Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

'परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष' विशेषांक

     अध्यात्मातील जिज्ञासूंना मोक्षाचा मार्ग दाखवणारे, आनंदी जीवनासाठी सहज-सोप्या भाषेत अध्यात्म शिकवून त्यांच्या जीवनातील अंधःकार दूर करणारे, हिंदु धर्माभिमान्यांच्या कार्याला दिशा देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले; म्हणजे आमची गुरुमाऊली ! राष्ट्रगुरु, ज्ञानगुरु, मोक्षगुरु, विश्‍वगुरु, जगद्गुरु अशा कितीही पदव्या थिट्याच वाटणारे आमचे परमपूज्य हे खरेतर कल्पतरूच आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महान कार्याचे गुणगान आम्ही काय गावे ? १० मे २०१५ या दिवशी साक्षात महर्षींनीच सप्तर्षि जीवनाडीपट्टीद्वारे 'परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अंशावतार आहेत', हे गुपित उघड केले. यंदाही महर्षींच्या आज्ञेनेच प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणाचा सोहळा सनातन आश्रम, रामनाथी येथे संपन्न झाला. या सोहळ्याचा वृत्तांत या विशेषांकातून प्रसिद्ध करत आहोत. साधनेचा मार्ग दाखवून आमचे जीवन उद्धरणारे धर्मसूर्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सनातन प्रभात समूहाकडून ही कृतज्ञता !!!

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नाडीवाचनाद्वारे महर्षींनी वर्णिली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची थोरवी !

     सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) - परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या उपस्थितीत ३० मे या दिवशी दुपारी १२ वाजता सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करण्यात आले. या वेळी महर्षींनी साधकांना गुरुमहिमा सांगून श्रीगुरूंची भक्ती करण्यासाठी प्रेरित केले. या नाडीवाचनातील सूत्रे येथे थोडक्यात प्रसिद्ध करत आहोत. 
 डावीकडून पू. (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ, परात्पर गुरु डॉ. आठवले,
नाडीवाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्, नाडीवाचन हिंदीत भाषांतर करून सांगतांना श्री. विनायक शानबाग

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी संपन्न !

विधींच्या प्रारंभी देवतांना नारळ-विडे अर्पण करतांना सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ,
त्यांच्या मागे मंत्रपठण करतांना सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित (२६.५.२०१६)

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या सनातनच्या रामनाथी आश्रमातील आगमनाप्रसंगीची क्षणचित्रे

जीवनाडीपट्टीच्या आगमनाने आश्रम पावन झाला । महर्षींच्या कृपेने अमृतानंद अनुभवला ॥
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संत यांची वंदनीय उपस्थिती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातातील सप्तर्षि जीवनाडीचे पूजन करतांना 
१. श्री. सिद्धेश आणि २. सौ. सायली करंदीकर, बाजूला  ३. पू. डॉ. ॐ उलगनाथन् (२८.५.२०१६)

भाजपचे काँग्रेसमुक्त भारत करण्याचेच हे कारस्थान ! - सोनिया गांधी

   रायबरेली (उत्तरप्रदेश) - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचा ब्रिटनमध्ये बंगला आहे. १९ कोटी रुपयांचा हा बंगला शस्त्रास्त्र वितरक आणि ऑफसेट इंडिया सोल्यूशन्स आस्थापनाचे मालक संजय भंडारी यांनी वर्ष २००९ मध्ये बेनामी पद्धतीने खरेदी करून दिल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोनिया गांधी यांनी हे भाजपचे काँग्रेसमुक्त भारत करण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. आणि हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (सोनिया गांधी यांनी आरोप फेटाळले; म्हणून ते खोटे ठरतात, असे नाही. या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. - संपादक)

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि सप्तर्षि जीवनाडीपट्टी यांच्या आगमनाप्रसंगीच्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात साक्षात महर्षि अवतरले !
१. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हातातील सप्तर्षि जीवनाडी आणि २. श्री. दिवाकर आगावणे यांच्या हातातील वज्र यांचे औक्षण करून स्वागत करतांना ३. सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ (२६.५.२०१६)

२९ मे या दिवशी झालेल्या भावसोहळ्यातील क्षणचित्रे

* १९९७ ते २००५ या कालावधीत भारतभर अध्यात्मप्रसारासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ज्या वाहनातून भ्रमण केले, त्याच पिवळ्या रंगाच्या चैत्यन्यमय वाहनातून (रथातून) परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे कलामंदिराच्या ठिकाणी आगमन झाले. 
* सोमयाजी चैत्यन्य काळे सोमयागाचे गायन करतांना करत असलेल्या मुद्रेविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जाणून घेतले. कार्यक्रमात शिकता आलेल्या गोष्टी त्यांनी लिहून घेतल्या.
* शेवटी प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी प.पू. कर्वेगुरुजी म्हणाले, "परात्पर गुरु डॉ. आठवले हे तीर्थस्वरूप आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हृदयामध्ये मला विश्‍वदर्शन झाले आणि 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा नामजप येतांना दिसला. त्यांच्यात दैवी शक्ती आहे."

काही उच्च कोटीतल्या संतांना विशिष्ट सवयी असणे; परंतु प.पू. डॉक्टरांच्या कुठल्याही कृतीत दोष आढळत नसल्याने ते सर्वच गोष्टींत परिपूर्ण आणि अनुकरणीय असणे

      उच्च कोटीतल्या संतांना विशिष्ट सवयी असतात. कोणी गांजा ओढतात, कोणी कचर्‍याच्या ढिगार्‍यावर जाऊन बसतात, काही संत लोकांनी पाठीस लागू नये; म्हणून हेतूपुरस्सर वेड्या माणसांसारख्या कृतीही करतात, तर काही संत शिव्याही देतात. म्हणून अध्यात्मशास्त्रात असे सांगितले आहे की, संतांच्या उपदेशाप्रमाणे वागावे आणि साधना करावी; परंतु ते वागतात, तसे वागू नये. त्यांचे अनुकरण करू नये. प.पू. डॉक्टरांच्या कुठल्याही कृतीत १ टक्कासुद्धा दोष आढळत नाही. - (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवलेसनातन प्रभातच्या संकेतस्थळाद्वारे सर्व नियतकालिकांना विज्ञापने देण्याची सोयही उपलब्ध !

     सनातन प्रभातच्या संकेतस्थळावर सनातन प्रभातच्या नियतकालिकांचे वर्गणीदार होण्यासह नियतकालिकांसाठी विज्ञापने देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये दैनिकाच्या ४ आवृत्त्या निवडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एखाद्या विज्ञापनदात्याने संकेतस्थळावरील 'फॉर्म' भरल्यावर संबंधित नियतकालिकाचे विज्ञापनसेवक विज्ञापनदात्याला संपर्क करून पुढील कार्यवाही करू शकतील.

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांच्या शुभहस्ते सनातन प्रभात नियतकालिकांच्या नूतन संकेतस्थळाचे उद्घाटन !

संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी सोबत
संकेतस्थळाशी संबंधित सेवा करणारे साधक श्री. सुमित सरोदे
 
     रामनाथी (गोवा), ३१ मे (वार्ता.) - येथील सनातनच्या आश्रमात २९ मे या दिवशी पुणे येथील थोर संत प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांच्या शुभहस्ते सनातन प्रभातच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. www.sanatanprabhat.org/subscribe अशी या नूतन संकेतस्थळाची मार्गिका (लिंक) असून याद्वारे (दैनिक सनातन प्रभात वगळता) मराठी आणि कन्नड भाषांतील साप्ताहिक, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील पाक्षिक अन् गुजराती भाषेतील मासिक सनातन प्रभात यांचे वर्गणीदार होता येणार आहे. याअंतर्गत वरील नियतकालिकांची वर्गणी भरण्यासाठी 'ऑनलाइन पेमेंट'ची (पैसे भरणे)सोय सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदर नियतकालिकांच्या वर्गणीदारांना संकेतस्थळाद्वारे नूतनीकरणही करता येईल. 
क्षणचित्र :
     या वेळी प.पू. कर्वेगुरुजी यांनी उपस्थित साधकांकडून ११ वेळा 'ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम:।' हा नामजप करवून घेतला. 

फलक प्रसिद्धीकरता

गेली ६ दशके देशाचे लचके तोडणार्‍या काँग्रेसला असे बोलण्याचा काय अधिकार ?
     काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर भाजपने लावलेले आर्थिक गैरव्यवहारांचे सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले, काँग्रेसमुक्त भारत या कारस्थानाचाच हा भाग असून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत.

पुणे येथील थोर संत प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांच्या शुभहस्ते 'परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय व संतांनी केलेला गौरव' या नूतन ग्रंथाचे प्रकाशन !

ग्रंथाचे प्रकाशन करतांना प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
     रामनाथी (गोवा), ३१ मे (वार्ता.) - सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या मंगल मुहूर्तावर (२९ मे या दिवशी) पुणे येथील थोर संत प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांच्या शुभहस्ते 'परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय व संतांनी केलेला गौरव' या सनातनच्या नूतन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले

अल्प अहं आणि स्थितप्रज्ञ 
असलेले प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी ! 
     प्रकाशनाच्या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस हे प.पू. कर्वेगुरुजींना म्हणाले, "ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेल्या विविध संतांच्या छायाचित्रांत तुमचेही छायाचित्र आहे." यावर प.पू. कर्वेगुरुजी म्हणाले, "अन्य सर्व संत आहेत, मी संत नाही." यातून त्यांच्यातील विनम्रता, अल्प अहं आणि स्थितप्रज्ञता दिसून येते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
BJPdwara Vaderapar lagaye aropopar Sonia Gandhine kaha, yah CongressMukt Bharatke shadyantraka bhag Sarkarhi nahi, jantabhi chahti hai Congressse mukti
जागो !
भाजपाद्वारा वडेरा पर लगाए आरोपों पर सोनिया गांधी ने कहा, यह काँग्रेस मुक्त भारत के षड्यंत्र का भाग !
सरकार ही नहीं, जनता भी चाहती है काँग्रेससे मुक्ती !

पुलगाव (जिल्हा वर्धा) येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला आग

       वर्धा, ३१ मे - जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्पमध्ये) ३० मे या दिवशी रात्री २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये २ अधिकार्‍यांसह २० जणांचा मृत्यू झाला असून १९ जण घायाळ झाले आहेत. आग लागल्यानंतर परिसरात मोठे स्फोट झाले. त्यामुळे कॅम्प परिसरातील १५ किलोमीटर परिघातील गावांना खूप मोठे हादरे बसले. या स्फोटामुळे डेपो परिसरातील नागझरी आणि आगरगाव येथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अग्नीशमनदलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती मिळत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या वेळी जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये

१. परमपूज्यांचा पवित्र नद्यांविषयीचा भाव
     परमपूज्यांवर ११ पवित्र नद्यांच्या जलाचे प्रोक्षण करण्यात आले. परमपूज्यांच्या तोंडवळ्यावर (चेहर्‍यावर) थकवा जाणवत होता, तसेच त्यांची छाती वर-खाली होतांना दिसत होती, इतका त्यांना श्‍वास घ्यायलाही त्रास होत असल्याचे जाणवत होते. असे असतांनाही प्रत्येक तीर्थप्रोक्षणाच्या वेळी ते हात जोडून नमस्कार करत होते.
     कृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेवाने कृष्णाला यमुनापार केले. तेव्हा बाळकृष्णाच्या चरणस्पर्शाने यमुना नदीला जेवढा आनंद झाला असेल, तेवढाच आनंद आज परम पूज्यांवर तीर्थप्रोक्षण केल्याने या सर्व नद्यांनाही झाला असेल ना !

करिता पाद्यपूजन श्रीगुरूंचे, कृतार्थ होई जीवन शिष्याचे !

       सनातन आश्रम, रामनाथी (गोवा), ३१ मे (वार्ता.) - परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीच स्वतःची पूजा करवून घेतलेली नाही. आता महर्षींच्या आदेशामुळेच साधकांना ते थोर भाग्य अनुभवण्यास मिळाले. एरव्ही स्वतःला कधी नमस्कारही करवून न घेणार्‍या गुरुमाऊलीची पाद्यपूजा होतांना पाहून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा गुरुमाऊलीचे रूप अशी स्थिती झाली. श्रीगुरूंची पाद्यपूजा करण्यासारखा परमोच्च क्षण शिष्याच्या जीवनात दुसरा कोणता असेल ? २९ मे २०१६ या दिवशी सकाळी ९.३६ वाजता परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कलामंदिरात आगमन झाले. दोन्ही बाजूंनी साधक पुष्पवृष्टी करत होते, तर छत्र आणि चामरही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्यात्मातील अधिकार दर्शवत होते. प्रवेशद्वाराशीच पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी त्यांच्या गळ्यात तुळशीचा हार घातला, तसेच त्यांना फेटा बांधून स्वागत करण्यात आले. अत्यंत तेजस्वी चेहरा, गळ्यात तुळशीचा हार, सेवेत छत्र-चामर अशा श्रीगुरूंचे स्वागत सनातनचे साधक श्री. सागर निंबाळकर यांच्या स्वरचित बिरुदावलीच्या घोषात झाले. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी अगदी हाताला धरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सिंहासनाकडे नेले. तेव्हा भगवान श्रीविष्णूच्या प्रभु श्रीरामावताराची आठवण झाली.

गुरुपौर्णिमेला ४८ दिवस शिल्लक

गुरुकृपायोगाचे महत्त्व 
      निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.

सोहळ्याच्या निमित्ताने महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे महाविष्णूचा श्रीजयंतावतार म्हणून ओळखले जातील !
      जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची महती वर्णन करतांना महर्षि म्हणाले, भगवान श्रीकृष्ण द्वारकेत ३२ वर्षे सिंहासनावर विराजमान होते, त्याचप्रमाणे आज परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले सिंहासनावर विराजमान आहेत. यापूर्वी ज्याप्रकारे भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, त्याप्रमाणे परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले श्रीजयंतावतार या नावाने श्री महाविष्णूचा अवतार म्हणून ओळखले जातील.
    प्रभु श्रीरामही अयोध्येत एकच दिवस सिंहासनावर बसले होते, याचा दाखला महर्षींनी दिला.
     या वेळी सिंहासनावर विराजमान झालेले परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले हे महाराजांप्रमाणे दिसत आहेत, असे महर्षि म्हणाले. महर्षींनी त्या वेळी साधकांकडून परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले महाराज की जय !, असा जयघोषही करवून घेतला.
२. महर्षि म्हणाले, हे वर्ष दोन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. एक म्हणजे हे वर्ष नारायणस्वरूप परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे अन् दुसरे कारण हे की, या वर्षात सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती येणार आहेत.

सप्तर्षी जीवनाडीमध्ये परम गुरुजी (डॉ. आठवले) श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे जे सांगितले आहे, त्याचा अर्थ

      सप्तर्षी जीवनाडीमध्ये परम गुरुजी श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे सांगितले आहे. या संदर्भात पुढील सूत्रे समजून घेणे आवश्यक आहे. 
१. साधना करणार्‍या सर्वांमध्ये देवतातत्त्व असते, तर साधना न करणारे आणि असुर यांच्यातही ब्रह्मतत्त्व असते. 
२. श्रीरामात श्रीविष्णुतत्त्व ७५ टक्के, तर श्रीकृष्णात १०० टक्के आहे. 
३. विविध संतांमध्ये त्यांच्या उपास्यदेवतेचे तत्त्व ५ - १० टक्के असते. त्यांच्यातील बर्‍याच जणांना त्या त्या देवतेचा अवतार मानतात. या पार्श्‍वभूमीवर (परात्पर गुरु) डॉ. आठवले श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे जे सांगितले आहे, त्याचा विचार करणे आवश्यक आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण या माझ्या उपास्यदेवता होत्या. त्यांच्यात श्रीविष्णुतत्त्व असल्याने माझ्यातही ते काही प्रमाणात आले आहे. त्यामुळे महर्षींनी (परात्पर गुरु) डॉ. आठवले श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे सांगितले आहे. यासंदर्भातच महर्षींच्या सांगण्याचा अर्थ समजून घ्यावा. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.५.२०१६)
      मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं विश्‍वास पूर्ण । 
      अनन्यभावें शरण त्या नांव सच्छिष्य ॥ - दासबोध, दशक ५, समास ३, ओवी १९
अर्थ : सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्‍वास हे सत्शिष्याचे मुख्य लक्षण आहे. सद्गुरूंना जो अत्यंत अनन्यभावाने शरण असतो, तोच खरा उत्तम शिष्य होय.

सप्तर्षि जीवनाडीसमवेत रामनाथी आश्रमात आगमन झालेल्या वज्राविषयीची माहिती

      वज्र हे ऋषी-मुनींच्या कृपेने मिळालेले दिव्य औषध आहे. यासंदर्भात महर्षि म्हणाले, साधकांना वज्रासारखे शरीर प्रदान करण्यासाठी आम्ही हे औषध ठेवले आहे. येणार्‍या काळात आम्ही या औषधात मंत्रशक्तीच्या माध्यमातून संजीवनीप्रमाणे शक्ती घालणार आहोत. (व्रजाच्या पूजनाचे छायाचित्र पृष्ठ ५ वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सोहळ्याच्या संदर्भातील छायाचित्रे

कलामंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले (उजवीकडे) 
यांचे स्वागत करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्

नृत्यसेवा सादर करतांना कु. अपाला आैंधकर (वय ९ वर्षे)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळ्याचे याची देही याची डोळा दर्शन !

धार्मिक विधीनुसार सजवल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिका ऑनलाइन वाचण्यासाठी सनातनच्या संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला (लिंकला) भेट द्या : goo.gl/E1bV5e
(टीप : यातील काही अक्षरे (इंग्रजी लेटर्स) कॅपिटल असल्याची नोंद घ्यावी.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी महर्षींनी दिलेली साक्ष !

      २८ मे या दिवशी जेव्हा पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि सप्तर्षि जीवनाडीपट्टी यांचे रामनाथी आश्रमात आगमन झाले, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घातलेल्या हारातील गुलाबाचे फूल गळून त्यांच्या चरणांवर पडले. त्या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले होते की, याचे कारण मी उद्या सांगीन. 
      त्यानुसार २९ मे या दिवशी सकाळी महर्षि म्हणाले की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांना गुलाबाचे फूल अत्यंत प्रिय होते. (असे होते. - डॉ. आठवले) ते त्यांच्या गुरूंनाही हेच फूल वाहात असत. काल ते हारातील गुलाबाचे फूल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर पडणे, हा प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेला आशीर्वाद होता.रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नाडीवाचनाद्वारे महर्षींनी वर्णिली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची थोरवी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या 
सामर्थ्याचे महर्षींनी केलेले वर्णन 
नाडीवाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्
पूर्णाहुती देतांना डावीकडून पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ,
पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ
 १. भगवान श्रीकृष्ण त्याच्या लीलेद्वारे द्रौपदीचे 
रक्षण करू शकतो, तर प.पू. गुरुदेव करणार नाहीत का ?
       नाडीवाचनाच्या वेळी वसिष्ठ आणि विश्‍वामित्र यांच्यात संवाद चालू झाला. विश्‍वामित्र वसिष्ठ महर्षींना विचारतात, गुरूंच्या स्मरणानेच विजय मिळतो, तर सनातनच्या साधकांनी गुरुदेवांचे स्मरण केले, तर भूक भागेल का ? त्या वेळी वसिष्ठ महर्षींनी एक कथा सांगितली. दुर्वास ऋषी त्यांच्या सहस्रो शिष्यांसह दुर्योधनाकडे जातात. तेव्हा भोजन झाल्यानंतर ते दुर्योधनाला विचारतात, तुला हवा तो वर माग. तेव्हा दुर्योधन म्हणतो, मला वर नको; मात्र आपण पांडवांच्या घरी भोजन स्वीकारावे. त्याप्रमाणे दुर्वास ऋषी पांडवांकडे जातात. द्रौपदी पहाते, तर घरात अन्नाचा कणही नसतो. ती श्रीकृष्णाचे स्मरण करते. श्रीकृष्ण म्हणतो, द्रौपदी चिंता का करतेस ? अक्षयपात्र घेऊन ये. त्या अक्षयपात्राला चिकटलेला अन्नाचा १ कण कृष्ण खातो अन् कृष्णार्पणमस्तु असे म्हणतो. आणि नदीवर स्नानासाठी गेलेले दुर्वास ऋषी आणि त्यांचे सहस्रो शिष्य यांचे पोट आपोआप भरते. कृष्ण हे करू शकतो, तर आपले गुरु करू शकत नाहीत का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या विधीयुक्त पूजनाचा हळदीपासून बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीवर होणारा परिणाम दर्शवणारी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

हळदीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचे
विधीयुक्त पूजन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले
       २९.५.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना ७४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार २६.५.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात हळदीपासून बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मूर्तीचे पूजन करण्यापूर्वी आणि नंतर तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवातील क्षणचित्रे

१. सर्व विधी आणि सोहळा अत्यंत सात्त्विक वातावरणात झाला. संबंधित सेवांमध्ये सहभागी झालेल्या साधकांच्या मुखावर आनंद दिसत होता. महर्षींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनानुसार नियोजनबद्ध रितीने हा सोहळा झाला.
२. जगभरातील साधकांना या ऐतिहासिक विधींची माहिती दाखवता यावी, यासाठी या विधींचे चित्रीकरण आश्रमातील साधकांनी परिश्रमपूर्वक केले. चित्रीकरणात सहभागी झालेल्या साधकांनीही भावपूर्ण आणि उत्तमरित्या हे चित्रीकरण कसे होईल, याची दक्षता घेतली. चित्रीकरणाच्या वेळी विधींचे पावित्र्य कुठेही भंग होणार नाही, याचीही दक्षता हे साधक घेत होते.
३. आश्रमातील प्रवेशद्वारे तोरणांनी सजवली गेली होती. दरवाजांसमोर घातलेली सात्त्विक रांगोळी या आध्यात्मिक महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या ऋषि आणि देवगणांचे स्वागत करत होती. कार्यक्रमावेळचे दैवी सौंदर्य मनाला संतोष देणारे होते. जन्मोत्सवाच्या वेळी आश्रमात कुठलाही कृत्रिम झगमगाट, डामडौल नव्हता.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कौतुकाचा अर्थ आणि अनुभूती

१. महर्षींनी दिलेल्या दैवी उपमा 
आणि त्यांमागील एक कार्यकारण भाव
       महर्षींनी पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांना रक्ताग्नीची, तर पू. (सौ.) बिंदाताई यांना जाठराग्नीची उपमा दिली. आयुर्वेदात रक्ताला जीवन असे म्हटले आहे. रक्ताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रक्त जसे सर्व शरिरात फिरते, तशा पू. गाडगीळकाकू सर्वत्र दैवी प्रवास करत आहेत.
       जाठराग्नी हा शरिरातील सर्व अग्नींमध्ये प्रमुख अग्नी आहे. त्याच्यावरच शरिराची सर्व भिस्त अवलंबून असते. तोच अन्नापासून सार(सत्त्व)भाग आणि मलभाग वेगळे करतो. सनातनमध्ये पू. बिंदाताईंचे स्थानही तसेच आहे. साधकांकडून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून घेऊन त्या साधकांमधील मलभाग दूर करत आहेत.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना महर्षींनी दिलेले आशीर्वचन !

१. प.पू. गुरुदेव सर्व करणार आहेत, असा भाव असल्यास विजय निश्‍चित ! : नाडीवाचनाला उपस्थित असलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना महर्षि म्हणाले, तुम्ही न्यायालयात जाणार तेव्हा गुरुच तेथे जाणार आहेत, असे म्हणा. वाद करणारे गुरु आहेत. निकाल देणारे न्यायाधीश गुरु आहेत, असा भाव ठेवा. आपण गुरुदेवांच्या लीलेचा अनुभव तरी घ्या !
१ अ. प.पू. गुरुदेव मनात विचार घालतात ! : आपण वकिली शिकला आहात. न्यायालयात जाता तेव्हा प्रत्येक सूत्र लक्षात येते, असे नाही. प.पू. गुरुदेव मनात विचार घालतात. आपल्या मुखातून बोलणारे स्वतः प.पू. गुरुदेव आहेत. त्याची आपण पुनःपुन्हा अनुभूती घ्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संतांचे शुभाशीर्वाद !

१. प.पू. नाना काळेगुरुजी, श्री योगिराज 
वेद विज्ञान आश्रम, बार्शी, जिल्हा सोलापूर
      आमचे सगळे लक्ष इकडेच (रामनाथी आश्रमातील अमृतमहोत्सव सोहळ्याकडे आहे.) आहे. तेथे स्वतः अग्निनारायण आहे. आता चालू असलेला अश्‍वमेध याग झाला की, हिंदु राष्ट्र येणारच आहे, असा स्पष्ट संकेत माझे गुरु प.पू. गुळवणी महाराज यांनी दिला आहे.
२. श्री. मुदलीयार गुरुजी, अगस्ती नाडीकेंद्र, पुणे 
      अत्रि आणि अगस्ती ऋषींच्या आदेशानुसार आज आम्ही याच स्थानी बसून छोटासा यज्ञ करणार आहोत आणि अत्रि, अनुसूया अन् अगस्ती यांची शक्ती तेथे (रामनाथी आश्रमात) पाठवणार आहोत. जेव्हा मुहुर्त येईल, तेव्हा अत्रि ऋषी, अनुसूया आणि अगस्ती ऋषी स्वतः रामनाथी आश्रमात येणार आहेत.
३. प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
      काल (२८.५.२०१६) या दिवशी पूजा करतांना मला प.पू. डॉक्टरांच्या हृदयात विश्‍वदर्शन झाले. तेथे साक्षात श्रीकृष्णच दिसला.

विश्‍वव्यापक विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांची काळजी घेणारे महर्षि !

       नाडीवाचनात सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याविषयीच सांगण्यात आले. नाडीवाचन झाल्यानंतर प.पू. डॉ. आठवले यांनी महर्षींना विचारले, हे सर्व सनातनविषयी झाले. हिंदु राष्ट्राविषयी काही सांगा.
       तेव्हा महर्षीही उत्तरले, हिंदु राष्ट्र लवकरात लवकर येणार आहे. निसर्ग वाट पहात आहे. येणार्‍या काळात पाण्यावर, आकाशात, पाण्याखाली मृत्यू होतील. नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. आमच्यासाठी तुम्ही (परात्पर गुरु डॉ. आठवले) महत्त्वाचे आहात. तुम्ही नाही, तर हिंदु राष्ट्र कसे येणार ?
       आपण आतापर्यंत जे कार्य हातात घेतले आहे, त्यात आपल्याला विजयच मिळाला आहे. तुमच्यापासूनच सृष्टीची निर्मिती झाली आहे. हिंदु राष्ट्रही आपल्यामुळेच येईल. नैसर्गिक आपत्तीनंतर हिंदु राष्ट्र येणार. युद्ध होणार, नैसर्गिक आपत्तीही येणार... !

पू. (कु.) स्वाती खाडये दिग्विजयी असल्याचे महर्षींचे गौरवोद्गार !

१. पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या भक्तीमुळे 
उज्जैन येथील आपत्काळात साधकांचे रक्षण ! 
      पू. (कु.) स्वाती खाडये यांना महर्षींनी विचारले, महाकालेश्‍वराच्या क्षेत्रात (उज्जैन येथील सिंहस्थपर्वात) साधकांना विजय मिळाला ना ? प.पू. गुरुदेवांना काळजी होती. साधक कसे आहेत ? आपण जेव्हा १८ वर्षांच्या होता, तेव्हा आपण गुरुदेवांच्या चरणी आलात. आपल्यामुळे महाकालेश्‍वराच्या क्षेत्रात साधकांचे रक्षण झाले. आपली भक्ती एवढी आहे की, आपल्यासाठी प.पू. गुरुदेव एवढेही करणार नाहीत का ? एवढ्या वादळातही प.पू. गुरुदेव आपले रक्षण करतील, अशी आपली श्रद्धा होती का ? (पू. (कु.) स्वाती खाडये यांनी श्रद्धा होती, असे उत्तर दिले.)
       पू. (कु.) स्वाती खाडये सिंहस्थ क्षेत्रात आपल्याला केवळ विजयच मिळालेला नाही, तर आपण दिग्वियजी आहात.
२. आपल्याला 
केवळ प्रार्थना करायची आहे
       उज्जैन येथील आपत्काळात आपण श्रीगुरूंचे स्मरण केले; ज्या खांद्यांवर साधक बसले होेते, ते खांदे कुणाचे होते ? ते दुखले नसतील का ? दुर्वास ऋषी भोजनाला आले, तेव्हा कुठे द्रौपदी होती अन् कुठे कृष्ण होता ? तरीही त्याने द्रौपदीचे साहाय्य केलेच ना ! आपल्याला केवळ प्रार्थना करायची आहे.

कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी !

       हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे झाले. तेव्हा विश्‍वाचा निर्माता ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी यांनी सत्त्वप्रधान राज्याची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे कार्य केले आहे, तरी त्यांना त्याचा कंटाळा आला नाही, हे लक्षात आले. त्यावरून मी किती क्षुद्र आहे आणि ते किती श्रेष्ठ आहेत, हे लक्षात आले. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाद्वारे साधकांना देवता आणि महर्षि यांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी प.पू. गुरुदेवांनी अमृत महोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली आहे !

       परम गुरुजींना अमृत महोत्सव साजरा करण्याची आवश्यकताच नाही. ते जीवनमुक्त असल्याने त्याच्या पलीकडे गेले आहेत, तरीही अमृत महोत्सवाच्या निमित्ताने साधकांना सेवेची संधी मिळावी अन् त्याद्वारे देवता आणि महर्षि यांचे आशीर्वाद साधकांना मिळावेत, तसेच या कार्यक्रमाद्वारे ब्रह्मांडातील सात्त्विक स्पंदने वाढावीत, यासाठी त्यांनी अमृत महोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली आहे.
(संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचन क्र. ७७, मनाली, हिमाचल प्रदेश (१५.५.२०१६))
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ
      हे गुरुदेवा, तुझ्या सर्व वृत्तींची सेवा मीच करावी, अशी सद्भक्तीने त्याची प्रार्थना करून म्हणतो, हे कृपानिधे, हाच मला वर द्यावा.
      जो तन, धन आणि प्राण (म्हणजे सर्वस्व) गुरूंना समर्पण करून गुरूंनी सांगितलेली साधना करतो, त्याला शिष्य म्हटले जाते.

१.६.२०१६ या दिनांकापासून सर्वांनी करावयाचे उपाय

  

     आतापर्यंत सांगितलेले उपाय कोणत्या कालावधीत करायचे, हे मी सांगत असे. आता काळ झपाट्याने पालटत असल्याने आणि महर्षि वेळोवेळी साधना सांगत असल्यामुळे या वेळी कधीपर्यंत उपाय करायचे, हे या वेळी सांगत नाही.

साधकांना सूचना, तसेच सनातन प्रभात नियतकालिकांचे वर्गणीदार आणि विज्ञापनदाते यांना विनंती !

     धर्माभिमानी हिंदू आणि जिज्ञासू यांना सनातन प्रभात नियतकालिकांच्या नूतन संकेतस्थळावरून नियतकालिकांचे (दैनिक वगळून अन्य) वर्गणीदार होता येणार आहे, तसेच वर्गणीदार त्यांच्या नियतकालिकाचे संकेतस्थळाद्वारे नूतनीकरणही करू शकतात. 
 
नाम गोड तव रूप मनोहर । ठसो सदा हृदयात ।
दे हरि गुरुचरणांचा ध्यास । मजसी दे तव चरणांचा ध्यास ॥

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
     भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

नायजेरियनांंची डोकेदुखी !

संपादकीय 
      दोनच दिवसांपूर्वी गोवा येथे दोन नायजेरियन नागरिकांनी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या संदर्भात गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केलेेले नायजेरियन नागरिक केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरात समस्या निर्माण करतात, हे विधान समस्येचे गांभीर्य लक्षात आणून देतात. दोन वर्षांपूर्वी याचा नायजेरियन नागरिकांनी गुंडगिरी करत गोंधळ घालून तीन घंटे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. महाराष्ट्रातील दिवा (ठाणे) येथेही किमान एक सहस्रापेक्षा अधिक नायजेरियन नागरिक निवास अनुमतीपत्र संपल्यावर रहात असल्याचे आढळून आले होते. जवळपास सर्वत्र नायजेरियन अमली पदार्थ, गुंडगिरी, तसेच सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायात गुंतल्याचे आढळून आले आहे. भारतात अधिक काळ रहाता यावे यांसाठी हे नागरिक जाणीवपूर्वक गुन्हे करत असल्याचे आढळून आले आहे. हे नागरिक सर्वत्र स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देतात, इतकेच काय तर पोलिसांवरही आक्रमणे करतात. एकीकडे संस्कृतीरक्षणाचे काम करणार्‍या श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांना कथित कारणे देत गोवा शासन दोन वर्षे गोव्यात येऊ देत नाही आणि दुसरीकडे खरोखर गोव्याच्या संस्कृतीला कलंक लावणार्‍यांवर मात्र राज्यात रहाण्यासाठी मोकळे रान उपलब्ध करून देण्यात येते. शासनाला खरोखरच नायजेरियन नागरिकांचा बंदोबस्त करायचा असेल, तर केंद्रीय स्तरावरून कठोर कायदा करून त्याची तात्काळ कार्यवाही केली, तरच या समस्येवर कायमस्वरूपी आळा बसू शकेल !

भ्रष्टाचारमुक्तीसाठी कठोर उपाययोजना करा !

संपादकीय 
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्याविषयी देशाला उद्देशून जे भाषण केले त्यात भ्रष्टाचार हे एक महत्त्वाचे सूत्र होते. गेल्या दोन वर्षांत वेळवेगळ्या माध्यमांतून भ्रष्टाचाराद्वारे होणारी गळती थांबवून ३६ सहस्र कोटी रुपये भाजप शासनाने वाचवले, असे त्यांनी सांगितले. या देशात भ्रष्टाचाराने जवळपास प्रत्येक क्षेत्र पोखरले असून त्याला आता कोणत्याही प्रकारची वरवरची उपाययोजना नाही, तर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची अत्यावश्यक निकड निर्माण झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतांश काळ या देशावर काँग्रेसनेच राज्य केले असल्याने भ्रष्टाचाराच्या या समस्येला काँग्रेसच उत्तरदायी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn