Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज सनातन साधक पुरोहित पाठशाळेचा तिथीनुसार वर्धापनदिन.

कोटी कोटी प्रणाम !

एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांचा आज वाढदिवस

श्रीनगर येथील वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर उघडले !

जिहादी आतंकवादामुळे वर्ष १९९० मध्ये बंद करावे लागले होते मंदिर !
काश्मिरी हिंदूंच्या संघटित लढ्याला यश
     श्रीनगर - येथील मध्यवर्ती भागात असलेले प्राचीन वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर उघडण्यात आले. यानंतर काश्मिरी हिंदूंनी श्री भैरव देवाची विधिवत् पूजा-अर्चा केली.
१. वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांमुळे ४ लाख ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडून जावे लागले होते. तेव्हापासून वेताळ भैरव मंदिर बंद करण्यात आले होते.
२. यानंतर स्थानिक धर्मांधांनी या मंदिराची भूमी अनधिकृतरित्या एका बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकली.
३. यावर काश्मिरी पंडितांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच याविरोधात लढा देण्यासाठी काश्मिरी पंडित संघर्ष समिती स्थापन केली.
४. काश्मिरी पंडित संघर्ष समितीच्या झेंड्याखाली देश-विदेशातील काश्मिरी पंडित संघटित झाले. त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबून मंदिराची भूमी सदर बांधकाम व्यवसायिकाच्या कह्यातून यशस्वीपणे मुक्त केली.

येळ्ळूर (बेळगाव) येथील श्री चांगळेश्‍वरी देवीच्या यात्रेच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाचा नकार !

यात्रा समितीनेच पाण्याची व्यवस्था करण्याचा सल्ला !
     हिंदुबहुल भारतात हज यात्रेकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, तर हिंदूंच्या यात्रांना पाण्यासारख्या मूलभूत सोयीसुविधाही पुरवल्या जात नाहीत, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      बेळगाव - येळ्ळूर येथे २ मेपासून चालू होणार्‍या ग्रामदेवता श्री चांगळेश्‍वरी देवीच्या यात्रेच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिला आहे. (प्रशासनाने अन्य पंथियांच्या धार्मिक उत्सवांच्या संदर्भात असा नकार दिला असता का ? - संपादक)
१. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही येळ्ळूर गावची ग्रामदेवता श्री चांगळेश्‍वरी देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
२. तथापि बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत यात्रेसाठी पिण्याचे पाणी कुठून आणणार, असा प्रश्‍न ग्रामस्थांना भेडसावत आहे.

बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्याची मागणी करत टोरँटो (कॅनडा) येथील पाकिस्तानी नागरिकांनी पाकचा झेंडा जाळला !

बलुचिस्तानप्रश्‍नी पाकच्या दमनशाहीचा निषेध !
  •  पाक आणि जीना यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी !
  •  पाकचे विचारवंत तारेक फतेह यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन !
  •  जागतिक पातळीवर पाकची नाचक्की !
     टोरँटो - बलुचिस्तानप्रश्‍नी पाककडून चालू असलेल्या दमनशाहीच्या निषेधार्थ येथील पाकिस्तानी नागरिकांनी पाकचा झेंडा जाळून तेथील शासनाच्या विरोधात रोष प्रकट केला. आंदोलनकर्त्यांनी पाकचा झेंडा जाळून त्याचे कफन बनवले, तसेच बलुचिस्तान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या. याशिवाय पाक आणि त्याचे संस्थापन महंमद अली जीना यांच्या विरोधातही उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जमलेल्या आंदोलकांनी बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्याची एकमुखी मागणी केली. टोरँटो येथील पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारेक फताह यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे येथील नागरिकांनी पाकची धंटिगशाही जगासमोर आणून पाकची नाचक्की केली.

मंदिर किंवा मशीद यांमध्ये बलपूर्वक घुसणे चुकीचे ! - महिला काझी

हिंदूंनो, मुसलमानांकडून धर्माभिमान शिका !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - मंंदिर किंवा मशीद येथे बलपूर्वक घुसू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा उत्तरप्रदेशच्या पहिल्या महिला काझी हीना झहीर यांनी निषेध केला आहे. त्यांच्या अशा कृतीमुळे समाजामध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतो. आपण शांतपणे जीवन जगत असतांना असे मशिदीमध्ये बलपूर्वक घुसणे अस्वीकारार्ह आहे, असे हीना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
     तृप्ती देसाई यांना मुंबई येथील हाजी अली दर्ग्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. दर्ग्याच्या परिसरात पोहोचताच देसाई यांना पोलिसांनी गाडीतून खाली उतरायलाच दिले नाही. त्यानंतर देसाई यांनी त्यांचा मोर्चा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाकडे वळवला होता; मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांना कह्यात घेण्यात आले होते.

पुढील वर्षापासून भ्रमणभाष संचामध्ये पॅनिक बटन बंधनकारक ! - केंद्रशासनाच्या शासकीय आदेशात माहिती

यासह केंद्रशासनाने महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण मिळण्याचीही व्यवस्था करावी ! 
पॅनिक बटनमुळे महिलांना स्वसंरक्षण करणे होणार शक्य !
     नवी देहली - भ्रमणभाषसंचाच्या माध्यमातून व्यक्तीचे संरक्षणही व्हावे, यासाठी पुढील वर्षापासून केंद्रशासनाने भ्रमणभाष संचामध्ये पॅनिक बटन बंधनकारक केले आहे. हे बटन असल्याविना कोणताही संच देशात विक्री करता येणार नाही, असे केंद्रशासनाने त्यांच्या आदेशात स्पष्ट केले आहे. पॅनिक बटण दाबल्यानंतर संबंधित कॉल जवळच्या सुरक्षा यंत्रणेशी किंवा पोलीस ठाण्याशी जोडला जाईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना त्यांचे स्वसंरक्षण करणे अधिक सोपे होणार आहे.

देशात ३ वर्षांत २५ सहस्र महिला ठरल्या हुंडाबळी ! - केंद्रीय मंत्री मनेका गांधी

     महिलांशी संबंधित एवढी गंभीर समस्या देशाला भेडसावत असतांना त्याकडे दुर्लक्ष करून मंदिरात प्रवेश करण्यासारखे अनावश्यक विषय घेऊन आंदोलन करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही तृप्ती देसाई कधी जाग्या होणार ?
      नवी देहली - २०१२ ते २०१४ या तीन वर्षांमध्ये देशात २५ सहस्र महिला हुंड्याच्या बळी ठरल्या आहेत. एक म्हणजे त्यांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्यहत्या केली किंवा त्यांना सासरच्या लोकांनी ठार मारले, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी नुकतीच लोकसभेत दिली.
     नॅशनल क्राइम रेकॉर्डस्ने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात २०१२ मध्ये ८ सहस्र २३३, २०१३ मध्ये ८ सहस्र ८३, तर २०१४ मध्ये ८ सहस्र ४५५ महिला हुंड्याच्या बळी ठरल्याची नोंद झाली आहे. तसेच याच कालावधीत हुंड्याविषयी ३० सहस्र प्रकरणे नोंद झाली आहेत, अशी माहिती त्यांनी एका लेखी उत्तरात दिली.

प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवण्यात येणार्‍या चांदीच्या वर्खावर बंदी येणार !

     नवी देहली - मिठाई, सुपारी यांसारख्या खाद्य पदार्थांना चविष्ट बनवण्यासाठी चांदीचा वर्ख लावण्यात येतो. हा वर्ख बैल किंवा गाय यांची हत्या करून त्यांच्या आतड्यांपासून सिद्ध करण्यात येत असल्याने आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानंतर केंद्रशासन याच्या विरोधात कायदा बनवणार आहे. २ वर्षांपूर्वी मेनका गांधी यांनी आरोग्य मंत्रालयाला यासंदर्भात पत्र लिहिले होते.
या पत्रात म्हटले आहे की,
१. केवळ मिठाईच नाही, तर सफरचंदासारख्या फळांना आकर्षक बनवण्यासाठीही त्याच्यावर चांदीचा वर्ख लावण्यात येतो. त्यामुळे ही फळेदेखील मांसाहाराच्या श्रेणीत येतात.
२. चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाईच्या वाढत्या विक्रीमुळे प्रतिवर्षी सहस्रो गोवंशाची हत्या होते.

आदर्श सोसायटी घोटाळा उघड करण्यासाठी ७.४ कोटी रुपये व्यय

एक घोटाळा उघड करण्यासाठी कोट्यवधी रुपये 
व्यय करावा लागणारा भारत बहुधा एकमेव देश असावा !
        मुंबई - आदर्श घोटाळा नोव्हेंबर २०१० मध्ये उघड झाल्यानंतर त्यातील सत्य जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या आदर्श चौकशी आयोगावर ७.४ कोटी रुपये व्यय झाला, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ता श्री. अनिल गलगली यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
१. आदर्श सोसायटीच्या चौकशीसाठी ८ जानेवारी २०११ या दिवशी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली. चौकशी आयोगाचे अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे.ए. पाटील यांची नेमणूक करण्यात आली, तसेच आयोगाचे कार्यकारी सचिव म्हणून माजी मुख्य सचिव पी. सुब्रह्मण्यम् यांच्याकडे दायित्व देण्यात आले.

तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार ! - मनोजकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त, मुंबई

असे आहे, तर हा तमाशा थांबवण्यासाठी 
पोलिसांनी तात्काळ प्रयत्न का केले 
नाहीत ?, याचे उत्तरही पोलिसांनी द्यावे !
देसाई केवळ तमाशा करत होत्या ! 
- देवेन भारती, पोलीस सहआयुक्त, मुंबई
        मुंबई - त्या दिवशी आम्ही तृप्ती देसाई यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही किंवा त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करता येणार नाहीत, असे सांगितले. त्यांना घरी परतण्याचा सल्लाही दिला; मात्र त्यांनी त्यास नकार दिला. अखेर नाइलाजाने त्यांना कह्यात घ्यावे लागले. देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार बनल्या आहेत, असे पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवरायांचे चरित्र अभ्यासल्यास आत्महत्येचा विचारही येणार नाही ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे

     पिरंगुट (जिल्हा पुणे) - वर्ष २०११ मध्ये भारतामध्ये जवळपास पावणेदोन लक्ष युवकांनी आत्महत्या केली. उत्तरोत्तर हे प्रमाण वाढतच आहे. क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करणार्‍यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र अभ्यासले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे जीवन संघर्षमय होते. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासमवेत झालेल्या तहात त्यांना २३ किल्ले द्यावे लागले. पुढे औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. अशा भयंकर संकटांवर मात करून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तरुणांनी जर शिवचरित्र वाचले, तर त्यांच्या मनात आत्महत्येचा विचारही येणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने २८ एप्रिल या दिवशी लवळे फाटा येथे आजच्या समाजापुढील आदर्श : छत्रपती शिवाजी या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अंकित काणे हेही उपस्थित होते.

स्मार्ट नागरिक होण्यासाठी रुपयातील दहा पैसे संस्कार करण्यासाठी खर्च करा ! - पालकमंत्री गिरीश बापट

लोकप्रतिनिधींनी अधिकाधिक स्वभाषेतील शब्द वापरणे अपेक्षित आहे !
     पुणे - स्मार्ट सिटी सिद्ध करत असतांना त्या शहरात वावरणारा माणूसही कसा स्मार्ट होईल, हे पहायला हवे. त्यासाठी एका रुपयातील दहा पैसे विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी म्हणजेच त्यांना चांगली शिकवण देण्यासाठी व्यय झाले पाहिजेत. जर शहर स्मार्ट झाले आणि ते वापरणारेच स्मार्ट नसतील, तर काय उपयोग, असा प्रश्‍न उपस्थित करत पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. येथील वसंत व्याख्यानमालेत २७ एप्रिल या दिवशी पुणे : एक स्मार्ट सिटी या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी महापालिकेचे आयुक्त श्री. कुणाल कुमार, बांधकाम व्यावसायिक श्री. सतीश मगर, सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. सुकृत खांडेकर उपस्थित होते.

थोर भारतीय गणितज्ञ रामानुजम् यांच्या जीवनावरील चित्रपट पाहून जगभरातील मान्यवर प्रभावित !

     सिलिकॉन व्हॅली (अमेरिका) - येथे २७ एप्रिल या दिवशी थोर भारतीय गणितज्ञ रामानुजम् यांच्या जीवनावरील द मॅन हू न्यू इनफिनिटी या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. रामानुजम् यांचा जीवनप्रवास पाहून अमेरिकेतील ५० जगप्रसिद्ध व्यक्ती प्रभावित झाल्या. रशियाचे अब्जाधीश आणि डिजिटल स्काय टेक्नालॉजीचे संस्थापक युरी मिलर यांनी हे प्रदर्शन आयोजित केले होते.
१. गणितासाठी रामानुजम् यांनी केलेला संघर्ष आणि त्यांची गणिताविषयीची आवड पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यात गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन, ओकुलुस व्हीआर्चे सी.ई.ओ. ब्रेंडन इर्बी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
२. या वेळी फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सी.ई.ओ. सुंदर पिचाई यांनी रामानुजम् यांच्या नावाने संस्था स्थापन करणार असल्याचे घोषित केले.
३. ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट स्लमडॉग मिलेनियरमधील अभिनेता देव पटेल यांनी या चित्रपटात रामानुजम् यांची भूमिका साकारली असून प्राध्यापक जी.एच्. हार्डी यांची भूमिका जेरेमी आयरंस यांनी साकारली आहे.

स्वीडनमधील शाळेत योगवर्गांवर बंदी !

     स्टॉकहोम - स्वीडन देशातील जोनकोपिंग राज्यातील वर्नामो नगर परिषदेच्या रायादाहोम येथील एका शाळेत योगवर्गांवर बंदी घालण्यात आली आहे. योग आणि सैतान यांचा संबंध आहे, असे कारण या बंदीसाठी देण्यात आले आहे. त्याविषयी अनेक हिंदूंनी निषेध व्यक्त केला आहे.
१. अमेरिकेतील हिंदू धार्मिक नेते राजन झेद यांनी स्वीडन देशाचे राजे गुस्ताव्ह आणि पंतप्रधान स्टीफन लोवेन यांना पत्र देऊन योगाभ्यासाची महती वर्णन केली आणि योगवर्गांवरील बंदी रहित करण्याची मागणी केली.
२. योग ही विद्या २ सहस्र वर्षापूर्वी हिंदु धर्मात अस्तित्वात आली. योगाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. अमेरिकेत सुमारे ४ कोटी लोक योग करतात. असेही वरील पत्रात नमूद केले आहे.
३. स्वीडन देशातील सर्व शैक्षणिक संस्थांत योगाचे वर्ग चालू करावे असेही श्री. झेद यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक जीवनात धर्मापेक्षा राज्यघटना प्रमाण मानणे म्हणजे धर्मनिरपेक्षता ! - शेषराव मोरे

धर्मनिरपेक्षतेची ही अजब व्याख्या नव्हे का ?
        पुणे, १ मे (वार्ता.) - राज्यघटनेतील कलम २५ अन्वये धर्माचे महत्त्व केवळ वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीपुरतेच उरले आहे. घटनेमुळे धर्माची व्यावहारिकता (सार्वजनिक जीवनात धर्म आचरणे) उणावली आहे. जी व्यक्ती वैयक्तिक जीवनात धर्म आणि सार्वजनिक जीवनात राज्यघटना आचरणात आणते, तीच खरी धर्मनिरपेक्ष होय. सार्वजनिक जीवनात धर्मापेक्षाही राज्यघटना प्रमाण मानणे, ही खरी धर्मनिरपेक्षता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक श्री. शेषराव मोरे यांनी केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत २९ एप्रिल या दिवशी भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ या विषयावर ते बोलत होते. (राज्यघटनेमध्ये गेल्या ६७ वर्षांच्या काळात अनेक पालट झाले आहेत, तर अनादि काळापासूनच्या वेदांमध्ये एका कानामात्रेचाही पालट झालेला नाही, यातच धर्माचे महत्त्व लक्षात येते. राज्यघटना ही काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे, तर धर्मग्रंथ सहस्रो वर्षांपूर्वीचे आहेत. धर्मात मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार आहे आणि मानवी जीवनाच्या सर्वांगाला व्यापून धर्म उरला आहे; तुलनेने राज्यघटना मर्यादित आहे. सहस्रो वर्षांपूर्वी या धर्माच्या आधारेच अतिशय समृद्ध आणि सुखी राष्ट्र चालत होते; त्या तुलनेत सध्याच्या लोकशाही राष्ट्राची दुःस्थिती सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे केवळ वैयक्तिक जीवनातच नाही, सार्वजनिक जीवनातही धर्मास प्राधान्य दिले गेले, तर अधोगती नाही, तर व्यक्तीची आणि राष्ट्राची झपाट्याने उन्नतीच होणार आहे. - संपादक)

धमक असेल, तर मोदींनी सोनिया गांधी यांना अटक करून दाखवावी ! - अरविंद केजरीवाल

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात धमक असेल, तर ऑगस्टा वेस्टलॅण्ड आस्थापनेच्या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणी सोनिया गांधी यांना अटक करून दाखवावी, असे आव्हान देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. या प्रकरणात जर माझ्यावर आरोप असते किंवा इटलीच्या न्यायालयाने जर माझे नाव घेतले असते, तर मोदींनी आतापर्यंत मला अटक केली असती; मात्र सोनिया गांधींची साधी चौकशीही केलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. केजरीवाल यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मोदींनी माझ्यावर सीबीआयच्या धाडी टाकल्या; मात्र सोनिया आणि रॉबर्ट वडेरा यांच्यावर घातल्या नाहीत. मोदींना गांधी परिवार प्रामाणिक वाटतो.

माहिती सेवा समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांना विनामूल्य चारावाटप

दौंड-पुरंदर तालुक्यांतील १०० शेतकर्‍यांनी लाभ घेतला
     वाघोली (जिल्हा पुणे) - राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यासाठी माहिती सेवा समितीने सहा एकर जागेवरील ओला चारा देण्याचे काम चालू केले आहे, असे समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.
     माहिती सेवा समितीने दौंड आणि पुरंदर या तालुक्यांतील शेतकर्‍यांसाठी साहाय्याचा हात पुढे केला आहे. चारा आणि पाणी उपलब्ध न झाल्यामुळे शेतकरी कवडीमोल भावाने जनावरे विकू लागला आहे. ही जनावरे शेतकर्‍यांनी विकू नये, यासाठी समितीच्या वतीने श्री. वारघडे यांनी पुढाकार घेतला आहे. माहिती सेवा समिती बकोरी, पुणे यांच्या वतीने दौंड तालुक्यातील वाळकी, पुरंदर तालुक्यातील राख, कोळविहिरे या गावांमध्ये चारा पाठवला आहे. त्याचा १०० हून अधिक शेतकर्‍यांनी लाभ घेतला.

पवना नदीच्या पात्रातील जलपर्णीमुळे नागरिकांचे आरोग्य संकटात

भाजयुमोच्या वतीने जलपर्णी भेट देत प्रभाग अधिकार्‍यांचा निषेध
     चिंचवड - चिंचवडगाव आणि परिसरातील पवना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उद्भवला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने महापालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांना जलपर्णी भेट देत निषेध व्यक्त करण्यात आला. भाजयुमोचे शहराध्यक्ष अधिवक्ता मोरेश्‍वर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सुभाष माछेरे आणि आरोग्य अधिकारी कुंडलीक दरोडे यांना चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयात घेराव घालून जलपर्णी भेट दिली. या प्रसंगी नदीपात्रात वाढलेली जलपर्णी त्वरित काढून टाकण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचे सामाजिक परीक्षण करणार !

उशिरा सुचलेले शहाणपण !
     पुणे - शहरात गेल्या ५ वर्षांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे सामाजिक परीक्षण (सोशल ऑडिट) करण्यात येणार आहे. या अंतर्गत प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्या संदर्भातील मते जाणून घेण्यात आहे. या उपक्रमासाठी महानगरपालिकेतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने स्वतंत्र कक्षही चालू करण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्पाची देखरेख, प्रकल्पाचा कालावधी आदी माहिती उपलब्ध करून मुख्यतः कामाच्या दर्जाच्या संदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली. (असे परीक्षण ठराविक कालावधीनंतर सातत्याने करून नागरिकांच्या समस्या सोडवल्या गेल्या, तरच परीक्षणाचे सार्थक झाले, असे म्हणता येईल. - संपादक)

केंद्र शासनाकडून सराफांना आता हॉलमार्कची सक्ती

केंद्रशासनाने विविध प्रकारची सक्ती 
करण्यासमवेतच भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर 
कारवाई करून पारदर्शी कारभार करावा, ही अपेक्षा !
         नगर, १ मे - केंद्रशासनाने सोन्यावर अबकारी कर (एक्साईज ड्युटी) लादला आहेच. त्यातच आता सुवर्ण व्यावसायिकांना हॉलमार्कचे (भारतीय मानक ब्युरो) दागिने विकण्याची सक्ती करण्यात येणार आहे. केंद्रशासनाने ही सक्ती करून विक्रीत पारदर्शीपणा आणण्यासाठी हा कायदा आणला आहे. त्यासाठी सराफांकडे कोणताही अधिकारी जाणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे; मात्र ६ कोटी रुपयांवर उलाढाल असणार्‍या सराफांना आता नोंदणी करणे अनिवार्य आहे.

समाजात कुमारी मातांच्या प्रमाणात वाढ !

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात प्रमाण अधिक !
राष्ट्र्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य विभागाचे सर्वेक्षण
* हे आहेत पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम ! लहान वयातच मुलांना साधना करण्यास शिकवून धर्मशिक्षण दिले, तर असे प्रकार निश्‍चितच थांबतील ! 
* मंदिर प्रवेशाचा अकारण वाद निर्माण करणार्‍या धर्मद्रोही तृप्ती देसाई यांना महिलांची ही भीषण समस्या का दिसत नाही कि त्या याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात ?
      नवी देहली - भिन्नलिंगी आकर्षण, पालटती जीवनशैली, समाजमाध्यमांचा तरुणाईवर असणारा प्रभाव, लैंगिक शिक्षणाचा अभाव, यांसह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्र्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत समोर आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचेही या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

सनातनच्या कार्याची समाजाला आवश्यकता ! - मान्यवरांचे मनोगत

अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींसह समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांची प्रदर्शनाला भेट !
डावीकडून प्रदर्शन पहातांना प.पू. स.गु. निरन्नमुक्तदासजी
स्वामी आणि त्यांना माहिती सांगतांना श्री. प्रवीण नाईक
    उज्जैन (सिंहस्थ पर्वक्षेत्र), १ मे (वार्ता.) - उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र आणि धर्म विषयी प्रदर्शन जिज्ञासू, राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांच्यासाठी जणू पर्वणी ठरली आहे. अनेक मान्यवरांनी सनातनच्या कार्याची समाजाला आवश्यकता असल्याचे सांगितले. एकीकडे संत आणि मान्यवर प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्या आशीर्वचनाने साधकांना उपकृत करत आहेत, तर दुसरीकडे समाजातील विविध क्षेत्रांतील संस्था आणि धर्माभिमानी हे सनातन आणि समिती यांचे कार्य जाणून घेत आहेत अन् ते या कार्याशी जोडले जात आहेत. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्रातील प.पू. स.गु. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांनी प्रदर्शन पाहिल्यावर कार्याला आशीर्वाद दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी एक वर्ष पुरे ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

    
हरिद्वार - गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी २० वर्षांची आवश्यकता नाही. जर गंगा नदीवर धरणे बांधली जात असतील आणि तिच्यात नाल्यांचे पाणी सोडले जात असेल, तर पुढील ५० वर्षांतही नदी स्वच्छ होणार नाही. ही धरणे हटवली आणि नाले बंद केले, तर एका वर्षांत गंगा स्वच्छ होईल, असे प्रतिपादन द्वारका आणि शारदा पिठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. नदीचे पाणी अविरत वाहू लागले की तिची आपोआप स्वच्छता होईल, असे त्यांनी सांगितले.

शाळा आणि महाविद्यालये यांच्याकडे अद्याप अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिका अनुपलब्ध

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार !
     पुणे - शाळा आणि महाविद्यालये यांनी इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेचे काम चालू केले आहे. असे असूनही प्रवेश प्रक्रिया समितीने अद्याप माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिलेली नाही. (प्रतिवर्षी प्रवेश पुस्तिका उपलब्ध करून द्यावी लागत असतांना प्रवेश प्रक्रिया समितीकडून त्यासाठी उशीर का होतो आहे, याविषयी शिक्षण विभाग सांगेल का ? - संपादक) शाळांकडून मात्र पुस्तिकेविषयी मागणी केली जात आहे.
     समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी ही पुस्तिका २ मे या दिवशी शाळांना देणार असल्याचे सांगितले होते; परंतु त्यांच्या साहाय्यक अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी अद्याप पुस्तिका छापून झाल्या नसल्याचे सांगितले. त्या पुस्तिका छपाईसाठी आणखी एक आठवडा लागणार असून त्या ६ मे या दिवशी उपलब्ध होतील. या पुस्तिका वितरित केल्यानंतर प्रक्रियेची माहिती देण्यासाठी पालकांचे उद्बोधन वर्ग चालू होतील, असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.

मला अटक केली, तर एकही पैसा मिळणार नाही ! - विजय मल्ल्या यांची धमकी

     लंडन - मी बँकांशी चर्चा करायला सिद्ध आहे. बँकांनी कर्जाच्या परतफेडीसाठी सुलभ हप्त्यांचा नवा पर्याय सुचवावा. मला परवडेल असा पर्याय मिळाला, तर टप्प्याटप्प्याने पैसे परत करणे शक्य होईल; पण माझे पारपत्र जप्त करून किंवा मला अटक करून बँकांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे बँकांनी नवा पर्याय सुचवावा, अशी धमकी भारतीय बँकांचे ९ सहस्र कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही धमकी दिली आहे. (उद्दाम विजय मल्ल्या यांना भारतात आणून त्यांची देश-विदेशातील सर्व संपत्ती जप्त करण्याचे धाडस केंद्रशासनाने दाखवले पाहिजे ! - संपादक)

राज्यातील निवासी डॉक्टरांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीची अनुज्ञप्ती द्यावी !

  • महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
  • सेन्ट्रल मार्ड संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
        मुंबई, १ मे - नांदेड वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला २९ एप्रिल या दिवशी मारहाण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून राज्यातील निवासी डॉक्टरांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीची अनुज्ञप्ती देण्याची मागणी केली असल्याची माहिती सेन्ट्रल मार्ड या आधुनिक वैद्यांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली आहे.
       त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, २ जुलै २०१५ या दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत असा निर्णय झाला होता की, एका रुग्णासमवेत २ नातेवाइकांना थांबण्याची अनुमती दिली जाईल. त्या निर्णयाची शासनाने कार्यवाही करावी. १ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील ४० निवासी डॉक्टरांवर आक्रमणेे झाली आहेत. त्यामुळे डॉक्टर्स प्रोटेक्शन अ‍ॅक्ट हा कायदा आणखी कडक करावा.

खोदकामातील शेकडो ट्रक डेब्रिज क्षेपणभूमीवर टाकल्याचे दाखवून पालिकेची लूट

मुंबईत रस्त्यांच्या कामासाठी नेमलेल्या 
चौकशी समितीकडून आणखी एक घोटाळा उघड !
        मुंबई - रस्त्यांच्या कामांत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे उजेडात आल्यानंतर चौकशी समितीने आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे. रस्त्यांच्या खोदकामातून सिद्ध झालेले चक्क चारशे ट्रक डेब्रिज एका रात्रीत मुंबईबाहेरील क्षेपणभूमीवर टाकल्याचे दाखवून ठेकेदारांनी पालिकेला लूटल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात एका रात्रीत मर्यादित कालावधीत एवढे ट्रक डेब्रिजची वाहतूक व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. मोठे देयक संमत करून घेण्यासाठी अधिकार्‍यांच्या संगनमताने ठेकेदारांनी हा घोटाळा केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. (यात दोषी अधिकार्‍यांवर शासनाने तत्परतेने कारवाई करावी, अशी अपेक्षा ! - संपादक)

महाराष्ट्रातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले ! - के.पी. बक्षी, अपर मुख्य सचिव, गृह विभाग

पोलीस यंत्रणेची ही कूर्मगती जनतेला न्याय कधी तरी देईल काय ?
     कोल्हापूर - गतवर्षी राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचा दर केवळ ३२ टक्के होता. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातला हा दर अल्प होता. या वर्षी तो ५२ टक्के झाला आहे. गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढणे आवश्यक असून त्यासाठी गृह आग्रही असल्याचे प्रतिपादन गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी केले. राज्यात अकोला आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी पोलीस आयुक्तालय चालू करण्याचे प्रस्ताव असून याबाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा चालू असल्याचे के.पी. बक्षी यांनी सांगितले.
     येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला के.पी. बक्षी यांनी भेट देऊन पाहणी केली.
     बक्षी या वेळी म्हणाले की, केवळ गुन्हे दाखल होणे यापेक्षा गुणवत्तापूर्ण आरोपपत्र दाखल होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय वकील, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था यांच्यामध्ये समन्वय आवश्यक आहे. गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

चिंचवड (पुणे) येथे वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यामध्ये वाद

     चिंचवड - येथील जुना जकात नाका भागात वाहतूक पोलीस आणि एक व्यक्ती यांमध्ये वादावादीचा प्रकार २९ एप्रिल या दिवशी झाला. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार एक जोडपे दुचाकीवरून जात असतांना त्यांच्याकडे वाहतूक पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली. सर्व कागदपत्रे, वाहन अनुज्ञप्ती, शिरस्राण हे सर्व असूनही त्यांच्याकडून संबंधित वाहतूक पोलिसाने १०० रुपयांची मागणी केली. त्या वेळी वाहनचालकाने १०० रुपये देण्यास नकार दिल्याने वाहतूक पोलीस आणि त्या जोडपे यांच्यामध्ये वादावादी झाली. (याचा अर्थ पोलिसाने लाच मागितली, असे वाटल्यास चुकीचे काय ? या प्रकरणी पोलीस प्रशासन चौकशी करून कारवाई करेल का ? - संपादक) त्यामुळे तेथे मोठा जमाव जमला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

मराठवाड्यास टँकरचा विळखा, बीडमध्ये सर्वाधिक ८३८ टँकर

         बीड, १ मे - मराठवाड्यातील ५४ लक्ष ८५ सहस्र २७४ लोकसंख्या ही ३ सहस्र १७४ टँकरवर अवलंबून आहे. त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ८३८ टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्याचा जलसाठा जसजसा अल्प होईल, तसतसे टँकर वाढण्याची शक्यता आहे. सध्या तापमान वाढत असल्याने जलसाठे आटू लागले आहेत. परिणामी टँकरची संख्या वाढत आहे. पाऊस पडेपर्यंत मराठवाड्यास टँकरचा विळखा असणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ८ सहस्र ५३६ गावे असून त्यापैकी ३ सहस्र ४० गावे-वाड्या यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यात टँकरची संख्याही लक्षणीय असून ७१२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पिंपरी (पुणे) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा व्यय १ कोटी २५ लक्ष रुपये

         पिंपरी, १ मे - येथे पार पडलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा व्यय १ कोटी २५ लक्ष रुपये झाला आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांनी साहित्य महामंडळाला संमेलनाच्या वेळी झालेल्या व्ययाचा (खर्च) अहवाल २९ एप्रिल या दिवशी सादर केला आहे. (मराठी साहित्य संमेलनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय होत असतांना संमेलनाची फलनिष्पत्ती काय ? आतापर्यंत झालेल्या सर्वच संमेलनातून मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने काय साध्य झाले, याचा विचार साहित्य परिषदेने करायला हवा. - संपादक)
         येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डॉ. डी.वाय. पाटील विद्यापिठाकडे होता. शासनाने संमेलनासाठी दिलेला २५ लक्ष रुपयांचा धनादेश डॉ. पी.डी. पाटील यांनी साहित्य महामंडळाकडे संमेलन समारोपाच्या वेळी सुपुर्द केला होता. प्रत्यक्षात शासनाने दिलेल्या व्ययाचा पैसा वापरल्याचे दाखवण्यात आले आहे. संमेलनात प्रदर्शनाचे भाडे (स्टॉल) २३ लक्ष रुपये, डॉ. पाटील यांनी नाम फाउंडेशनला दिलेले ७८ लक्ष आणि शासनाचे २५ लक्ष रुपये असा व्यय दाखवण्यात आला आहे.

इसिसवर मासे आणि वाहन यांची विक्री करून आतंकवाद्यांना वेतन देण्याची पाळी

      बगदाद (इराक) - काही मासांपूर्वी इसिस या आतंकवादी संघटनेकडे प्रचंड पैसा असलेली आतंकवादी संघटना म्हणून पाहिले जात होते; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये झालेली घट आणि तेलाचे साठे हातातून निसटल्यामुळे इसिसला मोठी आर्थिक हानी सोसावी लागत आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी ही आतंकवादी संघटना सध्या मासेविक्री आणि चारचाकी वाहनविक्री व्यवसाय यांमधून लक्षावधी डॉलर्सची कमाई करत असून यातून तिच्या सदस्यांना वेतन देत आहे. (अमेरिकेच्या सैन्याने इसिसच्या आर्थिक स्रोताला लक्ष्य केले. त्याप्रमाणे भारतानेही जिहादी आतंकवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्या आर्थिक नांग्या ठेचायला पाहिजे ! - संपादक)

अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गाने केलेल्या आक्रमणांमुळे इसिसचे आर्थिक कंबरडे मोडले !

आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी अमेरिका त्यांचे अड्डे नेस्तनाबूत करते ! 
भारताने आतंकवाद्यांचे असेच हाल करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     वॉशिंग्टन - अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गे आक्रमण केल्याने आतापर्यंत इसिस या आतंकवादी संघटनेची ८० कोटी डॉलर म्हणजे ५३ अब्ज १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. प्रचंड आर्थिक हानीमुळे आतंकवाद्यांकडून इसिस सोडून दुसर्‍या संघटनेत जाण्याच्या ९० टक्के घटना समोर आल्या आहेत, तसेच नवीन भरती होण्याचे प्रमाणही अल्प झाले आहे, असे अमेरिकेचे मेजर जनरल पीटर गर्स्टेन यांनी बगदाद येथे सांगितले.

स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला मंगल भेट

दैनिक सनातन प्रभात पहातांना स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती
बाजूला त्यांचे शिष्य आणि त्यांच्या डाव्या बाजूला श्री. प्रकाश जोशी
     रामनाथी, १ मे (वार्ता.) - नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी त्यांच्या काही अनुयायांसमवेत २८ एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीत त्यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांचे कार्य जाणून घेतले. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांनी माहिती दिली.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या संघटित लढ्यामुळे श्रीनगरमधील वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर खुले !
     वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांमुळे साडेचार लक्ष काश्मिरी हिंदू काश्मीर सोडून गेल्यापासून श्रीनगर येथील वेताळ भैरव मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर काश्मिरी पंडित संघर्ष समितीने केलेल्या संघर्षामुळे २७ वर्षांनंतर मंदिर खुले करण्यात आले.

हिंदू तेजा जाग रे !

     Jago ! : 27 varsh band raha Shrinagar ka Vetal Bhairav mandir Hinduonke sangharsha ke uprant khola gaya.
     Ab Hinduonka Kashmir loutne ka din kab ayega ?
     जागो ! : २७ वर्ष बंद रहा श्रीनगर का वेताल भैरव मंदिर हिंदूआें के संघर्ष के उपरांत खोला गया.
     अब हिंदूआें का कश्मीर लौटने का दिन कब आएगा ?

धर्मांतरासाठी नाव पालटण्याची आवश्यकता नाही ! - सर्वोच्च न्यायालय

         नवी देहली - नाव न पालटता अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याविषयी पंजाबमधील भदौडचे आमदार महंमद सादीक यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रहित करून सादीक यांची आमदारकी कायम ठेवली आहे.
       महंमद सादीक हे मुळचे मुसलमान असले, तरी त्यांनी शीख धर्म स्वीकारला आहे; मात्र नावात पालट केलेला नाही. ते मुसलमान असतांनाही त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली म्हणून त्यांचे प्रतिस्पर्धी शिरोमणी अकाली दलचे दरबारा सिंह गुरु यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मान्य केली होती; मात्र त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश देत म्हटले की, धर्मांतर केल्यास नाव पालटणे सक्तीचे नाही.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव आणि प्रकाशक यांना दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम

लोकसखा ज्ञानेश्‍वर आणि संतसूर्य तुकाराम 
या पुस्तकांतून बदनामीकारक माहितीचे प्रकरण
        पुणे, १ मे - ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी लोकसखा ज्ञानेश्‍वर आणि संतसूर्य तुकाराम या पुस्तकांतून संतांची अपकीर्ती करणारी माहिती लिहिली असल्याचा आरोप संत तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग विश्‍वनाथ मोरे यांनी केला होता. त्या प्रकरणी डॉ. आनंद यादव आणि प्रकाशक सुनील मेहता यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिलेली शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.जी. बिलोलीकर यांनी कायम ठेवली आहे. यापूर्वी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी यादव आणि मेहता यांना १० सहस्र रुपयांचा दंड किंवा
१ मासाची कैद अशी शिक्षा दिली होती.
         संत तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग विश्‍वनाथ मोरे यांनी उपरोक्त पुस्तकांच्या विरोधात यादव आणि मेहता यांच्या विरोधात एप्रिल २००९ मध्ये डॉ. यादव, स्वाती यादव आणि प्रकाशक सुनील मेहता यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा प्रविष्ट केला होता. त्या वेळी हे लेखन संशोधन करून केलेले आहे, तसेच वास्तववादी चरित्रात्मक कादंबरीचे लेखन आहे, असे डॉ. यादव यांनी न्यायालयात सांगितले होते. हे लेखन आक्षेपार्ह असल्याचे मान्य करत न्यायालयाने वरील शिक्षा दिली होती, तर स्वाती यादव यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर जिल्हा सत्र न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे.

वर्ष २०१४-२०१५ मध्ये भाजपला अन्य पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक देणगी !

राजकीय पक्षांना मिळणार्‍या निधीचा वापर जनहितासाठी किती होतो, 
याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे !
     नवी देहली - वर्ष २०१४-२०१५ मध्ये देशातील ६ राजकीय पक्षांना १ सहस्र २७५ कोटी ७९ लाख कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक देणगी भाजपला मिळाली आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉमच्या (एडीआर्च्या) अहवालात ही माहिती देण्यात आली. भाजपनंतर दुसर्‍या स्थानी माकप आहे. या सर्व पक्षांच्या एकूण उत्पन्नापैकी ५५ टक्के रक्कम म्हणजे ५८२ कोटी ७२ लाख रुपये रक्कम देणगीतून मिळाली आहे.
१. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी देणगीमध्ये ४४ टक्के वाढ झाल्याने या एका वर्षात भाजपला ९७० कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

चर्चमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचा विवाह हिंदुत्ववाद्यांनी थांबवला !

हिंदूंनो, ख्रिस्त्यांचा डाव ओळखा ! स्वत: धर्मशिक्षण घ्या आणि आपल्या मुलांनाही द्या !
पाद्रीसह १० जणांना अटक आणि सुटका
     सतना (मध्यप्रदेश) - कोलगवा येथील चर्चमध्ये एक अल्पवयीन हिंदु मुलीचा एका युवकाशी होणारा विवाह पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी थांबवला. या दोघांनीही ४ वर्षांपूर्वी अवैधपणे ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. याप्रकरणी पोलिसांकडून चर्चचा पाद्री आणि युवक यांच्यासह १० लोकांना अटक केली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसानी दिलेल्यानुसार मुलगी हिंदु होती आणि या विवाहाला तिच्या नातेवाईकांचा विरोध होता. तिच्या प्रमाणपत्रावरून तिला १८ वर्षे पूर्ण होण्यास अजून १० दिवसांचा कालावधी शेष होता. याविषयी मागासवर्गीय आयोगाच्या सदस्या लक्ष्मी यादव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

५ वर्षांत जयललिता यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ !

सामान्य जनतेच्या संपत्तीत कधीही अशी वाढ होत नाही; मात्र बरेच राजकारणी कोणतीही नोकरी 
अथवा व्यवसाय न करता त्यांच्या संपत्तीत अशी वाढ कशी होते, याचा शोध घ्यायला हवा !
     चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विधानसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरला आहे. यात त्यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. ५ वर्षांपूर्वी त्यांनी दिलेल्या संपत्तीच्या आकडेवारीपेक्षा आताची आकडेवारी दुप्पट झाली आहे. वर्ष २०११ मध्ये त्यांची संपत्ती ५१ कोटी ४० लाख रुपये इतकी होती. त्यात वाढ होऊन ती आता ११४ कोटी रुपये झाली आहे. त्यात ४१ कोटी ६३ लाख रुपये आणि ७२ कोटी ९ लाख रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. राज्यातील विरोधी पक्षाचे नेते करुणानिधी यांच्याकडे एकूण ६३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. वर्ष २०११ मधील संपत्तीमध्ये ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मांडवी नदीच्या डोहाला कॅसिनोरूपी कालियाच्या वेढ्यातून सोडवण्यासाठी भगवान श्रीकृष्णासारख्या नेतृत्वाची आवश्यकता !

श्री. अमित पोखरे
      गोव्यात वर्ष २००१ पासून कॅसिनो जहाजे मांडवी नदीत आली. वर्ष २००१ पूर्वी गोव्यातील तारांकित हॉटेल्समध्ये कॅसिनो आणण्यासाठी कायदा बनवण्यात आला आणि तारांकित हॉटेल्समध्ये कॅसिनो चालू झाले. प्रारंभी पंचतारांकित हॉटेल्सच्या एका कोपर्‍यात कॅसिनो असायचे. आता अनेक तारांकित आणि काही अतारांकित हॉटेलचा बहुतांश भाग कॅसिनोने व्यापला आहे. काही हॉटेलतर केवळ कॅसिनोच बनले आहेत. मांडवी नदीतील ५ कॅसिनो जहाजांबरोबर २० हून अधिक तारांकित हॉटेलमध्ये कॅसिनो मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आतापर्यंत स्वार्थी, तसेच सत्त्वहीन व्यक्तींनी कॅसिनोंना विरोधाचे नेतृत्व केल्यामुळे कॅसिनोविरोधातील आंदोलन निर्णायक स्वरूपात यशस्वी होऊ शकले नाही.

नोबेल पुरस्कार स्वीकारणार नाही ! - श्री श्री रविशंकर

         लातूर - पुरस्कार हे आता राजकीय झाले आहेत. मला नोबेल पुरस्कारासाठी विचारणा झाली होती, मी नकारच दिला. पुरस्कार मिळाला किंवा नाही मिळाला, याचा मी विचार करत नाही. मी पुरस्कार मिळावा यासाठी कोणतेही काम करत नाही आणि काम केल्यासच पुरस्कार मिळतो, असे नाही. १६ वर्षाच्या मुलीला नोबेल पुरस्कार मिळतो; त्यामुळे नोबेलचे महत्त्वच राहिले नाही, अशी प्रतिक्रीया आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली.

लातूर शहराला प्रक्रिया करून शुद्ध केलेल्या सांडपाण्याच्या तोडग्यास मुख्यमंत्र्यांची संमती

         संभाजीनगर, १ मे - लातूर शहरातून वाहणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे प्रति दिवशी १० लक्ष लिटर शुद्ध पाणी मिळणे शक्य आहे. या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ज्येष्ठ उद्योजक राम भोगले आणि अन्य काही जणांनी ठेवला. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली.
        काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भोकरदन (जिल्हा जालना) येथील सामुदायिक विवाहानिमित्त आले असता भोगले यांनी माहिती दिली. भोगले पुढे म्हणाले की, लातूर शहरातून वहाणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे शक्य आहे. त्याद्वारे प्रति दिवशी ७ लक्ष लिटर पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी योग्य पाणी उपलब्ध होऊ शकते, तसेच ३ लक्ष लिटर पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकते. याकरिता साधारणतः २ कोटी ५० लक्ष रुपयांचा व्यय येऊ शकतो. रेल्वेद्वारे पाणी आणण्यास लागणार्‍या व्ययाच्या एकदशांश व्ययामध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. ही प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कार्यवाही करणे शक्य असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. याविषयी अद्याप पुढे कुठलीही हालचाल झालेली नसली, तरी मे मासाच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.

कॉन्व्हेंट नव्हे, तर मातृभाषेतूनच शिक्षण द्या !

     गेल्या काही दशकांत पाश्‍चात्य संस्कृतीच्या वाढलेल्या प्रभावामुळे भारतामध्ये कॉन्व्हेंट शाळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दशकांत मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याऐवजी कॉन्व्हेंट शिक्षण देणार्‍या शाळांमधून शिक्षण देणे, हे पालकांच्या चुकीच्या मनोवृत्तीमुळे प्रतिष्ठेचे मानले गेलेे. त्यामुळेच अशा शाळांची संख्या शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढली. कॉन्व्हेंट शाळांच्या भूलभुलय्याला भूलण्यापेक्षा मुळात कॉन्व्हेंट शाळा म्हणजे काय, तेथे कोणते आणि कसे शिक्षण मिळते, स्वभाषा, स्वधर्म आणि देशाभिमान या दृष्टीने कुठले शिक्षण आणि उपक्रम राबवले जातात, याची कुठल्याही प्रकारची खात्री करून न घेता त्या शाळांमध्ये मुलांना शिकवण्याचा अट्टाहास खोट्या प्रतिष्ठेपोटी केला जातोे.

सावरकरांना नकली देशभक्त संबोधून त्यांच्यावर टीका करणे, ही नीचपणाची हद्द !

क्रांतीकारकांची हेटाळणी करणारा जगातील एकमेव देश भारत ! 
डॉ. सच्चिदानंद शेवडे
     चंद्रशेखर आझाद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन थोर क्रांतीकारकांची तुलना करून एकाला असली आणि दुसर्‍याला नकली ठरवण्याचा अधिकार काँग्रेसला दिला कुणी ? ना गुणी गुणिनं वेत्ति, अर्थात् गुणवान लोकांना गुण नसलेले लोक पाण्यात बघतात, अशी अवस्था सांप्रतकाळात काँग्रेसची झालेली दिसते. अर्थात् त्यांना दोष तरी का द्यावा ? कारण राहुल गांधींच्या पणजोबांनी सावरकरांना गांधी हत्येच्या आरोपात अडकवून कारागृहाची हवा खायला लावली होती. तेव्हापासूनच गांधी घराण्याने सावरकरद्वेषाची परंपरा जोपासली आहे. पुढे सावरकर निर्दोष सुटल्यावर वर्ष १९५० मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानाला म्हणजे लिलायत अली याला खुश करण्यासाठी सावरकरांना अटक करून बेळगावच्या हिंडलगा कारागृहात १०० दिवस डांबण्यात आले होते. जगातील कोणत्याही देशाने आपल्या क्रांतीवीरांची अशी हेटाळणी केली नसेल.

उन्हाळी सुटीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

मुलांनो, सुटीच्या कालावधीत संतचरित्रे वाचा !
सुटीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुटी लागली आहे. अलीकडे मुलांना सुटी लागणार म्हटले की, त्यांच्या वेळेचे नियोजन कसे करायचे, याच चिंतेत पालक असतात. अशा पालकांसाठी आणि आमच्या बालसाधकांच्या सुटीचा सुयोग्य वापर होण्यासाठी मे मासात हे विशेष सदर प्रसिद्ध करत आहोत. या सदरात राजा-राणी, चिऊ-काऊच्या गोष्टी, विनोद किंवा इतर मनोरंजानाच्या गोष्टी नव्हे, तर सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी जाणून घेणार आहोत. सनातनचे बालसाधक ही हिंदु राष्ट्राची भावी पिढी आहे. त्यामुळेच या सुटीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालसाधकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

चला, आपण सर्व जण प्रतिज्ञा करूया !

     हिंदु राष्ट्र आणि हिंदु संस्कृती यांच्या रक्षणासाठी भारतात सनदशीर मार्गाने हिंदु राष्ट्र स्थापन करून हिंदू महासभेचे ध्येय साध्य करण्यासाठी मी पुढील उद्देशांचा स्वीकार करतो.
१. अखंड हिंदुस्थानाची स्थापना
२. देशाची संस्कृती आणि परंपरा यांच्या आधारे भारतात विशुद्ध लोकराज्याची निर्मिती
३. विविध जाती आणि उपजाती यांना एका अविच्छिन्न समाजात संघटित करणे
४. अशी एक समाजव्यवस्था उभारणे की, जिच्यामध्ये राष्ट्राच्या सर्व घटकांना समान अधिकार आणि कर्तव्ये असतील.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या फेब्रुवारी २०१६ मधील कार्याचा आढावा

१. दाभोलकर आणि पानसरे हत्येच्या प्रकरणावर 
आयोजित केलेल्या चर्चेत सहभाग
     १.२.२०१६ या दिवशी महाराष्ट्र वन या मराठी वृत्तवाहिनीवर दाभोलकर आणि पानसरे हत्येच्या प्रकरणावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. समीर गायकवाडचे अधिवक्ता आणि हिंदुत्ववादी म्हणून या चर्चेत अधिवक्ता संजीव पुनाळेकर सहभागी झाले होते.
२. कोल्हापूर येथील धर्मजागृती सभेला संबोधित करणे
     ४.२.२०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सभेला उपस्थित असलेल्या धर्माभिमान्यांना संबोधित केले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)      हिंदु राष्ट्राची पहाट पहायची असेल, तर संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
www.sanatan.org वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

     आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत ! - प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. आपणाला असे वाटते का की हिंदूंच्या काही समस्या आहेत. किंवा स्वतःला हिंदू म्हणणेच एक समस्या आहे
२. गोध्रा प्रतिक्रिया अतिरंजित करण्यात आली, तर काश्मीरमधून चार लाख हिंदूंना हाकलून दिल्याविषयी का कोणी बोलत नाही ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या आधाराची आवश्यकता असलेल्या साधकाला भ्रमणभाषवर संपर्क करून चैतन्य देणारे पू. सौरभ जोशी !

१. पू. सौरभदादांनी भाऊ, भाऊ, असे सारखे म्हणणे आणि भाऊ नावाच्या ४ व्यक्ती पू. दादांना परिचित असल्याने ते कोणत्या भाऊंविषयी बोलत आहेत ?, याचा उलगडा न होणे : एप्रिल २०१५ मध्ये मी पू. सौरभदादा यांच्या सेवेच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आलो होतो. तेव्हा एक दिवस पू. सौरभदादा भाऊ, भाऊ, भाऊ, असे म्हणत होते; म्हणून मी त्यांना विचारले, तुम्हाला कोणत्या भाऊंशी बोलायचे आहे ? पू. सौरभदादा यांना ठाऊक असणारे चार भाऊ आहेत. - प.पू. गुरुदेवांचे भाऊ ती. भाऊकाका, सावंतवाडीचे श्री. दत्तात्रय पटवर्धन, कुडाळचे श्री. यशवंत गोवेकर आणि देवद आश्रमातील सनातनचे संत पू. भाऊ परब.
         असे चार भाऊ परिचित असल्याने मला प्रश्‍न पडला, पू. सौरभदादांना कोणत्या भाऊंशी बोलायचे असेल ? कोणत्या भाऊंना भ्रमणभाष करू ? तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने सुचले, सर्व भाऊंना संपर्क करूया. ज्यांच्याशी पू. सौरभदादा अधिक वेळ बोलतील, त्या भाऊंशी त्यांना बोलायचे होते, असे समजू.

पू. सौरभ जोशी यांच्यासमवेत आगावणे कुटुंबियांनी लुटला बालगीतांचा आनंद !

डावीकडून सौ. शकुंतला आगावणे, श्री. दीपक आगावणे, सौ. ज्योती
कांबळे आणि सौ. शुभांगी शेळके पू. सौरभदादांशी संवाद साधतांना
        २.६.२०१५ या दिवशी सायंकाळी श्री. दीपक आगावणे हे त्यांच्या दोन बहिणी सौ. शुभांगी शेळके, सौ. ज्योती कांबळे आणि सौ. शकुंतला आगावणे यांच्यासह पू. सौरभ यांना भेटायला आले होते. त्यांनी सांगितले, आश्रमात आल्यापासून प्रतिदिन पू. सौरभ यांना भेटल्याविना करमत नाही. पू. सौरभ यांना भेटल्यावर कितीतरी घंटे भावजागृती टिकून रहाते आणि मन उत्साही रहाते.

चि. शायरी मराठे हिच्या विवाहाच्या पूर्वसिद्धतेसाठी ईश्‍वर पदोपदी साहाय्य करत असल्याच्या आलेल्या अनुभूती

श्री. वीरेंद्र आणि सौ. वृंदा मराठे
        चैत्र कृष्ण पक्ष नवमी (१.५.२०१६) या दिवशी चि. स्नेहल मनोहर राऊत आणि चि.सौ.कां. शायरी वीरेंद्र मराठे हे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात विवाहबद्ध झाले. त्यांचा विवाह ठरल्यापासून सौ. शायरी यांचे आई-वडील यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. श्री. वीरेंद्र आणि सौ. वृंदा मराठे (चि.सौ.कां. 
शायरी हिचे आई-वडील) यांना आलेल्या अनुभूती
        चि.सौ.कां. शायरीचा विवाह ठरल्यापासून देव करत असलेल्या साहाय्याची प्रचीती येेत आहे. यासाठी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. काही प्रसंग येथे मांडत आहोत.
१ अ. एका संतांनी कु. सायली गाडगीळ हिच्या विवाहानंतर ५ - ६ दिवसांनी तुझा विवाह होईल, असे शायरीला सांगणे आणि त्याप्रमाणे शायरीचा विवाह त्याच दिनांकाला ठरणे : कु. शायरीचा विवाह निश्‍चित झाल्यावर आम्ही तो डिसेंबर २०१६ मध्ये करूया, असे ठरवले होते; परंतु विधात्याचे नियोजन वेगळेच होते. विवाहाची निश्‍चिती झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी कु. शायरी एका साधिकेला सेवेविषयी विचारायला गेली असता त्या वेळी तेथे एका संतांनी कु. सायली गाडगीळ हिचा विवाह झाल्यावर ५ - ६ दिवसांनी तुझा विवाह होईल, असे म्हटले. कु. शायरीने हे आम्हाला सांगितले. चौकशी केली असता १ मे या दिवशी या वर्षीचा शेवटचा मुहूर्त आहे आणि जुलैमध्ये काही अतिरिक्त मुहूर्त आहेत, असे समजले. म्हणजे १ मासही (महिनाही) हातात नव्हता. कु. सायलीचा विवाह २५ एप्रिलला होता. तिच्यानंतर ५ - ६ दिवसांनी म्हणजे १ मे हाच दिनांक येत होता. मनात विचारांचे द्वंद चालू होते. एकतर पुष्कळ घाई होणार आणि नातेवाइक एवढी घाई का करता ?, असे विचारणार. शायरीच्या आतेबहिणीचाही विवाह ठरला होता आणि तो डिसेंबरमध्ये होणार होता. ती शायरीपेक्षा मोठी आहे. तिच्या आधी शायरीचा एवढा घाईघाईत विवाह म्हटल्यावर नातेवाइकांना काहीतरी वाटणे साहाजिक होते. त्यामुळे एकदा मन विवाह डिसेंबरमध्ये करायचा, असे सांगत होते; पण दुसर्‍या मनाला जे होईल, ते ईश्‍वरेच्छेने होईल, असेही वाटत होते.

प.पू. गुरुदेव, तुम्हीच आम्हा सर्वांचे सर्वार्थानेे पिता आहात !

१. दैनिक सनातन प्रभातमधील स्वतःचा 
संतपिता असा उल्लेखवाचून मी संतपिता 
होण्याच्या योग्यतेचा आहे का ?, असे वाटणे
         १२.१.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे झालेल्या संतांचे दर्शन आणि त्या वेळी संतांनी पू. सौरभदादा यांच्या संदर्भात काढलेले उद्गार प्रसिद्ध झाले होते. खरेतर या सर्व घटना प.पू. गुरुदेवांच्या पूर्वनियोजनानुसारच घडलेल्या आहेत, घडत आहेत आणि पुढेही घडणार आहेत. या लेखात पू. सौरभदादा यांचे वडील या नात्याने माझा संतपिता असा उल्लेख केलेला मी वाचला. संतपिता हा शब्द सात्त्विक असल्याने तो वाचताच माझी भावजागृती झाली, शरीर रोमांचित झाले आणि डोळे भावाश्रूंनी दाटून आले; परंतु त्याच वेळी मनात अशी विचारप्रक्रिया झाली की, मी संतपिता होण्याच्या योग्यतेचा आहे का ? केवळ पू. सौरभदादा यांना जन्म दिला (खरेतर ते ईश्‍वराचे, म्हणजे प.पू. गुरुदेवांचेच नियोजन); म्हणून मी संतपिता आहे का ?

सतत कृष्णाच्या अनुसंधानात रहाणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील कु. सिद्धी दिनेश बाबते (वय ६ वर्षे) !

कु. सिद्धी बाबते
१. जन्मापूर्वी
        बाळ पोटात असतांना मी देवीची पुष्कळ उपासना केली. नियमित शाबरीकवच म्हणत असे. श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र बाळाभोवती सतत फिरत असल्याचे मला सतत जाणवत असे.
२. जन्मानंतर
२ अ. श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणे : सिद्धी आणि तिचे आजोबा दोघे मिळून सकाळी देवासाठी फुले तोडून आणतात. सकाळी ९ वाजता शाळा असूनही ती प्रतिदिन कृष्णासाठी हार बनवते. सिद्धी सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असते आणि शाळेत जातांना नेहमी श्रीकृष्णाला सांगूनच शाळेत जाते. ती श्रीकृष्णाला वासुदेव म्हणते.
२ आ. बर्‍याच प्रसंगात श्रीकृष्णाला स्वतःसमवेत अनुभवणे : सिद्धी नियमित गणपति आणि मारुति स्तोत्र म्हणते. ती सकाळी नामजपही करते. ती देवघरातील सर्व देवतांशी बोलते. त्यांना सर्वकाही सांगते. बर्‍याच प्रसंगात ती श्रीकृष्ण तिच्या समवेत खेळतांना आणि बोलतांना अनुभवते, उदा. एकदा तिने मला सांगितले, आज मला शाळेत वासुदेव दिसला. तो माझ्यासमवेत खेळत होता आणि पूर्ण वेळ माझ्यासमवेतच होता. तिच्याकडे असलेल्या बाहुलीतही ती श्रीकृष्णालाच अनुभवते. त्याला जेवायला देते, जवळ घेते आणि झोपतांनाही श्रीकृष्णाला जवळ घेऊनच झोपते.

पू. सौरभदादांच्या खोलीत चैतन्य जाणवून ते करत असलेल्या हातांच्या मुद्रांमधून उपाय होत असल्याचे जाणवणे

       आम्ही पू. सौरभदादांच्या खोलीत त्यांचे दर्शन घ्यायला गेल्यावर आम्हाला खोलीत पुष्कळ चैतन्य जाणवले. त्यावेळी पू. दादा हातांच्या मुद्रा करत होते. त्यातून मला उपाय होतांना जाणवले. पू. सौरभदादा माझ्याकडे पाहून हसले. त्या वेळी माझी भावजागृती झाली. 
- सौ. भारती सतीश बिरारी, भोसरी, पुणे (३.३.२०१६)

सौ. विजया भिडे यांना यजमानांच्या आजारपणात आलेल्या अनुभूती

१. शस्त्रकर्म होण्यापूर्वी केलेले प्रयत्न
१ अ. शस्त्रकर्माच्या २ दिवस आधीपासूनच शस्त्रकर्माच्या खोलीची मानस शुद्धी करणे आणि शस्त्रकर्मासाठी लागणार्‍या सर्व आयुधांभोवती श्रीकृष्णाचा नामजप लिहिणे : यजमानांचे शस्त्रकर्माच्या २ दिवस आधीपासूनच शस्त्रकर्म करण्याच्या खोलीची मानस शुद्धी केली. तसेच शस्त्रकर्मासाठी लागणार्‍या सर्व आयुधांभोवती श्रीकृष्णाचा नामजप लिहिला. देवाला केवळ प्रार्थना व्हायची, हे देवा, यजमानांसाठी योग्य काय ते होऊ दे आणि आमची त्यात साधना होऊ दे. तसेच आम्हाला हे सर्व सहन करण्याची शक्ती दे.
१ आ. रिक्शावाल्याने रिक्शात बसल्यापासून रुग्णालयात पोहोचेपर्यंत स्वामी समर्थांविषयी बोलणे आणि ते ऐकून भावजागृती होणे : दुसर्‍या दिवशी रुग्णालयामध्ये जातांना रिक्शावाला ओळखीचा असल्याप्रमाणे मला सांगत होता, स्वामी आहेत. काळजी करू नका. स्वामी काळजी घेणारच आहेत. रिक्शात बसल्यापासून रुग्णालयात पोहोचेपर्यंत तो स्वामी समर्थांविषयी बोलत होता. त्या वेळी माझी भावजागृती झाली.

रामनाथी आश्रमात चालू असलेले मंत्रपठण ऐकून मनात आलेल्या विचारांची पूर्तता झाल्याची साधकाने घेतली अनुभूती !

१. आश्रमात चालू असलेले मंत्रपठण ऐकून पू. सौरभदादांनी हा मंत्रजप करावा, असे वाटणे आणि तसा मंत्रजप त्यांनी करायचा असल्याचे समजणे : रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात सध्या मंत्रजपाचे पठण चालू आहे. तेव्हा माझ्या मनात हा मंत्रजप पू. सौरभदादांना म्हणायला सांगितला, तर ज्या उद्देशाने हे पठण चालू आहे, त्याची फलनिष्पत्ती वाढू शकेल, असा विचार गेले ३ दिवस येत होता. त्यासाठी हा मंत्रजप एकदा पू. सौरभदादांच्या कानात सांगायचा आणि नंतर कागदावर लिहून तो पू. सौरभदादांच्या चरणांजवळ ठेवायचा, असे वाटले; परंतु हे स्वतःच्या मनाने कसे करणार ? व्यवस्थापनाला या संदर्भात विचारावे लागेल, असा विचार करण्यात ३ दिवस गेले.
        १०.१०.२०१५ च्या सायंकाळी सौ. मनीषा पानसरे यांचा भ्रमणभाष आला आणि त्या म्हणाल्या, पू. सौरभदादांना वेदम् प्रमाणम् हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही तसे त्यांना सांगा. मी त्यांना हो असे सांगून भ्रमणभाष ठेवला आणि लगेच पू. सौरभदादांना तसे सांगितले. त्या वेळी पू. सौरभदादा अत्यंत गोड असे गालातल्या गालात हसू लागले.

मंदिरात, अंतरात तव नांदतो श्रीरंग ।

श्री. अभिजीत देशमुख
         श्री. अभिजीत देशमुख, पुणे यांचा चैत्र कृष्ण पक्ष दशमी (२.५.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सुचलेले काव्य पुढे देत आहे.
श्री. अभिजीत देशमुख यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
आनंदाचे डोही आनंदतरंग ।
गुरुभक्तीत जडले तुझे अंतरंग ॥ १ ॥
मंदिरात, अंतरात तव नांदतो श्रीरंग ।
श्रीरंगाच्या स्मरणात होई मन तुझे गुंग ॥ २ ॥
मिळे सदा तुज अनमोल कृष्णाचा सत्संग ।
समर्पित होऊनी काया-वाचा झाली गुरुसेवेत दंग ॥ ३ ॥
अर्जुन भावातील शिष्यरत्नात शूरता प्रकटली ।
धर्मसभेत उभ्या अर्जुनासम तुझ्या वाणीतून वाग्बाण सुटले ॥ ४ ॥
        हिंदु धर्मासाठी भारताबाहेरून आर्थिक वा इतर कोणतीही मदत येणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या दृष्टीने विचार केला, तर हिंदूंना स्वबळावर उभे रहाण्याशिवाय पर्याय नाही ! (लोकजागर)

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
      सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
     भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
भारतातील स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या शासनांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदा प्रयत्नरत रहाण्याचे महत्त्व !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
निष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा येतो आणि 
अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


भ्रष्टाचार + मग्रुरी = काँग्रेस

संपादकीय
     भ्रष्टाचार या शब्दाला समानार्थी शब्द कुणी विचारला, तर काँग्रेस असे उत्तर उत्स्फूर्तपणे दिले जाईल, इतके काँग्रेसवाल्यांनी देशाला लुबाडले आहे. सत्ता उपभोगतांना प्रारंभीच्या काळात जे घोटाळे केले, ते सत्तेच्या अंतिम टप्प्यात बहुतांशी उघड झाले. भ्रष्टाचारानेच काँग्रेसचा पाय अधिकाधिक खोलात गेला. काँग्रेसच्या या स्वार्थांध, भ्रष्ट आणि लुटारू वृत्तीचा उबग आल्यामुळेच वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले, हे उघड आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn