Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज संत तुकडोजी महाराज यांची जयंती

कोटी कोटी प्रणाम !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत 
पू. लोला वेजिलिच यांचा आज वाढदिवस
----------------------------------------------
सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांचा आज वाढदिवस

बांगलादेशमध्ये जिहाद्यांकडून हिंदु साधूची चाकूने भोसकून हत्या

  • भारतातील हिंदूंचे आणि साधू-संतांचे रक्षण न करणारे शासन बांगलादेशमधील हिंदूंचे आणि अन् साधू-संतांचे रक्षण कसे करणार ?
  • परदेशातील विविध वार्ता दाखवणारी भारतीय प्रसारमाध्यमे पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार मात्र दडपतात !
       ढाका - बांगलादेशच्या गोपालगंज जिल्ह्यातील तुंगीपारा येथे मुसलमान जिहाद्यांनी एका हिंदु साधूची चाकूने भोसकून हत्या केली. या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी शरिफुल शेख (वय २५ वर्षे) नावाच्या मुसलमान युवकाला अटक केली आहे. या साधूंचे नाव परमानंद राव असे असून त्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग करून धर्मकार्य आणि समाजकार्य यांसाठी स्वत:ला वाहून घेतले होते. हे साधू आपल्या भागात विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा प्रसार करत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. ठाकूर रसराज रॉय यांचे ते शिष्य होते. (बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! हिंदूंनो, भारतात तुम्हाला असहिष्णु ठरवणारे तथाकथित पुरोगामी इस्लामी राष्ट्रात तुमच्यावर आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात तोंडही उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक)

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सुटका करण्याची भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची उज्जैन सिंहस्थपर्वामध्ये मागणी !

        उज्जैन (मध्यप्रदेश), २९ एप्रिल (वार्ता.) - अयोध्येत श्रीराम मंदिराची जलद उभारणी करावी, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यासह साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांवर करण्यात आलेले खोटे आरोप मागे घेण्यात यावेत, शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांचा निधी गोरक्षणासाठी व्यय (खर्च) करावा, मुंबईतील देवनार पशूवधगृह बंद करण्यात यावे, गायीला राष्ट्रीय माता घोषित करण्यात यावे, आदी मागण्या आसारामजी बापू यांच्या ७९ व्या प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री योग वेदांत सेवा समितीने काढलेल्या भव्य फेरीत करण्यात आल्या. या वेळी संत, विश्‍व हिंदू परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी एकत्र येऊन उज्जैन शहरात भव्य फेरी काढली. यात पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे मध्यप्रदेश राज्यातील सहस्रावधी भक्त सहभागी झाले होते. श्री चामुंडामाता चौक, देवास रोड, श्री महाकालेश्‍वर महादेव देवस्थान ते भूखीमाता मंदिर अशी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत फेरी काढण्यात आली.

आदर्श सोसायटी पाडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

ही इमारत बांधण्यासाठी आलेला कोट्यवधी 
रुपयांचा व्यय शासनाने संबंधितांकडून वसूल करावा 
आणि घोटाळेबाजांना त्वरित कारागृहात टाकावे !
       मुंबई - कुलाब्यातील आदर्श सोसायटी पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २९ एप्रिल या दिवशी दिला. पर्यावरणाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करून ही इमारत का बांधण्यात आली ? असा प्रश्‍नही न्यायालयाने विचारला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती राष्ट्र्रवादी काँग्रेसचे आमदार तथा या आदर्श सोसायटीतील सदनिकाधारक जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
१. कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या विधवा पत्नींसाठी मुंबईतील कुलाबा येथे आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती; मात्र या इमारतीतील बहुसंख्य सदनिका राजकीय नेते आणि अधिकारी यांनी लाटल्याचेे उघड झाले होते. त्यामुळे काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते.

वसुंधरा राजे यांच्यावर कारवाई का नाही ? - काँग्रेस

  • वर्ष २००५ मध्ये राजस्थान शासनाकडून ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टरची खरेदी
  • ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरण 
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर
        नवी देहली - राजस्थान शासनानेही ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी करून जनतेच्या १ कोटी १४ लाख रुपयांची हानी केली होती, असा आरोप करत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? असा प्रश्‍न काँग्रेसने विचारला आहे. वेस्टलॅण्ड या आस्थापनाची हेलिकॉप्टर खरेदी करण्यात यावीत, यासाठी भारतीय अधिकार्‍यांना ३६० कोटी रुपयांची लाच दिली गेल्याचे निष्पन्न झाले आहे, असे इटलीमधील मिलान कोर्ट ऑफ अपील्स या न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

पाक एफ्-१६ विमानांचा वापर भारताच्या विरोधात करू शकतो ! - अमेरिकेतील खासदार आणि तज्ञ यांची चिंता

अमेरिकेने पाकला लढाऊ विमाने विकणे म्हणजे पाकला 
भारताविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र उपलब्ध करून देणे होय !  
अशी धूर्त अमेरिका भारताचा मित्र कधीतरी होऊ शकते का ?
       वॉशिंग्टन - आतंकवाद्यांशी लढण्यासाठी अमेरिका पाकला एफ्-१६ ही लढाऊ विमाने विकणार आहे. त्यावर अमेरिकेतील कायदेतज्ञ आणि खासदार यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाक या विमानांचा वापर भारताच्या विरोधात करू शकतो. त्यामुळे बराक ओबामा शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती या तज्ञांनी केली आहे. सध्या अमेरिकन सिनेटने एफ्-१६ लढाऊ विमाने विकण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
१. अमेरिकी संसदेचेे सदस्य मॅट सॅलमन म्हणाले की, भारत-पाकिस्तानमधील संबंध अजूनही ताणलेले आहेत. पाकिस्तानने या एफ्-१६ विमानांचा वापर आतंकवाद्यांशी लढण्यासाठी करणार असल्याचा दावा केला आहे; मात्र आतंकवाद्यांशी लढण्याऐवजी भारत किंवा इतर प्रादेशिक शक्तींच्या विरोधात या विमानांचा वापर केला जाऊ शकतो. माझ्यासह संसदेचे अनेक सदस्य ही विक्री करण्यामागचा निर्णय आणि वेळ यांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. यामुळे ओबामा प्रशासनाने याविषयी विचार करायला हवा.

स्वाभिमानी जनता सत्ताधार्‍यांची मांडलिक नाही, हे भाजपने लक्षात घ्यावे ! - सुभाष वेलिंगकर, भाभासुमं

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
    पणजी (गोवा) - शासनाने रस्ते बांधले, पूल, इमारती उभारल्या, शासकीय नोकर्‍या दिल्या, खिरापती वाटल्या म्हणजे लोक मिंधे होतील, असा भाजपचा भ्रम आहे. लोकांना मिंधे बनवता येणार नाही. स्वाभिमानी जनता आपल्या स्वाभिमानाचे दर्शन नक्कीच घडवतील. गोव्यात स्वाभिमानी जनता शिल्लक आहे आणि ती सत्ताधार्‍यांची मांडलिक झालेली नाही, अशी चेतावणी भाभासुमंचे राज्य समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी राज्यशासनाला दिली आहे. शैक्षणिक माध्यमप्रश्‍नाला अनुसरून भाभासुमं पुकारलेल्या निर्णायक लढ्याचा एक भाग म्हणून भाभासुमंने मांद्रे, पेडणे येथून राज्यभर भाजपच्या मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सभांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी मांद्रे येथील सभा २४ एप्रिल या दिवशी झाली. या पार्श्‍वभूमीवर दैनिक नवप्रभा या वृत्तपत्राला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत प्रा. वेलिंगकर यांनी ही चेतावणी दिली.

(म्हणे) दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणाकडे शासन गांभीर्याने पहात नाही !

  • स्वतःच न्यायालय आणि अन्वेषणयंत्रणा यांची दिशाभूल करून अन्वेषण भरकटवणारे दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबियांचे हे बोलणे, म्हणजे चोराच्या उलट्या..., असे झाले ! 
  •  डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे कुटुंबियांचा कांगावा
       पुणे, २९ एप्रिल - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला अनेक मास उलटल्यानंतरही त्यांच्या हत्येच्या अन्वेषणाला अद्याप गती आलेली नाही. शासन या अन्वेषणाकडे फारसे गांभीर्याने पहात नसून शासनाला मारेकरी खरंच पकडायचे आहेत का ?, असा प्रश्‍न डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांनी २८ एप्रिल या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. या वेळी डॉ. हमीद दाभोलकर, शैला दाभोलकर, उमा पानसरे, मेघा पानसरे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, प्रधान सचिव मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते.

समीर गायकवाड यांच्यावर ४ मे या दिवशी आरोप निश्‍चिती करण्याचा निर्णय घेण्यात येणार ! - न्यायालय

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
       कोल्हापूर, २९ एप्रिल (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी २७ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या प्रतीचे वाचन करून ४ मे या दिवशी संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असा आदेश २९ एप्रिल या दिवशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी दिला. त्यानुसार श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती करून हा खटला चालू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, कळंबा कारागृह प्रशासनाने २९ एप्रिलला जिल्हा न्यायालयात श्री. समीर गायकवाड यांना उपस्थित केले. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साध्या वेशातील पोलिसांची संख्याही मोठी होती.

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी न्यायालयाचा अवमान केलेला नाही !

तृप्ती देसाई यांना श्री महालक्ष्मी मंदिरात अतिमहनीय व्यक्तींसाठी 
असलेल्या पद्धतीने दर्शन दिल्याचे प्रकरण 
शासकीय अधिवक्त्यांचा उच्च न्यायालयात युक्तीवाद 
    कोल्हापूर, २९ एप्रिल (वार्ता.) - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात अतिमहनीय व्यक्तींसाठी असलेल्या पद्धतीने दर्शन दिल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी न्यायालयाचा अवमान केलेला नाही, असा युक्तीवाद शासकीय अधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात २७ एप्रिल या दिवशी केला.मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी चालू आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याविषयी कार्यवाही करावी !

हिंदुत्ववाद्यांची निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षकांकडे मागणी
प्रथम निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने दुसर्‍यांदा निवेदन दिले
पोलिसांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याच्या संदर्भात तक्रार देऊनही कृती न केल्याविषयी येथील अप्पर पोलीस निरीक्षक एस्. चैतन्य यांना श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालून या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा सर्व हिंदुत्ववादी आणि भाविक यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास याचे सर्वस्वी दायित्व प्रशासनाचे राहील, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, श्री. चंद्रकांत बराले, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काश्मीरमध्ये मशिदीत लपलेला जिहादी आतंकवादी ठार

       श्रीनगर - कांथपोरा गावात सैनिकांनी केलेल्या कारवाईत एका मशिदीत लपलेला जिहादी आतंकवादी जागीच ठार झाला, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. (नायजेरिया, सिरिया आदी देशांत जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या मशिदी शासनाने पाडल्या किंवा बंद केल्या. काश्मीरमध्येही असे निर्णय घेण्याचे धाडस तेथील राज्य आणि केंद्रशासन दाखवेल का ? - संपादक)

गोव्यातील भाभासुमंच्या आंदोलनामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली ! - प्रा. सुभाष वेलिंगकर

भारतीय भाषा सुरक्षा मंचची पणजी येथे पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेत डावीकडून फादर माऊझिन आताईद, श्री. सुभाष देसाई, पांडुरंग
नाडकर्णी, प्रा. सुभाष वेलिंगकर, (बोलतांना) अरविंद भाटीकर, पुंडलिक नायक,
नागेश करमली आणि कृष्णराज सुकेरकर
      पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) - इंग्रजी शाळांच्या अनुदानाच्या विरोधातील भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाला जनतेचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मांद्रे येथे शासनाचा विरोध होऊनही मंचने आयोजित केलेल्या सभेला अभूतपूर्व उपस्थिती लाभली. भाभासुमंच्या आंदोलनाला मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यापुढे भाजपचे आमदार असलेल्या २१ मतदारसंघांत मंच यशस्वी सभा घेणार आहे, असे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा करू ! - अधिवक्ता श्रीहरि अणे

अणे यांची महाराष्ट्रद्रोही भूमिका 
      नागपूर, २९ एप्रिल - महाराष्ट्र दिन, म्हणजेच १ मे हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. १ मे ला सर्व विदर्भवादी संघटना मिळून स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवणार असल्याची माहिती अधिवक्ता श्रीहरि अणे यांनी दिली. (अशा विघटनवाद्यांविषयी शासन आपली भूमिका घोषित करेल का ? या आंदोलनामुळे महाराष्ट्र दिनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? - संपादक) स्वतंत्र विदर्भाच्या भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी २९ एप्रिल या दिवशी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर अणे पत्रकारांशी बोलत होते.

पुण्यातील मॅपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

     पुणे, २९ एप्रिल - स्वस्तात घर देण्याचे आश्‍वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे छायाचित्र वापरून विज्ञापन करणार्‍या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील सत्र न्यायालयाने २८ एप्रिल या दिवशी फेटाळला. त्यामुळे आता सचिन अग्रवाल यांना पोलीस कधी अटक करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सचिन अग्रवाल यांनी स्वत:च्या मॅपल ग्रुपच्या वतीने पुण्यात ५ लक्ष रुपयांत घर देण्याची योजना घोषित केली होती; मात्र ही योजना फसवी असल्याचा दावा करीत खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. (या प्रकरणातील आरोपीने पसार होणे, हे राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍न निर्माण करणारे आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत सचिन अग्रवाल यांना अटक न करणे, हे पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी मनात शंका उत्पन्न करणारे आहे. - संपादक)

सायबर गुन्ह्यांत मुंबई शहर प्रथम, तर संभाजीनगर तिसर्‍या क्रमांकावर

     संभाजीनगर, २९ एप्रिल - राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने घोषित केलेल्या अहवालानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये मुंबई शहर प्रथम, तर संभाजीनगर शहर तिसर्‍या क्रमांकावर आहे. वर्ष २०१५ मध्ये संभाजीनगर शहरात १४८ सायबर गुन्हे घडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे एटीएम् कार्डमध्ये फसवणुकीचे असल्याची माहिती सायबर गुन्हे विभागाने दिली. (सायबर गुन्ह्यांतील वाढती गुन्हेगारी, हे कायद्याचा धाक संपल्याचे लक्षण आहे. - संपादक)

पाक आतंकवाद्यांवर कारवाई करत नाही ! - अमेरिकेचे अधिकारी रिचर्ड ओलसन

पाक जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई 
करत नाही, हे अमेरिकेलाही ठाऊक आहे, तरीही 
अमेरिका पाकला सर्वप्रकारचे साहाय्य देऊन पाठीशी घालते !
        वॉशिंग्टन - पाक त्यांच्या शेजारील राष्ट्रांपुढे संकट निर्माण करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करत नाही, असे प्रतिपादन अमेरिकेच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रकरणाचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड ओलसन यांनी येथे केले. त्यांनी हक्काने नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांसारख्या धोकादायक संघटनांच्या विरोधात पाऊल उचलले पाहिजे, असे म्हटले आहे.

अभिनेत्री कंगना काळी जादू करत असल्याचा अभिनेत्याचा आरोप

याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ?
      मुंबई - अभिनेता आणि अभिनेत्री कंगना राणावतचा मित्र अध्ययन सुमन याने अभिनेत्री कंगना काळी जादू करते, असा आरोप एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. याविषयी अनुभव सांगतांना मला एकदा कंगनाने रात्री घरी बोलावले आणि घरातल्या काळ्या कपड्याने झाकलेल्या खोलीमध्ये ठेवले. त्या वेळी घरामध्ये पूजा चालू होती. कंगनाने मला मंत्र म्हणायला लावले, असे गंभीर आरोप अध्ययनने केले आहेत. तसेच रात्री १२ वाजता काही गोष्टी स्मशानात टाकायला सांगितल्या असेही त्याने म्हटले आहे.


१ मे या दिवशी होणार्‍या हिंदवी स्वराज्य मानवंदना कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन होणार
पत्रकार परिषदेत डावीकडून (बसलेले) सर्वश्री
अनिल बाबर, विजयबापू शिवतारे, पू. भिडे
गुरुजी, बाळासाहेब बेडगे आणि अन्य...
     सांगली, २९ एप्रिल (वार्ता.) - महाराष्ट्रात प्रतिवर्षी पारंपरिक शिवजयंती साजरी होते; मात्र त्याचे स्वरूप व्यापक नसते. शिवजयंतीचे विचार प्रज्वलित होणे आणि समाजात त्याची जागृती होणे, यांसाठी या वर्षीपासून हिंदवी स्वराज्य मानवंदना हा कार्यक्रम चालू करत आहोत. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम रविवार, १ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता होणार असून त्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. हिंदुत्वाच्या कार्यासाठी अग्रभागी असणारे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे त्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(म्हणे) सर्व धर्मांमध्ये सांस्कृतिक आतंकवाद फोफावला आहे !

डॉ. श्रीपाल सबनीस यांचा वैचारिक गोंधळ
      चिंचवड (जिल्हा पुणे), २९ एप्रिल - कोणत्याही धर्माचे मूळ तत्त्वज्ञान मानवतावादी असले, तरी आजच्या सर्व धर्मांमध्ये सांस्कृतिक आतंकवाद फोफावला आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी २७ एप्रिल या दिवशी केले. (सबनीस यांनी हेच वक्तव्य अल्पसंख्यांकांच्या व्यासपिठावर जाऊन बोलून दाखवावे, म्हणजे मग त्यांना कळेल की, सांस्कृतिक आतंकवाद काय असतो ? - संपादक) येथील मोहननगर भागातील जयभवानी तरुण मंडळ आयोजित ६ दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेतील सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर ते बोलत होते. या वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजीव जाधव अध्यक्षस्थानी होते.

रावण दहनावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍याला मुंबई उच्च न्यायालयाने दंड ठोठावला !

     नागपूर - रावण दहनावर बंदी घालावी, अशी मागणी करणारे जनार्दन मून या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने २८ एप्रिलला झालेल्या सुनावणीच्या वेळी फटकारत न्यायालयाचा वेळ घालवण्यामुळे २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 
१. मून यांनी याचिकेत म्हटले होते की, दसर्‍याच्या दिवशी देशभरात रावणाचे पुतळे उभारून प्रतिकात्मक दहन केले जाते. ही एकप्रकारची अंधश्रद्धा असून असले कार्यक्रम बंद करावेत.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाकडून आयोजित सत्यम् शिवम् सुंदरम् आध्यात्मिक मेळा या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना प्रश्‍न विचारतांना
पू. डॉ. ब्रह्मकुमारी मंजू बहन
     उज्जैन, २९ एप्रिल (वार्ता) - उज्जैन सिंहस्थपर्वामधील दत्त आखाडा क्षेत्रामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयकडून सत्यम् शिवम् सुंदरम् आध्यात्मिक मेळा या कार्यक्रमात चैतन्य देवीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन भगवद्गीता कथावाचक पंडित देवकीनंदन ठाकुरजी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रदर्शनात देवीचे काळानुसार रूप आणि कार्य कसे पालटत गेले आहे, त्याची माहिती दृकश्राव्य माध्यमातून सादर केली गेली.
      उपस्थितांना संबोधित करतांना पंडित देवकीनंदन महाराज म्हणाले, मुलींच्या जन्माच्या आणि लग्नाच्या वेळेस लक्ष्मी घरी आली असे म्हटले जाते. हिंदु संस्कृतीत नारी सर्वत्र पूजनीय आहे. या संस्थेच्या माध्यमातून अथक श्रम घेऊन कार्य करत असलेल्या दीदींना मी नमस्कार करतो.
         पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ईश्‍वरीय हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यकता आहे. त्या कार्याला आरंभ झाला आहे. स्त्री ही देवीचे प्रतीक आहे म्हणून ती सर्व ठिकाणी पूजनीय आहे. ती अखंड शक्तीचा स्त्रोत आहे.

निवडणुकीमधील काळ्या पैशाविषयी माहिती पुरवणार्‍याला (खबर्‍याला) पारितोषिक घोषित करण्याची सूचना

      चेन्नई - निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी राजकारण्यांकडून काळ्या पैशाचा सर्रास वापर केला जातो. या काळ्या पैशाच्या विरोधात कारवाई करणे शक्य व्हावे, यासाठी त्याविषयी माहिती पुरवणार्‍यांना (खबर्‍यांना) पारितोषिक घोषित करावे, अशी सूचना तमिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना करण्यात आली आहे. चेन्नई येथील धर्माभिमानी श्री. बी.आर्. हरन् यांनी एका पत्राद्वारे ही सूचना केली आहे.

मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर लवकरच कॅसिनो चालू होण्याची चिन्हे

कॅसिनोचा जुगार मुंबईत न येण्यासाठी नागरिकांनी कृतीशील व्हावे !
      मुंबई - परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एम्टीडीसी) राज्यशासनापुढे कॅसिनोचा प्रस्ताव ठेवला असून कॅसिनोला कायदेशीर मान्यता देण्याविषयी शासन गांभीर्याने विचार करत आहे, असे समजते. त्यामुळे लवकरच मुंबईतील समुद्र किनारी कॅसिनो चालू होण्याची चिन्हे आहेत. (पर्यटकांना आर्कषित करण्यासाठी अन्य अनेक पर्याय असतांना कॅसिनो चालू करण्याचा विघातक पर्याय करणे आश्‍चर्यकारक आहे. गोव्यात कॅसिनोला होणारा विरोध महाराष्ट्र शासनाला माहीत नाही का ? - संपादक)

थोरले बाजीराव पेशवे यांची रणनीती आजही उपयुक्त ! - ब्रिगेडियर हेमंत महाजन

        पुणे, २९ एप्रिल (वार्ता.) - अवघ्या २० वर्षांच्या कालावधीत ४१ लढाया जिंकून साम्राज्यविस्तार करणार्‍या थोरले बाजीराव पेशवे यांची रणनीती आजही उपयुक्त आहे. त्यांचे युद्धातील डावपेच चाकोरीबाह्य असायचे. त्यामुळे शत्रूला त्यांचा अंदाज यायचा नाही. ४० वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. ते जर थोडे काळ अधिक जगले असते, तर कोहिनूर हिरा भारताच्या बाहेर गेला नसता आणि ब्रिटिशांचे राज्यही उदयाला आले नसते, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने बाजीरावांच्या २७६ व्या पुण्यतिथीनिमित्त २८ एप्रिल या दिवशी बाजीरावांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या शनिवारवाड्यावर अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी श्री. महाजन बोलत होते. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, पालकमंत्री गिरीष बापट, महापौर प्रशांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी महापौर प्रशांत जगताप यांचा पेशवाई पगडी घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर होनराज मावळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पोवाडे सादर केले. बाजीराव पेशवेंच्या युद्धनीतीची वैशिष्ट्ये उलगडून दाखवतांना श्री. हेमंत महाजन म्हणाले, 
१. बाजीरावांचे सैन्य रक्षणासाठी अल्प आणि आक्रमणासाठी अधिक वापरले जायचे. शत्रूवर आक्रमण करून त्यांना त्यांचे रक्षण करायला लावण्याचे त्यांचे तंत्र आज उपयोगात आणण्याची आवश्यकता आहे. त्यांचे गुप्तहेर खातेही सक्षम होते.

मालदीवचे १२ नागरिक इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना

     बेंगळुरू - मालदीवचे १२ जणांचे एक कुटुंब इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना झाल्याचे उघड झाले आहे. भारत-अमेरिकेच्या संयुक्त अन्वेषण पथकाला मालदीवच्या या कुटुंबाला रोखणे शक्य झाले नाही. या संयुक्त पथकाने राबवलेली मोहीम हे कुटुंब भारतातून निसटल्याचे लक्षात येताच मागे घेण्यात आली आहे. 
     इराक किंवा सिरिया या देशांमध्ये जाण्यापूर्वी या कुटुंबाने त्यांचे भ्रमणभाष फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कुटुंबातील एक व्यक्ती अब्दुल्ला मुबारक हा वैमानिक असून इसिसकडून त्याचा अमेरिकेतील ९/११ सारख्या आक्रमणासाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे. मालदीवचे हे कुटुंब ३ डिसेंबर या दिवशी आजारपणाच्या नावाखाली व्हिसा मिळवून भारतात आले. भारतातून इस्तंबूलला प्रयाण करण्यापूर्वी त्यांनी भारतात १० दिवस घालवल्याचे समजते. मालदीव हे आतंकवादाचे आश्रयस्थान झाले आहे. या देशातील अंदाजे १५० नागरिक इसिसमध्ये भरती झाले आहेत.

राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !

भाजप हिंदूंच्या भावना समजून घेईल, अशी आशा आहे !
अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी 
चक्रपाणी महाराज यांची केंद्रशासनाला चेतावणी
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला नाही, तर हिंदु महासभा आणि संत सभा संपूर्ण देशात भाजपच्या विरोधात संघर्ष करतील, तसेच भाजपला मतदान न करण्याचेही जनतेला आवाहन करतील, अशी चेतावणी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. या वेळी राष्ट्रव्यापी जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज श्रीवास्तव म्हणाले, स्वामीजींच्या नेतृत्वाखाली होणार्‍या प्रत्येक लढ्यामध्ये त्यांचा पक्ष संपूर्णपणे सहकार्य करील. स्वामीजींची लढाई देशाची लढाई असून संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे.

मलेशियात हिंदु देवतांची विटंबना करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची हिंदराफ संघटनेची मागणी

हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात मलेशियातील हिंदू संघटित !
     कुआलालंपूर - मलेशियाच्या इपो शहरात हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीचा विध्वंस आणि विटंबना केल्याच्या घटनेविषयी हिंदराफ मक्कल सक्ती या संघटनेने संताप व्यक्त केला आहे. हिंदु देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदराफचे अध्यक्ष पी. वेदमूर्ती यांनी केली आहे. इस्लामचे प्रचारक हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या भेटीनंतर ही घटना घडली आहे. त्यांच्यामुळेच त्यांच्या समर्थकांना इतर धर्मांच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे श्री. वेदमूर्ती यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. झाकीर नाईक यांच्या व्याख्यानांमुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे हिंदराफने मलेशिया शासनाच्या लक्षात आणून दिले होते.

देशाच्याच पैशावर उभ्या असलेल्या; पण देशविघातक कारवायांचा अड्डा बनलेल्या देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील देशद्रोह संपवण्यासाठी शासनाने आता कठोर पावले उचलावीत !

१. विद्यार्थ्यांना देशद्रोहाचे बाळकडू 
पाजणारे देहलीतील जवाहरलाल 
नेहरू विश्‍वविद्यालय ! 
१ अ. जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय, देहली येथे ९.२.२०१६ या दिवशी घडलेली देशद्रोही घटना ! : पाकिस्तान झिंदाबाद, भारताचे शंभर तुकडे करू, कुठे रहाल ?, किती अफजलना माराल ?, प्रत्येक घरातून अफझल निर्माण होतील. भारताच्या विनाशापर्यंत हे युद्ध चालूच राहील ! हे युद्ध चालूच राहील ! काश्मीर, केरळ आणि बंगाल यांना स्वतंत्र करूनच सोडू ! अफजल, आम्ही खेद व्यक्त करतो, तुझे मारेकरी अजूनही जिवंत आहेत ! हे शब्द पाकिस्तानच्या एखाद्या नगरातून कानी पडले असते, तरी आपल्याला उत्तेजित करण्यासाठी पुरेसे होते. आपण पाकिस्तानला दूषणे देऊन शत्रूला कठोर दंड देण्याच्या घोषणा तरी केल्या असत्या; परंतु ९.२.२०१६ या दिवशी देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तोंडून हे शब्द कानी पडले.

नरेंद्र मोदी यांच्यानंतरचा गुजरात असा आहे !

     पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जगाचे नेतृत्व करत आहेत; पण ज्या गुजरातमधून ते बाहेर पडले, त्या राज्याची नेमकी परिस्थिती काय, हे समोर आले आहे. गुजरात राज्यात सर्वकाही आलबेल आहे, घराघरांतून सोन्याचा धूर निघत आहे, असे चित्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात निर्माण झाले. ते आता पूर्णपणे पालटले आहे. शासकीय ऑडिटवरून हे स्पष्ट दिसते. मोदी यांच्यानंतरचा गुजरात कसा आहे, ते सगळ्यांनीच समजून घेतले पाहिजे. 
खासदार श्री. संजय राऊत, कार्यकारी संपादक, दैनिक सामना

गुन्हेगारी वृत्ती पालटण्यासाठी साधना अपरिहार्य !

     कैदी जाहले उदंड अशी स्थिती अनुभवणार्‍या भारतात कैद्यांच्या संदर्भात एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) मुंबई शहरात महिला गुन्हेगारांच्या संख्येचा चढता आलेख असून महिला गुन्हेगारांच्या अटकेच्या संदर्भात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. (तृप्ती देसाईंना महिलांची ही प्रगती पाहून खचितच आनंद होईल !) महाराष्ट्रात गेल्या ३ वर्षांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी जवळपास ९५ सहस्र १७४ महिलांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांचे प्रवक्ता उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, पुष्कळ अल्प महिला कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हे करण्याचे सोडून देतात. या महिलांपैकी काही जण महिला गुन्हेगारांच्या टोळ्या बनवून चोरी करणे, खिसे कापणे या उद्योगांना लागतात. कारागृहातून सुटल्यानंतर या महिला अधिक गंभीर गुन्हे करण्यात सक्रिय होत असल्याचे आढळून आले आहे.

गुजरातमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण !

       कर्णावती - आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या शासनाने घेतला आहे. वार्षिक ६ लाखांपेक्षा अल्प आर्थिक उत्पन्न असणार्‍यांनाच हे आरक्षण लागू असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेटमंत्री विजय रूपाणी यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. याविषयी १ मे या दिवशी अधिसूचना काढण्यात येईल. या आरक्षणाचा लाभ पटेल समाजासह सर्व सवर्णांना मिळणार आहे.

भाभासुमंच्या टीकेमुळे गोव्यातील भाजप शासन मातृभाषाप्रेमी असल्याचे दर्शवण्यासाठी नेत्यांची धडपड

शासनाच्या अशा वरवरच्या सारवासारवीला आता भाषाप्रेमी फसतील का ?
     पणजी (गोवा) - भाजप शासनाने इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देणे चालूच ठेवून देशी भाषांशी प्रतारणा केल्याची घणाघाती टीका भारतीय भाषा सुरक्षा मंच मागील काही दिवसांपासून करत आला आहे. या टीकेला अनुसरून शासन खडबडून जागे झाले असून शासन मातृभाषाप्रेमी आहे आणि देशी भाषांपासून शासन दूर गेलेले नाही, हे जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी शासनाने आता जोरदार प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे. गेली दोन वर्षे अकारण रखडलेल्या देशी भाषांविषयक घोषणा आणि योजना यांची पूर्तता युद्धपातळीवर करण्याची आटोकाट धडपड शासनाने चालवली आहे. पुढील सूत्रांवरून हे स्पष्ट होईल.

आरोग्यासाठी उपकारक असलेले तांब्याच्या भांड्यातील पाणी !

      पूर्वी आपल्याकडे तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवले जायचे. तांब्याच्या भांड्यांमधून पाणी पिणेे आपल्या शरिराला लाभदायक असते. याला शास्त्रीय कारणेही आहेत. गुणकारी असलेली तांब्याची भांडी मात्र आता लोप पावू लागली आहेत. शहरांमध्ये तर अशी भांडी मिळणे दुरापास्तच झाले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण स्वत:चेच अहित करून घेत आहोत. आपल्याला मिळालेल्या या गुणकारी तांब्याच्या भांड्याची उपयुक्तता पाहूया, 
१. तांब्याच्या भांड्यामधून पाणी प्यायल्यामुळे शरिरातील रक्त वाढते. त्यामुळे अ‍ॅनिमियाचा धोका संभवत नाही.
२. तसेच तांब्याच्या भांड्यातून सकाळी आणि संध्याकाळी पाणी प्यायल्यामुळे सांधेदुखी दूर होते.
३. तांब्याच्या भांड्यात ८-१० घंटे ठेवलेले पाणी प्यायल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात रहाते आणि हृदयाची क्षमता वाढून हृदयविकार दूर रहातात.

नोम चोमस्की यांचा चोंबडेपणा !

     जवाहरलाल नेहरू विद्यापिठात विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या आणि देशाचे तुकडे करण्याच्या संदर्भात निर्लज्जपणे आणि उन्मत्तपणे मिरवणूक काढली. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर सर्वांनीच हे बघितले. व्हाईस चॅन्सलरच्या विनंतीवरून मिरवणूक काढणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीला पोलिसांनी विद्यापिठाच्या आवारात जाऊन पकडून या देशद्रोही विद्यार्थ्याला पोलिसांनी न्यायालयात सादर केले. या प्रकरणावरून सर्व विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस अणि साम्यवादी पक्षांच्या पुढार्‍यांनी देशात गदारोळ केला. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वतीने मिरवणुकीला पाठिंबा देत घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांच्यापुढे त्यांच्या समर्थनार्थ भाषण केले. विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्या अधिकारांवर शासनाने अतिक्रमण केले, त्यांचा आवाज दाबून टाकणे, हाच शासनाचा हेतू आहे, असा शासनावर आरोप केला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(* तोल किंवा कल अशा अर्थाने झोक शब्द मराठी आहे.)
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

निसर्ग कोपला ।

धर्म पाळत नाही म्हणून निसर्ग कोपला, वाढला अनाचार ।
दुर्भिक्ष्य वाढले पाण्याचे होऊ लागली जनतेची उपासमार ॥
धर्मबंधने टाळून धर्मद्रोही महिलांचा वाढला स्वैराचार ।
धर्म परंपरा टाळू लागलो, तर देव कसे साहाय्य करणार ॥
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल
हिंदूंनो, संख्याबळ हे आमचे शस्त्र, या भ्रमात राहू नका; कारण मेलेल्या 
१०० जणांपेक्षा १ जिवंत राज्य करतो, हे लक्षात ठेवा !सतत सेवारत आणि आनंदी असणारे चि. स्नेहल राऊत अन् कोणत्याही सेवेला सदैव तत्पर असणार्‍या चि.सौ.कां. शायरी मराठे !

      चैत्र कृष्ण पक्ष नवमी (१.५.२०१६) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरण विभागात सेवा करणारे चि. स्नेहल मनोहर राऊत आणि रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या चि.सौ.कां. शायरी वीरेंद्र मराठे हे विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्ताने साधकांनी त्यांच्याविषयी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये आणि अन्य लिखाण येथे देत आहोत.
चि. स्नेहल राऊत आणि चि.सौ.कां. शायरी मराठे
यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
 सेवेच्या तीव्र तळमळीमुळे स्वतःच्या विवाहाच्या पूर्वसिद्धतेकडे 
लक्ष न देता सेवेलाच अधिक प्राधान्य देणारे श्री. स्नेहल राऊत !
१. बोलण्या-वागण्यात नम्रपणा
        स्नेहलदादा इतरांंशी नेहमी आदराने बोलतात. लहान-मोठ्या साधकांसह बोलतांना त्यांच्यातील नम्रपणा हा गुण जाणवतो. विभागामध्ये काही सुचवायचे असेल, तर ते कधीही अधिकारवाणीने बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात पुष्कळ नम्रता आहे.

दृष्टीकोनाचा सदसद्विवेकबुद्धीने वापर करण्याचे महत्त्व !

        एका साधकाने सदसद्विवेकबुद्धीने दृष्टीकोनाचा योग्य वापर करण्याविषयी मला एक गोष्ट सांगितली. रामकृष्ण परमहंस यांचा एक शिष्य एकदा रस्त्यावरून चालला होता. त्यांच्या समोरून एक पिसाळलेला हत्ती सर्वांना तुडवत येत होता. त्या शिष्यामध्ये त्या हत्तीला थांबवण्याचे सामर्थ्य होते; पण त्याने हत्तीमध्ये देव आहे, असा दृष्टीकोन ठेवून तसाच रस्त्यावरून चालू लागला. मग तो हत्ती त्या शिष्यालाही काही प्रमाणात दुखापत करून पुढे गेला. नंतर त्या शिष्याला रामकृष्ण परमहंस भेटले आणि शिष्याने त्यांना वरील प्रसंग आणि स्वतः ठेवलेला दृष्टीकोन सांगितला. त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले, अरे ! तू रस्त्यावरील लोकांमध्ये देव का पाहिला नाहीस ? तू दृष्टीकोन अयोग्य ठिकाणी ठेवल्यामुळे त्या हत्तीने एवढी हानी केली !
- कु. शायरी मराठे (१८.१०.२०१४)

भावपूर्ण आणि गुरूंना अपेक्षित अशी सेवा करण्याची तळमळ असणारे श्री. स्नेहल राऊत !

१. चूक स्वीकारून स्वतःमध्ये पालट करणे
        २०१५ या वर्षी काही मास श्री. स्नेहल राऊत यांच्यासह सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडे निवेदकाची सेवा होती. आरंभी प्रकल्प तपासतांना त्यांच्या उच्चारांत झालेल्या चुका त्यांना सांगून ऑडियो रिटेक घ्यावा लागे. एखाद्या हिंदी अथवा इंग्रजी शब्दाचा उच्चार ते नीट समजून घेत असत आणि ते उच्चारण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असे. सहसाधकांकडून त्यांना त्यांच्या निवेदनातील चुका सांगितल्या जात. तेव्हा ते त्या सहजरित्या स्वीकारत आणि शिकण्याच्या स्थितीत राहून स्वतःच्या बोलण्यात पालट करण्याचा प्रयत्न करीत.
२. सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
         श्री. स्नेहल राऊत हे अन्य निवेदकांच्या तुलनेत निवेदनाची सेवा करतांना नवीन होते; परंतु प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी निवेदनाची सेवा ते अतिशय भावपूर्ण करीत असत. आरंभी त्यांना सुस्पष्ट हिंदी बोलण्याचा सराव करण्यासाठी पुष्कळ परिश्रम घ्यावे लागले. प्रतिदिन निवेदनाची सेवा असल्याने तिच्यातील चुका सुधारण्यासाठी श्री. स्नेहल रात्री उशिरापर्यंत जागून हिंदी बोलण्याचा सराव करायचे.

मराठी भाषेचा परिस्थितीनुसार अर्थ लक्षात घेऊन योग्य कृती करण्याचे महत्त्व !

        एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला उद्देशून म्हणते, ते बघ ते झाड !....ते बघ ते झाड ! लगेच दुसरी व्यक्ती एक झाडू आणून तो परिसर झाडायला (केर काढायला) लागते. येथे पहिली व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला झाड बघायला सांगत होती. दुसरी व्यक्ती सांगकाम्याप्रमाणे कृती करते.
        या प्रसंगावरून शिकायला मिळाले, कोणतेही सूत्र सांगतांना ते समोरच्याला नीट समजले आहे का ?, याची निश्‍चिती केली पाहिजे. तसेच इतरांना कोणतेही सूत्र सांगितल्यास ऐकणार्‍याने आपण जे ऐकले वा आपल्या जे लक्षात आले, ते योग्य आहे का ? याची निश्‍चिती केली पाहिजे.
- कु. शायरी मराठे (१८.१०.२०१४)

वाग्दत्त वधू - चि.सौ.कां. शायरी मराठे हिच्यासारखी जीवनसाथी मिळाल्याविषयी श्री. स्नेहल राऊत यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि टिपलेली तिची गुणवैशिष्ट्ये !

१. शिकण्याची वृत्ती
        कु. शायरीमध्ये उपजतच नेतृत्वगुण आणि नियोजनकौशल्य आहे. लहान वयातही तिने आश्रमात होणार्‍या विवाहांचे नियोजन, आश्रमसेवांचे नियोजन, तसेच बाहेरून येणार्‍या अतिथींच्या सेवेचेे नियोजन शिकून घेतले.
२. चिकाटीने प्रयत्न करणे
        साधनेत कितीही चढउतार आले, तरी ती न डगमगता त्यांना सामोरी जाते. तिच्यात प.पू. डॉक्टरांप्रती भाव आणि साधनेची तळमळ आहे. देवाला अपेक्षित असे स्वतःला घडवण्यासाठी ती चिकाटीने प्रयत्न करते.

श्री. सिद्धेश आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सायली करंदीकर यांनी विवाहानंतर पू. सौरभ जोशी यांची भेट घेतली तो क्षण !

श्री. सिद्धेश आणि सौ. सायली करंदीकर यांना खाऊ देतांना पू. सौरभदादा

बिंब-प्रतिबिंब या न्यायानुसार संतांची प्रीती अनुभवता येणे !

        मी सनातन पंचांगाच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मला पू. सौरभदादांना भेेेटण्याची संधी मिळाली. पू. सौरभदादांना भेटल्यानंतर गुरुदेवांच्या कृपेने काही सूत्रे लक्षात आली.
१. पू. सौरभदादांना भेटायला गेल्यावर भीतीमुळे काहीही न बोलता केवळ त्यांचे दर्शन घेऊन परत येणे : मी पू. दादांना या आधीही भेेेेेटायला जात होते; परंतु माझ्यातील नकारात्मकता आणि मला वाटत असलेल्या भीतीमुळे त्यांच्याशी काय आणि कसे बोलायचे ?, असे विचार यायचे. या विचारांमुळे मी तिथे जात होते आणि केेेेवळ दर्शन घेऊन परत येत असेे.
२. पू. दादांकडे गेल्यावर त्यांच्याशी बोलायला शब्द सुचणे आणि बोलतांना आनंद जाणवणे अन् पू. दादांनी उपाय करणे : एकदा पू. दादांना भेटायला गेल्यावर मला अकस्मात् त्यांच्याशी बोलायला शब्द सुचू लागले आणि बोलतांना पुष्कळ आनंद जाणवू लागला. त्या वेळी मला प्रथमच पू. दादांची प्रीती अनुभवायला मिळाली.

ब्रह्मानंदी ज्यांची नित्य लागे टाळी । तयाच्या देहासी कोण सांभाळी । याची अनुभूती देणारे पू. सौरभदादा जोशी यांचे श्री, म्हणजेच आम्हा सर्व साधकांचे प.पू. डॉक्टर !

      चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी (३० एप्रिल २०१६) या दिवशी पू. सौरभ जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. संजय जोशी आणि अन्य साधकांनी केलेले लिखाण येथे देत आहोत.
पू. सौरभ जोशी यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
        कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील संत परमहंस भालचंद्र महाराज यांचा ३८ वा पुण्यतिथी सोहळा १४ ते १८.१२.२०१५ या कालावधीत त्यांच्या समाधी मंदिरात भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर पुढील लिखाण होते.
भालचंद्र नामी रंगले हे जग ।
जाती देहभान विसरून ॥
ब्रह्मानंदी ज्यांची नित्य लागे टाळी ।
तयाच्या देहासी कोण सांभाळी ॥
अनाथांचा नाथ आहे समाधीत ।
अंतरीचा दिवा ठेवा तो तेवत ॥
         या काव्यपंक्ती वाचल्यावर पुढील विचारप्रक्रिया झाली.

विकलांग असूनही श्रींना (प.पू. डॉक्टरांना) अपेक्षित असे घडण्याची तळमळ असणारे पू. सौरभदादा !

१. सहनशीलता 
कु. प्रियांका जगताप
        पू. सौरभदादांच्या शरिरात जीवनसत्वांचे प्रमाण अल्प झाल्यामुळे त्यांच्या दातांचे तुकडे पडतात, तरीही प्राजक्ताकाकू (सौ. प्राजक्ता जोशी) जेव्हा त्यांचे दात घासतात, तेव्हा दात दुखत असतांनाही ते त्यांना कधी त्रास देत नाहीत. ते कधीच बोट चावत नाहीत. त्यांना वेदना होत असूनही ते आवाजही करत नाहीत. त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत असते, तरी त्यांच्या तोंडवळ्यावर आनंदच असतो.
२. सूक्ष्मातून जाणणे
अ. प्रशिक्षणवर्ग चालू झाल्यावर त्यांच्या खोलीत आवाज येतो. तेव्हा ते हातांच्या मुठी घट्ट बंद करतात. (वर्गात जशी मूठ बंद करण्यास सांगितली आहे, अगदी त्याच प्रकारे ते मूठ बंद करतात. प्रत्यक्षात त्यांना मूठ कशी बंद करायची, हे कुणीच दाखवले नाही.)
आ. पू. दादांना प्रशिक्षण वर्गातील काही साधक भेटण्यास गेले, तर ते अचूक सावधान पवित्रासिद्ध या पवित्र्यात हात ठेवतात आणि आवाज करतात. प्रत्यक्षात हा प्रकार त्यांना कोणी दाखवलेला नाही. पू. दादा प्रशिक्षणवर्ग घेणार्‍या साधकांना अचूूक ओळखून ते दिसल्यावर तशी मुद्रा करतात. एकदा एक साधक पू. दादांवर बिंदूदाबनाचे उपाय करत असतांना त्यांना पुष्कळ वेदना होऊ लागल्या. त्या वेळी प्रशिक्षणात जसा रोध करतात, तसाच रोध त्यांनी २ - ३ वेळा केला. रोध हा प्रतिकार करण्याचा एक प्रकार आहे.

मी कोण ?, याची ओळख होण्यासाठी गुरुकृपा हवी, जी केवळ गुरुमाऊलीच करू शकते, याची जाणीव करून देणारा एक प्रसंग !

        मी नेहमीप्रमाणे पू. सौरभदादांच्या हातात दैनिक सनातन प्रभातचा १४.३.२०१६ या दिवशीचा अंक दिला. दैनिकाच्या पृष्ठ क्रमांक ७ वरील आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांनी गुरुकृपेचे महत्त्व विशद करणारे लिहिलेले काव्य मी पू. सौरभदादांना वाचून दाखवले. त्या वेळी पू. दादा थोडे हसले. त्यानंतर काही वेळाने दुर्गेशदादा मला त्यांच्या खोलीत जातांना दिसले; म्हणून मी त्यांना हाक मारून खोलीत बोलावले. गुरुकृपेचे महत्त्व विशद करणारे काव्य लिहिल्याबद्दल मी त्यांना खाऊ दिला. त्यानंतर दुर्गेशदादांनी पू. सौरभदादा यांच्याजवळ येऊन त्यांना नमस्कार केला. त्या वेळी त्यांचा पू. सौरभदादांशी पुढील संवाद झाला.
मी : पू. दादा, ओळखलंत का ?
पू. दादा : कोण ?
मी : दुर्गेशदादा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या 
व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक 
हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर पुढील प्रक्रिया करा !
        आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती
        प्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो.

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

गणेश चतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास 
इच्छुक असल्यास रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करा !
        प्रवासाच्या दिनांकाच्या १२० दिवस आधीपासूनच तिकीट आरक्षण चालू होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी काही मासांपूर्वी घोषित केले होते. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणार्‍यांनी ४ मास अगोदरच आरक्षण करण्यास आरंभ केला आणि ३ दिवसांत सर्व तिकीटे आरक्षित झाली. त्यामुळे नंतर आरक्षण करणार्‍यांची असुविधा (गैरसोय) झाली.
       ५.९.२०१६ या दिवसापासून गणेशोत्सवाला आरंभ होत असून त्यासाठीचे आगाऊ आरक्षण (अ‍ॅडव्हान्स् बूकिंग) चालू झाले आहे. सणासुदीच्या काळात रेल्वेची सर्व तिकीटे आरक्षित झाल्यानंतर बसच्या तिकीटदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली जात असल्याने प्रवाशांना अधिक मूल्य देऊन तिकीट काढावे लागते. त्यामुळे ज्यांना गणेश चतुर्थीच्या कालावधीत गावाला जायचे असेल, त्यांनी त्वरित रेल्वे तिकिट आरक्षित करून घ्यावे. अन्यथा नंतर आरक्षण मिळण्यात अडचण येऊ शकते.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.४.२०१६)
       पूर्वी जगात केवळ हिंदूच होते. आता ८९ देश ख्रिस्ती आणि ८० देश मुसलमानांचे आहेत. आज या धरणीवर एकही हिंदु देश नाही. (सावरकर टाइम्स, मे २०१०)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

      गांधीजींनी मंत्रीमंडळाच्या निर्णयाला हरकत घेऊन शासकीय निधी न वापरता सोमनाथ मंदिर पुनरुद्धारासाठी जनतेचा पैसा वापरावा असा आग्रह का धरला ? आणि जानेवारी १९४८ मध्ये देहलीतील मशिदींच्या पुरुज्जीवनासाठी शासकीय खजिन्यातील पैसाच वापरावा असे दडपण नेहरू आणि पटेल यांच्यावर का आणले ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

चि.सौ.कां. शायरी झाली श्री. स्नेहल यांची धर्म सहचारिणी ।

सौ. वृंदा - वीरेंद्र यांची ही लाडकी छकुली ।
आहे फारच गोडुली गोडुली ॥ १ ॥
ही आहे शौनकची प्रेमळ बहीण ।
गुरुसेवेत असते सतत रममाण ॥ २ ॥
हर्षदाची ही आहे आध्यात्मिक मैत्रीण ।
विवाहादी सर्व सेवांचे करी कुशल नियोजन ॥ ३ ॥

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
        सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंना असहिष्णु ठरवणारी प्रसारमाध्यमे 
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर गप्प का ?
       बांगलादेशच्या गोपालगंज जिल्ह्यातील तुंगीपारा येथे सर्वस्वाचा त्याग करून समाजसेवा आणि हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या परमानंद राव या साधूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी शरिफुल शेख या युवकाला अटक करण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladesh ke Gopalganj jileme ek dharmandhane dharmaprasar karnewale Hindu sadhuki hatya ki.
Hinduonko asahishnu batanewali media ab chup kyo ?
जागो ! : बांगलादेश के गोपालगंज जिले में एक धर्मांध ने धर्मप्रसार करनेवाले हिन्दू साधू की हत्या की ।
हिन्दुआें को असहिष्णु बतानेवाली मीडिया अब चुप क्यों ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
देशाच्या दुःस्थितीचे मूळ कारण लक्षात 
न घेता, वरवरचे उपाय करणारे शासन !
       देशाच्या आज झालेल्या दुर्दशेचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे जनता राजसिक आणि तामसिक होणे. ही परिस्थिती पालटण्यासाठी, म्हणजेच जनतेला सात्त्विक बनवण्यासाठी सनातन संस्था समाजात धर्मशिक्षण देऊन धर्मपालनाचा आणि साधनेचा प्रसार करते. धर्मपालन आणि साधना केल्याने व्यक्तीची सात्त्विकता वाढते. सनातनचे सर्वच उपक्रम समाजात सात्त्विकता वाढवणारे आहेत. समाजाची सात्त्विकता वाढल्यानंतरच देशाची स्थिती सुधारेल ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

गुरूंकडे काय मागावे ?
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
माझ्याकडे सुख मागू नका,
 दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आधाराची अपेक्षा नको 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना, धारिष्ट्य करून स्वतःच्या पायांवर उभे रहाणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


मर्यादेचे उल्लंघन आणि समानता

संपादकीय 
      पुरोगामी तृप्ती देसाई यांनी कथित स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली चालू केलेल्या धर्मातील हस्तक्षेपामुळे समाजात सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये समानतेचे सूत्र नेमके कोणते साधले जात आहे, ही मात्र विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. त्यामुळे ज्या स्त्रियांवर समाजात खरोखर अन्याय होत आहे, त्यांचे दुःख दूर झाले का ? त्यामुळे समानतेचे सूत्र बाजूलाच पडून प्रसिद्धीची हाव मात्र भागवली जात आहे.

ऑगस्टा...दुसरा बोफोर्स ?

संपादकीय
      ऑगस्टा वेस्टलॅण्डच्या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या सूत्रामध्ये डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्यामुळे २ दिवसांपासून राज्यसभा गाजत आहे. वर्ष २०१० मध्ये तत्कालीन युपीए शासनाने ऑगस्टा वेस्टलॅण्ड इटलीतील या आस्थापनाकडून अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३,६०० कोटी रुपयांत १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता; मात्र नंतर त्यात घोटाळा झाल्यामुळे तो रहित करण्यात आला होता. या प्रकरणी ३६० कोटी रुपयांची लाच दिल्याचे समोर आले होते. यामध्ये भारताच्या तत्कालीन वायुदलप्रमुख त्यागी यांच्यासह काही राजकारण्यांचा समावेश असल्याचे लक्षात आले आहे. इटलीच्या न्यायालयाने याविषयी दिलेल्या निकालात त्यागी यांचे नाव ठळकपणे दिले आहे. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी लाच घेणार्‍यांची नावे सोनिया गांधींनी घोषित करावीत, असे सांगितले आहे. बोफोर्स तोफा घोटाळ्यानंतर काँग्रेसचे इटलीशी संबंध या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn