Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

महर्षि व्यास यांची आज जयंतीविनम्र अभिवादन !

थोरले बाजीराव पेशवे स्मृतिदिन

भाजप असो कि काँग्रेस, दोघांच्या राज्यात हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही ! - द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी
श्रीराम मंदिराची उभारणी, तसेच गोहत्या आणि 
धर्मांतर बंदी करण्याची शंकराचार्य यांच्या उपस्थितीत
 भारत साधू समाजाच्या अधिवेशनात संतांची मागणी !
      उज्जैन - देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याला धर्मनिरपेक्ष करण्यात आले, ज्याचा अर्थ होतो की, कोणाताही भेदभाव केला जाणार नाही; पण हिंदूच याचे बळी पडले आहेत. सनातन धर्मावरच आघात होऊ लागले आहेत. चोहोबाजूने धर्माला तोडण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. लोकशाहीला पैशाद्वारे विकत घेतले जात आहे. या देशावर भाजप, काँग्रेस किंवा कोणाचेही राज्य असो, हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही, अशी कडक चेतावणी द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी भारत साधू समाजाच्या अधिवेशनात वार्ताहारांशी बोलतांना दिली. या अधिवेशनात १४ ठराव संमत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने अयोध्येेत श्रीराममंदिराची उभारणी, देशभरात गोहत्या बंदी अन् धर्मांतर बंदी अधिनियम करण्याची मागणी करण्यात आली.

केवळ २ मुले जन्माला घालणारा हिंदु नागरिक हिंदु धर्माचा शत्रू ! - चतुर्थ हिंदु संसदेतील घोषणा

हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर त्यांनी अनेक अपत्ये जन्माला घालणे हे उत्तर नाही, तर 
त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे महत्त्वाचे आहे ! तसे झाल्यास प्रत्येक हिंदू ५ जणांना 
भारी पडेल, हे राणाप्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उदाहरणांवरून लक्षात येते ! 
त्यांनी अल्प मनुष्यबळाद्वारे मोगल आणि पाच पातशाह्या यांना पाणी पाजले !
              अहिंदूंच्या वाढत्या लोकसंख्येवर हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याची एकमुखी मागणी !
हिंदु संसदेत उपस्थित साधू-संत आणि अन्य मान्यवर
     उज्जैन - देशात अहिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे देशात तातडीने कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्यात यावा. हा कायदा लागू होण्यापूर्वी ५ पेक्षा अल्प मुले जन्माला घालणारा हिंदु नागरिक हा धर्मद्रोही, तर केवळ २ मुले जन्माला घालणारा हिंदु नागरिक हा हिंदु धर्माचा शत्रू असेल, अशी घोषणा उज्जैन सिंहस्थपर्वातील भूखीमाता क्षेत्रातील दूधेश्‍वर अन्नपूर्णा मांडवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चतुर्थ हिंदु संसदेत उपस्थित संतांद्वारे करण्यात आली.

योग दिनाच्या दिवशी ॐ म्हणणे बंधनकारक नाही !

केंद्र सरकारची या वर्षीही कोलांटउडी !
     ॐ ला योगासनांतून वगळणे हे माणसाच्या देहातून चेतना काढून घेण्यासारखे आहे. ॐ विरहित योगासने म्हणजे योगासने केल्याचा केवळ देखावा, त्यापासून व्यक्तीला काहीच लाभ नाही ! अशी योगासने आंतरराष्ट्रीय योग दिनाला करून केंद्र सरकार लोकांना काय लाभ देणार ?      नवी देहली - २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला ॐ म्हणणे किंवा वेदातील इतर मंत्र म्हणणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तसे म्हणण्याचे कोणतेही बंधन नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सहआयुक्त अनिल कुमार गनेरीवाला यांनी केले आहे.
     योग दिनादिवशी योगसत्र आरंभ होण्यापूर्वी ४५ मिनिटे अगोदर ॐ आणि वेदातील इतर मंत्र म्हणण्याचा उल्लेख असलेले परिपत्रक केंद्राने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर गनेरीवाला यांनी याविषयीचे स्पष्टीकरण केले. ते म्हणाले की, ॐ चा उच्चार करणे हा योगाचा अविभाज्य भाग आहे; मात्र ते अनिवार्य करण्यासाठी कोणताही नियम नाही. आयुष मंत्रालयाने योग सत्रामध्ये १० मिनिटांची वाढ केली असून त्यामध्ये नव्या आसनांचा समावेश केला आहे.

नवीन पिढीला विज्ञानाच्या भाषेत अध्यात्म समजावण्याची सनातनची पद्धत चांगली ! - श्री १००८ महामंडलेश्‍वर, श्री विश्‍वगायत्री मिशन, गुजरात

प्रदर्शन पहातांना (वर्तुळात) श्री १००८ महामंडलेश्‍वर
अलखगिरीजी महाराज
    उज्जैन - आपण धर्म मानणारे आहोत, तर नवीन पिढी विज्ञानाच्या आधारे चालणारी आहे. अशा वेळी तिला विज्ञानाच्या भाषेत धर्म समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. सनातन या पद्धतीचा चांगला वापर करत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा गुजरात राज्यातील श्री विश्‍वगायत्री मिशनचे ब्रह्मपीठाधीश्‍वर श्री १००८ महामंडलेश्‍वर अलखगिरीजी महाराज यांनी केले. 
    सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित धर्मशिक्षण विषयीच्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. विनय पानवळकर यांनी त्यांचा पुष्पहार, श्रीफळ आणि कुंभमेले का महिमा हा सनातनचा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी ओडिशा येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे आणि समितीचे बंगाल येथील श्री. चित्तरंजन सुराल उपस्थित होते. या वेळी सनातनच्या गोवा येथील मुख्य आश्रमात येणार असल्याचे आश्‍वासन महाराजांनी दिले.

देहलीतील अकबर रोडला महाराणा प्रताप मार्ग असे नाव द्या ! - केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह

देहलीत ३३ मार्गांना मोगल आक्रमकांची नावे !
केंद्र सरकारमधील मंत्र्यांना अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून का प्रयत्न करत नाही ?
 ३३ मार्गांची नावे एकेक करून पालटण्यास कितीतरी वर्षे लागतील, ती एकदम का पालटली जात नाहीत ?
     नवी देहली - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्यानंतर आता केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि निवृत्त जनरल व्ही.के. सिंह यांनी देहलीतील अकबर रोड या मार्गाला महाराणा प्रताप यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांनी नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. ९ महिन्यांपूर्वीच देहलीतील औरंगजेब रोडला दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले होते. देहलीत सुमारे ३३ रस्त्यांना मोगल शासनकर्त्यांची नावे असल्याचे डॉ. स्वामी यांनी म्हटले होते.

उज्जैन सिंहस्थपर्वात आलेले ९० टक्के संत गैरसोयींमुळे त्रस्त ! - जगद्गुरु महेशाश्रम

     उज्जैन - सिंहस्थपर्वात आलेले ९० टक्के संत येथील गैरसोयींमुळे त्रस्त झाले आहेत. अर्धेअधिक संत सिंहस्थ सोडून गेले आहेत. साधे शौचालय आणि पाणी यांसाठीही संतांना देहलीला दूरभाष करावा लागत आहे. त्यानंतर व्यवस्था केली जात आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने सिंहस्थ क्षेत्रात दुरवस्था झाली आहे. अन्य संतांना पैसे देण्यात आल्याने ते सिंहस्थाचे कौतुक करत आहेत, असे आरोप बगलामुखीदेवीचे दर्शन घेण्यास नलखेडा, उज्जैन येथे आलेले जगद्गुरु महेशाश्रम यांनी केले.

सिंहस्थपर्वाला आतापर्यंत ५ कोटी भाविकांची उपस्थिती ! - भूपेन्द्र सिंह, प्रभारी मंत्री, मध्यप्रदेश

    सिंहस्थपर्वात आतापर्यंत ५ कोटी भाविक येऊन गेले सिंहस्थ संपेपर्यंत हा आकडा ७ कोटीपर्यंत जाईल, असा दावा मध्यप्रदेश राज्याचे प्रभारी मंत्री भूपेन्द्र सिंह यांनी येथे केला. पोलिसांनी केलेली मोजणी आणि वाहनांची संख्या यांद्वारे सदर आकडा काढल्याचे त्यांनी सांगितले. 
   ते पुढे म्हणाले की, सिंहस्थपर्वात वादळ आणि पाऊस यांमुळे व्यवस्था कोलमडली होती; पण २ दिवसांत शासनाने सर्व व्यवस्था सुस्थितीत केल्या. सिंहस्थपर्वामध्ये असलेल्या स्वच्छतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, तसेच अनेक दक्षिण आशियाई देशातील नागरिकही स्वच्छता अभियानमध्ये सहभागी होत आहेत.


सिंहस्थपर्वात साधूंच्या वेशातील १३४ भोंदूंना अटक

   उज्जैन - सिंहस्थपर्व क्षेत्री साधूंच्या वेशात आलेल्या १३४ भोंदू साधूंना आतापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. साधूच्या वेशात गुन्हेगार येऊ शकतात, अशी गोपनीय माहिती पोलिसांकडे होती. त्यानुसार येथे लक्ष ठेवून या भोंदूंवर कारवाई करण्यात आली.

इंदूर (तेलंगण) येथील शिवजयंती उत्सवात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलतांना
श्री. चेतन जर्नादन (उभे असलेले)
     इंदूर (तेलंगण) - येथील हनुमान मंदिर परिसरात मराठा समाजाच्या वतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त एका उत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात शिवसेनेचे शहर प्रमुख श्री. श्रीहरि गौड, श्रीराम युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संजीव पुरोहित, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि शिक्षक श्री. घनश्याम व्यास, नगरसेवक श्रीराम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन उपस्थित होते. या वेळी श्री. जनार्दन म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दाखवली. आमची संघटना लहान आहे; मात्र सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या, तर हिंदु राष्ट्र स्थापन करणे अशक्य नाही. आज आपल्याला श्री भवानीमातेचा आशीर्वाद आणि युद्ध करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची, तसेच श्रीकृष्णाचा आशीर्वाद अन् लढणारा अर्जुन यांची आवश्यकता आहे. ते आपल्यातूनच निर्माण होऊ शकतात. त्यासाठी प्रत्येकाने साधना केली पाहिजे, तसेच प्रतिदिन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी १ घंटा वेळ दिला पाहिजे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना कडक सुरक्षाव्यवस्थेत सिंहस्थपर्वात स्नानासाठी नेले !

प्राणत्याग करण्याच्या चेतावणीचा परिणाम !
साध्वी प्रज्ञासिंह यांना सिंहस्थपर्वात स्नान करण्याची 
मागणी करावी लागणे, हे भाजप सरकारला लज्जास्पद !
     भोपाळ - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना देवास न्यायालयाने उज्जैन येथील सिंहस्थपर्वात स्नानासाठी अनुमती दिली होती; मात्र सुरक्षेचे कारण सांगत पोलिसांनी ते फेटाळून लावले होते. त्यावर साध्वी प्रज्ञासिंह यांनी उपोषण चालू करून, २१ मेपर्यंत आपल्याला स्नानासाठी न नेल्यास २१ मेच्या रात्री प्राणत्याग करीन, अशी चेतावणी दिली होती. या चेतावणीचा योग्य तो परिणाम झाला आणि १८ मे या दिवशी पोलिसांनी कडक सुरक्षाव्यवस्थेत साध्वींना रुग्णवाहिकेतून उज्जैन येथील सिंहस्थपर्व क्षेत्री नेले आणि साध्वी यांनी तेथे क्षिप्रा नदीत स्नान केले.
माझा छळ करणार्‍यांचे शिवराज सिंह चौहान नेते ! - साध्वी प्रज्ञासिंह यांचा आरोप
     साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, माझा छळ ज्या लोकांनी केला, त्यांचे चौहान हे नेते आहेत आणि त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. साध्वींनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. मोदी राष्ट्रभक्त असून माझे नेहमीच त्यांना समर्थन राहील. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे होते. काँग्रेसमुळे मला इतकी वर्षे कारागृहात रहावे लागले. एन्आयएचे अन्वेषण आता योग्यरित्या चालू आहे, असेही त्या म्हणाल्या.

बांगलादेशमध्ये इस्लामचा कथित अवमान करणार्‍या हिंदु मुख्याध्यापकाला मारहाण

भारतात एखाद्या अल्पसंख्यांक शिक्षकाच्या विरोधात अशी घटना
 झाली असती, तर ढोंगी निधर्मीवाद्यांनी अकांडतांडव केले असते आणि 
त्यांचेच भाऊबंद असणार्‍या प्रसारमाध्यमांनी त्यात तेल ओतले असते !

भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे भारत सरकार 
बांगलादेशातील हिंदूंची ही दयनीय स्थिती रोखण्यासाठी काही करणार 
नाही; म्हणून जगभरातील हिंदूंच्या रक्षणार्थ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
     ढाका - बांगलादेशातील बंदार उपजिल्ह्यातील पियर सत्तर लतीफ शाळेच्या श्यामल कांति भक्त या मुख्याध्यापकांना इस्लामचा कथित अवमान केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्याची घटना घडली. त्यांना उठाबशा काढण्यास लावण्यात आल्या. या वेळी अवामी लीगचे स्थानिक खासदारही उपस्थित होते. या घटनेची चौकशी करण्याचा आदेश बांगलादेश सरकारने दिला आहे.

व्हॉटस् अ‍ॅपवर अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अभय वर्तक यांच्या अभिनंदनाचे फिरत असलेले लिखाण

श्री. अभय वर्तक
    
अधिवक्ता संजीव पुनाळेकर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात येण्याच्या घटनेच्या संदर्भात न्यायालयात, तसेच या अनुषंगाने दूरचित्रवाहिन्यांवर झालेल्या कार्यक्रमांमध्ये जोरदार बाजू मांडल्याप्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर त्यांच्या अभिनंदनाचे संदेश फिरत होते. त्यातील दोन संदेश खालीलप्रमाणे
१. मालेगाव बॉम्बस्फोटातील कथित गुन्हेगार आणि गलिच्छ राजकारणाचे बळी ठरलेल्या निष्पाप साध्वीला सगळ्या प्रकरणांतून क्लीन चिट मिळवून दिल्याविषयी, तसेच इतर आरोपींपा मकोका कायद्यातून मुक्तता मिळवून देणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे ख्यातनाम विधीज्ञ, हिंदु धर्मवीरांचे कायदेशीर आधार आणि सर्व स्वयंघोषित पुरोगाम्यांचा बाप श्री. संजीवजी पुनाळेकर यांचे आभाळभर अभिनंदन....!
पुनाळेकर सर, आम्हा सर्वांना आपले कौतुक अन् अभिमान वाटतो.....
॥ जयतु हिन्दु राष्ट्रम ॥
- सर्व हिंदु धर्माभिमानी,
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हुपरी, कोल्हापूर.
२. राजकीय नेत्यांनी चर्चेतून पळ काढला...
घाम फोडला त्यांना.... त्यांना घाम फोडणारे होते,
हिंदूंच्या बाजूने बोलणारे आपले सनातनचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर... दोघांचे अभिनंदन !

जंगलात लागलेल्या आगीची झळ वैष्णोदेवी मंदिरापर्यंत !

     जम्मू - रेयासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरावर १६ मेपासून पेटलेला वणवा वैष्णोदेवी मंदिरापर्यंत पोहोचला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वायूदलाच्या हेलिकॉप्टर्सचे साहाय्य घेतले जात आहे. भाविकांना मंदिरापर्यंत घेऊन जाणारी हेलिकॉप्टरर्स सेवा दक्षता म्हणून बंद ठेवण्यात आली.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (१६ मेपासून रेयासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरावर १६ मेपासून पेटलेला वणव्याच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती सत्य आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

देशाला बापाची संपत्ती समजली आहे का ?

अभिनेता ऋषी कपूर यांची गांधी घराण्यावर घणाघाती टीका
     मुंबई - देशातील अनेक ठिकाणे आणि राष्ट्रीय संपत्ती यांना काँग्रेसच्या सरकारांकडून नेहरू, गांधी यांचीच नावे दिली जात असल्यावरून अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशाला बापाची संपत्ती समजली आहे का ?, अशी टीका करतांनाच या सगळ्या संपत्तीचे नामांतर करा, अशी मागणीही ऋषी कपूर यांनी केली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी यावरून ऋषी कपूर यांचे कौतुक करत त्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे.
ऋषी कपूर यांनी केलेले ट्विट
१. इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ हेच नाव का ? महात्मा गांधी, भगतसिंह, डॉ. आंबेडकर किंवा ऋषी कपूर हे नाव का नाही ? किती क्षुद्र मानसिकता आहे ही ?
२. कल्पना करा, देशातील वेगवेगळ्या ठिकाणांना महंमद रफी, किशोर कुमार, मन्ना डे, मुकेश यांची नावे दिली गेली असती, तर किती बरे वाटले असते ! अर्थात, हा केवळ माझा सल्ला आहे.
३. मुंबईतील चित्रनगरीला (फिल्मसिटीला) दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार किंवा अमिताभ बच्चन यांचे नाव असायला हवे होते. हा राजीव गांधी उद्योग काय प्रकार आहे ? विचार करा मित्रांनो !

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस थांब्यांवरील विज्ञापनांच्या रकमेची चौकशी करण्याची मागणी

     पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएम्पी) बसथांब्यांवर विज्ञापने लावण्यात आली आहेत; मात्र महामंडळाकडे त्या विज्ञापनांतील मोजकेच पैसे जमा होतात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राजीव फाउंडेशनचे ऋषिकेश बालगुडे यांनी एका निवेदनाद्वारे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. (ही गोष्ट पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि पालिका प्रशासन यांच्या लक्षात का येत नाही ? सदर विज्ञापनांची रक्कम आली कि नाही, याविषयी नोंद ठेवणारी कोणती कार्यप्रणाली आहे कि नाही ? याविषयी पालिका आयुक्तांनी सखोल चौकशी करून कारवाई करायला हवी.- संपादक)  
      निवेदनात म्हटले आहे की, प्रभागस्तरीय निधीतून नगरसेवकांनी उभारलेले अनेक बस थांबे हे महामंडळाकडे हस्तांतरित केलेले नाहीत. त्यामुळे त्यावर अनुमतीविना विज्ञापने लावली जातात. शहरात महामंडळाचे १ सहस्र ६०० बस थांबे आहेत. त्यातील काही बस थांब्यांसाठी ठेकेदार नेमण्यात आला आहे; परंतु सर्व बस थांब्यांवरील विज्ञापनांचे पैसे महामंडळाकडे भरले जात नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. (पालिकेचा भोंगळ कारभार ! - संपादक)

४ मासांत १२२ लाचखोर पोलिसांना पकडले !

महाराष्ट्रातील लाचखोर पोलीस यंत्रणा ! 
लाचखोरांना कठोर कारवाई करून 
नागरिकांना 'स्वच्छ प्रशासन' मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     पुणे, १८ मे - गेल्या ४ मासांत ९६ प्रकरणांमध्ये १२२ लाचखोर पोलीस हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेने लाचखोरीतील अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. शासनाच्या विविध विभागांमधील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी ४ मासांच्या काळात सुमारे १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. (अशा लाचखोरांना पोलीस प्रशासनाने समाजात 'छी-थू' होईल अशी कठोर शिक्षा द्यायला हवी, तरच पोलीस दलाची ही प्रतिमा पालटेल ! - संपादक) 

पुण्यातील काही शाळांकडून २५ प्रतिशत राखीव जागांच्या प्रवेशास नकार

     पुणे - पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही शाळा २५ प्रतिशत राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत, अशी तक्रार काही पालकांनी शिक्षण विभागाकडे केली. त्या अनुषंगाने पालक आणि आप युनियन यांनी आंदोलन शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी २० मेपर्यंत प्रवेश देणे बंधनकारक असून कोणत्याही शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश नाकारू नयेत, असे आदेश दिले.
१. मदर टेरेसा स्कूल, रिम्स इंटरनॅशनल, सिटी इंटरनॅशनल, डीपीएस स्कूल, आर्यन स्कूल या शाळांविरोधात काही पालकांनी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. (खाजगी इंग्रजी शाळांची मक्तेदारी शिक्षण विभाग कधी मोडून काढणार ? - संपादक)
२. या शाळांनी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देणे अपेक्षित असतांना उपक्रम किंवा इतर शुल्काच्या नावाखाली शुल्क मागत आहेत. नावातील त्रुटी, जन्मदिनांक आणि वयाचा निकष अशी कारणे देऊन शाळा पालकांना हेलपाटे घालायला लावत आहेत.
३. शिक्षणाधिकार्‍यांनी शाळांसाठी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश रहित झाल्यास त्याविषयी पालकांना ३ दिवसांच्या आत कळवणे बंधनकारक आहे. २५ प्रतिशत राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कोणत्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येऊ नये

गोध्रा हत्याकांडाचा सूत्रधार फारूख भाना १४ वर्षांनी अटकेत !

आता भाना याला आणखी काही वर्षे पोसण्यापेक्षा 
तात्काळ खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या ! 
     कर्णावती - २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे ५९ कारसेवकांना साबरमती एक्स्प्रेसमध्ये जाळून ठार केल्याच्या घटनेतील प्रमुख आरोपी फारूख मोहम्मद भाना याला १४ वर्षांनी गुजरात आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) १८ मेला सकाळी पंचमहल जिल्ह्यातील कालोल येथे अटक केली. 

आरोपींच्या अधिवक्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेले पुरावेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने सादर केले !

वर्ष २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव आरोपपत्रातून 
वगळल्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीने घेतलेले चर्चासत्र !
आरोपींचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी उघड केले अन्वेषणातील गौडबंगाल !
अधिवक्ता
संजीव पुनाळेकर
     मुंबई - वर्ष २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पकडण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना अटक न करता त्यांची (अनधिकृतरित्या) नार्को चाचणी करण्यात आली. आरोपींचे अपहरण केले, हेच पुरावे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) घेतले. त्यात सैन्याधिकार्‍यांच्या साक्षी आहेत. आरोपींपैकी एक असलेल्या चतुर्वेदी यांना अटक न करता त्यांची नार्को चाचणी केली. त्यांना इंडिया बूल्सच्या विमानाने आतंकवादविरोधी पथकातील अधिकारी घेऊन गेले. त्या वेळचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली मुंबईतील कलिना येथील प्रयोगशाळेने आम्हाला (आरोपींच्या अधिवक्त्यांना) दिला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने घेतलेले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हे सगळे पुरावे आरोपीच्या अधिवक्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली शोधून दिले, असे रोखठोक प्रतिपादन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपींचे अधिवक्ते आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केले.

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील वाढती वाहनचोरी थांबवण्यासाठी विशेष पोलीस पथक

केवळ पथकाची स्थापना करण्यापेक्षा चोरी करणार्‍यांना कठोर शासन केल्यासच असे प्रकार थांबतील !
      पिंपरी - औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड या शहरांमधून मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होत आहे. विशेषत: आलिशान चारचाकी, जीप यांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. हे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ यांनी पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन केले आहे. यात एका पोलीस उपनिरीक्षकासमवेत प्रत्येक पोलीस ठाण्याचे २ कर्मचारी असे एकूण १८ पोलीस कर्मचारी असणार आहेत. वर्दळीच्या आणि अन्य ठिकाणी पथकातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.
१. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणाहूनही वाहने चोरीस जात आहेत. (पोलीस प्रशासन सुस्त आणि अकार्यक्षम असल्याचा परिणाम ! - संपादक)
२. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षात पोलीस उपायुक्त परिमंडळ-३च्या ९ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ सहस्र ९१३ वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील फक्त ७६८ वाहनांचा शोध लागला आहे.
३. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१६ या कालावधीमध्ये ११५ वाहने चोरीला गेली; मात्र एकाच वाहनाचा तपास लागला.

पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी यांची देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट

श्री. मडिगेरी (डावीकडून तिसरे) यांना माहिती सांगतांना श्री. शशांक जोशी
     पनवेल - पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. मडिगेरी यांच्या समवेत त्यांचे सहकारीही उपस्थित होते. आश्रमातील साधक श्री. शशांक जोशी यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या सेवांविषयी अवगत केले. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळेही त्यांना दाखवण्यात आली.
     आश्रमातील साधकांनी फलकावर लिहिलेल्या चुका वाचून श्री. मडिगेरी यांनी साधकांच्या प्रांजळपणाचे कौतुक केले. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया याविषयी त्यांनी आवडीने जाणून घेतले, तसेच सहकार्‍यांनाही लक्षपूर्वक ऐकण्यास सांगितले. या वेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड येथे बालसंस्कारवर्गही चालू करणार असल्याचे सांगितले. समितीच्या वतीने घेण्यात येणारे उपक्रम आणि आंदोलने यांतही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या साहाय्याने जागेची शुद्धी केल्याने अनुभूती आल्याचेही त्यांनी सांगितले. आश्रम पहाण्यासाठी कुटुंबियांनाही घेऊन येतो, म्हणजे त्यांनाही स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयी शिकायला मिळेल, असे श्री. मडिगेरी यांच्या मोठ्या बंधूंनी सांगितले.

बलात्काराचा आरोप असलेले गोव्यातील आमदार मोन्सेरात यांची जामिनावर सुटका !

     पणजी, १८ मे (वार्ता.) - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले येथील आमदार आतानासियो (बाबुश) मोन्सेरात यांना १८ मे या दिवशी जामीन संमत झाला आहे. एक लक्ष रुपयांच्या जातमुचलक्यावर, तसेच काही अटींवर त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणातील प्रमुख संशयित रोझी फेर्रोस आणि पीडित मुलीची सावत्र आई यांनाही जामीन मिळाला आहे. बाल न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रमोद कामत यांनी हा निर्णय दिला. 

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी आदी गोदरेज यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! - हिंदुत्ववादी संघटनांसह गोप्रेमी संघटनांचे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी (उजवीकडे) त्रिगुण कुलकर्णी यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सांगली, १८ मे (वार्ता.) - हिंदु धर्मीय गायीला पूज्य मानतात, माता मानतात. असे असतांना गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज यांनी गोमांस भक्षणाचे समर्थन करतांना निष्कारण आपली इंग्रजाळलेली बुद्धी पाजळून 'वैदिक काळात भारतीय गोमांस खात होते. हिंदु धर्मात 'बीफ'ला कुठलाही विरोध नाही', अशी मुक्ताफळे उधळली आहेत. केवळ व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवून जाणीवपूर्वक कोट्यवधी हिंदूंसाठी श्रद्धास्थान असणार्‍या गोमातेविषयी अवमानकारक वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी आदी गोदरेज यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी १८ मे या दिवशी सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांना हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मजागरण मंचचे श्री. चंद्रकांत आवळे, गोल्ला समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सचिन पवार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय रेठरेकर, संतोष देसाई उपस्थित होते. 

नंदुरबार येथे विनामूल्य दंत तपासणी शिबीर

    
शिबिरात रुग्णांची तपासणी करतांना दंततज्ञ विशाल पाटील
     नंदुरबार - येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात साक्रीनाका परिसरातील नागरिकांसाठी सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने १७ मे या दिवशी विनामूल्य दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील वैभव डेन्टल केअरचे दंततज्ञ विशाल पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. ५० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.

विटंबनेचे प्रकार न थांबवल्यास शिवसैनिक समाचार घेतील ! - विजय देवणे यांची चेतावणी

तारिहाळ (जिल्हा बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी 
महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रकरण 
     कोल्हापूर, १८ मे (वार्ता.) - समाजकंटकांनी पुतळ्याची विटंबना केली, तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नष्ट होणार नाहीत. शिवसेना विघातक प्रवृत्तींचा समाचार घेण्यास कायमच तत्पर आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा ज्या दिवशी असे समाजकंटक सापडतील त्याच दिवशी शिवसैनिकच त्यांचा समाचार घेतील, अशी चेतावणी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांनी १६ मे या दिवशी दिली. 

कराड येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा !

हिंदुत्ववाद्यांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी 
कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     कराड - येथील कृष्णा नाका सर्कल परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याविषयीचे निवेदन हिंदु एकता आंदोलन कराड यांच्या वतीने कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर आणि कराड उपनगराध्यक्ष श्री. सुभाष पाटील यांना देण्यात आले. या वेळी हिंदु एकताचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि कराडचे नगरसेवक श्री. विनायक पावसकर, हिंदु एकताचे श्री. अजय पावसकर, श्री. स्वप्नील हुलवान, श्री. सचिन कालेकर, श्री. भूषण जगताप, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सागर आमले, श्री. रूपेश मुळे, श्री. ओमकार माने, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लव्ह जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महिलांनी स्व-संरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! - रागेश्री देशपांडे

नाचणखेडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. श्रेयस पिसोळकर,
कु. रागेश्री देशपांडे आणि श्री. प्रशांत जुवेकर
     जळगाव, १८ मे (वार्ता.) - 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून या धर्मांधांनी राष्ट्र आणि धर्म यांविरुद्ध एक अघोषित छुपे युद्धच पुकारलेले आहे. उपलब्ध आकडेवाडीनुसार १ लक्ष २० सहस्र मुली लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. या जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी नाचणखेडा येथे १७ मे या दिवशी झालेल्या धर्मजागृती सभेत केले. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मजागृती सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, श्री. श्रेयस पिसोळकर, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी संबोधित केले. सभेच्या प्रारंभी शंखनाद झाला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून सभेला प्रारंभ झाला. समितीचे श्री. सचिन वैद्य यांनी समितीचे कार्य मांडले. सभेचे सूत्रसंचालन श्री. नीलेश तांबट आणि कु. तेजस्विनी तांबट यांनी केले. या धर्मजागृती सभेला ८०० हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती होती. 

नीलेश राणे पोलिसांना शरण येणार

     मुंबई - काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट झालेले काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने १७ मे या दिवशी फेटाळून लावला. त्यामुळे अखेर नीलेश यांनी पोलिसांना शरण जाण्याची सिद्धता दाखवून अर्ज मागे घेतला. त्यानुसार २३ मेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचा आदेश न्यायालयाने त्यांना दिला.


फलक प्रसिद्धीकरता

जनहो, ॐला योगासनांतून वगळणे हे माणसाच्या 
देहातून चेतना काढून घेण्यासारखे आहे, हे लक्षात घ्या !
     २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशी ॐ आणि वेदातील इतर मंत्र म्हणणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तसे म्हणण्याचे कोणतेही बंधन नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     21 Juneko Antar rashtriya Yog dinpar Om kehna bandhankarak nahi- Kendriya Ayush mantralay
     Ompar kayam na rehnewali sarkarpar Hindu vishwas kaise rakhe?
जागो !
     २१ जून को अंतरराष्ट्रीय योग दिन पर ॐ कहना बंधनकारक नहीं ! - केंद्रीय आयुष मंत्रालय
     ॐ पर कायम न रहनेवाली सरकार पर हिन्दू विश्‍वास कैसे रखे ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांनी केलेल्या सिक्कीम दौर्‍याची फलनिष्पत्ती शून्य

     पिंपरी (पुणे), १८ मे - भारतातील पहिले सेंद्रीय राज्य म्हणून सिक्कीम घोषित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, अन्य नगरसेवक आणि पर्यावरण विभागातील अधिकारी यांच्यासह १४ जणांचे पथक ८ ते १३ मे या कालावधीत सिक्कीमला जाऊन आले. सिक्कीम राज्यातील शून्य गुन्हेगारी, स्वच्छता, नियमांचे केले जाणारे काटेकोर पालन या सार्‍या गोष्टींमुळे हे पथक भारावले; तेथून परत आल्यानंतर महापौर आणि अन्य अधिकार्‍यांनी सिक्कीम राज्याचे बरेच कौतुक केले; मात्र त्या राज्यातील कोणता प्रकल्प आपण राबवू शकतो किंवा कोणत्या गोष्टी आपल्या शहरासाठी लाभाच्या आहेत, याविषयी कोणीच काही सांगितले नाही. त्यामुळे या दौर्‍याची फलनिष्पत्ती शून्यच म्हणावी लागेल. या दौर्‍यासाठी ८ लक्ष ६३ सहस्र ८०० रुपयांचा व्यय करण्यात आला. त्यामुळे दौ-याचे फलित काय आणि आयोजित केलेले दौरे हे शहर विकासासाठी नसून हौस म्हणूनच केले जातात कि काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. (अशी शून्य फलनिष्पत्ती असलेल्या दौर्‍याचा व्यय (खर्च) लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून वसूल करा ! - संपादक)

ब्राह्मणी गाव (जिल्हा नगर) येथे रणरागिणी शाखा चालू करण्यासाठीच्या बैठकीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

     ब्राह्मणी (ता. राहुरी, जिल्हा नगर), १८ मे (वार्ता.) - हिंदु महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा कार्यान्वित असून समाजातूनही 'रणरागिणी'चे कार्य गावागावांमधून चालू करण्यासाठी मागणी येत आहे. अशाच प्रकारे १५ मे या दिवशी येथील धर्माभिमानी कु. धनश्री तरटे, तसेच धर्मरक्षणाची तळमळ असलेले श्री. शिवाजी गाडे यांच्या पुढाकारातून गावात रणरागिणी शाखा चालू करण्यासंदर्भात पहिली बैठक पार पडली. जून २०१६ मध्ये रणरागिणी शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचे, तसेच गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे बैठकीच्या कालावधीत ठरवण्यात आले. समाजात महिलांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी संघटित होणे आवश्यक आहे, असे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले. रणरागिणी शाखेच्या पुणे जिल्हा समन्वयक कु. मोनिका गावडे आणि कु. अश्‍विनी कुलकर्णी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी समितीचे श्री. अरुण ठाणगे, सौ. मनीषा कावरे उपस्थित होते. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे 'अमृतमहोत्सवी वर्ष'

समस्त मानवजातीच्या कल्याणार्थ सदैव 
झटणार्‍या ईश्‍वरस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची
 महती वर्णन करणारा दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक 
 प्रसिद्धी दिनांक : २९ मे २०१६ 
* आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ ते परात्पर गुरुपर्यंतचा प्रवास ! 
* परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध क्षेत्रांतील अद्वितीय कार्य ! 
* संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन अन् त्यांना दिशादर्शन करणारे कार्य 
* परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरूंचे कृपाशीर्वाद ! 
* परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी केलेला सन्मान अन् त्यांना पुरस्कार देऊन केलेला गौरव ! 
* विशेष : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध भाव दर्शवणारी छायाचित्रे 
 आपली मागणी आजच नोंदवा ! 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ मे या
 दिवशी सायंकाळी ५ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

भारतात जवळजवळ ४०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात !

देशाला सतावणार्‍या या आर्थिक जिहादला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार काय पावले उचलणार आहे ?
     नवी देहली - एका अहवालानुसार, देशातील प्रत्येक १० लाख नोटांमागे २५० नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे. देशात आजच्या घडीला एकूण ४०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा आहेत. भारतीय सांख्यिकी संस्थेने (आयएस्आयने) बनावट नोटांच्या केलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे. 
या अहवालात पुढे म्हटले आहे की,
१. भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी ७० कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणल्या जातात. आर्थिक आतंकवादाशी लढायचे असल्यास कठोर पाऊले उचलायला केंद्रशासनानेही आरंभ केला आहे. 
२. अधिकोषांना (बँकांना) अधिक प्रमाणात बनावट नोटा सापडतात. त्यामुळे बाजारात अजूनही अनेक बनावट नोटा असतील. 
३. बनावट नोटा शोधण्याची मोहीम आणखी वेगवान केली पाहिजे, असेही अभ्यासातून सुचवण्यात आले आहे.

आदी गोदरेज यांनी गोमांस भक्षणाविषयीचे विधान मागे घ्यावे अन्यथा गोदरेजच्या उत्पादनांवर बहिष्कार घालू ! - हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनाला उपस्थित विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ
      नवी देहली - येथील हिंदुत्वनिष्ठांनी जंतरमंतर येथे १५ मे या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. याद्वारे गोदरेज आस्थापनाचे मालक आदी गोदरेज यांनी केलेल्या गोमांस भक्षणाच्या संदर्भातील विधानांचा निषेध करण्यात आला. गोदरेज यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने गोदरेज यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. याशिवाय गोदरेज यांनी हे विधान मागे घेऊन क्षमा न मागितल्यास त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली. या आंदोलनात वैदिक उपासना पीठ, योग वेदांत सेवा समिती, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अपंग मुलांच्या शासकीय वसतीगृहातील ४९ मुले एकच टूथब्रश वापरतात !

भ्रष्टाचारग्रस्त भारत !
     नवी देहली - अपंग मुलांच्या शासकीय वसतीगृहात ४९ अपंग मुले केवळ एका टूथब्रशने दात घासत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. अपंग मुलांच्या एका शासकीय वसतीगृहाला राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे (एनएचआरसीचे) अध्यक्ष आणि भारताचे माजी सरन्यायाधीश एच्.एल्. दत्तू यांनी भेट दिली असता ही माहिती समोर आली. 
     एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दत्तू म्हणाले की, अपंग मुलांच्या शासकीय वसतीगृहांना केंद्रशासन कोट्यवधी रुपयांचे साहाय्य देते; पण हे साहाय्य प्रत्यक्षात तेथे पोचते का ? हा प्रश्‍न आजही कायम आहे. (स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही अशी स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! यासाठी उत्तरदायी असणार्‍या आजपर्यंतच्या सर्व सरकारी अधिकारी आणि मंत्री यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. दत्तू अशी मागणी करतील का ? - संपादक)
     एका वसतीगृहातील हे भयानक वास्तव समोर आल्यानंतर दत्तू यांनी सर्व राज्यांतील शासकीय साहाय्य मिळणार्‍या अपंग मुलांच्या आणि वृद्धाश्रमांच्या पाहणीचे आदेश दिले आहेत. याचा अहवाल सिद्ध करण्यात येणार आहे.हवेच्या प्रदूषणामुळे भारतियांचे आयुर्मान ३ वर्षे ४ मासांनी घटले !

  • सुखसोयी उपलब्ध करून देणारे विज्ञान, ही व्याख्या आता पालटायला हवी, असे कोणी म्हटल्यास त्यात काय नवल ?
  • यज्ञायागांमुळे आणि होळी आली की, वायूप्रदूषणाविषयी बोंबा मारणारे आता गप्प का ? अंनिसवाले आता तोंड उघडतील का ?
     नवी देहली - हवेच्या प्रदूषणामुळे श्‍वासाद्वारे शरीरामध्ये जाणार्‍या प्रदूषित घटकांमुळे मानवी आयुर्मानात साधारण ३ वर्षे ४ मासांची घट होत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय उष्पप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम्ने) हा अभ्यास केल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
     भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत राजधानी देहलीमध्ये हवेच्या प्रदूषणाचा मानवी आयुर्मानावर सर्वाधिक परिणाम होत असून तेथील आयुर्मान ६ वर्षे ३ मासांनी न्यून होत आहे, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच प्रदूषणामुळे उद्भवणार्‍या फुफ्फुसांच्या गंभीर आजारामुळे प्रत्येक वर्षी ३१ सहस्र भारतियांचा मृत्यू होत असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे.ताजिकिस्तान येथील एका कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीर भारतात असल्याचा नकाशा दाखवला !

      इस्लामाबाद (पाकिस्तान) - ताजिकिस्तानमध्ये पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उपस्थितीत एका ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी पाकचा नकाशा दाखवतांना पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगीट बाल्टिस्तान हे भाग भारतात दाखवण्यात आले. ही बातमी छायाचित्रासह पाकच्या माध्यमांनी प्रसारित केल्याने देशभरातून पाक शासनावर टीका करण्यात येत आहे. पाकच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या निष्काळजीपणा आणि दायित्वशून्यतेमुळे पाकचे नाव अपकीर्त केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वीही काश्मीरचा समावेश नसलेला पाकिस्तानचा नकाशा दाखवल्याने एका शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले होते, तसेच एका वृत्तवाहिनीने ही असाच नकाशा प्रसारित केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. (कुठे स्वतःच्या देशाचा भाग नसतांनाही तो देशाच्या नकाशात न दाखवल्यावरून शासनावर टीका करणारे पाकचे नागरिक, तर कुठे भारताचा भाग पाकने कह्यात घेऊन ६८ वर्षे होईपर्यंत शासनावर तो मिळवण्यासाठी दबाव न निर्माण करणारे भारतीय नागरिक ! - संपादक)
     या घटनेनंतर मोठा गदारोळ झाल्याने पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच या स्पष्टीकरणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी माध्यमे चुकीवरच अधिक भर देत असल्याविषयी शासनाने अप्रसन्नताही व्यक्त केली आहे. कार्यक्रमाच्या वेळी प्रत्यक्ष पंतप्रधानांसमोरच हा प्रसंग घडल्याने शासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतल्याचे सांगितले जात आहे.

सिंहस्थपर्वाला जत्रा आणि सहल यांचे स्वरूप देण्यात आले आहे ! - पुरी पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी श्री निश्‍चलानंद सरस्वती महाराज

     उज्जैन - सिंहस्थपर्व ही जत्रा नाही किंवा सहलीचे स्थान नाही, तर ते महापर्व आहे. तथापि येथील सिंहस्थपर्वाला संपूर्णपणे जत्रा आणि सहली यांचे स्वरूप देण्यात आले आहे, असे प्रतिपादन पुरी पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज यांनी येथे केले. 
     त्यांनी या वेळी मध्यप्रदेश शासनाविषयी अप्रसन्नता व्यक्ती केली.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, 
१. केंद्रशासनाने प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथील सिंहस्थ तथा कुंभ यांसाठी एक समिती सिद्ध करावी. त्यामध्ये संत, विद्वान आणि तज्ञ असावेत. या समितीने सिंहस्थ आणि कुंभ यांना त्यांच्या मूळ स्वरूपात आणावे.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
    सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
सदाचाराचे महत्त्व
सदाचारी व्यक्तीजवळ लक्ष्मी, दान आदींचा वास असतो ! : महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश्‍चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, आपण कोण आहात ? त्यावर त्या स्त्रीने सांगितले, मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे. तेव्हा राजाने तिला सांगितले, तू जाऊ शकतेस. लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, आपण कोण आहात ? त्याने उत्तर दिले, माझे नाव दान आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे. राजाने सांगितले आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव सदाचार ! राजाने त्याला म्हटले, मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशी (२०.५.२०१६) उ.रा. १२.४२ वाजता
समाप्ती - वैशाख पौर्णिमा (२१.५.२०१६) उ.रा. २.४४ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय !

१. सनातन संस्था निःस्वार्थीपणे राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करत आहे ! 
     मी उज्जैन येथील सिंहस्थपर्वातील बहुतेक साधूसंतांच्या आखाड्यांना भेटी दिल्या. सर्व साधूसंत धर्मविषयी केवळ बोलतात; पण प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर एकाकडूनही अपेक्षित असे कार्य होतांना दिसत नाही. देशातील जनतेला अनेक संकटांनी घेरले आहे. अशा बिकट परिस्थितीत केवळ तुमचीच संस्था आणि तिचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करत आहेत, हेच या प्रदर्शनातून मला प्रकर्षाने जाणवले. आपल्या पुढील कार्यास माझ्या सदिच्छा असून मीही आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो. 
- श्री. राकेश मणीलाल, झाबुआ, मध्यप्रदेश
२. प्रदर्शनाला प्रथम भेट दिल्यावर हिंदु संस्कृतीची महानता लक्षात आली !
     मी प्रदर्शनाला प्रथम भेट दिल्यावर मला हिंदु संस्कृतीची महानता लक्षात आली, तसेच आपल्या देशाच्या सद्यस्थितीला मी स्वत:ही उत्तरदायी आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्या संस्थेतील कार्यकर्त्यांचा सेवाभाव पाहून मला कधी नव्हे इतका आनंद जाणवत होता आणि तो पुन्हा मिळवण्यासाठी मी ३ वेळा माझ्या अन्य मित्रांसह तुमचे प्रदर्शन पहाण्यासाठी आलो. 
- श्री. लोकेश पटेल, देवास, मध्यप्रदेश

मालेगाव स्फोटातील सत्य काय ?

श्री. भाऊ तोरसेकर
     घोडा घाससे दोस्ती करेगा, तो खायेगा क्या ? अशी हिंदी भाषेतील उक्ती आहे. हिंदु आतंकवाद किंवा मालेगाव प्रकरण हे काँग्रेससह तमाम सेक्युलर पक्षांसाठी तसाच घास आहे. मागील ७ वर्षांत त्याच घास-गवतावर हे सेक्युलर घोडे चरत राहिले; पण त्यापैकी कुणीही या विषयाचा न्यायालयीन निचरा करण्याचा विचारही केला नाही कि तसा प्रयत्न केला नाही. जवळपास त्याच दरम्यान मुंबईत कसाब टोळी येऊन शेकडो लोकांना ठार मारून गेली. त्यातील जिवंत सापडलेला अजमल कसाब न्यायालयाकडून दोषी ठरून फाशीही गेला. मग अजून मालेगाव स्फोटातील खटल्याचे चर्वितचर्वण कशाला चालू आहे ? आपल्या ६ वर्षांच्या कारकीर्दीत काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडी यांना मालेगावचे गुन्हेगार वा संशयितांना दोषी ठरवून घेण्यात कुठली अडचण आली होती ? आता पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची सुटका झाल्यावर सेक्युलर कल्लोळ चालू झाला आहे.

बिहारच्या आमदार पुत्राची मुजोरी

     बिहार राज्यातील जदयूच्या आमदार पुत्राच्या वाहनास दुसर्‍या वाहनाने केलेला ओव्हरटेक खटकल्याने त्या गाडीतील एकाची त्याने गोळ्या घालून हत्या केली. तद्नंतर खुनी पुत्राच्या बाजूने सारवासारव करण्यासाठी त्याचे वडील, बिन्देश्‍वरी प्रसाद यादव उभे राहिले. आपल्या पुत्राने घटनास्थळाहून पळ का काढला, याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे. असे वडील पोलिसांसमोर गुन्हेगार मुलाला फरफटत सादर करण्याचा विचारही करणार नाहीत. ज्या लोकशाहीने पत्नी मनोरमादेवीस आमदार बनवले, तिच्या विरुद्ध दडपशाहीचा वापर केला जाणे म्हणजे लोकशाहीचा गळाच घोटणे होय. नेत्यांच्या पुत्रांचा उद्दामपणा प्रसारमाध्यमांतून उघड होत असतो; पण त्या मुजोरांवर कडक कारवाई झाल्याचे आजमितीपर्यंत तरी वाचनात नाही. त्यामुळे ते फार शेफारले आहेत. समाजातील उत्तरदायी घटक म्हणून दायित्वाने वागणे, हा यांच्या कक्षेबाहेरील विषय म्हणावा लागेल. विविध क्षेत्रांतील माफियांना बळ मिळण्यास असे अपप्रकार कारणीभूत ठरू शकतात.
     संत तुलसीदासांनी धर्माची स्थिती पाहून आताचा काळ हातात बासरी नाही, तर धनुष्य धारण करण्याचा आहे, असे उद्गार काढले होते. आजही तोच काळ आला असून सर्वांनी जातपात, संघटना, संप्रदाय, पक्ष आदींच्या चौकटी सोडून धर्मासाङ्गी एकत्रित येणे आवश्यक आहे ! - श्री. नर्मदेश्‍वर पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जमशेदपूर, झारखंड.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
गोरक्षण विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
www.sanatan.org वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !
                                  ॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि एका वर्षांत ६४ टक्क्यांवरून ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कु. पूर्ती लोटलीकर (वय ५ वर्षे) !

    
कु. पूर्ती लोटलीकर
महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि निरपेक्षपणा अंगी बाणवून दोन वर्षांत ६४ टक्क्यांवरून ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कु. पूर्ती लोटलीकर हिच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी माझे तिच्याशी पुढील संभाषण झाले.
मी : तुझी पातळी ६४ टक्क्यांवरून एका वर्षात ६६ टक्के झाली. मग तू त्या दृष्टीने कोणते प्रयत्न केलेस ?
कु. पूर्ती : माझी पातळी ६६ टक्के झाल्याचे मला ठाऊक नव्हते. पूर्वी माझ्या मनात स्वतःच्या पातळीचे विचार यायचे; पण आता मी ते विचार सोडून दिले. तेव्हा देवाने मला ६६ टक्के पातळी झाल्याचे सांगितले.
मी : तू पुढचे ध्येय संत होणार, असे ठेवलेस ना ?
कु. पूर्ती : हो !
मी : कधीपर्यंत संत होणार, असे ध्येय ठेवले आहेस ?
कु. पूर्ती : देव जेव्हा करून घेईल, तेव्हा होणार !

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
शिवमोग्गा, कर्नाटक येथील जिज्ञासूंना रामनाथी आश्रमाविषयी आलेल्या अनुभूती
२ अ. श्री. वी. शबरीश
१. प.पू. गुरुदेव साक्षात् कृष्ण आहेत, असे मला जाणवले. त्यांच्या कपाळावर कमळ दिसले.
२. लागवडीत गेल्यावर शेषनागाचे अस्तित्व जाणवले.
३. प्रार्थना करतांना श्रीकृष्णाकडून आमच्याकडे चैतन्य येत आहे, असे जाणवले.
४. पू. (सौ.) बिंदाताईंसमवेत बोलतांना भावजागृती झाली.
२ आ. आर्. प्रदीपकुमार
२ आ १. आश्रमाचे वातावरण पुष्कळ चैतन्यदायी आणि उत्साहपूर्ण असून वैकुंठलोकात आल्याचे जाणवणे : आश्रमाचे वातावरण पुष्कळ चैतन्यदायी आणि उत्साहपूर्ण होते, तसेच मनाला पुष्कळच आनंद देणारे होते. सर्व जण प्रेमभावाने आणि कोणतीही अपेक्षा न करता इतरांना साहाय्य करतांना पाहून आनंद होत होता. आश्रमात आल्यावर वैकुंठलोकात आल्याचे जाणवले. आम्ही पुष्कळ पुण्यक्षेत्री फिरलो आहोत; पण आश्रम म्हणजे अद्भुत म्हणावे लागेल.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांच्या चित्रांप्रती प.पू. डॉक्टरांचा भाव !

सौ. रंजना गडेकर
     १२.२.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमातील कलश पूजनाच्या वेळी प.पू. डॉक्टर ध्यानमंदिरात आले होते. त्या वेळी कलशपूजनाचा पूजाविधी संपल्यावर ते ध्यानमंदिरात काही दिवसांपूर्वी ठेवलेल्या देवतांची चित्रे पहात होते आणि त्याविषयी पुरोहित साधकांना विचारत होते. (प.पू. डॉक्टर विशेष काही असेल, तरच ध्यानमंदिरात येतात.) ध्यानमंदिरात सनातन-निर्मित सप्तदेवतांची चित्रेही आहेत. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे. १. प.पू. डॉक्टर देवतांच्या चित्रांजवळ जात असतांना ते एखाद्या सजीव व्यक्तीलाच भेटायला जात आहेत, असे वाटले.
२. प.पू. डॉक्टर देवतांची चित्रे नुसती पहात नसून सगुण रूपातील देवतेलाच भेटत आहेत, असे वाटत होते आणि ते एकमेकांशी सूक्ष्मातून संवाद साधत आहेत, असे वाटले.
३. एखादी व्यक्ती आपल्या समोर असल्यावर आपण तिला कसे पहातो, वागतो, त्याप्रमाणेच ते देवतांकडे पहात होते, तसेच त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या तोंडवळ्यावर देवतांच्या प्रती आत्मीयता आणि भावही जाणवत होता.
४. ध्यानमंदिरात त्या वेळी प्रत्यक्ष सगुणातील देवताच उपस्थित आहेत आणि देवता नेहमी सगुण रूपातच असतात. आपण मात्र त्यांचे दर्शन घेतांना त्यांना चित्राच्या चौकटीतच बघून चित्राचेच दर्शन घेतो, असे वाटले.
५. प.पू. डॉक्टर ध्यानमंदिरात येऊन गेल्यानंतर तेथे अधिक प्रकाश आणि थंडावा जाणवत होता.
- सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, गोवा. (१२.२.२०१६)

कवटाळूया श्रीगुरुचरण !

दिसतो घोर आपत्काळ ।
कवटाळूया श्रीगुरुचरण ॥ १ ॥
जैसे मार्कंडेयांनी
कवटाळीली शिवपिंडी ।
तेव्हा उभे ठाकले यमदेव ॥ २ ॥
जेव्हा फेके काल फास ।
तेव्हा उगारूनी त्रिशूल, शिवाने रक्षिले चरणदास मार्कंडेया ॥ ३ ॥
तैसे या घोर कलियुगी आम्ही ।
धरूनी साधनेची कास, कवटाळूया गुरुमाऊलीच्या चरणा ॥ ४ ॥
- साधक चरणदास,
श्रीरामप्रसाद वि. कुष्टे, ढवळी, फोंडा, गोवा. (८.११.२०१५)

कळसारोहणाच्या कालावधीत सौ. आरती पुराणिक यांना झालेले त्रास आणि जाणवलेली सूत्रे

सौ. आरती पुराणिक
१. संकल्पविधीच्या आदल्या दिवशी झालेले त्रास
     ७.५.२०१६ पासून, म्हणजे विधीच्या आदल्या दिवसापासून माझे डोके पुष्कळ दुखत होते. मला काहीच सुचत नव्हते. उत्साह उणावल्यामुळे काहीच करू नये, असे मला वाटत होते. प्रत्येक कृती ओढून-ताणून करावी लागत होती.
२. संकल्पविधीच्या दिवशी जाणवलेली सूत्रे
     ८.५.२०१६ या दिवशी आश्रमातील ध्यानमंदिरात कळसारोहणाचा संकल्पविधी झाला. या विधीला आम्ही (मी आणि श्री. भानू पुराणिक) यजमान दांपत्य म्हणून उपस्थित होतो.
अ. विधीच्या वेळी सर्व देवता आणि ऋषि यांना आवाहन करत असतांना ते प्रत्यक्ष ध्यानमंदिरात येत असल्याचे जाणवले.
आ. संकल्पविधीच्या वेळी मला सूर्यमंडल दिसले. क्षणात सर्व ग्रह स्तब्ध झाल्याचे आणि त्यांची हालचाल पालटल्याचे दिसले. त्या वेळी आता वाईट शक्ती संपूर्णतः नष्ट होण्याची वेळ आली असून सर्वकाही देवाच्या इच्छेने होणार आहे, असे जाणवले.

रामनाथी आश्रमात कळसारोहण होत असतांना आलेल्या अनुभूती

१. दुपारी १२ ते २ या कालावधीत ध्यानमंदिरात बसावेसे वाटणे आणि
 त्यानंतर त्याच वेळेत रामनाथी आश्रमात कळसारोहण होणार असल्याचे समजणे
     १०.५.२०१६ या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुपारी १२ ते २ या कालावधीत उपायांसाठी देवद आश्रमातील ध्यानमंदिरात बसावे, असे सकाळपासून तीव्रतेने वाटत होते. त्यानुसार मी उपायांना बसायचे ठरवले. सकाळी भोजनकक्षात आले, तेव्हा तेथील फलकावर रामनाथी आश्रमात कळसारोहण विधी दुपारी १२ ते २ या वेळेत होणार असून साधकांनी त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी प्रार्थना करावी, अशी सूचना लिहिली होती. ती सूचना वाचून देव त्या वेळेत मला उपायांना बसायला का सांगत होता ?, हे लक्षात आले.
२. कळसारोहणाच्या कालावधीत उपायांना बसल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. उपायांच्या वेळी मन निर्विचार होऊन रामनाथी आश्रमातील कळसारोहण विधीचे चैतन्य मन अनुभवत होते.
आ. ब्रह्मांडात सगळीकडे पुष्कळ आनंदीआनंद झाला असल्याचे आणि सगळीकडे कळसातील शक्ती, चैतन्य अन् आनंद प्रक्षेपित होत असल्याचे दिसत होते.
इ. वातावरण प्रसन्न, आनंदी आणि चैतन्यमय वाटत होते.
ई. आश्रमावर स्थापन झालेले हे तीन कळस आकाराने छोटे असले, तरी कार्याने विशाल असल्याचे जाणवत होते.

रामनाथी आश्रमावर होणार्‍या कळसारोहणाच्या कालावधीत नागपूर येथील साधिकेला श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्या मूर्ती डोळ्यांसमोर येणे आणि प्रार्थना केल्यावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी लालसर रंगाचे चक्र अतीवेगाने फिरत असल्याचे जाणवणे

     ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रामनाथी आश्रमावर कळसारोहण होणार आहे. त्यासाठी १२.१५ ते २.३० या कालावधीत कळसारोहण निर्विघ्नपणे होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करूया, असा निरोप सौ. शास्त्रीकाकूंनी दिला. त्याप्रमाणे मी दुपारी १२.३० वाजता प्रार्थना करण्यासाठी बसले. दुपारी १२.३० ते २.१५ या काळात नामजप आणि प्रार्थना करत असतांना श्री लक्ष्मीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्या मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर आल्या. मी प्रार्थना करत होते, हे गुरुदेवा, हे श्रीकृष्णा, या कळसाच्या माध्यमातून तुझे आणि सर्व देवतांचे चैतन्य आम्हाला लाभू दे. हे कळसारोहण निर्विघ्नपणे होऊ दे, अशी तुझ्या चरणी संपूर्णपणे शरण येऊन प्रार्थना आहे. ही प्रार्थना सतत चालू होती, तसेच नामजपही चालू होता. साधारणपणे दुपारी १ ते १.३० या कालावधीमध्ये माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी लालसर रंगाचे मध्ये पिवळी छटा असणारे चक्र अती वेगाने फिरत आहे, असे जाणवले. ही स्थिती काही सेकंद जाणवली. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळत होता. त्या वेळी त्या चक्राचा अर्थ कळला नाही. दुसर्‍या दिवशी दैनिक सनातन प्रभात वाचल्यानंतर लाल चक्राची केवढी मोठी अनुभूती प.पू. गुरुदेवांनी दिली, याची जाणीव होऊन भावजागृती झाली आणि एवढी मोठी अनुभूती अन् चैतन्य दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त झाली. गुरुदेव किती दयाळू आहेत ! प्रार्थना केल्यावर एवढ्या दूर असलेल्या या पामर साधिकेला तिच्या हाकेला ईश्‍वर धावून येतो आणि ईश्‍वर माझ्याजवळच आहे, ही मोठी अनुभूती दिली.
सौ. जयश्री देशपांडे, नागपूर

रामनाथी आश्रमात झालेल्या कळसारोहणाच्या आदल्या दिवशी सौ. सारिका आय्या यांना आलेल्या अनुभूती

सौ. सारिका आय्या
१. नामजप करतांना कळसांचे दर्शन होऊन भावजागृती होणे आणि
 ब्रह्मा-विष्णु-महेश ही तीनही तत्त्वे रामनाथी आश्रमातून कार्यरत होणार
 असून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची पहाट होणार असल्याचे जाणवणे
     ८.५.२०१६ या रात्री ८ वाजता मी देवद आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत होते. त्या वेळी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेल्या कळसांचे मला दर्शन झाले आणि माझी भावजागृती व्हायला लागली. हे तीनही कळस म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे जाणवले. ब्रह्मा म्हणजे सृष्टीचा निर्माणकर्ता, विष्णु म्हणजे सृष्टीचा पालनहार, तर महेश म्हणजे सृष्टीचा लयकर्ता. ही तीनही तत्त्वे रामनाथी आश्रमात कार्यरत होणार असून अक्षय्य तृतीयेला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची पहाट होणार असल्याचे जाणवले.
२. ध्यानमंदिरातील शक्ती, चैतन्य आणि आनंद यांचे प्रतीक असलेले तीन कळस !
अ. तीन कळसांतील एक शक्तीचा कळस असून तेथून हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी संपूर्ण विश्‍वात शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे दिसत होते.
आ. चैतन्याचे प्रतीक असलेल्या कळसाच्या माध्यमातून देवतांचे चैतन्य संपूर्ण विश्‍वात पसरून रामनाथी आश्रम हे संपूर्ण जगात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याचे जाणवत होते.
इ. ध्यानमंदिरातील आनंदरूपी कळस स्थापन होणार असल्याचे जाणवत होते. शक्ती आणि चैतन्य यांनी भारित झाल्यावर जसा साधक आनंदी होतो, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प.पू. डॉक्टर, साक्षात् भगवान श्रीहरि विष्णु, हे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेचे चित्रीकरण करून चित्रफितींच्या माध्यमातून समाजाला सांगत आहेत. हे सर्व येथूून साकार होत आहे; म्हणून आनंदाचा कळस स्थापन होणार आहे, असे दिसत होते.

रामनाथी आश्रमात कळसारोहण विधीच्या कालावधीत विचारलेल्या प्रश्‍नांना श्रीकृष्णाने सूक्ष्मातून उत्तरे दिल्याने भाव जागृत होणे

     
सनातनचे कार्य विश्‍वव्यापी व्हावे, यासाठी आश्रमावर 
स्थापन करण्यात आलेल्या ३ कळसांपैकी १ कळस
      ९.५.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे तीन विविध ठिकाणी कळस बसवण्याचा सोहळा दुपारी १२.१५ ते १.४५ या कालावधीत पार पडला. या दिवशी साधकांना अधिकाधिक प्रार्थना करायला सांगण्यात आले होते. त्या सोहळ्याच्या कालावधीत कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका सौ. शिल्पा कोठावळे यांना कोल्हापूरला असतांना आलेली अनुभूती येथे देत आहोत.
     दुपारी साधारण १२.२० पासून दुपारी २ पर्यंत माझ्याकडून भावपूर्ण नामजप आणि प्रार्थना होत होत्या. त्या कालावधीत मी श्रीकृष्णाला प्रश्‍न विचारत होते आणि तो उत्तरे देत होता. त्या वेळी मी रामनाथी आश्रमात विधीच्या ठिकाणीच आहे, असे मला दिसले.
मी : या विधीनंतर आश्रमाला मंदिराचे स्वरूप येणार आहे, असे महर्षींनी सांगितले आहे; पण आताही आश्रमात सात्त्विकता आहे. मग कळसामुळे काय पालट होणार ?
श्रीकृष्ण : प.पू. डॉक्टर स्वतः रहात असलेली खोली म्हणजे मंदिराचा आतील गाभारा आहे. प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या समोरची मार्गिका म्हणजे बाहेरचा गाभारा आहे. प.पू. डॉक्टर साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत.

उपजतच देवाची आवड असणारा आणि सूक्ष्मातील कळणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला विरार (ठाणे) येथील चि. वेद विनोद गायकवाड (वय १ वर्ष) !

   
    विरार (ठाणे) येथील श्री. विनोद गायकवाड यांचा सुपुत्र चि. वेद विनोद गायकवाड याचा वैशाख शुक्ल पक्ष त्रयोदशी (१९.५.२०१६) या दिवशी तिथीनुसार पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. विभूती गायकवाड आणि आत्या कु. स्वाती गायकवाड यांना त्याच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहोत.
चि. वेद गायकवाड याला सनातन परिवाराकडून
 प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणी
१ अ. बाळ पोटात असतांना घरी साधकांचा सत्संग मिळणे : बाळ माझ्या पोटात असतांना प्रथमच साधक आमच्या घरी आकाश कंदील बनवण्याची सेवा करायला आले होते. धर्मरथसुद्धा पहिल्यांदाच विरार (पश्‍चिम) परिसरामध्ये आला होता. त्याचप्रमाणे धर्मरथासमवेत रहाणार्‍या साधकांच्या रहाण्याची सोय आमच्या घरीच केली होती. त्यामुळे बाळ पोटात असतांनाच त्याला साधकांचा सत्संग लाभला.
१ आ. मला प.पू. भक्तराज महाराजांची भजने ऐकायला आवडत असत.
१ इ. माझ्याकडून काही दिवस प्रतिदिन श्रीमद्भगवत्गीतेचे वाचन झाले.

- सौ. विभूती विनोद गायकवाड (चि. वेदची आई), विरार, ठाणे.

देवी कृतज्ञते, परत ये मज दर्शन देण्याला !

आधुनिक वैद्य 
दुर्गेश सामंत
     एकदा भगवंताने मला साधनापथावर कसे राखले ?, ते स्मरून कृतज्ञतेचे अश्रू आले. पुढे अल्पावधीत कृतज्ञतेची ती जाणीव नाहीशी झाली. त्या वेळी देवाने पुढील काव्यपंक्ती सुचवल्या. देवी कृतज्ञते, दोन अश्रूंनी शांतविले मम चित्ताला ।

निमिष ते बनावे जीवन वाटले मजला ॥ १ ॥
जलधारांची आस लागली ।
अखंड वेदनांच्या निखार्‍यांना ॥ २ ॥
देवी कृतज्ञते, परत ये मज दर्शन देण्याला ।
दोन अश्रूंचे ते निमिष परत एकदा देण्याला ॥ ३ ॥
- आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०१४, सायं. ६.३०)

देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्रावर किरणोत्सवाप्रमाणे सूर्याचा प्रकाश पडणे

     २६.२.२०१६ या दिवशी नाटे, जिल्हा रत्नागिरी येथील आमच्या घरातील देवघरासमोर नामजप करण्यासाठी बसल्यावर श्रीकृष्णाच्या चित्रावर सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सूर्याची किरणे येत आहेत, असे लक्षात आले. देवतेच्या किरणोत्सवाप्रमाणे श्रीकृष्णाच्या मुखावर किरण पडले आणि हळूहळू संपूर्ण चित्र प्रकाशमय होत होते.
असे सलग काही दिवस होत आहेे. घरातील स्पंदनेही चांगली जाणवत आहेत.
- श्री. विवेक नाफडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

महर्षींनी सांगितलेला नामजप करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. स्थूल स्तरावर जाणवलेली सूत्रे
श्रीमती वाघमारे
१ अ. चार नामांचा एकत्रित जप असल्याने चारही जपांचा क्रम लक्षात ठेवून जप करावा लागत असणे : १३.३.२०१६ या दिवशी सायंकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नवीन नामजप करत असतांना चार नामांचा एकत्रित जप असल्याने चारही जपांचा क्रम लक्षात ठेवून करावा लागत होता, नाहीतर क्रम चुकत होता किंवा अडखळायला होत होते.
१ आ. जपाचे स्वरूप मंत्रजपासारखे असणे : सेवा करतांना आधीचे जप मधूनच आतून चालू असल्याचे जाणवत होते. या जपाचे स्वरूप मंत्रजपासारखे वाटते. त्यामुळे जरी जपाचा पहिला चरण आतून आला, तरी पुढील तीन चरण पूर्ण होतांना सेवा आपोआप थांबते आणि जपाचे आवर्तन पूर्ण करण्याकडे लक्ष जाते.
२. सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
२ अ. मन लवकर एकाग्र होणे आणि जपाची लय धरल्यानंतर तो सहजतेने होऊ लागणे : १४.३.२०१६ या दिवशी पहाटे जप करतांना मनात येणारे विचार थांबले. माझे मन लवकर एकाग्र झाले. जप एकदा चालू झाल्यानंतर तो थांबू नये, असे मला वाटले. जपाची लय एकदा धरल्यानंतर तो सहजतेने होऊ लागला. त्यानंतर सकाळी बुद्धीची सेवा करतांना जप करायला कठीण जात असले, तरी जपाची ओढ लागून राहिली होती.

महर्षींना तळमळीने प्रार्थना केल्यावर त्यांचे दर्शन होऊन त्यांनी सांगितलेला नामजप भावपूर्ण होऊ लागल्याची अनुभूती घेणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दादा दामले (वय ८१ वर्षे) !

श्री. दादा दामले
१. महर्षींनी सांगितलेला नवीन जप मनास समाधानकारक असा होत 
नसणे आणि त्यामुळे महर्षींनीच तो आपल्याकडून करवून घेण्यासाठी 
अन् दर्शन देऊन मन स्थिर करण्यासाठी त्यांना तळमळीने प्रार्थना करणे
     मी दिनांक १३.३.२०१६ या दिवसापासून महर्षींच्या आज्ञेप्रमाणे नवीन नामजप करायला आरंभ केला. कदाचित् माझी तेवढी पात्रता नसल्यामुळे प्रयत्न करूनही २ दिवस तो जप माझ्या मनाप्रमाणे होत नव्हता. यासंदर्भात मार्गदर्शन मिळण्यासाठी मी रामनाथी आश्रमात दूरभाष केला. तेव्हा जप नवीन असल्यामुळेे तो होत नसल्यास वाचून करावा, असे मार्गदर्शन मिळाले. तेव्हापासून तो जप तसा करू लागलो. एक - दोन दिवस झाल्यानंतर मी महर्षींना तळमळीने प्रार्थना केली, मला आपले दर्शन झालेले नाही. त्यामुळे माझे मन अस्थिर आहे. मन आपल्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी मला मार्गदर्शन करावे आणि माझ्याकडून समष्टी साधना म्हणून नामजप करवून घ्यावा.

पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन इत्यादींची तातडीने आवश्यकता !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सनातनच्या आश्रमांत पावसाळ्यापूर्वीच्या सिद्धतेसाठी आगाशी, पायर्‍या, तात्पुरत्या निवारा शेड, तसेच अन्य साहित्य झाकून ठेवण्यासाठी नवीन किंवा वापरलेले फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन, मॅटिंग किंवा अन्य तत्सम साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. वापरलेले किंवा किरकोळ दुरुस्तीने वापरण्यायोग्य होणारेे साहित्यही चालेल. नवीन फ्लेक्स किंवा सिलपोलीन सवलतीच्या दराने उपलब्ध होत असल्यास साधकांनी तसे कळवावे.
     वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य अर्पण अथवा सवलतीच्या दराने देऊन धर्मकार्यास हातभार लावायचा असेल, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना ८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सनातन पंचांगाची अभ्यासपूर्वक मागणी नोंदवून परिपूर्ण सेवा करा !

जिल्हासेवक, वितरक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाची मागणी सर्व जिल्ह्यांनी २०.५.२०१६ या दिवसापर्यंत कळवणे अपेक्षित आहे. मागणी नोंदवतांना लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे देत आहे.
 १. मागील वर्षीची मागणी आणि वितरण अन् जिल्ह्याची सद्य:स्थिती यांचा अभ्यास करून, तसेच समाजापर्यंत अधिकाधिक पंचांग पोचावेत, यासाठी साधकांना उद्युक्त करून जिल्हासेवकांनी अंतिम मागणी देणे आवश्यक आहे.
२. सर्वच पंचांगाचे वितरण १५.११.२०१६ या दिवसापर्यंत, तर त्याची येणे बाकी ३०.११.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करावी. प्रायोजित केलेल्या पंचांगांची येणे बाकी पूर्ण झाली, तरी त्या पंचांगांचे वितरण ३०.११.२०१६ या दिवसापर्यंतच पूर्ण करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्वच पंचांगांचे वितरण आणि येणे बाकी दिलेल्या समयमर्यादेत पूर्ण होईल, अशा दृष्टीने अभ्यास करून जिल्हासेवकांनी मागणी नोंदवावी.
३. काही साधक आम्ही पंचांग वैयक्तिक स्तरावर विकत घेऊन नंतर सवडीने त्याची विक्री करू शकतो का ? असे विचारतात. नोव्हेंबर २०१६ पासून हिंदु धर्मजागृती सभांना आरंभ होणार आहे, तसेच साधकांना त्या कालावधीत अन्य उपक्रम राबवून धर्मप्रसार करण्याच्या अमूल्य संधीचाही लाभ करून घ्यायचा आहे. त्यामुळे साधकांनी नोव्हेंबर २०१६ नंतर केवळ पंचांग वितरणाची सेवा न करता अन्य सेवांमध्येही सहभागी व्हावे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो 
आनंद आहे, तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
भावार्थ : आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. मी दुःखी आहे म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
राज्य किंवा केंद्र शासनात सरकारी नोकरी करणार्‍यांना त्यांची कार्यक्षमता अल्प होते, असे समजून अनुक्रमे ५८ व्या किंवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त करतात. हाच नियम खाजगी आस्थापनांतील व्यक्तींना आणि विशेषतः लोकप्रतिनिधींना का लावत नाहीत ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्‍या चुका 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
तुमच्यातील स्वभावदोष तुम्हाला सांगणारा तुमचा खरा मित्र आणि हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शापित वास्तू !

संपादकीय 
     गोवा राज्यातील वृद्धाश्रमांच्या कमतरतेमुळे तेथे प्रवेशासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती नुकतीच उघड झाली. उणे-अधिक प्रमाणात ही परिस्थिती सर्वत्र आहे. जी ठिकाणे ओस पडायला हवीत ती भरभरून वाहू लागत असतील, तर आपण नेमकी कोणती प्रगती साध्य करत आहोत, हा अस्वस्थ करणारा प्रश्‍न सातत्याने भेडसावत रहातो. जन्मदात्या आईवडिलांचे आपण काही देणे लागतो, ही भावनाच नष्ट झाल्यामुळे आज वृद्धाश्रमांची निर्मिती झपाट्याने होत आहे. म्हणूनच भौतिक सुखाकडे झुकणार्‍या आणि कर्तव्यांशी प्रतारणा करणार्‍या आजच्या समाजजीवनात ज्येष्ठ नागरिकांवर आत्मसन्मानाशी तडजोड करून जगण्याची वेळ आली आहे.

मुलायमसिंह यांचे अमरप्रेम !

संपादकीय
      राजकारणात कुणीही कुणाचा मित्र आणि शत्रू नसतो, या तत्त्वहीनतेच्या सिद्धांतावरच भारतीय राजकारणाची वाटचाल चालू आहे. राजकारण ही नाण्याची एक बाजू असेल, तर तत्त्वहीनता ही त्याची दुसरी बाजू आहे. तत्त्वहीनतेशिवाय राजकारण अपूर्ण आहे, अशी आजची दुर्दैवी परिस्थिती आहे. कुठलाही पक्ष यास अपवाद नाही. उत्तरप्रदेशमधील मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षाने त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेले अमरसिंह यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित केली आहे. गंमत म्हणजे ६ वर्षांपूर्वी याच समाजवादी पक्षाने अमरसिंह यांनी पक्षाचा विचका केला आहे, असा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn