Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या संत पू. मंगला खेरआजी यांचा आज वाढदिवस


उज्जैन सिंहस्थासाठी पोहोचलेले शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचा मध्यप्रदेश शासनाकडून अवमान

गोव्यातही भाजपच्या शासनाकडून शंकराचार्यांचा अवमान झाला 
होता आणि मध्यप्रदेशातही झाला. भाजपच्या राज्यात हिंदूंना हे अपेक्षित नाही !
अशाप्रकारे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती 
यांना रेल्वेफलाटाच्या लोखंडी दांड्यावर बसावे लागले !
     उज्जैन - सिंहस्थपर्वासाठी रेल्वेने येथे पोहोचलेले पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांना अवमानाला सामोरे जावे लागले. प्रथम ते ज्या रेल्वेगाडीने येत होते ती दोन घंटे उशिरा पोहोचली. उज्जैन येथे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सिंहस्थक्षेत्री नेण्यासाठी मध्यप्रदेश प्रशासनाकडून कोणीही उपस्थित नव्हते. तसेच त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे शंकराचार्यांना काही वेळ फलाटावरील लोखंडी दांड्यावर बसावे लागले. या अवमानानंतरही शंकराचार्य कोणावरही अप्रसन्न झाले नाहीत (संत स्वतःला मान मिळाला नाही, तरीही कुणावर अप्रसन्न होत नाहीत कि रागावत नाहीत: मात्र राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना मान मिळाला नाही, तर ते अकांडतांडव करतात ! - संपादक)

सनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मी केंद्रशासनाकडे पाठवला होता !

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सनातनद्वेषी विधान
हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी नि:स्वार्थी वृत्तीने कार्य 
करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणू पहाणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !
     मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री असतांना केंद्रशासनाकडे पाठवला होता; मात्र केंद्रशासनाने संस्थेवर बंदी घातली नाही, तसेच बंदी घालण्यास नकारही दिला नाही, अशी स्वीकृती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रास मुलाखत देतांना दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,
१. मी मुख्यमंत्री असतांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. मी गुप्तहेर खात्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सनातन संस्थेवर संशय व्यक्त केला.

भाजपच्या दलितांसह समरसता स्नानामुळे शंकराचार्य, आखाडा परिषद आणि दलित नेते असंतुष्ट !

भाजप संतांमध्ये भेदभाव निर्माण करून राजकारण करत असल्याचा आरोप 
      उज्जैन, ८ मे (वार्ता.) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समर्पित शाखा असलेली दीनदयाल उपाध्याय विचार प्रकाशन या संस्थेद्वारे ११ मे या दिवशी समरसता स्नान या नावाने आयोजित एका कार्यक्रमात क्षिप्रा नदीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दलितांसह आंघोळ करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून ज्योतिष तथा द्वारका पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे.

काश्मीरमध्ये पोलिसांच्या ४ रायफल्स पळवल्या

पळवल्या कि पळवून नेऊ दिल्या ? काश्मीर पोलीस आतंकवाद्यांशी मिळालेले 
तर नाहीत, अशी शंका जनतेच्या मनात आल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
      श्रीनगर - काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ७ मेच्या रात्री जिहादी आतंकवाद्यांनी अदिजान भागात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या ४ रायफल्स पळवून नेण्याची घटना घडली आहे. यामध्ये २ एस्एल्आर् आणि दोन इन्सास रायफल्स आहेत. या रायफल्सचा परिसरात शोध घेण्यात येत आहे. यासाठी पोलीस पथके बनवण्यात आली आहेत.

राजस्थानमधील ८ वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधून नेहरूंना वगळले !

ज्यांच्या इतिहासातून देशाच्या भावी पिढीला आदर्श 
मिळणार नसेल, अशांचा इतिहास शिकवायचा तरी कशाला ?
      जयपूर - राजस्थानमधील शालेय पाठ्यपुस्तकांच्या नव्या आवृत्तीमध्ये जवाहरलाल नेहरू यांच्यासहित काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख टाळण्यात आला आहे.
१. येथील ८ वी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात भारताच्या इतिहासाविषयी देण्यात आलेल्या माहितीत भारताचे पहिले पंतप्रधान कोण ? याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
२. हे पाठ्यपुस्तक अद्याप बाजारपेठेत आले नसले, तरी संबंधित प्रकाशनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
३. या पाठ्यपुस्तकात म. गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक हेमू कलानी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र नेहरू यांच्यासह काँग्रेसी स्वातंत्र्यसैनिकांचा साधा उल्लेखही पुस्तकात केलेला नाही. तसेच पंडित नथुराम गोडसे यांच्याकडून मोहनदास गांधी यांच्या करण्यात आलेल्या हत्येचाही उल्लेख पुस्तकामध्ये नाही.

देवीशी संबंधित झाडाची फांदी तोडणार्‍या व्यक्तीच्या अंगात झाला संचार !

याविषयी अंनिसवाल्यांना काय म्हणायचे आहे ?
कर्नाटक राज्यातील विस्मयकारक घटना !
     बंटवाळ (कर्नाटक), ८ मे (वार्ता.) - देवाचे वन असलेल्या परिसरातील झाड तोडणार्‍या मुसलमान व्यक्तीच्या अंगात अचानक चामुंडी देवीचा संचार होऊन त्याने झाडे तोडणार्‍या त्याच्या सहकार्‍यांना पिटाळून लावल्याची आश्‍चर्यकारक घटना बंटवाळ येथील नारिकोम्बु गावाच्या पोयीत्ताजे भागात घडली.
१. नारिकोम्बु येथे पोयीत्ताजे भागातील चामुंडी देवीशी संबंधित पुरातन वनातील काही झाडे तोडण्याचे काम त्या जागेचे मालक श्रीधर नायक यांनी काही मुसलमान कामगारांना दिले होते.
२. या वनातील एका झाडाची फांदी तोडणार्‍या कामगाराच्या अंगात अचानकपणे देवीचा संचार झाला. त्यानंतर त्याच्या माध्यमातून देवीने माझ्या परिसरातील झाडे तोडण्यास तुला कोणी सांगितले ? तुम्हाला तो अधिकार कोणी दिला ? असे प्रश्‍न करण्यास चालू केले. त्यामुळे सर्व जण भांबावून गेले.

वर्ष २०१५ मध्ये मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांत ५ सहस्र ८७५ भारतीय कामगारांना जीव गमवावा लागला !

इस्लामी राष्ट्रांत एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय कामगारांचा मृत्यू होणे ही 
गोष्ट संशयास्पद आहे, याची चौकशी केंद्रशासनाने केली पाहिजे !
     नवी देहली - गेल्या वर्षी मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांत ५ सहस्र ८७५ भारतीय कामगारांचा मृत्यू झाला. सौदी अरेबिया पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रशासनाने दिली आहे. सौदी अरेबियामध्ये २ सहस्र ६९१ भारतीय कामगार मृत्यूमुखी पडले आहेत. दुसरा क्रमांक संयुक्त अरब अमिरातचा असून तिसर्‍या क्रमांकावर कतार आहे. 
   केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी लोकसभेत एका लिखित प्रश्‍नाला उत्तर देतांना वरील माहिती दिली; परंतु सिंह यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कामगारांच्या मृत्यूच्या घटनांना मध्य-पूर्वेतील देशांमधील काम करतांना असलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी जोडण्याचे टाळले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणे अथवा रस्त्यांवर झालेल्या अपघातांमुळे झाला.माजी खासदाराला शासकीय बंगला सोडण्याचे न्यायालयाचे आदेश !

न्यायालयाचा अमूल्य वेळ अशा प्रकरणांमध्ये वाया घालवणार्‍या 
खासदारांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी !
     नवी देहली - येथील जिल्हा न्यायालयाने अखिलेश दासगुप्ता या राज्यसभेतील माजी खासदाराला त्यांचा शासकीय बंगला रिकामा करण्याचे सांगितले आहे. दासगुप्ता यांना राज्यसभेच्या सचिवालयाने बंगला सोडण्यास सांगूनही त्यांनी तो सोडलेला नाही. त्यामुळे आता न्यायालयाने त्यांना याविषयी आदेश दिला आहे. 
१. वर्ष २००२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दासगुप्ता यांची राज्यसभेत निवड झाली होती. त्या वेळी त्यांना देहलीतील लोधी इस्टेट या क्षेत्रात शासकीय बंगला देण्यात आला होता.
२. वर्ष २००८ मध्ये दासगुप्ता बहुजन समाज पक्षाकडून राज्यसभेत निवडून आले.

मथुरा येथे म्हशींची चोरी करणार्‍या टोळीकडून युवकाची हत्या !

समाजवादी पक्षाचे शासन असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये अराजक !
     मथुरा (उत्तरप्रदेश) - येथे म्हशींची चोरी करणार्‍या टोळीने शेतकर्‍याच्या १५ वर्षांच्या मुलाची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केल्याने या भागातील लोक संतप्त झाले आहेत. हत्येखोर चोरांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त लोकांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी यमुना जलदगती महामार्ग रोखून धरला. मथुराचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार यांनी चोरांना पकडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर संतप्त लोक परत फिरले.

पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौर्‍यावर ११७ कोटी रुपयांचा व्यय !

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१५-१६ या कालावधीत आतापर्यंत २२ देशांचा दौरा केला असून यावर ११७ कोटी रुपये व्यय झाल्याची माहिती एअर इंडियाने एका माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली. 
    एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या काळात पंतप्रधान मोदी यांनी रशिया, फ्रान्स, जर्मनी, कोरिया, मंगोलिया, चीन, संयुक्त अरब अमिरात, आयर्लंड, ब्रिटन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्की आदी देशांचा दौरा केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा सर्वाधिक खर्चिक दौरा वर्ष २०१५ मध्ये झाला. फ्रान्स, कॅनडा आणि जर्मनी या देशांच्या संयुक्त दौर्‍यामध्ये ३१ कोटी रुपये व्यय करण्यात आला.

एका शिक्षकाची पदोन्नती रोखणार्‍या अधिकार्‍याला ५ सहस्र झाडे लावण्याची शिक्षा !

     चंदीगढ - प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) म्हणून पदोन्नती झालेल्या एका कला शिक्षकाला पदोन्नती न दिल्याने प्राथमिक शिक्षण संचालकाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने माध्यमिक शाळांमध्ये ५ सहस्र झाडे लावण्याची शिक्षा ठोठावली आहे. वर्ष २०१२ मध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या सेवानियमांमुळे शिक्षकाची पदोन्नती झाली होती. मुख्याध्यापक पदावरील ८५ टक्के जागा या टीजीटी म्हणून पदोन्नत झालेल्या शिक्षकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या; मात्र संबंधित शिक्षकाला पदावर पदोन्नती न दिल्याने त्याने या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेचा निकाल देतांना न्यायालयाने संबंधित अधिकार्‍याला ही शिक्षा सुनावली.शालेय विद्यार्थिनींच्या छेडछाड प्रकरणी ग्रामस्थांकडून निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ठराव !

 • ही गोष्ट मुलींना आजच्या काळात स्वसंरक्षण प्रशिक्षण किती आवश्यक आहे, ते अधोरेखित करते !
 • गावातील छेडछाड करणार्‍या मुलांना पोलीस स्वतःहून का अटक करत नाहीत ? प्रत्येक वेळी त्यांच्यावर दबाव येण्याची वाट का पहातात ?
 • ग्रामस्थांनी घेतलेली कठोर भूमिका अभिनंदास्पद आहेच; परंतु गावातील हे प्रकार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करणे आवश्यक आहे !
 • मसुचीवाडी येथील विद्यार्थिनींची छेडछाड काढल्याचे प्रकरण
        ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), ८ मे (वार्ता.) - वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथून बोरगाव येथे शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थिनींची गावगुंडांकडून छेडछाड होत असे. या प्रकरणी गावातील विद्यार्थिनींनी शाळेत पाठवायचे नाही आणि यापुढे सर्व सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा असे दोन ठराव दोन दिवसांपूर्वी ग्रामसभेने केले. (स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनी छेडछाडीच्या प्रकरणामुळे एखाद्या गावास विद्यार्थिनींना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागणे हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. हे प्रकरण एवढे गंभीर होईपर्यंत प्रशासन काय करत होते ? अशा घटनांमुळेच नागरिकांचा प्रशासनावरील विश्‍वास उडत चालला आहे ! - संपादक) या प्रकरणी शनिवारी ग्रामस्थांनी पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांची भेट घेतली. अखेर याचे वृत्त सर्व प्रसिद्धीमाध्यमांत आल्याने आणि सगळीकडून दबाव वाढल्याने पोलिसांनी ८ मे या दिवशी तीन गावगुंडांनी अटक करून त्यांच्यावर पाठलाग करणे, विनयभंग करणे असे गुन्हे प्रविष्ट केले आहेत. (वर्षभरापासून छेडछाडीचा प्रकार होत असून त्याची पोलीस प्रशासनाने नोंद न घेतल्याने ग्रामस्थांना टोकाची भूमिका घ्यावे लागणे हे पोलीस प्रशासनासाठी लज्जास्पद आहे ! ग्रामस्थांनी मुलींना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेण्याची वेळ येईपर्यंत या परिसरातील संबंधित लोकप्रतिनिधी काय करत होते ? - संपादक)

आज उज्जैन सिंहस्थातील दुसरे वैश्‍विक अमृत (शाही) स्नान !

 •  सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती साधू-संतांचे स्वागत करणार
 •  दुपारी २ नंतर भाविकांना स्नानाची अनुमती
      उज्जैन - वैश्‍विक सिंहस्थाच्या ९ मे या दिवशी असणार्‍या द्वितीय मोठ्या स्नानासाठी आखाड्यांचा स्नानक्रम आणि मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. उज्जैनमध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री नरेंद्रगिरि महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. दुसर्‍या अमृत योगी स्नानासाठी ज्योतिष तथा द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, तसेच पुरी पिठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज सहभागी होण्याची शक्यता आहे. या स्नानासाठी प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून आखाड्यांच्या मागे-पुढे पोलीस आणि निमलष्करी दलाचे सैनिक तैनात असणार आहेत. श्री नरेंद्रगिरि महाराजांनी भाविक आणि प्रशासन यांना आवाहन केले आहे की, सिंहस्थामध्ये झालेले वादळ आणि मुसळधार पाऊस यांमुळे भाविकांच्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन स्नानासाठी निघणार्‍या आखाड्यांनी बॅण्डबाजा अल्प प्रमाणात वापरून अल्प वेळेत स्नान करून मूळस्थानी परतावे.

तस्करीचे सोने लुटल्याच्या आरोपावरून कर्नल जसजीतसिंह यांसह ४ जणांना अटक !

राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचाराची लागण झालेल्या अशा 
सैन्याधिकार्‍यांनाही कठोर शिक्षा द्यायला हवी !
     आयझॉल (मिझोरम) - कोट्यवधी रुपयांचे तस्करीचे सोने लुटल्याच्या आरोपावरून मिझोरामची राजधानी आयझॉल येथून कर्नल जसजितसिंह यांसह ४ जणांना अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेक्स जार्जोलियाना यांनी या अटकेची पुष्टी दिली आहे.
      कर्नल जसजीतसिंह यांच्या आदेशावरून सैनिकांनी जवळपास १४ कोटी ५० लाख रुपयांची सोन्याची बिस्कीटे आयझॉल-लुंगलेई महामार्गावरून लुटली होती. हे सोने म्यानमारमधून तस्करी करून आणण्यात आले होते. या बिस्किटांची वाहतूक करणार्‍या वाहनचालकाने या प्रकरणाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावरून ही माहिती समोर आली आहे. या वेळी वाहनचालकाला ठार मारण्याची धमकीही दिली होती. यानंतर सिंह यांना निलंबित करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पतंजलीकडून शिबिराचे आयोजन !

शिबिराच्या बैठकीत सनातन संस्थेचा सहभाग !
योगऋषी रामदेवबाबा यांना पाक्षिक सनातन
प्रभात देतांना सनातनच्या साधिका
     फरिदाबाद (हरियाणा) - येथे १७ ते २१ जूनपर्यंत योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली न्यासाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१. येथील पंजाबी बागेत २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने हे शिबीर होणार आहे. 
२. शिबिराच्या आयोजनासाठी ३ मे या दिवशी कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली होती. त्यात सनातन संस्थेच्या सौ. संदीप मुंजाल, डॉ. भूपेश शर्मा आणि सौ. तृप्ती जोशी यांनीही सहभाग घेतला. या वेळी सौ. संदीप मुंजाल कौर यांनी सनातन संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला.
४. या बैठकीला योगऋषी रामदेवबाबा यांची वंदनीय उपस्थितीही होती.
टिटवाळा येथे अज्ञातांकडून पुरातन गावदेवी मंदिरातील मूर्तीचे भंजन

हिंदूंनो, देवतांची विटंबना किती काळ 
सहन करणार आहात ? आतातरी मंदिरांचे रक्षण 
होण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
        टिटवाळा - येथील गणपति मंदिराच्या आवारात असलेल्या पुरातन गावदेवी मंदिरातील मूर्तीचे अज्ञातांनी ६ मेच्या रात्री भंजन केले. त्यानंतर टिटवाळा ग्रामस्थांनी शांततेत बंद पाळला. (केवळ बंद पाळण्यापेक्षा असे कृत्य करणार्‍यांना कठोर शासन होण्यासाठी संघटित होऊन पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक)
१. अज्ञातांनी मंदिरातील मूर्ती फोडल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक नगरसेवक संतोष तरे, गजानन पंडीत गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोरेश्‍वर तरे, मंदिर विश्‍वस्त योगेश जोशी, प्रसाद जोशी, दादा खिस्मतराव आणि अन्य ग्रामस्थ तेथे आले.
२. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने टिटवाळा येथील दुकाने, रिक्शा आणि टांगा वाहतूक, तसेच गणपति मंदिराचा गाभारा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गाभारा बंद असल्याने भाविकांना केवळ मुखदर्शन घ्यावे लागले. (हिंदुबहुल भागात हिंदूंवर केवळ मुखदर्शनाची वेळ येणे याहून दुसरे दुर्दैव कुठले ? - संपादक)

परशुराम जयंतीच्या शुभदिनी पुण्यात रणरागिणी शाखा कार्यान्वित

ऐतिहासिक लाल महालात रणरागिणींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !
डावीकडून सौ. रूपा महाडिक, दीपप्रज्वलन करतांना 
कु. प्रतीक्षा कोरगावकर, कु. मोनिका गावडे, श्री. मिलिंद धर्माधिकारी
      पुणे - ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या भगवान परशुरामाच्या जयंतीच्या शुभदिनी पुण्यात हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेचा उद्घाटन सोहळा वीरश्रीयुक्त वातावरणात पार पडला. केवळ शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याच नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्याही महिला सक्षम व्हावी, या उद्देशाने तसेच हिंदु राष्ट्र निर्मितीच्या व्यापक ध्येयाने प्रेरित होऊन रणरागिणीच्या पुणे शाखेचा शुभारंभ झाला. येथील ऐतिहासिक लाल महालात ८ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारताला पुन्हा विश्‍वगुरुपदी विराजमान करण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत रहाण्याची उपस्थित रणरागिणींनी शपथ घेतली. या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी, सनातन संस्थेच्या सौ. रूपा महाडिक, तसेच रणरागिणी शाखेच्या पुणे जिल्हा समन्वयक कु. मोनिका गावडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. दीपप्रज्वलन आणि शंखनाद करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. वैभवी भोवर यांनी केले.

ब्रिटिश म्युझियम आणि गुगल यांच्याकडून सेलिब्रेटिंग गणेशा नावाचे ऑनलाइन प्रदर्शन !

हिंदूंना धर्मशिक्षित करण्यासाठी जे भारतीय राज्यकर्त्यांनी करायला हवे, 
ते विदेशातील संस्था करतात, यापेक्षा लज्जास्पद काय असेल ?
     लंडन - ब्रिटिश म्युझियम (संग्राहलय) आणि गुगल कल्चरल इन्स्टिट्यूट (गूगल सांस्कृतिक संस्था) यांनी सेलिब्रेटिंग गणेशा (श्री गणेश जाणून घ्या) नावाचे ऑनलाइन प्रदर्शन भरवले आहे. श्री गणेशाची चित्रे आणि वैशिष्ट्ये समजून घेऊन त्याच्या सर्वाधिक प्रसिद्ध गोष्टी जाणून घ्या ! हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. (ब्रिटिश म्युझियम आणि गुगल कल्चरल इन्स्टिट्यूट यांचे अभिनंदन ! - संपादक)
      या प्रदर्शनात १२ व्या शतकातील श्री गणेशाची मूर्ती, १६ व्या शतकातील श्री गणेशाचे तैलचित्र, तंजावुर (तमिळनाडू) येथील १७ व्या शतकातील एका तैलचित्रात एका मिरवणुकीमध्ये असलेला श्री गणेश, १८ व्या शतकातील महाराष्ट्रातील श्री गणेशाचे तैलचित्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच या प्रदर्शनात महाराष्ट्रात श्री गणेशमूर्ती बनवण्याची प्रक्रिया आणि तिची उपासना या विषयावर असलेल्या व्हिडिओचाही समावेश करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ उंदीर हे गणपतीचे वाहन का आहे ?, गणपतीला हत्तीचे मुख का ?, गणपतीचा एक दात तुटलेला का आहे ? इत्यादी विषयांवरही प्रकाश टाकतो.इसिसमध्ये पॅरिसप्रमाणे अमेरिकेवरही आक्रमण करण्याची क्षमता !

जिहादी आतंकवादाच्या संदर्भात असा वस्तुनिष्ठ विचार किती 
भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते करतात ?
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍याचे मत
     वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेटमध्ये (इसिसमध्ये) पॅरिसवर केलेल्या आक्रमणाप्रमाणे अमेरिकेवरही आक्रमण करण्याची क्षमता असल्याचे मत अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे संचालक जेम्स क्लॅपर यांनी व्यक्त केले आहे. इसिसमध्ये अमेरिकेतील स्थानिक गटांच्या साहाय्याने एकाच वेळी विविध ठिकाणी जिहादी कारवाया घडवून अनेक लोकांना मारू शकण्याची क्षमता आहे. त्यामुळे आम्हाला याविषयी चिंता वाटते, असेही क्लॅपर यांनी सीएन्एन् या विदेशी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधातील साक्षीदारांची सूची सादर करणार ! - डॉ. सुब्रमण्यम स्वामी

     नवी देहली - काही आरोपींनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश आल्यावर नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य ५ जणांच्या विरोधातील साक्षीदारांची सूची सादर करण्यात येईल, असे भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी न्यायालयात म्हटले आहे.निष्काळजीपणाने चारचाकी चालवणार्‍या आमदाराला ३ मासांचा कारावास !

      कर्णावती - भाजपचे आमदार राजेंद्रसिंग छावडा यांनी निष्काळजीपणाने चारचाकी चालवल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांना ३ मासांची कारावासाची शिक्षा, तसेच २६ सहस्र रुपयांचा दंड सुनावला आहे. 
१. डिसेंबर २०१३ मध्ये निष्काळजीपणाने चारचाकी चालवून नागरिकांच्या जीवितीला धोका निर्माण केल्याविषयी अजेय पटेल यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. 
२. चारचाकी चालवतांना मद्याच्या नशेत असल्यामुळे धडक दिल्याचे पटेल यांनी तक्रारीत म्हटले होते. (नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांसारख्या व्यक्तींचेच नैतिक अध:पतन झाले, तर जनता त्यांच्याकडून काय आदर्श घेणार ? अशा आमदारांना निवडून देण्यापूर्वी जनतेनेही विचार करायला हवा ! - संपादक) छावडा हे २०१२ मध्ये काँग्रेसचे आमदार होते, तर २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.


भारतखंडातील मुसलमान हे हिंदूंचे वंशज ! - सलाम रशीद, पाकिस्तानी लेखक

घरवापसीचा विरोध करणारे हे लक्षात घेतील का ? 
     नवी देहली - संपूर्ण भारतखंडातील सर्वच मुसलमान हे हिंदूंचे वंशज असून अरबस्तानातील आक्रमणकर्त्यांनी त्यांना बलपूर्वक इस्लाम धर्मात घेतले, असे प्रतिपादन पाकिस्तानी लेखक सलाम रशीद यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, मोहम्मद बीन कासीमने हिंदूंवर आक्रमण करून धर्मांतराला प्रारंभ केला होता. पुढे मोगलांनी धर्मांतराची ही परंपरा चालू ठेवली. पाकचे निर्माते महंमद अली जिना गुजराती हिंदूचे नातू होते, तर परवेझ मुशर्रफ हिंदु परिवाराचे वंशज आहेत. जर तुम्ही डीएन्एची पडताळणी केली, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की, मुसलमान अरबांचे वंशज आहेत कि हिंदूंचे ?

(म्हणे) हिंदु राष्ट्र साकारण्याची कल्पना करणे, म्हणजे स्वतःची हानी करून घेणे आहे !

हिंदु राष्ट्राचा पोटशूळ उठलेल्या अधिवक्ता 
प्रशांत भूषण यांची वैचारिक दिवाळखोरी
        संभाजीनगर, ८ मे - आपला देश वैविध्यपूर्ण असून सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता यांमध्ये शक्ती आहे. अशा वैविध्यतेतून आपण समृद्ध होत असतो; पण दुसर्‍यांवर दरारा निर्माण करणारे ही गोष्ट समजून घेऊ इच्छित नाही. इतर धर्मियांवर विचार लादून हिंदु राष्ट्र साकारण्याची कल्पना करणे, म्हणजे स्वतःची हानी करून घेणे आहे. (हिंदूंनी त्यांची मते इतरांवर लादली असती, तर विभिन्न पंथाचे लोक भारतात राहू शकले असते का ? काश्मीर पाकिस्तानला देऊन टाका अशी देशद्रोही विधाने करून प्रशांत भूषण मात्र भारतियांवर त्यांचे विचार लादत आहेत.- संपादक) भाजपचे शासन आल्यानंतर हे सूत्र अधिक उफाळले आहे, असे टीकात्मक प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी केले. येथील अमन कमिटीच्या वतीने एका विशेष कार्यक्रम वसंतराव नाईक महाविद्यालयात ७ मे या दिवशी घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

पिंपरे खुर्द (जिल्हा पुणे) येथील ग्रामस्थांंच्या सतर्कतेमुळे ८ गोवंशांचे प्राण वाचले, एका धर्मांधास अटक

शासनाकडून गोवंश हत्याबंदी कायद्याची 
ठोरात कठोर कार्यवाही करणे आवश्यक !
        पिंपरे खुर्द (जिल्हा पुणे), ८ मे (वार्ता.) - पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे ८ गोवंशियांचे प्राण वाचले आहेत. नीरा पोलिसांनी या प्रकरणातील पसार झालेल्या धर्मांधाला अटक केली आहे. (गोरक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या पिंपरे खुर्द ग्रामस्थांचे अभिनंदन ! असे सतर्क ग्रामस्थ सर्वत्र हवेत. - संपादक)
१. पिंपरे खुर्द या गावातील एका शेतात धर्मांधांकडून गोवंशियांची हत्या मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणातील कह्यात असलेे शेतभूमीचे मालक नामदेव कुंडलिक थोपटे यांच्या गोठ्यात अद्यापही गोवंश असल्याची माहिती तेथील नागरिकांनी गोरक्षक आणि पोलीस यांना दिली.
२. त्यानुसार पोलिसांनी हिंदुस्थान गोरक्षक संघाचे श्री. पंडित मोडक आणि अन्य गोरक्षक यांच्या साहाय्याने ६ गायी आणि २ वासरे यांची सुटका केली. सदर गोवंशियांना वडकी (जिल्हा पुणे) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेत सोडण्यात आले आहे.

(म्हणे) हिंदु नेत्यांना ठार करा आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा ! - दाऊद टोळीचा फतवा

भाजप शासन उलथवण्याचा प्रयत्न करणार्‍या दाऊद टोळीची नवी योजना !
     नवी देहली - गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत सहभागी असलेल्या हिंदू नेत्यांना तसेच जे मुसलमानविरोधी आहेत, अशा हिंदु नेत्यांना ठार करा आणि त्या मोबदल्यात चांगला पैसा आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा, असे आमिष दाऊद टोळीकडून दाखवले जात आहे. भारतात जातीय तणाव निर्माण करण्याची दाऊद टोळीने योजना आखली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दाऊद टोळीला युवकांची आवश्यकता आहे. त्यासाठी हे आमिष दाखवण्यात येत आहे.

पांडुरंगाची आरती आणि भजनसेवा करणारे पू. नंदकुमार हरिदास यांचा देहत्याग !

     
पू. नंदकुमार हरिदास
पू. नंदकुमार केशव हरिदास यांनी ७ मे या दिवशी देहत्याग केला. विठ्ठलाचे सेवेकरी नंदकुमार केशव हरिदास महाराज हे संत असल्याचे लक्षात आल्याने त्यांचा सनातन संस्थेच्या वतीने २ नोव्हेंबर २०१३ या दिवशी सन्मान करण्यात आला. त्यांच्या देहत्यागानिमित्त त्यांचा थोडक्यात परिचय, त्यांच्या संतत्वाची पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ओळखलेली लक्षणे वाचकांसाठी पुनर्प्रसिद्ध करत आहोत.
पू. नंदकुमार केशव हरिदास महाराज यांचा व्यावहारिक परिचय
     पू. नंदकुमार केशव हरिदास जन्म ५.१.१९४३ या दिवशी झाला. त्यांच्या घराण्यात पांडुरंगाची सेवा करण्याची परंपरा गेल्या ५०० वर्षांपासून चालू आहे. मूळच्या धार्मिक कुटुंबातील महाराजांनी १९८३ पासून पांडुरंगाची काकड आरती आणि भजनसेवा करणे, या सेवांना आरंभ केला. त्यांना विविध संतांचे साक्षात्कार झाले.
शिक्षण आणि चाकरी
     पू. नंदकुमार केशव हरिदास यांचे शिक्षण पंढरपूर येथे झाले. ते एस्.एस्.सी. म्हणजे पूर्वीची ११ वी उत्तीर्ण झाले आहेत. वर्ष १९६४ मध्ये ते आपटे उपलब हायस्कूल पंढरपूर येथे क्लार्क म्हणून चाकरीला लागले. तेथे त्यांना वरिष्ठ पदावर बढती मिळाली. ३१.१.२००१ या दिवशी ते सेवानिवृत्त झाले.

पंढरपूर येथील संत पू. नंदकुमार हरिदास महाराज यांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

     पू. नंदकुमार हरिदास महाराज यांनी ७.५.२०१६ या दिवशी सकाळी ६ वाजता देहत्याग केला. त्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
देहत्यागानंतरचे पू. नंदकुमार हरिदास महाराज यांचे छायाचित्र
१. कुटुंबियांना आलेल्या अनुभूती
१ अ. देहत्यागाच्या वेळी
१ अ १. पू. महाराजांच्या तोंडवळ्यावरील भाव शांत आणि समाधानी असल्याचे जाणवणे : पू. नंदकुमार हरिदास महाराज यांनी देह ठेवला. त्या वेळी त्यांचे तोंडवळ्यावरचे भाव शांत आणि समाधानी होते.
१ आ. पू. महाराजांना अंत्यविधीसाठी नेतांना आलेल्या अनुभूती
१ आ १. तुळशीहार घातलेल्या पू. महाराजांच्या जागी साक्षात् विठ्ठल दिसणे
: पू. महाराजांना अंत्यविधीकरता पालखीतून अभंगाच्या गजरात नेण्यात आले. तेव्हा त्यांना तुळशीहार घालण्यात आले होते. त्या वेळी कुटुंबियांना पू. महाराजांच्या जागी कमरेवर हात ठेवून साक्षात् विठ्ठल असल्याचे जाणवले.
१ आ २. पू. महाराजांच्या तोंडवळ्यावर आनंद आणि तेज जाणवणे : पू. महाराजांना अंत्यविधीसाठी नेतांना भजन आणि कीर्तन चालू होते. त्या वेळी कीर्तन आणि भजन चालू असतांना पू. महाराजांच्या तोंडवळ्यावर आनंद आणि तेज जाणवत होता.

कराड येथे हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आज दरबार मिरवणूक

       कराड, ८ मे (वार्ता.) - हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने ७ मे पासून शिवजयंती उत्सवास मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. ९ मे या दिवशी सायंकाळी शहरातून शाही दरबार मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू एकता आंदोलनाचे श्री. विनायक पावसकर आणि जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी दिली.
१. कराड शहरात वर्ष १९६८ पासून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. वर्ष १९८० पासून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून याला मोठे स्वरूप प्राप्त झाले.
२. गणेशोत्सवाप्रमाणे देखावे, शाही मिरवणूक यांमुळे कराडच्या शिवजयंती उत्सवाचा लौकिक संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात पसरला असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कराडची दरबार मिरवणूक पहाण्यासाठी शिवभक्त लक्षावधींच्या संख्येने उपस्थित रहातात.

उज्जैन सिंहस्थपर्वात स्वतःच्या अयोग्य कृतीमुळे धर्माला काळीमा फासणारे काही भोंदू नागा साधू !

चित्रविचित्र पेहराव करून लोकांना आकर्षित करणारे नागा साधू 

उत्तराखंडच्या काँग्रेस आमदारांना प्रत्येकी २५ लाख रुपये वाटले

काँग्रेस आमदाराचे स्टिंग ऑपरेशन
लोकशाहीला निरर्थक ठरवणारे लोकप्रतिनिधी !
     नवी देहली - १० मे या दिवशी उत्तराखंडमध्ये काँग्रेसकडून बहुमत सिद्ध करण्यात येणार आहे; मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा आमदारांच्या खरेदीचे एक स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या अत्यंत निकटचे काँग्रेसचे आमदार मदन बिस्त यांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यात बिस्त यांनी काँग्रेसच्या १२ आमदारांना पक्षाशी जोडून ठेवण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे. तसेच हरिश रावत यांनी खाणींच्या वाटपात २७ कोटी रुपये कमावल्याचेही म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वी हरिश रावत यांचेच अशा प्रकारचे एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्याची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे.

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये स्फोटकांसह धमकीचे पत्र

 • यावरून देशातील कायदा-सुव्यवस्था संपत चालली आहे, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
 • कन्हैया कुमारला पाठिंबा दिल्याने धमकीचे पत्र
 • पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट
      पुणे, ८ मे - येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफ्टीआयआयचे) माजी संचालक प्रशांत पाठराबे यांच्या नावे डिटोनेटर्स आणि स्फोटकसदृश पावडरसह धमकीचे पत्र ७ मे या दिवशी प्राप्त झाले आहे. देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएन्यू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पाठिंबा दिला म्हणून हे पत्र पाठवण्यात आले आहे. कन्हैया कुमारला संस्थेत प्रवेश दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्या पत्रात दिली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी दिली.

खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस

     संभाजीनगर, ६ मे - दुष्काळाची दाहकता वाढत असतांनाच खान्देशातील धुळे, जळगाव, विदर्भातील बुलढाणा, वाशीम आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात ५ मे या दिवशी वादळी वारे आणि गारांसह अवकाळी पाऊस झाला. वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली, तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी वीजही पडली. अमरावती जिल्ह्यात ३, धुळे जिल्ह्यात २, तर जळगाव जिल्ह्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला.
     अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । 
     स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति 
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, साधना केली, तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.सामायिक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये एक प्रश्‍न चुकीचा

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार !
      पुणे, ६ मे - राज्यात ५ मे या दिवशी सामायिक प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडली; परंतु या परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतील एक प्रश्‍न चुकीचा विचारल्याची माहिती उघड झाली आहे. भौतिकशास्त्राचे प्रा. केदार रिसबूड म्हणाले की, भौतिकशास्त्राच्या प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न क्रमांक ३३ व्हर्जन ११ मध्ये फोटो इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटीविषयी प्रश्‍न विचारला होता. त्याच्या उत्तरासाठी दिलेले पर्याय योग्य नव्हते. त्यामुळे हा प्रश्‍न चुकला आहे.

दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात येऊन सनातनला साहाय्य करणारे मुंबई येथील प.पू. प्रमोद केणे महाराज !

     
प.पू. प्रमोद केणे महाराज
मुंबई येथील संत प.पू. केणे महाराज हे विज्ञानाचे पदवीधर असून छोटे उद्योजकही आहेत. दत्तप्रेरणेने त्यांनी आजवर प्रतिमास पौर्णिमेला सलग १५० गिरनार यात्रा केल्या आहेत आणि आजही करत आहेत. गिरनार हे दत्तप्रभूंचे अक्षय निवास आणि जागृत स्थान आहे. प.पू. प्रमोद केणे महाराज हे ११ एप्रिल २०१६ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले असतांना, त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेला संवाद येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हाला सनातनच्या रामनाथी आश्रमात येण्याचा संकेत कशा प्रकारे मिळाला ? त्यामागे काय प्रक्रिया घडते ?
प.पू. प्रमोद केणे महाराज : विविध प्रकारचे संकेत मिळतात. कधी तेजतत्त्वाच्या माध्यमातून रूप दिसते, तर कधी गंधाच्या माध्यमातून संकेत मिळतात. एके दिवशी मी गिरनार येथे गेलो असतांना दत्तप्रभूंची आज्ञा झाली की, गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमात डॉ. आठवले असतात. तेथे जाऊन त्यांच्यावर उपाय कर. महाराजांचा हा संकेत मिळाल्यावर मी येथे आलो. दत्तप्रभूंची आज्ञा होण्यामागील कारण असे की, दत्तगुरूंमध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिघांच्या शक्ती एकत्रित असतात. त्यामुळे ते अधिक लाभदायक असते.

दीड वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी ! - आमदार अमल महाडिक

       कोल्हापूर, ८ मे (वार्ता.) - कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्‍वास टाकून आमदारपदी आपली निवड केली आहे. लोकप्रतिनिधी हा जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या यांचा उत्तरदायी असतो. ही गोष्ट लक्षात ठेवून माझ्या दीड वर्षांच्या कालावधीत आपण अत्यंत प्रामाणिकपणे मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करून सुमारे १२५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. येत्या वर्षभरात आणखी सहस्रो कोटी रुपयांचा विकासनिधी आणून मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा दर्जा उत्तम बनवणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार श्री. अमल महाडिक यांनी ६ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

इचलकरंजी येथे पोलिसांच्या दबावामुळे शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचे चित्र असलेला डिजिटल फलक शिवसूर्य मंडळाने काढला !

पोलिसांची मोगलाई ! हिंदुबहुल देशात हिंदूंच्या शौर्याचा इतिहास दर्शवणारा फलक काढण्यास भाग 
पाडणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? हिंदूंनी लावलेला फलक काढण्यास पोलीस हिंदूंवर दबाव 
आणतात; मात्र मुसलमानांनी लावलेले फलक काढण्यासाठी हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीची वाट 
पहातात ? अशा पोलिसांकडून हिंदूंना न्याय कसा मिळणार ?
 • डिजीटल फलक झळकावणार्‍या गुन्हेगारांवर तीन पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट ! 
 • हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीनंतर मुसलमानांनी खोटा इतिहास दर्शवलेले ८ फलक हटवले ! 
शहरात लावण्यात आलेला
अफझलखान वधाचे फलक
     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ८ मे (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवारीने हिंदुद्रोही शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा फलक शहरातील धान्यबोळ येथील शिवसूर्य मंडळाने लावला होता; मात्र जातीय तेढ निर्माण होत असल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी शिवसूर्य मंडळांच्या कार्यकर्त्यांना हा फलक काढण्यास भाग पाडले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा फलक काढला आहे. ही घटना २ मे या दिवशी घडली. शीघ्र कृती दलातील पोलिसांनी ही कारवाई केली, तर हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीनंतर मुसलमानांनी खोटा इतिहास दर्शवलेले ८ फलक हटवण्यात आले आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

उज्जैनसारख्या नगरीत शंकराचार्यांच्या आगमनाविषयी अनास्था ?
     उज्जैनमध्ये चालू असलेल्या सिंहस्थ पर्वासाठी आलेले पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर मध्यप्रदेश प्रशासनाकडून कोणीही उपस्थित नव्हते. त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्थाही नव्हती. परिणामी शंकराचार्यांना काही वेळ फलाटावरील लोखंडी दांड्यावर बसावे लागले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Ujjainme Sinhasthaparvke liye padhare Purike Shankaracharya ji ke swagatme gambheer chuke hui
     Hindu Dharmaguruonka apmaan honewala ekmatra desh Bharat
जागो ! : उज्जैन में सिंहस्थ पर्व के लिए पधारे पुरी के शंकराचार्यजी के स्वागत में गंभीर चुकें हुईं.
     हिन्दू धर्मगुरुआें का अपमान होनेवाला एकमात्र देश भारत !

वाईचे (जिल्हा सातारा) उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांना लाच घेतांना पकडले

कायद्याचे रक्षकच बनले भक्षक ! अमली पदार्थप्रकरणी 
लाच घेणार्‍या अशा लाचखोरांची सर्व संपत्ती 
कह्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित !
       सातारा, ८ मे (वार्ता.) - वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांनी मेफीड्रोन अमली पदार्थ प्रकरणातील आरोपीला साहाय्य करण्यासाठी ५ लक्ष रुपयांची मागणी केली होती. ही लाच स्वीकारतांना दलाल आणि मनसेचा पदाधिकारी युवराज ढमाळ यांना मुंबईच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ७ मे या दिवशी अटक केली आणि त्यानंतर दीपक हुंबरे यांनाही अटक केली.
       ९ मार्च २०१५ या दिवशी खंडाळा तालुक्यातील कण्हेरी येथे सातारा पोलिसांनी २२ कोटी रुपयांचे ११२ किलो वजनाचा मेफीड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त केला होता. हे अमली पदार्थ मुंबई पोलीस दलातीलच धर्मा काळोखे या पोलिसाचे असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली होती. सातारा पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर खंडाळा पोलीस ठाण्यात एन्डीपीएस् अ‍ॅक्टनुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. याचा प्राथमिक तपास वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे करत होते. हुंबरे यांनी संशयितांना साहाय्य करण्यासाठी हस्तकाकरवी १५ लक्ष रुपयांची लाच मागितली होती. ५ लक्ष रुपयांची लाच स्वीकारतांना दलाल ढमाळ याला अटक करण्यात आली.

मंदिरांच्या पुजार्‍यांना मंदिरांच्या भूमीतील उत्पन्न मिळाले पाहिजे ! - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शेतकरी मेळाव्यात ठराव

       कोल्हापूर, ८ मे (वार्ता.) - आम्हाला राजकीय आरक्षण आणि कर्जमाफी नको; मात्र ब्राह्मण शेतकर्‍यांच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसह मंदिराची पूजा आणि देखभाल करणार्‍या पुजार्‍यांना मंदिराच्या भूमीतील उत्पन्न मिळाले पाहिजे. शेतीमालाची किंमत उत्पादन खर्चावर ठरवावी आदी ठराव अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आयोजित शेतकरी मेळाव्यात करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. शाम जोशी होते.
        प्रारंभी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार वेठे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात शेतकरी आघाडी प्रमुख आणि अधिवक्ता श्री. सुधीर जोशी-वंदुरकर यांनी मेळाव्यामागील पार्श्‍वभूमी मांडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्र एकाच धर्माचे केल्यास इतर धर्मियांनी त्यात समाविष्ट व्हायचे कि त्यांना संपवले जाणार ?

हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या अधिवक्ता प्रकाश आंबेडकर 
यांची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारा प्रश्‍न !
     पुणे, ८ मे (वार्ता.) - हिंदु धर्माचे सांकेतिक आणि तात्त्विक असे धर्म व्यवस्था असणारे दोन विचारप्रवाह आहेत. ते कधी एकमेकांशी सुसंगत राहिले नाहीत. सांकेतिक धर्मात महिलांना स्वातंत्र्य आहे, तर तात्त्विक धर्मामध्ये महिलांवर बंधने आहेत. हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेचा विचार करण्यापूर्वी या धर्म व्यवस्थेपैकी कोणत्या धर्म व्यवस्थेनुसार देश चालवला जाणार आहे ? राष्ट्र एकाच धर्माचे केल्यास इतर धर्मियांच्या अस्तित्वाचे काय ? अशा वेळी इतर धर्मियांनी देशाचा जो धर्म असेल, त्यात समाविष्ट व्हायचे कि त्यांना संपवले जाणार, असे प्रश्‍न भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले. (हिंदु धर्माविषयी उठलेल्या पोटशुळामुळेच आंबेडकर अशी विधाने करत आहेत. अन्य राष्ट्रांनीही आपापला धर्म जाहीर केला असतांना केवळ जावईशोध लावण्यापेक्षा हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घेण्याचे कष्ट आंबेडकर घेतील का ? - संपादक) वक्तृत्त्वोतेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत राष्ट्राला धर्म असावा का ? या विषयावर ते बोलत होते.

भारताच्या भूगोलाची छेडछाड करणार्‍यांना कधी रोखणार ?

असा प्रश्‍न केवळ प्रखर राष्ट्रप्रेमी शिवसेनाच विचारू शकते. देशातील अन्य एकही पक्ष, 
लोकप्रतिनिधी असा प्रश्‍न विचारत नाहीत, हे लक्षात घ्या !
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचा केंद्रशासनाला खणखणीत प्रश्‍न
      मुंबई, ८ मे - भारताचा नकाशा चुकीचा दाखवला, तर १०० कोटी रुपये दंड आणि ७ वर्षांचा तुरुंगवास अशी तरतूद असलेला कायदा अमलात येत आहे. या कायद्यामुळे नक्की काय होणार आणि शासन कोणाला तुरुंगात पाठवणार ? भारतमाता की जय हे जसे सक्तीने म्हणता येत नाही, तसे भारताच्या नकाशाचा विनयभंग सक्तीने खरेच रोखता येईल काय ? कारण आमच्या नकाशाची छेडछाड करणारे लोक विदेशात आहेत. त्यात प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. देशाच्या नकाशाचा मान आणि त्याचे संरक्षण या विषयात गांभीर्य नक्कीच आहे; पण पाकिस्तान आणि चीन यांच्या आगळिकीचे काय करणार ? केवळ कायदा करून भारताच्या नकाशाची मोडतोड, विटंबना या अपप्रकारांना पूर्णविराम मिळेल, असे आम्हाला वाटत नाही. नकाशाची कागदी लढाई ठीक आहे; पण त्याहीपेक्षा भारताच्या भूगोलाची छेडछाड करणार्‍यांना कधी रोखणार, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी जमिनी जंग अधिक महत्त्वाची आहे. ती आपण लढणार आहोत काय, असा खणखणीत प्रश्‍न शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ६ मे या दिवशीच्या दैनिक सामनाच्या संपादकीयमधून केला आहे.

निपाणी येथे हिंदूंकडून मुसलमान व्यापार्‍यांची अरेरावी बंद

असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवेत !
     निपाणी (जिल्हा बेळगाव), ८ मे (वार्ता.) - २८ एप्रिल या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि उलूट या गावांतून काही हिंदु शेतकरी आणि व्यापारी आंबे विकण्यासाठी येथे आले होते. ते अल्प दरात आंब्याची विक्री करत होते. तेथे अन्य मुसलमान आंबेविक्रेतेही होते. हिंदु व्यापारी आणि शेतकरी अल्प दरात आंबे विक्री करत असल्याचा मुसलमान व्यापार्‍यांना राग आला. त्यांनी एकत्रित येऊन हिंदु व्यापार्‍यांनी येथून निघून जावे, असे सांगितले. तेथील हिंदु टॅक्सीचालक आणि हिंदु व्यापारी यांनी मुसलमानांना खडसवले. आंबे कोणत्या किंमतीला विकायचे, हा त्यांचा प्रश्‍न आहे. तुमचा येथे काही संबंध येत नाही, असे त्यांनी मुसलमान व्यापार्‍यांना सांगितले. त्यानंतर मुसलमान व्यापारी गप्प बसले. (हिंदूंनो, आतातरी संघटितपणाचे आणि धर्मांधांना वेळीच ठणकावण्याचे महत्त्व जाणा ! - संपादक)

तृप्ती देसाई यांच्या कार्यकर्त्यांचा डोंबिवली येथील हनुमान मंदिरात घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी

मंदिरात गाऊन (मॅक्सी) घालून न येण्याच्या फलकाचे प्रकरण
     ठाणे, ८ मे (वार्ता.) - डोंबिवली पश्‍चिमेकडील कोपरगाव येथील गावदेवी मंदिर, महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर येथे महिलांना गाऊन (मॅक्सी) घालून येऊ नये, असे फलक लावण्यात आले आहे. याला विरोध म्हणून तृप्ती देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. या वेळी गावदेवी मित्रमंडळ आणि तिन्ही मंदिरांची देखभाल करणारे शिवसेना नगरसेवक श्री. रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी या धर्मद्रोही महिलांचा प्रयत्न संघटितपणे हाणून पाडला. आज सकाळी १० वा सदर घटना घडली. 
    पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या हिंदूंच्या प्राचीन धार्मिक परंपरा मोडून सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या कार्यकर्त्या आज सकाळी पोलीस संरक्षण घेऊन कोपर येथील हनुमान मंदिरात घुसण्यासाठी येणार होत्या. ही बातमी शिवसेनेचे श्री. रमेश म्हात्रे यांना कळताच त्यांनी २००-२५० महिलांना एकत्र करून त्यांना विरोध केला. शेवटी तृप्ती देसाई यांच्या कार्यकर्त्या पळून गेल्या.

पुण्यात अज्ञातांनी पुन्हा ७ दुचाकी वाहने जाळली

पुण्यामध्ये अशा घटना सातत्याने होणे म्हणजे पोलीस 
प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था यांचे अस्तित्व संपल्याचे लक्षण
       पुणे, ८ मे - येथील उत्तमनगर परिसरात वाहने जाळण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या भागातील एका निवासी इमारतीच्या (सोसायटी) वाहनतळामध्ये लावलेल्या ७ दुचाकी अज्ञात आरोपींनी जाळल्या आहेत. ही घटना ८ मे या दिवशी पहाटे घडली आहे. त्या सर्व दुचाकी आगीत जळून खाक झाल्या आहेत.
       पहाटेची वेळ असल्याने झोपलेले नागरिक आग आणि धूर यांमुळे जागे झाले. आगीच्या ज्वाळा दृष्टीस पडताच इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या आगीच नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हाजी अली सबके लिए फोरममध्ये फूट !

तृप्ती देसाई यांची 
कार्यपद्धत शांततापूर्ण नाही - फोरम
        मुंबई - हाजी अली दर्ग्याच्या मझारपर्यंत महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी स्थापन झालेल्या हाजी अली सबके लिए फोरममध्ये फूट पडली आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची कार्यपद्धत शांततापूर्ण नसल्याचे सांगत फोरमने स्वत:ला या आंदोलनापासून वेगळे केले आहे. (केवळ प्रसिद्धीच्या हव्यासाचा अट्टाहास असलेल्यांची कार्यपद्धत शांततापूर्ण कशी असेल ? - संपादक)
       तृप्ती देसाई म्हणाल्या की, फोरमच्या सदस्यांत आंदोलन करण्याचा तसूभरही दम नाही. यामुळे मीच पाठिंबा मागे घेत आहे. आता भूमाता ब्रिगेड तिच्या बळावर दर्ग्यात महिलांना पुरुषांच्या समान अधिकार मिळवून देण्यासाठी लढा देईल

आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने मंगळवारी टिळक स्मारक येथे व्याख्यान !

       सांगली, ८ मे (वार्ता.) - सांगली जिल्हा पुरोहित संघाच्या वतीने मंगळवार, १० मे या दिवशी लोकमान्य टिळक स्मारक येथे सायंकाळी ६.३० वाजता एका व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या वेळी श्री. जनार्दन लिमये हे मार्गदर्शन करतील.

महिलांच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षण शिकवणे आवश्यक !

      नुकतेच केंद्र शासनाने महिला सुरक्षेच्या प्रश्‍नावर उपाय म्हणून भ्रमणभाष संचामध्ये पॅनिक कळची (बटन) सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी साहाय्यभूत ठरू शकते. ही सुविधा जानेवारी २०१७ पासून अमलात येईल. त्यामुळे भ्रमणभाष संचामध्ये पॅनिक कळ बसवणे उत्पादकांना अनिवार्य करण्यात आले आहे. ही कळ नसलेल्या भ्रमणभाष संचाचे उत्पादन आणि विक्री थांबवण्यात येईल. संकटसमयी कळ दाबताच महिला अडचणीत आहे, असा तातडीचा लघुसंदेश महिला पोलीस नियंत्रण कक्षासह आप्तस्वकीयांना पाठवता येईल.

संतश्री लक्ष्मण चैतन्यजी धाम यांच्या वतीने उज्जैनच्या सिंहस्थपर्वात सनातनला सहकार्य

     उज्जैन येथे धर्मशिक्षण प्रदर्शनकक्ष उभारत असतांना त्या ठिकाणी सेवेत असलेल्या ७ साधकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची सोय ८ दिवसांसाठी श्री हरि चैतन्य धाम येथे पू. शिवचैतन्य महाराजांनी स्वतःहून केली होती. प्रदर्शन पाहिल्यावर महाराजांनी सांगितले की, तुम्हाला साहित्य ने-आण करण्यासाठी टेम्पो अथवा इतर वाहने वापरण्यास विनामूल्य उपलब्ध करून देऊ.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
कृतज्ञता
१. कृतज्ञता म्हणजे काय ? : एखादी गोष्ट मला देवामुळे मिळाली किंवा देव माझ्यासाठी किती करतो, असे वाटून त्याच्याविषयी मनात प्रेम आणि आदर निर्माण होणे, म्हणजेच कृतज्ञता.
२. कृतज्ञतेचे महत्त्व
अ. मुलांनो, तुम्ही घरी लेखणी (पेन) विसरल्यास शाळेत मित्राने तुम्हाला त्याची लेखणी दिली, तर ती परत देतांना तुम्ही त्याला धन्यवाद म्हणता. मग देवाने आपल्याला जन्म देऊन हवा, पाणी, अन्न, जीवनावश्यक वस्तू, धडधाकट शरीर आणि बुद्धी इतके सगळे दिलेले आहे; म्हणून त्याविषयी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
आ. देवच आपल्यासाठी सर्व करतो, असे वाटून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केल्याने मनात कोणत्याच गोष्टीचा अभिमान निर्माण होत नाही.

भारतात इतके अत्याचार होत असूनही त्यांचा भारतात निषेध केला जात नाही; पण बलुचिस्तानप्रश्‍नी पाकिस्तानात झालेल्या अत्याचाराचा कॅनडात निषेध केला जातो !

     बलुचिस्तानच्या प्रश्‍नावर पाककडून चालू असलेल्या दमनशाहीच्या निषेधार्थ कॅनडातील टोरॅन्टोमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी पाकचा झेंडा जाळून तेथील शासनाच्या विरोधात रोष प्रकट केला. आंदोलनकर्त्यांनी पाकचा झेंडा जाळून त्याचे कफन बनवले, तसेच बलुचिस्तान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदूंनो, जगभरातील हिंदूंवर अत्याचार झाले, तर अमेरिकेतील हिंदु धार्मिक नेते राजन झेद प्रतिकार करतात; पण भारतातील हिंदू एक शब्द बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

     योग आणि सैतान यांचा संबंध असल्याचे कारण देऊन स्वीडनमधील वर्नामो नगर परिषदेच्या रायादाहोम येथील शाळेत योगवर्गांवर बंदी घालण्यात आली आहे. याचा अमेरिकेतील हिंदु धार्मिक नेते राजन झेद यांनी निषेध केला, तसेच स्वीडनचे राजे गुस्ताव्ह आणि पंतप्रधान स्टीफन लोवेन यांना पत्र देऊन योगाभ्यासाची महती वर्णन केली आणि योगवर्गांवरील बंदी रहित करण्याची मागणी केली.

हिंदूंचे भीषण अधःपतन होण्यामागचे कारण

      यामागे सनातन धर्माचा काहीच दोष नाही किंबहुना सनातन धर्माचे अनुसरण करत नसल्यामुळे हिंदूंचे भीषण अधःपतन झाले आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १०.३.२०११)

आज अक्षय्य तृतीया

     हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया हा एक मुहूर्तदिन आहे. वैशाख शुक्ल पक्ष तृतीयेला केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. इ.स. २००३-२००४ मध्ये एक मुसलमान राष्ट्राध्यक्ष, हिंदु प्रधानमंत्री आणि ख्रिस्ती संरक्षणमंत्री यांनी एकोप्याने राष्ट्राचा रथ चालविला, हिंदुस्थानविना-भारताविना इतरत्र कुठेही असे होऊ शकते काय?
२. केरळीय विधानसभेचे सदस्य, संसदेचे सदस्य आणि मंत्री अल्ला अन् येशू ख्रिस्ताच्या नावाने शपथ घेतात. हे घटनेच्या विरोधी आहे. एखादा हिंदु राम किंवा कृष्णाच्या नावाने शपथ घेऊ शकतो का?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

सर्व कौटुंबिक कर्तव्ये प्रेमाने पार पाडणारे डोंबिवली येथील श्री. अभय माधव जातेगावकर (वय ६१ वर्षे) !

श्री. अभय जातेगावकर
      वैशाख शुक्ल पक्ष द्वितीया (८.५.२०१६) या दिवशी डोंबिवली येथील श्री. अभय माधव जातेगावकर यांची एकसष्टी झाली. यानिमित्ताने त्यांच्या बहिणी आणि भाच्या यांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. समंजस : माझा भाऊ श्री. अभय माधव जातेगावकर लहानपणापासूनच अतिशय शांत आणि समंजस आहे. आम्ही दोघी बहिणी आणि चार भाऊ आहोत. तो आमच्यापेक्षा लहान असूनही प्रत्येक प्रसंगात नेहमी पडती बाजू घेतो. लहानपणापासून त्याचा मित्रपरिवार अगदी नेमका होता.
२. नेहमी हसतमुख, नम्र, आदराने बोलणे आणि प्रेमभाव हे त्याचे स्थायीभाव आहेत. तो अतिशय प्रामाणिक आहे.

सहनशील आणि समंजस असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय ९ वर्षे) !

कु. आर्या श्रीश्रीमाळ
पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून २०११ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. वैशाख शुक्ल पक्ष द्वितीया (८.५.२०१६) या दिवशी कु. आर्या हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. आठ मासांची (महिन्यांची) असतांना आध्यात्मिक त्रासामुळे जुलाब होऊनही आई सभेत विषय मांडण्यासाठी गेल्यावर वडिलांजवळ न रडता शांतपणे रहाणे : कु. आर्या ८ मासांची (महिन्यांची) असतांना सौ. मानसी हिला (आर्याच्या आईला) २५.१२.२००७ या दिवशी जुन्नर येथे सार्वजनिक हिंदु धर्मजागृती सभेत वक्ता म्हणून सेवा होती. त्या वेळी २३.१२.२००७ पासून आर्याला अकस्मात् जुलाब होऊ लागले आणि तिला आधुनिक वैद्यांकडे नेऊन औषधोपचार चालू केले. आध्यात्मिक उपाय वाढवले, तरीही २५.१२.२००७ च्या सकाळपर्यंत तिचे जुलाब थांबले नाहीत. तेव्हा मानसीने सभेत विषय मांडण्याचे रहित करावे, असा विचार माझ्या मनात आला. श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवून मानसीने सभेत विषय मांडण्यासाठी जाण्याचा निर्णय कायम ठेवला. आर्याला या तीन दिवसांत सभास्थळी पोेचेपर्यंत ६० हून अधिक जुलाब झाले. जुन्नरला सभास्थळी पोचल्यानंतर तिचेे जुलाब थांबल्याने ती सभा संपेपर्यंत मी आणि सौ. बोरकरकाकू यांच्याकडे शांतपणे राहिली. या तीन दिवसांच्या कालावधीत त्रास होऊनही ती न रडता शांत आणि स्थिर राहिली. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच तिने हा आध्यात्मिक त्रास सहन करून आईला सभेत विषय मांडण्यासाठी सहकार्य केले.

प्रगल्भ आणि देवाच्या अनुसंधानात असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली डोंबिवली येथील चि. सान्वी लोटलीकर (वय १ वर्ष) !

 चि. सान्वी लोटलीकर
१. १ ते १-१/४ वर्ष
१ अ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे : दूरचित्रवाहिनीवर धर्मविरोधी विषयांवर चर्चासत्रे बघत असतांना ती अस्वस्थ होते आणि रडू लागते. त्रास असणार्‍या ठिकाणी ती थांबतच नाही. मला इथून बाहेर जायचे आहे, असे तिच्या बोबड्या भाषेत सांगत असते.
१ आ. कु. पूर्तीने सांगितलेले पटकन ऐकणे : कु. पूर्ती आणि कु. सान्वी या दोघींचे एकमेकींशी चांगले पटतेे. कु. पूर्ती सांगते, आम्ही पूर्वी मैत्रिणी होतो. आम्हाला एकत्र सेवा करता यावी; म्हणून देवाने आम्हा दोघींना एकत्र पाठवले आहे. कु. पूर्तीने तिला काही सांगितले की, ती लगेच ऐकते.
१ इ. प्रगल्भ असणे : कु. सान्वी तिच्या वयाच्या मानाने पुष्कळ समजूतदार आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून ते जाणवते. आमचे नातेवाईक आणि तिला भेटणारे सर्वच तिच्या प्रगल्भ बुद्धीविषयी सांगतात.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. पूर्ती लोटलीकर (वय ५ वर्षे) हिच्या संदर्भात तिच्या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे

कु. पूर्ती लोटलीकर
     कु. पूर्ती अमेय लोटलीकर (वय ५ वर्षे) हिची २०१४ मध्ये ६४ टक्के पातळी होती. तिची सध्याची वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. पूर्ती सध्या करत असलेली साधना
अ. श्रीकृष्णाचा नामजप लिहून काढणे
आ. महर्षींनी सांगितलेला नामजप बसून ३० मिनिटे करणे
इ. स्तोत्रांचे पठण
ई. अत्तर, कपूर आणि उदबत्ती यांचे उपाय करणे
उ. चि. सान्वीला (धाकट्या बहिणीला) आध्यात्मिक आणि इतर गोष्टी शिकवणे
- श्री. अमेय आणि सौ. आर्या लोटलीकर (पूर्तीचे आई-वडील), डोंबिवली, जि. ठाणे.

देव वेगवेगळ्या रूपांत येऊन आपल्या भक्तांना साहाय्य करतो आणि त्यांची काळजी घेतो, याची प्रचीती येणे

१. अनोळखी व्यक्तीने साहाय्य करणे : सिद्धटेकला जातांना आम्हाला रात्री उशीर झाला. आम्ही तेथे दर्शन घेऊन लगेच निघायचे असे ठरवले होते; पण दोन वेळा रस्ता चुकलो. त्यामुळे तेथे पोचण्यास आम्हाला रात्रीचे ११ वाजले, तरीही मनात आपण लगेच पुढच्या प्रवासाला निघूया, असा विचार होता. दर्शन घेतल्यानंतर तेथे आम्हाला एका अनोळखी व्यक्तीने स्वतः येऊन सांगितले, तुम्ही आता निघू नका. रात्रीचा प्रवास करू नका. येथे बाजूला भाकरी-पिठले मिळेल आणि भक्त निवासमध्ये रात्री थांबा.

दुसरे बाळ होणे, हे ईश्‍वराचे नियोजन असल्याची साधक दांपत्याने घेतलेली प्रचीती !

सौ. आर्या आणि श्री. अमेय लोटलीकर
१. दुसरे बाळ नको, या विचारात पालट होत जाऊन दुसरे मूल होऊ देेण्याविषयी मनात विचार येणे : कु. पूर्ती झाल्यानंतर आता दुसरे बाळ नको, अशी आम्हा सर्वांची मानसिकता होती; पण पूर्ती जसजशी मोठी होऊ लागली, तसे ते विचार पुसट झाले. ती ३ वर्षांची झाल्यापासून आता तिला भावंड हवे का ?, असे विचार येऊ लागले. मला नक्की कळत नव्हते की, हे माझ्या मनाचे आसक्तीयुक्त विचार आहेत की, खरंच पूर्तीला एक भावंड व्हावे, अशी ईश्‍वराची योजना आहे अथवा आमचे प्रारब्ध आहे.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

आयो नटखट लाल ।

आयो नटखट लाल ।
आयो नटवरलाल ॥ धृ.॥
मटकी फोडे, माखन चुराये ।
आयो नटखट लाल ॥ १ ॥
मथुरेको जानेवाले गोपियोंको सताये ।
आयो नटखट लाल ॥ २ ॥
बासुरी बजाके गोपियोंका मन खुष करे ।
आयो नटखट लाल ॥ ३ ॥
- कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (२५.४.२०१५)

श्रीकृष्णा, गोविंदा, तूच सर्वस्वा ।

भावपूर्ण, परिपूर्ण सेवा करवून घे तुझी ।
या चिमुकल्या हातांतून ।
श्रीकृष्णा, गोविंदा, माझ्या सर्वस्वा ॥ धृ.॥
असे समज ही छोटी गोपी ।
तुझी सेवा करत आहे ।
श्रीकृष्णा, गोविंदा, माझ्या सर्वस्वा ॥ १ ॥
माझ्या संंगे खेळायला येेशील का ? ।
माझ्याशी खेळशील का ? ।
श्रीकृष्णा, गोविंदा, माझ्या सर्वस्वा ॥ २ ॥

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
सतत वर्तमानकाळात रहाणे आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म 
मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
भावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
गुंड धमकावून आणि राजकारणी भ्रष्टाचार करून पैसे लुबाडतात, तर संतांना धार्मिक वृत्तीचे लोक स्वतःहून अर्पण देतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आश्‍वासने उदंड झाली !

संपादकीय
     हे वर्ष निवडणुकांचे आहे. अनेक राज्यांच्या विधानसभांसाठी निवडणुका होत आहेत. प्रत्येक राज्यातील शासन शक्याशक्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून मतदारांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच एरव्ही कधी स्वप्नातही पाहिले नसतील, अशा सोयी-सुविधा मतदारांना मिळत आहेत. आपला देश फार काही श्रीमंत आहे, असे म्हणता येणार नाही. येथील शासने कर्जबाजारीच असतात; मात्र ती चालवणारे पक्ष इतके गलेलठ्ठ असतात की, त्यांचे एकेक स्वप्न पहाता गरीब बिचारा मतदार हबकून जातो. विविध पक्षांनी घोषित केलेले निवडणूक घोषणापत्र हे त्या पक्षाचे स्वप्नच असते. मग कुणी विकासाचे गाजर दाखवतो, कुणी सबका साथ म्हणतो, कुणी परिवर्तनाच्या नावाखाली स्वातंत्र्यसैनिकांनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे पाश्‍चात्तीकरण चालू ठेवतो. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांनी मात्र राज्य हायटेक करण्याचा चंगच बांधला आहे. बाकी खायला अन्न मिळाले नाही, तरी चालेल; पण महागडा भ्रमणभाष, इंटरनेट अगदी हवेच.. ! त्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn