Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


चौकटी

येणार्‍या हिंदु राष्ट्राचा ध्वनी सर्वांत प्रथम राष्ट्रसंत प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी ऐकला ! - पू. सुनील चिंचोलकर, अध्यक्ष, समर्थ व्यासपीठ, पुणे.


चौकटी

प.पू. डॉ. आठवले सत्त्वशील, त्यागी आणि महान पुरुष आहेत. त्यांचे कार्य आदिशंकराचार्यांच्या कार्यासारखे आहे ! - पूर्वाम्नाय श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंदसरस्वती, श्रीगोवर्द्धनमठ-पुरीपीठाधीश्‍वर, ओडिशा (सप्टेंबर २०१३)
जय गुरुदेव ! कृतज्ञ गुरुदेव !!

आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ही उक्ती आज आम्ही अगदी तंतोतंत अनुभवत आहोत. राष्ट्रगुरु, ज्ञानगुरु, मोक्षगुरु, विश्‍वगुरु, जगद्गुरु अशा कितीही पदव्या थिट्याच वाटणारे आमचे परमपूज्य हे खरेतर कल्पतरुच आहेत. त्यांच्या महान कार्याचे गुणगान आम्ही काय करावे ? १० मे २०१५ या दिवशी साक्षात् महर्षींनीच सप्तर्षि जीवनाडीपट्टीद्वारे 'परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अंशावतार आहेत', हे गुपित उघड केले. यंदाही महर्षींच्या आज्ञेनेच प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणाचा सोहळा सनातन आश्रम, रामनाथी येथे साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या अलौकिक जीवनातील काही पैलूंचा अमृतकुंभ वाचकांसमोर रिता करतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. प.पू. डॉक्टरांचे जीवनचरित्र इतके अद्भुत आणि विविधतेने भारलेले आहे की, एका विशेषांकात त्याची पूर्ण ओळख होणे शक्य नाही. हे जाणूनच आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या या अमृतमहोत्सवी वर्षात विविध विशेषांकांच्या माध्यमातून वाचकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची ओळख करून देणार आहोत. आजचा हा त्यातील प्रथम अंक त्यांच्या चरणी अर्पण करतांना शरणागती आणि कृतज्ञतेवाचून आमच्याकडे शब्दच नाहीत. साधनेचा मार्ग दाखवून आमचे जीवन उद्धरणारे धर्मसूर्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता ! - सनातन प्रभात समूह


अनंतकोटी श्री ब्रह्मांडनायक राजाधिराज संत भक्तराज शिष्योत्तम
त्रिकालदर्शी, श्रीरामनामी (टीप १), पुरुषोत्तम ।
सनातन संस्थेचे निर्माते, गुरुकृपायोगाचे उद्गाते ।
संतांचे जन्मदाते, साधकांचे नियंते ॥ १॥
ब्राह्मतेजाचे संजीवक, क्षात्रतेजाचे पुनरुज्जीवक ।
धर्मद्रोहाचे (टीप २) संहारक, राष्ट्रद्रोहाचे (टीप ३) निर्दालक ।
हिंदुत्वाचे पथदर्शक, हिंदु राष्ट्राचे संस्थापक ।
सकलविश्‍व उद्धारक, सप्तपाताळ-सप्तलोक शुद्धीकारक ।
वैश्‍विक सत्त्वगुण संघटक, ब्रह्मांड ज्ञानसंग्राहक ।
ब्रह्मानंदी अध्यात्मसंशोधक, परमपवित्र जणू गंगोदक ॥ २ ॥
अखिल संतमेरूमणी, संकटमोचक जगद्जननी ।
भक्तवत्सल गुरुमाऊली, देवकृपेची सावली ।
साधकांची मृत्यूनंतरही काळजी वाहणारी,
साधकांवरील आक्रमणे स्वतःवर घेणारी ॥ ३ ॥
गीतेची आधुनिक रचनाकार, हिंदुत्वाची सळसळती तलवार ।
साधकांसाठी कृष्णाची मूर्ती साकार,
महर्षींनी सांगितलेला विष्णूचा अवतार ॥ ४ ॥
दशदिग्विजयी । कर्तव्यशून्य (टीप ४)। अहंशून्य ।
अनादी अनंत । साधकहृदयाधिराज ।
एकमेवाद्वितीय आत्मश्रीमंत । श्री गुरुकृपाधिपति ॥ ५॥
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा... विजय असो !
 टीपा : १. रामनाम घेणारे

२. धर्मद्रोही विचारांचे खंडन

३. राष्ट्रद्रोही विचारांचे खंडन

४. 'आता उरलो उपकारापुरता' ही अवस्था

- श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

'जशी व्यास महर्षींप्रती कृतज्ञता म्हणून आपण प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो, तसा प.पू. डॉक्टरांचा वाढदिवसही आपण प्रतिवर्षी साजरा करायचा आहे; कारण हा तर कलियुगात झालेला श्रीमत् नारायणाचा प्रत्यक्ष अवतार आहे', असे महर्षींनी सांगणे आणि त्यामागील कार्यकारणभाव


१. प.पू. डॉक्टर म्हणजे कलियुगातील नारायणाचा अवतारच आहेत आणि या अवताराची प्रसिद्धी करण्याचे कार्य शिव-पार्वतीने आमच्यावर सोपवले आहे, असे महर्षींनी सांगणे : हिमाचल प्रदेशमधील मनाली येथून कांगडा येथे जात असतांना (हा प्रवास संपूर्णतः पहाडी क्षेत्रातून आहे आणि तो जवळजवळ ७ - ८ घंट्यांचा आहे. - सौ. गाडगीळ) महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले की, जशी व्यास महर्षींप्रती कृतज्ञता म्हणून आपण प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो, तसा प.पू. डॉक्टरांचा वाढदिवस आता येथून पुढे आपण प्रतिवर्षी साजरा करायचा आहे; कारण व्यास महर्षींचे स्मरण म्हणून आपण जर गुरुपौर्णिमा साजरी करतो, तर प.पू. डॉक्टर कलियुगात झालेला स्वयं नारायणाचा अवतार असल्याने त्यासाठी आपण किती केले, तरी ते अल्पच आहे. या अवताराची प्रसिद्धी आता आम्हीच (महर्षि) करणार आहोत. हे कार्य स्वयं शिव-पार्वतीने आमच्यावर सोपवले आहे आणि त्यासाठीच हे नाडीशास्त्र भूतलावर आले आहे.

गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशन' आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय लवकरच पूर्ण होईल ! - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे हिंदु राष्ट्राची स्थापना हे ध्येय आहे आणि या ध्येयासाठी त्यांची तीव्र तळमळ आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ते अविरत कार्य करत आहेत. या कार्याला सर्व देवता आणि धर्म यांचा त्यांना आशीर्वाद आहे. आपले हे कार्य लवकरच पूर्ण होणार आहे. आपल्या अमृत महोत्सवाला आपल्याला श्री विश्‍वदर्शन देवतेचा सदैव आशीर्वाद आहे.

- प.पू. श्रीकृष्ण कर्वे, पुणे.

आता हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होण्याची वेळ आली आहे ! - प.पू. आबा उपाध्ये, पुणे

संतसंदेश

॥ श्री ॥

१. सोहळ्याला उपस्थित रहाता येत नसल्याने मनात सोहळ्याचे चित्र आणून आनंद घेण्याचा विचार सद्गुरूंनी देणे
२९.५.२०१६, रविवार या दिवशी परम पूज्यांचा अमृतमहोत्सव ! पुष्कळ इच्छा असतांना हा कपिलाषष्ठीचा योग येऊनही आम्हाला भाग्य सोहळ्याला उपस्थित रहाता येऊ नये, ही खंत मनात अस्वस्थ करत होती; पण जे होते, ते चांगल्यासाठीच होते, असे सद्गुरु सदानंदांचे नेहमीच सांगणे असते. सद्गुरु म्हणतात, "अरे, कशाला हळहळ वाटते ? सर्वश्रेष्ठ पूजा ही मानसपूजा असते. मग डोळे मिटा आणि भविष्यात होणार्‍या सोहळ्याचे चित्र मनात घेऊन तुम्ही सोहळा साजरा करा ! मोठ्या मनात सोहळ्याचे चित्र आणून आनंद नव्हे, तर ब्रह्मानंद घ्या !"

साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे बीजारोपण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री गणेशमूर्ती सात्त्विक कशी बनवावी, याविषयी 
सनातनचे साधक-मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर 
यांना मार्गदर्शन करतांना परात्पर 
गुरु डॉ. आठवले (वर्ष २००५)
       साधनेच्या संदर्भात व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, या सिद्धांताला अनुसरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विद्या ग्रहण करण्याची क्षमता आणि कलेची आवड यांनुसार त्यांना साधना शिकवली. आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, हे ध्येय ठेवून अनेक साधक चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्यकला, वास्तूविद्या आदी कलांच्या माध्यमांतून साधना करत आहेत. पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देण्यात येणार आहे.
      परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलांमध्ये पारंगत साधक-कलाकार त्यांच्या कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्याविषयी संशोधन करत आहेत.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ परात्पर गुरु डॉ. आठवले !

ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारांवरील 
संशोधनासाठी जात असतांना मुंबई 
विमानतळावर झालेला सत्कार
       परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या कालावधीत ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारपद्धतीवर यशस्वी संशोधन केल्यानंतर त्यांची संमोहन उपचारतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती झाली. वर्ष १९७८ मध्ये मुंबईला परतल्यावर त्यांनी मुंबईत मनोविकारांवरील संमोहन-उपचारतज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय चालू केला. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था स्थापली. वर्ष १९७८ ते १९८३ या कालावधीत त्यांनी ५०० हून अधिक आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धांत अन् प्रात्यक्षिके यांविषयी अमूल्य मार्गदर्शन केलेे.
संमोहन-उपचारांतील नाविन्यपूर्ण संशोधन
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अयोग्य कृतीची जाणीव आणि तिच्यावर नियंत्रण, अयोग्य प्रतिक्रियांच्या जागी योग्य प्रतिक्रिया निर्माण करणे, प्रसंगाचा मनात सराव करणे आदी संमोहन-उपचारांच्या नाविन्यपूर्ण पद्धती निर्माण केल्या. त्यांनी इओसिनोफिलिया हा रक्तातील पेशींचा एक रोग मानसिक ताणामुळेही होऊ शकतो, याचा सर्वप्रथम शोध लावला.
            

आपत्काळात वैद्य, औषधे यांच्या अनुपलब्धतेत उपयुक्त सनातनची ग्रंथमालिका : स्वसंमोहन उपचार

लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार
     बर्‍याचदा रुग्ण स्वतःवर उपचार करू शकत नाही. अशा वेळी कोणतीही अभ्यासू आणि दुसर्‍याला साहाय्य करण्याची वृत्ती असलेली व्यक्ती संमोहन उपचारशास्त्राचा अभ्यास करून रुग्णावर उपचार करू शकते. असे उपचार करणे सुलभ जावे, यासाठी या ग्रंथात विविध लैंगिक समस्यांवर उपचार केल्याची उदाहरणे सविस्तर दिली आहेत.
मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग १)
     मनोविकारांवरील उपचारपद्धत, संमोहन उपचारपद्धत यांची वैशिष्ट्ये आदींचा उहापोह या ग्रंथात केला आहे. स्वसंमोहनशास्त्राचा वापर करून झोपेत बोलण्याची सवय, भीती आदी मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची उदाहरणे यात दिली असून व्यसनमुक्तीसाठी आणि परीक्षेतील अपयशावर मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

सुखी जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसाठी उपयुक्त ग्रंथमालिका

 • संमोहन उपचार (इंग्रजी)
 • संमोहनशास्त्र आणि संमोहन उपचार 
 • सुखी जीवनासाठी संमोहन-उपचार 
 • स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया
 • स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलन प्रक्रिया 
 • स्वभावदोष निर्मूलनासाठी बौद्धिक आणि कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न
 • स्वभावदोष निर्मूलनासाठी आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न


ग्रंथनिर्मिती आणि प्रकाशनकार्य

     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्र, देवतांची उपासना, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक उपाय, आपत्कालीन उपचार, संमोहन उपचार इत्यादी विविध विषयांवर ग्रंथसंपदा संकलित केली आहे. त्यांनी ३०.४.२०१६ पर्यंत संकलित केलेल्या २८७ ग्रंथांच्या भारतातील मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्ल्याळम्, गुजराती, गुरुमुखी, ओडिया, बंगाली, आसामी या भाषांत आणि विदेशातील नेपाळी, जर्मन अन् सर्बियन या १५ भाषांत ६५ लक्ष ५ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. अद्यापही अनुमाने ४५०० ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील, इतके ज्ञान त्यांच्याकडे संग्रही आहे. यासाठी त्यांनी हे सर्व विषय अनुमाने १६,००० संकेतांक घालून विभाजित आणि संग्रहित केले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झालेली गुरुप्राप्ती आणि त्यांनी केलेला अध्यात्मप्रसार !

जाहीर सभांतून साधना आणि क्षात्रधर्म याविषयी मार्गदर्शन 
करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (१९९७-१९९८)
अध्यात्मशास्त्र शिकण्यासाठी केलेले प्रयत्न आणि गुरुप्राप्ती
     संमोहन उपचारांनी सुधारणा होऊ न शकणारे मनोरुग्ण संतांनी सांगितलेली साधना केल्यानंतर बरे होतात, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९८३ ते वर्ष १९८७ या कालावधीत अध्यात्मातील अधिकारी असलेल्या जवळजवळ ३० संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष १९८७ मध्ये त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली.

धर्मप्रसाराशी संबंधित प्रसारसाहित्य

       ८ भाषांत प्रकाशित होणारे सनातन पंचांग, संस्कार वही, चित्रकला वही, धर्मशिक्षण देणारी पत्रके, धर्मशिक्षणाचे आणि राष्ट्र-धर्म जागृतीचे फलक, सनातनच्या कार्याशी संबंधित माहितीपत्रके आदी धर्मप्रसाराशी संबंधित प्रसारसाहित्यातील वैचारिक लिखाण, तसेच त्याच्या सात्त्विक सादरीकरणाच्या दृष्टीने त्यातील चित्रे अन् रंगसंगती परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः पडताळून देतात.

ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी) आणि ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी) यांची निर्मिती !

दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मसत्संग मालिकांच्या 
ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी)
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना (एकूण १६५ भाग) आणि धार्मिक कृतींमागील शास्त्र (एकूण २०२ भाग) या दूरचित्रवाहिन्यांवरील धर्मसत्संगांच्या मालिका बनवण्यात आल्या. या धर्मसत्संगांच्या मालिकांचे ३ राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांवर, तर १०० हून अधिक स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवर प्रक्षेपण करण्यात आले.
    सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि संस्कृती यांतील आचार-विचारांचे महत्त्व, भारतीय भाषांचे आध्यात्मिक महत्त्व, भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे आदींचे माहात्म्य, तसेच आध्यात्मिक संशोधन, वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय आदींविषयी सहस्रो ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी) बनवल्या जात आहेत.
साधनेसाठी उपयुक्त ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी)
   परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना, अध्यात्माविषयी शंकानिरसन, देवतांच्या नामजपाची योग्य पद्धत, आरती, क्षात्रगीते आदी विषयांवरील ध्वनी-चकत्यांचीही (ऑडिओ सीडी) निर्मिती करण्यात आली आहे.

साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने केलेले कार्य

गुरुकृपायोग या शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी असलेल्या योगमार्गाचे जनक !
     जिज्ञासूंना शीघ्र ईश्‍वरप्राप्ती करता यावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कर्म, भक्ती आणि ज्ञान या योगमार्गांचा संगम असलेला गुरुकृपायोग सांगितला. व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग या सिद्धांतानुसार गुरुकृपायोगात साधना शिकवली जात असल्याने साधकाला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करता येते. २०.५.२०१६ पर्यंत गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने ६५ साधक संतपदी विराजमान झाले आहेत, तर ८४६ साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक पातळी गाठली असून त्यांचा आध्यात्मिक प्रवास संतत्वाच्या दिशेने होत आहे. या साधनामार्गाचे विदेशातील जिज्ञासूही आचरण करत असून स्वतःचे जीवन उद्धरत आहेत.
(याविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या गुरुकृपायोगानुसार साधना या ग्रंथात दिली आहे.)

गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती !

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम
      साधकांना पूर्णवेळ साधनेला अनुकूल वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रेरणेतून रामनाथी (गोवा), देवद (पनवेल), मिरज (सांगली) या ठिकाणी असलेल्या आश्रमांतून, तसेच आश्रमासम असलेल्या सेवाकेंद्रांतून अनुमाने ८०० साधक पूर्णवेळ साधना करत आहेत.

साधकांच्या साधनेकडे व्यक्तीगत लक्ष देण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याच्या पद्धतीची निर्मिती !

        परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीकडे व्यक्तीगत लक्ष देण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याची पद्धत विकसित केली. व्यष्टी साधनेचा आढावा देण्याच्या पद्धतीमुळे साधकांमध्ये स्वतःच्या चुका आणि स्वतःतील स्वभावदोष प्रांजळपणे मांडण्याइतकी निर्मळता आली, तर समष्टी साधनेचा आढावा देण्याच्या पद्धतीमुळे समाजाशी जवळीक साधण्यातील स्वतःच्या त्रुटी साधकांना समजल्या, तसेच व्यष्टी पातळीचा गोपीभाव (टीप) असलेल्या साधिकांमध्ये समष्टी भाव निर्माण होऊन त्या तरुण वयातच अनेक जिल्ह्यांचे अध्यात्मप्रसाराचे दायित्व सांभाळू लागल्या आहेत.
(टीप - गोपीभाव म्हणजे भगवान श्रीकृष्णच जीवनातील सर्वकाही असून त्याच्या सतत अनुसंधानात रहाणे. याविषयीची माहिती सनातनच्या गोपीभाव ग्रंथमालिकेत दिली आहे.)

अध्यात्मातील अधिकारी असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अनुभूती येणे

     जेथे दिव्यत्व असते, तेथे प्रचीती असते, या सिद्धांतानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये त्यांच्यातील दैवीपणाची प्रचीती देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे साधकच नव्हेत, तर विविध सांप्रदायिक, हिंदुत्ववादी आणि विविध साधनामार्गांनुसार साधना करणारे संत यांनाही त्यांच्याविषयी अनुभूती येतात. 
    (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या अनुभूती सनातनच्या साधकांच्या अनुभूती - भाग १ आणि साधकांच्या अनुभूती - भाग २ या ग्रंथांत दिल्या आहेत.) 

ज्ञानशक्तीद्वारे चालू असलेलेे कार्य

      कुठलेही कार्य होण्यासाठी इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांपैकी एकाची आवश्यकता असते. यांपैकी ज्ञानशक्तीद्वारे केलेले कार्य हे क्रियाशक्तीला दिशा आणि इच्छाशक्तीला प्रेरणा देत असल्याने ते श्रेष्ठ ठरते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य हे ज्ञानशक्तीच्या आधारे चालू आहे. त्याचे संक्षिप्त स्वरूप पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म आणि त्यांचे आध्यात्मिक प्रवृत्तीचे कुटुंब

आई पू. (सौ.) नलिनी (पू. ताई) आणि वडील
पू. बाळाजी (पू. दादा) आठवले (मुंबई, वर्ष १९८६)
    शुद्धबिजा पोटी । फळे रसाळ गोमटी । (तुकारामगाथा, अभंग ३७, ओवी १), या ओवीनुसार परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्म ६ मे १९४२ (वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५०४४) या दिवशी श्री. बाळाजी वासुदेव आठवले (वर्ष १९०५ ते वर्ष १९९५) आणि सौ. नलिनी बाळाजी आठवले (वर्ष १९१६ ते वर्ष २००३) यांच्या पोटी झाला. ते दोघेही पुढे संतपदाला पोहोचले.
     पू. बाळाजी (उपाख्य श्रीकृष्ण) वासुदेव आठवले, हे माझे वडील. त्यांना आम्ही दादा म्हणायचोे. त्यांचा जन्म ९.९.१९०५ या दिवशी नाशिक येथे झाला. त्यांनी २८.१.१९९५ या दिवशी देहत्याग केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शिक्षण आणि त्यांनी विद्यार्थी दशेत केलेले कार्य

      इयत्ता ७ वीमध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रतिमास सहा रुपये, याप्रमाणे सतत ४ वर्षे शिष्यवृत्ती मिळाली. अकरावीपर्यंतचे शिक्षण चालू असतांना त्यांनी चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा, तसेच राष्ट्रभाषा हिंदीची कोविद पदवीपरीक्षा उत्तीर्ण केली. शालान्त माध्यमिक परीक्षेतही ते गुणवत्ता सूचीत आले. १९६४ मध्ये त्यांनी एम्.बी.बी.एस्. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली.

पू. बाळाजी आठवले यांचे विचारधन असलेली ग्रंथमालिका

जीवन सुखी आणि चैतन्यमय करण्याविषयी मार्गदर्शन !
खंड १ : सुगम सात्त्विक जीवन
    या ग्रंथात सात्त्विक जीवनशैली अंगिकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते, हे दैनंदिन जीवनातील सोप्या उदाहरणांद्वारे मांडले आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींची कर्तव्ये कोणती ? त्यांचे आचरण कसे असावे ? मुलांवर संस्कार कसे करावेत ? षड्रिपू घालवण्यासाठीचे उपाय आदी विविध विषयांवरही मार्गदर्शन केले आहे.
खंड २ : सुगम भक्तीयोग
     भक्तीमार्ग हा भगवंतप्राप्तीचा अत्यंत सोपा अन् सहजपणे आचरणात आणता येईल, असा मार्ग आहे. भक्तीमार्ग अनुसरणार्‍या भक्तांसाठी प्रस्तुत ग्रंथात साधना, नामजप, उपवास यांविषयीचे विवेचन, तसेच भक्त कसा असावा ? ईश्‍वरावरील श्रद्धा कशी असावी ? साधनेतील प्रगतीची लक्षणे कोणती ? यांविषयीची माहितीही उदाहरणांसह दिली आहे.

कलियुगातील आदर्श कुटुंब !

     पू. बाळाजी आठवले (प.पू. डॉ. आठवले यांचे वडील) यांचे कुटुंब त्यांच्या अलौकिक गुणवैशिष्ट्यांमुळे सर्वांनाच आदर्श आहे. अध्यात्मातील त्यांचे अपूर्व योगदान अन् त्यांनी समष्टीसाठी उपलब्ध करून दिलेली अनमोल ज्ञानसंपदा यांमुळे अखिल मानवजात त्यांची उपकृत आहे. - एक साधक
     (पू. बाळाजी आठवले, त्यांच्या पत्नी पू. नलिनी (पू. ताई) आठवले आणि कुटुंबीय यांविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या प.पू. डॉक्टरांचे सर्वांगांनी आदर्श आई-वडील आणि भाऊ या विषयाच्या ग्रंथमालिकेत आहे.)

प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. प्रिन्स नरेंद्र धाकड यांचा स्वप्नदृष्टांत आणि महर्षींचे भाकीत यांतील साम्य दर्शवणारी सूत्रे !

         मनाली, हिमाचल प्रदेश येथे १५.५.२०१६ या दिवशी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन झाले. या वेळी महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात महत्त्वाची सूत्रे सांगितली. यातील काही सूत्रे आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. प्रिन्स नरेंद्र धाकड यांना झालेल्या स्वप्नदृष्टांतातील सूत्रे एकसारखी आहेत.
१. १४.५.२०१६ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांनी श्री. प्रिन्स नरेंद्र धाकड यांना प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात स्वप्नदृष्टांत दिला, तर १५.५.२०१६ या दिवशी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन झाले आणि महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात महत्त्वाची सूत्रे सांगितली.
२. प.पू. डॉक्टरांच्या २९.५.२०१६ अमृतमहोत्सवाचे सर्व नियोजन महर्षींनीच केले आहे. श्री. प्रिन्स धाकड यांना स्वप्नदृष्टांतात प.पू. भक्तराज महाराज स्वतः त्या दिवशी असलेल्या प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवाची सिद्धता करतांना दिसले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे भक्त श्री. प्रिन्स धाकड यांना दिलेला स्वप्नदृष्टांत !

प.पू. भक्तराज महाराज
        पळसनेर, मध्यप्रदेश येथील श्री. नरेंद्र धाकड आणि त्यांचे कुटुंबीय हे प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त आहेत. ते पळसनेरच्या सरकारी विश्रामधामाचे चौकीदार होते. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येतांना आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जातांना श्री. नरेंद्र धाकड यांना दर्शन दिल्याविना प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) कधीही पुढे जात नसत. त्यांना प.पू. बाबांच्या संदर्भात पुष्कळ अनुभूतीही आल्या आहेत. प.पू. बाबांच्या देहत्यागाच्या संदर्भात त्यांना स्वप्नदृष्टांत मिळाला होता आणि त्याप्रमाणे १८.११.१९९५ च्या रात्री १ वाजता त्यांना प.पू. बाबांनी महाप्रयाणानंतरचे शेवटचे दर्शनही दिले. श्री. नरेंद्र धाकड यांचे चिरंजीव श्री. प्रिन्स नरेंद्र धाकड एप्रिल २०१५ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात येऊन गेले. त्यांनाही वडिलांप्रमाणे प.पू. भक्तराज महाराज यांचे स्वप्नदृष्टांत होऊ लागले. ‘२९.५.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे’, असा स्वप्नदृष्टांत १४.५.२०१६ या दिवशी प्रिन्स यांना झाला. त्यांना मिळालेला स्वप्नदृष्टांत त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी सन्मानांद्वारे केलेला गौरव !

ठाणे येथे आयोजित ‘संत बैठकी’च्या पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा
वात्सल्यभावाने सन्मान करणारे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील प.पू. दादा महाराज झुरळे (१४.७.२००१)
प.पू. तोडकर महाराज यांच्या द्रोणागिरी आश्रमात प.पू. डॉ. आठवले
यांचा छत्र असलेल्या चांदीच्या सिंहासनावर बसवून केलेला सन्मान ! (वर्ष २०००)
        संतांचे कार्य आध्यात्मिक (पारलौकिक) स्तरावरचे असल्याने त्यांना लौकिक सन्मान अन् पुरस्कार यांचे अप्रूप वाटत नाही. किंबहुना मनोलय आणि अहंलय झालेला असल्याने ते सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे सन्मान अन् पुरस्कार यांच्या पलीकडे गेलेले असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही असेच आहे. असे असले, तरी संतच संतांना ओळखू शकतात आणि त्यांनाच अन्य संतांच्या कार्याचे महत्त्व कळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याही आध्यात्मिक कार्याचे महत्त्व कळल्याने अनेक संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सन्मान अन् पुरस्कार यांद्वारे गौरव केला. याची उदाहरणे येथे दिली आहेत.

संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन अन् त्यांना दिशादर्शन करणारे कार्य

संघटनकार्य
कोल्हापूर येथील सर्वसंप्रदाय सत्संगात मार्गदर्शन
करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, सोबत इतर संत. (२.१२.२००१)
हिंदुत्वनिष्ठांशी संवाद साधतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (२०१३)
संत : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००१ ते वर्ष २००५ या काळात अनेक संतांच्या भेटी घेऊन त्यांना राष्ट्र-धर्म रक्षणासाठी उद्युक्त केले. वर्ष २००५ नंतर त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम नसल्याने त्यांनी या कार्यासाठी प्रवास केला नाही. असे असले, तरी सध्या राष्ट्र-धर्म रक्षणासाठी प्रत्यक्ष कार्य करणार्‍या संतांचे संघटन सनातनचे संत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, तर राष्ट्र-धर्म रक्षणासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणार्‍या संतांचे संघटन पू. (सौ.) अंजली गाडगीळ हे दोघे अव्याहतपणे करत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याची प्रेरणा घेऊन चालू झालेले कार्य

अ. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण, हिंदूसंघटन आदींद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणे, हे समितीचे ध्येय आहे. समिती करत असलेल्या कार्यामुळे पुढील परिणाम साध्य झाले आहेत.
१. सर्वधर्म सभा, सर्वसंप्रदाय सभा आणि नामदिंड्या यांद्वारे सांप्रदायिक ऐक्य साध्य !
२. हिंदु धर्मजागृती सभा आणि हिंदूसंघटन मेळावे यांद्वारे लाखो हिंदूंमध्ये धर्मजागरण !
३. स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग, तसेच आपत्कालीन साहाय्य अभियान यांद्वारे समाजसाहाय्य !
४. Hindujagruti.org या संकेतस्थळाच्या प्रतिमाह ८ लाखांपेक्षा अधिक वाचकांमध्ये राष्ट्र-धर्म जागृती !
५. प्रांतीय, राज्यस्तरीय आणि अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांद्वारे २५० हून अधिक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी संघटनांचे संघटन !

विविध माध्यमांतून राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

      परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी संकलित केलेला ईश्‍वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ १८ मार्च १९९९ या दिवशी प्रकाशित झाला. त्यात त्यांनी भारतात ईश्‍वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय आहे, असा विचार मांडला. त्यांनी भावी काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य कसे होणार, याचे वेळापत्रक मांडतांना द्रष्टेपणाने वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा विचार मांडला. अनेक संत अन् नाडीभविष्याच्या माध्यमातून महर्षीही आता हेच सांगत आहेत.

प.पू. डॉ. आठवले ईश्‍वरी अवताराची जाणीव करून देत आहेत !

        ‘सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंतराव आठवले हे त्यांच्या ईश्‍वरी अवताराची जाणीव करून देत आहेत. प.पू. डॉ. आठवले यांच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात त्यांना प्रभु श्रीरामचंद्रांचे आशीर्वाद मिळतील !’
- प.पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड, जि. सातारा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज !

प.पू. भक्तराज महाराज, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान
प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांच्या गुरूंच्या
चित्रांचा फलक दाखवतांना प.पू. डॉ. आठवले (गोवा १९९३)
गुरूंना वंदन करतांना शिष्य डॉ. आठवले यांचा भाव....
नेमले या चित्ता तुझ्या सेवे नाथा । नुरे कार्य आता आणिक ते ॥
        ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर ऑगस्ट १९८७ मध्ये त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करण्यापासून ते आजपर्यंत स्थुलातून आणि सूक्ष्मातून कृपादृष्टी आहेच. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विविध प्रसंगांतून दिलेली शिकवण आणि त्यांची अध्यात्मात करवून घेतलेली प्रगती, हा प.पू. बाबांच्या कृपाशीर्वादाचाच परिणाम आहे. याविषयीची सविस्तर माहिती सनातन-निर्मित ‘आदर्श शिष्य’, ‘गुरु’ आणि ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ या ग्रंथमालिकांमध्ये दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध क्षेत्रांतील संशोधनकार्य

स्वतःचा देह, तसेच वापरातील 
वस्तू यांच्या दैवी पालटांविषयी संशोधनकार्य 
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुंडलिनीचक्राच्या स्पंदनांचा
अभ्यास लेकर अँटिनाद्वारे करतांना श्री. मयांक बडजात्या (१३.६.२०१३)
कु. प्रियांका लोटलीकर यांनी काढलेले सूक्ष्मातील वैशिष्ट्ये
दर्शवणारे चित्र पडताळतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (२००७)
सनातनच्या आश्रमात निर्माण झालेले अत्तर
सनातनच्या आश्रमातील लादीवर उमटलेला ॐ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांवर उमटलेले ॐ चे शुभचिन्ह
        परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, त्वचा, केस, नखे आणि वस्तू यांमध्ये होत असलेल्या दैवी पालटांविषयी वेळोवेळी छायाचित्रे काढून आणि लिखाण करून त्या पालटांचा शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनांतून अभ्यास केला. या संशोधनाद्वारे त्यांनी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांच्या संदर्भात होणार्‍या दैवी पालटांचे शास्त्र उलगडले.
        (याविषयीची माहिती सनातनचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र या ग्रंथमालिकेत दिली आहे.)

सनातनची आगामी ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गौरवशाली चरित्र

       काही संतरत्ने जणू परमेश्‍वराचे अवतारी कार्य करायलाच पृथ्वीवर जन्म घेतात ! सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अशांपैकीच एक आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गौरवशाली चरित्रासंबंधी अनेक ग्रंथ होतील, एवढे लिखाण संग्रहात आहे. या लिखाणाचे विभाजन एकूण ६ उपमालिकांमध्ये केले आहे. या उपमालिकांची नावे, तसेच काही उपमालिकांतील प्रकरणांची नावे पुढे दिली आहेत. यांपैकी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय वैशिष्ट्ये हे ग्रंथ लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहेत.
उपमालिका १ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य (३३ प्रकरणे)
उपमालिका २ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय वैशिष्ट्ये (६ प्रकरणे)

सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले, संस्थापक संपादक
सनातन प्रभातच्या 
माध्यमातून पत्रकारितेचे कार्य 
दैनिक सनातन प्रभातचा ४.४.१९९९ या दिवशी प्रसिद्ध झालेला
प्रथम अंक पहातांना सनातन प्रभात समूहाचे संस्थापक संपादक परात्पर
गुरु डॉ. आठवले आणि बाजूला सहसंपादक श्री. भूषण केरकर (२०१५)
       हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संदेश प्रसारित करण्यासाठी त्यांनी सनातन प्रभात नियतकालिके चालू केली. ते सनातन प्रभात समूहाचे संस्थापक संपादक आहेत. ते २८ एप्रिल १९९८ ते १९ एप्रिल २००० या काळात संपादक होते. नंतर इतर सेवांमुळे त्यांनी संपादकपद साधकांकडे सोपवले. समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या हिताचा दृष्टीकोन देणार्‍या या नियतकालिकांतून प्रेरणा घेऊन अनेक जण राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य, तसेच साधनाही करू लागले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले संस्थापक संपादक असलेल्या सनातन प्रभात नियतकालिकांच्या समूहाच्या वतीने सध्या आर्थिक हानी सोसून मराठी दैनिक (मुंबई, गोवा, रत्नागिरी आणि पश्‍चिम महाराष्ट्र या ४ आवृत्त्या), मराठी अन् कन्नड साप्ताहिक, हिंदी अन् इंग्रजी पाक्षिक आणि गुजराती मासिक प्रकाशित केले जाते.

महर्षींनी प.पू. डॉक्टरांची वर्णन केलेली महती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्पवृष्टी
करतांना नाडीवाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् (वर्ष २०१५)
       ‘महर्षी म्हणतात, ‘देवावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. देवाने आम्हाला जे सांगितले, तेच आम्ही या नाडीशास्त्रात लिहिले. देवाने आम्हाला सांगितले की, साधकांना कैलासात, वैकुंठात दर्शन घ्यायला यायची आवश्यकता नाही. त्यासाठी आम्ही परम गुरुजींनाच (प.पू. डॉक्टरांना) अवताराच्या रूपात पृथ्वीवर पाठवले आहे. त्यांच्या दर्शनानेच साधकांना देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे साधकांनो, गुरुचरण सोडून कुठेही जाऊ नका.’ (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६)
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (१२.३.२०१६, सायं. ५.१३)

सनातन प्रभात नियतकालिक समूहाच्या कार्यवृद्धीचा गोषवारा

१. मराठी साप्ताहिक सनातन प्रभात
        २८.४.१९९८ या दिवशी मराठी साप्ताहिक सनातन प्रभातचा ८ पानी प्रथम अंक प्रकाशित झाला. तो आता नोव्हेंबर २०१५ पासून १६ पानी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
२. कन्नड पाक्षिक 
सनातन प्रभात (आताचे साप्ताहिक)
        जुलै १९९८ मध्ये ८ पानी कन्नड पाक्षिक सनातन प्रभात चालू करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर १९९९ मध्ये ८ पानी साप्ताहिक सनातन प्रभातच्या स्वरूपात ते प्रकाशित करण्यात येऊ लागले. ७ एप्रिल २०१६ पासून १६ पानी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अखिल मानवजातीसाठी अद्वितीय कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची राज्य किंवा केंद्र शासनाने नोंद न घेणे, हा दैवदुर्विलास !

        संतांचे कार्य आध्यात्मिक स्तरावरचे असते. त्यामुळे व्यावहारिक स्तरावर कार्य करणार्‍या शासनदरबारात संतांचे महत्त्व ते काय ! त्यामुळे खरेतर अखिल मानवजातीसाठी जगद्व्यापी हिंदु धर्मप्रसार आणि भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे कल्याणकारी कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची राज्य किंवा केंद्र शासनाने दखल घेतल्याचे एकही उदाहरण नाही. याउलट संतांना हालअपेष्टा आणि शासनाकडून त्रासच भोगावे लागतात, तसेच अनुभव परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आले. म्हणतात ना, ‘जिथे पिकते तिथे विकत नाही, हेच खरे !’

सनातनची आगामी ग्रंथमालिका : 'परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गौरवशाली चरित्र'

काही संतरत्ने जणू परमेश्‍वराचे अवतारी कार्य करायलाच पृथ्वीवर जन्म घेतात ! सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अशांपैकीच एक आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गौरवशाली चरित्रासंबंधी अनेक ग्रंथ होतील, एवढे लिखाण संग्रहात आहे. या लिखाणाचे विभाजन एकूण ६ उपमालिकांमध्ये केले आहे. या उपमालिकांची नावे पुढे दिली आहेत. यांपैकी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय वैशिष्ट्ये हे ग्रंथ लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहेत.
 • उपमालिका १ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य (३३ प्रकरणे)
 • उपमालिका २ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय वैशिष्ट्ये (६ प्रकरणे)
 • उपमालिका ३ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अलौकिक जीवनप्रवास (१७ प्रकरणे)
 • उपमालिका ४ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग अन् त्याचे निवारण
 • उपमालिका ५ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी येणार्‍या आध्यात्मिक अनुभूती
 • उपमालिका ६ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी साधकांना स्फुरलेल्या कविता


परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष विशेषांक

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये सांगणारा साप्ताहिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक

 • वर्ष : १८ वे
 • अंक क्र. ३० (९ जून ते १५ जून २०१६)
 • पृष्ठे : २४ सर्व पाने रंगीत
 • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या 'आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ' ते परात्पर गुरु या प्रवासाचे वर्णन करणारा विशेषांक !
 • 'हिंदु राष्ट्राची स्थापना' आणि जगभर हिंदु धर्माचा प्रसार करणे या कार्यासाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. सनातन संस्थेच्या स्थापनेनंतरचा त्यांचा कार्यकाल !
 • परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं भगवान श्रीविष्णूचे अवतार आहेत, असे महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी जीवनाडीपट्टीत लिहून ठेवले आहे. १०.५.२०१५ या दिवशी झालेल्या नाडीवाचनाद्वारे तमिळनाडूतील होरामार्तंड पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाचा उलगडा केला. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या नाडीवाचनांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाचे उलगडलेले अनेक पैलू !

विशेष : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध भाव असलेली रंगीत छायाचित्रे
आपली मागणी ३० मे पर्यंत नोंदवू शकता !
संपर्क : श्री. अविनाश पोयेकर, ९४०४९५६१८९

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातचा दुसरा रंगीत विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक : ३१ मे २०१६

 • पृष्ठे : १०                                                                                                         मूल्य ५ रुपये

या अंकात अनुभवा !
 • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या धार्मिक विधींचा सविस्तर वृत्तांत
 • सर्व विधींचे छायाचित्रात्मक सादरीकरण
आपली प्रत आजच नोंदवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २९ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.
       दैनिक सनातन प्रभात चालू करतांना वितरकापासून संपादकीय विभागात सेवा करणार्‍या साधकांपर्यंत कुणालाही ना अनुभव होता, ना अभ्यास ! मात्र आमच्याबरोबर होता तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आणि आशीर्वाद ! त्यामुळेच कोणतेही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसतांनाही सर्व संकटांना सामोरे जात तत्त्वनिष्ठपणे दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य चालू ठेवता आले. आमची कोणतीही पात्रता नसतांना सनातन प्रभातच्या माध्यमातून सेवेची अमूल्य संधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला दिली. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच ! सनातन प्रभातच्या विचारांतून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राचे स्वातंत्र्ययुद्ध लढणारे क्रांतीवीर निर्माण व्हावेत, ही सनातन प्रभातचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !
- सनातन प्रभात नियतकालिक समूहात सेवा करणारे सर्व साधक

साधकांना सूचना

साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव हा सामाजिक सोहळा नसून एक धार्मिक विधी आहे, हे लक्षात घ्या आणि साधनेला प्राधान्य द्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या २९ मे या दिवशी होणार्‍या अमृत महोत्सवाविषयी अनेक साधकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे साधकांना हा अमृत महोत्सव प्रत्यक्ष अनुभवण्याची ओढ निर्माण होणे साहजिक आहे; मात्र साधकांनी 'स्वेच्छेपेक्षा ईश्‍वरेच्छा सर्वश्रेष्ठ आहे', हे लक्षात घ्यावे. या अमृत महोत्सवाविषयी महर्षींनीच असे सांगितले आहे की, 'परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव हा सामाजिक सोहळा नसून एक धार्मिक विधी आहे. त्यामुळे या विधीतील चैतन्य ग्रहण करण्यासाठी साधकांनी या दिवशी अधिकाधिक भावपूर्णरित्या साधना म्हणजेच प्रार्थना आणि नामजप करावा.' महर्षींच्या आज्ञेप्रमाणे साधना केल्यास ईश्‍वराची अधिकाधिक कृपा होईल, हे लक्षात घेऊन या दिवशी साधकांनी घरी किंवा ते ज्या ठिकाणी सेवा करत आहेत, तेथे राहून अधिकाधिक साधना करावी.

- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२४.५.२०१६)


तज्ञ, अभ्यासू आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

        परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेली वास्तू, म्हणजे रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या या आश्रमात होणारे दैवी पालट (उदा. लाद्यांवर ॐ उमटणे), तसेच वाईट शक्तींचे तोंडवळे उमटणे यांचे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले जात आहे. संतांच्या वास्तूमध्ये होणार्‍या पालटांमागील कोणती वैज्ञानिक प्रक्रिया घडते, या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : savv.research@gmail.com)

कुठे अनेक वर्षे भारतात राहून येथील विविध विषयांवर संशोधन करणारे विदेशी वैज्ञानिक आणि कुठे अनुत्सुक भारतीय वैज्ञानिक !

     जर्मनी येथील एक संशोधक यांनी गेली ३४ वर्षे अग्निहोत्र या विषयावरती संशोधन केले आहे. तसेच अनेक विदेशी वैज्ञानिक भारताचे सांस्कृतिक महत्त्व जाणून येथे संशोधनासाठी येतात. भारतामध्ये अनेक आश्‍चर्ये असूनही त्यावर संशोधन करणे दूरच; परंतु भारतीय वैज्ञानिक एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेसंदर्भात ऐकण्यासही सिद्ध नसतात किंवा त्यासंबंधी जिज्ञासाही दर्शवित नाहीत.
- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०१४)

दादाजी उवाच् !

ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती
महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

तीर्थरूप रा.रा. डॉक्टर यांस,
साष्टांग नमस्कार

आता माझ्या दृष्टीने तरी तुमच्या प.पू. या शब्दाचे उच्चाटन होऊन त्याची जागा 'तीर्थरूप' या शब्दाने घेतली आहे; म्हणून आता अमृतमहोत्सवाच्या दिवशी ग्वाही व्हावी, ही आग्रहाची विनंती. आपण हाती घेतलेले अवर्णनीय कार्य आपल्या पराकाष्टेच्या प्रयत्नाने सफल होवो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !
- शुभं
दादाजी (योगतज्ञ दादाजी वैशंपायन)
('योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन माझे कौतुक करायला कोणत्या स्तरापर्यंत जातात, हे पाहून माझे मन निःशब्द झाले.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात आश्‍वस्त करणारे प.पू. डॉक्टरांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे अवतारी कार्य !

भगवंताने श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ७ आणि ८

अर्थ : जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते (म्हणजे लोक धर्माचरण करत नाहीत) आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो. सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी आणि धर्मस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुनःपुन्हा अवतार घेतो.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

कोटी कोटी नमन !

विशेष संपादकीय

२९ मे २०१६ हा दिवस सनातनच्या इतिहासात सुर्वणाक्षरांनी लिहिल्या गेेलेल्या अनेक दिवसांमधे उठून दिसेल. आजच्या या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन !

४ एप्रिल १९९९ हा दिवस आम्हाला चांगला आठवतो. दैनिक सनातन प्रभातचा पहिला अंक या दिवशी प्रसिद्ध झाला. गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीचा तो अंक होता. पुढे २८ नोव्हेंबर १९९९ या दिवशी रत्नागिरी आवृत्ती, ५ डिसेंबर १९९९ या दिवशी सांगली आवृत्ती (आजची 'पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा' आवृत्ती ) आणि ५ मार्च २००० या दिवशी मुंबई आवृत्ती (आजची 'मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ' आवृत्ती) प्रसिद्ध झाली. म्हणजे केवळ एका वर्षाच्या कालावधीत दैनिक सनातन प्रभातच्या चार आवृत्त्या चालू झाल्या. काय लपले होते या गरुडझेपेच्या मागे ? दैनिकाशी संबंधित साधक केवळ निमित्तमात्र होते. खरी प्रेरणा, उत्साह आणि ऊर्जा तर परात्पर गुरु डॉ. आठवले हेच पुरवत होते. त्यांनी शिकवलेल्या साधनेचे पाठबळ साधकांच्या पाठीशी असल्यामुळे चार आवृत्त्यांचा भार वाहणे सहज शक्य झाले. आम्हाला दैनिकाच्या पहिल्या अंकातील म्हणजे ४ एप्रिल १९९९ च्या अंकातील संपादकीय लेख आठवतो. 'ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेची पहाट' या मथळ्याखालील ते संपादकीय परात्पर गुरु आठवले यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरले होते. वर्तमानपत्रांचे दायित्व, लोकमान्यांनी वर्तमानपत्रांचे नक्की केलेले कोतवाली आणि वकिली हे स्वरूप, शासनकर्त्यांची मानसिकता, विद्यमान वर्तमानपत्रांची कार्यपद्धत इत्यादी ठळक सूत्रांवर विस्तृत लिहिले आणि पत्रकारिता या विषयाचा संपूर्ण उलगडा आम्हाला केला. तीच शिदोरी घेऊन आम्ही पुढची वाटचाल चालू केली ती आजतागायत चालू आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn