Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन 
---------------------------
आज रामानुजाचार्य जयंती

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या संत पू. शकुंतला पेठेआजी यांची आज पुण्यतिथी

अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी केंद्रशासनाचा वाढीव निधी !

बहुसंख्य हिंदूंच्या नव्हे, तर अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी
काँग्रेसच्याही दोन पावले पुढे असणारे केंद्रातील शासन !
     नवी देहली - केंद्रशासनाने सेवाभावी संस्थांविरुद्ध कडक धोरण स्वीकारल्याची आणि अल्पसंख्यांकांच्या संस्थांशी भेदभाव केल्याची ओरड होत असतांना, अल्पसंख्यांकांच्या प्रशिक्षणासाठी आणि तत्सम योजना अमलात आणणार्‍या सेवासंस्थांसाठी केंद्रशासनाने केलेल्या साहाय्याची रक्कम काँग्रेस शासनापेक्षा अधिक आहे.
१. लोकसभेत अल्पसंख्यांक व्यवहार खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रशासनाने २०१४-१५ मध्ये ९६ सेवाभावी आणि इतर संस्थांना ३० कोटी ५१ लाख रुपयांचे साहाय्य केले, तर हीच रक्कम २०१५-१६ मध्ये वाढवून ६८ सेवाभावी संस्थांना ४४ कोटी ६८ लाख रुपये देण्यात आले. काँग्रेस शासनात हीच रकम ९३ सेवाभावी संस्थांना १९ कोटी ४६ लाख रुपये एवढी होती.

उज्जैन सिंहस्थपर्वात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावरील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी !

  • साधू-संतांच्या चरणस्पर्शाने क्षिप्रा नदी चैतन्यमय झाली !
  • साधू-संतांच्या आधीच स्नान करून भाविकांकडून अधर्माचरण !
उज्जैन (मध्यप्रदेश), ९ मे (वार्ता.) भगवान श्री महाकालेश्‍वराची मोक्षदायिनी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैन येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिंहस्थपर्वातील दुसर्‍या अमृत (शाही) स्नानाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली. अक्षय्य तृतीयेच्या या अमृत स्नानाच्या औचित्यावर संतांच्या चरणस्पर्शाने क्षिप्रा नदीही श्रद्धाळू आणि भाविक यांप्रमाणे पवित्र होऊन चैतन्यमय झाली. मागील स्नानाप्रमाणे दुसर्‍या अमृत स्नानासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी करून क्षिप्रातटी संतांच्या आधी स्नान करून प्रथा मोडली, तर लोकांच्या प्रचंड गर्दीपुढे हतबल झालेले पोलीस आणि प्रशासन यांनी संत अन् आखाडे यांचे दुपारी २ वाजेपर्यंत स्नान होण्याआधीच लोकांना स्नानासाठी रामघाटावर सोडले. (संतस्नानानंतर त्या पाण्यात अधिक सात्त्विकता येते. त्यामुळे त्यांच्या स्नानानंतर स्नान केल्यास अधिक लाभ होतो, हे हिंदूंना कोणी न शिकवल्याचे हे फळ आहे ! - संपादक)
शंकराचार्य, १० शैव आखाडे, ३ वैष्णव आखाड्यांसह त्यांच्या अंतर्गत येणारे अनेक खालसे, संत, महंत, महामंडलेश्‍वर, नागा साधू यांनी मंगलमय वातावरणात अमृत स्नान केले. 

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर केलेल्या कलशारोहणामुळे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम बनले तीर्थक्षेत्र !

कलशारोहणाने सनातन आश्रमरूपी तीर्थक्षेत्र उजळले । हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस महर्षींचे आशीर्वाद लाभले ॥
रामनाथी (गोवा), ९ मे (वार्ता.) - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्यासारखा ऐतिहासिक विधी येथील सनातनच्या आश्रमात झाला ! नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर ३ दैवी कळसांची अक्षय्य तृतीयेला म्हणजे ९ मे या दिवशी स्थापना झाली. सनातनच्या साधक-पुरोहित पाठशाळेतील वेदब्राह्मणांनी भावपूर्णरित्या केलेल्या विधीत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुपारी १२.१५ ते १.४५ या वेळेत या षोडशोपचार पूजा करून कळसांची स्थापना झाली. कलशारोहणापूर्वी कळसाच्या खाली नवग्रहांचे खडे ठेवण्यात आले. सकाळी ९.४० वाजता सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कळसांना स्पर्श केला. काळाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या कळसांच्या स्थापनेमुळे आश्रमाला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. या कळसांमध्ये ब्रह्मा, विष्णु, महेश, सर्व देवता आणि ८८ सहस्र ऋषिगण आकाशमंडळातून चैतन्य प्रक्षेपित करणार आहेत अन् सर्व साधकांना आशीर्वाद देणार आहेत. 
सनातनचे कार्य विश्‍वव्यापी व्हावे, यासाठी आश्रमावर
स्थापन करण्यात आलेल्या ३ कळसांपैकी १ कळस
सनातनचे कार्य विश्‍वव्यापी व्हावे, तसेच घोर आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षि साधकांवर या कळसांच्या माध्यमातून कृपेचा वर्षाव करत आहेत, यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !

स्वामी नारायण संप्रदायाच्या वतीने पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्कार !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना स्वामी नारायण संप्रदायाचे
प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज आणि १०८ छोटे लालजी श्री पुश्‍वेंद्रप्रसादजी महाराज 
     उज्जैन - पहिल्यांदाच उज्जैन सिंहस्थ पर्वासाठी आलेले स्वामी नारायण संप्रदायाचे नववे वंशज प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज आणि १०८ छोटे लालजी श्री पुश्‍वेंद्रप्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

उज्जैन येथे वादळी वार्‍यासह पावसाचे पुन:श्‍च थैमान !

   उज्जैन - येथे ६ मे नंतर झालेल्या पावसानंतर ९ मेच्या दुपारी ३ च्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाला प्रारंभ झाला. यामुळे ठिकठिकाणी कक्षांच्या सीमा म्हणून लावण्यात आलेले पत्रे उडून गेले. एका संतांनी उभारलेली कमान या वार्‍यामुळे कोसळली. बर्‍याच ठिकाणच्या मांडवामध्ये पाणी शिरले तसेच काही ठिकाणी मांडव कोसळून त्यांची हानी झाली.
सनातनच्या साधकांनी केलेल्या नामजपानंतर काही वेळाने पाऊस थांबला !
   या वेळी सनातनच्या साधकांनी महर्षींनी दिलेला जप केला. पाऊस थांबण्याची शक्यता नव्हती; मात्र साधकांनी जप चालू केल्यानंतर काही वेळाने पाऊस थांबला. महर्षींच्या कृपेने साधकांना कसलीच हानी न पोहोचता साधकांनी उत्साहात सेवा केली. साहित्याची किरकोळ हानी झाली.

७० सहस्रांहून अधिक न्यायाधिशांची आवश्यकता ! सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांचा पुनरुच्चार

हे शासनाला परत परत का सांगावे लागते ?
    नवी देहली - न्याय मिळणे हा जनतेचा मूलभूत हक्क असून शासन तो नाकारू शकत नाही. त्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी प्रलंबित असलेले सर्व खटले निकाली काढणे आवश्यक असून त्याकरता ७० सहस्रांहून अधिक न्यायाधिशांची देशाला आवश्यकता आहे, असा पुनरुच्चार भारताचे सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांनी केला.
    न्या. ठाकूर पुढे म्हणाले, न्यायाधिशांची कमतरता हे देशाच्या न्यायपालिकेपुढील अतिशय मोठे आव्हान आहे. देशात विविध उच्च न्यायालयांमधील न्यायाधिशांच्या ९०० मान्य पदांपैकी ४५० हून अधिक जागा ताबडतोब भरल्या गेल्या पाहिजेेत. देशात केवळ १८ सहस्र न्यायाधीश असून ही संख्या ७० सहस्रांहून अधिक असणे आवश्यक आहे. यापूर्वीही सरन्यायाधीश ठाकूर यांनी भावनाविवश होऊन न्यायाधिशांच्या अपुर्‍या संख्येविषयी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवगत केले होते.

क्षिप्रा तटी सहस्त्रो लोकांनी घेतली नागा संन्याशी साधूंची दीक्षा : २४ संन्यासी महिलांचा समावेश !

नागा-साधू होण्यासाठी श्री पंचदशनाम आखाड्याद्वारे दीक्षा कार्यक्रम 
दीक्षा घेण्यासाठी उपस्थित लोक
     उज्जैन, ९ मे (वार्ता.) - महापर्व सिंहस्थाचे प्रमुख आकर्षण विविध मतांचे अनुयायी असलेले साधू-संत तथा त्यांचे आखाडे हेही आहेत. साधूसंतांची जीवनशैली तथा पूजन-विधी निरनिराळी आहे. संन्यास घेण्यासाठी एका व्यक्तीला कठीण प्रक्रिया पार पाडावी लागते, ही प्रक्रिया पाहून भाविक आणि श्रद्धाळू आश्‍चर्यचकीत झाले. उज्जैन सिंहस्थामध्ये नुकतीच श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याने एक सहस्त्र लोकांना संन्यास दीक्षा दिली. त्यात २४ महिला संन्यासी सहभागी झाल्या होत्या. संन्यास दीक्षेच्या आधी कठीण परिक्षेतून जावे लागते. 
     श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याचे कोषाध्यक्ष महंत श्री कैलाशगिरि महाराज यांनी सांगितले की, संन्यास जीवनात प्रवेश करणार्‍या व्यक्तींचा मोक्षदायिनी क्षिप्रा नदीच्या किनारी सर्वांत प्रथम मुंडन संस्कार करण्यात आला. इतकेच नव्हे, तर सर्व पूर्वज आणि स्वतःचे पिंडदानही करण्यात आले. क्षिप्रा नदीत स्नान झाल्यावर निवृत्ती जीवन प्रारंभ झाले. सर्व संन्यासी रांगेत आखाड्याच्या छावणीत पोहोचले.

शालेय अभ्यासक्रमात योगासनांचा समावेश होणार

     नवी देहली - शालेय अभ्यासक्रमात योगासनांचा समावेश करण्याचा आदेश केंद्रशासनाने राज्यशासनांना दिला असल्याचे आयुष्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत सांगितले. हा अनिवार्य नव्हे, तर ऐच्छिक विषय रहाणार असून मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्याविषयी राज्यांना पत्र पाठवले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना हा विषय घेता येईल, असे त्यांनी एका उत्तरात नमूद केले.
         येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनेल, अशी आम्हाला आशा आहे. पोलिसांना योगासने अनिवार्य करण्यात आली असून संरक्षण मंत्रालयातील सैनिकांसाठीही ते बंधनकारक करण्याची योजना आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात केंद्रशासनाला यश मिळाले आहे. २१ जून २०१५ या दिवशी १९२ देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली.

मत्तूरु (कर्नाटक) येथे झालेल्या सोमयागात बकर्‍यांचा बळी दिल्याचा आरोप !

       बेंगळुरू - कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यात असलेल्या मत्तूरु या ऐतिहासिक गावात २२ ते २६ एप्रिल या काळात झालेल्या सोमयागाच्या वेळी ८ बकर्‍यांचा बळी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या यज्ञाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली असून त्यात बकर्‍यांचा बळी देण्यासह उपस्थित लोक मद्यप्राशन करत असल्याचे दिसत आहे. बकर्‍यांना मारल्यावर त्यांचे अवयव यज्ञाच्या अग्नीत समर्पित करून यज्ञासाठी उपस्थित लोक ते अवयव नंतर खात असल्याविषयीही त्या व्हिडिओत दिसत आहे.

फेसबूकच्या माध्यमातून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या युवतीचे हिंदू महासभेकडून शुद्धीकरण !

     अलीगड - फेसबूकच्या माध्यमातून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या बंगाल येथील एका युवतीचे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण करून तिला स्वधर्मात परत घेतले.
१. युवतीची फेसबूकच्या माध्यमातून अलीगड येथील शादाब याच्याशी मैत्री झाली. त्याने जवळीक साधून तिला अलीगड येथे बोलावले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. 
२. शादाबच्या दबावाखाली तिने इस्लाम धर्म स्वीकारून त्याच्याशी विवाह केला. विवाहानंतर तिचे नाव जरीन असे ठेवण्यात आले. (वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणार्‍या पुरोगामी महिला याविरोधात आवाज उठवणार आहेत का? - संपादक)

जैश-ए-महंमदच्या १३ संशयित आतंकवाद्यांपैकी ६ जणांची सुटका

निरपराध हिंदु युवक कारागृहात आहेत, त्यांना सुधारण्यासाठी कधीपर्यंत वाट पहावी लागणार ?
नवी देहली - देहली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जैश-ए- महंमदच्या १३ संशयित आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यांपैकी ६ संशयित युवकांना सुधारण्याची संधी म्हणून न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांची सशर्त सुटका केली. या सर्वांना पोलिसांकडे त्यांच्या कुटुंबियांसह प्रतिदिन उपस्थिती लावण्याची अट घालण्यात आली आहे.
ओखलाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी या संशयितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली होती आणि फेसबूकवर या युवकांना निदोॅेष असल्याचे म्हटले होते. (धर्मांध आतंकवादी युवकांना पोलिसांनी पकडल्यावर नेहमीच त्यांचे लोकप्रतिनिधी या युवकांना पाठीशी घालून ते निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देतात; मात्र राष्ट्र आणि धर्मासाठी कार्यरत हिंदु युवकांच्या पाठीशी किती हिंदु लोकप्रतिनिधी उभे रहातात ? - संपादक)

दिशा दूरचित्रवाहिनीकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाचे चित्रीकरण अन् पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत !

दूरचित्रवाहिनीला मुलाखत देतांना पू. डॉ. पिंगळे
      उज्जैन, ९ मे (वार्ता.) - उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे दिशा या दूरचित्रवाहिनीकडून चित्रीकरण करण्यात आले. या वेळेस त्यांनी पूर्ण प्रदर्शनाचे चित्रीकरण केल्यावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेऊन प्रदर्शनामागील उद्देश जाणून घेतला. 
    प्रदर्शनाविषयी माहिती सांगतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, मुळात धर्म आचारमूलक आहे. त्यामुळे सिंहस्थात येणार्‍या भाविकांना येथे धर्माचे आचरण कसे करावे ? काय करावे, काय करू नये ? तसेच सनातन धर्म काय आहे, त्यात सांगितलेले दैनंदिन धर्माचरण, पूजाविधी यांचे महत्त्व काय, ते कळावे म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदू बहुसंख्यांक असूनही निधर्मी लोकशाही असलेल्या भारतात त्यांच्या हिताचे रक्षण होत नाही. हिंदुहितरक्षण करणारे हिंदु राष्ट्र कसे असेल, याविषयी माहिती सांगणारे फ्लेक्स फलक लावण्यात आलेले आहेत.

बेंगळुरूमध्ये प्लास्टिकवरील बंदीमुळे अनेक मंदिरांनी अल्प दक्षिणा घेऊन करण्यात येणार्‍या पूजेवर बंदी घातली !

अल्प दक्षिणेच्या पूजांचा प्रसाद देण्यासाठी प्लास्टिकऐवजी 
अ‍ॅल्युमिनियम फॉइल परवडत नसल्याची पुजार्‍यांची तक्रार
      बेंगळुरू - प्रशासनाकडून शहरात प्लास्टिकवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे अनेक मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण पूजा बंद पडल्या आहेत. अल्प दक्षिणेमध्ये पूजा करू शकत नाही, अशी असमर्थता दाखवत शहरातील प्रमुख मंदिरांनी प्रसिद्ध पूजा बंद करण्यात आल्याच्या सूचनांचे फलक मंदिरांबाहेर लावले आहेत. (हिंदूंनी प्लास्टिकला पर्याय म्हणून द्रोण आणि नाशवंत पदार्थांपासून वस्तू बनवल्या पाहिजेत किंवा भक्तांनी, भाविकांनी स्वतःहून भांडी आणायला हवी. - संपादक)

बांग्लादेशातील सुफी पंथाच्या धार्मिक नेत्याची हत्या !

भारतामध्ये असहिष्णुता वाढल्याचा तथाकथित आरोप करणारी अमेरिका 
बांगलादेशातील या घटनांची नोंद घेईल का ?
     ढाका - बांगलादेशातील सुफी पंथाच्या एका धार्मिक नेत्याची हत्या करण्यात आली आहे. शहीदुल्ला असे या नेत्याचे नाव असून ढाका येथील टानोर या उपजिल्ह्यातील एका बगीच्यात त्यांचा मृतदेह मिळाला आहे.
१. ही हत्या धार्मिक तणावातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामिक लिब्रेशन फ्रंट या कट्टरपंथी संघटनेने अशा प्रकारच्या हत्येची धमकी दिली होती.
२. १५ दिवसांपूर्वी बांगलादेशात उदारमतवादी प्राध्यापक रजौल करीम यांचीही याच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. ही हत्या इस्लामिक स्टेट या संघटनेने केल्याचे उघड झाले होते. 
३. शहीदुल्ला यांच्या हत्येचा संबंध देशातील अल्पसंख्यांक, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विदेशी नागरिक यांच्या होणार्‍या हत्येसमवेत जोडण्यात येत आहे.
श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे किरकोळ भांडणावरून धर्मांधांकडून दंगल !

* रस्त्यावर दगडांचा खच * काही दुकाने पेटवली * परिसरात तणाव
     धर्मांधांकडून वारंवार दंगल घडवली जाणे, हे शासनाच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण करते ! वारंवार होणार्‍या दंगली थांबून समाजात शांतता पसरण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! 
     श्रीरामपूर, ९ मे - येथील शिवाजी रस्त्यावरील सय्यदबाबा चौकात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या दुचाकीची एका धर्मांधाच्या मालवाहतूक रिक्शाला धडक झाली. त्यावरून त्या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर धर्मांधांनी दंगल घडवत दगडफेक केली आणि काही हिंदूंची दुकाने पेटवली. (यावरूनच धर्मांधांची पूर्वसिद्धता आणि त्यांचे दंगल घडवून आणण्याचे पूर्वनियोजन दिसून येते ! - संपादक) त्यामुळे संतप्त झालेल्या काही हिंदूंनीही धर्मांधांना चोख प्रत्युत्तर दिले. ही घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ८ मेच्या रात्री घडली.

वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांच्या जन्मदिनी त्यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भेट !

उज्जैन सिंहस्थ पर्व !
इंदूजी महाराज यांना कुंभपर्व की महीमा हा ग्रंथ भेट देतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांना भेटवस्तू देतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
तपोनिष्ठ श्रीधरजी महाराज यांना संस्थेच्या
कार्याविषयी माहिती सांगतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
    उज्जैन - श्री धर्मसम्राट विश्‍ववंद्य श्री यतिराज शिरोमणी हरिनंदनजी करपात्रीजी महाराज यांचे शिष्य वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांच्या जन्मदिनी त्यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेच्या महाराष्ट्र प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी त्यांच्या आश्रमात जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अन् साधकांच्या साधनेसाठी आशीर्वाद घेतले.
    या वेळी संस्थेच्या वतीने सनातननिर्मित शिवाचे सात्त्विक चित्र, पुष्पहार आणि श्रीफळ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पू. श्री प्रबलजी महाराज यांनी बराच वेळ शिवाचे चित्र निरखून पाहिले आणि पू. डॉ. पिंगळेकाका यांचा सन्मान केला अन् बहोत अच्छा, असे म्हणून आशीर्वाद दिला. पू. श्री प्रबलजी महाराजांचे शिष्य श्रद्धेय प्रवर पूज्य श्री त्रंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज म्हणाले की, सनातन संस्थेच्या कार्याविषयी बोलण्यास शब्दच नाहीत.

अमरावती येथे खोटे समाजकल्याण कार्यालय थाटून बेरोजगार तरुणांची फसवणूक !

    अमरावती, ९ मे - येथील मार्डी रस्त्यावर तीन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) एक कार्यालय थाटण्यात आले होते. कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या फलकावर भारत शासन, समाजकल्याण विभाग, देहली गेट, नवी देहली, मुख्य कार्यालय : गाडगेबाबा कॉलनी, प्लॉट क्रमांक ५, मार्डी रस्ता, अमरावती असा फलकही लावण्यात आला होता. भारत शासनाच्या नावाने चालवणारे जाणारे हे कार्यालय चक्क खोटे असल्याचे उघडकीस आले आहे.

संभाजीनगर येथे समलिंगी संबंधांतून एका अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या

पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा दुष्परिणाम !
या घटनेवरून तरी शासन समलिंगी संबंधांना आळा घालणार का ?
   संभाजीनगर, ९ मे - समलिंगी संबंधांतून दुरावल्याचा राग धरून एका अल्पवयीन मुलाने त्याचा मित्र शुभम वाघुले याची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना येथील टाऊन हॉल भागातील जय भीमनगर येथे घडली आहे. पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीचा शोध घेऊन ७ मे या दिवशी त्याला अंबड येथून अटक केली आहे.
   या अल्पवयीन मुलाने शुभमच्या हाताच्या नसा कापून आणि गुप्तांगावर वार करून गंभीर जखमी केले होते. शुभमचा ६ मे या दिवशी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी शुभमने या मित्राचे नाव पोलिसांना सांगितले होते. तो साडेसतरा वर्षांचा आहे.

माध्यम प्रश्‍नावरील आंदोलन निर्णायक टप्प्यावर नेऊ ! - प्रा. सुभाष वेलिंगकर

भाभासुमंची शिरोडा, गोवा येथे जाहीर सभा : २ सहस्र ५०० हून अधिक मातृभाषाप्रेमींची उपस्थिती 
     शिरोडा, गोवा - भाजप शासनाने गेली ३ वर्षे भारतीय भाषा सुरक्षा मंचची (भाभासुमं) फसवणूक केली. यापुढे शासनावर विश्‍वास ठेवणार नाही. यापुढे तडजोड नाही. हे जनआंदोलन निर्णायक टप्प्यावर घेऊन जाणार आहोत, अशी चेतावणी भाभासुमंचे गोव्यातील राज्य समन्वयक प्रा. वेलिंगकर यांनी दिली. भाभासुमंने ८ मे या दिवशी शिरोडा, गोवा येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित करतांना प्रा. वेलिंगकर यांनी ही चेतावणी दिली. 
      शिरोडा पंचायत कार्यालयासमोर झालेल्या या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक भाषाप्रेमींची उपस्थिती होती. या वेळी मंचावर प्रा. पांडुरंग नाडकर्णी, श्री. माधव कामत, माजी सनदी अधिकारी श्री. अरविंद भाटीकर, अधिवक्ता उदय भेंब्रे, अधिवक्ता स्वाती केरकर, लेखक पुंडलिक नायक, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, फादर माऊझिन आताईद, सुभाष देसाई, स्वातंत्र्यसैनिक श्री. चंद्रकांत केंकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निपाणी येथे हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीनंतर मुसलमानांनी लावलेला वादग्रस्त फलक हटवला !

इचलकरंजी आणि निपाणी येथील फलकावरील माहिती एकच ! 
     निपाणी (जिल्हा बेळगाव), ९ मे (वार्ता.) - शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात ४ मे या दिवशी भाजीपाला मुस्लीम समाजाच्या वतीने 'शिवरायांचे निष्ठावंत मुस्लीम मावळे' या मथळ्याखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी आक्षेपार्ह माहिती दर्शवणारा डिजिटल फलक लावण्यात आला होता. याविषयी हिंदुत्ववाद्यांनी जोरदार आक्षेप नोंदवून नगरपालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर नगरपालिकेने हा फलक काढण्याची सूचना केल्यानंतर मुसलमानांनी हा फलक काढला.

वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांच्या जन्मदिनी त्यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भेट !

उज्जैन सिंहस्थ पर्व !
वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांना भेटवस्तू देतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

'शिवाजी-संभाजी' हे मंत्रच हिंदुस्थानला तारू शकतील ! - पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

सांगली जिल्ह्यात शिवजयंती पुष्कळ उत्साहात साजरी ! 
     सांगली, ९ मे (वार्ता.) - देव, देश, धर्म, संस्कृती यांना मानणारी तरुण पिढी घडवायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या मार्गानेच जावे लागेल. देशाच्या आतील आणि बाहेरील शत्रूला नेस्तनाबूत करायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे बीजमंत्रच हिंदुस्थाला तारू शकतात, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. येथील विश्रामबाग चौकात शिवसेनेचे सांगली उपशहर प्रमुख श्री. नितीन काळे यांच्या पुढाकाराने आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, सर्वश्री अजिंक्य पाटील, पै. पृथ्वीराज पवार, प्रसाद रिसवडे, सचिन काळे, अमित कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते. 

नाशिक येथे नंदिनी गौशाळा आणि सनातन यांच्या सात्त्विक उत्पादनांच्या दालनाचा शुभारंभ !


डावीकडून पहिले श्री. महेश पाटील,
तिसरे श्री. महेंद्र पोद्दार, उजवीकडून दुसरे श्री. निमीचंदभाई पोद्दार
     नाशिक - येथिल नंदिनी गौशाळा संचलित स्वदेशी आणि सात्त्विक उत्पादनांच्या दालनाचा शुभारंभ कॉलेज रोड येथील निर्माण हाऊस येथे करण्यात आला. या दालनात नंदिनी गौशाळा आणि सनातन संस्था यांची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. नंदिनी गौशाळेचे संचालक श्री. महेंद्र पोद्दार यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ झाला. या वेळी सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. नंदिनी गौशाळेचे अध्यक्ष श्री. निमिचंदभाई पोद्दार यांनी यांच्या कार्यालयाच्या परिसरातील जागा या दालनासाठी उपलब्ध करून दिली आहे. 

बोरीवली येथील साहस संस्थेच्या वतीने आयोजित व्यक्तीमत्त्व विकास शिबिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कार विषयावर मार्गदर्शन

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सौ. अश्‍विनी पोवार
मुंबई, ९ मे (वार्ता.) - बोरीवली येथील साहस संस्थेच्या वतीने ५ ते ८ मे या कालावधीत १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मालाड (पश्‍चिम) येथे व्यक्तीमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. अश्‍विनी पोवार यांनी सुसंस्कारांचे महत्त्व आणि जोपासना या विषयावर मार्गदर्शन केले. सुसंस्कारांची आवश्यकता, संस्कारांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी, पालक यांसह ३३ जिज्ञासूंनी घेतला. साहस संस्थेच्या वतीने श्री. भूषण परब, सौ. अस्मिता इनामदार, रजनी राहुरीकर यांनी पुढाकार घेऊन हे शिबीर आयोजित केले होते. शिबिराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ब्रिटनमधील अनेक मशिदींनी महिलांवर फेसबूक न वापरणे यांसारखे कठोर नियम लादले !

स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या महिला संघटना अशा वृत्तांवर मात्र कधीच भाष्य करत नाहीत. 
जनहो, यातून स्त्री स्वातंत्र्याविषयीची त्यांची पोकळ निष्ठाच दिसून येते, हे लक्षात घ्या !
     लंडन - ब्रिटनमधील अनेक मशिदींनी मुसलमान महिलांनी फेसबूकवरील त्यांची खाती बंद (डिलीट) करण्यासारखे अत्यंत कठोर नियम लादले आहेत. महिलांनी त्यांच्या पतींच्या अनुमतीशिवाय घराबाहेर पडू नये आणि पॅन्ट घालू नये, यांसारख्या नियमांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. ही माहिती ६ मे या दिवशी द टाइम्स या ब्रिटनमधील प्रसिद्ध वृत्तपत्राकडून एका शोध अहवालाद्वारे प्रसारित करण्यात आली. या अहवालात ब्रिटनमधील अनेक मशिदी आणि इस्लामी संघटना यांनी लागू केलेले कठोर नियम दिलेले आहेत.

संबंधित अधिकार्‍यांनी कारवाई न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट

मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील मिरवणुकीत धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे प्रकरण 
     मलकापूर (जिल्हा बुलढाणा) - मोहम्मद पैंगबर जयंतीच्या निमित्ताने २४ डिसेंबर २०१५ या दिवशी त्यांच्या अनुयायांनी काढलेल्या मोठ्या मिरवणुकीत धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक केली. यानंतर नागरिक समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक काबरा यांनी २५ डिसेंबर या दिवशी तक्रार प्रविष्ट केली; मात्र त्यावर काहीच कारवाई न झाल्याने डॉ. काबरा यांनी नागरिक समिती, मलकापूर यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आणि पीडितांना हानीभरपाईचे आदेश देण्यात यावेत, अशी याचिका ५ मे या दिवशी प्रविष्ट केली. (दंगेखार धर्मांधांवर कारवाई होण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणारे डॉ. काबरा यांचे अभिनंदन ! - संपादक) 

पाणी जनतेला मिळत नसल्याचा प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांकडे

लातूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमुना ! 
* लातूरला आलेले पाणी जाते कुठे ?
* नगरसेवकांकडूनच पाण्याचे राजकारण 
     मुंबई, ९ मे - दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना शासनाकडून लातूरला रेल्वेद्वारे सुमारे ५ कोटी लीटर पाणी देण्यात आले. असे असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी थेट मंत्रालयापर्यंत केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तातडीने नोंद घेत लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. लातूर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हे पाणी जनतेला मिळत नसल्याचा प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

फलक प्रसिद्धीकरता

असे अनुदान कधी गोशाळा अथवा वेदपाठशाळा आदींच्या संस्थांना दिले आहे का ?
   लोकसभेत अल्पसंख्यांक व्यवहार खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६ मध्ये केंद्रशासनाने अल्पसंख्यांकांसाठी कार्य करणार्‍या संस्थांना ४४ कोटी ६८ लाख रुपये दिले. काँग्रेसच्या सत्ताकाळात ही रक्कम १९ कोटी ४६ लाख रुपये एवढीच होती.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kendrasarkarne alpasankhyakoke kalyanhetu Congresski tulname dogunese adhik nidhi di
Kya Goshalayon athva Vedpathshalayonko kabhi aisi nidhi mili hai ?
जागो ! : केंद्र सरकार ने अल्पसंख्यंको के कल्याण हेतु कांग्रेस की तुलना में दोगुने से अधिक निधी दी.
क्या गोशालाआें अथवा वेदपाठशालाआें को कभी ऐसी निधी मिली है ?

कर्नाटकमधील सत्ताधार्‍यांनी भटकळमधील दंगलीचा अहवाल धुडकावल्यानेच देशातील आतंकवाद वाढला ! - श्री. प्रमोद मुतालिक

वेळेत योग्य ती उपाययोजना न केल्यानेच यासिन भटकळसारखे जिहादी निपजले !
वर्ष १९९३ मध्ये भटकळ येथे झालेल्या दंग्यासंदर्भातील अहवालाच्या चकतीचे (सीडीचे) लोकार्पण !
श्री. प्रमोद मुतालिक
      बेंगळुरू - कर्नाटकमध्ये सत्तेवर आलेल्या विविध शासनांनी मतपेटीचे राजकारण करत भटकळ दंग्याच्या संदर्भातील कै. मा. न्या. जगन्नाथ शेट्टी यांच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्यानेच आज देशभरात आतंकवाद वाढला आहे, असा आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. वर्ष १९९३ मध्ये भटकळमध्ये झालेल्या दंगलीच्या संदर्भात कै. मा. न्या. जगन्नाथ शेट्टी यांच्या आयोगाने सिद्ध केलेल्या अहवालाच्या चकतीचे (सीडीचे) लोकार्पण करतांना ते बोलत होते.
     या वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अमृतेश एन्. पी., पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अग्निशेखर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

(म्हणे) टॉम अ‍ॅण्ड जेरी या कार्टूनमुळे अरब राष्ट्रात हिंसा वाढत आहे !

जिहादी मानसिकतेकडे दुर्लक्ष करणार्‍या इजिप्त शासनातील अधिकार्‍याचा साळसूदपणा
      कैरो (इजिप्त) - टॉम अ‍ॅण्ड जेरी कार्टूनमुळे अरब राष्ट्रात हिंसेची संस्कृती वाढत आहे, असा आरोप इजिप्त शासनाच्या एका खातेप्रमुखाने केला आहे. इजिप्त देशाची राजधानी कैरो येथे व्हिडियो गेम्स आणि कार्टून्स यांमुळे वाढणारी हिंसा या विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इजिप्त शासनाच्या माहिती खात्याचे प्रमुख सलाह अब्देल सदेक यांनी हा आरोप केला. 
      इजिप्तमध्ये कट्टरवादी मुसलमानांच्या जिहादी कारवायांमुळे हिंसा वाढत आहे. येथील शासनाने सहस्रो राजकीय कट्टरवाद्यांना अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सलाह अब्देल सदेक यांनी केलेल्या या हास्यास्पद व्यक्तव्यामुळे त्यांच्यावर पश्‍चिमी देशातून टीका होत आहे. या कार्यक्रमात सदेक म्हणाले, टॉम अ‍ॅण्ड जेरी या कार्टूनमध्ये मारहाण करणे आणि बॉम्बद्वारे उडवणे आदींसारखे हिंसेचे प्रकार मुले पहातात. वारंवार ही हिंसा पाहिल्यामुळे बालमनाला हिंसा करण्यात काही वाईट असते, असे वाटत नाही. (टॉम अ‍ॅण्ड जेरी सारख्या निरर्थक कार्टून पहाणे अयोग्यच आहे; मात्र इस्लामी राष्ट्रातील हिंसा ही त्यामुळे नव्हे, तर धर्माच्या आधारे होणारी जिहादी हिंसा आहे. याकडे या देशांनी लक्ष द्यायला हवे ! - संपादक)

जिहादी आतंकवाद्याकडून काश्मिरी जनतेला भारतीय सैन्याच्या विरोधात शस्त्र उचलण्याचे आवाहन !

काश्मीरचा प्रश्‍न भिजत ठेवणार्‍या काँग्रेसचे पळपुटे धोरण आणि त्यांची री ओढणार्‍या 
सध्याच्या राज्यकर्त्यांच्या नरमाईच्या भूमिकेचे हे फलित नव्हे का ?
जिहाद्यांचे नंदनवन झालेले जम्मू-काश्मीर राज्य ! 
     पुलवामा (जम्मू-काश्मीर) - काश्मीरमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वत:ला लष्कर-ए-तोयबाचा भारतातील प्रमुख म्हणवणारा अबु दुजाना या जिहादी आतंकवाद्याने काश्मिरी जनतेला भारतीय सैन्याच्या विरोधात शस्त्र उचलण्याचे आवाहन केले आहे. दुजाना एका आतंकवाद्याच्या दफनविधीच्या कार्यक्रमाला त्याच्या ५-६ सशस्र सहकार्‍यांसमवेत उपस्थित होता, त्या वेळी कार्यक्रमाला उपस्थित जनतेला संबोधित करतांना त्याने हे विधान केले. (एका जिहाद्याच्या दफनविधीला उपस्थित रहाणारे लोकही आतंकवादीच होत ! त्यामुळे भारतियांच्या करावर जगणार्‍या आणि भारताचे तुकडे होण्यासाठी प्रयत्नरत जिहाद्यांना पाठिंबा देणार्‍या लोकांना फाशीची शिक्षा देणेही कमीपणाचे ठरेल ! - संपादक) या वृत्ताचा व्हिडिओ इंडिया टूडे या वृत्त संकेतस्थळाने प्रसारित केला आहे. 
     अबु दुजाना हा पंचवीशीतील तरुण असून उधमपूरमध्ये झालेल्या जिहादी आक्रमणात तो सहभागी झाला होता. या आक्रमणात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले होते.

इसिसचा भारतीय वंशाचा जिहादी आतंकवादी प्रकाश अमेरिकेकडून ठार !

ऑस्ट्रेलिया त्यांचे आतंकवादी दुसर्‍या देशामार्फत ठार करते. 
असे आतंकवादी भारताने कधी ठार केलेत का ?
प्रकाश उपाख्य अबू खालिद अल-कम्बोडी ऑस्ट्रेलियासाठी होता मोस्ट वॉन्टेड !
     मेलबर्न (ऑस्टे्रेलिया) - ऑस्ट्रेलियातील इसिस या आतंकवादी संघटनेचा प्रमुख नील प्रकाश उपाख्य अबू खालिद अल-कम्बोडी याला इराकमधील अमेरिकेच्या हवाई आक्रमणात ठार मारण्यात आले. भारतीय वंशाचा पण ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेला नील प्रकाशचा येथील अनेक आक्रमणांमध्ये सहभाग होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होती. त्याची माहिती ऑस्टे्रलियाने अमेरिकेला दिली होती, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे महाधिवक्ता जॉर्ज ब्रॅन्डीस यांनी दिली.

स्वामी नारायण संप्रदायाच्या वतीने पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्कार !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना
स्वामी नारायण संप्रदायाचे प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज
आणि १०८ छोटे लालजी श्री पुश्‍वेंद्रप्रसादजी महाराज
उज्जैन - पहिल्यांदाच उज्जैन सिंहस्थ पर्वासाठी आलेले स्वामी नारायण संप्रदायाचे नववे वंशज प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज आणि १०८ छोटे लालजी श्री पुश्‍वेंद्रप्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
या वेळी अन्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. स्वामी नारायण संप्रदायाचे वकील स्वामी उपस्थित होते. या वेळी देशभरात हिंदुजागृतीचे मोठे कार्य करणारी सनातन संस्था आहे, असे गौरवोद्गार वकील स्वामी यांनी काढले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अप्पासाहेब सांगोलकर उपस्थित होते.

निधीअभावी कोणत्याही प्रादेशिक योजना बंद पडणार नाहीत ! - राज्यमंत्री दिलीप कांबळे

   तासगाव (जिल्हा सांगली), ९ मे (वार्ता.) - टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर निधीअभावी कोणतीही प्रादेशिक योजना थांबली जाणार नाही. त्याचसमवेत राज्यातील कोणतीही प्रादेशिक नळपाणी योजना वीजदेयक थकल्यामुळे अथवा अन्य कोणत्याही कारणांमुळे बंद पडणार नाही, अशी माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. ते तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा दौरा केल्यावर बोलत होते.

धोनीसाठी पाण्याची नासाडी

     भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या झारखंडमधील रांची शहरातील घरातील तरणतलावासाठी प्रतिदिन १५ सहस्र लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे केली आहे. या विषयी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला म्हणून देशाला कळले तरी की, क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती त्याच्या विभागातील पाण्याच्या समस्येविषयी किती असंवेदनशील आहे. सहस्रो लिटर पाणी एकट्या व्यक्तीच्या तरणतलावास न देता सर्वांना सार्वजनिक वापरासाठी पुरवले गेले असते, तर कित्येकांची पाण्याची आवश्यकता भागली असती. देशातील दुष्काळी स्थितीचा विचार अशा कृतघ्नांकडून का होत नाही ?

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा !
   भारतीय परंपरेनुसार तिन्हीसांजेला दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडतांना, प्रवासाहून घरी परतल्यानंतर, नवीन कपडे परिधान केल्यावर अशा विविध प्रसंगी घरातील मोठ्यांना पाया पडण्याची पद्धत आहे. एकप्रकारे ही आशीर्वाद घेण्याचीच पद्धत आहे. मुलांनो, पुढील लेख वाचून नमस्कार करण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घ्या आणि त्यानुसार आचरण करून सुखी व्हा !

देशभक्तीची परिणती असे हे स्वातंत्र्यसमर ।

१० मे या दिवशी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन आहे. त्यानिमित्ताने...
श्री. राज कर्वे
     आज १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा प्रारंभ दिवस ! देशभक्तांनी केलेल्या प्रचंड उठावामुळे इंग्रजी सत्ता समूळ हादरली. या समराचे नियोजन इतके गुप्तपणे झाले की, त्याचा आरंभ होईपर्यंत कपटी इंग्रजांना मागमूसही लागला नाही. सारा भारतवर्ष एक होऊन स्वराज्यासाठी झगडला. त्यानिमित्त सर्व राष्ट्रविरांना पुढील कविता सविनय अर्पण.....
भारतमातेच्या बेड्या तोडी हे युद्ध अमर ।
देशभक्तीची परिणती असे हे स्वातंत्र्यसमर ॥ १ ॥

परक्याने खेचला आमचा जन्मसिद्ध अधिकार ।
कत्तली, अन्याय, जुलूम& केवढा तो हाहाःकार ॥ २ ॥

महाराष्ट्र राज्याला आणि आजूबाजूच्या अन्य राज्यांना वेगळा कायदा ?

१. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे; पण परराज्यातून आलेले गोमांस जवळ बाळगणे गुन्हा नाही, असा निर्णय न्यायालयाने देणे आणि तो ऐकणे म्हणजे अजब वाटत नाही का ? 
२. स्वतंत्र भारत देशाच्या कायद्याच्या आणि न्यायाच्या विषयी असा कारभार म्हणजे हास्यास्पद अन् गंभीर प्रकार वाटत नाही का ? 
३. एकीकडे हे हास्यास्पद वाटते, तसेच याच गोष्टीची दुसरी बाजू गंभीरही आहे, असे वाटते; कारण महाराष्ट्र राज्यात वेगळा कायदा आणि बाकीच्या राज्यात वेगळा कायदा म्हणजेच कायद्याच्या विषयीही संपूर्ण भारत देशात एकोपा-ऐक्य नाही असे झाले. जगातील मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात न्याय संस्था असा निर्णय देत असेल, तर तो राज्याच्या प्रती पक्षपातीपणा होत नाही का ?

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
    हे भारती जय जननी ! दुष्ट आणि देशद्रोही नेते आणि अधिकारी यांच्यापासून भारताला वाचवण्यासाठी आज पुन्हा प्रत्येक घरात एकेक मदनलाल धिंग्रा जन्माला घाल ! (सावरकर टाइम्स, एप्रिल २०१०)

पुणे येथे रणरागिणी शाखा कार्यान्वित झाल्यानिमित्त शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी काव्याद्वारे जागवला अंगार !

कु. प्रतीक्षा कोरगावकर
आदर्श त्या वीरांगनांचा आम्ही पुन्हा जागवतो आहे !
युगायुगाचा काळ जरी जलद गतीने सरतो आहे,
आम्ही रणरागिणींना स्मरतो आहे,
लाव्हा त्या वीरांगनंाचा धमन्यांतून आमच्या सळसळतो आहे,
बोटे छाटलेला तो शास्त्या कबरीत आजही जळफळतो आहे,
रायगडी निनाद तोफेचा आजही गगनी भिडतो आहे,
आदर्श त्या वीरांगनांचा आज पुन्हा जागवतो आहे !

२०१६ या वर्षाची अक्षय्य तृतीया म्हणजे सनातनच्या इतिहासातील सोनियाचा दिवस !

महर्षि
 १. अक्षय्य तृतीयेपासून सनातनचे कार्य 
विश्‍वव्यापक होण्यास आरंभ 
होणार आहे, असे महर्षींनी सांगणे 
महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमावर लावण्यासाठी
आणलेल्या कळसाचे ध्यानमंदिरात केलेले पूजन
         ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया होती. या दिवशी गोव्यातील रामनाथी आश्रमावर तीन ठिकाणी महर्षींच्या आज्ञेनुसार तीन कळसांची स्थापना करण्यात आली. हे कळस वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. कळसस्थापनेनंतर सनातनच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आणखी प्रसिद्धी मिळणार आहे, तसेच हे कार्य भगवंताचेच असल्याने ते विश्‍वव्यापक होणार आहे, असे महर्षींनी आधीच सांगितले आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमावर कळस स्थापन झाल्यानंतर होणार्‍या परिणामांचे कळस स्थापन होण्यापूर्वी कु. दीपाली पवार यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. दीपाली पवार
      कृष्णा, १.५.२०१६ या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२.१५ या कालावधीत पू. सखदेवआजींचे कपडे धुतांना, भोजन करतांना आणि सेवा करतांना माझ्या डोळ्यांसमोर ९.५.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमावर होणार्‍या कळस स्थापनेचे दृश्य दिसत होते. कळसांची स्थापना होण्यापूर्वीच कळसांची स्थापना झाल्यानंतरचा परिणाम डोळ्यांना दिसत होता. कपडे धुण्याची सेवा करतांना आणि भोजन करतांना त्या विषयातील माहितीही मिळत होती. सूक्ष्म-परीक्षण करण्यासाठी मला वेगळा वेळ द्यावा लागला नाही. मला सूक्ष्म-परीक्षण करण्याची ओढ नाही. मी आज सूक्ष्म-परीक्षण करण्याचा विचार केलेला नव्हता. स्थुलातून घडणारी घटना आधीच सूक्ष्मातून घडलेली असते. त्यामुळे माझ्याकडून ९ दिवस पूर्वीच आश्रमावर स्थापित होणार्‍या कळसांचे परीक्षण झाले.

रामनाथी आश्रमावर स्थापित होणार्‍या कळसांच्या पूजनाच्या वेळी साधिकेने अनुभवलेला त्रिशक्तींच्या अनुसंधानातील आनंद !

१. ध्यानमंदिरातील कळसांच्या पूजेकडे पहाताक्षणीच आज्ञाचक्रातून आत्म्यापर्यंत त्रिशक्तीच्या स्रोताचे वेगाने प्रक्षेपण होणे आणि पूजा केलेले तीन कलश हे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या शक्तींचे प्रतीक असल्याचे जाणवणे : श्रीकृष्णा, आज वसंतपंचमी आणि प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्यानिमित्ताने ध्यानमंदिरात सरस्वतीदेवी आणि प.पू. भक्तराज महाराज यांची पूजा होत असावी, असे ध्यानमंदिरात पूजा चालू असतांना मला वाटले होते. त्या वेळी ध्यानमंदिरात कशाची पूजा चालू आहे ?, याची मला कल्पना नव्हती.
        पूजा पूर्ण झाल्यानंतर रात्री ९.१० वाजता पूजेतील देवतांचे दर्शन घ्यावे; म्हणून मी ध्यानमंदिरात जाऊन एका कोपर्‍यात बसून नामजप करू लागले. आज दिवसभर मला अकारण पुष्कळ त्रास होत होता; मात्र ध्यानमंदिरात बसताक्षणी चांगले वाटू लागले. त्या वेळी लक्षात आले की, पूजा कोणत्याही देवतेची किंवा प.पू. भक्तराजबाबांची नसून तीन कळसांची केलेली आहे. मी पूजेचे काहीच निरीक्षण किंवा सूक्ष्म-परीक्षण केले नव्हते, तरीही पूजेकडे पहाताक्षणी माझ्या आज्ञाचक्रातून आत्म्यापर्यंत त्रिशक्तीच्या स्रोताचे वेगाने प्रक्षेपण होऊ लागले. मला लक्षात येत नव्हते की, कळसातून कोणती शक्ती प्रक्षेपित होत आहे ? माझ्या मनात प्रश्‍न निर्माण झाल्यावर उत्तरही आपोआप मिळाले, पूजा केलेले तीन कळस म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या शक्तींचे प्रतीक आहेत.

स्वतः मंदिर होणार असल्याने कृतज्ञताभावात असणारा रामनाथी आश्रम आणि मंदिर होण्याचे ध्येय ठेवून प्रयत्न करणार असल्याचे सांगणारे देवद अन् मिरज आश्रम !

रामनाथी, गोवा येथील पवित्र सनातन आश्रम
        सनातन संस्था विश्‍वभरात अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केली. कार्य वाढावे आणि साधकांना सहजतेने साधना करता यावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवद, मिरज आणि रामनाथी येथे आश्रम स्थापन केले. आता आपण या आश्रमांचे भावभाष्य ऐकूया.

रामनाथी आश्रमावर स्थापित होणार्‍या कळसांच्या पूजाविधीच्या वेळी श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

श्री. राम होनप
सायं ६.०१ : वेटोळ्याच्या आकाराच्या तीन पांढर्‍या लहरी कळशाच्या शिरोभागातून आत प्रवेश करत असलेल्या दिसल्या.
सायं ६.२७ : ३ - ४ अपरिचित देवी आनंदाने हसत असल्याचे दृश्य दिसले. त्या देवी या कार्यक्रमाने आनंदी झाल्याचे जाणवले.
सायं ६.२९ : विधीला भगवान शिव आणि पार्वती उपस्थित असल्याचे दृश्य दिसले. कळसपूजन झाल्यानंतर तीन कळसापैंकी एक कळस शिव आणि दुसरा कळस पार्वती यांचा आहे, असे तेथील उपस्थित पुरोहित-साधकाने सांगितले.

रामनाथी आश्रमावर कळस स्थापित होणे, ही महर्षींची अद्भुत लीलाच !

सौ. प्राजक्ता जोशी
१. प.पू. डॉक्टरांच्या हस्ते प्रथम कळसपूजन झालेल्या दिवशी गुरुतत्त्वाची रास मीन ही असणे : रामनाथी आश्रम हा प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने अध्यात्माचा विश्‍वभर प्रसार व्हावा, या उद्देशाने स्थापन झाला आहे. प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनी, म्हणजे वसंतपंचमीच्या दिनी रामनाथी आश्रमात महर्षींनी सांगितल्यानुसार कळसांचे प्रथम पूजन झाले. या दिवशी मीन ही गुरुतत्त्वाची रास होती.
२. कळसपूजनाच्या प्रथमदिनी ऊर्ध्वमुख नक्षत्र असणे ही दैवी लीला असणे : प.पू. भक्तराज महाराज यांनी गोव्यात विश्‍वदीप होईल असे सांगितले होते. कळसपूजनाच्या प्रथमदिनी ऊर्ध्वमुख नक्षत्र होते. ऊर्ध्वमुख नक्षत्रावर दीर्घकाळ टिकणारी कृत्ये करतात, उदा. देवालय किंवा राजवाडा बांधणे आदी. ऊर्ध्वमुख नक्षत्रावर कळस पूजन होणे, म्हणजे दिवसेंदिवस प्रसाराचे कार्य वृद्धींगत होणे.

कलशारोहणाच्या संदर्भात महर्षींनी सांगितलेले देवरहस्य !

१. महामृत्यूंजय, नवग्रह आणि सुदर्शन यज्ञात तांब्याचे ३ कळस अन् करुंगाळी नावाच्या एका दिव्य वृक्षाचे लाकूड यांचे विधीवत् पूजन करण्यात येणे : २ आणि ३ फेब्रुवारी २०१६ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने ईरोड येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या घरी महामृत्यूंजय, नवग्रह आणि सुदर्शन यज्ञ झाले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते नाडीभक्त वेदब्राह्मण श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचा मुलगा वेदमूर्ती श्री. अरुण यांनी यज्ञाचा संकल्प करवून घेतला. या यज्ञात तांब्याचे ३ कळस आणि करुंगाळी नावाच्या एका दिव्य वृक्षाचे लाकूड यांचे विधीवत् पूजन करण्यात आले. करुंगाळी वृक्षाचे लाकूड कळसाच्या पोकळीत जाईल, असे कापण्यात आले. करुंगाळी वृक्षाच्या या लाकडामध्ये विजेपासून रक्षण करण्याची शक्ती आहे. या कळसांमध्ये वेदमंत्रोच्चार करत नवधान्य आणि ब्रह्मांडातील स्पंदने आकर्षित करणारी सात्त्विक सामुग्री ठेवण्यात आली.

मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील श्री. प्रमोद उपाख्य भाऊसाहेब डोरले (वय ७७ वर्षे) यांनी गाठला ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर

 पू. नंदकुमार जाधव (डावीकडे) श्री. प्रमोद डोरले यांचा सत्कार करतांना
     मलकापूर - येथील प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे गेल्या २२ वर्षांपासून अनुग्रहित असलेले शिष्य श्री. प्रमोद श्रीधरपंत डोरले यांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठल्याचे सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी घोषित केले. त्या निमित्ताने पू. नंदकुमार जाधव यांनी श्री. प्रमोद डोरले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे
एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर होतो आणि घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.
भावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो ... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो.
(संदर्भ सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मक रहा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जगात यशाचीच पूजा केली जाते. मी यशस्वी होणारच, असे म्हणणारी आणि सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्‍वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

झटपट पैसा मिळवण्याच्या लोभी प्रवृत्तीचे बळी !

संपादकीय
      सध्या भारतीय अर्थकारणात एक वेगळीच चिंता भेडसावत आहे. कालपर्यंत ती केबीसी घोटाळ्यातील झटपट पैसा कमवा या योजनेसंबंधी होती आणि आता ती कमी पैशात मोठे घर घ्या अशा नव्या योजनेसंबंधीची आहे. झटपट पैसा मिळवणे काय अथवा अल्प मोबदल्यात मोठा लाभ म्हणजे मोठे घर मिळण्याचा हव्यास काय, या दोन्ही प्रवृत्ती समाजातील लोभी वृत्तीच्या दर्शक आहेत आणि नेमके याच लोभी वृत्तीचे शेकडो बळी देशात पडत आहेत. भारतीय अर्थकारणाला हा जणू कलंक लागला आहे, असे म्हणायची वेळ आली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn