Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची आज जयंती

रघुराम राजन यांच्या पुनर्नियुक्तीविषयी प्रसारमाध्यमांना लक्ष घालण्याची आवश्यकता नसावी ! - पंतप्रधान मोदी यांचे परखड मत

       नवी देहली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून काढावे, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी गेल्या काही आठवड्यांत दोन वेळा पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. राजन यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर मासात संपणार आहे. या संदर्भातील प्रश्‍नावर मोदी म्हणाले की, राजन यांच्या नियुक्तीच्या संदर्भातील निर्णय प्रशासन घेईल; मात्र त्याविषयी प्रसारमाध्यमांना लक्ष घालण्याची आवश्यकता नसावी.
       दुसरीकडे अर्थमंत्री जेटली म्हणाले की, केवळ रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरवरच नव्हे, तर कोणाविरूद्धही दिलेल्या वैयक्तिक प्रतिक्रियेला मी मान्यता देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँक ही एक महत्त्वाची संस्था असून निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. कोणी जर त्यांच्या निर्णयावर सहमत किंवा असहमत असेल, तर तो वादाचा विषय आहे. आपण एखाद्या विषयावरील चर्चेकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. मात्र सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीविषयी चर्चा करण्यास अनुमती द्यावी, असे मला वाटत नाही.

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने आतंकवाद्यांना देण्यात येणारे समर्थन बंद करावे ! - पंतप्रधान मोदी

भारताने सांगितले आणि पाकने ऐकले, 
असे कधी झाले नाही आणि पुढेही कधी होणार 
नाही, हे भारतीय राज्यकर्ते समजतील तो सुदिन !
        वॉशिंग्टन - भारत-पाक संबंध खर्‍या अर्थाने अधिक चांगल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात; मात्र त्यासाठी प्रथम पाकने स्वतःहून निर्माण केलेल्या आतंकवादाची बाधा दूर करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी द वॉल स्ट्रीट जनरलच्या संकेतस्थळावर पोस्ट करतांना केले आहे.
       मोदी यांनी पुढे लिहिले आहे की, आम्ही पहिले पाऊल उचलायला सिद्ध आहोत; मात्र शांतीचा मार्ग दोन्ही बाजूने असायला हवा. पाकने त्यांची भूमिका बजावली पाहिजे. आम्ही यापूर्वीच म्हटले आहे की, आपण एकमेकांच्या विरोधात लढण्याऐवजी गरिबीच्या विरोधात लढायला हवे.
      मोदी यांनी पुढे असेही स्पष्ट केले आहे की, आतंकवादावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आतंकवाद तेव्हाच थांबू शकतो, जेव्हा त्याला देण्यात येणारे समर्थन थांबले जाईल. मग तो आतंकवाद सरकारद्वारा प्रायोजित असणारा असेल अथवा सरकारेतर असेल.

साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि महर्षींनी दिलेला आदेश

       परात्पर गुरु डॉ. आठवले हे वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी वयाची ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या दिवशी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे साधकांनी करावयाच्या जपाविषयीची महत्त्वाची सूचना आणि हा जप करण्यामागील कार्यकारणभावाविषयीचे महत्त्वपूर्ण लिखाण पुढे देण्यात आले आहे.

पुणे येथे विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदारांना सादर

डावीकडून नायब तहसीलदार नंदा परदेशी,
समितीचे श्री. बागवडे आणि श्री. कृष्णा पाटील
        पुणे, २७ मे (वार्ता.) - राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने येथील मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी त्या मागण्यांसाठी स्वाक्षरी चळवळही राबवण्यात आली होती. या संदर्भातील निवेदन २६ मे या दिवशी नायब तहसीलदार नंदा परदेशी यांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कृष्णा पाटील आणि विनायक बागवडे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
       हिंदु धर्मपरंपरांना आव्हान देणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर कठोर कारवाई करावी, देहली विद्यापिठाच्या पाठ्यपुस्तकांतून क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट करावा, तसेच कर्नाटकातील हिंदु मंदिर तोडून तेथे मशीद बांधणार्‍यांवर कारवाई करावी, या विषयांसाठी १५ मे या दिवशी आंदोलन केले होते.

ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेणार्‍या खोट्या संकेतस्थळप्रकरणी महाराष्ट्रात वर्षाला २५० हून अधिक तक्रारी

वाढत्या सायबर चाचेगिरीला पोलीस 
प्रशासन आणि शासन कसा आळा घालणार आहे ?
       पुणे, २७ मे - ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेणार्‍या खोट्या संकेतस्थळप्रकरणी महाराष्ट्रात प्रत्येक वर्षाला २५० हून अधिक तक्रारी येत आहेत. त्यात प्रतीवर्षी २० प्रतिशतने वाढ होत आहे, अशी माहिती सायबर तज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी दिली. (सायबर गुन्ह्यांतील वाढती गुन्हेगारी, हे कायद्याचा धाक संपल्याचे लक्षण आहे. - संपादक) अशा प्रकारच्या तक्रार करणार्‍यांमध्ये महाराष्ट्र, बंगळुरू, भाग्यनगर आणि चेन्नई येथील नागरिकांचा मोठा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
       ते पुढे म्हणाले की, देशात आतापर्यंत अशा १ सहस्र १०० ते १ सहस्र ५०० खोटी संकेतस्थळे असून त्यामध्ये प्रत्येक वर्षी ५ ते १० प्रतिशतने वाढ होत आहे. अशा खोट्या संकेतस्थळावर नागरिक डोळे झाकून त्यावर आपल्या तक्रारीची नोंद करतात. त्या खोट्या संकेतस्थळांकडून तक्रारींचा वापर चुकीच्या कामासाठी करण्यात येतो. त्या तक्रारीच्या माहितीमधील संगणकीय पत्ता, भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती घेऊन सायबर गुन्ह्यांना निमंत्रण दिले जाते, हे अनेकदा निष्पन्न झाल्याचेही डॉ. डिकोस्टा यांनी सांगितले.

२०२३ मध्ये भारतात बुलेट ट्रेन धावणार ! - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

        नवी देहली - वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वीच बुलेट ट्रेनसाठीच्या टप्प्यांविषयी चर्चा केली आहे. यासंबंधीचे काम वेळापत्रकाप्रमाणे चालू असून २०२३ मध्ये भारतात पहिली बुलेट ट्रेन धावेल. पहिली बुलेट ट्रेन मुंबई-कर्णावती या मार्गावर धावण्याची शक्यता आहे.
       बुलेट ट्रेनमुळे ५०८ कि.मी.चे हे अंतर अवघ्या २ घंट्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या रेल्वेची अधिकाधिक गती प्रतीघंटा ३५० किलोमीटर असणार आहे. या प्रवासापैकी २१ किलोमीटरचा प्रवास समुद्राखालून जाणारा असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ९७ सहस्र ६३६ कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी ८१ टक्के निधी हा जपानकडून मिळणार्‍या कर्जातून उपलब्ध होणार आहे.

डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या हस्ते पर्जन्यवृष्टी महायज्ञास प्रारंभ

       लातूर - दुष्काळावर मात करण्यासाठी आर्य प्रतिनिधी सभा, मुंबई आणि पर्जन्यवृष्टी महायज्ञ समितीच्या वतीने आयोजित पर्जन्यवृष्टी महायज्ञात आहुती आणि आशीर्वाद देत काशीपीठाचे जगद्गुरु श्रीश्रीश्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी यज्ञाचा शुभारंभ केला. या वेळी २१ सहस्र रुपयांचा निधीरूपी प्रसादही दिला. जगद्गुरूंसह नाथपिठाचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, रुईभर येथील प.पू. दत्तस्वरुप अप्पाबाबा महाराज यांनीही या यज्ञात आहुती टाकत यज्ञाचे आणि पाण्याचे महत्त्व विषद केले. दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या लातूरकरांना जीवनदान देण्यासाठी करण्यात येत असलेला पर्जन्यवृष्टी महायज्ञ यशस्वी होईल, असेही जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

नाशिकमध्ये धर्मद्रोही तृप्ती देसाई यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक, ४ संशयित कह्यात

 • नाशिकमधील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याच्या परिस्थितीला तृप्ती देसाई यांना उत्तरदायी ठरवून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई न करणे, हे आश्‍चर्यजनक आहे !
 • वारंवार धर्मपरंपरा मोडणार्‍यांच्या विरोधात पोलीस काही कारवाई करत नसल्यामुळेच जनता आक्रमक होत असल्यास चूक ते काय ?
       नाशिक, २७ मे - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या चारचाकी वाहनावर २५ हून अधिक जणांच्या जमावाने सुंदर नारायण मंदिराजवळ दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या सर्व काचा फुटल्या असून देसाई यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्या घायाळ झाल्या आहेत. या प्रकरणी देसाई यांनी २७ मे या दिवशी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला असून ४ संशयित युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
१. २६ मे या दिवशी तृप्ती देसाई या दुपारी श्री कपालेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करत होत्या. त्या वेळी पोलिसांनी भाविकांचा विरोध पाहून त्यांना मंदिरातून बाहेर काढून नाशिक जिल्ह्याच्या बाहेर सोडले होते.

सोलापूर येथे पोलीस नाकाबंदीत ३० लक्ष रुपयांची रक्कम शासनाधीन, दोघांना अटक

पैसे हवाल्याचे असल्याचा संशय
       सोलापूर, २७ मे - येथील जुना पुणे नाका भागातील हॉटेल अ‍ॅम्बेसेडर येथे पोलिसांकडून नाकेबंदीची पडताळणी चालू असतांना जयेशकुमार आोझा आणि सुनीलभाई कडीया यांच्याकडून ३० लक्ष रुपयांची रक्कम शासनाधीन (जप्त) करण्यात आली. हे पैसे हवाल्याचे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (अजूनपर्यंत हवालामार्गाने पैसे स्थानांतरण होणे, हे देशातील कायदा-सुव्यवस्था मोडीत निघाल्याचे लक्षण आहे, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. देशातील आर्थिकविषयीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. - संपादक) पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.
       पोलिसांकडून नाकाबंदीची पडताळणी चालू असतांना उपरोक्त दोघे दुचाकीवरून जात होते. पोलिसांनी अडवून त्यांच्याकडे वाहन अनुज्ञप्तीची पडताळणी केली. अनुज्ञप्ती गुजरात राज्यातील असल्याचे दिसल्यावर पोलिसांना संशय आला. त्यांनी साहित्य पडताळल्यावर उपरोक्त रक्कम, ५ भ्रमणभाष, दुचाकी आदी साहित्य शासनाधीन केले.

म्यानमारच्या बौद्धांना मुसलमान नकोत, गावागावांत लावले फलक !

कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाचा, निधर्मीवाद्यांचा, 
मानवाधिकार संघटनांचा विचार न करता अशा प्रकारचे फलक 
लावणार्‍या म्यानमारच्या बौद्धांची निश्‍चयी वृत्ती अभ्यासायला हवी !
        यांगून - बौद्ध राष्ट्र असणार्‍या म्यानमारच्या इरावडी डेल्टा भागातील गांवकर्‍यांनी स्वाक्षरी मोहीम चालवली आहे. हे गावकरी येथे मुसलमानांविना राहू इच्छित आहेत. यासाठी ते ही मोहीम राबवत आहेत. गावकर्‍यांनी येथे फलकही लावले आहेत आणि असे फलक म्यानमारच्या अनेक गावांत लावण्यात आले आहेत.
      मार्च महिन्यापासून येथील थाउंग्टन गावाच्या प्रवेशद्वारावर पिवळ्या रंगाचा एक फलक लावण्यात आला आहे. यात लिहिले आहे की, येथे मुसलमानांना रात्रीचे थांबवण्याची अनुमती नाही. येथे कोणत्याही मुसलमानाला भाड्याने घर मिळणार नाही आणि कुणाही मुसलमानाबरोबर कुणाचे लग्न लावले जाणार नाही.

गोवंशियांना कोंबून नेणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची 
त्वरित अंमलबजावणी करणे आवश्यक !
       नांदेड - अतिशय निर्दयीपणे टेम्पोतून कोंबून तेलंगणा राज्यात ५ गायी आणि ६ गोर्‍हे यांना घेऊन जाणार्‍या शे.मुखीद शे.इमाम साब (वय २३ वर्षे) आणि शे. युनुस शे. महेबूब (वय ३२ वर्षे) यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या धर्मांधांना काही गोप्रेमींनी पोलिसांच्या कह्यात दिले.
१. तेलंगणा राज्यात गोवंशियांची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यावर गोशाळेचे संचालक किरण बिच्चेवार यांनी वाहनाचा पाठलाग केला; पण अंधार असल्याने वाहने नंतर दिसली नाहीत.
२. काही युवकांना याविषयी कळताच त्यांनी दोन्ही टेम्पोंना थांबवले; परंतु धर्मांध वाहनचालकाने उर्मटपणाचे उत्तर देऊन गाडी न थांबवता वेगाने पुढे नेली. त्या युवकांनी आणखी काही गोप्रेमींना याविषयी कळवले.
३. गोप्रेमींच्या जमावामुळे एका चौकात धर्मांधांनी गाडी थांबवली; पण लगेचच पुन्हा एका कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. युवकांनी वाहनांना कह्यात घेऊन पोलीस येईपर्यंत धर्मांधांना तेथेच थांबून ठेवले. नंतर पोलिसांच्या कह्यात दिले.

काश्मीरच्या नौगाम येथील चकमकीत ४ आतंकवादी ठार, १ सैनिक हुतात्मा

केंद्रशासनाच्या गेल्या २ वर्षांच्या कार्यकाळात
 जिहादी आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन 
झाले असते, तर जनता सुखी झाली असती !
       श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील नौगाम येथे आतंकवादी असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे या परिसरात नाकेबंदी करून शोधमोहीम राबवण्यात आली. नौगम विभागातील डोंगराळ परिसरात या वेळी लपलेल्या आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीत १ सैनिक हुतात्मा झाला.

ममता(बानो) बॅनर्जी यांनी ईश्‍वर आणि अल्ला यांना स्मरून शपथ घेतली !

 • बंगालमधील हिंदूंनी गेल्या ५ वर्षांत तृणमूल काँग्रेस सरकारचा कार्यकाळ पाहिल्यानंतरही तिलाच निवडून देऊन आत्मघात करून घेतलेला आहे, हे ममता(बानो) यांच्या शपथेवरून लक्षात येते !
 • उद्या बंगालच्या हिंदूंना नमाज पठण करावे लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !
       कोलकाता - २७ मेच्या दिवशी येथे एका कार्यक्रमात बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी शपथ घेतली. त्यांनी ईश्‍वर आणि अल्ला यांना स्मरून ही शपथ घेतली. त्यांच्यासह ४१ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला लालूप्रसाद यादव, नीतीश कुमार, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव उपस्थित होते. भाजपकडून कोणीही उपस्थित नव्हते.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात राज्यकर्त्यांमधील राष्ट्र आणि धर्म प्रेमाच्या अभावाने देश रसातळाला गेला ! - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था

डावीकडून कु. रागेश्री देशपांडे, पू. नंदकुमार जाधव आणि श्री. विजय पाटील
     पिंप्री ( जिल्हा जळगाव) - स्वातंत्र्यानंतरच्या काळात राज्यकर्त्यांमधील राष्ट्र आणि धर्म प्रेमाच्या अभावाने देश रसातळाला गेला आहे, त्यामुळे गोहत्या, धर्मांतर, आतंकवाद आणि धर्मावरील आघातांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हाच एकमेव उपाय आहे. म्हणून हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी पिंप्री, येथील गिरणा कॉलनी मैदानावर नुकत्याच झालेल्या धर्मजागृती सभेत केले. या धर्मजागृती सभेचा प्रारंभ शंखनाद आणि पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर पुरोहित श्री. महेश जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. त्यांचा सत्कार श्री. रूपेश बडगुजर यांनी केला. सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांचा सन्मान श्री. राम पाटील यांनी केला, तर रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांचा सत्कार सौ. साधना पाटील यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांचा सत्कार श्री. आनंद चौधरी यांनी केला. त्यानंतर समितीचे श्री. नीलेश तांबट यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख आणि सभेचा उद्देश सांगितला. या धर्मसभेचे सूत्रसंचालन श्री. शैलेश पोळ यांनी केले.

डोंबिवली स्फोट : मृतांची संख्या दहावर, मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

     ठाणे - डोंबिवलीतील औद्योगिक वसाहत परिसरातील प्रो-बेस एंटरप्राईजेस आस्थापनात बॉयलरच्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता दहा झाली आहे. प्रो-बेस आस्थापन हे डॉ. विश्‍वास वाकटकर यांनी १९८४ मध्ये चालू केलेे. या आस्थापनाचे संचालक त्यांची मुले नंदन वाकटकर, सुमीत वाकटकर आणि सून स्नेहल वाकटकर यांचे मृतदेह २७ मे या दिवशी मिळाले. घटनास्थळी मातीचा ढिगारा उपसण्याचे चालूच असून ढिगार्‍याखाली आणखी काही मृतदेह आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आस्थापनाच्या मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. या आस्थापनात काम करणारा सुशांत कांबळे स्फोटानंतर अजूनही बेपत्ता आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे सुमारे १० फूट खोल आणि किमान ४० फूट रुंद खड्डा पडला आहे. यातून या स्फोटाची भीषणता स्पष्ट होते.

शनी-मंगळ ३० मे या दिवशी पृथ्वीच्या जवळ येणार

     मुंबई - पुढील आठवड्यात मंगळ आणि शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला दोन्ही ग्रह साध्या डोळ्यांनी बघता येतील. ३० मे या दिवशी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ ७ कोटी ५२ लक्ष ८० सहस्र कि.मी. अंतरावर येणार आहे. यापूर्वी मंगळ ग्रह १४ एप्रिल २०१४ या दिवशी पृथ्वीच्या जवळ ९ कोटी २३ लक्ष ९० सहस्र किमी अंतरावर आला होता. आता यानंतर ३१ जुलै रोजी २०१८ रोजी पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ७५ लक्ष ९० सहस्र किमी अंतरावर येणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते-खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली. ३ जून या दिवशी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ एक अब्ज ३४ कोटी ९० लक्ष किमी अंतरावर येणार आहे.

फारुख अब्दुल्ला यांच्याकडून राष्ट्रगीताचा अवमान !

 • अशांवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी कारवाईच केली पाहिजे !  
 • राष्ट्रगीताच्या वेळी करत होते भ्रमणभाषवर संभाषण !
      कोलकाता - २७ मेच्या दिवशी बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या शपथविधी कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रगीत वाजवण्यात येत होते, तेव्हा व्यासपिठावर उपस्थित जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला भ्रमणभाषवर संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, अब्दुल्ला म्हणाले की, असे वाद होतच असतात. मला याविषयी काहीही सांगायचे नाही. तुम्हाला वाद निर्माण करायचा असेल, तर करा. (राष्ट्रगीताच्या अवमानावर असे विधान करणारे कधीतरी राष्ट्रप्रेमी असू शकतात का ? फारुख अब्दुल्ला, असदुद्दीन ओवैसी अशा नेत्यांच्याच बाबतीत राष्ट्रगीताविषयी वादंग का निर्माण होतात ? - संपादक)

(म्हणे) शासनाने केलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा तुघलक आणि पेशवाई यांना लाजवणारा !

शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपिट यांचे हिंदुद्वेषी उद्गार ! 
हिंदुद्वेषी संघटनांचे शेतकर्‍यांमध्ये विद्वेष पसरवण्याचे हे कारस्थानच होय ! 
      पुणे, २७ मे - सध्याच्या शासनाने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केला असून तो तुघलकी आणि पेशवाई यांना लाजवेल, असे टीकात्मक प्रतिपादन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपिट यांनी केले. शेतकरी संघटना आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २७ मे या दिवशी आयोजित केलेल्या संयुक्त धरणे आंदोलनाच्या वेळी ते म्हणाले. या वेळी मराठा सेवा संघ, छावा संघटना, छावा युवा संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, कुरेशी जमाअत, महाराष्ट्र, मुस्लीम विकास परिषद आदींसह अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या.

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व जाणून पाश्‍चात्त्य संस्कृतीत वाढलेले विदेशी स्वीकारत आहेत हिंदु धर्म !

भारतात राहूनही हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येत नाही, हा त्यांचा कर्मदरिद्रीपणाच होय !
स्पेनच्या मारियाने वर्ष २०१३ चा प्रयाग कुंभ पाहून, तर स्पेनच्याच फातिमा नावाच्या स्थापत्यविशारद 
महिलेने नुकताच पार पडलेला उज्जैन सिंहस्थपर्व पाहून हिंदु धर्माची दीक्षा घेतली !
      प्रयाग (अलाहाबाद)/उज्जैन - युरोपीय देश स्पेन येथील मारिया नावाची एक २६ वर्षीय युवती वर्ष २०१३ मध्ये झालेला प्रयाग कुंभमेळा पहायला आली होती. त्या वेळी तिने कुंभमेळ्यात सहभागी साधूसंतांची तपश्‍चर्या पाहिली. यावर ती एवढी प्रभावित झाली की तिने सर्वस्व त्यागून सनातन हिंदु धर्म स्वीकारला. संन्यास घेतल्यानंतर तिचे नामकरण पार्वती मारिया गिरी करण्यात आले असून जुना आखाड्याचे महंत रमेश गिरी हे तिचे गुरु आहेत.
     महंत रमेश गिरी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना म्हणाले, वर्ष २०१३ मध्ये मारियाने हिंदु धर्म स्वीकारला. आता उज्जैन येथील सिंहस्थपर्वात ती पूर्णत: संन्याशीण झाली आहे. संन्यास घेतल्यानंतर पार्वती मारिया गिरी यांनी हिंदु धर्मशास्त्र, वेद आणि अन्य ग्रंथ वाचण्यासाठी हिंदी आणि संस्कृत भाषा शिकून घेतल्या.

सामान्य नागरिकालाही गुन्हेगाराला ठार मारण्याचा अधिकार ! - के.पी. सिंह, पोलीस महासंचालक, हरियाणा

सामान्य नागरिकाने गुन्हेगाराला ठार केले, 
तर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार नाहीत, असे 
पोलीस महासंचालक जनतेला आश्‍वस्थ करतील का ?
       जींद (हरियाणा) - जर कुणी एखाद्याचे घर अथवा दुकान जाळत असेल किंवा कुणाला ठार करण्याचा प्रयत्न करत असेल, अथवा बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असेल, तर कायद्याने सामान्य व्यक्तीला अधिकार दिला आहे की, ती व्यक्ती अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍याला ठार करू शकते; मात्र या कायद्याची नागरिकांना माहिती नाही, असे प्रतिपादन हरियाणाचे पोलीस महासंचालक के.पी. सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलतांना केले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, हा केवळ पोलिसांचा अधिकार नाही.
      सिंह पुढे म्हणाले की, तुम्हाला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे. पोलिसांना हा अधिकार आहेच, त्यांच्याकडे वर्दी आहे, त्यासाठी ते वेतनही घेतात; मात्र तुम्ही तुमची भूमिका समजून घेतली पाहिजे. जर तुम्ही ही भूमिका बजावण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही घाबरट आहात, मृतवत् आहात, असेच म्हटले पाहिजे.

सहकार विभागाकडून बरखास्त केलेल्या संचालकांच्या चौकशीला प्रारंभ

     पुणे, २७ मे - बरखास्त केलेल्या सहकारी अधिकोषामधील संचालकांना अन्य सहकारी अधिकोषांच्या संचालकपदी काम करण्यास १० वर्षे प्रतिबंध घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार दिलीप माने यांची २६ मे या दिवशी सहकार विभागाकडून सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक संतोष पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती या चौघांनी सहकार सचिवांकडे माहितीच्या अधिकारात मागवली आहे. ही माहिती न मिळाल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी २ जून या दिवशी होणार आहे. उपरोक्त चौघांनी राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्या होत्या. त्यावर न्यायालयाने सहकार विभागाने ही सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

(म्हणे) लेखन स्वातंत्र्याची गळचेपी होणे, ही देशात आणीबाणीसदृश स्थिती !

हिंदुत्ववाद्यांवरील अन्यायाच्या विरोधात
कोणतेही भाष्य न करणारे नाटककार प्रेमानंद गज्वी !
     पुणे, २७ मे - राज्यकर्त्यांकडून लेखन स्वातंत्र्याची गळचेपी होणे वा एखाद्याला ठार मारणे, ही देशातील आणीबाणीसदृश स्थिती आहे. यासाठी साहित्यिकांनी केवळ मनोरंजनात्मक साहित्य न लिहता राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे साहित्य लिहले पाहिजे, असे मत नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गज्वी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेव कसबे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दुखावलेले आत्मे, असंतुष्ट गिधाडे माझ्याविरुद्ध एकत्र ! - एकनाथ खडसे

     जळगाव, २७ मे (वार्ता.) - माझ्या आव्हानात्मक स्वभावामुळे ४० वर्षांच्या राजकारणात अनेक लोक दुखावले गेले असून दुखावलेले आत्मे आणि असंतुष्ट गिधाडे माझ्याविरुद्ध एकत्रित आली आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी केले. श्री. खडसे यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून विविध आरोप होत असून त्याची सर्वत्र जोरात चर्चा चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर गंभीर स्वरूपाच्या आरोपांविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, बिनबुडाचे आरोप करणार्‍यांमध्ये दमानिया याही एक आहेत. शेतकरी नसतांना त्यांनी भूमी खरेदी केली होती. ही खरेदी राज्य शासनाने रहित ठरवली होती. तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या बाजूने निकाल लागला असला तरी गेल्या ४ वर्षांपासून भूमी महसूलकडे आहे. त्यामुळे त्या त्यातून दुखावलेल्या आहेत. आपमधून हकालपट्टी झालेल्या दमानियांची विश्‍वासार्हता आहे का ? (स्वतःला निष्कलंक सिद्ध करण्यासाठी अशा प्रतिक्रीया उपयोगाच्या आहेत का ? - संपादक)

पुणे जिल्हा परिषदेने खरेदी केलेली १ कोटी रुपयांची चिक्की निकृष्ट

जिल्हा परिषद अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
     पुणे, २७ मे - पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने १ कोटी रुपये व्यय करून निकृष्ट दर्जाची चिक्की खरेदी केल्याचे समोर आले आहे. खरेदी केलेल्या चिक्कीला तेलाचा उग्र वास येत असून त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. आयएस्ओ मानांकन असलेल्या या चिक्कीच्या उत्पादनावर दिनांक अस्पष्ट आहे. चिक्की खाल्यानंतर घशामध्ये खवखव होत असल्याने जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये चिक्की पडून असल्याचे समजते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी या चिक्की खरेदी प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (या प्रकरणाची नुसती चौकशी करून उपयोग नाही, तर उत्पादक आणि इतर संबंधित यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.  - संपादक)

राजस्थानातील एका मंदिरात ११ रुपयांत देण्यात येते पाप-मुक्तीचे प्रमाणपत्र !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे पुजार्‍यांच्या संस्थेकडून होत असलेली चुकीची कृती !
      उदयपूर - राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात गौमतेश्‍वर महादेव पापमोचन तीर्थ हे शिवमंदिर प्रसिद्ध आहे. तिथे सहस्रो भाविक येतात आणि पवित्र मंदाकिनी कुंडात स्नान करतात. तिथे स्नान करणार्‍यांना पाप-मुक्ती प्रमाणपत्र देण्याची प्रथा गेली ६०-६५ वर्षं चालू आहे. इतक्या वर्षांत या कुंडात स्नान केलेल्या आणि पाप-मुक्ती प्रमाणपत्र घेतलेल्या भाविकांची नोंद ठेवल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. मंदिरातील पुजार्‍यांची एक संस्था दोष-निवारण विधीसाठी १० रुपये दक्षिणा घेऊन १ रुपयांत पाप-मुक्ती प्रमाणपत्र देते.

गुजरातमधील ढोलाविरा येथील प्राचीन भिंती जगातील पहिल्या सुनामी प्रतिरोधक भिंती आहेत ! - राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचा निष्कर्ष

     ढोलाविरा (गुजरात) - ढोलाविरा गावाच्या सभोवताली सुमारे ६ सहस्र वर्षांपूर्वी बांधलेल्या भिंती या परकियांच्या आक्रमणापासून बचाव होण्यासाठी बांधलेल्या नसून त्या सागरातील सुनामीपासून संरक्षण होण्यासाठी बांधलेल्या आहेत, असा निष्कर्ष राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनांवरून काढला आहे. त्यासाठी अभियंत्यांनी वैज्ञानिक संशोधन आणि समुद्रात उत्खनन केले आहे. 
      या भिंतींची रूंदी सुमारे १५ ते १८ मीटर आहे. या भागात ८ सहस्र वर्षांपूर्वी सुनामीचा तडाखा बसला होता. हे लक्षात घेऊन ढोलाविरा गावाची स्थापना करतांना या भिंती बांधण्यात आल्या असाव्यात, असे वैज्ञानिकांना वाटते.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचे कार्यक्रम

वक्ते : डॉ. सच्चिदानंद शेवडे
२८ मे
स्थळ : शास्त्रीनगर मैदान, गोरेगाव (प.),
वेळ : सायं. ७.३०, विषय : सावरकर - एक झंझावात
२९ मे
स्थळ : रविंद्र भवन, साखळी, गोवा, वेळ : सायं.६.३०
(सावरकर गीतांच्या कार्यक्रमात निरूपण) समग्र सावरकर दर्शन

आज भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : वर्‍हाळदेवी माता मंगल भवन, कामतघर, भिवंडी
शनिवार, २८ मे २०१६ वेळ : सायं ६ वाजता
संपर्क क्रमांक : ९९८७०२७४२७/९९८७१२४५५९
     हिंदूंनो, या धर्मजागृती सभेस प्रचंड संख्येने उपस्थित रहा !

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून झालेल्या चुकीच्या कारवाईची चौकशी करा !

धर्मांध युवकांवर मटका खेळतांना कारवाई झाल्याचे प्रकरण
असीफ बावा यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम संघटना आणि इतर संघटना यांची मागणी
चोराच्या उलट्या बोंबा...
     सांगली, २७ मे (वार्ता.) - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने १६ धर्मांध युवकांवर मटका, जुगार अड्डयाच्या संदर्भात करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. या वेळी युवकांकडे दोन तलवारी सापडलेल्या असतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी बिरोबा नरळे आणि अझरुद्दीन पिरजादे यांनी स्वत:च्या जवळच्या तलवारी वाढवून ६ तलवारी दाखवल्या, तसेच सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी युवकांच्या नातेवाईकांकडे १० लक्ष रुपये मागण्यात आले. तरी या सर्व युवकांवर खोटे गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करावी, या मागणीचे निवेदन असीफ बावा यांच्या नेतृत्वाखाली विविध मुस्लीम संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून दिले. (जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी मोर्चा काढून पोलिसांना वेठीस धरणार्‍यांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे ! - संपादक)

पुण्यामध्ये संस्कृत भारतीच्या वतीने विनामूल्य संस्कृत संभाषणवर्गांचे आयोजन

     पुणे, २७ मे (वार्ता.) - संस्कृत ही जनभाषा व्हावी, या उद्देशाने संस्कृत भारतीच्या वतीने येथील कोथरूड परिसरात विनामूल्य संभाषणवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. (संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी प्रयत्न करणार्‍या संस्कृत भारती संस्थेचे अभिनंदन ! - संपादक) देश-विदेशात संस्कृत भाषेचा प्रचार, संवर्धन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्कृत भारती ही संस्था करते. संभाषणवर्गात १० दिवस प्रतिदिन २ घंटे संस्कृत बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०१७३४९० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्कृत भारतीचे श्री. अग्निहोत्री यांनी केले आहे.

एटीएम्च्या गुप्त शब्दासाठी पुण्यात लष्करातील लान्स नायकाची हत्या

     पुणे - सैन्यातील लान्स नायक असलेले संजय लवंगे यांनी एटीएम्चा गुप्त शब्द (पासवर्ड) सांगण्यास नकार दिल्याने दोन मद्यपींनी हत्या केली आणि त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. ८ दिवसांनी पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी प्रतीक हाके आणि अमित सदनकर यांना अटक करण्यात आली आहे.

फुटीरतावादी मसरत आलम याला जामीन : न्यायाधिशांचे पोलिसांवर ताशेरे

      श्रीनगर - बडगाव येथील न्यायालयाचे न्यायाधीश मसरत रुही यांनी फुटीरतावादी मसरत आलम याला जामीन मान्य करतांना पोलिसांवर कडक ताशेरे ओढले आहेत. भारतात अबू घरीब अथवा ग्वान्तेनामो येते असणारी परिस्थिती सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. (अबू घरीब (इराक) आणि ग्वान्तेनामो (अमेरिका) या छळ-छावण्या असून त्यांत अनेक युद्ध कैद्यांचा अतोनात छळ करण्यात आला होता.)
     न्यायाधीश पुढे म्हणाले, पोलिसांना मसरत आलम याची पोलीस कोठडी नको, त्याची तपासणी करायची नाही; मात्र त्यांना मसरत आलम याची न्यायालयीन कोठडी हवी. हे कायद्यात बसत नसल्याने ते मान्य करता येत नाही.
     मसरत आलम याला २०१० मध्ये देशद्रोही कारवाया केल्याविषयी अटक करण्यात आली होती. मागील मार्चमध्ये मुफ्ती महंमद यांचे शासन आल्यावर सार्वत्रिक क्षमा दिली गेली होती तेव्हा तो सुटला; मात्र एका मासानंतर पाकिस्तानी ध्वज फडकवल्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.


इंग्लंडमध्ये नव्याने उभारलेल्या हिंदु मंदिराची प्राणप्रतिष्ठा

विदेशात मंदिरे उभारून स्वतःची संस्कृती जतन करणार्‍या विदेशी हिंदूंकडून भारतातील हिंदूंनी बोध घ्यावा !
      लंडन - इंग्लंडमधील दक्षिण पश्‍चिम भागात असलेल्या स्विंडन या शहरात नवीन हिंदु मंदिर बांधण्यात आले असून त्याची प्राणप्रतिष्ठा २१ मे या दिवशी पार पडली. त्यावेळी गणेश पूजन, सत्यनारायण पूजा असे अनेक धार्मिक विधी पार पडले. मंदिरासोबतच सांस्कृतिक केंद्रही बांधण्यात आले आहे. या मंदिराचा कार्यभार धर्मादाय कायद्याप्रमाणे नोंदणीकृत असलेल्या स्विंडन हिंदू टेम्पल ट्रस्ट सांभाळणार आहे. या मंदिरामुळे पूजा-अर्चा सोबतच मासिक भजन-कीर्तन, प्रीती-भोज, सण साजरे करणे, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचने, धार्मिक विधी, प्राचीन कलांचे सादरीकरण, हिंदुत्वाशी निगडीत कार्यक्रम, हिंदूंचे धर्मग्रंथांचे वाचन आणि हिंदू समुदायाला एकत्र येण्यासाठी जागा अशा विविध कार्यक्रमासाठी व्यासपीठ निर्माण झाले आहे.

सिंहस्थपर्वात गायत्री यज्ञ, भागवतकथा यांसह १६ संस्कारांविषयी जागृती !

अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे आयोजन
सनातन संस्थेच्या कु. पूनम चौधरी यांचा  सत्कार करतांना पू. श्रीधर महाराज
     उज्जैन - येथील सिंहस्थपर्वात अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशन यांच्या वतीने भरवलेल्या शिबिरात गायत्री यज्ञासह कथाव्यास श्रद्धेयप्रवर पू. त्र्यंबकेश्‍वरचैतन्यजी महाराज यांच्या भागवतकथेचा भक्तांनी लाभ घेतला. दिशा दूरचित्रवाहिनीवर झालेल्या थेट प्रसारणातून ठिकठिकाणच्या भक्तांनी या कथेचे श्रवण केले. सायंकाळच्या सत्रात १६ संस्कार आणि गोरक्षा यांविषयी संत आणि मान्यवर यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले. विशेष म्हणजे १६ संस्कारावरील लोकांच्या प्रश्‍नांचे समाधानही श्रद्धेयप्रवर पू. डॉ. गुणप्रकाश महाराज यांनी केले.

नेपाळमार्गे बिहारपर्यंत रेल्वे चालू करण्याची चीनची सिद्धता !

एकमेव हिंदु राष्ट्र असणार्‍या नेपाळला चीनने निधर्मी बनवले आणि आता ते गिळंकृत 
करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद होय !
      बीजिंग - नेपाळमार्गे बिहार सीमेपर्यंत रेल्वेमार्ग बांधण्याची योजना चीन आखत आहे. चीनच्या शासकीय प्रसारमाध्यमानुसार चीन उभारत असलेला रेल्वेमार्ग तिबेटमार्गे वर्ष २०२० पर्यंत नेपाळ सीमेपर्यंत पोहोचेल. या विस्ताराचा उद्देश भारत आणि दक्षिण आशियाबरोबर परिवहन संपर्कात सुधारणा करणे होय. चीन नेपाळमध्ये रेल्वेमार्ग उभारून संपूर्ण दक्षिण आशियात पोहोचण्याच्या सिद्धतेत आहे. आता त्याला दक्षिण चीन सागरीमार्गाने सिंगापूर, मलेशियाद्वारे भारतात यावे लागते. या रेल्वेमार्गामुळे चीनला एवढे लांब अंतर कापावे लागणार नाही. रेल्वे आणि रस्ते वाहतूक यांद्वारे नेपाळमध्ये भारताचा प्रभाव न्यून करण्याच्या दृष्टीने चीनचे हे षड्यंत्र असावे, असे राजकीय विशेषज्ञांचे मत आहे; परंतु काही तज्ञांच्या मते हिमालयातील हे रस्ते तेव्हा व्यावहारिक ठरतील, जेव्हा ते भारताशी जोडले जातील.


पत्नीने पतीची आज्ञा पाळली नाही, तर तिला सौम्य मारहाण करण्याची पतीला मुभा !

पाकिस्तानमध्ये भूमाता ब्रिगेडसारख्या स्त्रीवादी संघटना नसल्याचा हा परिणाम 
समजायचा का ? आता भूमाता ब्रिगेडने पाकिस्तानातही शाखा उघडावी !
इस्लामिक परिषदेच्या महिलांचे संरक्षण विधेयकात अनेक तरतुदी
     इस्लामाबाद - पाकिस्तानातील कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडीओलॉजी संस्थेने महिलांचे संरक्षण विधेयक सिद्ध केले आहे. त्यानुसार जर पत्नीने पतीची आज्ञा पाळली नाही, तर तिला सौम्य मारहाण करण्याची पतीला मुभा असल्याचे प्रावधान केले आहे. त्यात पत्नीने पतीने सांगितलेले कपडे न घालणे, लैंगिक संबंधास नकार, त्यानंतर आणि मासिक पाळीनंतर स्नान करण्यास नकार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. तसेच महिलांनी हिजाब घालणे अनिवार्य आहे, महिलांनी सैन्यात सहभाग घेऊ नये, विदेशी पाहुण्यांचे स्वागत करू नये, परपुरुषांशी बोलू नये, असे अनेक नियम त्या विधेयकात आहेत. रुग्णालयात परिचारिकांनी पुरुषांची सेवा करू नये, विज्ञापनांमध्ये काम करू नये. गर्भारपणात १२० दिवस उलटल्यावर गर्भपात करू नये, असेही नियम करण्यात आले आहेत.

कॅलिफोर्निया येथे हिंदु मंदिरावर दरोडा : हिंदूंकडून निषेध

विदेशातील हिंदूंच्या मंदिरांवरील वाढती आक्रमणे रोखण्यासाठी 
केंद्रशासन काही पावले उचलणार कि गप्प बसणार ?
      कॅलिफोर्निया - काही दिवसांपूर्वी शहरात एका शस्त्रधारी चोरट्याने मंदिरात दरोडा घातला. या आक्रमणात बळी पडलेल्यांमध्ये एका ८६ वर्षीय हिंदु महिलेचा समावेश आहे. या लूटमारीच्या प्रकरणी अमेरिकेतील हिंदूंनी निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेतील ३० लाख हिंदूंसाठी ही घटना धक्का देणारी आहे. कॅलिफोर्नियाच्या महापौरांनी या प्रकरणी कसून चौकशी करावी आणि हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
      गेल्या मार्चमध्ये पेन्सील्वानियाच्या मोन्रो शहरात हिंदूंच्या एका गोशाळेमध्ये गायीचे शीर धडावेगळे करून तेथे फेकण्यात आले होते. वर्ष २०१५ मध्ये न्ययॉर्क शहरात ४० हिंदु धर्मध्वज जाळण्यात आले होते. नोव्हेंबर २०१५ मध्ये किचनेर (ऑन्टारियो) येथे मंदिराची तोडफोड करण्यात आली होती.


अमेरिकेने पाकच्या सैन्याला देण्यात येणारे अब्जावधी रुपयांचे साहाय्य रोखले !

     वॉशिंग्टन - अमेरिकेकडून पाकिस्तानला २ सहस्र कोटी अमेरिकन डॉलरचे सैनिकी साहाय्य अडवून ठेवणारा कायदा सिनेटच्या समितीने संमत केला आहे. पाकमधील आतंकवादी हक्कानी गटाविरुद्ध पाकिस्तान स्पष्ट अशी पावले उचलत आहे हे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेच्या संसदेला प्रमाणपत्रासह पटवून देईपर्यंत हे साहाय्य अडवून ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षीही समितीने हक्कानी नेटवर्कवर कारवाईची अट घातली होती. सभागृहाने गेल्या आठवड्यात संमत केलेल्या विधेयकाने पाकला अमेरिकेकडून मिळणार्‍या ६ सहस्र कोटी रुपयांच्या मदतीपैकी ४ सहस्र ५०० कोटी रुपये रोखून धरले आहेत.

सौदी अरेबियामध्ये घरकाम करणार्‍या भारतीय महिलेचा छळामुळे मृत्यू !

आखाती देशात भारतीय कामगारांच्या होणार्‍या छळाविषयी निष्क्रिय 
रहाणारे राज्यकर्ते काही करतील, अशी अपेक्षा नाही !
      भाग्यनगर - येथून सौदी अरेबिया येथे घरकाम करण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय असिमा खातून यांचा छातीच्या रोगाच्या उपचाराच्या वेळी किंग सौद या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. असिमा खातून यांच्या मालकाने केलेल्या छळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अब्दुल रहमान अली महंमद याने केलेल्या मानसिक आणि शाररिक छळ यांविषयी असिमा यांनी २ मासांपूर्वी घरी कळवले होते. त्यांनी भारतात परत येण्यासाठीची व्यवस्था करायला आईला सांगितले होते. असिमा यांच्या मृत्यूच्या ३ दिवसांपूर्वी तेलंगणचे प्रमुख सचिव डॉ. राजीव शर्मा यांनी असिमा यांच्या परिवाराच्या वतीने त्यांना भाग्यनगरला परत आणण्याची विनंती केली होती. असिमा या वर्ष २०१५ मध्ये सौदी अरेबियाला ९० दिवसांच्या व्यावसायिक व्हीसावर गेल्या होत्या; परंतु त्यांना अवैधपणे तिथे ठेवण्यात आले होते.


बांगलादेशात हिंदु व्यापार्‍याची हत्या

     ढाका - देबेश चंद्र प्रमाणिक या हिंदु व्यापार्‍याची गोबिंदगंज उपजिल्ह्याच्या गैबांधा येथे त्याच्या दुकानातच अज्ञातांकडून धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. (बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी भाजप शासन काही पावले उचलणार का ? - संपादक)
    पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. देबेश याच्या परिवरातील सदस्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी काही दारूडे त्याच्याकडे पैसे मागत होते, तेव्हा देबेशने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. या दारूड्यांनीच त्याची हत्या केल्याचा संशय या सदस्यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे मुलींची खरेदी-विक्री करणार्‍या आंतरराज्य टोळीतील दलाल महिलेसह तिघे पोलिसांच्या कह्यात

अशा टोळ्यांचे मूळ शोधून पोलिसांनी 
त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !
       नाशिक - येथे मुलींची खरेदी विक्री करणार्‍या आंतरराज्य टोळीतील दलाल महिलेसह तिघांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांनी आतापर्यंत ८ ते १० मुलींची खरेेदी-विक्री केली आहे. या जाळ्यात अडकलेल्या एका मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
      श्रीमंत व्यक्तीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली दलाल अल्पवयीन मुलींची फसवणूक करायचे. गरीब कुटुंबातील पालकांना पैसे द्यायचे आणि मुलींची विक्री करायची, अशी या टोळीची कार्यपद्धत होती.

मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाच्या अन्वेषणात भारताला सहकार्य करा ! - अमेरिकेचा ८ वर्षांनंतर पाकला दम

       मुंबई - मुंबई शहरावर २६/११ ला झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या अन्वेषणात भारताला सहकार्य करा आणि तुमच्या देशात चालू असलेल्या जिहादी आतंकवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, असा दम अमेरिकेने पाकिस्तानला भरला आहे.
      अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, या आक्रमणातील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही वेळोवेळी पाकिस्तान सरकारला भारतीय अन्वेषण यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती करत आलो आहोत.

वस्तूस्थितीचा विपर्यास करून सशस्त्र क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वा. सावरकर यांच्या विरोधात मानहानीकारक वक्तव्ये करणे, हा मोठा देशद्रोह !

Add caption
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त....
१. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी स्वा. सावरकरांची 
धगधगती सशस्त्र क्रांती !
१ अ. अभिनव भारत सारखी संघटना बांधून स्वा. सावरकरांनी अनेक सशस्त्र क्रांतीकारक निर्माण करणे : ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली जखडलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, ते सशस्त्र क्रांतीकारकांच्या कारवायांमुळेच ! स्वा. सावरकरांची धगधगती सशस्त्र क्रांतीच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यास कामी आली, ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे या क्रांतीकारकांविरुद्ध बदनामीकारक वक्तव्ये करणार्‍या व्यक्ती देशद्रोही म्हणायला हव्यात. अभिनव भारत सारखी संघटना बांधून स्वा. सावरकरांनी अनेक सशस्त्र क्रांतीकारक निर्माण केले. या क्रांतीकारकांच्या जहाल आणि हिंसात्मक कारवायांमुळे ब्रिटीश साम्राज्य हादरून गेले, हेच खरे ! देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी अनेक विचारवंत मंडळी एकत्र येऊन सव्वाशे वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली खरी; परंतु त्यामध्ये जहाल आणि मवाळ प्रवृत्तीची माणसे निर्माण झाल्याने जहाल मतवादी लोक त्यातून बाहेर पडले. त्यांचा जहाल गट हिंसात्मक तत्त्वाचा बनला, तर मवाळ गट अहिंसा तत्त्व उराशी बाळगून तेथेच राहिला.

अतीउष्ण तापमानामुळे सैनिकांचे हाल !

     राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवरील सैनिकांना तेथील अतीउष्ण तापमानापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालय कूल जेकेट्स देणार होते; परंतु हे नियोजन अजून कागदावरच आहे. परिणामी ५० अंश सेल्सियसहून अधिकच्या तापमानात सैनिकांची अक्षरशः होरपळ होत आहे. सैनिक किती बिकट परिस्थितीत त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत, हे यावरून लक्षात येते आणि त्यांना जी गोष्ट पुरवली पाहिजे, ती कागदावरच असणे म्हणजे त्याविषयी असंवेदनशील असणे होय. एक माणूस म्हणून तरी माणुसकी या नात्याने सैनिकांना अत्यावश्यक असणार्‍या गोष्टीचा विचार प्राधान्याने झाला असता, तर आजमितीस अतीउष्ण तापमानात सैनिकांना होरपळत रहाण्याची वेळ आली नसती. सैनिक देशाच्या रक्षणासाठी वातावरणाची तमा न बाळगता त्यांचे दायित्व अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत. असे असतांना त्यांची सर्वतोपरी काळजी घेणे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे उत्तरदायित्व नव्हे का ? ५० अंश सेल्सियस ओलांडलेल्या तापमानात काम करण्याचा साधा विचार जरी केला, तरी एक क्षण स्तब्धच व्हायला होते. या ठिकाणी तर डोळ्यांत तेल घालून शत्रूवर दृष्टी ठेवावी लागते.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
खरा पश्‍चात्ताप
आंब्याची चोरी केल्याचा खरा पश्‍चात्ताप झालेल्या एका भावाचा शिक्षा म्हणून तोडलेला हात पुन्हा येणे : भूक लागली म्हणून भावाची वाट पाहून एकाने त्याच्या आंब्याच्या झाडाचा आंबा खाल्ला. नंतर त्याला पश्‍चात्ताप झाला. भाऊ आल्यावर तो भावाला म्हणाला, तुझ्या झाडाचा आंबा मी चोरला. भाऊ म्हणाला, अरे आंबा काय आणि चोर काय ? विसर सगळे. तो ऐकेना. तेव्हा भाऊ म्हणाला, चोरी केलीस ना, मग राजाला सांग. तो राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला, आंबा चोरणारा अपराधी म्हणून मी उभा आहे. राजा म्हणाला, तुला क्षमा केली. तो म्हणाला, असे शक्य नाही. राजा, तू अयोग्यपणे वागलास, तर तुझा राजेपणा नष्ट होईल. राजाने न्यायाधिशाला न्याय देण्यास सांगितले. न्यायाधिशाने त्याला हात तोडण्याची शिक्षा दिली. त्यानुसार त्याचा हात तोडला. नंतर तो भावाकडे आला. भाऊ म्हणाला, जा. रक्त आले आहे. नदीत आंघोळ कर आणि ते धुऊन टाक. त्याने आंघोळीसाठी नदीत बुडी मारली अन् वर आला. वर येऊन पहातो, तर त्याला परत हात आला होता.
(अधिक माहितीसाठी वाचा : सनातन निर्मित ग्रंथ बोधकथा)

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरिता धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग

श्री. रमेश शिंदे
        धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. याचा परिणाम म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली आहे. स्वतंत्र भारतातील हिंदु युवकांच्या मनात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात केलेले बीजारोपण आता अंकुरत असल्याचे दिसत आहे. याच वेळी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुसलमान मदरशांतून, तर ख्रिस्ती चर्च आणि कॉन्व्हेंट यांतून आपापल्या धर्माचे शिक्षण घेतच आहेत. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. त्यातूनच हिंदूंच्या मनात धर्माभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना सिद्ध करता येईल.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)


स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे !

आम्हीही संकटांपुढे हार 
न मानता शेवटपर्यंत झुंजतच राहू !! 
पू. संदीप आळशी
      देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान क्रांतीकार्य करण्यासह अंदमानातील कारागृहात असतांना हिंदु बंदीवानांवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध तुम्ही दिलेला लढा, अतोनात शारीरिक आणि मानसिक यातना सोसूनही देशासाठी मृत्यूसमोर हार न पत्करण्याचा केलेला दृढ निर्धार, अंदमानातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हिंदूंच्या शुद्धीकरणाची आणि संघटनाची केलेली खटपट, हिंदूंतील जातीभेदाविरुद्ध उभारलेला यशस्वी लढा... हे सारेच साहसी, अद्वितीय अन् म्हणूनच अविस्मरणीय आहे.
         आज हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी चळवळी आणि संघटनात्मक कार्य करणारे हिंदु धर्मप्रमी आणि राष्ट्रप्रेमी, धर्म अन् राष्ट्र द्रोह्यांचे आघात सोसत असणारे हिंदु बांधव, समष्टी प्रारब्धाचाच एक भाग म्हणून तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रास भोगत दिवस कंठणारे साधक... अशा आम्हा सार्‍यांनाच तुमचा अभिमान आहे. तुमचाच ध्येयमंत्र आम्ही पुन:पुन्हा आळवू आणि शेवटच्या श्‍वासापर्यंत झुंजत राहू...

सनातनच्या शिवमोग्गा येथील साधिका सौ. ममता राव आणि सौ. नागरत्ना के. यांनी गाठला ६२ टक्के आध्यात्मिक स्तर !

डावीकडून सौ. ममता राव (वय ७० वर्षे), ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले
श्री. रामानंद गौडा (यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला) आणि सौ. नागरत्ना के. (वय ७० वर्षे)

भावजागृतीची अनुभूती देणारा प.पू. गुरुदेवांचा सत्संग !

       १३.९.२०१५ या दिवशी संध्याकाळी ६.३० वाजता सुप्रियाताई आमचा साधनेचा आढावा घेत होती. अकस्मात् तिने तो थोडक्यात घेतला आणि आम्हाला आता आपल्याला पू. बिंदाताईंच्या आढाव्याला जायचे आहे, असे सांगितले. आढावा घेण्याच्या खोलीची सिद्धता चालू होती; म्हणून थोडा वेळ ध्यानमंदिरात बसण्यास सांगण्यात आले.
१. ध्यानमंदिरात बसल्यावर 
रडू येऊन देवाला आळवले जाणे
        ध्यानमंदिरात गेल्यावर मला अकस्मात् रडायला आले आणि माझ्याकडून देवाला पुष्कळ आळवले जाऊ लागले. मी नेमके काय सांगत आहे ?, हेच मलाही समजत नव्हते. मला हेची दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा या ओळी आठवायला लागल्या. ही अवस्था ५ ते ७ मिनिटे टिकून होती.

धर्मरथात जीवनाडीपट्टीचे आगमन होण्याविषयी आणि नाडीपट्टीचे पूजन करतांना आलेल्या अनुभूती

१. प्रत्यक्ष देव आणि महर्षि हे मनाच्या इच्छा 
पूर्ण करत आहेत, याविषयी आलेल्या अनुभूती 
ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने असलेल्या धर्मरथात डावीकडून
पू. (सौ.) अंजली गाडगीळ, सौ. ॐ पवित्रा (पू. डॉ. ॐ उलगनाथन यांच्या पत्नी)
महर्षि नाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन आणि त्यांची कन्या कु. ॐ अक्षरा
१ अ. प.पू डॉक्टर आणि महर्षि यांची पुष्कळ आठवण येणे अन् मंगळुरू आश्रमामध्ये जीवनाडीपट्टीचे आगमन होणार असल्याने सर्वांना बोलावले असल्याचा निरोप येणे : १५.३.२०१६ या दिवशी सकाळी १० वाजता मी धर्मरथामध्ये नामजप करत होतो. तेव्हा प.पू. डॉक्टर आणि महर्षि यांची मला पुष्कळ आठवण आली. त्या वेळी मला आकाशातून महर्षि धर्मरथामध्ये आले अन् धर्मरथातील प्रत्येक ग्रंथामध्ये त्यांचे अस्तित्व विलीन झाले, असे वाटले. त्याच दिवशी संध्याकाळी मंगळुरू सेवाकेंद्रामध्ये जीवनाडीपट्टीचे आगमन होणार आहे आणि सर्वांना बोलावले आहे, असा निरोप आला. त्या वेळी मला फार आनंद झाला. माझा नामजप आपोआप चालू झाला. प्रत्यक्ष देव आणि महर्षि हे आमच्या इच्छा पूर्ण करत आहेत, याची मला अनुभूती आली.

कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करणारा आणि श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणारा ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा विरार येथील चि. रुद्र गायकवाड (वय ५ वर्षे) !

चि. रुद्र गायकवाड
      मे मासाच्या सुटीत रुद्र (भावाचा मुलगा) घरी आला असतांना मला काही दिवस त्याच्या सहवासात रहायला मिळाले. तेव्हा त्याचे सतत श्रीकृष्णाशी अनुसंधान कसे टिकून असते ? आणि अन्य काही सूत्रे त्याच्याकडून शिकता आली.
१. श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणे
१ अ. श्रीकृष्णबाप्पा गाडीच्या वर बसला असून त्याच्या डोक्यावर शेषनागाने फणा धरला आहे, असे दिसत असल्याचे रुद्रने सांगणे : एकदा आम्ही प्रवास करत असतांना रुद्र गाडीत खिडकीच्या बाजूला बसला होता आणि तो बाहेरून जाणार्‍या अन्य गाड्यांविषयी बोलत होता. एकदा तो मागून येणारी बस पाहून ती गणपती बाप्पाची गाडी असून आपली कृष्णबाप्पाची आहे, असे म्हणाला. मी त्याला आपल्या गाडीत कृष्ण कुठे आहे ?, असे विचारल्यावर त्याने कृष्ण गाडीच्या वर असल्याचेे सांगितले. मी त्याला विचारले, कृष्णबाप्पाला ऊन लागेल, तर त्याला खाली बोलवूया का ? तेव्हा तो म्हणाला नको. त्याला ऊन कसे लागेल ? त्याच्या डोक्यावर शेषनागाने फणा धरला आहे.

पू. आनंदी पाटीलआजी यांच्याविषयी सौ. माधवी माणिक मोहिते यांना जाणवलेेली सूत्रे

१. पू. आनंदी पाटीलआजी आमच्यासमोर आल्यावर मला पू. पेठेआजीच आल्यासारखे जाणवले.
२. त्यांच्या तोंडवळ्याकडे बघून भाव जागृत झाला आणि त्यांच्याकडे पाहून आनंद वाटत होता.
३. पू. आजींना बघितल्यानंतर त्यांना मिठीच मारावी, असे वाटत होते.
४. त्यांचे वागणे अत्यंत साधे असून त्यांच्या तोंडवळ्यावरील तेज पुष्कळ जाणवत होते.
- सौ. माधवी माणिक मोहिते (साधिका), कराड, जिल्हा सातारा. (८.२.२०१६)

पू. पाटीलआजींची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यातील संतत्वाविषयी एका साधकाला मिळालेली पूर्वसूचना

१. वयाच्या ९५ वर्षीही 
तरुणांना लाजवेल, असा उत्साह असणे
       २.२.२०१६ या दिवशी अनुमाने १५ पाहुणे रामनाथी (गोवा) येथे आश्रमदर्शनासाठी आले होते. त्यांना महाप्रसादासाठी नेण्याची सेवा मला मिळाली होती. त्या वेळी मी उत्तरदायी साधकांच्या सूचनेनुसार पाहुण्यांना भेटलो आणि त्यांपैकी ९५ वर्षीय पू. (श्रीमती) पाटीलआजींना (पू. आजींना) म्हटले, दुसर्‍या मजल्यावरील भोजन कक्षात जाण्यासाठी चारचाकी गाडीची व्यवस्था करूया. त्यावर पू. आजी मला म्हणाल्या, मी पायर्‍या चढूनच वर येते.

प्रतिदिन वाचा सदर...!

रामनाथी आश्रमात आलेली 
अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे 
रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
 १. अनुभूती
       एक साधिका आश्रमातील खोलीची सूक्ष्मातून वास्तुशुद्धी करून गेल्याचे स्वप्नात दिसणे : रामनाथी आश्रमात आम्ही रात्री १२ वाजता पोचलो. एक वाजेपर्यंत सर्व आटोपून ताईने आमची खोली दाखवली. झोपल्यावर मला स्वप्नात असे दिसले, एक साधिका खोलीत आली आणि वास्तुशुद्धी करून गेली. मी स्वप्नातच माझ्या बहिणीला विचारले, दार बंद असतांना ताई कशी आली ? तिने सांगितले आपण दमलो आहोत; म्हणून सूक्ष्मातून एक ताई वास्तुशुद्धी करून गेली.

पू. आनंदी पाटीलआजी प.पू. फडकेआजींच्या खोलीत आल्यावर जाणवलेली सूत्रे

१. पू. पाटीलआजी आल्यावर 
वातावरण चैतन्यमय होणे 
पू. पाटीलआजी
        १७.३.२०१६ या दिवशी पू. पाटीलआजी प.पू. फडकेआजींची खोली पहाण्यासाठी आल्या होत्या. त्या खोलीत येताच वातावरण चैतन्यमय झाले. प.पू. फडकेआजीही त्यांची वाट पहात असल्याचे जाणवले.
२. पू. पाटीलआजी प.पू. फडकेआजी आणि 
प.पू. डॉक्टर यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधत 
असणे अन् त्या वेळी उपस्थित सर्वांचाच भाव जागृत होणे
       प.पू. फडकेआजी आणि प.पू. डॉक्टर यांची छायाचित्रे असलेल्या पटलासमोर पू. आजींना बसण्यासाठी आसंदी दिली. त्या वेळी त्या पुष्कळ वेळ दोघांशीही सूक्ष्मातून संवाद साधत होत्या. प.पू. फडकेआजींशी त्या बोलत असतांना त्यांना त्यांच्या नातीने (सौ. दीपा म्हात्रे) विचारले, आजी काय म्हणाल्या ? पू. पाटीलआजी म्हणाल्या, आजींना पुष्कळ आनंद झाला असून त्या हसत आहेत आणि मलासुद्धा प.पू. फडकेआजींना भेटून पुष्कळ आनंद झाला आहे. पुष्कळ वेळ दोन्ही संत एकमेकांशी सूक्ष्मातून संवाद साधत होते. पू. पाटीलआजींनी प.पू. फडकेआजींना स्थुलातून कधीही पाहिले नाही; परंतु त्यांची अनेक वर्षांची ओळख असल्याप्रमाणे समोर प.पू. फडकेआजी आहेतच, अशा भावाने त्या बोलत होत्या. पू. पाटीलआजी मध्ये मध्ये प.पू. डॉक्टरांशीही बोलत होत्या. त्या वेळी उपस्थित सर्वांचाच भाव जागृत झाला. 

महर्षींनी सांगितलेला सध्याचा नामजप आणि प.पू. डॉक्टरांचे अमृतमहोत्सवी वर्ष यांच्या संबंधाविषयी सुचलेली सूत्रे

श्री. विक्रम विनय भावे
१. २३.५.२०१६ या दिवशी सकाळी नामजप करतांना मनात विचार आला, महर्षींनी सांगितलेला सध्याचा ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा नामजप आणि प.पू. डॉ. आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष यांचा काय संबंध असेल ? त्या वेळी अंतर्मनातून उत्तर आले, प.पू. डॉक्टर हे कालातीत आहेत आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच त्यांचा अवतार आहे. त्यामुळे ते सध्याच्या काळाला आवश्यक असे तत्त्वच आहेत. थोडक्यात म्हणजे ते तत्त्वरूप झाले आहेत. त्यामुळे सध्या महर्षींनी सांगितलेला वरील नामजप त्या तत्त्वाचाच जप आहे.
२. जसे गुरुपौर्णिमेस गुरुतत्त्व किंवा गणेशचतुर्थीला गणेशतत्त्व सहस्रपटींनी कार्यरत असते, तसे प.पू. डॉक्टरांच्या जन्मदिनी त्यांचे तत्त्व सहस्रपटीने कार्यरत असेल. त्यामुळे प.पू. डॉक्टरांच्या वाढदिवसाला वरील नामजप अधिकाधिक केल्यास त्याचा सहस्रपटीने लाभ होईल.
३. नंतर मनात प्रश्‍न आला, आजवर प.पू. डॉक्टरांचे जे वाढदिवस झाले, त्या दिवशी असे काही नसावे का ? त्यावर अंतर्मनातून उत्तर आले, या वाढदिवसापासून प.पू. डॉक्टर तत्त्वरूपाने प्रकट होत असल्याने या वाढदिवसाचे महत्त्व सर्वाधिक आहे. या दिवसाचा सर्वांनी अधिकाधिक लाभ करून घ्यायला हवा.
- श्री. विक्रम विनय भावे, मुंबई (२३.५.२०१६)

एका साधिकेला घरातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राविषयी आलेल्या अनुभूती

सौ. अनन्या सेठी
१. प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रावर दैवी कण येणे : साधारण एप्रिल २०१३ पासून प.पू. डॉक्टरांचे एक छायाचित्र आमच्या घरातील ध्यानमंदिरात आहे. त्यावर (प.पू. डॉक्टरांचे हस्ताक्षर असलेल्या ठिकाणी) दैवी कण आले आहेत.
२. काही दिवसांपासून मला प.पू. डॉक्टरांचे हे छायाचित्र कधी निळसर, तर कधी गुलाबी दिसते.
३. प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राच्या मागच्या बाजूला डाग पडणे :
११.४.२०१४ या दिवशी मला त्या छायाचित्राच्या मागच्या बाजूला एक गडद आणि एक फिका असे दोन तपकिरी रंगाचे मोठे डाग पडल्याचे दिसले. यापूर्वी ते नव्हते.
- सौ. अनन्या सेठी, चंदीगड (१२.४.२०१४)

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची वैशिष्ट्ये

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. भर उन्हाळ्यात चेहरा न काळवंडणे : भर उन्हाळ्यात ४८ ते ५३ अंश सेंटिग्रेड तपमान असतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ ४ साधकांसोबत उत्तर भारतात ठिकठिकाणी गेल्या. उन्हात फिरून बरोबरच्या साधकांचे चेहरे काळवंडले; पण पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चेहर्‍याचा रंग जराही पालटला नाही. त्या लडाखला गेल्या, तेव्हा तेथील तपमान ३ अंश सेंटिग्रेड, तर दिल्ली येथील तपमान ४८ अंश सेंटिग्रेड होते. अशा तापमानात राहून केलेल्या खडतर साधनेमुळे त्यांचा चेहरा अधिकच उजळलेला दिसतो.
२. साडी न चुरगळणे : ऊठ-बस करून इतरांच्या साड्या चुरगळतात; पण पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची त्याच प्रकारची साडी चुरगळत नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.५.२०१६)

नाडीभविष्यात सांगितल्याप्रमाणे सनातन संस्थेने सर्व कृती करण्याचे कारण

       नाडीभविष्यात सांगितलेले विधी त्या त्या ठिकाणी जाऊन करण्यासाठी साधकांना महिनोंमहिने सारखा प्रवास करावा लागतो. त्यासाठी साधकांचा वेळ जातो, तसेच धनही व्यय (खर्च) करावे लागते. असे असले, तरी नाडीभविष्यात सांगितलेले सर्व सनातन संस्था का करते ?, असे कोणालाही वाटेल. याचे उत्तर असे आहे की, ज्या प्रकारचे ज्ञान नाडीभविष्यातून मिळते, ते इतके अपूर्व आहे की, त्यासाठी कोणी कितीही शुल्क मागितले असते, तरी आपण ते दिले असते !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
        (प.पू. डॉक्टरांचे वरील लिखाण वाचून भावजागृती झाली. खरंच, प.पू. डॉक्टरांनाच ज्ञानाचे खरे मोल कळते. आपल्याला हे लक्षात येऊ शकत नाही. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे तीर्थाटन करतांना मला नेहमी वाटायचे, माझ्याकडून कधीही गुरुधनाचा व्यय होऊ नये. प.पू. डॉक्टरांच्या या उत्तराने मनातील हा विचारही आता संपून गेला. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक)

श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर चुकांचा सत्संग घेत आहेत, असा भाव ठेवल्यामुळे बालसाधिकांना श्रीकृष्णाच्या मांडीवर बसल्याचे जाणवणे

        ४.१२.२०१५ या दिवशी सायंकाळी आमची सेवा झाल्यानंतर आम्ही सेवेत झालेल्या चुकांचा सत्संग घेत होतो. तेव्हा आम्ही साक्षात् श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर आमचा आढावा घेत आहेत, असा भाव ठेवला. त्या वेळी आम्हाला आम्ही सर्व जणी श्रीकृष्णाच्या मांडीवर बसलो आहोत, असे जाणवले. तेव्हा आम्ही श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
- कु. कनक मिश्रा, कु. अनास्तासिया वाले, कु. सौख्यदा शिंदे, कु. मनुश्री साने, कु. संजना कुलकर्णी आणि कु. अमृता मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (४.१२.२०१५)

वेदपठणात उच्चाराचे महत्त्व

प.पू. परशराम पांडे
       वेद जसेच्या तसे का म्हणावेत ? त्यांचा उच्चार कुठलाही फरक न करता करतात. त्यामुळे ते तसेच रहातात. ते तसेच म्हटले, तर परिणाम होतो, अन्यथा परिणाम होत नाही.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.११.२०१४)

जशी व्यास महर्षींप्रती कृतज्ञता म्हणून आपण प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो, तसा प.पू. डॉक्टरांचा वाढदिवसही आपण प्रतिवर्षी साजरा करायचा आहे; कारण हा तर कलियुगात झालेला श्रीमत् नारायणाचा प्रत्यक्ष अवतार आहे, असे महर्षींनी सांगणे आणि त्यामागील कार्यकारणभाव

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
१. प.पू. डॉक्टर म्हणजे कलियुगातील नारायणाचा अवतारच आहेत आणि या अवताराची प्रसिद्धी करण्याचे कार्य शिव-पार्वतीने आमच्यावर सोपवले आहे, असे महर्षींनी सांगणे : हिमाचल प्रदेशमधील मनाली येथून कांगडा येथे जात असतांना (हा प्रवास संपूर्णतः पहाडी क्षेत्रातून आहे आणि तो जवळजवळ ७ - ८ घंट्यांचा आहे. - सौ. गाडगीळ) महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले की, जशी व्यास महर्षींप्रती कृतज्ञता म्हणून आपण प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो, तसा प.पू. डॉक्टरांचा वाढदिवस आता येथून पुढे आपण प्रतिवर्षी साजरा करायचा आहे; कारण व्यास महर्षींचे स्मरण म्हणून आपण जर गुरुपौर्णिमा साजरी करतो, तर प.पू. डॉक्टर कलियुगात झालेला स्वयं नारायणाचा अवतार असल्याने त्यासाठी आपण किती केले, तरी ते अल्पच आहे. या अवताराची प्रसिद्धी आता आम्हीच (महर्षि) करणार आहोत. हे कार्य स्वयं शिव-पार्वतीने आमच्यावर सोपवले आहे आणि त्यासाठीच हे नाडीशास्त्र भूतलावर आले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातचा दुसरा विशेष रंगीत विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक : ३१ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
या अंकात अनुभवा !
 • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या धार्मिक विधींचा सविस्तर वृत्तांत
 • सर्व विधींचे छायाचित्रात्मक सादरीकरण
        यांसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण
आपली प्रत आजच नोंदवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २९ मे
या दिवशी सायं. ५ वाजेपर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.

भाषाशुद्धीचे व्रत

मराठी भाषेच्या शुद्धीची 
चळवळ पुढे नेणारा सनातनचा ग्रंथ !
 • भाषाशुद्धीचा इतिहास आणि भाषाशुद्धीचे महत्त्व
 • भाषाशुद्धीच्या विरोधकांच्या विविध मतांचे खंडण
 • परकीय शब्दांमुळे मराठी भाषेतील शब्द नाहीसे होण्याची उदाहरणे
 • भाषाशुद्धीची चळवळ चालू करण्यामागची कारणे आणि तिची आवश्यकता
याव्यतिरिक्त मराठी 
भाषेविषयी पुढील ग्रंथही उपलब्ध...
 • मराठीचे मारेकरी
 • मराठीला जिवंत ठेवा !
 • मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा
 • तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !
 • मराठी भाषेची सात्त्विकता स्पष्ट करणारे ज्ञान आणि सूक्ष्म-चित्रे
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा 
आता SanatanShop.com वर उपलब्ध !

सर्वत्रच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना

अपघाताचा दिवसेंदिवस उंचावणारा आलेख लक्षात घेऊन 
वाहनांच्या संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा !
१. अनेकदा जाणीव करून देऊनही
 वाहनांच्या संदर्भातील नियमांचे 
उल्लंघन करणारे दायित्वशून्य कार्यकर्ते !
       आतापर्यंत अनेकदा हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय सत्संगात वाहनांच्या संदर्भातील नियम पाळण्याविषयी चुका घेण्यात आल्या आहेत. आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत असल्याने वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असतांनाही काही कार्यकर्त्यांकडून वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अन्य कागदपत्रे समवेत न बाळगणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणे, तर चारचाकी चालवतांना सीटबेल्ट न वापरणे, भ्रमणभाषवर बोलत, तसेच अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी गंभीर चुका वारंवार होत आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत काही जणांना दंडही भरावा लागला आहे.
       देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही व साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे. तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल !
- डॉ. दुर्गेश सामंत

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

       आपणाला असे वाटते का की, मुसलमान आणि ख्रिस्ती सर्वधर्म समभाव मानतात ? जर मानत असतील, तर धर्मांतरे का करवतात ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्रगीताचा अवमान 
करणारे राष्ट्रप्रेमी असू शकतात का ?
       कोलकात्यात एका कार्यक्रमात राष्ट्रगीत वाजवण्यात येत होते, तेव्हा व्यासपिठावर उपस्थित जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला दूरभाषवर संभाषण करत होते. याविषयी पत्रकारांच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, असे वाद होतच असतात.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Rashtrageet ke apmanpar J&K ke purv CM Farooq Abdullahne patrakarose kaha, Aise vivad hote rehte hain !
Aise log Rashtrapremi kaise ho sakte hai ?
जागो ! : राष्ट्रगीत के अपमान पर जम्मू-कश्मीर के पूर्व सीएम् फारुक अब्दुल्ला ने पत्रकारों से कहा, ऐसे विवाद होते रहते हैं !
ऐसे लोग राष्ट्रप्रेमी कैसे हो सकते हैं ?

साधकांना महत्त्वाची सूचना

अमृतमहोत्सवाच्या दिवशी सर्व साधकांनी प.पू. डॉक्टरांच्या 
छायाचित्रासमोर बसून १०८ वेळा श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले....
जय गुरुदेव ।, असा जप करायचा आहे, अशी महर्षींनी आज्ञा देणे
         अमृतमहोत्सवाच्या दिवशी (वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६)) सोहळ्याला सर्व साधक उपस्थित राहू शकणार नाहीत; परंतु या दिवशी प्रत्येक साधकाने घरी प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र ठेवून त्यापुढे बसून दिवसभरातील कोणत्याही वेळी श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले... जय गुरुदेव ।, असा जप १०८ वेळा करायचा आहे. पूजेचे फार काही अवडंबर न माजवता केवळ नामजप करायचा आहे; कारण कलियुगात नामस्मरण करणे हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे. अगदीच हवे असल्यास एखादी उदबत्ती अथवा तुपाचा दिवा प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर लावू शकतो. नैवेद्य इत्यादी दाखवण्याची काहीही आवश्यकता नाही. असे केलेले प.पू. डॉक्टरांना आवडणारही नाही.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, कांगडा, हिमाचल प्रदेश (१८.५.२०१६, सकाळी ९.३०)

साधकांना सूचना

साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत 
महोत्सव हा सामाजिक सोहळा नसून एक धार्मिक 
विधी आहे, हे लक्षात घ्या आणि साधनेला प्राधान्य द्या !
      परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या २९ मे या दिवशी होणार्‍या अमृत महोत्सवाविषयी अनेक साधकांना उत्सुकता आहे. त्यामुळे साधकांना हा अमृत महोत्सव प्रत्यक्ष अनुभवण्याची ओढ निर्माण होणे साहजिक आहे; मात्र साधकांनी स्वेच्छेपेक्षा ईश्‍वरेच्छा सर्वश्रेष्ठ आहे, हे लक्षात घ्यावे. या अमृत महोत्सवाविषयी महर्षींनीच असे सांगितले आहे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव हा सामाजिक सोहळा नसून एक धार्मिक विधी आहे. त्यामुळे या विधीतील चैतन्य ग्रहण करण्यासाठी साधकांनी या दिवशी अधिकाधिक भावपूर्णरित्या साधना म्हणजेच प्रार्थना आणि नामजप करावा. महर्षींच्या आज्ञेप्रमाणे साधना केल्यास ईश्‍वराची अधिकाधिक कृपा होईल, हे लक्षात घेऊन या दिवशी साधकांनी घरी किंवा ते ज्या ठिकाणी सेवा करत आहेत, तेथे राहून अधिकाधिक साधना करावी.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२४.५.२०१६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खाजगी शिकवण्या नव्हत्या. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

भांडे स्वच्छ हवे 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
      तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे.
भावार्थ : तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा, याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. भांड्यात आधीचे काही खरकटे राहता कामा नये म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचा शोध घेऊ नये !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार 
योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

राममंदिर कोण उभारणार ?

संपादकीय
      राममंदिराचे सूत्र सोडलेले नाही, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा नुकतेच कुठेतरी म्हणाले. निवडणूक संपल्यावर भाजप राममंदिराचे सूत्र विसरला, असा समज समाजात दृढ झाल्यामुळे शहा यांना वरीलप्रमाणे विधान करून हिंदूंना आश्‍वस्त करावे लागले असावे. राममंदिराचे सूत्र भाजपला सोडता येणार नाही; कारण ते त्यांच्या निवडणूक घोषणापत्रातील सूत्र होते. केंद्रातील भाजपच्या सत्तेला परवाच दोन वर्षे पूर्ण झाली. अद्याप तीन वर्षांचा कालावधी त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांनी राममंदिराचे सूत्र पूर्ण करण्याविषयी आशावादी असणे स्वाभाविक आहे. आसाम राज्याची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn