Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महिलांसाठी असलेल्या मर्यादेपर्यंतच हाजी अली दर्ग्यात प्रवेश, मजारपर्यंत प्रवेश नाही

तृप्ती देसाई यांच्या दर्गा प्रवेशाचा पुन्हा एकदा फज्जा !
     प्राधान्य न कळणार्‍या कथित समानतावादी महिला ! देशासमोर लव्ह जिहाद, भ्रष्टाचार यांसारख्या समस्या आ वासून उभ्या असतांना महिलांकडून मात्र मंदिराच्या गाभारा आणि दर्गा प्रवेशासारख्या सूत्रावर आंदोलन केले जात आहे !
     मुंबई - १२ मेच्या सकाळी ६.३० वाजता कडक पोलीस बंदोबस्तात भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात महिलांसाठी असलेल्या मर्यादेपर्यंत जात प्रवेश केला. 
     दर्ग्यातील मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास अनुमती नाही; मात्र पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही त्या ठिकाणी प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. पुढील १५ दिवसांत महिलांना मजार प्रवेश देण्याचे आवाहन तृप्ती देसाई यांनी दर्ग्याच्या विश्‍वस्तांना केले आहे. तसे न झाल्यास आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल, असेही त्या पुढे म्हणाल्या. देसाई यांच्यासमवेत त्यांच्या महिला कार्यकर्त्यासुद्धा होत्या.

दुधारी तलवारीने स्वतःचेच नाक कापू नका ! - उत्तराखंडच्या प्रकरणावरून शिवसेनेचा भाजपला सल्ला

     मुंबई - भानगडी आणि उचापती करण्यासाठी लोकांनी तुमच्या हाती सत्ता दिलेली नाही. ज्यांनी शिखरावर बसवले, तेच उद्या धुळीस मिळवल्याशिवाय रहाणार नाहीत. म्हणून लोकशाहीचे महत्त्व समजून वागा. हुकूमशहा हिटलरचाही गर्व, अहंकार गळून पडला आणि अंधार्‍या खंदकात त्याला स्वत:वरच गोळी झाडावी लागली. जनतेने हाती दिलेल्या दुधारी तलवारीने स्वतःचेच नाक कापू नका, असा सल्ला शिवसेनेने उत्तराखंडमधील राजकीय परिस्थितीवरून भाजपवला दिला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसची सत्ता असतांना त्यातील ९ आमदारांनी बंडखोरी केली. त्यांना भाजपची फूस असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे अस्थिर झालेले शासन बहुमत सिद्ध करण्यापूर्वी राष्ट्रपती राजवट लावून विसर्जित करण्यात आले. त्याविरोधात न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यावर काँग्रेसने बहुमत सिद्ध केले. या घटनाक्रमावरून दैनिक सामनाच्या संपादकीय लेखातून हा सल्ला देण्यात आला आहे.

(म्हणे) मद्यबंदी आणि गोमांसबंदी यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी !

गोदरेज उद्योग समूहाचे आदी गोदरेज यांचा जावईशोध !
मद्यामुळे लक्षावधी संसारांची राखरांगोळी, तर गोहत्येमुळे मोठ्या प्रमाणात
 गोधन आणि अन्य हानी होत आहे, हे गोदरेज यांना लक्षात येत नाही का ?
     मुंबई - मद्यबंदी आणि गोमांसबंदी यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रचंड मोठी हानी होत आहे, असे विधान गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज यांनी केले. विधानसभा निवडणुकांमुळे काही राज्यांत मद्यबंदी लागू होत आहे, तर काही राज्यांत गोमांसबंदीचे कडक पालन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आदी गोदरेज यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांची भूमिका मांडली.
गोदरेज यांची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी विधाने
१. जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे आणि भारत लवकरच एक शक्तीशाली विकसित राष्ट्र म्हणून पुढे येईल; पण यात काही बाबींचा अडसर आहे. उदाहरणार्थ काही राज्यांमध्ये असलेली गोमांसबंदी. यांमुळे ग्रामीण आणि कृषी विकास यांवर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. (शेतकर्‍यांची एवढीच काळजी गोदरेज यांना आहे, तर त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना साहाय्य करावे ? - संपादक) कारण एवढ्या गायींचे तुम्ही करणार तरी काय ? याचा शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होतोय. कारण शेतकर्‍यांना यातून मोठे उत्पन्न मिळतेे. (गायी विकून शेतकर्‍यांना मोठे उत्पन्न मिळते, हाही आणखी जावईशोध गोदरेज यांनी लावला आहे. शेती व्यवसाय आणि गोधन सांभाळणे ही दोन्ही सूत्रे एकत्र करून गोदरेज यांनी त्यांचा वैचारिक गोंधळच प्रकट केला आहे. - संपादक)

अभिनेत्री मनीषा कोईराला उज्जैन सिंहस्थात सहभागी !

प्रार्थनेमुळे गर्भाशयाच्या कर्करोग बरा झाल्याच्या अनुभूतीमुळे अध्यात्माकडे वळल्या !
मनःशांतीसाठी सिंहस्थात 
स्वामी पायलटबाबा यांच्या मांडवात उपस्थित
अभिनेत्री मनीषा कोईराला (वर्तुळात) 
    उज्जैन - अभिनेत्री मनीषा कोईराला सध्या सिंहस्थात स्वामी पायलट बाबा यांच्या मांडवात दिसत आहे. साध्वीसारखे वस्त्र धारण करून जप-तप करणे, योग करणे अशी त्यांची दिनचर्या असते. एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, वर्ष २०१२ मध्ये त्यांना गर्भाशयाच्या कर्करोग झाला होता. त्याच्यावर त्यांनी औषधोपचार, तसेच प्रार्थना केल्या होत्या. या प्रार्थनेच्या परिणामामुळे त्यांचा कर्करोग दूर झाला. आता झगमगती चित्रपटसृष्टी सोडून काही दिवस शांततेचे जीवन जगायची इच्छा आहे. त्यामुळे इच्छा असेपर्यंत त्या इथेच रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. साध्वी चेतना यांच्या माध्यमांतून त्या पायलट बाबांच्या संपर्कात आल्या. दुसर्‍या अमृत स्नानातही त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच अर्धकुंभालाही त्या आल्या होत्या.


देहलीतील जंतरमंतरवर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ !

  •   १५६ देशांतील नागरिकांचे समर्थन
  •  हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग
     नवी देहली - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात त्यांच्या ७०० हून अधिक भक्तांकडून १२ मेपासून येथील जंतरमंतरवर बेमुदत सत्याग्रहाला आरंभ करण्यात आला आहे. जोपर्यंत पू. बापूजींच्या सुटकेचे ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह चालू रहाणार आहे. सत्याग्रहाचे नेतृत्व अखिल भारतीय नारी रक्षा मंचाच्या सौ. रूपाली दुबे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. विजय साहनी आदी करत आहेत. १५६ देशांतील नागरिक आणि संस्था यांच्याकडून या आंदोलनाला समर्थन देण्यात आले आहे. यात विश्‍व हिंदू परिषद, धर्मरक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा समावेश आहे. सत्याग्रहानंतर कारागृह भरा आंदोलन करण्यात येणार आहे. या सत्याग्रहात हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री यांनीही मार्गदर्शन केले.

स्वधर्मात रहाण्यासाठी ५०० वनवासी महिलांना स्वर्ण वाटप !

हिंदूंचे धर्मांतर थांबवण्यासाठी उज्जैन सिंहस्थ क्षेत्रात स्वर्ण 
पदकांचे वाटप आणि पार्थिव शिवलिंग निर्माण ! 
     उज्जैन - सिंहस्थक्षेत्री १० मे या दिवशी भारतमाता समन्वय शिबिरात ५०० वनवासी महिलांना एक ग्रॅम सोन्याचे ॐ चिन्ह असलेल्या पदकांचे वाटप करण्यात आले. या पदक वाटपाचा उद्देश त्यांनी स्वधर्म सोडू नये, असा होता. सिंहस्थानिमित्त त्यांना पदक वाटप करण्यात आले. पुढे बस्तर आणि झारखंड येथेही असे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. सत्यमित्रानंदगिरि महाराज आणि जुना आखाड्याचे पीठाधीश्‍वर महामंडलेश्‍वर अवधेशानंदगिरि महाराज यांनी पदक वाटप केले. व्यासपिठापर स्वामी चिदानंदजी, महामंडलेश्‍वर अखिलेश्‍वरानंदजी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री श्री. शिवराज सिंह यांच्या पत्नी सौ. साधना सिंह आणि राज्याचे शिक्षणमंत्री श्री. पारस जैन उपस्थित होते.

वेदांत गोमांसभक्षणाचा उल्लेख नाही, इंग्रजाळलेल्या शिक्षणाचा परिपाक म्हणजे उद्योगपती गोदरेज ! - हिंदु जनजागृती समिती

आदी गोदरेज यांच्या विधानांचा हिंदु जनजागृती समितीकडून निषेध
     मुंबई- हिंदु धर्मीय गायीला पूज्य मानतात, माता मानतात. असे असतांना गोदरेज समूहाचे आदी गोदरेज यांनी गोमांसभक्षणाचे समर्थन करतांना निष्कारण आपली इंग्रजाळलेली बुद्धी पाजळून वैदिक काळात भारतीय गोमांस खात होते. हिंदु धर्मात बीफला कुठलाही विरोध नाही, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. गोदरेज यांनी वेद न वाचताच हे भाष्य केलेले दिसते. वेदांमध्ये अनेक ठिकाणी गोमांसभक्षणाचा केवळ निषेध केलेला नसून गोहत्या करणार्‍याला कठोर दंड वेदांनी सांगितलेला आहे. नफा-तोट्याच्या व्यापारी बुद्धीने विचार करणारे गोदरेज यांना गोमातेचे महत्त्व कसे कळणार ? गोहत्येविषयी वेदांत काय म्हटले, हे काही क्षण विसरले, तरी गोदरेज यांनी किमान त्यांच्या पारशी धर्मग्रंथाचे वाचन केले असते, तरी त्यांनी असे उद्गार काढले नसते.
     पारसी धर्मगुरूंनी अवेस्तातील यस्न, ३८.८ यांतील दुसर्‍या ओळीत गोमाता, बैल, तसेच वासरे यांचे मांस भक्षण करण्यास वर्ज्य असल्याचे म्हटले आहे. गोदरेज यांच्या विधानांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते, असे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

नितीशकुमार यांना अर्जुनाच्या, तर शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात रेखाटले !

संयुक्त जनता दलाकडून फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा अवमान
हिंदूंनो, सातत्याने होणार्‍या देवतांच्या विडंबनाच्या विरोधात कठोर कायदा करण्यासाठी
 केंद्रशासनावर दबाव निर्माण करा ! हिंदूंनो, अशा पक्षांना निवडणुकीत धडा शिकवा !
     वाराणसी - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उत्तरप्रदेशात वाराणसीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आला आहे. या फलकावर कृष्णार्जुनाचे रथातील चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यात नितीशकुमार यांना अर्जुनाच्या रूपात, तर संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. या फलकाद्वारे केंद्रशासन आणि उत्तरप्रदेश शासन यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे. या दोघांच्या विरोधात युद्धाची घोषणा करण्याचेही आवाहन यात करण्यात आले आहे.

सिंहस्थात ४ भोंदू साधूंना त्यांची जटा कापून संतांनी शिक्षा दिली !

     उज्जैन - सिंहस्थ क्षेत्रातील उजरखेडा येथे असलेल्या फौजी बाबा आश्रमात काही साधू दुपारी ४ वाजताच्या सुमारास जेवायला गेले होते. जेवणानंतर त्यांना दक्षिणाही देण्यात आली. त्यात काही साधू भोंदू असल्याचे अन्य संतांना वाटले. संतांनी त्यांना मारहाण केली. या वेळी २ साधू पळून गेले. उरलेल्या ४ भोंदू साधूंच्या संतांनी जटा कापल्या आणि त्यांना पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. या वेळी पोलिसांनाही त्या भोंदू साधूंना मारहाण केली. याविषयी अधिक माहिती सांगण्यास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी नकार दिला.

देशातील संस्कृतीला भक्कम करणारे शासन देशात विराजमान ! - अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

शासनाने देशातील संस्कृतीला भक्कम केले, असे हिंदूंना दिसेल, हीच शासनाकडून अपेक्षा ! 
सिंहस्थामध्ये समरसतेसाठी संत संमेलनाचे आयोजन !
      उज्जैन - येथे आदि शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपच्या वतीने आयोजित समरसता स्नानाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमित शाह यांनी ११ मे या दिवशी उपस्थित सर्व संतांसह क्षिप्रा नदीच्या वाल्मीकि घाटावर पवित्र स्नान केले. या वेळी संत संमेलनात बोलतांना ते म्हणाले की, आज देशात भारतीय संस्कृतीला भक्कम करणारे शासन विराजमान आहे. समस्त जिवांचे कल्याण करणे, हाच भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र आहे. वर्तमान शासन याच ध्येयाने काम करत आहे. (असे जनतेने म्हटले पाहिजे; मात्र जनता अजून तसे म्हणत नाही, याचाच अर्थ ते सत्य नाही ! - संपादक)

यज्ञ करा म्हणजे पाऊस पडेल ! - वीरेंद्र सिंह, खासदार, भाजप

केंद्रशासनाने प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक जिल्ह्यात यज्ञ करण्यासाठी योजना आखली पाहिजे !
     नवी देहली - देशातील ३३ टक्के जनता दुष्काळाने त्रासलेली असतांना त्यावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये भाजपचे उत्तरप्रदेशातील भाडोई येथील खासदार वीरेंद्र सिंह यांनी यज्ञाचे आयोजन केले आहे. निसर्ग शुद्ध होऊन भरपूर पाऊस पडावा, यासाठी सर्वांनी यज्ञ करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लोकसभेत दुष्काळावर चर्चा करतांना वीरेंद्र सिंह बोलत होते.
     यज्ञाचे समर्थन करतांना सिंह म्हणाले, आधुनिक काळाचा विचार करता यज्ञ ही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पद्धत आहे. यज्ञामुळे ढगांना आकर्षित करण्यासाठी साहाय्य होते. यज्ञ हा केवळ शेतकर्‍यांसाठी किंवा संपन्न लोकांसाठी नसून यज्ञामुळे वातावरण शुद्ध होते. यज्ञातून निघालेला धूर आकाशात जातो आणि पाऊस पडतो, याला विज्ञानाचाही आधार आहे. मला निश्‍चिती आहे की, ज्या भागात दुष्काळाची परिस्थिती आहे, तेथे यज्ञ केल्यास पाऊस पडू शकेल. तसेच विकासाच्या नावाखाली लोक निसर्गाचा र्‍हास करत असल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी इंद्रदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या मतदारसंघात यज्ञ करावेत.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पुन्हा शिकागोला पाठवा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

     नवी देहली - राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी १२ मे या दिवशी राज्यसभेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. राजन यांची धोरणे आणि अर्थनीती भारतासाठी अनुकूल नाही. त्यांना पुन्हा शिकागोला प्राध्यापकी करायला पाठवायला हवे, अशी टीका त्यांनी केली आहे. राजन यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपत आहे. स्वामी म्हणाले की, चलन फुगवटा अल्प करण्यासाठी व्याजदर वाढवण्याच्या रघुराम राजन यांच्या निर्णयामुळे देशाची मोठी हानी झाली. व्याजदर वाढवल्याने बेकारी वाढली, महागाई वाढली आणि देशाचा विकास दर घटला.

तरुणाच्या खून प्रकरणात 'एम्.आय.एम्.'चे तालुकाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांचे नाव निष्पन्न : कांबळे पसार

     मिरज, १२ मे (वार्ता.) - मिरज-म्हैशाळ रस्त्यावर वड्डीजवळ भिकू उपाख्य सुधीर अरुण कांबळे या तरुणाच्या झालेल्या खूनप्रकरणी 'एम्.आय.एम्.' चे तालुकाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांचे नाव निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. महेश कांबळे सध्या पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ('एम्.आय.एम्.'चा खरा तोंडवळा ! - अशा प्रकारे खुनाचा आरोप असलेला तालुकाध्यक्ष असलेला पक्ष समाजहिताची कामे कधीतरी करेल काय ? वास्तवित राज्य शासनाने अशा पक्षांवरच बंदी घालायला हवी ! - संपादक) 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे मुलांना घडवण्यासाठी महिलांनी रणरागिणी शाखेत सहभागी व्हावे ! - सौ. रमा सावंत, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मुंबई येथे १४ मे पासून 'रणरागिणी' शाखेकडून होणार 'धर्मपरंपरा रक्षण चळवळी'स प्रारंभ !

डावीकडून सौ. नयना भगत, सौ. मनाली नाईक,
अधिवक्त्या (सौ.) गौरी सावंत, कु. प्रतीक्षा कोरगावकर, सौ. रमा सावंत, वैद्य उदय धुरी
     मुंबई, १२ मे (वार्ता.) - पाल्यांवर चांगले संस्कार व्हायला हवेत. जिजामातेने छत्रपती शिवरायांना घडवले, त्याही एक रणरागिणी होत्या. जिजामातेप्रमाणे स्वत:च्या पाल्यांना घडवायचे असेल, तर महिलांनी रणरागिणी शाखेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सौ. रमा सावंत यांनी केले. या उपक्रमात माझा सक्रिय सहभाग असेल, असे प्रतिपादन सौ. रमा सावंत यांनी या वेळी केले. मुंबई येथे रणरागिणी शाखा कार्यरत होत आहे. यानिमित्त १४ मे २०१६ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता शिवालय सभागृह, सेनापती बापट मार्ग, बिग बाजारजवळ, लोअरपरेल (प.), मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी १२ मे या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर धर्माभिमानी अधिवक्त्या (सौ.) गौरी सावंत, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर, मुंबई जिल्हा संघटक सौ. मनाली नाईक, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी हे उपस्थित होते. या वेळी वैद्य धुरी यांनी पत्रकार परिषदेची प्रस्तावना केली.

सनातन प्रभातच्या वार्ताहर प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे यांचा 'वसंत वक्ता' पुरस्काराने गौरव

पुणे येथे वसंत व्याख्यानमालेत युवा वक्तृत्वदिनानिमित्त वक्तृत्वस्पर्धा 
प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे (डावीकडे) यांना पुरस्काराने
गौरवतांना मध्यभागी प्रा. सुजाता शैण्ये आणि प्रा. प्र.ल. गावडे

     पुणे, १२ मे (वार्ता.) - येथे वक्तृत्त्वोतेजक सभेच्या विद्यमाने आयोजित १४२ वी वसंत व्याख्यानमाला चालू असून ११ मे या दिवशी युवा वक्तृत्वदिनानिमित्त निवडक वक्त्यांनी 'भारत असहिष्णु आहे का ?' आणि 'नावात काय आहे ?' या विषयावर विचार मांडले. या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहर प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे यांनी 'भारत असहिष्णु आहे का ?' या विषयावर उत्कृष्ट विचार मांडल्यामुळे त्यांचा 'वसंत वक्ता' पुरस्काराने गौरवण्यात आले, तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित साहित्याचे अभ्यासक प्र.ल. गावडे आणि प्रा. सुजाता शेणये यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देण्यात आले. सूत्रसंचालन व्याख्यानमालेचे प्रमुख कार्यवाह डॉ. मंदार बेडेकर यांनी केले. 

तमिळनाडूमध्ये मते विकत घेण्यासाठी जनतेला दिलेले ९२ कोटी रुपये निवडणूक आयोगाने जप्त केले !

जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवणार्‍या भारतीय लोकशाहीची वास्तविकता !
मतांसाठी पैसे देऊन मतदारांना भ्रष्ट करण्याचे अपप्रकार सर्रास चालू !
     चेन्नई - १६ मे या दिवशी तमिळनाडू येथे होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी मतांसाठी जनतेला पैसे दिले. त्यांपैकी ९२ कोटी रुपये रोख निवडणूक आयोगाने कह्यात घेतले आहेत. कह्यात घेतलेली ही रक्कम आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये सर्वाधिक रक्कम असल्याचे आयोगाने म्हटले आहे. (भारतीय लोकशाही पूर्णत: निरर्थक ठरल्याचे हे द्योतक आहे ! - संपादक)
      प्रत्येक २ गावांसाठी आयोगाने १ गट नेमला असून मतासाठी पैसे (कॅश फॉर व्होट) कशाप्रकारे वाटण्यात येतात, याचा अभ्यास करणे आणि हे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काढणे, हे काम सदर गट करत आहेत. तमिळनाडूत मतदारांना भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्याचे आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मुख्यमंत्री जयललितासहित १५७ उमेदवारांवर फौजदारी प्रकरणे

देशाची अराजकतेकडे वाटचाल ! 
तमिळनाडू विधानसभा निवडणूक
     नवी देहली - तमिळनाडू विधानसभा निवडणुकांना उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी मुख्यमंत्री जयललितासहित १५७ उमेदवार म्हणजेच १६ टक्के उमेदवार यांच्यावर विविध प्रकारची फौजदारी प्रकरणे प्रविष्ट आहेत अथवा त्यांना कधीतरी अशा खटल्यांना सामोरे जावे लागले आहे, अशी माहिती निवडणुकांच्या निरिक्षकांकडून देण्यात आली आहे. राजकीय पक्षांचा विचार केल्यास सर्वाधिक सीपीआय-एम् या साम्यवादी पक्षातील ४७ टक्के (१७ जणांना) उमेदवारांना फौजदारी प्रकरणांना कधीतरी सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर डीएम्डीकेचे ४२ टक्के (९८ जणांना) उमेदवार, डीएम्केचे ४० टक्के (६८ जणांना) उमेदवार, काँग्रेसचे २७ टक्के (१० जणांना) उमेदवार, एआयएडीएम्केचे २२ टक्के (४७ जणांना) उमेदवार आणि भाजपचे १५ टक्के (२६ जणांना) उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. (असे उमेदवार उद्या निवडून आल्यास राज्यात अराजक माजणार नाही, हे कशावरून ? - संपादक)सोनिया गांधी यांची एकूण संपत्ती १३ सहस्र कोटी रुपये ! -सेलिब्रिटी नेटवर्थ डॉट कॉम संकेतस्थळ

सुजलाम् सुफलाम् भारत ओरबाडून त्याचे वाळवंट करणार्‍या काँग्रेसच्या 
अध्यक्षांची संपत्ती सहस्रो कोटी रुपये आहे, यात आश्‍चर्य ते काय ?
जगातील सर्वाधिक श्रीमंत राजकारण्यांच्या सूचीत गांधी यांचा २६वा क्रमांक
      नवी देहली - काँग्रेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची एकूण संपत्ती अनुमाने २०० कोटी डॉलर्स (१३ सहस्र कोटी रुपये) असल्याचा दावा सेलिब्रिटी नेटवर्थ डॉट कॉम या संकेतस्थळाने केला आहे. या संकेतस्थळाने जगातील ५० सर्वाधिक श्रीमंत राजकारण्यांची सूची घोषित केली आहे. त्यात गांधी यांचा २६वा क्रमांक आहे. एवढेच नव्हे, तर त्यांची संपत्ती ब्रिटनच्या महाराणी आणि पाकचे पंतप्रधान जे स्वत: उद्योगपतीही आहेत, त्यांच्या पेक्षाही अधिक आहे. विशेष म्हणजे या सूचित सोनिया गांधी यांच्या शिवाय भारतातील दुसर्‍या राजकारण्याचे नाव नाही. (सहस्रो कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या राजकारण्यांची सूची करून त्यांच्या संपत्तीची कसून चौकशी व्हायला हवी. अशांवर आता जरी कारवाई झाली नाही, तरी हिंदु राष्ट्रात मात्र अशा प्रकरणात दोषी असणार्‍यांना आजन्म कठोर शिक्षा करण्यात येईल. - संपादक)
      दुसरे संकेतस्थळ ओपन सिक्रेट्स डॉट ऑर्गच्या नुसार सोनिया गांधी यांची वास्तविक संपत्ती २०० कोटी डॉलर्स आहे आणि एक लाख २६ सहस्र कोटींहून अधिक (१ सहस्र ९०० कोटी डॉलर्स) असण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी या मूळच्या इटली येथील असून वर्ष १९९८ पासून काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.

परीक्षेसाठी मला हिंदु असल्याची ओळख दाखवावी लागली !

अन्सरला वसतीगृह मिळवण्यासाठी स्वत:ची ओळख का लपवावी लागली, 
याचे आत्मपरीक्षण मुसलमान करतील का ?
यू.पी.एस्.सी.च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या अन्सर याच्याकडून धक्कादायक माहिती
     पुणे - परीक्षेसाठी स्वत: मुसलमान असतांना आपल्याला हिंदु असल्याची ओळख दाखवावी लागली; मात्र आता मला माझे खरे नाव लपवण्याची आवश्यकता भासणार नाही. आता मी शुभम (हिंदु) नसून शेख (मुसलमान) असल्याचे सर्वांना सांगू शकतो, अशी धक्कादायक माहिती यू.पी.एस्.सी.च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या २१ वर्षीय अन्सर अहमद शेख याने दिली आहे.

खाण घोटाळ्याप्रकरणी गोवा लोकायुक्त मागील ३ वर्षांपासून शासनाकडून उत्तराच्या प्रतिक्षेत

शासनाची ही भूमिका म्हणजे खाण घोटाळ्यातील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचाच प्रकार !
     पणजी - गोव्यातील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या अनधिकृत खाण घोटाळ्याप्रकरणी गोवा लोकायुक्त मागील ३ वर्षांपासून शासनाकडून उत्तर येण्याच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती गोवा लोकायुक्त कार्यालयातून मिळाली आहे. (यावरून खाण घोटाळ्याविषयी शासन किती गंभीर आहे, ते दिसून येते ! - संपादक)
      गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तीन वर्षांपूर्वी गोवा लोकायुक्त कार्यालयात अनधिकृत खाण घोटाळ्यासंबंधी तक्रार केली होती. या घोटाळ्यासंबंधी आरोप निश्‍चित करण्याची मागणी करण्यात आली होती. निवृत्त न्यायाधीश एम्.बी.शहा यांच्या आयोगाने केलेल्या चौकशीनुसार या घोटाळ्यामध्ये अनेक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि खाणमालक गुंतलेले आहेत.

रायगड, पुणे आणि नगर जिल्ह्यांत विविध भागांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस

     पुणे - रायगड, पुणे शहर, उपनगर आणि नगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ११ मे या दिवशी वादळी वार्‍यासह पाऊस पडला. पुण्यामध्ये वादळी पावसामुळे १४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या; परंतु जीवितहानी झाली नाही. काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. नगर शहरासह जिल्ह्यात झालेल्या वळवाच्या पावसासमवेत गारपीट झाली आहे. कर्जत तालुक्यात काही घरांचे पत्रे उडून गेले, तर अकोले तालुक्यात वीज पडून एका युवकाचा, तर कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथे गायीचा मृत्यू झाला आहे.

विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणार्‍या कोंढवा (जिल्हा पुणे) पोलीस ठाण्यातील ३ पोलिसांचे निलंबन

     पुणे, १२ मे - येथील कोंढवा पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या प्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका तरुणीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणार्‍या एका पोलीस उपनिरीक्षकासह २ हवालदारांना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी निलंबित केले आहे. पोलीस उपनिरीक्षक भिकोबा पांडुरंग देवकाते, पोलीस हवालदार नानासाहेब चमनराव भारूड आणि महादेव सिताराम सुर्वे अशी त्यांची नावे आहेत. (या कारवाईसमवेत अशा पोलिसांवर कठोर कारवाई व्हायला हवी, तरच पोलिसांमधील हलगर्जीपणा अल्प होईल ! याचसमवेत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न केल्यासच 'महिलांसाठी सुरक्षित' शहर होऊ शकेल ! - संपादक)

कराड येथे शिवजयंती निमित्त भव्य दरबार मिरवणूक उत्साहात !

     कराड, १२ मे (वार्ता.) - 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'हर हर महादेव', 'जय भवानी-जय शिवाजी' या घोषणांच्या गजरात नुकतीच दरबार मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत प्रभु श्रीराम आणि बजरंगबली हनुमान यांच्या भव्य मूर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून जमलेल्या सहस्रो शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या. 

बीड येथे शिक्षणमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक यांच्या विरोधात पोलीस तक्रार प्रविष्ट

राष्ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य केल्याचे प्रकरण 
     बीड, १२ मे - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात 'नॅशनल एलिजिबीटी टेस्ट' (नीट) या प्रकरणावर निर्णय देत वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा कायम ठेवली आहे. यामुळे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता या प्रकरणावरून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रवीण शिनगारे यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस तक्रार केली आहे. ही तक्रार बीड जिल्ह्यातील सुनील जाधव यांनी प्रविष्ट केली आहे. (शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे एक दिवस जनक्षोभ उसळल्यास आश्‍चर्य ते काय ? शासनाने शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार थांबवून विद्यार्थी आणि पालक यांना चांगले दिवस दाखवावेत, ही अपेक्षा ! - संपादक)

केंद्रशासनाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून १ कोटी ६० लाखांहून अधिक शिधापत्रिका बनावट असल्याचे स्पष्ट

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या थेट लाभ हस्तांतरण योजनांच्या प्रगती आढाव्यातील माहिती
१० सहस्र कोटी रुपयांहून अधिक बचत होणार !
     नवी देहली (प.सू.का.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आधार आणि थेट लाभ हस्तांतरण योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. थेट लाभ हस्तांतरण योजनेचा परिणाम म्हणून सर्व जलहितकारक कार्यक्रमांमध्ये मोठी बचत झाली आहे. खोटे लाभार्थी वेळीच दूर करण्यातही यश प्राप्त झाले आहे. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून १ कोटी ६० लाखांहून अधिक शिधापत्रिका बनावट असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी १० सहस्र कोटी रुपयांहून अधिक बचत झाली आहे. तसेच २०१५-१६ यावर्षी पुढाकार योजनेतील ३ कोटी ५० लाख खोट्या लाभार्थींना वेळीच ओळखल्यामुळे १४ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत झाली आहे, असे आढळून आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार नियोजनेमध्येही वर्षभरात ३ सहस्र कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.

तिस्ता सेटलवाड प्रकरणात चौकशी होण्यापूर्वीच गृह मंत्रालयाचे सचिव फरार !

     नवी देहली - तिस्ता सेटलवाड यांच्या सबरंग या संस्थेला मिळालेल्या विदेशी धनाच्या संदर्भातील धारिका गहाळ होण्याच्या प्रकरणात आरोप असणारे केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव आनंद जोशी फरार झाले आहेत. त्यांची या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी होणार होती. (तीस्ता सेटलवाड या सदर धारिका गहाळ होण्यामागे नसणार, हे कशावरून ? त्यामुळे आता सेटलवाड यांचीच कसून चौकशी व्हायला हवी ! - संपादक)
     जोशी यांनी घरातून पळून जातांना एक पत्र ठेवले होते. त्यात त्यांनी लिहिले होतेे की, गेल्या काही मासांपासून मी मानसिक अत्याचार सहन करत आहे; मात्र आता पाणी डोक्यावरून गेले आहे. मला शांतीची आवश्यकता आहे. ती येथे मिळण्याची शक्यता नाही; म्हणून मी घर सोडून जात आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये.

फलक प्रसिद्धीकरता

भौतिक विकासापेक्षा देशाला धर्म आणि नीतीमत्ता यांची आवश्यकता अधिक आहे, हे लक्षात घ्या !
     काही राज्यांमध्ये मद्यबंदी लागू केल्याने आणि गोमांसबंदीचे कडक पालन केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रचंड मोठी हानी होत आहे, असे विधान गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kuch rajyonme Darubandi evam Gomansbandi ke karan deshki arthvyavasthako badi hani ! - Adi Godrej
     Congresske Mahabhrashtachar par Godrej chup kyon ?
जागो !
: कुछ राज्यों में दारूबंदी एवं गोमांसबंदी के कारण देश की अर्थव्यवस्था को बडी हानि ! - आदि गोदरेज
     कांग्रेस के महाभ्रष्टाचार पर गोदरेज चुप क्यों ?

मेघा पानसरे यांची याचिका प्रविष्ट करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

     १२ मे - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मेघा पानसरे यांची याचिका प्रविष्ट करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. समीर गायकवाड यांच्याविरुद्ध चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आरोपपत्र दाखल करू नये ही मेघा पानसरे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. २० मे या दिवशी कोल्हापूर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात सत्र न्यायालयाने निर्णय घ्यावा असे आदेशही दिले होते; पण चौकशीत प्रतिदिन नविन खुलासे होत असतांना आरोपपत्राची घाई नको असे पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

पुण्यातून दिवसाला सरासरी एक 'प्रेमीयुगल' पालकांच्या विरोधामुळे पळून जाते

'प्रेम गोष्टींवर' आधारित चित्रपटांचा दुष्परिणाम ! 
अशाने देशातील कुटुंबव्यवस्था पूर्णपणे मोडल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! 
     पुणे, १२ मे - पुण्यातून दिवसाला सरासरी एक 'प्रेमीयुगल' पालकांच्या विरोधामुळे पळून जात आहे. याविषयी पोलिसांकडील नोंद थक्क करणारी आहे. त्यातच फूस लावून पसार झालेल्या १४ वर्षांपासूनच्या पुढील अल्पवयीन मुलींचा समावेश अधिक असल्याची नोंद पोलीस प्रशासनाकडे आहे. अशा प्रकारे मुलींना पसार केल्याने त्या मुलावर अपहरणाचा गुन्हा नोंद होतो. सध्या पुण्यात असा गुन्हा नोंद होण्याचे प्रमाण दिवसाला सरासरी एक आणि त्यापेक्षा अधिक आहे. (यामध्ये काही घटना 'लव्ह जिहाद'च्याही असू शकतात. - संपादक)

योगऋषि रामदेवबाबा यांचा भजन गायन रिअ‍ॅलिटी शो दूरचित्रवाहिनीवर !

योगऋषि रामदेवबाबा
    मुंबई - योगाचा जागतिक स्तरावर प्रसार करून योगऋषि रामदेवबाबांनी हिंदु धर्माची पताका सर्वदूर फडकवली. तसेच योगऋषी पतंजलिच्या माध्यमातून अन्न आणि औषध व्यवसायामध्ये यशस्वी झाले. त्यामुळे बहुराष्ट्रीय आस्थापनांवर वचक बसला.
    आता योगऋषि रामदेवबाबा यांचा दूरचित्रवाहिनीवर भजन गायन रिअ‍ॅलिटी शो नावाचा कार्यक्रम चालू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नाव भजनरत्न असून आस्था या प्रमुख आध्यात्मिक दूरचित्रवाहिनीवर या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे.

अडचणीच्या वेळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही १०० क्रमांकावरून प्रतिसाद नाही !

न्यायाधिशांनाही जेथे प्रतिसाद मिळत नाही, तेथे सामान्य जनतेला 
कसा प्रतिसाद मिळत असणार, हे यातून लक्षात येते ! 
    नवी देहली - देहली उच्च न्यायालयातील न्यायाधीश वाहतुकीच्या अडथळ्यात अडकल्याने त्यांनी १०० या पोलीस साहाय्य क्रमांकावर संपर्क केला असता, त्यांचा कॉल ५ मिनीट संस्थागित (होल्ड) करण्यात आला. 
१. देहली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपीन संघवी रात्रीच्या वेळी देहलीतील वसंत कुंजच्या दिशेने एका विवाह समारंभासाठी निघाले होते. त्यावेळी वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे त्यांना अर्ध्या घंट्याहून अधिक वेळ वाट पहावी लागली. 
२. या वेळी वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने त्यांनी १०० या क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. (कामाच्या कालावधीत उपस्थित नसणारे कामचुकार वाहतूक पोलीस ! अशांच्या विरोधात प्रशासन कारवाई करेल का? - संपादक)
३. न्यायाधिशांनी देहलीतील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला या संदर्भात पत्र लिहिले असून या पत्राची एक प्रत देहली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी यांना पाठवण्यात आली आहे. न्यायालयाने हे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले आहे.

२०१२ ते २०१५ या कालावधीत ४ सहस्र ८९५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला !

भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष असतांना धर्माच्या आधारावर 
शाळांना दर्जा देणे, हा विरोधाभास नव्हे का ?
     नवी देहली - अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांच्या राष्ट्रीय आयोगाने देशातील ४ सहस्र ८९५ शाळांना २०१२ ते २०१५ या कालावधीत अल्पसंख्यांक दर्जा दिला असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली. यामध्ये पहिल्या क्रमांकावर केरळ असून त्यानंतर उत्तरप्रदेशाचा क्रमांक लागतो.

दुष्काळ निवारणासाठी निधी उभारण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश !

दुष्काळाने जनता त्रस्त असतांना राज्यकर्त्यांना सर्वोच्च 
न्यायालयाच्या आदेशाची वाट का पहावी लागते ?
     नवी देहली - सर्वत्र चिंतेचा विषय बनलेल्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी केंद्रशासनाने निधी उभारावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. स्वराज्य अभियानाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. 
यात पुढे म्हटले आहे की,
१. आपत्ती व्यवस्थापन कायद्यात नमूद केल्यानुसार केंद्रशासनाने दुष्काळ विरोधात उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे.
२. राज्यात दुष्काळाची घोषणा करण्यापूर्वी शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि त्यांना सामोरे जावे लागणार्‍या तणावाचा विचार करण्यात यावा.
३. याप्रकरणी केंद्रीय कृषि सचिव आणि बिहार, गुजरात तसेच हरियाणाच्या मुख्य सचिवांची एक आठवड्याच्या आत बैठक घेण्यात यावी.

कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना परतावा देण्याचा ट्रायचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रहित !

     नवी देहली - भ्रमणभाषवर बोलतांना कॉल ड्रॉप झाल्यास (संपर्क तुटल्यास) ग्राहकांना कोणताही परतावा मिळणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कॉल ड्रॉप झाल्यास संबंधित ग्राहकाला परतावा द्यावा, हा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात ट्रायने) दूरसंचार आस्थापनांना दिलेला आदेश न्यायालयाने रहित केला आहे.
       ग्राहकांच्या हिताचा विचार करून ट्रायने दिलेल्या या निर्णयाला आस्थापनांनी विरोध करत देहली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही ट्रायचा निर्णय योग्य ठरवला होता. त्याविरोधात आस्थापनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आस्थापने आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहेत. स्पेक्ट्रमविषयी आधीच मोठी किंमत मोजावी लागत असल्याने कॉल ड्रॉपविषयी अन्यायकारक शुल्क लादले जाऊ नये, असे त्यांनी न्यायालयात सांगितले होते. (जनतेवर अन्याय होत आहे, याचाही विचार करायला नको का ? - संपादक) त्यावर ११ मे २०१६ या दिवशी सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने ट्रायचा आदेश रहित केला.श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा

उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त..
महंत श्री सागरानंद
सरस्वती महाराज
    नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत श्री सागरानंद सरस्वती महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.
संकलक : श्री. सचिन कौलकर 
आखाड्यांचा परिचय
     सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्‍याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

क्रांतीकारकांना आतंकवादी कोणी ठरवले ?

    हुतात्मा क्रांतीकारक भगतसिंग यांचा देहली विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातील भारताचा स्वातंत्र्यसंघर्ष या पाठ्यपुस्तकात आतंकवादी असा उल्लेख केला आहे. तसेच भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन यांना क्रांतीकारक आतंकवादी, असे संबोधण्यात आले आहे. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे का ? या पुस्तक लेखनात सहभागी असणार्‍या कोणा कोणास क्रांतीकाराकांविषयी पोटशूळ उठल्याने असा भ्याडपणा केला आहे, हे शोधायलाच हवे. संधी मिळेल तिथे तात्काळ घाव घालून वैचारिक आतंकवादी मोकळे होत आहेत. आपण जे लिहितो, त्याचे समर्थन करण्यासाठी, तसेच आता जनतेसमोर येण्यासाठी लाज का वाटत आहे ? अक्षम्य चुका करायच्या आणि नंतर त्या सुधारल्या जातील, असे सांगून वेळ मारून न्यायची. अशी सोंगे आता पुरे झाली. राष्ट्रप्रेमींनी हा अवमान का सहन करायचा ? क्रांतिकारकांचा अवमान हा देशाचा अवमान आहे. क्रांतीकारकांच्या बलीदानाची कुचेष्टा करणार्‍यांना कठोर शासन झालेच पाहिजे.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी मुलांत विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
मुलांनो, काटकसर केल्याने होणारे लाभ जाणा !
२ इ. साबण
१. कपडे धुणे, भांडी घासणे आणि आंघोळ करणे यांसाठी साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा.
२. साबणाच्या वडीचा वापर करून झाल्यानंतर ती उभी करून निथळत ठेवावी. त्यामुळे त्या वडीची झीज अल्प होईल.
३. शेष राहिलेल्या साबणाचे तुकडे एकत्र करून ते हात धुणे, कंगवे स्वच्छ करणे आणि लादी धुणे यांसाठी वापरावेत.

ईश्‍वरावर श्रद्धा ठेवण्याचा मेंदूवर काय परिणाम होतो ?

अंतर्मुखता प्राप्त करून देणारी श्रद्धा !
     ईश्‍वरावर श्रद्धा ठेवल्याने मनुष्य मेंदूचा चिकित्सक विचार करण्याचा भाग दाबून ठेवतो आणि भाव-भावनांशी समरस होण्यासाठी उत्तरदायी असलेला भाग वापरतो, असे एका संशोधनाद्वारे आढळून आले आहे. तेच जेव्हा तो मायेतील विचारांत गुंततो, तेव्हा ही प्रक्रिया नेमकी उलटी घडते. 
     वरील संशोधन करणार्‍या गटाचे प्रमुख प्राध्यापक टोनी जॅक म्हणतात, श्रद्धेच्या दृष्टीकोनातून पाहिले असता चिकित्सक बुद्धीचा वापर करणे मूर्खपणाचे आहे. मेंदूच्या कार्याचा अभ्यास केला असता आध्यात्मिक गोष्टींवरील विश्‍वासाचे परिवर्तन श्रद्धेत होते त्या वेळी मेंदूच्या टीकात्मक अथवा चिकित्सक विचारांना दूर सारले, तर आपल्याला सामाजिक आणि भावनात्मक स्तरावर अधिक अंतर्मुखता प्राप्त होते.

भगवान परशुरामांनी त्यांच्या आईचा खून केला, असा अपप्रचार करणार्‍या ब्राह्मणद्वेष्ट्यांचा एका हिंदुत्ववाद्याने संवादाद्वारे वस्तूनिष्ठपणे केलेला वैचारिक प्रतिवाद !

८ मे या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती आणि मातृदिन झाला. त्या निमित्ताने...
    आमचे बिग्रेडी मित्र म्हणतात, "म्हणे परशुरामाने आपल्या आईचा खून केला. पहा, पहा हे बामन कसे असतात !"
     मी एकाला धरून विचारले, "काय रे, परशुरामांनी आपल्या आईचा खून केला, हे तुला कुणी सांगितले ?"
      तर म्हणे, "पुराणांत लिहिलय ना ?"
    मी म्हणालो, "अरे, पण हिंदूंची पुराणं म्हणजे भाकडकथा असं तुम्हीच रक्त आटवून आटवून सांगता ना ? मग आता लोकांना त्याच भाकडकथांवर विश्‍वास ठेवायला लावून परशुरामांना खुनी कसे काय ठरवता ?"
     पिवळ्या पुस्तकांवर पोसलेला असला, तरी लेकराने एखादे तरी पांढरे पुस्तक वाचले असावे बहुतेक. कारण माझ्या प्रश्‍नानंतर थेट शिव्यांवर न उतरता, तो जरासा विचारात पडलेला दिसला. मग मीच पुढे म्हणालो, मित्रा, असं पुराणातलं सोयीचं उचलायचं नाही. परशुरामांनी आईचा खून केला असं तुला म्हणायचं असेल, तर मग हिंदूंच्या पुराणांत सत्य घटनांवर आधारित इतिहास लिहिलेला असतो, हे मान्य कर. नाहीतर जर पुराणं खोटी असतील, तर तुझा परशुरामांवरचा आरोपसुद्धा निराधार आहे हे मान्य कर. काय करतोस ?
www.sanatan.org
वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !
     हिंदुस्थानात भाषा, प्रांत, जात, स्त्री, पुरुष, कामगार, शेतकरी, विशिष्ट पक्ष अथवा विचारसरणी म्हणून जगण्याची प्रवृत्ती वाढत असतांना आपण हिंदुस्थानी म्हणून जगायला विसरत आहोत, ही शोकांतिका आहे !
- श्री. भारतकुमार राऊत, खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी
 इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     जर गाणे, नाचणे इस्लामला संमत नसेल (कारण इस्लाम हा गंभीर विचारांचा धर्म म्हटला जातो.), तर जे मुसलमान - खान चित्रपटांत नाचतात, गाणे म्हणतात, त्यांच्यविरुद्ध फतवा का नाही?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

भारती विद्यापीठ, पुणे येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि अनुभव

        हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारांतर्गत २६.१.२०१६ या दिवशी भारती विद्यापीठ, पुणे तसेच सभोवतालच्या गावांत बैठका आणि प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने विषय मांडण्याचे नियोजन केले होते. त्या वेळी या अभियानात सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या अनुभूती आणि अनुभव येथे देत आहोत.
१. सभेच्या प्रसाराचे नियोजन करतांना उत्साह जाणवणे आणि प्रसाराची सेवा करणार्‍या साधकांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहून हिंदु राष्ट्रातील मावळेच आले आहेत, असे वाटणे : २६.१.२०१६ या दिवशीच्या प्रसाराचे नियोजन करतांना बैठकीत पुष्कळ उत्साह जाणवत होता. माझ्या मनाला आलेला निरुत्साह निघून गेला. नामजप परिणामकारक होऊ लागला. २६ जानेवारीच्या दिवशी माझे नियोजन प्रसारात नव्हते. माझ्याकडे साधकांना प्रसारासाठी जोडून देण्याची सेवा होती. ही सेवा त्या दिवशी मनापासून स्वीकारली गेली. जसे साधक येत होते, तसे पुढचे नियाजन होत होते. त्यामुळे मोकळ्या वेळेत प्रार्थना होत होत्या. सर्वजण सेवेला गेल्यानंतर देवाने मला वेगवेगळ्या सेवा दिल्या, असे वाटून कृतज्ञताभाव जागृत झाला. दुपारी साधक जेवायला आल्यानंतर सर्वांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने हिंदु राष्ट्रातील मावळेच आले आहेत, असे वाटत होते. सर्व साधकांना एकत्र पाहून आणि त्यांची सेवा करतांना चांगले वाटले.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चि. गजानन प्रमोद सुतार (वय ४ वर्षे) !

चि. गजानन सुतार
       वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी (१३.५.२०१६) या दिवशी कोकिसरे, वैभववाडी, सिंधुदुर्ग येथील चि. गजानन प्रमोद सुतार याचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आजी श्रीमती रत्नप्रभा राजाराम सुतार यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. गजानन सुतार 
याला सनातन परिवाराकडून 
वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. प.पू. भक्तराज महाराज आणि 
प.पू. डॉक्टर यांच्या छायाचित्रांशी खेळणे
         गजानन दोन मासांचा (महिन्यांचा) असतांना आम्ही त्याच्या पाळण्यात उशीजवळ प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांची छायाचित्रे ठेवली होती. तेव्हा तो मागे हात करून उशाशी ठेवलेले छायाचित्र घ्यायचा आणि त्यांच्यासमवेत खेळत रहायचा. त्यांच्या छायाचित्रांकडे पाहून तो पुष्कळ हसायचा. तो दिवसभरातील पुष्कळ वेळ त्या छायाचित्रांकडे पाहून शांतपणे खेळण्यात रमायचा.

वैद्यकीय व्यवसाय व्यवसाय या दृष्टीकोनातून न करता सेवाभावाने करणार्‍या आणि साधकांना आधार देणार्‍या पुणे येथील वैद्या कु. कल्याणी गोंधळेकर !

वैद्या कु. कल्याणी गोंधळेकर
       गेल्या काही वर्षांपासून वैद्या कु. कल्याणीताई पुणे येथे आयुर्वेदीय वैद्यकीय सेवा करत आहेत. पुण्यात त्यांचे एक चिकित्सालय आहे. ताई साधकांवर मनापासून, तळमळीने आणि सेवाभावाने उपचार करतात. त्यांचा हातगुण चांगला असून बर्‍याच साधकांना त्यांच्या उपचारांचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ झाला आहे.
         कल्याणीताईंचे आई-वडील आणि दोन बहिणी सर्वच जण सनातनच्या माध्यमातून साधना करतात. मूळचे अकोला येथील सौ. राजेश्री आणि श्री. रवींद्र गोंधळेकर (आध्यात्मिक स्तर अनुक्रमे ६१ आणि ६३ प्रतिशत) यांच्या त्या कन्या आहेत. पुण्यातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. सहजता आणि आपलेपणा
अ. कु. कल्याणीताईच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. ती अतिशय आपलेपणाने शारीरिक त्रासांवर उपाय सांगते, तसेच औषधोपचारही करते. त्या औषधांचा अल्पावधीत गुण येतो.
- सौ. राजश्री खोल्लम आणि सौ. मानसी राजंदेकर, पुणे (२२.७.२०१५)
आ. कु. कल्याणीताईकडे गेल्यावर किंवा तिच्याशी बोलतांना ती डॉक्टर आहे, असे वाटत नाही. तिच्यामध्ये पुष्कळ सहजता आहे. तिचा अहं अल्प आहे, असे जाणवते.
- सौ. अर्चना घनवट

चंद्रपूर येथील श्री. विनोद कोंगरे आणि सौ. सुषमा चंदनखेडे यांनी गाठला ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर

सौ. चंदनखेडे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)
     
श्री. विनोद कोंगरे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)
 चंद्रपूर - राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील श्री. विनोद कोंगरे (वय ५१ वर्षे) आणि चंद्रपूर येथील सौ. सुषमा चंदनखेडे (वय ४२ वर्षे) यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त केला. सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी येथील साधक श्री. गुणवंत चंदनखेडे यांच्या निवासस्थानी झालेल्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ही घोषणा केली. त्यानंतर पू. नंदकुमार जाधव यांनी या साधकांना श्रीकृष्णाच्या चित्राची चौकट भेट देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी चंद्रपूर जिल्ह्यातील साधक सत्संगाला उपस्थित होते. या सत्संगामुळे उपस्थित साधकांना पुष्कळ आनंद झाला.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पू. सिरियाक वाले
१. जय गुरुदेव । हा जप केल्यावर स्वतःच्या आत प.पू. डॉक्टर दिसून त्या जपातून निर्माण झालेली शक्ती सर्व दिशांतून आपल्या आत जात आहे, असे जाणवणे, कार्यशाळेच्या खोलीतील त्रासदायक स्पंदने दूर होऊन खोली चैतन्याने भरणे आणि तेव्हा केवळ प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व अन् हा जप यांमुळे तिन्ही लोकांची शुद्धी होते, असा विचार मनात येणे : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेतील सकाळच्या सत्रात नामजप करत असतांना मला सभोवताली त्रासदायक स्पंदने असल्याचे जाणवले. त्या वेळी माझ्या मनात जय गुरुदेव । असा जप करण्याचा विचार आला. त्यानुसार मी काही वेळा ते शब्द उच्चारल्यावर मला माझ्या आत प.पू. डॉक्टर दिसले. जय गुरुदेव । या जपातून निर्माण झालेली शक्ती सर्व दिशांतून माझ्या आत जात आहे, असे मला जाणवले. त्यानंतर काही वेळातच तेथील वातावरण पालटले आणि संपूर्ण खोली चैतन्याने भरली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, केवळ प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व आणि जय गुरुदेव । हा जप यांनी निर्माण होणार्‍या शक्तीने तिन्ही लोकांची शुद्धी होते. जय गुरुदेव । हा जप केल्याने तेथे प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व येते.

माझी गुरुमाऊली प.पू. डॉक्टर !

कु. ऐश्‍वर्या वांडरे
माझ्या गुरूंचे रूप पाहून तृप्त झाले जीवन ।
लवकर व्हावा दूर, दोष अन् अहंचा हा केर ॥ १ ॥
देवाजवळ जाण्या अन् गुणांची वाढ होण्या ।
करवून घ्या साधना, हे प.पू. गुरुदेवा ॥ २ ॥
-----------------------------------
गुरूंची महती वर्णाया शब्द अपुरे पडती ।
माझ्या गुरूंची महती ।
वर्णाया शब्द अपुरे पडती ।
विष्णूचा अवतार अवतरला भूवरी ।
रक्षण्या साधक अन् सज्जना ‘
सनातन संस्था स्थापन झाली ॥ १ ॥

त्रास भोगणार्‍या साधकांनो, खंत बाळगू नका; तुमचीही साधना होत आहे !

पू. संदीप आळशी
       सध्या काळ प्रतिकूल असल्याने अनेक साधकांना तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावे लागत आहेत. अशा साधकांची कार्यक्षमता पुष्कळ अल्प झाल्यामुळे आपल्याकडून म्हणावी तशी सेवा होत नाही, याची त्यांना खंत वाटत रहाते. आपली साधनाही नीट होत नाही, या विचाराने काहींना निराशाही येत रहाते. यासंदर्भात खंत बाळगणे अयोग्य आहे; कारण अशा साधकांचीही साधना होत आहे.
        स्वातंत्र्यपूर्वकाळात अनेक क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. काही क्रांतीकारक अनेक वर्षे झुंजू शकले, काही क्रांतीकारकांना काही वर्षे कारावासाची शिक्षा झाली, तर काहींना आजीवन कारावास भोगावा लागला, तर काहींना मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागली. आजीवन कारावास भोगावा लागणार्‍यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. त्यांच्या देशकार्याचेही मोल होते. त्यांनी कारावासात इंग्रजांकडून होणारे अमानुष अत्याचार निधड्या छातीने सोसले; म्हणून नवोदित क्रांतीकारकांना क्रांतीची स्फूर्ती मिळाली आणि देशभर क्रांतीकार्याची ज्वाला अधिकच भडकली.
         त्रास भोगणार्‍या साधकांचेही तसेच आहे. त्रास भोगणार्‍या साधकांनो, वाईट शक्तींना गर्जून सांगा, कितीही त्रास भोगावे लागले, तरी आम्ही ते भोगू; पण आमची देवावरील श्रद्धा अल्प होऊ देणार नाही. यामुळे उलटे तुमचेच मनोधैर्य खच्ची होत आहे. आम्ही देवाच्या पक्षातील असल्याने अंती विजय आमचाच आहे. गुरुमाउलीच्या ध्येयपूर्तीचा आनंद, हेच आमचे ध्येय आहे; मग त्यापुढे आमच्या त्रासांचे मोल ते काय ? आम्ही ते त्रास हसत हसत भोगू; कारण यातच आमची साधना आहे !
- (पू.) श्री. संदीप आळशी (९.५.२०१६)

समष्टी सेवेची तळमळ आणि प्रेमभाव असणार्‍या चंद्रपूर येथील साधिका सौ. सुषमा चंदनखेडे (वय ४३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

     चंद्रपूर येथील साधिका सौ. सुषमा चंदनखेडे यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधिका यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् जाणवलेले पालट पुढे देत आहोत.
१. सहसाधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. सेवेची तळमळ : त्यांच्यात सेवेची तळमळ पुष्कळ आहे, त्या सेवेसाठी सदैव सिद्ध असतात. स्वत:च्या घरी सत्संग घेण्यास त्या नेहमीच सिद्ध असतात. त्या कोणत्याही अडचणी सांगत नाहीत.
१ आ. प्रेमभाव : वहिनींमध्ये पुष्कळ प्रेमभाव असल्याने त्या सर्वांना लवकरच आपलेसे करतात. साधकांशी प्रेमाने बोलणे, त्यांची विचारपूस करून त्यांची सोय बघणे, त्यांना कितीही अडचण आली, तरी तिच्यावर त्या उपाय शोधून ती सोडवण्याचा प्रयत्न करणे, असे त्या करतात.
१ इ. स्वीकारण्याची वृत्ती : चूक झाल्यावर त्या लगेच स्वीकारतात आणि त्या सेवेतील किंवा इतर पालट लवकर स्वीकारतात. त्या प्रत्येक कृती विचारून करतात आणि परिस्थिती स्वीकारतात.
- सौ. भारती पवार आणि सौ. मंगला दर्वे

होशियारपूर, पंजाब येथील भृगुसंहितेचे वाचक आधुनिक वैद्य विशाल शर्मा यांनी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार केलेल्या रुद्र यागाच्या पूर्वी आलेल्या अनुभूती

वैद्य विशाल शर्मा
       होशियारपूर, पंजाब येथील आधुनिक वैद्य विशाल शर्मा हे भृगुसंहितेचे वाचक आहेत. ९.५.२०१६ या दिवशी दुपारी २.३० वाजता त्यांनी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार त्यांच्या आश्रमामध्ये रुद्र याग केला. त्या यागाला उपस्थित रहाण्याची आम्हा उभयतांना संधी मिळाली. त्या कालावधीत मला आलेल्या अनुभूती पुढीलप्रमाणे आहेत.
१. रुद्र यागाच्या पूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. स्वप्नात पुष्कळ मोठा फणा असलेला नाग दिसणे : रुद्र यागाच्या दोन दिवस आधी रात्री स्वप्नात मला पुष्कळ मोठा फणा असलेला एक नाग दिसला. मी आणि माझ्यासमवेत असलेले एक साधक आम्ही दोघांनी त्याला नमस्कार केला आणि पुढे गेलो.
१ आ. घराच्या आसपास पांढरे कबुतर नसतांनाही खिडकीत पांढरे शुभ्र कबुतर बसलेले दिसणे : त्याच दिवशी दुपारी जेवणानंतर मला पुष्कळ मोठा आवाज आल्याने मी बाहेर पाहिले, तेव्हा एक पांढरे शुभ्र कबुतर खिडकीत बसले होते. काही वेळानंतर ते उडून गेले. आमच्या घराच्या आसपास पांढरे कबुतर नसल्याने हे मला थोडे आश्‍चर्यकारक वाटले.

स्वीकारण्याची वृत्ती असणारे आणि भावपूर्ण सेवा करणारे राजुरा, चंद्रपूर येथील श्री. विनोद कोंगरे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

१. नम्रता
     कोंगरेकाका सर्वांशी नम्रतेने आणि आदराने बोलतात. काकांच्या बोलण्यात माधुर्य आहे.
२. हसतमुख
     काकांचा तोंडावळा हसरा असतो आणि ते सदैव आनंदी असतात. आजवर त्यांना कधीही रागावलेले किंवा तणावात असलेले पाहिलेले नाही.
३. अपेक्षा नसणे
     सेवेला जाण्यासाठी सहसाधक नसले, तरी स्वतःला जमेल तसे प्रयत्न करतात. इतरांनी माझ्यासमवेत सेवेला यावे, अशी त्यांची अपेक्षा नसते. काकांना त्यांच्या नोकरीमुळे सेवेसाठी वेळ देता येत नाही; पण सेवा आणि साधना यासंदर्भातील प्रत्येक गोष्ट जमेल तशी आज्ञापालन म्हणून करतात.
४. स्वीकारण्याची वृत्ती असणे
     ते मितभाषी आहेत. त्यांची चूक त्यांना सांगितल्यास ते ती लगेच स्वीकारतात. कोणताही पालट त्यांना सांगितल्यास त्यांची लगेच स्वीकारण्याची सिद्धता असते. कोणतीही सेवा दिल्यास ते अडचणी न सांगता ते स्वीकारतात.

कार्यकर्त्यांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची वस्तूनिष्ठ माहिती 
समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अद्ययावत माहितीचा आधार घ्या !
        समितीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक तिच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लग्नपत्रिका, स्वतःच्या उत्पादनाचे विज्ञापन करणार्‍या पिशव्या, आस्थापनाचे विज्ञापन करणारी दैनंदिनी (डायरी) आदींवर समितीची माहिती छापतात. समितीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कार्याच्या अनुषंगाने ही सर्व माहिती अद्ययावत होत असते. ही अद्ययावत माहिती सर्वांना कळावी आणि समितीचे कार्य वस्तूनिष्ठपणे समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी पुढील माहिती सनातन प्रभात नियतकालिकांत प्रसिद्ध करत आहोत. समितीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी प्रसार करतांना या माहितीतील आकडेवारीचा उपयोग करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. १.५.२०१६ पर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती !
१. ५०० हून अधिक विनामूल्य धर्मशिक्षणवर्गांद्वारे हिंदूंना धर्मशिक्षण !
२. ७ भाषांत, १३ राज्यांत १ सहस्र १३० हून अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन !

सर्वत्रच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना

अपघाताचा दिवसेंदिवस उंचावणारा आलेख लक्षात घेऊन 
वाहनांच्या संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा !
१. अनेकदा जाणीव करून देऊनही वाहनांच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणारे दायित्वशून्य कार्यकर्ते ! : आतापर्यंत अनेकदा हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय सत्संगात वाहनांच्या संदर्भातील नियम पाळण्याविषयी चुका घेण्यात आल्या आहेत. आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत असल्याने वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असतांनाही काही कार्यकर्त्यांकडून वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अन्य कागदपत्रे समवेत न बाळगणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणे, तर चारचाकी चालवतांना सीटबेल्ट न वापरणे, भ्रमणभाषवर बोलत, तसेच अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी गंभीर चुका वारंवार होत आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत काही जणांना दंडही भरावा लागला आहे.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी फ्लेक्स, 
प्लास्टिक, सिलपोलीन इत्यादींची तातडीने आवश्यकता !
        सनातनच्या आश्रमांत पावसाळ्यापूर्वीच्या सिद्धतेसाठी आगाशी, पायर्‍या, तात्पुरत्या निवारा शेड, तसेच अन्य साहित्य झाकून ठेवण्यासाठी नवीन किंवा वापरलेले फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन, मॅटिंग किंवा अन्य तत्सम साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. वापरलेले किंवा किरकोळ दुरुस्तीने वापरण्यायोग्य होणारेे साहित्यही चालेल. नवीन फ्लेक्स किंवा सिलपोलीन सवलतीच्या दराने उपलब्ध होत असल्यास साधकांनी तसे कळवावे.
       वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य अर्पण अथवा सवलतीच्या दराने देऊन धर्मकार्यास हातभार लावायचा असेल, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना ८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
       हिंदुस्थानात भाषा, प्रांत, जात, स्त्री, पुरुष, कामगार, शेतकरी, विशिष्ट पक्ष अथवा विचारसरणी म्हणून जगण्याची प्रवृत्ती वाढत असतांना आपण हिंदुस्थानी म्हणून जगायला विसरत आहोत, ही शोकांतिका आहे !
- श्री. भारतकुमार राऊत, खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

जाहीर कार्यक्रमात श्रोत्यांना टाळ्या न वाजवण्याची सूचना देऊ नका !

१. सनातन संस्थेच्या अंतर्गत असलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमात टाळ्या वाजवू नयेत, ही सूचना देणे योग्य आहे; कारण त्या वेळी साधकांनी अंतर्मुख होऊन अधिकाधिक आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेणे अपेक्षित असते. टाळ्या वाजवल्याने साधक बहिर्मुख होण्याची शक्यता असते.
२. असे असले, तरी जाहीर कार्यक्रमात (उदा. हिंदु धर्मजागृती सभा, हिंदू अधिवेशन, मेळावे इत्यादी) श्रोत्यांना टाळ्या न वाजवण्याची सूचना देऊ नये; कारण जाहीर कार्यक्रम हा राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीविषयी असतो. अशा कार्यक्रमांत टाळ्या वाजवल्याने श्रोत्यांना पुढील लाभ होतो.
अ. त्यांचा कार्यक्रमातील सहभाग वाढतो.
आ. त्यांना आनंद व्यक्त करण्याचे माध्यम मिळते.
इ. एखादा सत्कार चालू असतांना टाळ्या न वाजवल्याने एक प्रकारची शुष्कता येते.
        वरील नियम घोषणा देण्याविषयीही लागू होतो. संस्थेच्या अंतर्गत आध्यात्मिक कार्यक्रमात घोषणा देऊ नयेत; मात्र जाहीर कार्यक्रमांत राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या घोषणा आवर्जून द्याव्यात; पण त्या दोन वेळाच असाव्यात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

 
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला
 न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास
 तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात; मात्र स्वातंत्र्यापासूनची ६८ वर्षे भारतावर राज्य केलेल्या शासनकर्त्यांना न स्वतःला अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा झाली आणि ना जनतेलाही अध्यात्म शिकवण्याची इच्छा झाली! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
दैवी कृपेने प्राप्त झालेला आयुष्यातील काळ ऐषारामात न घालवता सतत साधनारत रहाणे, परमेश्‍वरी चिंतनात रहाणे आणि प्राप्त कर्तव्य करणे, हीच जिवंतपणाची लक्षणे होत. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सिंहस्थात विचारमंथन व्हावे !

संपादकीय
     उज्जैन येथे हिंदूंचा सर्वांत मोठा आध्यात्मिक उत्सव चालू आहे. सिंहस्थपर्वातील दुसरे अमृत स्नान अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडले. शंकराचार्य, साधू-संत, महंत, भाविक तेथे जमले आहेत. एकूणच भक्तीमय वातावरण झाले आहे. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या हिंदूंच्या प्रश्‍नांना उजाळा मिळाला आहे. विश्‍व हिंदु परिषदेने श्रीराममंदिर उभारणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. त्यानिमित्ताने हिंदु धर्म, राष्ट्र आणि हिंदु समाज यांच्या समोरील इतरही समस्यांविषयी ऊहापोह होणे आवश्यक आहे. लक्षावधी संख्येने जमणार्‍या भाविकांचा हा आवाज निश्‍चितच शासनापर्यंत पोहोचेल आणि शासनाला हिंदूंसाठी काहीतरी कृती करणे भाग पडेल, हाच त्यामागे उद्देश आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn