Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीरमधील हरि प्रबात टेकडीचे नामांतर कोह-ए-मारण !

 • यापूर्वी शंकराचार्य टेकडीचेही इस्लामी नामकरण करण्यात आले. अशा घटना घडू नयेत यासाठी जनतेने भाजपला सत्तेत बसवले आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे !
 • पिडीपी-भाजप सरकारच्या राज्यात काश्मीरचे इस्लामीकरण !
      श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन विभागाने काश्मीर फोर्ट फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनात हरि प्रबात टेकडीचे नाव कोह-ए-मारण असे छापले आहे. यावर काश्मिरी हिंदूंनी आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीरचे इस्लामीकरण होत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. काश्मीरमधल्या हिंदूंची संघटना एएस्केपीसी आणि एपीएम्सीसी यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे.
      हिंदूंच्या विरोधानंतर आम्ही प्रकरणामध्ये लक्ष घातले असून निमंत्रण पत्रिकांचे वाटप थांबवण्यात आल्याची माहिती काश्मीरच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आली.
       हिंदूंनी म्हटले आहे की, हरि प्रबात हे प्राचीन नाव आहे. काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कट्टरता वाढत आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तेत असूनही असे प्रकार होत असल्याबाबत पनून काश्मीर संघटनेचे अध्यक्ष अजय चोंग्रू यांनी खेद व्यक्त केला आहे. काश्मीरमध्ये हिंदूंच्या ठिकाणांचे इस्लामी नामकरण करण्याचा घाट घालण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बाटला हाऊस चकमकीतील आतंकवादी इसिसच्या चित्रफितीमध्ये दिसले !

बाटला हाऊस येथील चकमक खोटी ठरवून 
जिहादी आतंकवाद्यांना निरपराध ठरवणारी काँग्रेस 
आणि अन्य पक्ष यांंचे जिहादी आतंकवादप्रेम उघड !
       नवी देहली - नुकतेच इसिसकडून प्रसारित करण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये दिसलेल्या काही आतंकवाद्यांमध्ये भारतातील आतंकवाद्यांचा समावेश आहे. यात फहाद याची आधीच ओळख पटली होती. आता देहलीतील बाटला हाऊस येथे २००८ मध्ये झालेल्या आतंकवाद्यांच्या विरोधातील चकमकीच्या वेळी पळून गेलेले दोन आतंकवादी दिसून आले आहेत. यातील एकाचे नाव अबू राशीद आहे, तर दुसर्‍याचे नाव महंमद साजिद आहे. राशीद बाटला हाऊस चकमकीपासून फरार आहे, तर साजिद कर्णावती आणि जयपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटांत सहभागी होता.
        साजिद आणि राशीद उत्तरप्रदेश येथील आझमगडच्या संजारपूर येथे रहाणारे आहेत. या दोघांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षिस घोषित केलेले आहे. बाटला हाऊच्या चकमकीतून एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली होती. यावरून काँग्रेसने विरोध केला होता. दिग्विजय सिंह यांच्यासारखे काही काँग्रेसी नेते, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आदी नेते या आतंकवाद्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवारांचे सांत्वन करत होते आणि आतंकवाद्यांना निर्दोष ठरवत होते. त्यांचे जिहादी आतंकवादप्रेम या चित्रफितीमुळे उघड झाले आहे.

महाविद्यालयांनी अकरावीला प्रवेशप्रक्रियेत कोट्यातील प्रवेश करणे, हा न्यायालयाचा अवमान !

 • शिक्षण विभागच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असेल, तर शासनाच्या अन्य विभागांची स्थिती कशी असेल, याचा विचारच न केलेला बरा !
 • सिस्कॉम संस्थेची शिक्षण विभागाकडे तक्रार
       पुणे, २४ मे - अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे केंद्रीय करावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतांनाही महाविद्यालयातून विविध कोट्यातून दिले जाणारे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने न करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा आहे, अशी तक्रार सिस्कॉम या संस्थेने शिक्षण विभागाकडे केली आहे.
      तक्रारीत म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांत अल्पसंख्याक, इन हाउस, व्यवस्थापन या कोट्यातील प्रवेश महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. (याला शिक्षण विभागाचा मनमानी कारभार म्हणायचा कि तथाकथित शिक्षणसम्राटांसाठी सिद्ध केलेले धोरण म्हणायचे ? सदर निर्णयाविषयी राज्य शासन लक्ष देईल का ? - संपादक) प्रवेशासाठी केंद्रीय पद्धत वापरण्यात येत असेल, तर महाविद्यालयीन स्तरावर कोणतेही प्रवेश करण्यात येणार नाहीत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै २०१० या दिवशी एका याचिकेच्या सुनावणीत दिला आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश करण्यासाठी सर्व महाविद्यालयांची संकेतस्थळे अद्ययावत आहेत का, त्यांची नावे माहिती पुस्तकात का देण्यात आली नाहीत, असे प्रश्‍नही तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.

केंद्रशासनाच्या बहुचर्चित नमामि गंगा स्वच्छता अभियानातून जपानच्या आस्थापनाची माघार !

 • राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा आदी विषयांकडे दुर्लक्ष करणारे केंद्रशासन कोणताही वाद नसलेल्या गंगा नदी स्वच्छतेविषयी गाजावाजा करून निष्क्रीय रहाते, हे अनपेक्षित आहे !
 • आस्थापनाच्या सूचनांवर केंद्रशासन २ वर्षे निष्क्रीय राहिल्याचा परिणाम !
        लक्ष्मणपुरी (लखनौ) - गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमामि गंगा हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी जपानच्या एन्जेएस् कन्सल्टंट आस्थापनाचे सहकार्य घेण्यात येत आहे; मात्र या आस्थापनाने या अभियानातून माघार घेतली आहे. या आस्थापनाने केंद्रशासनाला गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी काय करावे लागेल, यासंबंधी सल्ला दिला होता. मात्र गेल्या २ वर्षांत शासनाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने आस्थापनाने या प्रकल्पावर काम करण्यास नकार दिला आहे.

फिलिपिन्सचे निर्वाचित राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी कॅथलिक चर्चला पाखंडी ठरवले !

      मनीला - फिलिपिन्सचे निर्वाचित राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी कॅथलिक चर्चवर टीका केली आहे. फिलिपिन्समधील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ ३ मुले जन्माला घालण्याचा कायदा करण्यासाठी दुतेर्ते प्रयत्न करत आहेत. त्याला कॅथलिक चर्चकडून विरोध केला जात आहे. चर्च गर्भपात आणि गर्भनिरोध यांना विरोध करत आहे. त्यावरून दुतेर्ते चर्चवर टीका करत आहेत.
दुतेर्ते म्हणाले की,
        कॅथलिक चर्च म्हणजे पाखंडीपणाचे अड्डे आहेत. मी ख्रिस्ती असलो, तरी वस्तूनिष्ठ विचारांचा आहे; म्हणूनच वाढत्या लोकसंख्येला नियंत्रित करू इच्छितो. मी चर्चच्या परंपरांचा विरोध करत आहे. चर्च ही सर्वांत मोठी पाखंडी संस्था आहे. त्यांनी सरकारच्या कारभाराची दखल घेणे बंद केले पाहिजे. अनेक बिशप गरिबांच्या पैशावर स्वतः धनाढ्य बनत आहेत.

विश्रामबाग परिसरात ६ वर्षांची बालिका कुत्र्यांच्या आक्रमणात ठार !

नागरिकांच्या जिवाशी खेळणारे दायित्वशून्य 
महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी !
       सांगली, २४ मे (वार्ता.) - शहरात विश्रामबाग परिसरातील सरस्वतीनगर भागात सकाळी ६ वाजता प्रातर्विधीसाठी गेलेल्या सुंदरी भारती (वय ६ वर्षे) हिच्यावर कुत्र्यांनी आक्रमण करून तिचे लचके तोडले. अत्यंत गंभीर अवस्थेत तिला शासकीय रुग्णालयात नेले; मात्र रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. सध्या महापालिका क्षेत्रात जवळपास प्रत्येक भागात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रीयतेच्या संदर्भात नागरिकांत पुष्कळ संताप दिसून येत आहे. (भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, हे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. भटक्या कुत्र्याने मुलीचा जीव घेतल्यानंतरही त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले न उचलणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना जनतेने खडसवावे ! - संपादक)
       या संदर्भात पत्रकारांनी महापौर हारुणभाई शिकलगार यांना विचारले असता ते म्हणाले, कुत्र्यांना पकडणारी एकच डॉग व्हॅन आहे. आपल्याकडे सध्या मनुष्यबळ अपुरे असून कुत्र्यांची नसबंदी करणारा डॉक्टरही उपलब्ध नाही. या संदर्भात सर्व स्वच्छता निरीक्षकांची तातडीने बैठक बोलावली आहे. (महापौरांनी लालफीतीतील उत्तरे न देता कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे ! - संपादक)

देशात नेहरू परिवारामुळे बलात्कार होतात ! - भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा

केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे त्याच्या नेत्यांनी 
असे केवळ सांगणे अपेक्षित नाही, तर अशा घटनांवर 
प्रतिबंध आणण्यासाठी कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
       अल्वर (राजस्थान) - देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना नेहरू परिवार उत्तरदायी असून त्याच्यामुळेच देशात बलात्कार होतात, असे वक्तव्य भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केले आहे. आहुजा यांनीच काही महिन्यांपूर्वी जेएन्यू हा शारीरिक संबंध निर्माण करणार्‍यांचा अड्डा असल्याचे म्हटले होते. आहुजा म्हणाले की, देशातील नेहरू आणि गांधी परिवारांचे सर्व पुतळे तोडायला हवेत. सद्दाम हुसेन यांचा पुतळा तोडल्यानंतर नागरिक पुतळ्यावर थुंकले होते. याप्रमाणेच नागरिक यांच्या पुतळ्यांवर थुंकतील. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामुळेच देशात समस्या निर्माण होत आहेत.

ब्रेड खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो ! - तपासणीचा निष्कर्ष

       नवी देहली - ब्रेडमुळे कर्करोग होऊ शकतो, अशी चेतावणी सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट (सीएस्ई) या संस्थेने दिली आहे. ब्रेड आणि पिझ्झा चा ब्रेड यांमध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे कर्करोग होऊ शकतो, असा दावा संस्थेने केला आहे. (जे प्रशासनाकडून झाले पाहिजे ते खाजगी संस्थांना करावे लागत आहे, हे शासनाला लज्जास्पद होय ! ब्रेड आणि पिझ्झा चा ब्रेड प्रमाणे अन्य अन्नपदार्थांमुळे असे आजार होत आहेत का, याची पडताळणी शासनाने केली पाहिजे ! - संपादक)
१. सीएस्ई या संस्थेने देहलीतील काही आस्थापनांंमध्ये उत्पादित होत असलेल्या ब्रेडचे नमुने तपासले. त्यात पोटॅशियम ब्रोमेट आणि आणि पोटॅशियम आयोडेट असे धोकादायक रासायनिक घटक असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे संस्थेने म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातून १३ अल्पवयीन आणि अंबड (जिल्हा जालना) येथून १० प्रेमीयुगुल यांचे पलायन !

 • चित्रपटांद्वारे समाजाचे होणारे नैतिक अधःपतन रोखण्यासाठी राज्यकर्त्यांनी जनतेला साधना आणि धर्माचरण शिकवणे अपरिहार्य आहे ! असे राज्यकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
 • सैराट चित्रपटाचा उदोउदो करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
 • सैराट या मराठी चित्रपटाचे दुष्परिणाम !
       बीड - सैराट नावाचा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नायक आणि नायिका यांचे प्रेमप्रकरण दाखवण्यात आले असून घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ते पळून जाऊन लग्न करत असल्याचे दाखवले आहे. हा चित्रपट पाहून बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील १३ अल्पवयीन मुलगे अल्पवयीन मुलींना घेऊन पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. काही पालकांनी तर आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर आल्याचे सांगितले. (पालकांनो, आपल्या पाल्यांवर बालपणापासूनच साधनेचे संस्कार करा आणि त्यांना धर्मशिक्षण द्या ! - संपादक)

उत्खननासाठी अवजड यंत्रांचा वापर केल्याने प्राचीन मूर्ती भंग

मध्यप्रदेशमध्ये खनिज 
व्यावसायिकांकडून रामायणकालीन मूर्तींची लूट !
       भोपाळ - मध्यप्रदेशमधील चित्रकूटच्या सारभंगा आश्रमाजवळील इ.स. पूर्व १० व्या आणि ११ व्या शतकांतील जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या मंदिरांतील मूर्ती, शिल्पाकृती आणि इतर अवशेष यांची खनिज व्यावसायिकांनी लूट चालवली आहे. हे स्थळ भगवान श्रीरामाच्या पाऊलखुणासाठी प्रसिद्ध आहे. येथील १०० एकरवर पसरलेल्या सिद्ध पहर या टेकडीवर भगवान श्रीरामाने वनवासाची १२ वर्षे घालवली होती. गेल्या ५ वर्षांमध्ये खनिज व्यावसायिकांनी संवर टेकडीवर आश्रमाच्या जवळ खनिज काढतांना प्राचीन मंदिरांतील मौल्यवान वस्तू पळवल्या, असे मध्यप्रदेश पुरातत्व खात्याच्या अहवालात म्हटले आहे. खनिज उत्खननासाठी अवजड यंत्रांचा वापर केला गेल्याने बर्‍याच प्राचीन मूर्ती भंग पावल्या. आश्रमाजवळील सिद्ध पहर ही टेकडी बेकायदा खनिज उत्खननामुळे नष्ट झाली, असे या अहवालात म्हटले आहे. (भाजपची सत्ता असलेल्या मध्यप्रदेशमध्ये हिंदूंची श्रद्धास्थाने नष्ट केली जात असूनही शासन ते रोखण्यासाठी पावले उचलतांना दिसत नाही. हिंदूंची श्रद्धास्थाने वाचवण्यासाठी आता हिंदूंनीच संघटित झाले पाहिजे. शासनाने अन्य पंथियांच्या बाबतीत अशी भूमिका घेतली असती का ? - संपादक)

दुबईमध्ये शेख स्वखर्चाने मंदिर बनवत आहेत, तर भारतात राममंदिरासाठी न्यायालयाकडे पहावे लागत आहे ! - साक्षी महाराज

       लक्ष्मणपुरी (लखनौ) - दुबईमध्ये शेख मंदिर बनवण्यासाठी भूमी आणि पैसे देत आहे, तर भारतात अयोध्येत राममंदिर बनवण्यासाठी आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागत आहे, अशी खंत भाजपचे उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केली आहे. ते मथुरा येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.
साक्षी महाराज म्हणाले,
१. हज यात्रेवर कर लावल्यावर चिंता व्यक्त केली जाते; मात्र हिंदूंच्या यात्रांवर कर लावल्यावर कुणालाही चिंता वाटत नाही.

भोसरी (पुणे) येथील ४० कोटी रुपयांचा भूखंड अवैधरित्या ३ कोटी ७५ लक्ष रुपयांत खरेदी

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप 
     पुणे, २४ मे - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा ४० कोटी रुपये बाजारभाव असलेला भूखंड ३ कोटी ७५ लक्ष रुपयांत अवैधरीत्या खरेदी केल्याचा आरोप येथील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केला आहे. यावर महसूलमंत्री कार्यालयाने 'हा खरेदीचा व्यवहार कायदेशीर प्रक्रियेनुसारच झाला आहे', असा खुलासा केला आहे. 

मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील पदे रहित; धर्मादाय आयुक्तांचा निकाल

छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का ! 
     मुंबई, २४ मे (वार्ता.) - मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील (एम्ईटी) कथित १७८ कोटी रुपयांच्या अपव्यवहाराच्या प्रकरणी राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे गेल्या ४ वर्षांपासून विविध प्रकरणांत चालू असलेल्या सुनावणींपैकी एका प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे. या निकालानुसार पंकज आणि समीर भुजबळ यांची अनुक्रमे एम्ईटीचे सचिव आणि खजिनदार ही पदे रहित करण्यात आली आहेत.

गांधीनगर येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

शिवसेना शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना श्री. संजय पवार
       गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), २४ मे (वार्ता.) - येथील शिवाजी चौक येथे शिवसेना फेरीवाले संघटना शाखेच्या फलकाचे उद्घाटन २१ मे या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या हस्ते झाले. शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.

(म्हणे) लव्ह-जिहादसारख्या घटनांचे भडक वृत्तांकन टाळावे !

सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून मुसलमानांना आरक्षण द्यावे !
                                           मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात ठराव !
 • लव्ह जिहादची वृत्ते दाबून ठेवणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे नव्हे का ? 
 • मुसलमानांच्या या असहिष्णुतेविषयी आता मुसलमान कलाकार तोंड उघडणार का ?
 • हिंदूंचा वंशविच्छेद करणारा लव्ह जिहादच करू नये, असा ठराव का संमत केला नाही ?
     कोल्हापूर, २४ मे (वार्ता.) - लव्ह-जिहादसारख्या घटनांचे भडक वृत्तांकन टाळावे, असा ठराव मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला आहे. (म्हणजे मुसलमानांनी हिंदूंवर अन्याय करायचा आणि वरून त्याला कोणी प्रसिद्धीही द्यायची नाही, हा तोंड दाबून बुक्क्याचा मार असणारा ठराव हिंदू सहिष्णु असल्यामुळेच संमत होऊ शकला आहे. यावरून आता हिंदुत्ववादी साहित्य संमेलनाची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे कुणाला वाटले, तर त्यात नवल ते काय ? - संपादक) येथील दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंगच्या वतीने घेण्यात आलेल्या मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात हा ठराव संमत करण्यात आला. २१ आणि २२ मे या दिवशी असे दोन दिवस हे संमेलन केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. २२ मे या दिवशी समारोपाच्या प्रसंगी काही ठराव करण्यात आले.

भारत अधिकृतरित्या हिंदु राष्ट्र घोषित झाल्यावरच देशातील अहिंदू सुखी होतील - शरद पोंक्षे

     निगडी (पुणे), २४ मे - आपल्या देशात बहुसंख्य माणसे हिंदु असतांना तार्किकदृष्ट्या ते हिंदु राष्ट्र आहे, हे सांगायला कोणाची आवश्यकता नाही. हा देश जेव्हा अधिकृतरित्या हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईल; तेव्हाच या देशातील अहिंदू सुखात रहातील, असे प्रतिपादन अभिनेते आणि व्याख्याते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. येथील जयहिंद मित्र मंडळ ट्रस्टने कै. अशोक शाळू यांच्या स्मरणार्थ आयोजित ५ दिवसीय जयहिंद लोकजागर व्याख्यानमालेत ते स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर २१ मे या दिवशी बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेविका सुलभा उबाळे, मंडळाचे अध्यक्ष राजेश फलके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

राहुरी (जिल्हा नगर) येथे वाळूतस्करांची महसूल पथकावर दगडफेक

महसूल विभागाच्या किती कर्मचार्‍यांनी मार खाल्ल्यावर 
राज्य शासन वाळूतस्करांच्या मुसक्या आवळणार आहे ? 
     राहुरी, २४ मे - राहुरी खुर्द येथील मुळा नदीपात्रात वाळूतस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर २२ मे या रात्री पुष्कळ प्रमाणात दगडफेक करीत आक्रमण केले. यामध्ये कामगार तलाठी हरिभाऊ मुठे हे घायाळ झाले असून मंडलाधिकारी बी.जी. सोडणर आणि तलाठी शिवाजी टेमकर घटनास्थळावरून जीवाच्या भीतीने पसार झाले. त्यामुळे ते या आक्रमणातून बचावले आहेत. (नगर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचे द्योतक ! - संपादक) उपरोक्त तिघे जण मुळा नदीपात्रातील वाळूची तस्करी रोखण्यासाठी राहुरी खुर्द येथे गेले होते. वाळूउपसा करणार्‍या तस्करांना पथक आल्याचे कळताच त्यांनी गलोलीच्या साहाय्याने तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्यावर दगडांचा मारा केला. 

क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणे म्हणजे त्यांचा अक्षम्य अवमान होय - हेमंत सोनवणे

सातारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी धर्माभिमानी हिंदू
     कराड, २४ मे (वार्ता.) - देहली विद्यापिठाच्या 'भारतका स्वतंत्रता संघर्ष' या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना 'आतंकवादी' ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. ज्या क्रांतीकारकांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांचीही आहुती दिली, त्यांना स्वतंत्र भारतात आतंकवादी म्हणणे, हा क्रांतीकारकांचा अक्षम्य अवमानच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केले

सनातनच्या हुबळी (कर्नाटक) येथील ३ साधिकांनी गाठला ६१ टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर !

डावीकडून सौ. पुष्पा कामत (वय ६७ वर्षे), श्री. काशिनाथ प्रभु,
सौ. उमा पट्टणशेट्टी (वय ६१ वर्षे) आणि सौ. लीला हंडीगोल (वय ५६ वर्षे)
       हुबळी (जिल्हा धारवाड, कर्नाटक) - येथील सनातनच्या ३ साधिका ६१ टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्या. सौ. पुष्पा कामत यांनी ६३ टक्के आध्यात्मिक स्तर, सौ. लीला हंडीगोल यांनी ६२ टक्के आध्यात्मिक स्तर, तर सौ. उमा पट्टणशेट्टी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी ६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. काशिनाथ प्रभु यांच्या हस्ते साधिकांचा सत्कार करण्यात आला.

पुणे विभागात १५ प्रतिशत खाद्यनमुने अल्प दर्जाचे, तर ५ प्रतिशत असुरक्षित

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पडताळणीचे विश्‍लेेषण
     पुणे, २४ मे - अन्न आणि औषध प्रशासनाने पुणे विभागात केलेल्या खाद्यनमुन्यांच्या पडताळणीमध्ये १५ प्रतिशत नमुने हे अल्प दर्जाचे, तर ५ प्रतिशत खाद्यनमुन्यांमध्ये खाद्यपदार्थ आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे विश्‍लेषणातून उघड झाल्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. (जनतेच्या जिवाशी खेळणारी आस्थापने ! यावर अन्न आणि औषध विभागाने कठोर कारवाई आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. - संपादक) पुण्यात २२ मे या दिवशी विभागाची आढावा बैठक बापट यांनी घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

म्हणे) मालेगाव बॉम्बस्फोट आणि मुंबई आक्रमण यांचा पुनर्तपास झाल्यास ब्राह्मणी व्यवस्था कोसळेल !

एस्.एम्. मुश्रीफ यांचे पुन्हा नेहमीचे स्वरचित हिंदुद्वेषाचे तुणतुणे
      पुणे, २४ मे (वार्ता.) - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांचे राज्यघटनाविरोधी षड्यंत्र हेमंत करकरे यांनी उघडकीस आणले होते. त्या संदर्भात त्यांच्याकडे भ्रमणसंगणकात अनेक ध्वनीचित्रचकत्या होत्या. म्हणूनच अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांनी हेमंत करकरे यांची हत्या केली. मालेगाव बॉम्बस्फोट आणि मुंबईवरील आतंकवादी आक्रमण यांचा खर्‍या अर्थाने पुनर्तपास झाला, तर ब्राह्मणी व्यवस्था कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुनर्तपासाची मागणी करावी, अशी हिंदुद्वेषी मागणी माजी पोलीस महानिरिक्षक एस्.एम्. मुश्रीफ यांनी केली. १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राह्मणवादी गट समाजातील अनेक तणावांना कारणीभूत आहे. अशा गटांपासून सावध राहणे आवश्यक आहे, अशीही गरळओक त्यांनी केली. पत्रकार संजय आवटे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. (माजी पोलीस महानिरिक्षक एस्.एम्. मुश्रीफ यांचा स्वैर कल्पनाविलास ! मुळात देशात कोणतीही ब्राह्मणी व्यवस्था आज अस्तित्वात नाही. त्यामुळे ती कोसळण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. हिंदुद्वेषातून उमटणार्‍या मुश्रीफ यांच्या उमाळ्यांकडे म्हणूनच लक्ष देण्याची आवश्यकता नाही. - संपादक)इचलकरंजी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची अभूतपूर्व मिरवणूक

     इचलकरंजी, २४ मे (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने येथे अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली. शिस्तबद्ध मिरवणूक कशी असावी, याचा जणू प्रत्ययच या मिरवणुकीत श्री शिवप्रतिष्ठानच्या सहस्रो कार्यकर्त्यांनी दाखवून दिला. श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांची उपस्थिती आणि शिवचरित्राचे देखावे यांमुळे मिरवणुकीत पुष्कळ उत्साह होता. 
१. शिवजयंतीनंतरही आतापर्यंत प्रतिदिन विविध संघटनांच्या वतीने भव्य मिरवणुका काढल्या जात आहेत.
२. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने काढलेल्या मिरवणुकीत अफझलखान वध आणि पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे कटाऊट फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

सर्वसामान्यांचे सामाजिक ज्ञान आणि सामाजिक प्रश्‍न यांची जाणीव वाढणे, यांसाठी 'जिजाऊ व्याख्यानमाले'चे आयोजन

चिंचवडगाव (पुणे) येथे गांधीपेठ तालमीच्या माध्यमातून २५ वर्षे समाजप्रबोधन 
     चिंचवड, २४ मे - पिंपरी-चिंचवड शहर 'औद्योगिक नगर' म्हणून ओळखले जाते. येथील सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक ज्ञानात भर पडावी आणि स्थानिक सामाजिक प्रश्‍नांचीही जाणीव व्हावी, तसेच आपल्या वेगवेगळ्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने जि'जाऊ व्याख्यानमाला' आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी १३ ते १९ मे या कालावधीत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी या व्याख्यानमालेला २५ वर्षे पूर्ण झाली असून या उपक्रमामध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ गोलांडे हे सक्रीय सहभागी होतात. 

नाशिक येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गोसेवक नेमिचंदभाई पोद्दार यांचा वाढदिवस गोशाळेत साजरा

श्री. पोद्दार यांचे औक्षण करतांना सनातनच्या साधिका
         नाशिक - येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गोसेवक श्री. नेमिचंदभाई पोद्दार यांचा वाढदिवस २२ मे या दिवशी तिथीनुसार येथील नंदिनी गोशाळेत साजरा करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या साधिकांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर सनातन संस्थेचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी सनातनचे साधक श्री. अनिल पाटील यांनी तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध गुन्हे प्रविष्ट करण्याविषयी निवेदन

अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुरेश इटनाळ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     बेळगाव - देहली विद्यापिठात पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारक भगतसिंग, सूर्यसेन आणि चंद्रशेखर आझाद यांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी २३ मे २०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी यांच्या वतीने निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुरेश इटनाळ यांना देण्यात आले. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातचा विशेष रंगीत विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक : ३१ मे २०१६ 
पृष्ठ संख्या : १० 
मूल्य : ५ रुपये 
 या अंकात अनुभवा ! 
* परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या धार्मिक विधींचा सविस्तर वृत्तांत 
* सर्व विधींचे छायाचित्रात्मक सादरीकरण 
     यांसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण 
आपली प्रत आजच नोंदवा ! 
 विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २९ मे 
या दिवशी सायं. ५ वाजेपर्यंत 'इआरपी' प्रणालीत भरावी.

अपात्रतेच्या कारवाईविषयी अजित पवार यांसह इतर प्रकरणांत सुनावणीची प्रक्रिया पुन्हा चालू !

     मुंबई, २४ मे (वार्ता.) - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांसह ४३ जणांना जिल्हा सहकारी अधिकोषाच्या संचालकपदी अपात्र ठरवण्याच्या प्रक्रियेत पवार यांसह काही जणांच्या प्रकरणांची पुणे येथे जिल्हा सहनिबंधकांच्या वतीने २४ मे या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मागील ५ मासांपासून ही प्रक्रिया चालू असून ती पूर्ण होऊन अहवाल सादर झाल्यानंतर उच्च न्यायालयाकडून याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

काँग्रेस आमदाराला मारहाण करणार्‍या भाजपच्या नगरसेवकाला अटक !

भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून अशी कृती अपेक्षित नाही ! 
पक्षाच्या नेत्यांनी याची नोंद घेणे अपेक्षित आहे !
       गोंदिया - काँग्रेसचे आमदार तसेच लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांना मारहाण करणारे भाजप नगरसेवक शिवकुमार शंकरलाल शर्मा आणि त्यांचा सहकारी राहुल श्रीवास २३ मे या दिवशी पोलिसांपुढे शरण आले. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. गोंदिया येथील पत्रकार परिषदेत शिव शर्मा यांनी गुंडगिरी करीत ९ एप्रिल या दिवशी गोपालदास अग्रवाल यांना मारहाण केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. आमदार अग्रवाल ९ एप्रिलला पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांनागरसेवक शिवकुमार शंकरलाल शर्मा आणि त्यांचा सहकारी राहुल श्रीवास हे दोघे या पत्रकार परिषदेत शिरले आणि कुणाला काहीही न विचारता सरळ गोपालदास अग्रवालांजवळ जाऊन त्यांना असभ्य शिवीगाळ करून बुक्क्यांनी मारहाण केली होती. भाजपच्या विरोधातील सूत्रे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितली होती.ठाण्यात २५० धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याचा आयुक्तांचा आदेश !

     ठाणे, २४ मे (वार्ता.) - ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांत धोकादायक अन् अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या अनुमाने २५० इमारती पावसाळ्यापूर्वी त्वरित रिकाम्या करण्याचा आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २१ मे या दिवशी दिला दिला. (इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक स्थितीला जाईपर्यंत महापालिकेचे अधिकारी झोपले होते का ? आता रहिवाशांना प्रथम पर्यायी निवारा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. - संपादक) आयुक्तांच्या नव्या आदेशामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या इमारती रिकाम्या करण्यासाठी धावपळ चालू झाली आहे. यामुळे रहिवासी आणि महापालिका यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक ५४ आणि ५५ अतिधोकादायक ठरवून रिकामी करावयास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला रहिवाशांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले.

मुसलमानांनी असे केले तर ? - असदुद्दीन ओवैसी

बजरंग दलाकडून शस्त्र 
चालवण्याचे प्रशिक्षण शिबीर
       नवी देहली - उत्तरप्रदेशातील फैजाबाद येथे बजरंग दलाकडून हिंदूंच्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. यात आतंकवाद्यांच्या रूपात मुसलमानाला दाखवण्यात आल्याने एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटद्वारे टीका केली, जर एखाद्या मुसलमान संघटनेकडून असे करण्यात आले, तर काय होईल ?

धर्माभिमान्याच्या प्रबोधनानंतर हिंदु मुलीने गळ्यातील 'क्रॉस' काढला !

असे धर्माभिमानी सर्वत्र हवेत ! 
     कोल्हापूर, २४ मे (वार्ता.) - येथील धर्माभिमानी श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले यांनी गळ्यात 'क्रॉस' घातलेल्या एका हिंदु मुलीचे प्रबोधन केल्यावर तिने 'क्रॉस' काढून टाकला. 
     येथील श्री महालक्ष्मी मंदिरात २० मे या दिवशी कुटुंबासमवेत आलेल्या १७ वर्षांच्या मुलीने गळ्यात 'क्रॉस' घातला होता. श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले यांनी मुलीच्या आईला याविषयी विचारले; पण वारंवार सांगूनही ती 'क्रॉस' काढत नसल्याचे आईने सांगितले. श्री. अस्वले यांनी प्रबोधन करतांना तिला सांगितले," 'क्रॉस' गळ्यात घालणे, ही हिंदु धर्माच्या विरोधातील आणि हिंदुद्वेषी गोष्ट आहे. गळ्यातील 'क्रॉस' काढून टाकावा. त्यापेक्षा 'ॐ'चे पदक गळ्यात घालू शकतो." त्यानंतर मुलीने 'क्रॉस' काढला. मुलीच्या आईने श्री. अस्वले यांचे आभार मानले.

बांगलादेशातील बौद्ध भिख्खूच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईत बौद्ध भिख्खूंचा मोर्चा

किती हिंदू असे मोर्चे काढतात ? 
     मुंबई - बांगलादेशात झालेल्या बौद्ध भिख्खूच्या हत्येच्या निषेधार्ह येथील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बौद्ध भिख्खूंनी १३ मार्च या दिवशी मोर्चा काढला होता. बांगलादेशातील अल्पसंख्यांक बुद्धांच्या रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे समजते.

१३ मार्च या दिवशी विनयभंगाचा आरोप करणार्‍या महिलेकडून दोन महिन्यांनंतर तक्रार का? - राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रश्‍न

वानलेसवाडी येथील संत बाळूमामा 
मंदिरातील पुजार्‍यांना अटक केल्याचे प्रकरण
       सांगली, २४ मे (वार्ता.) - वानलेसवाडी येथील ढेरे मळ्यातील संत बाळूमामा मंदिर हे धनगर समाजाचे अधिष्ठान आहे. या मंदिराचे पुजारी परशुराम महाराज नाईक आणि त्यांचा भाऊ त्रिज्योत यांना अंनिसच्या महिला कार्यकर्तीने दिलेल्या कथित तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित कार्यकर्तीने १३ मार्च या दिवशी विनयभंगाचा आरोप केला आहे. विनयभंगाची घटना जर १३ मार्च या दिवशी झाली, तर तक्रार दोन मासानंतर का, असा प्रश्‍न राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आणि धनगर समाजातील भाविक यांनी उपस्थित केला आहे.
       या संदर्भात कार्यकर्ते म्हणाले की, या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. येथे अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा जादूटोणा-लिंबू, तसेच अन्य प्रकार घडलेला नाही. त्यामुळे अंनिसकडून परशुराम महाराज यांच्यावर प्रसिद्धीसाठीच खोटी तक्रार देण्यात आली आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

लातूर येथे पर्जन्यवृष्टी महायज्ञास आजपासून प्रारंभ !

हवन, व्याख्यान, प्रवचन, कीर्तन आदी भरगच्च कार्यक्रम 
     लातूर - आर्य प्रतिनिधी सभा मुंबई आणि पर्जन्यवृष्टी महायज्ञ समिती, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बालाजी मंदिराच्या परिसरात २५ मे २०१६ या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी आहुतीने पर्जन्यवृष्टी महायज्ञास प्रारंभ होणार आहे. तर २४ मेपासून यज्ञानिमित्तच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. हा यज्ञ २९ मे २०१६ पर्यंत असून या कालावधीत हवन, व्याख्यान, प्रवचन, कीर्तन आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती महायज्ञ समितीचे अध्यक्ष एस्.आर्. मोरे, स्वागताध्यक्ष विष्णु भुतडा यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. बालाजी मंदिर परिसरातील इंद्रधाम येथे पर्जन्यवृष्टी महायज्ञाची जय्यत सिद्धता करण्यात आली असून या यज्ञाचे मुख्य ब्रह्मा गुरुकुल येडशी येथील आचार्य सुभाषचंद्रजी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी करण्यात येणार आहेत. 

विद्यार्थ्यांना निकालानंतर ६ मासांत पदवी द्या !

असे आदेश विद्यापिठांना का द्यावे लागतात ? त्यांच्या ते स्वतःहून कसे लक्षात येत नाही ?
विद्यापीठ अनुदान आयोगाचे विद्यापिठांना आदेश
     पुणे, २४ मे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल जाहीर होतो आणि विद्यार्थी पदवी घेण्यासाठी पात्र ठरल्यापासून ६ मासांच्या आत, म्हणजे १८० दिवसांत त्याला पदवी देण्यात यावी, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील सर्व विद्यापिठांना दिले आहेत. विद्यापिठाकडून वेळेवर पदव्या दिल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरी यांच्या संधी गमवाव्या लागतात, असेही आयोगाने म्हटले आहे.

मालेगाव स्फोटप्रकरणातील निर्दोष मुसलमानांना प्रत्येकी १० कोटी रुपये हानीभरपाई द्या !

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनची आंदोलनात मागणी
     पुणे, २४ मे - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या मुसलमानांचे पुनर्वसन करावे, तसेच त्यांना प्रत्येकी १० कोटी रुपये हानीभरपाई मिळावी आणि मालेगाव येथे घर देण्यात यावे, या मागण्यांसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन संघटनेच्या वतीने २० मे या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी दोषी असलेले अधिकारी के.पी. रघुवंशी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांना देण्यात आले. या आंदोलनात रिपब्लिकन युवा मोर्च्याचे अध्यक्ष राहुल डंम्बडे, तसेच एम्.आय.एम् आणि पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (किती हिंदू निरपराध असलेल्या हिंदूंच्या सुटकेसाठी अशी मागणी करतात ? - संपादक)

सांगली महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचे किरीट सोमय्या यांचे आश्‍वासन !

     सांगली, २४ मे (वार्ता.) - भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शासन आणि न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. नागरिक हक्क संघटनेचे श्री. वि.द. बर्वे, सर्वश्री सतीश साखळकर, तानाजी सरगर यांनी सोमय्या यांची मुंबई येथे भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले. या संदर्भात लवकरच सोमय्या यांची सांगलीत सभा घेण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती श्री. बर्वे यांनी दिली. हिंदु राष्ट्र-स्थापनेकरिता धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग

श्री. रमेश शिंदे
श्री. सुनील घनवट
     धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. याचा परिणाम म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली आहे. स्वतंत्र भारतातील हिंदु युवकांच्या मनात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात केलेले बीजारोपण आता अंकुरत असल्याचे दिसत आहे. याच वेळी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुसलमान मदरशांतून, तर ख्रिस्ती चर्च आणि कॉन्व्हेंट यांतून आपापल्या धर्माचे शिक्षण घेतच आहेत. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. त्यातूनच हिंदूंच्या मनात धर्माभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना सिद्ध करता येईल.

गुजरातमध्ये उघडली जाणार शरीयतनुसार चालणारी पहिली इस्लामिक बँक !

      नवी देहली - संयुक्त अरब अमिरातमधील इस्लामिक डेव्हलपमेंट बँक त्याची भारतातील पहिली शाखा गुजरातमध्ये उघडत आहे. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातचा दौरा केल्यावर या संदर्भात करार केला होता. ही बँक शरीयत कायद्यानुसार काम करते. जगातील ५६ इस्लामी देशांत हिच्या शाखा आहेत. या बँकेकडून राज्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी ३० रुग्णवाहिकाही देण्यात येणार आहेत.

भारत या शब्दाऐवजी दक्षिण आशिया हा शब्द वापरण्याची सूचना कॅलिफोर्निया पाठ्यपुस्तक आयोगाने फेटाळली !

भारतियांच्या विरोधाचा परिणाम !
       पुणे - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील इतिहास आणि सामाजिक शास्त्रांच्या पाठ्यपुस्तकात भारत या शब्दाऐवजी दक्षिण आशिया हा शब्द वापरण्यात येणार नाही, असे तेथील आयोगाने घोषित केले आहेे.
      कॅलिफोर्नियातील शाळांत शिकवल्या जाणार्‍या साऊथ एशिया स्टडीज् या विषयाच्या काही शिक्षकांनी अभ्यासक्रम गुणवत्ता निश्‍चित करणार्‍या कॅलिफोर्निया बोर्ड ऑफ एज्युकेशन या मंडळाकडे काही सूचना केल्या. त्यात भारताला दक्षिण आशिया म्हणण्यात यावे, अशीही सूचना होती. त्याला विरोध करण्यात आला होता. भारत या शब्दाने जे अभिप्रेत आहे किंवा भारत या शब्दाने ज्याचा निर्देश होतो. त्यासाठी दक्षिण आशिया हा शब्द वापरू नये यासाठी ऑनलाईन सह्यांची मोठी मोहीम जागतिक पातळीवर हाती घेण्यात आली होती.

चायनिज् मुजोरी मोडीत काढली जाईल ?

     भारतीय सीमेलगत चीनच्या सैन्याची जमवाजमव वाढत असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आपल्या वर्ष २०१६ च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. संरक्षण क्षेत्राचा विचार करता भारतावर दबाव कायम रहावा, यासाठी चीन नेहमीच हुशारीने पावले टाकत आला आहे. काश्मीरप्रमाणे ईशान्य भागातील सीमेवर भारतीय सैन्य तैनात नाही, याची चीनला चांगलीच कल्पना आहे. याचाच अपलाभ उठवत चीनने येथील तळ मजबूत करण्यास आरंभ करत, ईशान्य भारतावर पकड मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. हेतूत: सीमेवर तणाव निर्माण करण्यासाठी शक्तीप्रदर्शन करणार्‍या चीनला भारत याविषयी खडसावेल का ? असे केले नाही, तर उद्या या कुरापतींचेे रूपांतर मोठ्या वादात करण्यासाठी ही जय्यत सिद्धता केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीमेवर जेव्हा जेव्हा चीन तणावपूर्ण स्थिती निर्माण करतो, तेव्हा त्यांना साधे खडसवण्यासही आपण घाबरतो कि काय असा प्रश्‍न जनतेच्या मतात येतो. चीनच्या तुलनेत आपण तुल्यबळ नाही, हे काही अंशी सत्य असले, तरी भारत त्यांची मुजोरी निमूटपणे सहनच करत रहाणार आहे का ?

पिंपरी शिक्षण मंडळ कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत गाणी ऐकण्यात मग्न

प्रशासकीय सेवा गतीमान करू पहाणारे पंतप्रधान 
नरेंद्र मोदी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
       पुणे, २४ मे - येथील महानगरपालिका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असणार्‍या शिक्षण मंडळ प्राथमिक विभागाच्या कार्यालयामध्ये काही कर्मचारी १८ मे या दिवशी सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट हे गाणे भ्रमणभाषवर मोठ्या आवाजात लावून ऐकत असल्याचे आढळून आले. विभागात येणार्‍या नागरिकांकडेही त्यांचे लक्ष नव्हते. (अशा कर्मचार्‍यांवर कुणाचा अंकुश नसल्याचेच यातून सिद्ध होते. - संपादक)

मराठवाड्यात केवळ १ प्रतिशत पाणी, तर संपूर्ण राज्यात केवळ १३ प्रतिशत पाणीसाठा !

       संभाजीनगर, २४ मे - दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील पाणीस्थिती दिवसागणिक बिकट होत चालली आहे. मराठवाड्यातील जलाशयांमध्ये केवळ १ प्रतिशत, तर राज्यातील सर्व जलाशयांमध्ये एकूण साठ्याच्या १३ प्रतिशत पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या दोन दिवसांतच मराठवाडा अक्षरश: कोरडाठाक पडेल, अशी भयावह स्थिती उदभवली आहे. संपूर्ण राज्यातच पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. मान्सूनचा पाऊस अपेक्षेनुसार वेळेवर चालू झाला असला, तरी पुरेसा पाणीसाठा निर्माण होण्यासाठी पुढील काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे,असे शासकीय यंत्रणांनी सांगितले आहे.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
धनवंतांनो, धन देणार्‍या ईश्‍वराचा त्याग करू नका !
     एकदा एक श्रीमंत मनुष्य एका साधू महाराजांच्या पायावर डोके ठेवू लागला. महाराजांनी विचारले, तुम्ही मला नमस्कार का करता ? तो म्हणाला, तुम्ही दिवसभर ईश्‍वर चिंतनात रहाता आणि संपत्तीचा त्यागही केलेला आहे. आम्हाला तर धंद्यामुळे ईश्‍वराचे नाव घेण्यासही वेळ मिळत नाही. तेव्हा ते साधू महाराज म्हणाले, तर मग मलाच तुम्हाला नमस्कार करावा लागेल; कारण मी केवळ संपत्तीचाच त्याग केला; पण तुम्ही तर संपत्ती प्रदान करणार्‍या ईश्‍वराचाही त्याग केला आहे !

भूमाता संघटनेने अंतर्मुख होऊन महिलांच्या खर्‍या समस्यांकडे लक्ष द्यावे !

श्री. नीलेश बोरा
      संत ज्ञानेश्‍वर महाराज, चोखामेळा, तुकाराम महाराज, मुक्ताबाई आदी संतमंडळींनी निर्माण केलेल्या भक्ती संगमात (महाराष्ट्रात) आज विषवल्ली निर्माण होतांना आढळत आहे. महाराष्ट्रातील शेकडो संत-महंतांनी प्रत्येक ठिकाणच्या प्रथा-परंपरांचा मान राखला आहे. जिजाऊंच्या आशीर्वादाने सुराज्याची निर्मिती करणार्‍या शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्रात प्रथा-परंपरांचे हनन होत आहे, ही शोकांतिका आहे. महिलांना न्याय देणे, स्त्रीस्वातंत्र्य मिळवून देणे आदी आभूषणांचा अलंकार चढवणार्‍या भूमाता ब्रिगेड नामक संघटनेने संतसमाज आणि श्री शिवछत्रपतींच्या आदर्श राज्यप्रणालीचे आणि शिकवणीचे विडंबन चालवले आहे.

भारतात हिंदू आणि राजकारणी शंकराचार्यांचे म्हणणे मानत नाहीत; म्हणून देशाची परमावधीची अधोगती झाली आहे !

        देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याला धर्मनिरपेक्ष करण्यात आले, याचा अर्थ असा होतो की, कोणताही भेदभाव केला जाणार नाही; पण हिंदूच याचे बळी पडत आहेत. सनातन धर्मावरच आघात होऊ लागले आहेत. चोहोबाजूने धर्माला तोडण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. या देशावर भाजप, काँग्रेस किंवा कोणाचेही राज्य असो, हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही, अशी कडक चेतावणी द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी भारत साधू समाजाच्या अधिवेशनात वार्ताहरांशी बोलतांना दिली.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

धर्मसंसदवाले भारतभूमी किती जणांचे पोषण करू शकते, याचा विचार करू शकत नाहीत का ?

        देशात अहिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे देशात तातडीने कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्यात यावा. हा कायदा लागू होण्यापूर्वी ५पेक्षा अल्प मुले जन्माला घालणारा हिंदु नागरिक हा धर्मद्रोही, तर केवळ २ मुले जन्माला घालणारा हिंदु नागरिक हा हिंदु धर्माचा शत्रू असेल, अशी घोषणा उज्जैन सिंहस्थपर्वातील भूखीमाता क्षेत्रातील दूधेश्‍वर अन्नपूर्णा मांडवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चतुर्थ हिंदु संसदेत उपस्थित संतांद्वारे करण्यात आली.

सरकार स्वतः धर्मद्रोही तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध कृती करत नाही, उलट धर्मप्रेमी हिंदूंवर लाठीमार करते !

      १९ मे या दिवशी धर्मद्रोही तृप्ती देसाई यांनी नाशिक येथील श्री कपालेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याला पुजारी, नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केला. ते पाहून देसाई यांनी पोलीस संरक्षणात गाभार्‍यात जाण्याची मागणी केली. त्या वेळी पोलिसांनी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर मोठ्या प्रमाणात लाठीमार केला. 

असे आहेत मंदिराचे धर्मद्रोही विश्‍वस्त !

     पंचवटी, नाशिक येथील श्री कपालेश्‍वर या शिव मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळवण्यासाठी धर्मद्रोही तृप्ती देसाई यांनी तथाकथित आंदोलन केले. त्या संदर्भात त्यांनी सांगितले की, मंदिराच्या विश्‍वस्तांशी चर्चा केली आहे. विश्‍वस्तांनी त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास कोणतीही अडचण नाही, असे सांगितल्याचे समजते. यानंतर चिडलेले नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी मंदिराच्या न्यासाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे समजते.

नामजप आणि स्तोत्र ऐकण्याची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पनवेल येथील चि. अथर्व मयुरेश मुळ्ये (वय १ वर्ष) !

चि. अथर्व मुळ्ये
      वैशाख कृष्ण पक्ष तृतीया (२५.५.२०१६) या दिवशी पनवेल येथील चि. अथर्व मुळ्ये याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. अथर्व यास वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. ईश्‍वरी राज्याला पात्र असणारे बालक जन्माला येऊ दे, अशी प्रार्थना होणे आणि दोन मासांनंतर (महिन्यांनंतर) गर्भवती असल्याचे कळणे : वर्ष २०१४ मध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीच्या सोहळ्यासाठी आम्ही कोकणात गेलो होतो. तिथे श्रीकृष्णाच्या एका मंदिरातील बाळकृष्णाच्या चित्राकडे पाहून मी मनात इच्छा व्यक्त केली आणि प्रार्थना केली, आमच्या घरीसुद्धा लवकरच ईश्‍वरी राज्याला पात्र असणारे बालक जन्माला येऊ दे. दोन मासांनंतर (महिन्यांनंतर) श्रीकृष्णकृपेने मी गरोदर असल्याचे कळले. हेे कळल्यावर श्रीकृष्णाला पुन्हा प्रार्थना केली, आम्हा सर्व कुटुंबाकडून ईश्‍वरी राज्य चालवणारे बालक घडवून घे. त्यासाठी तूच आम्हाला साहाय्य कर आणि तुला अपेक्षित अशी सेवा अन् साधना करवून घे.

देव नाही, असे सांगणार्‍या शिक्षकांना सडेतोड उत्तर देणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील कु. शैलजा विजय मिसाळ (वय १७ वर्षे) !

कु. शैलजा मिसाळ
      पूर्वीपासूनच मला मी हिंदू असल्याचा अभिमान आणि धर्मांधांविषयी चीड होती. हिंदूंवर होणारे आघात आणि धर्माभिमान हे माझे मैत्रिणींशी चर्चेचे विषय असत. त्या वेळी कोणाकडूनही धर्माविषयी काही अयोग्य बोलले गेले, तर मी कशाचीही तमा न बाळगता क्षात्रवृत्तीने सूत्रे मांडायचे. समोरच्या व्यक्तीला ती मान्य होईपर्यंत मी गप्प बसत नसे.
१. देवाचे अस्तित्व नाकारणार्‍या 
शिक्षकांनी सांगितलेली कथा
१ अ. शिक्षकांनी मोगल हिंदूंची देवळे लुटत असतांना देव साहाय्याला न आल्याने देव नाही, असे सांगणे : एकदा वर्गात इतिहास शिकवणार्‍या शिक्षकांनी एक सूत्र सांगितले, सर्व हिंदू पूर्वीच्या काळी देव देव करत राहिले आणि मोगल आपल्याला लुटून निघून गेले. त्यांनी याविषयी एक प्रसंगही सांगितला. एका मंदिरात पुष्कळ पैसे आणि सोने होते. मोगल जेव्हा मूठभर सैन्य घेऊन देऊळ लुटायला आले, तेव्हा सर्व हिंदू झाडावर चढून भजन-कीर्तन करायला लागले. मग सर्व निरर्थक ठरले. मोगल देऊळ लुटून निघून गेले, तरी देव काही साहाय्यासाठी आला नाही. त्यामुळे देव नसतो.

भावपूर्ण सेवा करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनगर, कारवार येथील कु. आरती शंकर गुंजेकर (वय ८ वर्षे) !

कु. आरती गुंजेकर
१. आरती गोमूत्र आणि धूप यांनी घराची शुद्धी करते.
२. प्रार्थना आणि नामजप करणे :
आम्ही तिला प्रार्थना आणि नामजप करायला सांगितल्यावर ती करते. रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र ती नियमितपणे म्हणते. ती नियमितपणे घरातील सर्वांना श्रीमन्नारायण आणि श्रीकृष्ण यांना करावयाची प्रार्थना सांगते अन् मग सगळे जण ती प्रार्थना म्हणतात.
३. प.पू. डॉक्टरांसमोर न लाजता संपूर्ण मारुतिस्तोत्र म्हणून दाखवणे : आरतीचे बाबा संत झाल्यावर एप्रिल २०१६ मध्ये रामनाथी आश्रमात आले होते. तेेेव्हा त्यांची प.पू. डॉक्टरांशी भेट झाली. त्यांनी प.पू. डॉक्टरांना सांगितले, आरती रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र चांगले म्हणते. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी तिला दोन ओळी म्हणण्यास सांगितले. त्या वेळी तिने न लाजता संपूर्ण मारुतिस्तोत्र म्हणून दाखवले. तेव्हा प.पू. डॉक्टरांना पुष्कळ आनंद झाला. 

अध्यात्माची आवड असलेली अन् संत होऊन पृथ्वीवरील अन्याय दूर करू इच्छिणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली घार्ली (जिल्हा बेळगाव) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्राजक्ता राणे (वय १२ वर्षे) !

कु. प्राजक्ता राणे
      बेळगाव, कर्नाटक येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर संतपदी विराजमान झाल्यावर गोवा येथील रामनाथी आश्रमात आले होते. त्यांची प.पू. डॉक्टरांशी भेट झाली. त्या वेळी त्यांच्यासमवेत कर्नाटकातील घार्ली गावातील सनातनचे साधक श्री. यशवंत राणे यांची पुतणी कु. प्राजक्ता पांडुरंग राणे (वय १२ वर्षे) हीसुद्धा उपस्थित होती. त्या भेटीच्या वेळी प.पू. डॉक्टर, पू. शंकर गुंजेकर आणि कु. प्राजक्ता यांच्यामध्ये झालेले संभाषण पुढे देत आहोत.
१. कु. प्राजक्ता सतत श्रीकृष्णाच्या 
अनुसंधानात असल्याचे पू. शंकरमामांनी सांगणे
पू. शंकर गुंजेकरमामा : आपले काही साधक श्री. यशवंत राणे यांच्या गावी गेले होते. त्या वेळी त्यांची पुतणी प्राजक्ताही तेथे होती. साधकांना उदबत्ती आणि कापूर यांचे उपाय करतांना पाहून तीही उपाय करू लागली. तेव्हापासून तिने नामजपही चालू केला आहे. ती यापूर्वी अधिक वेळ सत्संगात बसलेली नाही, तरी ती प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणते, तसेच कृष्णाशी बोलते.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. प्रियांका भागवत कदम (वय १८ वर्षे) हिला रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर आलेल्या अनुभूती

कु. प्रियांका कदम
१. घरच्यापेक्षा आश्रमात रहायला आल्यावर चिडचिड अल्प प्रमाणात होणे आणि पित्ताच्या त्रासातही पुष्कळ प्रमाणात घट होणे : घरी असतांना माझा चिडचिडेपणा पुष्कळ व्हायचा. त्यामुळे मला पित्ताचा त्रासही पुष्कळ होत असे. माझा नामजपही होत नसे; परंतु रामनाथी आश्रमात आल्यावर माझी चिडचिड अल्प प्रमाणात होत आहे, तसेच माझ्या पित्ताच्या त्रासातही पुष्कळ प्रमाणात घट झाली आहे.
२. त्रासांच्या निवारणासाठी ज्योतिषाने प्रत्येक शनिवारी औदुंबराला ११ प्रदक्षिणा घालायला सांगितले असणे आणि आश्रमात रहायला आल्यावर पहिल्या शनिवारीच दत्तमाला मंत्रपठणाला बसायला सांगितल्याने दत्तगुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे : माझी घरी होत असलेली चिडचिड आणि पित्ताचा त्रास यांविषयी आई-बाबांनी एका ज्योतिषाला विचारले असता त्यांनी प्रत्येक शनिवारी औदुंबराला ११ प्रदक्षिणा घालायला सांगितले होते; परंतु रामनाथी आश्रमात असतांना काय करायचे ?, हा मला प्रश्‍न होता आणि बघता बघता शनिवार आला. त्या दिवशी व्यवस्थापन-विभागातील ताईने येऊन मला सांगितले, तुला दत्तमाला मंत्रपठणाला बसायचे आहे. ते ऐकून मला दत्तगुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

५१ टक्के पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बेळगाव येथील कु. ज्योती चव्हाण हिला तिचे वडील साधनेसाठी करत असलेल्या साहाय्याविषयी वाटत असलेली कृतज्ञता !

कु. ज्योती चव्हाण
१. साधना करण्यास आजीने विरोध करून मुलीचे लग्न करण्याविषयी सांगणे : माझ्या घरची परिस्थिती पुष्कळ बिकट आहे. माझी आजी सेवा करून काही मिळतं का ? इतर सर्व लोक किती पैसे मिळवतात ! तुम्हाला काही काम करायला नको. मुलीचे लग्न करा. सारखे सनातनचे करत राहिलात, तर सर्व लोक यांनी मुलीला घरीच ठेवून घेतले आहे. त्यामुळे तिचे लग्न जमत नाही, असे बोलतील, असे सारखे ओरडत असते; पण माझे बाबा तिचे न ऐकता मला सेवेला जायला सांगतात.
२. खडतर प्रारब्ध आनंदाने स्वीकारून लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मुलीला साधनेसाठी उद्युक्त करणे : बाबा म्हणतात, लोक काहीही बोलू दे. आपण लोकांचे ऐकायचे नाही. लोकांचे ऐकून आपल्याला साधना न्यून करायची नाही. आपण मागच्या जन्मी काहीतरी चुका आणि पापे केली असतील; म्हणून या जन्मी आपल्याला त्रास होत आहे आणि तो त्रास आपले प्रारब्ध संपेपर्यंत होणारच आहे. बाबा मला सांगतात, आपत्काळ जवळ आला आहे. नामजप आणि प्रार्थना कर.
- कु. ज्योती चव्हाण (वय १६ वर्षे), बेळगाव. (२१.५.२०१६)

कु. पूर्ती लोटलीकर सत्संग घेत असतांना श्रीकृष्णच सत्संग घेत असल्याचे जाणवणे

       बालसाधकांचा कु. पूर्ती (वय ६ वर्षे) सत्संग घेत असतांनाचे चित्रीकरणकक्षात चित्रीकरण झाले. तेव्हा श्रीकृष्णच आमचा सत्संग घेत आहे, असे मला वाटत होते. ती इतकी लहान असूनसुद्धा छान सत्संग घेते. मला माझे आई-बाबा एवढे दिवस सांगत होते; पण मी त्यांचे ऐकले नसल्याचे मला वाईट वाटत आहे. मला कु. पूर्तीकडून पुष्कळ शिकायला मिळाले. मी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतेे.
- कु. ज्योती चव्हाण (२१.५.२०१६)

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांत पैशांची गुंतवणूक 
केल्याने होणारी संभाव्य आर्थिक हानी लक्षात घेऊन 
त्यात गुंतवलेेले पैसे लवकरात लवकर काढून घ्या !
       शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांत पैसे गुंतवल्यास त्यातून मिळणारा परतावा (रिटर्न्स) अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवल्यावर मिळणार्‍या व्याजापेक्षा अधिक असतो, या विचाराने अनेक जण त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करतात. बर्‍याच वेळा लाभ तर नाहीच; पण त्यात गुंतवलेली रक्कमही परत मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक हानी झाल्याची उदाहरणे आहेत.
       सध्या चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे बर्‍याच आस्थापनांना आर्थिक हानी सोसावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शेअर व्हॅल्यूवर विपरित परिणाम होत असल्याने गुंतवणूकदाराचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांमधील पैसे बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांमध्ये रक्कम गुंतवली असल्यास ती लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक आहे. भविष्यातही त्यात पैशांची गुंतवणूक करू नये.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

       वाटाघाटी वा चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवण्यावर कुराणचा विश्‍वास नाही. फक्त काफिरांशी (इस्लामशी सहमत नसतील ते सर्व काफीर) लढून त्यांना लढाईत हरवण्यावरच त्यांचा विश्‍वास आहे, असे असतांना अयोध्येचा प्रश्‍न वाटाघाटीने सुटेल काय? - पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

फलक प्रसिद्धीकरता

पीडीपी-भाजप सरकारच्या 
राज्यात काश्मीरचे इस्लामीकरण !
       जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनात हरि प्रबात टेकडीचे नाव कोह-ए-मारण असे छापले आहे. यावर काश्मिरी हिंदूंनी आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीरचे इस्लामीकरण होत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांना सूचना !

    धर्मशिक्षणाविषयी मार्गदर्शक असलेला हा लेख संग्रही ठेवावा. धर्मशिक्षणवर्ग घेणार्‍यांना या लेखाचा उपयोग करता येईल.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jammu-Kashmir sarkarne ek vigyapanme Hari Parbatka naam Koh-e-Maran aisa likha
Kendra sarkarpar Bhagvekaran ka aarop laganewale ab ispar chup kyon
जागो ! : जम्मू-कश्मीर सरकार ने एक विज्ञापन में हरि पर्बत का नाम कोह-ए-मारन ऐसा लिखा.
केंद्र सरकार पर भगवेकरण का आरोप लगानेवालें अब इस पर चुप क्यों?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तात्काळ निष्कर्ष कळतो !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आत्मप्रौढी नको ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. 
आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


॥ हरि ॐ तत्सत् ॥

तीर्थयात्रा 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला 
परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, 
इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ : इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

फास्टफूडवर बंदी हवी !

संपादकीय 
   सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड इनव्हारमेंट मध्ये केलेल्या तपासणीत ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट, अशा अत्यंत घातक केमिकलची मात्रा आढळून आली आहेत. ब्रिटानिया, हार्वेस्टर गोल्ड, इंग्लिश ओवन, परफेक्ट प्रिमीयम सारख्या अधिक विक्री होणार्‍या ब्रेडच्या तपासणीत ही केमिकल आढळून आली आहे. याचसमवेत जवळपास प्रत्येक लोकप्रिय फास्ट फूड आणि बर्गरमध्ये हीच स्थिती आढळून आलेली आहे. जे लोक दिवसाचा प्रारंभ ब्रेडने करतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात या तपासणीत व्यक्त करण्यात आली आहे. सध्या शहरच नव्हे, तर गावांमध्येही घराघरांत ब्रेड पोचलेला आहे. सकाळच्या अल्पाहरापासून रात्रीच्या जेवणापर्यंत या ना त्या रूपात ब्रेड हा खाण्यासाठी वापरला जातोच. ब्रेड भारतीय नागरिकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. अमेरिका, इंग्लड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, चीन, ब्राझील यांसह अनेक देशांनी ब्रेडमध्ये वरील केमिकल वापरण्यावर पूर्णत: बंदी घातलेली असून भारतात खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर लक्ष ठेवणारी संस्था एफ्.एस्.एस्.ए.आय.मात्र याकडे डोळेझाक करत आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भारतात, तर ब्रेड बनवणार्‍या आस्थापनांसमवेत गल्लोगल्ली असणार्‍या बेकरीत ब्रेड बनवला जातो आणि विकला जातो. याची कधी तपासणी करण्याचा तर प्रश्‍नच येत नाही.

ठोस उपाययोजना हवी !

संपादकीय
    २२ मे या दिवशी मणीपूरमधील चंडेल जिल्ह्यातील जौपी हेंगशी भागाजवळ झालेल्या आतंकवादी आक्रमणात २९ आसाम रायफल्सचे १ अधिकारी आणि ५ जवान हुतात्मा झाले. याच दिवशी काश्मीरमध्ये उधमपूर येथे आतंकवाद्यांशी लढतांना राष्ट्रीय रायफल्सचे नायक पांडुरंग गावडे यांना वीरमरण आले. २३ मेच्या दिवशी तर त्याही पुढे जाऊन श्रीनगरमध्ये पोलिसांवर झालेल्या आक्रमणात ३ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीर ही एक न सुटणारी समस्या झाली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn