Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक बाळकृष्ण चापेकर बलीदानदिन

दिनविशेष

आज गंगोत्पती गंगापूजन

राममंदिर उभारणीचा प्रारंभ ३१ डिसेंबरच्या पूर्वी झाला पाहिजे !

विश्‍व हिंदु परिषदेकडून केंद्रशासनाला समयमर्यादा
     इंदूर (मध्यप्रदेश) - अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने केंद्रशासनाला ३१ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाणार नाही. ३१ डिसेंबरच्या आत राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ झाला पाहिजे. त्यानंतर आम्ही आमच्या संयमावर नियंत्रण ठेवू शकणार नाही, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेचे महासचिव चंपत राय यांनी उज्जैन येथील सिंहस्थपर्व क्षेत्रात झालेल्या मेळाव्यात दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या राममंदिर प्रकरणी सुनावणी चालू आहे. ती जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी आम्हाला आशा आहे, असेही राय म्हणाले.

भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व देण्यास पाकचा विरोध !

सातत्याने भारताला पाण्यात पहाणार्‍या पाकिस्तानचा भारतद्वेष !
     इस्लामाबाद - भारताच्या ४ मित्रराष्ट्रांसह भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व देण्यास पाकिस्तानने विरोध केला आहे. पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील दूत मलिहा लोधी यांनी आमसभेच्या अनौपचारिक बैठकीत हा विरोध केला आहे.
     लोधी यांनी पुढे म्हटले आहे की, भारत आणि त्याची ४ मित्रराष्ट्रे यांनी स्थायी सदस्यत्व देण्याची केलेली मागणी तर्कसंगत नाही. स्थायी समितीची सदस्य संख्या वाढवल्याने या देशांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. सुरक्षा मंडळाचा विस्तार हा केवळ काही देशांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नसावा. तसेच ही मागणी सदस्य देशांनी मान्य केलेल्या लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.
     निवडणुकीच्या आधारावर अतिरिक्त कालबद्ध पदे वाढवणे आणि फिरते सदस्यत्व ठेवणे यांमुळे सर्वांना समान संधी मिळेल, असा दावा भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी या वेळी केला.

उत्तराखंडमध्ये पुन्हा काँग्रेस !

लहान राज्यांतील सत्तेचे राजकारण दाखवणारे उत्तराखंडचे उदाहरण !
     डेहराडून - उत्तराखंडमधील राजकीय संघर्षाला अखेर विराम मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या निकालात काँग्रेसला ३३ आणि भाजपच्या बाजूने केवळ २८ आमदारांनी कौल दिल्यावर काँग्रेसने बहुमत जिंकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हरीश रावत यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्याचे आणि केंद्रशासनाला राष्ट्र्रपती राजवट हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तत्पूर्वी २८ मार्च या दिवशी केंद्रशासनाने हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शासन विसर्जित (बरखास्त) करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर उत्तराखंडच्या राजकारणात अनेक घडामोडी होऊन राजकीय संघर्ष शिगेला पोचला होता.

विजय मल्ल्या यांना भारतात पाठवू शकत नाही ! - ब्रिटन

एका भ्रष्टाचार्‍यापुढे हतबल झालेले केंद्रशासन अब्जावधी 
रुपये काळा पैसा लाटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना कशी शिक्षा करणार ?
     नवी देहली - भारत शासनाने कर्जबुडव्या विजय मल्ल्या यांचे पारपत्र रहित केले असले, तरी त्यांना भारतात परत पाठवू शकत नाही, असे म्हणत ब्रिटनने केंद्रशासनाची मागणी धुडकावून लावली आहे. मल्ल्या यांचे हस्तांतरणही शक्य नसल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. असे असले, तरी मल्ल्या यांच्यावरील गंभीर आरोपांची ब्रिटनच्या शासनाला कल्पना असून या संदर्भात भारत शासनाला साहाय्य करण्याची सिद्धताही ब्रिटनने दाखवली आहे.
     बँकांचे सहस्रो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या तीनदा समन्स पाठवूनही उपस्थित न झाल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या सूचनेनुसार देहली प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयाने मल्ल्या यांचे पारपत्र रहित केले आहे. पारपत्र रहित झाल्यामुळे मल्ल्या यांचे विदेशातील वास्तव्य अवैध ठरून त्यांना भारतात परतावे लागेल, असे अधिकार्‍यांना वाटत होते.

फ्रान्समध्ये लांब स्कर्ट परिधान करणे, हे धर्माचे प्रतीक असल्याच्या कारणावरून एका मुसलमान विद्यार्थिनीला शाळेत येण्यापासून रोखले !

भारतात असे कुठल्या शाळेत झाले असते, तर धर्माधांनी
 आणि ढोंगी निधर्मीवाद्यांनी देश डोक्यावर घेतला असता !
     पॅरिस - लांब स्कर्ट परिधान करणे, हे धर्माचे प्रतीक असल्याच्या कारणावरून १६ वर्षांच्या एका मुसलमान विद्यार्थिनीला पॅरिस येथील शाळेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. मूळ ख्रिस्ती असलेल्या या युवतीने नुकताच इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
१. फ्रान्समध्ये वर्ष २००४ पासून शाळांमध्ये अशा धार्मिक प्रकारच्या पोशाखांवर बंदी घालणारा कायदा करण्यात आला होता.
२. फॅशन म्हणून मुली लांब स्कर्ट घालू शकतात; मात्र धार्मिक उद्देशाने जर मुलींनी लांब स्कर्ट परिधान केला, तर शाळेचे मुख्याध्यापक त्यावर आक्षेप घेऊ शकतात, अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली होती.
३. परिस्थिती आटोक्यात रहावी, यासाठी मुलीच्या पालकांना बोलवण्यात आले होते.

ऑगस्टा प्रकरणात लाच दिली गेली ! - मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेल यांची स्वीकृती

काँग्रेस आणि भाजप यांनी यात हस्तक्षेप केलेला नाही !
स्वतः केलेल्या गुन्ह्यात वाचण्यासाठी आजी-माजी राज्यकर्त्यांना निर्दोष ठरवण्याचाच हा प्रयत्न आहे !
     दुबई - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीत लाच देण्यात आली होती, अशी स्वीकृती या प्रकरणात मध्यस्थ असणार्‍या ख्रिश्‍चियन मिशेल यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिली आहे. त्याने हेही स्पष्ट केले की, या प्रकरणात त्यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. तसेच काँग्रेस आणि भाजप यांनी यात हस्तक्षेप केलेला नाही.
     मिशेल म्हणाले की, मी कधीही सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांची भेट घेतली नाही. मात्र तत्कालीन वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांची भेट घेतली.

बगदादमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, १७ ठार आणि ४० घायाळ

मृतांमध्ये शिया पंथीय नागरिकांचा समावेश
     बगदाद (इराक) - येथील बाजारपेठेत ११ मेच्या सकाळी आतंकवाद्यांनी एका मोटारीतून घडवून आणलेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात १७ जण ठार झाले असून ४० जण घायाळ झाले आहेत. उपचारासाठी त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घायाळांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
     मृतांमध्ये शिया पंथीय नागरिकांचा समावेश आहे. कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही; परंतु इसिस या आतंकवादी संघटनेवर संशय व्यक्त केला जात आहे. आतंकवाद्यांनी १० मे या दिवशीही शिया मशिदीजवळ घडवलेल्या बॉम्बस्फोटात १० नागरिक ठार झाले होते.

दुसर्‍या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !

यात्रा सुनियोजन करतांना सनातनचे साधक 
अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांचे आणि साधू-संतांचे स्वागत करणारा सनातनचा फलक

चिंचवड (जिल्हा पुणे) येथे श्री परशुराम सेवा समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

भगवान श्री परशुराम जयंती सोहळा
     चिंचवड - भगवान श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ८ मे या दिवशी श्री परशुराम सेवा समितीच्या वतीने सर्व भाविक-भक्त यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने चापेकर चौकापासून ते संपूर्ण चिंचवडगाव परिसरात भव्य दुचाकी फेरीचे आयोजन केले होते. त्यात २०० तरुणांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी चिंचवडगावातील चापेकर वाड्यात सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी (आळंदी) यांचा भक्तीसंगीत कार्यक्रम पार पडला.
     या वेळी श्री परशुराम सेवा समितीच्या वतीने अधिवक्ता मोरेश्‍वर शेडगे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रकाशराव मीठभाकरे यांच्या हस्ते चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव महाराज आणि वेदमूर्ती शेखर रबडे गुरुजी यांचा शाल, श्रीफळ, भगवान श्री परशुराम यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

उज्जैन येथील श्री महाकाल भक्ती साधना आश्रमाचा मोठा मांडव कोसळला : गवतापासून बांधलेल्या यज्ञशाळेची कोणतीही हानी नाही !

वादळातही यज्ञशाळा सुरक्षित रहाते, याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ?
छायाचित्रात १. लोखंडी खांबाद्वारे उभारलेला मांडव पडला आहे.
 २. बाजूलाच असलेली यज्ञशाळा स्थिर उभी आहे.
     उज्जैन - येथील सिंहस्थपर्वातील बडनगर मार्ग, रामघाटाजवळ श्री महाकाल भक्त साधना आश्रमाचा लोखंडी खांबांद्वारे उभारलेला मोठा मांडव ९ मे या दिवशी आलेल्या वादळी पावसात कोसळला; मात्र त्याला लागून असलेल्या आणि गवत अन् बांबू यांपासून बांधलेल्या यज्ञशाळेची कोणतीही हानी झाली नाही, अशी अनुभूती आल्याचे आश्रमाच्या दीदी श्री शिरेश्‍वरादेवी आणि पंडित राहुल शुक्ला यांनी दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराला सांगितले.

धर्मांध शक्तींच्या शिरकाव्यामुळे शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण होण्याच्या मार्गावर ! - शरद पवार

शिक्षणक्षेत्राच्या भगवेकरणाविषयी एवढी भीती बाळगण्याचे कारण काय ?
 बहुसंख्य हिंदूंच्या देशात शिक्षणाचे हिरवेकरण पवार यांना अपेक्षित आहे का ?
     सातारा - शासकीय नीती पालटत चालली आहे. शिक्षणाला अर्थसाहाय्य करण्यासाठी शासनाचा हात आखडता व्हायला लागला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या घटकांवर याचा परिणाम दिसू लागला आहे. शासनाच्या पालटत्या धोरणांमुळे शिक्षणाचे भगवेकरण होते कि काय अशी, भीती शिक्षणतज्ञांना वाटू लागली आहे. धर्मांध शक्तींच्या शिरकाव्यामुळे सद्यस्थितीतील शिक्षणक्षेत्रापुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, असे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. (राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मोठमोठे घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे राष्ट्रवादीची सत्ता असतांना त्यांनी नेमके काय काम केले, हाच प्रश्‍न आहे. त्यामुळे आताच्या शासनापुढे या घोटाळ्यांचेच मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राजकारणाचे भ्रष्टाचारीकरण करणार्‍या अशा नेत्यांना जनतेनेच खडसवावे. - संपादक)      रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित होते.

सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरूला पहाण्यावरून कवठेमहांकाळ येथे युवकांची हुल्लडबाजी, तर मिरजेत चित्रपटगृहात हाणामारी !

समाजाची खालावत चाललेली नैतिकता !
     सांगली - कवठेमहांकाळ येथे सैराट चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु एका खाजगी कार्यक्रमासाठी आली असता तिला पहाण्यासाठी आलेल्या तरुणांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी लाठीमार करावा लागला, तर दुसर्‍या प्रकरणात मिरज शहरात सैराट पहाण्यासाठी आलेल्या दोन गटांत हाणामारी झाली. चित्रपटहागृहाच्या मालकांना पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या १२ लोकांना कह्यात घेतले. (राज्यासमोरील अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांना बगल देऊन एका अभिनेत्रीसाठी थिल्लरपणा करणार्‍या युवकांवरून आज समाज किती रसातळाला गेला आहे, हेच कळते ! - संपादक)      कवठेमहांकाळ शहरात एका दुकानाच्या उद्घाटनासाठी रिंकू येणार होती. याचे वृत्त जिल्हाभर पसरले होते. तिला पहाण्यासाठी युवकांनी प्रचंड गर्दी केली, तर अनेक जण तिचे छायाचित्र भ्रमणभाषमध्ये टिपून घेण्यासाठी आतूर होते. या वेळी युवकांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरॅकेट्सही तोडले. यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. (राजा कालस्य कारणम् ! याप्रमाणे आज राजाच धर्मपालन करत नसल्याने प्रजाही धर्मपालन करत नाही. त्यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. अशा समाजाकडून बलशाही राष्ट्राची काय अपेक्षा करणार ? - संपादक)

राज्यातील जलाशयांमध्ये केवळ १५ प्रतिशत साठा शेष

दुष्काळाची भीषणता !
     मुंबई - राज्यातील जलाशयांमध्ये केवळ १५ प्रतिशत साठा शेष राहिला आहे. एका आठवडाभरात १ प्रतिशत साठा न्यून झाल्याने शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखी पाणीकपात करायची कि अन्य काही तोडगा काढायचा, यावर शासकीय पातळीवर विचार करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मराठवाड्यातील जलाशयांमध्ये केवळ २ प्रतिशत साठा शिल्लक असून येत्या १५ दिवसांत मराठवाडा कोरडाठाक होईल, अशी चिन्हे आहेत.

हिंदु राष्ट्र आणि हिंदु धर्म यांसाठी 'मी काय करू' हाच विचार सतत ठेवा ! - प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन करतांना श्री. प्रमोद मुतालिक (वर्तुळात) आणि उपस्थित हिंदुत्ववादी
     मिरज, ११ मे (वार्ता.) - काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले, कर्नाटकात हिंदूंवर संकट आले, तर हिंदूंना दु:ख होत नाही कि त्यांच्यासाठी कोणती कृती करण्याची इच्छा होत नाही. याउलट डेन्मार्कमध्ये मुसलमानांना काही झाल्यास भारतातील मुसलमानांमध्ये प्रतिक्रिया उमटतात. भाषा, प्रांत यांत हिंदूंनी न अडकता केवळ एक हिंदू म्हणून एक होणे ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र आणि हिंदु धर्मासाठीच मी काय करू शकतो, हाच विचार प्राधान्याने असायला हवा, असे मार्गदर्शन कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. मिरज येथे हिंदु धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. 

रणरागिणी शाखेच्या कार्यक्रमास महिलांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे ! - सौ. सुनीता दीक्षित

सोलापूर येथे रणरागिणी शाखेकडून 'धर्मपरंपरा रक्षण चळवळी'ला प्रारंभ होणार
छायाओळीत डावीकडून सौ. राजश्री तिवारी, सौ. सुनीता दीक्षित आणि कु. दीपाली मतकर
     सोलापूर, ११ मे (वार्ता.) हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून सोलापुरातील 'धर्मपरंपरा रक्षण चळवळी'चा प्रारंभ करण्यासाठी श्री सिद्धरामेश्‍वराच्या नगरीत श्री भवानीदेवीच्या आशीर्वादाने १५ मे २०१६ ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, तसेच रणरागिणीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. सुनीता दीक्षित यांनी केले. ११ मे या दिवशी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी पत्रकार परिषदेस सोलापूर जिल्हा समन्वयक सौ. राजश्री तिवारी, सनातन संस्थेच्या कु. दीपाली मतकर उपस्थित होत्या. 

वैद्यकीय तपासण्या आणि शस्त्रक्रियांसाठी जनतेचे पैसे उकळणार्‍या चिकित्सालयांचा व्यावसायिक चेहरा चव्हाट्यावर !

जनतेला अनाठायी व्यय करायला लावून तिचे कंबरडे मोडणार्‍या 
वैद्यकीय व्यवस्थेवर २ डॉक्टरांनीच ताशेरे ओढले !
वैद्यकीय क्षेत्रातील अमानवीय दुर्जनता ! 
     पुणे - येथील साथी नावाच्या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) अरुण गद्रे आणि आधुनिक वैद्य अभय शुक्ला यांनी डिसेन्टिंग डायग्नॉसिस (विरोधाभास निर्माण करणारे निदान) या पुस्तकाद्वारे वैद्यकीय व्यवस्थेवर ताशेरे ओढत वैद्यकीय चाचण्या आणि शस्त्रक्रिया यांमध्ये होणार्‍या भयंकर गैरप्रकारांवर प्रकाश टाकला आहे. 
     कॉर्पोरेट चिकित्सालये, औषधे बनवणारी आस्थापने (फार्मा कंपनीज) आणि आधुनिक वैद्य हातात हात घालून टार्गेट सिस्टम (अधिकाधिक पैसा कमावण्याचे ध्येय ठेवणे) आणि कट्स (कमीत कमी खर्च करून वैद्यकीय सुविधा पुरवणे) ही रुग्णविरोधी धोरणे राबवून त्यांना फसवत आहेत. (असाहाय्य आणि दुर्बल रुग्णांना फसवणार्‍या अशा आधुनिक वैद्यांना हिंदु राष्ट्रात कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल ! - संपादक) हे षड्यंत्र खूप खोलवर रुजलेले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे ध्येय ठेवले जाते, असे उदाहरणांसहित या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे.

गोव्यातील सनदी अधिकार्‍यांना कोकणी-मराठीचा गंध नसल्याने इंग्रजीचे स्तोम माजले आहे ! - शिवसेनेचे खासदार संजय राऊत

खासदार संजय राऊत 
     पणजी - गोव्याच्या मंत्रालयात आणि शासकीय कामांत इंग्रजीचे स्तोम माजले आहे. गोव्यात सध्या भाषावाद उफाळला आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, असे हे सूत्र आहे; मात्र शासनामधील बहुसंख्य अधिकार्‍यांना स्थानिक मराठी-कोकणी भाषेचा गंध नाही, असे स्पष्ट मत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या ५ मेच्या अंकात व्यक्त केले आहे. 
सच्चाई या सदरातील या लेखात श्री. राऊत यांनी म्हटले आहे की, 
१. देशातील नागरी सेवेचे म्हणजे सनदी अधिकारी ज्या राज्यात नियुक्त होतात, त्यांनी तेथील स्थानिक भाषा आत्मसात करावी, असे नियम आहेत. सर्वच राज्यांत या नियमांचे पालन होत असते; मात्र गोव्यासारख्या छोट्या राज्यात हे घडत नाही.

लोहगाव विमानतळ परिसरातील १५० अवैध बांधकामे पुढील १५ दिवसांत पाडणार

हवाईदलाच्या लोहगाव (पुणे) विमानतळाजवळ अवैध बांधकामे केल्याचे प्रकरण
     पुणे - येथील लोहगाव विमानतळ परिसरातील अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुढील १५ दिवसांत करण्यात येणार आहे. या संदर्भातील कार्यवाहीची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाने चालू केली असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. (नुसती अवैध बांधकामे पडून उपयोगी नाही, तर देशाच्या सुरक्षेविषयी हलगर्जीपणा करणारे संबंधित सर्व विभाग आणि त्यांतील उत्तरदायी यांच्यावर शासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)
     लोहगाव विमानतळाजवळ बांधकाम करण्याच्या संदर्भात निर्बंध आहेत. यासंबंधी केंद्रशासनाने वेळोवेळी अधिसूचना काढल्या आहेत, तसेच अवैध बांधकामांमुळे विमानतळाची सुरक्षितता धोक्यात आहे. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. त्याची नोंद घेत अवैध बांधकामांवर तातडीने कारवाईचा आदेश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिला होता.

लाचखोर पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई ?

      सातारा - पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे आणि त्यांचा साथीदार युवराज ढमाळ या दोघांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. हुंबरे यांच्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आला आहे. या अहवालावरून दीपक हुंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मनसेचे पदाधिकारी युवराज ढमाळ आणि उपअधीक्षक दीपक हुंबरे या दोघांनाही आठवडयातून एकदा उपस्थिती लावण्याचे आदेश न्यायालयाने देऊन जामीन संमत केला आहे.

लाचखोर पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई ?

      सातारा - पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे आणि त्यांचा साथीदार युवराज ढमाळ या दोघांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. हुंबरे यांच्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आला आहे. या अहवालावरून दीपक हुंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मनसेचे पदाधिकारी युवराज ढमाळ आणि उपअधीक्षक दीपक हुंबरे या दोघांनाही आठवडयातून एकदा उपस्थिती लावण्याचे आदेश न्यायालयाने देऊन जामीन संमत केला आहे.

राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्यावर आक्रमण केल्याप्रकरणी ५ जणांना अटक

     पुणे, ११ मे - राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी शिरूर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. प.पू. भय्यूजी महाराज हे ८ मे या दिवशी पुण्याहून इंदूरला जात असतांना त्यांच्या चारचाकी गाडीला येथील रांजणगावाजवळ एका ट्रकने रात्री पाठीमागून धडक दिली. त्यानंतर झालेल्या वादावादीतून काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले.

धमकी पत्रासमवेत भुकटी (पावडर) ही अमोनियम नायट्रेट

'एफटीआयआय' आणि रानडे इन्स्टिट्यूट यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण 
     पुणे - भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफ्टीआयआय) आणि रानडे इन्स्टिट्यूट यांना धमकीचे पत्र, डिटोनेटर आणि स्फोटक भुकटी (पावडर) पाठवण्यात आली होती. ती भुकटी ही 'अमोनियम नायट्रेट' असल्याचे समोर आले आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या पडताळणीमधून ही गोष्ट उघडकीस आली आहे, तसेच हे 'पार्सल' दोन्ही संस्थांना पोहोचवणार्‍या टपाल कर्मचार्‍यांचे जबाबही नोंदवण्यात आल्याची माहिती परिमंडल-१ चे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. 

चिंचवड (पुणे) येथे आगीमध्ये जळणार्‍या अपंगाला वाचवण्याऐवजी जमाव चित्रीकरण करण्यातच मग्न

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ! 
अशी घटना 'सुसंस्कृत' म्हणवणार्‍या पुण्यासारख्या ठिकाणी होणे, हे लज्जास्पद आहे ! 
     चिंचवड, ११ मे - येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील महावितरणच्या रोहित्राचा स्फोट ७ मे या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता झाला होता. त्यामध्ये पोपट निवृत्ती बनसोडे या अपंग चर्मकाराचा होरपळून मृत्यू झाला. तो जळत असतांना साहाय्य मिळण्यासाठी जीवाच्या आकांताने आरडाओरड करत होता; परंतु जमाव हा या घटनेचे भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण करण्यातच मग्न होता. त्या व्यक्तीला साहाय्य करण्यास पुढे मात्र कोणी आले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या वेळी कोणी पुढे आले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, अशी खंत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. या वेळी मृत्यू झालेल्या बनसोडे यांची पत्नी निर्मला यांनी सांगितले की, त्यांच्या निधनानंतर 'महावितरण'चे कर्मचारी २० सहस्र रुपये घेऊन साहाय्य करण्यासाठी आले होते. हे तुटपुंजे साहाय्य आम्ही नाकारले. त्यांनी आमच्या मुलाला कामावर घ्यावे, अशी आमची मागणी आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा ! - राधाकृष्ण विखे-पाटील

     पुणे, ११ मे - 'नीट' परीक्षेविषयी केंद्र आणि राज्य शासन यांची भूमिका संदिग्ध असल्याचे दिसून येत आहे. सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) रहित झाल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची हानी झाली आहे. त्याचे दायित्व घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा. 'नीट' प्रकरणी प्रथमत: संस्थाचालक आणि पालकच न्यायालयात गेले होते, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे वर्ष चांगले नाही !

अक्षय्य तृतीयेला जळगाव येथे शेती आणि राजकीय वातावरण यांविषयीची भाकणूक !
     बुलढाणा - जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यात असलेल्या भेंडवळ या छोट्या गावात प्रतिवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भविष्य वर्तवले जाते. सूर्यास्ताच्या वेळी एखाद्या शेतकर्‍याच्या शेतात घटमांडणी (१८ प्रकारची धान्ये आणि पुरी, विड्याची पाने, सुपारी, इत्यादींची परंपरेनुसार केलेली मांडणी) करून शेती आणि राज्यकारभार यांविषयी भाकीत केले जाते. यावर्षी देशात आर्थिक तणाव राहील, तसेच पंतप्रधानांसाठीही हे वर्ष चांगले नाही. त्यांना विविध राजकीय आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे, असे भाकीत यावर्षीच्या भाकणुकीत करण्यात आले आहे.

आंदोलनात वेळ घालवण्याऐवजी शाळांचा दर्जा वाढवा ! - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न 
     पणजी - मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण ही माझी व्यक्तीगत आणि मुख्यमंत्री या नात्यानेसुद्धा भूमिका आहे. आंदोलन करून शक्ती वाया घालवण्याऐवजी मराठी आणि कोकणी शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करा, प्रत्येक शाळेला मार्गदर्शक असे नेतृत्व सिद्ध करा, असे आवाहन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमंच्या) नेत्यांना केले आहे. (गेल्या ४ वर्षांत शासनाने मराठी आणि कोकणी शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले ?, ते जनतेला सांगावे ! - संपादक) निवडक संपादकांसाठी आयोजित एका बैठकीत मुख्यमंत्री पार्सेकर यांनी त्यांची ही भूमिका स्पष्ट केली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी !

     सांगली - ८ मे या दिवशी पशुपतीनाथ मंदिर येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी ह.भ.प. मधुबुवा वझे यांनी सुश्राव्य कीर्तन सादर केले. भगवान परशुराम यांचा पाळणा म्हणून जन्मकाळ साजरा करण्यात आला. भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शहराध्यक्ष श्री. महेश ठाणेदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन सर्वश्री आशुतोष कुलकर्णी, योगेश जोग, मंदार मेहंदळे, अमोल कुलकर्णी, सौरभ गोखले, तसेच पुरोहित आघाडी यांनी केले.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने शिवाजी चौकाचे शिवतीर्थ असे नामकरण !
     मिरज - शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असलेले शिवाजी चौक, असे नामकरण पालटून शिवतीर्थ असे करण्यात आले. ही मागणी रितसर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांनाही भेटून करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्राहक संरक्षण कक्षाचे महापालिका क्षेत्रप्रमुख श्री. आनंद राजपूत यांनी दिली. या वेळी शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख श्री. सुरेश लांडगे, मिरज विधानसभेचे श्री. तानाजी सातपुते, सर्वश्री प्रशांत मोतुगडे, गजानन मोरे, प्रतिक सातवेकर, गिरीश जाधव, अजित अवसरे, दिलीप नाईक यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

रत्नपूर (जिल्हा संभाजीनगर) येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 'धर्मयोद्धा' संघटनेची स्थापना

     संभाजीनगर, ११ मे (वार्ता.) - येथील रत्नपूर (खुलताबाद) तालुक्यातील वेरूळ गावातील जगद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम येथे अक्षय्य तृतीया, म्हणजेच ९ मे या दिवशी युवा प्रतिष्ठान संचलित 'धर्मयोद्धा' या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेची स्थापना प.पू. महामंडलेश्‍वर १०८ शांतीगिरी महाराज, भारतमाता आश्रमाचे पू. जनैश्‍वरानंद महाराज, 'सुदर्शन' वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, शिवसेनेचे संभाजीनगर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब आणि अनेक संत, महंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला ३० सहस्रांहून अधिक तरुणांची उपस्थिती होती. 

भिवंडीत (जिल्हा ठाणे) निवडणुकीच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण

साम्यवाद्यांच्या हिंसाचाराचा पुरावा ! 
तृप्ती देसाई महिलांवरील या अत्याचारांविरोधात काही करणार का ? 
     ठाणे - ग्रामपंचायतीच्या निवडणूक वादातून 'लालबावटा' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला विवस्त्र करून पुष्कळ मारहाण केल्याची घटना घडली आहे. तिला वाचवण्यासाठी गेलेला पती आणि इतर कार्यकर्ते यांनाही मारहाण केली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राजस्थानमध्ये गायीने लिहिलेले पत्र शिकवण्यात येणार !

लहान मुलांना गायीविषयी माहिती करून देणारे धडे देशातील 
इतरही राज्यांतील शाळांमधून शिकवले जाणे आवश्यक !
     जयपूर - राजस्थानच्या वसुंधरा राजे शासनाने त्यांच्या शासकीय शाळांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये गायीने आई म्हणून मुलांना लिहिलेले पत्र मुलांना शिकवण्यात येणार आहे. राज्यशासनाने यापूर्वीच त्यांच्या मंत्रालयात गायीसाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले आहे. त्यामुळे शासन हिंदुत्वाचा कार्यक्रम राबवत आहे, अशी टीका करण्यात येत आहे. (गायीचा विषय म्हणजे हिंदुत्वाचे राजकारण, असे म्हणणार्‍यांच्या लेखी बहुसंख्यांक हिंदूंच्या भाव-भावना कवडीमोल असल्याचेच लक्षात येते. अशांना हिंदू निवडणुकीच्या वेळी त्यांचे स्थान दाखवून देतील ! - संपादक)
    हा धडा हिंदीच्या पुस्तकातून ५वीच्या मुलांना शिकवण्यात येणार आहे. या धड्यात गायीला आई समजल्यास होणारे लाभही सांगण्यात आले आहेत. या धड्यातील पत्रात गाय मुलांना सांगते, मी प्रत्येकाला सामर्थ्य, बुद्धीमत्ता, दिर्घायुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी देते. जे मला आई मानतात, त्यांच्यावर मी मुलांप्रमाणे प्रेम करते. हा धडा केवळ वाचण्यासाठी असून याविषयी परीक्षेत कोणतेही प्रश्‍न विचारण्यात येणार नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे.गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांनी राज्यसभेचा प्रस्ताव नाकारला !

     हरिद्वार - गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांनी राष्ट्राची सेवा राजकारणाच्या बाहेर राहूनही करता येऊ शकते, असे म्हणत राज्यसभेसाठी केलेला नियुक्तीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला. (आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती खासदारपदाचा प्रस्ताव सहजपणे नाकारतात, तर राजकारणी अशी पदे मिळवण्यासाठी नानाविध तडजोडी करतात ! - संपादक) 
   काही दिवसांपूर्वी डॉ. पंड्या यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राज्यसभेसाठी नियुक्त करण्यासंर्भातील प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव नाकारतांना राष्ट्रपती मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हितचिंतक यांच्यांप्रती आभार व्यक्त करत डॉ. पंड्या म्हणाले, मला अतिशय नम्रतेने सांगायचे आहे की, मला राज्यसभेत जायला आवडणार नाही; कारण देशविदेशात १२ कोटी सदस्य असलेला गायत्री परिवार माझ्याशी भावनिक धाग्याने जोडलेला आहे, तसेच राजकारणात गेल्यामुळे गायत्री परिवाराच्या वातावरणामध्येही अडचणी निर्माण होऊ शकतात. राष्ट्राची सेवा राज्यसभेच्या बाहेर बसूनही होऊ शकते. निर्मल गंगा अभियान, विचार क्रांती अभियान आदी आमची कामे चालूच रहातील.लाच घेतांना तलाठ्यास अटक

भ्रष्टाचारग्रस्त भारत !
     आटपाडी (जिल्हा सांगली) - शेतजमीन खरेदी दस्ताची नोंद करून उतारा देण्यासाठी १४ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी करगणीचे तलाठी शिवाजी माने आणि दलाल दगडू सरगर यांना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

समान नागरी कायदा लागू करा ! - अधिवक्ता आर्.के. पाटील

     पनवेल - देशात पुष्कळ विषमता निर्माण झाली आहे. हिंदूंची पिळवणूक करण्यासाठी हिंदु मॅरेज अ‍ॅक्ट, फॅमिली अ‍ॅक्ट निर्माण केले असून हिंदूंना न्यायालयातून ३-४ वर्षांत घटस्फोट आणि मुसलमानांना २ मिनिटांत धर्मानुसार तलाक, तसेच हिंदूंना एकपत्नी आणि मुसलमानांना ४ पत्नी परण्याची मुभा दिल्याने मुसलमानांची जनसंख्या पुष्कळ वाढली आहे. हिंदु आणि मुसलमान या सर्वांसाठीच समान नागरी कायदा लागू करण्यात यावा, तसेच हिंदु फॅमिली अ‍ॅक्टसारखे जुलमी कायदे रहित करावेत, अशी मागणी अधिवक्ता आर्.के. पाटील यांनी केली. या वेळी महाराणा प्रताप बटालियनचे ठाकूर अजयसिंह सेंगर हेही उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

दिवाळखोरीत गेलेल्या उद्योगपतीला देश सोडण्याची संधी दिल्याचे फलीत !
     भारत शासनाने कर्जबुडव्या विजय मल्ल्या यांचे पारपत्र रहित केले असले, तरी त्यांना भारतात परत पाठवू शकत नाही, असे म्हणत ब्रिटनने मल्ल्या यांचे हस्तांतरण करण्याची केंद्रशासनाची मागणी धुडकावून लावली आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharatne Vijay Mallya ka passport radda karne ke uprant bhi ham unko Bharat ko nahi sopenge. - Britain
     Videsh me Bharat ka koi mulya nahi !
जागो !
: भारत ने विजय मल्ल्या का पासपोर्ट रद्द करने के उपरांत भी हम उनको भारत को नही सोपेंगे. - ब्रिटन
     विदेश में भारत का कोई मूल्य नही !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या साधिका सौ. मुक्ता वेगाड यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी


सौ. मुक्ता वेगाड (वय ६८ वर्षे) यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन
सत्कार करतांना सनातनचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. रामानंद गौडा


देशात केवळ हिंदु धर्मालाच लक्ष्य का केले जात आहे ? - विवेक अग्निहोत्री

साम्यवादाची भयावहता स्पष्ट करणार्‍या 
'बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम' या चित्रपटाचा मुंबई विद्यापिठात प्रक्षेपणाचा कार्यक्रम 
     मुंबई - या देशात होळी साजरी करू नका, दिवाळी साजरी करू नका, टिळा लावू नका अशा प्रकारे प्रत्येक सण-उत्सवाविषयी आक्षेप घेतला जातो; मात्र 'कुणी बकरा कापू नका', असे सांगत नाही. केक कापण्यावर आक्षेप घेतला जात नाही. या देशात चारही बाजूंनी एकाच धर्मावर प्रश्‍न का उठवले जात आहेत. या देशात केवळ हिंदु धर्मालाच लक्ष्य का केले जात आहे, असा प्रश्‍न साम्यवादाची भयावहता स्पष्ट करणार्‍या 'बुद्धा इन अ टॅ्रफिक जॅम' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. विवेक अग्निहोत्री यांनी उपस्थित केला. १३ मे या दिवशी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची वास्तवता युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मागील काही दिवसांपासून देशातील विविध विद्यापिठांमध्ये या चित्रपटाचे प्रक्षेपण करण्यात येत आहे. ८ मे या दिवशी मुंबई विद्यापिठात जागर संस्थेच्या वतीने या चित्रपटाचे प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी देहली येथील अकबर रोडचे नामांतर महाराणा प्रताप करा !

देहलीच्या केवळ एका मार्गाचे नाही, तर दास्यत्वाचे प्रतीक असणार्‍या 
सर्वच मार्गांचे नामांतर केल्यास देशात राष्ट्राभिमान वाढेल ! 
भाजपचे नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी
     नवी देहली - येथील प्रसिद्ध अकबर रोडचे नाव पालटून महाराणा प्रताप करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. (अशी मागणी करावी लागते, हेच देशासाठी लज्जास्पद आहे. शेकडो वर्षांपूर्वी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍यांची आठवण ठेवणे, हा केवळ धर्मद्रोहच नाही, तर राष्ट्रद्रोहही आहे. त्यामुळे अशा रस्त्यांची नावे ठेवणार्‍यांना आणि अशी नावे चालू देणार्‍या आजपर्यंतच्या सर्वच सत्ताधार्‍यांना याविषयी देशाची क्षमा मागायला हवी ! - संपादक) महाराणा प्रताप एक वीर योद्धा होते, त्यांनी कधीही शत्रूपुढे शरणागती पत्करली नव्हती. त्यांनी केलेला त्याग आणि बलीदान लक्षात घेऊन या मार्गाचे नामांतर करण्यात यावे, असे स्वामी म्हणाले. त्याचबरोबर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांना भेटून अकबर मार्गाचे नामांतर करण्याची मागणी केली आहे. (जे काही हिंदु नेत्यांना वाटते, ते अन्य हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना का वाटत नाही ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन अभ्यास करावा ! - संपादक)बांगलादेशमध्ये जमाते-इस्लामीचा नेता मोतीउर रहमान निझामीला फाशी !

युद्धाच्या काळात ४५० हून अधिक नागरिकांची हत्या केल्याचा आरोप
     ढाका - बांगलादेशच्या वर्ष १९७१ मधील मुक्तिसंग्रामाच्या वेळी केलेल्या युद्ध गुन्ह्यांच्या प्रकरणी जमाते-इस्लामी या बांगलादेशातील कट्टरतावादी पक्षाचा प्रमुख मोतीउर रहमान निझामी याला १० मेच्या मध्यरात्री फाशी देण्यात आली. युद्धाच्या काळात अनुमाने ४५० हून अधिक नागरिकांची हत्या केल्याचा आरोप निझामी याच्यावर ठेवण्यात आला होता. ७३ वर्षीय निझामी हा वर्ष २०१० पासून कारागृहात होता. त्याला २९ ऑक्टोबर २०१४ या दिवशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.केरळमधील गांजा मेरी या गांज्याचा व्यापार करणार्‍या महिलेस अटक !

   तिरुवनंथापुरम् - येथील अबकारी विभागाच्या अधिकार्‍यांनी ७ मे या दिवशी पारास्सला रेल्वे स्थानकाजवळ मेरी उर्फ गांजा मेरी या गांज्याचा व्यवसाय करणार्‍या महिलेस अटक केली. त्यावेळी तिच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला.
    ४७ वर्षीय मेरी मूळची कन्याकुमारी जिल्ह्यातील असून ती आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् येथून ५ सहस्र रुपये प्रति किलो दराने गांजा घेऊन तो २५ सहस्र रुपये प्रति किलोने कन्याकुमारी जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना विकत असे. तसेच ती तमिळनाडूच्या सीमेवरून केरळमध्ये प्रत्येक आठवड्याला ५० किलो गांजा आणत असे, अशी माहिती अबकारी विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. (अशी अनधिकृत कामे दिवसाढवळ्या होणे, हे सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतात ! - संपादक)

गुजरातमध्ये गोमांस बाळगल्याप्रकरणी रफीर इलियासभाई खलिफाला ३ वर्षांचा कारावास

     कर्णावती (अहमदाबाद) - गुजरातमध्ये गोमांस बाळगल्याप्रकरणी गणदेवीचे न्यायदंडाधिकारी सी.वाय. व्यास यांनी रफीर इलियासभाई खलिफा या गोमांस विक्रेत्याला ३ वर्षे कारावास आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
    गुजरातमध्ये गुजरात प्राणी संवर्धन सुधारणा कायदा २०११च्या कलमानुसार, मांस आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खरेदी करणे, विकणे आणि त्याची वाहतूक करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. गोरक्षकांनी खलिफाला २० किलो गोमांस मोटरसायकलवरून नेताना पकडले होते. या प्रकरणी त्याला ८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी अटक करण्यात आली होती.

सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे असलेला सर्वांत मोठा आखाडा : अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा !

उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त..
महंत रामकिशोरशास्त्रीजी महाराज
     श्री पंच दिगंबर अनी आखाडा हा भारतातील सर्व म्हणजे १३ आखाड्यांचा राजा मानला जातो. सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे यांचा समावेश असलेला हा आखाडा सर्वांत मोठा आखाडा आहेे. नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरशास्त्रीजी महाराज यांची मुलाखत घेतली. या वेळी महंत रामकिशोर शास्त्रीजी महाराज यांनी दिलेली अमूल्य माहिती त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. 
संकलक : श्री. नीलेश कुलकर्णी, पुणे

(अ)स्वच्छतागृहे : असून अडचण, नसून खोळंबा !

     नाव सार्थ न ठरवणारी ठळक गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी असणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे ! शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला, बसथांब्यांवर, रेल्वे स्थानकांवर, शासकीय रुग्णालयांमध्ये, शाळा-महाविद्यालये यांमध्ये असणारी ही सार्वजनिक स्वच्छतागृहे म्हणजे अस्वछतेची आणि गलिच्छपणाची ठळक उदाहरणे आहेत. 
     वर्ष २००० पासून महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यास प्रारंभ केला. १ एप्रिल २०१२ पासून निर्मल भारत अभियानाची घोषणा करण्यात आली. त्या अंतर्गत स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येऊ लागले. काही जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, यासाठी निर्मल दीपावली भाऊबीज उपक्रम यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठीही शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येत आहेत.

नुसते आवश्यकता असल्याचे सांगणे शासनाकडून अपेक्षित नाही, तर कृतीचे फळ सांगणे अपेक्षित !

     मद्यपींची संख्या अल्प करण्यासाठी समाजात प्रबोधनाची आवश्यकता आहे. - फ्रान्सिस डिसोझा, उपमुख्यमंत्री, गोवा.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी मुलांत विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
मुलांनो, काटकसर केल्याने होणारे लाभ जाणा !
     देवाच्या कृपेने मानवाला अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची उधळपट्टी टाळून आवश्यक तेवढाच वापर करणे, यालाच काटकसर म्हणतात.
      मुलांनो, आई-बाबा तुम्हाला हव्या त्या वस्तू आणून देतात; म्हणून आज तुम्हाला पैशांचे इतके मोल वाटत नाही; परंतु मोठेपणी जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमवायला लागाल, तेव्हा तुम्हाला त्याचे खरे मोल कळेल. यासाठी काटकसर या गुणाचा संस्कार तुमच्या मनावर आतापासूनच नको का व्हायला ?
१. काटकसर केल्याने होणारे लाभ
१ अ. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण होणे : पाणी, वीज, पेट्रोल, डिझेल इत्यादी राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा काटकसरीने वापर केल्यास राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण होते.

चाफेकरांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी कुलस्वामिनीपुढे सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारतमाता स्वतंत्र करण्याची सावरकरांची प्रतिज्ञा - मारिता मारिता मरेतो झुंजेन !

बाळकृष्ण चाफेकर यांच्या बलीदानदिनानिमित्त...
     या घटनेने अंतःकरण विव्हळ होऊन सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी आपल्या कुलस्वामिनीपुढे सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारतमाता स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा केली. पुण्यश्‍लोक शिवछत्रपतींच्या नंतर महाराष्ट्राच्या इतिहासातील ही दुसरी प्रतिज्ञा होय.
     सावरकर आपल्या आत्मवृत्तात लिहितात, स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन चाफेकर फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाताजाता चेतवलेली शत्रुंजय वृत्ती यज्ञकुंडात समिधा मागून समिधा टाकून अशी भडकवत नेणे असेल, तर त्याचे दायित्व आपणाकडे येत आहे. चाफेकरांचे कार्य कुणीतरी जागते ठेवून चालवणे इष्ट आणि आवश्यक असेल, तर ते कार्य मीच का करू नये, हा विचार ठाम होऊन मी देवीपुढे शपथ घेतली, देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मी मारिता मारिता मरेतो झुंजेन !
      सावरकरांच्या विशाल दृष्टीकोनातून भारताची भूमी आपली पितृभूमी आहे आणि अशा हिंदूंचे जे राज्य ते हिंदुराष्ट्र, अशी व्याख्या सावरकरांनी हिंदु राष्ट्रदर्शन या नावाने आपल्या व्याख्यानात दिली आहे.
 - श्री. बाबासाहेब पानसे (स्वातंत्र्यवीर दिवाळी विशेषांक २०१०)

देश आणि धर्म यांचे लचके तोडणारा कन्हैया अन् त्याला प्रोत्साहन देणारे मोगलांचे वंशज यांना कठोर शासन करा !

सौ. अंजली जोशी
१. सूर्याजी पिसाळाचा वंशज कन्हैया ! : सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन्यू) जगभर गाजत आहे, ते चांगल्या गोष्टींमुळे नसून धर्मद्रोही आणि देशद्रोही विद्यार्थ्यांच्या कुकृत्यांमुळे ! कन्हैया नावाच्या उपटसुंभाची काळी कृत्ये वाचून छत्रपती शिवरायांच्या काळातील स्वामीद्रोही (नमकहराम) आणि घरभेदी (फितूर) सूर्याजी पिसाळाची आठवण झाली. त्यानेही हिंदवी स्वराज्य स्थापनेत अडथळा आणण्यासाठी मोगलांशी संगनमत करून स्वराज्य आणि स्वधर्म यांविरुद्ध फितुरी केली; कारण केवळ स्वार्थाने आलेले अंधत्व ! त्यामुळे स्वतःच्या विवेकावरील संतुलन गमावून देश, धर्म आणि समाज यांच्या विरोधात कुकृत्य करण्यात धन्यता मानणारा सूर्याजी या कन्हैयाच्या रूपात पुन्हा मोदी शासनाला त्रास देण्यासाठी आणि आमच्या प्राणप्रिय मातृभूमीला रसातळाला नेण्यासाठी उभा ठाकलेला दिसत आहे.

कन्हैयासारख्या प्रवृत्तींना थोपवण्यासाठी सज्जनशक्ती कृतीशील होण्याची आवश्यकता !

प्रा. कु. शलाका सहस्रबुद्धे
     ९ फेब्रुवारीनंतर देशाच्या विभाजनाची स्वप्ने पहाणारे, सैन्याचा अनादर करणारे आणि आतंकवाद्याच्या स्मृती जपणारे कन्हैया नावाचे प्रकरण उदयास आले. केवळ उदयास आले नाही, तर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळून देशप्रसिद्धही झाले. देशद्रोही कन्हैयाचा एकीकडे राष्ट्रभक्तांकडून निषेध होत असतांना दुसरीकडे साम्यवादी, काँग्रेसी आणि कथित पुरोगामी यांच्याकडून कन्हैयाला डोक्यावर घेतले जाऊ लागले. इतके की, त्याच्यावर लावण्यात आलेला देशद्रोहाचा आरोप रहित व्हावा, यासाठी चक्क देशद्रोहाच्या संदर्भातील कलमच ब्रिटीशकालीन आणि कालबाह्य असल्याचे सांगत राज्यघटनेतून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अनेक पुरोगाम्यांना देशाच्या अखंडतेला छेद देण्याच्या मनोवृत्तीमध्ये अभिव्यक्ती दिसू लागली. त्यातूनच मग कन्हैया कुमार प्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा दावा कन्हैयाच्या समर्थकांकडून करण्यात येऊ लागला. कोण कुठला देशद्रोही टीनपाट कन्हैया येतो, देशाच्या विरोधात गरळ ओकतो आणि हिरो बनतो ! सगळेच बुद्धीच्या पलीकडचे ! कदाचित यालाच कलीचा महिमा म्हणत असावेत; कारण सध्या देशाच्या रक्षणासाठी प्राणही समर्पित करण्याच्या सिद्धतेने सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक देशात उपेक्षिले जात आहेत आणि देशद्रोह करणारे प्रसिद्ध पावत आहेत.

राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालू आहेत, हे शासनाला लज्जास्पद आहे !

     गोवा राज्यात गेल्या ४ वर्षांत मराठी माध्यमाच्या ५६ आणि कोकणी माध्यमाच्या ३१ नव्या शाळा मिळून एकूण ८७ मराठी-कोकणी शाळा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली. याउलट एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला अनुमती दिलेली नाही. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमंच्या) नेत्यांनी याचा विचार करावा आणि भाजपची तुलना काँग्रेस पक्षाशी करण्याचे प्रकार बंद करावेत. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

शासन स्वयंसेवी संघटनांना कधी साहाय्य करते ?

     पुराणकाळापासून अत्यंत महत्त्व असलेल्या पंचक्रोशी यात्रेला उज्जैन (मध्यप्रदेश) येथे प्रारंभ झाला आहे. प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक उज्जैनला येत असल्यामुळे त्यांना अल्प त्रास व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वयंसेवी संघटनांचे साहाय्य घेण्यात आले आहे.
गंगामाहात्म्य (आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)
गंगा नदीचे अलौकिकत्व आणि माहात्म्य सांगणारा सनातनचा ग्रंथ !
  •  पापनाशक गंगा नदी म्हणजे विश्‍वातील सर्वोत्तम तीर्थ !
  •  शिवतत्त्वदायिनी, ज्ञानदायिनी आणि मोक्षदायिनी गंगा !
  •  गंगास्नानाचे महत्त्व, गंगास्नानविधी आणि गंगापूजनविधी !
  •  गंगा देवीशी संबंधित उत्सव आणि व्रते अन् उपासनाशास्त्र !
संपर्क : गोवा - (०८३२) २३१५९१९, पनवेल - (०२१४३) २३३१२०
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

क्रांतीवीर चाफेकर बंधूंचे धाडस आणि वधस्तंभावर चढणे

    २६.६.१८९७ या व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहण महोत्सवाच्या दिवशी रॅन्ड आणि आयर्स्ट या अत्याचारी गोर्‍या अधिकार्‍यांना ठार करून चाफेकर बंधूंनी ब्रिटिश साम्राज्याला शत्रूत्वाचा तीट लावला. टिळकांच्या हस्ताक्षरांतील गीता हातात घेऊन दोघे क्रांतीवीर वधस्तंभावर चढून अमर झाले. चाफेकर खटल्याचे वृत्त केसरी आणि ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रकांत वाचून सावरकरांच्या अंगाची लाही होई. अंगाचा क्षोभ होई. आधीच संस्कारित असलेल्या मनाचा क्षोभ उत्पन्न होईल, तरच नवल !

हिंदु राष्ट्र लढून मिळवावे लागेल !

     हिंदु राष्ट्र हे मागून मिळणार नाही. अधिकार कधी मागून मिळत नाही, तर तो लढून मिळवावा लागतो. त्यासाठी हिंदूंनो, आता युद्धाची सिद्धता करा ! हे येरा-गबाळ्याचे काम नाही, तर शूरवीरांचे कार्य आहे. - महंत डॉ. बिंदू महाराज, नाशिक.
     सध्या हिंदूंमध्ये धर्मभावनेची उणीव आहे; कारण हिंदूंना कोठेही धर्मशिक्षण मिळत नाही. ज्याच्याबद्दल प्रेम नाही, त्याच्यावर आघात झाला, तर काहीच वाटत नसते !
- पू. राजेंद्र शिंदे, सनातनचे संत

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. एक कोटी लोकसंख्या असलेल्या जम्मू-काश्मीरला २४००० कोटी रुपये म्हणजे माणसागणिक २४००० रुपये इतके आर्थिक साहाय्य दिले आहे, तर भारतातील इतर राज्यांना वरील साहाय्याच्या ५ टक्के पेक्षांही न्यून आर्थिक साहाय्य दिले आहे. राष्ट्रविरोधासाठी हे बक्षीस नव्हे का ?
२. चित्र काढणे इस्लामला संमत नसेल, तर एम्.एफ्. हुसेनविरुद्ध फतवा का नाही ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

सौ. सारिका आणि श्री. कृष्णा आय्या यांचा अविश्‍वसनीय विवाह अन् संसार

मुलीच्या आयुष्याचे सार्थक होण्यासाठी 
तिला प्रवाहाविरुद्ध निर्णय घेण्यास साहाय्य करणारे 
सुजाण पालक सौ. सुचिता आणि श्री. सुरेश काशेट्टीवार ! 
सौ. सारिका, कु. विश्‍व (मुलगा) आणि श्री. कृष्णा आय्या
         आजकाल मुलीला श्रीमंत आणि उच्चशिक्षित मुलगा मिळावा, यासाठी पालकांचा केवढा आटापिटा आणि चढाओढ असते. असा जावई मिळणे हे समाजात मानाचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. यातच पालक स्वतःच्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात. सौ. सारिकासारख्या उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित घराण्यातील मुलीने मला पैसा नको, मुलाने मला विवाहोत्तर साधना करू द्यायला हवी, अशी इच्छा व्यक्त करणे आणि त्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्यास सिद्ध होणे हे जसे विरळेच, तसेच साधना करण्यातच जीवनाचे सार्थक आहे, हे जाणून मुलीचा इच्छेचा आदर करून तिच्या इच्छेनुसार विवाह करून देणारे आईवडीलही विरळेच ! सज्ञान असलेल्या मुलीही स्वतःचे हित ओळखण्यात अज्ञान आहेत, असे सांगून मुलींना साधना करण्यास अटकाव करणारे अनेक पालक आपण पहातो. आपल्या इच्छा मुलींवर लादून बळजोरींने त्यांचा जीवनप्रवाह पालटणारे काही पालक तर त्यासाठी कोर्ट आणि पोलीसस्थानकांच्या पायर्‍या चढण्यासही मागेपुढे पहात नाहीत. इतकेच नव्हे, तर प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने सनातनवर खोटेनाटे आरोप करून आगपाखड करणार्‍या अशा पालकांच्या वागण्याचे चटकेही सनातन संस्थेने पचवले आहेत. अशा परिस्थितीत मुलीचे खरे हित जाणून मातृपितृधर्म निभावणारे सौ. सुचिता आणि श्री. सुरेश काशेट्टीवार यांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस करून, प्रचलित समाजव्यवस्थेतील तथाकथित सुखी समाधानी आयुष्याचे निकष बाजूला सारून आणि प्रसंगी स्वकियांचा विरोध पत्करूनही त्यांनी हा निर्णय घेतला आणि मुलीनेही तो योग्य असल्याचे साधनाधिष्ठित वैवाहिक जीवनातील या दशकपूर्तीच्या वाटचालीने सिद्ध केले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी !

उज्जैन येथे झालेल्या वादळी पावसाच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना

कु. नंदा नाईक
१. स्वप्नात प.पू. डॉक्टर आणि उज्जैन येथे वादळी पावसाने झालेल्या हानीची दृश्ये दिसणे : २७.४.२०१६ ते १.५.२०१६ या कालावधीत प.पू. डॉक्टर माझ्या स्वप्नात यायचे आणि मला काही दृश्ये दिसायची. ती दृश्ये उज्जैन येथे वादळी पावसाने झालेल्या हानीची होती, असे लक्षात आले. आधीच्या स्वप्नात मला पू. स्वातीताई आणि त्यांच्यामागे काही साधक दिसले. नंतर दैनिक सनातन प्रभातमध्ये त्याच साधकांची छायाचित्रे आली होती.
२. उज्जैनमध्ये उभारलेल्या कक्षावर श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र सतत फिरत असल्याचे दिसणे आणि त्यानंतर सनातनच्या प्रदर्शनाची अल्प प्रमाणात हानी झाल्याचे समजणे : नंतर उज्जैनमध्ये उभारलेला कक्ष दिसला. कक्षावर श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र सतत फिरत आहे, असे जाणवले. त्याच्यामुळे आपल्या कक्षाची हानी अल्प झाली, असे त्या दृश्यात दिसले होते; पण त्याच वेळी समष्टीच्या पापांमुळे आपलीही थोडी हानी झाली, असे श्रीकृष्ण मला सांगत होता. नंतर दैनिक सनातन प्रभातमध्ये सनातनच्या प्रदर्शनाची अल्प प्रमाणात हानी झाल्याचे वृत्त आले.

प.पू. डॉक्टरांनी लिहिलेल्या ग्रंथांचे वितरण होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत कणगलेकरकाका !

श्री. यशवंत कणगलेकर
       ७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०१४ या कालावधीत कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, जळगाव या जिल्ह्यांमध्ये शाळांमध्ये व्यक्तीमत्त्व विकास अन् गुणसंवर्धन प्रकल्पांतर्गत अभ्यासवर्गाचे आयोजन, तसेच काही वैयक्तिक संपर्क केले. त्या वेळी श्री. कणगलेकरकाकांसमवेत सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रेे प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून लिहून देत आहे.
१. अभ्यासपूर्ण सेवा करणे : काकांच्या तळमळीमुळे हा नवीन प्रकल्प शिकायला मिळाला. हा प्रकल्प सध्याच्या शिक्षणव्यवस्थेसाठी किती आवश्यक आणि उपयुक्त आहे, हे लक्षात आले. यातून काकांची जिज्ञासू, तसेच अभ्यासू वृत्ती लक्षात आली. काकांचे ग्रंथवाचन अफाट आहे. सनातनचे सर्वच ग्रंथ त्यांनी लक्षपूर्वक आणि अभ्यासपूर्वक वाचले आहेत. ते समाजात वैयक्तिक संपर्काला गेल्यावर विषयानुरूप संदर्भ देतांना ग्रंथाचे नाव आणि ती माहिती ग्रंथाच्या कोणत्या पानावर मिळेल ?, हेसुद्धा सांगतात. अशी तळमळ माझ्यातही निर्माण होण्यासाठी मी ईश्‍वराला प्रार्थना करते.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

स्वभावदोषांमुळे चुका होत आहेत कि अहंमुळे चुका होत आहेत, हे ओळखायचे कसे ?

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. मनाने परिस्थिती स्वीकारली जात असेल; परंतु बुद्धी त्यात शंका उपस्थित करत असेल, तर ते अहंचे लक्षण आहे. बुद्धीचा अडथळा म्हणजे अहं आणि मनाचा अडथळा म्हणजे स्वभावदोष.
२. स्वभावदोष घालवण्यासाठी स्वयंसूचनांचा उपयोग होतो, तर अहं घालवण्यासाठी भावजागृतीचे प्रयत्न करणे आवश्यक असते.
३. अहं घालवण्यासाठी सतत दुसर्‍यांचे ऐकावे लागते, तर स्वभावदोष घालवण्यासाठी मात्र मनावर लक्ष ठेवून स्वभावदोष नियमित लिहून ते विभागसेवकांना दिल्यास, तसेच व्यष्टी स्तरावर स्वयंसूचनांचे सत्र केल्यास दोषहरण होते.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (१.३.२०१६, सकाळी ९.०५)

वाईट शक्ती म्हणजे काय याचे विवरण

        वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया म्हणजे चैतन्याच्या महासागरातून आनंद मिळवण्याचे माध्यम असल्याची साधकाने घेतलेली अनुभूती !

श्री. केशव अष्टेकर
१. आश्रमात प्रक्रियेसाठी जाण्याचा निरोप मिळाल्यापासून दृष्टीकोन सकारात्मक होणे : मी घरी स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया करायची म्हणून करत होतो. त्यात मी सवलत घेत होतो आणि चालढकलपणा करत होतो. मला प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात जाण्याचा निरोप मिळाल्यापासून माझा दृष्टीकोन सकारात्मक झाला. मी आश्रमात आल्यानंतर मला देवच प्रक्रिया शिकवणार आहे, हाच भाव होता आणि तशी प्रार्थनाही माझ्याकडून होत होती.
२. भावसत्संगामुळे ईश्‍वर, गुरु आणि संत यांच्या प्रतीच्या कृतज्ञताभावात वृद्धी होणे : मी प्रक्र्र्रियेत येण्यापूर्वी नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आणि उपाय करत होतो; पण आता हे सर्व चैतन्याच्या स्तरावर आणि शरणागत भावाने कसे करायचे ?, हे सांगितल्यामुळे माझ्याकडून तसे प्रयत्न व्हायला लागले. प्रत्येक कृतीला (सेवेला) आणि प्रक्रियेला भावाची जोड दिली, तर देव साहाय्य करील, याची मला जाणीव झाली. पूर्वी माझा कृतज्ञतेचा भाग अल्प होता. मला भावसत्संगामुळे सजीव-निर्जीव वस्तूंप्रती कृतज्ञता वाटायला लागली. त्यामुळे माझ्या ईश्‍वर, गुरु आणि संत यांच्या प्रतीच्या कृतज्ञताभावात वृद्धी झाली.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. परशराम पांडे
विद्यार्थ्याला आतून 
जागृत करणारेे शिक्षण हवे !
         भगवंत सहस्रो कोटी जिवांची व्यवस्था कशी करतो ? पंचमहाभूतांचे जग कसे आहे ? त्याचा आपल्याशी संपर्क कसा होतो ?, याचे मूळ ज्ञान विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. सत्यासत्य पाहून त्याची विवेकशक्ती जागृत करणारे आणि विद्यार्थ्याला आतून जागृत करणारे शिक्षण, हेच खरे शिक्षण. सध्याचे शिक्षण लादले जाते. तसे नको. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत जीवन जगतो, निःसत्त्व होऊन जातो. असा विद्यार्थी राष्ट्राचे काय भले करणार ? शाळा, शिकवणी, परीक्षा, नंतर नोकरीची चिंता, यातच त्याचे आयुष्य जाते. मग पुन्हा भ्रष्टाचार, फसवणूक करणे, असे होते. विद्यार्थ्याने आनंदयुक्त हसत-खेळत, बागडत शिक्षण घेतले पाहिजे.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.११.२०१४)

वाईट शक्तींनी रामनाथी आश्रमातील फरशीवर केलेल्या आक्रमणाचा परिणाम आणि महर्षींनी सांगितलेला नामजप यांविषयी प्रश्‍न अन् त्यांची उत्तरे !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
       रामनाथी (गोवा) येथे आश्रमदर्शनासाठी आलेला एक हिंदु धर्माभिमानी आणि एक साधक यांनी अनुक्रमे वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणाचा आश्रमातील फरशीवर झालेला परिणाम अन् महर्षींनी सांगितलेला नामजप यांविषयी विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे पुढे देत आहे.
१. सनातन संस्थेवर ईश्‍वर आणि श्रीगुरु 
यांची कृपा असल्याने बलाढ्य आसुरी (वाईट) 
शक्तींनी केलेल्या आक्रमणात सनातनचे आश्रम, 
साधक आदींची मोठ्या प्रमाणावर हानी न होणे
प्रश्‍न : रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात एवढे चैतन्य असूनही वाईट शक्ती आश्रमात प्रवेशच कसा करू शकतात ?
उत्तर
अ. साधक आणि संत यांच्याप्रमाणेच वाईट शक्तींकडेही साधनेचे बळ असते. त्यामुळे त्या सनातनच्या आश्रमातही प्रवेश करू शकतात.

समाजकंटकांचे सनातनच्या साधकांना नाहक त्रास देण्याचे घृणास्पद कृत्य चालूच !

साधकांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे, 
अश्‍लील बोलणे आणि सनातनच्या आश्रमावर 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
     सनातनच्या साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे १६७ वा दिवस ! 
 ११.५.२०१६
     गोव्यातील एका केशकर्तनालयात मुलाचे केस कापण्यासाठी गेलेल्या साधिकेने दुचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केल्यावर एका सनातनद्वेष्ट्याने 'सनातनवाले नेहमी असेच घुसतात', असे मोठ्या आवाजात म्हणून काहीबाही बोलला. साधिकेने तिने उभी केलेली दुचाकी आणि त्या व्यक्तीचे वाहन यांत आवश्यक जागा असल्याचे त्याला सांगितल्यावरही त्याची आरडाओरड चालू होती.

सनातन संस्थेच्या कार्याची वस्तूनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अद्ययावत माहितीचा आधार घ्या !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
      सनातनचे साधक, वाचक आणि हितचिंतक अध्यात्मप्रसार करण्याच्या उद्देशाने सनातनच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लग्नपत्रिका, स्वतःच्या उत्पादनाचे विज्ञापन करणार्‍या पिशव्या, आस्थापनाचे विज्ञापन करणारी दैनंदिनी (डायरी) आदींवर संस्थेची माहिती छापतात. ही सर्व माहिती नेहमीच्या संकेतस्थळावर ठेवलेली असते. संस्थेच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कार्याच्या अनुषंगाने ती सातत्याने अद्ययावतही होत असते. ही अद्ययावत माहिती सर्वांना कळावी आणि संस्थेचे कार्य वस्तूनिष्ठपणे समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी पुढील माहिती प्रसिद्ध करत आहोत. साधक, वाचक आणि हितचिंतक यांनी प्रसार करतांना या माहितीतील आकडेवारीचा उपयोग करावा. १.५.२०१६ पर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
धर्मशिक्षण देणारी सनातन संस्था !
१. १.५.२०१६ पर्यंत सनातनचे एकूण ६० साधक संत बनले, तर ८२६ साधकांचा प्रवास त्या दिशेने चालू आहे.
२. संस्थेद्वारे विनामूल्य सत्संग आणि बालसंस्कारवर्ग चालवले जातात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
 ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभपर्व इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना येण्यासाठी पैसे देऊनही किती उपस्थिती असते ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
उत्तम चरित्र म्हणजे कधीही दुराचाराचा विचारही मनात न आणणे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

प्रशिक्षणातून कर्तव्यतत्परता !

संपादकीय
     बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे महंमद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने २४ डिसेंबर २०१५ या दिवशी मोठी मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंच्या वस्तीत दगडफेक करण्यात आली. हिंदूंच्या घरांची यात मोठी हानी झाली, त्याचबरोबर वाहने आणि सिंटेक्स टाक्या यांचीही फार हानी झाली. दगडफेकीत अनेक हिंदू घायाळ झाले. श्रद्धास्थानाच्या मिरवणुकीला गालबोट लागण्याची जणू कुणाला पर्वाच नव्हती, असा हा प्रकार आहे. नागरिक समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक काबरा यांनी २५ डिसेंबर या दिवशी तक्रार दाखल केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn