Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शस्त्रांद्वारे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट !

हिंदूंनो, या देशात सरकार तुमचे रक्षण करत नाही 
आणि तुम्हालाही स्वतःचे रक्षण करू देत नाही, हे लक्षात 
घ्या आणि स्वरक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
       अयोध्या - येथे बजरंग दलाकडून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्याचे शिबीर आयोजित केल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सहभागी कार्यकर्ते हाती बंदूक घेऊन प्रशिक्षण घेत असून प्रतिस्पर्ध्यांना इस्लामी वेशात दाखवण्यात आले होते. यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्याविषयी आयोजक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी या कार्यक्रमात काहीच चुकीचे नसल्याचे सांगत पाठिंबा दिला होता.
हिंदूंनो, केवळ शिवसेनाच असे 
म्हणण्याचे धाडस करते, हे लक्षात घ्या !
आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी 
हातात शस्त्रे घ्या ! - शिवसेना
        या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत म्हणाले, देशामध्ये जैश-ए-महंमद, तोयबा यांची प्रशिक्षण केंद्रे चालतात. त्यासाठी ते काय शासनाची अनुमती घेतात ? जर आपले लोक त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी हातात शस्त्रे घेत असतील, तर त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला ? हे केवळ निवडणुकीचे सूत्र आहे. उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी आतंकवादाविरुद्ध लढायचे असेल, तर हातात शस्त्रेे घ्यावी लागतील, असे म्हटले असून ते योग्य आहे.
(म्हणे) आम्हालाही शस्त्र चालवण्याच्या 
प्रशिक्षणाची अनुमती हवी ! - मुसलमान धर्मगुरूंची मागणी
        उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी स्वरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूत्राचे समर्थन केल्याचे पाहून मुसलमान युवकांनाही शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची अनुमती मिळण्याची मागणी केली आहे. अब्बास यांच्या म्हणण्यानुसार देशातील दंगलीत मुसलमानांनाच अधिक हानी सोसावी लागते. यासाठी त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. (चोरांच्या उलट्या बोंबा ! देशात प्रथम धर्मांधाकडून दंगली करण्यात येतात आणि त्यात सर्वाधिक हिंदूंच भरडले जातात; म्हणूनच हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अधिक आवश्यकता आहे ! - संपादक)

(म्हणे) स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानात समाजवाद !

डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जावईशोध
        पुणे, २५ मे (वार्ता.) - संत हे समाजवादी असू शकतात, याचे उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांनी अमेरिकेत जाऊन बुद्धवाद, खोटे हिंदुत्व आणि वैदिक हिंदु धर्म मांडला. त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानात समाजवाद दिसून येईल, असे अभ्यासशून्य प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. (संत हे समाजवादी नाहीत, तर हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान एवढे व्यापक आहे की, त्यात व्यापक अर्थाने समानता आणि मानवता आहे. हिंदु धर्म अनादी अनंत आहे आणि समाजवाद काही दशकांपूर्वी निर्माण झाला आहे. वरील प्रकारे हास्यास्पद विधाने करून सबनीस स्वतःचे हसे करून घेत आहेत ! - संपादक) साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुति मंदिर यांच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये पूर्व भागातील भारत कालचा, आजचा आणि उद्याचा या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, राष्ट्र्रवादीचे नगरसेवक रवींद्र माळवदकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उंड्री (जिल्हा पुणे) येथील शाळेत शिक्षण अधिकार्‍यास प्रतिबंध करणार्‍या रखवालदारांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

खाजगी शाळांचा वाढता उद्दामपणा !
       पुणे, २५ मे - येथील उंड्रीतील विबग्योर शाळेविषयी काही पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीनंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिक्षण अधिकार्‍याला दोन रखवालदारांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखून आत येण्यास प्रतिबंध केला. पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) मुश्ताक शेख यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तनवीर आणि केवल या रखवालदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट केला आहे. (या प्रकरणी रखवालदारांचा करविता धनी कोण, हे शोधणे महत्त्वाचे आहे. - संपादक)
१. शाळेतील काही पालकांच्या तक्रारी आल्यानंतर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मुश्ताक शेख यांना शाळेची पाहणी करण्याची सूचना दिली होती. त्या वेळी जाधव यांनी शेख यांना पालकांनी प्रवेश शुल्कापोटी दिलेले धनादेश आणि त्याची पोचपावती पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
२. पुढील कारवाई करण्यासाठी शेख २० मे या दिवशी दुपारी शाळेत गेले. त्या वेळी तेथे असलेल्या रखवालदारांनी त्यांना प्रतिबंध केला.

अरुणाचल प्रदेश दाखवला चीनचा भाग

  • घोडचुकांना किरकोळ चुका म्हणणार्‍या बालभारतीच्या प्रमुखांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी अल्पच आहे. असे पुस्तक मंडळ दर्जेदार पुस्तके काय निर्माण करणार. या चुकांसाठी उत्तरदायी असणार्‍यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यासच पुढे अशा चुका करण्याचे कुणी धाडस करणार नाही ! 
  • महाराष्ट्रात बालभारतीच्या सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अनेक घोडचुका
(म्हणे) चुका किरकोळ आहेत ! - बालभारतीचे 
राष्ट्राभिमानशून्य प्रमुख मगर यांचे संतापजनक स्पष्टीकरण
         पुणे - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचा (बालभारतीचा) भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अनेक घोडचुका केल्याचे लक्षात आले आहे.
       पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नाही, तर चीनचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र प्रदेश दाखवण्यात आला आहे. याचसमवेत या पुस्तकातील नकाशात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा चक्क पाण्याच्या खाली दाखवण्यात आल्या आहेत, तसेच भारताची राजधानी देहली ज्या यमुना नदीच्या काठावर वसली आहे, त्या तिरावर न दाखवता तिच्याविरुद्ध असलेल्या तीरावर दाखवण्यात आली आहे.
        या चुकांविषयी बालभारतीचे प्रमुख श्री. सुनील मगर यांनी सांगितले की, या चुका किरकोळ स्वरूपाच्या असून त्यासाठी पुस्तके परत मागवण्याची आवश्यकता नाही.

फलकप्रदर्शनाद्वारे इस्लामचा कथित उदारमतवाद सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न

      पुणे, २५ मे - आज संपूर्ण विश्‍व जिहादी आतंकवादाचे चटके सोसत आहे. सर्व विश्‍व इस्लाममय करू पहाणार्‍या इसिसने निरपराध्यांच्या हत्येचा सपाटा लावला आहे. असे असतांना पुण्यात एका फलक प्रदर्शनाच्या माध्यमातून मात्र इस्लामचा कथित उदारमतवाद लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. येथील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीत लावलेल्या फलक प्रदर्शनाच्या माध्यमातून इस्लाम धर्म आणि कुराण हे मानवतावादी आणि उदारमतवादी असल्याचे दाखवण्यात आले. विशेष म्हणजे इस्लामच्या संदर्भातील पुस्तकही प्रदर्शन पहाणार्‍यांना भेट देण्यात येत असल्याचे अनुभवास आले.
फ्लेक्सच्या माध्यमातून 
सांगण्यात आलेली सूत्रे
१. इस्लाम धर्मात सर्वांना समान वागणूक देण्यात आली आहे. सर्व मानव समान आहेत. अरब आणि अरबेतर, तसेच रंगाने पांढरे-काळे असलेले सर्व मानव समान आहेत. (असे आहे, तर मूर्तीपूजक, गोपूजक हिंदूंचा द्वेष का होतो ? - संपादक)

नेल्सन मंडेलांना भारतरत्न; मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही ?

  • याविषयी केंद्र शासन उत्तर देईल का ?
  • अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांचा खणखणीत प्रश्‍न
        पुणे, २५ मे - दक्षिण आफ्रिकेत वंशविरोधी लढा देणारे नेेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो; परंतु स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हा पुरस्कार का दिला जात नाही, असा खणखणीत प्रश्‍न शिवसेना उपनेते, अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. शिवसेना कोथरूड मतदारसंघाच्या बाणेर विभागाच्या वतीने शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्ण पुण्यतिथी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वाहा या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक श्याम देशपांडे, कार्यक्रमाचे संयोजक गणेश कळमकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पाकने त्याच्या नौदलाच्या ५ अधिकार्‍यांना फाशीची शिक्षा ठोठावली

       इस्लामाबाद - इसिसशी संबंध असणार्‍या पाकिस्तानच्या नौदलातील ५ अधिकार्‍यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकी नौदलाच्या इंधन भरणार्‍या नौकांपैकी एका नौकेवर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तानी युद्धनौका पळवून नेण्याचा कट त्यांनी रचला होता, असा आरोप आहे.

(म्हणे) मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय देण्यासाठी भाजपच्या विरोधात कायदेशीर लढा देऊ !

हिंदु आतंकवादचा बागलबुवा निर्माण करणार्‍या 
काँग्रेसचे संजय निरुपम यांचे हिंदुद्वेषी वक्तव्य !
       मुंबई, २५ मे - जेव्हापासून मोदी शासन सत्तेत आले, तेव्हापासून आतंकवाद या विषयावर राजकारण होत आहे. तत्कालीन आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचे नाव भाजपचे नेते बदनाम करत आहेत. करकरे यांनी कर्नल पुरोहित यांच्या घरी स्फोटके लपवली, असा खोटा आरोप भाजप आणि संघवाले करत आहेत. आम्ही मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय देण्यासाठी भाजपच्या विरोधात कायदेशीर लढा देऊ. (यावरून निरुपम राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि न्याययंत्रणा यांच्याविषयी अविश्‍वासच दर्शवला आहे ! - संपादक) राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या माध्यमातून मोदी शासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जे षड्यंत्र करत आहेत, त्यात आम्ही त्यांना यश मिळू देणार नाही. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाच्या विरोधात काँग्रेस न्यायालयात जाईल, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले.

महाराष्ट्रात मद्यबंदीला प्रारंभ कधी होणार ? - डॉ. अभय बंग

शासनाने याचे उत्तर द्यावे !
        संभाजीनगर, २५ मे - तमिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच पहिल्या दिवशी मद्यविक्रीची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात मद्यबंदीला कधी प्रारंभ कधी होणार, असा प्रश्‍न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रानेही पुढील ३ वर्षांत क्रमश: मद्यबंदी लागू करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
        ते पुढे म्हणाले की, प्रथम बिहारमध्ये आणि नंतर तमिळनाडूमध्ये मद्यबंदी झाली. आता महाराष्ट्रात कधी हा प्रश्‍न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तमिळनाडूत मद्याचा वापर आणि त्यापासून राज्य शासनाला मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे. प्रत्येक राज्य शासनाने मद्याच्या करावर पाणी सोडणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानेही या रक्तलांच्छित कराचा लोभ सोडावा. राज्यातील नागरिकांना पाणी हवे असून मद्य नको आहे.
महाराष्ट्र्राचे मद्यराष्ट्र झाले !
       महाराष्ट्र्राचे मद्यराष्ट्र झाल्याने आणि येथील जनता ४० सहस्र कोटी रुपयांचे वार्षिक मद्यपान करत असल्याने शासनाला या रोगावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचेही बंग यांनी म्हटले आहे. (आतातरी शासनाचे डोळे उघडतील का ? - संपादक)

महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या परीक्षेचा निकाल ८६.६० टक्के : उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक

       पुणे, २५ मे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल २५ मे या दिवशी जाहीर झाला. परिक्षेला बसलेल्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६.६० टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी परीक्षेत बाजी मारली असून एकूण ९०.५० टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण, तर ८३.४६ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ९ जुलै या दिवशी घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निकालाची वैशिष्ट्ये
१. गेल्या वर्षीचा निकाल ९१.२६ टक्के इतका होता, तर यंदाच्या वर्षीचा निकाल ४.६६ टक्क्यांनी घसरला आहे.

हिंदी चित्रपटातील अभिनेत्यांकडून खंडणी वसूल करण्याचा इसिसचा विचार

हिंदी चित्रपटसृष्टीचाही आतंकवादाशी संबंध असल्याने 
चित्रपटांमागील भयाण वास्तव भारतीय आतातरी लक्षात घेतील का ? 
'जनूद-ऊल्-खलिफा-हिंद 'या संघटनेतील आतंकवाद्याचे विधान 
     मुंबई - आतंकवादी कारवायांना निधी उपलब्ध होण्यासाठी इसिसशी संलग्न असलेल्या 'जनूद-ऊल्-खलिफा-हिंद' या भारतातील संघटनेने हिंदी चित्रपटातील अभिनेत्यांकडून खंडणी वसूल करण्याचा विचार चालू असल्याचे सांगितले आहे. संघटनेच्या रिझवान नवाझुद्दीन उपाख्य खलिद आणि मुदब्बीर शेख या दोन आतंकवाद्यांना सुरक्षायंत्रणांनी पकडल्यावर त्यांच्या चौकशीतून हे उघड झाले. 

पुणे येथे 'इसिस'च्या संपर्कातील ४ युवक आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात

'इसिस'ने पोखरलेला भारत ! 
     
     पुणे, २५ मे - आतंकवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाने 'इसिस' या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या ४ युवकांना पुण्यातून कह्यात घेतले आहे. पथकाचे साहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २५ मे या दिवशी सकाळी २ जणांना कह्यात घेतले. त्यानंतर आणखी दोघांना दुपारी सापळा रचून कह्यात घेण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. तूर्तास या चौघांना कह्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (आतंकवादविरोधी पथकाने या सर्वांचे समुपदेशन करून सोडल्यास आश्‍चर्य ते काय ? - संपादक)

बीड जिल्हा बँकेच्या आर्थिक घोटाळ्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे आगीमुळे खाक

या घोटाळ्यातील आर्थिक हितसंबंध असलेल्यांविषयी संशय आल्यास वावगे काय ? 
     बीड, २५ मे - अब्जावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेडला लागलेल्या भीषण आगीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आर्थिक घोटाळ्यामुळे बंद पडलेल्या १९ शाखांची कागदपत्रे या शेडमध्ये ठेवण्यात आली होती. ही घटना २४ मे या दिवशी पहाटे ४ वाजता घडली. सध्या बँकेतील घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एका विशेष पथकाकडून (एस्आयटी) चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी चालू असतांनाच हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीचे कारण समजू शकले नसले, तरी ५ प्रतिशत असे महत्त्वाचे दस्तऐवज जळाल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले. 

बाटला हाऊस चकमक खरी ! - माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे स्पष्टीकरण

बाटला हाऊस चकमकप्रकरणी काँग्रेसला घरचा अहेर !
       नवी देहली - २००८ मध्ये देहलीच्या बाटला हाऊसमध्ये आतंकवाद्यांबरोबर झालेली चकमक खरी होती, यात कोणताही संशय नाही. मी त्या वेळीही हेच सांगितले होते. या चकमकीवरून प्रश्‍न उपस्थित करणे अयोग्य आहे, असा घरचा अहेर काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी काँग्रेसला दिला आहे. काँग्रेसकडून सातत्याने ही चकमक खोटी असल्याचे म्हटले जात होते. विशेषतः दिग्विजय सिंह, गुलाम नबी आझाद यांसारखे काँग्रेसी नेते चकमक खोटी म्हणत होते. ते या चकमकीत ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या आझमगड येथील घरीही जाऊन आले होते. या चकमकीच्या वेळी पळून गेलेले २ आतंकवादी इसिसमध्ये सहभागी झाल्याचे एका व्हीडिओवरून उघड झाले आहे. पाटील यांच्या या विधानानंतर खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी दिग्विजय सिंह यांनी देशाची दिशाभूल केल्यावरून त्यांची राष्ट्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या वेळी शिवराज पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले. शासनाने अनेक निर्णय घेतले, जे चांगले आहेत. मोदी शासनाला आणखी वेळ द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
       पाटील यांनी काँग्रेस पक्षांंतर्गत मोठे पालट करण्याची वेळ आली आहे, असेही सांगितले.

पुन्हा पठाणकोटप्रमाणे आक्रमणाची शक्यता !

जोपर्यंत पाकची नांगी ठेचली जात 
नाही, तोपर्यंत अशी आक्रमणे होतच रहाणार !
       चंडीगड - पंजाबमधील पठाणकोट येथे वायूदलाच्या तळावर पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाप्रमाणे आक्रमण करण्याची सिद्धता जैशने पुन्हा एकदा केल्याची माहिती समोर आली आहे.
       जैशच्या सदस्यांनी उत्तर भारतातील ठिकाणांचे अवलोकन करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएस्आय आणि इंडियन मुजाहिद्दीन यांचे साहाय्य मिळणार आहे.
       सैन्याच्या गुप्तचर विभागाने पंजाब शासनाला दिलेल्या अहवालात याप्रकरणी माहिती नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अवैस महंमद हा मलेशियाला जाणार असून तेथे त्याला बनावट मलेशियन पासपोर्ट देण्यात येणार आहे. त्या आधारे तो भारतात प्रवेश करून आक्रमण घडवून आणू शकेल. या नव्या आक्रमणाच्या आखणीसाठी जैश-ए-मोहम्मदने पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा येथे ३ नवीन कार्यालये उघडली आहेत.

देशातील एक तृतीयांश एटीएम् यंत्रे निरुपयोगी ! - रिझर्व्ह बँक

     मुंबई - देशातील एक तृतीयांशपेक्षा जास्त एटीएम् यंत्रे निरुपयोगी आहेत. ती तशीच वापरात ठेवून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा बँकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. या यंत्रांमध्ये त्रुटीही असल्याचे आढळून आले आहे, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस्.एस्. मुंद्रा यांनी एका कार्यक्रमात सांगितले. (बँक प्रशासनाचा भोंगळ कारभार ! - संपादक)

२८ मे या दिवशी सातारा येथे 'सावरकर भक्तांचा मेळावा'


     सातारा, २५ मे (वार्ता.) - येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ अन् इतर संस्थांच्या सहकार्याने शनिवार, २८ मे या दिवशी राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यानामधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात सकाळी १० वाजता 'सावरकर भक्तांचा मेळावा' आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस यांनी दिली. 
     या मेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जगन्नाथ शिंदे हे भूषवणार आहेत. तसेच पुणे येथील सावरकर साहित्याचे अभ्यासक प्रा. गिरीष बक्षी हे प्रमुख वक्ते आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेचे उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

दौर्‍याची फलनिष्पत्ती नसतांना पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकांचा पुन्हा सिक्कीम दौरा

जनहो, राज्य दुष्काळात असतांना फलनिष्पत्तीशून्य दौर्‍यांचे 
आयोजन करणार्‍या अशा पक्षांना येत्या निवडणुकीत घरी बसवा ! 
     पिंपरी (जिल्हा पुणे), २५ मे - महापौर शकुंतला धराडे यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांचा सिक्कीम दौरा झाला आणि त्यावरून बरीच टीका झाली. त्या विषयावरून शिवसेनेने पालिका सभेत आंदोलनही केले. एवढे होऊनही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेत्या मंगला कदम यांच्यासह ६ नगरसेविकांचे पथक पुन्हा सिक्कीमला रवाना झाले आहे. त्यासाठी ३ लक्ष ८० सहस्र रुपये व्ययास संमती देण्यात आली आहे. (आजपर्यंत केलेल्या बहुतांश दौर्‍यांची फलनिष्पत्ती शून्य असतांना त्यावर होणारा व्यय संबंधितांकडून वसूल करायला हवा. - संपादक) सदर दौर्‍याविषयीची माहिती देताना प्रशासकीय अधिकारी हे टाळाटाळ करत होते. नगरसचिव कार्यालयाकडे विचारणा केली असता, हा पर्यावरण विभागाचा विषय असल्याचे सांगण्यात आले, तर पर्यावरण विभागात चौकशी केल्यानंतर, नगरसचिव कार्यालयात माहिती मिळेल, असे सांगण्यात येत होते. (यावरूनच या दौर्‍यांच्या मागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय आल्यास वावगे काय ? - संपादक) 

सनातनचे कर्नाटक येथील ४ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

सौ. विजयालक्ष्मी नीलगुंड (वय ५४ वर्षे) यांचा सत्कार
करतांना ६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. काशिनाथ प्रभु
श्री. संगनगौडा पाटील (वय ४३ वर्षे) यांचा सत्कार करतांना
६३ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. व्यंकटरमण नाईक
सौ. पद्मा धारवाडकर (वय ६२ वर्षे) यांचा सत्कार करतांना
६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. काशिनाथ प्रभु
सौ. वीणा होमे (वय ६१ वर्षे) यांचा सत्कार करतांना
६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. काशिनाथ प्रभु
       मंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटक राज्यातील ४ साधक ६१ टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. गदग येथील सौ. विजयालक्ष्मी नीलगुंड यांनी ६२ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे नुकतेच घोषित करण्यात आले. या बरोबरच आणखी एक आनंदाचे वृत्त म्हणजे विजयपूर (विजापूर) येथील श्री. संगनगौडा पाटील, धारवाड येथील सौ. पद्मा धारवाडकर आणि सौ. वीणा होमे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्याच्या औचित्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांपासून जगाला वाचवणे आवश्यक ! - पॅट्रीयोटिक फोरमचे राष्ट्रसंघाला आवाहन

     नवी देहली - येथील पॅट्रीयोटिक फोरम या राष्ट्रप्रेमी संघटनेने राष्ट्रसंघाचे सरसचिव बान की मून यांना एक पत्र लिहून इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांपासून जगाला धोका असून मानवतेला भावी संकटापासून वाचवण्याकरता राष्ट्रसंघाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन केले आहे. या पत्रात प्रसिद्ध जर्मन अभ्यासक श्रीमती मारिया वर्थ यांनी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यातील काही सूत्रे थोडक्यात पुढे देत आहोत.
१. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांनी जगातील मानवजातीवर भयानक अत्याचार केले आहेत. धर्मप्रसाराच्या नावाखाली कोट्यवधी लोकांची हत्या केली आहे. असे का झाले हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदु धर्माने मात्र अशा क्रौर्यापासून अंतर राखले आहे. 
२. आज जगातील प्रत्येक दुसरे मूल इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्मात जन्म घेते. त्याच्यावर या धर्मांची शिकवण विनाचिकित्सा बिंबवण्यात येते. जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला अशी शिकवण बालपणापासून मिळणे, त्याची चिकित्सा करण्याची संधी दिली नाही, तर ते मानवतेच्या कर्तव्याला मुकण्यासारखे ठरेल.

स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाच्या परतफेडीत पालट केल्याने केंद्रशासनाने २१ सहस्र कोटी रुपये वाचवले !

जे आताच्या केंद्रशासनाने करून दाखवले, ते याआधी बहुतांश वेळ 
सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसने का केले नाही ?
     नवी देहली - स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान गॅस वापरणार्‍या ग्राहकांच्या बँक खात्यांत थेट जमा केल्यामुळे तसेच या पद्धतीमुळे बनावट गॅस ग्राहकांच्या संख्येत कपात झाल्यामुळे केंद्रशासनाने गेल्या २ वर्षांत जनतेचे २१ सहस्र कोटी रुपये वाचवल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात दिली.
१. केंद्रशासनाने नोव्हेंबर २०१४पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाची रक्कम काही जिल्ह्यातील गॅस ग्राहकांच्या बँक खात्यांत थेट जमा करणे चालू केले. ही योजना १ जानेवारी २०१५पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली.

मदरशांचे आधुनिकीकरण करण्यास जमीयत उलेमा-ए-हिंदचा विरोध !

     लक्ष्मणपुरी (लखनौ) - मुसलमानांची महत्त्वाची संघटना असणार्‍या जमीयत उलेमा-ए-हिंदचे महासचिव मौलाना महमूद मदनी यांनी केंद्रशासनाच्या मदरशांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेला विरोध केला आहे. मला त्यांचे साहाय्य नको, अशा शब्दांत त्यांनी विरोध केला आहे. मदनी अनेक वर्षांपासून मुसलमानांच्या मागासलेपणासाठी काँग्रेसला उत्तरदायी ठरवत आले आहेत. 
      मदनी म्हणाले की, मोदी जर मुसलमानांसाठी काही करू इच्छीतात, तर त्यांनी येथे मुसलमानांसाठी शाळा, महाविद्यालये बांधावीत; मात्र मदरशांना हात लावू नये.
      भारतात २५ सहस्रांहून अधिक मदरशे असून तेथे लक्षावधी मुसलमान मुले आणि मुली इस्लामी शिक्षण घेत आहेत. मोदी यांनी संसदेत म्हटले होते की, मदरशांतील मुले एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात कम्युटर घेतलेले पहायचे आहेत. यासाठी त्यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. (मदरशांच्या मागासलेपणासाठी कोणतीही निधर्मीवादी संघटना अथवा पुरोगामी पुढे येत नाहीत, हे लक्षात घ्या ! -संपादक)महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'गोरक्षक' पदासाठी नावे मागवण्यास प्रारंभ

गोभक्तांसाठी सुवार्ता ! 
     मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या वतीने 'गोरक्षक' या स्वयंसेवक पदासाठी नावे मागवण्यात येत आहेत. गोरक्षण करण्याची कायदेशीर मान्यता या पदामुळे कार्यकर्त्याला मिळेल. कार्यकर्त्यांनी स्वत:चे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक vhpgouraksha@gmail.com या संकेतस्थळावर संगणकीय पत्राद्वारे पाठवावे, असे राजेश जैन, गोरक्षा प्रमुख देवगिरी प्रांत यांनी सांगितले आहे.

विद्यापिठाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखांच्या परीक्षांमध्ये चुकीच्या प्रश्‍नपत्रिका

पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार ! 
     पुणे, २५ मे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून सध्या विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखा यांच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षांचा प्रारंभ प्रश्‍नपत्रिका मिळण्याच्या वादातून झाला. त्यानंतर परीक्षा केंद्रांवर विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या आणि अभियांत्रिकी शाखेची प्रश्‍नपत्रिका चुकीची मिळाल्याची विद्यार्थ्यांकडून तक्रार करण्यात येत आहे. या प्रकरणी चुकीच्या प्रश्‍नपत्रिका मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केली आहे. (या प्रकरणी विद्यापीठ प्रशासन संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करेल का ? - संपादक) 

पुणे शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

      पुणे, २५ मे - शहरात जलतरण आणि वाहन धुलाई केंद्र या आणि अन्य ठिकाणी पाण्याचा अपव्यय चालू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी परिवर्तन संस्थेने पुणे जिल्हा पालकमंत्री, महापौर आणि पालिका आयुक्त यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. (जनहितासाठी पाणीप्रश्‍नी संबंधितांना जागरूक करणार्‍या परिवर्तन संस्थेचे अभिनंदन ! याविषयी लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन कोणती उपाययोजना आणि कारवाई करणार आहे ? - संपादक)

इंग्लंडमध्ये आतंकवाद निपटण्याचा सराव करतांना खोट्या आतंकवाद्याने अल्लाहु अकबर उच्चारल्याने मुसलमानांना पोटशूळ !

     लंडन - इंग्लंडमधील ट्रॅफोर्ड सेंटरवर आतंकवाद निपटण्याच्या सरावाच्या वेळी आत्मघातकी बॉम्बधारकाचा वेश परिधान केलेल्या ब्रिटीश सुरक्षा अधिकार्‍याने अल्लाहु अकबर हे शब्द उच्चारले. असे म्हणणार्‍याने नुसती क्षमायाचना करणे पुरेसे नाही; तर त्याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी मुसलमान समुदायाच्या एका गटाने केली आहे. तसेच या प्रकरणी उत्तरदायी असलेल्या सर्वांनी त्यागपत्र द्यावे, असेही या गटाने म्हटले आहे.

काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचे आदेश तत्कालीन सीबीआय प्रमुख रणजित सिन्हा यांनी दिले !

काँग्रेसच्या काळात सिन्हा यांनीच सीबीआयला पोपट म्हटले होते, त्यामुळे काँग्रेसच्या 
दबावामुळे त्यांनी चौकशी बंद केली असणार, यात शंका नाही !
     नवी देहली - कोळसा खाणवाटप घोटाळ्यातील काही प्रकरणांची चौकशी बंद करण्याचा आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) तत्कालीन प्रमुख रणजित सिन्हा यांनी दिले होते, असे या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या एका अधिकार्‍याने विशेष न्यायालयाला सांगितले. सिन्हा यांनी दिलेल्या या आदेशामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेली समिती सिन्हा यांच्या आदेशाप्रमाणे अन्वेषण करत होती. हे प्रकरण मध्यप्रदेशातील कमल स्पंज स्टील आणि पॉवर लिमिटेड आणि अन्य आस्थापनांशी निगडीत होते.

प्रयाग आणि सोलापूर येथे काँग्रेसकडून शौचालयाला अभिनेता ऋषी कपूर यांचे नाव !

गांधीवादी काँग्रेसची हीन मानसिकता !
     प्रयाग - येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका सार्वजनिक शौचालयाला अभिनेते ऋषी कपूर यांचे नाव दिले आहे. सोलापूरमध्येही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका सार्वजनिक शौचालयाला कपूर यांचे नाव दिले आहे. शौचालयाला नाव देण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ऋषी कपूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता प्रकल्प स्वच्छ भारत असल्याने शौचालयाला आपले नाव देण्याच्या प्रकाराचा अभिमान आहे. 
    ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी देशातील सार्वजनिक ठिकाणांना गांधी-नेहरू परिवारातील नावे देण्याचा विरोध केला होता. त्यावरून काँग्रेसकडून असा विरोध करण्यात आला आहे.

श्रीनगरमध्ये सैन्याच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत चालू असतांना उभे न रहाणार्‍या २ पत्रकारांना सैन्याने बाहेर काढले !

     श्रीनगर - येथून काही अंतरावर असणार्‍या रंगरेथ येथे सैन्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी आलेले २ पत्रकार कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रगीत चालू असतांना उभे न राहिल्याने सैन्याधिकार्‍यांनी त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढल्याची घटना घडली आहे. 

सावरकर जयंतीच्या निमित्त ठाणे येथे दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

भारत-पाक युद्धाचा थरार ऐकायला मिळणार 
     ठाणे - स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त प्रथमच दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला सहयोग मंदिर सभागृह, पहिला मजला, घंटाळी येथे आहे. 

गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपकाची अनुमती देण्याची महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाची मागणी !

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो 
मी मिळवणारच' या लोकमान्य टिळकांच्या घोषणेला १०० वर्षे पूर्ण ! 
     मुंबई, २५ मे (वार्ता.) - लोकमान्य टिळकांनी १९१६ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात दिलेल्या 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या घोषणेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवातील ११ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाने केली आहे. 

सनातनची साधिका कु. प्रीती कुंभार हीचेे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश !

        तासगाव, २५ मे (वार्ता.) - जुळेवाडी येथील सनातन संस्थेचे साधक श्री. रवींद्र शामराव कुंभार यांची मुलगी कु. प्रीती रवींद्र कुंभार (वय ८ वर्षे) हिने प्रज्ञा शोध परीक्षेत तासगाव तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिला १०० पैकी ९६ गुण मिळाले आहेत. नियमित प्रार्थना, नामजप यांमुळे अभ्यास करतांना एकाग्रता साधल्यामुळे हे यश मिळाले, असे कु. प्रीती हिने सांगितले. कु. प्रीती ही जिल्हा परिषद जुळेवाडी येथील शाळेची विद्यार्थिनी आहे.

सतना (मध्यप्रदेश) येथे ३ हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पादरीसहित तिघांना अटक

     सतना (मध्यप्रदेश) - येथील पोलिसांनी १ पादरी आणि त्यांच्या २ सहकारी महिला यांना ३ हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. 
     या तिघांनी गोरइया गावातील प्रशांत गुप्ता, रामबन आदिवासी आणि हेमराज वर्मा यांना अबेर चर्च मध्ये बोलावले होते. गुप्ता यांनी पोलिसांना सांगितले की, मी पादरी ए.बी. अँथनी यांच्या संपर्कात होतो. त्यांनी आणि अन्य दोघांना नोकरी देण्याचे आमीष दाखवून आमचे धर्म परिवर्तन केले. 
      राज्याच्या मागसवर्गीय आयोगाच्या सदस्या लक्ष्मी यादव म्हणाल्या की, येथे धर्मांतराच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

अलीगड विश्‍वविद्यालयात हिंदु विद्यार्थिनींना प्रवेश न देण्याच्या प्रकरणाचा राष्ट्रवादी शिवसेनेकडून विरोध

     नवी देहली - हिंदु विद्यार्थिनींना अलीगड विश्‍वविद्यालयात प्रवेश न देण्याच्या प्रकरणाचा राष्ट्र्रवादी शिवसेना आणि युनायटेड हिंदू फ्रंट या संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. 
     राष्ट्रवादी शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जय भगवान गोयल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विश्‍वविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देण्यापासून टाळण्यासाठी त्यांना जागा नसल्याचे कारण देण्यात आले. काही विद्यार्थिनींनी या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आयोगाने विश्‍वविद्यालच्या उपकुलगुरूंना नोटीस पाठवली आहे. शासनाने या घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी गोयल यांनी केली आहे.इसिसच्या अतिरेक्यांकडून २५ लोकांची नायट्रिक अ‍ॅसिडमध्ये बुडवून हत्या !

इस्लामिक स्टेट कसे असेल, हे या प्रसंगावरून लक्षात येते ! 
     नवी देहली - इसिसच्या आतंकवाद्यांनी २५ लोकांची नायट्रिक अ‍ॅसिडमध्ये बुडवून हत्या केल्याचे वृत्त डेली मेल या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. 
    इराकमधील मोसुल या शहरात २५ लोकांना एका रस्सीने बांधण्यात येऊन त्यांचे शरीर वितळेपर्यंत त्यांना अ‍ॅसिडने भरलेल्या एका भांड्यात बुडवून ठेवण्यात आले. या २५ जणांची हत्या हेर असल्याच्या संशयावरून करण्यात आली. इराकमधील शासनाने इसिसविषयी माहिती गोळा करण्यासाठी यांना हेर म्हणून पाठवले होते, असा यांच्यावर संशय होता.

     पुणे - दुधात असणारी भेसळ ओळखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने 'स्ट्रिप' सिद्ध केली आहे. ही स्ट्रिप दुधात बुडवून घरबसल्या भेसळ ओळखता येते. यासाठीच्या 'स्ट्रिप्स' लवकरच हा विभाग बाजारात आणणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने दूध भेसळ ओळखण्यासाठी तयार केलेल्या स्ट्रिपच्या आवश्यक चाचण्या केल्या असून, त्या यशस्वी झाल्या आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी पाटणच्या (जिल्हा सातारा) जनतेची दाही दिशांना भटकंती !

     पाटण, २५ मे (वार्ता.) - कोयना-केरा नदी काठावर वसलेले पाटण या शिवकालीन शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. कोयना धरण याच तालुक्यातील आहे; मात्र आज पाटणकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकावे लागत आहे. सध्या नळांना अनियमित, अल्प दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. पाटण ग्रामपंचायतीने सर्व नळ जोडण्यांना सकाळी आणि संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत किमान १ घंटा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. तसेच पिण्याच्या पाण्यासंबंधित योग्य त्या उपाययोजना करून कराव्यात, अशी मागणी पाटणवासियांकडून होत आहे.

मद्यनिर्मिती कारखान्याच्या पाणीपुरवठ्यावर बंदी घालण्याची याचिका फेटाळली

     नवी देहली - महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर तेथील मद्य आणि बिअर निर्मिती आस्थापनांचा पाणीपुरवठा बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका २४ मे या दिवशी फेटाळण्यात आली. 
     मद्य आणि बिअर निर्मिती आस्थापनांच्या पाणीपुरवठ्यात ६० टक्के कपात करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच दिले आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम आदेश दिले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातचा दुसरा विशेष रंगीत विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक : ३१ मे २०१६ 
पृष्ठ संख्या : १० 
मूल्य : ५ रुपये 
 या अंकात अनुभवा ! 
* परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या धार्मिक विधींचा सविस्तर वृत्तांत 
* सर्व विधींचे छायाचित्रात्मक सादरीकरण 
     यांसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण 
आपली प्रत आजच नोंदवा ! 
 विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २९ मे 
या दिवशी सायं. ५ वाजेपर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी.

सिरियात क्रांतीनंतर ६० सहस्र नागरिकांची कारागृहात हत्या !

     दमास्कस - वर्ष २०११ मध्ये सिरिया देशात क्रांतीचा उठाव झाल्यानंतर लक्षावधी नागरिकांना बशर अल-असद यांच्या राजवटीने कारागृहात डांबले. त्यातील ६० सहस्र लोक शारीरिक छळ, अन्न आणि औषधे न पुरवल्याने मृत्यूमुखी पडले. असा अहवाल सिरियातील मानवाधिकार निरीक्षण संस्थेने दिला आहे. 
१. या संस्थेचे संचालक रामी अब्दुल रहमान यांनी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सिरियातील अनेक कारागृहात बंदी असलेल्या युद्धकैद्यांकडून आणि सुरक्षा सैनिकांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे.
२. सिरियातील कारागृहातून सीझर नावाच्या युद्धकैद्याने काही छायाचित्रे बाहेर पाठवली होती. त्या आधारे मे २०११ ते ऑगस्ट २०१३ पर्यंत ६ सहस्र ७८६ कैदी एकाच कारागृहात मृत्यूमुखी पडल्याचे सिद्ध झाले आहे.
३. सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांनी मात्र सीझर याने पाठवलेली छायाचित्रे बनावट असल्याचे म्हटले आहे; मात्र राष्ट्रसंघाने असद राजवटीने नागरिकांना कारागृहात डांबून ठर करण्याचे धोरण राबवले आहे, असे म्हटले आहे. इतर मानवाधिकार संघटनांनी अशाच प्रकारचे अहवाल दिले असून इस्लामिक स्टेटच्या अमलाखाली असलेल्या भागातही असे मानवताविरोधी हत्याकांडे होत असल्याचा दावा केला आहे.

दूरचित्रवाहिनी, भ्रमणभाष, संगणक यांमुळे माणूस पुस्तकांपासून दूर जात आहे ! - कला आणि संस्कृती मंत्री, गोवा

राज्यकर्त्यांकडून सामान्य नागरिकांप्रमाणे बोलणे अपेक्षित नाही, 
ही स्थिती पालटण्यासाठी कृती करणे अपेक्षित आहे ! 
     पणजी - पूर्वी मनोरंजनाच्या सुविधा नसल्यामुळे वाचन संस्कृती बळकट होती. सध्या दूरचित्रवाहिनी, भ्रमणभाष, मोबाईल, संगणक यांसारख्या तंत्रज्ञानाने मनुष्याची एकाग्रता खंडित झाली आहे. याचा परिणाम वाचन संस्कृतीवर झाला आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वतीने २१ मे या दिवशी पाटो येथे उत्कृष्ट ग्रंथालय आणि ग्रंथपाल पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या वेळी केले.

पाकमध्ये जाऊन आतंकवाद्यास ठार करा ! - अजयसिंह सेंगर

हुतात्मा सैनिक पांडुरंग गावडे यांच्यासाठी पनवेल येथे श्रद्धांजली सभा
नवाज शरीफ यांची प्रतिमा जाळतांना राष्ट्रप्रेमी 
     पनवेल, २५ मे (वार्ता.) - अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकमध्ये जाऊन ठार केले. त्याचप्रमाणे भारत शासनाने पाकमध्ये जाऊन लश्कर-ए-तोयबाचे आतंकवादी अथवा दाऊद यांना ठार करावे. तेव्हाच सैनिक पांडुरंग गावडे यांसारख्या हुतात्मास श्रद्धांजली वाहिल्यासारखे ठरेल, असे महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यानी पनवेल येथे पृथ्वी सभागृहामध्ये आयोजित श्रद्धांजली सभेत प्रतिपादन केले. तसेच या वेळी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रतिमा निषेध म्हणून जाळण्यात आली. 
     सेंगर पुढे म्हणाले की, शासन आतंकवादाविरुद्ध आक्रमक पावले का उचलत नाही ? कोठपर्यंत मुसलमानांच्या मतापुढे लाचारी स्वीकारणार ? देशाच्या सीमेवर राहत असलेल्या नागरिकांना शस्त्रे देण्यात यावीत. या वेळी पाकिस्तान मुर्दाबाद आणि पांडुरंग गावडे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीराम गोंधळी, तर अतिथि गुरुनाथ मुंबईकर, संतोष मोकल, लष्करातील सैनिक दत्ता कानडे होते. आभार प्रदर्शन कविता भालेराव यांनी केले.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरिता धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग

श्री. रमेश शिंदे
श्री. सुनील घनवट
       धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. याचा परिणाम म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली आहे. स्वतंत्र भारतातील हिंदु युवकांच्या मनात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात केलेले बीजारोपण आता अंकुरत असल्याचे दिसत आहे. याच वेळी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुसलमान मदरशांतून, तर ख्रिस्ती चर्च आणि कॉन्व्हेंट यांतून आपापल्या धर्माचे शिक्षण घेतच आहेत. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. त्यातूनच हिंदूंच्या मनात धर्माभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना सिद्ध करता येईल.

प्रदूषण कसे रोखणार ?

      देहली येथे प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे सध्या डिझेल इंधन वापरल्या जाणार्‍या चारचाकी वाहनांची नोंदणी थांबवण्यात आली आहे. त्याचसमवेत केजरीवाल शासनाने चारचाकी गाड्यांमध्ये एक दिवस सम आणि एक दिवस विषम क्रमाकांच्या गाड्या रस्त्यावर धावण्याचा पर्याय चालू ठेवला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष खंडपिठाने केरळमधील एर्नाकुलम येथेही देहलीप्रमाणेच डिझेलवर चालणार्‍या आणि १० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एका मासानंतर १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेलच्या गाड्या आढळल्यास १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, असा आदेशही खंडपिठाने दिला आहे. या संबंधी प्रविष्ट केलेल्या याचिकेत कोची आणि केरळमध्ये वेगाने विकसित होणार्‍या अन्य शहरांची वाटचाल याच दिशेने होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे विषारी वायू सोडणार्‍या बस आणि ट्रक यांसारख्या डिझेलवर चालणार्‍या वाहनांच्या संदर्भात तात्काळ उपाययोजना करत बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे केली होती. या पार्श्‍वभूमीवर खंडपिठाने हा अंतरिम आदेश दिला आहे.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
मुलांनो, धर्माभिमानी बना अन् धर्मरक्षण करा !
धर्मासाठी भिंतीत चिणून मरण पत्करलेले जोरावरसिंह आणि फतेहसिंह ! : जोरावरसिंह आणि फतेहसिंह हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र. गुरु गोविंदसिंह यांनी मुगलांविरुद्ध पुकारलेल्या स्वातंत्र्ययुद्धातील एका लढाईत वडिलांशी ताटातूट झाल्यावर हे दोघे बंधू क्रूरकर्मा औरंगजेबाचा सरहिंद येथील सुभेदार वझीरखान याच्या हाती सापडले. वझीरखान याने त्यांना मुसलमान व्हा, नाहीतर ठार मारू, असे धमकावले. ही वाक्ये ऐकताच या मुलांनी मेलो तरी चालेल; पण आम्ही धर्म सोडणार नाही ! आमचा धर्म आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहे. आमचे आजोबा गुरु तेगबहादूर यांनी धर्माच्या रक्षणासाठीच प्राणार्पण केलेे. त्यांचा आदर्श आमच्यासमोर आहे, असे सांगितले. या बाणेदार उत्तराचा परिणाम व्हायचा तोच झाला. २७.१२.१७०४ या दिवशी या दोघा बंधूंना भिंतीत चिणून ठार मारण्यात आले. या वेळी जोरावरसिंह ८ वर्षांचा, तर फतेहसिंह ५ वर्षांचा होता. जगातील कोणत्याही देशाच्या इतिहासात अशी घटना नाही की, ज्यात ८ अन् ५ वर्षांच्या दोन बालसिंहांनी धर्मासाठी प्राणार्पण केले !
       मुलांनो, आपला जन्म हिंदु धर्मात झाला आहे. या धर्मावर आपले प्राणापेक्षाही प्रेम हवे. धर्मावर आपले प्रेम असेल, तरच आपण धर्मासाठी त्याग करण्यास सिद्ध होऊ !
(अधिक माहितीसाठी वाचा : सनातन-निर्मित ग्रंथ बोधकथा)

बंगालमध्ये मिनी अफगाणिस्तानही !

ब्रिगेडियर (निवृत्त)
हेमंत महाजन
      काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी पाकिस्तानमधील वृत्तपत्र द डॉनच्या पत्रकाराला मुलाखत देतांना त्यांनी गार्डन रिच परिसराची ओळख मिनी पाकिस्तान अशी करून दिल्याने वाद निर्माण झाला होता. गार्डन रिच परिसरात प्रचारसभेत पाकिस्तानमधील वृत्तपत्र द डॉनची पत्रकार मलिहा हमीद सिद्दिकी सहभागी झाली होती ! या वेळी मंत्री फिरहाद हकीम यांनी त्यांना चला तुम्हाला मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो, असे म्हटले. फिरहाद हकीम यांचे हे वक्तव्य द डॉन वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते. बंगाल विधानसभेची निवडणूक आता पार पडली आहे; पण या निवडणुकीच्या रणधुमाळीत ममता बॅनर्जींच्या एका मंत्र्याने केलेल्या विधानावरून बंगालमध्ये काय स्थिती आहे, हे सहज लक्षात येईल. हकीम यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले होते, हे स्पष्ट आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मतांसाठी कुठल्या पातळीवर जाऊ शकतात, हे पुन्हा स्पष्ट झाले. ज्या गार्डन रिच मतदारसंघातून हे फिरहाद हकीम उभे आहेत, त्या मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात हे विधान हकीम यांनी केले. मतांसाठी टाकलेली ही पावले देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

     भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! 
- श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे

विविध विषयांवर प्रबोधन करणारी पत्रके म्हणजे प.पू. गुरुदेवांचे चैतन्यमय पत्र असा भाव ठेवून पुणे जिल्ह्यातील साधकांनी प्रयत्न केल्यावर त्यांना समाजाकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद !

       पुणे जिल्ह्यात मकरसंक्रांत, व्हॅलेंटाईन डे या संदर्भात प्रबोधन करणारी पत्रके मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिली आहेत, हे कळल्यावर पुष्कळ खंत वाटली. केंद्राकेंद्रात जाऊन बैठकीत या पत्रकांच्या संदर्भात सूत्रे सांगूया, असा विचार आला. नंतर होळीच्या संदर्भात प्रबोधन करणारी पत्रके आली. तेव्हा भावाच्या स्तरावर सेवा होण्यासाठी श्रीकृष्णाला पुष्कळ प्रार्थना केली. त्याचप्रमाणे केंद्रात द्यावयाच्या पत्रकांचे गठ्ठे करतांना त्या गठ्ठ्यांवर हे करुणाकर श्रीकृष्णा, प.पू. गुरुदेवांचे हे चैतन्यमय पत्र समाजात वितरण करण्याचे बळ तू आम्हाला दे. हे श्रीकृष्णा, तू सदैव आमच्यासमवेत आहेस, याची जाणीव आम्हाला असू दे. या पत्रकाच्या माध्यमातून संस्थेच्या कार्यात समाज जोडला जाऊ दे, अशा भावपूर्ण प्रार्थना लिहिल्या. या प्रयत्नामुळे झालेला लाभ पुढे देत आहे.

लहानपणापासूनच देवाची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील चि. गौरी दत्तात्रय फोकमारे (वय ३ वर्षे) !

चि. गौरी फोकमारे
      यवतमाळ येथील बालसाधिका चि. गौरी दत्तात्रय फोकमारे हिचा वैशाख कृष्ण चतुर्थी २६.५.२०१६ या दिवशी तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. गौरी यास वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी
१ अ. लग्नानंतर ४ वर्षे अपत्य नसणे आणि पू. रत्नाकर मराठेकाका यांनी सांगितलेल्या उपायांमुळे पत्नीला दिवस रहाणे : लग्नानंतर ४ वर्षे आम्हाला अपत्य नव्हते. आम्ही २ वर्षे वैद्यकीय औषधोपचार घेऊनही लाभ झाला नाही. सनातनचे अमरावती येथील संत पू. रत्नाकर मराठेकाका यवतमाळ येथे आले होते. त्या वेळी त्यांच्याशी या विषयावर बोलल्यावर त्यांनी आम्हाला औषधोपचार चालू ठेवून श्री दुर्गादेवीच्या चित्रासमोर तुपाचा दिवा लावून दुर्गादेवी-शिव-गणपति या देवतांचा जप करायला सांगितला. त्याप्रमाणे जप केल्यावर एक ते दीड मासांत सौ. स्वातीला दिवस राहिले.

श्रीकृष्णावर प्रेम करणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. श्रीनंद विलास चौधरी (वय २ वर्षे) !

चि. श्रीनंद चौधरी
      जळगाव येथील श्री. विलास चौधरी आणि सौ. सुनिता चौधरी यांचा मुलगा चि. श्रीनंद चौधरी याच्याविषयी त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्येे पुढे देत आहोत.
चि. श्रीनंद यास वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
१. गर्भारपण
१ अ. सासूबाईंनी गुरुकृपेचा प्रसाद पाठवला, असे म्हटल्यावर भाव जागृत होणे : मला दिवस गेल्याचे मी आईंना (सासूबाई सौ. विमल चौधरी) सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, आपल्याला देवाने गुरुकृपेचा प्रसाद पाठवला आहे. त्या वेळी माझा भाव जागृत झाला.
१ आ. प्रार्थना, नामजप, उपाय आणि ग्रंथवाचन केल्याने मळमळणे, अशक्तपणा, जेवणाची इच्छा न होणे, हे त्रास उणावणे : गर्भारपणाच्या पहिल्या दोन मासांत मला होत असलेले काही त्रास एका साधिकेला सांगितल्यावर तिने मला जास्तीतजास्त प्रार्थना आणि नामजप करायला सांगितला. याशिवाय कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे, श्रीमद्भगवद्गीता, शिवचरित्र, साईचरित्र, प.पू. भक्तराज महाराजांचे चरित्र यांचे वाचन करणे, तसेच प.पू. भक्तराज महाराजांची भजने ऐकणे, हे सर्व उपाय करत होते. त्यामुळे माझा त्रास उणावला.

नेहमी स्वतःकडे लहानपण घेऊन इतरांचे कौतुक करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती गलांडेकाकू !

श्रीमती भारती गलांडे
१. हसतमुख आणि उत्साही
       गलांडेकाकू सतत हसतमुख असतात. पहाटे पाच वाजल्यापासून त्या सेवा करतात; पण मी त्यांना कधी थकलेले वा तणावग्रस्त पाहिले नाही. त्या नेहमी उत्साही असतात.
२. प्रेमभाव
      प.पू. डॉक्टरांच्या महाप्रसादातील पदार्थ प्राधान्यानुसार आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना देतात. त्यांना तो मिळाला आहे कि नाही, याची निश्‍चितीही करतात.
३. अल्प अहं
       कु. रोहिणीने (कु. रोहिणी गुरव यांनी) गलांडेकाकूंविषयी लिहून दिलेली सूत्रे वाचून मी त्यांना म्हटले, तुमच्याविषयी फार छान सूत्रे दैनिक सनातन प्रभातमध्ये आली आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या, तिचा (कु. रोहिणीचा) तसा भाव आहे; म्हणून तिने तसे लिहिले. प्रत्यक्षात काकूंमध्ये ते गुण अनेक वर्षांपासूनच आहेत; पण त्या प्रत्येक वेळी स्वतःकडे लहानपण (कमीपणा) घेतात आणि इतरांचे मात्र कौतुक करतात.
- कु. नंदा सदानंद नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१६)

स्वतःतील स्वभावदोष नष्ट करून गुणरूपी फूल अर्पण करण्यासाठी तळमळणारी कु. योगिनी आफळे (वय १४ वर्षे) हिने प.पू. गुरुदेवांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन !

कु. योगिनी आफळे
हेे गुरुमाऊली,
        माझी साधना होण्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेता; पण मला त्याची जाणीवच नाही, याची मला खंत वाटत आहे. एवढ्या वर्षांपासून मी साधनेत आहे, तरी माझी प्रगती होत नाही. देवा, तुमच्याकडे येण्याच्या मार्गावर माझे स्वभावदोष आणि अहं यांनी मला अडकवून ठेवलेे आहे आणि मी कुठेतरी साधनेच्या प्रयत्नांमध्ये न्यून पडत आहे, असे वाटत आहे.
१. साधनेतील प्रयत्नांविषयी 
मार्गदर्शन हवे आहे, असे सांगणारी योगिनी !
        हे गुरुमाऊली, मी काही प्रसंगांत खचून जाते. मला तो प्रसंग स्वीकारता येत नाही. मनात नकारात्मक विचार येतात. सेवेत चुका होतील, याचा ताण आल्यामुळे कुठल्याच सेवेतील आनंद मला मिळत नाही, असे वाटते. भावाच्या स्तरावर प्रयत्न कसे करायचे ?, हे मला समजत नाही. याविषयी मला मार्गदर्शन हवे आहे. यासाठी गुरुदेवा, मी भावसत्संगात शिकण्यासाठी जावे, असे वाटते. आई आणि सत्संगाला जाणारे इतर साधक सूत्रे सांगतात. तेव्हा असे वाटते की, मी कुठेतरी भावाच्या स्तरावर न्यून पडत आहे. मी भावसत्संगाला जाऊ शकते का ? (उत्तर - हो.)

प्रतिदिन वाचा सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

वयोवस्थेनुसार करावयाचे शांतीकर्म

सौ. प्राजक्ता जोशी
१. वयोवस्थेनुसार करण्यात 
येणार्‍या शांती आणि त्यांच्या देवता
        वयोवस्थेनुसार विविध शांतीकर्मे चालू करण्यास शास्त्रात सांगितलेले आहे. मानवी आयुर्मान सामान्यतः शंभर वर्षांचे आणि वेदोक्त आयुर्मान एकशेवीस वर्षांचे कल्पून अर्धे आयुष्य संपत येताच शांतिकर्म चालू करावयास सांगितलेले आहे. प्रत्येक शांतीसाठी विविध देवता असून त्यांची नावे भिन्न आहेत.
२. वयोवस्थेनुसार 
शांतीकर्म केव्हा करावे ?
      जन्मतिथीप्रमाणे ती ती वयोवस्था प्राप्त होण्यापूर्वी शांती होणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, एकोणपन्नासावे वर्ष पूर्ण होताच वैष्णवीशांती व्हावी; पण काही वेळा अडचणीमुळे उक्तकाली शांती करणे शक्य न झाल्यास नंतरही करता येते. अशा वेळी तो अतिक्रांत काल समजावा. ठराविक शांतिकाल उलटल्यानंतरही सुमारे तीन वर्षापर्यंत अतिक्रांत काल समजण्यात येतो.

साधना आणि भक्ती वाढवणे, हाच वाईट शक्तींच्या त्रासांवरील कायमस्वरूपी उपाय !

पू. संदीप आळशी
       सध्या काळ प्रतिकूल असल्यामुळे साधकांना वाईट शक्तींचे तीव्र त्रास भोगावे लागत आहेत. साधक आध्यात्मिक उपाय करतात; पण वाईट शक्तींचे बळही मोठे असल्याने त्याही आक्रमणांवर आक्रमणे करतच रहातात. असे उपाय किती काळ करत रहाणार ? एकदा प.पू. डॉक्टरांनी एका चौकटीत लिहिले होते, कागदावर काढलेल्या एका रेषेला लहान करायचे असल्यास तिच्या शेजारी दुसरी मोठी रेष काढली की, पहिली आपोआप लहान होते. याच तत्त्वानुसार वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी उपाय करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे आपली साधना आणि भक्ती वाढवून देवाला प्रसन्न करणे. एकदा देव प्रसन्न झाला की, वाईट शक्तींची आपल्याला त्रास देण्याची काय बिशाद ? भूत पिसाच निकट नहीं आवै । महाबीर जब नाम सुनावै ॥, असे संतश्रेष्ठ तुलसीदासांनी सांगितले आहे. महाबीर म्हणजे हनुमान. संतवचन कधीही असत्य ठरत नाही. आपल्या नामजपात आणि भक्तीत एवढी शक्ती हवी की, त्यायोगे देवाला आपल्यासाठी यावेच लागेल.
       साधकांनो, आपल्याला साधना आणि भक्ती यांची पराकाष्ठा करण्याचे नियतीने जणू आव्हानच दिले आहे, असे समजून श्री गुरूंचे स्मरण करून ते आव्हान स्वीकारूया ! मग पहा... अंती विजय आपलाच आहे !
- (पू.) श्री. संदीप आळशी (२२.५.२०१६)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेले छायाचित्र पहाणारे पू. सौरभ जोशी यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

१. योगतज्ञ दादाजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेले छायाचित्र पाहून पू. सौरभदादांनी नमस्कार म्हणून दैनिक आज्ञाचक्रावर धरणे : पू. सौरभदादा प्रतिदिन सकाळी उठल्यावर प्रथम दैनिक सनातन प्रभात पहातात. २१.५.२०१६ या दिवशी योगतज्ञ दादाजी यांचा वाढदिवस होता. दैनिक सनातन प्रभातमधील योगतज्ञ दादाजींचे छायाचित्र पाहून पू. सौरभदादांनी नमस्कार म्हणून दैनिक आज्ञाचक्रावर धरले. (संतांच्या वाढदिवशी त्यांना भ्रमणभाष करू नये, अशी सूचना येऊ लागल्यापासून पू. सौरभदादा ज्या संतांचा वाढदिवस आहे, त्या संतांना मानस नमस्कार करतात.) पू. सौरभदादांना संतांच्या चरणी नतमस्तक होता येत नाही; म्हणून त्यांनी दैनिक मस्तकी धारण केलेला पाहून प.पू. डॉक्टर पू. सौरभदादांना कसे घडवत आहेत, असा विचार येऊन माझा भाव जागृत झाला.

रोहिणी गुरवची बोलण्यातील हुशारी !

कु. रोहिणी गुरव
       हल्लीची बरीचशी मुले आई-वडिलांचे बघत नाहीत. ती कृतघ्न असतात. या विषयावर बोलणे चालू असतांना रोहिणी म्हणाली, आई-वडिलांचे प्रारब्ध चांगले नसल्यामुळे त्यांना अशी मुले होतात ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

भ्रमणभाष, भ्रमणसंगणक यांवर वायफाय आदी 
सुविधांचा वापर करत असल्यास पुढील दक्षता घ्या !
१. हॉटस्पॉट, शेअरइट आदींचा अनोळखी व्यक्तींकडून 
अयोग्य वापर होऊ नये, यासाठी वापरानंतर ते लगेच बंद करावे !
         बरेच साधक भ्रमणभाष, टॅबलेट, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांवर वायफाय (wifi), हॉटस्पॉट (hotspot), ब्लुटूथ (bluetooth), शेअरइट (Shareit) अशा सुविधांचा वापर करतात. वापरानंतर ते बंद न केल्यास अनोळखी व्यक्ती आपल्या भ्रमणभाषमधील डेटा (माहिती) चोरणे, इंटरनेटचा वापर करणे आदी कृती करू शकतात. त्यामुळे इंटरनेटचा अनावश्यक व्यय होतो, तसेच भ्रमणभाषमध्ये व्हायरस शिरण्याचीही शक्यता असते. वरील सूत्र लक्षात घेऊन यापुढे सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी या सुविधा वापरतांना विशेष काळजी घ्यावी.
२. संगणक अथवा भ्रमणसंगणक 
दुरुस्तीला देतांना त्यातील सर्व सेटिंग्ज पुसणे आवश्यक !
        आपला संगणक अथवा भ्रमणसंगणक दुरुस्तीसाठी बाहेरील तंज्ञाकडे द्यायचा असेल, तर तो देण्यापूर्वी त्यातील सर्व सेटिंग्ज पुसावेत. सेटिंग्जमध्ये वायफायवर राईट क्लिक करून forget network वर क्लिक करावे, अन्यथा त्यांना आपल्या वायफायचा संकेतांक (पासवर्ड) मिळू शकतो.

संगणक क्षेत्रातील साधक आणि हिंदु राष्ट्रप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !

रामनाथी आश्रमातील संगणक 
दुरुस्ती विभागात साधकांची आवश्यकता !
        हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय शीघ्रतेने साकार होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, तसेच उत्पादने आणि सनातन प्रभात नियतकालिके या माध्यमांतून जनसामान्यांमध्ये राष्ट्र अन् धर्म यांसंदर्भात जागृती केली जाते. राष्ट्र-धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी संगणकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
        सध्या संगणकांची देखभाल, तसेच दुरुस्ती करण्यासाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे संगणक असेम्बल करणे, त्यांचे इन्स्टॉलेशन करणे, बेसिक नेटवर्किंग करणे, तसेच संगणक, भ्रमणसंगणक, प्रिंटर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांना आलेल्या अडचणी सोडवून त्यांची दुरुस्ती करणे आदी सेवांसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधकांची आवश्यकता आहे.

सर्व साधक-वक्त्यांसाठी महत्त्वाची सूचना

संहितेतील सूत्रे पाठ करून 
मांडण्याऐवजी बोलीभाषेत विषय मांडा !
         एका साधिकेकडे एका कार्यक्रमात विषय मांडण्याची सेवा होती. संहितेतील पाठ केलेली सूत्रे ती सरावाच्या वेळी म्हणून दाखवत असल्याने तिच्या बोलण्यात सहजता नव्हती, तसेच ती पुष्कळ गांगरत होती. नंतर बोलीभाषेत विषय मांडण्याचा सराव करून तिने प्रत्यक्ष कार्यक्रमात विषय मांडला. तेव्हा तो विषय अतिशय उत्स्फूर्त आणि प्रभावी झाला.
      संहितेतील सूत्रे पाठ करून पुस्तकी स्वरूपात मांडल्याने विषय कंटाळवाणा होऊ शकतो. त्यामुळे साधक-वक्त्यांनी संहितेतील सूत्रे वाचून न दाखवता स्वतःच्या शैलीत, तसेच बोलीभाषेत मांडावीत. विषय अवगत करून उत्स्फूर्तपणे बोलण्याचा प्रयत्न केल्यास श्रोत्यांना जवळीक वाटेल.

साधक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

संस्था आणि समिती यांना सहकार्य 
करणार्‍या धर्मप्रेमींच्या राष्ट्र-धर्म कार्याचे वृत्त 
आणि छायाचित्र त्वरित दैनिक कार्यालयात पाठवा !
१. धर्मप्रेमींनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि 
त्यांनी केलेले प्रयत्न प्रसिद्धीसाठी दैनिक कार्यालयात 
न पाठवणारे एका जिल्ह्यातील दायित्वशून्य साधक !
         एका शहरातील एक धर्मप्रेमी सनातन प्रभातचे वाचक असून ते वेळोवेळी संस्थेला सहकार्य करतात. एका कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांनी उत्स्फूर्त अभिप्राय देऊनही तो दैनिकात प्रसिद्धीसाठी देण्याचे उत्तरदायी साधकांनी नियोजन केले नाही, तसेच त्यांनी दिलेले एक विज्ञापन (जाहिरात) दैनिकात छापण्यास त्यांनी स्वतःच्या मनानेच नकार दिला.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास 
पोलिसांकडून अशी तत्परता कधीतरी दाखवली जाते का ?
       अयोध्या येथे बजरंग दलाकडून स्वसंरक्षणासाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांनी हातात बंदूक घेतली होती. या वेळी प्रतिस्पर्ध्यांना इस्लामी वेशात दाखवण्यात आले होते. यावर मुसलमानांच्या भावना दुखावल्याचे कारण देत पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bajrang dalke swaraksha shivirme virodhiyoko Islami veshme dikhanepar policedwara apradh pravisht.
Hinduoki raksha na kar panewali policeka virodh kyu?
जागो ! : बजरंग दल के स्वरक्षा शिविर में विरोधियों को इस्लामी वेश में दिखाने पर पुलिसद्वारा अपराध प्रविष्ट !
हिन्दुआें की रक्षा न कर पानेवाली पुलिस का विरोध क्यों ?
       हिंदु समाज हा देहाने जरी पुरुष असला, तरी राष्ट्रीयत्वाच्या संदर्भात मात्र नपुंसकच आहे.
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

प्रेम 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

विचारपूर्वक कृती करणे आवश्यक !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? 
याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

देशद्रोह्यांना देशाबाहेर हाकला !

संपादकीय 
      काश्मीरमध्ये दिवसेंदिवस भारतद्वेषाची बीजे खोलवर रूजत चालली आहेत. येथे भारतविरोधी घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्यातच आता पत्रकारांचीही भर पडली आहे. काश्मीरमधील सैन्याच्या एका कार्यक्रमात चालू असलेल्या राष्ट्रगीताच्या वेळी २ देशद्रोही पत्रकार जागीच बसून राहिले. अखेर एका सैन्याधिकार्‍याने त्यांना बाहेर हाकलले. त्यानंतरही त्यांनी उलट सैन्यावरच टीका केली. असले पत्रकार कसली पत्रकारिता करत असतील, हे उघड आहे. खरे तर काश्मीरमध्ये देशद्रोह फोफावण्यामागे आतापर्यंतच्या शासनांची बोटचेपी भूमिका कारणीभूत आहे. केवळ राष्ट्रहित समोर ठेवून हा देशद्रोह वेळीच चिरडला जाणे आवश्यक होते; पण मतांच्या राजकारणासाठी आतापर्यंत शासनस्तरावरून असे कधी केले गेले नाही. मोदी शासनाकडून काही प्रमाणात असलेली आशा त्यांनी पीडीपीसमवेत केेलेल्या युतीमुळे धुळीस मिळाली. अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणार्‍या अशा घटना रोखणार कोण आणि कशा ? हा सुमारे ६ दशकांपासूनचा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे. असो. तुर्तास देशद्रोह्यांना केवळ कार्यक्रमाच्या बाहेर हाकलण्यापेक्षा देशाबाहेर हाकलून देणे, एवढे तर शासन निश्‍चितच करू शकते. देशद्रोह्यांविषयी मोदी शासन हे तरी पाऊल उचलणार का ?चीनला धक्का !

संपादकीय 
     आपल्याला जे करायचे असते, ते कधीही बोलून दाखवायचे नसते, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अलिखित नियम मोदी शासनाने अचूकपणे अमलात आणत तेलसंपन्न इराणशी तेथील चबाहर बंदर विकसित करण्याचा करार केला. भारताचे हे पाऊल चिनी ड्रॅगनला जोरदार धक्का देणारे ठरले. माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच हा चीनचा आसुरी विस्तारवाद सर्वज्ञात आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनने जी दादागिरी चालवली आहे, त्यामुळे या समुद्रालगतचे सर्वच लहानसहान देशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महाकाय चीनला रोखण्यासाठी हे सर्व देश भारताकडे आशेने पहात आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn