरातील सर्वांचे एकत्रित मन आहे.
२. अंंगण झाडणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे आणि शेणाचा सडा अथवा शेणाने सारवणे यांचा मतितार्थ पुढीलप्रमाणे आहे.

अ. झाडणे : घरातील सर्वांचे स्वभावदोष एकत्र करणे, म्हणजेच स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची पूर्वसिद्धता (स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला आरंभ)
आ. सडा टाकणे : सर्वांची मने धुऊन स्वच्छ करणे, म्हणजेच प्रत्यक्ष स्वभावदोष निर्मूलन

१.६.२०१६ या दिनांकापासून सर्वांनी करावयाचे उपाय

      आतापर्यंत सांगितलेले उपाय कोणत्या कालावधीत करायचे, हे मी सांगत असे. आता काळ झपाट्याने पालटत असल्याने आणि महर्षि वेळोवेळी साधना सांगत असल्यामुळे या वेळी कधीपर्यंत उपाय करायचे, हे या वेळी सांगत नाही.

साधकांना महत्त्वाची सूचना !

पोलीस घराची किंवा आश्रमाची झडती 
घेण्यासाठी आल्यास पुढील दक्षता घ्या !
       पोलीस घरी किंवा आश्रमांत झडतीसाठी आल्यानंतर कोणती दक्षता घ्यावी, यासंदर्भातील मार्गदर्शक सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. कोणत्याची वास्तूची झडती घेण्यासाठी तसे लेखी आदेश पोलिसांकडे असणे आणि त्यांची प्रत संबंधित मालकाला दाखवणे आवश्यक असते.
२. कायद्यानुसार झडती घेतांना पंच असलेच पाहिजेत. पंच हा पोलिसांचा प्रतिनिधी असतो. ते अमुक धर्माचे किंवा गटाचे आहेत; म्हणून नको, असे म्हणून चालणार नाही.
३. पोलीस घरी किंवा आश्रमात आल्यानंतर झडती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा आग्रह आपण करू शकतो. तसेच धर्माविरुद्ध कोणतीही कृती पोलिसांकडून होणार नाही, याची दक्षता आपणच घ्यायला हवी. उदा. आश्रमात प्रवेश करतांना चप्पल काढूनच प्रवेश करणे इत्यादी.

गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक

गुरूंच्या निर्गुण 
आणि सगुण रूपांची सेवा 
       अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.

साधकांना सूचना

आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढत असल्यास 
आध्यात्मिक उपाय आणि नामजप वाढवा !
       सध्या अनेक साधकांना तीव्र स्वरूपाचे शारीरिक त्रास होत आहेत. त्यात उष्णतेचे त्रास, अंगदुखी, गळून गेल्यासारखे होणे आदी स्वरूपांचे त्रास होत आहेत. हे सर्व त्रास शारीरिक स्वरूपाचे असले, तरी त्यांमागे आध्यात्मिक कारण असल्यामुळे साधकांनी नियमित आध्यात्मिक उपाय करण्याबरोबरच नामजपही वाढवावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०१६)

साधकांना सूचना

        पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - वैशाख कृष्ण पक्ष चतुर्दशी (४.६.२०१६) रात्री ११.५० वाजता
समाप्ती - वैशाख अमावास्या (५.६.२०१६) सकाळी ८.३० वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवादाच्या सावटाखाली असलेली असुरक्षित मंदिरे !
         गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सारसा गावात असलेल्या कैवाल मंदिराचे पुजारी अविचलदासजी महाराज यांना ठार मारण्याची तसेच मंदिर बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी २ पत्रांद्वारे देण्यात आली आहे. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या जिहाद्याने ही पत्रे पाठवली आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jaish-e-Mohammadne Gujaratke Anand jileke ek mandirko bamse udane ki dhamki di.
Kya Hindubahul deshme Mandiroka asurakshit rehna lajjajanak nahi ?
जागो ! : जैश-ए-मोहम्मद ने गुजरात के आनंद जिले के एक मंदिर को बम से उडाने की धमकी दी.
क्या हिन्दूबहुल देश में मंदिरों का असुरक्षित रहना लज्जाजनक नहीं ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      नोकरी करायची असेल, तर कोणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले असण्याचा अर्थ लक्षात घ्या !

       सप्तर्षि जीवनाडीतील मजकूर सांगणार्‍या महर्षींनी मला श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले आहे. साधकांना ही अपूर्व गोष्ट वाटेल. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, काही संतांना अनंत श्री, असे संबोधतात. त्यांच्या मानाने मी कुठेच नाही, हे लक्षात घ्या !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । 
वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाची एकाग्रता 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

खडसेंचे काय होणार ?

संपादकीय 
     भाजप शासन सत्तेवर आले तेच मुळी काँग्रेसींच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी दिलेल्या ललकारीमुळे. त्यांनी गुजरातमधील भ्रष्टाचार अल्प करून दाखवल्याची चर्चा झाली आणि सज्जन भारतीय जनतेला आशा वाटू लागली की, पंतप्रधान मोदी अशाच प्रकारे देशातील भ्रष्टाचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करतील; तसे ते अन्य पक्षांच्या संदर्भात करतही आहेत; परंतु स्वपक्षातच त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍या नेत्यांना राज्यात आणि देशात मंत्रीमंडळात सामावून घेतले आहे, ही काही दिवसांपासून जनतेला खुपत असलेली सल आहे. आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या सपाट्यामुळे खडसे यांचे मंत्रीपद जाण्याची चिन्हे निर्माण झाल्यावर भाजपने पक्षांतर्गत सुधारणा करायला हव्यात, असे जनतेला वाटल्यास नवल नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn