Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांचा आज वाढदिवस

भोजशाळेतील नमाज बंद न केल्यास मध्यप्रदेशातील सर्व मशिदींत शुक्रवारी हनुमानचालीसाचे पठण करू ! - काशी-सुमेरू पीठाधीश्‍वर स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज

अखिल भारतीय हिंदु महासभेच्या वतीने संत संमेलन आणि राष्ट्रीय अधिवेशनातील घोषणा !
   उज्जैन, २ मे (वार्ता.) - धार येथील भोजशाळा ही हिंदूंची असून वर्षातून केवळ वसंत पंचमीला सरस्वतीपूजन करू देण्यापेक्षा ३६५ दिवस हिंदूंना पूजनाचा अधिकार मिळालाच पाहिजे. त्या ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करू देऊन शासन ८० कोटी हिंदूंचा अपमान करत आहे. यापुढे हिंदूंच्या भोजशाळेतील नमाजपठण बंद न केल्यास मध्यप्रदेश राज्यातील प्रत्येक मशिदीत शुक्रवारी हनुमानचालिसाचे पठण करण्यात येईल, अशी चेतावणी काशी-सुमेरू पीठाधीश्‍वर स्वामी नरेंद्रनंदगिरी सरस्वती महाराज यांनी उज्जैन सिंहस्थपर्वातील संत संमेलनात आणि अखिल भारतीय हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात दिली. २०१८ पर्यंत अयोध्येत श्रीराम मंदिर न उभारले गेल्यास हिंदू स्वतःच्या पद्धतीने अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी करतील, अशी चेतावणीही त्यांनी दिली. (भाजपच्या राज्यात संतांना अशी चेतावणी द्यावी लागणे अपेक्षित नाही ! - संपादक)
काशी-सुमेरू पीठाधीश्‍वर स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज बोलतांना
    संतांचा सन्मान, अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना, धार येथील भोजशाळा मुक्ती आंदोलन, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, तसेच गो-गंगा-गीता यांचे रक्षण करण्यासंदर्भात आयोजित संत संमेलन आणि राष्ट्रीय अधिवेशन यांत देशभरातील संत-महात्मे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जय हिंदु राष्ट्र, असा जयघोष करण्यात येत होता.

संघर्ष करावा लागणार; पण हिंदु राष्ट्र नक्की येणार ! - प.पू. स्वामी श्री अवधूतानंदजी महाराज परमहंस, होशियारपूर, पंजाब

उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन
प.पू. स्वामी श्री अवधूतानंदजी महाराज (डावीकडून 
दुसरे) यांना प्रदर्शनाविषयी माहिती सांगतांना 
श्री. प्रकाश मालोंडकर (डावीकडे)
     उज्जैन, २ मे (वार्ता.) - हिंदु राष्ट्र येणार; मात्र त्यासाठी थोडा संघर्ष करावा लागणार. हल्लीचे शासन अमरनाथ यात्रेत जाणार्‍या संतांकडून जागेचा कर घेते, तर मुसलमानांना हज यात्रेसाठी अनुदान देते. अमरनाथ येथे हिंदु संतांनी जाऊन धर्मप्रसार करणे, भंडारा करणे हे शासनाला खपत नाही. या अपप्रकारांमुळे लवकरच युद्ध होणार आहे. हिंदूंना एकत्रित आणण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे सिद्धांत आणि करत असलेला प्रसार चांगला आहे. त्याला आमचे समर्थन आहे. सेवेत कार्यरत संत आणि साधक हे सर्व पूर्ण समर्पित आहेत, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. देवाच्या कृपेमुळे तुमच्याशी भेट झाली, असे प्रतिपादन होशियारपूर (पंजाब) येथील प.पू. स्वामी श्री अवधूतानंदजी महाराज परमहंस यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीच्या उज्जैन सिंहस्थ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे पं. देवकीनंदन ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन !


अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे लोकार्पण
करतांना पं. देवकीनंदन ठाकूर
उज्जैन, २ मे (वार्ता) - उज्जैन सिंहस्थमध्ये येणार्‍या भाविकांना सिंहस्थविषयक धर्मजागृतीपर माहिती, तसेच स्थानिक आवश्यक माहिती मिळावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीद्वारे उज्जैन सिंहस्थ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप सिद्ध करण्यात आले होते. या प्रणालीचे ३० एप्रिल २०१६ या दिवशी उज्जैन सिंहस्थक्षेत्री विश्‍व शांती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सत्संगात वृन्दावन येथील भागवत कथाकार पं. देवकीनंद ठाकूर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळेस व्यासपिठावर सनातन संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते.

लव्ह जिहाद, आतंकवाद यांच्या रूपातील आसुरी लंकांचे दहन करणे आवश्यक ! - श्री. राजेश पांडेय, राष्ट्रीय संयोजक, विश्‍व हिंदु परिषद

     उज्जैन - पूर्वीपासून देवता आणि असुर यांच्यात संघर्ष चालत आला आहे. त्याप्रमाणे आपल्याला देशात वाढत असलेल्या असुरी शक्तींचा धैर्याने सामना करावा लागणार आहे. देशात लव्ह जिहाद, आतंकवाद यांच्या रूपात आसुरी शक्तींनी ज्या लंका निर्माण केल्या आहेत, त्यांचे बजरंगबलीप्रमाणे दहन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय संयोजक श्री. राजेश पांडेय यांनी येथे नुकत्याच पार पडलेल्या विश्‍व हिंदु परिषदेच्या हिंदु युवा कुंभ या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला संत श्री रामदास वेदांती, प.पू. हेमलतादिदी यांच्यासह विश्‍व हिंदु परिषदेचे प्रांत संघटनमंत्री श्री. सोहन, बजरंग दलाचे क्षेत्रीयमंत्री श्री. राजेश तिवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक श्री. पराग अभ्यंकर आदींनी संबोधित केले. या कार्यक्रमात माळवा प्रदेशातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मालदा (बंगाल) येथे गावठी बॉम्ब बनवतांना झालेल्या स्फोटात ४ जण ठार, तर ६ घायाळ !

  • बंगाल म्हणजे गावठी बॉम्ब बनवण्याचा कारखाना झाला आहे; मात्र यावर एकही पुरोगामी, निधर्मी किंवा स्वतःला सहिष्णु म्हणवणारे तोंड उघड नाहीत, हे लक्षात घ्या !
  • तृणमूल काँग्रेसच्या ममता(बानो) यांच्या राज्यात बंगाल देशातील मिनी (छोटे) पाकिस्तान झालेले असतांनाही तेथील नागरिक पुन्हा त्यांनाच सत्तेवर बसवतात, हा नागरिकांचा आत्मघातच होय !
    मालदा (बंगाल) - येथील जौनपूरमध्ये एका घरात १ मेच्या रात्री गावठी बॉम्ब बनवण्यात येत असतांना झालेल्या स्फोटात ४ जण ठार, तर ६ जण घायाळ झाले.
   पोलीस अधीक्षक सय्यद वकार रजा यांनी सांगितले की, बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या भागातील गियासू शेख नावाच्या व्यक्तीच्या घरी बॉम्ब बनवण्यात येत होते, तेव्हा हा स्फोट झाला. यात स्थानिक गुंड सहभागी होते. या घटनेनंतर गियासू फरार झाला.

(म्हणे) भगतसिंह यांनी स्वतःला आतंकवादी संबोधले होते ! - इतिहासकार इरफान हबीब यांचा दावा

भगतसिंह यांच्या राष्ट्रवादाला आतंकवाद संबोधणे, हा क्रांतीकारकांचा अवमान आहे !
    नवी देहली - वर्ष १९८८ मध्ये प्रकाशित झालेल्या इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडीपेन्डन्स या पुस्तकात हुतात्मा भगतसिंह यांना आतंकवादी संबोधल्याविषयी वाद निर्माण झाला असतांना या पुस्तकाच्या समर्थनासाठी इतिहासकार इरफान हबीब पुढे आले आहेत. मी स्वत: या पुस्तकातील अनेक सूत्रांविषयी सहमत नाही; परंतु भगतसिंह यांना क्रांतीकारक आतंकवादी संबोधण्यात काहीच चुकीचे नाही, असे ते म्हणाले.(पारतंत्र्याच्या काळात आतंकवादी या शब्दाला वेगळा अर्थ होता. त्या आतंकवादामुळे सध्याप्र्र्र्र्र्र्र्रमाणे सामान्य जनता मारली जात नव्हती, तर ब्रिटिशांना हादरे बसत होते. त्यामुळे त्या आतंकवादाची तुलना आताच्या आतंकवादाशी होऊ शकत नाही; कारण तो राष्ट्रवाद होता ! - संपादक) आपले मत अधिक स्पष्ट करतांना हबीब म्हणाले, भगतसिंह हिंदुस्थान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशनशी संबंधित होते.

श्रीयंत्राची निर्मिती मानवी नसून परग्रहवासियांची असल्याचा एलियनवादी संशोधकांचा दावा !

अमेरिकेच्या कोरड्या सरोवरात श्रीयंत्राची रहस्यमय निर्मिती !
     न्यूयॉर्क - हिंदु धर्मात श्रीयंत्राला एक वेगळे महत्त्व आहे. देवीचे भक्त, योगी आदी या श्रीयंत्राची पूजा करत असतात, तसेच अनेक हिंदूंच्या देवघरात श्रीयंत्राचे पूजन केले जाते; परंतु असे हे श्रीयंत्र वर्ष १९९० मध्ये अमेरिकेतील ओरेगॉनच्या कोरड्या सरोवरात गूढपणे निर्माण झाले. तेव्हापासून या श्रींयंत्राविषयीचे रहस्य आजतागायत कायम आहे. १० ऑगस्ट १९९० मध्ये इहाडो एअर नॅशनल गार्डचा पायलट बिल मिलर प्रशिक्षण करत होता. त्या वेळी अचानक त्याची दृष्टी ओरेगॉनमधील कोरड्या पडलेल्या सरोवराकडे गेली. तेथे त्याने एक अनोखी आकृती उमटलेली पाहिली. अर्ध्या घंट्यापूर्वी तो तेथून जात असतांना त्याठिकाणी काहीही नव्हते; परंतु अर्ध्या घंट्यात आखीवरेखीव, प्रमाणबद्ध आणि विशाल अशी १३ मैल लांबीची ही आकृती निर्माण झाली. त्यानंतर त्याने याची माहिती त्याच्या वरिष्ठांना दिली. या संदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यावर हे हिंदूंच्या पूजेतील श्रीयंत्र असल्याचे निष्पन्न झाले.

आयआयटीमध्ये संस्कृत शिकवा !

आधुनिक तंत्रज्ञानाला भारतीय संस्कृतीतील प्रगत ज्ञानाची जोड दिल्यास भारताचा उत्कर्ष दूर नाही ! 
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची सूचना 
     नवी देहली - संस्कृत साहित्यात वर्णन केलेली वैज्ञानिक आणि तांत्रिक माहितीचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील आयआयटी संस्थांनी संस्कृत शिकवावे, अशी सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत एका लिखित उत्तरात केली आहे. 
    त्या पुढे म्हणाल्या, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन् गोपालस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीने शासनाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये संस्कृत साहित्यामध्ये वर्णन केलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक माहितीचा आयआयटीकडून सखोलपणे अभ्यास झाला पाहिजे, असे नमूद केले होते. यानंतर काँग्रेस, आप आणि डाव्या पक्षांनी भाजपकडून देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम थोपवण्यात येत असल्याचा आरोप केला.येत्या ५ ते १० वर्षांत लाखो नोकर्‍यांवर टाच येण्याची शक्यता !

     मुंबई - सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून त्यामुळे येत्या ५ ते १० वर्षांत अनुमाने ५० ते ७० लाख नोकर्‍यांवर टाच येऊ शकते, अशी भीती जागतिक आर्थिक संघटनेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने) वर्तवली आहे. दावोस येथे जागतिक आर्थिक संघटनेची नुकतीच एक परिषद झाली. त्यात त्यांनी मांडलेल्या अहवालात कौशल्य विकासाअभावी आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे असंख्य नोकर्‍या धोक्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञानात झपाट्याने पालट होत आहेत. कुशल कामगारांच्या अभावामुळे अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हॉस्पिटॅलिटी अर्थात् सेवा उद्योगात आणि वस्तूनिर्मिती उद्योगात सध्या मोठ्या प्रमाणात रोबोट्सचा वापर केला जात आहे. चीन आणि जपानमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. जपानमध्ये प्रत्येक १० सहस्र कामगारांमागे १ सहस्र ५०० रोबोट काम करत आहेत. हे प्रमाण येत्या काळात वाढणार असून कामगारांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होईल.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील आणखी २५ धारिका (फाइल) खुल्या

     नवी देहली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील तिसर्‍या टप्प्यातील २५ धारिका (फाईल) केंद्रशासनाने खुल्या केल्या आहेत. या धारिकांपैकी पंतप्रधान कार्यालयातून ५, परराष्ट्र मंत्रालयातून १५ आणि उर्वरित गृह खात्याकडून खुल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिली. जपानमधील रेणकोजी मंदिरात नेताजींची राख जतन केली आहे. नेताजींच्या डीएनए चाचणीसाठी या राखेचा नमुना उपयोगात आणता येईल का, याचा विचार शासन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
     शर्मा म्हणाले की, नेताजींसंबंधी जपानकडे असलेल्या ५ पैकी २ धारिका भारताकडे सोपवण्याची सिद्धता त्यांनी दर्शवली; मात्र रशिया नेताजींविषयीची माहिती जाणीवपूर्वक गुप्त ठेवत आहे.

जनता दरबारात नितीशकुमार यांच्यावर कागदाचा बोळा फेकला !

    पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जनता दरबाराच्या वेळी एका युवकाने कागदाचे बोळे फेकल्याची घटना २ मे या दिवशी घडली. या युवकाने त्याची तक्रार मांडल्यानंतर त्याने कागदाचा बोळा तयार करून नितीशकुमार यांच्या दिशेने फेकला. नितीशकुमार यांच्या बाजूला जाऊन तो बोळा पडला. या घटनेनंतर अधिकार्‍यांनी संबंधित युवकाला कह्यात घेतले.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तान निर्माण केले, तेव्हा पाकिस्तानमध्ये हिंदू २४ टक्के होते. आज १ टक्कासुद्धा नाहीत. पूर्व पाकिस्तानात वर्ष १९४७ मध्ये हिंदू ३० टक्के होते. आज बांगलादेशात ७ टक्के हिंदू उरले आहेत. नाहीशा झालेल्या हिंदूंचे काय झाले ? त्यांना आणि एकंदरीत हिंदूंना मानवाधिकार आहेत का ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

महाराष्ट्र दिनी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा ध्वज फडकवला

(म्हणे) 'पश्‍चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो' - अणे यांचा आरोप 
महाराष्ट्रद्रोही भूमिका घेणार्‍यांवर शासन कोणती कारवाई करणार आहे, ते स्पष्ट करावे ! 
     नागपूर, २ मे - संपूर्ण राज्यात १ मे या दिवशी 'महाराष्ट्र दिन' उत्साहात साजरा झाला; पण स्वतंत्र विदर्भवादी नेत्यांनी हा दिवस विदर्भात 'काळा दिवस' म्हणून साजरा केला. त्याच वेळी येथील बजाजनगर चौकामध्ये राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे आणि अन्य नेते यांनी 'स्वतंत्र विदर्भाचा ध्वज' फडकवला आणि 'पश्‍चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो आहे', असा आरोप केला. १ मे या दिवशी युवराज साळवी या तरुणाने यवतमाळ राज्य परिवहन महामंडळाच्या डेपोमध्ये असलेल्या ५ बसगाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

स्वतंत्र विदर्भप्रश्‍नी आंदोलन करणार्‍या ६५ जणांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट

पोलिसांनी त्याच वेळी आंदोलकांवर कारवाई 
का केली नाही, याविषयी पोलीस प्रशासन उत्तर देईल का ? 
छोटी छोटी राज्ये निर्माण करून महाराष्ट्राचे विभाजन करू पहाणारे देश एकसंध काय राखणार ? 
     नागपूर, २ मे - 'स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे', अशी मागणी करत 'महाराष्ट्रदिनी' विदर्भ राज्य समिती, आम आदमी पक्ष, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, अदिम यांसह विविध पक्ष आणि संघटना यांनी येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. हे आंदोलन करणार्‍या ६५ जणांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हे प्रविष्ट केले आहेत. त्यात माजी आमदार वामनराव चटप, राम नेवले यांचाही समावेश आहे. 

प्राचीन भारतीय विज्ञानाची उपेक्षा ही असहिष्णुताच ! - सतिश कुलकर्णी

पुणे, २ मे (वार्ता.) - प्राचीन भारतीय विज्ञानामध्ये ज्ञानाचा खजिना आहे. या क्षेत्रात संशोधन कार्याला पुष्कळ वाव आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी सूत्ररूपाने विज्ञान मांडले आहे. केवळ त्याचे गणित मांडून त्याला सिद्धातांचे रूप दिले नसल्याच्या कारणावरून त्याचे मूल्य अल्प होत नाही. कुठल्याही अभ्यासाविना प्राचीन भारतीय विज्ञानाची उपेक्षा करणे, ही असहिष्णुताच आहे, असे प्रतिपादन वैदिक विज्ञानाचे अभ्यासक श्री. सतिश कुलकर्णी यांनी केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत प्राचीन भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिकांची असहिष्णुता या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी विविध दाखले देऊन त्यांनी प्राचीन भारतीय विज्ञानाची महानता प्रतिपादित केली.
ते पुढे म्हणाले,
१. वनस्पतीशास्त्र, प्र्राणीशास्त्र, नाणेशास्त्र, जहाजबांधणीशास्त्र, कृषीशास्त्र, रसायनशास्त्र आदी अनेक शास्त्रांचे जनकत्व भारताकडे आहे.
२. मराठीत विज्ञानाची मांडणी करणारे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या लेखनात पौराणिक वाङ्मयाचे दाखले देत त्याकाळी पुष्पक विमान होते, युद्ध पाहू शकणारा संजय होता, यावरून त्याकाळचे विज्ञान प्रगत होते, हे सिद्ध होत नाही, अशी मांडणी केली आहे. या ठिकाणी लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, पुराणे, रामायण, महाभारत हे काही विज्ञानाचे प्रमाणग्रंथ नाहीत; कारण या ग्रंथांचे उद्दिष्ट वेगळे होते. धर्माचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुराणांमध्ये रंजक कथा रचण्यात आल्या आहेत आणि रामायण, महाभारत हा तर इतिहास आहे. (पुराणातील कथा या मनोरंजनासाठी नसून त्या माध्यमातून धर्मशास्त्रच सांगण्यात आले आहे. - संपादक) त्यामुळे चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, बृहद् विमानशास्त्र, आर्यभाटिया, लीलावती आदी प्राचीन वैज्ञानिक प्रमाणग्रंथांच्या आधारे प्राचीन भारतातील वैज्ञानिक प्रगतीचे मोजमाप करायला हवे.

बॉम्बस्फोट करून नागरिकांना ठार मारणार्‍या पाकिस्तानसमवेत क्रिकेट किंवा संगीत अशी कोणतीही कृती नको ! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • उभ्या हिंदुस्थानात भगवा फडकवू !  
  • ३० सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती
     सांगली, २ मे (वार्ता.) - पाकिस्तान आज आपल्या देशात आतंकवादी घुसवून बॉम्बस्फोट करून निष्पाप नागरिकांना ठार मारत आहे. सीमेवरील जवानांवर पाकिस्तानकडून गोळीबार होत आहे. जे जवान देशासाठी प्राण अर्पण करतात, त्यांच्या प्राणांचे मोल आपण ठेवणार आहोत कि नाही ? जवानांचा विचार आपण करणार आहोत कि नाही ? त्यामुळे पाकिस्तानसमवेत क्रिकेट-संगीत अशी कोणतीही कृती नको. हिंदुस्थानवर भगवा फडकवण्याच्या ध्येयासाठी आम्ही कधीही हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही, असे ठाम प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केलेे. श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने रविवार, १ मे या दिवशी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे हिंदवी स्वराज्य मानवंदना कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी व्यासपिठावरून ते बोलत होते. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे(गुरुजी) यांचेही मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री श्री. विजयबापू शिवतारे, आमदार निलम गोर्‍हे, आमदार श्री. उल्हास पाटील, आमदार श्री. अनिल बाबर, कोल्हापूर येथील आमदार श्री. राजेश क्षीरसागर, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री बाळासाहेब बेडगे, रावसाहेब देसाई, नितीन चौगुले, मिलिंद तानावडे यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती. व्यासपिठावर श्रीशिवछत्रपती आणि श्री भवानीमाता यांची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. प्रास्ताविक श्री. रावसाहेब देसाई यांनी केले. शिवसैनिकांच्या वतीने श्री. ठाकरे यांना अखंड महाराष्ट्राचा कलश देण्यात आला.

भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करावे ! - नाएला कादरी बलोच यांचे पुन्हा आवाहन

  • पाक उघडपणे भारताच्या विरोधात कारवाया करतो, तर भारतानेही पाकच्या विरोधात उघडपणे कृती केली पाहिजे !
  • भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे ! इंदिरा गांधी यांनी जे धाडस बांगलादेश निर्मितीच्या वेळी दाखवले, तसे धाडस मोदी यांनी बलुचिस्तानसाठी दाखवावे !
नवी देहली - भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये ज्याप्रमाणे पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करून बांगलादेशची निर्मिती केली. त्याप्रमाणे भारताने आता बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे, असे विधान बलुचिस्तानातील महिला नेत्या नाएल कादरी बलोच यांनी केले आहे. नाएला आणि तिचे कुटुंबिय कॅनडामध्ये विजनवासात रहात आहेत. बलोच यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे आवाहन केले होते; पण भारताने या मागणीला फारसे गांभीर्याने घेतले नाही. तरीही पाकिस्तानने अनेकदा भारतावर बलुचिस्तानात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे.

भाजप शासनाने सत्तेसाठी मातृभाषेचा सौदा करून विश्‍वासघात केला ! - प्रा. सुभाष वेलिंगकर

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नी भाभासुमंची साखळी येथे सभा !
सभेस ३ सहस्र ५०० मातृभाषाप्रेमींची उपस्थिती !
प्रा. सुभाष वेलिंगकर
      साखळी, २ मे (वार्ता.) - भाजप शासनाच्या भूलथापांवर विश्‍वास ठेवल्यामुळे आम्ही फसलो गेलो आहोत. त्यांनी सत्तेसाठी मातृभाषेचा, तसेच आईच्या अब्रूचा सौदा केला, असा घणाघाती आरोप भाभासूमंचे ज्येष्ठ नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी येथे केले. 
   इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे अनुदान रहित करण्याच्या मागणीसीठी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमंच्या) वतीने वसंतनगर, साखळी येथील वैश्य भवनाजवळील मैदानात ३० एप्रिल या दिवशी सभेचे आयोजन करण्यात आले होते. साखळी मतदारसंघातील भाजपचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांचा हा मतदारसंघ आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिद्ध केली वाहनांची खोटी कागदपत्रे

४ जणांवर गुन्हा प्रविष्ट 
कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! 
     संभाजीनगर, २ मे - येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी धर्मांध दुचाकी आणि चारचाकी वाहन विक्रेत्यांशी संगनमत करून अनेक वाहनांची खोटी कागदपत्रे सिद्ध केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात परिवहन कार्यालयातील साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुणवंत गवई, वरिष्ठ लिपीक विक्रम राजपूत, कनिष्ठ लिपीक, वाहन विक्रेता महंमद शफी, शेख सलीम सिद्दीकी यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (धर्मांध गुन्हेगारीत पुढे ! या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अधिकार्‍यांची सखोल चौकशी करून आणखी किती प्रकरणांत त्यांनी अशा प्रकारे फसवले आहे, हे शोधायला हवे आणि संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी ! - संपादक) 

'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाविरोधात पोलिसांना निवेदन

     कोल्हापूर, २ मे (वार्ता.) - कोल्हापूर येथील शाहू कुस्ती मैदान येथे ३० एप्रिल २०१६ या दिवशी 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकातून राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, संत, देवता, ऐतिहासिक प्रसंग इत्यादींचे विडंबन दिसून आल्यास नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, निधी देणारे आणि संबंधित यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याविषयी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

(म्हणे) 'ब्राह्मण समाजाचे हिंदूंना मुसलमानांविरुद्ध लढवण्याचे षड्यंत्र !' - श्रीमंत कोकाटे

फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ब्राह्मणविरोधी गरळओक 
     चिंचवड, २ मे (वार्ता.) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जनतेला दाखवण्यासाठी स्वतःचे असे महापुरुष नाहीत. त्यामुळे बहुजन समाजाच्या महापुरुषांची नावे वापरून संघटन निर्माण करायचे आणि त्याचा वापर दोन धर्मांमध्ये दंगली घडवणे, जातीजातींमध्ये फूट पाडणे यांसाठी करायचा असे षड्यंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच ब्राह्मण समाज रचत आहे. यासाठी महापुरुषांची चरित्रे पालटण्याचे काम केले जात आहे. ३.५ टक्के ब्राह्मण समाजाचे ७० टक्के हिंदूंना मुसलमानांविरुद्ध लढवण्याचे षड्यंत्र आहे, अशी गरळओक श्रीमंत कोकाटे यांनी केली. ते फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत 'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कोणासाठी' या विषयावर बोलत होते. (विचाराने दरिद्री असणारे ब्राह्मणद्वेष्टे कोकाटे ! षड्यंत्र ब्राह्मणांनी नव्हे, तर छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून ब्राह्मणद्वेष पसरवणार्‍यांनी रचले आहे. यासाठी अशा मंडळींच्या भूलथापांना बळी न पडता मुसलमानांच्या हिंदूंवरील आक्रमणाचा सत्य इतिहास आणि वर्तमान हिंदूंनी जाणून घ्यायला हवे. - संपादक) 

तंबाखूजन्य पदार्थ विकणार्‍या १ सहस्र २१३ दुकानदारांकडून २ लक्ष ४२ सहस्र रुपये दंड वसूल

एवढ्या दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असतांना प्रशासन काय करत होते ? कामचुकारपणा करून एवढे दिवस तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई करायला हवी !
    पणजी,२ मे (वार्ता.) - राज्यात सिगारेट आणि तंबाखूविरोधी कायद्याचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या एकूण १ सहस्र २१३ दुकानदारांवर कारवाई करून गोवा पोलिसांनी २ लक्ष ४२ सहस्र ६०० रुपये दंड वसूल केला आहे.
    उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहानन यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री प्रतिबंधक आढावा समितीच्या बैठकीत याविषयी माहिती देण्यात आली. बैठकीला संयुक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक उपस्थित होते. पोलिसांनी डिसेंबर महिन्यात ३९३, जानेवारी २८२ आणि फेब्रुवारी महिन्यात ५३८ तक्रारी नोंद केल्या. राज्यातील १०९ विद्यालयांत तंबाखू सेवनविरोधी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

बीड येथील शेतकर्‍यांना भूमीचा मावेजा न दिल्याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी शासनाधीन करण्याचे आदेश

     बीड, २ मे - शेतकर्‍यांच्या संपादित भूमीचा मावेजा (शासनअधिग्रहीत भूमीचे मूल्य) न दिल्याने बीड येथील जिल्हाधिकारी वापरत असलेली शासकीय गाडी शासनाधीन (जप्त) करण्याचे आदेश न्यायालयाने २९ एप्रिल या दिवशी दिले आहेत. 

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान परत करण्यामध्ये पुणे प्रथम क्रमांकावर

२ लक्ष ९३ सहस्र ग्राहकांनी अनुदान परत केले 
केंद्र शासनाने सदर अनुदानाचा वापर योग्य पद्धतीने करावा, ही जनतेची अपेक्षा ! 

     पुणे, २ मे - केंद्र शासनाने घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान स्वेच्छेने परत करण्याच्या योजना 'गिव्ह ईट अप ' या नावाने चालू केली होती. या योजनेला २ लक्ष ९३ सहस्र पुणेकर ग्राहकांनी अनुदान परत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनुदान परत करणार्‍यांच्या संख्येचा विचार केल्यास महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, देहली, कर्नाटक आणि तमिळनाडू यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील १६ लक्ष ४२ सहस्र ८१४ ग्राहकांनी, तर देशभरातील १ कोटी घरगुती ग्राहकांनी गॅसवरील अनुदान परत केले आहे. या ग्राहकसंख्येच्या दृष्टीने राज्यात पुण्याचा पहिला क्रमांक आला आहे.

चंद्रभागा शुद्धीकरणासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती !

४ मे या दिवशी अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात (जिल्हा सोलापूर) बैठक ! 

     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २ मे - राज्यशासनाने नुकतेच चंद्रभागेची स्वच्छता आणि शुद्धीकरण यांसाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याकरिता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी नागपूर येथील 'निरी' संस्थेकडून अहवाल सिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रदूषण महामंडळाचे मुख्य सचिव नलिनी शंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस पुण्याचे विभागीय आयुक्त एस्. चोक्कलिंगम आणि सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वक्फ बोर्डाच्या भूमी खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रहित ! - महसूलमंत्री एकनाथ खडसे

वक्फ बोर्डाच्या सर्वच प्रकारच्या व्यवहारांची चौकशी होणे आवश्यक आहे, हेच यावरून
 स्पष्ट होते. आतातरी शासन वक्फ बोर्डाला देण्यात येणारे अनुदान कायमस्वरूपी थांबवेल का ? 
     संभाजीनगर, २ मे - मराठवाड्यात वक्फ बोर्डाची १ लक्ष एकर जागा आहे. वर्ष १९९५ नंतर या जागेच्या संदर्भात झालेले खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रहित करण्यात येत असून वर्ष १९९५ पूर्वीच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

इसिसकडून इंडियन मुजाहिद्दीनच्या आतंकवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण

     नवी देहली - इसिस आणि अल्-कायदा या आतंकवादी संघटनांसाठी काम करणार्‍या इंडियन मुजाहिद्दीनचे भारतातील अनेक आतंकवादी अफगाणिस्तानमध्ये जाऊन प्रशिक्षण घेत असल्याचे एका चित्रफितीतून समोर आले आहे.
       जुनुद अल् हिंद ग्रुपनेे त्याच्या संकेतस्थळावर ही ध्वनीचित्रफीत ठेवली आहे. या चित्रफितीतून अनेक मुसलमान तरुणांना जिहादच्या नावावर आतंकवादी शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी चिथावण्यात आले आहे. यात हिंदी आणि उर्दू या भाषांमधून बोलतांना इसिसचा आतंकवादी अन्वर भटकळने मला कोणीही चिथावले नसून मी स्वत:च्या इच्छेने येथे आलो आहे, असे सांगितले. इसिस आणि अल्-कायदा या आतंकवादी संघटनांसाठी काम करणार्‍या इंडियन मुजाहिद्दीनच्या आतंकवाद्यांचा संपूर्ण चमूच सध्या अफगाणिस्तानमध्ये आहे. त्यांच्यासह भारतातून अनेक जण आतंकवादाचे प्रशिक्षण घेत आहेत. तेथून त्यांना सिरिया आणि इराक या देशांमध्ये पाठवले जाते. भारतातील सर्वच तपास यंत्रणा मागावर असलेला अन्वर हुसेन हाही सध्या अफगाणिस्तानच्या या शिबिरांमध्ये प्रशिक्षण घेत आहे. देशातील इतरही धर्मांध तरुणांना सोबत घेऊन आलेला अन्वर म्हणतो, जिहाद आमचे कर्तव्य आहे. जिहादच्या मैदानात अल्लाहने आम्हाला सर्वकाही दिले.इसिसचे आतंकवादी महिलांच्या हातून मरणाला घाबरतात !

     मोसूल (इराक) - इराकमध्ये इसिसच्या विरोधात लढणार्‍यांपैकी पीपल्स प्रोटेक्शन युनिट हा अत्यंत प्रभावशाली गट आहे. या गटातील एक कुर्दिश महिलेने म्हटले आहे की, मी आता खूप काळापासून इसिसच्या विरोधात लढत आहे. जर महिलेच्या हातून एखाद्या आतंकवाद्याचा मृत्यू झाला, तर स्वर्गात मिळणार्‍या ७० अप्सरा त्याला मिळणार नाहीत, या भीतीमुळे इसिसचे आतंकवादी महिलांच्या हातून मरायला घाबरतात.

लंडनमध्ये ३ धर्मांधांकडून १३ वर्षीय मुलीवर सतत ४ दिवस बलात्कार

जगभरातील धर्मांधांची सगळीकडे पाशवी वृत्ती सारखीच ! 
     लंडन - येथे महंमद शेख, हमजा अली आणि सुरन उद्दीन या ३ धर्मांध युवकांनी एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सतत ४ दिवस बलात्कार केला आणि तिला शारीरिक संबंधासाठी बंधक बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उद्दीनला १५, शेखला ८, तर अलीला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे तिघेही सोमालियन आहेत. पीडितेचे लंडनच्या एका मार्गावरून अपहरण केल्यानंतर तिला एका अज्ञात स्थळी डांबून ठेवले. तेथे त्यांनी तिला अमली पदार्थ आणि दारू पाजली अन् तिच्यावर सतत ४ दिवस बलात्कार केला.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत स्त्रीशक्ती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

फलक प्रसिद्धीकरता

बंगाल बॉम्ब बनवण्याचा कारखाना झाला असतांना यावर एकही निधर्मी तोंड उघड नाही, हे लक्षात घ्या !
मालदा (बंगाल) येथील जौनपूरमध्ये गियासू शेख नावाच्या व्यक्तीच्या घरात १ मेच्या रात्री गावठी बॉम्ब बनवण्यात येत असतांना झालेल्या स्फोटात ४ जण ठार, तर ६ जण घायाळ झाले आहेत.

कार्ला येथे ऐतिहासिक विजयस्तंभाचे भूमीपूजन

     लोणावळा (जिल्हा पुणे) - कार्ल्यात ४ जानेवारी १७७९ या दिवशी झालेल्या इंग्रज आणि मराठे यांच्या लढतीत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा मोठा विजय झाला. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक विजयातून स्थानिक तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी, यासाठी कार्ला येथील ऐतिहासिक तळ्याकाठी विजयस्तंभाची उभारणी करण्यात येत आहे. या स्तंभाचे भूमीपूजन इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

शिवतीर्थ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ४ मेपासून शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन !

     मिरज, २ मे (वार्ता.) - येथील शिवतीर्थ सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळ यांच्या वतीने ४ मे या दिवसापासून शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ मे या दिवशी सकाळी ७ वाजता नगरसेवक श्री. निरंजन आवटी यांच्या हस्ते पूजा आणि मानवंदना होईल. ५ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता भारुडातून समाजप्रबोधन हा कार्यक्रम होईल. 

उत्तराखंडच्या जंगलांतील ७० टक्के आग नियंत्रणात

     डेहराडून - उत्तराखंडमधील ५ जिल्ह्यांतील जंगलांत गेल्या ८९ दिवसांपासून लागलेल्या भीषण आगीवर ७० टक्के नियंत्रण मिळवण्यात एन्डीआरएफच्या सैनिकांना यश आले आहे. सुमारे १३० सैनिक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

घरफोडी करून विशेष ऐवज न मिळाल्याने रागाच्या भरात हत्या !

     'सुसंस्कृत आणि शांत नव्हे, तर गुन्हेगारांचे पुणे' अशी पुण्याची ओळख बनू लागली आहे. 'पुणे तेथे गुन्हेगारीला काय उणे', असे घोषवाक्य होऊ नये, यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
     पुणे, २ मे - तीन ठिकाणी घरफोडी करूनही विशेष ऐवज न मिळाल्याने संतप्त झालेल्या चोरट्यांनी रागाच्या भरात तानाजी टकले (वय २७ वर्षे, रा. कात्रज) यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात समोर आले आहे. या प्रकरणी संदीप भोसले याला अटक करण्यात आली असून त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. (गुन्हेगारीने गाठलेला कळस हा आतापर्यंतच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षणापासून वंचित ठेवल्याचाच दुष्परिणाम ! जनतेवर वेळीच सुसंस्कार केले असते, तर आज असे वाईट दिवस पहायची वेळ आली नसती. - संपादक)

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे हिंदु नेते बलदेव कुमार यांना अटक

पाकमधील शीख नेत्याच्या हत्येचे प्रकरण
     पेशावर - शीख नेते डॉ. सरदार सूरन सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे हिंदु नेते बलदेव कुमार यांना अटक केली. डॉ. सिंह खबर पख्तूनख्वा या प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचे अल्पसंख्यांक प्रकरणातील विशेष सहाय्यक होते. २२ एप्रिल या दिवशी त्यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. सिंह वर्ष २०११मध्ये पीटीआयमध्ये सहभागी होण्यापूर्वी ९ वर्षेपर्यंत जमात-ए-इस्लामी पाकिस्तान या पक्षाचे, तसेच पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य होते.

प्रियांका गांधी यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाची नोटीस

सिमल्यातील भूमी घोटाळा
     सिमला - सिमल्यातील भूमी खरेदी प्रकरणी राज्य सूचना आयुक्तांनी प्रियांका गांधी यांच्याकडून मालमत्तेची माहिती मागितली होती. त्यावर प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयातला ही माहिती दिल्यास माझ्या जीवास धोका निर्माण होईल, असे कारण दिले होते; मात्र उच्च न्यायालयाने प्रियांका गांधी यांची सुरक्षा याचिका फेटाळून लावली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्रिलोकसिंह चौहान यांनी प्रियांका त्यांना नोटीस पाठवली असून ४ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. (गेली अनेक वर्षे केंद्रात काँग्रेसचे शासन असल्याचा अपलाभ घेत गांधी कुटुंबियांनी अनेक घोटाळे केल्याचे उघड होत आहे. या घोटाळ्यांचा छडा लावून त्यांना कारागृहात पाठवावे, म्हणजे देशात सर्वांना समान न्याय असल्याचे जनतेला समजेल ! - संपादक) 

केंद्राच्या सुवर्ण ठेव योजनेत तिरुपती देवस्थानची ७.५ टन सोने ठेवण्याची सिद्धता

हिंदूंच्या मंदिरांतील सोने हे शासनाच्या कह्यात कशासाठी द्यायचे ? मशिदींचा आणि चर्चचा पैसा 
किंवा अन्य मौल्यवान वस्तू शासनाकडे दिल्या जातात का किंवा शासन त्यासाठी योजना आखते का ?
हिंदूंच्या मंदिरांच्या सोन्याचा वापर हिंदु धर्मप्रसार आणि धर्मशिक्षण यांसाठी केला पाहिजे ! 
     भाग्यनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुवर्ण ठेव योजनेमध्ये (गोल्ड मॉनिटायजेशन स्कीममध्ये) सुमारे ७.५ टन सोने ठेवण्याची सिद्धता तिरूमला तिरुपती देवस्थान विश्‍वस्त मंडळाने दर्शवली आहे. केंद्राने रोख रकमेऐवजी व्याज स्वरूपात सोनेच दिल्यास विश्‍वस्त मंडळाकडील सर्व सोने सुवर्ण योजनांत गुंतवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.सियाचीनमध्ये २०१३ पासून आतापर्यंत ४१ सैनिकांचा मृत्यू !

पाकपासून रक्षण होण्यासाठी भारतीय सैनिकांना युद्ध न करताच हुतात्मा व्हावे लागत आहे. 
यावर कोणतेही राज्यकर्ते ठोस उपाय काढत नाहीत, हे भारतियांना लज्जास्पद होय !
     नवी देहली - सियाचीनमध्ये २०१३ पासून आतापर्यंत ४१ सैनिकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत लिखित उत्तरात ही माहिती दिली.

७० टक्के लोकांना पुढील ५ वर्षांतही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवे !

मोदी शासनाविषयी ५० टक्के लोकांमध्ये अप्रसन्नता !
     नवी देहली - दोन वर्षांपूर्वी भरभरून मते देऊन सत्तेवर आणणार्‍या जनतेमध्ये मोदी शासनाची लोकप्रियता दिवसेंदिवस न्यून होत चालल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले असून त्याच्या कामकाजाविषयी ५० टक्के लोकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. असे असले, तरी ७० टक्के लोकांनी मोदी शासनाने ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनीच पंतप्रधान व्हावे, असे मतही व्यक्त केले आहे.
१. या सर्वेक्षणानुसार ५० टक्के लोकांच्या मतानुसार गेल्या २ वर्षांत परिस्थितीत काहीही पालट झालेला नाही. 
२. १५ टक्के लोकांनी मोदी शासनाच्या काळात परिस्थिती वाईट झाल्याचे सांगितले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangal ke Jounpur me 1 dharmandh ke ghar bam banate samay huye visphot me 4 logonki mrutyu aur 6 log ghayal.
kya Bangal mini Pakistan ban raha hai ?
जागो ! : बंगाल के जौनपूर में एक धर्मांध के घर बम बनाते समय हुए विस्फोट में ४ लोगोंकी मृत्यू और ६ लोग घायल.
क्या बंगाल मिनी पाकिस्तान बन रहा है ?

सिंचन प्रकल्पातील स्वामित्व शुल्काचा घोटाळा

     महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पावर झालेला अवाढव्य व्यय आणि तुलनेने सिंचनाखाली आलेली अत्यल्प भूमी हा चर्चेत असणारा विषय आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाने केलेले ते एक महापाप आहे. त्यापुढे जाऊन आघाडीच्या ठराविक नेत्यांनी संगनमताने काही कंत्राटदारांशी मिळून सिंचन प्रकल्पातील भूमीवर शासनाला देण्यात येणार्‍या स्वामित्व शुल्कामध्येही (रॉयल्टीत) फसवले आहे. कॅगने आता सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावर आधारित ताज्या अहवालात काही ठराविक कंत्राटदारांनी शासनाला देण्यात येणार्‍या स्वामित्व शुल्कामध्ये कशा प्रकारे घोटाळा केला आहे, याची २२ हून अधिक उदाहरणे या अहवालात दिली आहेत.

उन्हाळी सुटीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

       सध्या शाळा-महाविद्यालयांना सुटी लागली आहे. अलीकडे मुलांना सुटी लागणार म्हटले की, त्यांच्या वेळेचे नियोजन कसे करायचे, याच चिंतेत पालक असतात. अशा पालकांसाठी आणि आमच्या बालसाधकांच्या सुटीचा सुयोग्य वापर होण्यासाठी मे मासात हे विशेष सदर प्रसिद्ध करत आहोत. या सदरात राजा-राणी, चिऊ-काऊच्या गोष्टी, विनोद किंवा इतर मनोरंजानाच्या गोष्टी नव्हे, तर सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी जाणून घेणार आहोत. सनातनचे बालसाधक ही हिंदु राष्ट्राची भावी पिढी आहे. त्यामुळेच या सुटीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालसाधकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

दर्शनाचा दांभिक ध्यास !

श्री. दत्तात्रय पटवर्धन
तृप्ती देसाई ही नसे नावाप्रमाणे तृप्ती ।
तर ती आहे अधर्म, अनाचार, अतृप्तीची अभिव्यक्ती ॥ १ ॥

नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा ।
असे तिचे वास्तव रूप, धर्मश्रद्धेवर हा घाला ॥ २ ॥

तृप्ती देसाईंचे नव्हे हे देवदर्शन ।
तर हे अहंकार, अनाचाराचे आेंगळ प्रदर्शन ॥ ३ ॥

वेळीच नाही रोखले, तर त्या करतील आणखी अतिरेक ।
समानतेचा डांगोरा पिटून म्हणतील, ईश्‍वरा माझेच आता 
ऐक ॥ ४ ॥

तृप्ती देसाई, शनिदेवाच्या चौथर्‍यावर जायचा नाद सोडून द्या आणि पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करा !

    शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी तृप्ती देसाई इतक्या का आतुरल्या आहेत ? त्यांना एकच सांगणे आहे, पंढरीचा पांडुरंग कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे. तिथे जाऊन त्याच्या पायावर लोळण घ्या. तो प्रसन्न होईल. तुमच्या जीवनाचे सार्थक होईल. शनिदेवाला झाडाची सावलीही चालत नाही. बायकांची सावली तर मुळीच आवडत नाही. ज्या देवाला जे आवडत नाही, ते आपण करू नये. असे केले, तर महापाप लागेल.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
देशात भूषा, भाषा आणि भोजन या माध्यमांतून पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण चालू आहे. ते थांबवण्यासाठी धर्माचे ज्ञान सर्वांनी आत्मसात करायला हवे ! - शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, करवीर पीठ

पू. भाऊ परब यांच्या अनमोल सत्संगात उलगडलेलेे सेवेतील अनेक बारकावे आणि संतांच्या संकल्पाची आलेली अनोखी प्रचीती !

पू. सदाशिव परब
       मी काही दिवसांसाठी सांगलीतून ग्रंथसाठा पडताळणीची सेवा करण्यासाठी देवद आश्रमात गेले होते. त्या वेळी पू. भाऊ परब (पू. भाऊकाका) यांच्यासह सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचबरोबर एखाद्या गोष्टीत संतांचा संकल्प कसा कार्यरत होतो, याची अनोखी प्रचीतीही घेता आली.
१. परिपूर्ण सेवा करायला 
शिकवणारे पू. भाऊकाका !
१ अ. पू. भाऊकाकांनी प्रेमाने; पण कडक शब्दांत चूक लक्षात आणून दिल्याने सेवेचे गांभीर्य निर्माण होऊन चुका होऊ नयेत, यासाठी प्रयत्न होणे : मी पू. भाऊकाकांच्या सोबत लघुग्रंथांच्या पडताळणीची सेवा करत होते. मी एक लघुग्रंथ पडताळून पू. काकांकडे पुनर्पडताळणीस दिला. त्यांनी ग्रंथातील प्रत्येक सूत्र बारकाईने पडताळले आणि त्या संदर्भातील माझी चूक मला त्याच वेळी प्रेमाने; पण कडक शब्दांत सांगितली. त्यामुळे ती माझ्या चांगली लक्षात राहिली आणि माझ्यात सेवेचे गांभीर्यही निर्माण झाले. एकदा प्लास्टिक पिशवीत ग्रंथ ठेवतांना ते उलटसुलट झाले होते. त्यांनी ते लक्षात आणून दिले. त्या वेळी पू. काकांना माझ्या चुकांमुळे सेवा करण्यास पुन्हा वेळ द्यावा लागतो आणि आपण क्षुल्लक गोष्टींसाठी संतांचा अमूल्य वेळ वाया घालवतो, याची जाणीव अंतर्मनापर्यंत झाली. त्यानंतर अचूक सेवा होण्यासाठी प्रयत्न होऊ लागले.

पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांनी सनातनच्या साधकांना केलेले मार्गदर्शन

प.पू. आबा उपाध्ये
      पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांचा ३.५.२०१६ या दिवशी ८९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त प.पू. आबांनी सनातनच्या साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
प.पू. आबा उपाध्ये यांच्या चरणी सनातन 
परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सनातनने समाजात 
चांगले पुरोहित सिद्ध करावेत !
         सनातनने पौराहित्य करणारे गुरुजी शिक्षण देऊन सिद्ध करावेत. देशामध्ये गोवा, महाराष्ट्र आणि सर्वच ठिकाणी चांगले पौराहित्य करणारे गुरुजी शिक्षण देऊन सिद्ध करावेत. ते परमेश्‍वराची आत्मीयतेने पूजा-अर्चा करतील. त्यामुळे केवळ पाट्या टाकण्याचे काम करणारे बाहेरचे गुरुजी यापासून धडा घेतील आणि भरमसाठ दक्षिणा घेणार नाहीत.
२. आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हटले आहे की, काळ्या गायीचे दूध प्रतिदिन एक भांडे प्यायल्यास केस काळे होतात.
३. शाळा आणि महाविद्यालये 
यांत प्रवचन देऊन प्रबोधन करावे !
        सनातनमधून शिक्षण घेतलेल्या ज्ञानी सेवकांनी शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्रवचन करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर त्याचा योग्य परिणाम होईल.

उज्जैन येथील सिंहस्थपर्वात जयपूर (राजस्थान) येथील साधिका सौ. सीतादेवी नोगिया यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

उज्जैन सिंहस्थक्षेत्री गुरुकृपेने उमलले तिसरे कृतज्ञतेचे पुष्प !
सौ. सीतादेवी नोगिया (उजवीकडे) यांचा सत्कार
 करतांना पू. (कु.) स्वाती खाडये
     उज्जैन, २ मे (वार्ता.) - उज्जैनच्या सिंहस्थ क्षेत्री जिथे एकीकडे निसर्गाने उग्ररूप धारण केल्याने उष्णता वाढली आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय अव्यवस्थेमुळे संत आणि भाविकही त्रस्त आहेत. अशा स्थितीतही गुरुकृपेच्या सावलीखाली असलेले सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन सुगंधाने दरवळून निघाले. क्षण होता आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण करून ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणार्‍या जयपूर, राजस्थान येथील साधिका सौ. सीतादेवी नोगिया यांच्या सत्कार सोहळ्याचा ! या वेळेस सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाव तेथे देव या उक्तीनुसार छोट्या-छोट्या गोष्टींत ईश्‍वरी साहाय्य मिळून देवच सारा भार कसा वहातो, याविषयी ६२ प्रतिशत आध्यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य प्रकाश घाळी यांना आलेल्या अनुभूती !

        माझी आई (वय ८५ वर्षे) आजारी असल्याने मी गेल्या १० मासांपासून आईच्या सेवेसाठी आमच्या गावी (हुक्केेरी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) रहात होतो. त्या वेळी आलेल्या विविध अनुभूती पुढे देत आहे.
आधुनिक वैद्य
प्रकाश घाळी
१. घरातील विजेच्या मीटरची तार पूर्ण जळलेली असूनही दिवे लागणे आणि दुसरे दिवशी वीज अन् दिवे गेल्यावर भावाने वीज खात्यातील कर्मचार्‍यांना बोलावून दुरुस्ती करून घेणे : एका रविवारी मी भ्रमण संगणकावर सेवा करत असतांना आमच्या घरातील विद्युत् मीटरची तार जळत असल्याचे लक्षात आले. तार संपूर्ण जळली असती, तर दिवे गेले असते; म्हणून लगेच माझ्या भावाला दुरुस्तीसाठी कुणालातरी बोलावण्यास सांगितले. तेव्हा रात्रीचे ७ - ८ वाजले असतील ! मी घरी आलो. तेव्हा वायर पूर्ण जळलेली होती; पण रात्री दिवे लागलेले होते. दुसर्‍या दिवशी वीज गेल्यामुळे दिवेही गेले. रात्री वीज खात्यातले कर्मचारी येऊन दुरुस्ती करून गेले. घरी दिवे आल्याने मला आनंद झाला. सोमवारी रात्री माझ्या भावाच्या घरातील विद्युत् मीटरची वायर जळल्यामुळे त्याने कर्मचार्‍यांना बोलावून आणले होते. त्यामुळे ईश्‍वराने त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे साहाय्य केले. मी हे प.पू. डॉक्टरांना सांगितले. तेव्हा त्यांनी भाव-भक्ती असेल, तर ईश्‍वर अशा छोट्या छोट्या गोष्टींतही साहाय्य करतो, असे सांगितले.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

पू. अप्पाकाकांनी पूर्वी केलेल्या मार्गदर्शनाच्या ध्वनीचकतीचे टंकलेखन करतांना झालेले आध्यात्मिक त्रास

        एकदा मी टंकलेखन करण्यासाठी पू. अप्पाकाकांनी (देहत्याग केलेले सनातनचे संत पू. वसंत बाळाजी आठवले) एकनाथी भागवतावर केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचकती ऐकत होतो. ही सेवा करतांना माझ्या मनात किती जलद गतीने बोलत आहेत. ही ध्वनीचकती कधी एकदाची संपते ? विषयाची सूत्रबद्ध मांडणी नाही. त्यामुळे टंकलेखनाला किती अडचणी येत आहेत, असे नकारात्मक विचार येत होते. या वेळी माझी चिडचिडही होत होती. माझ्या मनातील हे विचार प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, हे मार्गदर्शन पू. अप्पाकाकांनी संत होण्यापूर्वी केले असूनही त्यात किती चैतन्य आहे !, हे लक्षात येते. ही ध्वनीचकती ऐकून खरे तर माझ्या मनात चांगले शिकायला मिळाले, असा विचार यायला हवा होता; परंतु आसुरी शक्ती मनात नकारात्मक विचार आणतात, हे लक्षात आले. (पूर्वी मला आसुरी शक्तींचा तीव्र त्रास होता.)
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०१५)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. - संपादक
कु. श्रीया राजंदेकर
        ३.५.२०१६ या दिवशी म्हणजेच वरूथिनी एकादशीला पुणे येथील कु. श्रीया अनिरुद्ध राजंदेकर हिचा पाचवा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने कु. श्रीया 
हिला सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
         कु. श्रीया हिच्या आई-वडिलांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कृष्ण मनात रहायला येणार म्हणून सिद्धता करणारी कु. ऐश्‍वर्या वांडरे (वय ११ वर्षे) !

कु. ऐश्‍वर्या वांडरे
        परम पूज्य बघा ना ! मी कृष्णाशी बट्टी केली, तरी कृष्ण माझ्याशी बोलतच नाही. मीच वैतागून कृष्णाशी १ ते २ घंट्याने बोलते आणि तुम्ही सर्व कळत असूनही कळत नसल्यासारखे करता. आधी तुम्हाला बघावसे वाटत होते, आता प्रतिदिन भेटावेसे वाटते.
       परम पूज्य, माझ्याकडून व्यष्टी साधनेचे काहीच प्रयत्न होत नाहीत. तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न माझ्याकडून करवून घ्याल ना ! (निरोपाची वाट पहात आहे.)
       कृष्ण माझ्या मनात रहाण्यासाठी येणार आहे, हे कळल्यावर घरातील सर्व घटकांनी केलेल्या सिद्धतेत विविध प्रकारचे आणलेले साहित्य खालीलप्रमाणे आहे.
       साहाय्याला शरिरातील सर्व पेशी आल्या होत्या.
- तुमची कु. ऐश्‍वर्या वांडरे, मिरज (वय ११ वर्षे) (२१.५.२०१५)

बालपणीच भक्त प्रल्हादाप्रमाणे मोठा भक्त होण्याचे ध्येय ठेवणारी फोंडा (गोवा) येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अवनी पुंडलिक तळावलीकर (वय ६ वर्ष) !

कु. अवनी तळावलीकर
१. ऐकण्याची वृत्ती असणे
        कु. अवनी २ वर्षांची असल्यापासून आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी मनापासून ऐकते. ती आज्ञाधारक आहे. ती सहसा हट्ट करत नाही.
२. स्वीकारण्याची वृत्ती असणे
       एका प्रसंगात अवनी माझ्याशी खोटे बोलली. ही चूक तिच्या लक्षात आणून दिल्यावर तिने लगेच माझी क्षमा मागितली. तसेच इतरांनी तिच्या चुका सांगितल्या, तरी ती लगेच चुका स्वीकारते.
३. चांगली निरीक्षणक्षमता असणे
        एखाद्या प्रसंगात कोण काय बोलले ? किंवा घरात एखादी वस्तू कुठे ठेवली आहे ?, हे अवनीला ठाऊक असते.

रामनाथी आश्रमात आल्यानंतर विविध प्रसंगात श्री. निमिष म्हात्रे यांच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया

श्री. निमिष म्हात्रे
१. दशप्रणवी गायत्री महायज्ञ 
बघून झालेली विचारप्रक्रिया
       मे २०१३ मध्ये रामनाथी आश्रमात दशप्रणवी गायत्री महायज्ञ झाला. त्या काळात यज्ञाविषयी कुतूहल वाटून आवड वाढली. त्या वेळी मनात आले, आपण यज्ञ करू शकत नाही; पण यज्ञ करणार्‍याला साहाय्य म्हणून दिवसभरातील कृती करतांना भाव कसा ठेवायला हवा ?, याचा विचार करूया.
१ अ. व्यक्तीच्या विचारांची आहुती व्यष्टी यज्ञावर आणि कृतींची आहुती समष्टी यज्ञावर म्हणजे इतरांवर अधिक परिणामकारक होणे : प्रत्येक व्यक्ती ही एका प्रज्वलित यज्ञकुंडाप्रमाणे असते. आपण ज्या कृती किंवा विचार करत असतो, त्यांची आहुती या यज्ञात पडत असते. या मार्गाने त्या देवाकडे पोचतात आणि आपल्याला त्याचे फळ मिळते. विचार हे व्यष्टी यज्ञावर (स्वतःवर), तर कृती या समष्टी यज्ञावर (इतरांवर) अधिक परिणाम करतात. व्यक्तीने आपले दोष आणि अहं घालवून आहुती (विचार / कृती) अधिकाधिक सात्त्विक घातल्यास त्यांतून मिळणारे फळसुद्धा चांगलेच (सात्त्विक) असते. विचार चांगले केले की, वृत्ती चांगली होते आणि कृती चांगल्या केल्या की, इतरांकडून मिळणारा प्रतिसाद चांगला मिळतो.

महर्षींनी सांगितलेला नामजप करतांना कर्णावती (गुजरात) येथील श्री. श्रीपाद हर्षे यांना लक्षात आलेली काही सूत्रे

        ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा महर्षींनी सांगितलेला जप करतांना सर्वप्रथम मला वाटले, हा जप पुष्कळ मोठा आहे आणि हा जप ४ ओळींचा असल्यामुळे करायला वेळ लागतो. त्या वेळी मला या जपाविषयी लक्षात आलेली काही सूत्रे पुढे देत आहे.
१. या जपातून सर्व देवतांना 
वंदन केल्याचा आनंद मिळणे
       या जपात सर्वप्रथम निसर्गदेवतेला वंदन आहे. नंतर वेदांना प्रमाणभूत मानले आहे. त्यानंतर श्रीकृष्णाचा जयकार केला आहे आणि सर्व देवांना वंदन केल्यावर शेवटी श्रीगुरूंचा जयघोष केला आहे. त्यामुळे एकाच जपात सर्वांना वंदन केल्याचा पुष्कळ आनंद मिळतो.

सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत नसूनही यजमानांना देव म्हटल्यावर डोळ्यांसमोर प.पू. डॉक्टर दिसणे

        माझे यजमान मेजर सुहास ठकार कधी नामजप, पूजा, मंदिरात जाणे, स्तोत्र म्हणणे, अशी कोणतीच साधना करतांना दिसत नाहीत; पण देवावर विश्‍वास आहे, असे सांगतात. मी त्यांना विचारले, तुम्ही काहीच देवाचे करत नाही आणि देवावर विश्‍वास आहे, असे म्हणता. मग देव म्हटल्यास तुमच्या डोळ्यांसमोर कोणत्या देवाची मूर्ती येते ? तेव्हा त्यांनी सांगितले, देवाची मूर्ती येत नाही. केवळ प.पू. डॉक्टर दिसतात.
        मी हे उत्तर ऐकून निरुत्तर आणि स्तब्ध झाले. माझ्या लक्षात आले की, मी सगळे काही करत असूनही त्यांचा आध्यात्मिक अधिकार पुष्कळ जास्त आहे. ते केव्हाच अनेकातून एकात गेले आहेत. मी सनातनची साधना करते आणि यजमान करत नाहीत, हा माझा अहंकार नष्ट झाला.
- शरणागत, सौ. वर्षा ठकार, पुणे

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
माणसापेक्षा पशू श्रेष्ठ !
अ. हिंस्र पशू जेवढी भूक असेल, तेवढेच भक्ष्य मारून खातात. वाघ, सिंह भूक नसतांना १०० हरणे मारत नाहीत. हा धर्म ! (याउलट आतंकवादी सहस्रावधींना मारतात !)
आ. वाघिणीला प्रत्येक १२ वर्षांनी अपत्य होते. हे भगवंताचे नियोजन ! ज्यामुळे इतर प्राणीसुद्धा सुरक्षित जीवन जगू शकतात. (याउलट मानव इतक्या अपत्यांना जन्म देतो की, पृथ्वीला त्यांचा भार सोसत नाही !)
- प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

प्रतिदिन साधना करण्याचे महत्त्व

परात्पर गुरु डॉ. आठवले
       शरिरावर येणार्‍या घामाचे आणि धुळीचे आवरण जाण्यासाठी आपण प्रतिदिन स्नान करतो. त्याचप्रमाणे दिवसभरात मन आणि बुद्धी यांच्यावर येणारे रज-तम गुणांचे आवरण दूर करण्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक असते. साधनेमुळे प्राणशक्तीवहनसंस्थेत निर्माण होणारे अडथळे दूर होण्यासही साहाय्य होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
देशाच्या दुःस्थितीचे मूळ कारण लक्षात न घेता, वरवरचे उपाय करणारे शासन !
देशाच्या आज झालेल्या दुर्दशेचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे जनता राजसिक आणि तामसिक होणे. ही परिस्थिती पालटण्यासाठी, म्हणजेच जनतेला सात्त्विक बनवण्यासाठी सनातन संस्था समाजात धर्मशिक्षण देऊन धर्मपालनाचा आणि साधनेचा प्रसार करते. धर्मपालन आणि साधना केल्याने व्यक्तीची सात्त्विकता वाढते. सनातनचे सर्वच उपक्रम समाजात सात्त्विकता वाढवणारे आहेत. समाजाची सात्त्विकता वाढल्यानंतरच देशाची स्थिती सुधारेल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील ?, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तर मानसिक शांतीचा लाभ होईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बंगालचे बांगलादेश होणार ?

संपादकीय
     अलीकडेच पाकिस्तानचे पत्रकार सिद्दीकी बंगालमधील निवडणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी बंगालला गेले होते. त्या वेळी त्यांची बंगालचे मंत्री फिराहाद हकीम यांच्याशी गाठ पडली. हे हकीम महाशय सिद्दीकी यांना कोलकात्यातील गार्डन रिच परिसरात घेऊन गेले आणि हा परिसर मिनी पाकिस्तान असल्याचे त्यांना सांगितले. शत्रूराष्ट्राचा एक पत्रकार राज्यातील निवडणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी येतो, तर त्याच्यासमोर स्वतःच्या राष्ट्राचे गुणगान गाण्याऐवजी या महाशयांनी हे देशद्रोही कुकृत्य केले. तृणमूल काँग्रेसवाल्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार ? या पक्षाच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या संदर्भात कोणीच हात धरू शकत नाही. बांगलादेशी घुसखोरांना बंगाल हे त्यांचे माहेरघर वाटते. याला कारणीभूतही ममताबानो आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn