Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक वासुदेव चापेकर बलीदानदिन

कोटी कोटी प्रणाम !

आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती (परंपरेनुसार)

कोटी कोटी प्रणाम !

आज परशुराम जयंती

मुंबई येथे १४ मे या दिवशी रणरागिणीची शाखा कार्यरत होणार !

    
छायाचित्रात डावीकडून धर्माभिमानी सौ. विद्या कामेरकर, सौ. उर्मिला
 खानविलकर, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सौ. रमा सावंत, रणरागिणी
 शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतिक्षा कोरगावकर, निसर्गोपचारतज्ञ
 श्रीमती संगीता अमलाडी, धर्माभिमानी सौ. शर्मिला बांगर, सौ. ज्योती परब
      मुंबई - झाशीच्या राणीचा आदर्श ठेवून महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखणे अन् धर्मपरंपरांचे रक्षण करणे यांसाठी कार्यरत असलेली हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणीची शाखा आता मुंबई येथे सक्रीय होत आहे. १४ मे या दिवशी मुंबई येथे रणरागिणीच्या शाखेच्या उद्घाटनचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ६ मे या दिवशी रणरागिणी शाखेच्या महिलांनी मुंबईची ग्रामदेवता श्री मुंबादेवीचे दर्शन घेऊन राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी देवीचा आशीर्वाद घेतला. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व रणरागिणींनी श्री मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि अन्य महिला उपस्थित होत्या. देवीचा आशीर्वाद घेतल्यावर रणरागिणींनी हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, अशा उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

९ नोव्हेंबरपासून अयोध्येत राममंदिराच्या कामाला प्रारंभ !

धर्मसंसदेचा निर्णय
     उज्जैन - अखिल भारतीय संत संमेलन आणि धर्म संसद येथे अयोध्येत रामंदिराचे बांधकाम प्रारंभ करण्याच्या तिथीचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी कार्तिक अक्षय नवमी अर्थात ९ नोव्हेंबरपासून मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार प्रथम सिंह द्वाराचे काम चालू करण्यात येणार आहे.

श्री शनिशिंगणापूर येथील परंपरा पाळली जायला हवी होती ! - शंकराचार्य श्री श्री विद्यारण्यभारती

धर्मपरंपरांना छेद देणारे आणि ती न पाळणारे यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     संभाजीनगर - श्री शनिशिंगणापूर येथील परंपरा पाळली जायला हवी होती, असे स्पष्ट प्रतिपादन कर्नाटकमधील हंपी येथील शंकराचार्य श्री श्री विद्यारण्यभारती यांनी श्री शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर महिलांनी केलेल्या प्रवेशाच्या सूत्रावर केले. शिर्डीचे श्री साईबाबा आमच्यासाठी गुरुस्थानी असून त्यांच्याविषयी काही वाद होण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. ब्राह्मण समाज परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
     शंकराचार्य श्री श्री विद्यारण्यभारती पुढे म्हणाले, आपले वेदमंत्र काय सांगतात, विज्ञानवाद कसा मांडतात यापासून ते अगदी रूढी, परंपरा पाळणे यांविषयी पुनःश्‍च विचार करणे आवश्यक आहे. जे आपल्याकडे रूढी-परंपरेने आले, तेच आपण विसरलो आहोत. यामुळे आपल्याला अधोगतीकडे जावे लागत आहे. अमेरिका, जर्मनी यांसारखी राष्ट्रे आपल्याच हिंदु संस्कृतीचा अवलंब करून वेदमंत्र शिरोधार्ह मानत वेगाने विज्ञानवाद मांडत आहेत. (केंद्रातील भाजप शासन याचा विचार करेल का ? - संपादक)

पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांसह प्रज्ञासिंह ठाकूर आणि पीठाधीश्‍वर अमृतानंद देवतीर्थ यांना कुंभस्नानाला सोडण्याची मागणी !

गोरक्षा, संत सुरक्षा आणि राष्ट्र निर्माण यांसाठी हिंदुत्वनिष्ठांची बैठक !
डावीकडून डॉ. गंगाराम तिवारी, पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, श्री. राजेश
शर्मा, स्वामी स्वात्मबोधानंदजी महाराज आणि स्वामी अशोकानंदजी
     उज्जैन - कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना कारागृहात बंदी असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, पीठाधीश्‍वर स्वामी अमृतानंद देवतीर्थ महाराज, स्वामी असिमानंद, संत नारायण प्रेमसाई, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित विविध कारागृहात बंद आहेत. या सर्वांना सिंहस्थ स्नान आणि दर्शन यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संस्कृती रक्षक संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
     ६ मे या दिवशी प्रेस क्लब येथे आयोजित गोरक्षा, संत सुरक्षा आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये संस्कृती रक्षक संघाचे राष्ट्रीय संयोजक श्री. राजेश शर्मा, श्रीरामबालक महात्यागी महाराज, स्वामी स्वात्मबोधानंद महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, भारत जागृतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वामी अशोकानंदजी महाराज उपस्थित होते.

गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

      फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत. अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अश्‍लील संकेतस्थळ ब्लॉक करण्यासाठी येत्या ८-१० दिवसांत अप्पर आयुक्तांच्या स्वाक्षरीने पत्र देणार ! - परमवीर सिंह, ठाणे पोलीस आयुक्त

अभिनेत्री सनी लिओन यांच्या विरोधातील तक्रारीवर 
वर्षभरात केवळ पत्र पाठवण्याचा पोलिसांकडून सोपस्कार !
     समाजाची नैतिकता रसासळाला नेणार्‍या अश्‍लील संकेतस्थळांवर कोणतीही कारवाई होत नाही; मात्र राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या फेसबूक पानावर तडकाफडकी नाहक बंदी आणली जाते. यालाच न्याय म्हणायचे का ? अश्‍लील संकेतस्थळांवर स्वतःहून कारवाई करणे दूर, उलट धर्मप्रेमींनी तक्रार केल्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नसेल, तर पोलिसांचा गुन्हेगारांना काय धाक रहाणार ?
       मुंबई - अभिनेत्री सनी लिओन यांचे अश्‍लील संकेतस्थळ बंद करण्यात यावे, यासाठी त्याच्या प्रक्षेपणाचे अधिकार असलेले गो डॅडी आस्थापन आणि गुगल आस्थापन यांना यापूर्वी पत्र पाठवण्यात आले आहे; मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता हे अश्‍लील संकेतस्थळ ब्लॉक करण्यासाठी येत्या ८ ते १० दिवसांत अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या स्वाक्षरीने संबंधितांना पत्र पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ५ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेला दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Dr. Subramaniam Swamyji ne Rajyasabha me Rammandir nirmanka prashna upasthit kiya.
     Sansadme anya hindutvanishtha sansad is vishaypar moun kyon ?
जागो !
: डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामीजी ने राज्यसभा में राममंदिर निर्माण का प्रश्‍न उपस्थित किया.
     संसद में अन्य हिन्दुत्वनिष्ठ सांसद इस विषय पर मौन क्यों ?

फलक प्रसिद्धीकरता

राममंदिराविषयी संसदेत केवळ डॉ. स्वामीच का बोलतात ?
इतर खासदार का बोलत नाहीत ?
      भाजपचे नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ६ मे या दिवशी राज्यसभेत राममंदिर उभारणीचा प्रश्‍न उपस्थित केला आणि राममंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणी होण्याविषयी केंद्रशासनाने संसदेत वक्तव्य करावे, अशी मागणी केली.

वर्कला (केरळ) सामूहिक बलात्कार प्रकरणात सफीर उर्फ दाऊद, शैजु आणि रशीद या वासनांधांना अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे हात-पाय
 तोडणे, दगडाने ठेचून मारणे, अशी शिक्षा का देऊ नये ?
     तिरुवनंथापुरम - केरळ पोलिसांनी नुकत्याच झालेल्या एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात पीडित मुलीचा प्रियकर सफीर उर्फ दाऊद, त्याचा मित्र रशीद आणि रिक्शाचालक शैजु या तीन वासनांधांना ४ आणि ५ मे या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक केली आहे. परिचारिकेचे शिक्षण घेणार्‍या सदर पीडित विद्यार्थिनीवर तिरुवनंथापुरम जिल्ह्यातील वर्कला येथे काही दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासह ३ जणांनी एका ऑटो-रिक्शेाध्ये सामूहिक बलात्कार केला होता. ही विद्यार्थिनी दलित असल्याचे नंतर निष्पन्न झाले. (रोहित वेमुलाप्रकरणी पूर्ण जग डोक्यावर घेऊन केंद्रशासनाला धारेवर धरणारे अथवा दादरी प्रकरणात गोहत्येमुळे दादरी येथील इकलाखची हिंदूंकडून कथित हत्या झाल्यावर एकजात संपूर्ण हिंदु समाजालाच असहिष्णु ठरवणारे धर्मनिरपेक्षतावादी पक्ष, संघटना आणि बहुतांश प्रसारमाध्यमे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वासनांधांचा धर्म पाहून आता गप्प बसले आहेत का ? - संपादक)

हिंदु धर्म संकटात असल्याने साधू-संतांनी एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवश्यकता !

     उज्जैन येथील सिंहस्थ पर्वक्षेत्री अनेक साधू-संत, महंत त्यांच्या आखाड्यांसह आले आहेत. सर्वांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एकत्रित येऊन कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे; मात्र काही साधू-संतांमध्ये एकमेकांविषयी असलेल्या कटुतेमुळे त्यांनी एकत्रित कार्य करण्यासाठी असमर्थता व्यक्त केली आहे. कारागृहात असलेल्या एका प्रसिद्ध संतांच्या भक्तांनी सिंहस्थ पर्वक्षेत्री अन्य संतांशी चर्चा केली असता त्या संतांनी तुमच्या संतांचे कार्य वेगळे आणि आमचे कार्य वेगळे आहे, अशा शब्दांत भक्तांची हेटाळणी केली.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील संत पू. नंदकुमार हरिदास यांचा देहत्याग

पू. नंदकुमार हरिदास
      पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील पू. नंदकुमार हरिदास (वय ७४ वर्षे) यांनी शनिवार, ७ मे या दिवशी सकाळी ६ वाजता देहत्याग केला. सनातनने त्यांच्यातील संतत्व ओळखून त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या पश्‍चात ५ मुली, १ मुलगा, जावई, सून, नातवंडे आणि २ भाऊ असा परिवार आहे.
     नवी देहली - आम आदमी पक्षाकडून ७ मेच्या दिवशी देहलीत ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याच्या प्रकरणी आंदोलन केले. या वेळी त्यांनी मोदी शासन सोनिया गांधी यांना अटक करण्याचे धाडस का दाखवत नाही?, असा प्रश्‍न करत सोनियांना एक दिवस कारागृहात टाकले, तर सर्व सत्त समोर येईल, असे म्हटले. तसेच गेल्या दोन वर्षांत मोदी शासनाकडून रॉबर्ट वडेरा यांना अटक का केली नाही, त्यांना दत्तक घेतले आहे का, अशी उपरोधिका टीकाही केली. काँग्रेस आणि भाजप यांच्यात भ्रष्टाचारावर महायुती आहे. ते दोघे या सूत्रावर मिळालेले आहेत, असेही ते म्हणाले.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

     श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत ३ जिहादी आतंकवादी ठार झाले आहेत. चकमकीत ठार झालेले तिन्ही आतंकवादी हिज्बुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेशी संबंधित होते. त्यांच्याजवळून तीन एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.

उज्जैन सिंहस्थपर्वातील आपत्कालीन स्थिती आणि साधकांची साधना !

सिंहस्थक्षेत्री वादळी पाऊस आल्यांनतर प्रदर्शनस्थळी जयघोष करून उत्साहाने आणि जिद्दीने बचावकार्य करणारे
१. सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये २. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि साधक
   ५.५.२०१५ या दिवशी उज्जैन सिंहस्थ पर्वस्थळी तीव्र वादळी पावसामुळे प्रदर्शनात चिखल झाल्याने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शन स्थळातील आध्यात्मिक ग्रंथ, सात्त्विक वस्तू, साधकांचे व्यक्तीगत साहित्य सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले. सर्व वस्तू हालवण्याची शारीरिक श्रमाची अवघड सेवा सर्व साधक संघभावाने आणि उत्साहाने करत होते. यात सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनीही पावसात भिजून सेवा केली. प्रदर्शनाला हानी पोहोचू नये; म्हणून छतावर साचलेले पाणी त्वरित काढणे, छताचे आधार असलेले बांबू मोडू नयेत; म्हणून त्यांना आधार देणे, साहित्य हालवणे, साधकांना सूचना देणे आदी सेवा धावपळ करत केल्या. सर्व साहित्य हालवण्याची सेवा पूर्ण झाल्यावर महर्षींच्या आज्ञेप्रमाणे सांगितलेला जप सामूहिकपणे करण्यात आला.

कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापिठात अभाविप आणि डावे यांच्यात हाणामारी

     कोलकाता - येथील जाधवपूर विद्यापिठात ६ मेच्या रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विचारसरणीच्या समर्थक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या वेळी एका विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अभाविपच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
     विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम या चित्रपटाचे प्रदर्शन विद्यापिठात होणार होते. त्याला डाव्या विचारसरणीच्या समर्थकांनी विरोध केला. तसेच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर अग्निहोत्री यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. या वेळी अभाविपचे कार्यकर्ते आणि डाव्या समर्थकांमध्ये जोरदार जुंपली. या घटनेची माहिती मिळताच जाधवपूर विद्यापिठाकडे रवाना झालेल्या भाजप नेत्या रूपा गांगुली यांनी प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले.

स्त्री आणि तिचे कौटुंबिक जीवनातील स्थान

१. कामवासना नैसर्गिक प्रेरणा असून ती प्रजोत्पादनासाठी 
असणे आणि तिच्यामुळे वंशपरंपरा टिकून रहाणे 
     कामवासना ही नैसर्गिक प्रेरणा असते. ती प्रजोत्पादनासाठी असते आणि तिच्यामुळे वंशपरंपरा टिकून रहाते. माझ्या कामवासनेची तृप्ती तर व्हायलाच हवी; परंतु संततीला सांभाळण्याचे दायित्व माझे नाही, हे म्हणणे निसर्गविरोधी आहे. 
२. पिट्रीम ए. सोरोकीन त्यांच्या सेम सेक्स ऑर्डर (Same Sex 
Order) या पुस्तकातील स्त्रियांविषयीची काही सूत्रे
२ अ. सुसंस्कृत घरात वाढलेल्या, सालस वातावरणात जोपासलेल्या स्त्रिया समाजात नसतांनाही बुद्धीवादी संस्कृतीचा विकास होण्याचे उदाहरण मानवजातीच्या इतिहासात शोधूनही सापडणार नसणे : पिट्रीम ए. सोरोकीन त्यांच्या सेम सेक्स ऑर्डर (Same Sex Order) या पुस्तकात म्हणतात, सभ्य समाजाने लैंगिक स्वातंत्र्याला बंदिस्त करून उत्तम संस्कृती विकसित केली आहे. स्त्री पतीशी पूर्णपणे एकनिष्ठच असावी. सुसंस्कृत घरात वाढलेल्या, सालस वातावरणात जोपासलेल्या स्त्रिया समाजात नसतांनाही बुद्धीवादी संस्कृतीचा विकास होत आहे, असे उदाहरण मानवजातीच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही.
      यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।
      यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ।
अर्थ : ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते, अर्थात आदर होतो, त्या ठिकाणी देवता रमतात आणि ज्या ठिकाणी स्त्रियांना यथोचित सन्मान प्राप्त होत नाही, तेथील सर्व कामे निष्फळ होतात.
     सध्याच्या युगातील अनेक स्त्रियांना अत्याचार, छेडछाड, बलात्कार यांसारख्या घटनांना तोंड द्यावे लागते. चित्रपट काय किंवा कुठलेही विज्ञापन काय, त्यात स्त्रीला भोगवादी किंवा शोभिवंत अशा प्रकारचेच स्वरूप दिलेले असते. धर्मपालन न करणे आणि त्यातूनच स्वैराचार बोकाळणे, हीच या सर्वांमागील कारणे आहेत. आधुनिकतेचा डौल मिरवणार्‍या स्त्रीला धर्मपालन करणे म्हणजे खुळचट प्रथा-परंपरा पाळण्यासारखे वाटते. ही बंधने झुगारून देतांना त्यातून होणार्‍या परिणामांची मात्र तिला यत्किंचितही जाणीव नसते.

अनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी !

१. देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे 
दिला असल्याने ती प्रपंच समर्थपणे 
सांभाळू शकणे 
देवाच्या शासनात चार महत्त्वाची खाती स्त्रीदेवतांकडेच सदासाठी देण्यात आली आहेत आणि त्या आपापली खाती समर्थपणे आणि उत्तम रितीने सांभाळत आहेत. आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्याचे संरक्षण खाते कालिकादेवीकडे, अर्थ खाते श्री लक्ष्मीदेवीकडे, शिक्षण खाते सरस्वतीकडे, तर अन्न खाते अन्नपूर्णादेवीकडे आहे. या देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला आहे; म्हणून ती सारे घर आणि प्रपंच समर्थपणे सांभाळू शकते, तसेच स्वसामर्थ्यावर तोलून धरू शकते.

भारतीय संस्कृतीत नारीशक्तीला असलेले विशेष महत्त्व !

श्रीमती रजनी नगरकर
      ५.९.२०१५ या दिवशी श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी, म्हणजेच गोकुळाष्टमी होती. या दिवशी रामनाथी गोकुळातील गोपी विशेष नटल्या होत्या. कुणी घागरा-ओढणी, कुणी गुजराती पद्धतीच्या साड्या, कुणी नऊवारी आणि त्याला अनुषंगून विविध अलंकार धारण केले होते. त्यात नथ, मेखला, बिंदी असे अनेक प्रकार बघायला मिळत होते. त्या दिवशी प.पू. डॉक्टरांनीही मुलांना चिडवले, बघा, मुलींना कसे विविध प्रकारे नटता येते; पण मुलांना काहीच नाही ! हे समजल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले. 
१. हिंदु धर्मात विविध ठिकाणी देवी म्हणून 
पूजली जाणारी भारतीय स्त्री ! 
     प्रत्येक सणात, कार्यक्रमात, आनंद आणि सुख-दुःखाच्या प्रसंगात स्त्रियांनाच महत्त्व दिले जाते. यावरून स्त्रीमाहात्म्य लक्षात येते. याची काही उदाहरणे पुढे देत आहे.

आयुष्य उद्ध्वस्त करणारे बलात्कार स्त्रीशक्तीला कलंकच !

रेल्वेगाडीतून प्रवास करणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होणे, 
हे भारतीय स्त्री कमालीची असुरक्षित झाल्याचे द्योतक ! 
      ९.८.२०१३ या दिवशी छत्तीसगडमध्ये कुर्ला-हावडा एक्स्प्रेसमधून प्रवास करणारी सात वर्षांची मुलगी मध्यरात्री लघुशंकेसाठी शौचालयात जात असतांना बलात्कार्‍यांनी तिला पकडले. त्यानंतर शौचालयात ढकलून आतून दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार पहाटेपर्यंत चालू होता. त्या वेळी गाडीतील इतर प्रवासी झोपेत होतेे. बलात्कारानंतर या मुलीला बिलासपूर शहरातील बाजारपेठेजवळ फेकून देण्यात आले होते. (१३.८.२०१३)

स्त्रीशक्तीचा र्‍हास करणार्‍या भू्रणहत्या !

भारतातील वाढती स्त्री-भ्रूण हत्या !
१. प्रतिवर्षी जन्माला येण्यापूर्वीच लाखो मुलींची होणारी हत्या 
रोखता न येणेे, ही भारतासाठी मानहानी करणारी गोष्ट !
जीवन हे ईश्‍वराचे वरदान असून सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे. असे असले, तरी मुलगा व्हावा, या मोहामुळे भारतात प्रतिवर्षी लाखो मुलींची जन्माला येण्यापूर्वीच हत्या केली जाते. कोट्यवधी रुपये खर्चूनही शासनाला समाजातील स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना रोखता आलेल्या नाहीत. भारताची ही एक मानहानी करणारी गोष्ट आहे.
२. सधन घरांतही लिंगनिदान करून मुलींची हत्या !
विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न असणार्‍या घरांतही ही विकृती अधिक प्रमाणात आहे. जन्मपूर्व निदान अधिनियम १९९५ (नेटल डायग्नोस्टिक अ‍ॅक्ट)नुसार बाळाच्या लिंगाचे निदान करणे अनधिकृत आहे. असे असतांनाही या कायद्याचे सर्वाधिक प्रमाणात उल्लंघन होते. देशातील ३२८ जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर ९५० पेक्षा अल्प आहे.
३. प्रचलित प्रथा आणि सामाजिक व्यवस्था यांमुळे मुलगा अन् मुलगी यांच्याविषयी लोकांचे विचार अयोग्य
युनिसेफ या संघटनेच्या पाहणीनुसार विश्‍वातील लोकसंख्येत १० टक्के महिलांची घट झाली आहे. हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. स्त्रियांच्या संख्येत घट होण्यामागे स्त्री-भ्रूण हत्या, हेच मुख्य कारण आहे. समाजाची संकुचित मानसिकता अन् अंधविश्‍वास यांमुळे समाज मुलगा आणि मुलगी यांत भेद करतो. प्रचलित प्रथा आणि सामाजिक व्यवस्था यांमुळे मुलगा आणि मुलगी यांच्याविषयी लोकांचे विचार विकृत झाले आहेत.
(संदर्भ : श्री. मणिन्द्रकुमार तिवारी, सनातनवाणी, वर्ष ३१, अंक २ (एप्रिल २०१२))

पालक, मुले, शासन अशा सर्वांकडून प्रयत्न झाले, तरच लव्ह जिहादची प्रकरणे थांबू शकतील !

कु. वैष्णवी जाधव
       सध्याच्या लव्ह जिहादसारख्या प्रश्‍नाचे गांभीर्य साधना करणार्‍या कु. वैष्णवी जाधव हिच्यासारख्या १८ वर्षांच्या मुलीला कळते, ते मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणे, शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर चढणे, यांसारख्या धर्मद्रोही चळवळी करणार्‍यांच्या आणि पुरोगामीत्व मिरवणार्‍यांच्या लक्षात का येत नाही ?
       लव्ह जिहादच्या घटना वाचल्यावर मनात तीव्रतेने विचार आला, या गोष्टीला केवळ धर्मांधांचे जिहादचे वेड म्हणावे, हिंदूंनी मुलींना दिलेले अवाजवी स्वातंत्र्य म्हणावे, त्यांच्यावर कधी संस्कार केले नसल्याचे द्योतक म्हणावे कि केवळ वशीकरण म्हणावे. एवढ्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर शासन उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करत असल्याने उपाययोजनेच्या दृष्टीने त्याचा विचार करणेच चुकीचे आहे. राहिला प्रश्‍न तो आपला. आपण या गोष्टीवर, प्रतिदिन वाचनात येणार्‍या या घटनांवर, काय कृती करतो ? बंधू-भगिनींनो, आता खरे पहाता विचार करायलाही वेळ उरलेला नाही. हा विषय केवळ शासनाने उपाय काढून सुटणारा नाही. आज सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवेत, तरच ही प्रकरणे थांबू शकतात. हे प्रयत्न कसे करता येतील, ते आपण येथे पाहू.

अक्षय्य तृतीया

* अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे.
* या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. 
* या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. 
* या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो.
* या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. (संदर्भ : मदनरत्न)

सनी लिओन - कलियुगातील एक शूर्पणखा !

१. सनी लिओनचा विषय वाचल्यानंतर 
रामायण काळातील शूर्पणखेची आठवण होऊन 
तिला धडा शिकवणार्‍या लक्ष्मणाचे स्मरण होणे 
     सध्या संपूर्ण भारतात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे सनी लिओन ! वर्तमानपत्रातून हा विषय वाचल्यानंतर रामायण काळातील एका पात्राची प्रकर्षाने आठवण झाली. ते पात्र म्हणजे रावणाची बहीण शूर्पणखा ! प्रत्यक्ष प्रभु रामचंद्राला मोहवश करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ती आपला मोचार्र् वळवते रामबंधू लक्ष्मणाकडे ! लक्ष्मणाला मोहवश करण्याचा प्रयत्न करत असतांना हिंंदूंचा परमोच्च आदर्श, व्रतस्थ आणि शेषस्वरूपी लक्ष्मण याने तिच्यातील कामवासनेचा भडकलेला अहंकार जाळून टाकण्यासाठी अन् तिच्या रूपाचे गर्वहरण करण्यासाठी तिचे नाकच कापून टाकले. तिला देशाबाहेरही हाकलले. यातून लक्ष्मणाने दोन गोष्टी साध्य केल्या. एक म्हणजे धर्महानी रोखली आणि हिंदु धर्माची महानता किती उच्च कोटीतील आहे, हे सोदाहरण पटवून दिले. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीवध करणे वर्ज्य (त्याज्य) आहे, हे शास्त्रवचन पाळून शूर्पणखेचे नाक कापले आणि तिला विद्रूप करून तिच्या सौंदर्याचे गर्वहरण करत अश्‍लीलतेला चाप बसवला.

स्त्रीशक्तीचा विनाश टाळण्यासाठी हिंदु संस्कृतीनुसार आचरण आवश्यक !

हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणारे व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, रोज डे, जीन्स डे यांसारखे डे म्हणजे स्वैराचाराचे हिडीस प्रदर्शनच ! भगिनींनो, अशा नीतीहीन कुप्रथांमधून पदरी काहीच पडत नाही; मात्र होतो तो तुमच्यातील शक्तीचा विनाश ! हे टाळण्यासाठी हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा आणि आनंद मिळवा !

स्त्रीवादी साहित्याचा फोलपणा !

    ही एक स्त्रीवादी कविता. पुरोगाम्यांकडून या प्रकारे स्त्रीवादी साहित्याची निर्मिती केली जाते. त्यामुळे सामान्य महिलांची, विद्यार्थ्यांची, तसेच युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होतेे. या कवितेतून स्त्रीला इतरांच्या सांगण्याप्रमाणे वागावे लागत असल्याने तिच्यावर अन्याय होत आहे, अशा आशयाचे चित्र वर्णन केले आहे. गोमंतक या दैनिकात प्रसिद्ध झालेली उदय नाईक या तरुणाची ही एक प्रातिनिधिक कविता आहे. समाजात वेगाने फोफावत असलेल्या अशा पोकळ स्त्रीवादी विचारांचे खंडण करणे आवश्यक आहे; कारण हे विचार म्हणजेच योग्य असे वैचारिक क्षमता नसलेल्या समाजाला, नवीन पिढीला, तसेच विद्यार्थ्यांना वाटत रहाते. महाविद्यालयातूनही अशा प्रकारचे साहित्य असलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. प्रत्यक्षात हिंदूंच्या जीवनपद्धतीचा उद्देश आणि धर्माने दिलेले स्त्रियांचे स्थान हे विश्‍वात सर्वोत्तम आहे, हे समजून घेतले पाहिजे. आज पाश्‍चात्त्यांच्या अनिर्बंध जीवनाचा परिपोष झाल्यामुळे पुरोगामी आणि स्त्रीवादी हिंदु धर्मातील पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीवर बंधने लादून अन्याय केला असे समजतात. प्रत्यक्षात धर्मातील बंधने ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही एक समृद्ध जीवन देतात, हे साधना आणि धर्माचरण केल्यावरच लक्षात येते. देव, धर्म, अध्यात्म आणि साधना यावर विश्‍वास असणार्‍यांचा अशा साहित्यामुळे बुद्धीभेद होऊ नये, यासाठी वरील कवितेचे खंडण करणारी कविता पुढे देत आहोत.
- सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 

धर्मपरंपरा रक्षण चळवळीचा शुभारंभ करणारी रणरागिणी शाखा !

चळवळीतून घडले पुन्हा स्त्रीशक्तीचे दर्शन !
कु. प्रतीक्षा कोरगावकर
हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी या महिला शाखेचे कार्य गेली ७ वर्षेे चालू आहे. सध्या महिला अधिकारांच्या नावाखाली हिंदु धर्मातील प्राचीन परंपरा, धर्मशास्त्र आदींवर आघात करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथील शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा मोडण्याचा प्रयत्न होत आहे. आंदोलनांचे स्टंट केले जात आहेत.
हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेने दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर म्हणजेच ८ एप्रिल या दिवशी धर्मपरंपरा रक्षण चळवळीस शुभारंभ करण्यात आला. या चळवळीच्या माध्यमातून समाजात धर्माविषयी जागृती निर्माण करणे, त्यासाठी गावागावातील महिलांच्या भेटी घेणे, त्यांचे प्रबोधन करणे, पत्रकार परिषदा घेणे असेही कार्य करण्यात आले. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महिलांना गाभार्‍यात प्रवेश देण्याच्या संदर्भात केलेल्या आंदोलनाच्या विरोधात याच रणरागिणी शाखेच्या महिला कार्यकर्त्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. ईश्‍वरी अधिष्ठान, तसेच धर्माप्रती असलेला अभिमान आणि प्रेम यांच्या बळावर त्यांनी या आंदोलनाला पोटतिडकीने विरोधही दर्शवला.
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी । अश्रू दोन ढाळी ॥ 
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली ॥
    युरोपियन क्लबवर आक्रमण करून ११ इंग्रज अधिकार्‍यांना ठार मारणारी आणि चितगाव कटात धारातीर्थी पडलेली महिला क्रांतीकारक प्रीतीलता वड्डेदार !

साधकांनो, शिकण्यासाठी सनातनच्या आश्रमात किंवा अन्यत्र सेवेला जाता यावे; म्हणून अन्य दैनिकांच्या स्थानिक वितरकांना आवश्यक तेवढे दिवस मोबदला देऊन सनातन प्रभातचे वितरण करण्यास सांगा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
     काही जिल्ह्यांत अल्प साधकसंख्येमुळे दैनिक सनातन प्रभात वितरित करण्याचे दायित्व एका साधकाकडे असते. त्यामुळे तो शिकण्यासाठी सनातनच्या अन्य आश्रमांमध्ये किंवा अन्यत्र सेवेला जाऊ शकत नाही. अशा वेळी अन्य दैनिकांचे वितरण करणार्‍या स्थानिक वितरकांना आवश्यक तेवढे दिवस मोबदला देऊन सनातन प्रभातचे वितरण करायला सांगितल्यास सनातन प्रभातचे नियमित वितरण होईल आणि साधकांनाही शिकण्यासाठी अन्यत्र जाता येईल. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०१६) 

     प्रतिकूल स्थितीतही औदार्य, युद्धकौशल्य, सदाचरण, न्यायप्रियता आणि मुत्सद्दीपणा बाळगणार्‍या अहल्याबाई होळकर !

हिंदु नारींनो, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कृतीशील व्हा !

कु. मधुरा भोसले
हिंदु नारींना आवाहन !
हिंदु नारींनो, आपल्या देशावर आपले (धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांचे) राज्य आल्यासच आपल्या देवा-धर्माचे, संस्कृतीचे, इतिहासाचे, भाषेचे, अस्मितेचे, आबाल-वृद्धांचे आणि स्त्रियांचे रक्षण अन् पालन होणार आहे, हे परम सत्य जाणा ! स्वतःच्या रक्षणासाठी आतातरी कृतीशील व्हा अन् हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी अखंड प्रयत्नरत व्हा !
हिंदु राष्ट्रातील स्त्री ही आदर्श आणि आदरणीय नारी असेल !
हिंदुु राष्ट्रातील स्त्री ही प्रत्येक धर्मपरायण हिंदूसाठी माता आणि भगिनी समान आदरणीय असेल. धर्मद्रोही, वासनांध आणि व्यभिचारी मनुष्याला हिंदु राष्ट्रात कठोर शिक्षा भोगण्यासाठी केवळ कारागृहातच स्थान असेल. हिंदु राष्ट्रातील स्त्री निश्‍चितपणे सुरक्षित, आनंदी आणि उच्चतम आध्यात्मिक स्तराचे जीवन अनुभवू शकेल, यात कसलीच शंका नाही. हे हिंदु नारी, आज जगातील समस्त राष्ट्रांतील स्त्रिया केविलवाण्या होऊन तुझ्याकडे आशेने पहात आहेत. उद्याची नवी पिढी तुला आदर्श मातेच्या रूपात पहाण्यास उत्सुक आहे आणि उद्याचा दिवस तुला आणि केवळ तुलाच आदर्श हिंदु नारी म्हणून पहाण्यास आतूर झालेला आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
      समाज भावनाहीन अवस्थेत आहे. स्वार्थ आणि अहंकार सोडल्याशिवाय सामाजिक शांतता लाभणार नाही ! (लोकजागर)

धूम्रपान करण्यात पुरुषांना मागे टाकणार्‍या स्त्रियांच्या या पराक्रमाविषयी स्त्रीमुक्तीवाल्यांना काय म्हणायचे आहे ?

      ब्रिटीश मेडिकल जर्नलने विश्‍वातील एकूण १८७ देशांमध्ये धूम्रपानाचा अभ्यास केला. ख्रिस्ताब्द १९८० ते २०१२ या काळात भारतातील पुरुषांचे प्रमाण ३३.२ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आले आहे, तर महिलांचे धूम्रपान करण्याचे प्रमाण ३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. असे असले, तरी या कालखंडात धूम्रपान करणार्‍या महिलांची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे. (२७.६.२०१४)

भारतीय महिला जगात अश्‍लील संकेतस्थळे पहाण्यात दुसर्‍या क्रमांकावर असणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचे फलित !

     जगात पोर्न वेबसाईट्स पहाणार्‍या महिलांची संख्या सरासरी २४ टक्के इतकी आहे. त्यामध्येही जगात ब्राझील आणि फिलिपाईन्स येथील ३५ टक्के महिला अशी संकेतस्थळे पहातात. तर दुसरा क्रमांक भारतीय महिलांचा लागतो. भारत आणि अर्जेंटिना या देशांत एकूण अश्‍लील संकेतस्थळे पहाणार्‍यांमध्ये ३० टक्के महिलांचे प्रमाण आहे. (२२.८.२०१५)

स्त्रीशक्तीचा र्‍हास झाल्याची उदाहरणे

पोटच्या मुलींना मुसलमान मित्राशी शय्यासोबत करण्यास 
सांगण्याइतपत अधःपतित झालेली हिंदु महिला ! 
     पोटच्या मुलींना २४ वर्षीय झुम्मान खान या स्वतःच्या मुसलमान मित्राशी शय्यासोबत करण्यास बाध्य केल्याच्या आरोपावरून छत्तीसगड राज्यातील आदिवासी भागाून लीलावती या ३६ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली. या वेळी झुम्मान खानलाही कह्यात घेण्यात आले. (९.६.२०१४)संगणकीय खेळ (व्हिडिओ गेम्स) - व्यक्ती आणि समाज यांचा नाश करणारे गोड विष !

संगणकीय खेळ (व्हिडिओ गेम्स) खेळतांना 
व्यक्तीवर होणारा सूक्ष्मातील परिणाम दर्शवणारे सूक्ष्मचित्र 
        सध्या उन्हाळी सुट्टी चालू असल्याने अनेक मुले संगणकीय खेळ (व्हिडिओ गेम) खेळण्यातच आपला वेळ घालवतात. ती घंटोन्घंटे त्यातच रमलेली असतात. हे खेळ खेळतांना त्यांना ना आजूबाजूचे भान असते, ना जेवणाखाण्याचे भान असते. ती त्या खेळात जणू आकंठ बुडालेली असतात. अशा प्रकारे या खेळांच्या आहारी गेलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना या खेळांचे सूक्ष्मातील दुष्परिणाम समजावेत, या हेतूने वरील सूक्ष्म चित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या आणि विदेशी असूनही
भारतात येऊन हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या भगिनी निवेदिता !
जर्मनीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत कुणाच्याही विरोधाला
न जुमानता भारताचा पहिला झेंडा फडकावणार्‍या धाडसी मादाम कामा !

हिंदूसंघटक विक्रमराव सावरकर यांचे जाज्वल्य विचार !

१. हिंदुत्वनिष्ठ भगवी देशकल्याणकारी क्रांती करण्यासाठी समस्त देशभक्तांनी तात्काळ कार्यप्रवण झाले पाहिजे.
२. भारताच्या अन्नावर पोसलेल्या; परंतु पाकिस्तानवर निष्ठा असलेल्या सर्व मुसलमानांना खरेतर पाकिस्तानात हाकलून दिले पाहिजे.
३. चीनच्या राक्षसी आक्रमणांपासून वाचवण्यासाठी संपूर्ण आग्नेय आशियाला आपल्या पंखाखाली घेण्यास भारताने पुढे सरसावले पाहिजे !
    
श्री. अभय जातेगावकर
डोंबिवली येथील श्री. अभय माधव जातेगावकर (वय ६१ वर्षे) यांची वैशाख शुक्ल पक्ष द्वितीया (८.५.२०१६) या दिवशी एकसष्टी आहे. यानिमित्ताने त्यांच्या बहिणी आणि भाच्या यांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
श्री. अभय जातेगावकर यांना त्यांच्या 
एकसष्टीनिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार ! 

युवतींनो, वीरांगनांचा आदर्श घ्या !

     राजमाता जिजाऊ, अहल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, गोंडवन (मध्यप्रदेश) येथील राणी दुर्गावती, कित्तूरची राणी चेनम्मा, कोल्हापूरची राणी ताराबाई अशा हिंदु वीरांगनांचे जीवन हिंदु स्त्रियांसाठी दीपस्तंभासमान आहे. त्यामुळे चित्रपटातील अभिनेत्रींचे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांच्या अस्मितेसाठी झिजलेल्या वीरांगनांचे आदर्शच राष्ट्राला तारतील !

ही स्त्री शक्ती नव्हे...!

        गेल्या ३ महिन्यांपासून राज्यातील काही पुरो(अधो)गामी महिलांनी तथाकथित स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली हिंदूंच्या मंदिरांत बळजोरीने घुसण्याची चळवळ चालू केली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांवर अन्याय होतो, मंदिरांच्या गर्भगृहात पुरुषांसमवेत स्त्रियांनाही प्रवेश मिळायला हवा, मंदिरात जेथे जेथे पुरुष जातो आणि ज्या ज्या धार्मिक कृती करतो, त्या सर्व ठिकाणी जाण्यास आणि धार्मिक कृती करण्यास स्त्रियांना अधिकार मिळाला पाहिजे. नव्हे तो आमचा हक्कच आहे, असे या पुरो(अधो)गामी महिला प्रसारमाध्यमे, पत्रकार परिषदा, आंदोलने या ठिकाणी सांगू लागल्या. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्‍वर येथे स्थानिकांचा धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी होणारा सनदशीर विरोध झुगारून आणि खोटेनाटे आरोप करत पुरो(अधो)गामी महिलांनी शेकडो वर्षांच्या धर्मश्रद्धांवर आघात केला. धर्मातील जाणकार त्यांना त्याविषयी शास्त्र सांगत असतांना या (अ)सुधारणावादी महिलांनी तो विषय थट्टेवारी नेला आणि प्रथा-परंपरा मोडण्याचा हट्ट कायम ठेवला. विरोध करणार्‍यांवरच मंदिरातील देवीच्या गर्भगृहात महिलांनाच जाऊ न देणे हा स्त्री-शक्तीचा केवढा मोठा अपमान आहे, नारी शक्तीवर अन्याय आहे, अशी ओरड केली आणि न्यायालयाचा निर्णय, पोलिसी बळाचा वापर यांद्वारे विरोधकांना दडपण्यात आले.

दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र तेज यांचा उत्कृष्ट उपयोग करणारा योद्धावतार भगवान परशुराम !

       वैशाख शुक्ल पक्ष द्वितीया, म्हणजे ८.५.२०१६ या दिवशी भगवान परशुरामाची जयंती आहे. त्यानिमित्त त्याच्या चरणी शतशः प्रणाम करूया. भगवान परशुरामाची गुणवैशिष्ट्ये विशद करणारा हा लेख त्याच्या चरणी सविनय अर्पण !
१. सप्तचिरंजिवांपैकी एक
अश्‍वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्‍च बिभीषण:।
कृपः परशुरामश्‍च सप्तैते चिरजीविनः ॥
अर्थ : अश्‍वत्थामा, बळी, महर्षि व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत.
        परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते. 
२. श्रीविष्णूचा सहावा अवतार
         सत्ययुगात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन हे श्रीविष्णूचे पाच अवतार झाले. त्रेतायुगाच्या प्रारंभी महर्षी भृगु यांच्या गोत्रात जामदग्नेय कुळात महर्षि जमदग्नी आणि रेणुकामाता यांच्या पोटी श्रीविष्णूने सहावा अवतार घेतला. त्याचे नाव परशुराम होते. भार्गवगोत्री असल्याने त्यास भार्गवराम असेही संबोधले जात असे.

अक्षय्य तृतीयेला करावयाच्या अन्य कृती

          अक्षय्य तृतीयेला केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ हे मिळतेच.
सत्पात्रे दान का करावे ? : अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानामुळे व्यक्तीचा पुण्याचा साठा वाढतो. पुण्यामुळे व्यक्तीला स्वर्गप्राप्ती होऊ शकते; परंतु स्वर्गसुख भोगून झाल्यावर पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. मनुष्याचे खरे ध्येय हे पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करणे असे नाही, तर पाप-पुण्याच्या पलीकडे जाऊन ईश्‍वरप्राप्ती करणे असे आहे. त्यामुळे मनुष्याने सत्पात्रे दान करणे आवश्यक असते. सत्पात्रे दान केल्यामुळे दानाचे कर्म हे अकर्म कर्म (अकर्म कर्म म्हणजे पाप-पुण्याचा हिशोब लागू न होणे) झाल्याने मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजेच तो स्वर्गलोकात न जाता त्यापुढच्या उच्च लोकांत जातो. संत, धार्मिक कार्य करणार्‍या व्यक्ती, समाजात धर्माचा प्रसार करणार्‍या आध्यात्मिक संस्था अन् राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी कार्य करणारे धर्माभिमानी यांना अर्पण देणे (दान करणे), हे सत्पात्रे दान आहे.

असात्त्विक आणि सात्त्विक दागिने ओळखा अन् सात्त्विक दागिन्यांचा वापर करा !

पोलीस खात्यात सेवारत असणार्‍या आणि सनातनला नावे ठेवणार्‍या पोलिसांना समजावून सांगून त्यांच्यात पालट घडवून आणणार्‍या एका जिल्ह्यातील सनातनच्या साधिका !

          मी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात कार्यरत आहे. वर्ष १९९९ मध्ये मला सनातन संस्थेविषयी माहिती मिळाली. त्यानंतर मी टप्प्याटप्प्याने साधना करू लागले. मला काही पोलीस अथवा समाजातील काही लोक विचारतात, तो समीर तुमचाच ना ? तसेच ते म्हणतात, सनातनवाले असे आहेत, तसे आहेत. तेव्हा मी त्यांना पटेल अशा भाषेत पुढीलप्रमाणे समजावून सांगते.
१. पोलीस खात्यातील चांगल्या कर्मचार्‍यांना दिल्या 
जाणार्‍या वाईट वागणुकीप्रमाणेच सनातन संस्थेच्या 
साधकांनाही काही लोकांकडून त्रास दिला जात असणे
         पोलीस खात्यातील सर्वच कर्मचारी वाईट नसतात. काही कर्मचारी चांगलेही असतात. जे वरिष्ठांच्या पुढे पुढे करतात, जे भ्रष्टाचारी असतात आणि वाम मार्गाने पैसे मिळवतात. अशा कर्मचार्‍यांना कधी रस्त्यावर उभे राहून नेमून दिलेले काम केलेले पाहिले आहे का ? मात्र जे कर्मचारी प्रामाणिक असतात, निष्पक्षपाती असतात आणि जे भ्रष्टाचारी अथवा वाम मार्गाने पैसे मिळवत नाहीत, असे कर्मचारी साहेबांच्या पुढे पुढे करत नसल्याने, ते वरिष्ठांंचेही नावडते असतात. त्यामुळे त्यांचे एक काम संपले की, लगेच त्यांना दुसरे काम दिले जाते. त्यांना सतत वरिष्ठांच्या तैनातीत रहावे लागते. त्यांना विश्रांती म्हणून दिली जात नाही. म्हणजेच चांगल्या पोलिसांना त्रास होतोच ना ? तसेच सनातनच्या साधकांचे आहे. सनातन संस्था चांगली असूनही तिच्या साधकांची प्रगती झालेली पाहू न शकणारे लोक निरपराध साधकांना अडकवून संस्थेची अपकीर्ती करत असतात; परंतु सत्य मात्र निराळेच असते.

स्त्री-अलंकार

वेल 
 कानांभोवती वेल (कानांभोवती घालायची साखळी) घातल्यामुळे स्त्रियांंना त्याचा आध्यात्मिक स्तरावर ४-५ प्रतिशत लाभ होतो आणि त्यामुळे काळ्या शक्तीचे आवरण न्यून होते. वेल सोन्याचे नसले, तरी ते घातल्यामुळे निर्माण होणार्‍या आकृतीबंधाचा (आकाराचा) लाभ होतो.
अंगठी
अंगठी घातल्यावर श्‍वासावाटे शरिरातील त्रासदायक वायूचे उच्चाटन होते. अंगठी ही तेजधारिणी असून जिवाला तेजदायी कर्म करण्यास प्रवृत्त करणारी आहे.

प.पू. डॉक्टरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमावर लावण्यात येणार्‍या कळसांची पूजा करणे, याची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

पू. (सौ.) योया वाले
        महर्षींनी नाडी वाचनात सांगितल्याप्रमाणे १०.२.२०१६ या दिवशी महर्षींनी दोन तांब्याचे आणि एक पितळ्याचा, अशा तीन कळसांची पूजा करायला सांगितली होती. वसंतपंचमीपासून अक्षय्यतृतीयेपर्यंत या कळसांची पूजा करून अक्षय्य तृतीयेला (९.५.२०१६ या दिवशी) कळस रामनाथी आश्रमावर सर्वांत उंच ठिकाणी उभारायला सांगितले. त्यानुसार १२.२.२०१६ या वसंतपंचमीच्या दिवशी ध्यानमंदिरात प.पू. डॉक्टरांच्या हस्ते तिन्ही कळसांची पूजा करण्यात आली. त्या कळसांची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढे देत आहोत. (तिन्ही कळसांत समान स्पंदने असल्यामुळे एकाच कळसाची सूक्ष्मातील प्रक्रिया दिली आहे. - (पू. (सौ.) योया वाले)

हिंदु जनजागृती समितीचे महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग

        स्वसंरक्षणार्थ सामर्थ्य निर्माण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती महिलांसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आयोजित करते. यात कराटे, लाठीकाठी यांसारख्या स्वसंरक्षण-विद्या शिकवल्या जातात. आठवड्यातून १ दिवस १ घंटा असा प्रशिक्षणवर्गाचा कालावधी असतो.
आपल्या भागात विनामूल्य प्रशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी - ९३२२५३३५९५

अबला नको, रणरागिणी व्हा !

पुरे झाली आता धर्मपरंपरांची विटंबना ।
धर्मरक्षिण्या आली आता रणरागिणी संघटना ॥
चला भगिनींनो, आपल्या सर्वश्रेष्ठ हिंदु
धर्माच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी सहभागी व्हा !
स्त्री चारित्र्यावर हात टाकूनी ।
केला नराधमांनी घात ॥
रणरागिणी धावून आली ।
करण्या नराधमांचा नि:पात ॥
होय भगिनींनो, आता यापुढे हिंदु स्त्रीवर
होणारा अन्याय, अत्याचार सहन केला जाणार
नाही; कारण आता रणरागिणी आली आहे.
नैतिकता घसरली, अश्‍लीलता वाढली ।
संस्कृतीरक्षण करणार कोण ?
संस्कृती रक्षिण्या रणरागिणी आली ।
आता रोखण्या नाही कोण ॥
होय भगिनींनो, आता अनैतिकता आणि अश्‍लीलता 
यांची पाळेमुळे उखडून टाकण्याची वेळ आली आहे; 
कारण प्रत्येक हिंदु स्त्री समवेत रणरागिणी आहे.
- श्री. सुमित सागवेकर, मुंबई

हे हिंदु नारी...तू हो रणरागिणी ।

  • शाखेच्या सदस्या व्हा !
  • राष्ट्रउभारणीसाठी राष्ट्रउभारणीसाठी योगदान द्या !
  • शाखेत सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा !
संपर्क - विदर्भ : ९७६४०९६७४२
जळगाव : ९४०४९५६४७१
मुंबई : ९३२२०१५५३३, ८४५१००६११९

...तरच स्त्रीशक्ती जागृत होईल !

  • पाश्‍चात्त्यांप्रमाणे जीन्स, टी-शर्ट, तसेच तोकडे कपडे घालणार्‍या स्त्रियांचे प्रबोधन करा !
  • डेच्या माध्यमातून होणारे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत चळवळ उभारा !
  • जिजाऊंचा आदर्श ठेवून मुलांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा अभिमान निर्माण करा !
  • एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यास त्याविरुद्ध संघटित कारवाई करा ! 

उन्हाळ्यात पुढील दक्षता घेऊन विविध विकारांपासून दूर रहा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सध्या उन्हाळा चालू असल्याने वातावरणात अतिशय उष्णता आहे. त्यामुळे शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्‍या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.
 १. दिवसभरात भरपूर पाणी अथवा तत्सम पेय प्यावे. पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. गडद रंगाची लघवी होत असल्यास आपण अधिक पाणी प्यायला हवे, हे लक्षात घ्यावे.
२. अधिक साखर असलेले पेय शक्यतो पिऊ नये.
३. सैलसर, फिकट रंगाची, वजनाला हलकी असणारी (शक्य असल्यास सुती) वस्त्रे वापरावीत.
४. व्यायामाचे प्रमाण अल्प ठेवावे.
५. ऊन असतांना घरात किंवा सावली असलेल्या ठिकाणी थांबावे.
इंग्रजांच्या विरोधातील सशस्त्र 
क्रांतीत सहभागी होऊन अपूर्व शौर्याचे दर्शन 
घडवणारी कित्तूरची धाडसी राणी चेन्नम्मा !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथांचे वितरण करण्यासाठी सुवर्णकारांना संपर्क करा !

साधकांना सूचना
     ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने सुवर्णकारांच्या पेढीवर (दुकानावर) जातात. या दिवशी सोने खरेदी करणार्‍यांना सुवर्णकार ग्रंथ किंवा एखादी भेटवस्तूही देतात. यासाठी साधकांनी सुवर्णकारांना संपर्क करून त्यांना सनातनच्या अलंकारविषयीचे ग्रंथ, अध्यात्म, तसेच राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ-लघुग्रंथ यांची माहिती सांगून ते त्यांना खरेदी करण्यास सांगू शकतो आणि अक्षय्य तृतीयेला येणार्‍या ग्राहकांना भेट देण्याविषयी सूचवू शकतो. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०१६)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.
श्रीकृष्णाच्या अत्युच्च भक्तीत 
रममाण होऊन त्याचे गुणगान करणारी आणि 
द्वारकाधिशाच्या मूर्तीतच विलीन होणारी संत मीराबाई !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्‍या चुका 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
मानवी आयुष्यात कालक्रमणा करतांना चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तर पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
मंदिरात प्रवेशासाठी स्त्री-पुरुष समानतेच्या 
गप्पा मारणार्‍यांनी पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत !
१. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा संसदेत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळावे, म्हणजेच राजकीय क्षेत्रात पुरुषांइतकेच समान अधिकार मिळावेत, यासाठी ते प्रयत्न का करत नाहीत ?
२. आजही अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच असलेल्या महिलांचे पतीच त्यांच्या नावाने कारभार पहातात. अशा महिलांना समान अधिकार मिळूनही त्या शोभेची बाहुली बनल्या आहेत. अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी ते का प्रयत्न करत नाहीत ?

राममंदिराच्या उभारणीची तळमळ !

संपादकीय
     भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ६ मे या दिवशी राज्यसभेत राममंदिराचा प्रश्‍न उपस्थित केला. राममंदिराविषयी प्रतिदिन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी व्हावी, यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या खासदारानेच अशी केलेली मागणी पाहून काही जणांना आश्‍चर्य वाटले, काही जणांना ते योग्यच वाटले आणि काही जणांना डॉ. स्वामी यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक करावेसे वाटले. डॉ. स्वामी यांचा राजकीय क्षेत्रातील अनुभव पहाता, त्यांना अनेक खाचखळगे ठाऊक असावेत, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःचे असलेले दायित्व त्यांना उत्तमप्रकारे अवगत असावे, असे म्हणता येते. देशात राममंदिर हे संवेदनशील सूत्र होऊन बसले आहे. बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर अर्थात्च तेथे राममंदिराची उभारणी होणे जनतेला अपेक्षित होते. आज त्या घटनेला २५ वर्षे होऊन गेली, तरी जनतेची प्रतीक्षा संपलेली नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn