Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह ४ जणांना निर्दोष ठरवत आरोपपत्रातून वगळले !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची अभिनंदनीय कृती !
२००८ वर्षचे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
सर्व आरोपींवरील मोक्काही हटवला !
भगव्या आतंकवादाचा काँग्रेसचा फुगा फुटला !
  •  आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी चुकीच्या पद्धतीने अन्वेषण केले !
  •  आतंकवादविरोधी पथकानेच लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरात आर्डीएक्स ठेवले !
      मुंबई - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी येथील न्यायालयात २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरवणी आरोपपत्र सादर केले. यात या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आतापर्यंत समोर आणण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य तिघांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांचे नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलेले नाही, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने यात म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील सर्व १२ आरोपींवरील मोक्का हटवण्यात आला आहे. आरोपपत्रात नाव नसल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांची लवकरच सुटका होणार आहे.
१. आरोपपत्रात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) या स्फोटाच्या प्रकरणी प्रारंभी केलेल्या अन्वेषणावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी चुकीच्या पद्धतीने या स्फोटाचे अन्वेषण केले, असा आरोप यात लावण्यात आला आहे.

गेल्या ८ वर्षांमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोगाव्या लागलेल्या दु:खदायक आणि वेदनादायक घटना !

हिंदु साधू-संतांवर ब्रिटिशांच्या काळातही झाले नाहीत, असे 
अत्याचार तत्कालीन काँग्रेसप्रणीत आतंकवादविरोधी पथकाने केले !
हे वाचून ज्या हिंदूंचे रक्त सळसळत नाही, ते हिंदू नव्हेतच !
१. साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांच्या अटकेच्या आधी १३ दिवस आतंकवादविरोधी पथकाच्या (एटीएस्च्या) अधिकार्‍यांनी त्यांना डांबून ठेवले.
२. साध्वी यांच्या पावित्र्याविषयी अर्वाच्च्य भाषा वापरली. त्यांना अश्‍लील चित्रफीती दाखवण्यासारखे घृणास्पद प्रकार आतंकवादविरोधी पथकाने केले.
३. पोलिसांनी साध्वी यांना कंबरपट्ट्याने बेशुद्ध पडेपर्यंत झोडपले. त्या अनेकवेळा बेशुद्ध पडल्या.
४. त्यांचा केलेला छळ एवढा असह्य होता की, त्यांना आत्महत्याच करावीशी वाटत होती.
५. अधिकारी खानविलकर आणि त्यांच्या गटाने साध्वी यांना रात्रंदिवस प्रचंड मारहाण केली.
६. साध्वींच्या शिष्य भीमभाई याला साध्वींना मारण्यास भाग पाडण्यात आले.

कथित भगव्या आतंकवादाच्या षड्यंत्रामागील सूत्रधाराला बेड्या केव्हा घालणार ? - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

     राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव वगळण्यात आले, तसेच कर्नल पुरोहित यांच्या घरी आर्डीएक्स ठेवून त्यांना गोवण्यात आले होते, हे आज स्पष्ट झाले. गेली ७-८ वर्षे साध्वीजी आणि कर्नल पुरोहित यांना प्रचंड छळ सोसावा लागला. साध्वींना साधे उपचारही मिळू दिले नाहीत. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि त्यापुढे जाऊन भगव्या आतंकवादाचे षड्यंत्र रचणार्‍या सूत्रधारांवरही कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
१. भगव्या आतंकवादाचे षड्यंत्र आता उघड होत आहे. डेव्हीड हेडलीने इशरत जहाँ आतंकवादी असल्याचा खुलासा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी प्रतिज्ञापत्रात फेरफार केल्याचे उघड झाले होते.

मालेगाव स्फोटाचे प्रकरण

१. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री हा स्फोट झाला होता. यात ४ जण ठार, तर ७९ जण घायाळ झाले होते. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने या स्फोटामागे कडव्या हिंदुत्ववादी संघटनाचा हात असल्याचे सांगत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण १२ जणांना अटक केली होती.
२. साध्वी प्रज्ञासिंह यांनी स्कूटरवर बॉम्ब ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता; मात्र प्रत्यक्षात ही स्कूटर त्यांनी कधी वापरलीच नव्हती. त्यांनी ती दोन वर्षांपूर्वीच म्हणजे २००८ मध्ये विकली होती, तरीही त्यांना या प्रकरणात अटक करून गोवण्यात आले.
३. साध्वी प्रज्ञासिंह यांना २४ ऑक्टोबर २००८ या दिवशी कागदोपत्री अटक केल्याचे दाखवण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात त्याच्या काही दिवस आधीच त्यांना महाराष्ट्र एटीएस्ने कह्यात घेऊन त्यांचा छळ केला होता.
४. वर्ष २०११ मध्ये या प्रकरणाचे अन्वेषण महाराष्ट्र एटीएस्कडून एन्आयएकडे आले होते.
५. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित, शिवरानायण कलसांगरा, श्याम साहू, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण यांना अटक करण्यात आली, तर रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे फरार आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यावर खोटे खटले दाखल करणार्‍यांवर कारवाई करा ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

     साध्वी प्रज्ञासिंह यांना क्लिन चिट मिळाल्याचा आम्हाला आनंद झाला आहे. हा खटला चुकीचा होता. खोट्या आरोपांखाली आरोपींना अटक करण्यात आली होती. आठ वर्षे साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांसारख्या लोकांना अंडा सेलमध्ये सडवण्यात आले असून आता जे अधिकारी आणि राजकारणी यांनी हे खोटे खटले दाखल केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी केली आहे.

वृंदावन येथील कथावाचक पंडित देवकीनंदन ठाकुर यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान !

पंडित देवकीनंदन ठाकुर यांच्याशी चर्चा करतांना
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (उजवीकडे)
     उज्जैन - वृंदावन येथील लोकप्रिय कथावाचक पंडित देवकीनंदन ठाकुर यांचा त्यांच्या छावणीमध्ये जाऊन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि सनातन संस्थेचे उत्तर भारत प्रसारसेवक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शाल, श्रीफळ, सनातन-निर्मित हिंदु राष्ट्र क्यों आवश्यक ? हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. 
    या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळेकाका आणि पं. देवकीनंदन ठाकुर यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. सनातन संस्थेचे साधक श्री. प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आणि अन्य साधक या वेळी उपस्थित होते. 
क्षणचित्रे : या वेळी अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पं. देवकीनंदन ठाकुर यांच्या दर्शनासाठी आले होते. ते पोलीस त्यांना खाली वाकून नमस्कार करत होते.


उज्जैन सिंहस्थाचा प्रसार करत असतांना ३६ वर्षांनंतर जुन्या मित्राची भेट होणे आणि त्याने साधनेची आवड दाखवून पहाटे प्रदर्शन बघण्यासाठी येणे !

श्री. जगदीश ढकेचा यांना प्रदर्शन दाखवतांना
श्री. विनय पानवळकर, त्यांच्या उजवीकडे
श्री. आप्पासाहेब सांगोलकर
     उज्जैन सिंहस्थ २०१६ च्या प्रसारासाठी मला इंदूर येथे जाण्याची संधी मिळाली. वर्ष १९७९ मध्ये मी शासकीय खात्यात सेवारत असतांना इंदूर येथील अभियंता श्री. जगदीश ढकेचा आमच्यासमवेत नगर येथे सेवेला होते. पुढे त्यांनी १९८० मध्ये नोकरीचा त्याग केला. ३६ वर्षे त्यांच्याशी भेट झाली नाही. 
    इंदूर येथे प्रसाराला गेल्यावर त्यांची आठवण होऊन त्यांच्या पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. ४ दिवसांनी त्यांचे कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले भाऊ यांच्याशी संपर्क होऊन त्यांना साधना सांगितली. त्यांच्या माध्यमातून बडोदा येथे असलेले श्री. जगदीश ढकेचा यांच्याशी दूरभाषद्वारे संपर्क झाला. त्या वेळेस त्यांना प्रदर्शनाचे निमंत्रण दिले. त्यांच्याशी प्रथम भेट घेताच त्यांनी सिंहस्थासाठी अर्पण दिले. अन्यांकडूनही अर्पण गोळा केले. तसेच ते हिंदी पाक्षिकाचे वर्गणीदारही झाले आणि काही ग्रंथही त्यांनी विकत घेतले.

आडगावखुर्द (जिल्हा संभाजीनगर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकदिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

     
प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रात्यक्षिके करतांना धर्माभिमानी
     संभाजीनगर - स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन धर्माभिमानी सिद्ध होण्याच्या उद्देशाने येथील आडगावखुर्द येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकदिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर ८ मे या दिवशी श्री राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात आयोजित केले होते. शिबिराला आडगावखुर्द आणि आसपासच्या परिसरातील २२ धर्माभिमानी सहभागी झाले होते.
     समितीचे पुणे येथील कार्यकर्ते श्री. विजय चौधरी यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. उपस्थित धर्माभिमान्यांना व्यायाम प्रकार आणि कराटे यांचे काही प्रकार शिकवण्यात आले. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाचे स्वरूप कसे असावे आणि त्याची आवश्यकता काय, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित धर्माभिमान्यांचा नेतृत्व गुण वाढवण्याच्या उद्देशाने काही प्रायोगिक भाग घेण्यात आले.

पुण्यातील कोथरूड उपनगरात चोरट्यांकडून अडीच घंट्यांमध्ये १६ ठिकाणी चोरी

  • सुस्त पोलीस प्रशासन आणि चोर्‍यांच्या टोळ्या कार्यरत (?) असलेले पुणे असेच आता म्हणावे लागेल !
  • ७० तोळे सोन्यासह २७ लक्ष रुपयांचा ऐवज पळवला
      पुणे, १३ मे - येथील कोथरूड उपनगरातील एरंडवणा भागात ११ मेच्या रात्री चोरांनी अडीच घंट्यांत ६ निवासी इमारतींतील १४ सदनिका आणि २ दुकाने फोडली. तेथून चोरट्यांनी ७० तोळे सोन्यासह २७ लक्ष ९४ सहस्र रुपयांचा ऐवज पळवला. या प्रकरणी ३ अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
       पुणे शहर परिमंडळ - १ चे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले की, चोरांच्या शोधासाठी क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रीकरण पडताळले. त्यावरून ते सर्वजण एकाच टोळीतील असल्याचे समजते. ज्या इमारतीत चोरी झाली, तेथे क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक नव्हते, तर काही ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारही नव्हते. (केवळ कारणे देऊन परिस्थिती सांगण्यापेक्षा चोरांना कधीपर्यंत अटक करणार, हे पोलिसांनी सांगावे ! संपादक)
     वतकारा (केरळ) - सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी निरीक्षक राम गोपाल मिना या अधिकार्‍याची उमेश प्रसाद सिंग या सैनिकाने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव यांचे कॅनडा येथे अपघाती निधन !

     मॉन्ट्रीयल (कॅनडा) - निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव यांचे कॅनडातील मॉन्ट्रीयल येथे चारचाकी उलटून झालेल्या अपघातात निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.
      बाबा हरदेव यांचे कोट्यवधी अनुयायी आहेत. त्यांनी देशांत अनेक ठिकाणी निरंकारी भवनांची स्थापना केली होती. वर्ष १९८० मध्ये त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ते या संप्रदायाच्या प्रमुखपदी होते. उपलब्ध माहितीनुसार निरंकारी संप्रदायाच्या २७ देशांत १०० हून अधिक शाखा आहेत.

५ वर्षांत पुणे पोलिसांना सापडले केवळ ३९१ भिकारी

शेकडो भिकारी चौकाचौकात भीक मागत असतांना पोलिसांकडून
केली जाणारी कारवाई हास्यास्पद आहे. काही दिवसांनी पुणे शहराला 
कोणी भिकार्‍यांचे शहर असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
     पुणे - पुण्यातील प्रमुख चौकांमध्ये भीक मागणार्‍यांची संख्या मोठी असून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. असे असतांना गेल्या ५ वर्षांत पुणे पोलिसांनी केवळ ३९१ भिकार्‍यांवर कारवाई केली आहे. या अनुषंगाने भिक्षा प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, यासाठी राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते, तसेच वर्ष २०११ ते २०१६ या कालावधीत पोलिसांनी किती भिकार्‍यांवर कारवाई केली, याची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितली होती. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २७ जूनला प्रस्थान

  
   पुणे - जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३१ व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी, म्हणजेच २७ जून या दिवशी आरंभ होणार आहे. ३० जून या दिवशी ही पालखी पुण्यात दाखल होणार असून १५ जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. हा पालखी सोहळा १९ जुलै या दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार असून ३० जुलै या दिवशी पुन्हा श्री क्षेत्र देहूगाव येथे परतून पालखी सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. या पालखी सोहळ्याच्या कालावधीत प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण, इंदापूरमधील सराटी येथील माने विद्यालयाजवळ आणि माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा, तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे उभे रिंगण करण्यात येणार आहे.

समृद्ध जीवनकडून कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार

      पुणे - चिटफंड अपहारप्रकरणी चर्चेत असलेल्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या आस्थापनाने कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केलेली २ वर्षांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम (पीएफ्) खात्यात भरली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वतीने भविष्य निर्वाह निधी निरीक्षक सुरेश फाळके यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी व्यवस्थापकीय संचालक महेश किशन मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार आणि राजेंद्र पांडुरंग भंडारे यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. भंडारे याला ओडिशा पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून वैशाली मोतेवार या पसार झाल्या आहेत.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्ध जीवन फूड्स आस्थापनाचे संचालक मंडळ आणि इतरांनी ऑगस्ट २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीतील कर्मचार्‍यांच्या वेतनातून २२ लक्ष ३४ सहस्र ४२ रुपयांची रक्कम कपात केली होती. त्यांनी ही रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा न करता त्या रकमेचा परस्पर स्वतःच्या लाभासाठी वापर करून अपहार केला. एप्रिलमध्ये भविष्य निर्वाह निधीच्या अधिकार्‍यांच्या ही गोेष्ट लक्षात आली.

भाजप शासनाने काश्मिरी पंडितांची पनून काश्मीरची मागणी मान्य न केल्यास देशभरात सहस्रो काश्मीर बनण्याचा धोका ! - प्रमोद मुतालिक

विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी एक भारत आंदोलनाच्या अंतर्गत बेंगळुरू येथे महासभा
भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा बेंगळुरू येथे संघटित आविष्कार !
काश्मीरसाठी बलीदान करणार्‍या सैन्य दलाच्या जवानांना श्रद्धांजली
वाहतांना भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी 
      बेंगळुरू - वर्ष १९९० मध्ये भारतातील काश्मिरी हिंदू हे जिहादी आतंकवादाचे पहिले बळी ठरले आणि त्यांना स्वतःचा जीव तसेच महिलांची अब्रू वाचवण्यासाठी आपली भूमी सोडून उर्वरित भारतात विस्थापित व्हावे लागले. या २६ वर्षांत देशात विविध पक्षांची शासने सत्तेवर आली; मात्र काश्मिरी पंडितांची समस्या काही सोडवण्याचा गांभीर्याने प्रयत्न झाला नाही. परिणामी काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्‍यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच विस्थापित होण्याची स्थिती निर्माण होईल.

नांदेड येथे भगवान परशुराम आणि देवता यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याविषयी युवा सेनेकडून पोलिसांकडे तक्रार

हिंदूंच्या प्रभावी संघटना अभावीच धर्मद्रोही अशा प्रकारे 
देवतांचे विडंबन करण्यास धजावतात ! देवतांचे विडंबन 
आणि धर्मद्रोह्यांना आळा घालण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !
        नांदेड, १३ मे - येथील दोन जणांनी फेसबुक या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून भगवान परशुराम आणि इतर देवता यांच्या संदर्भाने आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध केले होते. त्या दोघांच्या विरोधात युवा सेनेचे शहरप्रमुख गणेश पेन्सलवार यांनी अन्य सहकार्‍यांसमवेत वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने तक्रार प्रविष्ट करणार्‍या युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन ! - संपादक)
        आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या रवी सावंत आणि अन्य एकाने फेसबुकच्या माध्यमातून देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामध्ये त्यांनी भगवान परशुराम यांचे छायाचित्र पोस्ट करून तुमचा परशा कोण ?, असे लिखाण करून देवतांविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टिप्पण्या केल्या आहेत. त्या दोघांविरुद्ध गणेश पेन्सलवार यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
       धुळे - येथील महानगरपालिकेच्या इमारतीच्या समोर श्री महाराणा प्रताप पुतळ्याजवळ सकाळी ८.३० वाजता श्री गणेशाच्या श्‍लोकाने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला आरंभ झाला. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुळवले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेश पाटील, बांधकाम संघटनेचे श्री. मनोज सूर्यवंशी, श्री. रवींद्र वाघमारे, शनिनगर मित्रमंडळाचे सर्वश्री सागर वाडेकर, श्री. गणेश गायकवाड, रोहित वानखेडे, समाधान थोरात, सुशील अहिरराव, नयन ठाकरे, हर्षल वानखेडे, १००८ केशवानंद दादाजी धुनियावले यांचे शिष्य श्री. संदीप पाटील, श्री सप्तशृंगी मातेची सेवा करणारे श्री. भिकन पाटील जुने धुळे परिसरातील श्री. निखिल शिंपी, श्री. हरिश वाघ, ओशो ग्रुपचे श्री. नंदकुमार अहिरराव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल उपस्थित होते.

२००८चे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
     भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आकसाने खोटे गुन्हे नोंदवले गेले. या स्फोटप्रकरणी चुकीच्या लोकांवर गुन्हे दाखल केल्याने सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात यावी.
काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचा थयथयाट !
(म्हणे) केंद्रशासनाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेवर दबाव आणला !
    महाराष्ट्र एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी केलेल्या अन्वेषणाविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यात आल्याने काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी थयथयाट केला आहे. ते म्हणाले की, करकरे यांची निंदा करणे, हा त्यांचा अवमान आहे. केंद्रशासन या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र बँक माका शाखेत (जिल्हा नगर) मोठा अपहार

कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार !
      नगर - येथील नेवासे तालुक्यातील माका गावात असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेतील रोखपालाने (कॅशियर) १०० हून अधिक खातेदार आणि ठेवीदार यांनी अधिकोषात जमा केलेल्या रकमेचा मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. अधिकोषाच्या व्यवस्थापनाने रोखपाल शिवाजी भवर यांना तातडीने निलंबित केले असून खातेदार आणि ठेवीदार यांना त्यांचे पैसे तातडीने परत देण्याचे आश्‍वासन दिले आहे.
     शिवाजी भवर यांनी अनेक लोकांच्या खात्यातून त्यांच्या अपरोक्ष परस्पर रक्कम काढून हा अपहार केला आहे. गेली २ वर्षे हा अपप्रकार चालू असून अधिकोषातील छपाई यंत्र (प्रिंटर) खराब झाल्याचे कारण देऊन खातेदारांना खाते पुस्तिका भरून देण्यात येत नव्हती.

श्रीरामपूर (जिल्हा नगर) दंगलीची पोलीस महानिरीक्षकांच्या वतीने चौकशी - गृहराज्यमंत्री राम शिंदे

       श्रीरामपूर, १३ मे - एका किरकोळ कारणावरून ८ मे या दिवशी धर्मांधांनी दंगल केली होती. या दंगलीची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्यावतीने सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती निरपराधित्व सिद्ध झाल्यास संबंधितांची नावे गुन्ह्यातून वगळली जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांना दिली. (याचसमवेत धर्मांधांच्या मुसक्या कायमच्या आवळणे आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे, यासाठीही गृहराज्यमंत्र्यांनी निर्देश द्यावेत, ही अपेक्षा ! - संपादक) शिंदे यांनी १२ मे या दिवशी दंगलग्रस्त भागाची पाहणी करून दंगलीची झळ बसलेल्या दुकानदारांशी चर्चा केली.
       ते पुढे म्हणाले की, दंगलीतील हानीग्रस्तांना साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. त्यासाठी करण्यात आलेले पंचनामे आणि संकलित माहिती तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आदेश त्यांनी उपस्थित जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना दिले आहेत.

टीकेनंतर ४ कोटी रुपयांचे देयक रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडून मागे

जनक्षोभाचा परिणाम !
        मुंबई, १३ मे - लातूरकरांना रेल्वेने ६ कोटी २० लक्ष लिटर पाणी दिल्यानंतर त्याच्या वाहतुकीचे ४ कोटी रुपयांचे देयक रेल्वेकडून लातूर जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आले होते. त्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी हे देयक मागे घेत असल्याचे नवी देहलीमध्ये सांगितले.
      दुष्काळग्रस्त लातूरला मिरजेहून आतापर्यंत ६ कोटी २० लक्ष लिटर पाणी रेल्वेने पाठवण्यात आले आहे. त्या पाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ४ कोटी रुपयांचे देयक पाठवले असून त्यांपैकी ४ मेपर्यंतचे २ कोटी ४ लक्ष रुपयांचे देयकाचे पैसे तत्काळ द्यावेत, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना पाठवले होतेे. या पत्रामुळे लातूरला रेल्वेने विनामूल्य पाणी देण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी आरंभी केलेली घोषणा हवेतच विरली होती.
       लातूरला दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर तातडीचा उपाय म्हणून १२ एप्रिलपासून प्रति दिवशी मिरजेहून रेल्वे वॅगनद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. लातूरला १२ मेपर्यंत ६ कोटी २० लक्ष लिटर पाणी पोहोचवले आहे. त्यासाठी रेल्वेला प्रति दिवशी १२ लक्ष ५० सहस्र रुपये व्यय येत आहे.

सांगली येथे पू. साध्वी सरस्वतीजी यांचे व्याख्यान

     शिवतेज मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या हिंदु धर्मप्रसारक पू. साध्वी सरस्वतीजी आणि ज्वलंत हिंदुत्वाचा ज्वालामुखी आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज यांचे हिंदु ऐक्य - काळाची गरज या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान रविवार, १५ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता गणपति पेठेतील श्री गणेश मंदिरासमोर होईल. तरी अधिकाधिक हिंदूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. अंकुश जाधव आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणी बंदुकीच्या गोळ्यांचा तपास स्कॉटलंड यार्डाकडे

       मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडात वापरण्यात आलेल्या बुलेट्स आणि इतर पुरावे केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) स्कॉटलंड यार्डला तपासासाठी पाठवले आहेत. या दोन्ही हत्या प्रकरणातील समान धाग्यावर सेकंड ओपिनीयन घेण्यासाठी सीबीआयने पाऊल उचलले आहे. याआधी मुंबईतल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीने या हत्या प्रकरणात एकाच प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले होते, असे स्पष्ट केले होते; पण ही बाब अधिक स्पष्ट होण्यासाठी हे पुरावे पुढच्या तपासासाठी स्कॉटलंड यार्डला पाठवण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

भगवा आतंकवाद म्हणून हिंदूंना हिणवणार्‍यांवर आता खटले प्रविष्ट करा !
     राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) न्यायालयात २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरवणी आरोपपत्र सादर करत प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आतापर्यंत समोर आणण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य तिघांचे नाव वगळले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Malegaon bamvisphot prakaranme NIAne dakhil ki chargesheetme Sadhvi Pragyasinghjika naam nahi
     Bhagva Atankvaad kehnewalopar karvai karneki maang karo
जागो !
: मालेगाव बमविस्फोट प्रकरण में एन्आयए ने दाखिल की चार्जशीट में साध्वी प्रज्ञासिंहजी का नाम नहीं !
     भगवा आतंकवाद कहनेवालों पर कारवाई करने की मांग करो !

पाकमध्ये मैत्रिणीला तिच्या इच्छेनुसार विवाह करण्यासाठी साहाय्य केल्यामुळे मुलीची हत्या !

असुरक्षित जिहादी पाक !
     इस्लामाबाद - पाकमधील खैबर पख्तूनख्वाह प्रांतात मैत्रिणीला तिच्या इच्छेप्रमाणे विवाह करण्यास साहाय्य केल्यावरून एका मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अंबरीन असे या मुलीचे नाव असून पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रकाशित केले आहे. 
१. या घटनेतील विशेष गोष्ट म्हणजे मुलीच्या आईनेच भीतीपोटी स्वत:च्या मुलीला मारेकर्‍यांच्या हाती सोपवले.
२. पहिल्यांदा फास लावून या मुलीचा गळा घोटण्यात आला त्यानंतर एका गाडीत तिचे प्रेत ठेऊन गाडीला आग लावण्यात आली. 
३. शासनाने अशा मारेकर्‍यांवर बंदी घालायला हवी, तसेच अशा घटनांना आळा घालण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे येथील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.


सुरक्षेच्या दृष्टीने विक्रीस बंदी असलेल्या ड्रोनची सर्रास ऑनलाइन विक्री !

     मुंबई - सुरक्षेच्या दृष्टीने नागरी विमानसेवा महासंचालनालयाने ड्रोनच्या (चालकविरहित विमानांच्या) विक्रीवर बंदी घातली असूनही त्यांची ऑनलाइन विक्री चालू आहे. वर्ष २०१४ मध्ये बंदी घालण्यात येऊनही त्याविषयीचे नियम न केल्याने ही विक्री चालू आहे. (संवेदनशील सूत्रासंदर्भात असा हलगर्जीपणा म्हणजे शासनाची जनतेच्या सुरक्षिततेविषयी असंवेदनशीलताच होय ! - संपादक)

इसिसमध्ये भारतीय मुसलमान युवकांना भरती करवून घेणार्‍यांच्या गटामध्ये महिलांचाही समावेश !

     नवी देहली - इसिसमध्ये भारतीय मुसलमान युवकांची भरती करण्यासाठी परदेशातून प्रयत्न करणार्‍यांमध्ये ५ महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण २५ जणांची ओळख पटली असून ते सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सक्रिय आहेत. त्याद्वारे ते युवकांना इसिसमध्ये भरती करून घेत आहेत. २५ जणांचा हा गट भारत आणि श्रीलंका येथील युवकांशी संपर्क साधून असतो. या गटात फिलीपीन्स, केनिया, अर्जेंटीना आणि श्रीलंका येथील महिलांचा समावेश आहे. फिलीपीन्समधील आतंकवादी महिलेचे नाव केरन, तर श्रीलंकेतील आतंकवादी महिलेचे नाव एजे आहे.उमर खलिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांची याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

      नवी देहली - देशद्रोहाचा आरोप असणारे जेएन्यूमधील विद्यार्थी उमर खलिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांची याचिका देहली उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. या दोघांना जेएन्यूमधून निलंबित करण्यात आले आहे. त्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने जेएन्यू प्रशासनाला नोटीस पाठवून विद्यापिठाच्या समितीने या दोघांना निलंबित करण्यासाठी निष्पक्षपणे चौकशी केली का, याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

नागराज मंजुळे यांच्याकडून धर्मपत्नीला अन्याय्य वागणूक ?

सैराटला डोक्यावर घेणार्‍या 
जनतेने नागराज मंजुळे यांना पत्नीविषयीचे 
सत्यही उघडकीस आणण्याविषयी विचारावे !
        पिंपरी, १३ मे - प्रत्येक घरात एक शोषित स्त्री आहे. स्त्रियांनी जागे व्हायला हवे, अशा प्रकारचे उपदेश करणारे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी स्वतःच त्यांच्या धर्मपत्नीला वार्‍यावर सोडले असल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीत वडिलांच्या घरी रहात असलेल्या सौ. सुनीता नागराज मंजुळे या धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करत आहेत. ज्यांना पडत्या काळात कष्ट करून साथ दिली, त्यांनी यश मिळाल्यानंतर दूर लोटले, असे दुःख सौ. सुनीता मंजुळे व्यक्त करत आहेत. (स्त्रियांची कैफियत मांडतो, असे सांगणार्‍या नागराज मंजुळे यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे ! अशा प्रकारे स्वतःच महिलांवर अन्याय करणार्‍यांनी महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे सक्षमीकरण यांविषयी बोलणे हास्यास्पद आहे. केवळ स्त्रियाच नाहीत, तर समस्त मानवजातीचेच कल्याण धर्माचरण करण्यात आहे. धर्म नाकारणारी मंडळी हे समजून घेतील, तो सुदिन ! - संपादक)

श्री तपोनिधी निरंजनी आखाडा

उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त..
महंत श्री रामानंदपुरी
महाराज
    नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याचे महंत श्री रामानंदपुरी महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.
संकलक : श्री. सचिन कौलकर
आखाड्यांचा परिचय
      सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्‍याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आमदार आव्हाड यांचे कार्यालय पाडले

       ठाणे - कळवा खाडीलगत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यालय १२ मे या दिवशी केलेल्या कारवाईत ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडले. याचसमवेत अन्यही काही राजकीय व्यक्तींनी केलेली अतिक्रमणे पाडण्यात आली. कळवा खाडीवर नव्याने उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलात हे कार्यालय बाधित होणार होते. त्यामुळे ते पाडलेच जाणार होते, असा दावा या वेळी महापालिकेतील सूत्रांनी केला. तीन दिवस चालू असलेल्या कारवाईत शहरातील २२०० बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रवक्त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांत क्षात्रवृत्तीने मांडली भूमिका !

  • हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसच्या कथित भगव्या आतंकवादाचे पितळ उघड !
  • १३ मे या दिवशी झालेली चर्चासत्रे
       मुंबई - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या तपासानुसार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींपैकी ४ आरोपींची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली. तसेच सर्व आरोपींवरील मोक्का कायदा १३ मेला हटवण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद तसेच हिंदु जनजागृती समिती यांनी सहभाग घेतला. याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे,

छत्रपती शिवाजी महाराजांची पाण्याविषयीची नीती !

    सध्या महाराष्ट्रात आणि देशातील काही राज्यांमध्ये दुष्काळामुळे भीषण परिस्थिती उद्भवली आहे. आताचे शासन जलशिवार ही योजना राबवून दुष्काळ अल्प करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अत्यंत बारकाईने अभ्यास करायला हवा. शिवचरित्रातील पाण्याचे व्यवस्थापन शासनाला शिकण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूकडून आक्रमणे होऊन गडाला कित्येक मास वेढा पडण्याची भीषण परिस्थिती होती. त्या काळीही त्यांनी कोणती साधनसुविधा नसतांना त्यावर मात केली आहे. यासाठी आपण गडावरील पाणी साठवण्याची पद्धती पहाणे महत्त्वाचे आहे.

देशद्रोही पीडीपीसह भाजपने युती केल्याने आमच्या मनात शंका निर्माण होते ! - डॉ. अग्नीशेखर, राष्ट्रीय समन्वयक, पनून कश्मीर

डॉ. अग्नीशेखर
     काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी लढा देत असलेले आणि पनून कश्मीर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अग्नीशेखर हे लेखक, पत्रकार, कवी आणि लढवय्ये आहेत. नुकत्याच झालेल्या त्यांच्या बेंगळुरु दौर्‍याच्या वेळी कर्नाटक येथील प्रसिद्ध दैनिक विजयवाणीचे सल्लागार संपादक डॉ. जी.बी. हरीश यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी काश्मीर खोर्‍यातील राजकारण येणार्‍या काळात देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याचे अग्नीशेखर यांनी सांगितले. त्यातील प्रत्येक धागा त्यांनी उलगडला. त्यांच्याशी झालेल्या या वार्तालापातील निवडक सूत्रे मांडत आहोत.

मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा दर प्रती लिटरला ३८, तर मद्याच्या पाण्याचा ४ पैसे !

       धाराशीव - धाराशीव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात १३ लिटरची एक घागर आता पाच रुपयांना विकली जाते, म्हणजे एका लिटरसाठी ३८ पैसे. लातूरमध्ये खाजगी टँकरने पाणी घेतल्यास येणारी प्रतिलिटर किंमत २२ पैसे. म्हणजे ग्रामीण परंड्यास टँकरने होणार्‍या पाणीपुरवठ्याचा दर लातूर शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यापेक्षा अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर मद्यनिर्मिती कारखान्यांना लागणार्‍या पाण्याचा दर मात्र केवळ ४ पैसे प्रतिलिटर आहे. मद्य आस्थापनांना अद्याप स्वस्तात पाणीविक्री होत असल्याने नागरिकांत संतापाची भावना आहे. (अद्यापही लोकांना पाणी देण्याऐवजी मद्य उद्योगांना अल्प दरात पाणीपुरवठा का केला जात आहे, याचा शासन शोध घेईल का ? - संपादक)

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
     काल्पनिक पात्रे खरोखरची शक्तीमान नसल्यामुळे ती आपल्याला कधीच साहाय्य करू न शकणे स्पायडरमॅन, सुपरमॅन यांसारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण निर्माण झाल्याने होणारे चुकीचे परिणाम सध्या लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तीमान अशा प्रकारच्या काल्पनिक पात्रांच्या मनोरंजनात्मक मालिका दूरचित्रवाणीवर दाखवण्यात येतात. ही काल्पनिक पात्रे संकटकाळात समाजाला साहाय्य करतांना आणि इतरांचे कल्याण करण्यासाठी झटतांना दिसतात. या पात्रांना उडता येते, अदृश्य होता येते, धावती आगगाडी (ट्रेन) थांबवता येते आणि बोटांमधून बंदुकीसारख्या गोळ्या किंवा विध्वंसक किरण सोडता येतात. या सर्वांच्या साहाय्याने त्यांनी वाईट व्यक्तींचा नाश केलेलाही दाखवला जातो. यामुळे मुलांमध्ये या पात्रांविषयी पुष्कळ आकर्षण निर्माण होते. त्यांना वाटते की, ही पात्रे आपल्यालाही संकटात साहाय्य करतील; मात्र ही सर्व पात्रे केवळ काल्पनिकच आहेत, त्यांना खरोखरचे अस्तित्व नाही. त्यामुळे जर आपण संकटकाळात त्यांना हाक मारली, तर ती आपल्याला कधीच साहाय्य करू शकणार नाहीत.

हज यात्रेकरूंना देण्यात येणार्‍या अनुदानावर जनतेचा किती पैसा व्यय होतो ?

    भारत एक निरपेक्ष देश म्हणवतो. अशा देशात कुठल्याही नागरिकाला त्याच्या धार्मिक कृती पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुदान देणे हे शासनाच्या धोरणात बसत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी हज यात्रेकरूंना देण्यात येणार्‍या जनतेच्या पैशातून शासकीय अनुदान देणे, हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. 
हज यात्रा म्हणजे काय ?
     प्रत्येक वर्षी सौदी अरेबियातील मक्का, मीना, अराफत, मुझादालीफा आणि मदिना या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी यात्रेचे आयोजन केले जाते, त्याला हज यात्रा असे संबोधले जाते. सौदी अरेबिया प्रत्येक देशाला त्याच्या मुसलमान लोकसंख्येच्या तुलनेत यात्रेकरूंचे प्रमाण (सहसा हे प्रत्येक सहस्र मुसलमानामागे १ असे असते) ठरवून देते. हे यात्रेकरू एकतर हज समितीच्या माध्यमातून अथवा खाजगी पर्यटन आस्थापनाच्या माध्यमातून यात्रा पार पाडतात.

कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले यांच्या वस्तूविनीमय पद्धतीची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद !

वैद्य सुविनय दामले
     कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले हे प्रथितयश आयुर्वेदीय चिकित्सक आहेत. त्यांच्या चिकित्सालयात (दवाखान्यात) उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना तपासणी शुल्क किंवा औषधांची रक्कम रोख स्वरूपात देणे बंधनकारक नाही. रुग्णांच्या घरी जे काही उत्पादन बनत असेल, ते त्यांनी रोख रकमेऐवजी वैद्य दामले यांना दिले, तरी ते त्याचा स्वीकार करतात. हे करत असतांना रुग्णांशी ते कोणत्याही प्रकारची तडजोड, आढेवेढे घेत नाहीत. भारत देशात अनेक वर्षांपूर्वी अशाच प्रकारे समाजात व्यवहार चालत होते. काळाच्या ओघात व्यवहाराची ही आदर्श पद्धत लुप्त झाली; मात्र वैद्य सुविनय दामले यांनी पुन्हा एकदा या पद्धतीला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न चालू केला. सध्याच्या काळात जेथे केवळ व्यवहाराचा विचार होतो, तेथे भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली जुनी वस्तूविनिमय पद्धत यशस्वीपणे चालू ठेवल्याविषयी लिमका बुक ऑफ रेकार्डने नोंद घेतली आणि वैद्य दामले यांच्या नावाची नोंद केली. या संदर्भातील प्रमाणपत्र ११ फेब्रुवारी २०१६ या दिवशी वैद्य दामले यांना देण्यात आले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेचा कार्यक्रम !

वार : शनिवार, दिनांक : १४ मे २०१६ वेळ : सायं. ६.३० वा.
स्थळ : शिवालय सभागृह, सेनापती बापट मार्ग, बिग बाजारजवळ, लोअरपरेल (प.), मुंबई
विशेष : सनातनच्या संत पू. अनुराधा वाडेकर यांचे मार्गदर्शन !
बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्या !

अत्याचारी पोलिसांना कठोर शिक्षा करा !

     हिंदूंनो, साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, सनातनचे साधक यांच्यासह असंख्य निरपराध हिंदुत्ववाद्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नाहक अडकवून त्यांना अनेक वर्षे नाहक कारागृहात डांबून त्यांचा अनन्वित छळ करणारे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पोलीस अन् तत्कालीन काँग्रेस सरकारमधील उत्तरदायी यांना फाशी देण्याची मागणी करा !
     हिंदुत्ववाद्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून भगव्या आतंकवादाची ओरड मारणारे तत्कालीन धर्मद्रोही काँग्रेसी राज्यकर्ते आणि अन्य हिंदुद्वेष्टेे यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागावी आणि प्रायश्‍चित्त घ्यावे ! इतकी वर्षे नाहक कारागृहात खितपत ठेवल्याविषयी सर्व निरपराध्यांना हानीभरपाई मिळालीच पाहिजे !

भाजप सरकार सत्तेवर येऊनही दोन वर्षे निरपराधी कारागृहातच !
     मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तत्कालिन धर्मद्रोही काँग्रेस सरकारने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य निरपराध्यांना ६ वर्षे डांबून ठेवले. त्यानंतर भाजपचे सरकार सत्तेवर येऊनही हे सर्व आरोपी दोन वर्षे कारागृहात रहाणे हिंदूंना अपेक्षित नाही ! काँग्रेसने काही दिवसांतच हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी साध्वी प्रज्ञा आणि अन्य जणांना अटक केली, तर सुटकेसाठी २ वर्षे का ? 
 
निरपराध हिंदूंना अनेक वर्षे नाहक छळणार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

लहानपणापासूनच श्रीकृष्णाशी बोलणार्‍या आणि त्याच्या अस्तित्वाची अनुभूती घेणार्‍या लवेल, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथील सौ. सविता सदानंद गद्रे !

सौ. सविता गद्रे
१. लहानपणीच आईचे निधन झाल्याने एकटेपणा जाणवू लागल्यानंतर देवाची ओढ वाटू लागणे आणि श्रीकृष्णाच्या चित्राजवळ बसून मनातील सर्व गोष्टी सांगणे : मी घरात सर्वांत लहान होते. मी लहान असल्यामुळे आई मला तिच्यासमवेत फिरायला न्यायची. आई मला श्रीकृष्णाच्या आणि महाभारतातील गोष्टी सांगायची. मी इयत्ता नववीत असतांना माझ्या आईचे निधन झाले. मी आईची लाडकी असल्याने आई गेल्यावर मला एकटेपणा जाणवू लागला. मी एकाकी पडले. तेव्हापासून मला देवाची ओढ वाटू लागली. मी घरी एकटी असतांना घरातील श्रीकृष्णाच्या चित्राजवळ बसून माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगत असे. तेव्हा कृष्ण केवळ हसायचा. असे माझे लग्न होईपर्यंत चालू होते.
        लग्न झाल्यानंतर मी देवपूजा करणे, गुरुमंत्राचा जप करणेे, गजानन महाराजांची पोथी वाचणे, असे करायचे; पण त्याच कालावधीत त्रास वाढला आणि वर्ष २००१ पासून मला पुन्हा श्रीकृष्णाशी बोलावेसे वाटू लागले.

हिंदु राष्ट्र स्थापनेची अनुभवलेली रम्य पहाट !

सौ. सुजाता कुलकर्णी
१. रात्री १ वाजता स्पष्टपणे नामजप ऐकू येणे आणि या नामजपाने संपूर्ण आश्रमाभोवती नामजपाचे कडे केलेले दिसणे : गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशीच्या रात्री मला झोप येत नव्हती; म्हणून मी अंथरुणावर बसून नामजप करत असतांना मला स्पष्टपणे श्रीकृष्णाचा नामजप ऐकू येऊ लागला. हा नामजप बालसाधक चि. आदित्य, चि. मुकुल आणि चि. नंदन यांच्या आवाजात ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । असा रात्री १ वाजता शांत वेळी ऐकू येत होता. या नामजपाने संपूर्ण आश्रमाभोवती नामजपाचे कडे केलेले दिसत होते. प्रारंभी मला भ्रमणभाषवर जप लावला असेल, असे वाटले; पण तसेही नव्हते.
२. मिरवणुकीत हत्तीवरील अंबारीत प.पू. डॉक्टर गोड हास्य करत कौतुकाने सर्वांकडे पहात आहेत, असे दिसणे : तो जप ऐकतांना आश्रमासमोरून मिरवणूक जात आहे, असे दिसले. मिरवणुकीत बर्‍याच घोड्यांवर आपले साधक ऐटीत बसून चालले होते. त्यांच्या पाठीमागे हत्तीही चालले होते. हत्ती-घोड्यांना पुष्कळ सजवले होते. हत्तीवरील अंबारीत प.पू. डॉक्टर गोड हास्य करत कौतुकाने सर्वांकडे पहात होते. हत्तींच्या पाठीमागे बर्‍याच पालख्या येतांना दिसल्या. प्रत्येक पालखीत संत बसले होते. त्यांच्यावर चवर्‍या ढाळल्या जात होत्या. त्याच्या सभोवती हिंदु राष्ट्राचा विजय असो, असे कापडी फलक धरून साधक चालले होते. कापडी फलकांना फुलांच्या माळा बांधल्या होत्या आणि विजयध्वज आनंदाने फडकत होते.

निसर्गदेवतेचा नामजप करतांना साधिकेला आलेल्या विविध अनुभूती

१. नामजपाच्या चालीविषयी 
मनात विचार आल्यावर जाणवलेली सूत्रे 
कु. मधुरा भोसले
१ अ. हा ईश्‍वराच्या व्यापक रूपाचा नामजप असल्याचे जाणवणे आणि डोंगराच्या कड्यावरून कोसळणार्‍या एका धबधब्याची आठवण होणे : ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा महर्षींनी सांगितलेला नामजप करत असतांना तो नामजप निसर्गात सामावलेल्या ईश्‍वराच्या शुद्ध, सगुण आणि व्यापक रूपाचा नामजप आहे, असे प्रकर्षाने जाणवत होते. या नामजपाला चाल कशी लावावी ?, या विचारात असतांना मला झर्‍याचे दृश्य दिसून खळखळ वहाणार्‍या पाण्याचा आवाज ऐकू आला. दुसर्‍या दिवशी हाच नामजप करत असतांना डोंगराच्या कड्यावरून कोसळणार्‍या आणि दुधासारखे पांढरेशुभ्र पाणी असलेल्या गोव्यातील दूधसागर या धबधब्याची आठवण झाली.
१ आ. संपूर्ण आठवडाभर निसर्गातील विविध घटकांमध्ये सामावलेल्या नैसर्गिक नादाचे स्मरण होणे : त्यानंतर नामजपाला कोणती चाल लावायची ?, हा विचार मनात घोळत असतांना संपूर्ण आठवडाभर निसर्गातील विविध घटकांमध्ये सामावलेल्या नैसर्गिक नादाचे, उदा. समुद्राच्या लाटा, नदीच्या पात्रातील वहाणारे पाणी, पिंपळाच्या पानांचा सळसळणारा आवाज, पावसाची सर, कडाडणारी वीज, वेगाने वहाणार्‍या वार्‍याचा आणि जंगलाला लागलेल्या वणव्याच्या ज्वालांचा आवाज आदींचे स्मरण झाले.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

साधकांनो, नामजप करत असतांना मनात विचार येत असल्यास पुढील प्रयत्न करून पहा !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
      साधक नामजप करत असतांना त्यांच्या मनात असंख्य विचार येत असल्याने त्यांचा नामजप नीट होत नाही. अशा वेळेस साधकांनी पुढील उपाय करून पहावेत.
१. नामजप लिहून काढणे : एका कागदावर नामजप लिहावा. त्यामुळे हाताने नामजप लिहिला जातो. डोळ्यांनी वाचला जातो आणि मनातल्या मनात म्हटला जातो. त्यामुळे मनातील विचारांकडे दुर्लक्ष होते.
२. श्रीकृष्णाच्या चित्रातील प्रत्येक अवयवावर बोट ठेवून नामजप करणे : श्रीकृष्णाचे चित्र समोर ठेवून श्रीकृष्णाच्या डोक्यापासून आरंभ करून त्याचा प्रत्येक अवयव, त्याने परिधान केलेले दागिने, प्रत्येक दागिन्यावरील प्रत्येक कलाकुसर, सुदर्शनचक्र, मोरपीस, शेला, शेल्यावर असलेले ठिपके या प्रत्येकावर तर्जनी ठेवून नामजप करावा, उदा. ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।, हा पूर्ण नामजप श्रीकृष्णाच्या शेल्यावरील एकाच ठिपक्यावर बोट ठेवून न म्हणता चार ठिपक्यांवर प्रत्येकी एकेक नामजप बोट ठेवत म्हणावा. अशा प्रकारे नामजप केल्याने श्रीकृष्णाच्या चित्रातील चैतन्य तर्जनीद्वारे आपल्या शरिरात जाते. श्रीकृष्णाच्या डोक्यापासून चरणांपर्यंत अशा प्रकारे नामजप करून झाला की, परत पहिल्यापासून तसे करावे.

स्वतःला पालटण्याची तळमळ असणारी त्यागी वृत्तीची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. प्राजक्ता प्रवीण नाईक (वय ७ वर्षे) !

कु. प्राजक्ता नाईक
१. प्रेमभाव
१ अ. साधकांसमवेत रहायला आवडणे : प्राजक्ताला साधकांविषयी आपुलकी आहे. तिला साधकांसमवेत रहायला आवडते. प्राजक्ताला एकदाच कुणी भेटले असले, तरी ती त्यांची आवर्जून आठवण काढते. कु. तृप्तीताई, दीपालीताई आणि मी तिला क्वचितच भेटलो असू; पण ती सर्वांची विचारपूस करते. ती आम्हाला स्वतःहून भ्रमणभाष करतेे.
१ आ. पू. स्वातीताईंविषयीही आदर आणि प्रेम असणे : प्राजक्ताला पू. स्वातीताईंविषयीही आदर आणि प्रेम आहे. ती त्यांच्याबद्दलही विचारत असते. पू. स्वातीताई पुणे येथे आल्यावर प्राजक्ता जेव्हा त्यांना भेटते, तेव्हा ती काय प्रयत्न करू ?, याविषयीही विचारते.

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात मनात विचार येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
       जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसार होत असतात. पूर्णवेळ साधना करणारे युवा साधक आणि साधिका यांच्या मनात विवाहाविषयी येणारे विविध विचार अन् त्यांवरील योग्य दृष्टीकोन पुढे देत आहे. विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !
१. मी अविवाहित राहिल्यास आई-वडिलांच्या 
मृत्यूनंतर मला कुणाचाच आधार नसेल !
१ अ. विचार : काही साधकांना आई-वडिलांचा मृत्यू झाल्यावर मला कुणाचाच आधार नसेल. मला पुढील आयुष्य एकट्याने काढावे लागेल, असे वाटते आणि त्यामुळे आपण विवाह करावा, असा विचार त्यांच्या मनात येतो.
१ आ. योग्य दृष्टीकोन : प्रत्येकाचा खरा आधार भगवंतच असतो. त्यामुळे मायेतील मानसिक आधार मिळण्यासाठी विवाह करण्यापेक्षा साधनेचे प्रयत्न वाढवावेत आणि सतत आपल्यासमवेत राहून कृपेचा वर्षाव करणार्‍या चिरंतन अशा भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती घ्यावी.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. परशराम पांडे
एकादशीचे व्रत कसे करावे ?
        एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे. मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे ! या दिवशीचे तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते. एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे; मात्र एक दिवस योग्य तर्‍हेने केल्यास त्याचा प्रभाव १५ दिवस टिकतो; म्हणून एका मासात २ एकादशी असतात.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.११.२०१४)

पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ सद्गुरु धोंडीराज महाराज !

    
     पलूस (जिल्हा सांगली)- पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ सदगूरु धोंडीराज महाराज यांच्या यात्रेचा कार्यक्रम ४ मे या दिवशीपासून चालू झाला असून आतापर्यंतचे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. ७ मे या दिवसापासून जगदगूरु तुकाराम महाराजकृत गाथा पारायण सोहळा चालू असून त्याची समाप्ती शनिवार, १४ मे या दिवशी होत आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. ही यात्रा सदगूरु धोंडीराज महाराज त्यांचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भरवत असत. ती पुढे धोंडीराज यात्रा म्हणून प्रचलित झाली.  सदगूरु धोंडीराज महाराज हे दत्तावतार होते. त्यांचे साक्षात्कार अनेक भक्तांनी अनुभवले आहेत. सदगूरु धोंडीराज महाराज यांचे समकालीन शेगावचे गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रात पलूसच्या महाराजांचा उल्लेख आढळतो. महाराजांनी ख्रिस्ताब्द १९०८ (वैशाख शुद्ध नवमी) मध्ये देह ठेवला. श्रीमहाराजांच्या इच्छेनुसार त्यांना खर्डेकर मठात समाधीस्त करण्यात आले. वर्ष २००८ मध्ये त्याचा शताब्दी सोहळा पार पडला. त्या निमित्ताने पुढे रथोत्सव चालू झाला. यंदा महाराजांची १०८ वी पुण्यतिथी साजरी होत असून ९ वा रथोत्सव सोहळा आहे.

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

        रामनाथी आश्रमातील संकलन विभागात अनेक जिल्ह्यांतील पालकांकडून स्वतःच्या पाल्याविषयीचे लिखाण येते. अनेकदा सूचना देऊनही या लिखाणात बरीच माहिती अपूर्ण असते, उदा. काही वेळा पूर्ण नाव नसणे, वय नसणे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव नसणे आदी त्रुटी असतात. त्यामुळे ही माहिती गोळा करण्यात संबंधित साधकांना बराच वेळ द्यावा लागतो. यासाठी पालकांनी कृपया खालील सूत्रांनुसार संकलन विभागात माहिती पाठवावी.
१. पाल्याची माहिती पाठवण्याचा तपशील
अ. पाल्याचे संपूर्ण नाव, गाव, जिल्हा, राज्य
आ. जन्मदिनांक, जन्मतिथी, अचूक जन्मवेळ, जन्मस्थान (गाव, तालुका आणि जिल्हा) आणि जन्मपत्रिका (स्कॅन इमेज किंवा झेरॉक्स प्रत)
इ. पूर्वी पातळी आणि उच्च स्वर्गलोक किंवा महर्लोक घोषित केला आहे का ? असल्यास कोणत्या वर्षी ?

पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक साधकांसाठी महत्त्वाची सूचना

साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे मात करण्यासाठी
 स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !
        आध्यात्मिक स्तर ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधक होण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्याच्या खालील स्तरावरील साधकांना निर्णय घेणे कठीण जाते. त्यांनी निर्णय घेता येण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन पुढे केले आहे.
१. पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक 
साधकांनी बुद्धीचा निश्‍चय करणे आवश्यक !
         अनेक साधक स्वतःचे शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय सोडून पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक असतात आणि तशी इच्छाही उत्तरदायी साधकांकडे व्यक्त करतात. आंतरिक इच्छा असतांनाही कौटुंबिक अडचणी, तसेच मनाच्या स्तरावरील अडथळे यांमुळे ते पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी बुद्धीचा निश्‍चय केल्यास ईश्‍वरकृपेने त्या अडचणी सहज दूर होतील, यात तीळमात्रही शंका नाही !

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींवरील आरोप फेटाळल्याविषयीची अनुभूती

        पराकोटीच्या हिंदुद्वेषातून अतोनात हालअपेष्टा भोगलेल्या साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आदिंसह मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींवरील कथित आरोप फेटाळल्याचा आनंद आकाशदेवतेने आकाशात भगव्या रंगाची उधळण करून धर्मप्रेमी हिंदूंना दिला !
(वेळ - सायंकाळी ६ वाजून ४५ मिनीटे ते ७) 
- श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

हिंदु आतंकवाद या संकल्पनेतील फोलपणा दर्शवणारे श्री. विक्रम भावे लिखित पुस्तक

श्री. विक्रम भावे
       वर्ष २०१३ मध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांनी कारागृहात असतांना मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात हे पुस्तक लिहून वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदु आरोपींच्या निरपराधत्वाविषयी सर्व उल्लेख केला आहे. या पुस्तकात विक्रम भावे म्हणतात, कारागृहातून मुक्त झाल्यावर हे लिखाण माझ्या हातून घडले. कारागृहातील अनुभव यातनादायक मानला जातो. माझाही अनुभव याला अपवाद नव्हता; मात्र कित्येक सहबंदी, तसेच कारागृह कर्मचारी यांचे शेकडो सुखद अनुभवही माझ्या वाट्यास आले. त्यामुळे माझे मनोबल कायम राहिले आणि काहीतरी सकारात्मक निर्मिती करण्याचे मनात आले. २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट आणि २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट या दोन्ही प्रकरणांत अनुक्रमे मुस्लिम आरोपी आणि हिंदु आरोपी माझ्या समवेत कारागृहात होते. मन मोकळे करून त्यातील कित्येक माझ्याशी बोलले. त्यातून त्यांचे निरपराधित्व मला जाणवले. मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणांतील कागदपत्रे तपासून आणि इतर संबंधीत व्यक्तींशी बोलून मला जाणवलेले सत्य सर्वांसमोर मांडले पाहिजे, असा विचार यातून मनात आला. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींचा मी ऋणी आहे. त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी मी सदैव प्रार्थना करीन.

सोलापूर येथे धर्मपरंपरा रक्षण चळवळीला प्रारंभानिमित्त रणरागिणी शाखेचा कार्यक्रम

दिनांक : १५ मे २०१६,
वेळ : सायं. ५.३०
स्थळ : सुशील रसिक सभागृह, मुरारजी पेठ, सोलापूर

शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती कशी असावी, याविषयीचे भित्तीपत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना !
     या वर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी श्री गणेशमूर्ती बनवण्याचे काम मूर्तीकार चालू करत आहेत. धर्मशास्त्रानुसार आदर्श श्री गणेशमूर्ती कशी असावी, याविषयी प्रबोधन करणारे आदर्श श्री गणेशमूर्ती हे ए २ आकारातील भित्तीपत्रक सनातन संस्थेच्या वतीने नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचा उपयोग मूर्तीकारांच्या प्रबोधनासाठी करता येईल. त्यामुळे अनेक मूर्तीकार सात्त्विक मूर्ती बनवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मूर्तीकारांना भेटून आताच प्रबोधन केल्यास स्वतः मूर्तीकारच त्यांच्याकडे येणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचेही या भित्तीपत्रकाच्या आधारे प्रबोधन करू शकतात. त्यानुसार या भित्तीपत्रकांची मागणी करता येईल. त्याचा ग्रंथप्रदर्शने, मूर्तीकारांची गावे, दुकाने, गल्ल्या आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी उपयोग करावा, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत 
नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     रज-तम प्रधान आणि स्वेच्छेला महत्त्व देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी उद्या भ्रष्टाचार, बलात्कार, खून इत्यादी करण्याचे स्वातंत्र्य हवे, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दुबळी सहिष्णुता आणि कट्टर धर्मप्रेम

संपादकीय
     महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या नावाखाली वादंग माजवणार्‍या आणि ज्या ठिकाणी महिलांना गर्भगृहात प्रवेश नाही, तेथे प्रवेश करून हिंदूंच्या धर्मपरंपरांचे भंजन करणार्‍या तृप्ती देसाई यांचा सुधारणावाद किती पोकळ आहे, हे कालच्या घटनेने दिसून आले. हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचा दावा १२ मे या दिवशी गुपचूप दर्ग्यात प्रवेश करूनही पूर्ण करता आला नाही. कडेकोट पोलीस बंदोबस्तातही जेथपर्यंत इतर महिला जातात, तेथपर्यंतच जाऊन देसाई परतल्या. मजारमध्ये त्यांना जाताच आलेले नाही. दोन वेळा दर्ग्यात प्रवेश करूनही ते साध्य झाले नाही, हे विशेष !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn