Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा आज जन्मोत्सव !कोटी कोटी प्रणाम !

कूर्म जयंती

संत दामाजीपंत पुण्यतिथी

काश्मिरी हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहती नाहीत !

भाजप-पीडीपी सरकारचा हिंदुद्रोह !
देशद्रोही फुटीरतावाद्यांच्या दबावापुढे सरकारची शरणागती !

देशद्रोह्यांपुढे लोटांगण घालणार्‍या राज्यकर्त्यांच्या निरर्थक
 लोकशाहीऐवजी आता हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

हिंदूंनो, तुमचा विश्‍वासघात करणार्‍या राज्यकर्त्यांना विसरू नका !
      श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील विस्थापित हिंदूंसाठी स्वतंत्र वसाहती उभारणार नाही, असे जम्मू-काश्मीरच्या भाजप-पीडीपी सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी ही माहिती दिली. देशद्रोही फुटीरतावाद्यांच्या प्रचंड दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सैनिक आणि हिंदू यांच्या वसाहती उभारण्याचा निर्णय झाला, तर मोठे आंदोलन उभारण्याची चेतावणी राज्यातील देशद्रोही फुटीरतावाद्यांनी दिली होती. त्यासाठी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष यासीन मलिक यांनी काही देशद्रोही फुटीरतावादी नेत्यांची भेट घेऊन या प्रस्तावाविषयीची पुढील धोरणे निश्‍चित केली होती. हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवेझ उमर फारूक यांनीही वर्ष २००८ प्रमाणे मोठे आंदोलन उभारण्याची चेतावणी दिली होती. (देशद्रोह्यांना कारागृहात टाकून त्यांना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या दवाबापुढे झुकणारे राज्यकर्ते हिंदुद्रोहीच होत ! - संपादक)

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याप्रमाणे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूही निर्दोष सुटतील ! - संत संमेलनातील प्रतिपादन

संतसंमेलनातील व्यासपिठावर उपस्थित साधूसंत. मध्यभागी (वर्तुळात)
हिंदु जनजागृती समितीचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     उज्जैन, २० मे (वार्ता.) - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदु आतंकवादाच्या नावाखाली ८ वर्षे कारागृहात ठेवून त्यांचा छळ करण्यात आला. शेवटी त्यांच्यावर कोणतेही आरोप नसल्याचे सांगून त्यांना आरोपमुक्त करून सिंहस्थपर्वात अमृत (शाही) स्नानासाठी सोडले. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील एकही आरोप अजून सिद्ध झालेला नाही. त्यामुळे तेही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याप्रमाणेच निर्दोष सुटतील, असा विश्‍वास सर्व संतांनी संत सुरक्षा-गोरक्षा संत संमेलनात व्यक्त केला.

एकट्या देहलीमध्ये ६४ ठिकाणांना गांधी कुटुंबियांची नावे ! - ऋषी कपूर यांची काँग्रेसवर पुन्हा टीका

ऋषी कपूर यांच्यासारखे नागरिक देशात असतील, तर राजकीय पक्षांना थोडा तरी वचक बसेल !
     मुंबई - एकट्या देहली शहरामध्येच ६४ ठिकाणांना गांधी कुटुंबियांची नावे देण्यात आलेली आहेत, असे अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका करणारे ट्वीट केले आहे. तसेच सोबत एक चित्रही पोस्ट केले असून त्यात ही ठिकाणे दर्शवण्यात आली आहेत. त्या चित्रावर लिहिले आहे की, या स्मारकांना खरेच एखाद्याच्या कुटुंबियांची नावे देण्याची आवश्यकता आहे का ? ऋषी कपूर यांनी दोनच दिवसांपूर्वी गांधी परिवारांच्या व्यक्तींची नावे देशातील संपत्तीला देण्यावरून टीका केली होती. या टीकेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपूर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने करून दगडफेक केली आणि घोषणाबाजी केली गेली. (स्वतःवर झालेली टीका सहन न करू शकणार्‍या काँग्रेसी कार्यकर्त्यांना इतरांवर टीका करण्याचा अधिकार आहे का ? हिंदूंना आतंकवादी ठरवल्यानंतर हिंदूंनी काँग्रेसवाल्यांच्या घरांवर दगडफेक केली असती, तर चालले असते का ? - संपादक)

जनतेने खोट्या शंकराचार्यांवर बहिष्कार घालावा ! - श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

      उज्जैन, २० मे (वार्ता.) - जनतेने खोट्या शंकराचार्यांकडे जाणे सोडले पाहिजे, तसेच त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी येथे केले. रुद्रसागर, उज्जैन येथील धर्मसम्राट करपात्री कल्याण संघ शिबिराच्या वतीने आयोजित अखिल भारतीय धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खोट्या शंकराचार्र्‍यांच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावावर श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज बोलत होते. या वेळी स्वतः शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती उपस्थित होते.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे ! - योगऋषी रामदेवबाबा

     उज्जैन - आतंकवादाकडे कोणताही रंग, जाती आणि धर्म यांच्या दृष्टीने पहाता कामा नये. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कोणतेही आरोप नसल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र साध्वींनी फार अत्याचार सहन केले आहेत. त्यांच्या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी योगऋषी रामदेवबाबा यांनी केली. ते प्रभु प्रेम शिबिरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जुना आखाड्याचे पीठाधीश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरी महाराज उपस्थित होते. रामदेवबाबा पुढे म्हणाले, काळा पैसा भारतात परत आणण्याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री जेटली यांना सतत स्मरण करून देत रहाणार आहे. देशात जेएन्यू, भाग्यनगर (हैद्राबाद) विश्‍वविद्यालय, जम्मू-काश्मीर एन्आईटी मुस्लिम विद्यापीठ यांच्याद्वारे वैचारिक असहिष्णुता वाढली आहे.उज्जैन येथील विचार महाकुंभला श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना बोलावण्याची आवश्यकता नव्हती ! - जगद्गुरु रामानंदाचार्य रामनरेशाचार्यजी

      उज्जैन - ज्या बौद्ध धर्माने हिंदु धर्माला सतत उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केले त्या धर्माचे प्रतिनिधीत्व करणार्‍या श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना विचार महाकुंभला बोलावण्याची आवश्यकता नव्हती, असे सांगत सिंहस्थपर्वात विचार महाकुंभचे करण्यात आलेले आयोजन हे हिंदु धर्मासाठी लज्जास्पद आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदाचार्य रामनरेशाचार्यजी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले,
१. काही गोष्टी कार्यक्रमाच्या वेळी बोलणे आपल्या देशाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने उचित नाहीत; मात्र त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तो कार्यक्रम झाल्यानंतर सांगत आहे.
२. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांकडे विचारच नव्हते. असे लोक विचारांचे मंथन काय करणार ? या विचार मंथनामुळे यापूर्वी कुंभमेळ्यात चिंतनच होत नव्हते, असा चुकीचा संदेश जाईल.
३. पंतप्रधानांनी येथे येऊन विचार मंथनाच्या माध्यमातून स्वत: वैश्‍विक नेता असल्याचे दाखवण्याचा जो प्रयत्न केला. त्यामुळे सर्व संत आणि तपस्वी यांचा अवमान झाला आहे.
(संदर्भ : दैनिक दबंग दुनिया)

पाकने काश्मीरवर बळजोरीने अवैधरित्या नियंत्रण ठेवले आहे ! - गिलगीट-बाल्टिस्तान इन्स्टिट्यूट

पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांवर पाककडून अत्याचार !
काँग्रेसने तिच्या कार्यकाळात पाकव्याप्त काश्मीर मुक्त केला नाही, 
आताचे राज्यकर्ते ते कार्य करतील, अशी जनतेला आशा वाटत नाही !
     वॉशिंग्टन - येथील कॅपिटल हिलमध्ये झालेल्या चर्चेनंतर गिलगीट-बाल्टिस्तान इन्स्टिट्यूटचे सेंजे सेरिंग यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, पाकिस्तानने या भागावर अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे. या भागातील पाकिस्तानी राज्य संपवण्यासाठी अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाला पुढे यावे लागेल. अमेरिकेच्या सिनेटमधील सदस्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढलेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांना रोखण्यासाठी साहाय्याची विनंती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय जोपर्यंत गिलगीट-बाल्टिस्तानमधील वातावरणाची दखल घेत नाही, तोपर्यंत येथील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना थांबणार नाहीत.
     संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कलम ४७ नुसार पाकिस्तानला गिलगीट-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण करून नियंत्रण करणारा देश, असे म्हटलेले आहे. यात या भागातून पाकिस्तानने काढता पाय घ्यावा, असेही सांगितलेले आहे, अशी माहिती सेरिंग यांनी दिली.

आखाड्यांचा मार्ग पालटून प्रशासनाने अनेक वर्षांपासूनची परंपरा मोडली !

प्रशासनाने असे धाडस अन्य पंथियांच्या संदर्भात केले असते का ?
      उज्जैन - येथे ९ मे या दिवशी झालेल्या दुसर्‍या राजयोगी (शाही) स्नानाच्या दिवशी प्रशासनाने आखाड्यांचे मार्ग पालटून अनेक वर्षांपासूनची परंपरा मोडल्यामुळे २ आखाडे एकमेकांसमोर येऊन दुर्घटना होण्याची स्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने बडा उदासीन आखाड्याचा मार्ग परस्पर पालटला, जो श्री पंचायत या नव्या उदासीन आखाड्याचा मार्ग होता. त्यामुळे हा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाच्या या कृतीमुळे आखाड्यांकडून अप्रसन्नता व्यक्त होत आहे. आखाडा परिषदेच्या प्रमुखांनी पंतप्रधान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, प्रभारीमंत्री, तसेच पोलीस अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. तसेच प्रशासनाने असा निष्काळजीपणा केल्यास पुढील राजयोगी स्नानावर आखाडे बहिष्कार घालतील, अशी चेतावणीही दिली आहे.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी यथार्थ गीतेवर केलेल्या वक्तव्यावरून वाद !

     उज्जैन - शारदा तसेच ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे यथार्थ गीतेवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. परमहंस स्वामी अडगडानंदजी यांची यथार्थ गीता शास्त्रोक्त नाही, असे वक्तव्य शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले होते. यावर श्री परमहंस आश्रमाचे राजेश्‍वरानंद महाराज यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदजी यांना यथार्थ गीतेवर खुल्या चर्चेचे आवाहन केले आहे. आज देश विविध जाती, धर्म आणि वर्ण यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असतांना यथार्थ गीता हाच त्यावर एकमेव उपाय आहे, तसेच ही अपौरूषेय वाणी असल्याने कृपया त्यावर कुणीही वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन राजेश्‍वरानंद महाराज यांचे केले.

मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण रोखण्यासाठी संतांनी पुढे यावे ! - बालयोगी उमेशनाथ महाराज, वाल्मीकि धाम

     उज्जैन - देशांतील मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण होणे, ही चिंताजनक गोष्ट असून हे रोखण्यासाठी सर्व संतांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वाल्मीकि धामचे बालयोगी उमेशनाथ महाराज यांनी केले. आर्यावर्त षट्दर्शन साधू मंडलाच्या वतीने आयोजित संत संमेलनात ते बोलत होते. बालयोगी उमेशनाथ महाराज पुढे म्हणाले, संत आणि समाज हे एकमेकांना पूरक असून समाजाला समवेत घेऊनच संतांनी जायला हवे. या वेळी बालयोगी उमेशनाथ महाराज यांची मध्यप्रदेश आर्यावर्त षट्दर्शन साधू मंडलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
दिलीप पाटीदार यांच्याविषयीचे अन्वेषण एन्आयएकडे सोपवा ! - दिलीप पाटीदार यांच्या पत्नी पद्मा पाटीदार यांची मागणी

मालेगाव बाँम्बस्फोट प्रकरण
पाटीदार यांना गायब करणार्‍या एटीएस्च्या अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी
     मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मध्यप्रदेश येथून दिलीप पाटीदार यांना महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) २००८ मध्ये कह्यात घेतले. या घटनेला ८ वर्षे लोटली आहेत. तेव्हापासून दिलीप पाटीदार बेपत्ता असून त्यांची हत्या झाली असल्याचा आमचा संशय आहे. अपहरण, छळवणूक आणि हत्या यांच्याशी हे प्रकरण संबंधित असल्याने या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्आयएकडे) सोपवण्यात यावे. तसेच २०१२ मध्ये अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार इंदूर न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाच्या काही अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते; मात्र तत्कालिन काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकारने चौकशीस अनुमती नाकारली होती. आताच्या शासनाने या चौकशीस अनुमती द्यावी, अशा मागण्या दिलीप पाटीदार यांच्या पत्नी पद्मा पाटीदार यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. पद्मा पाटीदार, दिलीप पाटीदार यांचे भाऊ रामस्वरूप पाटीदार आणि अधिवक्ता प्रशांत मग्गु यांनी २० मे या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

सौदी अरेबियात पत्नीला मारहाण करण्याचे मिळतात धडे !

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासारख्या संघटनांच्या नेत्या सौदी अरेबियात जाऊन याविरोधात 
काही करतील का ? भारतात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात बोलणार्‍या संघटना आणि 
संस्था इस्लामी राष्ट्रातील मुसलमान महिलांवरील अत्याचारांविषयी कधीही तोंड उघडत नाहीत !
पत्नीला मारहाण करण्याचा सल्ला देणारा व्डिडिओ सर्वत्र प्रसारित !
     रियाध (सौदी अरेबिया) - पत्नीला मारहाण कशी करावी ? यासाठी रोगनिवारणतज्ञ सल्ला देत असल्याचा व्हिडिओ सध्या सामाजिक संकेतस्थळाद्वारे सर्वत्र प्रसारित होत आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबियामधील शासनाने दिलेल्या अनुमतीनंतर राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर फेब्रुवारी २०१६ मध्ये हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. एप्रिल २०१६मध्ये अमेरिकेत हा व्हिडिओ दाखवण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली. रोगनिवारणतज्ञ खालेद-अल्-साकबे यांनी पत्नीला मारहाण का आणि कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे.

भारतातील मुसलमान लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, इंडियन मुजाहिदीन, सिमीसारख्या आतंकवादी संघटनांकडे पाठ फिरवून आता इस्लामिक स्टेटकडे वळत आहेत !

जिहादी आतंकवादी संघटना इस्लामी राष्ट्रासाठी प्रयत्न करणार्‍या इसिससारख्या बलाढ्य संघटनांकडे 
वळू शकतात, तर हिंदु राष्ट्रासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रयत्नशील असणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडे 
अन्य हिंदुत्वनिष्ठ का वळू शकत नाहीत ?
     नवी देहली - भारतातील जिहादी प्रशिक्षण घेतलेले मुसलमान तरुण लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महम्मद, मुजाहिदीन, सिमी सारख्या प्रस्थापित आतंकवादी संघटनांकडे पाठ फिरवून आता इस्लामिक स्टेटकडे (इसिसकडे) आकर्षित होत आहेत, असा अहवाल राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिला आहे. इतर संघटना केवळ काही आतंकवादी घटना घडवून पडद्याआड जातात, तर इसिसने मोठा भूभाग जिंकून त्यांचे राज्य स्थापन केले आहे याची भुरळ मुसलमान तरुणांना पडली आहे. 
१. लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन आणि सिमी या आतंकवादी संघटनांनी जिहादी आक्रमणे घडवण्याची क्षमता सिद्ध केली आहे; परंतु इराक आणि सिरिया यांमधील प्रदेशात अमेरिका, रशिया आणि याचबरोबर सौदी अरेबियासारख्या पश्‍चिम आशियाई देशांच्या सैन्यांना तोंड देत स्वत:चे कार्यक्षेत्र अबाधित राखलेल्या इसिसच्या तुलनेमध्ये या संघटनांचा प्रभाव हा तात्पुरता मानला जात आहे.

हरियाणामधील गुडगाव येथे सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांचे अधिवक्त्यांसाठी मार्गदर्शन

अधिवक्ता
श्री. रामदास केसरकर
      गुडगाव - १२.३.२०१६ या दिवशी हरियाणामधील गुडगाव येथे अधिवक्ता अरुण शर्मा यांच्या कार्यालयात अधिवक्त्यांसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ बँक व्यवस्थापक, लेखा परिक्षक (चार्टर्ड काउंटंट) आणि १० अधिवक्ते यांनी घेतला.

आनंद आखाड्याच्या नवीन आचार्य पीठाधीश्‍वरांच्या नियुक्तीला विद्यमान पीठाधीश्‍वर आणि नागा साधू यांचा विरोध !

     उज्जैन - येथील श्री पंचायतन आनंद आखाड्यामध्ये नवीन आचार्य पीठाधीश्‍वरांच्या नियुक्तीला विद्यमान पीठाधीश्‍वर स्वामी गेहनानंद महाराज आणि त्यांचे नागा साधू यांनी विरोध दर्शवला आहे. १८ मे या दिवशी सकाळी आखाड्यांच्या पंचांच्या उपस्थितीत महामंडलेश्‍वर बालकानंदगिरी महाराज यांचा पट्टाभिषेक करून त्यांना आचार्य पीठाधीश्‍वर ही पदवी देण्यात येणार होती. आखाड्याचे विद्यमान पीठाधीश्‍वर स्वामी गेहनानंद महाराज यांनी १६ मे या दिवशी आखाड्याच्या साधूसंतांसमवेत एक बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी सांगितले की, पीठाधीश्‍वर ब्रह्मलीन झाल्यास किंवा त्यांनी स्वत:हून सांगितल्यास नवीन पीठाधीश्‍वरांची नियुक्ती केली जाते; पण येथे मात्र अशी परिस्थिती नसूनही नवीन पीठाधीश्‍वरांना नियुक्त करण्यात येत आहे. हे चुकीचे आहे.एका महामंडलेश्‍वरांच्या संस्थेने लाखो बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप !

अशांना कोण साधू म्हणणार ?
     उज्जैन - एका महामंडलेश्‍वरांच्या संस्थेने लाखो बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या महामंडलेश्‍वरांनी लाखो बेरोजगारांना संगणकीय शिक्षण देण्याचे आश्‍वासन देऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. येथील एका स्थानिक वृत्तपत्राने हे वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तात पुढे म्हटले आहे की, वर्ष २००८ मध्ये या शिक्षण संस्थेने वृत्तपत्रांमध्ये विज्ञापने देऊन संगणक केंद्र उघडणार असल्याचे सांगितले होते, तसेच सुरक्षेच्या कारणावरून एकूण ५०० कोटी रुपये जमा केले होते. या संस्थेची देशात ५ सहस्रांहून अधिक केंद्रे आहेत. संस्था चालू झाल्याच्या ६ मासांनंतर उत्तरप्रदेशातील बरेली येथील या संस्थेचे मुख्यालय बंद करण्यात आले होते. या महामंडलेश्‍वरांच्या एक विदेशी शिष्या या संस्थेच्या उपाध्यक्ष होत्या.

बंदीवानांनी क्षिप्रा नदीत स्नान केले; यापुढे अपराध न करण्याचा संकल्प !

श्री बालकदासजी महाराज आणि योगाचार्य हर्षानंदजी महाराज यांची उपस्थिती
     उज्जैन - येथील भैरवग कारागृहातील ५४ बंदीवानांनी पवित्र क्षिप्रा नदीत स्नान केले. हे सर्व बंदीवान सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सिंहस्थपर्व चालू झाल्यानंतर या बंदीवानांनी पवित्र क्षिप्रा नदीत स्नान करण्याची अनुमती मागितली होती. ती त्यांना देण्यात आली. या वेळी छत्तीसगड मंडपचे श्री बालकदासजी महाराज आणि योगाचार्य हर्षानंदजी महाराज उपस्थित होते. स्नान करून झाल्यानंतर श्री बालकदासजी महाराज आणि योगाचार्य हर्षानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बंदीवानांनी यापुढील आयुष्यात आम्ही कधीही अपराध करणार नाही, असा संकल्प सोडला. स्वत:च्या वाढदिनी एक रोपटे लावू, तसेच जीवनभर पाणी वाचवू, असाही संकल्प बंदीवानांनी या वेळी केला.

महसूलमंत्री एकनाथ खडसे दाऊदच्या संपर्कात असल्याचा आपच्या नेत्या प्रीती मेनन यांचा आरोप !

दूरभाषवरील कॉल्सची चौकशी चालू !
      मुंबई - राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे नेते एकनाथ खडसे हे दाऊदच्या संपर्कात असून ते आणि दाऊद यांच्यात संभाषण झाल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला होता. या आरोपांच्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी चालू करण्यात आली असून खडसे यांचे दूरभाषवरील कॉल्स पडताळण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे प्रीती मेनन यांनी सांगितले.
     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खडसे मंत्रीपदावर राहिले, तर ही चौकशी नि:पक्षपाती होणार नाही. त्यासाठी त्यांना मंत्रीपदावरून दूर करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे मेनन यांनी सांगितले. मेनन पुढे म्हणाल्या, खडसे यांच्या स्वीय साहाय्यकाच्या लाचखोरीच्या प्रकरणी राज्यशासन भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या(एसीबीच्या) चौकशीत कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे ही चौकशी योग्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

केंद्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या गोशाळेवरील परिषदेत गोरक्षक शेतकर्‍यांकडून गोहत्या बंद कराच्या घोषणा !

केंद्रसरकार गोरक्षणाच्या संदर्भात निष्क्रीय राहिले, तर पुढे गोरक्षक याहून प्रखर विरोध करतील, 
हे त्यांनी लक्षात ठेवावे ! काँग्रेसच्या राज्यात गोरक्षकांना जे करावे लागत होते, तेच जर नवीन राज्यकर्त्यांच्या राज्यातही करावे लागणार असेल, तर दोघांमध्ये भेद तो काय ? 
     नवी देहली - येथील विज्ञान भवनात केंद्रसरकारच्या शेतकी आणि पर्यावरण मंत्रालयांनी गोशाळेवर आयोजित केलेली परिषद गोरक्षक शेतकर्‍यांनी गोहत्या बंद करा अशा घोषणा देऊन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले केंद्रीय शेतीमंत्री राधामोहन सिंह आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याही भाषणात अडथळे आणले. त्यातच परिषदेत वितरित केलेल्या पुस्तिकेवर विदेशी जर्सी गाईचे चित्र छापल्याने आंदोलक अधिकच भडकले. त्यांनी भारत माताकी जय आणि गो माताकी जय अशा घोषणा देणे चालू केले. मंत्री केंद्रसरकारने गोसंवर्धनासाठी चालू केलेल्या योजनांची माहिती देत असता, शेतकर्‍यांनी आधी गोहत्या बंद करा म्हणजे सर्व सुरळीत होईल, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे मंत्र्यांना त्यांची भाषणे आवरती घ्यावी लागली. काही शेतकर्‍यांनी केंद्रसरकारने गाईचे शेण ५ रुपये किलो या भावाने विकत घ्यावे, अशीही सूचना केली.

शाकाहारी बर्गर्समध्ये आढळले मांसाहारी अंश !

भारतातील बर्गरप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ?
अमेरिकेत बगर्र्रमध्ये सापडले मानव आणि उंदीर यांचे अवशेष !
     न्यूयॉर्क - अमेरीकेतील क्लीअर लॅब या अन्नपदार्थ तपासणार्‍या प्रयोगशाळेने बर्गर या अन्नपदार्थाचे २५८ नमुने तपासले असता त्यांना २ शाकाहारी बर्गर्समध्ये मांसाहारी अंश, ३ बर्गर्समध्ये उंदराची गुणसूत्रे (डी.एन्.ए.) आणि एका बर्गरमध्ये मानवी गुणसूत्रे आढळून आली. तसेच २ शाकाहारी बर्गर्समध्ये गोमांसाचे अवशेष आढळून आले. अर्थात् हे पदार्थ सिद्ध करतांना केस, त्वचा अथवा नखे यांतूनही चुकून असे होऊ शकते, असा प्रयोगशाळेचा तर्क आहे. खाद्यपदार्थात आढळून आलेले मानवी आणि उंदराचे अवशेष हे कायदेशीर निर्बंधाच्या दृष्टीने चालू शकणारे आहेत याची कल्पना खाणार्‍यांना नसते; मात्र खाद्यपदार्थांची सुरक्षितता आणि गुणवत्ता यांत मोठे अंतर राहून जाते. शाकाहारी खाद्यपदार्थात वेष्टनावर लिहिलेले घटक आणि प्रत्यक्षात वापरलेले घटक यांच्यात भेद आढळून येतो.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच ! - शिक्षणमंत्री विनोद तावडे

     मुंबई - या वर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २ सहस्र ८१० जागांवरील प्रवेश ५ मे या दिवशी राज्यशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटीद्वारेच) देण्यात येणार आहेत. महाराष्ट्राने नीटविषयी मांडलेल्या भूमिकेला केंद्रशासनाने पाठिंबा दिला. याविषयीचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने २० मे या दिवशी घेतला असून याविषयीचा अध्यादेशही निघणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील १ सहस्र ७२० आणि अभिमत विद्यापिठातील १ सहस्र ६७५, अशा एकूण ३ सहस्र ३९५ जागा या नीटद्वारेच भरल्या जातील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
     पुढच्या वर्षीपासून येणार्‍या नीटच्या पार्श्‍वभूमीवर आपण उच्च माध्यमिक (एच्एस्सी) शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत काय पालट करता येऊ शकेल, याविषयी शिक्षणतज्ञांची बैठक घेण्याची सूचना केली आहे.

भारतीय सीमेत भुयार खोदल्याचा भारताचा दावा पाकने फेटाळला !

     नवी देहली - मार्च महिन्यात काश्मीरच्या आर्एस् पुरा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकच्या सैनिकांनी भारतीय सीमेत भुयार खोदले होते. या सदंर्भात आपण असे काही केले नसल्याचे सांगत भारताचा दावा पाकने फेटाळला आहे. येथे भारत-पाक सैन्याच्या झालेल्या ध्वजबैठकीत पाकने हा दावा फेटाळला आहे.

कालबाह्य झालेल्या साम्यवादाची नव्याने मांडणी आवश्यक ! - डॉ. अभिराम दीक्षित

     पुणे - कार्ल मार्क्सच्या विचारांचा पायाच चुकीचा होता. मार्क्सवादाचे आकलन चुकीचे झाल्याने आज काही मोजके अपवाद वगळता अनेक देशांनी साम्यवादाचा त्याग केला आहे. आज मार्क्स नावाचा धर्म बनला आहे आणि हा धर्म जगभर उच्छाद मांडत आहे. त्यामुळे मार्क्सच्या विचारांची पुनर्बांधणी नाही, तर डावा विचार नव्याने मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. अभिराम दीक्षित यांनी केले. १७ मे या दिवशी वसंत व्याख्यानमालेत कन्हैया, कम्युनिस्ट आणि विचारकलह या विषयांवर ते बोलत होते. या प्रसंगी इतिहासाचा मागोवा घेत डॉ. दीक्षित यांनी साम्यवादाची लक्तरे काढली.
डॉ. दीक्षित यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. साम्यवादी मंडळी भारत हा देशच मानत नाहीत. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी साहाय्य केले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका केवळ संशयास्पद नाही, तर विश्‍वासघातकी होती.
२. ७ नोव्हेंबर १९५० या दिवशी तिबेटच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात सरदार वल्लभभाई पटेल यांनी जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या पत्रात साम्यवाद्यांचा देशद्रोही, हिंसक, परदेशी शक्तींचे हस्तक, धोकादायक, पाकप्रेमी असे वर्णन केले होते.

समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती न करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला !

विशेष शासकीय अधिवक्त्यांचा आरोप निश्‍चिती करण्यास विरोध कायम, उच्च न्यायालयात अर्ज करणार !
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
पुढील सुनावणी १० जून या दिवशी
      कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी स्कांटलंड येथील फॉरेन्सिक लॅबचा (बॅरिस्टिक रिपोर्ट) अहवाल आणि मुद्देमाल येईपर्यंत सनातनचे साधक आणि संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती करू नये, अशी मागणी विशेष शासकीय अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी एका अर्जाद्वारे न्यायालयात केली; मात्र हा अर्ज अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एल्.डी. बिले यांनी फेटाळून लावला. या खटल्याची पुढील सुनावणी १० जून या दिवशी होणार आहे. या अर्जाच्या संदर्भात शासकीय अधिवक्ता हर्षद निंबाळकर हे ६ जून या दिवशी उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट करणार आहेत. जिल्हा न्यायालयाने ही शेवटची मुदतवाढ पानसरे यांच्या अधिवक्त्यांना दिली आहे. उच्च न्यायालयाचा निकाल सकारात्मक अथवा नकारात्मक असला, तरी या १० जूनला श्री. गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती (चार्ज फ्रेम) करण्यात येणार आहे. या वेळी श्री. गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि श्री. आनंद देशपांडे उपस्थित होते. प्रचंड पोलीस बंदोबस्तात समीर गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

पाकचे आक्रमण रोखण्यास भारत असमर्थ ! - रशियाच्या अणुतज्ञाचा दावा

पाकचे आक्रमण रोखण्यास भारत असमर्थ आहे कि समर्थ आहे, हे युद्धाच्या वेळेसच 
लक्षात येईल; मात्र पाकपुरस्कृत आतंकवाद गेली २५ वर्षे भारत रोखू शकला नाही, हे वास्तव आहे !
     इस्लामाबाद - भारत आणि इस्रायल यांच्यात क्षेपणास्त्र आक्रमणापासूनच्या बचावासाठी सहकार्य करार असतांना आणि रशियाकडून एस्-४०० संरक्षण व्यवस्था घेतली असतांनाही पाकिस्तानकडून जर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण झाले, तर ते थोपवण्यासाठी सक्षम व्यवस्था विकसित करण्यापासून भारत अद्याप फार दूर आहे, अशी प्रतिक्रिया कार्नेगी मॉस्को केंद्रातील अणूविस्तार प्रतिबंध कार्यक्रमातील ज्येष्ठ संशोधक पीटर टॉपीचॉकनोव्ह यांनी व्यक्त केल्याचे वृत्त पाकमधील एका दैनिकाने दिले आहे. (भारताचे आक्रमण रोखण्याची पाककडे किती क्षमता आहे, हेही पीटर यांनी सांगायला हवे होते ! - संपादक)
१. पीटर म्हणाले की, भारतीय शहरांवर नेमकेपणाने आक्रमण करण्यासाठी पाकची क्षेपणास्त्रे सक्षम आहेत.
२. पाकची क्षेपणास्त्रे उत्तर भारत आणि दक्षिण भारत येथील काही राज्यांच्या राजधान्यांना लक्ष्य करू शकतात. श्रीनगर, शिमला, लक्ष्मणपुरी (लखनौ), पाटलीपुत्र (पाटणा), देहली, जयपूर, मुंबई, भाग्यनगर आणि बेंगळुरू येथपर्यंत पाकची क्षेपणास्त्रे पोचू शकतात.

भुजबळांच्या जामिनावर २७ मे या दिवशी सुनावणी होणार !

     मुंबई - सुमारे ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते छगन भुजबळ यांनी जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांनी त्यांच्या विरोधात ईडी विशेष न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या दोन्ही याचिकांवर २० मे या दिवशी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ही सुनावणी २७ मे या दिवशी होणार आहे.
     ईडीने मार्च मासात छगन भुजबळ यांना अटक केली होती. ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर छगन भुजबळ यांनी वैद्यकीय उपचाराचे कारण पुढे करत जामिनासाठी अर्ज केला. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसह विविध आजार असल्याने किमान उपचारासाठी जामीन द्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. याला ईडीने विरोध केला. कारागृहात छगन भुजबळ यांच्यावर योग्य प्रकारे उपचार केले जात आहेत, त्यामुळे उपचारासाठी जामीन देण्याची काहीच आवश्यकता नाही, असा दावा ईडीने केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने छगन भुजबळ यांचा जामीन नाकारला. त्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
     या घोटाळ्याचे आरोपपत्र प्रविष्ट केल्यानंतर विशेष न्यायालयाने यातील ४४ आरोपींच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यात पंकज भुजबळ यांचेही नाव आहे. हे वॉरंट रहित करण्यासाठी पंकज यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव धेतली; मात्र, यासाठी उच्च न्यायालयाचा पर्याय असल्याने तेथे याचिका प्रविष्ट करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार पंकज यांनी वरील कृती केली आहे.

मनमाड येथील माझ्यावरील आक्रमण पूर्वनियोजित ! - प.पू. भय्यूजी महाराज

रांजणगावातील आक्रमणकर्त्यांनी प.पू. भय्यूजी महाराज यांची क्षमा मागितली !
      मुंबई - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपति येथे आध्यात्मिक गुरु प.पू. भय्यूजी महाराज यांच्या गाडीवर आक्रमण केलेल्या तरुणांनी स्वत:हून चूक मान्य केली आहे. आक्रमणकर्त्यांना मी क्षमा केले आहे; मात्र मनमाड येथे झालेले आक्रमण हे पूर्वनियोजित होते. त्याची नि:पक्षपाती चौकशी महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी मागणी प.पू. भय्यूजी महाराज यांनी केली आहे.
     ९ मेच्या रात्री १० वाजता प.पू. भय्यूजी महाराज यांच्या गाडीला रांजणगावाजवळ ट्रकची धडक बसली होती. त्या वेळी बाचाबाची होऊन प.पू. भय्यूजी महाराज यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली होती. प.पू. भय्यूजी महाराजांना आम्ही ओळखले नाही. त्यामुळे आपल्या हातून चूक झाली; म्हणून आम्ही महाराजांच्या इंदूर येथील निवासस्थानी जाऊन क्षमा मागितली आहे, असे रांजणगावचा रहिवासी सागर तावरे याने सांगितले. त्याच रात्री २ वाजता मनमाडजवळ प.पू. भय्यूजी महाराज यांच्या गाडीवर २५ ते ३० लोकांनी आक्रमण केले होते. ते आक्रमणकर्ते अद्याप सापडले नाहीत. ते आक्रमण पूर्वनियोजित होते, असे प.पू. भय्यूजी महाराज यांनी सांगितले आहे.
      मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगतो, यज्ञ आणि सत्संग यांमधील मोठ्या खर्चांना विरोध करतो, बहुजन समाजाच्या उत्थानाविषयी चर्चा करतो; म्हणून काही कर्मठ मंडळी दुखावली आहेत. याच दुखावलेल्या मंडळींनी मनमाड येथील पूर्वनियोजित आक्रमण केले असावे, असे प.पू. भय्यूजी महाराज यांचे म्हणणे आहे.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मरक्षणासाठीचे कार्य प्रेरणादायी ! - प.पू. शिवानंदविजय सुरिजी

    
प.पू. शिवानंदविजय सुरिजी महाराज यांना समितीच्या 
कार्याविषयी अवगत करतांना श्री. हेमंत सोनवणे (उजवीकडे)
     सातारा
- सनातन भारतीय संस्कृतीचे रक्षण झाले पाहिजे. हिंदूंची देवालये ही चैतन्याचे स्रोत आहेत. त्यांचेही रक्षण झाले पाहिजे. हिंदूंमध्ये जनजागृती करून त्यांचे संघटन केले पाहिजे. आज या सर्व गोष्टी हिंदु जनजागृती समिती समाजामध्ये तळमळीने करतांना दिसते. हिंदु जनजागृती समितीचे धर्मरक्षणासाठीचे कार्य संपूर्ण समाजासाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे, असे गौरोवोद्गार प.पू. शिवानंदविजय सुरिजी यांनी काढले.
     हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी मोळाचा ओढा येथील देवालयात त्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी ते बोलत होते. समवेत हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस, दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे इत्यादी उपस्थित होते.
      प.पू. शिवानंदविजय सुरिजी पुढे म्हणाले की, हिंदूंसाठी एक कायदा आणि इतर धर्मियांसाठी वेगळा कायदा या देशात अस्तित्वात आहे, ही फार विचित्र परिस्थिती आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती धर्मसभा, अधिवेशने, आंदोलने यांच्या माध्यमातून समस्त हिंदूंमध्ये धर्मजागृतीचे महान कार्य करत आहेत. त्यामुळेच त्यांना धर्मद्रोह्यांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे; मात्र जो धर्माचे कार्य करतो, त्याचे रक्षण भगवंत करतो, हे धर्मरक्षकांनी विसरू नये, असे ते शेवटी म्हणाले.

जंक फूडच्या सेवनाने २० प्रतिशत तरुणांना लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांची समस्या

पुरुषांना उच्च रक्तदाबाचा धोका स्त्रियांपेक्षा अधिक - खाजगी संस्थेच्या पाहणीतील निष्कर्ष
जंक फूडचा वाढता दुष्परिणाम ! पाश्‍चात्त्य पद्धतीच्या अन्न 
सेवनापेक्षा सात्त्विक अन्नसेवनाची आवश्यकता दर्शवणारी स्थिती !
      पुणे - तरुणांपैकी २० प्रतिशत तरुणांना जंक फूडचे सेवन करत असल्यामुळे त्यांना लठ्ठपणा आणि पुढे उच्च रक्तदाबाचीही समस्या निर्माण होऊ शकते, असे इंडस हेल्थ प्लस या खाजगी संस्थेने केलेल्या पाहणीत आढळले आहे. याचसमवेत पुरुषांना उच्च रक्तदाब जडण्याचा धोका स्त्रियांपेक्षा अधिक असल्याचेही म्हटले आहे.
     इंडस हेल्थ प्लस या संस्थेच्या वतीने जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्ताने जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत केलेल्या तपासण्यांविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. संस्थेने एकूण २३ सहस्र १४५ नागरिकांची प्रतिबंधात्मक आरोग्य पडताळणी केली. सदर पडताळण्यांमध्ये २८.०६ प्रतिशत पुरुष आणि २२.९९ प्रतिशत स्त्रिया यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसून आले आहे, असे अहवालात म्हटले आहे. उच्च रक्तदाबाच्या त्रासाचे प्रमाण हे २२ वर्षांपासूनच्या तरुणांमध्ये आढळले आहे, तसेच ताण, व्यायामाचा अभाव, सतत बाहेरचे खाणे यांमुळेही धोका वाढत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या २५ ते ३५ या वयोगटातील व्यक्तींना उच्च रक्तदाबाची शक्यता अधिक असल्याचेही संस्थेने म्हटले आहे.

काश्मीरमध्ये कार्यरत जिहादी आतंकवाद्यांपैकी ७० टक्के स्थानिक नागरिकच !

नेहरूंपासून आजच्या राजकारण्यांपर्यंत काश्मीर प्रश्‍न भिजत ठेवल्याचाच हा परिणाम ! 
काश्मीर खोर्‍यात जिहाद्यांना मिळणार्‍या पाठिंब्यात वाढ !
     श्रीनगर - काश्मीर खोर्‍यात जिहाद्यांच्या संख्येत वाढ झाली असून येथे कार्यरत जिहाद्यांपैकी ७० टक्के जिहादी हे स्थानिक नागरिक असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागील मासात १० स्थानिक तरुण आतंकवादी संघटनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे सुरक्षायंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांपैकी चार त्राल, तीन पुलवामा आणि श्रीनगर येथील आहेत. आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन येथील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
१. काश्मीर खोर्‍यातील आतंकवादाविषयी जाहीर झालेल्या एका अहवालानुसार, खोर्‍यातील एकूण आतंकवाद्यांमध्ये ७० टक्के स्थानिक आहेत. 
२. सर्वाधिक भरती हिजबुल मुजाहिदीनने केली आहे, तर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद क्रमश: दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत.

कृती कधी करणार ? - दिग्विजय सिंह यांची गांधी परिवारावर टीका !

काँग्रेसला घरचा अहेर !
     नवी देहली - काँग्रेसचा सर्वत्र होत असलेला पराभव पहाता पक्षातील नेत्यांकडून अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. गांधी कुटुंबियांचे भाट असल्याप्रमाणे वागणारे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही काही प्रश्‍न उपस्थित करीत गांधी परिवाराचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, केरळ आणि आसाम येथील पराभव निराश करणारा असला, तरी तो अनपेक्षित नक्कीच नव्हता. पक्षाने परीक्षण करण्याऐवजी कृतीवर भर दिला पाहिजे.

दिवाळीपूर्वी ६ आमदार कारागृहात जाणार ! - खासदार किरीट सोमय्या, भाजप

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ९५ कोटी रुपयांचे अपव्यवहाराचे प्रकरण
      संभाजीनगर - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ९५ कोटी रुपयांचा वापर विधानसभा निवडणुकीत करण्यात आला आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत बनावट लाभार्थी दाखवून हा पैसा राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत वापरला. याविषयी आपण ईडीकडे पुरावे दिले असून मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या प्रमाणेच आता जालना, भंडारा, पुणे, बुलढाणा जिल्ह्यांतील आणखी ६ आमदार दिवाळीपूर्वी कारागृहात जातील, असा दावा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी १९ मे या दिवशी केला. मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
     दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्यातून घाटकोपर भागात स्थलांतरित झालेल्या १ सहस्र लोकांसाठी सोमय्या यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच जालना जिल्ह्यात पाण्याच्या ५० टाक्यांचेही त्यांनी वितरण केले. पत्रकारांशी बोलतांना सोमय्या पुढे म्हणाले, वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने साठे महामंडळाच्या माध्यमातून ९५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. जालना जिल्ह्यात ११ कोटी रुपये, बीड जिल्ह्यात ८ कोटी ५० लक्ष रुपये, भंडारा जिल्ह्यात २४ कोटी रुपये, तसेच बुलढाणा आणि पुणे जिल्ह्यांतही हा निधी वितरित करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या सतर्कतेमुळे पशूवधगृहाकडे जाणारे दोन ट्रक पोलिसांच्या कह्यात !

      मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) - येथील तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या सतर्कतेमुळे सोलापूरला पशूवधगृहाकडे जाणारे दोन ट्रक पोलिसांनी कह्यात घेतले. या ट्रकमध्ये २९ म्हशी दाटीवाटीने बांधण्यात आल्या होत्या. बोराळे नाक्यावरून जात असतांना शेलार यांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर तत्परतेने कारवाई करून दोन्ही ट्रक पकडण्यात आले. याविषयी चालक जमीर बागवान आणि साहिल बागवान यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या म्हशी सोलापूरला पशूवधगृहाकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. (गुन्हेगारीत अग्रेसर धर्मांध ! - संपादक) त्यामुळे त्यांच्यावर मुंबई प्राणी संरक्षण कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे २९ म्हशींना जीवदान मिळाले.

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले

     यवतमाळ - येथील दत्त चौकामध्ये हिंदूंच्या धर्म परंपरा रोखणे, क्रांतिकारकांचा अवमान करणे आणि गोवंशहत्या बंदी कायद्यामुळे अन् मद्यबंदीमुळे राष्ट्राची आर्थिक हानी होत आहे, या आदि गोदरेज यांची नीतीमत्ताहीन वक्तव्ये यांच्या विरोधात नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनामध्ये पतंजली योगपिठाचे श्री. रमेश राउत, गुरुदेव सेवा मंडळाचे श्री. रमेश गुरनुले, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता. स्वाक्षरी मोहिमेत ३०० जणांनी स्वाक्षर्‍या केल्या. आंदोलनानंतर हिंदूंच्या या संदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. राजेश फवले यांना देण्यात आले.

पुणे-सातारा महामार्गावरील कात्रजचा नवीन बोगदा असुरक्षित

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांचा जीवघेणा कारभार !
     पुणे - पुणे-सातारा महामार्गावर नवीन कात्रज बोगद्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून बोगद्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बोगद्यातील प्रवास असुरक्षित झाला आहे. 
      पुणे-सातारा महामार्गावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी असे शेजारी-शेजारी दोन बोगदे आहेत. तिथेअसलेली प्रकाश व्यवस्था अनेकदा बंद असते. त्यामुळे दोन्ही बोगद्यांत अंधार असतो. बोगद्यात हवा खेळती रहावी, यासाठी लावण्यात आलेले पंखेही अनेकदा बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना धुराचा त्रास सहन करावा लागतो. बोगद्यात दोन्ही बाजूला लावलेले संरक्षक कठडे वारंवार चोरीला जात आहेत, तर अनेक ठिकाणी हे कठडे तुटलेले आहेत. बोगद्यात अग्नीशामक यंत्रणा असली, तरी वाहनाने पेट घेतल्यास आग विझविण्यासाठी पुण्याहून अग्नीशामक दलाची गाडी बोलवावी लागते. त्यामुळे बोगद्यातील अग्नीशामक यंत्रणा नक्की चालू आहे का, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. अशी अवस्था असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा हे आस्थापन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. (बोगद्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणार्‍या राष्ट्र्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा या आस्थापनावर शासनाने कारवाई करणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने यात लक्ष घालणे अपेक्षित आहे. - संपादक)

पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आनंद दवे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !

     रामनाथी, गोवा - येथील सनातनच्या आश्रमाला, पुणे येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर संघटक श्री. आनंद दवे यांनी १९ मे या दिवशी भेट दिली. आश्रमभेटीच्या वेळी त्यांनी आश्रमातील विविध विभागांत चाललेले राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य जाणून घेतले. या वेळी श्री. प्रशांत कोयंडे यांनी त्यांना आश्रमाविषयी माहिती दिली.
     श्री. आनंद दवे विविध वृत्तवाहिन्यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रांत हिंदुत्वाची बाजू ठामपणे मांडतात. तसेच हिंदुद्रोही चित्रपटांच्या विरोधातील कायदेशीर प्रक्रियेत साहाय्य करतात. ते दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार आहेत.
श्री. आनंद दवे यांना दैनिकाविषयी सांगतांना श्री. कोयंडे (उजवीकडे)
समाजातील रज-तमाच्या वातावरणात रहाणार्‍या तरुण पिढीने 
सनातनच्या आश्रमातील साधकांचा आदर्श घेणे आवश्यक ! - श्री. आनंद दवे
     आश्रमभेटीच्या वेळी घरादाराचा त्याग करून आश्रमात आलेल्या साधकांची सेवावृत्ती पाहून समाजातील रज-तमाच्या वातावरणात रहाणार्‍या तरुण पिढीने सनातनच्या आश्रमातील साधकांचा आदर्श घेणे आवश्यक असल्याचे मत श्री. आनंद दवे यांनी व्यक्त केले. ही भेट अविस्मरणीय असून आश्रमाला सहकुटुंब भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात मोगल आक्रमकांच्या नावे ७०४ शहरे आणि गावे !

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांतही देशावर आक्रमण करून राज्य करणार्‍यांची 
नावे न पालटणारा जगातील एकमेव देश भारत ! 
मोगल आक्रमक आणि त्यांच्या नावाने
असणारी शहरे अन् गावे यांची संख्या
     मुंबई - केंद्रीयमंत्री व्ही.के. सिंह यांनी अकबर मार्गाचे नाव पालटून महाराणा प्रताप मार्ग करा, अशी मागणी केली होती. सिंह यांच्यापूर्वी भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी आणि नंतर शायना एन्.सी. यांनीही ही मागणी केली आहे. इस्रायलचे उदाहरण देत त्यांनी कोणताही देश आपल्यावर अत्याचार करणार्‍यांचा सन्मान करत नाही, असे ट्वीट केले होते. 
     वर्ष २०१५मध्ये देहलीतील औरंगजेब मार्गाचे नाव पालटून त्यास डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले होते. या व्यतिरिक्त संपूर्ण देशामध्ये मुघल शासकांच्या नावांची अनेक शहरे आणि गावे आहेत. देशातील ६ लाख शहरे आणि गावांपैकी ७०४ शहरे आणि गावे अकबर, बाबर, हुमायूँ, जहाँगीर, शाहजहाँ आणि औरंगजेब यांच्या नावाने ओळखली जातात. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी या शहरांची नावे पालटण्याची मागणी केली आहे.

अल्झायमरचा धोका टाळण्यास योग आणि ध्यानधारणा यांचे साहाय्य !

पाश्‍चात्त्यांनाही हिंदु धर्माची देणगी असलेल्या योग आणि ध्यानधारणा यांचे महत्त्व पटू लागले आहे.
     वॉशिंग्टन - योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य असून त्यामुळे अल्झालयमरचा धोका टाळण्यास साहाय्य होते, असे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे ध्यानामुळे बौद्धिक क्षमतेच्या विकासास मोठ्या प्रमाणात हातभार लागत असल्याचेही संशोधकांना आढळून आले आहे. या अभ्यासाचा अहवाल अल्झायमर जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
१. यासंबंधी करण्यात आलेल्या संशोधनानुसार ३ मासांचा ध्यानधारणेचा कार्यक्रम मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करण्यास लाभदायक ठरतो. मूळत: याच कारणांमुळे अल्झायमरचा त्रास होत असल्याने या आजाराला रोखण्यास योग आणि ध्यानधारणा महत्त्वाची भूमिका बजावतात.
२. त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासही ध्यानधारणा आणि योग अत्यावश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे संकटाची सूचना देतो लाल भैरव !

     शिमला - देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये अनेक मंदिरे आहेत आणि देवतांच्या अनेक कथाही येथे ऐकायला मिळतात. अशीच कथा शक्तीपीठ ब्रजेश्‍वरी मंदिराविषयीही सांगितली जाते. 
    कांगडा भागात असलेल्या या मंदिराच्या आवारात लाल भैरवाचे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती ५ सहस्र वर्ष प्राचीन असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे कांगडा भागावर काही संकट येणार असेल, तर या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येतात आणि अंगाला घाम येतो. अनेकदा हा चमत्कार घडला आहे. त्यानंतर तेथील पुजारी देवी ब्रजेश्‍वरीपुढे होमहवन करून आणि मूर्तीला अभिषेक करून संकट निवारण व्हावे, यासाठी प्रार्थना करतात. त्यामुळे संकट टळते, अशी भाविक आणि स्थानिक यांची श्रद्धा आहे.

पोलिसांच्या गैरवर्तनाला कसे सामोरे जावे, याचे माजी पोलीस महासंचालकांकडून बजरंग दलाला प्रशिक्षण !

     लक्ष्मणपुरी (लखनऊ) - उत्तरप्रदेशचे माजी पोलीस महासंचालक बृजलाल हे पोलिसांच्या चुकीच्या गोष्टींना कसे सामोरे जावे आणि त्यांचा सामना कसा करावा, याचे प्रशिक्षण स्थानिक लोकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना देत आहेत. हे प्रशिक्षण शिबीर अयोध्या येथील कारसेवकपूरम्मध्ये चालू आहे. या प्रशिक्षणात गोहत्या, लव्ह जिहाद यांसारख्या मोहिमांचा समावेश आहे. राम मंदिरासाठी लोकांमध्ये जागृती करणारे कार्यकर्तेही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. 
१. या कार्यकर्त्यांचा बर्‍याचदा पोलिसांशी सामना होतो. त्यांना पोलिसांकडून अनेकदा चुकीची वागणूक मिळते. त्रास सहन करावा लागतो. अशा त्रासाला कसे सामारे जावे, याचे प्रशिक्षण बृजलाल देत आहेत. 
२. कारसेवकपूरम् येथूनच राममंदिर निर्माणाची मोहीम चालू झाली. ही मोहीम आता विश्‍व हिंदु परिषद पुढे नेत आहे. 
३. बृजलाल यांनी सेवानिवृत्तीनंतर मागील वर्षी जानेवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.


काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांना अखेर अटक, जामीन अर्ज फेटाळला !

     चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) - चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांचा जामीन अर्ज चिपळूण न्यायालयाने २० मे या दिवशी फेटाळून लावला. त्यामुळे नीलेश राणे यांना आजची रात्र न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. २६ दिवसांनी नीलेश राणे यांना अखेर १९ मे या दिवशी सकाळी चिपळूण पोलिसांनी अटक केली होती. त्यांना येथील न्यायालयात उपस्थित करण्यात आले. काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी नीलेश राणे, त्यांचे स्वीय साहायक तुषार पांचाळ, अंगरक्षक मनीष सिंह यांसह अन्य काही साथीदारांवर ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

शंभूराजांचा आदर्श समोर ठेवून भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कटीबद्ध व्हावे ! - प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

शहापूर (जिल्हा ठाणे) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित कार्यक्रम
     शहापूर (जिल्हा ठाणे) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अपकीर्त करून त्यांचा खोटा इतिहास समाजासमोर आणला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम शंभूराजांनी पाहिले असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर धर्मासाठी बलीदान करण्याचे संस्कार झाले होते. त्यांनी १४ व्या वर्षांत बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. १२७ पैकी एकही लढाई ते हरले नाहीत. त्यांचे डोळे फोडण्यात आले, पळीपळीने गरम तेल अंगावर टाकण्यात आले, तरीही त्यांनी धर्म पालटला नाही. सर्वांनी शंभूराजांचा आदर्श समोर ठेवून भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कटीबद्ध व्हायला हवे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद वडके यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना केले. येथील धसई गावात नामदेव इलेवन क्रीडा मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते.

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त वाहन फेरी

    
फेरीत सहभागी हिंदु धर्माभिमानी
भुसावळ
- २२ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने भुसावळ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने भुसावळ शहरात १९ मे या दिवशी वाहन फेरी काढण्यात आली. जामनेर रोड येथील साईबाबा मंदिर येथे धर्मध्वजाचे पूजन करून शंखनादाने वाहन फेरीचा प्रारंभ झाला. धर्मध्वज पूजन हिंदु धर्माभिमानी सर्वश्री अभय राठोड, भूषण महाजन यांचा हस्ते करण्यात आले.
     भगवे ध्वज घेऊन हर हर महादेव, जय श्री राम, जय भवानी, जय शिवाजी, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, आयेगा भाई आयेगा हिंदु राष्ट्र आयेगा या घोषणांद्वारे जनजागृती करण्यात येत होती. उपस्थित हिंदूंना सर्वश्री प्रशांत जुवेकर, उदय बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. या वाहन फेरीत ४० दुचाकी आणि १०० हिंदु धर्माभिमानी युवक उपस्थित होते.

पुण्यातील नगर रस्त्यावरील एकात्मिक वाहतूक प्रणालीतील (बीआर्टी) त्रुटींच्या विरोधात पालिका सभेत आंदोलन

यावरूनच बीआर्टी मार्गाचे रस्ते मृत्यूचे सापळे होत आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार
 नाही. त्या मार्गाच्या उद्घाटनाची घाई ही आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून 
केली आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. याविषयी परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष 
म्हणून जिल्हाधिकारी या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील का ?
     पुणे - येथील नगर रस्त्यावरील एकात्मिक वाहतूक प्रणाली (बीआर्टी) मार्गावर अपघात आणि वाहतूककोंडी होत आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या पक्षाच्या नगरसेवकांनी यांनी १८ मे या दिवशी महानगरपालिकेच्या मुख्य सभेत निदर्शने केली. प्रवासी आणि पादचारी यांच्या सुरक्षेचा विचार न करता सत्ताधार्‍यांनी केवळ श्रेयासाठी नगर रस्त्यावर एकात्मिक वाहतूकप्रणाली सेवा चालू केली, असा आरोप या सभेत करण्यात आला.  
      नगर रस्त्यावरील एकात्मिक वाहतूकप्रणाली सेवा चालू होऊन तीन आठवडे झाले आहेत. तरी या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर प्रतिदिवशी छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा मार्ग प्रवासी आणि पादचारी यांच्यासाठी धोकादायक झाला आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळेही या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात गंभीर त्रुटी असतांनाही या मार्गाची अनुमती शासनाने कशी काय दिली ? - संपादक)

छत्तीसगडमध्ये जेएन्यूच्या ३ प्राध्यापकांवर देशद्रोहाचा आरोप !

ज्या विद्यापिठातील प्राध्यापकच देशद्रोहाचा गुन्हा करतात, 
तेथे विद्यार्थ्यांनी तसे केल्यास आश्‍चर्य ते काय ? 
प्राध्यापकांनी नक्षलवाद्यांना समर्थन देण्यासाठी गावकर्‍यांना गाव जाळून टाकण्याची धमकी दिली
     रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगड पोलिसांनी जेएन्यूच्या अर्चना प्रसाद, ऋचा केशव आणि विनीत तिवारी या ३ प्राध्यापकांच्या विरोधात देशद्रोह आणि छत्तीसगड जन सुरक्षा अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. त्या प्रकरणी अन्वेषण केल्यानंतर त्यांना अटक केली जाणार आहे. राज्यातील नक्षलवाद्यांच्या साहाय्यतेसाठी गावकर्‍यांना उकसवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षलवाद्यांना साहाय्य न केल्यास गाव जाळून टाकू, अशी धमकीही त्यांनी दिली होती. 
      या तिन्ही प्राध्यपकांनी १२ ते १६ मे या कालावधीत बस्तर जिल्ह्यातील काही गावांचा दौरा केला होता. यातील एका प्राध्यापकाने गावकर्‍यांना म्हटले होते की, केंद्र आणि राज्य यांपैकी कोणतेही शासन तुमच्यासाठी काही करू शकत नाही. केवळ नक्षलवादीच तुम्हाला साहाय्य करू शकतात.नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकालाची ५० टक्के कामे पूर्ण ! - जिल्हाधिकारी

      कोल्हापूर - नृसिंहवाडी (तालुका शिरोळ) येथे ऑगस्ट मासात होत असलेल्या कन्यागत महापर्वकालासाठी रस्त्यांचे डांबरीकरण, घाट बांधणे, वीज आस्थापनाचे खांब बसवणे इत्यादी विविध विकासकामे चालू असून ती आतापर्यंत ५० टक्के इतकी झाली आहेत. रस्ते डांबरीकरणाचे काम मेअखेर, तर उर्वरित कामे जूनअखेर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी १७ मे या दिवशी येथे संबंधित यंत्रणेला या वेळी दिल्या. नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाल २०१६ साठीच्या आराखड्यातील कामांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी लोकप्रतिनिधी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कन्यागतसाठी सिद्ध केलेल्या आराखड्यानुसार चालू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.

फलक प्रसिद्धीकरता

देशद्रोह्यांपुढे लोटांगण घालणार्‍या राज्यकर्त्यांच्या निरर्थक
 लोकशाहीपेक्षा आता हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
     जम्मू-काश्मीरमधील विस्थापित हिंदूंसाठी स्वतंत्र वसाहती उभारणार नाही, असे जम्मू-काश्मीरच्या भाजप-पीडीपी सरकारने स्पष्ट केले आहे. देशद्रोही फुटीरतावाद्यांच्या प्रचंड दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jammu-Kashmirke visthapit Hinduonke liye swatantra colony nahi banai jayegi : PDP-BJP ki Rajyasarkar
     Hinduo, apka vishwasghaat karnewalo ko na bhule !
जागो !
:जम्मू-कश्मीर के विस्थापित हिन्दुआें के लिए स्वतंत्र कॉलोनी नहीं बनाई जाएगी : पीडीपी-भाजपा की राज्यसरकार
     हिन्दुओ, आपका विश्‍वासघात करनेवालों को न भूले !

राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर ५३ अंश तापमानाच्या नोंदीमुळे सैनिकांचे हाल !

अगणित वृक्षतोड, अधर्माचरण आणि विज्ञानाचा अतिरेक यांमुळेच पृथ्वीवर उष्णता 
वाढत आहे, हे तथाकथित पुरो(अधो)गाम्यांच्या लक्षात येईल तो सुदिन !
     जयपूर - भीषण गर्मीमुळे राजस्थान होरपळत आहे. राजस्थानमधील शाहगड, बल्ज क्षेत्र येथे भारत-पाक सीमेवर १९ मे या दिवशी दुपारी ५३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर अन्य काही ठिकाणी तापमान ५२ अंश सेल्सियस होते. या कठिण परिस्थितीत सीमेवर २४ घंटे पहारा देणार्‍या सैनिकांची स्थिती अवघड झाली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालय सैनिकांना कूल (थंड) जॅकेट्स देण्याची सोय करणार होते; परंतु हे नियोजन केवळ कागदावरच राहिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच सैनिकी चौक्यांवर कूलर अथवा पंख्यांचीही सोय नाही. (यातून सरकारची सैनिकांविषयीची असंवेदनशीलताच दिसून येते ! - संपादक) याचा परिणाम म्हणून सीमा सुरक्षा दलाचे (बीएस्एफ्चे) सैनिक डोक्यावर कॉटनचे कापड ठेवून उंटावर बसून सीमेवर पहारा देत आहेत.आता स्पीड पोस्टद्वारेही तलाक दिल्याची घटना !

मुसलमान महिलांवरील या अन्यायाच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या 
तृप्ती देसाई यांसारख्या कोणीही आंदोलन करत नाहीत, हे लक्षात घ्या !
     जयपूर - येथील आफ्रीन रहमान या २५ वर्षीय विवाहितेला त्याच्या पतीने स्पीड पोस्टद्वारे तलाक दिला आहे. या प्रकरणी आफ्रीन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपवरांसाठीच्या संकेतस्थळावरून वर्ष २०१४मध्ये आफ्रिनचे सैयद असार अली वारसी याच्याशी लग्न जुळले होते. लग्नानंतर २-३ महिन्यांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ चालू केला. तिला मारहाणही करण्यात आली. या नेहमीच्या छळाला कंटाळून आफ्रीन माहेरी आली. माहेरी असतांनाच तिला स्पीड पोस्टने तलाक देण्यात आला.

देहली येथील न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेत ३ वर्षांपासून ११ सहस्र नमुने प्रलंबित !

     नवी देहली - देहली न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेत गेल्या ३ वर्षांपासून ११ सहस्र नमुन्यांची तपासणी प्रलंबित असल्याचे देहली पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले. देहलीतील महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातील खटल्याची सुनावणी करतांना पोलिसांनी ही माहिती दिली. यावर उत्तर देतांना न्यायालयाने सांगितले की, अशा चाचण्या जर प्रलंबित असतील, तर त्यांची माहिती आधीच समजते.
   हत्या, बलात्कार, अपहरण यांसारख्या प्रकरणात गुन्हेगाराला दोषी ठरवण्यासाठी देहली पोलीस यासंदर्भातील पुरावे गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात; परंतु यांचा तपास लागेपर्यंत खटला दीर्घकाळ चालू राहून यात निर्दोष व्यक्तीलाही कारागृहात रहावे लागते. (निरपराध्याला नाहक कारागृहात रहाण्यास भाग पाडणारे प्रशासन जनताद्रोहीच होय ! केजरीवाल यांचे राज्यशासन आणि केंद्रशासन याकडे लक्ष देईल का ? - संपादक)
    सध्या चाणक्यपुरीमध्ये दोन न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळा आहेत. यांव्यतिरिक्त आणखी एक प्रयोगशाळा बनवण्याचा विचार चालू आहे.

मुंबईत १५ वर्षांखालील मुलींच्या गर्भपातात १४४ टक्क्यांनी वाढ !

पाश्‍चात्त्यांच्या स्वैराचाराचे अनुकरण करण्याचे, तसेच मुलींवर बंधने घालण्याच्या 
विरोधात असणार्‍या पुरो(अधो)गाम्यांच्या विचारसरणीचा दुष्परिणाम !
     मुंबई - मुंबई शहरातील १५ वर्षांखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या घटनांमध्ये गेल्या ३ वर्षात १४४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसीज (एम्टीपी)च्या आकडेवारीवरून उघडकीस आली आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी महानगरपालिकेकडे मागितलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती उघड झाली आहे.
१. एम्टीपीत २०१५-१६ मध्ये नोंदणी झालेल्या ३४ सहस्र ७९० महिलांनी गर्भपात केला आहे. ही आकडेवारी २०१४-१५ च्या तुलनेत १३ टक्क्याने वाढली आहे. २०१४-१५ मध्ये ३० सहस्र ७४२ महिलांनी गर्भपात केला होता. 
२. अल्पवयीन मुलींमध्ये गर्भपात करण्याच्या टक्केवारीत १११ ते १८५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. १५ ते १९ वयोगटातील मुलींच्या गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. 
३. १८ वर्षांखाली गरोदर असलेल्या मुलींची माहिती पोलिसांना द्यायला हवी. तरच त्याचे खरे कारण समजू शकेल. तसेच १५ वर्षांखालील मुलींचे गर्भपात का होत आहेत, याचे स्पष्टीकरण कळू शकेल, असे ही या माहितीद्वारे सांगण्यात आले आहे.


विवाह हा सोहळा न होता संस्कार व्हावा !

  हिंदु धर्मानुसार मनुष्यजन्मातील १६ मुख्य संस्कारांपैकी विवाह हा महत्त्वाचा आणि संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा संस्कार. विवाहाचा खरा उद्देश म्हणजे २ जीवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होण्यासाठी ईश्‍वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे. २ जीवांच्या सहप्रवासात २ घराणीही एकमेकांशी जोडली जातात आणि कालांतराने एकरूप होतात. विवाहाचा उद्देश केवळ प्रजोत्पादन नसून त्याद्वारे एक सुसंस्कारित अशी कुटुंबसंस्था निर्माण होऊन पर्यायाने समाज आणि राष्ट्र यांची निर्मितीच होय ! हिंदु धर्माने विवाहसंस्था या माध्यमातूनही मानवाला ईश्‍वरप्राप्तीची सुवर्णसंधी दिली आहे. म्हणूनच हिंदु धर्मानुसार विवाह केल्यास वधू-वर हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही संलग्न होतात. विवाहाच्या वेळी केल्या जाणार्‍या धार्मिक विधींमधून वधू-वराला ईश्‍वराचा आशीर्वाद प्राप्त करून दिला जातो. त्यातील प्रत्येक धार्मिक विधीमागे शास्त्रीय कारण आहे; परंतु आजकाल विवाह संस्काराचे रूपांतर सोहळ्यात झाल्यामुळे त्याचा संपूर्ण अर्थच पालटला आहे.

दादर (जिल्हा मुंबई) येथे आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

      देहली विद्यापिठाच्या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍या सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा आणि श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर येथील प्राचीन धार्मिक परंपरांचे रक्षण व्हावे अन् धार्मिक परंपरा हेतूत: मोडू पहाणार्‍या तृप्ती देसाई यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
वार : शनिवार, दिनांक : २१ मे २०१६, वेळ : सायं. ५ ते ७
स्थळ : श्री हनुमान मंदिराजवळ, दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर, 
श्री स्वामी नारायण मंदिरासमोर, दादर (पू.), मुंबई.
संपर्क क्र. : ९९२०२०८९५८
हिंदु बांधवांनो, या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होऊन राष्ट्र आणि धर्म कर्तव्य बजावा !
समस्त मानवजातीच्या कल्याणार्थ सदैव झटणार्‍या ईश्‍वरस्वरूप परात्पर गुरु
डॉ. आठवले यांची महती वर्णन करणारा दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष
प्रसिद्धी दिनांक : २९ मे २०१६
  •  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ ते परात्पर गुरुपर्यंतचा प्रवास !
  •  परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध क्षेत्रांतील अद्वितीय कार्य !
  •  संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन अन् त्यांना दिशादर्शन करणारे कार्य
  •  परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरूंचे कृपाशीर्वाद !
  •  परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी केलेला सन्मान अन् त्यांना पुरस्कार देऊन केलेला गौरव !
  •  विशेष : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध भाव दर्शवणारी छायाचित्रे
आपली मागणी आजच नोंदवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ मे या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
सकारात्मक दृष्टीकोन कसा असावा ? 
१. शिष्याच्या अयोग्य दृष्टीकोनाला गुरूंनी दिलेला सकारात्मक दृष्टीकोन : दोन संन्यासी, म्हणजे गुरु-शिष्य ८ मासांनी (महिन्यांनी) पावसाळ्यात परत त्यांच्या झोपड्यांकडे आले. आल्यावर त्यांनी बघितले की, झोपड्यांचे अर्धे छप्पर उडून गेले आहे. शिष्य म्हणाला, बघा, आपण भगवंताची आठवण करून करून मरतो, त्याचे फळ ! म्हणून मी सांगतो, प्रार्थना, पूजा इत्यादींत काही अर्थ नाही. दुष्टांंचे बंगले चांगले राहिले आणि आपल्या झोपड्या पडल्या.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

     कुठे प्रत्येक मानवाला उन्नत बनवून त्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणारे आपले पूर्वज, तर कुठे जनतेला भोगवादाच्या खाईत लोटणारे हल्लीचे राज्यकर्ते !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
गोरक्षण विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
     मोगल आणि ब्रिटीश यांच्या राजवटीत हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे झाली, तरी हिंदु धर्म टिकला; मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती संकटात आली आहे. त्यामुळे धर्मरक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता ठरली आहे ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती. जेव्हा शस्त्र आणि शास्त्र एकत्र येते, तेव्हाच धर्माची स्थापना होते ! - ह.भ.प. आंधळे महाराज
      देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे. तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल !

पहिल्यांदाच कुणा नास्तिकामध्ये देवाप्रती ओढ दिसली !

सेक्युलर पक्ष धुऊन घेती वाहत्या गंगेत आपले हात
पुरुषवादी हिंदु धर्म अशी या पुरोगाम्यांची नवी जाहिरात
मीरा-गार्गीची नावे ही विद्वान मंडळी केव्हाच विसरली
पहिल्यांदाच कुणा नास्तिकामध्ये देवाप्रति ओढ दिसली ॥ १ ॥

साधकांनो, देवाचिये दारी रहातांना साधक आणि भगवंत यांच्यामध्ये असलेली स्वभावदोष-अहं यांची भिंत पाडून टाका अन् भगवंताला जाणून घ्या !

१. देवाने सनातनच्या सर्व साधकांना त्याच्या घरी ठेवले 
असून तो साधकांची हर प्रकारे काळजी घेत असणे
      देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे; पण सनातनच्या साधकांसाठी देवाचिये घरी उभा क्षणभरी । असे म्हणावे लागेल. तुम्हा सर्व साधकांचे भाग्य मोठे आहे. देवाने सनातनच्या सर्व साधकांना त्याच्या घरी ठेवले आहे. त्यांची खाण्यापिण्याची, रहाण्याची व्यवस्था केली. पाहिजे ते जेवण दिले. ऊन पाणी पाहिजे, तर ऊन पाणी आणि थंड पाणी पाहिजे, तर थंड पाणी दिलेे. अशा प्रकारे भगवंताने साधकांना त्याच्या घरी ठेवून सर्वकाही दिले आहे.
२. साधकांनो, मायेची भिंत तोडल्याविना भगवंताचे दर्शन होणे असंभव !
     देव तुमच्यातच रहात आहे; पण तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. तुकाराम महाराजांना साधकांसारखे पंचपक्वान्नी अन्न नव्हते; पण त्यांनी साधना करून प्रगती केली. साधक आणि भगवंत यांच्यामध्ये जी कुठली भिंत आहे, ती पाडून टाका. मायेच्या ममतेत (मायेमध्ये) अडकू नका. असे केल्यास आपण देवापर्यंत पोहोचू शकू. जोपर्यंत तुम्ही ही मायेची भिंत तोडू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवंताचे दर्शन होणार नाही.

साधकांनो, धनाच्या त्यागापेक्षा मनाच्या त्यागाने शीघ्रतेने गुरुकृपा संपादन करता येते, हे लक्षात घ्या !

    
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
एका जिल्ह्यातील एक साधिका १५-२० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. तिची आर्थिक स्थिती चांगली असून ती धर्मकार्यासाठी धनाचा त्याग करत असते. तिच्याकडे असलेल्या धनाविषयी तिला आसक्ती नाही; परंतु तिने स्वतःचे मन अजून गुरुचरणी अर्पण केले नसल्याने तिच्यात अपेक्षित असे साधकत्व, भाव आणि तळमळ निर्माण न झाल्याने तिची आध्यात्मिक उन्नती झालेली नाही, असे लक्षात येते.
     साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी मनाच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने स्वचा (मनाचा) त्याग करून स्वतःच्या मनमंदिरात गुरूंचे अस्तित्व अनुभवा ! - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ

प.पू. पांडे महाराजांच्या ठिकाणी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे दर्शन होणे

     २९.५.२०१५ रात्री मी प.पू. पांडे महाराजांच्या खोलीत सेवेसाठी गेलो होतो. त्या वेळी ते पलंगावर बसले होते. तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी योगतज्ञ दादाजी वैशंपायन दिसले. यापूर्वीही मला प.पू. पांडे महाराजांच्या ठिकाणी श्री साईबाबा, श्री दत्तगुरु आणि शेषशायी श्रीविष्णु यांचे दर्शन झाले होते.
- श्री. गोपाळ जोरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

उतारवयातही सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्यावर आलेली संकटे दूर करण्यासाठी अनुष्ठाने करणारे योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

     
    
श्री. अतुल पवार
वैशाख पौर्णिमा (२१.५.२०१६) या दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन ९७ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आजही वयाच्या ९७ व्या वर्षी दादाजींचे प्रेम, कृपा आणि आशीर्वाद यांचा अखंड वर्षाव आमच्यावर सातत्याने होत असतो. ही आम्हा सर्वांसाठी महद्भाग्याची गोष्ट आहे. कलियुगातील महान तपस्वी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सेवेची आणि त्यांच्या दैवी सहवासाची संधी गुरुकृपेने मिळाली. त्याविषयी श्री गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता ! योगतज्ञ दादाजींच्या सेवेमध्ये आहे, हे ऐकल्यानंतर तू पुष्कळ भाग्यवान आहेस, असे अनेक साधक मला सांगतात. हे सत्य मला अनुभवायला मिळाले. मला योगतज्ञ दादाजींना पुष्कळ जवळून पहायला आणि अनुभवायला मिळाले. योगतज्ञ दादाजींच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेले अनुभव येथे देत आहोत.
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
१. साधी राहणी आणि प्रसन्न व्यक्तीमत्त्व
     योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची राहणी अत्यंत साधी आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रसन्न आणि हसतमुख असतो. त्यांचे व्यक्तीमत्त्व अत्यंत मोहक आहे. गुलाबी छटा असलेली गोरी काया, बोलके डोळे, तोंडवळ्यावर विलक्षण तेज, निरागस हास्य, मृदू आणि लाघवी बोलणे, स्वच्छ साधा पोशाख आणि कपाळावर गंध, अशा रूपातील त्यांचे मोहक दर्शन सर्वांंना हवेहवेसे वाटणारे आहे. त्यांच्या या व्यक्तीमत्त्वातील मोहकता आमच्या मनाला उल्हसित करणारी आहे. त्याचप्रमाणे विनय, पराकोटीची नम्रता, प्रेमभाव, क्षमाशीलता, व्यवस्थितपणा, काटकसर, नियोजनकौशल्य, प्रसिद्धीपराङ्मुखता, निर्मळता, चिकाटी, तळमळ आणि प्रीती यांसारख्या अनेक दिव्य गुणांचे दर्शन योगतज्ञ दादांजीमध्ये होते.

अहंकाराचा आविष्कार !

आधुनिक वैद्य
दुर्गेश सामंत
     मन ज्याच्याशी एकाग्र होते, ते मनाला चांगले किंवा लोभसवाणे वाटते. विकल्प, नकारात्मकता किंवा मनोराज्येही काही वेळा असेच करतात आणि मन त्यांच्या आहारी जाते. नंतर ते संघर्ष करून त्यातून बाहेरही पडते. या हेलकाव्यांना पाहून मी भगवंताला प्रार्थना केली, ही स्थिती माझ्यावर का आणतोस ? तूच मला मी यातून काय शिकायचे आहे, ते दाखव आणि शिकव. त्या वेळी देवाने पुढील काव्यपंक्ती सुचवल्या.
सुंदर तेे रूप, लोभसवाणे ते नृत्य ।
पाहूनी प्राप्तीसाठी सिद्ध झाला एक ॥
भासले त्याला तोच तो एक बलवान ।
सर्व करू शकतो, असा त्याचा हुंकार ॥ १ ॥
पहाता पहाता वाटले, हाच खरा मी ।
असाच असावा एकांडा वीर ॥
चालू झाले मग राज्य कल्पनांचे ।
पादाक्रांत केली मग कितीक क्षितिजे ॥ २ ॥

सेवा मनापासून स्वीकारून देवाला शरणागत भावाने प्रार्थना केल्यास देवाने सेवा पूर्ण होण्यासाठी साहाय्य करणे

१. सेवा परिणामकारक न होण्याची दोन कारणे
१ अ. सेवा लक्षपूर्वक न करणे : आपण कुठलीही सेवा करत असतांना आपले लक्ष जर विचलीत (म्हणजे इकडे तिकडे भरकटत) असेल, तर ती सेवा परिणामकारक होऊच शकत नाही. त्यामुळे आपण आपला अमूल्य वेळ तर व्यर्थ घालवतोच; पण अन्य साधक जो ती सेवा व्यवस्थित करू शकला असता, त्याचीही संधी दवडतो. साधकांनी आपली सेवा आणि नामजप व्यवस्थित का होत नाही ?, याचा विचार केला पहिजे.
१ आ. सेवा मनापासून न करणे : आपल्याला जी सेवा दिली आहे, ती आपण मनापासून स्वीकारली कि नाही, हे बघायला पाहिजे. आपण सेवा मनापासून स्वीकारली नाही, तर ती सेवा आपण तळमळीने करू शकणार नाही. त्यामुळे आपण साधनेच्या पहिल्या टप्प्यावरच रहाणार. आपल्याला साधनेत पुढे जायचे असेल, तर जी सेवा आवडत नाही, तीही आपल्याला स्वीकारता यायला पाहीजे, तर आणि तरच आपली प्रगती होऊ शकते.
२. उपाय
२ अ. देवाच्या चरणी मनापासून शरण जाणे : काही साधक सेवेत होणार्‍या चुकांचे समर्थन करतांना म्हणतात, मी ही सेवा प्रथमच केल्यामुळे या चुका झाल्या. आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की, कुठलीही सेवा आपण मनापासून स्वीकारली, तर देव आपल्याला स्वतःहूनच साहाय्य करतो.

सनातनच्या रायचूर (कर्नाटक) येथील साधिका सौ. शोभा रायचुरु यांनी गाठला ६३ टक्के आध्यात्मिक स्तर !

सौ. शोभा रायचुरु (वय ५४ वर्षे) यांचा सत्कार करतांना 
६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. काशिनाथ प्रभु

साधकांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी केलेल्या प्रीतीच्या उधळणीची सौ. सुप्रिया आळशी यांना आलेली प्रचीती

सौ. सुप्रिया आळशी
     वापी, गुजरात येथील आधुनिक वैद्या (सौ.) सुप्रिया संतोष आळशी या जानेवारी २०१६ मध्ये रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या अल्प कालावधीच्या आश्रमातील वास्तव्यात प.पू. डॉक्टरांनी साधकांच्या माध्यमातून त्यांची विविध प्रकारे काळजी घेतली. त्या संदर्भात येथे देत आहोत.
१. शारीरिक
१ अ. शारीरिक वेदना होत असतांना साधकांनी साहाय्य करणे : आश्रमात आल्यावर एके दिवशी मला कंबर आणि गुडघे यांत तीव्र वेदना होत होत्या. वेदनाशामक गोळ्या घेऊनही वेदना नियंत्रणात येत नव्हत्या. तेव्हा साधक श्री. निमिष म्हात्रे यांनी मला दूरभाष करून फिजियोथेरपीसाठी बोलावले. तेथे त्यांनी करवून घेतलेल्या काही व्यायामांनी वेदनांची तीव्रता अल्प झाली. त्याच रात्री खोलीत पोचल्यावर साधिका कु. प्रतिभा तावरे यांनी माझे पाय दाबून दिले.
१ आ. वजन न्यून होण्यासाठी साधिकेने जातीने लक्ष घालून औषधे उपलब्ध करून देणे : वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांची भेट झाल्यावर त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली आणि वजन न्यून करायला हवे, असे सांगितले. डॉ. दीपक जोशी आश्रमात आले होते आणि वजन न्यून करायचा उपचार करणार होते. तेव्हा मला त्या उपचाराचा लाभ होण्याच्या दृष्टीने त्या सतत प्रयत्नरत होत्या. जेव्हा माझ्याकडे दिवस अल्प आहेत आणि ही प्रक्रिया आता करू शकत नाही, असे त्यांना कळले, तेव्हा त्यांनी मला घरी जायच्या आधी डॉ. दीपक जोशी यांच्याशी बोलून औषधे घेण्यास सांगितले. त्यांनी मला माझ्या शारीरिक त्रासांविषयी विचारून घेऊन त्यावरील औषधेसुद्धा काढून ठेवली होती.

निरागस भाव असणारी आणि इतरांना आनंद देणारी ६६ टक्के आध्यात्मिक स्तर असलेली देवद आश्रमातील कु. स्नेहा झरकर (वय १९ वर्षे) !

कु. स्नेहा झरकर
१. निरागसभाव आणि सहजता
     कु. स्नेहा झरकर हिच्या मनात सतत मला प.पू. डॉक्टरांंसारखे व्हायचे आहे, मला पू. (सौ.) बिंदाताईंसारखे व्हायचे आहे, असा ध्यास लागलेला असतो. यांतून तिचा देवाकडे जाण्याचा ध्यास आणि तळमळ मला शिकायला मिळाली. कु. स्नेहासमवेत राहिल्याने माझ्याही मनात आपल्याला एकाच ठिकाणी थांबायचे नाही, पुढे पुढे जायचे आहे, असे विचार वाढून माझ्या प्रयत्नांना दिशा मिळायची. कु. स्नेहाच्या बोलण्या-वागण्यात निरागसभाव आणि अतिशय सहजता आहे.
२. इतरांना साहाय्य करणे
अ. कु. स्नेहा माझी वेणी घालत असे. तेव्हा तिचा स्पर्श मला अतिशय निराळा वाटायचा. मी तिला म्हणायचे, तुझा स्पर्श इतका सुंदर, जणू देवच माझी वेणी घालत आहे. त्या स्पर्शाने माझा भाव जागृत व्हायचा. मला पुष्कळ आनंद जाणवायचा. अनेक वेळा तिच्या माध्यमातून देवच माझ्यावर उपाय करत आहे, असे मी अनुभवले आहे.
आ. माझ्या कानातली कुडी गोल आणि मोठी होती. ते पाहून कु. स्नेहाने मला सांगितले, तुला लोंबते कानातले चांगले दिसतील. माझ्या पोषाखांची रंगसंगती कशी असावी, ती चांगली ठेवण्यासाठी मी काय करायला हवे, अशी सूत्रेही तिने मला सांगितली. प्रत्येक गोष्टीतील बारकावे कु. स्नेहा मला सांगत असे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशी (२०.५.२०१६) उ.रा. १२.४२ वाजता
समाप्ती - वैशाख पौर्णिमा (२१.५.२०१६) उ.रा. २.४४ वाजता
आज पौर्णिमा आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा म्हणता येईल. त्याचप्रमाणे राष्ट्र आणि धर्म मृत्यूशय्येवर असतांना तशा जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणे, याला महामूर्खपणा म्हणता येईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा एकांत 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


जीव जन्माला घालण्यासंदर्भात भगवंताचे नियोजन

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
     भगवंताचे नियोजन आवश्यकतेनुसार आणि परिणामांचा विचार करून असते, उदा. वाघांची उत्पत्ती प्रत्येक १२ वर्षांनी असते. मनुष्याची एक वर्षाने असते. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.११.२०१४)

इतरांवर परिणाम करण्यात सगुणापेक्षा निर्गुण आणि निर्गुणापेक्षा संत अधिक श्रेष्ठ !

     साधकांच्या बोलण्यामुळे नाही, तर सनातनचा आश्रम पाहून हिंदुत्ववादी आणि साधनेची आवड असलेले सनातनच्या कार्याशी जोडले जातात. संतांमध्ये सगुण-निर्गुण दोन्ही तत्त्वे असल्याने त्यांचा प्रभाव आश्रमापेक्षा अधिक पडतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


लोकराज्यातील मतदाराचे स्थान !

संपादकीय
     तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी, बंगाल आणि आसाम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १९ मे या दिवशी घोषित झाले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शासनाची विजिगीषू कार्यपद्धत पहाता या पाच विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात नेत्रदीपक असे काहीतरी होईल, अशी देशवासियांची कल्पना होती; त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले होते. लोकांचा त्यामानाने अपेक्षाभंगच झाला. कोण कुठे कमी पडले, या सूत्रावर प्रत्येकाचे मत वेगळे आहे. तमिळनाडूमध्ये परत एडीएम्के हा स्थानिक पक्ष, केरळमध्ये काँग्रेसची संयुक्त लोकशाही आघाडी जाऊन डाव्यांची लोकशाही आघाडी, पुदुचेरीमध्ये परत ऑल इंडिया एन्आर् काँग्रेस, बंगालमध्ये परत तृणमूल काँग्रेस आणि आसाममध्ये काँग्र्र्रेसचा धुव्वा उडवत भाजपची मुसंडी असे चित्र स्पष्ट झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn