Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जम्मू-काश्मीरच्या कूपवाड्यामध्ये ५ आतंकवादी ठार

सिंधुदुर्गातील पांडुरंग गावडे हुतात्मा !
     कूपवाडा - येथील डरुगमुल्ला गावात सैनिकांनी ५ जिहादी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आली. यात राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग गावडे हे सैनिक हुतात्मा झाले. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावचे रहिवासी आहेत.
     आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सैनिकांनी या भागाला घेरले होते. या वेळी झालेल्या चकमकीत हे आतंकवादी ठार झाले.

मणीपूर येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात ६ सैनिक ठार !

सैनिकांना ठार करणार्‍या आतंकवाद्यांना रोखू न शकणारी निरर्थक लोकशाही काय कामाची ?
    चंदेल (मणिपूर) - येथे आतंकवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सचे ६ सैनिक ठार झाले. यात एका अधिकार्‍याचा समावेश आहे. हेंगशी आणि तुइयांग गावाच्या परिसरात झालेल्या भूस्खलनचा सैनिक आणि अधिकारी आढावा घेत असतांना येथे दबा धरून बसलेल्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. आक्रमणानंतर आतंकवाद्यांनी सैनिकांकडील एके ४७ रायफल्स, एक इंसास रायफल्स, एक एल्एम्जी रायफल्स आणि दारुगोळा पळवला आहे. हे आतंकवादी कॉरकॉम या आतंकवादी संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. चंदेली जिल्ह्यात याच परिसरात गेल्यावर्षी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १८ सैनिक ठार झाले होते. यानंतर सैन्याने म्यानमारमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केले होते. (एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय सैनिकांना आतंकवादी ठार करत असतांना तेथील आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन न करणारे राज्यकर्ते काय कामाचे ! - संपादक) या घटनेची माहिती मिळाल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन दुखः व्यक्त केले. (गृहमंत्रीजी दुःख व्यक्त करण्याबरोबर आतंकवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी कृती करा, अशीच जनतेची मागणी आहे ! - संपादक)

(म्हणे) भारतामुळे पाकसह ३२ देशांना धोका ! - पाकमधील प्रसारमाध्यमांचा दावा

पाकमधील जिहादी आतंकवाद्यांमुळे गेली २५ वर्षे भारत त्रस्त आहे, त्यावर पाकच्या
 प्रसारमाध्यमांनी कधी तोंड उघडले नाही. आता ती भारतामुळे पाकसह ३२ देशांना
 धोका असल्याचे म्हणत आहेत, हा त्यांचा पक्षपातीपणा कोण नाकारणार ?
     नवी देहली - भारताची अण्वस्त्र क्षमता असणारी पाणबुडी आणि क्षेपणास्त्रे यांवरून पाकच्या प्रसारमाध्यमांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.
१. जंग या दैनिकात म्हटले आहे की, अण्वस्त्रक्षमतेची पाणबुडी आणि अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे यांमुळे दक्षिण आशियामधील समतोल बिघडून जाईल. यामुळे हिंदी महासागराच्या किनार्‍यावर असलेल्या ३२ देशांना त्याचा धोका वाटतो. दैनिकाचे म्हणणे आहे की, ही भीती पाकच्या पंतप्रधानांचे विदेश सल्लागार सरताज अजीज यांनी संसदेत व्यक्त केली आहे. अजीज यांनी ३२ देशांत इजिप्त, इराण, इराक, कुवैत, ओमान, कतार, बहारीन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, मालदीव, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांची नावे घेतली.
२. या दैनिकातील वृत्तानुसार, अजीज यांनी म्हटले आहे की, भारत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या आगामी सत्रात हिंद महासागराला अण्वस्त्रांपासून दूर ठेवण्याचा प्रस्ताव आणू पहात आहे. यासाठी तो या ३२ देशांचे समर्थन मिळवू इच्छितो.

माझ्या दूरध्वनी क्रमांकाचा अपवापर करण्यात आला असावा ! - एकनाथ खडसे

आप पक्षाकडून केलेले आरोप फेटाळले !
     मुंबई - महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कराची येथून कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या घरातून दूरध्वनी आल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला आहे.
     दाऊदच्या घरातून ज्या भ्रमणभाष क्रमांकावरून दूरध्वनी आल्याचा मेनन यांचा आरोप आहे, तो माझा क्रमांक असून गेल्या वर्षभरापासून बंद आहे. या कालावधीत या क्रमांकावरून एकही दूरध्वनी परदेशात केलेला नाही अथवा परदेशातून आलेला नाही. कदाचित् माझ्या दूरध्वनी क्रमांकाचा अपवापर करण्यात आला असावा. माझा भ्रमणभाष क्रमांक कुणी वापरत आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे, असे खडसे यांनी सांगितले.
     याविषयी सह-आयुक्त (गुन्हे) श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भ्रमणभाषवरून दाऊद इब्राहिमच्या भ्रमणभाषवर संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. त्यानंतर आम्ही खडसे यांच्या भ्रमणभाषवरील सर्व माहिती पडताळली आहे. आमच्या प्राथमिक अन्वेषणानुसार सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत दाऊद इब्राहिम याच्या कोणत्याही क्रमांकावरून खडसे यांच्याशी संपर्क झालेला नाही अथवा खडसे यांनी अशा कोणत्याही क्रमांकावर संपर्क केलेला नाही, असे आढळून आले आहे.

सात्त्विक वृत्तीने रहाणे म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे ! - योगतज्ञ दादाजी वैशंपायन

सत्यदत्त पूजा करतांना योगतज्ञ दादाजी वैशंपायन आणि बाजूला त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रमीला वैशंपायन
      शेवगाव (जिल्हा नगर) - सात्त्विक वृत्तीने रहाणे म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे. आज समाजात संघटितपणाची आवश्यकता असल्याने एकमेकांविषयी असलेल्या अपसमजांना तिलांजली द्यावी, असा संदेश योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिला. योगतज्ञ दादाजी यांनी ९७ व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त २१ मे या दिवशी शेवगाव (जिल्हा नगर) येथील दादाजी वैशंपायननगर येथे आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी योगतज्ञ दादाजींनी दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. योगतज्ञ दादाजींच्या जन्मोत्सवानिमित्त अनेक भक्तगणांनी प.पू. दादाजींचा सन्मान केला. सनातन संस्थेच्या वतीनेही श्री. अतुल पवार यांनी योगतज्ञ दादाजींचा सन्मान केला.
     या प्रसंगी पुणे येथील डॉ. रवींद्र नांदेडकर यांना सामाजिक कार्यगौरव पुरस्काराने, तर शिव चिदंबर स्वामींचे उपासक श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील श्री. उमाकांत कुलकर्णी आणि नाशिक येथील श्री. शिरीष ओतुरकर यांना आध्यात्मिक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुष्पहार, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गुजरात येथील प.पू. सवितानंद स्वामी यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.

जोधपूर येथील कडक उन्हाळ्यामुळे त्रस्त पू. संतश्री आसारामजी बापू यांनी केरळ येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली !

बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा भोगतांना सातत्याने सुटी देणारी व्यवस्था
 हिंदूंच्या निरपराध संतांची आरोग्यविषयक विनंती मानत नाही, हे लक्षात घ्या !
     जोधपूर - कथित लैंगिक शोषणाच्या आरोपावरून येथील कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू सध्या कडक उन्ह्याळ्यामुळे त्रस्त आहेत. त्यांनी उन्हाळा आणि उपचार यांसाठी त्यांना केरळ येथे नेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
     येथील न्यायालयात आणण्यात आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. पू. बापूजी म्हणाले की, मारवाडमधील सध्याच्या भीषण उन्हाळ्यामुळे प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे डोके दुखत आहे. या आजारावर केवळ केरळमध्येच उपचार आहेत. तेथील आयुर्वेद पद्धतीने यावर उपचार होऊ शकतात.
     दोन दिवसांपूर्वी केरळ येथील प्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक राघवन् कारागृहात येऊन बापूंची तपासणी करून गेले. राघवन् म्हणाले की, जर बापूजी केरळमध्ये आले, तर त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येतील.

क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा !

  • मुंबई येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्ववादी यांची मागणी !
  • मंदिर प्रवेशाचा निर्णय धर्मपिठाला विचारून घेण्याचीही मागणी
आंदोलन करतांना राष्ट्र आणि धर्मप्रेमी
       मुंबई, २२ मे (वार्ता.) -
देहली विद्यापिठाच्या भारतका स्वतंत्रता संघर्ष या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवण्याचे घृणास्पद कृत्य करण्यात आले आहे. क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट करा, यांसह हिंदूंच्या मंदिराच्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश मागणार्‍या पुरोगाम्यांमुळे सहस्रावधी वर्षांच्या प्राचीन धार्मिक प्रथा-परंपरा शासन आणि न्यायालय यांनी परस्पर मोडून काढू नयेत. याविषयी हिंदु धर्मातील धर्माचार्य, शंकराचार्य आणि काशी विद्वत परिषद यांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्ववादी यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे करण्यात आली.

डॉ. दाभोलकर यांचा खून समाजातील सद्य:परिस्थितीच्या कोंडीत अडकलेल्या व्यक्तीने केला !

डॉ. हमीद दाभोलकर यांचा कंठशोष !
     पुणे - महात्मा गांधी यांच्या मारेकर्‍याने समोर येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या; परंतु आताचे तरुण मारेकरी हे एका सत्तरीतल्या माणसावर पाठीमागून येऊन गोळ्या झाडतात. त्यामुळे त्यांच्यात धाडस नावाची गोष्ट नाही. डॉ. दाभोलकर यांचा खून कोणी एक व्यक्ती, विचारसरणी किंवा पक्ष यांच्या व्यक्तीने केला नसून समाजातील सद्य:परिस्थितीच्या कोंडीत अडकलेल्या व्यक्तीने केला आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. (पोलीस यंत्रणांची दिशाभूल करणारे आणखी एक वक्तव्य म्हणायचे कि वैचारिक दिशाभूल ? - संपादक) एका काव्यसंग्रह प्रकाशनाच्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवाला आणि धर्माला विरोध नाही; देव आणि धर्म यांच्या नावाखाली समाजाचे शोषण करणार्‍या प्रवृत्ती आणि व्यक्ती यांना विरोध आहे. (यावरून अंनिसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, असेच म्हणावे लागेल. एकीकडे धर्मपरंपरांना विरोध करायचा आणि दुसरीकडे धर्माला विरोध नाही, असे म्हणणे हे नागरिकांची वैचारिक दिशाभूल करण्याचेच काम आहे. - संपादक)

साधना, धर्माचरण आणि धर्मरक्षण हेच खरे आनंदी जीवनाचे मर्म ! - चंद्रशेखर कद्रेकर

आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करतांना
श्री. कद्रेकर (डावीकडून तिसरे)
     कर्णावती (गुजरात) - योग्य साधना करून धर्माचरण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण केले की, आपले जीवन आनंदी होते. ज्येष्ठ नागरिक या नात्याने स्वत:च्या घरात साधना, धर्माचरण आणि धर्मरक्षण यांच्या संस्कारांचे बीज पेरणे आणि सर्वांना आनंद देणे, हे आपले दायित्व आहे, असे प्रतिपादन श्री. चंद्रशेखर कद्रेकर यांनी केले. ते १५ मे या दिवशी संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने सायन्स सिटी उद्यान, थलतेज येथे ज्येष्ठ नागरिक परिवाराच्या सदस्यांना आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते.
     या वेळी धर्म आणि अध्यात्म यांविषयीच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. स्थानिक महिला सौ. अंजू गज्जर आणि सौ. शीला दातार यांनी प्रवचन आयोजित करण्यास साहाय्य केले. आम्हाला साधनेची योग्य दिशा मिळाली, त्यामुळे फार आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. श्री. पुरुषोत्तमभाई पटेल आणि श्री. पाठक यांनी साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

केरळमधील धर्मांधांकडून एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण !

     चेलांबरा (केरळ) - काही धर्मांधांनी येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे कोलाकाट्टुचल गावात असलेल्या तिच्या काकांच्या घरातून १८ मे या दिवशी अपहरण केले. काराथूर येथील रहिवासी शिहाब आणि सेरिना यांचे मुलीच्या आई-वडिलांशी चांगले संबंध होते. याचा अपलाभ घेत थामारासेरी येथील अब्दुल सामाद आणि बेंगळुरु येथील मूर्ती या दोघांनी शिहाब आणि सेरिना यांच्या साहाय्याने मुलीचे अपहरण केले.
    मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली असून पोलीस मुलीचा आणि धर्मांधांचा शोध घेत आहेत. केरळमधील निवडणुकांचे कारण देत चौकशीस विलंब होत असल्याचे समजते.

पुण्यातील नगर रस्त्यावरील एकात्मिक वाहतूक प्रणाली (बीआर्टी) खोट्या माहितीच्या आधारे चालू

एका बीआर्टी मार्गाविषयीची ही वस्तुस्थिती असेल, तर पुण्यातील इतर ठिकाणच्या 
बीआर्टी मार्गांची अनुमती कशी मिळवली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! जिल्हा
 प्रशासन किंवा राज्य शासन या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करेल का ?
      पुणे - येथील नगर रस्त्यावरील एकात्मिक वाहतूक प्रणाली (बीआर्टी) चालू करतांना या मार्गात अनेक त्रुटी आढळल्या आहेत; मात्र सर्व गोष्टींची पूर्तता झाल्याची खोटी माहिती देऊन हा मार्ग घाईघाईने चालू करण्यात आल्याचा आरोप पीएम्पी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले...
   १. एकात्मिक वाहतूक प्रणाली चालू झाल्यापासून तेथे प्रतिदिन लहान-मोठे अपघात होत आहेत. तेथील त्रुटी पालिका प्रशासनानेही मान्य केल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी संबंधितांना ३ दिवसांची मुदत दिली आहे; परंतु मार्गात अनेक त्रुटी असल्यामुळे तो चालू करण्याची घाई करू नका, अशी मागणी पीएम्पी प्रवासी मंच आणि नागरिक चेतना मंच या स्वयंसेवी संस्थांनी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पुणे येथे विद्यार्थिनीने घरी बसून व्यवस्थापनविषयीच्या अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका लिहिल्या

शिक्षण विभागाची वाढती बजबजपुरी !
 शिक्षण क्षेत्रातील वाढते अपप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभाग काही ठोस उपाययोजना करेल का ?
     पुणे - घरी बसून व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षाच्या परीक्षेची उत्तरपत्रिका देणारी विद्यार्थिनी आणि तिला पेपर पुरवणार्‍या शिपायास शिवसैनिकांच्या साहाय्याने पोलिसांनी धाड टाकून १९ मे या दिवशी पकडले. या प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे साहाय्यक कुलसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे.
१. निगडीच्या यमुनानगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट या संस्थेत दीप्ती परब दुसर्‍या वर्षाला शिकते. ती घरी उत्तरपत्रिका लिहायची आणि तिची उत्तरपत्रिका संस्थेतील शिपाई सावंत हा मूळ उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यात टाकून सील करायचा. त्यानंतर हा गठ्ठा अप्पा बळवंत चौकातील नारळकर इन्स्टिट्यूमध्ये जमा केला जायचा.

तुम्ही देवाला संतुष्ट केल्यास देव तुम्हाला संतुष्ट करील ! - प.पू. सवितानंद स्वामी

     प्रतिदिन साधना करण्याचे महत्त्व अधोरेखित करतांना प.पू. सवितानंद स्वामी म्हणाले, आज देशात, गावात घडणार्‍या प्रत्येक घटनेसाठी मी उत्तरदायी आहे, असे जेव्हा वाटेल, तेव्हाच काहीतरी पालट होईल. श्रीकृष्णाची भक्ती सर्वजण करतात; पण भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश आचरणात आणत नाहीत. ईश्‍वरामध्ये आणि आपल्यामध्ये कमीतकमी अंतर हवे, असे वाटत असेल, तर आपण सरळमार्गाने कार्य करावे. प्रत्येकाने प्रतिदिन किमान १ माळ तरी गुरुमंत्राचा अथवा इष्टदेवतेचा नामजप केला पाहिजे. नामजप केला, तर घरात आनंद, सुख, शांती निर्माण होईल. आपले धर्मग्रंथ प्रत्येकाच्या घरी असायला हवेत आणि त्याचे वाचनही प्रतिदिन करायला हवे. त्यामुळे आपले आचार, विचार, बुद्धी सिद्ध होते. आजचा मानवसमाज दुःष्यासनासारखा दुराचारी झाला आहे. त्सुनामी, भूकंप, आग लागणे यांसारखी संकटे येतात, त्या वेळी समुद्रातील एकही जीव मरत नाही; पण मानवाची हानी होते. पाऊस पडत नाही, याचे कारण म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेली शिकवण लोक आचरणात आणत नाहीत. लोक श्राद्धविधीही नीट करत नाहीत. श्राद्ध करायलाही आज लोकांकडे वेळ नाही.
काही जण दशक्रिया विधीही पाचव्या दिवशीच करतात. त्यामुळे पितरांना मुक्ती मिळत नाही. आपल्या ऋषीमुनींनी सर्व रचना अभ्यासपूर्ण केल्या आहेत. सध्या मात्र कुणी काहीही करत लागल्याने घरात अशांती आहे. सर्वांनी सत्कर्म करणे आवश्यक आहे. तुम्ही देवाला संतुष्ट केले, तर देव तुम्हाला संतुष्ट करेल.

चीन, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांत महापूर, तर तिबेटमध्ये भूकंपाचे झटके !

     नवी देहली - रोआनू नावाच्या वादळामुळे बांगलादेशातील बारीवाल आणि चटगाव क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यात २४ जणांचा मृत्यू झाला, तर ५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. अशीच काहीशी स्थिती श्रीलंकेत झाली आहे. येथे महापुरामुळे झालेल्या भूस्खलनात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२७ जण बेपत्ता आहेत. २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारताने दोन नौकांतून साहाय्यासाठीचे साहित्य पाठवले आहे. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे येथेही पूर आला आहे. चीनच्या दक्षिण भागात ही स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका लाखो लोकांना बसला आहे. यात धरणाचे बांधकाम करणारे ४१ मजूर बेपत्ता आहेत. तिबेटमध्ये ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे झटके बसले. यात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (बांगलादेशात रोआनू नावाचे आलेले वादळ, चीन आणि श्रीलंकेत आलेला महापूर आणि तिबेटमध्ये झालेला भूकंप या घटनांवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

थेरगाव (जिल्हा पुणे) येथे एका धर्मांध भोंदूबाबाकडून एका महिलेवर बलात्कार, धर्मांधाला अटक

अल्पसंख्यांकांच्या भोंदूगिरीविषयी 
तृप्ती देसाई आवाज उठवतील का ?
        पुणे, २२ मे - येथील एका धर्मांध भोंदूबाबाने एका २६ वर्षीय महिलेवर करणी झाल्याचे सांगत बलात्कार केल्याची घटना येथील थेरगाव भागात २० मे या दिवशी उघड झाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी रमजान शेख याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट अघोर प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा प्रविष्ट केला आहे. वाकड पोलिसांनी शेख याला २२ मे या दिवशी अटक केली आहे.
१. पीडित महिला मे २०१५ मध्ये रुग्णाईत होती. त्या वेळी शेख याने तिच्याशी संपर्क साधून तिच्या घरावर करणी केल्याचे सांगितले. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. मी तुमच्या घरावर केलेली करणी दूर करू शकतो; परंतु त्यासाठी तुला ७ वेळा माझ्यासमवेत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. याविषयी कोणालाही माहिती दिल्यास तुझ्या घरातील एका व्यक्तीचा मृत्यू होईल, अशी धमकी दिली.

पिंपरी (पुणे) आणि परिसरात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढली

पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा भयावह दुष्परिणाम रोखण्यासाठी धर्मशिक्षणच आवश्यक !
     पिंपरी - येथील हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, काळेवाडी, भोसरी आणि पिंपरी या परिसरातील औषध दुकानांमधून गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्या घेण्यात तरुणींचा सहभाग लक्षणीय असल्याचे औषध विक्रेत्यांकडून समजते. सध्या मोठ्या औषध दुकानांतून प्रतिदिन किमान ५, तर छोट्या दुकानांमधून किमान २ अशा प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री होत आहे. त्या गोळ्या खरेदी करणार्‍यांमध्ये १७ ते ३२ या वयोगटातील अविवाहित युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांचे प्रमाण अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहे.
     आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याविना ही औषधे-गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारे गोळ्या घेतल्या जात आहेत. (या प्रकरणी औषध विक्रेतेही दोषी आहेत वा नाही, हे अन्न आणि औषध प्रशासन पडताळून त्यांच्यावर कारवाई करेल का ? - संपादक) काही ठिकाणी औषध दुकानांमधून विक्री होणार्‍या गोळ्या आणि औषधे यांची नोंदही केली जात नाही. किशोरवयीन मुलीसुद्धा स्वत: दुकानात जाऊन गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्याचे समजते.

सनातन संस्था कोल्हापूरच्या वतीने नेत्ररोग शिबीर

शिबिरात सहभागी रुग्ण
     कोल्हापूर - १९ मे या दिवशी येथील शाहूपुरीमधील दुसर्‍या गल्लीतील श्री राधाकृष्ण मंदिर येथे सनातन संस्था कोल्हापूरच्या वतीने नेत्ररोग पडताळणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. संजय सामंत यांनी रुग्णांची पडताळणी केली. या उपक्रमाचा ९५ जणांनी लाभ घेतला. या वेळी रुग्णांना नेत्ररोगावरील औषधांचे विनामूल्य वाटपही करण्यात आले. सनातन संस्था कोल्हापूरद्वारे असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. याविषयी उपस्थितांनी संस्थेचे आभार मानले.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

        नवी देहली - पाणी आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले दायित्व आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्याच्या ४ महिन्यांमध्ये पाण्याचा योग्य वापर करणे आपले दायित्व आहे, पावसाळयाच्या या ४ महिन्यांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले. (पाण्याचा अपव्यय करणार्‍यांना दंड करणे हे राजाचे कर्तव्य आहे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष असणे, हा राज्यकर्ते अधर्माचरणी असल्याचा परिणाम आहे, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे ! - संपादक) पंतप्रधान म्हणाले की, पाणी वाचवा, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका. (देशातील जनतेला हेही सांगावे लागते, हे लज्जास्पद ! - संपादक) पाणी वाचवणे आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मी प्रसारमाध्यमांना विनंती करीन की, त्यांनी पाणी वाचवण्यासाठी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करावी. दुष्काळाचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी चांगले उपाय योजले, गुजरात आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग केला, असेही मोदी यांनी सांगितले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनस्थळी अवतरली संतांची मांदियाळी

ग्रंथ बघतांना श्री. खेमराज शर्मा (मध्यभागी) आणि
त्यांना माहिती सांगताना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (उजवीकडे)
पू. रामगिरी बापू यांचा सन्मान करतांना
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

महाबळेश्‍वर (जिल्हा सातारा) येथील श्री जननीमाता मंदिरात चोरी

राज्यातील असुरक्षित मंदिरे !
     महाबळेश्‍वर - येथील खालची माळी आळी येथील श्री जननीमाता मंदिराच्या मागील खिडकीची जाळी उचकटून चोरट्यांनी मंदिरातील अनुमाने ११ सहस्र ८०० रुपयांच्या ऐवजाची चोरी केली आहे. या प्रकरणी मंदिराचे अध्यक्ष एकनाथ बिरामणे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
     मंदिराचे पुजारी १८ मे या दिवशी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा मुकुट, चांदीची तलवार, चांदीचे त्रिशूळ, क्लोज्ड सर्किट टीव्हीची प्रणाली, मंदिरातील २ पितळी कळस आणि समई असा ऐवज चोरला आहे.

प्राध्यापक कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांनी डिस्कव्हर मोटारसायकल वापरल्याचा इस्रोचा दावा !

       बेळगाव - प्राध्यापक कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांनी डिस्कव्हर मोटारसायकल वापरल्याचा दावा इस्रोने (भारतीय अवकाश संस्था) केला आहे. कलबुर्गींच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकर्‍यांचे तेथून फरारी होतांनाचे दृश्य शेजारील महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये रेकॉर्ड झाले होते. या दृश्याविषयीचा अहवाल इस्रोने दिला आहे.
१. कलबुर्गींच्या हत्येचा तपास करणार्‍या सीआयडी पोलिसांनी या व्हिडीओचा अभ्यास केला मात्र त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने अधिक तपासासाठी इस्रोकडे पाठवण्यात आला होता.

कर्जत (जिल्हा सातारा) येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाकडून आक्रमण

जमावाकडून पोलिसांना केली जाणारी मारहाण 
हा पोलिसी खाक्याचा धाक संपल्याचे निदर्शक आहे. 
असे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ?
        कर्जत, २२ मे - सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे पथक कर्जत तालुक्यात माळंगी येथे आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथील जमावाने पोलिसांच्या पथकावर आक्रमण केले आणि आरोपीची सुटका केली. हा सर्व प्रकार १९ मे या दिवशी घडला.
१. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक हे रस्ता लुटीच्या प्रकरणातील आरोपीच्या माळंगी येथील घरापर्यंत पोहोचले. त्या वेळी आरोपी घराजवळच होता.

सिंहस्थपर्वात धर्म आणि अध्यात्म केवळ सनातन संस्थेच्या प्रदर्शनात दिसले ! - स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज (माजी शास्त्रज्ञ), सतना, मध्यप्रदेश

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी चर्चा करतांना 
स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज
     उज्जैन - मी संपूर्ण सिंहस्थपर्वात फिरलो; मात्र धर्म आणि अध्यात्म केवळ सनातन संस्थेच्या प्रदर्शनात मला दिसले, असे गौरवोद्गार स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने लावण्यात आलेले प्रदर्शन पाहिल्यावर ते बोलत होते. सनातनच्या सर्व ग्रंथांचा संच ए.के.एस्. विद्यापिठासाठी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
    महाराज निवृत्त प्राध्यापक असून त्यांनी संन्यास घेतला आहे. ते अद्यापही ए.के.एस्. विद्यापिठात एक विषय विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी ग्रंथप्रदर्शनातील विविध ग्रंथ खरेदी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी त्यांची अध्यात्मावर सविस्तर चर्चा झाली.

कोल्हापूर येथे पाईक संघ आणि वासकर फड यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी संस्कार शिबिराचे आयोजन

     पंढरपूर/कोल्हापूर (जिल्हा सोलापूर) - शालेय मुला-मुलींना वारकरी संप्रदायाचे आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार लाभावेत, या हेतूने १३ ते २६ मे या कालावधीत येथील श्री विठ्ठल वीरदेव मंदिर पट्टण कोडोली (कोल्हापूर) या ठिकाणी उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन वारकरी संप्रदाय पाईक संघ आणि वै. विवेकानंद महाराज वासकर फड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. देवव्रत महाराज वासकर यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी संत नामदेवरायांचे वंशज विठ्ठल महाराज नामदास, कबीर फडाचे प्रमुख रघुनाथ महाराज कबीर, गणेश महाराज कराडकर, यादव महाराज उपस्थित होते.
     शिबिरात हरिपाठ, ज्ञानेश्‍वरी, मृदंगवादन, गायन, तसेच शारीरिक समृद्धीसाठी योगा शिक्षण दिले जात आहे. यासाठी ह.भ.प. बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी संपूर्ण नियोजन सांभाळत असून या शिबिराला पालक वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ४५० हून अधिक मुलींनी यात सहभाग नोंदवला आहे.

प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांचे राष्ट्रप्रेरक विचार लोकांमध्ये पसरवण्याची आवश्यकता ! - अजय सिंह सेंगर

प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांची १०६ वी जयंती साजरी
मार्गदर्शन करतांना श्री. अजय सिंह सेंगर, व्यासपिठावर
श्री. नरेंद्र सुर्वे (डावीकडून चौथे) आणि अन्य मान्यवर
     पनवेल - जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा धर्माच्या आधारावर गांधी यांनी फाळणीला मान्यता दिली. पाक आणि बांगलादेश मुसलमानांना देण्यात आले. त्या वेळी राहिलेला भूभाग हिंदूंचे हिंदु राष्ट्र असायला हवे होते; पण गांधीयच्या हेकेखोरपणामुळे भारतात मुसलमानांनाही त्यांनी थांबवले. आज त्याच मुसलमानांचे काँग्रेससारखे राजकीय पक्ष लांगूलचालन करत आहेत. देशातील हिंदूंची संख्या अल्प आणि मुसलमानांची संख्या वाढत आहे. येत्या काळात हिंदु म्हणून भारतात रहायचे असेल, तर हिंदूंची लोकसंख्या वाढवायला हवी. त्यासाठी प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांचे राष्ट्रप्रेरक विचार लोकांमध्ये पसरवले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजय सिंह सेंगर यांनी केले. येथे महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांची १०६ वी जयंती १९ मे या दिवशी साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

राज्यात जातीअंतासाठी आंतरजातीय विवाहाला ५ पट अनुदान - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

जातीअंतासाठी हास्यास्पद उपाययोजना ! अशा निर्णयाने 
जातीअंत होणार आहे का ? उलट यामुळे कायदा-सुव्यवस्थेची 
परिस्थिती बिघडल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
       कोल्हापूर, २२ मे - जातीअंतासाठी राज्यात आंतरजातीय विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाईल. आंतरजातीय विवाह करणार्‍या दांपत्यांना ५० सहस्र रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाते. या अनुदानात केंद्र शासनाकडून वाढ करण्यात येणार असून अशा दांपत्यांना २ लक्ष ५० सहस्र रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या अपत्यालाही चाकरीसाठी आरक्षण देण्याचा विचार चालू असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी जाहीर केले. (अशा धोरणाने आरक्षणाचे भूत उतरण्याऐवजी ते वाढत जाईल. - संपादक) येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या छोट्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती जिल्हा निवड आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन २० मे या दिवशी केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
      या वेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत धनवडे, आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके आदी उपस्थित होते.

वाळूमाफियांना आघाडी शासनाची राजमान्यता ! - राधाकृष्ण विखे-पाटील यांची स्पष्ट कबुली

दोन्ही काँग्रेसच्या तत्कालीन 
आघाडी शासनाचे खरे स्वरूप !
       इंदापूर (जिल्हा पुणे), २२ मे - आमच्या शासनाच्या काळात शासनाने अवैध वाळूउपशावर कसलेच लक्ष दिले नाही. त्यामुळे राज्यातील वाळूमाफिया सुसाट सुटले असून त्यांनी मोठा हैदोस घातला आहे. आमच्या आघाडी शासनाने वाळूमाफियांना दिलेली ही राज्यमान्यताच आहे, अशी स्पष्ट स्वीकृती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. (सत्ता गेल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे आता का बोलत आहेत ? सत्ता हातात असतांना पाटील हे त्याविषयी का बोलले नाहीत ? याचाच अर्थ आघाडी शासनाने सत्तेचा दुरुपयोग करून वाळूमाफियांना राजाश्रयच दिला असेच म्हणावे लागेल ! अशा लोकप्रतिनिधींना जनतेने आता कायमचे घरी बसवायला हवे ! - संपादक) सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर जातांना वाटेत इंदापूर येथील विश्रामगृहावर थांबले असता त्या वेळी विखे-पाटील हे पत्रकारांशी बोलत होते.

प्रदर्शन पहाण्यास भगवान शिवाचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घालून आलेल्या ग्रामस्थ युवकाचे प्रबोधन केल्यानंतर त्याने क्षमा मागून लगेच तो पालटला !

     उज्जैन - उज्जैन सिंहस्थपर्वात लावण्यात आलेले सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला १९ मे या दिवशी ग्रामस्थांनी भेट दिली. त्यांच्यापैकी एका युवकाने भगवान शिवाचे चित्र असलेला टी-शर्ट घातला होता. यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंखे यांनी सदर युवकाचे प्रबोधन केले. श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला. यानंतर दोघाही ग्रामस्थांना झालेला पश्‍चाताप त्यांच्या चेहर्‍यावर दिसून आला. याविषयी त्यांनी नम्रपणे क्षमायाचना करून प्रदर्शनात एका कोपर्‍यात जाऊन त्यांच्या पिशवीतून दुसरा शर्ट काढून तो घातला.
सनातनचे प्रदर्शन अद्भुत आहे ! - स्वामी निरंजनानंद महाराज (एक भिक्षुक), संगरूर, पंजाब

स्वामी निरंजनानंद (आसंदीवर बसलेले) यांच्याशी 
चर्चा करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
      उज्जैन - सनातनचे प्रदर्शन अद्भुत आहे, असे गौरवोद्गार पंजाबच्या संगरूर जिल्ह्याचे एक भिक्षुक स्वामी निरंजनानंद महाराज यांनी येथे काढले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेल्या प्रदर्शनास स्वामी निरंजनानंद महाराज यांनी नुकतीच भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
    स्वामी निरंजनानंद महाराज पुढे म्हणाले, आम्ही तर धर्मासाठी फार थोडे कार्य केले आहे. त्या तुलनेत तुम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमांतून धर्माची परिपूर्ण सेवा करत आहात. आम्हा संतांना असे कधी सुचणार नाही. तुमचे गुरु डॉक्टर असल्यामुळे ते तक्ते आणि फलक यांच्या माध्यमांतून चांगला धर्मप्रसार करत आहेत. सनातनचे प्रदर्शन अद्भूत आहे. मी ज्याची कल्पना केली होती, त्यापेक्षा येथे फार सखोल चिंतन आणि अभ्यास करून सनातनने प्रदर्शन बनवले आहे. अशी माहिती अन्य कुठेही मिळाली नाही. मी सिंहस्थपर्वात आलो; पण कोणत्याही साधूसंतांना भेटण्याची इच्छा झाली नाही. येथे सर्वत्र पाखंड जाणवले. कुणाशी मनातील बोलावे वा जवळीक करावी, असे वाटले नाही; मात्र सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आल्यावर मला फार चांगले वाटले.

फलक प्रसिद्धीकरता

जिहादी आतंकवादाचे मूळ असलेल्या पाकच्या प्रसारमाध्यमांचा थयथयाट !
     पाकच्या जंग या दैनिकात म्हटले आहे की, भारताची अण्वस्त्र क्षमता असणारी पाणबुडी आणि अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे यांमुळे दक्षिण आशियामधील समतोल बिघडून जाईल. हिंदी महासागराच्या किनार्‍यावर असलेल्या ३२ देशांना त्याचा धोका आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharatki parmanu astra kshamataki pandubbi aur missilesse Hind Mahasagarke 32 deshoko dhoka- Pak - Jihadiyoka adda ban chuke Pakko ab path padhanahi hoga
जागो ! : भारत की परमाणु अस्त्र क्षमता की पनडुब्बी और मिसाईल्स से हिंद महासागर के ३२ देशों को धोका ! - पाक - जिहादियों का अड्डा बन चुके पाक को अब पाठ पढाना ही होगा !

अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे (राजकीय) उद्घाटन !

       पुणे, २२ मे (वार्ता.) - वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे २१ मे या दिवशी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (संत साहित्याचे उद्घाटन राजकारण्यांच्या हस्ते नव्हे, संतांच्या हस्ते करणे अपेक्षित आहे ! - संपादक) या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. मराठी संत साहित्य संमेलन हा चांगला उपक्रम असला, तरी एकंदरित कार्यक्रमाचा फ्लेक्स, त्यातील परिसंवाद यामध्ये सहभागी वक्ते आणि विषय यांचा संत साहित्याशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे दिसून येत होते. (संत साहित्य संमेलने राजकारण्यांचे अड्डे न बनता संमेलनाच्या माध्यमातून संतांची साधना करण्याची शिकवण सर्वत्र पोहोचावी, ही अपेक्षा ! - संपादक) हे संमेलन दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अर्पित करण्यात येणार असल्याचे संमेलनाध्यक्षांनी घोषित केले. हे संमेलन ३ दिवस चालणार असून २३ मे या दिवशी त्यचा समारोप होईल.

४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानामध्ये दिवसभर वाळूवर बसून सूर्यसाधना करणारे काही हठयोगी साधू !

उन्हात वाळूवर बसून साधना करणारे साधू
    उज्जैन - सिंहस्थपर्वात विविध प्रकारचे साधू आले होते. ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. त्यांपैकी काही जण दिवसभर कडक उन्हात तपश्‍चर्या करत होते. एकीकडे कडक ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडत नव्हते. लोकांना लगेच उन्हाळ्याचा तीव्र त्रास होत होता. मध्यप्रदेश शासनानेही ऑरेंज अलर्ट घोषित करून दुपारी १ ते ५ या वेळेत बाहेर न पडण्याची सूचना नागरिकांना केली होती. दुसरीकडे तापमान ४३ ते ४७ अंश सेल्सियस इतके प्रचंड असतांना उजडखेडा कुंभक्षेत्रातील भूखीमाता मार्गावर साधू राधिकानंदजी महाराज अत्यंत कडक उन्हात वाळूवर शांतपणे डोळे मिटून बसून साधना करत होते.

उज्जैन सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

     सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंहस्थक्षेत्री लावलेल्या प्रदर्शनास अनेक साधूसंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी भेटी दिल्या. हे प्रदर्शन पाहिल्यावर त्यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय पुढे देत आहोत. 
श्री. रोहिनी शर्मा प्रसाद, कटनी, मध्यप्रदेश
     हे प्रदर्शन पाहिल्यावर हिंदु संस्कृती किती महान आहे, हे लक्षात आले. आज जन्म हिंदूंची जी दयनीय अवस्था आहे, त्याचे मूळ कारण म्हणजे आपण आपल्याच संस्कृतीला विसरलो असून पाश्‍चात्त्य संस्कृतीला स्वीकारले आहे. याउलट अमेरिका, जर्मनी यांसारख्या पाश्‍चात्त्य राष्ट्रांतील नागरिक हिंदु संस्कृतीचा अभ्यास करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहेत. निदान हे प्रदर्शन पाहून गेलेल्या हिंदूंनी आतातरी त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा त्यांच्यापेक्षा कर्मदरिद्री कुणी नसेल. आपल्यासारख्या निष्काम कर्म करणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आणि तुमच्या गुरूंमुळे पुढे हिंदु राष्ट्र येईल, याची निश्‍चिती वाटते. मी स्वत: पोलीस दलात कार्यरत असून ३ मासांनी सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर आपल्याप्रमाणे संस्थेत राष्ट्र आणि धर्मासाठी कार्य करू इच्छितो.

सिंहस्थपर्वात कथेच्या नावाखाली एका प्रसिद्ध कथावाचकाकडून पान मसाल्याचा सर्रास प्रचार !

  • मांडवात पान मसाल्याची विज्ञापने 
  • भाविकांना पान मसाल्याचे विनामूल्य वाटप
मांडवात लावण्यात आलेली पान
मसाल्याची विज्ञापने
     उज्जैन - देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून श्रद्धाळू आणि भाविक लोक कुंभमेळ्यात आध्यात्मिक भाव घेऊन येतात. संतांकडून चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी, तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. एकीकडे वैश्‍विक सिंहस्थपर्वात लोक हिमालयातून आलेल्या संतांचे दर्शन करून धन्य होत होते, तर दुसरीकडे काही तथाकथित संत धर्म आणि अध्यात्म यांच्या नावावर लोकांना व्यसनाकडे वळवून चुकीचा मार्ग दाखवत होते. वृंदावन येथील प्रसिद्ध कथावाचकाच्या मांडवात चक्क लहान-लहान मुले पान मसाला खात होती. या कथावाचकाचा मांडवाच्या प्रवेशद्वारावरच लोकांना खाण्यासाठी पान मसाला विनामूल्य दिला जात होता. तो वाटण्यात लहान मुलांचाही सहभाग होता.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरिता धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग

श्री. रमेश शिंदे
श्री. सुनील घनवट
     धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. याचा परिणाम म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली आहे. त्यांना स्वतःच्याच धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे धर्मपरिवर्तन करणार्‍यांचे, तसेच हिंदु धर्मविरोधकांचे फावले आहे. आज तथाकथित सेक्युलर वाहिन्यांवरून केला जाणारा हिंदु धर्मविरोधी प्रचार, जे.एन्.यू. सारख्या विद्यापिठांतून हिंदु धर्मावर केली जाणारी टीका, तसेच महिषासुर जयंतीसारखे कार्यक्रम पाहिल्यावर हिंदु धर्मविरोधक यशस्वी झाल्याचे दिसत आहे. स्वतंत्र भारतातील हिंदु युवकांच्या मनात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात केलेले बीजारोपण आता अंकुरत असल्याचे दिसत आहे. याच वेळी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुसलमान मदरशांतून, तर ख्रिस्ती चर्च आणि कॉन्व्हेंट यांतून आपापल्या धर्माचे शिक्षण घेतच आहेत. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. त्यातूनच हिंदूंच्या मनात धर्माभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना सिद्ध करता येईल.

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मालेगाव बॉम्बस्फोटातील सद्यस्थिती आणि खरे स्वरूप या विषयावर पत्रकारांशी संवाद !

       जळगाव - येथे २२ मे या दिवशी मालेगाव बॉम्बस्फोटातील सद्यस्थिती आणि खरे स्वरूप या विषयावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत...)

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाची मालिका

       सातारा, २२ मे - राज्यात भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणाच्या परिसरात गेल्या ३ दिवसांपासून भूकंपाची मालिका चालू आहे. गेल्या ३ दिवसांत काही घंट्यांच्या अंतराने ६ वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचे धक्के ३.० ते ३.६ रिश्टर स्केल या अल्प तीव्रतेचे असले, तरी त्याची खोली ५ ते ८ किलोमीटर एवढी आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोयना धरणाच्या दक्षिणेला २७ किलोमीटरच्या आसपास भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.

बोथट संवेदना

   व्यक्तीच्या स्वतःच्या संदर्भातील जाणिवा (त्याला आध्यात्मिक भाषेत अहंकार म्हणू शकतो) दिवसेंदिवस तीव्र होत असतांना समाजाविषयीच्या संवेदना मात्र बोथट होत चालल्या आहेत. एखाद्या सामाजिक प्रश्‍नाच्या अथवा दुर्घटनेच्या संदर्भात मला काय त्याचे, मी कशाला मध्ये पडू ?, माझा काय संबंध अशा उमटणार्‍या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचेच प्रतीक आहे.

वास्तुशास्त्रातील बारकावे शिकतांना आलेले अनुभव आणि त्याद्वारे झालेले हिंदूसंघटन !

सौ. मधुरा कर्वे
१. सर्वधर्मसमभावाचा जोरदार सूर ओढणारे आयकर सल्लागार 
     मी आणि यजमान एके ठिकाणी वास्तुशास्त्रातील बारकावे शिकण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी तेथे दोन अन्य गृहस्थही आले होते. त्यातील एक आयकर सल्लागार होते आणि दुसरे वैद्य होते. (त्यांचा ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास होता.) यातील एका सत्रात वास्तूउपायांच्या संदर्भात समाजातून आलेेले कटू अनुभव आणि ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी या विषयावर काही मिनिटे व्यवस्थापकाने गटचर्चा घेतली. गोव्यामध्ये इतर धर्मियांकडून आलेले काही कटू अनुभवही त्यांनी सांगितले. तेव्हा त्या चर्चेत सहभागी असलेल्या आयकर सल्लागारांनी सर्वधर्मसमभावचा जोरदार सूर ओढला.

भूमाता ब्रिगेडच्या महिलांनो, मंदिरातच नव्हे, तर अगदी गर्भगृहापर्यंतही भक्तीभावाविना जाणार्‍यांना देव कधी भेटत नाही, हे लक्षात घ्या !

पू. बाबा (सदानंद) नाईक
      मंदिरांतील गर्भगृहात प्रवेश मिळवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलने करत आहेत. मंदिरातच नव्हे, तर अगदी गर्भगृहातही भक्तीभावाविना जाणार्‍यांना देव कधी भेटत नाही; कारण तो भक्तीभावामध्ये असतो. तृप्ती देसाई यांनी कधी देवासमोर गुडघे टेकून वा देवाला शरण जाऊन कधी काही मागितले आहे का ? भाव नाही, तेथे काहीही नाही. याउलट ज्याच्याकडे भाव आहे, त्याच्याकडे देव स्वतःहून जातो. अशा व्यक्तीला देवाला शोधण्यासाठी देवळातही जावे लागत नाही. 
     अन्न वा कोणतीही गोष्ट आपल्याला कष्ट केल्याविना मिळत नाही. त्याचप्रमाणे देवाची कृपा होण्यासाठी भक्तीभावाने कष्टच करावे लागतात. भाव नसलेली व्यक्ती देवळात अगदी गर्भगृहात मूर्तीपर्यंत गेली, तरी तिला देवतेचे चैतन्य ग्रहण होणार नाही; पण भाव नसलेली व्यक्ती देवळात न जाता घरात भक्तीभावाने जरी भांडी घासत बसली, तरी तिला त्या भांड्यांतूनही देवतेचे चैतन्य मिळेल. 
- (पू.) बाबा (सदानंद) नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०१६)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     हिंदु राष्ट्राची पहाट पहायची असेल, तर संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
     इतर पंथीय त्यांच्या पंथाप्रमाणे विनासंकोच धर्माचरण करतात. मग हिंदूंचे धर्माचरण उंबरठ्याच्या आत मर्यादित का ? - प.पू. वामनाचार्य महाराज

रत्नागिरी येथील साधिका सौ. पल्लवी लांजेकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सौ. पल्लवी लांजेकर
१. मनात नकारात्मक विचार येत असतांना कागदावर मनाचे चित्र काढून ते भावसोहळ्यातील पुष्पांसमवेत ठेवून आर्ततेने प्रार्थना केल्यावर नकारात्मक विचार न्यून होऊन मन सकारात्मक होणे आणि त्यामुळे भावजागृती होणे : गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. माझे साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत. माझी अजून साधनेत प्रगती होत नाही, तसेच मला मनमोकळेपणाने बोलता येत नाही, माझा प्रतिमा जपण्याचा भाग पुष्कळ आहे, माझ्यातील दोष कधी जातील ? असे विचार येऊन मला रडू येत होते.
        गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी मी गुरुदेवांच्या चरणी शरण जाऊन एका कागदावर मनाचे चित्र (गोल) काढले. त्यावर माझे नाव (सौ. पल्लवी लांजेकर) आणि प.पू. गुरुदेव असे लिहिले. नंतर हे गुरुदेवा, या मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन तुम्हाला अपेक्षित असेच विचार येऊ देत, अशी आर्ततेने प्रार्थना केली आणि तो कागद मी मला मिळालेल्या भावसोहळ्याच्या प्रसादाच्या फुलांसमवेत ठेवला. त्या क्षणापासून माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन मन सकारात्मक झाले. मला गुरुमाऊलींनी नकारात्मक विचारांतून बाहेर काढल्यामुळे मला प्रक्रियेचा आनंद मिळू लागला. त्यासाठी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी मी कोटी कोटी कृतज्ञ आहे. माझी गुरुमाऊली माझ्यासाठी किती करत आहे ! माझ्या साधनेची काळजी माझ्यापेक्षा माझ्या गुरुमाऊलीलाच आहे, हे अनुभवतांना भावजागृती झाली.

प्राणघातक आक्रमण आणि कर्करोगासारख्या आजारातही स्थिर रहाणारे अन् ईश्‍वरी कृपेमुळेच वाचलो, असा भाव असणारे श्री. किशोर आचार्य !

१. वडिलांवर प्राणघातक आक्रमण झाल्यावर आधुनिक वैद्यांनी देवानेच वडिलांना वाचवल्याचे सांगणे आणि वाईट शक्तीने प्रकट होऊन वडिलांना मारण्यासाठी आल्याचे सांगणे : वर्ष २००४ मध्ये काही लोकांनी माझे वडील श्री. किशोर आचार्य यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले होते. त्या वेळी त्यांची स्थिती एवढी वाईट होती की, आधुनिक वैद्यांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता नसल्याचे सांगितले होते. भारतातील एक प्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉ. राजा हे अजूनही त्यांच्या तपासणीसाठी येतात. तेव्हा ते देवानेच तुमच्या वडिलांना वाचवले आहे, असे म्हणतात.
      वडिलांवर आक्रमण होण्यापूर्वी मुल्की सेवाकेंद्रात एक वाईट शक्ती प्रकट होऊन म्हणाली, मी किशोरला मारण्यासाठी आले होते; पण या टोपीवाल्यांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) त्यांना वाचवले. मी त्यांना ५ वेळा मारणार होतो; पण त्यांना ३ वेळाच मारू शकले.
२. वडील अतीदक्षता विभागात असतांना साधकांनी नामजप केल्याने आणि स्थूल-सूक्ष्म मंडल काढल्याने लवकर बरे होऊन सर्वसामान्य विभागात येणे : माझे वडील चिकित्सालयात होते, तेव्हा काही साधक त्यांच्यासाठी नामजप करतग होते. साधकांनी सूक्ष्मातील मंडल आणि माझ्या आईने स्थुलातून मंडल काढल्यामुळेच ते अतीदक्षता विभागातून लवकर बरे होऊन सर्वसामान्य विभागात येऊ शकले.
३. वडिलांनी रक्षण करण्यासाठी कुलदेवी आल्याचे सांगून रडणे आणि शस्त्रकर्म करायच्या आधी केलेल्या चाचणीत जखम भरून आल्याने शस्त्रकर्म स्थगित करणे : वडील सर्वसामान्य विभागात आल्यावर ते कुलदेवीचे स्तोत्र म्हणून रडू लागले आणि म्हणाले, माझे रक्षण करण्यासाठी श्री कालिकांबा (आमची कुलदेवी) आली होती. मी तिला पाहिले. आजही एखादे आधुनिक वैद्य त्यांचा सी.टी. स्कॅनचा अहवाल पहातात, तेव्हा सांगतात, ते कदाचित ्आयुष्यभर झोपून राहिले असते किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल झाले असते. त्यांच्या डोक्यावरील घाव एवढा खोल होता की, आधुनिक वैद्यांनी त्यांचे शस्त्रकर्म करावे लागेल, असे सांगितले होते. त्यांच्या शस्त्रकर्माचा दिवसही ठरला; पण त्या दिवशी आधुनिक वैद्यांनी पुन्हा त्यांची सी.टी. स्कॅन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीत त्यांच्या मेंदूतील जखम बर्‍याच अंशी भरून आली होती. त्यामुळे त्यांचे शस्त्रकर्म केले नाही.
       माझ्या वडिलांना लवकर बरे करून आमच्या कुटुंबाचे रक्षण केल्यामुळे मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.
४. गंभीर आजारपणात वडील शांत आणि स्थिर रहाणे अन् ईश्‍वराच्या कृपेने बरे आहोत, असा भाव असणे : वर्ष २०१३ मध्ये वडिलांना नन होडिकनेस लिंफोमा हा आजार होऊन तो तिसर्‍या टप्प्यापर्यंत पोहोचला होता; पण तरीही वडील शांत आणि स्थिर होते. किरणोत्सर्जन चिकित्सेमुळे त्यांना थकवा येणे आणि रात्री झोप न लागणे, असे त्रास होत होते; पण तरीही त्यांची ईश्‍वरावरील श्रद्धा न्यून झाली नाही. ईश्‍वराच्या कृपेनेमुळेच आपण बरे होत आहोत, असा त्यांचा भाव होता.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे आलेल्या चिन्हांप्रमाणे वडिलांच्या चाचणीत लिफनोड दिसणे : डी.एफ्.टी. स्कॅनमध्ये जे लिफनोड दिसत होते, तशीच चिन्हे परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रात आली होती. त्या छायाचित्रावर आक्रमण झाल्यामुळे आम्ही ते छायाचित्र काढून टाकले होते. त्यानंतर वडिलांना कर्करोग झाल्याचे निदान झाले.
       किरणोत्सर्जन चिकित्सेमुळे ते लवकर बरे झाले. याचे आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटले. गुरुदेवांनी वडिलांचे दुसर्‍यांदा प्राण वाचवले आणि त्यांच्याकडून साधना करवून घेऊन आमच्या कुटुंबावर कृपा केली, त्यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.
- कु. गौरी आचार्य, उडुपी, कर्नाटक. (६.३.२०१६)

अशी अनुभवली गुरुकृपा !

श्री. तुकाराम लोंढे
१. दुकानावर झाड झुकल्याने ते 
कधीही पडू शकेल, अशी स्थिती असणे
        २२.६.२०१५ या दिवशी सकाळी मी गावाहून आलो. आश्रमात सेवेसाठी आलो असतांना सायंकाळी ६ वाजता माझ्या मुलाचा मला दूरभाष आला, दुकानावर झाड पडणार आहे. लगेच या. निरोप ऐकून मी ताबडतोब गेलो. तेव्हा झाड दुकानावर झुकले होते. कधीही ते पडू शकेल, अशी स्थिती होती.
२. स्वार्थी नगरसेवकांनी झाड 
तोडण्याच्या मागणीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणे
        मी प्रथम नगरसेवकांकडे गेलो आणि झाड तोडण्यासाठी साहाय्य मागितले. आमच्या दुकानाला लागून या नगरसेवकांची १५ दुकाने आहेत. तेव्हा तेे म्हणाले, ते झाड अशा स्थितीत कापू शकत नाही. ते पडल्यावर पाहू. तेव्हा मी गयावया करून म्हणालो, झाड पडल्यास माझ्या दुकानाची हानी होईल. आमचे सर्व कुटुंब या दुकानावर चालते. त्यावर ते म्हणाले, झाड पडल्यावरच पुढे काहीतरी करता येईल. वास्तविक झाड आमच्या दुकानावर झुकले असल्याने त्यांच्या दुकानांची हानी होणार नाही; म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करत होते.

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी या संतपदी विराजमान झाल्यावर कु. मधुरा भोसले यांनी भेटकार्ड देऊन त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

पू. विजयालक्ष्मी काळेआजी 
यांच्या चरणी सविनय अर्पण ! 
कु. मधुरा यांनी दिलेल्या भेटकार्डाचे मुखपृष्ठ
        कु. मधुरा भोसले यांनी पू. काळेआजींना दिलेल्या भेटकार्डातील कविता पुढीलप्रमाणे आहेत.
वैकुंठाकडे विमान निघाले । 
पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी
 साधक-शिष्य-संत हा प्रवास पूर्ण केलात ।
विहंगम गतीने संतपदी पोचलात ॥ १ ॥
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालात ।
स्थळ-काळाच्याही पलीकडे गेलात ॥ २ ॥
विष्णूच्या भक्तीत तल्लीन झालात ।
ज्ञानाचा दीपक प्रज्वलित केलात ॥ ३ ॥
मधुपर्काने अभिषेक केलात ।
शिवलिंगावर तपोबेल चढवलात ॥ ४ ॥

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

सकाळ उत्साहात उजाडणे, व्यष्टी साधनाही 
समाधानकारक होणे, ही कशाचीतरी पूर्वसूचनाच आहे, 
असे वाटणे आणि दुपारी काळेआजी संत झाल्याचे समजणे
       १७.३.२०१६ या दिवशी सकाळ उत्साहात उजाडली. व्यष्टी साधनाही समाधानकारक होत होती. ही कशाचीतरी पूर्वसूचनाच आहे, असे मला वाटत होते. दुपारी मी जप करायला बसले, तेव्हा सौ. मेधाने (सूनबाईने) सांगितले, काळेआजी संत झाल्या. माझे मन आनंदाने भरून गेले. इतके की, मला पंख असते, तर उडतच मी पू. काळेआजींना भेटायला गेले असते. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले आणि देवाप्रती कृतज्ञता व्यक्त होऊ लागली. देवा, पुण्याला दोन संत दिलेस. आनंद गगनात मावेना.
- श्रीमती माया गोखले, पुणे (१७.३.२०१६)

कार्यशाळेत सूक्ष्मातून गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

       माझे मन जून २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेला जाण्यासाठी उत्सुक होते. ते मन मोरपिसावर बसून श्रीकृष्णासमवेत आश्रमात पोहोचले. त्या वेळी मी लहान मुलीच्या रूपात श्रीकृष्णाचा हात धरून उत्साहाने उड्या मारत जात होते.
१. कार्यशाळेतील सभागृहात सनातनचे संत दिसणे आणि पू. (सौ.) बिंदाताई अन् पू. अनुताई यांचे दर्शन होणे : कार्यशाळेत पोहोचल्यावर त्या सभागृहात सनातनचे एक एक संत दिसू लागले. पू. बिंदाताई व्यासपिठावरून बोेलतांना दिसल्या. तेथे साधक न दिसता लेखणी धरलेले सर्व हात दिसले. सर्वजण एकाग्रतेने सहभागी झाले होते. त्यांच्या सभोवती पिवळ्या वलयासारखे सुदर्शनचक्र अधांतरी दिसले. एक देवी हातात घडा घेऊन व्यासपिठावर आली आणि तिने घड्यातील चैतन्य ओतायला प्रारंभ केला. ते सर्व साधकांना मिळत होते. मनामध्ये ही देवी कोण ?, असा प्रश्‍न पडताच मला पू. (सौ.) बिंदाताई दिसल्या. त्यानंतर पू. (कु.) अनुताईही दिसल्या.

प्रतिदिन वाचा सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
       भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांनी दिलेल्या विविध अनुभूतींमुळे सोलापूर जिल्ह्यातील साधिकांची अविस्मरणीय ठरलेली रामनाथी आश्रमाची भेट !

प.पू. डॉक्टरांच्या खोलीची स्वच्छता आदी सेवा पूर्वी आणि आता करणार्‍या साधिकांकडून कु. नंदा नाईक यांना शिकायला मिळालेली सूत्रे

कु. नंदा नाईक
१. सेवेचे श्रेय दुसर्‍याला 
देण्यासाठी प्रेमाने भांडणे
       एक दिवस पार्वतीताई (सौ. पार्वती जनार्दन) आणि रोहिणी (कु. रोहिणी गुरव) या साधिका एकमेकांशी प्रेमाने भांडत होत्या. तेवढ्यात मी तिथे पोचले. त्यांचे भांडण्याचे कारण काय होते, तर दोघींनाही असे वाटत होते की, माझ्यापेक्षा तू सेवा चांगली करतेस. असेच पूर्वी कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे, कु. दीपाली माळी, कु. तृप्ती गावडे आदी साधिकांकडून होत असे.
२. गुरूंप्रती भाव
        या साधिका सेवेविषयी कर्तेपणा कधीही स्वतःकडे घेत नाहीत. त्यांचा सेवा करतांना जे काही चांगले घडले, ते प.पू. गुरुमाऊलीनेच घडवले, असा भाव असतो. तसेच त्यांची भावावस्था सतत टिकून असते. यातून असे लक्षात येते की, प.पू. डॉक्टरांकडून त्या जे काही शिकल्या, ते त्या परिपूर्णपणे आचरणात आणतात. जाणूनी श्रींचे मनोरथ अशा त्या वागत असतात. यावरून या सर्व साधिकांचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे.
      प.पू. डॉक्टर, या साधिकांसारखी तळमळ आम्हा सर्व साधकांतही निर्माण होऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.
- कु. नंदा सदानंद नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१६)

आपल्या पाल्यांवर देवाचे लक्ष असल्याने त्यांची प्रगती होत असणे आणि साधक-पालकांनी सेवा अन् साधना यांसाठी अधिक वेळ दिला, तर देव त्यांचीही प्रगती करून घेणार असणे

श्री. संगम बोरकर
       ५.१.२०१६ या दिवशी माझी कन्या कु. साक्षी बोरकर हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या गुणांविषयी दैनिक सनातन प्रभातमध्ये लेख प्रसिद्ध झाला. तो वाचतांना तिचा आध्यात्मिक स्तर ५१ वरून ५५ टक्के झाल्याचे कळले आणि गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. त्या वेळी श्रीकृष्णाने माझे पुढील चिंतन करून घेतले.
१. आध्यात्मिक प्रगती केवळ गुरुकृपेमुळे होत असणे : आमच्या घरी साधनेच्या दृष्टीने पोषक वातावरण नाही. त्यामुळे कु. साक्षी सेवेत नाही. मी नोकरीच्या वेळेनंतर अधिक वेळ सेवेत असल्याने कु. साक्षीकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळत नाही. असे असतांनाही प.पू. गुरुदेव तिची आध्यात्मिक प्रगती करून घेत आहेत. यावरून एखाद्या साधकाची आध्यात्मिक प्रगती केवळ गुरुकृपेमुळे होते, हे देवाने शिकवले. 
२. सेवा मनापासून आणि ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने केल्याने साधना होणे : आध्यात्मिक प्रगतीसाठी बाह्य कृतीपेक्षा आंतरिक प्रयत्न असणे महत्त्वाचे आहे. सेवा करतांना बर्‍याच वेळा आपल्याकडून कृती होते; मात्र आपले मन इतर गोष्टींत असल्याने सेवेतून आपली साधना होत नाही. मनाने एकरूप होऊन ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने सेवा केली, तर त्या सेवेतून साधना होते.

षड्रिपू हेच मानवाचे शत्रू !

      
श्री. अविनाश जाधव
२३.९.२०१४ या दिवशी माझ्या मनात दिवसभर विविध विचार येत होते. या विचारांतून बाहेर पडण्यासाठी मी हे श्रीकृष्णा, मला या विचारांतून बाहेर काढ, अशी प्रार्थना केली. त्या प्रसंगी मला पुढील काव्य सुचले.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू ।
जीवनाचे खरे शत्रू भासती ।
घुसखोरी मनात अधूनमधून करती ।
त्यामुळे सैरभैर होऊनी मन धावी ॥ १ ॥
मनावरील संयम सुटतो ।
विचारांचा महाकल्लोळ माजतो ।
भावनांचा उद्रेक होतो ।
षड्रिपू या देहात आतंक माजवतात ।
पापाचरणाला मनाला लावतात ।
मनाचा आनंद हरपतो ॥ २ ॥

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
समेवर राहून करायचा तो संसार
      संसार म्हणजे सार, समेवर रहाणे. जीवन जगण्याचे विविध अनुभव मिळतात. त्यांचे सार म्हणजे संसार. संसारात देहाने राहून मन भगवंताच्या विचारात ठेवावे; अन्यथा सर्व शक्ती सांसारिक विषयांमध्ये व्यय होते.
- प.पू. परशराम पांडे, (८.११.२०१४)

देव माझ्याशी बोलतो हा अहंचा पैलू आणि स्वभावदोष घालवल्यावर लगेच प्रगती होईल, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

        एकदा माझी प.पू. डॉक्टरांशी भेट झाल्यावर पुढील संभाषण झाले.
मी : माझे स्वप्नात देवाशी बोलणे होते, तरी त्यासंबंधी प्रत्यक्ष अनुभूती मला कधी येणार ?
प.पू. डॉक्टर : तुमच्यामध्ये माझ्याशी देव बोलतो हा अहं आहे. हे मी केले, अशा प्रकारचा मोठेपणा मिरवणे आणि लोकेषणा हे स्वभावदोष अन् अहं यांचे पैलू आहेत. ते घालवा. तसे केले की, लगेच प्रगती होईल !
- श्री. अनंत विठ्ठल मुळये, भांडुप, मुंबई. (२४.३.२०१५)

गुरुप्रसादाने चैतन्ययुक्त झालेला पदार्थ शिष्याने ग्रहण केल्यावर त्याच्या आध्यात्मिक उन्नतीवर होणारा परिणाम !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई
       पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची रौप्य महोत्सवी उद्योजकीय यशोगाथा असलेल्या मी कोण ? या पुस्तकाचे प्रकाशन (लौकिकदृष्ट्या) ७.२.२०१६ या दिवशी एका सोहळ्यात होणार होते; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुस्थानी मानणारे श्री. प्रभुदेसाई यांनी प.पू. पांडे महाराजांना त्यांचे प्रतीक म्हणून त्यांच्या हस्ते ५.२.२०१६ या दिवशी देवद आश्रमात येऊन (खर्‍या अर्थाने) पुस्तकाचे प्रकाशन केले.
       या प्रसंगावरून श्री. प्रभुदेसाई यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील अपार श्रद्धा येथे दिसून येते. जसे आपण कोणतीही नवीन वस्तू प्रथम देवापुढे ठेवून नंतर ती वापरतो, तेव्हा तो प्रसाद होतो. अशा प्रसादरूपी वस्तूवरील रज-तम युक्त आवरण निघून गेल्याने ती वस्तू सात्त्विक आणि चैतन्ययुक्त होते. हा प्रसाद आपण उपयोगात आणतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक दृष्टीने खरा लाभ होतो. हे ओळखूनच श्री. प्रभुदेसाई यांनी अशी कृती केली, असे दिसते. प्रसादाविषयी श्रीमद्भगवद्गीतेत दिलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

महर्षींनी सांगितलेल्या नामजपाचा पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना समजलेला अर्थ वाचून चेन्नर्ई येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन् यांच्या मनात आलेले विचार

सौ. उमा रविचंद्रन
       समष्टीसाठी महर्षींनी आता ॐ निसर्ग देवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा नामजप करायला सांगितले आहे. ३०.३.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी सांगितलेल्या या नामजपाचा पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना समजलेला अर्थ छापून आला आहे. तो वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार जय गुरुदेवांच्या चरणकमली अर्पण करत आहे.
१. ॐ निसर्ग देवो भव ।
       याद्वारे महर्षींनी परमेश्‍वराच्या सगुण रूपाची भक्ती करण्यास सुचवले आहे. सगुण भक्तीच निर्गुण परमेश्‍वराकडे घेऊन जाणार आहे.
२. ॐ वेदम् प्रमाणम् ।
       वेद म्हणजेच परमेश्‍वराचे सूक्ष्म रूप आहे. वेद हेच अंतिम सत्य मानून संपूर्णपणे नतमस्तक होऊन वेदांनाच प्रमाण मानल्यास आपली वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे होते. यामुळे अंततः ईश्‍वराशी एकरूप होणे शक्य होते.

पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक साधकांसाठी महत्त्वाची सूचना

साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे 
मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ 
साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !
       आध्यात्मिक स्तर ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधक होण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्याच्या खालील स्तरावरील साधकांना निर्णय घेणे कठीण जाते. त्यांनी निर्णय घेता येण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन पुढे केले आहे.
१. पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक 
साधकांनी बुद्धीचा निश्‍चय करणे आवश्यक !
        अनेक साधक स्वतःचे शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय सोडून पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक असतात आणि तशी इच्छाही उत्तरदायी साधकांकडे व्यक्त करतात. आंतरिक इच्छा असतांनाही कौटुंबिक अडचणी, तसेच मनाच्या स्तरावरील अडथळे यांमुळे ते पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी बुद्धीचा निश्‍चय केल्यास ईश्‍वरकृपेने त्या अडचणी सहज दूर होतील, यात तीळमात्रही शंका नाही !

सनातन संस्थेच्या कार्याविषयी नारदीय कीर्तनकारांनी दिलेला अभिप्राय !

        आजच्या घडीला सनातन संस्था साधनेच्या बळावर क्षात्रतेज आणि ब्र्राह्मतेज निर्माण करत आहे. तिचे हे कार्य पाहून येणार्‍या संकटांत भगवंत हातात चक्र घेऊन साधकांचे संरक्षण करील, यात तीळमात्र शंका नाही.
- ह.भ.प. दत्तात्रेय धोंडू साळवी, रत्नागिरी (२०.२.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष

समस्त मानवजातीच्या कल्याणार्थ सदैव 
झटणार्‍या ईश्‍वरस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची 
महती वर्णन करणारा दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक 
प्रसिद्धी दिनांक : २९ मे २०१६
  • आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ ते परात्पर गुरुपर्यंतचा प्रवास !
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध क्षेत्रांतील अद्वितीय कार्य !
  • संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन अन् त्यांना दिशादर्शन करणारे कार्य
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या कार्याला गुरूंचे कृपाशीर्वाद !
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी केलेला सन्मान अन् त्यांना पुरस्कार देऊन केलेला गौरव !
  • विशेष : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध भाव
दर्शवणारी छायाचित्रे आपली मागणी आजच नोंदवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ मे 
या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारासाठी फलक उपलब्ध !

साधकांना सूचना
     सनातन संस्थेच्या वतीने साजर्‍या करण्यात येणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांसाठीचे आवश्यक असे प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रसारसाहित्यावर स्थानिक गुरुपौर्णिमा महोत्सवाचे स्थळ आणि वेळ घालून, तसेच त्यासाठी प्रायोजक मिळवून प्रसारासाठी ते मंदिरे, रहिवासी संकुले, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, हिंदुत्ववादी संघटनांची कार्यालये आदी सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी लावावेत. उपलब्ध प्रसारसाहित्य पुढीलप्रमाणे आहे.
१. ए-२ आकारातील भित्तीपत्रक
२. ६ फूट ४ फूट, ८ फूट ६ फूट, १० फूट ८ फूट आणि १२ फूट १२ फूट या आकारांतील होर्डिंग्स (फलक)
    उत्तरदायी साधक आणि कार्यकर्ते यांनी स्वत:च्या जिल्ह्यातील भित्तीपत्रकाची मागणी एकत्रित करून स्वत:च्या जिल्ह्याशी संबंधित लेखासमन्वयक साधकाला कळवावी. भित्तीपत्रकाचा नमुना सोबत दिला आहे.
     वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा वापर करावा.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरे समजून घेणे
सुनो सोचो समझो । सुनो समझो सोचो ।
भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारेे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत सुनो समझो सोचो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
रज-तम प्रधान आणि स्वेच्छेला महत्त्व देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी उद्या भ्रष्टाचार, बलात्कार, खून इत्यादी करण्याचे स्वातंत्र्य हवे, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

अहंभाव-निर्मूलनाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्‍चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

बुडत्याचा पाय खोलात !

संपादकीय 
      सध्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ८ अधिकोषांनी चौथ्या तिमाहीचा निकाल घोषित केला आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युको बँक, सेंट्रल बँक, देना बँक, अलाहाबाद बँक, युनियन बँक आणि आयडीबीआय अशा मोठ्या अधिकोषांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये १२ सहस्र ४५८ कोटी रुपयांहून अधिक तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अधिकोषांच्या थकित कर्जांचे प्रमाणही (एन्पीए) अधिक आहे. ज्या वेळी कर्जदार अधिकोषामध्ये व्याज किंवा मुद्दलचा भरणा ९० दिवस करत नाही, त्या वेळी सदर कर्ज थकित किंवा एन्पीए म्हणून ग्राह्य धरले जाते. सध्या अशी थकित कर्जे ३ लक्ष कोटी रुपयांहून अधिक आहेत. एकूणच सार्वजनिक क्षेत्रातील अधिकोषांना अनेक बड्या उद्योगांनी घेतलेली सहस्रो कोटी रुपयांची कर्जे कशी वसूल करायची, हा भेडसावणारा यक्ष प्रश्‍न आहे. एकूण थकित कर्जांची आकडेवारी बघितली, तर देशाची आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे, हे देखील लक्षात येईल. ही सर्व गंभीर परिस्थिती फक्त सार्वजनिक क्षेत्रातील अधिकोषांची झाली; पण नागरी, सहकारी आणि अन्य प्रकारच्या अधिकोषांची स्थिती किती भीषण असेल, याचा विचारच न केलेला बरा. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn