Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज महाराष्ट्रदिन

विनम्र अभिवादन !

क्रांतीवीर प्रफुल्लकुमार चाकी यांचा आज बलीदानदिन
लोकहो, सर्व राजकीय पक्ष क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !


शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह ८ जण दोषमुक्त

लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण
शंकराचार्यांना अटक झाल्यावर त्यांची अपकीर्ती करणारी वृत्ते प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे त्यांना निर्दोष ठरवल्यावर मात्र वृत्त प्रसारित करत नाहीत, हे लक्षात घ्या आणि अशा हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घाला !
चेन्नई - सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले. (निरपराध्यांना नाहक १५ वर्षे मनस्ताप भोगण्यास भाग पाडणार्‍या अन्वेषण यंत्रणा आणि न्याययंत्रणा ! - संपादक)

तृप्ती देसाई यांना शबरीमला मंदिरात पाय ठेवू देणार नाही ! - हिंदु तरुणाई आंदोलन, तमिळनाडू

असे जागृत हिंदु युवकच हिंदु धर्माची शक्ती आहे !
थिरुवनंतपूरम् - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शबरीमला येथे येऊन मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासाठी आंदोलन करणार आहेत, असे म्हटले जात आहे. आमची संघटना तृप्ती देसाई अथवा त्यांच्या कुठल्याही महिला कार्यकर्तीला पवित्र शबरीमला मंदिरात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी हिंदु तरुणाई आंदोलन (हिंदु युथ मुव्हमेंट) या संघटनेचे राज्य संघटक श्री. सच्चिदानंदन् यांनी दिली आहे.
श्री. सच्चिदानंदन् पुढे म्हणाले, "तृप्ती देसाई या काही देवतांच्या भक्त नाहीत. त्यांच्या भेटीमागे राजकीय कट आहे. सध्या केरळ राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर हिंदु समाजात दुही पसरवण्यासाठी तृप्ती देसाई शबरीमला येथे येत आहेत. काहीही झाले, तरी आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुठल्याही कार्यकर्तीला मंदिरात पाय ठेऊ देणार नाही." (शबरीमला मंदिराची याचिका सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. तसेच केरळ राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. या सर्वांची पर्वा न करता तृप्ती देसाई केवळ धर्मद्रोहच नव्हे, तर घटनेची पायमल्ली करून देशद्रोहही करणार असतील, तर त्यांच्यावर केरळ शासनाने कठोर कारवाई करायला हवी. देसाई केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हिंदु धर्माची आणि समाजाची मोठी हानी करत आहेत, याचे त्यांना भान उरलेले नाही. त्यांनी मानसोपचारतज्ञांकडून उपचार करून घ्यावेत, असा सल्ला कुणी दिला, तर त्यांनी तो गांभीर्याने घ्यावा ! - संपादक)


उज्जैन येथील हिंदूंच्या वैश्‍विक सिंहस्थपर्वात मानवसेवेच्या नावाखाली इस्लाम धर्माचा प्रसार !

अन्य धर्मियांच्या उत्सवांमध्ये हिंदु धर्माचा प्रचार केल्याचे कधी ऐकले आहे का ? हिंदुबहुल देशात हिंदूंच्याच उत्सवांमध्ये इस्लामचा प्रचार होतो, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
सिंहस्थपर्वाच्या स्थळी लावण्यात आलेले इस्लाम दर्शन केंद्र
उज्जैन (मध्यप्रदेश), ३० एप्रिल (वार्ता.) - येथे १२ वर्षांतून एकदा भरणार्‍या हिंदूंच्या वैश्‍विक सिंहस्थपर्वात धर्मांधांकडून मानवसेवेच्या नावाखाली इस्लाम धर्माचा छुप्या पद्धतीने प्रचार चालू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख असलेल्या 'श्री महाकालेश्‍वर मंदिरा'पासून हाकेच्या अंतरावरच चालू आहे. विशेषत: या सेवेच्या नावाखाली उघडलेल्या कार्यालयात धर्मांधांच्या जोडीने एक हिंदु साधू बसला असल्याचेही निदर्शनास आले आहे. (अशा प्रकारचे दृश्य कधी तरी मुसलमानांच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पहायला मिळते का ? हिंदूंना त्यांचे धर्मग्रंथ, देवतांची चित्रे, मूर्ती आणि साहित्य नेण्यास इस्लामी राष्ट्रात बंदी आहे, तर मुसलमानांच्या प्रमुख तीर्थक्षेत्री हिंदूंना जाण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे. हिंदू यातून काही बोध घेऊन स्वत:चा धर्माभिमान आणि स्वाभिमान जपतील का ? - संपादक)

जर्मनीच्या औषधनिर्मिती आस्थापनाकडून मासिक पाळीच्या काळात महिलांना सुटी !

      मासिक पाळीच्या काळात महिलांची अपवित्रता वाढते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम औषधांच्या गुणवत्तेवर होतो, तसेच ही औषधे रुग्णांना अपेक्षित लाभही देऊ शकणार नाहीत, अशी जर्मनीतील बेरींगर इंगलहेम या औषधनिर्मिती आस्थापनाची धारणा आहे. त्यामुळे या आस्थापनाने त्यांच्या महिला कर्मचार्‍यांना या काळात सुटी देण्याची घोषणा केली आहे. (भारतीय अध्यात्मशास्त्रात मासिक पाळीविषयी जे शास्त्रशुद्ध विवेचन केले आहे, त्याची प्रचीती पाश्‍चात्त्य देश घेत आहेत; मात्र भारतात तथाकथित पुरोगामी पुरुष आणि महिला कथित समानतेच्या नावाखाली महिलांवर अन्याय होतात, अशी ओरड करत धर्माचरणाला विरोध करतात ! - संपादक) जर्मनीतील बेरींगर इंगलहेम औषधनिर्मिती आस्थापन हे जगातील १० मोठ्या औषधनिर्मिती आस्थापनांपैकी एक आहे. त्यांचा व्यवसाय आणि कर्मचार्‍यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन धार्मिक आणि सामाजिक आहे. त्यांच्या व्यवसायातील अनुभवानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांना होणार्‍या आध्यात्मिक आणि आरोग्याच्या त्रासाची जाणीव ठेवून त्यांनी महिलांना सुटी घोषित केली आहे. झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

गुजरात दंगलीवरून हिंदूंना तालिबानी ठरवणारे ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडतील का ?
    हजारीबाग (झारखंड) जवळील केरेदारी येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात २ हिंदूंसह तिघांची हत्या करण्यात आली, तर काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
१. श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ करण्यात आली.
२. दुसर्‍या घटनेत हजारीबाग येथे १६ एप्रिल या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी दोन गटांमध्ये दंगल झाली. या वेळीही धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. प्रिंस सिंह आणि अनुज कुमार सिन्हा या हिंदूंची हत्याही करण्यात आली. 
३. तिसर्‍या घटनेत हजारीबाग येथेच १७ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर धर्मांधांनी दगडफेक केली. त्या वेळी दुकाने आणि वाहने यांना आग लावली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही पोलिसांसहित बारा जण घायाळ झाले.

उज्जैन सिंहस्थपर्व : भाजपच्या मध्यप्रदेश शासनाकडून संतांशी दुजाभाव !

     पहिल्या अमृत स्नानाच्या वेळी सामान्य जनतेला १० किलोमीटर दूर रोखण्यात आले होते; परंतु मंत्री आणि अधिकारी यांचे कुटुंबीय शासकीय वाहनांमधून घाटावर पोहोचले होते. हा जनतेवर अन्याय आहे. शासन शासकीय संस्थांना कोट्यवधींच्या सुविधा पुरवत आहे; परंतु संतांना प्लॉट मिळवण्यासाठीही मेळा कार्यालयात चकरा टाकाव्या लागल्या. - सुमेरूमठ काशीचे शंकराचार्य जगद्गुरु नरेंद्रानंद सरस्वती

बंगालच्या मंत्र्याने पाक पत्रकारास कोलकात्यातील एका भागाची ओळख 'मिनी पाकिस्तान' अशी करून दिली !

हिंदूंनो, भारतात पाकच्या पत्रकारांना एखाद्या भागाची 'मिनी हिंदुस्तान' अशी ओळख करून देण्यापूर्वी जागृत व्हा !
कोलकाता - बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या प्रसाराचे वृत्त संकलन करण्यास पाकिस्तानमधून आलेल्या सिद्दीकी नावाच्या पत्रकाराला बंगालचे मंत्री फिराहाद हकीम यांनी कोलकत्यातील गार्डन रिच या भागाची ओळख 'छोटे (मिनी) पाकिस्तान' अशी करून दिली. भाजपाने या विधानाला दुर्दैवी म्हटले आहे.

१. सिद्दीकी यांचा लेख पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉन यात प्रकाशित झाल्यावर एकच खळबळ उडाली.

२. फिराहाद हकीम यांनी केवळ त्यांचा देशद्रोहच उघड केला नाही, तर मते मागतांना मुसलमान धर्मियांचा धर्माच्या नावावर अनुनय करून आचारसंहितेचा भंगही केला आहे.

मुंबई येथे नायजेरीयन अमली पदार्थ तस्करांकडून पोलिसांवर दगडफेक; पोलिसांकडून हवेत गोळीबार

  • राज्यात आणि मुंबई येथे नायजेरीयन अमली पदार्थ तस्करांची पसरत असलेली पाळेमुळे पोलीस प्रशासन उखडून नष्ट करेल का ?
  • ७ पोलीस घायाळ
       मुंबई, ३० एप्रिल - येथील वाडी बंदर भागात २९ एप्रिल या दिवशी रात्री नायजेरीयन अमली पदार्थ तस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या आक्रमणात ७ पोलीस घायाळ झाले आहेत. (असे पोलीस आतंकवाद्यांच्या आक्रमणाच्या वेळी त्यांना कसे सामोरे जातील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली असून इतर २२ जण पसार झाले आहेत.
१. वाडी बंदर येथे काही विदेशी तस्कर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ते तस्कर वाडी बंदर परिसरातील मोकळ्या रेल्वे रुळांजवळ थांबले होते.

संसदेत कायदा झाला तर राममंदिराचा प्रश्‍न सुटेल ! - तोगडिया

        नाशिक - राममंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा झाला, तर हा प्रश्‍न नक्कीच सुटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: स्वयंसेवक असल्याने आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याने असा कायदा होणे सहज शक्य आहे. उज्जैन येथील सिंहस्थपर्वात सुद्धा येत्या काही दिवसांत साधू, संत, महंत यांच्याशी या प्रश्‍नी चर्चा होण्याची शक्यता आहे, असे विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी २९ एप्रिलला येथे सांगितले. शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात इंडिया हेल्थ लाइनच्या वतीने हेल्थ ऍम्बेसिडर प्रशिक्षणवर्गाचा प्रारंभ डॉ. तोगडिया यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.

भाभासुमंच्या सभेसाठी रवींद्र भवन नाकारण्यामागे केवळ राजकारण ! - अधिवक्त्या स्वाती कर्पे

     साखळी (गोवा) येथील भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या सभेसाठी साखळी येथील रवींद्र भवन निश्‍चित करण्यात आले होते. या संदर्भात आवेदनासह सभागृह आरक्षणासाठी १० सहस्र रुपयांचा धनादेशही देण्यात आला होता; परंतु मांद्रे येथील सभेला मातृभाषाप्रेमींचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनाला धडकी भरल्याने २५ एप्रिलच्या सभेसाठी रवींद्र भवनची जागा नाकारण्यात आली. यामागे केवळ राजकीय कारण आहे, असा आरोप भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमंच्या) अधिवक्त्या स्वाती कर्पे यांनी आेंकार भवन येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.

पाककडून भारताच्या सीमेमध्ये १८० बंकर्सची निर्मिती

     भारताच्या राजस्थान सीमेवरील संवेदनशील भागांमध्ये पाककडून अनुमाने १८० बंकर्स बनवण्यात आल्याचे आढळून आले आहे. पाकने हे बांधकाम केवळ मागील १ मासात केले असून पुन्हा १०० बंकर्स बनवण्याची त्यांची सिद्धता चालू आहे. हे बंकर्स डेझर्ट वॉरफेअर तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात आले असून ते जैसलमेर, बीकानेर, बाडमेर आणि श्रीगंगानगर या शहरांच्या दीड किलोमीटरच्या परिसरात निर्माण करण्यात आले आहेत.संरक्षणतज्ञांच्या मते, हे बंकर्स बनवण्यामागे युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याला पाकमध्ये जाण्यापासून रोखण्याचा हेतू आहे.

महिलांच्या मंदिर प्रवेशापेक्षा आर्थिक सक्षमीकरणाची आवश्यकता ! - पंकजा मुंडे-पालवे, ग्रामविकासमंत्री

तृप्ती देसाई यांना सणसणीत चपराक ! महिलांच्या 
आर्थिक स्वातंत्र्यासाठी तृप्ती देसाई झगडतील 
कि महिला समानतेचे तुणतुणे वाजवत बसतील ?
        महाड, ३० एप्रिल - महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळण्यापेक्षा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकारणाच्या गाभार्‍यात प्रवेश मिळणे आवश्यक आहे. यासाठी गावागावात महिला बचत गट चळवळी बळकट करणे महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त करत मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी फटकारले आहे. महाड येथील हिरवळ संस्थेच्या पहिल्या महिला बचत गटाच्या विक्री केंद्राच्या उद्घाटन समारंभात मुंडे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर त्या स्वयंपूर्ण होऊ शकतात. घरातील व्ययामध्ये (खर्च) हातभार लावू शकतात.

नॅशनल फेडरेशन ऑफ न्यू स्टेटच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भासाठी अणे लढणार

राज्याचे तुकडे करून देशाच्या एकसंधतेला धोका 
निर्माण करणार्‍या राष्ट्रद्रोही संघटनांचा निषेध करा !
        नागपूर - वेगळ्या विदर्भाची मागणी अग्रक्रमाने मांडण्यात येणार असेल, तर नॅशनल फेडरेशन ऑफ न्यू स्टेटच्या (एन्एफ्एन्एस्च्या) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यास सिद्ध आहे, असा करार करून महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी एन्एफ्एन्एस् या संघटनेच्या माध्यमातून वेगळा विदर्भाचा लढा देण्याची सिद्धता चालू केली आहे. ५ मे या दिवशी दुपारी ३ वाजता देहली प्रेस क्लबमध्ये अधिवक्ता अणे या संघटनेच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारणार आहेत.
        या वेळी अणे यांनी सांगितले की, तेलंगण राज्याच्या निर्मितीत ही संघटना कार्यरत होती. आता विदर्भ आणि बुंदेलखंड राज्य निर्माण व्हावे, यासाठी ही संघटना काम करील. वेगळ्या विदर्भासाठी आता कोणत्याही संघटनेची निर्मिती करण्यात येणार नाही. पक्ष आणि संघटना त्यांच्या पातळीवर आंदोलन चालू ठेवतील आणि त्यांच्यातील समन्वयासाठी समन्वयकाची नेमणूक करण्यात येईल.

पुण्यातील नगर रस्त्यावरील एकात्मिक वाहतूक प्रणालीचे (बीआर्टी) उद्घाटन; पण त्रुटी तशाच

यावरून पालिकेचा कारभार 
किती भोंगळ आहे, हेच दिसून येते
       पुणे, ३० एप्रिल - येथील नगर रस्त्यावरील बहुचर्चित एकात्मिक वाहतूक प्रणाली (बीआर्टी) मार्गाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते २८ एप्रिल या दिवशी उद्घाटन करण्यात आले; परंतु या मार्गावर असलेल्या अनेक त्रुटी अद्यापही दूर करण्यात आलेल्या नाहीत. याविषयी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
        राठी या मार्गाविषयी म्हणाले की, येरवडा (नगर रस्ता) ते वाघोली या नव्या बीआर्टी मार्गातील त्रुटींविषयी वारंवार निवेदन देऊन तसेच चर्चा करूनही पालिका आणि पुणे महानगर परिवहन प्रशासन यांनी त्याची नोंदही घेतलेली नाही. (यावरून पालिका आणि परिवहन प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक देत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) सर्व बीआर्टी मार्गात त्रुटी आहेतच; शिवाय प्रवासी आणि संबंधित विभागांना चुकीची आणि खोटी माहिती दिली आहे. खोटी माहिती देऊन अनुमती घेऊन हा मार्ग चालू केला आहे.

आद्य शंकराचार्यांनी केलेल्या धर्मजागृतीच्या कार्याप्रमाणे सनातनच्या चळवळीला प्रतिसाद लाभो ! - महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी महाराज, श्री काशी अन्नपूर्णा अन्नक्षेत्र ट्रस्ट, वाराणसी

संतांच्या चरणस्पर्शाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती 
यांनी लावलेले प्रदर्शन झाले चैतन्यमय !
डावीकडून पू.डॉ. चारुदत्त पिंगळे, मध्यभागी सनातनच्या
ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतांना महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी
महाराज आणि त्यांना माहिती सांगतांना श्री. विनय पानवळकर

कोल्हापूर येथील सामाजिक कार्यक्रमात रणरागिणी शाखेचा सहभाग

सौ. राजश्री तिवारी यांचे मार्गदर्शन ऐकतांना उपस्थित हिंदू
कोल्हापूर, ३० एप्रिल (वार्ता.) - मणिधारी भवन, इचलकंजी येथे २६ एप्रिल या दिवशी सायं. ८ ते १० या वेळेत श्री. जैन श्‍वे. मणिधारी जिनचंद्र सुरि दादावाडी संघ, इचलकरंजी यांच्या वतीने एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्री. महावीर गोळेच्छा (इन्स्पायर फेलो भारत सरकार, १६ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित) आणि सोलापूर येथील रणरागिणीच्या जिल्हा संघटक सौ. राजश्री तिवारी हे दोघे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला २२० उपस्थिती लाभली.

वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकार्‍याला लाच देतांना पकडले

  • अशा लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
  • भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर न काढण्यासाठी सेना नगरसेवकाला दिली लाच
        वसई - वसई-विरार महानगरपालिकेचे नगर नियोजन विभागाचे उपसंचालक वाय. शिवा रेड्डी यांना २५ लक्ष रुपयांची लाच देतांना २८ एप्रिलला रात्री ठाण्यातील घोडबंदर रोड येथे अटक केली. ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक श्री. धनंजय गावडे यांना लाच देतांना रेड्डी यांना अटक केली आहे. काही प्रकरणांविषयी न्यायालयात खटले प्रविष्ट करू नये आणि पोलिसांमध्ये तक्रार करू नये, माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागू नये यासाठी नगरसेवक गावडे यांना रेड्डी लाच देत होते. (याचा अर्थ स्वत:चा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून रेड्डी यांना यापूर्वीही अनेकांना लाच दिली असेल. याविषयीही रेड्डी यांची चौकशी होणे अपेक्षित आहे. - संपादक) यापूर्वी पैसे देतांना एका अधिकार्‍याला लाचलुचपत विभागाने पकडले आहे. रेड्डी श्री. गावडेंना १ कोटी रुपयांची लाच देणार होते. त्यातील पहिला हप्ता देत असतांना ही अटक झाली आहे.

आता घराबाहेर पडल्याविना मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होणार नाही ! - नीलेश राणे

त्यागाची शिकवण देण्याऐवजी आरक्षणाच्या कुबड्यांसाठी लढा देणारे 
नेते समाजाचा उत्कर्ष कधी साधतील का ?
      मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी आता बिगूल वाजला आहे. आज गुजरातमध्ये असणारा १५ टक्के पटेल समाज स्वतंत्र आरक्षणासाठी पेटून उठतो. हरियाणामधील ६-७ टक्के असलेला जाट समाज आरक्षणासाठी अख्खा हरियाणा पेटवून देतो. मराठे तर ३२ टक्के आहेत. ४०० वर्षांचा रुबाबात जगण्याचा इतिहास आमच्या पाठीशी आहे; पण आज या समाजाला मागासलेपणाची खंत आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडल्याशिवाय आरक्षणाचा लढा यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत केले.

ख्रिस्त्यांच्या पाठिंब्यासाठी भाजप ख्रिस्ती उमेदवारांची संख्या वाढवण्याची शक्यता

गोवा विधानसभा निवडणूक २०१७
     पणजी - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ख्रिस्ती मतदार भाजपपासून दूर जाऊ नये, यासाठी आगामी निवडणुकीत भाजप अधिक संख्येने ख्रिस्ती उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये सध्या २१ पैकी ६ आमदार ख्रिस्ती आहेत, तरीही भाजपला विशेषत: ख्रिस्तीबहुल सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती मतदारांवरील पक्षाचा प्रभाव न्यून झाल्याचे वाटत आहे.
   भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत ६ ख्रिस्ती उमेदवार उभे केले होते आणि हे सर्व उमेदवार निवडणूक जिंकले होते. अधिक ख्रिस्ती उमेदवारांना पक्षाचे तिकीट दिल्यास ख्रिस्ती मतदार पक्षाकडे आकृष्ट होईल, अशी आशा काही राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आर्थुर डिसिल्वा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी निवडणुकीत डिसिल्वा हे भाजपचे एक उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार डिसिल्वा यांना कुडतरी येथे काम करण्यास सांगण्यात आले असून कुडतरी मतदारसंघातून ते पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात.


तृप्ती देसाईंविरुद्ध २ गुन्हे नोंद !

हाजी अली दर्ग्यातील प्रवेशाचे प्रकरण
मुंबई - २८ एप्रिलला हाजी अली दर्ग्यात प्रवेश नाकारल्यानंतर तृप्ती देसाई मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जात होत्या. पोलिसांनी त्यांना गावदेवी परिसरातच अडवल्यावर त्यांनी तेथेच निदर्शने केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे अनुमती नसतांना आंदोलन केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (जमावबंदी आदेश असतांना कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीच्या गाभार्‍यात तृप्ती देसाई गेल्या, तसेच यांनी १४९ ची नोटीसही नाकारली. तेव्हा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला नाही; उलट त्र्यंबकेश्‍वर आणि शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थांवर गुन्हे नोंदवण्यात आले, हे लक्षात घ्या ! - संपादक) तसेच हाजी अली दर्ग्याबाहेर अनुमती नसतांना आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे या प्रकरणीही ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तृप्ती देसाई यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून यात ५ जणांना अटक करण्यात आली होती. गावदेवी पोलीस ठाण्यातही देसाईंसह ६ महिला कार्यकर्त्यांविरुद्ध १३५ कलमान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

अनधिकृत धार्मिक स्थळांविषयी त्वरित कार्यवाही करा ! - के.पी. बक्षी

       कोल्हापूर, ३० एप्रिल (वार्ता.) - जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण भागांतील २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित, स्थलांतरीत अथवा नियमितीकरणाची कार्यवाही त्वरित करावी, असे निर्देश गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी दिले. शहर आणि जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे, तसेच महापालिका आणि महसूल विभागांचे पोलीस दलांशी असलेले विषय यांविषयी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
        बैठकीस पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस्., निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे यांसह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. के.पी. बक्षी पुढे म्हणाले की, सार्वजनिक तसेच शासकीय भूमीवरील अनधिकृत धार्मिक स्थळांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्ययक ती कार्यवाही सर्वप्रथम करावी.

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

महिलांच्या मंदिर प्रवेशाला वारेमाप प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे, तसेच दादरी प्रकरणावरून ऊर 
बडवणारे ढोंगी निधर्मीवादी मंदिरांवरील आक्रमणाविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
     बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरुंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे लुटण्यात आली, दुकाने पेटवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ८७ धर्मांधांना कह्यात घेतले आणि गावात संचारबंदी लागू केली, असे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध केले.
    जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री ८ वाजता श्रीरामनवमीच्या भंडार्‍यासाठी ट्रॅक्टरमध्ये भाकर्‍या गोळा करण्यात येत असतांना धर्मांधांनी ट्रॅक्टर अडवून भाकर्‍या गोळा करणार्‍या भाविकांशी वाद घातला. त्यानंतर या धर्मांधांनी त्यांना अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांनी दिसेल त्या हिंदूला मारहाण करणे चालू केले. गावातील महिला भंडार्‍याचा स्वयंपाक करत होत्या तेथपर्यंत हे धर्मांध पोहोचले; मात्र हिंदु तरुणांनी कडे करून भगिनींना संरक्षण दिल्याचे पाहून संतापलेल्या या धर्मांधांनी गावातील मंदिरांना लक्ष्य केले.महिलांच्या मंदिर प्रवेशाचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट ! - मणिंदरजीत सिंह बिट्टा, अध्यक्ष, अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्चा

     महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी महिलांकडून करण्यात येत असलेले आंदोलन, हा प्रसिद्धीचा स्टंट असून या महिला लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्चाचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंह बिट्टा यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर केली आहे. 
     बिट्टा, शिर्डी येथे साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. या वेळी बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी महिलांच्या मागणीला माझा विरोध आहे. (एका शीख नेत्याला हिंदूंच्या मंदिराविषयी जी संवेदनशीलता आहे, तशी संवेदनशीलता किती हिंदु धर्मीय नेत्यांना आहे ? केवळ हिंदूंच्या मतांवर निवडून यायचे एवढेच माहीत असणार्‍या या नेत्यांना धर्मपरंपरांची काय किंमत ? - संपादक)निवडणूक घोषित झाल्यानंतरच भाजपशी युती कायम ठेवण्यासंबंधी निर्णय ! - दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप

     पणजी - विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतरच भाजपशी युती कायम ठेवण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मगोपचे अध्यक्ष तथा मंत्री दीपक ढवळीकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना दिली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा निवडणुकीत मगोप इच्छुक असेल, तर त्यांच्याशी युती करण्यास भाजप सिद्ध असल्याचे मत व्यक्त केले होते. या पार्श्‍वभूमीवर मंत्री दीपक ढवळीकर यांनी उपरोल्लेखित विधान केले. मंत्री ढवळीकर पुढे म्हणाले, निवडणुकीच्या २ ते ३ मास अगोदर युतीसंबंधी निर्णय होणार आहे; पण तत्पूर्वी युतीचे नियम आणि अटी यांवर चर्चा होणार आहे. पक्षाने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण २५ मतदारसंघांमध्ये कार्य करण्यास प्रारंभ केला आहे. मगोप निवडणुकीसाठी काँग्रेस किंवा नव्याने स्थापन झालेला गोवा फॉर्वर्ड या पक्षाशी हातमिळवणी करणार नाही. आगामी निवडणुकीत मंत्री सुदिन ढवळीकर मडकई मतदारसंघ, लवू मामलेदार फोंडा मतदारसंघ आणि मी प्रियोळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

गोव्यातील माध्यमप्रश्‍नी सुवर्णमध्य काढण्यासाठी भाजपच्या हालचाली !

इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करून मराठी शाळांना प्रोत्साहन देणे, तसेच मातृभाषेतून शिक्षण 
देण्यास पालकांना उद्युक्त करणे, हाच या प्रश्‍नाचा खरा सुवर्णमध्य आहे !
     पणजी - माध्यमप्रश्‍नी भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमं) चालवलेल्या आंदोलनाची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गंभीर नोंद घेतली असून हे आंदोलन अधिक चिघळू नये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सामोपचाराची बोलणी करण्याची सिद्धता चालवली आहे. याअनुषंगाने भाजपचे वरिष्ठ नेते आणि संघाच्या कोकण प्रांत अन् गोवा विभागाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत एक संयुक्त बैठक नुकतीच देहली येथे झाल्याचे वृत्त दैनिक नवप्रभा या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

सोनिया गांधी कडव्या ख्रिस्ती ! - योगऋषी रामदेवबाबा

      नवी देहली - सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांच्यात भारतीयत्व दिसते; पण सोनिया गांधी या कडव्या ख्रिस्ती आहेत. त्यांच्या सल्लागारांनी त्यांची दिशाभूल केली आहे, असे योगऋषी रामदेवबाबा यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

फलक प्रसिद्धीकरता

आता शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या निर्दोषत्वाच्या बातम्यांविषयी प्रसारमाध्यमे गप्प का ?
लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Radhakrushnan akraman Prakaran me Shankaracharya Jayendra Saraswati nirdosh sidhha huye. - Desh ki dharmanirpeksh media ab kaha hai ?
जागो ! : राधाकृष्णन् आक्रमण प्रकरण में शंकराचार्य जयेंद्र सरस्वती निर्दोष सिद्ध हुए. - देश की धर्मनिरपेक्ष मीडिया अब कहा है ?

खोटे वृत्त प्रसारित करून सनातन संस्थेची अपर्कीती करणार्‍या 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या विरोधात सनातन संस्थेचा हानीभरपाईचा दावा

राजापूर - खोटे आणि काल्पनिक वृत्त सातत्याने प्रसारित करून सनातन संस्थेची अपकीर्ती करणारी 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनी, वृत्तवाहिनीचे संपादक आणि वृत्तवाहिनीचे संचालक यांच्या विरोधात सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र पांडुरंग मराठे यांनी राजापूर येथील दिवाणी न्यायालयात अधिवक्त्या सौ. अस्मिता सोवनी यांच्या मार्फत ५ लक्ष रुपयांच्या हानीभरपाईचा दावा दाखल केला. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वाहिनीच्या संचालिका श्रीमती हेमलता सुधाकर शेट्टी, संचालक सुधाकर मल्लाप्पा शेट्टी आणि संपादक यांना या दाव्यात प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

आज वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा

विद्यार्थ्यांची फेरविचार 
याचिका न्यायालयाने फेटाळली
        नवी देहली - राष्ट्रीय पातळीवरील एकच प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या आदेशाविरोधात काही विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने ३० एप्रिल या दिवशी फेटाळली. १ मे २०१६ या दिवशी होणारी नीटची पहिल्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलावी, अशी याचिका या विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे १ मे आणि २४ जुलै या दिवशी राष्ट्रीय पातळीवर नीटची परीक्षा होईल.

खोटे वृत्त प्रसारित करून वैयक्तिक अपर्कीती करणार्‍या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विरोधात सनातनच्या साधिकेचा हानीभरपाईचा दावा

        राजापूर - एकांगी, खोटे आणि खोडसाळ वृत्त सातत्याने प्रसारित करून वैयक्तिक अपकीर्ती केल्याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वृत्तवाहिनीचे संपादक आणि वृत्तवाहिनीचे संचालक यांच्या विरोधात सनातन संस्थेच्या साधिका सौ. श्रद्धा विनय पवार यांनी अधिवक्त्या सौ. अस्मिता सोवनी यांच्यामार्फत राजापूर येथील दिवाणी न्यायालयात ५ लक्ष रुपयांच्या हानीभरपाईचा दावा दाखल केला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वाहिनीच्या संचालिका हेमलता सुधाकर शेट्टी, संचालक सुधाकर मल्लाप्पा शेट्टी आणि संपादक यांना या दाव्यात प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

मद्य उद्योगांच्या पाण्यात ६० टक्के कपात करा ! - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

जे न्यायालयाला सांगावे लागते, ते शासन आणि प्रशासन यांना कळत नाही कि स्वार्थापोटी ते असा 
निर्णय घेत नाहीत ? दुष्काळग्रस्त जनतेचा विचार न करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा केली पाहिजे !
     मद्य निर्मिती करणार्‍या उद्योगांचे ६० टक्के, तर अन्य उद्योगांचे २५ टक्के असा दोन टप्प्यांत पाणी कपात करण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती एस्.एस्. पाटील यांनी दिला.

(म्हणे) शनिशिंगणापूर येथील महिला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाण्याला त्यांची अंधश्रद्धा कारणीभूत ! - कांता नलावडे, प्रवक्त्या, भाजप

     पुरोगामीपणाच्या नावाखाली केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे का ? या विषयावरील मी मराठी या वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये तृप्ती देसाई यांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेतले; मात्र गावातील महिला परंपरांच्या विरोधात नाहीत, या सूत्रावर बोलतांना भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे म्हणाल्या, शनिशिंगणापूर येथील महिलांवर अंधश्रद्धेचा प्रभाव असल्यामुळे त्या चौथर्‍यावर जात नाहीत. त्यांना समाजात रहायचे असल्यामुळे नाईलाजास्तव त्या परंपरा पाळत आहेत. यावर श्री. अभय वर्तक म्हणाले, मी स्वत: त्या महिलांना भेटून त्यांच्याशी याविषयी चर्चा केली. शनिशिंगणापूर येथील महिला श्रद्धाळू असून त्यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून मंदिरातील परंपरा न मोडण्याविषयी विनंती केली होती. यासंदर्भात निवेदनही सादर केले होते.

ख्रिस्त्यांपासून देशाला वाचवण्यासाठी चीनने सहस्रो क्रॉस तोडले !

देशातील ईशान्यकडील राज्ये ख्रिस्तीबहुल झाली असतांना त्याविषयी साधा ब्र 
ही न काढणारे भारतीय राज्यकर्ते चीनकडून काही शिकतील का ?
     बीजिंग - ख्रिस्त्यांपासून देशाला वाचवण्यासाठी आता चर्चमध्ये ख्रिस्ती प्रतिकांना तोडण्यास आरंभ केला आहे. एक्स्प्रेस युकेच्या अहवालानुसार चीनच्या प्रशासनाकडून आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक चर्चवरील क्रॉस तोडण्यात आले आहेत. चीनसाठी हे नवीन नसून त्यांनी मागील वर्षातही ४०० चर्चवरील क्रॉस तोडले होते. याकरता प्रशासनाला मोठ्या प्रमाणात विरोधही सहन करावा लागला होता. मागील मासात चीनच्या या मोहिमेला विरोध केल्याप्रकरणी झीजियांग प्रांतातील एका चर्चचे पाद्री रिव गू यूज यांना अटक करण्यात आली आहे.ख्रिस्ती त्यांच्या धर्माचे पालन करत नसल्यामुळे धार्मिक संतुलनावर परिणाम ! - कोएन जींस, कायदा मंत्री, बेल्जियम

     ब्रुसेल्स (बेल्जियम) - ख्रिस्ती धर्मीय त्यांच्या धमार्र्चे पालन करत नसल्यामुळे त्याचा धार्मिक संतुलनावर परिणाम होणार आहे. हा परिणाम मुसलमानांची संख्या वाढल्यामुळे नाही, तर ख्रिस्ती धर्मीय त्यांच्या धर्माचे सक्रीयपणे पालन करत नसल्यामुळे होत आहे. युरोपला ही गोष्ट जाणवत नाही आहे; परंतु हे सत्य आहे, असे वक्तव्य बेल्जियमचे कायदामंत्री कोएन जींस यांनी युरोपीयन संसदीय समितीसमोर केले.हिंदु धर्मासाठी भारताबाहेरून आर्थिक वा इतर कोणतीही मदत येणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या दृष्टीने विचार केला, तर हिंदूंना स्वबळावर उभे रहाण्याशिवाय पर्याय नाही ! (लोकजागर)


वसुंधरेचा कर्दनकाळ ठरू पहाणारा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारा मानव !

श्री. अभय वर्तक
      वसुंधरेची म्हणजे आपल्या पृथ्वीची मानवाने कशी अपरिमित हानी केली ?, याविषयीचा एक माहितीपट पहाण्यात आला. वसुंधरेने आधार दिला; म्हणून आपण जगत आहोत आणि आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी स्थूलदेह धारण करून साधना करणे शक्य होत आहे. पूर्वी मानव सुसंस्कृत आणि निसर्गाशी अनुकूल असे आचरण करणारा होता. त्याने तिला वसुंधरा म्हटले. तिच्यावर प्रेम केले आणि कृतज्ञतेच्या भावाने वास केला. आजचा आणि कालचा मानव कशा प्रकारे वसुंधरेशी कृतघ्नतेने वागला आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागला ?, हे माहितीपटात पाहून मी स्वतः आतापर्यंत या वसुंधरामातेला कशा प्रकारे त्रास दिला ?, हे आठवून माझ्या डोळ्यांत पाणी तरळले. मी दिलेल्या त्रासासाठी सर्वप्रथम वसुंधरामातेची क्षमायाचना करतो. यापुढील जीवनात तिला माझ्याकडून त्रास होणार नाही, असे वागायचा प्रयत्न करण्याचे वचन देतो. या माहितीपटात सांगितलेली काही महत्त्वाची सूत्रे पुढे दिली आहेत.

दुष्काळ : महाराष्ट्रासमोरील एक भीषण आव्हान !

    पाण्याचे दुर्भिक्ष्य....पाण्यासाठी भटकंती....विहिरी कोरड्याठाक...पाण्याची आगगाडी....हे शब्द महाराष्ट्रवासियांसाठी आता नेहमीचेच झाले आहेत; कारण गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. मेरे देश की धरती....मेरे देश की धरती सोना उगले हिरे मोती, या काव्यपंक्ती आता केवळ स्वप्नवतच वाटतील, अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. मध्यंतरी शासनाने १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली २ वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली. या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. निसर्ग आणि मनुष्य हे एकमेकांना खरेतर पूरक असायला हवेत; पण दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्या प्रकारे उठला आहे, मग ती वृक्षांची अमाप केली जाणारी तोड असो, समुद्राच्या पाण्यावर केले जाणारे बांधकाम असो किंवा या सर्वांच्या मुळाशी असलेले अधर्माचरण असो. हा दुष्काळ माणसाला गिळंकृत करणारा आहे, हे चिंताजनक आहे. याचा मनुष्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. 
     अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
     स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही शिरस्त्राण घालणे बंधनकारक

       मुंबई - विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍यांवर जोरदार कारवाई चालू असतांनाच, आता दुचाकीच्या मागे बसणार्‍या प्रवाशाला म्हणजेच, पीलियन रायडरलाही शिरस्त्राण घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच चारचाकीमध्ये पुढच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीलाही आसन पट्टा (सीटबेल्ट) लावणे बंधनकारक राहणार आहे. २९ एप्रिलपासून दोन्ही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला असून यानुसार नियम मोडणार्‍यांवर कारवाईही चालू करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त मिलिंद भांरबे यांनी सांगितले. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर वाहतूक नियम कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचे लेखी आदेश वाहतूक पोलीस निरीक्षक, सह पोलीस आयुक्त श्रीराम कोरेगावकर यांनी दिले आहेत.

हिंदूंपेक्षा भाजपलाच धर्मजागृतीची अधिक आवश्यकता !

     डॉ. कोनरॅड एल्स्ट (जन्म ७ ऑगस्ट १९५९) बेल्जियमचे नागरिक असून त्यांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करून अनेक ग्रंथ लिहिले. त्यांना या विषयात डॉक्टरेट पदवीही प्राप्त आहे. भारतावर आर्यांनी आक्रमण केले नसून युरोपातील प्राचीन लोक हे भारतीय संस्कृती आणि युरोपीय भाषा घेऊन भारतातून आले, या संशोधनावर त्यांनी सप्रमाण पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेला भारतातील हिंदुत्वाविषयीचा लेख आम्ही येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यातून सध्या देशात सत्तेवर असणार्‍या हिंदुत्ववादी पक्षाकडून हिंदुत्वाचे कार्य होत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. यासाठी प्रथम या पक्षालाच जागृतीची आवश्यकता आहे. 
     गेल्या वीस एक वर्षांपासून संघ परिवाराचे एक घोषवाक्य ऐकण्यात येते, हिंदूंची एकता आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही म्हणजेच हिंदूंनी आमच्यावर कोणतीही टीका करू नये. हिंदुत्ववाद्यांचा हिंदु हा शब्द वगळला, तर साम्यवादी रशियामध्येही अशा एकतेचा घोष करण्यात आला होता. तेथील निर्दयी साम्यवादी राज्यकर्त्यांनी याच एकतेच्या नावाखाली जनतेवर अनेक अत्याचार केले. म्हणजेच जे रशियामध्ये झाले, तेच हिंदुत्ववादी संघाकडून होऊ शकतो, असा त्याचा मतितार्थ आहे.

ही आईच्या कुशीत वार करणारी अवलाद - उद्धव ठाकरे

       मुंबई - छत्रपती शिवराय, शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनी सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना वेगळ्या विदर्भाची भाषा करणार्‍या व्यक्ती ज्या आईच्या कुशीतून जन्माला आले, त्या कुशीवर वार करणार्‍या दळभद्री औलाद आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी २९ एप्रिल या दिवशी महाराष्ट्र दिनाविषयी श्रीहरि अणे यांनी आंदोलनाच्या दिलेल्या हाकेवर भाष्य केले. महाराष्ट्र दिनी अशाप्रकारे आंदोलनाची भाषा करणे दुर्दैवी असल्याचे श्री. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. श्रीहरि अणे यांनी १ मे या दिवशी साजरा होणारा महाराष्ट्र दिन विदर्भवादी नेत्यांनी काळा दिवस म्हणून साजरा करत काळे झेंडे फडकवावेत, असे आवाहन केले आहे.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत स्त्रीशक्ती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

केरळमधील देवीच्या मंदिरांतील काही चुकीच्या प्रथा

अशा धर्मद्रोही प्रथा बंद पाडण्यासाठी कृती करणे प्रशंसनीय असते; पण महाराष्ट्रातील 
धर्मद्रोह्यांना कोणत्या प्रथा बंद पाडाव्यात, हेही कळत नाही !
पैसे घेऊन दुसर्‍यासाठी प्रायश्‍चित्त
घेणारी आणि ३२ फूट उंचावर पाठीच्या
त्वचेला आकडा (हुक) लावून लटकवण्यात
आलेली व्यक्ती)
१. तूक्कम नावाचा प्रायश्‍चित्त घेण्याचा क्रूर प्रकार !
     केरळ राज्यातील इलावूर येथील इलावूर पुत्तन्कावूदेवीच्या मंदिरात तूक्कम हा प्रायश्‍चित्त घेण्याचा एक प्रकार चालत असे. यात व्यक्तीच्या पाठीच्या स्नायूंत एक लोखंडी आकडा (हूक) अडकवून त्या व्यक्तीला ३२ फूट उंच उचलले जात असे (छायाचित्रात दिल्याप्रमाणे) आणि त्याच स्थितीत तिला ३ वेळा मंदिराभोवती प्रदक्षिणामार्गात फिरवले जात असे. नवस बोललेली व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला पैसे देऊन तिच्या माध्यमातून या कृतीद्वारे अशा प्रकारे प्रायश्‍चित्त पूर्ण करत असे. हा क्रूर प्रकार वर्ष १९८७ मध्ये पू. भूमानंदतीर्थ स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हिंदु नवोथ्थम् प्रतिष्ठान (एच्.एन्.पी.) या संस्थेने प्रदीर्घ चळवळीनंतर थांबवला.
१ अ. धर्मद्रोही पोलिसांच्या विरोधात पू. भूमानंदतीर्थ स्वामींना घालावा लागला देवीला साष्टांग नमस्कार ! : इलावूर पुत्तन्कावूदेवीच्या मंदिरातील ही क्रूर प्रथा थांबवण्यासाठी मंदिरात जात असतांना पोलीस आणत असलेला अडथळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव होणारी अटक यांचे गार्‍हाणे देवीला सांगण्यासाठी पू. स्वामीजी आणि इतर संन्यासी यांनी देवीला साष्टांग नमस्कार घातला.

महाराष्ट्र धर्म !

१. महाराष्ट्र धर्म नामाला आक्षेप
     भारतीय विचारांचा प्रवाह प्रांतीय भावनांची कोंडी फोडून अतीप्रांतीय, किंबहुना अतीराष्ट्रीय वळणाने वाहू लागला आहे. वरून जसा गोड, तसा आतून पोकळ. 
२. मर्यादित क्षेत्रामुळे निर्माण होणारे गुण-दोष
    खालचे खालचे धर्म वरच्या धर्माला विरोध न करता रहातील, तर ते हानीकारक न होता उपकारकच होतील. मर्यादित क्षेत्रामुळे जोरकसपणा हा गुण आणि संकुचितपणा हा दोष उत्पन्न होऊ शकतो; पण गुण घेऊन दोष टाकून देता येतील.
३. महाराष्ट्र शब्दाचे वैशिष्ट्य
     महाराष्ट्र, महान राष्ट्र - भारत, किंबहुना विश्‍व ! बंगाल, गुजरात किंवा चेन्नई (मद्रास) या शब्दांत हे रहस्य (खुबी) नाही.

बृहन्महाराष्ट्रीय लोकांचे झालेले भाषिक धर्मांतर !

१. परप्रांतात गेलेल्या मराठी भाषिकांचे झालेले हिंदीकरण, ही मोठी समस्या !
      गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील किती मराठी भाषिकांनी आपले मराठीपण टिकवून धरले आहे ? भोपाळ, जबलपूर आणि रायपूर येथे सर्वच मराठी घरात मंडळी आपसात हिंंदीत बोलतात. आम्ही फारच हिंदीमय झालो आहोत. आम्ही धर्मयुग, मायापुरी इत्यादी वाचतो; पण मराठी मासिके वा वृत्तपत्रे वाचत नाही. माझ्या मते आजची मूळ समस्या मराठी भाषिकांना पुनश्‍च मराठीकडे कसे वळवता येईल, ही आहे.

अखंड महाराष्ट्र ते अखंड हिंदुस्थानचा संकल्प का नाही ?

       १ मे या दिवशी ५६ वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांनी लढा दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात आले. त्यानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. प्रती वर्षी या दिवशी महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक उपक्रम करून हा दिवस साजरा केला जात आहे; परंतु गेली काही वर्षे काही महाराष्ट्रद्रोही मंडळी ही स्वतंत्र विदर्भ राज्य करून महाराष्ट्राचा तुकडा पाडण्यासाठी आंदोलन करत आहेत. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे १ मे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणे, त्या दिवशी विदर्भाचा वेगळा ध्वज घरोघरी लावणे आणि अन्य प्रकारे आंदोलन करून निषेध नोंदवतात. याही वर्षी काहींनी तसे केले. ही मागणी अल्प होती, म्हणून कि काय, सध्या स्वतंत्र मराठवाडा राज्य करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यात भरीस भर म्हणून काही ज्येष्ठ समाजधुरीणांनी सध्याच्या महाराष्ट्राची ४ राज्ये करण्याचे समुपदेशनही करण्यास मागे-पुढे पाहिले नाही.

(म्हणे) वाचवलेले तांदूळ गरजूंच्या मुखी...!

श्री. वीरेंद्र मराठे
       लोकसत्ताच्या संकेतस्थळावर काही दिवसांपूर्वी एक बातमी झळकली. मथळा होता, वाचवलेले तांदूळ गरजूंच्या मुखी... या बातमीतून सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजाला धर्माचरणापासून दूर नेणे आणि दुःखाच्या खाईत आणखी लोटणे, या धर्मद्रोह्यांच्या समीकरणाचा पुन्हा अनुभव आला. हिंदूंचे सण, उत्सव, विधी, धार्मिक परंपरा याच जशा काही समाजातील गरिबी, मागासलेपण, दुष्काळ यांना कारणीभूत ठरत असल्याप्रमाणे हे धर्मद्रोही, तथाकथित पुरोगामी प्रचार करत असतात. वाचवलेले तांदूळ गरजूंच्या मुखी...! हा मथळा वाचल्यावर कोणाही सर्वसामान्य व्यक्तीला त्यातही हिंदूला कौतुकच वाटणार; पण यामागे हिंदूंना धर्माचरणापासून, त्यांच्या परंपरांपासून दूर लोटण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे आणि लोकसत्तासारखे पाश्‍चात्त्यांच्या आेंजळीतून पाणी पिणारे यात आघाडीवर असणार, हे ओघाने आलेच. लोकसत्ताच्या कुबेरांना मध्यंतरी ख्रिस्त्यांविरुद्धचा सत्य अग्रलेख मागे घ्यावा लागला होता. टाइम्स किंवा एक्स्प्रेस ग्रुपने ख्रिस्त्यांच्या विरोधात छापणे, म्हणजे स्वतःच्या विरोधातच छापण्यासारखे आहे. त्यामुळे कुबेरांच्या धनावर त्याचा विपरीत परिणाम होणार; म्हणून कुबेर तात्काळ अग्रलेख मागे घेण्यापर्यंतची मानहानी सहन करतात; पण तसेच हिंदूंच्या विरोधात छापायला त्यांचा स्वतःचा धर्म आड येत नाही. असे असूनही पुन्हा हिंदूंना असहिष्णु असे हिणवायला हे मोकळे असतात !
         असो. संताप गिळून सहिष्णूपणे आपण वैचारिक प्रतिवादासाठी मूळ सूत्राकडे वळूया.

हिंदु आणि हिंदुत्व हे सिंहासारखे शक्तीशाली झाले पाहिजेत !

      आज हिंदु धर्मियांची स्थिती ही बकर्‍यासारखी झाली आहे. इतिहासामध्ये सिंहाचा बळी गेला आहे, असे कधी ऐकले आहे का ? याचे उत्तर नाही असे असून कायम बकर्‍याचा बळी दिला जातो. त्यामुळे हिंदूंनी सिंहासारखे बनायला हवे. हिंदु आणि हिंदुत्व हे सिंहासारखे शक्तीशाली झाल्यास खर्‍या अर्थाने शांती आणि समृद्धी येईल. - श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

मराठी वृत्तपत्रे आणि मराठी विषयातील उच्च विद्याविभूषित मंडळीच मराठीचे मारेकरी !

एका मराठी दैनिकात मराठी भाषेची हत्या करणारे
 मराठी भाषा दिनाच्या आयोजनाचे प्रसिद्ध झालेले वृत्त
         एका मराठीबहुल भागात प्रकाशित होणार्‍या आणि मराठीचे कडवे पुरस्कर्ते असणार्‍या दैनिकात मराठी भाषा दिन आयोजित केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेतून विद्यावाचस्पती सारख्या पदव्या प्राप्त केलेले भाषाप्रेमी, साहित्यिक, शिक्षक यांचा सत्कार करण्यात येणार होता. खेदाची गोष्ट म्हणजे या उच्च विद्याविभूषितांची नावे लिहितांना त्यांच्या नावातील आद्याक्षरे इंग्रजी भाषेत लिहिली होती. मराठीसारख्या विषयात पदवी प्राप्त करूनही इंग्रजीच्या दास्यत्वाचे जोखड ही मंडळी अभिमानाने मिरवत आहेत. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही व्यक्तीची नावे आणि शैक्षणिक पदव्या यांचे मराठीकरण झालेले नाही, ही मराठी भाषिकांची शोकांतिका आहे. सनातन प्रभातच्या वाचकांना कळण्यासाठी त्या वृत्तातील काही भाग पुढे देत आहोत. त्या वृत्तात आलेला इंग्रजीतील उल्लेख अधोरेखित केला आहे.

जपानी नागरिकांची उद्योगशीलता !

१ मे - कामगारदिनाच्या निमित्ताने....
१. सतत उद्योगरत रहाणारे आणि व्यावसायिकास न लुबाडणारे जपानी नागरिक ! : १९४७ ते १९५५ या काळात जपानच्या प्रत्येक घरातील एकजण व्यवसाय करत होता. त्या व्यवसायाचे स्वरूप किरकोळ का असेना; पण तो कार्यरत होता. एकेक जपानी माणूस त्या वेळी न्यूनतम तीन ते चार व्यवसाय एकावेळी करत असे. एखादा माणूस जर शिवणकामाच्या व्यवसायात असेल, तर त्याच वेळी रस्त्याकर पादत्राणे विकण्याचा व्यवसायही तो करत असे. रस्त्यावर चपला-बूट मांडून ठेवलेले असत आणि त्याच्या किमतीचे बिल्ले लावलेले असत. खरेदीस येणारे लोकही अगदी प्रामाणिकपणे आपल्या आकाराची पादत्राणे घेऊन त्याचे पैसे बाजूच्या डब्यात ठेवत असत. यामुळे एकावेळी एक व्यवसाय माणसाच्या वेळेविना; पण पैशाच्या चलन-वलनाने होत असे.

एकेकाळी देहलीवरही राज्य करणार्‍या महाराष्ट्राचे कवि राजा बढे यांनी केलेले हृद्य वर्णन !

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी ।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ॥
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।
जय जय महाराष्ट्र माझा ... ॥ १ ॥

महाराष्ट्र दिनानिमित्त सनातनची स्वभाषाभिमान वाढवणारी ग्रंथसंपदा वाचा !

     सर्वच भाषांची जननी असलेली देववाणी संस्कृत भाषा, या आपला राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ठेवा आहेत. चैतन्यमय भारतीय भाषांचा हा ठेवा जपणे, हे भारतियांचे कर्तव्यच आहे. यासाठी साहाय्यभूत ठरणारी सनातनची भाषाविषयक ग्रंथसंपदा ...
* भाषाशुद्धीचे व्रत 
* मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा
* मराठीचे मारेकरी 
* मराठीला जिवंत ठेवा !
* तामसिक इंग्रजीच्या तुलनेत 
* सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ
* देववाणी संस्कृत 
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

हिंदु तेजा जाग रे !

     सनातन धर्माचा आत्मा अदृश्य झाला आहे आणि त्याचा प्राणहीन देह तेवढा शेष राहिला आहे. अशा स्थितीत हा देश आणि धर्म यांचे सर्वांग असलेला हिंदु समाज धार्मिकदृष्ट्या जागृत होणे आणि त्यात राष्ट्रीय चेतना जागणे महत्त्वाचे आहे. - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

नियोजनशून्य गोवा शासन !

     काही वर्षांपूर्वी गोव्यातील कुंभारजुवे-गवंडाळी या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते; पण योग्य अशा जोडरस्त्यांची व्यवस्था नसल्याने तेथून वाहतूक होत नव्हती.

संतस्नानानंतर त्या पाण्यात अधिक सात्त्विकता येते. त्यामुळे त्यांच्या स्नानानंतर स्नान केल्यास अधिक लाभ होतो, हे हिंदूंना कोणी न शिकवल्याचे हे फळ आहे !

      उज्जैन येथील सिंहस्थपर्वात २२ एप्रिल २०१६ या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर विविध आखाड्यांच्या संतांनी स्नान केल्यानंतर दुपारी २ नंतर सर्वसामान्य भाविकांना स्नानाची संधी होती; मात्र भाविकांनी काळ-वेळ न पहाता संतांच्या आधीच स्नान करून प्रथा-परंपरा मोडीत काढली. मध्यप्रदेश शासनानेही महाराष्ट्राप्रमाणे प्रथम संतांचे स्नान झाल्याशिवाय भाविकांना न सोडण्याची कार्यवाही परिणामकारकपणे राबवली नाही.

आरोपींच्या जीवनातील ९ वर्षे मनःस्तापामध्ये घालवल्याविषयी उत्तरदायी न्यायालये आणि पोलीस यांना आमरण कारागृहात टाका !

    मालेगाव येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बहुचर्चित बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने ९ आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यांपैकी एका आरोपीचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणात ३५ जण ठार, तर शेकडो लोक घायाळ झाले होते. या प्रकरणी १३ आरोपींपैकी या ९ जणांना २००६ मध्ये अटक करण्यात आली होती आणि २०११ मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. उर्वरित आरोपी फरार आहेत.

सनदी अधिकार्‍यांसह देश-विदेशांत दौर्‍यावर जाणार्‍या मंत्र्यांनाही रोखा !

     सनदी अधिकारी गोव्यासारख्या शांत ठिकाणी नेमणूक करवून घेतात; मात्र बरेच सनदी अधिकारी पुन: पुन्हा देहली येथे जाण्याचे निमित्त शोधत असतात. हे अधिकारी वारंवार देहलीचे दौरे करत असल्यामुळे प्रशासकीय कामावर परिणाम होतो. - फ्रान्सिस डिसोझा, उपमुख्यमंत्री, गोवा.

मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्‍या निधर्मी राजकीय पक्षांविरुद्ध देशभक्तांनी उसळून उठले पाहिजे !

हिंदूसंघटक विक्रमराव सावरकर यांचे जाज्वल्य विचार !
      इस्लामी जिहादमुळे अनेक मुसलमान बहुसंख्यांक देशात ख्रिस्ती आणि मुस्लिमेतर यांवर आक्रमणे होत आहेत. भारतात ते हिंदूंवर होत आहेत. दुर्दैव हे की, भारताचे निधर्मीनंदन राजकीय पक्ष इस्लामियांचे मानवघातक तुष्टीकरण करत आहेत. त्यांच्या विरोधात देशभक्तांनी उसळून उठले पाहिजे.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

जसे मुसलमान आणि ख्रिस्ती महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार वगैरे ठिकाणी अल्पसंख्य आहेत तसे जम्मू-काश्मीर, मिझोराम, नागालँड, अरुणाचलप्रदेश, मेघालय येथे हिंदु अल्पसंख्य नाहीत का ? तिथे हिंदूंना अल्पसंख्य अधिकार का नाकारण्यात आले आहेत ? - पी. देवमुथ्थु, संपादक, 'हिन्दू व्हॉईस' (क्रमश:)

कारागृहातील जीवन जगतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
        वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. चौकशीपासूनच पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

भगवंत विरोध करणार्‍यांकडूनही त्याची भक्ती करवून घेत आहे !

पू. राजेंद्र शिंदे
१. देवाला न मानणारे नास्तिकवादी विचारवंत देवळात प्रवेश मिळवून देवाचे दर्शन मिळवण्यासाठी आटापिटा करत आहेत.
२. देवाचे अस्तित्व नाकारणारे नास्तिक देवळात देवाचे अस्तित्व आहे, हे जाणून देवळात प्रवेश मिळावा; म्हणून अट्टाहास करत आहेत.
३. देवाची आणि धर्माची अ‍ॅलर्जी असणारे देवळाच्या गाभार्‍यात प्रवेश मिळावा, या आंदोलनाच्या नावाखाली सतत देवाचे नाव घेत आहेत. यातून भगवंत विरोध करणार्‍यांकडूनही (विरोधी भक्ती) त्याचा नामजप करवून घेत आहे.
- श्री. (पू.) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.४.२०१६)

अंशतः अंध असूनही तळमळीने साधना आणि सेवा करणारी इंडोनेशिया येथील कु. लिझा विनाटा (वय १६ वर्षे) !

          २७.४.२०१६ या दिवशी जकार्ता, इंडोनेशिया येथे स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) च्या वतीने घेण्यात आलेल्या सत्संगात एका साधिकेकडून बरेच शिकायला मिळाले. या सत्संगाला १६ वर्षीय विद्यार्थिनी कु. लिझा विनाटा उपस्थित होती. श्री. एन्ड्री रिको या तिच्या मित्रामुळे ती एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आली असून गेल्या ६ मासांपासून (महिन्यांपासून) ती एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. सध्या ती स्तर २च्या सत्संगाला उपस्थित रहात असून फेसबूकची सेवा नियमितपणे करत आहे. कु. लिझा अंशतः अंध असल्यामुळे इतरांच्या साहाय्याची आवश्यकता असल्याने यापूर्वी ती प्रवचनांना उपस्थित राहू शकली नव्हती. सेवा करण्याची आणि साधकांना भेटण्याची तिची इच्छा असल्याने या प्रवचनाला येण्याचे ठरवून एकाच्या साहाय्याने ती आलीसुद्धा ! 
श्री. रेन्डी एकारांतिया
       या प्रवचनाच्या संदर्भात प्रसार करणे, त्याची सिद्धता करणे आणि प्रवचन करणे या सर्व सेवा तिने उत्साहाने केल्या. प्रवचनानंतर साधकांनी सांगितले, अडथळ्यांवर मात करून तळमळीने आणि उत्साहाने सेवा कशी करायची ?, हे लिझाकडून शिकायला मिळाले, तसेच तिच्या प्रवचनाने आम्हाला प्रेरणा मिळाली. या अनुभूतीतून ईश्‍वर आमच्यातील श्रद्धा आणि तळमळ वाढवत असल्याविषयी आम्ही त्याच्याप्रती कृतज्ञ आहोत.
- श्री. रेन्डी एकारांतियो, इंडोनेशिया (२७.४.२०१६)

उज्जैन येथे होणार्‍या सिंहस्थपर्वासाठी अर्पण मिळवण्याची सेवा करतांना कु. कृतिका खत्री यांना आलेल्या अनुभूती

कु. कृतिका खत्री
१. सिंहस्थपर्वासाठी मोठी रक्कम अर्पण देणार्‍यांकडून अर्पण गोळा करण्यात आपण न्यून पडत आहोत, असे पू. पिंगळेकाकांनी सांगणे : पू. पिंगळेकाकांचा सत्संग चुकल्यामुळे सौ. अनन्याने मला त्या सत्संगातील सूत्रे थोडक्यात सांगितली. पू. पिंगळेकाकांनी सांगितलेले एक सूत्र माझ्या ठळकपणे लक्षात राहिलेे आणि ते म्हणजे समाजामध्ये सिंहस्थपर्वासाठी मोठी रक्कम अर्पण देणारे पुष्कळ दाते आहेत; मात्र अर्पण गोळा करण्यात आपण न्यून पडत आहोत. तेव्हा संतांच्या शब्दांवरील माझी श्रद्धा दृढ होऊन त्यासाठी मला कृती करता येऊ दे, अशी प्रार्थना मी प.पू. डॉक्टरांना केली.
२. मोठी रक्कम अर्पण स्वरूपात मागण्यास निघाल्यावर स्वतः असमर्थ असल्याचे लक्षात येणे, श्रीकृष्णाला साहाय्यासाठी प्रार्थना करणे आणि श्रीकृष्णाने त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवण्यास सांगणे : दुसर्‍या दिवशी मी चंदीगडपासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या लुधियाना येथे रहाणार्‍या एका ओळखीच्या व्यक्तीकडे जाण्याचे ठरवले. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असून सिंहस्थपर्वासाठी मोठी रक्कम अर्पण म्हणून ते सहज देऊ शकत होते. श्रीकृष्णाच्या साहाय्याविना मी अर्पण गोळा करण्याची सेवा करू शकत नसल्याने गाडीमध्ये बसतांना मी श्रीकृष्णालाही सूक्ष्मातून गाडीत बसायला सांगितले. संपूर्ण प्रवासात मी नामजप आणि प्रार्थना करत होते; परंतु लुधियाना जवळ येऊ लागल्यानंतर मला मोठी रक्कम अर्पण स्वरूपात मागण्याची भीती वाटू लागल्यामुळे पळवाट काढण्यासाठी आपण छोटी रक्कम अर्पण स्वरूपात घेऊया, असे मला वाटू लागले, तरीही संतांनी दिलेल्या सेवेमध्ये आपण फसवणूक करू शकत नाही, असे मला आतून वाटत होते. श्री. मोहित यांच्याकडे मोठी रक्कम मागण्यास असमर्थ असल्यानेे मला साहाय्य करण्यासाठी मी श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना करत होते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, मी तुझा हात धरला आहे. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव.

उन्हाळी सुटीच्या निमित्ताने आजपासून बालवाचकांसाठी विशेष सदर !

       सध्या शाळा-महाविद्यालयांना सुटी लागली आहे. अलीकडे मुलांना सुटी लागणार म्हटले की, त्यांच्या वेळेचे नियोजन कसे करायचे, याच चिंतेत पालक असतात. अशा पालकांसाठी आणि आमच्या बालसाधकांच्या सुटीचा सुयोग्य वापर होण्यासाठी मे मासात हे विशेष सदर प्रसिद्ध करत आहोत. या सदरात राजा-राणी, चिऊ-काऊच्या गोष्टी, विनोद किंवा इतर मनोरंजानाच्या गोष्टी नव्हे, तर सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी जाणून घेणार आहोत. सनातनचे बालसाधक ही हिंदु राष्ट्राची भावी पिढी आहे. त्यामुळेच या सुटीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालसाधकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यार्थीमित्रांनो, नवीन 
गोष्टी शिकून सुट्टी सार्थकी लावा !
सुटीतील परिपाठ !
        विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. सुट्टी म्हणजे आपल्या व्यक्तीमत्त्वाला सुंदर आकार देणारी आणि नवनवीन कलाकौशल्य शिकण्याची मुक्त शाळाच होय. या सुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत. आपल्यात कोणत्या गोष्टींची उणीव आहे, याचा अभ्यास करून त्या गोष्टींचा विकास करण्यासाठी आपल्याला देवाने दिलेली ही संधी आहे.
         ही सुट्टी आनंदात जावी, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो, शिकण्यातच खरा आनंद आहे.

अमेरिकेतील रज-तम वातावरणामुळे त्रास होणे आणि संतांच्या सत्संगात बसल्यावर हलकेपणा जाणवून दैनंदिन कृती करत असतांना होत असलेल्या चुका लक्षात येऊ लागल्यामुळे आध्यात्मिक उपायांचे महत्त्व समजणे

        मला कार्यालयीन कामानिमित्त अमेरिकेत यावे लागले. इथे आल्यावर मला डोक्यावर दाब जाणवत होता, तसेच मला श्‍वास घ्यायलाही त्रास होत होता. मी श्‍वास घेत असतांना त्या श्‍वासातही घर्षणामुळे आवाज येत होता.
        ९.३.२०१५ या दिवशी मी एस्.एस्.आर.एफ्.च्या ऑनलाईन सत्संगात सहभागी झालो होतो. त्या वेळी मला माझ्याकडून होत असलेल्या चुका लक्षात येत नाहीत, असे जाणवले. मी त्यासाठी काही स्वयंसूचना द्यायला हवी का ?, यासाठी सोमनाथदादांकडे विचारणा केली.
       १२.३.२०१५ या दिवशी पू. लोलाआजी घेत असलेल्या अनौपचारिक सत्संगाला बसायची मला संधी मिळाली. संतांमधील चैतन्यामुळे माझ्यावर उपाय होऊन मला हलकेपणा जाणवला. मी दैनंदिन कृती करत असतांना त्यात होत असलेल्या चुका शोधायला हव्यात, असे मला जाणवले. नंतर मला माझ्याकडून होत असलेल्या लहान चुकांचीही जाणीव होऊ लागली. तेव्हा मला आध्यात्मिक उपायांचे महत्त्व लक्षात आले.
श्रीकृष्णचरणी कृतज्ञता ! 
- श्री. नीलेश पाध्ये, फोंडा, गोवा (१४.३.२०१६)

संगणकाच्या पडद्यासमोर मध्ये मध्ये पांढरा धूर दिसणे

         मागील ८ दिवसांपासून संगणकासमोर बसून सेवा करतांना दिवसभरात एक-दोन वेळा मध्येच ढगासारखा पांढरा धूर डोळ्यांसमोर येतो. काही वेळाने तो लुप्त होतो. कधी तो धूर संगणकाच्या पडद्यातून बाहेर येतांना दिसतो, तर कधी नुसताच समोर दिसतो; पण माझ्यासमवेत सेवेसाठी बसणार्‍या इतर साधकांना त्याच वेळी तसे काही दिसले नाही. या धुरामुळे मला चांगले किंवा त्रासदायक वाटणे, असे काही अनुभवास आले नाही. 
- अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.३.२०१६)
         ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना केल्यामुळे जिवाची सात्त्विकता वाढू लागते. साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजे सूक्ष्मातील कळू लागते. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पाहिल्यावर तिच्यातील चांगली आणि त्रासदायक स्पंदने जाणवतात, दिसतात किंवा त्यासंदर्भात अनुभूती येते. अध्यात्मात साधनेमध्ये उत्तरोत्तर प्रगती झाल्यानंतर यंत्राच्या माध्यमातून दिसणारी प्रभावळ डोळ्यांनीही दिसू शकते. त्याप्रमाणे अधिवक्ता योगेश जलतारे यांना ही अनुभूती आली.

कुटुंबातील एका सदस्याने साधना केल्यावर गुरुकृपेने कुटुंबियांमध्ये पालट झाल्याचे अनुभवता येणे

१. सत्संगात सांगितलेले नामजपाचे 
महत्त्व यजमानांना पटत नसूनही सांगत रहाणे
       ऑगस्ट २००६ या वर्षी मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि मी नामजप चालू केला. त्या वेळी आधुनिक वैद्या (सौ.) आशाताई ठक्कर यांच्या घरी सत्संग असायचा. प्रत्येक रविवारी यजनमानांना मी ताईंकडे जाऊन लगेच येते, असे सांगून जात होते. मी सत्संगाला जाऊन आल्यावर त्यांना सांगायचे, तेथे एक ताई येऊन नामजपाविषयी माहिती सांगतात. मी यजमानांना कार्यालयातून येतांना नामजप करत येण्यास सांगत असे. त्या वेळी यजमान मला वेड्यात काढायचे (याला पुरुषी अहं म्हणतात); पण तरीही मी त्यांना नामजपाविषयी सांगत असे.

जन्महिंदू आणि कर्महिंदू यांच्यातील भेद

कु. मधुरा भोसले
       जन्महिंदू आणि कर्महिंदू यांच्यातील साधिकेला जाणवलेला भेद येथे दिला आहे. कर्महिंदु खर्‍या अर्थाने हिंदुत्व जगून ईश्‍वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात, तर जन्महिंदू हिंदु धर्मातच जन्मले असूनही त्याचा लाभ करून घेत नाहीत. 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०१६, रात्री १०.३०)

अविचार आणि सुविचार यांतील भेद - मायेकडे नेणारा प्रत्येक विचार हा अविचार आहेे, तर ईश्‍वराकडे नेणारा प्रत्येक विचार हा सुविचार आहे !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. प्रत्येक गोष्टीतील कार्यकारणभाव, 
म्हणजे त्या गोष्टीमागील सूक्ष्म ईश्‍वरी विचार !
        प्रत्येक गोष्टीमागे एक सूक्ष्म विचार दडलेला असतो. यालाच त्या गोष्टीचा कार्यकारणभाव म्हणतात, उदा. आम्ही आमच्या जीवनात हे हे केल्याने आम्ही यात यशस्वी झालो. यातील कर्ता मी आहे; परंतु या कर्त्यामागे कोण ?, असा सूक्ष्म विचार केला असता, या वाक्यातील कार्यकारणभाव आपल्याला कळतो, तो असा - आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाला माहीत असते. ईश्‍वराने ठरवून दिलेल्या प्रत्येक गोष्टीत आपण केवळ एक कळसूत्री बाहुलीसारखे नाचत असतो. या वाक्यात ईश्‍वर प्रमुख आहे आणि मी गौण आहे. हा विचार आपल्याला अध्यात्माकडे नेतो.
        मी करतो, हा विचार मायेकडे नेणारा आहे; म्हणून तो विचार नाही, तर अविचार आहे; परंतु विचारातील ईश्‍वर शोधला, तर तो सुविचार ठरतो. येथे मी करतो ऐवजी मीमधील (माझ्यातील) ईश्‍वर करतो, असे म्हटले की, तो सुविचार होतो. सुविचार मात्र अध्यात्माकडे नेणारा असल्याने तो ईश्‍वरी आहे.

गोवा येथे पंचम 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशना'च्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

महिलांना स्वातंत्र्य देण्याची महाराष्ट्राची परंपरा !

         इंग्रज इतिहासकार ग्रँट डफ लिहितो की, महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना पुरुषांची सहचारिणी मानले जाते आणि हिंदुस्थानच्या इतर प्रांतांच्या मानाने मराठी स्त्रियांना समाजात वावरण्याचे अन् वागणुकीचे बरेच स्वातंत्र्य आहे. - नीलिमा भावे (शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा, प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन)

दफना दो अब अफजल के बेटों को अफजल के पास में ।

स्वामी दिव्यजीवनदासजी
फिर गहरे संकट के बादल छायें हैं जेएन्यू में ।
देशद्रोह की डिग्री लेने आए हैं जेएनयू में ॥ १ ॥
फिर केसर की क्यारी में विष बोने की तैयारी है ।
फिर से अफजल की फांसी पर रोने की तैयारी है ॥ २ ॥
इनकी आँखे देख रही हैं कश्मीर को ख्वाबों में ।
आतंकवाद की कथा कहानी पढते रहे किताबो में ॥ ३ ॥
इससे काले दिन क्या होंगे भारत की बर्बादी के ।
दिल्ली में नारे लगते हैं कश्मिरी आजादी के ॥ ४ ॥
अंजाम समझना होगा अब इनके कातिल मंसूबो के ।
भारत में अभिनंदन होगा अफजल और याकूबों के ॥ ५ ॥

रामनाथी आश्रमात रुग्ण साधकांना तैलमर्दन (तेलाने मालिश) करू इच्छिणारे सक्षम स्त्री-पुरुष साधक हवेत !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमामध्ये पंचकर्म चिकित्सा विभागात रुग्ण साधकांना तैलमर्दन करण्यासाठी स्त्री-पुरुष साधकांची आवश्यकता आहे. या अंतर्गत प्रतिदिन १ - २ घंट्यांच्या अंतराने थोडा वेळ विश्रांती घेऊन दिवसभरात ७ - ८ घंटे सेवा उपलब्ध आहे. तैलमर्दनाचा अनुभव नसणार्‍या साधकांना ही सेवा कशी करावी ?, तेही शिकवण्यात येईल. जे सक्षम साधक पूर्णवेळ किंवा न्यूनतम १ मास (महिना) आश्रमात राहून ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना ८४५१००६०८१ या भ्रमणभाषवर संपर्क करावा.


अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे मिळवण्यासाठी पहा
www.sanatan.org

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
        मागील पाच मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
        यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१. 
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणार्‍या लेखमालेचा आज शेवटचा दिवस !

         मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव ! ही लेखमालिका गत ५ मास सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली. या लेखमालेत कारागृहात असतांना तेथील कर्मचारी, प्रशासन, पोलीस आणि इतर कैदी इत्यादींनी निर्दोष साधकांचा केलेला छळ, तसेच त्यांच्या संदर्भातील अनुभव आणि साधनेच्या बळावर त्या वातावरणाला कारागृहातील साधकांनी अन् समाजाला त्यांच्या कुटुंबियांनी स्थिर राहून कसे तोंड दिले, हे आपण विस्तृतपणे जाणून घेतले. आज आम्ही या लेखमालिकेचा शेवटचा लेख प्रसिद्ध करत आहोत. राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्‍यांना हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कधीतरी कारागृहात जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे असा कठीण प्रसंग स्वतःवर आल्यास त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, याचा वस्तूपाठच या लेखमालेमुळे मिळाला आहे. भावी पिढ्यांचे जीवन सुखात जावे, यासाठी एकूण प्रशासनच पालटून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची अनिवार्यता वाचकांच्या लक्षात आली. अनेक वाचकांनी पत्राद्वारे त्यांच्या मनातील चीड व्यक्तही केली. हीच या लेखमालेची फलनिष्पत्ती आहे.

शुभविवाह

       आज चैत्र कृष्ण पक्ष नवमी (१.५.२०१६) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरण विभागात सेवा करणारे चि. स्नेहल मनोहर राऊत आणि रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या चि.सौ.कां. शायरी वीरेंद्र मराठे हे विवाहबद्ध होत आहेत. त्यांची गुणवैशिष्ट्ये ३०.४.२०१६ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 
चि. स्नेहल राऊत आणि चि.सौ.कां. 
शायरी मराठे यांना सनातन परिवाराच्या 
वतीने शुभविवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
       ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! 
(साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

रामनाथी आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय

रामनाथी आश्रम हे अत्यंत सात्त्विक 
आणि पवित्र स्थळ असून सनातनचा प्रसार 
पाहून ही केवळ परमेश्‍वरनिर्मिती आहे, असे वाटते ! 
         ए.बी.पी. माझा इत्यादी वृत्तवाहिन्यांवर सनातन आश्रमावर (संस्थेवर) होणारी टीका ऐकल्यावर रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन निश्‍चिती करावी, अशी इच्छा होती. दीड-दोन दिवसांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून येथील स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा, काटेकोर नियोजन अन् त्याचे पालन पाहून आत्यंतिक समाधान वाटले. साधकांच्या तोंडवळ्यावरील सात्त्विकता आणि आपलेपणानेे झोकून देऊन सेवा करण्याची प्रवृत्ती प्रसंशनीय आहे. हा आश्रम म्हणजे एक अत्यंत सात्त्विक आणि पवित्र स्थळ आहे. येथे हिंदु धर्माचरणाशी उपयुक्त असे वाङ्मय (ग्रंथसंपदा) प्रसिद्ध केले जाते, जे हिंदु समाजधारणा आणि धर्माचरणासाठी अत्यंत उपयुक्त अन् आवश्यक आहे. आश्रमामध्ये बर्‍याच कामांच्या सुलभतेसाठी आधुनिक यंत्रांचा वापर केलेला दिसला. ही भव्य वास्तू, साधकांमध्ये निर्माण झालेली सात्त्विकता, कार्यतत्परता आणि सनातनचा प्रचंड प्रसार पाहून ही केवळ परमेश्‍वरनिर्मिती आहे, असे दिसते.

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना नम्र विनंती !
सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.


सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !
       पाकिस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, तसेच व्यावहारिक संबंध त्वरित तोडून टाका. पाकिस्तान, बांगलादेश यांना शेजारी राष्ट्र्र असे म्हणणे बंद करा ! त्यांना शत्रूराष्ट्रच म्हणा !
- आचार्य स्वामी धर्मेंद्रजी महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

गणेश चतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास 
इच्छुक असल्यास रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करा !
       प्रवासाच्या दिनांकाच्या १२० दिवस आधीपासूनच तिकीट आरक्षण चालू होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी काही मासांपूर्वी घोषित केले होते. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणार्‍यांनी ४ मास अगोदरच आरक्षण करण्यास आरंभ केला आणि ३ दिवसांत सर्व तिकीटे आरक्षित झाली. त्यामुळे नंतर आरक्षण करणार्‍यांची असुविधा (गैरसोय) झाली.
       ५.९.२०१६ या दिवसापासून गणेशोत्सवाला आरंभ होत असून त्यासाठीचे आगाऊ आरक्षण (अ‍ॅडव्हान्स् बूकिंग) चालू झाले आहे. सणासुदीच्या काळात रेल्वेची सर्व तिकीटे आरक्षित झाल्यानंतर बसच्या तिकीटदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली जात असल्याने प्रवाशांना अधिक मूल्य देऊन तिकीट काढावे लागते. त्यामुळे ज्यांना गणेश चतुर्थीच्या कालावधीत गावाला जायचे असेल, त्यांनी त्वरित रेल्वे तिकिट आरक्षित करून घ्यावे. अन्यथा नंतर आरक्षण मिळण्यात अडचण येऊ शकते.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.४.२०१६)

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेले शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान

संतांकडून मिळवायच्या गोष्टी
देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. ज्याला घ्यायचे असेल, तो आमच्याकडून सर्वकाही घेऊ शकतो.
भावार्थ : 'देण्यासाठी आमच्याकडे काही नाही' मधील काही शब्द व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. 'सर्वकाही घेऊ शकतो' मधील सर्वकाही अध्यात्माच्या संदर्भातील आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

घरीही लोकशाही नसते, तर राष्ट्रात कशी यशस्वी ठरेल ?
परात्पर गुरु डॉ. आठवले
घरी लोकशाही नसते, म्हणजे लहान मुलांचे मत विचारांत घेऊन आई-वडील निर्णय घेत नाहीत. असे असतांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात एकही विचार न करणार्‍या जनतेने लोकप्रतिनिधी निवडणे हास्यास्पद नाही का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे यश !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
स्वतःच्या यशाच्या धुंदीत रहाणार्‍यांपेक्षा जो दीन-दुबळे, दरिद्री आणि गरजू अशा व्यक्तींच्या साहाय्याला धावून जातो अन् यालाच कर्तव्य मानतो, तोच खरा यशस्वी माणूस ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

...आता पुढील कारवाई करा !

संपादकीय
     विजय मल्ल्या या उद्योगपती व्यक्तीचे नाव भारतीय प्रसिद्धीमाध्यमांमध्ये सध्या झळकत आहे. प्रचंड आर्थिक अडचणीत आलेली आणि देशातील १७ बँकांचे जवळपास ९ सहस्र कोटी देणे लागत असलेली ही व्यक्ती सध्या इंग्लंडमधील एका आलिशान राजवाड्यासारख्या बंगल्यात रहात आहे. २ मार्च या दिवशी मल्ल्या यांनी देश सोडून इंग्लंडला प्रयाण केले. वर्षअखेर म्हणजे ३१ मार्च हा वार्षिक ताळेबंदीचा दिवस जवळ येत असल्याने त्यांच्या ञ१७ धनको बँकांना जणू जाग आली आणि मल्ल्या यांच्याजवळ असलेली ९ सहस्र कोटी रुपयांची कर्जवसुली करण्याची त्यांना आठवण झाली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn