Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज आद्यशंकराचार्य जयंती
आज साप्ताहिक सनातन 
प्रभातचा वर्धापनदिन (तिथीनुसार)

वर्ष २००८ मधील मुंबईवरील आक्रमणात पाकचाच सहभाग !

 • पाकचे माजी राजदूत हक्कानी यांनी पदावरून निवृत्त झाल्यावर हे विधान का केले ? पदावर असतांना का सांगितले नाही ? त्यांच्या या स्वीकृतीवरून पाक शासन आतंकवाद्यांच्या विरोधात काही कृती करील, अशी अपेक्षा नाही !
 • पाकचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांची स्वीकृती
        इस्लामाबाद - पाकचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी लिहिलेल्या इंडिया व्हर्सेस पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान) या पुस्तकामध्ये २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या आक्रमणाच्या संदर्भात पाकच्या सहभागाची स्वीकृती दिली आहे. हे पुस्तक पुढच्या महिन्यात प्रकाशित होणार आहे. (स्वतःचे पुस्तक खपण्यासाठी प्रत्येक जण जाणीवपूर्वक असे वादग्रस्त लिखाण करतात, त्यातीलच हे एक उदाहरण होय ! - संपादक)

दुसर्‍या अमृत स्नानाच्या दिवशी वादळी पावसामुळे उज्जैन सिंहस्थपर्वात प्रचंड हानी : २०० हून अधिक मांडव जमीनदोस्त !

वादळी पावसामुळे सिंहस्थपर्वातील कोसळलेले मांडव
सिंहस्थ पर्वात कोसळलेले मंडप
 • शेकडो लोक घायाळ
 • १५०० मांडवांना फटका
 • एकाही यज्ञशाळेची हानी नाही !
 • सनातन संस्थेचे प्रदर्शन सुरक्षित
 • २१ मेपर्यंत प्रतिदिन दुपारी ३ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
 • पोलीस आणि प्रशासन यांचे साहाय्य नाही !
        उज्जैन, १० मे (वार्ता.) - उज्जैन सिंहस्थपर्वातील पहिल्या अमृत (शाही) स्नानानंतर चालू झालेल्या पावासाने ९ मे या दिवशी दुसर्‍या अमृत स्नानाच्या वेळी रौद्ररूप दाखवले. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे १ सहस्र ५०० मांडवांना मोठा फटका बसला आहे. यात ३०० मंडपांच्या कमानी आणि २०० हून अधिक मांडव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. मंडपात अडकल्यामुळे शेकडो लोक घायाळ झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन न पोहोचल्यामुळे लोकांना शासनाकडून कोणतीही सुविधा दुसर्‍या दिवसापर्यंत मिळालेली नव्हती. स्थानिक लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना साहाय्य केले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून वाहनांवर पडल्यामुळे ६ वाहने पूर्णपणे चेपली गेली होती. अनेक मंडपामध्ये पाणी गेल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून दलितांसमवेतचे समरसता स्नान आणि शबरी भोज कार्यक्रम रहित !

सिंहस्थातील साधू-संतांच्या विरोधाचा परिणाम !
        उज्जैन (मध्यप्रदेश) - येथील सिंहस्थ पर्वात नियोजन करण्यात आलेले रामघाटावर दलितांसह समरसता स्नान आणि शबरी भोज हे कार्यक्रम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून रहित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना शंकराचार्यांपासून सर्व साधू-संतांकडून विरोध करण्यात आला होता. तसेच रा.स्व. संघाकडूनही याचा विरोध झाला होता. सिंहस्थाच्या इतिहासात जातीपातीद्वारे कधीही भेदभाव करण्यात आला नव्हता. सिंहस्थाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अशी चेतावणी साधू-संतांनी दिली होती. त्यामुळेच भाजपकडून हे कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत. शहा आता वाल्मीकि घाटावर दलित संतांबरोबर स्नान करतील, असे सांगण्यात आले आहे. या वेळी मुख्यमंत्री शिवराज चौहान आणि भाजपचे मध्यप्रदेश प्रभारी विनय सहस्रबुद्धे हेही स्नान करणार आहेत. तसेच वाल्मीकि धाम येथे दलित संतांचा सन्मान करणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. अमित शहा अन्य आखाड्यांच्या मांडवांनाही भेटी देणार आहेत.

उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीत बहुमत मिळाल्याचा काँग्रेसचा दावा

आज न्यायालय निकाल घोषित करणार !
       नैनीताल / नवी देहली - उत्तराखंडमधील राजकीय अस्थिरतेवर न्यायालयाच्या आदेशानंतर १० मे या दिवशी घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीत काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे, तर भाजपने त्याचा पराभव मान्य केला आहे, असे म्हटले जात आहे; मात्र या चाचणीचा अधिकृत निकाल ११ मे या दिवशी न्यायालय घोषित करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने ३४ मते मिळवत बहुमत सिद्ध केले, तर भाजपला २८ मते मिळाली आहेत.
१. काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना विधानसभेत होणार्‍या बहुमत चाचणीत अपात्र ठरविल्यानंतर १० मेला सकाळी बहुमत चाचणी घेण्यात आली.
२. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेसला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

जर्मनीत धर्मांधाकडून प्रवाशांवर चाकूने आक्रमण, ५ जण घायाळ

जगभरातील आतंकवादी 
आक्रमणात धर्मांधच का असतात ?
       म्युनिच - जर्मनीतील म्युनिच शहराजवळील ग्राफींग रेल्वेे स्थानकामध्ये १० मे या दिवशी पहाटे ५ च्या सुमारास एका धर्मांधाने अल्लाहू अकबरच्या घोषणा देत प्रवाशांवर चाकूने आक्रमण केले. या आक्रमणात ५ प्रवासी घायाळ झाले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची ओळख पटवण्यात येत आहे. जर्मनी इसिसच्या विरोधात युद्धात उतरलेली आहे. त्यामुळे आतंकवाद्याने हे आक्रमण केले असण्याची शक्यता आहे. जर्मनीचे शेजारी देश असलेले फ्रान्स आणि बेल्जियम या देशांमध्ये इसिसने यापूर्वीच आक्रमणे घडवून आणली आहेत.

कॅनडात लागलेली आग विझण्यासाठी काही मास लागण्याची शक्यता !

 • ५ लाख एकर क्षेत्रात पसरली आग 
 • उद्योगपती नवजीत ढिल्लन यांच्याकडून विस्थापितांसाठी १०० घरे उपलब्ध
     टोरॅन्टो (कॅनडा) - कॅनडातील अल्बर्टा प्रॉव्हिंसमधील वनात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली आग विझवण्यात अजून यश आलेले नाही. ही आग ५ लाख एकर क्षेत्रात पसरली आहे. त्यामुळे एक लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. कॅनडामध्ये रहाणारे भारतीय उद्योगपती नवजीत ढिल्लन यांनी या विस्थापितांसाठी ३ मासांकरता १०० घरे उपलब्ध करून दिली आहेत, तसेच १०० कुटुंबांची गुरुद्वारात निवासाची सोय केली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही आग विझवण्यासाठी काही मास लागण्याची शक्यता आहे. 
नाडीवाचन क्रमांक ६७ मध्ये महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.
(भारतातील उत्तराखंड आणि कॅनडातील आगीच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती सत्य आहे, हे लक्षात येते ! - संपादक)दर्ग्यावर चादर चढवण्यास जाणार्‍या दोन अन्य धर्मीय युवतींवर महंमद अमजद उपाख्य नाग, नुसा आणि साका यांच्याकडून बलात्कार !

असहिष्णुतेवरून उर 
बडवणारे आता कुठे आहेत ?
        मालेरकोटला (पंजाब) - येथील बाबा हजरत शेख यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यास जाणार्‍या दोन अन्य धर्मीय युवतींचे मोहम्मद अमजद उपाख्य नाग, नुसा, साका आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी अपहरण केले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मालेरकोटलाच्या जरग चौकाजवळ या युवतीपैकी एकीचे घर असून दुसरी युवती तिची मैत्रिण आहे. दर्गा येथून जवळ असल्याने ही तरुणी तिच्या मैत्रिणीकडे आदल्या रात्री रहाण्यास आली होती. सकाळी लवकर उठून त्या दर्ग्याकडे निघाल्या होत्या. तेव्हा वरील वासनांध मोटारसायकल वरून आले आणि त्यांनी युवतींचे अपहरण करून त्यांना जवळच्या शेतात नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला.

आयएस्आयने पाकमधील सीआयएच्या प्रमुखाला दिले होते विष !

स्वतःच्या अधिकार्‍याला विष पाजणार्‍या पाकला अमेरिका साहाय्य करते, 
याचा अर्थ भारताने काय घ्यावा ?
     वॉशिंग्टन - अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या पाकमधील प्रमुखाला पाकच्या गुप्तचर संस्था आयएस्आयने विष दिल्याची घटना समोर आली आहे. मार्क केल्टन असे या अधिकार्‍याचे नाव असून तो मे २०११ मध्ये अल-कायदा या जिहादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला मारण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत होता. पाकच्या एबटाबादमध्ये केल्टन यांनी २ मास बिन लादेनच्या परिसराची छापेमारी केली होती.
१. वॉशिंग्टन पोस्टने प्रसारित केलेल्या एका विशेष अन्वेषण अहवालानुसार, मार्क केल्टन यांनी २ मास केलेल्या छापेमारीनंतर त्यांचे स्वास्थ्य बिघडू लागल्याने त्यांना तेथून काढण्यात आले. 
२. आता केल्टन सीआयएतून निवृत्त झाले असून त्यांच्या पोटाचे शस्त्रकर्म झाले आहे. परिणामी त्यांचे स्वास्थ्य सुधारले आहे.

जर्मनीत नाझी आरोपीला ७२ वर्षांनंतर न्यायालयाकडून शिक्षा !

पुढच्या काही वर्षांत देशाच्या फाळणीला उत्तरदायी असणार्‍या, हिंदूंच्या हत्यांना उत्तरदायी 
असणार्‍या, देशाला भ्रष्टाचाराद्वारे लुटणार्‍या सर्व संबंधितांनाही शिक्षा करण्यात येईल ! 
जर्मनीत नाझींना शिक्षा करण्यास प्रारंभ
     डेटमोल्ड (जर्मनी) - येथे ज्यू नागरिकांच्या हत्येला साहाय्य करणार्‍या ९४ वर्षीय नाझी आरोपी रीनहोल्ड हेनिंग याच्या विरोधातील खटल्याला ७२ वर्षे झाल्यानंतर न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 
१. या वेळी आरोपीच्या विरोधात एका ८५ वर्षीय महिलेने साक्ष दिली. घटना घडली, त्या वेळी या साक्षीदाराचे वय १३ वर्षे होते.
२. न्यायालयाच्या या भूमिकेविषयी बोलतांना जर्मनीतील नाझी आरोपींसंदर्भात संशोधन करणार्‍या कायदेतज्ञ लॉरेन्स डग्लस यांनी म्हटले आहे की, काही न होण्यापेक्षा विलंब झालेला चांगला आहे. या नवीन खटल्यांचे प्रतिकात्मक महत्त्व मोठे आहे. नाझी आरोपींना शिक्षा देण्यासाठी अनेक दशकांपासून संघर्षरत जर्मनीत कायदेशीर प्रणाली शेवटी न्याय मिळवून देत आहे, हेच महत्त्वाचे आहे.

२१६ झाडे तोडण्याच्या बदल्यात २ सहस्र झाडे लावा !

केवळ झाडे लावण्याचा आदेशच न देता संबंधितांना शिक्षाही करा !
राष्ट्रीय हरित लवादाचा देहली शासनाला आदेश
     नवी देहली - येथील यमुना विहार कॉलनीतील २१६ झाडे तोडण्याच्या बदल्यात २ सहस्र झाडे लावण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने देहली शासनाला दिला आहे. यात शासन अयशस्वी ठरल्यास दंड आकारण्यात येईल, असेही लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांनी स्पष्ट केले.
     यासंदर्भात एस्.डी. विंडलेश यांनी याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेद्वारे यमुना विहार कॉलनीमध्ये मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी बांधकाम विभागाने विनाअनुमती तेथील ४०० झाडे तोडल्याचा आरोप करण्यात आला होता. मुख्य मार्गालगत १५ मीटर लांबीच्या या सर्व्हिस लेनवर हिरवा पट्टा होता आणि त्या ठिकाणी अनेक स्थानिक नागरिक सकाळी फिरण्यासाठी, तसेच शुद्ध हवा मिळवण्यासाठी जात होते; मात्र आता सर्वकाही नष्ट झाले आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. (मानवाचे जगणे हिरावून घेणारा आधुनिक विकास हा त्याच्यासाठी वरदान नसून शापच ठरला आहे, असे वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! - संपादक)

केंद्रशासनाने कामचुकारपणा करणार्‍या ३३ महसूल अधिकार्‍यांना वेळेपूर्वीच निवृत्त केले !

     नवी देहली - कामचुकारपणा करणार्‍या महसूल खात्यातील ३३ अधिकार्‍यांना केंद्रशासनाने वेळेपूर्वीच निवृत्त केले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार अर्थ मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या एका विधानात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत विभागीत कारवाईमध्ये ७२ अधिकार्‍यांना काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये प्रथम श्रेणीतील ६ अधिकार्‍यांचाही सहभाग आहे. काम न करणार्‍या कर अधिकार्‍यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी मानसिकता निर्माण झाली आहे; मात्र वर्तमान शासन ही मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्नरत आहे.

पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी जुगार चालकांकडून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर

      नवी देहली - पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता गुन्हेगाराकडून सीसीटीव्हीचा वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. देहली येथील एका जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला होता; मात्र त्या वेळी पोलिसांना यश आले नाही. त्यानंतर पोलिसांनी जुगार अड्डयावरील सीसीटीव्हीच्या खोलीवरच धाड टाकली. अवैधरित्या दारू आणि अंमली पदार्थ विकणारे आणि जुगार अड्डा चालवणार्‍या गुन्हेगारांनी पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी त्यांच्या घरामध्येच सीसीटीव्ही लावल्याचे लक्षात आले. त्यामाध्यमातून घरातील महिलाच जुगार चालकांना पोलीस आल्याची माहिती द्यायच्या. (पुरुषांसह महिलांचाही गुन्हेगारीतील सहभाग, म्हणजे पुरुष-स्त्री समानता का ? समाजाला देशोधडीला लावणारी अशी समानता पुरोगाम्यांना ही का ? - संपादक)हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे काही संघटनांचे नव्हे, तर आपणा सर्वांचे कर्तव्य आहे ! - श्रीश्री श्री मुक्तानंद स्वामीजी, श्री क्षेत्र करंजी मठ, मूडबिदिरे

मल्पे, उडुपी (कर्नाटक) येथील हिंदु धर्मजागृती सभा
डावीकडून कु. भव्या गौडा, सौ. लक्ष्मी पै,
श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी आणि श्री. गुरुप्रसाद
      उडुपी (कर्नाटक) - मुख्यमंत्री प्रत्येक सभेत हिंदु धर्मात असलेल्या मूळ श्रद्धांना अंधश्रद्धा असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणण्याविषयी सांगत आहेत. वास्तवात आपला इतिहास पहाता वैज्ञानिक अलीकडे सांगत असलेल्या ग्रहांच्या संदर्भातील विचार १० सहस्र वर्षांपूर्वी आमच्या संस्कृत विद्वानांनी सांगितले आहेत. असे श्रेष्ठ विचार असलेल्या हिंदु धर्मातील मूळ श्रद्धा शासनाला अंधश्रद्धा वाटतात. आपल्या धर्मातील श्रद्धांच्या आचरणाचे रक्षण करणे केवळ संघटनांचे कर्तव्य नसून आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, या दृष्टीने समाजातील प्रत्येक व्यक्तीने शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी, श्रीक्षेत्र करंजे मठ, मूडबिदिरे यांनी केले. मल्पे येथील एळुरू मोगवीर भवन येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

हिंदूंनो, इसिसच्या जिहाद्यांचा सामना करण्यास सिद्ध व्हा ! - पू. नंदकुमार जाधव

गोंदेगाव (जिल्हा संभाजीनगर) आणि धामणगाव (जिल्हा जळगाव)
 येथील हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमान्यांनी केला हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष ! 
     जळगाव - पूर्ण जगावर इस्लामचे राज्य प्रस्थापित करण्याच्या ईर्ष्येने पेटलेल्या इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने आता भारतावर आक्रमण करण्याची उघड धमकी दिली आहे. भविष्यात आपल्यासमोर हे संकट उभे रहाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्यासमोर आहे. तेव्हा हिंदूंनो, संघटित होऊन आणि धर्माचरणाद्वारे धर्मबळ मिळवून इसिसच्या जिहादी आतंकवाद्यांचा सामना करण्यास आपण सिद्ध होऊया, असे आवाहन सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी गोंदेगाव (जि. संभाजीनगर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमान्यांना केले. समितीच्या वतीने ८ मे या दिवशी गोंदेगाव आणि धामणगाव (जि. जळगाव) येथे धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

शबरीमला येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी चालू असलेल्या आंदोलनाला विहिंपचा विरोध !

      तिरुवनंथापुरम् (केरळ) - शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासंदर्भात चालू असलेल्या आंदोलनाला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध दर्शवला आहे. परिषदेने मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणत्याही गटास रोखण्यात यावे, अशी केरळ शासनाकडे मागणीही केली आहे. अशा प्रकारची आंदोलने भगवान अय्यप्पाच्या भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे षड्यंत्र असून हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या शबरीमलाचे महत्त्व नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असे विहिंपचे प्रदेशाध्यक्ष एस्.जे.आर्. कुमार यांनी सांगितले.
१. हिंदूंच्या तीर्थक्षेत्री सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या विविध प्रथा-परंपरांविषयी आणि हिंदूंच्या श्रद्धेविषयी न्यायालयांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असेही कुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

(म्हणे) शिव, पार्वती, षण्मुख देवता नाहीत !

देवतांची अनुभूती न घेता केवळ मनात येईल ते बरगळणारे स्वामी हिंदूंना काय दिशा देणार ? 
मौलवी कधी त्यांच्या प्रेषितांविषयी असे विधान करतात का ? 
निडुमामिडी संस्थानचे श्री वीरभद्र चेन्नमल्ल स्वामी यांचे धर्मद्रोही विधान
     मैसुरू (कर्नाटक) - आपण देवता म्हणून पूजत असलेले शिव, पार्वती, षण्मुख यांरख्या अनेक देवता प्रत्यक्षात देवता नाहीत. त्या सर्व आपल्या प्रमाणेच एका काळात जगल्या. त्या समाजसेवा करून आणि मरून गेलेल्या ऐतिहासिक व्यक्ती आहेत, असे धर्मद्रोही विधान निडुमामिडी संस्थानचे श्री वीरभद्र चेन्नमल्ल स्वामी यांनी मैसुरू विश्‍वविद्यालयाच्या कुवेंपु कन्नड अध्ययन संस्थेमधील एका कार्यक्रमात केले. (हिंदूंमध्ये हिंदु देवतांविषयी भ्रम निर्माण करणारे स्वामी स्वत:सह इतरांनाही अधोगतीकडे नेत आहेत ! शिव-पार्वती उच्च देवता आहेत. त्यांची हिंदु धर्मात अनादी काळापासून पूजा-अर्चा आणि भक्ती करण्यात येत आहे; कारण त्यांची अनेक संत, भक्त यांनी साधना करून अनुभूती घेतली आहे ! - संपादक)

कोल्हापूर येथे मे. गोविंद नारायण जोग अ‍ॅण्ड सन्स्च्या भव्य सुवर्ण दालनाचे उत्साहात उद्घाटन

मे. गोविंद नारायण जोग अ‍ॅण्ड सन्स्च्या
शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर
     कोल्हापूर, १० मे (वार्ता.) - येथील व्हिनस कॉर्नर येथे ११५ वर्षांची परंपरा असलेल्या मे. गोविंद नारायण जोग अ‍ॅण्ड सन्स्च्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्घाटन ८ मे या दिवशी छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहात करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सर्वश्री सुधीर गाडगीळ, आमदार अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, उद्योजक रामभाऊ वेलणकर, महाराष्ट्र सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित, सांगली सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आणि मे. गोविंद नारायण जोग चौथ्या पिढीतील मार्गदर्शक श्री. बाबुराव जोग आणि GNJ ची ब्रॅण्ड अ‍ॅबिसिडर सिनेअभिनेत्री माधवी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र हा अफझलखानाचा वध करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

उंचगाव येथे संयुक्त शिवजन्मोत्सव उत्साहात ! 
कार्यक्रमात बोलतांना सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक
 (छायाचित्रकार श्री. सुधाकर सुतार, कोल्हापूर
)
     कोल्हापूर, १० मे (वार्ता.) - पुरोगामी नव्हे, तर अफझलखानाचा वध करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हिंदूंनी संस्कृती आणि धर्मशिक्षण घेेऊन प्रथम घराघरामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच लढली. पुरोगामी खोटा इतिहास सांगून हिंदूंना भ्रमित करत आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षणाला लढल्याविना हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण, स्वावलंबन, स्वसंरक्षण प्रशिक्षण या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणाव्यात, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. उंचगाव येथे ९ मे या दिवशी 'संयुक्त शिवजन्मोत्सव सोहळ्या'च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'छत्रपती शिवराय, हिंदु राष्ट्र आणि सध्याची स्थिती' या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाला ७०० जिज्ञासूंची उपस्थिती होती. व्यासपिठावर अधिवक्ता श्री. रणजितसिंह घाडगे, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, किरण दुसे आदी उपस्थित होते. या वेळी श्री. अभय वर्तक यांनी पुरोगामी संघटनांनी सनातन संस्थेवर केलेले सर्व आरोप खोडून काढले. 

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा पावसाळी अधिवेशनात संमत करू ! - पालकमंत्री

     कोल्हापूर, १० मे (वार्ता.) - श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा पावसाळी अधिवेशनात संमत केला जाईल. पहिल्या टप्प्यातील प्रस्तावानुसार पुरवणी अंदाजपत्रकात निधीचे प्रावधान केले जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ७ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिले. याचसमवेत श्री जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आणि माणगाव (तालुका हातकणंगले) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसाठीच्या आराखड्याला याच अधिवेशनात मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शिरूर (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्यावर आक्रमण

* हिंदुबहुल देश आणि पुण्यासारखी संतभूमी या ठिकाणी संतांवर आक्रमण होणे, हे शासन आणि पोलीस प्रशासन यांच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे आहे !
* जेथे संतच असुरक्षित असतील, तेथे सामान्य जनतेचे रक्षण कसे होणार ? आजपर्यंत कधी अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंवर आक्रमण झाल्याचे ऐकले आहे का ? 
* संत आणि जनता यांचे रक्षण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ते असणारे हिंदु राष्ट्रच हवे ! 
चारचाकी वाहनाच्या अपघाताद्वारे आणि त्यानंतर 
काही अज्ञातांकडून २ वेळा आक्रमण करण्याचा प्रयत्न 
     शिरूर, १० मे - राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्या चारचाकी वाहनाला ८ मेच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथील रांजणगावजवळ एका ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या अपघातानंतर झालेल्या वादावादीतून काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. यामध्ये त्यांनी वाहनचालकाला मारहाण केली. त्यानंतरही चौंडी घाटामध्येही काही अज्ञात हत्यार घेऊन आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते. (या प्रकरणी पोलीस प्रशासनाने संबंधितांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! - संपादक) या सर्व प्रसंगांतूनही प.पू. भय्यूजी महाराज हे सुखरूप असल्याची माहिती सूर्योदय आश्रमाचे श्री. तुषार पाटील यांनी दिली. (साधनेमुळे संतांचे ईश्‍वर रक्षण करतो, हेच यातून सिद्ध होते. आपत्काळाची भीषणता लक्षात घेऊन त्यापासून रक्षण होण्यासाठी हिंदूंनी साधना वाढवण्याला पर्याय नाही ! - संपादक) 

पाकमधून परतलेल्या ५ जणांकडून ४ बंदुका शासनाधीन

     अमृतसर - अटारी येथील तपास नाक्यावर पाकमधून परतलेल्या दोन महिलांसह तीन लोकांकडून कस्टम विभागाने बंदूक आणि ७ मॅगझिन शासनाधीन केले. जप्त करण्यात आलेल्या ३ बंदुका तुर्की, तर एक बंदुक इटली बनावटीची आहे. माहितीनुसार पकडण्यात आलेले आरोपी उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यातील डांगरू या गावातील आहेत. शामली येथील महंमद इस्माईल याच्या नेतृत्वाखाली हे पाचही जण २१ एप्रिल या दिवशी पाकिस्तानात गेले होते.चीन करत आहे युद्धाची सज्जता !

भारताची शत्रूराष्ट्रे युद्धासाठी सिद्धता करत असतांना भारतात 
सैन्याधिकार्‍यांची सहस्रो पदे रिक्त आहेत, हे लक्षात घ्या !
     बीजिंग - कोणत्याही क्षणी युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेऊन २३ लाख सैनिक असलेला चीन सैनिकी बळ वाढवण्याची सिद्धता करत आहे. चीनकडून चित्रफितीच्या माध्यमातून युवकांना वायूसेना, रणगाडे आणि विशेष दलाचे सैनिक दाखवले जातात. तसेच पाश्‍चिमात्त्य संगीतही ऐकवले जात आहे. अशा प्रकारे चीन युवकांना सैन्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन आमिषे दाखवत आहे. ही चित्रफीत चीनच्या संरक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नुकतीच ठेवण्यात आली आहे. 
     या चित्रफितीमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाची शक्यता वर्तवण्यात आली असून युवकांना युद्धासाठी सिद्ध रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर यात आम्हाला केवळ शत्रूला मारण्याची प्रतीक्षा आहे, अशा अर्थाच्या ओळी असणारे गाणेही ऐकवण्यात येत आहे. यात अत्याधुनिक सैनिक आणि शस्त्रास्त्रे दाखवण्यासह चीनकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. भारतीय जीवन विमा निगममध्ये देशातील सर्वांत मोठा घोटाळा ! - ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांचा आरोप

प्रशांत भूषण यांच्याकडे याविषयीची माहिती असेल, तर ती त्यांनी तात्काळ जाहीर 
करावी आणि घोटाळ्यातील संबंधितांना कठोर शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करावेत !
     संभाजीनगर, १० मे - सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गियांची लक्षावधी रुपये गुंतवणूक असलेल्या भारतीय जीवन विमा निगममध्ये (एलआयसी) आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा झाला आहे. याविषयीच्या कागदपत्रांचा अभ्यास चालू असून लवकर सर्व घोटाळा उघडकीस येईल. त्याविषयी लवकरच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी ८ मे या दिवशी केला. बँक कर्मचारी प्रबोधिनीच्या वतीने येथील संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहात द ग्रेट बँक डिफॉल्टर विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

सद्गुरु तोडकर महाराज मंदिर येथे संत-महंत यांच्या उपस्थितीत अमृत कुंभाभिषेक सोहळ्याचे आयोजन

कुंभाभिषेक सोहळ्यात उपस्थित
संत-महंत आणि भाविक
     अमृतनगर-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर), १० मे (वार्ता.) - श्रीक्षेत्र अमृतनगर येथील महासिद्ध शिवगुरु आश्रमात सद्गुरु तोडकर महाराज मंदिर येथे ८ मे या दिवशी अमृत कुंभाभिषेक सोहळा संत-महंत यांच्या उपस्थितीत भावपूर्व वातावरणात पार पडला. ६ मे या दिवशी श्री हनुमतरुद्र सूक्तयाग झाला. ७ मे या दिवशी प.पू. महेश जोशी महाराज यांच्या हस्ते श्री दत्तयाग पार पडला. या वेळी महासिद्धगुरु शिवगुरु आश्रमाच्या १८ साधक भक्तांनी समष्टी कल्याणाकरिता दत्तयागात आहुती दिली.

पुणे जिल्ह्यात १ जुलैला अठरा लाख झाडे लावणार !

     पुणे, १० मे - वन महोत्सवाच्या कालावधीत राज्यात १ जुलै या दिवशी २ कोटी वृक्षांचे रोपण करण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. महाराष्ट्र राज्य वन महामंडळाच्या वतीने दीड कोटी झाडे लावण्यात येणार असून उर्वरित ५० लक्ष झाडे अन्य विभागांच्या वतीने लावण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातही १ जुलै या दिवशी अठरा लक्ष झाडे लावण्याचे प्राथमिक उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (केवळ वृक्षांची लागवड न करता वृक्षांच्या संगोपनाचेही नियोजन निश्‍चित करण्यात यावे, ही अपेक्षा ! - संपादक) जळगाव येथे अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर रणरागिणींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

तलवार हातात घेऊन रणरागिणी आणि समवेत अन्य रणरागिणी महिला
     जळगाव - 'रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो..., जय भवानी जय शिवाजी...' या घोषणांच्या गजरात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर येथील सुभाष चौकातील श्री भवानीदेवीच्या मंदिरात हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखा कार्यान्वित झाली. या वेळी हिंदूंच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत रहाण्याची उपस्थित रणरागिणींनी शपथ घेतली. या प्रसंगी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. रागेश्री देशपांडे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष सौ. मंगला बारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. शंखनाद आणि शक्तीस्तवन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर भवानीदेवीची ओटी भरण्यात आली, तसेच हिंदु स्त्रियांमधील वीरश्री जागवण्यासाठी सौ. मंगला बारी यांच्या हस्ते श्री भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा जाधव यांनी केले. 

शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक अज्ञातांनी पळवला !

     गावठणवाडी (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), १० मे (वार्ता.) - येथे प्रत्येक वर्षी परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या वर्षी ८ मे या दिवशी आेंकार तरुण मंडळ, तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने साजर्‍या केल्या जाणार्‍या शिवजयंतीनिमित्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शिवजयंती कार्यक्रमाचे फ्लेक्स फलक लावले होते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आडसोळवाडी फाटा येथे लावलेला फलक मात्र अज्ञातांनी पळवल्याचे निदर्शनास आले. (शिवजयंतीचे कार्यक्रम कोणाला होऊ नये, असे वाटते, ते उघड आहे. हिंदुद्वेष्ट्या मंडळींची कारस्थाने हाणून पाडण्यासाठी शीघ्र गतीने व्यापक प्रमाणात हिंदुत्वाचा प्रसार करायला हवा. - संपादक)

आतंकवादामुळे ४६४ अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी २० सहस्र पोलीस, तर देहलीच्या १ कोटी ९२ लाख नागरिकांसाठी केवळ ३२ सहस्र पोलीस !

जिहादी आतंकवादावर ठोस उपाययोजना न काढता नेभळट धोरणे राबवल्याचाच हा परिणाम !
     नवी देहली - देहलीतील ४६४ अतीमहनीय व्यक्तींना झेड प्लस अथवा झेड अथवा वाय आदी प्रकारच्या सुरक्षा पुरवल्या गेल्या असून उर्वरित १ कोटी ९२ लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी केवळ ३२ सहस्र पोलीस असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (या संख्येवरून लोकांनी लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून राबवलेली लोकशाही लोकच कशी निरर्थक ठरवत आहेत, हे लक्षात येते ! - संपादक) 
     एका महनीय व्यक्तीला सरासरी ४३ पोलीस सुरक्षा पुरवतात; तर १ पोलीस ६०० सामान्य व्यक्तींना सुरक्षा पुरवतो. (यावरून सामान्य जनताच आतंकवादाच्या छायेतच जगत आहे, हे स्पष्ट होते ! - संपादक) एवढे असूनही अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी देहली पोलिसांना अधिक पोलीस बळाची आवश्यकता आहे.काश्मीरमध्ये सैनिकांच्या वसाहतीसाठी भूमी दिली नाही !

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचे स्पष्टीकरण
     श्रीनगर - काश्मीरमध्ये सैनिकांच्या वसाहतीसाठी भूमी दिल्याचा दावा मुख्यमंत्री मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी फेटाळला आहे. जम्मू-काश्मीरमधील काही सैनिकांनी भूमीची मागणी केली होती; मात्र त्यांना कोणतीही भूमी देण्यात आली नाही, असे मुख्यमंत्री मुफ्ती यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. 
    काश्मिरी पंडितांच्या वसाहतीविषयी बोलतांना मुख्यमंत्री मुफ्ती म्हणाल्या, काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत उभारण्यात येणार नाही, तर त्या वसाहतीमध्ये राज्यातील इतरही लोकांना रहाण्याची मुभा असणार आहे. ओमर अब्दुल्ला लोकांना चुकीची माहिती देत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. यावर ओमर यांनी महबूबा यांच्यात ध्यैर्य असेल, तर त्यांनी २४ घंट्याच्या आत माझ्या विरोधात खटला दाखल करावा, असे आव्हान दिले.जम्मू-काश्मीरमध्ये गौपुत्र सेनेकडून २० गायींची सुटका

जम्मू-काश्मीरमध्ये २० गायींना वधापासून मुक्ती देणार्‍या गौपुत्र सेनेचे अभिनंदन !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये गोरक्षणासाठी कार्यरत गौपुत्र सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. खेमराज यांच्या नेतृत्वाखाली गौपुत्र सैनिकांनी अरनिया भागात धाड टाकून गोतस्करांना जोरदार चोप दिला आणि २० गायींची सुटका केली. त्यानंतर गोरक्षकांनी आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले. सुटका करण्यात आलेल्या गायींना स्थानिक गोशाळा आणि शेतकरी यांच्याकडे सोपवण्यात आले. या गायी गोतस्करांनी मले दे कोठे या गावात कापण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्या होत्या. (मुसलमानबहुल भाग असूनही गोरक्षणाचे कार्य धैर्याने करणार्‍या गोपुत्र सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा ! - संपादक)


फलक प्रसिद्धीकरता

जिहाद्यांच्या पाठीशी असलेल्या पाक शासनाला भारत धडा शिकवील का ?
      मुंबईवरील २६/११ चे आक्रमण आपल्याच माणसांनी केले होते, असे आयएस्आयच्या तत्कालीन प्रमुखांनी पाकचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांना सांगितल्याची स्वीकृती त्यांनी त्यांच्या आगामी पुस्तकातून दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
Mumbaipar hua 26/11 ka akraman Pakke jihadiyone kiya tha- Pakke bhutpurva Rajdut Hussain Hakkani Jihadiyoke palanhaar Pakko Bharat sabak kab sikhayega?
जागो ! :
मुंबई पर हुआ २६/११ का आक्रमण पाक के जिहादियों ने किया था - पाक के भूतपूर्व राजदूत 
हुसैन हक्कानी जिहादियों के पालनहार पाक को भारत सबक कब सिखाएगा ?


कन्हैया कुमारला पाठिंबा दिल्याने धमकीचे पत्र

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी 
संस्थेपाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटलाही स्फोटकांसह धमकीचे पत्र 
     पुणे, १० मे - भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) ७ मे या दिवशी धमकीचे पत्र पाठवल्याची घटना ताजी असतांनाच येथील रानडे इन्स्टिट्यूटच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख माधवी रेड्डी यांना धमकीचे पत्र ९ मे या दिवशी मिळाल्याचे उघड झाले आहे. अज्ञातांनी पाठवलेल्या त्या पत्रात 'तुमच्या संस्थेतील काही जणांनी कन्हैया कुमारला पाठिंबा दिल्याने धमकीचे पत्र पाठवल्याचे' नमूद केले आहे. या पत्रासमवेतही डिटोनेटर आणि स्फोटकसदृश पावडर सापडली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 

बेंगळुरू (कर्नाटक) जिल्ह्यातील सनातनच्या ७ साधिका जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

पहिल्या रांगेत डावीकडून सौ. उमा सुरेश, सौ. अनुसया,
श्रीमती लक्ष्ममम्मा नायक, सौ. सविता वेणूगोपाल, खुर्चीवर बसलेले
 डावीकडून सौ. मधू पटेल, श्री. रामानंद गौडा, सौ. रेखा पै, सौ. लक्ष्मी कृष्णमूर्ती
     बेंगळुरू - जिल्ह्यातील सनातन संस्थेच्या ७ साधिका आध्यात्मिक उन्नती करून जन्मू-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत. त्यानिमित्ताने सनातन संस्थेचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. रामानंद गौडा यांनी त्यांचा भेटवस्तू देऊन नुकताच सत्कार केला. यात सौ. उमा सुरेश (वय ४३ वर्षे) ६१ टक्के, सौ. अनुसया (वय ५६ वर्षे) ६१ टक्के, श्रीमती लक्ष्ममम्मा नायक (वय ६० वर्षे) ६२ टक्के, सौ. सविता वेणूगोपाल (वय ४४ वर्षे) ६२ टक्के, सौ. मधू पटेल (वय ५३ वर्षे) ६३ टक्के, सौ. रेखा पै (वय ६५ वर्षे) ६२ टक्के, सौ. लक्ष्मी कृष्णमूर्ती (वय ६४ वर्षे) ६३ टक्के यांचा समावेश आहे. 

हिजबुल मुजाहिदीनचे जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात वावरतांना आढळले !

आतंकवादग्रस्त जम्मू-काश्मीर !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात असलेल्या घनदाट जंगलात हिजबुल मुजाहिदीनचे जिहादी आतंकवादी सैन्याच्या गणवेशात वावरतांना आढळले आहेत. इंडिया टूडेने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओतून ही माहिती समोर आली आहे. या जिहाद्यांकडे एके-४७ रायफलीही होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशाच्या विक्रीवर संपूर्ण प्रतिबंध असूनही जिहाद्यांच्या हाती हे गणवेश कसे लागले, याविषयी आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (यावरून सैन्यातील अज्ञात अधिकारी अथवा सैनिक या जिहाद्यांना साहाय्य करतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ! त्यामुळे संबंधितांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. - संपादक)

गोव्यात गोमांस विक्रीवर बंदी घालण्यासंबंधी शिवसेनेने केलेल्या विधानाला काँग्रेसचा आक्षेप !

ख्रिस्त्यांच्या मतांसाठीच असा आक्षेप घेतला जातो, हे जनता ओळखून आहे.
     पणजी - गोव्यात गोमांस विक्रीवर बंदी घालण्यासंबंधी शिवसेनेने केलेल्या विधानाला गोव्यातील काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने अशी विधाने करणे बंद करावे, असे मत गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव दुर्गादास कामत यांनी व्यक्त केले आहे. 
     दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे की, शिवसेनेने केलेले उपरोल्लेखित विधान हे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बहुसंख्य मतदारांचे ध्रूवीकरण आणि मतदारांमध्ये फूट घालण्यासाठी केले गेले आहे. (काँग्रेस गोमांस विक्रीला समर्थन देते त्या वेळी ख्रिस्त्यांच्या मतांचे ध्रूवीकरण होत नाही का ? हिंदुत्ववाद्यांनी काही म्हटले की, त्याला ध्रूवीकरण, धर्मांधता, मूलतत्त्ववाद असे म्हणून हिणवायचे हा काँग्रेसला जडलेला पारंपरिक विकार आहे. गोहत्या ही हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारी आहे. त्यामुळे ती बंद झालीच पाहिजे ! - संपादक) गोमंतकातील जनता अशा विधानांना बळी पडणार नाही. (म्हणे) १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपांविषयी श्री अकाल तख्तची क्षमा मागणार !

३२ वर्षांनंतर साडेतीन सहस्र शिखांच्या हत्याकांडांवर काँग्रेसचे नेते जगदीश टाईटलर यांचे नक्राश्रू !
अशांना क्षमा नाही, तर कठोरातील कठोर शिक्षा, हेच एकमेव प्रायश्‍चित्त !
     नवी देहली / चंडीगड - वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीत झालेल्या शीखविरोधी दंगल करणार्‍यांचे नेतृत्व केल्याचा आरोप काँग्रसेचे नेते जगदीश टाईटलर यांच्यावर आहे. आता पंजाबमध्ये जवळ येत असलेल्या विधानसभा निवणुकांच्या पार्श्‍वभूमीवर टाईटलर यांनी या दंगलीप्रकरणी शिखांची सर्वांत मोठी धार्मिक संस्था असणार्‍या अकाल तख्तची क्षमा मागणार असल्याचे म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार स्वतःवरील आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी टाईटलर यांनी श्री अकाल तख्त साहिब यांना पत्र लिहिण्यासह प्रत्यक्ष क्षमा मागण्यासाठी आणि स्पष्टीकरण देण्यासाठी निवेदनही दिले आहे. टाईटलर यांच्या निवेदनावर अकाल तख्तने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हिंदुद्वेषी आझम खान यांना अटक करण्याची साध्वी प्राची यांची मागणी !

     बरेली (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशच्या सत्ताधारी समाजवादी पक्षातील मंत्री आझम खान यांनी साधूसंतांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना अटक करून कारागृहात डांबायला हवे. प्रत्यक्षात जेव्हा त्यांनी अपमान केला, तेव्हाच उत्तरप्रदेश शासनाने त्यांना मंत्रीमंडळातून हाकलायला हवे होते; परंतु शासनाच्या उदासीनतेवरून हिंदु धर्माविरोधात बोलण्यासाठीच समाजवादी पक्षाने आझम खान यांची नेमणूक केलेली दिसते, असा आरोप विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी प्राची यांनी केला आहे.
      बरेली येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या पुढे म्हणाल्या की, आझम खान यांचे मौलाना महंमद जौहर विद्यापीठ हे जिहाद्यांचे नंदनवन बनत चालले आहे. केंद्रशासनाने त्याची चौकशी करायला हवी. खान यांनी उघडलेल्या मदरशांचीही चौकशी व्हायला हवी.

गेल्या ३ वर्षांत ११२ वैमानिकांनी मद्यप्राशन करून विमान चालवले ! - केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री

 • वैमानिकाच्या नियमांचा भंग झाल्यावरही त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही !
 • प्रवाशांच्या जीविताशी काही देणे-घेणे नसणार्‍या वैमानिकांना कठोर शासनच व्हायला हवे !
     नवी देहली - जानेवारी २०१३ ते २८ एप्रिल २०१६ या कालावधीत विविध एअरलाइन्सच्या ११२ वैमानिकांनी मद्यप्राशन करून विमान चालवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाला लेखी उत्तर देतांना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी ही माहिती दिली. 
      नागरी उड्डाण संचालक मंडळाने (डीडीसीएने) दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत शर्मा म्हणाले की, एअर इंडिया, इंडिगो आणि जेट एअरवेज या आस्थापनांच्या वैमानिकांकडून ही अक्षम्य चूक झाली आहे. तसेच उड्डाणाच्या २४ व्या नियमानुसार, वैमानिकाने उड्डाणाच्या वेळी मद्यप्राशन केलेले नसावे; परंतु ११२ वैमानिकांनी या नियमाचा भंग केला असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मद्यप्राशन करून एकदा विमान चालवल्याचे लक्षात आल्यास वैमानिकाला ३ मासांसाठी निलंबित करण्यात येते. दुसर्‍यांदा चूक झाल्यास ३ वर्षांसाठी आणि तिसर्‍यांदा चूक झाल्यास ५ वर्षांसाठी वैमानिकाला निलंबित करण्यात येते; परंतु गेल्या ३ वर्षांत कोणत्याच वैमानिकाला निलंबित करण्यात आलेले नाही. (वैमानिकांबरोबरच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांचाही हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. यासाठी केंद्रशासन संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करील, अशी अपेक्षा ! - संपादक)अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी महंमद आशिक या वासनांधास अटक !

देशात मुसलमानांसाठी शरीयत लागू करण्याची मागणी करणारे आता महंमद आशिक 
या बलात्कार्‍याला शरीयतनुसार शिक्षा देण्याची मागणी करतील का ?
     कोची (केरळ) - येथील अलुवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी महंमद आशिक नावाच्या वासनांधाला त्याच्या घराशेजारी रहाणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराप्रकरणी अटक केली आहे. वेलियाथुनाडू या गावातील ही घटना असून सदर घाबरलेल्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर हे प्रकरण समोर आले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले. महंमद आशिकने त्याचा गुन्हा स्वीकारला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.ऑगस्टा वेस्टलॅण्ड आणि सिग्नोरा गांधी !

ब्रिगेडियर हेमंत महाजन
      फेब्रुवारी २०१० मध्ये भारताने १२ ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स ३६०० कोटी रुपयांत खरेदी करण्याचा करार इटली येथील उत्पादक कंपनी फिनमेकानिकाशी केला. २०१२ मध्ये इटलीच्या वृत्तपत्रांत या हेलिकॉप्टर खरेदीत भारतियांना लाच दिली गेल्याच्या बातम्या उमटल्या. या बातम्या भारतातील वृत्तपत्रांतही ठळकपणे आल्या. मनमोहन सिंह शासनाने या आरोपांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) माध्यमातून चालू केली. त्यात तथ्य आढळून आले. २५ मार्च २०१३ या दिवशी संसदेत या सूत्रावर तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅण्टनी यांनी या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची स्वीकृती दिली. होय, हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला आहे आणि लाचही दिली गेली आहे. सीबीआय या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे, असे अ‍ॅण्टनी यांनी संसदेत सांगितले. यावरून तर आणखीनच गदारोळ माजला.

काँग्रेस आणि लोकशाही !

कु. प्राजक्ता धोतमल
      सध्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याचे सूत्र चर्चेत आहे. घोटाळे करणार्‍यांच्या स्वत:ची तिजोरी भरा आणि देशाशी प्रतारणा करा, या धोरणाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा अक्षरश: खेळ मांडला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात मात्र चांगलीच जुंपली आहे. क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजाने चेंडू फेकावा आणि फलंदाजाने येणार्‍या चेंडूला फटकारावे, तसे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चालू आहे. सत्ताधारी भाजप पक्ष दोषींच्या शोधासाठी सीबीआयसारख्या अन्वेषण यंत्रणांचे साहाय्य न घेता काँग्रेसवर विनाकारण आरोप करून काँग्रेसला अपकीर्त करत आहे आणि लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या सोनिया गांधींनी लोकसभेवर मोर्चा काढला. आधीच काँग्रेस पक्षाची दाणादाण उडालेली असतांना उरलासुरला विश्‍वास टिकवून ठेवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत जमावबंदीचा आदेश धुडकावून हा मोर्चा काढण्यात आला. ऑगस्टाच्या या प्रकरणात कोण दोषी, कोण निर्दोष हे तपासाअंतीच कळेल; मात्र काँग्रेसने सध्या केलेला हा आरोप म्हणजे चोराने चोरी केल्याचे नाकारण्यासारखा आहे. गेल्या अनेक दशकांत काँग्रेसच्या कार्याचा मागोवा घेतला, तर काँग्रेसने लोकशाहीच्या मूल्यांना आपल्या कारकीर्दीत कोणते स्थान दिले आहे, हे लक्षात येईल.

पाण्याचे निव्वळ राजकारण !

     पुण्यातील खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर यांसाठी १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला. त्याला विरोध म्हणून जलसंपदा विभाग अभियंत्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापासून ते मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणे आदी अनेक प्रकारे आंदोलन करण्यात आले. हा विरोध करण्यामागे मुख्य कारण बापट यांनी हा निर्णय महानगरपालिकेतील पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेता दिला, असे सांगण्यात येते. या निर्णयाचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार आहे, असेही कारण पुढे करण्यात आले. महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातूनच पाणी सोडण्याच्या प्रश्‍नी राजकारण केले जात आहे, हे स्पष्ट होते. पाणी सोडण्याच्या प्रश्‍नी होणारा विरोध काही संदर्भात योग्य वाटला, तरी माणुसकीच्या दृष्टीने चुकीचा निश्‍चितच वाटतो. कारण सोडण्यात आलेले पाणी हे नागरिक आणि जनावरे यांना मिळणार होते. त्या पाण्यामुळे विहिरी आणि कालवे भरले जाणार आहेत. पाणी सोडण्याच्या प्रकरणी खरे पहावयास गेले, तर कोणास पोटदुखी होण्याचेही काही कारण नाही. दौंड गावास पाणी देण्यासाठी पुणेकरांनी मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागाप्रमाणे आणखी थोडे सहन केल्यास अडचणीचे ठरणार नाही. या प्रकरणी आक्षेप घेणारे राजकारणी आणि नागरिक कोत्या मनाचे आहेत, असे वाटते.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
वेळेचा योग्य वापर होण्यासाठी प्रतिदिन दैनंदिनी लिहावी !
१. दैनंदिनीचे स्वरूप
दैनंदिनीचे स्तंभ साधारणपणे पुढीलप्रमाणे असावेत. 
   पालकांना विचारून या स्तंभांत काही सुधारणा केली, तरी चालेल.
२. दैनंदिनी कशी लिहावी ?
अ. दैनंदिनी लिहितांना आरंभी तिथी / दिनांक लिहावा. 
आ. त्यानंतर किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत ? या स्तंभात कृतींच्या वेळा (उदा. सकाळी ६ ते ६.३०, ६.३० ते ७.१०) एकाखाली एक लिहाव्यात.

हिंदू मुलांपेक्षा मुसलमान युवक अधिक धर्माभिमानी ! - स्वामी परमानंद, ज्योतिषाचार्य

उज्जैन येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेल्या 
प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया
स्वामी परमानंद
     माझा जन्म काशी येथे झाला असून मी पुणे विद्यापिठातून रसायनशास्त्रातील पदविका घेतली आहे. आमचे महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात, तर मध्यप्रदेशात धार जिल्ह्यात आश्रम आहेत. मी कथाकार आहे. मी भागवत, रामायण, शिवपुराण आणि देवी भागवत यांवर कथा करतो. या कथेच्या माध्यमांतून तरुण युवकांना बोधपर मार्गदर्शक ठरील, असे माझ्या प्रत्येक कार्यक्रमात युवकांना सांगण्याचा प्रयत्न करतो; परंतु मी अयशस्वी ठरतो. 
      मी भरपूर दिवसांपासून चिंतीत आहे; कारण आजच्या हिंदु युवा पिढीला ना धर्माची ओढ, ना मंदिरांची, तर याउलट मुसलमान युवकांसह ५-६ वयोगटातील लहान-लहान मुले यांना इस्लाम धर्म काय किंवा त्यांची शिकवण आचरणात आणण्याविषयी सांगायची आवश्यकता लागत नाही; कारण त्यांना धर्मशिक्षण दिले जाते. आपले युवक मंदिरात जात नसतील; पण ती मुले न चुकता मशिदीत जातात. ५ वेळा नमाज पढतात.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

एक साधै सब साधै या वचनाप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक !

     सनातन हिंदु धर्म वटवृक्षासारखा आहे आणि या वृक्षाच्या सर्वच फांद्यांवर सध्या चोहोबाजूंनी आघात केले जात आहेत. मग ते गोहत्या असो कि लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवादी घुसखोरी इत्यादी. या एक-एक समस्या सोडवत बसल्यामुळे हिंदूंची शक्ती विभागली गेली आहे. आपल्याला एक-एक फांदी नव्हे, तर संपूर्ण हिंदु वटवृक्ष वाचवायचा आहे. त्यासाठी एक साधै सब साधै, म्हणजे एक (एका ईश्‍वराला) साध्य केले की सर्व साध्य होते. या न्यायानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समितीआद्य शंकराचार्यांप्रमाणे घराघरामध्ये जाऊन धर्म आणि संस्कार जागृती यांचे कार्य केले पाहिजे !

     आज अनेक संत, महामंडलेश्‍वर, शंकराचार्य, जगद्गुरु आहेत, पण ते काय करतात ? आद्य शंकराचार्यांनी घराघरामध्ये जाऊन जसे धर्म आणि संस्कार जागृती यांचे कार्य केले, तसे कार्य चालू केल्याविना हिंदु राष्ट्र कसे येणार ? त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून संस्कार चालू केले पाहिजेत. पूर्वी जसे संस्कार जपले जात होते, तसे जपले गेले पाहिजेत. - महामंडलेश्‍वर रामभूषणदासजी महाराज, गुजरात

हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजून सांगणारा सनातनचा ग्रंथ !

धर्मग्रंथ
 • हिंदूंच्या धर्मग्रंथांची वैशिष्ट्ये कोणती ? 
 • धर्मग्रंथांतील ज्ञान चिरंतन का असते ?
 • मनुस्मृतीत कोणत्या विषयांचे वर्णन आहे ?
 • धर्मग्रंथांप्रमाणे आचरण करणे आवश्यक का ?
 • धर्मग्रंथांवरील टीकांना उत्तरे का आणि कशी द्यावीत ?
संपर्क : गोवा - (०८३२) २३१५९१९ पनवेल - (०२१४३) २३३१२०
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !
     भारतात रहाणार्‍या लोकांचे साधारणतः दोनच प्रकारांत वर्गीकरण केले जाऊ शकते. काही लोक हिंदु आहेत आणि काही लोक हिंदु होते ! - स्वामी चिन्मयानंद

साधनेसाठीच जुळून येती विवाहाच्या रेशीमगाठी । गुरुकृपेने आध्यात्मिक जीवना पूरक होती अशी ही नाती ॥

सौ. सारिका, कु. विश्‍व (मुलगा) आणि श्री. कृष्णा आय्या
       सौ. सारिका आय्या ही सनातनच्या गोव्यातील रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधिका म्हणून सेवा करते. साधना करणे हेच तिच्या जीवनाचे ध्येय असल्याने ती अन्य मुलींप्रमाणे विवाहोत्सुक नव्हती. प.पू. डॉक्टरांनी सांगितल्यावर विवाहानंतर साधना करू देणारा मुलगा असेल, तरच विवाह करायचा, असे विचार असलेल्या सारिकाला साधनाच करायची होती. चांगले प्रतिष्ठित घराणे असलेल्या सारिकाची ध्येयासाठी सर्व सुखोपभोगांचा त्याग करण्याची सिद्धता होती. तिला समाजातून आधुनिक वैद्य, अभियंते यांची प्रतिष्ठित स्थळे येत असूनही केवळ तिच्या ध्येयाला पूरक स्थळ आहे, या एकाच निकषावर श्री. कृष्णा आय्या यांची मिळकत आणि शिक्षण अल्प असूनही ही ध्येयवेडी विवाहास सिद्ध झाली. मुळातच सात्त्विक वृत्ती असलेल्या आईवडिलांनीही त्यासाठी तिला पूर्ण सहकार्य केले. मुलगा किंवा त्याचे घरदार न पहाता केवळ मुलीच्या विवाहोत्तर जीवनात तिला साधना करण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी तिच्या विवाहाला होकार दिला. तिच्या या तळमळीमुळे तिचेे यजमानही आता पूर्णवेळ साधक म्हणून आश्रमात राहून साधना करत आहेत. साधनेसाठी पूरक विवाहगाठी देवच जुळवतो. म्हणूनच अशा पद्धतीने विवाह होणे, ही या कलियुगातीला अद्भूत घटना आहे, असे प.पू. डॉक्टरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

रामनाथी आश्रमावर स्थापित होणार्‍या कळसांच्या पूजनाच्या वेळी सौ. रंजना गौतम गडेकर यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

सौ. रंजना गडेकर
१. विधी चालू होण्यापूर्वी
अ. विधी चालू होण्यापूर्वी ३ कळसांपैकी मधल्या कळसाभोवती लाल प्रकाश दिसला.
आ. डाव्या बाजूला असलेल्या तांब्याच्या कळसाभोवती पिवळा आणि उजव्या बाजूच्या कळसाभोवती निळा प्रकाश दिसला.
२. विधी चालू झाल्यानंतर
अ. श्रीविष्णूचे आवाहन केल्यावर मधल्या कलशाच्या ठिकाणी श्रीविष्णु दिसला.
आ. विधीच्या कालावधीत ज्या ज्या देवतांना प्रार्थना आणि आवाहन केले, त्या सगुण रूपात त्या ठिकाणी प्रकट झाल्याचे दिसले.
इ. कळसांत चैतन्य कार्यरत असलेले दिसले.

रामनाथी आश्रमावर स्थापित करण्यासाठी आणलेल्या सोनेरी कळसाकडे पाहून जाणवलेली सूत्रे

महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमावर लावण्यासाठी
आणलेल्या कळसाचे ध्यानमंदिरात केलेले पूजन
      ३.३.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपासाठी बसले होते. तेव्हा रामनाथी आश्रमात कळसारोहणासाठी आणलेला सोनेरी कळस दिसला. त्या कळसाकडे पाहून जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

श्री गुरूंचे मन जिंकण्याच्या तळमळीमुळे विवाहादी मायेतील सुखांचा त्याग करून साधनेसाठीच आयुष्य वेचणारे काही दृढनिश्‍चयी युवा साधक !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
        विविध जिल्ह्यातील अनेक उच्चशिक्षित युवा साधक सनातनच्या आश्रमात आणि प्रसारात पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांपैकी काही जणांनी स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेणे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी खारीचा वाटा उचलणे हे माझे जीवनातील ध्येय आहे. त्यामुळे विवाहादी मायेत न अडकता मी या ध्येयासाठीच माझे जीवन समर्पित करणार आहे, असा दृढनिश्‍चय केला आहे.
त्यागी वृत्ती आणि ध्येयनिष्ठा यांमुळे तरुण वयात असा निर्धार करणार्‍या अन् ध्येयपूर्तीसाठी झोकून देऊन प्रयत्न करणार्‍या या साधकांचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे !
        या साधकांची पुष्कळ जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होऊ दे, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, (८.५.२०१६)
युवा साधकांची 
क्रांतीकारकांप्रमाणे अढळ ध्येयनिष्ठा !
        भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ठिकठिकाणचे अनेक तरुण युवक त्यांच्यातील जाज्वल्य राष्ट्राभिमानामुळे आपल्या प्राणांची आहूती देण्याच्या सिद्धतेने त्या क्रांतीयज्ञात सहभागी झाले होते. घर-दार, विवाह आदींपेक्षा राष्ट्र स्वतंत्र होण्यास प्राधान्य देणार्‍या या क्रांतीकारकांचा आदर्श ठेवून हे युवा साधक साधनारत आहेत, असे म्हटल्यास नवल ते काय !

महर्षींची दिव्य वाणी

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
१. संतभूमी असलेल्या महाराष्ट्रासारख्या पुण्यभूमीत पाणी नाही, याला देव कारणीभूत नसून प.पू. डॉक्टरांना विरोध करणारे विरोधकच कारणीभूत असणे आणि पुढे अन्नही मिळणार नसणे : संतभूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात गुरूंचा (प.पू. डॉक्टरांचा) जन्म झाला. अशा या पुण्यभूमीतच त्यांना विरोध झाल्यामुळे आज महाराष्ट्र राज्यात पाणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुढे या भूमीत अन्नासाठी लोक भांडून भुकेने मरतील. यात देवाची काही चूक नाही.
(संदर्भ : महर्षि, ७२ वे नाडीवाचन, चेन्नई, तमिळनाडू (२६.४.२०१६)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. शासकीय खर्चाने अरेबिक भाषेची उन्नती केली जाते; पण संस्कृतची नाही. अरेबिक भाषा संस्कृतपेक्षा अधिक राष्ट्रीय आहे का ?
२. आसाममधील आय.एम्.टी.डी. कायद्याने बांगलादेशी मुसलमानांना हिंदुस्थानात येऊन रहावयाचे आणि भारतीय नागरिक होण्याचे अधिकार दिले आहेत; परंतु भारतीय नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये कायमचे राहू शकत नाहीत, असा दुजाभाव का ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

लाभावा अखंड सहवास अंतरी गुरुचरणांचा ।

श्री. अभिजीत देशमुख
क्षय नाही जिथे भाव-भक्तीचा ।
धो धो पाऊस सदैव चैतन्याचा ।
अखंड सहवास गुरुचरणांचा ।
लाभला आज आनंदाचा दिन ।
रामनाथी आश्रमाला ॥ १ ॥
कोटी देवतांचा सहवास जिथे ।
योगेश्‍वर कृष्ण वसे सगुण रूपे ।
आनंद शांती नांदे सर्वत्र जिथे ।
करितो नमन या कृष्णगोकुळाला ॥ २ ॥
       शब्दांमुळे भावना व्यक्त करण्याची, भाषेमुळे संवादाची आणि गणितामुळे व्यवहाराची अडचण सुटते, तर साधनेमुळे जन्म-मृत्यूची अडचण सुटते. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०१६)
       हिंदूंनो, पाकिस्तानधार्जिण्यांवर पूर्णपणे सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घाला अन् त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका किंवा त्यांना काही विकूही नका !
- आचार्य स्वामी धर्मेंद्र महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

साधकांना सूचना !

सनातनच्या ग्रंथांविषयीच्या माहितीपत्रकांचा 
परिणामकारक उपयोग करा आणि अधिकाधिक 
ग्रंथवितरणाद्वारे समाजाला साधनेसाठी प्रवृत्त करा !
         साधकांनी प्रसाराच्या वेळी ग्रंथांची माहिती देतांना किंवा ग्रंथांसाठी प्रायोजक मिळवतांना उपलब्ध रंगीत ग्रंथसूची आणि नव्याने बनवण्यात आलेली माहितीपत्रके यांचा अधिकाधिक उपयोग करावा. सनातन ग्रंथसंपदा ही रंगीत ग्रंथसूची सर्व साधकांकडे उपलब्ध आहे. आता सनातन संस्थेकडून नव्याने प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा समावेश असलेली सनातनची बालसंस्कारविषयक ग्रंथमालिका आणि सनातनची ग्रंथमालिका : आपत्काळातील संजीवनी ! ही माहितीपत्रके (ब्रोशर्स) उपलब्ध करण्यात आली आहेत. ती ए ४ आकारात असून नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्रंथसूची आणि या माहितीपत्रकांचा परिणामकारक उपयोग करून समाजात अधिकाधिक ग्रंथांचे वितरण होईल या दृष्टीने साधकांनी प्रयत्न करावेत. ग्रंथांचे वितरण करतांना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनाच्या 
निमित्ताने प्रबोधनासाठी हस्तपत्रक उपलब्ध !
         हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमीला (११ जून २०१६) या दिवशी असलेल्या बलीदानदिनाच्या निमित्ताने प्रबोधनासाठी ए-५ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकासाठी प्रायोजक मिळवून त्याचा ग्रंथप्रदर्शने, देवस्थाने, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
१२ मे २०१६ या दिवशी गुरुपुष्यामृतयोग आहे.
कालावधी : सूर्योदयापासून रात्री १०.४४ पर्यंत

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       धर्मद्रोही हिंदूंनी उद्या पुरुषांनाही बाळाला जन्म देण्याचा अधिकार असावा, या मागणीसाठी देवाकडे मोर्चा नेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दिशा माझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.
भावार्थ अ : दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मक रहा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जगात यशाचीच पूजा केली जाते. मी यशस्वी होणारच, असे म्हणणारी आणि सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदूंच्या धार्मिक उत्सवांची परवड थांबणार कधी ?

संपादकीय
      ५ मेपासून उज्जैनमधील सिंहस्थस्थळी निसर्गाने परत एकदा रौद्र रूप दाखवण्यास प्रारंभ केला आहे. ५ मे या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने ६ जणांचा प्राण तर घेतलाच याशिवाय अन्य हानी झाली ती वेगळीच. यातून भाविक सावरत असतांनाच ९ मे या दिवशी परत एकदा जोराचा वादळी वारा आणि पाऊस यांमुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. नैसर्गिक हानी जेवढी झाली, त्यापेक्षा कित्येक पट हानी शासन आणि प्रशासन यांची निष्क्रीयता, नाकर्तेपणा, दायित्वशून्यता, नियोजनशून्यता, समन्वयाचा अभाव, इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे झाली. गेल्या सहा दिवसांत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला दिसला. इतका प्रकार होऊन पडझड झालेल्या अनेक तंबूंच्या ठिकाणी ना प्रशासन पोहोचले ना वैद्यकीय सुविधा पोहोचल्या. झालेल्या प्रकारामुळे तेथील भाविक, साधू-संत प्रचंड संतप्त झाले आहेत. हिंदुत्वाच्या नावाने राज्य करणार्‍या शासनाकडून तर हे अजिबात अपेक्षित नसल्याची संतप्त प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn