Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज वसिष्ठऋषि जयंती

भारतीय सीमेवरील चिनी सैन्याच्या संख्येत लक्षणीय वाढ ! - पेंटागॉन

लोकहो, हे भारत शासनाकडून किंवा स्वतःला अधिक कळते या भ्रमात रहाणार्‍या भारतीय प्रसारमाध्यमांकडून नाही, तर अमेरिकेकडून आपल्याला समजते हे लज्जास्पद ! उद्या
चीनने भारतावर आक्रमण केल्याची माहितीही विदेशातूनच समजेल !
   वॉशिंग्टन - अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने अमेरिकी संसदेसमोर सादर केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, चीनकडून भारतीय सीमेवरील संरक्षण सज्जता आणि सैन्यसंख्या यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. जगभरात ज्या ठिकाणी चिनी सैन्याचे तळ आहेत, त्याठिकाणी सैन्याच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून चिनी सैन्याच्या पाकिस्तानमधील सैनिकी तळाचा समावेश आहे. मात्र यामागील चीनचा नेमका हेतू अजूनही समजलेला नाही.

८ वर्षांनी आरोपी निर्दोष असल्याचे सांगणार्‍या अन्वेषण यंत्रणांच्या उत्तरदायींना आजन्म कारागृहात टाका !

हिंदूंनो, निरपराध्यांना अनेक वर्षे नाहक छळणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत शासनाकडे पाठपुरावा घ्या !
वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी
साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह ४ जणांना निर्दोष ठरवत आरोपपत्रातून वगळले !
    राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे २०१६ या दिवशी मुंबई येथील विशेष न्यायालयात वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरवणी आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आतापर्यंत समोर आणण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य तिघांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांचे नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलेले नाही, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने यात म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील सर्व १२ आरोपींवरील मोक्का हटवण्यात आला आहे.

पाकिस्तानला आळा घालण्याची वेळ ! - न्यूयॉर्क टाइम्सचे मत

पाकिस्तानच्या संदर्भात अमेरिकेचीच दुटप्पी भूमिका राहिली आहे आणि पुढेही रहाणार
आहे, त्यामुळे अमेरिका कधीही पाकला आळा घालणार नाही, हे भारतियांनी लक्षात ठेवले पाहिजे !
   न्यूयॉर्क - पाकच्या दुटप्पी धोरणामुळे अनेकदा अमेरिकेला त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे पाकबरोबरील संबंध धोकादायक झाले आहेत. आता पाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्याची वेळ आली आहे, असे मत अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या संपादकीयमधून व्यक्त केले आहे.
टाइम टू पूट द स्क्वीझ ऑन पाकिस्तान या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयमध्ये या वृत्तपत्राने म्हटले आहे की,
१. अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या आतंकवादी आक्रमणाला १५ वर्षे उलटली, तरी अफगाणिस्तानमधील संघर्ष चिघळतच असून त्याचे दायित्व पाकिस्तानवर आहे.
२. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले अब्जावधी रुपयांचे साहाय्य आणि त्या देशाबरोबरील संबंध सुधारण्यासाठी वारंवार केलेल्या प्रयत्नांनंतरही पाकिस्तान अमेरिका आणि अफगाणिस्तान यांसाठी एक दुटप्पी आणि धोकादायक भागीदार राहिला आहे.

सनातनच्या आश्रमांत पोलीस येतात, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे सनातन संस्था का सांगते, हे या उदाहरणावरून लक्षात येईल !

आतंकवादविरोधी पथकानेच लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरात आर्डीएक्स ठेवले !
   मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पुरवणी आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकानेच (एटीएस्नेच) आर्डीएक्स ठेवून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचे एन्आयएने म्हटले आहे.

कायदा आंधळा आहे ! - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

हिंदु राष्ट्रात कायदा आंधळा नाही, तर डोळस असेल !
कोणत्याही निरपराध्याला कधीही कारागृहात जावे लागणार नाही !
    जोधपूर - कायदा आंधळा आहे. येथे कोणालाही कारागृहात डांबले जाऊ शकते. एका मुलीने काहीतरी सांगितले; म्हणून एवढ्या लोकांचा छळ केला जात आहे, अशी प्रतिक्रिया पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी येथे दिली. न्यायालयातून बाहेर पडतांना ते पत्रकारांशी बोलत होते.
पू. बापूजी पुढे म्हणाले, मला तुमच्याशी बोलावेसे वाटते; परंतु मी आजारी आहे. मी अनेक आजारांनी पीडित आहे. माझी प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. मला विशिष्ट उपचारांची आवश्यकता असते. अल्पवयीन मुलीचे कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून ३१ ऑगस्ट २०१३ पासून पू. बापूजी कारागृहात आहेत.

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी केरळ येथील ख्रिस्त्यांकडून हिंदु धर्मातील विधींचे अनुकरण करण्याची क्लृप्ती !

१. देवळात दिवा लावतात आणि उत्सवात देवाची पालखी काढतात, त्याप्रमाणे चर्चमध्ये दिवा लावणे 
आणि उत्सवात रथात येशूचे चित्र ठेवून त्याला देवतेसारखे अलंकार घालून फेरी काढत असणे 
श्री. बालकृष्ण
     केरळ येथील ख्रिस्ती लोक आता त्यांच्या चर्चमध्ये देवळात ठेवतात, तसा दीपस्तंभ ठेवतात; पण त्याच्या टोकावर क्रॉस असतो. चर्चमध्ये दिवा लावतात. हिंदु धर्मीय देवतेच्या उत्सवात जशी देवाची पालखी काढतात, त्याप्रमाणे चर्चमधील उत्सवात रथात येशूचे चित्र ठेवून त्याला देवतेसारखे अलंकार घालतात आणि फेरी काढतात. उत्सवात केरळ येथील मंदिरांत एका विशिष्ट प्रकारचे फटाके फोडतात, त्याप्रमाणे चर्चमध्येही फटाके फोडतात.
२. विष्णुसहस्रनाम म्हणण्याप्रमाणे येशु सहस्रनामही म्हणत असणे 
    चर्चमधील उत्सवात अन्नदानाला प्रसाद ॐ म्हणतात. खरेतर प्रसाद ॐ हा शब्द केवळ देवळातील अन्नदानाला म्हणतात. देवळात गेल्यावर जशी घंटा वाजवतात, तशी चर्चमध्ये गेल्यावरही घंटा वाजवतात. सध्या विष्णुसहस्रनामसारखे येशु सहस्रनाम म्हणणे चालू झाले आहे.

चिनी अधिकार्‍यांचे वर्तन उद्धट ! - इंग्लंडची राणी एलिझाबेथ

     लंडन - चीनचे अध्यक्ष शी जिनपिग यांच्या इंग्लंड भेटीच्या वेळी त्यांच्यासोबतच्या चिनी अधिकार्‍यांचे वर्तन अतिशय उद्धट होते, अशी प्रतिक्रिया इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांनी व्यक्त केली आहे. स्कॉटलंड यार्डचे कमांडर लकी डीओर्सी यांच्यासोबतचे एलिझाबेथ यांचे यासंदर्भातील संभाषण राजघराण्याच्या छायाचित्रकाराच्या कॅमेर्‍यामध्ये चित्रीत (रेकॉर्ड) झाले आहे. गेल्या वर्षी शिनपिग यांचा इंग्लंड दौरा झाला होता. एलिझाबेथ यांनी अशी प्रतिक्रिया दिली असली, तरी हा दौरा अत्यंत यशस्वी झाल्याचे निवेदन यानंतर दोन्ही देशांनी दिले होते.

कंटेनरमध्ये सापडले ५७० कोटी रुपये !

  • तमिळनाडू विधानसभा निवडणूक
  • लोकशाहीला निरर्थक ठरवणार्‍या अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात ! 
    तिरुपूर (तमिळनाडू) - तमिळनाडू विधानसभेसाठी १६ मे या दिवशी मतदान करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरापासून येथे निवडणुकीचा प्रसार चालू आहे. त्यातच १४ मेच्या पहाटे तिरुपूर जिल्ह्यात तीन कंटेनरमधून ५७० कोटी रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या पथकाने जप्त केली. निवडणूक आयोगाने अद्याप या संदर्भात अधिकृत कोणतीच माहिती दिलेली नाही. या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाने पूर्वी १०० कोटी रुपये जप्त केले होते.

(म्हणे) मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एन्आयएचे आरोपपत्र संशयास्पद !

अन्वेषण यंत्रणांवर विश्‍वास नसलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांचे हिंदुद्वेषी विधान
    नगर, १४ मे - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र संशयास्पद वाटते. साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र (क्लीन चीट) देणे चुकीचे आहे. धार्मिक आतंकवादाला केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे, असे आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. (हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची सुटका झाल्यास आरोपपत्र संशयास्पद वाटणारे आणि मुसलमान व्यक्ती सुटल्यास स्वागत करणारे हिंदुविरोधी विखे पाटील ! याला म्हणतात हिंदुद्वेषाचे उमाळे ! - संपादक)

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून कोणाचीही मानहानी करता येणार नाही ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - मानहानीच्या संदर्भातील कायदा वैध आहे आणि त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणताही परिणाम होत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून कोणाचीही मानहानी करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालायाने स्पष्ट केले. मानहानी कायद्यातील तरतुदी रहित करण्यात याव्यात, यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी याचिका दाखल केली होती. या कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० प्रमाणे एखाद्याचा अपमान किंवा अनादर करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतांना समोरच्याची प्रतिष्ठा जपणे आणि आदर राखणे आवश्यक आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.


वासनांध पोलीस निरीक्षक इक्बाल याच्याकडून तक्रार करण्यास गेलेल्या महिलेवर पोलीस ठाण्यातच बलात्कार !

अशा पोलिसांवर तात्काळ खटला चालवून कठोर शिक्षा द्या !
    श्रीनगर - मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार नोंद करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वासनांध पोलीस निरीक्षक महंमद इक्बाल याने पोलीस ठाण्यातच बलात्कार केल्याची घटना अखनूर येथे घडली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद इक्बाल याला अटक करण्यात आली आहे. बलात्कार करण्यास साहाय्य करणार्‍या ममता कुमारी या महिला पोलीस अधिकार्‍यालाही अटक करण्यात आली आहे. (स्त्री-पुरुष समानतेचे असेही उदाहरण ! - संपादक ) या प्रकरणाच्या विरोधात नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर निदर्शने केली.डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी हिंदु सेनेकडून हवन !

     नवी देहली - अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठीच्या रिपब्लिकन पार्टीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नरत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात ११ मे या दिवशी हिंदु सेनेच्या वतीने देहलीमध्ये हवन करण्यात आले. हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी सांगितले की, इस्लामी आतंकवाद हा जगासाठी कर्करोगाप्रमाणे भयंकर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचेसुद्धा हेच मत आहे; म्हणून आम्ही त्यांच्या यशासाठी प्रार्थना करत आहोत. 
    डोनाल्ड ट्रम्प यांचे फलक घेऊन हिंदु सेनेचे कार्यकर्ते या वेळी जंतर-मंतर येथे उपस्थित होते. अमेरिकेमध्ये मुसलमानांना प्रवेश बंदी करण्यासाठी त्वरित आतंकवादविरोधी समिती बनवण्यात येणार, असे विधान ट्रम्प यांनी केले होते.

सर्व मंत्रालये आणि विभाग येथील भ्रष्ट अन् निष्काळजी अधिकार्‍यांवर २ मासांच्या आत कारवाई करा ! - पंतप्रधान मोदी यांचा आदेश

     नवी देहली - पुढील २ महिन्यांच्या आत सर्व मंत्रालये आणि विभागातील भ्रष्टाचार करणार्‍या, तसेच सुस्तपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. यापूर्वी याच मोहिमेच्या अंतर्गत अर्थ खात्यातील ३३ अधिकार्‍यांना काढून टाकण्यात आले होते. (यांना नुसते काढून टाकू नका, तर त्यांना शिक्षा करा ! - संपादक)
    पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध मंत्रालये आणि विभागांतील ४८० अधिकार्‍यांची सूची बनवण्यात आली आहे. त्यातील सुमारे २०० अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि उर्वरित अधिकार्‍यांवर निष्काळजीपणे काम करण्याचा, तसेच अकार्यक्षम असल्याचा आरोप आहे. या सूचीतील सर्वाधिक अधिकारी अर्थ मंत्रालयाचे आहेत. अधिकार्‍यांच्या विरोधात येणार्‍या तक्रारींमुळे मोदी त्रस्त आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

अत्याचारी पोलिसांना कठोर शिक्षा करा !

    हिंदूंनो, साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, सनातनचे साधक यांच्यासह असंख्य निरपराध हिंदुत्ववाद्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नाहक अडकवून त्यांना अनेक वर्षे नाहक कारागृहात डांबून त्यांचा अनन्वित छळ करणारे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पोलीस अन् तत्कालीन काँग्रेस सरकारमधील उत्तरदायी यांना फाशी देण्याची मागणी करा !
हिंदुत्ववाद्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून भगव्या आतंकवादाची ओरड मारणारे तत्कालीन धर्मद्रोही काँग्रेसी राज्यकर्ते आणि अन्य हिंदुद्वेष्टेे यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागावी आणि प्रायश्‍चित्त घ्यावे ! इतकी वर्षे नाहक कारागृहात खितपत ठेवल्याविषयी सर्व निरपराध्यांना हानीभरपाई मिळालीच पाहिजे !

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांत अटक केलेले मुसलमान आणि हिंदू दोघेही निर्दोषच ! - श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री. विक्रम भावे
वर्ष २०१३ पासून श्री. विक्रम भावे जे सांगत होते,
ते वर्ष २०१६ मध्ये सत्य होत आहे !
पुणे - वर्ष २००६ आणि २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांत अटक केलेले मुसलमान आणि हिंदु आरोपी हे दोघेही निर्दोष आहेत. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह उर्वरित १० हिंदु आरोपी निर्दोष असून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राचे पत्रकार चंदन हायगुंडे यांना मुलाखत देतांना दिली. श्री. विक्रम भावे हे २००८ मध्ये ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या स्फोटातील एक आरोपी असून ते सध्या जामिनावर मुक्त आहेत.
विक्रम भावे यांचा दोन्ही गटांतील आरोपींशी संपर्क
    श्री. विक्रम भावे हे त्यांच्यावरील आरोपांची चौकशी चालू असतांना आधी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील अंडासेलमध्ये आणि नंतर नवी मुंबईतील तळोजा येथील कारागृहात बंदी होते. तेथे त्यांचा २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील अभिनव भारत संस्थेचे सदस्य असलेले हिंदु आरोपी आणि २००६ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील मुसलमान आरोपी यांच्याशी नियमित संपर्क असायचा. त्यावरून श्री. भावे यांची खात्री पटली होती की, अटक झालेले हिंदु आणि मुसलमान आरोपी निष्पाप आहेत.

उत्तर भारतातील एका प्रसिद्ध कथावाचकाकडून सिंहस्थ क्षेत्रामध्ये मादक पदार्थांची विज्ञापने : ईश्‍वरी प्रकोपात सर्व उद्ध्वस्त !

मंडपात लावलेली मादक पदार्थाची विज्ञापने
     उज्जैन - सिंहस्थात भाविक ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी साधूसंतांकडे येतात. अशा वेळी लोकांना कथा, प्रवचन, कीर्तन, संमेलन आदींच्या माध्यमातून साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संत, महंत, आखाडे, कथाकार आदींनी मोठे मांडव घातले आहेत. यात उत्तरप्रदेश येथील एका प्रसिद्ध कथावाचकाने आपल्या भल्या मोठ्या मांडवात विमल पान मसाला, शिमला पान मसाला, बम्बईया माऊथ फ्रेश यांसारखी गुटख्याची विज्ञापने, तसेच दबंग दुनिया, हॉटेल व्हिन-वे यांच्यासह अनेक विज्ञापने देणारी होर्डिंग्ज लावण्यात आली होती. कथेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खाण्या-पिण्याची व्यावसायिक दुकानेही थाटली होती. येथे कथा चालते का व्यवसाय, असा प्रश्‍न येणार्‍या लोकांना पडला होता. येथे आलेल्या पहिल्या आणि दुसर्‍या मुसळधार पावसात हा मांडव संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

नागा साधूने हातात तलवार घेऊन रामघाटावर स्नान करत असलेल्या भाविकांना हुसकावून लावणे !

     उज्जैन - येथील रामघाटावर ८ मे या दिवशी दुपारी भाविक स्नान करत असतांना काही नागा साधू तिथे आले. त्यापैकी एका नागा साधूने हातात तलवार घेऊन स्नान करत असलेल्या लोकांना हुसकवण्यास प्रारंभ केला. तलवार घेलेल्या नागा साधूने एक-दोन जणांच्या मानेवर तलवार ठेवली होती. एकंदरीतच नागा साधूंच्या या अयोग्य कृत्यामुळे घाटावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागा साधू तलवार आदी शस्त्र हे धर्मरक्षणार्थ वापरतात; मात्र काही साधूंच्या अयोग्य आचरणामुळे लोकांच्या मनात साधूंची चुकीची प्रतिमा निर्माण होत असल्याचे जाणवले. - श्री. सचिन गावंड, मुंबई 

देशद्रोही विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला विद्यापिठातील १२० शिक्षकांचा पाठिंबा !

अशा शिक्षकांचा भरणा असलेल्या विद्यापिठांतून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची मानसिकता 
कशी झाली असेल, ते सांगायलाच नको. अशा विद्यापिठांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
जेएन्यू प्रकरण
    देशद्रोही विद्यार्थ्यांवर जेएन्यू प्रशासनाकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन्यू) आणि देहली विद्यापिठ यांचे १२० शिक्षक, तसेच २०० विद्यार्थी यांनी ४ मे या दिवशी उपोषण केले. (देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठीशी घालणार्‍या शिक्षकांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये ? - संपादक) जेएन्यूच्या एका उच्चस्तरीय समितीने अनिर्बन भट्टाचार्य, उमर खालिद आणि मुजीब गट्टो यांना विद्यापिठातून तात्पुरते काढून टाकले आहे; तर कन्हैया कुमार आणि अन्य १५ विद्यार्थ्यांना मोठा दंड आकारला आहे.
देशात ७० सहस्रांहून अधिक न्यायाधिशांची आवश्यकता ! सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर

     न्याय मिळणे हा जनतेचा मूलभूत हक्क असून शासन तो नाकारू शकत नाही. त्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी प्रलंबित असलेले सर्व खटले निकाली काढणे आवश्यक आहे. देशात केवळ १८ सहस्र न्यायाधीश असून ही संख्या ७० सहस्रांहून अधिक असणे आवश्यक आहे, असा पुनरुच्चार भारताचे सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांनी केला. देशात विविध उच्च न्यायालयांमधील न्यायाधिशांच्या ९०० मान्य पदांपैकी ४५० हून अधिक जागा त्वरित भरल्या गेल्या पाहिजेत, असेही न्या. ठाकूर म्हणाले. 

भाजप संतांमध्ये भेदभाव निर्माण करून राजकारण करत असल्याचा आरोप !

भाजपच्या दलितांसह समरसता स्नानामुळे शंकराचार्य, आखाडा परिषद आणि दलित नेते असंतुष्ट ! 
     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्पित शाखा असलेली दीनदयाल उपाध्याय विचार प्रकाशन या संस्थेद्वारे ११ मे या दिवशी दलितांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह समरसता स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. यावर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज म्हणाले, सिंहस्थामध्ये स्नान करण्यापासून दलितांना कोणीही रोखलेले नाही, तसेच स्नान करण्यापूर्वी कोणालाही जात विचारलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासह स्नान करण्याचा देखावा करून भाजप नाटक का करत आहे ? त्यामुळे भेदभाव वाढेल.आमदार बाबुश आणि पीडित युवतीची सावत्र आई यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

अशांना आमदार म्हणून निवडून देणारी जनताही शिक्षेस पात्र ! 
अल्पवयीन युवतीवर बलात्कार केल्याचे प्रकरण !
     अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपी तथा सांताक्रूझ (गोवा)चे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्यावर पोलिसांनी मानवी तस्करीचा आरोप ठेवला आहे. याप्रकरणी न्यायालयाने आमदार मोन्सेरात आणि पीडित युवतीची सावत्र आई यांना ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (९.५.२०१६)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

   जर दीपावली आणि जन्माष्टमी व्हाईट हाऊस, हाऊस ऑफ कॉमन्स अन् ऑस्ट्रेलियन पार्लमेंटमध्ये साजरी केली जाते, तर भारतीय संसदेत का साजरी केली जात नाही? आपण अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त धर्मनिरपेक्षतावादी आहोत का?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

बांगलादेशमध्ये बौद्ध भिक्खूची हत्या !

     ढाका (बांगलादेश) - १४ मे या दिवशी सकाळी बांगलादेशमधील दक्षिण-पूर्व भागातील बंदारबन जिल्ह्यात एका ७५ वर्षांच्या एका बौद्ध भिक्खूची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामस्थांना भिक्खू (भंते) मोंग शु यु चाक यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बौद्ध विहारात आढळला. त्यांची हत्या करण्यात आली होती, अशी माहिती बंदारवनचे पोलीस उपप्रमुख जश्मीम उद्दीन यांनी दिली.

पुणे येथे अवैध शस्त्रे बाळगल्याच्या प्रकरणी धर्मांधासह एकाला अटक

    पुणे, १४ मे - अवैध शस्त्रे बाळगल्याच्या आरोपात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका धर्मांधासह एकाला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीची २ पिस्तुले आणि ३ काडतुसे शासनाधीन केली आहेत. त्यांची नावे जाकीर जलालुद्दीन शेख आणि ब्रिजेश खुरखुर मौर्य अशी आहेत. ते दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील असून येथे ते व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. तेथून त्यांनी हे पिस्तूल आणल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे. पोलिसांना १२ मे या दिवशी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माका (जिल्हा नगर) येथील रोखपालाला अपहारप्रकरणी अटक

      नगर - येथील सोनई तालुक्यातील माका येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रोखपाल शिवाजी भवार यांनी लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याचे ११ मे या दिवशी उघड झाले होते. या प्रकरणी बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुधीर कुलकर्णी यांनी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा प्रविष्ट झाला आहे. पोलिसांनी भवार यांना जेऊर पथकर नाक्यावरून १३ मे या दिवशी अटक केली आहे. भवार यांनी वर्ष २०१५ ते २ मे २०१६ पर्यंत १ कोटी २५ लक्ष ८६ सहस्र ३२० रुपयांचा अपहार केला आहे. (हा अपहार अधिकोषाच्या लक्षात का आला नाही, याविषयी अधिकोष व्यवस्थापन सांगेल का ? - संपादक)

राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) द्यावीच लागेल ! - मुख्यमंत्री

    पुणे, १४ मे - राज्यशासनाने सर्वोच्च न्यायालयात राज्यांच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) तीन वेळा धाव घेतली होती; परंतु सर्वोच्च न्यायालय वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट घेण्यावर ठाम आहे. यामुळे ती परीक्षा द्यावीच लागेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते येथील एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पाठ्यपुस्तकात क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा !

कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
      कोल्हापूर - देहली विद्यापिठाच्या भारत का स्वतंत्रता संघर्ष या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी त्यांच्या प्राणांचीही आहुती दिली, त्यांना स्वतंत्र भारतात आतंकवादी म्हणणे, हा क्रांतिकारकांचा अक्षम्य अवमानच आहे. देहली विद्यापिठाच्या या अभ्यासक्रमामुळे लक्षावधी विद्यार्थ्यांवर आजपर्यंत चुकीचा इतिहास बिंबवला गेला आहे. आजवर केवळ गांधी-नेहरूंचा अवमान करणार्‍यांवर त्वरित गुन्हे प्रविष्ट करण्यात येतात. मग हुतात्मा भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍यांवर आजवर अशा प्रकारे गुन्हे का प्रविष्ट होत नाहीत ? अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी याच्याशी संबंधित सर्वांवर त्वरित गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत. यासह हिंदु मंदिरांच्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश मागणार्‍या पुरोगाम्यांमुळे सहस्रो वर्षांच्या प्राचीन धार्मिक प्रथा-परंपरा शासनाने, तसेच न्यायालयाने परस्पर मोडीत काढू नये. त्याविषयी हिंदु धर्मातील धर्माचार्य, शंकराचार्य वा काशी विद्वद् परिषद यांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

सोलापूर येथे धर्मपरंपरा रक्षण चळवळीला प्रारंभानिमित्त रणरागिणी शाखेचा कार्यक्रम

दिनांक : १५ मे २०१६, वेळ : सायं. ५.३०
स्थळ : सुशील रसिक सभागृह, मुरारजी पेठ, सोलापूर

वीरांगनांच्या जयघोषात मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या धर्मरक्षण परंपरा चळवळीला प्रारंभ

डावीकडून श्री.नरेंद्र सुर्वे, सौ. मनाली नाईक,
पू. (कु.) अनुराधा वाडेकर, सौ. शीतल करदेकर, कु. प्रतीक्षा कोरगावकर
     मुंबई - झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, राणी चेनम्मा आदी वीरांगनांच्या नावाचा जयघोष करत आम्ही रणरागिणी, आम्ही रणरागिणी म्हणत मुंबई येथे रणरागिणी शाखेची धर्मपरंपरा रक्षण चळवळ कार्यरत झाली. १४ मे या दिवशी लोअर परेल येथील शिवानंद सभागृह येथे एका कार्यक्रमाद्वारे या कार्याला प्रारंभ झाला. सनातनच्या संत पू. अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थितीत क्षात्रतेज जागवणारा हा कार्यक्रम पार पडला. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ पत्रकार सौ. शीतल करदेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर, मुंबई जिल्हा समन्वयक सौ. मनाली नाईक या उपस्थित होत्या.
सविस्तर बातमी वाचा लवकरच...

(म्हणे) या देशातील लोकतंत्र, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि सहिष्णुता टिकवणे हे खरे आव्हान !

डॉ. गणेश देवी यांची मुक्ताफळे !
काँग्रेसचे शासन असतांना डॉ. देवी यांना लोकतंत्र धोक्यात 
असल्याचे कधी का वाटले नाही ? यावरून त्यांचा हिंदुद्वेषच दिसून येतो !
     सांगली - आज देशात परिवर्तनाची आवश्यकता असतांना या देशातील शास्त्रज्ञ या देशात पूर्वी पुष्पक विमान होते, असे सांगत आहेत. (शास्त्रज्ञांपेक्षा डॉ. देवी यांना अधिक कळते का ? - संपादक) आपल्या देशात माणसांच्या आयुष्यातून विचार नाहीसा झालेला आहे, अशी स्थिती आहे. या देशात एकमुख्यातरशाही, हुकूमशाही निर्माण होत आहे काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे या देशातील लोकतंत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णुता टिकवणे हे खरे आव्हान आहे, अशी मुक्ताफळे अहमदाबाद येथील ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उधळली. ते डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल येथे दोन दिवस होत असलेल्या दुसर्‍या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून बोलत होते. (याच देशातील काही धर्मांध धर्माच्या आधारावर बाँबस्फोट करून निरपराध्यांचे जीव घेतात, इसिससारख्या संघटनेत सहभागी होतात, आझाद मैदानावर मोर्चा काढून सहस्रो लोकांना वेठीस धरतात, उघडउघडपणे शत्रूराष्ट्राचे झेंडे फडकवात, तेव्हा डॉ. गणेश देवी यांना कधी देशातील लोकतंत्र धोक्यात आल्याचे जाणवले नाही. या देशात पूर्वीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते आणि आजही आहे, त्यामुळेच तर अंधश्रद्धावाले आज अशा प्रकारचे संमेलन घेऊ शकतात. त्यामुळे केवळ हिंदुत्ववादी विचारसरणीवर टीका करणे एवढाच ज्यांना एककलमी कार्यक्रम आहे, त्यांना अन्य गोष्टी काय कळणार ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

लोकशाहीला निरर्थक ठरवणार्‍या अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
    तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १४ मेच्या पहाटे तिरुपूर जिल्ह्यात ३ कंटेनरमधून ५७० कोटी रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या पथकाने जप्त केली. याआधीही १०० कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Tamilnadu chunavoki parshwabhumi par Chunav aayogne 570 karod rupaye nakad japt kiye.
Jantako bhrasht kar chunav jeetna yah loktantraki vifalta hi hai !
जागो ! : तमिलनाडु चुनावों की पार्श्‍वभूमी पर चुनाव आयोग ने ५७० करोड रुपयें नकद जप्त किएं.
जनता को भ्रष्ट कर चुनाव जीतना यह लोकतंत्र की विफलता ही है !

शिवरायांचे स्मारक समुद्रात नको, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी करा ! - पू. संभाजीराव भिडे गुरुजी

     पुणे - छत्रपती शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्यापेक्षा प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारून त्या ठिकाणी आतंकवाद निर्मूलन प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात यावे. आताच्या शासनाने ते नाही केले, तर आम्ही निर्माण करू, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले. सृजन कॉलेज ऑफ डिझाईन आणि कलादत्त प्रकाशनाच्या वतीने १३ मे या दिवशी येथील बालगंधर्व रंगमंदिरात शिवतेज संभाजी या त्रिमितीय (थ्री डी) ऐतिहासिक चित्रचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर, इतिहास अभ्यासक सर्वश्री सदाशिव शिवदे, पांडुरंग बलकवडे, माजी खासदार प्रदीप रावत, सुरेश नाशिककर, पुस्तकाचे लेखक संतोष रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे क्षात्रतेजयुक्त उद्गार !
१. स्मार्ट इंडिया, मेक इन इंडिया या गोष्टींना उशीर झाला तरी चालेल; पण देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा केला जावा. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आम्ही भेट घेऊ.

जनतेच्या ज्वलंत समस्यांविषयी जनसहभागातून लढा देणे, ही हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आगामी दिशा !

श्री. रमेश शिंदे
    आज लोकशाहीत सर्वोच्च स्थान असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. त्यांना प्रतिदिन भ्रष्टाचार, फसवणूक, लूटमार अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांच्या संदर्भात न्याय मिळवून देणार्‍या यंत्रणांकडे जावे, तर पोलिसांपासून ते न्याययंत्रणेपर्यंत सगळीकडेच याहून वेगळी स्थिती नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाव घेऊन कार्य करणार्‍या संघटनांतही अनेक स्वार्थी तत्त्वांनी शिरकाव केल्यामुळे तेथेही भ्रष्टाचारच पहायला मिळतो. परिणामी जनतेच्या पदरी निराशेविना काही पडत नाही. अशा निराश झालेल्या समाजामध्ये भ्रष्ट प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करण्याची सिद्धता निर्माण करणारे कार्य हिंदु जनजागृती समितीला करायचे आहे. त्रस्त जनतेच्या मनात खदखदत असलेली चीड आणि संताप यांची ठिणगी प्रज्वलित करून त्यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा वणवा निर्माण करायचा आहे. जनतेच्या संतापाला कारणीभूत ठरणार्‍या काही समस्या आणि त्याविषयी उभारायचा लढा पुढे दिला आहे.

श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा

उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त..
श्री महंत सत्यगिरि महाराज
     नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महासचिव आणि काशी येथील श्री महंत सत्यगिरि महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी आखाड्यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.
संकलक : श्री. सचिन कौलकर
१. आखाड्याची स्थापना, त्यांचे इष्टदैवत आणि नित्यसाधना 
     त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथील श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्याची स्थापना विक्रमी संवत ६०३ (वर्ष ५४७), ज्येष्ठ कृष्ण पक्ष नवमी, शुक्रवार या दिवशी करण्यात आली. भगवान सिद्ध गणेशजी हे या आखाड्याचे इष्ट दैवत आहे. या आखाड्याची मुख्य शाखा वाराणसी येथे आहे. प्रतिदिन पहाटे ४ वाजता स्नान करून ध्यानधारणा करणे, पूजा-अर्चा करणे, भाविकांना मार्गदर्शन करणे, अशी त्यांची नित्यसाधना असते. श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्यातील साधूंची संख्या अनुमाने १५ सहस्र इतकी आहे.

नागरिकांच्या आयुष्याला धोकादायक असलेली पाणी प्रदूषण समस्या - कारणे आणि उपाय

श्री. मधुसूदन कुलकर्णी 
      अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गोष्टींकडे राज्यकर्त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. वीज आणि पाणी पुरवण्यासाठी शुल्क आकारूनही नागरिकांना पिण्यायोग्य शुद्ध पाणी पुरवले जात नाही. त्यामुळे सध्या दूषित पाण्याची समस्या पुष्कळ जटील झाली आहे. अशा दूषित पाण्याचा प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होत आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे, तर काहींना त्यामुळे प्राणही गमवावे लागले आहेत. अशा वार्ता आपण नेहमीच नियतकालिकांमध्ये वाचतो; पण त्याची दखल राज्यकर्ते, प्रशासन, संबंधित स्थानिक संस्था आदी घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे क्षुल्लक वाटणारा हा प्रश्‍न डोंगराएवढा मोठा झाला आहे. 
     या समस्येचा विचार करून तिच्या मुळापर्यंत जाणे आणि त्यावर यथोचित मार्ग काढणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. दूषित पाण्यासंबंधीची सद्यःस्थिती, अशा पाण्याचा जनजीवनावर होणारा विपरीत परिणाम, पाणी दूषित होण्याची कारणे आणि त्यावर करावयाची उपाययोजना याविषयीची सूत्रे या लेखात पाहूया.

प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राविषयी अभिमान निर्माण करणारा ग्रंथ वास्तु महाविज्ञान !

डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे
      पाश्‍चात्त्य गृहकल्पनांच्या अतिक्रमणामुळे हिंदूंचे प्राचीन वैभव असलेले वास्तुविद्याशास्त्र लोप पावत आहे. हे एकप्रकारचे सांस्कृतिक आक्रमणच आहे. ते परतवून लावण्यासाठी भारतीय वास्तुविद्येचे महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देणे, भारतीय वास्तुविद्या आणि विज्ञान यांच्या सुसंगमाद्वारे वास्तु निर्माण करणे यांसाठी पुणे येथील सुप्रसिद्ध मेगा प्लॅनर्सचे ज्येष्ठ वास्तुविद्या वाचस्पती डॉ. नरेंद्र हरि सहस्रबुद्धे (वय ६२ वर्षे) हे कार्यरत आहेत. त्यांनी विविध ग्रंथांचे लिखाण केले असून आजवर देश-विदेशांत अनेक कार्यशाळांद्वारे भारतीय वास्तुविद्येचे महत्त्व जगभर पोहोचवले आहे. त्यांनी लिहिलेला वास्तु महाविज्ञान हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याविषयीची माहिती देणारे विवेचन स्वतः डॉ. सहस्रबुद्धे यांनी केले आहे. ते सनातन प्रभातच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुलांनो, देवाविषयी भाव निर्माण करा !
     भाव म्हणजे देवाची मनापासून आठवण येणे किंवा त्याच्याविषयी प्रेम वाटणे.
अ. भावाचे महत्त्व
     भाव तेथे देव, म्हणजेच भावाच्या ठिकाणी देव असतो. भाव असणार्‍यांवर देव नेहमी प्रसन्न असतो. देव संकटात किंवा अडचणीत त्यांना साहाय्य करून त्यांची काळजी घेतो. भाव निर्माण झाल्यावर सातत्याने आनंद जाणवतो. मन स्थिर आणि शांत होऊ लागते.

हिंदूंनो, हिंदुत्ववादाचा देखावा करणार्‍यांना नव्हे, तर हिंदूंवरील अन्यायांना वाचा फोडणार्‍यांच्याच पाठीशी उभे रहा !

     हिंदु धर्माला कोणताही राजकीय पक्ष तारू शकत नाही. निवडणुकीत एखादा विषय मिळावा, यासाठी श्रीराम मंदिर बांधणे यांसारखे प्रश्‍न उपस्थित केले जातात. हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात मंत्रीमंडळात आवाज उठवण्याचे मान्य करणार्‍याच्याच पाठीशी उभे रहा ! - जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

काँग्रेसच्या विचारांची दिवाळखोरी !

    गोहत्या बंदीविषयी बोलतांना महाराष्ट्राचे माज मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी गोहत्या बंदीच्या विरोधात नाही; मात्र काय खावे याची निवड करण्याचा अधिकार लोकांना आहे. आपल्या धार्मिक श्रद्धा इतर धर्मियांवर लादण्याची सक्ती धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे. भाकड गुरांच्या पोषणासाठी शासनाने काहीच व्यवस्था न केल्याने त्यांचे काय करावे, हा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

पोप, मुल्ला यांना, तसेच दर्ग्याला भेटी देणारे शासनकर्ते शंकराचार्यांचा अवमान करते, यात आश्‍चर्य काय ?

     सिंहस्थपर्वासाठी रेल्वेने उज्जैन येथे पोहोचलेले पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सिंहस्थक्षेत्री नेण्यासाठी मध्यप्रदेश प्रशासनाकडून कोणीही उपस्थित नव्हते, तसेच त्यांच्यासाठी व्हीलचेअरचीही (चाकाच्या आसंदीचीही) व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे शंकराचार्यांना काही वेळ फलाटावरील लोखंडी दांड्यावर बसावे लागल्याची घटना ४ मे २०१६ या दिवशी घडली.

अशी मागणी करावी लागणे, हे केंद्रशासनासाठी लज्जास्पद ! गोव्यात मराठीची गळचेपी

करणारे भाजपचे शासन केंद्रातही करणारच ! 
     बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली. महाराष्ट्र शासनाकडून २००५ पासून सातत्याने नामकरणाची मागणी करण्यात येत आहे; परंतु केंद्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात नसल्यामुळे विलंब होत आहे. हिंदु आतंकवाद या संकल्पनेतील फोलपणा दर्शवणारे श्री. विक्रम भावे लिखित पुस्तक

     वर्ष २०१३ मध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांनी कारागृहात असतांना मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात हे पुस्तक लिहून वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदु आरोपींच्या निरपराधत्वाविषयी सर्व उल्लेख केला आहे. या पुस्तकात विक्रम भावे म्हणतात, कारागृहातून मुक्त झाल्यावर हे लिखाण माझ्या हातून घडले. कारागृहातील अनुभव यातनादायक मानला जातो. माझाही अनुभव याला अपवाद नव्हता; मात्र कित्येक सहबंदी, तसेच कारागृह कर्मचारी यांचे शेकडो सुखद अनुभवही माझ्या वाट्यास आले. त्यामुळे माझे मनोबल कायम राहिले आणि काहीतरी सकारात्मक निर्मिती करण्याचे मनात आले. २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट आणि २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट या दोन्ही प्रकरणांत अनुक्रमे मुस्लिम आरोपी आणि हिंदु आरोपी माझ्या समवेत कारागृहात होते.

वृत्तवाहिन्यांवर हिंदुत्वाची बाजू मांडण्यासाठी असलेली पोकळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद या संघटनांनी भरून काढणे !

   
अधिवक्ता संजीव पुनाळेकर
श्री. अभय वर्तक
     बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडे वृत्तवाहिन्यांवर बोलण्यासाठी प्रवक्ते नसल्याने एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती; मात्र सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद या संघटनांनी ती भरून काढली. त्यामुळे हिंदी, मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषांमधील प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तवाहिन्या विविध चर्चासत्रांमध्ये हिंदुत्व, धर्म अथवा राष्ट्रवाद यांसंदर्भातील भूमिका मांडण्यासाठी या संघटनांच्या प्रवक्त्यांना निमंत्रित करतात.
     लव्ह जिहाद; हिंदूंवरील वाढते अत्याचार; भोजशाळा प्रकरण; शनिचौथरा, हाजी अली दर्गा इत्यादी ठिकाणी धर्मद्रोही महिलांचा घुसण्याचा प्रकार; संतांचे चमत्कार; जात पंचायती; प्रसारमाध्यमांचा अतिरेक होत आहे का ?; धर्मशिक्षण यांसारख्या विविधांगी सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक विषयांवर वरील संघटनांचे प्रवक्तेच गेल्या काही वर्षांपासून धर्माची बाजू प्रखरपणे मांडत आले आहेत.
     १३ मे या दिवशी मालेगाव स्फोट प्रकरणातील महत्त्वाच्या सूत्रावर आयोजित चर्चासत्रांना हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडण्यासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी वरील संघटनांच्या खालील प्रवक्त्यांना निमंत्रित केले होते.
 
डॉ. उदय धुरी
अधिवक्ता नागेश ताकभाते

रा.स्व. संघ आणि विहिंप स्वतःच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष का करते ? सनातन संस्था साधकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असते !

   साध्वी प्रज्ञासिंह १४ वर्षांच्या असतांना त्यांचा ओढा रा.स्व. संघाकडे होता. त्यांचे वडील सी.पी. ठाकूर यांचे चिकित्सालय होते. ते स्वत: संघाशी जोडलेले होते. साध्वी प्रज्ञासिंह महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होत्या.

भाजप सरकार सत्तेवर येऊनही दोन वर्षे निरपराधी कारागृहातच !

   मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तत्कालिन धर्मद्रोही काँग्रेस सरकारने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य निरपराध्यांना ६ वर्षे डांबून ठेवले. त्यानंतर भाजपचे सरकार सत्तेवर येऊनही हे सर्व आरोपी दोन वर्षे कारागृहात रहाणे हिंदूंना अपेक्षित नाही ! काँग्रेसने काही दिवसांतच हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी साध्वी प्रज्ञा आणि अन्य जणांना अटक केली, तर सुटकेसाठी २ वर्षे का ?

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
     सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
रामनाथी आश्रम म्हणजे पृथ्वीतलावरील आध्यात्मिक स्वर्गच !
     तुमचा आश्रम मी प्रथमच पहात आहे. आश्रम पाहिल्यावर त्यावर विश्‍वास ठेवणे कठीण वाटावा, एवढा तो चांगला आहे. जणू पृथ्वीतलावरील आध्यात्मिक स्वर्गच आहे. तुमची ईश्‍वरप्राप्तीची महत्त्वाकांक्षा आमच्यासाठी पुष्कळ साहाय्यभूत ठरत आहे. तुमच्याप्रमाणे आम्हालाही आध्यात्मिक जीवन जगणे आवश्यक आहे. कृतज्ञता ! - मीना (७.१.२०१६)

कथित हिंदुत्ववाद्यांनी एका संन्याशाच्या विरोधात केलेल्या तक्रारीची तत्परतेने नोंद घेणारे पोलीस हिंदुत्ववाद्यांच्या धर्मांधांच्या विरोधातील तक्रारीची कधीतरी तत्परतेने नोंद घेतात का ?

एका मंदिर परिसरात भाविकांना पत्रिका पाहून भविष्य सांगणारा एक संन्यासी प्रतिदिन धुनी लावत असे. त्याने भविष्य सांगणे आणि धुनी लावणे थांबवावे, यासाठी काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनीही त्या संन्याशाला लोकांचे भविष्य सांगू नये आणि धुनी लावू नये, अशा आशयाची नोटीस दिली.
पोलीस कधी एखाद्या मुल्ला किंवा मौलवी यांना मशिदीत काय 
करू नये, याविषयी नोटीस बजावण्याचे धाडस दाखवतात का ?

हिंदुत्वनिष्ठांनो, आंदोलने करतांना ही दक्षता घ्या !

१. आंदोलने करतांना काही वेळा पोलीस लाठीमार करतात. अशा वेळी डोक्यावर लाठी लागून गंभीर इजा होण्याची शक्यता असते. यासाठी संघर्षपूर्ण आंदोलने व्हायची शक्यता असल्यास आंदोलकांनी दुचाकीचे शिरस्त्राण (हेल्मेट) घालून जावे.
२. आंदोलने करतांना आंदोलकांनी हातात फलक आणि झेंडे घेऊन जावे. पोलिसांनी लाठीमार चालू केल्यानंतर आंदोलकांनी स्वरक्षणासाठी हातातील फलक अथवा झेंडे यांच्या काठ्यांनी पोलिसांच्या लाठीमारापासून स्वतःच्या शरिराचे रक्षण करावे.

पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेल्यावर पोलिसी मनोवृत्तीची अनुभवलेली चुणूक !

१. दोन तृतीयपंथी होळीची वर्गणी मागण्यासाठी
आल्यावर भीतीपोटी इमारतीमधील बहुतांश सर्वांनी वर्गणी देणे
   १७.३.२०१६ या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत आमच्या सदनिकेत दोन हिजडे तृतीयपंथी होळीची वर्गणी मागण्यासाठी आले होते. त्यांच्या भीतीपोटी आमच्या इमारतीमधील बहुतांश सर्वांनी त्यांना वर्गणी दिली. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी मात्र त्यांना वर्गणी न देण्याचे धाडस दाखवले. ते कोणत्या भागातून आले आणि त्यांची नावे काय आहेत, हेही त्यांना विचारायला जमले. त्यांचे असे शहरी (नागरी) वस्तीतून वर्गणी मागणे माझ्या मनाला मुळीच पटले नाही. यावर स्वस्थ न बसता काहीतरी करावे, असे मला तीव्रतेने वाटू लागले.
२. वर्गणी दिलेल्या सर्व महिलांना भेटून समस्येचे गांभीर्य सांगून
पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन देण्याविषयी विचारणे आणि सर्वांना हा विचार पटणे

समोरच्या इमारतीमध्येही ते लोक गेले होते आणि तेथील सर्व महिलांनी भीतीपोटी त्यांना वर्गणी दिल्याचे समजले. मी या सर्व महिलांना दुपारी लगेच जाऊन भेटले आणि त्यांच्यासमोर विचार मांडले, आता हे लोक अन्य सणांच्या वेळीही येऊन सर्वांकडून वर्गणी घेतील, अन्य स्वरूपाचे गंभीर गुन्हेही करण्यास धजावतील. तेव्हा आपण सर्वांनी मिळून पोलीस ठाण्याला जाऊन त्यांचा बंदोबस्त करण्याच्या संदर्भात निवेदन देऊया का ? तेव्हा सर्वांना हा विचार पटला. त्या महिलांमध्ये अन्यायाच्या विरोधात लढा देण्याची वृत्ती निर्माण करावी. आज त्या व्यक्तीगत स्वरूपाच्या हानीच्या विरोधात काहीतरी कृती करण्यास सिद्ध होतील. उद्या समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात होणार्‍या हानीच्या संदर्भात काही विचार करतील अन् कृतीशील होतील. सर्वांचा थोडाफार आत्मविश्‍वास वाढेल, असेही विचार माझ्या मनात आले. एकमेकींच्या साहाय्याने निवेदनावर २२ जणींच्या स्वाक्षर्‍या झाल्या.

सायंकाळी ध्यानमंदिरात होणार्‍या आरतीनंतर आश्रमावर लावण्यात येणार्‍या कळसांना ओवाळतांना गुरूंचा श्‍लोक म्हटला जाणे आणि साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे सर्व गुरुदेव असल्याने त्यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्याचे कार्य होणार असल्याचे देवाने सांगणे

    
श्री. अविनाश जाधव
रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरामध्ये आश्रमावर, म्हणजेच मंदिरावर अक्षय्य तृतीयेला लावण्यात येणारे कळस ठेवण्यात आले आहेत. महर्षींनी या तिन्ही कळसांना ध्यानमंदिरातील आरती झाल्यानंतर ओवाळण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सायंकाळी आरती झाल्यानंतर नित्यनियमाने कळसांना आरती ओवाळणे होत होते. तिन्ही कळसांना आरती ओवाळतांना प्रतीदिन गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ हा श्‍लोक म्हटला जात होता.
     हे कळस ब्रह्मा, विष्णु आणि महेश्‍वर यांची प्रतीके असली, तरी हे तिन्ही कळस म्हणजे गुरुदेव श्रीमत् नारायण आहेत आणि कळसांच्या माध्यमातून, म्हणजेच गुरुदेवांच्या माध्यमातूनच पुढील हिंदु राष्ट्र स्थापनेचे सर्व कार्य होणार असल्याची देवच मनाला जाणीव करून देत असल्याचे लक्षात आले.
- श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, गोवा. (५.५.२०१६)

राहो सदा आमचे चित्त तुज चरणांवरी ।

आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी
कळसातील चैतन्य सांगे वायुदेवतेला ।
ने मज सर्व कर्महिंदूंजवळी ।
स्थापण्या सत्वर
हिंदु राष्ट्र या भूवरी ।
करण्या समष्टी साधना सत्वर ।
ने मज सत्वर सत्वर ॥ १ ॥
ऐकोनी मनोगत वायुदेवतेचे ।
कृतज्ञ झाले मन ।
झाली प्रार्थना विश्‍वमनास ।
सर्व कर्महिंदूच्या मनात वसू दे एक तुझा विचार ॥ २ ॥
तळमळण्या, धडपडण्या हिंदु राष्ट्रासाठीचा ।
अर्पिण्या प्राणही गुरुचरणांसी ।
व्हावी ही इच्छा पूर्ण ।
आम्हा सर्व साधकांची, गुरुराया ।
धूळ समजूनी घे विलीन करूनी ।
तव चरणी कायमचे ॥ ३ ॥

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमावर स्थापन केलेल्या तीन कळसांची छायाचित्रे पाहून हे कळस त्रिमूर्तींचे म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहेत, असे जाणवणे

     महर्षींच्या मार्गदर्शनानुसार अक्षय्य तृतीयेला (९.५.२०१६ या दिवशी) रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमावर तीन कळसांची स्थापना करण्यात आली. त्याविषयी छायाचित्रासह वृत्त १०.५.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यात कळसांची छायाचित्रे बघून माझी चार वर्षांची मुलगी चि. सान्वी हिला हे कळस अतिशय आवडले. ती मला म्हणाली, आपणही असे कळस घरी बसवूया का ? माझी पत्नी सौ. वैभवी हिला हे कळस त्रिमूर्तींचे म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहेत, असे जाणवले. मलाही कळसांची छायाचित्रे बघून पुष्कळ चैतन्य जाणवले.
- श्री. केदार दामले, आणंद, गुजरात. (१०.५.२०१६)

रामनाथी आश्रमावर स्थापित होणार्‍या कळसांच्या पूजनाच्या वेळी आलेली अनुभूती

सौ. अनुपमा जोशी
प.पू. डॉक्टरांचे विशाल रूपात दर्शन होणे आणि स्वतः विष्णुलोकात असल्याचे जाणवणे : ध्यानमंदिरात कळसाच्या पूजनाच्या वेळी प.पू. डॉक्टर उभे असतांना त्यांचे खांद्यापासून पायापर्यंतच दर्शन होत होते; पण तेवढ्यातच त्यांचे मोठे रूप दिसले. ते इतके मोठे की, पुरोहित आणि ध्यानमंदिरातील साधक त्यांच्यापुढे अगदी अंगठ्याएवढे दिसत होते. त्या वेळी आपण विष्णुलोकातच आहोत, असे जाणवले. - सौ. अनुपमा जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०१६)

कळसारोहण सोहळ्याला होत असलेल्या आसुरी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न होत असतांना पू. आजींनी शोधलेले उपाय आणि प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले उपाय सारखे असणे

   
पू. आशालता सखदेव
  ८.५.२०१६ या दिवशी श्‍वास घेण्यास त्रास होत असतांना पू. आजींनी उपाय शोधले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, उद्या होत असलेल्या कळसारोहण सोहळ्याला होत असलेल्या आसुरी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न होत असल्याने स्वतःला त्रास होत आहे. हा त्रास रात्री उशिरापर्यंत होत रहाणार, असे त्यांना वाटले. पू. आजींनी शोधलेल्या उपायांसंदर्भात प.पू. डॉक्टरांना विचारले असता त्यांनी उपाय बरोबर असल्याचे आणि हा समष्टी त्रास असल्याने महर्षींनी सांगितलेला ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा नामजपही मधेमधे करण्यास सांगितला. हा निरोप पू. आजींना देताच त्या म्हणाल्या त्रास होण्यास आरंभ झाल्यानंतर मी उपाय शोधले, तेव्हापासून मधेमधे ॐ निसर्गदेवो भव । .. हा नामजप चालूच झाला. मलाच वाटले की, माझे काही चुकते आहे; पण हा नामजप मधेमधे होत आहे. आताही मी तोच नामजप करत आहे.
- कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०१६)

सिंहस्थ क्षेत्री फूल नसतांनाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शन कक्षातील संत कक्षात फुलपाखरू येऊन पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याजवळ शांतपणे बसणे; पू. (कु.) स्वाती खाडये आल्यावर त्यांच्याकडे तोंड करणे !

पू. (कु.) स्वाती खाड्ये यांच्याकडे तोंड
करून बसलेले फुलपाखरू
     सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शन कक्षात उभारण्यात आलेले संत कक्षात ४ मे २०१६ च्या रात्री ८.३० च्या सुमारास पू. डॉ. चारुदत्त पिंगळेकाका बसले असतांना एक फुलपाखरू त्यांच्याजवळ येऊन बसले. वैशिष्ट्यपूर्ण असे की, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन असलेले क्षेत्र शेतीची जमीन असल्याने तिकडे फुलांची लागवड कुठेच नाही. त्यामुळे कोणीच त्या परिसरात फुलपाखरू पाहिलेले नव्हते. 
     पू. पिंगळेकाका बसले असतांना ते फुलपाखरू त्यांच्या जवळ बसले होते. थोड्या वेळेत त्या कक्षात पू. (कु.) स्वाती खाडये यांचे आगमन झाल्यावर फुलपाखराने त्याची दिशा पालटून पू. स्वातीताई बसलेल्या दिशेला तोंड करून बसले. 
- श्री. अरविंद पानसरे, उज्जैन, मध्यप्रदेश
ईश्‍वर मनुष्याला संत अथवा ज्ञानप्राप्तकर्ता साधक यांच्या माध्यमातून सांगत असल्याने त्या साधकाला आनंद मिळून त्याच्यावर ईश्‍वरी कृपा होत असणे

     पंतप्रधानांना राष्ट्रासंबंधित अनेक कामे असतात. प्रत्येक काम ते स्वतः न करता कर्मचार्‍यांकडून करून घेतात. त्या कामानिमित्त कर्मचार्‍याला मासिक वेतन मिळते. त्याप्रमाणे ईश्‍वराला मनुष्याला काही सांगायचे असल्यास तो संत अथवा ज्ञानप्राप्तकर्ता साधक यांचे माध्यम निवडतो. या सेवेतून साधकाला आनंद मिळून त्याच्यावर ईश्‍वरी कृपा होते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०१६)

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या कळसारोहण विधीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

     
कु. मधुरा भोसले
     महर्षींच्या आदेशावरून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात तीन ठिकाणी तीन कळसांचे रोहण (स्थापन) करण्यात आले. हा मंगल विधी होत असतांना कळसांवर केलेल्या धार्मिक विधींचा सूक्ष्म स्तरावर कशा प्रकारे परिणाम होतो, याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि त्याविषयी त्यांना मिळालेले ज्ञान पुढे देत आहोत.

गुरुधनाचा नाहक व्यय होऊ नये; म्हणून मुलाच्या लग्नाप्रीत्यर्थ पुन्हा मुंबईला स्वागतसमारंभ करण्याचे रहित करणारे आदर्श मातापिता !

      एका साधकाच्या मुलाचे लग्न गोव्यात झाले. ते मूळचे मुंबईचे असल्यामुळे त्यांनी मुलाचे लग्न झाल्यावर मुंबईला स्वागतसमारंभ (रिसेप्शन) करायचे ठरवले होते; कारण मुंबईचे काही नातेवाईक आणि ओळखीचे लग्नाला येणार नव्हते. त्यांनी तिथे स्वागतसमारंभासाठी कार्यालयाची चौकशी केली. त्याचा व्यय (खर्च), तसेच खाण्यापिण्याचा व्यय मिळून लाखो रुपये लागतील, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी लोक काय म्हणतील !, याचा विचार न करता गुरुधनाचा नाहक व्यय होईल, हा विचार करून मुंबईतील स्वागतसमारंभ रहित केला. त्यांनी नातेवाइकांना सांगितले, नवदांपत्यच तुम्हा सर्वांना नमस्कार करायला येईल. - (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.४.२०१६) सनातनच्या रामनाथी आश्रमावर ३ कळसांची स्थापना करण्यापूर्वी विधीयुक्त पूजनाचा त्यांच्यावर झालेला परिणाम दर्शवणारी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

महर्षींच्या मार्गदर्शनानुसार रामनाथी, गोवा येथील 
सनातनच्या आश्रमावर स्थापना करण्यासाठी आणलेले कळस
       महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर ३ दैवी कळसांची स्थापना करण्यात आली. कळसांची स्थापना करण्यापूर्वी त्यांचे विधीयुक्त पूजन करण्यात आले. कळसांंचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांतून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या जिज्ञासूंची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सनातनच्या रामनाथी आश्रमात जगभरातील जिज्ञासूंसाठी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या वेळी ही कार्यशाळा १०.५.२०१६ ते १४.५.२०१६ या कालावधीत घेण्यात आली. कार्यशाळेसाठी आलेल्या जिज्ञासूंनी आतापर्यंत केलेली साधना आणि कार्यशाळेत सहभागी होण्यामागील कारणमीमांसा येथे थोडक्यात देत आहोत.
स्वभावदोष-निर्मूलनासाठी गांभीर्याने प्रयत्न करणार्‍या कु. मिल्की अगरवाल !
१. लहानपणापासून अध्यात्माकडे कल असणे आणि साधनेविषयी योग्य मार्गदर्शन न मिळणे : कु. मिल्की यांनी बायो-टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून काही काळ त्यांनी अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. लहानपणापासूनच त्यांचा कल अध्यात्माकडे होता. त्यामुळे त्यांनी अध्यात्मावरील अनेक ग्रंथ आणि भगवद्गीता वाचली; परंतु प्रत्येक ग्रंथ वाचल्यानंतर त्या अधिकाधिक गोंधळून जात असत. त्यामुळे साधना करून अध्यात्मात प्रगती कशी करायची ?, यासंदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नव्हते. 

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांकडून करवून घेतलेले विविध प्रयोग आणि त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती

   महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सनातनच्या रामनाथी आश्रमात देशभरातील जिज्ञासूंसाठी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या वेळी ही कार्यशाळा १०.५.२०१६ ते १४.५.२०१६ या कालावधीत घेण्यात आली. कार्यशाळेच्या दुसर्‍या, म्हणजे ११.५.२०१६ या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन दाखवण्यात आले, तसेच त्यांच्याकडून सूक्ष्मातील वेगवेगळे प्रयोग करवून घेण्यात आले. त्यांच्याकडून करवून घेतलेले विविध प्रयोग आणि त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. प्रयोग क्र. १ - श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहाणे : एका विभागात ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून सर्वच सहभागी झालेल्यांना चित्रामध्ये हालचाल होत असल्याचे दिसले, उदा. श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र फिरत असल्याचे दिसणे, स्वतः उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे हलल्यावरही श्रीकृष्णाची दृष्टी आपल्यावर टिकून असल्याचे जाणवणे, श्रीकृष्णाच्या डोळ्यांची हालचाल होतांना आणि चित्रातील श्रीकृष्णाच्या हसण्यात पालट होतांना दिसणे

रामनाथी आश्रमातील कळसारोहण विधीच्या वेळी गरुड येण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

    
कु. प्रियांका लोटलीकर
विज्ञानाच्या स्तरावर हे सिद्ध झाले आहे की, प्राण्यांच्या पंचज्ञानेंद्रियांची क्षमता मानवाच्या पंचज्ञानेंद्रियांपेक्षा अधिक असते. त्यामुळे प्राण्यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमताही मानवाच्या क्षमतेपेक्षा अधिक असते. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या देवतेचे तत्त्व अधिक असते, तेथे त्या देवतेशी संबंधित पशू-पक्षी अथवा वनस्पती आढळून येतात. काही जण याला अंधश्रद्धेच्या नावाखाली दुर्लक्षित करतात; परंतु त्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणही असते, उदा. दत्तक्षेत्रामध्ये गाय अथवा कुत्रे आढळतात. शिवाच्या मंदिराजवळ बेलाचा वृक्ष आलेला दिसतो. यामागील कारण म्हणजे त्या तीर्थक्षेत्रातून प्रक्षेपित होणारे देवतेचे तत्त्व त्या जिवांसाठी पूरक असल्यामुळे ते जीव आपोआपच तेथे आकृष्ट होतात. त्याप्रमाणे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातून कळसारोहण विधीच्या वेळी प्रक्षेपित होणार्‍या विष्णुतत्त्वामुळे त्या ठिकाणी तीनही कळसांच्या स्थापनेच्या वेळी गरुडाचे आगमन झाले.

रामनाथी आश्रमात झालेल्या कळसारोहणाच्या संदर्भात सप्तर्षि जीवनाडीपट्टीत महर्षींनी सांगितलेली सूत्रे

महर्षि
१. परम गुरुजींनी केलेल्या भगीरथ 
प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे !
     राजा भगीरथाने ज्या प्रकारे भगीरथ प्रयत्न करून गंगेला भूतलावर आणले, तसेच परम गुरुजींनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे. (सप्तर्षि जीव नाडीपट्टी वाचन क्र. ७५, चंदीगड (११.५.२०१६))
२. देवतांनी वरुणाशीर्वाद देऊन 
कळसारोहणाचे चैतन्य सर्वदूर पसरवले !
     गंगा पृथ्वीवर आली, तेव्हा देवांनी तिचे सात भाग केले होते. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधु आणि कावेरी याच त्या सप्त पवित्र नद्या ! गंगेचे जल सप्तनद्या आणि ११ तीर्थे या ठिकाणी गेले. रामनाथी येथे अक्षय्य तृतीयेला झालेले कळसारोहण देवतांनी स्वीकारले आहे. साधकांना कळसारोहणाचे चैतन्य सप्तनद्या आणि ११ तीर्थे या ठिकाणी जाऊन ग्रहण करण्यास मर्यादा असल्याने देवतांनी त्या दिवशी सर्वत्र वरुणाशीर्वाद देऊन कळसारोहणाचे चैतन्य सर्वदूर पसरवले. (सप्तर्षि जीव नाडीपट्टी वाचन क्र. ७५, चंदीगड (११.५.२०१६))

जिल्हासेवक, वितरक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन पंचांगाची अभ्यासपूर्वक मागणी नोंदवून परिपूर्ण सेवा करा !
    वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाची मागणी सर्व जिल्ह्यांनी १५.५.२०१६ या दिवसापर्यंत कळवणे अपेक्षित आहे, अशी सूचना यापूर्वी दिली होती. मागणी नोंदवतांना लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे देत आहे.
१. मागील वर्षीची मागणी आणि वितरण अन् जिल्ह्याची सद्य:स्थिती यांचा अभ्यास करून, तसेच समाजापर्यंत अधिकाधिक पंचांग पोचावेत, यासाठी साधकांना उद्युक्त करून जिल्हासेवकांनी अंतिम मागणी देणे आवश्यक आहे.
२. सर्वच पंचांगाचे वितरण १५.११.२०१६ या दिवसापर्यंत, तर त्याची येणे बाकी ३०.११.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करावी. प्रायोजित केलेल्या पंचांगांची येणे बाकी पूर्ण झाली, तरी त्या पंचांगांचे वितरण ३०.११.२०१६ या दिवसापर्यंतच पूर्ण करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्वच पंचांगांचे वितरण आणि येणे बाकी दिलेल्या समयमर्यादेत पूर्ण होईल, अशा दृष्टीने अभ्यास करून जिल्हासेवकांनी मागणी नोंदवावी.

हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
   राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेलेे शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.
१. हिंदु धर्मशास्त्रानुसार अन्नदानाचे महत्त्व
    हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. अन्नदानामुळे भोक्ता तृप्त होऊन आशीर्वाद देतो; म्हणून अन्नदान करणे हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. अन्नदान केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपाने अन्नदानाच्या दुप्पट फळ अन्नदात्याला मिळते; परंतु अहंपोटी अन्नदान केल्यास फळ निम्मे होते. त्यामुळे धर्मकर्तव्य समजून अन्नदान करणे आवश्यक आहे.

गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
    या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

सर्वांगस्पर्शी ज्ञान उपलब्ध करून देणार्‍या वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाची मागणी लवकरात लवकर कळवा !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. राष्ट्र, धर्म आणि साधना या विषयांचा सुरेख संगम असलेल्या
सनातन पंचांगातून वाचकांना विविधांगी विषयाचे ज्ञान मिळणे
    प्रतिवर्षीप्रमाणे वर्ष २०१७ मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगु आणि ओडिया या ८ भाषांत सनातन पंचांग विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या वर्षीच्या पंचांगात धर्मशिक्षण, धर्मपालन, धर्मजागृती आणि धर्मरक्षण आदींविषयी समाजमनाचे प्रबोधन करण्यासाठी त्या संदर्भातील लिखाण अंतर्भूत करण्यात आले आहे. अश्‍लीलता, भेसळ, भ्रष्टाचार, आतंकवाद यांसारख्या सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांच्या संदर्भातही जागृतीपर लिखाण यात आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करणारे विविध संत, तसेच हिंदुत्ववादी संघटना यांच्याविषयी सर्वांना अवगत व्हावे, याकरता त्यांचा परिचय यामध्ये प्रसिद्ध केला आहे.
२. सनातन पंचांगाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अपुरी
साधकसंख्या यांमुळे काही वाचकांपर्यंत मागील वर्षीचे पंचांग न पोचणे
सनातन पंचांगातील देवता आणि संत यांची सात्त्विक चित्रे, तसेच चैतन्यदायी रचना अन् रंगसंगती यांमुळे ते घरात लावल्यानंतर घरातील वातावरण आनंददायी आणि चैतन्यमय झाल्याच्या अनुभूती आजवर अनेकांनी घेतल्या आहेत.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत गोरक्षण विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन इत्यादींची तातडीने आवश्यकता !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
    सनातनच्या आश्रमांत पावसाळ्यापूर्वीच्या सिद्धतेसाठी आगाशी, पायर्‍या, तात्पुरत्या निवारा शेड, तसेच अन्य साहित्य झाकून ठेवण्यासाठी नवीन किंवा वापरलेले फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन, मॅटिंग किंवा अन्य तत्सम साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. वापरलेले किंवा किरकोळ दुरुस्तीने वापरण्यायोग्य होणारेे साहित्यही चालेल. नवीन फ्लेक्स किंवा सिलपोलीन सवलतीच्या दराने उपलब्ध होत असल्यास साधकांनी तसे कळवावे.
    वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य अर्पण अथवा सवलतीच्या दराने देऊन धर्मकार्यास हातभार लावायचा असेल, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना ८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
    भावार्थ : हे असे आहे का? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    कलियुगातील सध्याच्या काळात जनता रज-तमप्रधान असल्यामुळे ती निवडून देणारे लोकप्रतिनिधीही रज-तमप्रधान आहेत. त्यामुळे देश परमावधीच्या अधोगतीला गेला आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
समुद्रातील वादळे अल्पकाळात नाहीशी होतात; पण मनातील वादळे एकदा निर्माण झाली की, 
ती आवरणे अतिशय कठीण; म्हणून ती निर्माण होऊ न देण्यासाठी साधना करणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

खर्‍या आरोपींना शासन हाच न्याय !

संपादकीय
      वर्ष २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून गेली आठ वर्षे कारागृहात अनन्वित यातना भोगणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह यांना निर्दोष ठरवल्याच्या वृत्ताने समस्त हिंदुप्रेमींना आनंदवार्ता दिली. आता त्यांची कारागृहातून सुटका होईलही; परंतु दोन्ही मालेगाव बॉम्बस्फोटांच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आणि अन्वेषण यंत्रणांनी खर्‍याचे खोटे अन् खोट्याचे खरे करून समस्त राष्ट्रातील जनतेशी आणि सैन्याशी जी भयावह प्रतारणा केली आहे, तसेच हिंदु धर्माभिमान्यांची जी आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत, ती हानी कधीही कोणत्याही गोष्टींनी भरून निघणारी नाही. त्यामुळेे याला उत्तरदायी राज्यकर्ते आणि अधिकारी यांनाही आयुष्यभराची अद्दल घडेल, असे कठोरात कठोर शासन होण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी आता संघटितपणे केली पाहिजे. दैव बलवत्तर असल्याने दैवाने साध्वींना साथ दिली आणि शेवटी सत्याचा विजय झाला; परंतु एका संन्याशिणीचा घोर अपमान होत असतांना हिंदू मात्र शांत बसले, हे सत्य नाकारून चालणार नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn