Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संसदेत राममंदिराविषयी कायदा करण्यासाठी विहिंप खासदारांना भेटणार !

सत्ता हाताशी असणार्‍या भाजपने आतापर्यंत राममंदिरासाठी
 कायदा केला असता, तर विहिंपवर ही वेळ आली नसती !
     नवी देहली - संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात राममंदिराविषयी कायदा करण्यासाठी सर्व खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेणार असल्याचे विहिंपने घोषित केले आहे. राममंदिर उभारण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचेही विहिंपने स्पष्ट केले आहे. भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एका शून्य प्रहरात राममंदिराचे सूत्र उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता; पण उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी त्यांना अनुमती नाकारली. यावर डॉ. स्वामी यांनी पावसाळी अधिवेशनात मी राममंदिरावर स्वतंत्र चर्चाच घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सूत्र न्यायालयाच्या नव्हे, तर संसदेच्याच कक्षेत येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर विहिंपनेही हे सूत्र अधिक उचलून धरले आहे.
कायदा संसदच करणार असल्याने न्यायालयीन निर्णयासाठी 
आता थांबणे व्यवहार्य ठरणार नाही ! - सुरेंद्र जैन, सहसरचिटणीस, विहिंप
     विहिंपचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन म्हणाले, विहिंपने राममंदिरासाठी ३१ डिसेंबर ही समयमर्यादा निश्‍चित केली आहे. त्यापूर्वीचे अखेरचे अधिवेशन म्हणजे पावसाळी अधिवेशन असेल. विहिंप अधिवेशनापूर्वी प्रत्येक खासदाराला स्वतंत्रपणे भेटणार आहे. केंद्रातील सत्तारूढ भाजपने राममंदिराचा निर्णय पूर्णपणे न्यायालयावर सोपवल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जैन म्हणाले की, न्यायालयाने निर्णय दिला, तरी कायदा करण्यासाठी शेवटी हे सूत्र संसदेतच येणार आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयासाठी आता थांबणे व्यवहार्य ठरणार नाही.

काँग्रेसच्या काळात नौदलाच्या नौका खरेदीतही घोटाळा झाल्याची शक्यता !

     नवी देहली - काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात झालेल्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यानंतर आता नौदलाच्या नौका खरेदी प्रकरणातही घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
१. काँग्रेस शासनाने वर्ष २००९ मध्ये आयएन्एस् दीपक आणि वर्ष २०११ मध्ये आयएन्एस् शक्ती या २ नौका इटलीमधील आस्थापनाकडून नौदलासाठी खरेदी केल्या होत्या. त्या वेळी ए.के. अँथनी संरक्षणमंत्री होते.
२. काँग्रेस शासनावर आरोप केला जात आहे की, त्यांनी या आस्थापनाला नियमांमध्ये विशेष सूट दिली होती. यात नौकांच्या बांधणीसाठी निकृष्ट दर्जाचे स्टील वापरण्याची अनुमती देण्यात आली होती. (नौदलाच्या नौकांसाठी अशी अनुमती देणे, म्हणजे शत्रूराष्ट्राला साहाय्य करण्यासारखेच आहे. - संपादक)
३. नौदलाच्या एका अधिकार्‍याने या प्रकरणी आवाज उठवला होता आणि चौकशीची मागणी केली होती; मात्र त्यावर कोणतीही कृती झाली नाही.
४. २०१०मध्ये लेखापरीक्षकांनी या करारावर टीका करतांना काही प्रश्‍न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी काँग्रेस शासनावर इटलीच्या आस्थापनाला लाभ होणारे धोरण राबवल्याचा आरोप केला होता.

मुसलमानांच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी शिवमंदिर झाकले !

मुसलमानांसाठी मंदिर झाकण्याची वेळ यायला हा भारत आहे कि पाक ?
      पुणे - येथील गंजपेठेत असणार्‍या सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी १४ मे या दिवशी सायंकाळी मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या मुसलमानांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम होत असतांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळाच्या जवळच असलेले एक शिवमंदिर मात्र पांढर्‍या कापडाने झाकून ठेवले होते. (पोलिसांनी मंदिर झाकण्यामागे मुसलमानांच्या जमावाकडून मंदिराला हानी पोहोचवली जाण्याची भीती होती का ? कि मुसलमानांच्या भावना सांभाळण्यासाठी जाणीवपूर्वक पोलिसांनी ही कृती केली ? कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवर कारवाई न करता त्यांच्या भीतीपोटी पोलिसांकडून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची मानहानी करणे कितपत योग्य ? - संपादक)
या संदर्भात काही प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी सांगितलेली माहिती अशी,
१. या शिवमंदिरात नित्यनेमाने पूजाअर्जा होते. मुसलमानांच्या कार्यक्रमासाठी मंदिर झाकून ठेवण्याचे काय कारण ? दुसर्‍या दिवशी मंदिरावरील कापड काढून टाकण्यात आले होते.
२. मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
३. कार्यक्रमासाठी येणार्‍या अन्य धर्मीय व्यक्तींचे पोलिसांकडून नाव, संपर्क क्रमांक टिपून घेण्यात येत होते.

उज्जैन सिंहस्थक्षेत्री संतांच्या पदस्पर्शाने पुनित होत असलेले सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन !

श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती यांचा
सन्मान करतांना पू. डॉ. पिंगळे
     उज्जैन - सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन संतांच्या कृपादृष्टीने न्हाऊन निघाले आहे. जवळपास प्रत्येक दिवशी संतांचे चरणधुळीने प्रदर्शन पावन होत आहे. तीव्र वादळी पावसामुळे आणि नैसर्गिक संकटामुळेही प्रदर्शन खंडित झाले नाही. 
     १३ मे २०१६ या दिवशी सकाळी रायपूर, छत्तीसगड येथील प्रेम प्रकाश मंडलचे स्वामी हेमंत प्रकाशजी यांनी त्यांच्या शिष्यांसह भेट दिली, तर संध्याकाळी अखंडानन्द आश्रम, मोतीझील, वृन्दावन, उत्तरप्रदेशचे महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती आणि त्यांच्या नंतर प.पू. देवराहा बाबा यांचे शिष्य स्वामी नारायणदास आणि अस्सी घाट, वाराणसी येथील स्वामी वासुदेवदास यांचे आगमन झाले. सर्व संतांचे आगमन आणि आशीर्वचन यांमुळे प्रदर्शनातील सर्व साधकांच्या उत्साहात वृद्धी झाली.

इसिसमध्ये भरती होणार्‍या अमेरिकेतील तरुणांच्या संख्येत लक्षणीय घट !

     वॉशिंग्टन - इसिसमध्ये भरती होणार्‍या अमेरिकेतील तरुणांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे वक्तव्य अमेरिकेतील अन्वेषण संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (एफ्बीआय)चे प्रमुख जेम्स कॉमे यांनी केले आहे. १० मे या दिवशी पत्रकारांना माहिती देतांना कॉमे पुढे म्हणाले, इसिसचा अमेरिकेतील तरुणांवर असलेला प्रभाव मोठ्या प्रमाणात न्यून झाला आहे. परिणामी गेल्या वर्षभरात अमेरिकेतील तरुणांची इराक आणि सिरिया येथे भरती करण्याची इसिसची क्षमता प्रचंड प्रमाणात उणावली आहे. कॉमे यांनी या वेळी स्पष्ट केले की, सामाजिक संकेतस्थळांवरून मात्र असमाधानी तरुणांना (ट्रबल्ड माइन्ड्सना) इसिसकडे ओढण्याचे प्रयत्न चालू असून एफ्बीआय सध्या अशा १ सहस्र प्रकरणांचे अन्वेषण करत आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसादाच्या किमतीत ३ रुपयांची वाढ !

कळंबा कारागृहातील बंदीवान प्रसादाचे लाडू बनवणार !
     कोल्हापूर - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या भक्तांना लाडू प्रसाद १६ मेपासून नियमितपणे देण्यात येणार आहे; मात्र लाडूच्या किमतीत ३ रुपये वाढ केली असून तो आता भक्तांना ८ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा लाडू प्रसाद ५ रुपये प्रतिनगाप्रमाणे मिळत होता. कळंबा कारागृहातील बंदीवानांकडून हे लाडू बनवून घेतले जाणार आहेत. त्यांना त्याचा मोबदलाही मिळणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी बंदीवानांकडून लाडू बनवून प्रसादरूपात भक्तांना देण्यास विरोध दर्शवला होता.   
      गेल्या काही मासांपासून श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना प्रसादरूपाने काय द्यायचे यावरून वाद चालू होता. जिल्हाधिकार्‍यांनी भक्तांना लाडू प्रसाद देण्याचा विचार व्यक्त केला होता, तर त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी बंदीवानांनी बनवलेले प्रसादाचे लाडू भक्तांना देण्यास विरोध दर्शवला होता. अखेरीस जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित सैनी यांनी लाडू प्रसाद म्हणून देण्याचे निश्‍चित केले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती त्याची कार्यवाही करणार आहे. लाडू पुरवण्यासाठी कारागृहाच्या प्रशासनाकडे मागणी नोंदवण्यात आली आहे. कारागृह प्रशासन आता १६ मेपासून देवस्थान समितीकडे मागणीप्रमाणे लाडू प्रसाद बांधणीसह (पॅकिंग) ७ रुपये प्रतिनग या किमतीत पुरवणार आहे, तर देवस्थान ८ रुपये प्रतिनग याप्रमाणे भक्तांना हा प्रसाद विकणार आहे.

सुरत येथे डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्या चुलत भावासह तिघांची चाकूने भोसकून हत्या

गुजरातमध्येही हिंदु नेते असुरक्षित !
     सुरत - विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा चुलत भाऊ भरत तोगाडिया, तसेच बालू हिरान आणि अशोक पटेल अशा एकूण तिघांची १४ मे या दिवशी सुरतमधील वराछा भागात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या तिघांचे मृतदेह भरत तोगाडिया यांच्या मित्राच्या कार्यालयाच्या परिसरात मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी मेहुल भरवाड, लालू भरवाड आणि इमरान या ३ संशयितांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे. अनेक संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून वराछा भागातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भरत तोगाडिया यांचे सख्खे भाऊ प्रफुल्ल तोगाडिया हे सुरत महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते आहेत.

हिंदु आतंकवाद अस्तित्वात नाही ! - काँग्रेसचे नेते शशी थरूर

शशी थरूर इतकी वर्षे हे का बोलले नाहीत ?
हिंदूंना आतंकवादी ठरवणार्‍या काँग्रेसला घरचा अहेर ! 
     नवी देहली - माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, हिंदु आतंकवाद यासारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. हिंदुत्वाच्या कोणत्याही व्याख्येद्वारे कोणीही संघटित आतंकवादी कारवाया करू शकत नाही. 
    साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने निर्दोष ठरवत आरोपपत्रातून त्यांचे नाव वगळल्याची बातमी अमेरिकेतील दैनिक वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यावर थरूर यांनी वरील ट्विट केले. थरूर पुढे लिहतात की, दिशाहीन असणारे गुन्हेगार हिंदु असू शकतात. हिंदु आतंकवाद हा शब्द पत्रकारांच्या वैचारिक आळशीपणाचा उगम आहे.

प्रदर्शन पाहून प्रभावित झालेल्या जिज्ञासूंनी दाखवले अनेक जिज्ञासूंना सनातनचे प्रदर्शन !

प्रदर्शनाचा प्रसार करणारे खरे जिज्ञासू हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !
उज्जैन येथील सनातन संस्थेचे प्रदर्शन पहाण्यासाठी ९ वेळा जिज्ञासूंना आणणार्‍या 
सौ. रजनी रमेश लोहार आणि ४ वेळा आणणार्‍या कु. निकिता बोडाना ! 
सौ. रजनी रमेश लोहार
कु. निकिता बोडाना
    उज्जैन - सिंहस्थ क्षेत्रामध्ये नया गुजराती लोहार समाज यांच्या वतीने एक मांडव उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आलेल्या सौ. रजनी रमेश लोहार (अंदाजे ५० वर्षे) यांनी सनातन संस्थेचे प्रदर्शन एकदा पाहिल्यावर त्या इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी स्वतःला समजलेली माहिती अन्य आपल्या सहकार्‍यांना समजावी; म्हणून सलग ९ वेळा अनेक जिज्ञासूंना प्रदर्शन पाहण्यासाठी त्या घेऊन आल्या. अन्य सहाकार्‍यांचे प्रदर्शन पाहून होईपर्यंत त्या बसून रहातात. पुन्हा नव्या जिज्ञासूंना प्रदर्शन पहाण्यासाठी घेऊन येतात.

लंडनचे पहिले मुसलमान महापौर सादिक खान यांनी घेतले भगवान श्रीकृष्णाचे दर्शन !

     लंडन - येथील पहिले मुसलमान महापौर सादिक खान यांनी येथील स्वामीनारायण मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. खान हे पाक वंशाचे आहेत. खान यांनी फेसबूकवर म्हटले आहे की, स्वामीनारायण मंदिर हे माझ्या आवडत्या स्थानांपैकी एक आहे. हे मंदिर स्थानिक लोकांच्या समर्पणाचे प्रतिरूप असून भारताबाहेर हे भव्य हिंदु मंदिर बांधण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. (आतंकवादी हिंदु मंदिरांवर आक्रमण करण्याची शक्यता असल्याने त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणेही आवश्यक आहे. काळानुसार नवीन मंदिरे बांधण्यापेक्षा हिंदूंनी तीच शक्ती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी दिल्यास पुढे हिंदूंना आनंदाचे जीवन जगता येईल, पर्यायाने हिंदु मंदिरे आणि संस्कृती यांची आपोआपच जपणूक होऊ शकेल ! - संपादक)

चिली देशात देशभक्तीचा भाव अल्प पडल्याच्या आरोपामुळे निवेदकाची हकालपट्टी !

      चिली - एका चर्चासत्राच्या वेळी देशभक्तीचा भाव अल्प पडल्याच्या आरोपामुळे येथील दूरचित्रवाहिनीच्या निवेदकाची हकालपट्टी करण्यात आली. दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात पेरू या देशातील एका मद्य निर्मात्याशी संवाद साधतांना पेरूच्या ब्रॅन्डीला पिस्को संबोधून ख्रिश्‍चयन पिनो या निवेदकाने उघडपणे देशद्रोह केल्याचे चिलीच्या एका मद्य निर्मात्यांच्या संघटनेने म्हटले आहे. बीबीसी या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिका खंडातील चिली आणि पेरू या देशांमध्ये अनेक शतकांपासून पिस्कोया नावावरून वाद चालू आहे. पेरूच्या मते पिस्को हा पेरूचे भौगोलिक क्षेत्र दर्शवतो, तर चिलीच्या मते पिस्को ही द्राक्षांपासून निर्माण होणार्‍या ब्रॅन्डीची एक जात आहे.

(म्हणे) राजकीय दबावामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण पूर्ण होणार नाही !

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांचा जावईशोध
     तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्ते यांच्या दबावामुळे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण आरंभापासूनच भरकटवण्यात आले. या हत्येच्या प्रकरणात सनातनला गोवण्यासाठी ८०० हून अधिक निरपराध साधकांची नाहक चौकशी करून त्यांचा छळ करण्यात आला. त्यामुळे खर्‍या गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोचू शकले नाहीत. याविषयी डॉ. हमीद दाभोलकर काही बोलतील का ?
     सांगली - अन्वेषण यंत्रणांवर राजकीय शक्तींचा दबाव आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा शासकीय सूचनांनुसार काम करत आहे. सर्वच अन्वेषण यंत्रणांमधील अन्वेषण अधिकार्‍यांचे स्थानांतर (बदली) करण्यात आले आहे. त्यामुळे गोपनीय माहिती असलेले अधिकारी अन्वेषणासाठी उपलब्धच नाहीत. त्यामुळे आमची पक्की खात्री पटली आहे की, या हत्येचे अन्वेषण कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही मॉर्निंग वॉक काढला आहे. आता आम्ही आमची लढाई विचारांच्या स्तरांवर लढू, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. १५ मे या दिवशी सकाळी अंनिसच्या वतीने मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. (इरशतजहाँ प्रकरणात आता ती आतंकवादी होती, हे विविध मार्गांनी समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकाळात या प्रकरणी झालेल्या अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप होता, याविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना काय म्हणायचे आहे ?- संपादक)

श्री महालक्ष्मीदेवीच्या भक्तांच्या धर्मभावना वारंवार दुखवणार्‍या डॉ. अमित सैनी यांना तात्काळ जिल्हाधिकारी पदावरून हटवा !

कैद्यांकडून बनवलेले लाडू प्रसाद म्हणून देण्यास हिंदु जनजागृती समितीचा विरोध कायम !
     कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेले लाडू करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्याला भाविकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी वारंवार विरोध केला आहे. तरीही याची दखल न घेता या धर्मद्रोही निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून (१६ मे २०१६) करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांचा निर्णय धिक्कारास्पद आहे. कैद्यांकडून श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद बनवून घेण्याचे सुतोवाच डॉ. सैनी यांनी केल्यानंतर कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ आणि आध्यात्मिक दृष्टीने तमप्रधानही असते. देवाचा प्रसाद ग्रहण केल्याने ईश्‍वरी चैतन्य मिळते, असे धर्मशास्त्र सांगते आणि भाविकांचा तसा भाव असतो. धर्मशास्त्रानुसार कोणताही प्रसाद बनवतांना शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असते. शुचिर्भूततेच्या नियमांमध्ये स्नानादी कृत्ये, शाकाहार आणि मासिक धर्माचे पालन आदी गोष्टी अंतर्भूत असतात. कारागृहातील कैद्यांकडून या नियमांचे पालन होईल, याचे दायित्व कोण घेणार ? तसेच कारागृहात कैद्यांमध्ये अन्य धर्मीय कैद्यांचा समावेशही असल्यामुळे त्यांचा देवतेप्रती भाव असेलच, असे गृहित धरता येत नाही, असे आक्षेप हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे नोंदवले होते.

चंडी, दुर्गेचे रूप धारण करून धर्मद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी सिद्ध होऊया ! - पू. (कु.) अनुराधा वाडेकर

मुंबई येथे धर्मरक्षण परंपरा चळवळीला प्रारंभ !
     मुंबई, १५ मे (वार्ता.) - आजही देशाने रणरागिणींना जन्माला घालणे बंद केलेले नाही. धर्मपरंपरांना विरोध करणार्‍या महिला आहेत, त्यामुळे दुर्गा, चंडी यांचे रूप धारण करणार्‍या रणरागिणीही आहेत. आता चंडी, दुर्गा यांचे रूप धारण करून धर्मद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी सिद्ध होऊया, असे आवाहन सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या धर्मरक्षण परंपरा चळवळीस १४ मे या दिवशी मुंबई येथे प्रारंभ झाला. या निमित्त लोअरपरेल येथील शिवानंद सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, ज्येष्ठ पत्रकार सौ. शीतल करदेकर, रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्र्रतीक्षा कोरगावकर, मुंबई जिल्हा संघटक सौ. मनाली नाईक या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला २०० हून अधिक महिलांची उपस्थिती होती.

पुराण साहित्य डोळसपणे समजून घ्यायला हवे ! - डॉ. गो.बं. देगलूरकर

पुराणांना हिणवणार्‍या कथित बुद्धीवाद्यांना चपराक !
     पुणे - भारतात सरस्वती नदीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. या नदीवर आधारित संशोधनामुळे पुराणातील अनके गोष्टींमध्ये तथ्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. त्यामुळे सरस्वती नदीविषयी आणखी संशोधन करण्याला वाव आहे. पुराणात सांगितल्याप्रमाणे भारतीय संस्कृती अत्यंत प्रगल्भ होती; परंतु आपल्याकडील लोकांना आजही इंग्रजांनी सांगितलेला इतिहास अधिक जवळचा वाटतो. पुराणातील गोष्टींना भाकड कथा मानून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. असे न करता डोळसपणे पुराण साहित्य समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी केले. शरच्चंद्र लिमये लिखित आणि सरस्वती नदी लुप्त झाली... गुप्त झाली या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांचे धार्मिक अपराध लक्षात ठेवा !

अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
१. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीचा भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद कळंबा कारागृहातील कैद्यांकडून बनवण्याची घोषणा !
२. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीलेपनाला विरोध करणार्‍या धर्मप्रेमींच्या नवीन मूर्ती बसवण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावून अशास्त्रीय पद्धतीने मूर्तीवज्रलेपन होऊ दिले.
३. पुरातत्व खात्याने मनकर्णिका कुंडावरील अवैध शौचालय हटवावे, असा अहवाल दिलेला होता, तसेच हिंदूंचीही तीच मागणी होती. असे असतांना अवैध शौचालय हटवण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत.
४. आधुनिकतावादी महिलांना श्री महालक्ष्मी मंदिरातील गर्भगृहात पोलीस संरक्षणात प्रवेश दिला; मात्र या धर्मद्रोही महिलांना विरोध करणार्‍या भाविक महिलांना ज्या पोलिसांनी बळाचा वापर करून अन्याय्य पद्धतीने फरफटत देवळाबाहेर काढले, त्या पोलिसांवर कोणतीही कारवाई केली नाही.

देशद्रोह्यांचे उघड समर्थन करणार्‍या राज्यकर्त्यांना त्यांची पात्रता दाखवून द्या ! - विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती

धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही यांच्या विरोधात लढा देण्याचा शिरसोली (जिल्हा जळगाव) 
येथील हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमान्यांनी केला निर्धार !
दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. विजय पाटील,
कु. रागेश्री देशपांडे आणि श्री. प्रशांत जुवेकर
      जळगाव, १५ मे (वार्ता.) - सध्या भारतात देशद्रोह्यांचे उघड समर्थन करण्याची एक देशविघातक टुम निघाली आहे. देशद्रोही याकूबच्या समर्थनार्थ सहस्रो मुसलमान रस्त्यावर आले. याकूब, कन्हैया, लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असलेल्या इशरतजहाँ हिचेही आज आपल्या देशातील काही देशद्रोही राज्यकर्ते उघड समर्थन करत आहेत. हिंदूंनो, आपण संघटित होऊन या राज्यकर्त्यांना त्यांची पात्रता दाखवून देण्याची आज आवश्यकता आहे, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी मांडले. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे १४ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला श्री. विजय पाटील यांच्यासमवेत रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. दीपप्रज्वलनाने या सभेचा शुभारंभ झाला. सभेचे सूत्रसंचालन कु. तेजस्विनी तांबट आणि कु. पूजा जाधव यांनी केले. या सभेचा लाभ ८०० हून अधिक धर्माभिमान्यांनी घेतला.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे १५ मंदिरे हटवली !

मंदिरे हटवण्याला नागरिकांचा तीव्र विरोध !
     इचलकरंजी, १५ मे (वार्ता.) - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीम नगरपालिकेने दोन दिवसांपासून आरंभली आहे. नगरपालिकेने १४ मे या दिवशी शहरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेली ४ मंदिरे हटवली. 
    १४ मे या दिवशी बावणे गल्लीतील विघ्नेश्‍वर मंदिर पाडण्यासाठी आलेल्या नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना या भागातील नागरिकांनी जोरदार विरोध केला. नगरपालिकेने मंदिरासाठी पर्यायी भूमी उपलब्ध करून दिल्यानंतरच त्या ठिकाणी मंदिराचे स्थलांतर केले जाईल, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे मंदिराशेजारीच असणार्‍या नगरपालिकेच्या भूमीत मंदिर स्थलांतरित करण्यात आले. ज्या भूमीत मंदिर स्थलांतरित करण्यात आले, ती भूमी न्यायप्रविष्ट असल्यामुळे शिवाजीनगर युवक मंडळाचे अध्यक्ष पांडू बिरंजे यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे जवळपास साडेतीन घंट्यांहून अधिक काळ भागात तणाव निर्माण झाला होता. (हिंदूंनो, अनधिकृत मंदिरे आहेत, असे सांगून प्रशासन त्वरित मंदिरे पाडण्याची कारवाई करते; मात्र आतापर्यंत प्रशासनाने एकही अनधिकृत मशीद अथवा चर्च हटवले नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रशासनही हिंदूंच्या विरोधात असल्याने अशा प्रशासनाकडून हिंदूंचे हित होईल, अशी अपेक्षा न करता संघटित व्हा ! - संपादक)

नगर येथे नाकाबंदीच्या वेळी सापडले ९७ लक्ष रुपये

     नगर - शहरात रात्री नाकाबंदीच्या वेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका व्यक्तीकडून सुमारे ९७ लक्ष रुपयांची रोख रक्कम कह्यात घेतली आहे. संबंधित व्यक्तीला तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. एवढी मोठी रक्कम येण्यामागे हवाला रॅकेट आहे का, याची पोलीस चौकशी करत आहेत. (कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीनतेरा ! अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांची पाळेमुळे खणली जाऊन अर्थव्यवस्थेला चांगले दिवस पहायला मिळतील का ? - संपादक)

कोरेगाव पार्क (पुणे) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याप्रकरणी निलंबित

     पुणे - येथील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांना अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याप्रकरणी १३ मे या दिवशी निलंबित केले आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याकडे कानाडोळा केल्याप्रकरणी पवार यांची चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीत पवार दोषी आढळल्याने सहपोलीस आयुक्त रामानंद यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. (यावरून पोलिसांच्याच पाठिंब्याने अवैध धंदे चालू असल्याचे आणि पोलिसांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे उघड होते आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे ! - संपादक) 
      येथील कोरेगांव पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय चालू होता. पोलीस आयुक्त शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांनी विशेष शाखेच्या पथकाला छापा टाकण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी तेथे छापा टाकून तरुणींची सुटका केली आणि दलालांना अटक केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांची चौकशी करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची कवड्याची माळ नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांकडून जतन !

     पुणे - नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकण्यासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याविषयी गड आला; पण सिंह गेला, असे भावपूर्ण उद्गार काढले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नरवीर तानाजी यांच्या पार्थिवावर त्यांच्या गळ्यातील कवड्याची माळ ठेवली होती. ती माळ आजही तानाजी मालुसरे यांच्या वंशजांकडे असून इतिहासाची साक्ष देत आहे ! वंशपरंपरेने ही माळ त्यांच्या वारसांनी अजूनपर्यंत जतन करून ठेवली आहे. (कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवा जपण्यासाठी प्रयत्नरत मालुसरे यांचे वंशज आणि कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्ग अन् अन्य अनमोल ठेव्याची वाट लावणारे पुरातत्व खाते ! - संपादक) तानाजी यांचे १३ वे वंशज शीतल मालुसरे रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे ही माळ आहे. शीतल मालुसरे या प्राध्यापिका असून नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरही व्याख्याने देतात.

हिंदु धर्माची दीक्षा घेतलेल्या विदेशींनी सनातन हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व प्रतिपादिले !

निनौरा, उज्जैन येथे आंतरराष्ट्रीय विचार-महाकुंभ !
चंगळवाद आणि भौतिकतेत रममाण झालेल्या हिंदूंनी आतातरी बोध घ्यावा अन् पूर्वपुण्याईमुळे 
भारतात आणि हिंदु धर्मात जन्म मिळाल्याने जीवनाचे सार्थक करावे. अन्यथा उद्या विदेशी 
लोक येऊनच आपल्याला आपल्या धर्माची आणि अध्यात्माची शिकवण देतील !
कार्यक्रमाला संबोधित करतांना विदेशी
आणि अन्य मान्यवर
    उज्जैन - सिहंस्थामध्ये मध्यप्रदेश शासनाच्या वतीने चालू असलेल्या विचार-महाकुंभाच्या द्वितीय सत्रात धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याच्या पद्धतीवर गंभीरपणे चर्चा झाली. या संदर्भातील विषयाची मांडणी करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राम माधव यांनी प्रश्‍न मांडले. धर्माच्या मार्गावर चालतांना जीवन यशस्वी कसे करावे ? या सत्रात थायलंडच्या भिक्खुनी धम्मानंदा, अमेरिकेतील पंडित वामदेव (डॉ. डेविड फ्रॉले), मिशेल केमो, प्रा. रामदास लाम्ब, स्टीफन नॅप आणि डॉ. वेट्टे रोशर रामरानी यांनी विचार मांडले. या सत्रात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह देश-विदेशातून आलेले अनेक विद्वान उपस्थित होते.

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस वीरश्रीयुक्त वातावरणात प्रारंभ !

सोलापूर येथे अश्‍लीलता, लव्ह जिहादयांसारख्या धर्मावरील 
आघातांच्या विरोधात रणरागिणींनी रणशिंग फुंकले !
     सोलापूर, १५ मे (वार्ता.) - अश्‍लीलता, लव्ह जिहाद, धर्मपरंपरांना विरोध यांसारख्या धर्मावरील आघातांच्या विरोधात रणरागिणींनी रणशिंग फुंकले. हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून सोलापुरातील धर्मपरंपरा रक्षण चळवळीचा प्रारंभ करण्यासाठी श्री सिद्धरामेश्‍वराच्या नगरीत श्री भवानीदेवीच्या आशीर्वादाने १५ मे या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सुशील रसिक सभागृह, मुरारजी पेठ, सोलापूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. मनोज खाडये, सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर, रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. सुनीता दीक्षित, रणरागिणीशाखेच्या राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी मार्गदर्शन केले.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या पोलीस अधिकार्‍याचे स्थानांतर !

     कोल्हापूर, १५ मे (वार्ता.) - सध्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चैतन्या एस्. यांचे धुळे येथे बढतीवर स्थानांतर झाल्याने रिक्त पदावर शर्मा यांची नियुक्ती झाली आहे. चैतन्या एस्. यांच्याकडे कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण होते. जिल्ह्यात बढतीवर स्थानांतर झालेले पोलीस अधिकारी सुहेल शर्मा हे शनिवार, २१ मे या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. शर्मा हे भारतीय पोलीस सेवेतील २०१२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे पंजाब येथील आहेत.

श्री. चंद्रकांत शहासने यांची हिंदु एकता आंदोलन पक्षाच्या पुणे जिल्हा प्रवक्तापदी निवड

      पुणे - श्री. चंद्रकांत शहासने यांची नुकतीच हिंदु एकता आंदोलन पक्षाच्या पुणे जिल्हा प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे. श्री. शहासने यांनी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, तसेच समरसता साहित्य संमेलनाचे निमंत्रकपद भूषवले आहे. साहित्य क्षेत्रात श्री. शहासने यांचे मोठे योगदान असून ते देशभक्त कोषाचे लेखकही आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गाथा भीमरावांची हे महाकाव्य लिहले आहे. हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे यांनी श्री. शहासने यांना प्रवक्ता पदीचे नियुक्तीचे पत्र दिले. या वेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश कुलकर्णी, शहराध्यक्ष श्री. विजय पाटील, श्री. शैलेंद्र दीक्षित यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


इचलकरंजी येथे मद्याचे दुकान बंद करण्यासाठी महिलांचे रस्ता बंद आंदोलन !

निद्रिस्त प्रशासन !
     इचलकरंजी, १५ मे (वार्ता.) - बावणे गल्लीतील देशी मद्याचे दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे, या मागणीसाठी भागातील महिलांनी १४ मे या दिवशी सायंकाळी रस्ता बंद आंदोलन केले. सनदशीर पद्धतीने गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन चालू आहे; मात्र शासनाकडून या प्रश्‍नी कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे भविष्यात आत्मदहनासारखे हत्यार उपसण्याची चेतावणी या वेळी महिलांनी दिली आहे. (न्याय मागणीसाठी आंदोलन करणार्‍या सर्व रणरागिणींचे अभिनंदन ! मद्यबंदीसाठी महिलांना आंदोलन करायला लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! - संपादक) 
    शिवाजीनगर पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे गेल्या १४ दिवसांत एक थेंबही मद्याची विक्री झालेली नाही.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाने ३० कोटी रुपयांची लाच मागणार्‍या तोतया स्वीय साहाय्यकास अटक !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक
     मुंबई, १५ मे (वार्ता.) - महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांचे नाव सांगून लोकांकडून पैसे उकळणारे त्यांचे तोतया स्वीय साहाय्यक गणेश पाटील यांना पोलिसांनी १४ मे या दिवशी अटक केली आहे. त्यांनी भूमी हस्तांतरासाठी ३० कोटी रुपयांची मागणी केली होती. पाटील हे खडसे यांचे स्वीय साहाय्यक असल्याचे लोकांना भासवत होते. 
    मागासवर्गियांच्या शिक्षण संस्थेने २००४ मध्ये ३७ एकर भूमी घेतली होती; मात्र मंत्रालयाला लागलेल्या आगीत धारिका जळून खाक झाली. त्यानंतर संस्थेचे विश्‍वस्त डॉ. रमेश जाधव हे अनेक वेळा मंत्रालयाचे खेटे घालत होते. त्यानंतर त्यांची ओळख गणेश पाटील यांच्याशी झाली. पाटील यांनी जाधव यांना काम करण्यासाठी एक सदनिका आणि १ कोटी रुपयांची मागणी केली; मात्र नंतर मागणी प्रमाणाबाहेर गेल्यानंतर रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पाटील यांना लाच मागतांना अटक केली.

संभाजीनगर येथील मद्यनिर्मिती कारखान्यांकडून वर्षभरात २०० कोटी लिटर पाण्याचा वापर

पाण्याचा हा व्यय टाळणे आणि वाढती व्यसनांधता रोखणे यांसाठी
 जनतेला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      संभाजीनगर - येथील मद्य आणि बिअर यांची निर्मिती करणार्‍या १० कारखान्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. (दुष्काळाच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असतांना मद्यनिर्मितीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होणे, हा दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे ! - संपादक) या उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत १ सहस्र लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. (मद्य उद्योगांना अल्प दरात पाणीपुरवठा का केला जात आहे, याचा शोध घेऊन शासन त्यांच्याकडून चढ्या दराने पाणीपट्टी आकारेल का ? - संपादक) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एम्आयडीसी) या क्षेत्रातील १२ उद्योगांना प्रति दिवशी ४० लक्ष लिटर पाणी पुरवले जात होते. उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने आदेश दिल्यानंतर मद्य आणि बिअर यांची निर्मिती करणार्‍या कारखान्यांची पाणीकपात ६० प्रतिशतपर्यंत करण्यात आली आहे.

राष्ट्र आणि धर्म संकटात : आपण गप्प का ? या विषयावरील संत संमेलनात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

डावीकडून (उपस्थितांना मार्गदर्शन करतांना) पू. डॉ. चारुदत्त पिंगळे,
स्वामी भावेशानंद, आर्य जितेंद्र आणि पू. स्वामी चिदंबरानंदजी महाराज
     उज्जैन - सिंहस्थ क्षेत्री असलेल्या विद् साधना साध्यम ट्रस्टच्या पू. स्वामी चिदंबरानंदजी महाराज यांच्या व्यासपिठावर नुकतेच राष्ट्र आणि धर्म संकटात : आपण गप्प का ? या विषयावरील संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय संत समितीकडून या संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात स्वामी भावेशानंद महाराज, हिमालयातील पू. स्वामी हेमचंद्रजी, यथार्थ गीताचे प.पू. स्वामी राजेश्‍वरानंदजी, रतलाम येथील भाजप नेते आणि हरिहर समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. राजेश शर्मा, उज्जैन येथील पं. नारायण प्रसाद शर्मा, सर्वदलीय गौरक्षक दलाचे राष्ट्रीय संयोजक श्री. महेंद्र कृष्ण शास्त्री, राष्ट्रीय गौरक्षा मंचचे नरेंद्रजी सनातनी, हरियाणा भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. पूनम बोहरा, स्वदेशी रक्षा मंचच्या साध्वी शारदा आणि श्री. जितेंद्र आर्य, प्रसिद्ध समाजसेवी श्री. पगनसिंह कुलस्ते आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे हे मान्यवर उपस्थित होते.

पुस्तकातून प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएन्टीडी) भंग केल्याचा आरोप

सुप्रसिद्ध वैद्य बालाजी तांबेंना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश
     संगमनेर (जिल्हा नाशिक) - आयुर्वेदात इच्छेनुरूप संतती होण्यासाठी विशेष उपाय सुचवलेले असतात. गर्भधारणा झाल्यानंतर पुंसवन विधी करायचा असतो. पुंसवन विधीचे निरनिराळे योग सांगितलेले सापडतात. आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठीचे हे उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार करून प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएन्टीडी) भंग केल्याने संगमनेर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. (या तक्रारीवरून हिंदु धर्मशास्त्रानुसार पुत्रप्राप्तीसाठी सुचवलेले उपाय (पुंसवन विधी) हेच चुकीचे आहेत, असा संदेश जातो. पुंसवन विधीवर बंदी घालणारा नव्हे, तर त्याचा चुकीचा वापर होणार नाही, यासाठी कायदा असणे आवश्यक आहे ! - संपादक)

लवकरच पनवेल महानगरपालिका होणार

     पनवेल - पनवेल शहर आता लवकरच महानगरपालिका होणार आहे. पनवेल नगरपालिकेसह लगतच्या ६८ गावांचा यामध्ये समावेश होणार असल्याची माहिती आहे.
     कोकण विभागीय आयुक्तांनीही ही महापालिका स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. या अहवालानंतर नगरविकास विभागाने पनवेल महापालिका स्थापन करण्याविषयीचा प्रस्ताव मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पनवेल महापालिका राज्यातील २७ वी महापालिका ठरेल. तसेच मुंबई महानगर प्रदेशामधील ही आठवी महापालिका ठरणार आहे. या नव्या महापालिकेत एम्एम्आर्डीए, सिडको, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि एम्आयडीसी ही चार नियोजन प्राधिकरणे आहेत. नवी मुंबईचे विमानतळ हे या नव्या महापालिकेच्या हद्दीत येत नाही.

पुणे येथे बलात्कारप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक

अशा भोंदूबाबांमुळे हिंदु धर्माचे नाव खराब होते. जन्महिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच 
अशा भोंदूबाबांचे फावते. यासाठी हिंदु धर्मियांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. 
     पुणे, १५ मे - येथील एका भोंदूबाबाने एका महिलेचा व्यवसाय चांगला चालावा, यासाठी होमहवन करण्याचे निमित्त करून त्याने तिच्याशी बलपूर्वक लैंगिक संबंध ठेवले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अशोक नारायण घाटगे याला अटक केली आहे. 
     घाटगे याने त्या महिलेला माझ्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीस, तर तुझे छायाचित्र मी लोकांना दाखवीन आणि तुझ्या मुलीला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा अन् जादूटोणा प्रतिबंध आणि उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून १३ मे या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता त्याला १७ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

प्रमोद मोहिते यांनी लावले दुचाकी वाहनावर अफझलखान वधाचे चित्र !

असे हिंदु धर्माभिमानी सर्वत्र हवेत ! 
     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १५ मे (वार्ता.) - येथील द ग्रेट मराठा मित्रमंडळाचे श्री. प्रमोद मोहिते यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्या दुचाकीवर अफझलखानवधाचे सिद्ध केलेले चित्र लावले आहे. हे चित्र लावूनच ते शहरातून सर्वत्र फिरतात. 
    याविषयी श्री. मोहिते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला, हा सत्य इतिहास आहे आणि तो कुणी दडपू शकत नाही. छत्रपतींचा हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे. श्री. मोहिते दुचाकी घेऊन जिथे जातील, तिथे नागरिक याकडे अभिमानाने पहातात आणि श्री. मोहिते यांचे कौतुक करतात.

पुणे जिल्ह्यात विदेशी मद्याच्या विक्रीत वाढ

विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत असलेल्या पुण्याची ओळख पुढे 
मद्यपी पुणेकर अशी झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
महसूल खात्याला मद्याच्या विक्रीतून १ सहस्र ५६४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त 
     पुणे, १५ मे - पुणे शहर आणि जिल्हा परिसरात देशी बनावटीच्या मद्यविक्रीत घट होत असून विदेशी बनावटीच्या मद्यविक्रीत चांगलीच वाढ झाली आहे. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या आर्थिक वर्षांत मद्यविक्रीतून १ सहस्र ५६४ कोटी रुपयांचा महसूल पुणे विभागाला मिळाला. विदेशी मद्यविक्रीत ११.६४ प्रतिशत, बिअर आणि वाईन या मद्यप्रकारांच्या विक्रीत अनुक्रमे १०.१६ प्रतिशत आणि १३.८९ प्रतिशत वाढ झाली आहे. त्या तुलनेत देशी मद्याच्या विक्रीत झालेली वाढ १.७८ प्रतिशत आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली.

धर्मादाय आयुक्तांनी वक्फ भूमीच्या संदर्भात केलेल्या नियमबाह्य व्यवहारांच्या संदर्भात महसूलमंत्र्यांचा असंतोष

     मुंबई - राज्यातील वक्फ बोर्डाच्या नावे असलेल्या मिळकतींच्या संदर्भात यापुढे गैरव्यवहार किंवा नियमबाह्य व्यवहार होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महसूल विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालये यांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी वक्फ बोर्डाच्या भूमीच्या संदर्भात शासकीय दस्तऐवजांमध्ये वक्फ सत्ता प्रतिबंधक प्रकार अशी नोंद करावी, तसेच अशा मिळकती संदर्भात धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी न करता वक्फ मंडळाच्या अनुमतीविना अशा मिळकतीविषयी कोणताही बदल, नोंदणी अथवा खरेदी-विक्री करुन नये, अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूल तसेच अल्पसंख्यांक कल्याण विभागमंत्री एकनाथराव खडसे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलतांना दिली.

अखिल भारतीय धर्मसंघीय आणि धर्मसम्राट करपात्री फाऊंडेशन शिबिराद्वारे आयोजित शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

  • सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही सहभाग ! 
  • विश्‍वकल्याण आणि आर्थिक संकट निवारणार्थ १०० कुंडीय श्री गायत्री महायज्ञाचे आयोजन !
शोभायात्रेत सहभागी झालेले साधू-संत

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमानांसाठी मंदिर झाकण्याची वेळ यायला हा भारत आहे कि पाक ?
     पुण्यातील गंजपेठेत मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या मुसलमानांच्या सत्काराचा कार्यक्रम १४ मे या दिवशी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या वेळी पोलिसांनी कार्यक्रमस्थळाच्या जवळच असलेले एक शिवमंदिर पांढर्‍या कापडाने झाकून ठेवले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Puneme Malegaon bamvisphot prakaranme nirdosh Musalmanoke satkar karyakramke samay policene ek Shiv mandir dhaka.
     Yah Bharat hai ya Pakistan?
जागो ! : पुणे में मालेगाव बमविस्फोट प्रकरण में निर्दोष मुसलमानों के सत्कार कार्यक्रम के समय पुलिस ने एक शिव मंदिर ढका.
     यह भारत है या पाकिस्तान ?

सनातनच्या साधकाने प्रबोधन केल्यामुळे गळ्यातील क्रॉस काढून श्रीकृष्णाचे पदक घालणारा उज्जैन येथील कु. विशाल मकवाना !

     उज्जैन - येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण विषयक प्रदर्शनात उज्जैन जिल्ह्याच्या भाखाड गावातील कु. विशाल मकवाना नावाचा युवक गळ्यात क्रॉस घालून आला होता. (हिंदूंना आपल्या देवतांचे महत्त्व माहीत नसल्याने अर्थात् धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु तरुण गळ्यात क्रॉस घालण्यासारख्या कृती करतात ! - संपादक) गळ्यात क्रॉस घातल्याचे लक्षात आल्यावर सनातनचे साधक श्री. मिलींद पोशे यांनी त्याला विचारले, तू हिंदु असून खिस्त्यांचे क्रॉस असलेले पदक का घातले आहेस ? आपल्या धर्मात अनेक शूरवीर देवता आणि अवतार झाले आहेत. तुला हिंदु धर्माचा अभिमान आहे की नाही ? यावर कु. विशालसह आलेल्या दोन्ही मित्रांनी त्याला पदक काढण्यास सांगितले आणि कु. विशाल याने गळ्यातील क्रॉस काढला. नंतर त्याने प्रदर्शनातून श्रीकृष्णाचे पदक घेऊन गळ्यात घातले.लोक-कल्याण आणि पर्यावरण शुद्धी यांसाठी १८ कोटी पार्थिव शिवलिंग निर्मिती ! - संत श्री विष्णु प्रभाकर शास्त्री उपाख्य दद्दाजी

     उज्जैन - सध्याच्या काळात पर्यावरणाचे संरक्षण करून पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्याची सर्वाधिक आवश्यकता आहे. पार्थिव शिवलिंगाचे निर्माण केल्याने केवळ आध्यात्मिक लाभ न होता त्या काळ्या मातीत जिवाश्म असल्यामुळे वृक्ष, रोपटी यांची जलद वृद्धी आणि जलशुद्धी यांसाठीही लाभ होतो, असे प्रतिपादन सिंहस्थ पर्वाच्या काळात पार्थिव शिवलिंग निर्माण मिशनचे संत श्री विष्णु प्रभाकर शास्त्री उपाख्य दद्दाजी यांनी येथे केले.

सनातन पंचांग २०१६ अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅपला मिळालेला भरघोस प्रतिसाद

टीप १ : वरील डाऊनलोडची संख्या आणि मूल्यांकन १ डिसेंबर २०१५ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीतील आहे.
- श्री. महेश ननावरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०१६)

श्री पंच अग्नि आखाडा

श्री सद्गुरु उमाकांत
उपाख्य खडेश्‍वर महाराज
उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त..
     नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे श्री पंच अग्नि आखाड्याचे संत आचार्य महामंडलेश्‍वर ब्रह्मर्षी श्रीमद् रामकृष्णानंद महाराज आणि येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील दत्तवाडी गावातील खडेश्‍वर सेवा आश्रमाचे श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात उभय महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.
संकलक : श्री. सचिन कौलकर
आखाड्यांचा परिचय
     सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्‍याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

हिंदूंनो, संतांना शरण जाऊन स्वत:चे कल्याण ओळखा !

     कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून न्यायालयाने नुकतेच दोषमुक्त केले. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, साध्वी प्रज्ञासिंह यांनाही खोट्या आरोपाखाली गेल्या काही वर्षांपासून कारागृहात बंदिस्त केले आहे. हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांची कावीळ झालेल्या प्रसारमाध्यमांनी संतांवर आरोप करत स्वतःच्या वाहिनीची वारेमाप प्रसिद्धी करून घेतली. हे करतांना त्यांनी संतांसमवेत हिंदु धर्माला अपकीर्त करण्यात कुठलीही त्रुटी ठेवली नव्हती. सद्यस्थितीत हिंदु धर्मगुरु आणि संत यांना न्यायालयाने दोषमुक्त म्हणून जाहीर केल्यावर एकाही वृत्तवाहिनीने त्या वृत्ताची म्हणावी तितकी प्रसिद्धी केली नाही. वर्ष २००२ मध्ये शंकराचार्यांना अटक केल्यावर सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या वृत्ताचा अवधी २ सहस्र १५ घंटे इतका प्रदीर्घ होता, तर वर्ष २०१६ मध्ये निर्दोष सुटका झाल्यानंतरच्या वृत्ताचा अवधी केवळ ८ मिनिटे इतकाच होता. यावरूनच हिंदुबहुल देशातील हिंदु धर्म संपवण्याचा समाजविघातक शक्तींचा कट किती व्यापक आणि प्रभावीपणे कार्यरत आहे, हे उघड होते.
     मोगल आणि ब्रिटीश यांच्या राजवटीत हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे झाली, तरी हिंदु धर्म टिकला; मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती संकटात आली आहे. त्यामुळे धर्मरक्षणासाङ्गी हिंदूंनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता ठरली आहे ! - श्री. रमेश शिंदे, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

उन्हाळीसुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
हस्ताक्षर वळणदार आणि सुवाच्च काढावे !
    अक्षरावरून माणसाची पारख करता येते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात.
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
 गोरक्षण विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : २२ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
     ज्यांना ध्येयाविषयी दृढ आस्था आहे, असे मूठभर संकल्पनिष्ठ लोक इतिहासाचा प्रवाह पालटू शकतात. - दीपक सिंह (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी
 इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

बादामी (कर्नाटक) येथील हिंदु धर्माभिमानी श्री. शिवनागौडा बरमागौडर हे ६३ टक्के, श्री. शिवानंद गंगावती हे ६२ टक्के आणि श्री. रमेश फत्तेपूर हे ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले !

डावीकडून श्री. रमेश फत्तेपूर (वय ५६ वर्षे), ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले सनातनचे साधक
 श्री. काशिनाथ प्रभु (यांच्या हस्ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या हिंदु धर्माभिमान्यांचा
 सत्कार करण्यात आला), श्री. शिवनागौडा बरमागौडर (वय ५४ वर्षे) आणि श्री. शिवानंद गंगावती (वय ५८ वर्षे)अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे
www.sanatan.org

पुरोगामी कोणाला म्हणावे ?

     युरोपमध्ये तेथील पुरोगाम्यांच्या दबावामुळे मुसलमान विस्थापितांवर कठोर कारवाई करायला अडचण येत आहे. यावरून सर्वत्रचे पुरोगामी म्हणजे देश, धर्म, संस्कृती आणि श्रद्धा यांना मानवता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि सहिष्णुता यांच्या गोंडस नावाखाली बुद्धीभ्रम करून नष्ट करणार्‍या टोळ्याच होत ! - श्री. (पू.) राजेंद्र शिंदे

विवाहादी मायेतील गोष्टींपासून दूर ठेवून साधनेचा दृढनिश्‍चय टिकून रहावा, यासाठी प.पू. गुरुमाऊलीला कु. सई कुलकर्णी हिने केलेली आर्त विनवणी !

 कु. सई कुलकर्णी
प.पू. डॉक्टर,
     मागील ३ - ४ दिवसांत आपण २ वेळा मला इतरांकडून निरोप पाठवलात, सईच्या मैत्रिणींचे विवाह ठरले. आता सई काय करणार आहे ? त्यानंतर पू. बिंदाताईंना या संदर्भात सांगितल्यावर त्यांनीही मला तू या संदर्भात काय ठरवले आहेस ? असे विचारले.
     गुरुमाऊली, बालपणापासूनच आपल्या कृपेने या जिवाने आपण इतरांसारखे सर्वसाधारण आयुष्य जगायचे नाही. आयुष्यात काहीतरी निराळे साध्य करायचे, असे ठरवले होते. आई-बाबांनीही माझ्या मनावर सई, तू लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी आध्यात्मिक उन्नती करून संतपद प्राप्त कर, असाच विचार बिंबवला. त्यांच्या त्या तळमळीमुळेच लग्न करण्याच्या संदर्भात माझ्या मनात विचार आले नाहीत.
      लहानपणी आमची (बालमैत्रिणी कु. वैदेही पिंगळे आणि कु. वैष्णवी जाधव यांची) जेव्हा लग्नाच्या संदर्भात चर्चा व्हायची, तेव्हा लग्न इत्यादी काहीच नको. आपल्याला केवळ भगवंतासाठीच जगायचे आहे, असा आमचा निर्धार व्यक्त व्हायचा.

आपली कन्या उच्च लोकातून जन्माला आली असल्याचे समजल्यावर तिची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती व्हावी, या उद्देशाने तिला विवाहबंधनात न अडकवण्याचा स्तुत्य निर्णय घेणारे कुटुंबीय !

     आपल्या कन्येवर विवाहाच्या मायेत अडकण्यासाठी दबाव न आणता तिला साधनेसाठी प्रोत्साहन देणारे कुटुंब सर्वच कुटुंबियांसाठी आदर्श आहे. या दृष्टीकोनामुळे कुटुंबियांचीही जलद प्रगती होईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     पूर्णवेळ साधना करणार्‍या एका युवा साधिकेला आध्यात्मिक प्रगती करण्याची तळमळ आहे. ती विवाहयोग्य झाल्यावर तिचे कुटुंबीय तिच्यासाठी स्थळे पाहू लागले. याच कालावधीत ती उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे घोषित झाले. त्या वेळी आपल्या मुलीची साधना चांगली चालू असून ती उच्च लोकातून जन्माला आलेली असल्याने तिने यापुढेही साधनाच करावी आणि स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी, या विचाराने कुटुंबियांनी तिच्या विवाहासाठी स्थळे पहाणे बंद केले आणि तिला साधनेत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१५)

लहानपणापासून साधनेची आवड असणारा, सतत आनंदी आणि उत्साही असणारा रामनाथी आश्रमातील कु. अक्षय मनोहर जाधव (वय १९ वर्षे) !

                      १. लहानपणापासून कु. अक्षयला साधनेची आवड असणे
कु. अक्षय जाधव
अ. अक्षय लहान असतांना घरात वरच्या खोलीत प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावली की, तो वरच्या खोलीत पायर्‍यांवरून रांगत रांगत जात असे. तेथे जाऊन तो शांतपणे भजने ऐकत असे.
आ. लहानपणी तो बाबांसोबत सत्संगाला जायचा. तेव्हा रात्री कितीही विलंब झाला, तरी तो घरी जाण्यासाठी हट्ट करत नसे. सत्संग पूर्ण होईपर्यंत शांतपणे तेथे बसून रहायचा.
इ. अगदी लहान असल्यापासून तो स्वतःच्या हातानेच जेवत असे. त्याला कुणी भरवलेले आवडत नसे.
ई. त्याला शिक्षणाची ओढ नव्हती. आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचाच त्याचा मानस होता.
उ. कराडमध्ये धर्मजागृती सभा असल्यावर तो लहान असूनही न थकता रात्रंदिवस झोकून देऊन तळमळीने सेवा करायचा.
ऊ. मी आणि माझा मोठा भाऊ त्याला पुढचे शिक्षण घेण्यासाठी सांगत असतांना तो साधनाच करण्याविषयी सांगत असे.
ए. लहानपणापासून त्याने आई-बाबांना कधीच त्रास दिला नाही.

दयाळू परमेश्‍वरा, अपूर्ण हा जीव तुझ्याविना !

सौ. शरण्या देसाई
हे दयाळू परमेश्‍वरा, गुरुराया,
मी एक पाऊल तुझ्याकडे टाकले ।
तर शंभर पावलांनी
तूच आलास पुढे ॥ १ ॥
मी एक भावपूर्ण हाक दिली तुला ।
तर तू येऊन या जिवास
आलिंगन दिलेस ॥ २ ॥
कशी रे तुझ्या जिवावर,
तुझी ही अपार प्रीती ।
भरभरून तू दिले अन् भरभरून अजूनही देतोय तू कितीतरी ॥ ३ ॥
शब्दांत नाही कृतज्ञता व्यक्त करू शकत गुरुराया ।
हे दयाळू परमेश्‍वरा, अपूर्ण हा जीव तुझ्याविना ॥ ४ ॥
- तुझ्या चरणांशी एकरूप होण्यास आतुरलेली,
सौ. शरण्या देसाई, अमेरिका (२०.२.२०१४)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
     सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
शिवमोग्गा, कर्नाटक येथील जिज्ञासूंना रामनाथी आश्रमाविषयी
 जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१ अ. श्री. वी. शबरीश
१ अ १. रामनाथी आश्रमात येण्याचे ठरवले असता २ - ३ वेळा ते पुढे ढकलले गेल्याने निराशा येणे आणि कोणतीही अपेक्षा ठेवू नये, हे शिकायला मिळणे : आम्ही शिवमोग्गा येथून रामनाथी आश्रमात येण्याचे ठरवले असता २ - ३ वेळा आमचे येणे पुढे ढकलले गेले. तेव्हा आम्हाला दुःख होऊन निराशा आली. पुन्हा एकदा दिनांक ठरल्यावर सेवाकेंद्रातील साधकांनी आमचे अभिनंदन केले. त्या वेळी आम्हाला कोणतीही अपेक्षा ठेवू नये, हे शिकायला मिळाले.

श्री. राम होनप यांना आलेल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. राम होनप
१. चार - पाच दिवसांपूर्वी मी प्रसाधनगृहात आवरण्यासाठी गेलो. तेथे माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि मी कुठेतरी चाललो आहे, असे जाणवले. काही सेकंदांनंतर प्रवास संपल्याचे जाणवले आणि पुढे साक्षात् शिव उभा असल्याचे दृश्य दिसले. शिवाने मला अनुमाने २०० - ३०० पानांचा ग्रंथ भेट दिला. तो मी घेऊन लगेच शिवाला नमस्कार केला. शिवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर दृश्य दिसेनासे झाले. काही सेकंदाने माझे डोळे उघडले गेले. हा प्रसंग घडतेवेळी शिवाला, हा ग्रंथ कसला ? याचे काय करायचे ?, असे प्रश्‍न विचारावेसे वाटले नाही आणि शिवानेही काही सांगितले नाही.
२. ९.२.२०१६ रात्री २ वाजता मला जाग आली. त्यानंतर माझा पहाटे ३.१५ पर्यंत सतत नामजप होत होता. त्यानंतर मला अचानक श्रीविष्णूचे स्मरण होऊन बोलावणे आल्याप्रमाणे मी वेगाने कुठेतरी जाऊ लागलो. काही सेकंदांनंतर बघतो, तर मी विष्णुलोकात पोचलो होतो. तेथे नागाचे मोठे २ - ३ वेटोळे होते त्यावर मी उभा होतो. समोर साक्षात् श्रीविष्णु शेषावर पहुडलेले होते. तेथे माझे रूप असे होते -

विहिरीच्या दगडी बांधकामाच्या वेळी दोरखंडातून सुटलेला एक दगड डोक्यात पडतांना जीव वाचण्यासंबंधी एका साधक-कामगाराला आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. विहिरीमध्ये दगडाचे बांधकाम करतांना सहकारी कामगारांनी दगड दोरखंडात बांधून विहिरीत सोडणे आणि त्यांपैकी एक दगड आपोआप दोरखंडातून सुटून स्वतःच्या डोक्यावर पडत असल्याचे दिसणे अन् तत्क्षणी श्रीकृष्णाच्या कृपेने दगडाला दूर ढकलता येणे : मी एक कामगार असून १० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. एक दिवस मला जांभा दगड तासून ते ५ फूट रुंद आणि २५ फूट खोल विहिरीमध्ये लावण्याचे काम मिळाले. मी साधारण १० फुटांपर्यंत दगड लावत आलो आणि ६ दगड लावणे शेष होते. त्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता माझे सहकारी कामगार दोरखंडाने दगड बांधून विहिरीत उतरवत होते. त्या वेळी एक दगड दोरखंडातून आपोआप सुटून विहिरीत पडला. तत्क्षणी सहकारी कामगार पुष्कळ घाबरले आणि त्यांनी मोठ्याने ओरडून मला हाक मारली. मी आवाजाच्या दिशेने वर बघत असतांनाच तो दगड माझ्या डोक्यात पडत असल्याचे दृश्य दिसले. तत्क्षणी मी श्रीकृष्णाला संपूर्णपणे शरण जाताच दोन्ही हातांद्वारे त्या दगडाला जोरात ढकलणे शक्य झाले.

स्वभाषाभिमान असणारा आणि सात्त्विक वृत्तीचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सोलापूर येथील चि. अथर्व रोडी (वय २ वर्षे) !

चि. अथर्व रोडी
१. जन्मापूर्वी
१ अ. नियमितपणे रामरक्षा, अथर्वशीर्षाचे पठण करणे आणि चांगले बाळ जन्माला येऊ दे, अशी देवाला प्रार्थना होणे : गर्भारपणात पू. नकातेकाकांच्या सत्संगाचा लाभ मिळाला, तसेच नियमितपणे रामरक्षा, अथर्वशीर्ष या ग्रंथांचे पठण करत असे. घरात सासू-सासरे (सौ. अलका रोडी आणि श्री. दिलीप रोडी) यांच्याकडून सेवा, नामजप आणि आध्यात्मिक उपायांचे महत्त्व समजले. दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणारी दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये नियमितपणे वाचत होते आणि त्या वेळी चांगले बाळ जन्माला येऊ दे, अशी देवाला प्रार्थना होत होती.
१ आ. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करावे लागेल, असे सांगितल्यावर ईश्‍वरेच्छा असा विचार करून प्रार्थना केल्याने बाळाचा जन्म गणेशजयंतीच्या दिवशी होणे अन् नैसर्गिक प्रसूती होणे : चि. अथर्वच्या जन्माअगोदर एक आठवड्यापूर्वी आधुनिक वैद्यांकडे पडताळणीसाठी गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, थोडी वाट पाहू इंजेक्शन देऊन प्रसूती झाली नाही, तर शस्त्रकर्म करावे लागेल. त्या वेळी ईश्‍वरेच्छेने जसे व्हायचे, तसे होईल, असा भाव ठेवून मी आणि आई-बाबांनी प्रार्थना केली. आईने (सौ. अलका रोडीने) आधुनिक वैद्यांना विचारले, बाळाचा जन्म गणेशजयंतीला होईल काय ? तेव्हा ते म्हणाले, आपल्या हातात काही नाही. चि. अथर्वचा जन्म ३.२.२०१४ या दिवशी, म्हणजेच गणेशजयंतीला झाला आणि प्रसूती नैसर्गिक झाली. त्या वेळी ईश्‍वराने तुमची इच्छा पूर्ण केली, असे वैद्यांनी सांगितले.

प्रत्येक क्षण साधनेसाठी वापरणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले कै. भास्कर नेवगीआजोबा !

  
कै. भास्कर नेवगी
  डोंबिवली, ठाणे येथील भास्कर नेवगी यांचे २७.१.२०१६ या दिवशी आजारपणामुळे देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८३ वर्षे होते. त्यांची मुलगी कु. सुनिता भास्कर नेवगी हिला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचा साधनेचा प्रवास येथे दिला आहे.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. शांत, संयमी आणि मितभाषी : बाबा कधीही घरात किंवा समाजात कुणाशीही चिडून वा रागावून बोलत नसत. कुणाशीही वाद घालणे, तक्रार करणे, हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. ते सर्वांशी शांतपणे बोलायचे.
१ आ. निरपेक्ष : ते अनेकांना आर्थिक आणि शारीरिक साहाय्य करायचे. त्या वेळी ते कसलीही अपेक्षा ठेवत नसत. ते नेहमी म्हणत, समोरची व्यक्ती कशीही वागली, तरी आपण नेहमी क्षमाशील असावे.
१ इ. माणसे जोडून ठेवणे : शांत आणि प्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी समाजात, नोकरीच्या ठिकाणी, मित्रमंडळी आणि नातेवाईक, अशी अनेक माणसे जोडून ठेवली. ते चार मास आजारी असतांना अनेक हितचिंतक आणि सात्त्विक उत्पादने घेणारे यांचे त्यांना दूरभाष यायचे आणि ते त्यांची विचारपूस करत असत.

सनातन पंचांगाची अभ्यासपूर्वक मागणी नोंदवून परिपूर्ण सेवा करा !

जिल्हासेवक, वितरक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाची मागणी सर्व जिल्ह्यांनी २०.५.२०१६ या दिवसापर्यंत कळवणे अपेक्षित आहे. मागणी नोंदवतांना लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे देत आहे.
१. मागील वर्षीची मागणी आणि वितरण अन् जिल्ह्याची सद्य:स्थिती यांचा अभ्यास करून, तसेच समाजापर्यंत अधिकाधिक पंचांग पोचावेत, यासाठी साधकांना उद्युक्त करून जिल्हासेवकांनी अंतिम मागणी देणे आवश्यक आहे.
२. सर्वच पंचांगाचे वितरण १५.११.२०१६ या दिवसापर्यंत, तर त्याची येणे बाकी ३०.११.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करावी. प्रायोजित केलेल्या पंचांगांची येणे बाकी पूर्ण झाली, तरी त्या पंचांगांचे वितरण ३०.११.२०१६ या दिवसापर्यंतच पूर्ण करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्वच पंचांगांचे वितरण आणि येणे बाकी दिलेल्या समयमर्यादेत पूर्ण होईल, अशा दृष्टीने अभ्यास करून जिल्हासेवकांनी मागणी नोंदवावी.
३. काही साधक आम्ही पंचांग वैयक्तिक स्तरावर विकत घेऊन नंतर सवडीने त्याची विक्री करू शकतो का ? असे विचारतात. नोव्हेंबर २०१६ पासून हिंदु धर्मजागृती सभांना आरंभ होणार आहे, तसेच साधकांना त्या कालावधीत अन्य उपक्रम राबवून धर्मप्रसार करण्याच्या अमूल्य संधीचाही लाभ करून घ्यायचा आहे. त्यामुळे साधकांनी नोव्हेंबर २०१६ नंतर केवळ पंचांग वितरणाची सेवा न करता अन्य सेवांमध्येही सहभागी व्हावे.

साधकांनो, धनाच्या त्यागापेक्षा मनाच्या त्यागाने शीघ्रतेने गुरुकृपा संपादन करता येते, हे लक्षात घ्या !

    
(पू.) सौ. बिंदा सिंगबाळ
एका जिल्ह्यातील एक साधिका १५-२० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. तिची आर्थिक स्थिती चांगली असून ती धर्मकार्यासाठी धनाचा त्याग करत असते. तिच्याकडे असलेल्या धनाविषयी तिला आसक्ती नाही; परंतु तिने स्वतःचे मन अजून गुरुचरणी अर्पण केले नसल्याने तिच्यात अपेक्षित असे साधकत्व, भाव आणि तळमळ निर्माण न झाल्याने तिची आध्यात्मिक उन्नती झालेली नाही, असे लक्षात येते.
     साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी मनाच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने स्वचा (मनाचा) त्याग करून स्वतःच्या मनमंदिरात गुरूंचे अस्तित्व अनुभवा ! - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ

बैठक, सत्संग आदी चालू असतांना भ्रमणभाष हाताळण्याऐवजी बैठकीतील सूत्रे लक्षपूर्वक ऐका !

सर्वत्रच्या साधकांसाठी सूचना
     काही साधक बैठक, सत्संग अथवा व्यष्टी आढावा चालू असतांना भ्रमणभाषवर (मोबाईलवर) लघुसंदेश पाठवणे, व्हॉटसअ‍ॅपवरील संदेश पहाणे अशा अयोग्य कृृती करत असल्याचे लक्षात आले आहे. अशा प्रकारे गांभीर्य आणि शिकण्याची स्थिती नसल्यास साधकांना बैठक, सत्संग यांत कोणता विषय चालू आहे, ते समजत नाही अन् त्यात अपेक्षित असा सहभागही घेता येत नाही.
     यापुढे सर्वत्रच्या साधकांनी बैठक, सत्संग आदी वेळी भ्रमणभाष हाताळण्याऐवजी त्यात चालू असणार्‍या विषयाकडेच एकाग्रतेने लक्ष द्यावे. तातडीच्या सेवेमुळे भ्रमणभाष हाताळावा लागल्यास उत्तरदायी साधकांना विचारून घ्यावे. साधक बैठकीत भ्रमणभाष हाताळत असल्यास उत्तरदायी साधकांनी त्यांना जाणीव करून द्यावी. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (१४.५.२०१६)

धर्मशिक्षणवर्गात बौद्धिक शंकांचे निरसन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा साधक आणि धर्मप्रेमी घडण्यासाठी आवश्यक असलेल्या शंकांचे निरसन प्राधान्याने करा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !
      विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या धर्मशिक्षण वर्गांत धर्माभिमान्यांकडून प्रश्‍न विचारण्यात येतात. यांतील काही प्रश्‍नांची उत्तरे धर्मशिक्षण वर्गसेवक देतात आणि काही प्रश्‍न उत्तरे मिळण्यासाठी रामनाथी आश्रमात पाठवले जातात. धर्मशिक्षणवर्गांत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांचे प्रकार आणि त्यांना उत्तरे देण्याच्या संदर्भातील धोरण पुढे दिले आहे.
१. फारसे महत्त्वाचे नसणारे प्रश्‍न
अ. आपले प्राधान्य साधना, राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित प्रश्‍न अन् धर्मशिक्षण यांना आहे. त्यामुळे वर्गात विचारलेले प्रश्‍न त्याच्याशी संबंधित नसल्यास त्या प्रश्‍नांना फारसे महत्त्व देऊ नये, उदा. फेंगशुईप्रमाणे आदल्या दिवशी कासव पाण्यात ठेवून नंतर ते दुसर्‍या दिवशी घरातील देवघरात ठेवतात का ?
आ. काही ठिकाणी धर्मशास्त्रापेक्षा रुढींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा प्रश्‍नाचे उत्तर देण्यापेक्षा शास्त्र सांगून योग्य कृती काय करावी ?, ते धर्माभिमान्यांना ठरवण्यास सुचवू शकतो, उदा.
१. होळीतील बोंब डाव्या हाताने मारली, तर ते योग्य आहे का ?
२. तरुण मुलाचे निधन झाल्यावर मृतदेहाचे लग्न रुईच्या झाडासमवेत का लावतात ? हे योग्य आहे का ?

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
 प्रकृती आणि पुरुष
१. प्रकृतीचे भय गेले म्हणजे तो पुरुष झाला. मी कर्ता आहे, 
याचे ज्ञान पाहिजे. मी म्हणजे अहंकार धरला, तर ती प्रकृती.
भावार्थ : मी कर्ता आहे यातील मी हा पुरुषतत्त्वासंबंधी आहे.
२. प्रकृतीधर्माप्रमाणे वृत्ती, याला प्रवृत्ती म्हणतात. निवृत्तीची प्रतिक्रिया प्रवृत्ती. निवृत्ती ही स्वयंसिद्ध आहे.
३. पुरुषाचे लक्ष आणि स्त्रीची दृष्टी : पुरुषाचे लक्ष हे त्याचे ध्येय असते, तर स्त्रीची दृष्टी परपुरुषाचे लक्ष आकृष्ट करते, म्हणजे प्रकृतीमुळे विकार येतात. लक्ष, रस इत्यादी म्हणजे विकार.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वेच्छेनुसार वागतात. त्यामुळे ते सुखी होतात, तर साधना करणारे प्रथम परेच्छेने आणि नंतर ईश्‍वरेच्छेने वागतात. त्यामुळे ते आनंदी होतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
मानवी जन्म पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतो; म्हणून जीवनात सुविचाराची साथ ठेवून जन्माचे सार्थक करावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


प्रकृती आणि काम (कार्य) यांच्याकडे पहाण्याचा सामान्य व्यक्ती अन् साधक यांच्यातील भेद !

१. सामान्य व्यक्तीचा दृष्टीकोन : प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यासाठी काम कमी करावे.
२. साधकाचा दृष्टीकोन : प्रकृती साथ देते, तोपर्यंत अधिकाधिक काम (साधना) करून घ्यावे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चौथा स्तंभ धोक्यात !

संपादकीय
     बिहारमध्ये पत्रकार राजदेव रंजन आणि झारखंडमध्ये अखिलेश प्रताप सिंह या दोन पत्रकारांच्या २४ घंट्यांत झालेल्या हत्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांत पत्रकार, दैनिक कार्यालये यांच्यावर होणार्‍या आक्रमणांत वाढ झाली आहे. पत्रकारांसाठी काम करणारी संस्था हूटने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, या वर्षात पत्रकारांवर पोलिसांनी ६ खोटे खटले दाखल केले. २६ पत्रकारांना त्यांचा जीव गमवावा लागला, तर ६ जणांना धमक्या देण्यात आल्या आहेत. उत्तराखंड, तमिळनाडू, बिहार या राज्यांत पत्रकारांची स्थिती अत्यंत वाईट असून पत्रकारांवर सतत अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणे, त्यांना धमक्या देणे असे प्रकार चालू असतात. ग्रामीण भागात वाळूमाफिया, बांधकाम व्यावसायिक आणि अन्य लहान-मोठे गुंड पत्रकारांना सतत धमकवण्याचे काम करतात.

नीटचा तिढा !

संपादकीय
       भारतातील कोणत्याही शासकीय अथवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एम्.बी.बी.एस्. अथवा बीडीएस् (दंतरोग) चिकित्सेच्या शिक्षणासाठी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नीट) द्यावी लागेल, असा महत्त्वपूर्व निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वैद्यकीय शिक्षणाचा विचार केल्यास भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणतीही एक सामायिक परीक्षा नसल्याने खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, स्वायत्त विद्यापिठे, मान्यताप्राप्त विद्यापिठे आणि देशातील प्रत्येक राज्यातील वैद्यकीय शिक्षण खाते स्वतंत्र परीक्षा घेतात. अशा ९० पेक्षा अधिक प्रवेश परीक्षा होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. हे सर्व टाळण्यासाठी देशव्यापी सामायिक परीक्षा हेच त्यावर उत्तर आहे. या निर्णयाला सर्वच राज्य प्रखर विरोध करत आहेत. वेळ पडल्यास नीटसाठी अध्यादेश काढण्याची चाचपणी केंद्रशासन करत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn