Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज नृसिंह जयंती

विनम्र अभिवादन !

देशभक्त बिपीनचंद्र पाल स्मृतीदिन

४ राज्यांमध्ये जनतेने काँग्रेसला लाथाडले !

हिंदूंनो, देश काँग्रेसमुक्त होण्याच्या दिशेने जात असला, तरी त्याच्या जागेवर येणारे
 तुमच्यासाठी काहीही करणार नसल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दिशेने मार्गक्रमण करा !
देशाची काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल !
  •  तमिळनाडूत जयललिता
  •  बंगालमध्ये ममता बॅनर्जी
  •  आसाममध्ये भाजप
  •  केरळमध्ये साम्यवादी
  •  पुदुचेरीमध्ये पुन्हा काँग्रेस !
      नवी देहली - गेल्या २ वर्षांपासून देशात असलेली काँग्रेसविरोधी लाट अद्याप ओसरलेली नाही. देश काँग्रेसमुक्त करण्याचे मोहनदास गांधी यांचे स्वप्न जनता पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याला काँग्रेसचे निष्क्रीय युवराज राहुल गांधी यांची साथ लाभत आहे. यामुळे देशात झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील ४ राज्यांत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला आहे. ५ पैकी आसाम आणि केरळ या राज्यांमधील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली आहे, तर तमिळनाडूत पुन्हा एकदा जयललिता यांचा विजय झाला आहे. तसेच बंगालमध्येही हिंदूंनी आत्मघात करून घेत ममता(बानो) बॅनर्जी यांना सत्तेवर बसवले आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एन्आर् काँग्रेसचा विजय झाला आहे. आसाममध्ये प्रथमच भाजपने बहुमत प्राप्त केले आहे, तर केरळमध्ये खाते उघडले आहे.

धर्मद्रोही तृप्ती देसाई यांचा नाशिक येथील कपालेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न नागरिक आणि हिंदुत्ववादी यांच्या तीव्र विरोधामुळे विफल !

हिंदु अतीसहिष्णु असल्यामुळे या घटना घडतच रहाणार, असे म्हणायचे का ?
नागरिक आणि हिंदुत्ववादी यांचे अभिनंदन !
     नाशिक - पंचवटी भागातील कपालेश्‍वर या शिव मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळवण्यासाठी धर्मद्रोही तृप्ती देसाई यांनी तथाकथित आंदोलन केले; मात्र स्थानिक नागरिक, पुजारी आणि हिंदुत्ववादी यांच्या प्रचंड विरोधाला त्यांना सामोरे जावे लागल्याने त्यांचा मंदिर प्रेवशाचा डाव उधळला गेला. (धर्मद्रोहाला विरोध करून धर्मासाठी लढणारे समस्त ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा ! - संपादक) २६ मे या दिवशी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.
     या प्रकरणी मंदिराच्या विश्‍वस्तांशी चर्चा केली आहे, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला होता. कपालेश्‍वर मंदिराच्या विश्‍वस्तांनी त्यांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यास कोणतीही अडचण नाही, असे सांगितल्याचे समजते. तृप्ती देसाई १९ मे या दिवशी दुपारी कपालेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी आल्या, त्या वेळी मात्र स्थानिक नागरिक, पुजारी आणि हिंदुत्ववादी यांनी त्यांना प्रचंड विरोध केला.

हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हा केंद्रबिंदू धरून लढल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांना निश्‍चित यश मिळेल ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

उज्जैन येथे भारत रक्षा मंचच्या वतीने बांगलादेशी घुसखोरीच्या विरोधात संमेलन !
देशपातळीवर घुसखोरीविरोधी कठोर कायदा करण्याची आग्रही मागणी !
भारत रक्षा मंचच्या संमेलनातील व्यासपिठावर डावीकडून 
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि इतर मान्यवर
       उज्जैन, १९ मे (वार्ता.) - मुसलमानधर्मीय कुराणला (त्यांच्या धर्माला) समोर ठेवून, तर ख्रिस्ती लोक बायबलला (त्यांच्या धर्माला) समोर ठेवून आंदोलन करतात. त्यामुळे त्यांना यश येते. त्या तुलनेने हिंदुत्वनिष्ठ संघटना चळवळ आणि आंदोलन करतांना हिंदु धर्माला केंद्रबिंदू ठेवून लढा देत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आपल्या धर्मावर निष्ठा ठेवून आणि धर्म हा केंद्रबिंदू धरून कार्य केल्यास त्यांना निश्‍चित यश मिळेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. भारत रक्षा मंच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरीच्या विरोधात उज्जैन येथील केळकर परिसरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी रोखण्यासाठी जन दबाव (जनतेचा दबाव), राजकीय दबाव, कायदेशीर दबाव आणि प्रसिद्धीमाध्यमांद्वारे दबाव आणण्यासाठी भरवण्यात आलेल्या या संमेलनात पू. डॉ. चारूदत्त पिंगळे हे जन दबाव सत्राचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

देशभरात तीव्र उष्णतेची लाट

     नवी देहली - देशभरात तीव्र उष्णतेची लाट असून वेधशाळेकडून ७ राज्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. वेधशाळेने देहली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांना अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे.

सिंहस्थपर्वातील अन्य घडामोडी

पाकमध्ये महिलांना घरातून बाहेर निघण्याची अनुमती नाही, सणही 
घरातच साजरे केले जातात ! - सिंहस्थक्षेत्री आलेले पाकमधील हिंदू 
     उज्जैन - सिंहस्थक्षेत्री प्रथमच पाकिस्तानाहून १८३ हिंदू पर्वणीचा लाभ घेण्यासाठी आले आहेत. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पाकिस्तानमध्ये महिलांना एकटीने घरातून बाहेर पडण्याची किंवा पाश्‍चात्त्य वस्त्र परिधान करायची अनुमती नसते. त्या केवळ पुरुषांसह घराबाहेर पडू शकतात. हिंदूंच्या मिरवणुकांना अनुमती नसते. अनुमती दिलीच, तर ती काही ठराविक मार्गांवरच असते. पाकमध्ये केवळ जुनी मंदिरे आहेत. नवीन मंदिर बांधण्याची अनुमती नाही.

देहलीतील अकबर रोडचे नाव पालटणार नाही ! - व्यंकय्या नायडू

भाजपकडून या स्मृती जपणे अपेक्षित नाही.
मतांची गणिते बाजूला ठेवून भाजपने राष्ट्रहितार्थ तरी 
देशातील सर्व ठिकाणी असलेली आक्रमकांची नावे त्वरित पालटावीत !
आक्रमकांच्या स्मृती नष्ट करण्याऐवजी त्या जपणारा जगातील एकमेव देश भारत !
     नवी देहली - देहलीतील अकबर रोडचे नाव पालटणार नाही, असे केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. अकबर रोडचे नाव पालटून त्यास महाराणा प्रताप यांचे नाव देण्याची मागणी केंद्रीयमंत्री व्ही.के. सिंह यांनी नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहून केली होती. यासह काही नेत्यांनीही अकबर रस्त्याचे नाव पालटण्याची मागणी केली होती; मात्र नाव पालटणे हा माझा कार्यक्रम नाही, असे नायडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. या पत्राला दिलेल्या उत्तरात नायडू यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे.

श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याकडून ५०० जणांना नागा साधूंची दीक्षा !

पवित्र क्षिप्रा नदीच्या तीरावर दीक्षा
देण्यात आलेले नागा साधू
     उज्जैन, १९ मे (वार्ता.) - येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याकडून १८ मे या दिवशी पुन्हा ५०० नागा साधूंना दीक्षा देण्यात आली. दीक्षा घेतलेल्यांमध्ये लहान मुले, तरुण, वयस्कर अशा सर्वच वयोगटातील साधूंचा समावेश आहे. आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर पुण्यानंदगिरी महाराज यांच्या निर्देशानुसार दत्त आखाडा घाटावर हा सोहळा पार पडला. या वेळी नवीन नागा साधूंनी मोक्षदायिनी क्षिप्रा नदीत स्नान करून ७ पिढ्यांचे पिंडदान केले. दीक्षेचे अन्य स्तर, नामकरण विधी आदी प्रक्रिया रात्री विलंबापर्यंत चालू होती.

उज्जैन सिंहस्थ कुंभमेळ्यात मध्यप्रदेश शासन साधू-संतांकडून करवून घेत आहे शासकीय योजनांचा प्रचार !

बेटी बचाव, पाणी वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण योजनांचा प्रचार
     उज्जैन, १९ मे (वार्ता.) - कुंभमेळ्यात येणार्‍या कोट्यवधी श्रद्धाळू भाविकांना धर्म अन् साधनामार्ग यांविषयी मार्गदर्शन करून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणे, हे संतांचे कार्य आहे; मात्र मध्यप्रदेश शासन काही ठराविक संतांना जवळ करून त्यांच्या माध्यमांतून बेटी बचाव (मुलींना वाचवा), पाणी वाचवा, वृक्षारोपण करा, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळून पर्यावरण रक्षण करा, शौचालयाचा वापर करा आदी संदेश देत आहेत. यासाठी कुंभमेळ्यांत ठिकठिकाणी संतांच्या छायाचित्रांसह मोठमोठी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. काही वर्तमानपत्रांत याविषयी विशेष बातम्या छापून आणल्या जात आहेत. संत प्रवचन, भागवत, कीर्तन यांतून याविषयी प्रबोधन करत आहेत. संतांनी याविषयी सांगणे चुकीचे नसले, तर शासन ज्यासाठी लोकांकडून पैसे गोळा करते, जे काम शासनाचे आहे. त्यासाठी अधिकारी वेतन घेतात.

१९६४ मध्येच भारताकडे होती अण्वस्त्र क्षमता ! - अमेरिका

भारताकडे नुसतीच क्षमता असून काय उपयोग ?
त्याचा योग्य वेळी वापर करणेही आवश्यक आहे !
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून वर्ष १९६४ मध्येच भारताकडे अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता होती, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईजवळील ट्रॉम्बे येथे कॅनडाने पुरवलेल्या आण्विक भट्टीमधील इंधनामध्ये त्या काळात प्रत्येक ६ महिन्यांनी पालट करण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या अहवालासहितच इतरही काही कागदपत्रे अमेरिकेकडून नुकतीच प्रसिद्ध (डीक्लासीफाय) करण्यात आली.
१. या अहवालात पुढे म्हटले आहे की, भारताने ठरवल्यास आता ते अण्वस्त्रनिर्मिती करू शकतात. अर्थात् अण्वस्त्र कार्यक्रम राबवण्याच्या उद्देशार्थ भारताकडून संशोधन केले जात असल्याचा कोणताही थेट पुरावा नाही, असेही यात म्हटले आहे.
२. सामान्य परिस्थितीत आण्विक भट्यांमधील इंधन पालटण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी हा खूपच अल्प असल्याची चेतावणीही या अहवालातून देण्यात आली होती.

कल्याण येथील तीन मंदिरे उडवून देण्याचा आतंकवाद्यांचा कट

आतंकवादविरोधी पथकाकडून मंदिरांची तपासणी
आतंकवादाच्या छायेत असणारी हिंदूंची मंदिरे ! मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     ठाणे - कल्याण परिसरातील तीन मंदिरे उडवून देण्याचा आतंकवाद्यांकडून कट केला जात असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत आतंकवाद विरोधी पथकाने नुकतीच डोंबिवलीतील गणेश मंदिर, स्वामीनारायण मंदिर, शहाडमधील बिर्ला मंदिर यांसह आणखी काही मंदिरांची तपासणी केली. बॉम्बशोधक पथक, श्‍वानपथक यांनी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. या तपासणीमागील कारण न सांगता हा कामाचा भाग असल्याचे पथकातील अधिकार्‍यांनी सांगितले असले, तरी ही मंदिरे उडवून देण्याचा कट रचला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळेच ही तपासणी केल्याचे सांगितले जात आहे.

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाच्या अन्वेषणासाठी पाठपुरावा करणार ! - संजय पवार

कोल्हापूरचे प्रभारी जिल्हा शल्याचिकित्सक पाटील यांचे शिवसैनिकांना आश्‍वासन
भ्रष्टाचाराने पोखरलेली शासकीय यंत्रणा !
जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांच्याशी चर्चा करतांना श्री. संजय पवार
     कोल्हापूर - येथील शासकीय रुग्णालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून क्षयग्रस्त, अपंग आणि अंध असल्याचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍यांची टोळीच कार्यरत आहे. असे बनावट प्रमाणपत्रधारक अनेक शासकीय खात्यांत असून ते घरात बसून शासनाचे वेतन लाटत असल्याचा पुरावाच शिवसेनेच्या वतीने येथील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक एस्.एल्. पाटील यांना सादर करण्यात आला. जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांना खडसवले. तेव्हा खोट्या प्रमाणपत्रांची मान्यता देत या प्रकरणी गुन्हे नोंद केलेल्या प्रकरणांचे पोलिसांनी तातडीने अन्वेषण करावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन पाटील यांनी दिले. (पुरावा देऊनही दोषींवर कारवाई करण्याचे केवळ आश्‍वासनच का ? शिवसेनेला जे जमले, ते शल्यचिकित्सकांच्या लक्षात का आले नाही ? खोटे प्रमाणपत्र देणार्‍यांवर कठोर कारवाई करून झालेली हानीभरपाई त्यांच्याकडूनच वसूल करायला हवी ! - संपादक) या वेळी शिवसेना शहरप्रमुख सर्वश्री दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, महिला संघटक शुभांगी साळोखे, सुजाता सोहोनी, दीपाली शिंदे, सुमन शिंदे, युवा सेना जिल्हाधिकारी हर्षल सुर्वे, संदीप पाटील, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.

इजिप्त एअरच्या विमानाला अपघात, ६९ प्रवासी ठार !

     पॅरिस - येथून काहिरा येथे जाणार्‍या इजिप्त एअरच्या विमानाला अपघात झाल्याने विमानातील ६९ प्रवासी ठार झाले. अगोदर हे विमान रडारवरून बेपत्ता झाले होते. त्यानंतर काही वेळातच त्याचा अपघात झाल्याचे वृत्त आले. अपघातामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना गजाआड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! - अंजली दमानिया

आलिशान साेनाटा लिमोझिन गाडीचे प्रकरण
     मुंबई - महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची ग्रहदशा चालू झाली आहे. खडसे काही काळातच कारागृहात गेल्याशिवाय रहाणार नाहीत. खडसे यांना गजाआड केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी १९ मे या दिवशी केले आहे.
१. दमानिया यांनी खडसे यांच्यावर आरोप करतांना खडसे यांचे जावई आधुनिक वैद्य प्रांजल खेवलकर यांच्याकडे जी अलिशान लिमोझिन गाडी आहे, ती अवैध आहे. तसेच खडसे यांच्या नातेवाइकांकडे मर्सिडीज बेंझसह अनेक महागड्या गाड्या आहेत. या गाड्या खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, असा प्रश्‍न विचारला आहे.
२. दमानिया म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्या चौकशीला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाने अनुमती दिली होती, तेव्हाही मी हेच म्हणाले होते की, भुजबळ यांची साडेसाती चालू झाली आहे. त्यांना ग्रहदशा छळणार आहे. आता भुजबळांची काय अवस्था झाली आहे, ते अख्खा महाराष्ट्र पहातोय. हीच परिस्थिती खडसे यांच्यावर येणार आहे; मात्र त्यासाठी थोडा काळ जाऊ द्या.
३. खडसे यांचे निकटवर्तीय शिवाजी जाधव यांना कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली आहेत, तसेच त्यांच्या नावावर असलेली शेकडो एकर भूमी ही खडसे यांचीच असल्याचा अप्रत्यक्ष आरोप दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये केला होता. याविषयी एकनाथ खडसे यांना छेडले असता त्यांनी दमानिया यांच्याविषयी अपशब्द काढले होते.

पुण्यातील मध्यवस्तीतील टिळक रस्त्यावर वाहतूक पोलिसाला मारहाण; दोघांना अटक

     पुणे, १९ मे - येथील मध्यवस्तीतील टिळक रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालयाच्या चौकाजवळ एका वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना १७ मे या दिवशी सायंकाळी घडली. वाहतूक पोलीस कर्मचारी गणेश अर्जुन कांबळे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून शाम राजू शिंदे आणि अमोल बंडोपंत हुलावळे या दोघांना अटक केली, तर त्यांचे अन्य साथीदार पसार आहेत. (जनतेमधील वाढती गुन्हेगारी ही चिंताजनक आहे. यावरून पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. असे मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण करतील का ? - संपादक) 

मुंबई येथे अ‍ॅपल आस्थापनाचे सर्वेसर्वा टीम कूक यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले !

धर्मद्रोही अंनिसला सणसणीत चपराक ! 
     मुंबई, १९ मे (वार्ता.) - येथील श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात जगप्रसिद्ध 'अ‍ॅपल' या भ्रमणभाष आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी १७ मे या दिवशी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. कपाळावर टिळा, गळ्यात गणपति स्तोत्र लिहिलेले उपरणे, तोंडवळ्यावर विनम्रता दर्शवणारे हास्य आणि अत्यंत साधे कपडे परिधान केलेल्या कूक यांना पहाण्यासाठी मंदिराच्या आवारात लोकांची गर्दी झाली होती. (परदेशातून येणारे 'अ‍ॅपल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक हे भारतात आल्यानंतर मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात, तर देशातील राजकारणी आणि लोकप्रतिनिधी इतर पंथांचा उदोउदो करतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! - संपादक) 

शेवगाव येथे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ९७ वा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन !

     शेवगाव - वैशाख पौर्णिमेला म्हणजेच २१ मे या दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा ९७ वा जन्मोत्सव सोहळा शेवगाव येथे साजरा करण्यात येत आहे. प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. चिंदबरस्वामीचे भक्त प.पू. उमाकांत कुलकर्णी (श्रीरामपूर), तसेच पुणे येथील डॉ. रवींद्र नांदेडकर हेही पुरस्काराचे मानकरी असतील. स्वामी सवितानंद (सूरत) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतील.
     जन्मोत्सवाचा कार्यक्रम योगतज्ञ दादाजी वैशंपायन आणि माजी आमदार श्री. चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. जन्मोत्सवानिमित्त २५ जण सकाळी ९ वाजता सामूहिक श्री सत्यस्त पूजा करणार आहेत.

जिल्ह्यातील ८ नगरपालिका आणि ४९० कारखाने यांनी भविष्य निर्वाह निधी थकवल्याविषयी महापालिकेला समन्स

अहमदनगर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार !
     नगर - अहमदनगर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने आणि रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे थकवल्याने भविष्य निर्वाह निधी विभागाने पालिकेला समन्स बजावले आहे. (जी पालिका कंत्राटी पद्धतीच्या कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी थकवत असेल, ती सर्वसामान्यांशी कशी वागत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) पालिकेने ते पैसे तातडीने जमा केले नाहीत, तर पालिकेचे अधिकोष खाते सील करण्यात येईल. याचसमवेत जिल्ह्यातील ८ नगरपालिका आणि ४९० कारखाने यांनी भविष्य निर्वाह निधीचे पैसे थकवल्याने त्यांचीही चौकशी चालू केल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी विभागाचे विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली आहे. तांबे यांनी नगर जिल्ह्यातील विविध संस्था आणि नगरपालिका यांना भेटी दिल्या. या कालावधीत ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की,
१. भविष्य निर्वाह निधी कायद्यानुसार जानेवारी २०११ पासून कंत्राटी, रोजंदारीवर काम करणार्‍या तसेच ठेकेदारांकडे काम करणार्‍या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे संबंधित कारखाने अथवा नगरपालिका यांनी जमा केलेले नाहीत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि पाथर्डी या २ नगरपालिकांची अधिकोष खाती सील केली आहेत. (नगरपालिकांच्या या गैरकारभाराच्या प्रकरणी राज्यशासन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करेल का ? - संपादक)

प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत !

महिलांच्या मंदिर प्रवेशावर कांची कामकोटीचे पीठाधीश्‍वर शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे मत
      चेन्नई - कांचीपुरम् येथील कांची कामकोटी पीठाधीश्‍वर शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांची नुकतीच रेडिफ डॉट कॉम या वृत्तसंकेतस्थळावर मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर मत प्रदर्शन केले आहे. या मुलाखतीचे काही संक्षिप्त अंश पुढे देत आहोत. 
महिलांचा मंदिर प्रवेश 
    महिलांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्‍न घेऊन न्यायालयात खटले चालू आहेत, हे अयोग्य आहे. मंदिराच्या गर्भगृहात कुणालाच प्रवेश नको. मग त्यात महिला आणि पुरुषही आले. महिलांना मंदिराच्या बाहेर ठेवणे ही हिंदु धर्मात परंपरा नाही; मात्र प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत.

ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांच्या शुभहस्ते गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिका-२०१६चे प्रकाशन

   
स्मरणिकेचे प्रकाशन करतांना उजवीकडून दुसरे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज आणि अन्य
     सातारा
- सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 'गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिका-२०१६' चे प्रकाशन येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांच्या शुभहस्ते भावपूर्ण वातावरणात झाले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. माधुरी दीक्षित, सौ. संतोषी माने, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, महेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
     सनातन संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी 'गुरुपौर्णिमा महोत्सवा'चे आयोजन करण्यात येते. या वर्षीही मंगळवार, १९ जुलै २०१६ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात प्रसार करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने 'गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिका-२०१६'चे प्रकाशन करण्यात आले आहे. 
क्षणचित्रे : 
१. स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा प्रारंभ होणार इतक्यात वरूणराजाने उपस्थिती लावल्यामुळे सर्वांचा भाव दाटून आला आणि भावपूर्ण वातावरणात प्रकाशन सोहळा पार पडला.

२ अल्पवयीन मुलांसह ७ जणांना अटक

तारिहाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण 
     तारिहाळ (जिल्हा बेळगाव), १९ मे (वार्ता.) - येथे ४ दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांसह ७ जणांना अटक केली आहे. आणखी काही जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गावातील शांतता भंग करून तेढ निर्माण करण्यासाठी हे भ्याड कृत्य केल्याचे पोलीस अन्वेषणात उघडकीस आले आहे. महेश नागाप्पा तळवार, परमेश्‍वर सन्नतमण्णावर, ईश्‍वर सन्नतमण्णावर, हणमंत तळवार, यल्लाप्पा तळवार अशी पोलिसांनी अटक केलेल्या ५ जणांची नावे असून महेश आणि ईश्‍वर हे अल्पवयीन आहेत. या तरुणांना भडकावणारे अन्य दोघे पळून गेले आहेत. तलवार त्यांच्याजवळ असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

गोवंशहत्या बंदी कायदा रहित करा, या मागणीसाठी २७ मे या दिवशी पुणे येथे आंदोलन - रघुनाथ पाटील, शेतकरी संघटना

देशातील गोवंशियांची घटती संख्या पहाता गोवंशहत्या बंदी कायद्याची
 अत्यावश्यकता असतांना गोहत्येचे समर्थन करणारे हिंदुद्रोहीच आहेत !
     सांगली - गोवंशहत्या बंदी कायदा रहित करावा यांसह शेतकरीविरोधी कायदे रहित करावे, या मागण्यांसाठी शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटीलप्रणीत), संभाजी ब्रिगेड, एसडीपीआय या संघटनांच्या वतीने २७ मे या दिवशी पुणे येथे आंदोलन करण्यात येण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे संदीप राऊत, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, बी.जी. माळी, एस्डीपीआयचे सादिक कुरेशी हे उपस्थित होते. (कोणत्याही शेतकर्‍यास त्याची गाय कसायाकडे जावी, असे वाटत नाही; मात्र शेतकरी संघटनेच्या नावाखाली काही तथाकथित नेते असा कांगावा मात्र नेहमीच करतात. हिंदु धर्माला विरोध करणार्‍या संघटना समवेत घेऊन आंदोलन करणार्‍या संघटनांवर शासनाने गुन्हे प्रविष्ट करून कठोर कारवाई केली पाहिजे ! - संपादक)  
      रघुनाथ पाटील पुढे म्हणाले की, पशूसंवर्धन आणि पशूपालन हा कृषी अर्थव्यवस्थेचा कणाच गोवंशहत्या बंदी करून मोडला आहे. बैलगाडी शर्यतीवर बंदी लादून शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था मोडीत काढली आहे. या आंदोलनात मराठा सेवा संघ, छावा संघटना, पाप्युलर फ्रंट इंडिया, मुस्लीम विकास परिषद, कुरैश जमाअत यांसह अन्य संघटना सहभागी होणार आहे.

गोवंशाचे रक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोसंरक्षण केंद्र उभारणार ! - एकनाथ खडसे, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकासमंत्री

     मुंबई - महाराष्ट्रातील भाकड गायी आणि गोवंश यांचे संरक्षण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोसंरक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती १७ मे या दिवशी पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलतांना दिली. 
       या वेळी खडसे म्हणाले, अशा गोसंरक्षण केंद्राचे प्रारूप सिद्ध करण्याचे काम शासकीय पातळीवर चालू आहे. गोसंरक्षण केंद्र चालू करण्यासाठी निविदा काढून पात्र ठरलेल्या स्वयंसेवी संस्थेला राज्यशासन गायरान भूमी देणार असून या ठिकाणी ठेवण्यात येणार्‍या गोवंशाला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी वनभूमीवर राखीव कुरणे ठेवण्यात येणार आहेत. तसेच अशा केंद्रांना अल्प दराने पाणीपुरवठा करण्यात येणार असून जनावरांच्या आश्रयासाठी शेड बांधणे, तसेच विहीर खोदणे, यासाठी देखील राज्यशासन साहाय्य करणार आहे. त्यासाठी येणारा खर्च राज्यशासन उचलणार आहे.

फतवा हे मतप्रदर्शन असून तो बंधनकारक नाही ! - इस्लामी तज्ञांचे स्पष्टीकरण

     नवी देहली - देवबंद येथील दारूल उलुम अथवा इतर कुठल्याही इस्लामी संस्थेने जारी केलेला फतवा हे एखाद्या धार्मिक प्रश्‍नावर उपस्थित केलेल्या विषयावरील त्यांच्या मुल्ला-मौलवींचे मतप्रदर्शन असते. फतवा हा बंधनकारक नसतो. असे मतप्रदर्शन भारतीय घटनेने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन ठरू शकत नाही. प्रसारमाध्यमांनी उगाच अशा फतव्यांचा बाऊ करून त्यांना जणू काही हे इस्लामिक स्टेटने जारी केलेले आदेशच आहेत, असे स्वरूप दिले आहे. इस्लाम धर्मातील अनेक लोक आणि गट अशा जुनाट इस्लामी संस्थांनी जारी केलेल्या फतव्यांवर टीका करून त्यांना इस्लामच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आवाहन करतात, असे मत इस्लाम धर्माचे अभ्यासक मंहमद अली यांनी हिंदू या दैनिकात प्रकाशित केलेल्या एका लेखात व्यक्त केले आहे. 

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे 'एम्आयएम'चा फलक हिंदुत्ववाद्यांच्या संघटित विरोधामुळे पोलिसांनी काढला !

     अकलुज (जिल्हा सोलापूर), १९ मे (वार्ता.) येथील अकलाई कॉर्नर येथे काही समाजकंटकांनी लावलेला 'एम्आयएम'चा फलक हिंदुत्ववाद्यांच्या संघटित विरोधामुळे पोलिसांनी काढला. याविषयी उपलब्ध माहिती अशी की, येथील हिंदुबहुल भागात काही समाजकंटक १७ मेच्या रात्री १० वाजता अकलाई कॉर्नर येथे एम्आयएम् पक्षाच्या अकलुज शाखेचा फलक लावत असल्याचे लक्षात आल्यावर काही हिंदूंनी या फलकाला विरोध केला. थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी एकत्र आले. या हिंदुत्ववाद्यांनी पोलिसांना याविषयी कल्पना देऊन फलक काढण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एका घंट्यात तेथून तो फलक हटवला. असाच प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. हा फलक लावणारे परिचित नसल्याने ते पंचक्रोशीतूनच आले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(म्हणे) जनतेने हिसका दाखवल्याविना राज्यशासन ठिकाणावर येणार नाही !

देशातील आणि राज्यातील जनतेने स्वतःच्या पक्षाला 
सपशेल नाकारले असतांना अजित पवार यांचा थयथयाट !
      नगर - राज्यातील सध्याच्या शासनाला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण नाही. दुष्काळी स्थितीने तडफडणार्‍या जनतेला दिलासा देण्यात शासन अपयशी ठरले आहे. राज्य मंत्रीमंडळात मराठवाडा आणि विदर्भ येथील मंत्र्यांची संख्या अधिक असल्याने शासनाकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. (प्रत्यक्षात तत्कालीन आघाडी शासनाने संपूर्ण महाराष्ट्रावरच अन्याय केल्यामुळेच ही दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. - संपादक) त्यामुळे जनतेनेच हिसका दाखवल्याविना शासन ठिकाणावर येणार नाही, असे टीकात्मक प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. येथील पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित दुष्काळी परिषदेत ते बोलत होते.

व्हीआयपी कक्षावरून विखे-पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगले मानापमान नाट्य !

     संभाजीनगर - मराठवाड्याच्या दुष्काळी दौर्‍यावर आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात सुभेदारी विश्रामगृहातील व्हीआयपी कक्षावरून येथे १६ मे या दिवशी चांगलेच मानापमान नाट्य रंगले. विभागीय आयुक्तांनी मोठ्या शिताफीने हा मानापमानाचा पेच मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे सोडवला खरा; परंतु दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या या विरोधी पक्षनेत्यांतील हे मानापमान नाट्य चर्चेचा विषय ठरले होते. (स्वत:ला मान मिळावा म्हणून धडपडणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ! - संपादक)

सुदान देशातील आदिवासी करतात गोपूजा !

सुदान देशातील अशिक्षित आदिवासींना गोमातेचे महत्त्व जितके ठाऊक आहे, तितके 
महत्त्व भारतातील सुशिक्षित राजकारणी आणि सत्ताधारी यांना का माहिती नाही ? 
     नवी देहली - आफ्रिका खंडातील सुदान देशाचे मुंदारी जातीचे आदिवासी गाय आणि बैल यांच्यावर अतूट प्रेम करतात आणि त्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजतात. गायीची देवाप्रमाणे पूजा करणे आणि त्यांची देखभाल करणे हेच त्यांचे एकमेव काम असते. 
१. मुंदारी आदिवासी गोमूत्राने अंघोळ करतात. कारण त्यांचा विश्‍वास आहे की, यामुळे शरिराला कोणताही रोग होत नाही. तसेच त्वचा फिकट नारंगी रंगाची होते. 
२. संसर्गापासून बचाव होण्यासाठी ते गायीचे दूध थेट पितात. त्यांची श्रद्धा आहे की, गायच त्यांचे जीवन वाचवू शकते. त्यामुळे ते बंदूक घेऊनच गोरक्षण करत असतात.

पारंपरिक उपचारपद्धतींच्या वैश्‍विक प्रसारासाठी भारताचा जागतिक आरोग्य संघटनेशी करार

      नवी देहली, (पसूका) - केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत शासन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात ऐतिहासिक प्रकल्प सहकार्य करार (पीसीए) करण्यात आला. या करारामुळे पारंपरिक उपचारपद्धती आणि औषधींची सुरक्षितता अन् प्रभावीपणा यांचा वैश्‍विक प्रसार करण्यास साहाय्य होणार आहे. या करारावर १३ मे या दिवशी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत जिनिव्हामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव अजित शरण आणि जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मेरी किनी यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

गोमूत्राचा वापर केलेल्या पतंजलीच्या उत्पादनांच्या विरोधात बरेलीमध्ये फतवा !

गोमूत्र अपवित्र आहे, तर गोहत्या करून तिचे मांस खाणे पवित्र कसे ?
     बरेली (उत्तरप्रदेश) - येथे योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि संस्थेच्या उत्पादनांत गोमूत्र असल्याने त्याच्या विरोधात दरगाह अल्-हजरतने फतवा काढला आहे. मुसलमानांसाठी गोमूत्र अपवित्र असल्याने हा फतवा काढण्यात आला आहे. 
     मरकजी दारुल इफ्ताचे मुफ्ती मुहम्मद हकीम मुजफ्फर हुसैन कादरी आणि मुफ्ती मुहम्मद अली रजवी यांनी म्हटले की, पतंजलि असो कि अन्य कोणतेही आस्थापन, जर उत्पादनांमध्ये गोमूत्राचा वापर केलेला असेल, तर ते उत्पादन मुसलमानांसाठी अपवित्र आहे. अशा उत्पादनांचा वापर करणे अयोग्य आहे. जर गोमूत्राचा वापर औषधांमध्ये केला जात असेल, तर ते औषधही मुसलमानांसाठी अपवित्र आहे. (अशा बुरसटलेल्या मुसलमान संघटनांच्या विरोधात कोणताही निधर्मीवादी आणि ढोंगी पुरोगामी कधी तोंड उघडत नाही ! - संपादक)

वारकर्‍यांनी समाजात संस्कार रुजवण्याचे काम करावे ! - ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज

सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा 
मंडळाचा  ५ वा वर्धापन सोहळा प्रचंड उत्साहात साजरा 
डावीकडून ह.भ.प. आनंदराव पाटील, पुरस्कार स्वीकारतांना ह.भ.प.प्रकाश 
बोधले महाराज,मध्यभागी अण्णासाहेब डांगे, पुरस्कार देतांना  पू. संभाजीराव 
भिडे (गुरुजी), ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज आणि ह.भ.प. भाऊसाहेब नरोटे
     मिरज, १९ मे (वार्ता.) - प्रत्येकाची कार्यक्षेत्र ठरलेली असतात. त्यानुसारच त्या त्या समाजाने काम करावे. काम करतांना वारकर्‍यांनी खुर्चीचा मोह करू नये. वारकर्‍यांनी समाजात संस्कार रुजवण्याचे काम करावे. वारकरी हीच सांगली जिल्ह्याची खरी संपत्ती आहे, असे मनोगत पैठण येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी व्यक्त केले. सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा मंडळाचा पाचवा वर्धापन सोहळा १९ मे या दिवशी नदीवेस विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांना पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या हस्ते वारकरी भूषण पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

फलक प्रसिद्धीकरता

भारत काँग्रेसमुक्त होत असला, तरी अन्य सरकारांचा हिंदूंना काय लाभ ?
     गेल्या २ वर्षांपासून देशात असलेली काँग्रेसविरोधी लाट अद्याप ओसरलेली नाही. देशात झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील ४ राज्यांत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला आहे. ५ राज्यांपैकी आसाममध्ये आणि केरळमध्ये असलेली सत्ताही काँग्रेसला गमवावी लागली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 5 me se 4 rajyoke Vidhansabha chunavome Congresski karari haar; usne Assam aur Keralki satta khoi.
     Congress Mukt Bharatka Hinduon ko kuch laabh hoga?
जागो ! : ५ में से ४ राज्यों के विधानसभा चुनावों में कांग्रेस की करारी हार; उसने असम और केरल की सत्ता खोई.
     कांग्रेस मुक्त भारत का हिन्दुआें को कुछ लाभ होगा ?

राजस्थानमध्ये महिला डॉक्टरकडून रुग्णांना इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला !

  • या घटनेविषयी एकही ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडणार नाही, हे लक्षात घ्या ! 
  • एखाद्या हिंदु डॉक्टरने हिंदु धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला असता, तर याच ढोंगी निधर्मीवाद्यांनी आकाशपाताळ एक केले असते ! 
  • दुसरीकडे इंडोनेशिया, पाक, बांगलादेशसारख्या मुसलमानबहुल राष्ट्रांत असे प्रकरण घडले असते, तर गैरमुसलमान डॉक्टराची एव्हाना हत्या झाली असती !
     बिकानेर - येथील जमीमा हयात ही महिला डॉक्टर आजार बरा होण्यासाठी इस्लामचा स्वीकार करण्याचा सल्ला देत असल्याची घटना समोर आली आहे. जमीमा हयातविरुद्ध अनेक रुग्णांनी तक्रारी केल्यानंतर सीएम्एच्ओ डॉ. देवेंद्र चौधरी यांनी हयात यांना असे न करण्यास बजावले; परंतु जमीमा हयात यांनी त्याकडे दुर्लक्ष करत प्रॅक्टिस चालूच ठेवली. यामुळे त्यांना एक नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयातूनदेखील या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. आरोप सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करण्यासही सांगण्यात आले आहे.काश्मीरमध्ये परतलेली १०० विस्थापित हिंदु कुटुंबे जिहादी आतंकवादी आणि देशद्रोही मुसलमान यांच्या दहशतीखाली जगत आहेत !

हिंदूंनो, तुमची ही स्थिती करणार्‍यांना धडा शिकवण्याचे धाडस कोणत्याही राजकीय 
पक्षांकडे नाही, त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हा !
      हाल पुलवामा (जम्मू-कश्मीर) - वर्ष २००८ मध्ये मनमोहनसिंह पंतप्रधान असतांना केंद्रशासनाने काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी १ सहस्र ६०० कोटी रुपयांची एक योजना कार्यान्वित केली होती. त्यात राज्यशासनाने १ सहस्र ५०० निर्वासितांन शासकीय नोकरी देऊन त्यांच्या निवासासाठी घरे बांधली होती. सध्या तिथे १०० हिंदू त्यांच्या कुटुंबासह आतंकवाद्यांच्या आणि देशद्रोही मुसलमानांच्या दहशतीखाली जीव मुठीत धरून रहात आहेत. 
१. या हिंदूंची स्थिती कारागृहात रहाण्यासारखी झाली आहे. त्यांना आणि त्यांच्या बायका-मुलांना भीतीने घराच्या बाहेर पडता येत नाही. काश्मीरमध्ये एखादा आतंकवादी ठार झाला की या हिंदूंंच्या घरावर दगडफेक होते. या निवासी संकुलाला उंच भिंतीचे कुंपण असले तरी बाहेरून दिल्या जाणार्‍या धमक्या हादरून टाकतात.

ख्रिस्त्यांच्या बैठकीसाठी मध्यप्रदेशातील प्रशासनाने रस्त्यावरील भगवे ध्वज काढून टाकले !

     जोबत (मध्यप्रदेश) - हिंदूंनी रामनवमीनिमित्त रस्त्यांवर लावलेले भगवे ध्वज प्रशासनाने एका रात्रीतून काढून टाकले. येथे आयोजित तीन दिवसीय ख्रिस्ती वार्षिक बैठकीसाठी असे करण्यात आले. त्याआधी चर्चजवळ लावलेल्या भगव्या ध्वजांची ख्रिस्त्यांनी हानी केल्याने हिंदूंनी प्रत्युत्तर म्हणून चर्च जवळील दिवे फोडून टाकले. त्यामुळे आदल्या रात्री दोन्ही समुदायात दगडफेक झाली. त्यानंतर जोबतचे भाजप आमदार माधोसिंह डाबर आणि अलीराजपूर येथील भाजप आमदार नगरसिंह चौहान यांनी भगवे ध्वज काढण्याच्या घटनेच्या विरोधात जोबत येथील मुख्य रस्त्यावर धरणे आंदोलन केले. आमदार म्हणाले की, हे भगवे ध्वज पुन्हा लावण्यात यावेत. ते आम्ही २१ मे या दिवशी सिंहस्थ संपल्यावरच काढू. (मध्यप्रदेशातील भाजप सरकारच्या प्रशासनाचे असे धाडस होतेच कसे ? प्रशासनावर सरकारचा वचक नाही का ? - संपादक)
     जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वरील भगवे ध्वज नगर परिषदेच्या विनंतीवरून काढण्यात आले, अशी मखलाशी केली. या प्रकरणी दोन्ही समुदायाच्या काही लोकांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.


भारताने काश्मीरच्या नकाशासंदर्भात पाकिस्तानला खडसावले !

     इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी केंद्रशासन लवकरच एक विधेयक संसदेत मांडणार आहे. पाकव्याप्त काश्मीर पाकच्या नकाशात दाखवण्याच्या विरोधात हे विधेयक असणार आहे. या कायद्यानंतर भारताचा चुकीचा नकाशा छापणार्‍यास कमाल ७ वर्षे कारावास किंवा १० लाख ते १०० कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. (चुकीच्या नकाशाच्या संदर्भात कायदे करण्यासह भारताने पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याचेही धाडस करावे ! - संपादक) याचा पाकने विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करण्यापासून भारताला रोखावे, अशी विनंती पाकने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. त्यावर भारताने पाकला खडसवतांना म्हटले की, हे प्रस्तावित विधेयक म्हणजे पूर्णपणे भारताचे अंतर्गत वैधानिक सूत्र आहे. त्याच्याशी पाकिस्तानचा किंवा अन्य कोणाचाही काहीही संबंध नाही.

माझा हिंदूंना विरोध नाही, तर हिंदुत्वाला विरोध आहे, या ओवैसी यांच्या वक्तव्याविषयी मनात आलेले विचार !

श्री. संजय जोशी
       काही दिवसांपूर्वी ओवैसी यांनी माझा हिंदूंना विरोध नाही, तर हिंदुत्वाला विरोध आहे, असे म्हटल्याचे वाचनात आले. या वक्तव्यातून त्यांचा हिंदुत्वाला विरोध का ? याचा विचार करत असतांना मनात आलेले विचार येथे देत आहे.
१. बहुतेक हिंदू निद्रिस्त असून शहामृगी वृत्तीने 
जीवन जगत असल्याचा परिणाम 
१ अ. निद्रिस्त हिंदूंवर अत्याचार करून परकीय साम्राज्याचा विस्तार होणे ! : आतापर्यंतचा अनुभव असे सांगतो की, हिंदूंमध्ये हिंदुत्व जागृत झालेले नसते, तेव्हा अनेक परकीय आक्रमकांनी हिंदूंना संपवून, त्यांचे धर्मपरिवर्तन करून, हिंदु माता-भगिनींवर अत्याचार करून स्वत:चा पंथ वाढवला. स्वत:च्या साम्राज्याचा विस्तार केला.

करसंकलन वाढण्यासाठी इच्छाशक्ती हवी !

     केंद्रसरकारने नुकतीच २०१२-१३ या आर्थिक वर्षापर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १२० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात करदात्यांची संख्या केवळ २ ते ३ प्रतिशत इतकी अत्यल्प आहे. त्या आकडेवारीमध्ये मार्च २०१२ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये एकूण १ कोटी २५ लक्ष लोकांनीच प्रत्यक्ष कर भरला, म्हणजेच ही संख्या एकूण लोकसंख्येच्या १ प्रतिशतच आहे. याचाच दुसरा अर्थ घ्यायचा झाल्यास कोट्यवधी नागरिक हे आयकर भरत नाहीत अथवा करचुकवेगिरी करतात, असाच घ्यावा लागेल. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळाचा विचार केल्यास आताच्या नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावला आहे, असे दिसेल. देशातील श्रीमंतांची संख्याही वाढते असून करदात्यांची संख्या वाढतांना दिसत नाही, ही गोष्ट चिंताजनक आहे; कारण यामुळेच देशामध्ये काळा पैसा वाढतो आहे.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
अहंकार नसावा !
ज्ञानाचा अहंभाव आणि संतांची परीक्षा नको !
१. समर्थ रामदासस्वामींच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकाराची परीक्षा घेणारा जगद्गुरु 
शंकराचार्यांचा एक शिष्य आणि आध्यात्मिक अधिकाराची चुणूक दाखवणारे समर्थ ! 
      चाफळपासून काही अंतरावरच्या गावी आलेल्या जगद्गुरु शंकराचार्यांच्या एका शिष्याच्या कानी समर्थ रामदासस्वामींची कीर्ती गेली. आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या अधिकाराची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्या शिष्याने एका ब्राह्मणाला रिकामी वाटी घेऊन समर्थांकडे पाठवले अन् त्याला समर्थांकडून वाटी भरून ब्रह्म आणायला सांगितले. त्यानुसार तो ब्राह्मण रिकामी वाटी घेऊन समर्थांकडे गेला आणि त्याने शंकराचार्यांच्या शिष्याचा निरोप सांगितला. समर्थांनी शंकराचार्यांच्या शिष्याला उलट निरोप पाठवला, त्या वाटीत अगोदरच असलेले ब्रह्म काढून टाकून ती रिकामी करून माझ्याकडे पाठवा, म्हणजे मी त्या वाटीत ब्रह्म भरून पाठवीन !

कन्हैया नावाचे साम्यवादी खेळणे !

      कन्हैयाकुमारच्या उदयाने देशातील गलितगात्र झालेली अनेक धेंडे हुरळून गेली आहेत. कित्येक वर्षांत ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाने काही करता आले नाही किंवा जनतेच्या मनात स्थान मिळवता आले नाही त्यांना आता कन्हैया आपला मसीहा वाटत आहे. कन्हैया जे बोलतो त्याला तरुणाईचा वाढता प्रतिसाद मिळता असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत कन्हैया कुमारमुळे आपल्या पक्षाचे सरकार यावे, यासाठी त्याला पाठींबा देण्याचीही सध्या अहमहमिका सर्व पक्षांत लागली आहे; परंतु कन्हैया काय बोलतो, त्याची घडण कोणत्या वैचारिक धारेत झाली आहे, याचे कुणालाही कसलेही देणेघेणे नाही. केवळ त्याच्यामुळे आपल्याला सत्तेचा मलिदा खायला मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा झाली आहे. याआधी ज्यांनी साम्यवादाला विरोध केला तेही कन्हैयाच्या मुखी असलेले साम्यवादाचे नाव ऐकून आनंदाने डोलत आहेत.
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
गोरक्षण विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)     शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान
     निधर्मी संकल्पनेचे अधिष्ठानच मूळ सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे उद्ध्वस्तीकरण हे आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ८.७.२०१०)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

साधकांना सूचना

'गुरुकृपायोग' हा गुजराती
 ग्रंथ आता वितरणासाठी उपलब्ध ! 
गुजराती 'गुरुकृपायोग' - आवृत्ती पहिली, १ ऑक्टोबर १९९८ 
सूचना : या ग्रंथात कोणतेही पालट नाहीत, तसेच या ग्रंथाला ४ सामाईक पानेही जोडू नयेत.

पनवेल (जिल्हा रायगड) येथील श्री. दत्तात्रेय आगवेकर आणि सौ. प्रेमलता आगवेकर यांनी गाठली ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी !

 
१. श्री. दत्तात्रेय आगवेकर यांचा सत्कार करतांना श्री. विनायक आगवेकर (उजवीकडे)

२. सौ. प्रेमलता आगवेकर यांचा सत्कार करतांना श्री. विनायक आगवेकर (उजवीकडे)
      पनवेल - येथील एका कौटुंबिक कार्यक्रमात सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात सेवा करणारे ६३ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक श्री. विनायक आगवेकर यांचे काका श्री. दत्तात्रय गजानन आगवेकर (वय ८४ वर्षे) आणि काकू सौ. प्रेमलता दत्तात्रेय आगवेकर (वय ७३ वर्षे) यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. १७ मे या दिवशी सनातनच्या ६८ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठलेल्या साधिका सौ. अश्‍विनी पवार यांनी ही आनंदवार्ता दिली. श्री. दत्तात्रेय आगवेकर यांच्या धाकट्या कन्येच्या घरी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी श्री. विनायक आगवेकर यांच्या हस्ते श्री. दत्तात्रय आगवेकर यांचा श्री गणेशाचे चित्र देऊन, तर सौ. आगवेकर यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार करण्यात आला.

नृसिंह जयंतीचे अध्यात्म !

आज असलेल्या नृसिंह जयंतीच्या निमित्ताने...
     ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो आणि साधू-सज्जनांचा त्रास पराकोटीला जातो, त्या वेळी ईश्‍वरी तत्त्व मानवी अवतार धारण करून पुन्हा धर्माची स्थापना करत असते. उन्मत्त वरदानाने माजलेल्या हिरण्यकश्यपूला त्याच्याच वरदानाचे तंत्र वापरून धड मानव नाही आणि धड पशूही नाही, अशा चमत्कारिक आवेशातून प्रकट होऊन दानवांच्या शक्तीपेक्षा ईश्‍वरीतत्त्वाची शक्ती प्रचंड असते. याची ओळखही नृसिंह अवताराने जगाला करून दिलेली आहे. नृसिंह अवतार भगवान विष्णूंचा चौथा अवतार असून तो सत्ययुगातील आहे.
     नृसिंह हे अत्यंत शक्तीशाली आणि उग्र दैवत आहे. त्या अवताराची प्रकटशक्ती ४५ टक्के, तर त्यातील विष्णूतत्त्वाचा अंश ४५ टक्के आहे. उर्वरित शक्ती देवीतत्त्वाची असते. नृसिंह मूर्तीमधील शक्ती सामान्यांना पेलवत नसल्याचे नृसिंहाच्या देवळातून मूर्तीच्या डोळ्यांवर कापड बांधून ठेवलेले असते.

कुडाळ सेवाकेंद्रात आलेल्या अनुभूती

सौ. शोभा कौलकर
१. कुडाळ सेवाकेंद्र पाहून आनंद मिळणे
     कुडाळ सेवाकेंद्र पुष्कळ छान आहे. तेथील परिसर, निसर्ग, मोठे अंगण, फुले, फळझाडे पाहून आनंद वाटला. तेथील सर्व साधकांत प्रेमभाव आहे. कु. वनिता शिरगावकर वयाने लहान असूनही व्यवस्थापन चांगले बघते. तिच्यात प्रेमभाव असल्यामुळे कोणाला काय हवे, काय नको, याकडे तिचे पूर्ण लक्ष असते. कु. वनिता दमली किंवा थकली आहे, असे तिच्या तोंडवळ्याकडे पाहून वाटत नव्हते.
२. पू. रेडकरआजींकडून सहज वावरतांना अचूक मार्गदर्शन मिळणे
     पू. रेडकरआजी सहज जरी स्वयंपाकघरात येऊन गेल्या, तरी अचूक मार्गदर्शन करून जातात, उदा. फणस खराब व्हायला नको, भाजी व्यवस्थित ठेवायला हवी, भांडी घासतांना ती कशी आणि कोणत्या ठिकाणी घासायची आणि कशी ठेवायची इत्यादी. नेमके मी भांडी घासतांनाच हा प्रसंग घडल्यामुळे मला माझी चूक लक्षात आली. आपण मनाने करतो, ऐकण्याची वृत्ती अल्प असते, तसेच मी चांगले करते, हा अहं होता ना ! त्यामुळे देवाला प्रसंग घडवून आणून सांगावे लागले.
     समाजात वैचारिक गोंधळ निर्माण करून समाजात फूट पाडण्याचे कारस्थान करणार्‍यांना पुरोगामी म्हणतात !
- (पू.) श्री. राजेंद्र शिंदे (८.२.२०१६)

डॉ. संजय सामंत यांच्या रुग्णालयात गेल्यावर आलेल्या अनुभूती

डॉ. संजय सामंत
१. रुग्णालयात जाण्यापूर्वी प्रथम नकारात्मक
 आणि नंतर सकारात्मक विचार येणे
     ३.८.२०१५ या दिवशी माझे यजमान श्री. पांडुरंग कौलकर यांच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म डॉॅ. संजय सामंत (कुडाळ) यांच्या रुग्णालयात करण्याच्या निमित्ताने आम्ही कुडाळ सेवाकेंद्रात गेलो. जाण्यापूर्वी मनात थोडा विचार होता, डॉक्टर नवीन, गाव नवीन, साधक नवीन, तर तिथे आपल्याला जमेल का ? नंतर ते आपलेच साधक आहेत, तर व्यवस्थितच होणार, असा सकारात्मक विचार झाला.
२. रुग्णालयातील वातावरण एकदम शांत आणि सात्त्विक असणे
     शस्त्रकर्म ८ ऑगस्टला करायचे ठरले होते; म्हणून आम्ही दवाखान्यात गेलो, तर तिथे पुष्कळ गर्दी होती. तेथील एका फलकावर दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण लिहिले होते. तसेच तिथे मोठे श्रीकृष्णाचे चित्र आणि उद्बत्ती लावली होती. वातावरण एकदम शांत आणि सात्त्विक वाटत होते. त्यामुळे नामजप आणि प्रार्थना होत होत्या. आम्ही रुग्णालयात आलो आहोत, असे वाटत नव्हते आणि तेथे किती वेळ गेला, हेही कळले नाही.

सात्त्विकतेची आवड असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बीड येथील चि. वेदश्री भुकण (वय २ वर्षे) !

चि. वेदश्री भुकण
१. गर्भधारणा होण्यापूर्वी
१ अ. बर्‍याच वेळा गर्भपात होणे आणि मूल 
होणार नाही, असे वाटून मन नकारात्मक बनणे
     आमच्या विवाहानंतर ५ वर्षे आम्हाला मूल नव्हते. बर्‍याच वेळा मला गर्भ राहिला; पण २ - ३ मास झाले की, गर्भ मृत होत असे. वैद्यकीय उपचार केल्यानंतर गर्भपात करावा लागत असे. एकदा असा प्रसंग घडला की, गर्भ राहिल्यानंतर तो गर्भाशयात न रहाता तो गर्भबिजवाहक नलिकेमध्ये राहिला आणि दोन मास तिथेच वाढला. गर्भ राहिला; म्हणून वैद्यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला संगितले. त्यानुसार आम्ही तज्ञांकडून सोनोग्राफी करण्यास ऐन दिवाळीच्या दिवशी गेलो. तज्ञाला सोनोग्राफीमध्ये गर्भाशय रिक्त दिसले. त्यांनी आम्हाला सांगितले गर्भ नाही; पण पूर्वीच्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल पाहून परत त्या तज्ञांनी माझी वेगळ्या प्रकारे सोनोग्राफी केली. त्यानंतर त्यांना गर्भ अतिशय लहान अशा बिजवाहक नलिकेत रुजल्याचा दिसून आला. त्या तज्ञांनी संगितले, त्या गर्भामुळे नलिका केव्हाही फुटू शकते आणि त्यामुळे पोटामध्ये अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. तुम्हाला लगेचच शस्त्रकर्म करून हा गर्भ काढावा लागेल; कारण तुमच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्या वेळी देवानेच आम्हाला येणार्‍या मोठ्या संकटातून वाचवले, याची तीव्रतेने जाणीव होऊन देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. दिवाळीच्या दिवशीच आम्ही रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रकर्म करून घेतले. या सर्व घटनेनंतर मन एकदम नकारात्मक झाले आणि मला मूल होऊच शकत नाही, असे वाटू लागले.

साधना सांगितल्यावर सनातनविषयी अपसमज असलेल्या व्यक्तीने दिलेला सकारात्मक प्रतिसाद

१. सनातन संस्थेविषयी अपसमज असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीला 
संपर्क करून संस्था आणि संस्थेचे कार्य यांविषयी सांगितल्यावर
 त्यांचे अपसमज दूर होऊन ते साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होणे
     महाकुंगे-डोंगर येथील श्री. शिवराम भांबले ही गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असून ते ग्रामदेवतेचे गावकार आहेत. सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांच्याविषयी त्यांची नकारात्मक भूमिका होती. त्यांच्या मनात संस्थेविषयी अपसमज असल्याने ते स्वतः किंवा त्यांचा गटही साधकांजवळ फिरकत नसे. मी आणि श्री. विनोद गादीकर हे साधक एकदा सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीसंदर्भात रत्नागिरीला होणार्‍या आंदोलनाच्या संपर्कासाठी गेलो होतो. त्या वेळी श्री. शिवराम भांबले यांच्या गटाशी संपर्क झाला. त्या वेळी श्री. विनोददादा यांनी संस्था आणि संस्थेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री. भांबले यांचा संस्थेविषयीचा अपसमज दूर झाला आणि ते साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले.
२. ग्रंथांविषयी माहिती दिल्यावर ग्रंथांविषयी उत्सुकता 
दाखवून पुढच्या संपर्काच्या वेळी ग्रंथ घेऊन येण्यास सांगणे
     त्यांची बेताची आर्थिक परिस्थिती आणि वरीलप्रमाणे मानसिकता मला ठाऊक होती. एकदा मी त्यांना संपर्क केला. त्या वेळी मी त्यांना सनातनच्या ग्रंथाची माहिती दिली आणि सांगितले, आपण आणि आपल्या मुलांनी ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मनाच्या आणि कृतीच्या स्तरांवर प्रयत्न केले, तर नक्कीच मुलांच्यातही पालट होऊन ते देशाचे सुजाण नागरिक बनतील. सुसंस्कारित होतील आणि त्यांना चांगल्या सवयी जडतील. तेव्हा त्यांनी मला पुढच्या वेळी ग्रंथ घेऊन या, असे सांगितले.

वैयक्तिक कामांपेक्षा सेवेला प्राधान्य देऊन भावपूर्ण सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. संजीव नाईक !

श्री. संजीव नाईक
१. अल्पाहार वा जेवण यांपेक्षा साधकांचे
 क्षौरकर्म करण्यास प्राधान्य देणे
     श्री. संजीव नाईक यांना मी मागील एक वर्षापासून ओळखतो. ते आठवड्यातून दोन वेळा रामनाथी आश्रमात साधक आणि संत यांचे केस कर्तनाची (दाढी आणि केस कापण्यास) करण्यासाठी येतात. ते प्रत्येक वेळी प्रार्थना करूनच साधकांचे केस कापणे चालू करतात. ते साधकांचे केस कापत असतांना स्वतःहून बोलत नाहीत, तर शांतपणे साधकांना कसे अपेक्षित आहे, हे विचारून त्याप्रमाणे सेवा करतात. कधी कशा प्रकारे केस ठेवल्यास चांगले दिसेल, हेही सांगतात. त्यांना अल्पाहाराला वा जेवायला बोलावल्यानंतर कधीही मला इथे आणून द्या, असे म्हणत नाहीत, तर सर्वांचे केस कर्तन झाल्यानंतरच प्रसाद किंवा महाप्रसाद घ्यायला जातात. कधी ते घरून आश्रमात येऊन साधकांचे केस कर्तन करतात आणि इथूनच कामावर जातात. काही वेळा कामावर जायला विलंब होत असल्यास महाप्रसाद घ्यायच्या वेळेत येऊन साधकांचे केस कर्तन करून काहीही न खाता तसेच कामावर जातात.

महर्षींनी सांगितलेला दैवी प्रवासामागील कार्यकारणभाव,म्हणजेच महर्षींनी वेळोवेळी झालेल्या नाडीवाचनातून सांगितलेली पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दैवी प्रवासामागील कारणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी वेळोवेळी झालेल्या नाडीवाचनातून सांगितलेली माहिती
१ अ. प.पू. डॉक्टरांच्या आज्ञेनेच दैवी प्रवास चालू असणे : प.पू. डॉक्टरांच्या आज्ञेनेच हा प्रवास होत आहे.
१ आ. प.पू. डॉक्टरांचे कार्य केवळ अस्तित्वाने चालू असल्याचा महर्षींनी दिलेला दाखला : प.पू. डॉक्टरांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. (या वाक्यावरून कळते की प.पू. डॉक्टरांचे कार्य केवळ अस्तित्वानेच चालू आहे. - संकलक) त्यांच्याऐवजी कार्तिकपुत्रीच (पू. (सौ.) अंजली गाडगीळ) सर्वत्र जात आहे; कारण आम्ही या कार्यासाठीच तिची निवड केली आहे.
१ इ. प.पू. डॉक्टरांच्या आज्ञेनेच राष्ट्रकल्याणासाठी कार्तिकपुत्रीचा (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा) प्रवास चालू असणे : कार्तिकपुत्रीचा हा प्रवास तिच्यासाठी नाही, तर राष्ट्राच्या कल्याणासाठीच आहे आणि तसे परम गुरुजींचेच (प.पू. डॉक्टरांचेच) नियोजन आहे; कारण त्यांनाच वाटते की, पृथ्वीवर सर्वत्र हिंदु राष्ट्र यायला हवे आणि तशी श्रीमत्नारायणाचीही इच्छा असल्याने हे कार्य आता सर्वस्वी आम्हीच हाती घेतले आहे.

निनावी दूरभाष करणार्‍यांपासून सतर्क रहा !

साधकांना सूचना
     १८.५.२०१६ या दिवशी दुपारी ४.२० वाजता सनातनच्या एका आश्रमाच्या स्वागतकक्षावर एक निनावी दूरभाष आला. त्या वेळी त्या व्यक्तीचे आणि स्वागतकक्षातील साधिकेचे पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
व्यक्ती : अहमदनगर येथे अधिवेशन आहे. त्यासाठी पानसरे यांचा क्रमांक मिळेल का ?
साधिका : पानसरे कोण ?
व्यक्ती : गोविंद पानसरे यांचे नातेवाईक.
साधिका : आमच्याकडे त्यांचा क्रमांक नाही.
व्यक्ती : सनातन आणि पानसरे यांचा दाट संबंध आहे.
साधिका : आमचा आणि पानसरे यांचा काहीही संबंध नाही. आमच्याकडे त्यांचा क्रमांकही नाही.
     स्वागतकक्षातील साधिकेने संबंधित व्यक्तीला तिचे नाव विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या व्यक्तीने काहीही माहिती न देता दूरभाष बंद केला.
साधकांनो, अशा प्रकारे निनावी दूरभाष आल्यास साधकांनी त्वरित याविषयी उत्तरदायी साधकांना त्याची कल्पना द्यावी !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशी (२०.५.२०१६) उ.रा. १२.४२ वाजता
 समाप्ती - वैशाख पौर्णिमा (२१.५.२०१६) उ.रा. २.४४ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

अपघाताचा दिवसेंदिवस उंचावणारा आलेख लक्षात घेऊन वाहनांच्या संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा !

सर्वत्रच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना
१. अनेकदा जाणीव करून देऊनही वाहनांच्या 
संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणारे दायित्वशून्य कार्यकर्ते !
     आतापर्यंत अनेकदा हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय सत्संगात वाहनांच्या संदर्भातील नियम पाळण्याविषयी चुका घेण्यात आल्या आहेत. आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत असल्याने वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असतांनाही काही कार्यकर्त्यांकडून वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अन्य कागदपत्रे समवेत न बाळगणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणे, तर चारचाकी चालवतांना सीटबेल्ट न वापरणे, भ्रमणभाषवर बोलत, तसेच अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी गंभीर चुका वारंवार होत आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत काही जणांना दंडही भरावा लागला आहे.

सनातन पंचांगाची अभ्यासपूर्वक मागणी नोंदवून परिपूर्ण सेवा करा !

जिल्हासेवक, वितरक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाची मागणी सर्व जिल्ह्यांनी २०.५.२०१६ या दिवसापर्यंत कळवणे अपेक्षित आहे. मागणी नोंदवतांना लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे देत आहे.
१. मागील वर्षीची मागणी आणि वितरण अन् जिल्ह्याची सद्य:स्थिती यांचा अभ्यास करून, तसेच समाजापर्यंत अधिकाधिक पंचांग पोचावेत, यासाठी साधकांना उद्युक्त करून जिल्हासेवकांनी अंतिम मागणी देणे आवश्यक आहे.
२. सर्वच पंचांगाचे वितरण १५.११.२०१६ या दिवसापर्यंत, तर त्याची येणे बाकी ३०.११.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करावी. प्रायोजित केलेल्या पंचांगांची येणे बाकी पूर्ण झाली, तरी त्या पंचांगांचे वितरण ३०.११.२०१६ या दिवसापर्यंतच पूर्ण करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्वच पंचांगांचे वितरण आणि येणे बाकी दिलेल्या समयमर्यादेत पूर्ण होईल, अशा दृष्टीने अभ्यास करून जिल्हासेवकांनी मागणी नोंदवावी.
३. काही साधक आम्ही पंचांग वैयक्तिक स्तरावर विकत घेऊन नंतर सवडीने त्याची विक्री करू शकतो का ? असे विचारतात. नोव्हेंबर २०१६ पासून हिंदु धर्मजागृती सभांना आरंभ होणार आहे, तसेच साधकांना त्या कालावधीत अन्य उपक्रम राबवून धर्मप्रसार करण्याच्या अमूल्य संधीचाही लाभ करून घ्यायचा आहे. त्यामुळे साधकांनी नोव्हेंबर २०१६ नंतर केवळ पंचांग वितरणाची सेवा न करता अन्य सेवांमध्येही सहभागी व्हावे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
     संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

  धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरण आणि धार्मिकता म्हणजे काय, हेही हिंदू विसरले. त्यामुळे बहुतेक सर्व केवळ जन्महिंदू झाले. कर्महिंदू फारच थोडे उरले. परिणामी हिंदु धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. - प.पू. डॉ. आठवले (१६.५.२०१०)


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रद्धेचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. 
त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी, तर कुठे हे विश्‍वची माझे घर, असे म्हणणारे व्यापक दृष्टीचे संत ज्ञानेश्‍वर ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंतर्मुखता वाढवणारे म्हातारपण म्हणजे भगवंताचे वरदान !

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
     म्हातारपण म्हणजे भगवंताची कृपा ! म्हातारपणात टप्प्याटप्प्याने ऐकू अल्प येणे, अल्प दिसणे, बोलता न येणे, असे होते. त्यामुळे भगवंत म्हणतो, आतातरी अंतर्मुख हो आणि आतमध्ये लक्ष दे. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१.२०१५)

सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगात गुरुमंत्र देण्यात येत नसूनही सहस्रो साधक प्रगतीपथावर असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
     सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगाच्या शिकवणीत संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत कधीही कोणालाही गुरुमंत्र देण्यात आलेला नाही. त्याऐवजी संस्थेत तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास शिकवण्यात येते. तसे टप्प्याटप्प्याने केल्याने साधकांची प्रगती जलद गतीने होत आहे. याउलट गुरुमंत्र घेणार्‍या लाखो भक्तांची प्रगती होतांना दिसत नाही; कारण ते कोणताच त्याग करत नाहीत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ड्रॅगनचे डंख थांबवा !

संपादकीय
     भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २४ ते २७ मे या कालावधीत चीनला भेट द्यायला जात आहेत. भारत आणि चीन यांचे संबंध सुधारण्यासाठी त्यांचा हा चीन दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. विस्तारवादी चिनी ड्रॅगन स्वातंत्र्यकाळापासून भारताला सातत्याने डंख मारून घायाळ करत असतांना त्याला बाबापुता करून दूध पाजण्याचे भारताचे काँग्रेसी धोरण अद्यापही चालूच आहे कि काय, अशी शंका आल्यावाचून रहात नाही. निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्याप्रमाणेच अन्य केंद्रीयमंत्र्यांनी चीनचे दौरे केले. चीनला भेट देऊन पंतप्रधानांनी नवा पायंडा पाडला, असे म्हटले जाते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn