Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

योगासने करतांना ॐ म्हटल्याने आपल्याला अधिक ऑक्सिजन मिळतो !

सलमा अन्सारी यांची धर्मांधांना चपराक !
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांचे प्रतिपादन
     अलीगड (उत्तरप्रदेश) - तुम्ही अल्ला, गॉड किंवा रब म्हणत नाही का ? त्यात काय फरक आहे ? ॐ म्हणण्यात काहीही अयोग्य नाही. सर्वांनी योग करायला पाहिजे. आपण ॐ उच्चारतो, तेव्हा आपल्याला अधिक ऑक्सिजन मिळतो. त्यांच्या पठणामुळे आरोग्य सुधारते, त्यामुळे योगाला विरोध करणे पूर्णपणे चुकीचे आहे. मी योग केला नसता, तर माझ्या काही हाडांची हानी झाली असती, असे प्रत्युत्तर भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी योगासनाच्या वेळी ॐचा उच्चार करण्याला मुसलमानांकडून होत असलेल्या विरोधाला दिले आहे.
      येथे एका कार्यक्रमात सलमा अन्सारी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, जर तुम्ही सुशिक्षित आहात, तर तुम्ही ते प्रत्येक काम केले पाहिजे, ज्यामधून तुम्हाला लाभ होईल. सूर्यनमस्कार हा योगासनांचा प्रकार आहे. पूर्वीच्या काळी योगासनांविषयी इतका विरोध नव्हाता. आता प्रत्येक गोष्टीला अयोग्य पद्धतीने सादर केले जाते.

श्रीनगर येथील आक्रमणांत ३ पोलीस हुतात्मा

काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप सरकारच्या काळातही आतंकवादी कारवाया चालूच !
अन्य देशांमध्ये आतंकवादी मारले जातात; मात्र भारतात
 प्रतिदिन आतंकवाद्यांच्या हातून पोलीसच मारले जातात !
     श्रीनगर - येथील झादिबालमध्ये आतंकवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा झाले आहेत. या आक्रमणात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नझीर अहमद आणि शिपाई बशीर अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य २ पोलीस घायाळ झाले आहेत. दुसर्‍या आक्रमणात आतंकवाद्यांनी तेंगपोरामध्ये केलेल्या गोळीबारात महंमद शफी चटवाल हा पोलीस अधिकारी ठार झाला.

भारताचे पुनर्वापरायोग्य स्वदेशी अंतराळयान अवकाशात यशस्वीपणे झेपावले !

भारतीय शास्त्रज्ञांप्रमाणे सक्षम आणि सूज्ञ शासनकर्तेही 
भारताला मिळाले असते, तर भारताची केव्हाच प्रगती झाली असती !
    नवी देहली - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) बनवलेले पूर्णपणे भारतीय बनावटीचे आणि परत वापर करता येण्याजोगे पहिले अंतराळयान (स्पेस शटल) आर्एल्व्ही-टीडी (रियूजेबल लाँच व्हेइकल-टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) २३ मेच्या सकाळी श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वीपणे अवकाशात झेपावले. गेल्या ५ वर्षांपासून इस्रो या प्रकल्पावर काम करत होती. आर्एल्व्ही-टीडी यान पुनर्वापर करण्याच्या क्षमतेचे आहे.
     एखाद्या अंतराळयानाचा पुनर्वापर करण्याची कल्पना प्रगत राष्ट्रांनी सोडून दिली होती; पण ते साध्य करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. यामुळे अंतराळयानाच्या निर्मितीचा व्यय १० पटींनी न्यून होणार आहे. आर्एल्व्ही-टीडी यानाच्या निर्मितीसाठी ९५ कोटी रुपये खर्च झाला आहे. हे अंतराळयान यशस्वी उड्डाणानंतर पुन्हा माघारी येणार असून ते बंगालच्या समुद्रात उतरेल. मात्र पाण्यावर तरंगण्याचे तंत्र त्यात अंतर्भूत नसल्याने हे यान पुन्हा हस्तगत करता येणार नाही. अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपान यांच्या नंतर संचालित अवकाशयान पाठवणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्ट. कर्नल पुरोहित यांना नाहक गोवण्यात आले ! - डी.जी. वंजारा, माजी पोलीस अधिकारी, गुजरात

     बडोदा - मला ज्या राजकीय शक्तींनी इशरतच्या गुन्ह्यात गोवले, त्याच शक्ती पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारागृहात टाकण्यामागे आहेत, असे गुजरातमधील माजी पोलीस अधिकारी जी.डी. वंजारा यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्ट. कर्नल पुरोहित यांनाही नाहक गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त सचिव नीरज जैन यांनी स्थापन केलेल्या गुजरात अस्मिता मंचाच्या वतीने अकोटा येथे वंजारा यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी वंजारा बोलत होते.
वंजारा म्हणाले,
 १. पू. बापूजी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपशील मी वाचलेला आहे. त्यांच्यावरील एफ्आयआर् बोगस असल्याचे एक माजी पोलीस अधिकारी म्हणून माझे मत आहे.
२. साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांनाही खोटे गुन्हे दाखल करून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्यात आले आहे. एन्आयएने नुकतेच साध्वी प्रज्ञा यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत. मग त्यांना ८ वर्षे कारागृहात खितपत पडावे लागले त्याचे काय ? मला एवढेच सांगायचे आहे की, सनातन हिंदु धर्माचे रक्षणकर्ते असल्यानेच साध्वी आणि पू. बापूजी यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

शनिदेवाच्या चौथर्‍यावरून दर्शनाची पद्धत बंद करा अन्यथा ६ जूनला आंदोलन करणार !

भारत अगेन्स्ट करप्शनची चेतावणी
     नगर - शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरून दर्शन चालू झाल्याने स्वयंभू मूर्तीची होणारी झीज, चौथर्‍यावर भाविकांच्या हातून तेल सांडल्याने घसरून पडल्याने महिला आणि मुले यांना होणारी इजा, दर्शनासाठी होत असलेला विलंब या सर्व गोष्टी लक्षात घेऊन चौथर्‍यावरून दर्शनाची पद्धत तातडीने बंद करावी, अशी मागणी पुणे येथील भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेने केली आहे.
     (या सर्व घटनांबरोबरच धर्मपरंपरांचे रक्षण होण्यासाठी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरील प्रवेश बंद होणे सर्वांत महत्त्वाचे आहे. यासाठीही आंदोलनातून आवाज उठवावा, अशी भाविकांची मागणी आहे ! - संपादक) संघटनेने शनैश्‍वर देवस्थानला लेखी निवेदन पाठवले असून येत्या ६ जून या दिवशी २०० कार्यकर्त्यांसह शनिशिंगणापूर येथे चौथरा बंद आंदोलन करण्याची चेतावणी संघटनेने दिली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात भारत अगेन्स्ट करप्शन संघटना सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

६ प्रमुख औषधोत्पादन आस्थापनांकडून निकृष्ट दर्जाच्या औषधांची निर्मिती झाल्याचे उघड !

सनोफी या आस्थापनाचे कॉम्बिफ्लॅम हे प्रसिद्ध वेदनाशामक औषधही निकृष्ट दर्जाचे आढळले !
     नवी देहली - सिप्ला, इप्का लॅब्स, आल्केम लॅब्स, मोरपेन लॅब्स, अबॉट आणि सनोफी यांसह न्यूनतम ६ प्रमुख औषधोत्पादन (फार्मास्युटिकल) आस्थापनांकडून २०१५-२०१६ या आर्थिक वर्षामध्ये निकृष्ट दर्जाच्या औषधांची निर्मिती करण्यात आल्याचे सेंट्रल ड्रग्स स्टॅडर्ड कंट्रोल ऑर्गनाईजेशनने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. बिजिनेस स्टॅडर्ड या वृत्त संकेतस्थळाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 
१. आल्केम लॅब्स, मोरपेन लॅब्स आणि सनोफी या आस्थापनांनी त्यांचा बाधित औषधांचा साठा मागे घेतल्याचे बिजनेस स्टॅन्डर्डला सांगितले.

इराणच्या छाबहार बंदरासाठी भारताची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक

पाक आणि चीन यांना चपराक देण्याचा प्रयत्न !
     तेहरान - इराणमधील छाबहार मुक्त व्यापार भागामध्ये (फ्री ट्रेड झोनमध्ये) अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा भारताच्या वतीने करण्यात आली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इराण दौर्‍यावर असून या पार्श्‍वभूमीवर भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या या बंदराच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक करण्याची ही घोषणा करण्यात आली आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या छाबहार बंदराची बांधणी आणि देखभाल करण्यासंदर्भातील या करारामुळे भारतास इराणसहच अफगाणिस्तान आणि मध्य आशियामधील राजनैतिक प्रभाव वाढवण्याची संधी मिळणार आहे. गुजरातचे कांडला आणि छाबहार या बंदरांमधील अंतर हे नवी देहली आणि मुंबईमधील अंतरापेक्षाही अल्प आहे. यामुळे या करारामुळे भारतास इराणमध्ये व्यापारी माल उतरवून त्यानंतर अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियाच्या प्रदेशांत नव्या रेल्वे आणि रस्त्यांच्या माध्यमातून नेणे शक्य होणार आहे. मोदी यांच्या या इराण भेटीदरम्यान एकंदर १२ महत्त्वपूर्ण करारांची घोषणा करण्यात आली आहे.

तमिळनाडूच्या उडागमंगलम्मध्ये धर्मांध ख्रिस्ती महिलेने हिंदु देवतांच्या ८ मूर्ती तोडल्या !

असहिष्णुतेची ओरड करणारे आता या घटनेस सहिष्णुता संबोधणार का ?
     उडागमंगलम् (ऊटी) - येथे असलेल्या हिंदुस्तान फोटो फिल्म या क्षेत्रात काम करणार्‍या नेसारिपू या ख्रिस्ती महिलेने तेथील हिंदु मंदिरातील ८ देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. महिलेने दगड मारून देवतांच्या मूर्ती तोडल्या. ही घटना शहरात आलेल्या एका पर्यटकाने भ्रमणभाषात टिपली. हा व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. सदर व्यक्तीने स्थानिक हिंदूंना याविषयी माहिती दिल्यावर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या १५० हिंदुत्वनिष्ठांनी पुडुमुंड पोलीस स्थानकात याविषयी तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून महिलेस चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.मालेगाव खटल्यात साध्वींना छळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा चालूच ठेवणार ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

    
डावीकडून श्री. सुनील घनवट, अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि पू. नंदकुमार जाधव
      जळगाव - साध्वी प्रज्ञासिंह आणि मालेगाव प्रकरणातील इतर हिंदुत्ववादी यांना नरकयातना दिल्या. आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना चटके दिले, त्यांना अश्‍लील चित्रफिती दाखवण्यात आल्या, त्यांच्या शिष्यांवर त्यांना मारहाण करण्यासाठी दबाव आणण्यात आला, पट्ट्याने मारले, तसेच दिलीप पाटीदार यांना कह्यात घेतल्यानंतर गायब केले, कर्नल पुरोहित यांना अडकवण्यासाठी त्यांच्या घरात ७० किलो आर्डीएक्स ठेवले. या सर्व गोष्टींसाठी उत्तरदायी असणार्‍या आतंकवादविरोधी पथकाच्या (एटीएस्च्या) संबंधित सर्व अधिकार्‍यांना शिक्षा होईपर्यंत हिंदु विधीज्ञ परिषद हा लढा चालू ठेवणार, असे प्रतिपादन मालेगाव स्फोटप्रकरणातील अधिवक्ते आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव श्री. संजीव पुनाळेकर यांनी केले. जळगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सनातनचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमाला पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एन्आय्एने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) भूमिकेत पालट केल्याच्या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे कोणतेही साहाय्य झालेले नसून याबाबत चालू असलेली चर्चा आणि आरोप निष्फळ आहेत, असा दावा अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी या वेळी केला.

पुणे येथे दलित युवकांवर धर्मांधांच्या टोळक्याकडून प्राणघातक आक्रमण

धर्मांधांच्या दृष्टीने स्वधर्मीय वगळून इतर सर्व काफीर आहेत, हे दलितांनी जाणावे !
पोलिसांकडून दलित युवकांवरच कलम ३०७ अन्वये (हत्येच्या प्रयत्नाचा) गुन्हा दाखल
     पुणे - येथील जनवाडी परिसरात रहाणार्‍या २ दलित युवकांवर त्यांच्या शेजारी रहाणार्‍या धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण करण्याची घटना घडली. श्री. राहुल चव्हाण आणि श्री. गौरव चव्हाण अशी धर्मांधांच्या आक्रमणात गंभीररित्या घायाळ झालेल्या युवकांची नावे आहेत. दलित युवकांवर जीवघेणे आक्रमण होऊनही जनवाडी पोलिसांनी मात्र या युवकांवरच कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला, तर आक्रमणकर्त्या धर्मांधांवर कलम ३२४ अन्वये सौम्य गुन्हा दाखल केला. (धर्मांधांकडून वारंवार अशी आक्रमणे व्हायला हा पाकिस्तान आहे का ? शिवाय युवकांवर जीवघेणे आक्रमण होऊनही धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पीडित युवकांवरच गुन्हा दाखल करणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? अशा पोलिसांचा जनतेला कधीतरी आधार वाटेल का ? अशा पोलिसांवर भाजप शासन कठोर कारवाई करणार का ? - संपादक)
१. १५ मेच्या दुपारी पूर्ववैमनस्यातून श्री. राहुल चव्हाण यांच्या शेजारी रहाणार्‍या ३-४ धर्मांधांनी श्री. राहुल चव्हाण आणि त्यांचे बंधू श्री. गौरव चव्हाण यांच्यावर सिमेंटचे ठोकळे मारून आक्रमण केले. (सदैव दंगे करण्याच्या मानसिकतेत असलेले आणि कायदा हातात घेणारे धर्मांध ! - संपादक)

हिंदुत्ववाद्यांना छळणार्‍या अधिकार्‍यांना शिक्षा होईपर्यंत साध्वींना न्याय मिळणार नाही ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथील पहिल्याच सभेत 
हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे रणशिंग फुंकले !
व्यासपिठावर डावीकडून कु. रागेश्री देशपांडे, श्री. सुनील घनवट,
 अधिवक्ता संजीव पुनाळेकर, पू. नंदकुमार जाधव, श्री. विकास साबळे
     भुसावळ - ज्या आतंकवाद विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांचा क्रूर पद्धतीने छळ केला, कर्नल पुरोहितांच्या घरी सत्तर किलो आर्डीएक्स ठेवले, त्या सर्व अधिकार्‍यांना राज्य शासनाने उच्चपदावर विराजमान केले आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांना सक्त मजुरीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत साध्वी प्रज्ञासिंगांना न्याय मिळाला असे मानता येणार नाही, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केले. भुसावळ येथे टीव्ही टॉवर मैदान येथे २२ मे या दिवशी सायंकाळी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अधिवक्ता श्री. पुनाळेकर बोलत होते.

अश्‍लील विज्ञापन फलकांच्या विरोधात कृतीशील लढा देण्याचा महिलांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने गोवा येथे महिला संघटन मेळावा
    म्हापसा, गोवा. २३ मे (वार्ता.) - गोव्यातील कॅसिनो संस्कृती, तसेच रस्त्याच्या बाजूने आणि दुकानांवर लावण्यात येणारे अश्‍लील विज्ञापनफलक यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देणे, तसेच स्वत: धर्माचरण करण्याबरोबरच समाजावर धर्माचरणाचे महत्त्व बिंबवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, यांसह धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांविषयी महिला अन् युवती यांच्यामध्ये जागृती करण्याचा निर्धार हिंदु धर्माभिमानी महिलांनी येथे केला. हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने म्हापसा येथील वैश्य भवन सभागृह, ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा येथे २२ मे या दिवशी महिलासंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित महिलांनी हा निर्धार केला. मेळाव्याला सौ. हेमश्री गडेकर, फोंडा येथील अधिवक्त्या कु. वंदना जोग, सनातन संस्थेच्या सौ. लता ढवळीकर, रणरागिणी शाखेच्या सौ. आनंदी वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला १०० हिंदु धर्माभिमानी महिलांनी उपस्थिती लावली.

गेल्या साडेपाच मासांत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ११७ अपघात, ३९ जण मृत्यूमुखी

मृत्यूचा सापळा बनत चाललेला द्रुतगती महामार्ग
     पुणे - यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे. गेल्या साडेपाच मासांत या मार्गावर ११७ अपघातांमध्ये ३९ जण मृत्यूमुखी पडले असून १६० जण घायाळ झाले आहेत. या मार्गावर सातत्याने अपघात होत असून त्यातील बहुतांश अपघात हे अतिवेगामुळे झाले असल्याची माहिती खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिली आहे. (वेग नियंत्रण आणि वाहतुकीची शिस्त लागणे, यांसाठी महामार्ग पोलीस कोणती उपाययोजना करणार आहे ? - संपादक)
     पोलिसांनी सांगितले की, द्रुतगती मार्गाची ओळख अतिशय वेगवान मार्ग अशी आहे. या महामार्गावरून मार्गक्रमण करणारी वाहने आणि वाहनचालक अजूनही या महामार्गावरील नियमांचे पालन करतांना दिसत नाहीत. द्रुतगती मार्गावर वेग नियंत्रणात ठेवणे आणि मार्गिकेच्या शिस्तीचे पालन करत वाहने चालवणे, या दोन्हींचे पालन केल्यास अपघात आणि वाहतूककोंडी अल्प होऊ शकते.

आलमेल (कर्नाटक) येथील चौकात लावलेल्या श्रीरामाचे चित्र असलेल्या फलकाची अज्ञातांकडून नासधूस

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची श्रद्धास्थाने असुरक्षित ! 
श्रीराम सेनेकडून आंदोलन ! 
     आलमेल (कर्नाटक) - येथील श्रीराम चौकात लावण्यात आलेला श्रीरामाचे चित्र असणारा फलक अज्ञातांकडून विद्रूप करण्यात आल्याची घटना २१ मेच्या रात्री घडली. यात श्रीरामाचे चित्रातील मुख कापण्यात आले. 
     २२ मेला सकाळी ही घटना लक्षात येताच श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन करून उत्तरदायींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांवरून निषेध मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी अहल्यादेवी होळकर हे हिंदुत्वाचे खरे आधारस्तंभ ! - व्याख्याते अभयराजे जगताप


     नवी मुंबई - छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या नावावर छळणार्‍या इस्लामी पातशाह्यांनाच केवळ नमवले नाही, तर ख्रिस्ती इंग्रज आणि पोर्तुगिज यांनाही वठणीवर आणले. गोव्यात हिंदु जनतेस अतोनात छळणार्‍या विरजईलाही जशास तसे उत्तर दिले. त्याचप्रमाणे अहल्याबाईंनी केवळ सुयोग्य शासनच केले नाही, तर त्या कार्याला त्यांनी धार्मिकतेची जोडही दिली. त्यांनी स्वतः अनेक स्थळी तसेच विविध हिंदु तीर्थक्षेत्रांवर मंदिर उभारणी केली. हे दोघे हिंदुत्वाचे खरे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन व्याख्याते श्री. अभयराजे जगताप यांनी येथे केले. २१ मे २०१६ या दिवशी सायंकाळी सेक्टर १६, ऐरोली येथील 'श्री रौद्रशंभो प्रतिष्ठान' यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी अहल्यादेवी होळकर यांचा संयुक्तरित्या जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. जगताप यांनी आपले विचार मांडले. 

कोलकाता पोलिसांनी राष्ट्रद्रोही उमर खालिदच्या कार्यक्रमाचा विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना घेतले कह्यात !

भारतमाता की जय, गो बॅक उमर खालिद, सेव्ह कश्मीर सेव्ह इंडियाच्या जोरदार घोषणा !
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार...चा प्रकार !
आंदोलनाला उपस्थित राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठ
आणि त्यांना अडवणारे कोलकाता पोलीस
     कोलकाता - राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा (जेएन्यूचा) विद्यार्थी उमर खालिदचा २१ मे या दिवशी कोलकाता येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डाव्या पक्षांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा शहरातील हिंदुत्वनिष्ठांनी जोरदार विरोध केला. हिंदु संहति, हिंदु महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद, भाजप आदी संघटनांच्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कार्यक्रम असलेल्या भारत सभा हॉलसमोर प्रखर आंदोलन केले. (राष्ट्रद्रोही उमर खालिदचा संघटितपणे विरोध करणार्‍या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! परंतु अशा कार्यक्रमांना केवळ हिंदुत्वनिष्ठच विरोध करतांना का दिसतात ? सर्वसामान्य नागरिकांना याविषयी काही का वाटत नाही ? - संपादक)

नेहरू-गांधींची नावे म्हणजे लोकशाहीवर आघात ! - सूर्याप्रकाश, अध्यक्ष, प्रसार भारती

गांधी-नेहरू यांचा उदोउदो करणारे काँग्रेसी धोरण भाजप शासनाने 
त्वरित पालटावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     नवी देहली - प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्याप्रकाश यांनी म्हटले आहे की, देशातील विविध योजना, संस्था, शिष्यवृत्या यांसाठी नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तींची नावे देण्याचा प्रकार म्हणजे देशातील लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्यासारखे आहे. त्यामुळे अशी नावे तातडीने पालटण्यात यावीत. काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋषी कपूर यांनीही हे सूत्र उपस्थित केले होते. 
     सूर्याप्रकाश पुढे म्हणाले की, या प्रकरणी मी एक संशोधन केले आहे. देशभरातील विविध शासकीय योजना, प्रकल्प, संस्था, शिष्यवृत्त्या, मैदाने, विमानतळे अशा एकूण ४५० ठिकाणी केवळ नेहरू-गांधी कुटुंबातील व्यक्तींचीच नावे देण्यात आल्याचे आढळून आले. याविषयी मी मार्च २००९मध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. देशातील २ लाख कोटी रुपयांच्या योजनांना राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे नाव आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव असल्याने ही चूक दुरुस्त करायला हवी.

मुंबई विद्यापिठात उत्तरपत्रिका घोटाळ्याच्या प्रकरणी अद्यापपर्यंत ८ जणांना अटक

शिक्षणक्षेत्राची दु:स्थिती !
     मुंबई - देशातील प्रमुख विद्यापिठांमध्ये गणना होणार्‍या मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेतील उत्तरपत्रिका घोटाळा उघडकीस आला आहे. न सोडवलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहण्यासाठी परीक्षा विभागाच्या कह्यातील उत्तरपत्रिका पुन्हा विद्यार्थ्यांना घरी दिल्या जात होत्या आणि त्यासाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी १५ ते २० सहस्र रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. या प्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील तिघा लिपिकांसह आठ जणांना अटक करण्यात आली असून अनेक वर्षांपासून हे रॅकेट चालू असल्याचे समजते. यात विद्यापिठातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
     पेपर रॅकेटप्रकरणी पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर तातडीने परीक्षा मंडळाची बैठक बोलावली जाईल. संबंधित दोषी कर्मचार्‍यांवर रितसर कारवाई केली जाईल, असे विद्यापिठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वेसावे यांनी सांगितले.

येत्या ३ वर्षांत देशभरात इतिहासाची अभ्यासक्रमातील पुस्तके पालटणार ! - सुब्रह्मण्यम स्वामी

     नागपूर, २३ मे (वार्ता.) - भारतात आर्य आणि द्रविड या सूत्रावरून उत्तर आणि दक्षिण भागातील लोकांमध्ये वाद आहेत; मात्र या देशाच्या चारही भागांमधील लोकांचे 'डीएन्ए' सारखेच आहे. या देशाचा इतिहास इंग्रजांनी चुकीच्या पद्धतीने सांगितला आणि आजही तोच इतिहास शिकवला जात आहे; मात्र आता येत्या ३ वर्षांत देशभरात इतिहासाची अभ्यासक्रमातील पुस्तके पालटण्यात येतील. त्याचे काम चालू झाले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी २३ मे या दिवशी येथे केले.

संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या परिसरात ४ डिटोनेटर सापडले

असुरक्षित संभाजीनगर !
     संभाजीनगर, २३ मे - येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात २२ मे या दिवशी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास ४ डिटोनेटर सापडले. साहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले की, सापडलेले डिटोनेटर घातक नाहीत. एक मुलगा हातात एक डिटोनेटर घेऊन रेल्वेस्थानकात खेळत होता

हिरोशिमावरील आक्रमणाप्रकरणी क्षमा मागणार नाही ! - अमेरिका

कुठे आक्रमणाविषयी क्षमा न मागणारी अमेरिका, तर कुठे पाकिस्तान 
गेली ६८ वर्षे भारताची कुरापत काढतांना त्यावर आक्रमण न करणारा भारत ! 
     टोकियो - दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणूबॉम्बद्वारे केलेल्या आक्रमणाविषयी आपण क्षमा मागणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. ते या आठवड्यात जी-७ सम्मेलनात सहभागी होण्यासाठी जपानमध्ये जाणार असून हिरोशिमा शहराला भेट देणार आहेत. अणूहल्ल्यानंतर हिरोशिमा शहराला भेट देणारे ओबामा हे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. ६ ऑगस्ट १९४५ या दिवशी टाकलेल्या या बॉम्बमुळे १ लाख ४० सहस्र लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच या आक्रमणातील किरणोत्सर्गाचे परिणाम लोकांना अनेक वर्षे भोगावे लागले होते.

केंद्रशासनाकडून वेदविद्येसाठी स्वतंत्र शिक्षण मंडळाचा प्रस्ताव !

सत्तेत आल्यानंतर २ वर्षांनी प्रस्ताव बनवणारे केंद्रशासन ! 
     नवी देहली - वेदविद्येला पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच संस्कृत भाषेला पुन्हा मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केंद्रशासनाने आता स्वतःच शालेय मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वेदविद्येला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सीबीएस्ईच्या धर्तीवर शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बनवला आहे. सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे सचिव देवीप्रसाद त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ५ जणांच्या शासकीय समितीने प्रस्तावित शिक्षण मंडळासाठी ६ कोटी रुपयांच्या प्राथमिक निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.
      सध्या देशभरात वेदाभ्यास करणारे १० सहस्र विद्यार्थी असून सीबीएस्ईच्या धर्तीवर वेदविद्या शिक्षण मंडळाची स्थापना झाल्यानंतर जवळपास ४० सहस्र विद्यार्थी वेदविद्येचे शिक्षण घेतील, अशी शासनाला अपेक्षा आहे. हे मंडळ स्थापन झाल्यास ते देशातील पहिलेच वैदिक शिक्षण मंडळ असेल. 
     वेदविद्येच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच वेद आणि संस्कृतचे शिक्षण देणार्‍या शाळांची निर्मिती करण्यालाही शिक्षण मंडळ प्राधान्य देईल. या शाळांमध्ये वेद आणि संस्कृत या विषयांना अधिक महत्त्व दिले जाईल आणि इतर प्रचलित अभ्यास विषयांना दुय्यम स्थान असेल.२ वर्षांत बांगलादेशची सीमा संपूर्णपणे बंद करणार ! - सर्बानंद सोनोवाल, भावी मुख्यमंत्री, आसाम

गेली २ वर्षे केंद्रात सत्ता असतांना भाजपने हे पाऊल उचलणे अपेक्षित होते !
     गौहत्ती - आगामी २ वर्षांत बांगलादेशला लागून असलेल्या आसामच्या सीमा सिलबंद करण्यात येतील, अशी माहिती आसामचे भावी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे. २४ मे या दिवशी आसाममधील नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 
   सोनोवाल पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भाजपने जनतेला दिलेल्या आश्‍वासनात प्राधान्याने हे सूत्र नमूद केले होते. आसाममधील बांगलादेशियांची घुसखोरी हा आमच्या दृष्टीने अत्यंत काळजीचा विषय आहे. त्यामुळे हेे काम प्राधान्याने पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता बांगलादेशी सीमा कायमस्वरूपी सिलबंद करण्यासाठी २ वर्षांची मुदत दिलेली आहे. या सीमा कायमस्वरूपी वायर फेन्सिंगच्या माध्यमातून सिलबंद करण्यात आल्या की, घुसखोरीचे प्रमाणही आपोआप न्यून होईल.राजस्थानमधील ५५ अंश तापमानातही सैनिक करत आहेत देशाची सुरक्षा !

अशा सैनिकांप्रती भारतियांनी प्रतिदिन कृतज्ञता व्यक्त करायला हवी ! 
     जैसलमैर (राजस्थान) - राजस्थान येथील तापमान ५० अंश सेल्सियस झाले आहे. येथील वाळू प्रतिदिन एवढी तापत आहे की, सैनिक थेट वाळूचा शेगडीसारखा उपयोग करत आहेत. भारत-पाक सीमेवर नियुक्त सैनिकांनी तर वाळूवरच पोळया भाजून घ्यायला प्रारंभ केला आहे. सीमावर्ती भागात तापमान ५५ अंशांच्या घरात पोहोचले असल्याची माहिती काही सैनिक देत आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात सैनिक देशाच्या संरक्षणाचे काम चोखपणे बजावत आहेत. सीमावर्ती भागातील सैनिक शक्य ते प्रयत्न करून उष्माघाताचा त्रास होणार नाही आणि सीमेच्या संरक्षणाचे काम अखंड चालू राहील, याची दक्षता घेत आहेत.फलक प्रसिद्धीकरता

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नीची ॐ चा विरोध करणार्‍यांना चपराक !
     ॐ म्हणण्यात काहीही अयोग्य नाही. आपण ॐ उच्चारतो तेव्हा आपल्याला अधिक ऑक्सिजन मिळतो. त्याच्या पठणामुळे आरोग्य सुधारते, त्यामुळे योगाला विरोध करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Om kehneme kuch ayogya nahi. Usse swasthya sudharta hai- Uprashtrapati Hamid Ansarijiki patni Salma Ansari
     Kya ab Salmajiko bhi sampradayik kaha jayega
जागो !
: ॐ कहने में कुछ अयोग्य नहीं. उससे स्वास्थ्य सुधरता है - उपराष्ट्रपती हमीद अन्सारीजी की पत्नी सलमा अन्सारी
     क्या अब सलमाजी को भी सांप्रदायिक कहा जाएगा ?

अंनिसने संत बाळूमामा मंदिरातील पुजार्‍यांवर प्रविष्ट केलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करा !

राष्ट्रीय समाज पक्ष आणि धनगर समाज यांची पोलीस ठाण्यासमोर निदर्शनांद्वारे मागणी 
     सांगली, २३ मे (वार्ता.) - विश्रामबाग परिसरात असलेल्या संत बाळूमामा मंदिरात कोणत्याही प्रकारचे जादूटोणा, तसेच अन्य अनुचित प्रकार होत नाहीत. असे असतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तथाकथित मानवी रूपात गेलेल्या महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीवरून दोन पुजार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. एखाद्या महिलेची जर मंदिर परिसरात एखाद्या व्यक्तीकडून विनयभंगासारखी घटना घडली असेल, तर त्याला समाज पाठीशी घालणार नाही; मात्र हेतुपुरस्सर आणि प्रसिद्धीसाठी मंदिर आणि मंदिरातील पुजार्‍यांना वेठीस धरण्याचे काम केले, तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संत बाळूमामा मंदिरातील पुजार्‍यांवर प्रविष्ट केलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करा, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि धनगर समाजाने विश्रामबाग पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करून पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.

(म्हणे) 'हिंदु राष्ट्र संकल्पना लोकशाहीविरोधी !'

हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून न घेता आंधळेपणाने टीका करणारे राम पुनियानी ! 
विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राम पुनियानी यांची गरळओक 
     पुणे, २३ मे (वार्ता.) - हिंदु राष्ट्र ही संकल्पना लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय यांच्या विरुद्ध आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना मनुस्मृतीवर आधारित हिंदु राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्यासाठी राज्यघटना पालटण्याचा घाट घातला जात आहे, अशी गरळओक विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राम पुनियानी यांनी केली. येथील साने गुरुजी स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी विद्रोह्यांच्या प्रथेप्रमाणे हिंदुत्वाच्या विचारधारेवर पूर्वग्रहातून टीका केली. 

अन्य धर्मियांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी बजरंग दलाकडून शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण

हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्नशील असणार्‍या बजरंग दलाचे अभिनंदन ! 
     अयोध्या - बजरंग दलाने उत्तरप्रदेशातील कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. यात बंदूक, तलवार आणि लाठी यांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. अन्य धर्मियांपासून हिंदूंचे रक्षण करणे, हा यामागील उद्देश आहे. अयोध्येत बजरंग दलाचे पहिले शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबीर पार पडले. येत्या ५ जूनला सुलतानपूर, गोरखपूर, पिलभीत, नोएडा आणि फतेहपूर येथे अशाच प्रकारचे शिबीर होणार आहे.

आग्रा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आंदोलनाला उपस्थित विविध संघटनांचे
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते
     आग्रा - २२ मे या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील भगवान सिनेमागृह पुलाच्या खाली राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु युवा वाहिनी, हिंदु सेवा, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात १२० जणांनी शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या.
या वेळी शासनाकडे पुढील दोन मागण्या करण्यात आल्या.
१. देहली विश्‍वविद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगत सिंह यांना आतंकवादी ठरवणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. 
२. भूमाता ब्रिगेडसारख्या धर्मविरोधी संघटना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी धर्मद्रोही आंदोलन करत आहेत. केवळ लोकप्रियतेसाठी करण्यात येणार्‍या या आंदोलकांवरही कठोर कारवाई करावी.

शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उज्जैन सिंहस्थपर्वात साधूंचे अश्‍लाघ्य स्वरूपात करण्यात आले विडंबन !

     उज्जैन - नुकत्याच पार पडलेल्या उज्जैन सिंहस्थपर्वात प्रशासनाकडून साधूंचे अश्‍लाघ्य स्वरूपात विडंबन करण्यात आले. स्वच्छतेच्या आणि शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने लावलेल्या एका विज्ञापनामध्ये सफाई मोक्ष है जिंदगी से असे लिहिले होते. हे विज्ञापन सिंहस्थक्षेत्राच्या मध्यभागी लावण्यात आले होते. (हिंदूंनो, मध्यप्रदेश शासनाकडे याविषयी सनदशीररित्या आपला निषेध नोंदवून हिंदूंची क्षमा मागण्यास शासनाला भाग पाडा ! तसेच संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करा ! - संपादक)

जेएन्यूमध्ये विदेशी विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍यास अटक !

जेएन्यूमध्ये दारू पिण्यात येते आणि शारीरिक संबंध ठेवले जातात, असा केला जाणारा 
आरोप खरा असू शकतो, याचेच हे उदाहरण म्हटल्यास चुकीचे काय ?
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात शिकत असलेल्या एका विदेशी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली उदीप नावाच्या आसाम येथील विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. वर्ष २०१५मध्ये जेएन्यूमध्ये भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या आणि दुसर्‍या वर्षात शिकत असलेल्या एका विदेशी विद्यार्थिनीला हॉस्टेलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीत बळजोरीने दारू पाजण्यात आली. दारू पाजल्यानंतर नशेत असतांना तिच्यावर रात्री बलात्कार करण्यात आला.

किरकोळ कारणांवरून उज्जैन येथे साधूंमध्ये हाणामारी !

     उज्जैन २० मे या दिवशी रात्री साध्वी कनकेश्‍वरीदेवी यांचा पट्टाभिषेक सोहळा होता. त्या कार्यक्रमाला मान्यवर साधूसंत आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर अनेक साधूसंत बसलेले होते. या वेळी एक युवा साधू पाणी पित असतांना बाजूला बसलेल्या साधूवर पाणी पडले. त्यामुळे ते संतप्त झाले. त्यावर युवा साधूने क्षमायाचना केली; मात्र समारंभ संपल्यावर तो युवा साधू खाली उतरल्यावर अन्य तीन साधूंनी त्याला आडवा पाडून मारहाण करण्यास प्रारंभ केला. अचानक झालेल्या आक्रमणामुळे युवा साधूला धक्काच बसला. या वेळी एक युवक त्या युवा साधूला वाचवायला गेल्यावर त्या तीन साधूंनी त्याच्यावरही आक्रमण केले. त्या वेळी अन्य साधू आणि लोक भांडण थांबवायला मध्ये पडले. नंतर साधू शांत झाले.


हिंदु राष्ट्र-स्थापनेकरिता धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग

श्री. रमेश शिंदे
श्री. सुनील घनवट
    धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. याचा परिणाम म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली आहे. त्यांना स्वतःच्याच धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे धर्मपरिवर्तन करणार्‍यांचे, तसेच हिंदु धर्मविरोधकांचे फावले आहे. आज तथाकथित सेक्युलर वाहिन्यांवरून केला जाणारा हिंदु धर्मविरोधी प्रचार, जे.एन्.यू. सारख्या विद्यापिठांतून हिंदु धर्मावर केली जाणारी टीका, तसेच महिषासुर जयंतीसारखे कार्यक्रम पाहिल्यावर हिंदु धर्मविरोधक यशस्वी झाल्याचे दिसत आहे. स्वतंत्र भारतातील हिंदु युवकांच्या मनात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात केलेले बीजारोपण आता अंकुरत असल्याचे दिसत आहे. याच वेळी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुसलमान मदरशांतून, तर ख्रिस्ती चर्च आणि कॉन्व्हेंट यांतून आपापल्या धर्माचे शिक्षण घेतच आहेत. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. त्यातूनच हिंदूंच्या मनात धर्माभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना सिद्ध करता येईल.

भरकटलेली आप !

     सध्या आम आदमी पक्ष (आप) देहलीमध्ये सत्तेवर आहे. हा पक्ष पहिल्यांदाच भरघोस मते आणि जागा यांनी निवडून आला. ज्या दिवशीपासून हा पक्ष सत्तेत बसला, त्या दिवशीपासून त्यांनी केंद्र शासनाशी अघोषित युद्ध आरंभले आहे. सद्यस्थितीत देहलीमध्ये मुंगी जरी मेली, तरी आपचे नेते आणि मुख्यमंत्री केंद्र शासनाच्या नावे टाहो फोडतात.
     मध्यंतरी केजरीवाल आणि आप यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शैक्षणिक अहर्तेचे सूत्र लावून धरले होते. त्यांनी हे सूत्र एवढे मोठे केले की, आपच्या राज्यातील आणि देशातील सर्व समस्या संपल्या असून तेवढी एकच समस्या बाकी आहे, अशा पद्धतीने त्यावर आरोप चालू केले.

केरळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्यात जिज्ञासू आणि धर्माभिमानी यांचा उल्लेखनीय सहभाग

१. धर्मशिक्षणवर्गात सांगितलेली गुढीपाडव्याची माहिती समजून 
घेऊन त्यानुसार गुढी उभी करणारे कृतीशील 
हिंदु धर्माभिमानी श्री. प्रदीप !
      केरळ येथे गुढीपाडवा हा सण साजरा केला जात नाही. त्यामुळे येथील लोकांना गुढी उभारण्याविषयीची माहिती नाही. केरळमधील कोची येथील सनातनच्या सेवाकेंद्रात प्रत्येक आठवड्यात धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या वर्गात गुढीपाडव्याची माहिती आणि गुढी उभी करण्याची पद्धत सांगण्यात आली होती. वर्गात येणारे श्री. प्रदीप यांनी सर्व सूत्रे उत्साहाने लिहून घेतली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी घरी गुढी उभारली. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसूनही त्यांच्यामध्ये धर्माचरणाची ओढ असल्याचे लक्षात येते.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
महाबली हनुमानाने केले भीमाचे गर्वहरण !
वृद्ध माकडाशी गर्वाने बोलणारा भीम !
१. जंगलातून जातांना भीमाला वाटेत लांबलचक शेपटी पसरून बसलेले म्हातारे माकड दिसणे : एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती. 
भीम : ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे.
माकड : मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा कृपा करून तूच शेपटी बाजूला कर.
भीम : घाणेरड्या शेपटीला मी हात लावू काय ? उचल ती लवकर.
माकड : बरं, मग असं कर, तुझ्या गदेने शेपटी बाजूला कर.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     आगामी भीषण काळात हिंदूंचे आस्तत्व टिकून रहाण्यासाठी त्यांचे धार्मिक, शारीरिक आणि मानसिक बळ वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सर्वत्र चालू करत आहे. - श्री. विनय पानवळकर, धर्मशक्ती सेना

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

     स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या सर फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे. त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत. (लोकजागर, १२ एप्रिल २०१३)

सर्वधर्मसमभावचा खरा अर्थ काय ?

     सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही. - श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     एक पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष, दोन भूतपूर्वी पंतप्रधान, साधू आणि संत यांनी कांचीच्या शंकराचार्यांच्या अटकेला विरोध दर्शवला; पण प्रसारमाध्यमांनी कोणचाही विरोध नाही असे प्रसिद्ध केले. लोकांचा विरोध वा दुःख प्रदर्शनासाठी शारीरिक हिंसा हे एकच माप आहे काय? - पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

रामनाथी आश्रमात जायला विलंब होत असतांना सकारात्मक राहून साधना करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कु. लक्ष्मी चंद्रकांत राऊळ !

कु. लक्ष्मी राऊळ
१. रामनाथी आश्रमात जायला काही कारणाने 
विलंब होत असतांना श्रीकृष्णाने ही परिस्थिती 
कशी स्वीकारतेस ?, हे महत्त्वाचे असल्याचे सांगणे
        मला रामनाथी आश्रमात जायला काही कारणाने विलंब होत होता. त्यामुळे मी कुडाळ सेवाकेंद्रात रहायला गेले. मी श्रीकृष्णाला याविषयी विचारल्यावर तो मला म्हणाला, सद्गुरूंच्या आश्रमात जाण्याचे नियोजन कधीतरी होणारच आहे. तुला गुरुदेवांचे सुक्ष्मातून दर्शन होते, तसे स्थुलातूनही दर्शन होणारच आहे; परंतु आता तू ही परिस्थिती कशी स्वीकारतेस ?, हे महत्त्वाचे आहे.
२. शाळा, शिकवणी आणि अभ्यास यांमध्येच 
पूर्ण वर्ष गेल्याने माझ्यावर आवरण आले असेल 
आणि ते दूर होण्यासाठीच गुरुदेवांनी कुडाळ 
आश्रमात १ मास रहाण्याची संधी दिली आहे, असे वाटणे
       माझी नववीची परिक्षा झाल्यावर दहावीचे शिकवणी वर्ग चालू झाले. त्यामुळे मी उन्हाळ्याच्या सुटीत सेवाकेंद्रात जाऊ शकले नाही. माझे शाळा, शिकवणी आणि अभ्यास यांमध्येच पूर्ण वर्ष गेल्याने प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून होत नाही. त्यामुळे आता माझ्यावर आवरण आले असेल आणि ते दूर होण्यासाठीच मला गुरुदेवांनी कुडाळ आश्रमात १ मास रहाण्याची संधी दिली आहे. जेणेकरून रामनाथी आश्रमातील चैतन्य मला सहजतेने ग्रहण करता येईल आणि तिथे गेल्यावर माझ्यावर आलेले आवरण दूर होण्यासाठी माझी साधनाही खर्च होणार नाही. त्यामुळे आश्रमातील चैतन्याचा मला पुरेपूर लाभ करून घेता येईल, असे मला वाटले.

उज्जैन येथे झालेल्या भृगुसंहितेच्या वाचनापूर्वी, वाचनाच्या वेळी आणि नाडीपट्टीच्या दर्शनाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

भृगुसंहितेचे वाचक डॉ. विशाल शर्मा आणि पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (डावीकडे) यांची भेट
       २१ मे २०१६ या दिवशी होशियारपूर (पंजाब) येथील भृगुसंहितेचे वाचक डॉ. विशाल शर्मा यांनी उज्जैन येथील सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेल्या प्रदर्शनात भृगुसंहितेचे वाचन केले. उज्जैन येथे विविध ठिकाणांहून सेवेसाठी आलेल्या साधकांना भृगुसंहितेच्या वाचनाच्या पूर्वी आणि वाचनानंतर आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. नाडीवाचनापूर्वी
१ अ. नाडीवाचनाच्या एक दिवस पूर्वीपासूनच आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. 
- सौ. सुचेता सुरेश नाईक, पंढरपूर

प्रतिदिन वाचा सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

बालवयातच स्वत:ला पालटण्याची तळमळ आणि आश्रमजीवनाची ओढ असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पनवेल येथील कु. लक्ष्मी संदीप घोलप (वय ९ वर्षे) !

कु. लक्ष्मी घोलप
      रामनाथी आश्रमात काही दिवसांसाठी आलेल्या कु. लक्ष्मी घोलप (वय ९ वर्षे) हिच्याशी माझी ओळख झाली. तिच्या सहवासात असतांना मला तिच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. कु. लक्ष्मी हिची गुणवैशिष्ट्ये आणि तिला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. हसतमुख आणि मोहक असल्याने सर्वांची लाडकी असणे : लक्ष्मी सतत हसतमुख असते. ती अतिशय मोहक आहे, त्यामुळे तिच्याकडे कोणीही सहजपणे आकर्षिले जाते. तिच्या बहिणीने सांगितले, लक्ष्मी घरात सर्वांची लाडकी आहे. नातेवाईक किंवा परिचित घरात आले, तर ते सर्व लक्ष्मीचे कौतुकच करतात. तिच्यात काय आहे ते कळत नाही; पण सर्वजण तिचे लाड करतात.
२. बोलणे ऐकत रहावेसे वाटणे : तिचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते. तिच्या बोलण्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे, असे जाणवते. तिच्या सहवासात उत्साह आणि आनंद जाणवतो.

५३ टक्के पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुडाळ, सिंधुदुर्ग येथील कु. आदिती प्रदीप तवटे (वय १६ वर्षे) हिचे तेजस्वी विचार !

कु. आदिती तवटे
पूर्तीने चांगल्या प्रकारे सत्संग घेणे
        कु. पूर्ती लोटलीकर ही ६ वर्षाची असूनही तिने आमचा चांगल्या प्रकारे सत्संग घेतला. एवढ्या छोटाशा पूर्तीने चुका कशा सुधारायच्या, गुरूंना काय अपेक्षित आहे, हे आम्हाला समजावून सांगितलं. मलाही तसे सांगता येणार नाही. आम्ही तिचा आदर्श ठेवायला हवा.
प.पू. डॉक्टरांची भेटीच्या वेळेस आलेली अनुभूती
         प.पू. डॉक्टरांची भेट होणार आहे, असे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. कु. स्वातीताई गायकवाड म्हणाली, प.पू. डॉक्टर येण्यापूर्वी प्रार्थना करूया. जेव्हा मी डोळे उघडण्यास सांगेन, तेव्हाच डोळे उघडायचे. मी प्रार्थना करत असतांना माझे डोळे बंद असूनही प.पू. डॉक्टरांनी दरवाजा उघडल्यावर माझ्या हातांना कोणीतरी हळूवार स्पर्श करत आहे, असे जाणवले. तेव्हाच प.पू. डॉक्टर खोलीत येऊन म्हणाले, अरे वा ! पुष्कळ छान वाटले. प.पू. डॉक्टरांना भेटून माझा भाव जागृत झाला.
- कु. आदिती प्रदीप तवटे (वय १६ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (२१.५.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कु. मधुरा चतुर्भुज यांनी पाठवलेले कृतज्ञतापत्र !

कु. मधुरा चतुर्भुज
प.पू. डॉक्टर,
साष्टांग नमस्कार वि.वि.
       पुष्कळ दिवसांत मी तुम्हाला पत्र लिहिले नाही. तुमची आठवण आली; म्हणून पत्र लिहीत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन, तसेच भावजागृतीसाठी प्रयत्न तुमच्या कृपेमुळे चालू झाले. मानसिक स्तरावर औषधोपचार चालू आहेत. तुमच्या कृपेमुळे मी बरी झाले आहे. त्यासाठी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. आध्यात्मिक उपायांमध्ये सातत्य रहाण्यासाठी केवळ तुमच्यामुळेच प्रयत्न होतात. मला औषधांमुळे आलेली सूजही हळूहळू न्यून होत आहे.
        प.पू. डॉक्टर, तुमच्या चरणांशी येण्यासाठी मी धडपडत आहे. माझी प्रगती होत आहे कि नाही, हे मला कळतच नाही. तुम्ही कसे आहात ?, हे विचारणे योग्य नाही, तरी विचारते. तुमची सतत आठवण येते. जेथे समष्टी राधा (पू. (सौ.) बिंदाताई) आणि समष्टी मीरा (पू. (सौ.) गाडगीळकाकू) आहेत, तेथे तुम्हाला कसे आहात ? हे विचारणे योग्य नाही. प.पू. डॉक्टर, मी तुमचे नाडीभविष्य ऐकले आणि वाचले. त्यात तुम्ही ८३ व्या वर्षी देहत्याग करणार असे लिहिले आहे. हे वाचून काळजात धस्स झाले. तुमचा देहत्याग होण्याआधी तुमच्या शेवटच्या क्षणी मला तुमची सेवा करण्याची संधी द्या, हीच कळकळीची प्रार्थना आहे. माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत आणि त्यानंतरही तुम्ही माझ्यासमवेत सूक्ष्मातून असणारच ! आता कसलीच भीती वाटत नाही.

उज्जैन सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाचा भावपूर्ण समारोप !

अमृत (शाही) स्नानाच्या पर्वणीच्या दिवशी सनातनचे सोलापूर येथील साधक 
श्री. हिरालाल तिवारी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !
पंचतत्त्वाच्या कोपात, घडला ३१ दिवसांचा प्रवास ।
कल्प-विकल्पांच्या मंथनातून अमृत प्रकटले आज ॥
    
श्री. तिवारी यांचा सत्कार करतांना पू. डॉ. पिंगळे (डावीकडे)
      उज्जैन - सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनातील कण-कण आनंदाने आेंथबून गेले. निमित्त होते, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाच्या समारोपाचे ! उज्जैन येथील समारोपाचा दिवस प्रत्येक साधकासाठी अविस्मरणीय ठरला. सकाळी प्रदर्शनात झालेले नाडीवाचन आणि त्यातून प्रत्येक साधकाने अनुभवलेली दिव्य अनुभूती, दुपारी आलेल्या भाविकांना प्रदर्शन दाखवणे आणि संध्याकाळी संतांसह भजने म्हणत मिळालेले महाप्रसादाचे दिव्यत्व, एवढ्या आनंदाचा वर्षाव जणू अपुरा होता कि काय, म्हणून महाप्रसादानंतर घेण्यात आलेल्या समारोप सत्संगात साधकांना गुरुमाऊलीकडून अनमोल अशी आध्यात्मिक भेट मिळाली.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
कर्मांत भेद करू नये !
      दोन सेवांमध्ये भेद करू नये. भेद केला की, विकार आला. भेद उत्पन्न झाल्यामुळे समाजात विषमता निर्माण झाली आणि पुढे राष्ट्रात झाली; म्हणून कुठल्याही कर्मात भेद करू नये. कर्म करण्याच्या पद्धतीत मात्र भेद असू शकतो.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१.२०१५)

कुठे कृत्रिम पावसाच्या प्रयोगांनी पाऊस पडेल याची निश्‍चिती नसतांना त्यावर जनतेचे कोट्यवधी रुपये व्यय करणारे शासनकर्ते, तर कुठे पाऊस पडण्याची पूर्ण निश्‍चिती देणार्‍या ऋषिमुनींनी सांगितलेल्या वैदिक पद्धती !

अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी
१. वर्ष २०१५ मधील पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने मराठवाड्यात दुष्काळ पडला होता. पाण्याअभावी शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. त्यानंतर मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी ५० हून अधिक पर्जन्ययाग करण्यात आले. त्यांचा परिणाम दिसून आला आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाऊस पडला.
२. कत्रिम पावसाच्या प्रयोगांवर शासनाने कोट्यवधी रुपये व्यय केले आहेत. तरीही अपेक्षित यश मिळालेले नाही, तसेच कृत्रिम पावसाचे प्रयोग केल्यानंतर पाऊस पडेल, याची निश्‍चिती नसते. याउलट सोमयागांवर होणारा व्यय हा कृत्रिम पावसावर केल्या जाणार्‍या व्ययापेक्षा पुष्कळ अल्प आहे, तसेच सोमयाग केल्यानंतर त्या ठिकाणी १९५ दिवसांनी पाऊस पडतोच, असे वराहमिहिर आणि प्राचीनशास्त्र यांनी सांगितले आहे. आम्ही त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला आहे.
३. पर्जन्ययागाचे महत्त्व केवळ पर्जन्यवृष्टी होत नसल्यास ती व्हावी यासाठी जसा होतो, तसाच अतिवृष्टी होत असल्यास ती थांबावी यासाठीही होतो. तशी मंत्रांची योजना ऋषीमुनींनी केलेली आहे.
- अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळे, श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम, बार्शी, जिल्हा सोलापूर.
     शासनकर्ते नाही, तर प.पू. नाना काळे यांच्यासारखे अश्‍वमेधयाजी यज्ञ करून कोरडा दुष्काळ दूर करू शकतात, याची प्रत्यक्ष अनुभूती !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.५.२०१६)

गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केल्या जाणार्‍या हिंदूसंघटन मेळाव्यासाठीचे प्रसारासाठी फलक उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या हिंदूसंघटन मेळाव्यासाठी लागणारे प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या फलकावर स्थानिक मेळाव्याचे स्थळ आणि वेळ घालावी. या फलकासाठी प्रायोजक मिळवून तो मंदिरे, रहिवासी संकुले, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, हिंदुत्ववादी संघटनांची कार्यालये आदी सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी लावावा.
उपलब्ध फलकांचा आकार पुढीलप्रमाणे -
१. ए-२ आकारातील भित्तीपत्रक
२. ६ फूट ४ फूट
३. ८ फूट ६ फूट
४. १० फूट ८ फूट
     उत्तरदायी साधक आणि कार्यकर्ते यांनी स्वत:च्या जिल्ह्यातील भित्तीपत्रकाची मागणी एकत्रित करून स्वत:च्या जिल्ह्याशी संबंधित लेखासमन्वयक साधकाला कळवावी. भित्तीपत्रकाचा नमुना सोबत दिला आहे. वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा वापर करावा.

सनातन प्रभात अँड्रॉईड अ‍ॅपच्या वाचकांसाठी सूचना !

     सनातन प्रभातचे अँड्रॉईड अ‍ॅप काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या बंद झाले आहे, याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी. या अडचणीमुळे वाचकांच्या झालेल्या गैरसोयीसाठी आम्ही खेद व्यक्त करतो. ही अडचण लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. अडचण सुटल्यावर हे अ‍ॅप अद्ययावत् (अपडेट) करण्यात येईल. त्यामुळे कृपया वाचकांनी हे अ‍ॅप काढू (uninstall करू) नये. अ‍ॅप अद्ययावत् केल्यावर त्याविषयी नोटिफिकेशन, तसेच दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून वाचकांना कळवण्यात येईल. ही अडचण सुटेपर्यंत वाचक www.dainiksanatanprabhat.blogspot.in या दैनिक सनातन प्रभातच्या ब्लॉगचा लाभ घेऊ शकतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधना करण्यासाठी सांगितलेले उपयुक्त दृष्टीकोन

१. साधना करतांना ताण येत 
असल्यास साधकांनी ठेवायचे दृष्टीकोन 
परात्पर गुरु डॉ. आठवले
अ. साधनेतील प्रयत्नांमध्ये कुठेतरी कमी पडत असणे, हे साधकाला ताण येण्यामागील कारण आहे. आध्यात्मिक प्रगती झाली की, ताण येत नाही.
आ. बर्‍याच वेळा साधकांचा मानसिक आणि बौद्धिक स्तरावर विचार किंवा कार्य होते. ही प्रक्रिया आध्यात्मिक स्तरावर झाली पाहिजे. खरेतर सेवा करतांना ताण येण्यापेक्षा या सेवेतून अजून काय शिकता येईल, सेवेत अजून चांगले काय करता येईल, असा विचार असला पाहिजे.
इ. तणावनिर्मूलनासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, हेच महत्वाचे आहे.
ई. ताण येण्याचे प्रमाण अधिक असल्यास आणि ताणाचा कालावधी अधिक टिकून रहात असल्यास मानसोपचारतज्ञांकडून उत्साह येण्यासाठी गोळ्या घ्याव्यात.
उ. एस्एस्आर्एफ्च्या संकेतस्थळावर आध्यात्मिक उपायांच्या लिखाणात हिंदु देवतांचा नामजप करण्यास सांगितले असल्याने एका इस्लामी देशाने या संकेतस्थळावर बंदी घातली होती. हे संकेतस्थळ तेथील साधिकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव माध्यम असल्याने एका साधिकेने संकेतस्थळ चालू व्हावे, यासाठी १५ दिवस भरपूर प्रार्थना केली. १५ व्या दिवशी तेथे एस्एस्आर्एफ्चे संकेतस्थळ पूर्ववत दिसू लागले. अशी ईश्‍वराची भक्ती केली, तर कधी तरी ताण येईल का ?

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंनी दिलेले नाव
लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, 
तर बाकीची नावे सगुणातील असतात.
भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.
     गुरु मिळाले असे म्हणू नये. गुरु दिले गेले, असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंनो, हिंदु राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला नोकरी मिळावी, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मंत्रजपाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप 
केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


बोधचित्र

कठीण निर्णय !

संपादकीय
     अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या जपान दौर्‍यात हिरोशिमा अणू आक्रमणासंदर्भात जपानी जनतेची क्षमा मागणार नाहीत, असे त्यांनी एका जपानी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले आहे. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर केलेल्या अणूआक्रमणाचे समर्थन करतांना त्यांनी युद्धकाळात नेता अनेक प्रकारचे कठीण निर्णय घेत असतो, असे वक्तव्य केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn