Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हाजी अली दर्गा प्रवेशाच्या आंदोलनाचा फज्जा !

 आक्रमक मुसलमानांच्या घेरावानंतर पोलिसांनी तृप्ती देसाई यांना अज्ञातस्थळी नेले !
एम्आयएम्, मुस्लिम लीग आणि समाजवादी पक्ष यांचा तीव्र विरोध !
  • हिंदूंनो, मुसलमानांकडून धर्मप्रेम शिका ! हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे आणि असंघटितपणामुळे धर्मपरंपरा मोडत मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार्‍या तृप्ती देसाई यांना मात्र मुसलमानांच्या आक्रमतेमुळे आणि संघटितपणामुळे दर्ग्यात प्रवेश न करताच पोलीस संरक्षणात पळ काढत अज्ञातस्थळी जावे लागले !
  • तृप्ती देसाई पोलिसांच्या साहाय्याने मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करू शकल्या; मात्र पोलीस संरक्षण असतांनाही त्या दर्ग्यात प्रवेश करू शकल्या नाहीत, उलट मुसलमानांच्या आक्रमकतेमुळे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. याचा अर्थ हिंदू कायदा पाळतात, असाच होतो !
      मुंबई - भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही आणि प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई हाजी अली सबके लिए नावाने आततायी आंदोलन करत हाजी अली दर्ग्यातील मजारला हात लावण्यासाठी २८ एप्रिल या दिवशी संध्याकाळी दर्ग्याबाहेर पोहोचल्या. या वेळी दर्ग्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमलेल्या एम्आयएम्, मुस्लिम लीग आणि समाजवादी पक्ष यांच्या मुसलमान कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक आंदोलन करत आणि घोषणा देत तृप्ती देसाई यांच्या गाडीला घेराव घातला. या वेळी तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तृप्ती देसाई यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये; म्हणून त्यांना वरळीच्या मार्गाने अज्ञातस्थळी नेले. त्यामुळे पोलीस संरक्षणात दर्ग्यात जाणार, अशा वल्गना करणार्‍या तृप्ती देसाईंच्या आंदोलनाचा चांगलाच फज्जा उडाला.

अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट

काँग्रेसप्रमाणे आताच्या शासनाच्याही राजवटीत हिंदूंना जिहादी 
आतंकवादाच्या सावटाखाली यात्रा कराव्या लागणे, हे लज्जास्पद !
  • यात्रेस २ जुलैपासून आरंभ
  • यात्रा सुरळीत पार पडू न देण्याचा आतंकवाद्यांचा निश्‍चय
      श्रीनगर - यंदा अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना आतंकवादी कृत्यांचा त्रास होऊ नये; म्हणून सुरक्षायंत्रणांनीही जोरदार सिद्धता चालू केली असून आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास, तसेच संशय येताच छापे मारण्यास आरंभ केला आहे.
     अमरनाथ यात्रेत हिजबूल मुजाहिदीन ही जिहादी आतंकवादी संघटना अडथळे आणील किंवा काही आतंकवादी कृत्ये करील, अशी भीती अन्वेषण यंत्रणांनी व्यक्त केली आहे. हिजबूल मुजाहिदीनमध्ये तरुणांची भरती करणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या म्हणण्यातून ही यात्रा सुरळीत होऊ द्यायची नाही, असे या संघटनेने ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षादले यांना आतापासूनच सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या विधानावरून काँग्रेसी खासदारांचा दुसर्‍या दिवशीही गदारोळ !

गदारोळ करून जनतेच्या पैशांचा अपव्यय करणार्‍या खासदारांकडून हा पैसा वसूल करा !
     नवी देहली - राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून पुन्हा राज्यसभेत प्रवेश केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या एका विधानावरून काँग्रेसच्या सदस्यांनी २८ एप्रिलला राज्यसभेत प्रचंड गदारोळ केला. डॉ. स्वामी यांनी काँग्रेसचे खासदार इटलीची राज्यघटना मानतात, असे विधान केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या खासदारांनी उपाध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत डॉ. स्वामी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी डॉ. स्वामी रस्त्यावरची भाषा राज्यसभेत बोलत आहेत, अशा शब्दांत टीका केली. डॉ. स्वामी जोपर्यंत त्यांचे विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांना सभागृहात बोलूच न देण्याचा पवित्रा काँग्रेसच्या खासदारांनी घेतला. शेवटी कुरियन यांनी डॉ. स्वामी यांचे विधान कामकाजातून वगळण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर या नाट्यावर पडदा पडला. २ दिवसांत २ वेळा डॉ. स्वामी यांचे वक्तव्य संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले.

सत्त्वयुक्त आहाराने हृदयविकारावर नियंत्रण !

     मेलबर्न (ऑस्टे्रलिया) - भूमध्य प्रदेशातील आहाराने हृदयविकारावर नियंत्रण मिळवता येते, असा दावा ऑस्ट्रेलियातील आहारतज्ञांनी केला आहे. भूमध्य प्रदेशातील आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि प्रक्रिया न केलेले अन्न यांचा समावेश होतो. ज्यांना हृदयविकार आणि पक्षाघात यांचा त्रास आहे, त्यांनी प्रतिदिनच्या आहारात भूमध्य प्रदेशातील आहाराचा समावेश केला, तर त्यांना निश्‍चितच लाभ होतो, असे आरोग्यतज्ञांनी म्हटले आहे.

अल्प गुणवत्तेच्या चिनी उत्पादनांवर भारतात बंदी !

चीनच्या केवळ अल्प गुणवत्तेच्या वस्तूंवर बंदी नको, तर सर्वच वस्तूंवर बंदी घाला !
शत्रूराष्ट्राच्या वस्तूंना देशात बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आत्मघात होय !
केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन् यांची लोकसभेत माहिती
दूध, दुग्धजन्य पदार्थ, भ्रमणभाष संच आदी वस्तूंचा समावेश
     नवी देहली - चीनमधून आयात केल्या जाणार्‍या गुणवत्तापूर्ण उत्पादन नसलेल्या दूध, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तूंसह आयएम्ईआय क्रमांक आणि इतर सुरक्षाविषयक सुविधा नसलले भ्रमणध्वनीसंच यांवरही केंद्रशासनाने बंदी घातली आहे. चिनी वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याविषयी खासदार भोला सिंह यांच्यासह काही सदस्यांनी लोकसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला उत्तर देतांना माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन् यांनी वरील माहिती दिली. (चीनकडून देशात अल्प गुणवत्तेची सहस्रो उत्पादने विकली जात आहेत. त्यामुळे अब्जावधी भारतीय पैसा चीनमध्ये जात आहे, तसेच भारतातील अनेक लहान उद्योग डबघाईस आले आहेत. त्यामुळे चीनच्या सर्वच वस्तूंवर बंदी घालणे श्रेयस्कर आहे ! - संपादक)
     या वेळी केंद्रीय मंत्री सीतारामन् म्हणाल्या, जागतिक व्यापार कराराच्या नियमानुसार एखाद्या राष्ट्राशी आपले राजनैतिक किंवा सैनिकी वाद असले, तरी आयातीवर प्रतिबंध घालणे अशक्य आहे. चीनमधून दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्रातील वस्तूंची मोठी आयात होत असून चीनबरोबरचा व्यापार तोट्यात आहे.

(म्हणे) दिवसा पूजा आणि स्वयंपाक करू नका !

आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरीप्रमाणे निर्णय घेणारे बिहार शासन !
आगीच्या घटना रोखण्यासाठी बिहार शासनाचा जनतेला अजब सल्ला !
     पाटलीपुत्र (पाटणा) - उन्हाच्या तीव्रतेमुळे बिहार राज्यात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी शासनाकडून सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांनी विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांनी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पूजा, हवन किंवा स्वयंपाक करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. बिहारमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव व्यासजी म्हणाले की, उन्हाच्या तीव्रतेमुळे गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये आगीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ६० जण मृत्यूमुखी पडले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे.

पाक सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी भारत लेझरचे कुंपण बांधणार !

पाकला कायमचा धडा शिकवणे, हाच घुसखोरी रोखण्याचा प्रभावी उपाय होय !
     नवी देहली - पंजाबमधील भारत-पाक सीमेवर लेझर किरणांच्या साहाय्याने कुंपण घालण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात एका पोलीस ठाण्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर उपाययोजना काढतांना हा निर्णय घेण्यात आला. या कुंपणामुळे घुसखोर, गुप्तहेर आणि तस्कर यांना रोखणे शक्य होणार आहे.

जपान नेताजींविषयी २ धारिका सार्वजनिक करणार !

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एका प्रमुख क्रांतीकारकाशी संबंधित धारिका सार्वजनिक 
करण्यासाठी ६९ वर्षे उलटावी लागली, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद !
केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांची लोकसभेत माहिती 
   नवी देहली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित असलेल्या ५ पैकी २ महत्त्वपूर्ण धारिका या वर्षाच्या शेवटी सार्वजनिक करण्याचा निर्णय जपान शासनाने घेतला आहे. त्यामुळे या धारिकांच्या माध्यमातून नेताजींच्या संदर्भातील अनेक रहस्य जगासमोर येण्याची शक्यता आहे. तथापि त्यांच्या कह्यात असलेल्या तेवढ्याच महत्त्वाच्या अन्य ३ धारिकांविषयी जपानने ठोस आश्‍वासन दिले नाही; परंतु त्याही धारिका सार्वजनिक करण्यात येतील, अशी आम्हाला आशा आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले.

मनुष्यबळाअभावी केंद्रीय अन्वेषण विभागाची यंत्रणाच कोलमडून पडेल ! - केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा

मेरा भारत महान !
अजूनही १ सहस्र ५३१ पदे रिक्त !
     नवी देहली - केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) कर्मचार्‍यांचा अभाव आहे. आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आमची संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल, अशी चेतावणी या विभागाचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिली. संसदीय समितीपुढे सीबीआयची बाजू मांडतांना ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत सीबीआयकडे येणार्‍या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांकडूनही अधिक प्रकरणे आमच्याकडे येत आहेत. वर्षाला सुमारे ७०० प्रकरणांचा तपास करण्याची आमची क्षमता असतांना ही संख्या दुप्पट झाली आहे. सध्या आमच्याकडे देशातील १ सहस्र २०० आणि विदेशांतील ६२ प्रकरणे तपासासाठी आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून आमच्याकडे पडून आहेत. सीबीआयमधील रिक्त जागांची संख्या १ सहस्र ५३१ वर पोहोचली आहे. आम्हाला ७ सहस्र २२४ पदांची मान्यता असतांना इतक्या जागा रिक्त राहिल्याचा परिणाम तपासावर होत आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संसदीय समितीने रिकामी पदे भरण्याविषयी केंद्रशासनाने लवकर आढावा घ्यावा, असे सुचवले आहे. एवढी पदे रिकामी असल्याविषयी समितीने तीव्र चिंताही व्यक्त केली आहे.

काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

     श्रीनगर - पुलवामा जिल्ह्यात सैन्याने केलेल्या कारवाईत २ आतंकवादी ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. (आतंकवादग्रस्त भारत ! - संपादक) नैना बातापोरा गावाजवळ सुरक्षा दलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात चकमक उडाली. यानंतर लपून बसलेल्या आतंकवाद्यांच्या विरोधात सैन्याने शोधमोहीम चालू केली. या वेळी आतंकवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. यास सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात २ आतंकवादी जागीच ठार झाले.

महाराष्ट्रातील पशूधनाची बांगलादेशात तस्करी

अधर्माचरण वाढल्यानेच दुष्काळ उद्भवतो ! हे पालटण्यासाठी 
गोवंशियांची विक्री नव्हे, तर धर्माचरणच आवश्यक !
दुष्काळ आणि गोहत्याबंदी यांमुळे शेतकर्‍यांकडून व्यापार्‍यांना पशूधनाची विक्री
     गौहत्ती - महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी असल्यामुळे राज्यातील पशूवधगृहांना गोधनाची विक्री करता येत नाही. त्यामुळे चोरटी तस्करी करणार्‍या गोतस्करांना येथील गोधन स्वस्तात उपलब्ध झाले असून त्याला आसाम मार्गाने बांगलादेशात पाठवण्यात येत आहे. सीमेवरील पोलिसांनी काही पशूधन तस्करांना पकडल्यावर त्यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे. 
     कोलकात्यातील एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, महाराष्ट्रातील सततच्या दुष्काळामुळे येथील शेतकरी त्यांचे पशूधन मोठ्या प्रमाणात अल्प भावात व्यापार्‍यांना विकत आहेत. हे पशूधन घेऊन गोतस्कर आसामच्या बांगलादेशाला लागून असलेल्या सीमावर्ती धुबरी जिल्ह्यातून बांगलादेशात पाठवत आहेत. या पशूधनाची तस्करी सीमा सुरक्षा दलाचे पोलीस नेहमीच पकडत असतात.



भारतात १ वर्षात ३२ सहस्र ७७ बलात्कार

संस्कृतीप्रधान भारत झाला बलात्कार्‍यांचा देश ! या बलात्कार्‍यांना कठोर शासन करा !
     नवी देहली - वर्ष २०१५ मध्ये देशभरात अनुमाने ३२ सहस्र ७७ बलात्काराच्या घटना घडल्या असून त्यात १ सहस्र ७०६ घटना सामूहिक बलात्काराच्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी यांनी राष्ट्रीय गुन्हेगार नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे राज्यसभेत दिली. केंद्रशासनाने बलात्कार पीडितांच्या साहाय्यासाठी एक योजना सिद्ध केली असून त्याकरता प्रारंभी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे, असेही चौधरी यांनी सांगितले. (शासनाने देशातील महिलांना सुरक्षा पुरवण्यासह स्वसंरक्षण प्रशिक्षणही द्यावे ! - संपादक)

इसिसकडून भारतातील सदस्यांना बॉम्ब बनवण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन

     नवी देहली - इसिसकडून भारतातील तिच्या सदस्यांपर्यंत बॉम्ब बनवण्याची माहिती पोहोचवण्यासाठी बॉम्ब बनाने का आसान तरीका हा व्हिडिओ जस्टपेस्ट.इट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडिओ इसिसमध्ये सहभागी भारतीय मुसलमान युवकांंपर्यंत पोहोचवण्यासाठी किकसारख्या गुप्त संदेश माध्यमांचा आधार घेण्यात आला आहे. यात आगपेटीतील काडीपासून बॉम्ब कसा बनवता येईल, याचे धडे दिले आहेत. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली. 
१. बेंगळुरूमधील एका चर्चवर २८ डिसेंबर २०१४ या दिवशी केलेल्या बॉम्ब आक्रमणाच्या प्रकरणी सिमीचा माजी सदस्य आलमबाझ आफ्रिदीला अटक करण्यात आली होती. त्याने बॉम्ब बनवल्याची स्वीकृतीही दिली. एका अज्ञाताने किकद्वारे माहिती पुरवल्याचे आलमबाझने चौकशीच्या वेळी सांगितले. 
२. या माहितीत बॉम्बस्फोट करण्यासाठी काडीपेटी, साखर आणि अन्य मिश्रण यांचा वापर केला होता.


गेल्या सव्वा दोन वर्षांत पुणे शहर पोलिसांनी केले ४०० गुंडांचे स्थानांतर

स्थानांतर करून गुन्हेगारी थांबल्याचे उदाहरण पोलिसांकडे आहे का ? 
यापेक्षा गुंडावर कठोर कारवाई केल्यासच गुन्हेगारीला आळा बसेल !
     पुणे - गेल्या सव्वा दोन वर्षांत पुणे शहर पोलिसांनी गुंडगिरी संपवण्यासाठी ४०० गुंडांवर स्थानांतराची (तडीपारीची) कारवाई केली आहे. यामध्ये १४ गुन्हेगारी टोळ्यांचाही समावेश आहे.
१. वर्ष २०१४ मध्ये पुणे शहरातून २०८, वर्ष २०१५ मध्ये १६७, तर मार्च २०१६ च्या शेवटी ३३ गुंडांचे स्थानांतर करण्यात आले आहे. पोलिसांकडे ५० हून अधिक गुंडांचे प्रस्ताव स्थानांतरणासाठी प्रलंबित आहेत.
२. स्थानांतर केलेल्या १४ गुन्हेगारी टोळ्यांमधील ७६ गुंडांचाही त्यात समावेश आहे.

नंदुरबार येथे सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने फळवाटप

    
फळवाटप करतांना कार्यकर्ते
      नंदुरबार - येथे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना २४ एप्रिल २०१६ या दिवशी सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने पंडितजी सुरेशजी जैन यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले.
     या वेळी १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमाला सर्वश्री मयुरभाऊ चौधरी, आकाश गावित, शुभम कलाल, सतीश बागुल यांचे सहकार्य लाभले.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये उघडपणे वेश्याव्यवसाय चालतो ! - प्राध्यापक समितीचा अहवाल

  • विद्यापीठ शिकवण्यासाठी आहे कि देशविरोधी आणि अनैतिक कृत्यासाठी ?
  • नेहरूंच्या नावाने चालणार्‍या या विद्यापिठात अनैतिक कृत्ये केली जाणे, हे काँग्रेसला मान्य आहे का ?
  • केंद्रशासन उत्तरदायींवर कारवाई करून या विद्यापिठाचे शुद्धीकरण करण्याचे धाडस दाखवणार का ?
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील ११ प्राध्यापकांच्या एका समितीने विद्यापिठात चालत असलेल्या गैरप्रकारांविषयी २०० पानी अहवाल सिद्ध करून तो कुलगुरूंना सादर केला आहे. त्यात विद्यापिठात उघडपणे वेश्याव्यवसाय चालतो, असा मुख्य आरोप करण्यात आला आहे. हा अहवाल वर्ष २०१५ मध्येच सिद्ध करण्यात आला आहे; मात्र त्यावर विद्यापिठाच्या प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही, असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला हवी ! - डॉ. योगेश पाटील

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
    धुळे - गोहत्या होणे, हे लज्जास्पद आहे. यासाठी सर्वांना संघटित होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेश पाटील यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुळवले यांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर येथील चिंचपूर बंधार्‍यातील पाण्याची चोरी टाळण्यासाठी सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त

      सोलापूर - उजनी धरणातील पाण्याने भरून घेतलेल्या चिंचपूर बंधार्‍यातील पाण्याची चोरी टाळण्यासाठी सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त काळम-पाटील यांनी दिली आहे.
     सध्या सोलापूर शहराला ४ दिवसांनी पाणीपुरवठा चालू करण्यात आला आहे. चिंचपूर बंधार्‍यामध्ये पाणी भरण्यासाठी पालिकेने ५ कोटी ५० लक्ष रुपये व्यय करून पाणी विकत घेतले आहे. असे असतांना बंधार्‍याच्या दरवाजाला गळती लागून पाणी खालच्या बाजूला वाहून जात आहे. त्यामुळे ते तातडीने दुरुस्त करण्याची सूचना नगरसेवकांनी केली आहे. (ही गोष्ट पालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांच्या स्वतःहून लक्षात का येत नाही ? विकत घेतलेले जे पाणी वाया गेले, त्याचे मूल्य संबंधितांकडून वसूल करायला हवे. - संपादक) मागच्या वर्षीही अशाच प्रकारे पाण्याला गळती लागली होती. (वरवरच्या उपाययोजना करणारे पालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग ! - संपादक)

पुण्यातील खडकवासला कालव्याला १२ ठिकाणी मोठी गळती

* खडकवासला कालवा कित्येक वर्षे दुरुस्तीविना 
* कालव्याचे अस्तरीकरण फुटल्याने काही ठिकाणी धोका 

     पुणे, २८ एप्रिल - पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला कालव्याची दुरुस्ती कित्येक वर्षे झालेली नाही. सध्या कालव्याला १२ ठिकाणी मोठी गळती लागली असून अनेक ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण फुटून काही ठिकाणे धोकादायक बनली आहेत, तसेच काही ठिकाणी वैध आणि अवैधपणे कालव्यातून पंप आणि मोटारी लावून पाणीउपसा होत आहे. हे धक्कादायक वास्तव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या खडकवासला कालव्याच्या भेटीच्या वेळी दिसून आले. याविषयी मंत्रीमहोदयांनी उपस्थित जलसंपदा अधिकार्यांयकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे उत्तर नव्हते. (जलसंपदा विभागाचा समाजद्रोही कारभार ! पाण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणार्यार विभागाच्या संबंधित कर्मचार्यांरची चौकशी करून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक) 

मोहसीन शेख मृत्यूच्या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेच्या तिघांना उच्च न्यायालयाकडून जामीन

हडपसर (जिल्हा पुणे) भागात झालेल्या दंगलीचे प्रकरण 
     पुणे, २८ एप्रिल - छत्रपती शिवाजी महाराज यांची 'फेसबुक' या सामाजिक संकेतस्थळावर अपकीर्ती केल्याप्रकरणी २ जून २०१४ या दिवशी येथील हडपसर भागात दंगल झाली होती. या दंगलीत झालेल्या दगडफेकीत मोहसीन शेख मोहम्मद सादिक याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हिंदु राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २२ जणांना अटक केली होती. त्यातील तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. 

साधन-सुविधेचा अभाव आणि उष्णता यांमुळे सिंहस्थपर्वात लोकांची उपस्थिती अल्प !

* योग्य नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा !
* पाण्याचा अपुरा पुरवठा 
* चोर्‍यांमुळे साधू-संत अप्रसन्न
एका मंडपात भाविकांची अल्प
उपस्थिती दिसत आहे
       उज्जैन, २८ एप्रिल (वार्ता.) - सिंहस्थपर्वासाठी मध्यप्रदेश शासानाने उज्जैन शहरापासून १९ किमीपर्यंत परिसरात विविध आखाडे, खालसे, संप्रदाय आदींना जागा उपलब्ध करून दिली आहे. यात सुमारे ५ सहस्रांहून अधिक मोठे मंडप उभारण्यात आले आहेत; मात्र ठिकठिकाणी बॅरीकेट्स (अथडळे) लावणे, सार्वजनिक वाहनाची सोय नसणे आणि कडक उन्हाळा यांमुळे सिंहस्थपर्वामध्ये येणार्‍यांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा पुष्कळ अल्प आहे. पहिले अमृत (शाही) स्नान होऊन चार दिवस झाल्यानंतरही सिंहस्थपर्वामध्ये लोकांची उपस्थिती खूपच अल्प आहे.

कुराण वाचा असे घटनेत लिहिले आहे का ? - योगऋषी रामदेवबाबा

     नवी देहली - द्वेषयुक्त भाषण करणे चुकीचे आहे. इस्लाम धर्माचे पालन करा आणि कुराण वाचा, असे घटनेमध्ये लिहिले आहे का ? असा प्रश्‍न योगऋषी रामदेवबाबा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना उपस्थित केला. भारतमाता की जय असे घटनेत लिहिले आहे का, या एम्आयएम्चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्‍नावर रामदेवबाबा यांनी वरील उत्तर दिले.

मोहरमच्या मिरवणुकीत डी.जे. वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी अल्ताफ अजमखान यास शिक्षा

     नगर - वर्ष २०१३ मधील मोहरमच्या मिरवणुकीत डी.जे. वाजवून ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी डी.जे. चा मालक अल्ताफ अजमखान यास नगरचे प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश एम्.एस्. तोडकर यांनी एक मास कैद आणि ५ सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. डी.जे. वाजवल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. शासकीय अधिवक्ता सचिन सूर्यवंशी यांनी या प्रकरणात शासनाची बाजू मांडली़. तत्कालीन पोलीस अधीक्षक आर्.डी. शिंदे यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार

नक्षलवादाची समस्या सोडवण्यासाठी शासन ठोस उपाययोजना कधी करणार ?
     नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील जडेगाव जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना पोलीस पथकावर अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी पळून गेले. घटनास्थळावरून पोलिसांनी रायफल आणि मोठ्या प्रमाणात नक्षलसाहित्य कह्यात घेतले.

पुणे येथे एका युवतीवर बलात्कार करणार्याा पोलीस निरीक्षकास अटक

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! असे पोलीस हे जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षकच आहेत !! 
     पुणे, २८ एप्रिल - येथील एका २० वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ठाणे येथील संतोष सोनावणे या पोलीस निरीक्षकास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. (या प्रकरणी संबंधित पोलिसावर पोलीस प्रशासनाने तत्काळ कठोर कारवाई करावी. - संपादक) 

नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वार्याुसह पाऊस

     नांदेड, २८ एप्रिल - नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये २७ एप्रिल या दिवशी सायंकाळी वादळी वार्यारसह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले होते. नांदेड शहर, जिल्ह्याच्या विविध भागांत, लातूर शहरासह परिसर आणि धाराशिव जिल्ह्यातही अर्धा घंटा जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अटक

'समृद्ध जीवन' घोटाळा प्रकरण !
केंद्रशासन आणि सेबी (भारतीय सिक्युरिटीज् एण्ड एक्स्चेंज बोर्ड) 
यांनी असे घोटाळेबाज सिद्ध न होण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.    
     नवी देहली, २८ एप्रिल - चिटफंड अपहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २७ एप्रिल या दिवशी 'समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक महेश किशन मोतेवार यांना भुवनेश्वयरमध्ये अटक केली. उच्च व्याज दराचे आमिष दाखवत मोतेवार यांनी नागरिकांकडून १ सहस्र ५०० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना ५ दिवसांची अन्वेषण विभागाची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

भारताच्या आय.आर्.एन्.एस्.एस्.-१ जी उपग्रहाचेे यशस्वी प्रक्षेपण !

     श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) - संपूर्ण स्वदेशी दिशादर्शक यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने भारताच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) २८ एप्रिलला आणखी एक यशस्वी पाऊल टाकले. दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील आय.आर्.एन्.एस्.एस्.-१ जी या सातव्या उपग्रहाचे आंध्रप्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. प्रक्षेपणानंतर अवघ्या २० मिनिटांत हा उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिरावला. आय.आर्.एन्.एस्.एस्.-१ जी हा ७ उपग्रहांच्या मालिकेतील शेवटचा उपग्रह आहे. जुलै २०१३ मध्ये या मालिकेतील पहिला उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडण्यात आला होता. शास्त्रज्ञांच्या या कामगिरीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या अधिकार्‍यांचे अभिनंदन केले.

केंद्रातील भाजप शासनाचे अस्तित्व संतमहंतांच्या त्यागातूनच ! अभयसिंह कुलकर्णी, हिंदु महासभा

पंढरपूर येथे प.पू. आसारामजी बापूंचा ७९ वा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात पार पडला 
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २८ एप्रिल (वार्ता.) - प.पू. आसारामजी बापूंचे कार्य हिंदु धर्म आणि हिंदु धर्मियांसाठी गौरवास्पद आहे. त्यांनी धर्माची ज्योत जागृत ठेवली. कोणतेही ठोस पुरावे नसतांना त्यांना कारागृहात ठेवले आहे. कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, प.पू. फरशीवाले बाबा यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अपमानित करण्याचा अश्ला्घ्य प्रयत्न करण्यात आला. संतांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही. महर्षी दधिचींच्या अस्थीपासून निर्मित शस्त्राने इंद्राला स्वर्गाचे स्थान मिळाले, तसेच सध्याचे केंद्रातील भाजप शासन हे संत महंतांच्या आशीर्वादामुळे आणि त्यागामुळे आहे, हे लक्षात घेऊन शासनाने प.पू. बापूजींना सन्मानाने मुक्त करावे. हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, असे परखड मत हिंदु महासभेचे पंढरपूरचे प्रमुख श्री. अभयसिंह कुलकर्णी (इंचगांवकर) यांनी केले. 

सनातन संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी श्री. अभिजित बापट यांचे अभिनंदन !

सातारा शहर स्वच्छ ठेवल्यासाठी विशेष प्रयत्न केले
श्री. अभिजीत बापट (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सनातनचे साधक

     सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) - सातारा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याविषयी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. अभिजित बापट यांचा राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबई येथे सत्कार करण्यात आला. याच अनुषंगाने सनातन संस्थेच्या वतीने श्री. बापट यांना पुष्प, दैनिक सनातन प्रभातचा 'आतंकवादविरोध विशेषांक' आणि सनातननिर्मित 'हिंदु राष्ट्र का हवे ?' हा ग्रंथ भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांच्या न्यासाचे अध्यक्षपद भाजपकडे, तर श्री सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्षपद शिवसेनेकडे !

हिंदूंनो, मंदिर सरकारणाचे दुष्परिणाम जाणा आणि मंदिरे देवाप्रती 
भाव असलेल्या भक्तांच्याच कह्यात रहाण्यासाठी आग्रही रहा !
प्रसिद्ध देवस्थानांचे राजकीय वाटप !
      मुंबई - राज्यातील देवस्थानांच्या विश्‍वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप निश्‍चित केले आहे. त्यानुसार शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान, पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर आणि कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर या न्यासांचे अध्यक्षपद भाजपला, तर मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक संस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेला दिले जाणार आहे.

सूर्यकिरणांद्वारे कोणत्याही असाध्य आजारांवर उपचार शक्य ! - शब्द सुरति संगम आश्रमचा दावा

    उज्जैन (मध्यप्रदेश) - सूर्याच्या किरणांमुळे कोणतेही असाध्य आजार बरे होऊ शकतात, असा दावा सिंहस्थपर्वामध्ये प्रथमच पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून आलेल्या शब्द सुरति संगम आश्रमचे संत आणि साधक यांनी केला आहे. 
    शब्द सुरति संगम आश्रमचे महायोगी स्वामी बुद्धपुरी यांच्याकडून सिंहस्थामध्ये एक शिबीर आयोजित करण्यात येत आहे. अमृतम् अभियान नावाच्या या शिबिरात नि:शुल्क सूर्यसाधनेच्या माध्यमातून अनेक रुग्ण उपचार करून घेण्यासाठी आलेले आहेत. स्वामींनी कॅन्सर आणि लकवा यांसारखे गंभीर आजारही बरे करून दाखवल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते विविध आजारांच्या १ लाखाहून अधिक रुग्णांनी या चिकित्सा पद्धतीचा लाभ करून घेतला आहे.

उल्फाचा कमांडर आणि विदेश सचिव यांनीही सिंहस्थपर्वाचा लाभ घेतला !

     उज्जैन - येथील सिंहस्थपर्वाचा साधूसंत, मान्यवर, तसेच देश-विदेशातून येणारे भाविक लाभ घेत आहेत. त्यातच बंदी घालण्यात आलेली संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) याचा जामिनावर सुटलेला एक कमांडर आणि विदेश सचिव यांनीही सिंहस्थपर्वाचा लाभ घेतला. त्यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केल्यावर ते म्हणाले की, आमची केंद्रशासनाबरोबर शांतीवार्ता चालू आहे. या संदर्भात करार झाल्यावर आम्ही शस्त्र खाली ठेवू. ७ एप्रिल १९७९ ला स्थापन झाल्यापासून वर्ष २०११ पर्यंत उल्फा संघटना शासनाच्या विरोधात लढत होती. या कालावधीत १२ सहस्रांहून अधिक युवक ठार झाले. १५ भाषांचे ज्ञान असणारे उल्फाचे विशेष सचिव शेषा चौधरी म्हणाले की, देशातील युवकांना नाईलाजामुळे शस्त्रे हातात घ्यावी लागतात.

फलक प्रसिद्धीकरता

अनैतिक कृत्यांचा अड्डा बनलेले जेएन्यू बंद करा !
     जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात उघडपणे वेश्याव्यवसाय चालतो, तसेच येथील वसतीगृहात दारू पिणे आणि अनैतिक कृत्ये करणे यांसाठी १ सहस्र मुलामुलींना २ ते ५ सहस्र रुपये दंड ठोठवण्यात आला आहे, असा आरोप ११ प्राध्यापकांच्या एका समितीने केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     JNU me dindahade veshyavyavasay chalta hai, aisa yahake 11 pradhyapakon ki committee ne kaha.
- Anaitik krutyonka adda bane JNU ko band karo !
जागो !
     जेएन्यू में दिनदहाडे वेश्याव्यवसाय चलता है, ऐसा यहां के ११ प्राध्यापकों की कमिटी ने कहा. - अनैतिक कृत्योंका अड्डा बने जेएनयू को बंद करो !

पाटण टपाल कार्यालयात अपुर्याव कर्मचार्यांतमुळे नागरिकांची गैरसोय

     पाटण (जिल्हा सातारा) - पाटण येथील टपाल कार्यालयात कर्मचार्यांकची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कार्यालयातील काही पदे रिक्त असून ती अनेक काळ भरली गेली नाहीत. त्यामुळे प्रलंबित कामांची संख्या वाढत आहे. वरिष्ठ पातळीवर याची तातडीने नोंद घेऊन ही पदे भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांनाही प्रवेश द्या !

तृप्ती देसाई यांचे सरसंघचालक भागवत यांना पत्र 
     मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांनाही स्थान द्यावे, या आशयाचे पत्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिले आहे. या पत्रात लिहिले आहे की, 'संघाच्या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर भारतमातेची प्रतिमा असते; परंतु भारतमातेचे प्रतिनिधित्व करणार्याा महिला कार्यक्रमात कधीच कार्यरत नसतात. राष्ट्रसेविका समिती ही जरी महिलांची 'विंग' असली, तरी ती नाममात्र आहे. या समितीने महिलांसाठी कधीच आक्रमक, भरीव काम केलेले नाही. संघात महिलांचा समावेश झाला, तर संघासारख्या मोठ्या संघटनेकडून समानतेचा संदेश जाईल.' या सूत्रावर चर्चा करण्यासाठी तृप्ती देसाईंनी मोहन भागवत यांच्याकडे भेटीची वेळही मागितली आहे.

देश काँग्रेसमुक्त करण्याआधी दुष्काळमुक्त करा ! - शिवसेनेची केंद्रशासनावर टीका

खासदार श्री. संजय राऊत

     नवी देहली - राजकारणात घोषणा सतत होतच असतात. याआधी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली गेली होती; मात्र सर्वांत आधी देश दुष्काळापासून मुक्त करा. त्यातून देश आपोआप काँग्रेसमुक्त होऊन जाईल, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रशासनावर केली आहे. आमचे पंतप्रधान विश्वाीचे नेते बनले आहेत; पण मोदीजी, एक दिवसतरी आमच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात या, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यसभेत भाषण करतांना संजय राऊत बोलत होते. 

मातृभाषेच्या रक्षणासाठी शासन वचनबद्ध ! - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री

इंग्रजी शाळांना अनुदान देऊन मातृभाषेचे रक्षण कसे करणार ?
गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
      पेडणे - गोवा राज्याला मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व लाभले; म्हणून राज्यातील प्राथमिक शाळा वाचल्या अन्यथा त्या कोलमडून गेल्या असत्या. शासन कोणत्याही एका धर्मियांचे नसून सर्वांना एकसंघ ठेवून राज्यकारभार चालवावा लागतो. शासनाला तडकाफडकी कोणताही निर्णय घेता येत नाही. मातृभाषेच्या रक्षणासाठी शासन वचनबद्ध आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. तुये, मुरमुसे येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केल्यानंतर पार्सेकर बोलत होते.
     मुख्यमंत्री पार्सेकर पुढे म्हणाले, सरकारी प्राथमिक शाळा ही गरीब पालकांसाठी असते, असे जे बनवले गेले आहे, ते पुसून काढले जाणार आहे. आतापर्यंत भाजप शासनाने २६० प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीवर १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. यापूर्वी काँग्रेसने एकही मराठी कोकणी शाळा उघडायला अनुज्ञप्ती दिली नव्हती.

साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या घरावर भाभासुमंचा मोर्चा !

      साखळी (गोवा) - येथील रवींद्र भवन येथे भारतीय भाषा सुरक्षा मंचला (भाभासुमं) सभा घेण्याची दिलेली अनुज्ञप्ती मागे घेतल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाभासुमंच्या सुमारे ३० कार्यकर्त्यांनी येथील भाजपचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या घरावर मोर्चा नेला. मोर्च्याचे नेतृत्व करणार्‍या अधिवक्त्या स्वाती केरकर यांनी म्हटले, भाभासुमंने सभेसाठी आवश्यक पैसेही भरले होते. ते परत करण्यात आले आहेत. मांद्रे येथील सभेला भाषाप्रेमींच्या लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शासन भयभीत झाले आहे. आमदार सावंत यांनी यासंबंधी स्पष्टोक्ती देतांना म्हटले की, सभेला अनुज्ञप्ती नाकारण्याचा निर्णय शासन स्तरावर झाला आहे.



चर्च भाजपच्या बाजूने रहाणे अशक्यच ! - राजकीय जाणकारांचे मत

असे असले, तरीही ख्रिस्त्यांचेच लांगूलचालन होत राहील आणि येथील स्थानिक जनता 
शासनापासून आणखीनच दुरावेल, हे उघड सत्य आहे !
     पणजी - माध्यमप्रश्‍नी भाजपने ख्रिस्ती मतांवर डोळा ठेवून स्वकियांशीच वैर केले असले, तरी प्रत्यक्षात चर्च भाजपच्या बाजूने रहाणे अशक्य असल्याचे काही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. वास्तविक स्थानिक चर्चचा ख्रिस्ती मतदारांवर प्रभाव आहे. प्रत्येक चर्चला एक पॅरिश पॅस्ट्रॉल (रोमन कॅथोलिक चर्चमध्ये बिशपला सल्ला देणारे मंडळ) मंडळ असते आणि संबंधित भागातील लोक या मंडळावर असतात. चर्चच्या या पॅरिश पॅस्ट्रॉल मंडळांची अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका असते; मात्र ही मंडळे मतदारांना भाजपला पाठिंबा द्या, असे कधीही सांगत नाहीत. चर्चच्या विविध वक्त्यांकडून आणि ख्रिस्ती राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चर्च अन् बहुतांश ख्रिस्ती मतदार भाजपच्या बाजूने रहाणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. राशोला सेमिनरीच्या फिलॉसॉफी विभागाचे डीन फादर व्हिक्टर फेर्रांव यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ख्रिस्ती मतदारांसाठी काँग्रेस हा स्वाभाविक पर्याय नाही; मात्र त्याचबरोबर भाजप हा पर्यायच होऊ शकत नाही.





शासनाला खरेच सर्व पालटायचे आहे का ?

    राज्यातील सराफ संघटना २५ एप्रिलपासून वाढीव १ प्रतिशत अबकारी कराच्या विरोधात पुन्हा एकदा संपावर गेल्या आहेत. राज्यातील सराफांनी १४ एप्रिलपूर्वी ४५ दिवस याच कारणांसाठी संप केला होता. त्याला सर्वच सराफांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या कालावधी त्यांनी मोर्चा, आंदोलने, अतिमहनीय राजकीय नेत्यांच्या भेटीही घेतल्या. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला काही प्रमाणात राजकीय किनारही मिळाली. त्याचसमवेत सराफ संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. त्या वेळी जेटली यांनी अबकारी कर रहित करण्याविषयी कोणतेच मतप्रदर्शन केले नाही. त्यामुळे आता सराफ संघटनांनी पुन्हा त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्याचे सांगत ३ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मोठ्या शहरांमधील सराफ संघटना संपामध्ये सहभागी झाल्या आहेत.

भारतविरोधी चेहरे उघडे पडू लागले आहेत !

डॉ. सच्चिदानंद शेवडे
      देशातील नवीन पिढीला भारतमाता की जय म्हणायला शिकवण्याची वेळ आली आहे, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य खरे तर जेएन्यूमधील घटनांना उद्देशून होते. त्याचा आपल्याला हवा तसा अर्थ काढून ओवैसीबंधूंनी गरळ ओकली आणि मानेवर सुरा ठेवला तरी भारतमाता की जय ही घोषणा देणार नसल्याची वल्गना केली. लगेच अशा गोष्टींचे राजकारण करायला आपल्याकडचे फेक्युलर्स पुढे सरसावले. काहींनी तर संविधानात तसे नमूद केले नसल्याचेही सांगितले. तशा बर्‍याच गोष्टी संविधानात नाहीत; पण त्या केल्या जातात. सर्व गोष्टी संविधानात असतात असेही नाही; पण तसे बोलायचे नसते. अंगाशी आले, तर झटकून टाकायचे असते, ही गोष्ट या फेक्युलर्सना ठाऊक असते. केवळ मोदींना विरोध एवढा एककलमी कार्यक्रम त्यांच्याकडे उरला आहे. त्यामुळे हे सर्व जाणीवपूर्वक घडवले जात आहे.

सर्वसामान्य कारागृहातील बंदीवान आणि भगवंताच्या कारागृहातील बंदीवान

     २०.३.२०१४ या दिवशी दुपारी २.३० वाजता कोणतीही वैचारिक पार्श्‍वभूमी नसतांना भगवंताच्या कारागृहातील बंदीवान आणि व्यावहारिक कारागृहातील बंदीवान यांतील भेदाविषयी मनात स्फुरलेले विचार पुढीलप्रमाणे आहेत.
- सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.३.२०१४)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

मुलांचे मन बिघडवणारे चित्रपट

    
      आज २९ एप्रिलला सैराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून त्याची गाणी तरुणाईमध्ये लोकप्रिय होत आहेत. सैराट, फॅन्ड्री, टाईमपास या चित्रपटांमधून समाजात विशेषकरून विद्यार्थी आणि तरुण वर्गापर्यंत काय संदेश जात आहे, याचाही गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. फॅन्ड्री, टाईमपास, सैराट या चित्रपटांत दाखवलेली प्रेमाची भावना ही प्रियकर-प्रेयसी या स्वरूपातील आहे. चित्रपटातील पात्रे अल्पवयीन किंवा शाळकरी दाखवलेली आहेत. या वयात नैसर्गिकरित्या प्रेमाची भावना उत्पन्न होणे साहजिकच आहे; परंतु त्याला चित्रपटाचे बाजारू स्वरूप देणे अतिशय घातक आहे. अशा चित्रपटांमधून प्रेम करण्यासाठी शाळेत जायचे असते किंवा शाळेत जाऊन प्रेमच करायचे, असा चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत जातो.
     निधर्मी संकल्पनेचे अधिष्ठानच मूळ सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे उद्ध्वस्तीकरण हे आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ८.७.२०१०)

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

     स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या सर फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे. त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत. 
(लोकजागर, वर्ष २ रे, अंक ४०, १२ एप्रिल २०१३)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. भारताचा अविभाज्य भाग असण्याच्या संदर्भात महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तरप्रदेश यांच्यापेक्षा जम्मू-काश्मीर वेगळा कसा ? त्याच्या घटनेत कलम ३७० का ?
२. ज्या खिलाफत चळवळीशी भारताचा काहीही संबंध नाही, त्या चळवळीला गांधींनी पाठिंबा का दिला आणि त्यामुळे त्यांना वा भारताला काय मिळाले?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

कारागृहातील जीवन जगतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. चौकशीपासूनच पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते. 
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेले साधनेविषयीचे अनमोल दृष्टीकोन आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. बैठक आणि स्वभावदोष-निर्मूलन सत्संग 
यांविषयी पू. गाडगीळकाकूंनी दिलेले दृष्टीकोन
१ अ. बैठक घेणारा : तलवार बनायला सगळेच सिद्ध असतात; पण ढाल (बैठक घेणारा) बनायला कुणीच सिद्ध नसते. तलवारीची धार ढालीला उमगते; पण तलवारीला ढालीच्या यातना कळत नाहीत.
१ आ. देवच बैठक घेणार्‍याच्या माध्यमातून अडचणी मांडणार्‍याचे मन मोकळे करून त्याच्या मनातील अनावश्यक ऊजर्र्ेचेही आघात सहजपणे पचवतो ! : जो बैठक घेणार आहे, त्याच्याविषयी बर्‍याच वेळा आपला विचार न्यून पडतो. आपण एका तलवारीप्रमाणे आपल्या शंका, अडचणी आणि त्रास एकावर एक वार केल्याप्रमाणे बैठक घेणार्‍याला सांगतो. बैठक घेणारा मात्र एका ढालीप्रमाणे सर्व वार सहन करतो, म्हणजेच सर्व शांतपणे ऐकून घेत असतो. देवच त्याच्या माध्यमातून अडचणी मांडणार्‍याचे मन मोकळे करून त्याच्या मनातील अनावश्यक ऊजर्र्ेचेही आघात अगदी सहजपणे पचवत असतो. त्यामुळे जो बैठक घेणारा आहे, त्याच्याप्रती आपण सदैव कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे. एवढे सर्व होऊनही बैठक घेणाराच आपल्याला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करत असतो, हेही लक्षात घेतले पाहिजे.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया म्हणजे निखळ आनंद !
२. आपत्काळानुसार धोरणे पालटायला हवीत. प्रत्येक गोष्टीत सखोल जायचे कि नाही ? जायचे, तर किती जायचे ?, हे त्या त्या वेळेनुसार ठरवायला हवे.
३. मनाप्रमाणे केल्याने साधनेत होणार्‍या 
हानीच्या संदर्भात पू. काकूंनी दिलेले उदाहरण
        एका मुलाला त्याचे वडील गाणेे शिकवत असत. ते मुलाला सा ऽऽ लावून सराव करण्यास सांगतात आणि घरातून निघून जातात. ते १२ वर्षे घरी येत नाहीत. या कालावधीत मुलगा मोठा गायक होतो. त्याला प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. नंतर त्याचे वडील पुन्हा घरी येतात आणि त्याला पाहून म्हणतात, जर सा ऽऽ लावला असता, तर मोक्षाला गेला असतास. येथे मनाप्रमाणे केल्याने त्या मुलाची संगीताच्या माध्यमातून साधना झाली नाही. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सा ऽऽ लावणे म्हणजे ब्रह्माची अनुभूती घेणे. तसे न करता त्याने संगीताचा उपयोग मायेतील प्रसिद्धी आणि पैसा इत्यादी मिळवण्यासाठी केला. त्यातून त्याची साधना झाली नाही, असा पू. काकूंचा हे सांगण्यामागचा उद्देश होता. (प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे माणूस अखंड ज्योतीप्रकाश (देवाकडे) पहाण्याचे सोडून लुकलुकत्या दिव्याकडेच (मायेत) पहातो.) - दिवाकर)

मनात येणार्‍या प्रतिक्रिया न्यून होत नसतील, तर तीनही स्तरांवर पुढील उपाय करून पहा !

१. शारीरिक उपाय : प्रत्यक्ष कृती करणे, म्हणजेच स्वभावदोष सारणी लिहिणे. विभागसेवकांना अथवा सहसाधकांना आपले स्वभावदोष सांगून त्यांवर उपाययोजना काढणे. आपल्या दोषांमुळे इतर साधक दुखावले गेले असतील, तर त्यांची प्रत्यक्ष क्षमा मागणे.
२. मानसिक उपाय : स्वयंसूचनांची सत्रे नियमित करणे. अधिक मानसिक त्रास असेल, तर अधिक सत्रे करणे.
३. आध्यात्मिक उपाय : मनात येणार्‍या प्रतिक्रिया एका कागदावर लिहून तो कागद कापूर घालून जाळला असता मनातील विचार वाईट शक्तींच्या त्रासामुळे येत असतील, तर ते अल्प होण्यास साहाय्य होते. नित्यनियमाने सेवा संपल्यानंतर दिवसभरात मनात येणार्‍या प्रतिक्रिया कागदावर लिहाव्यात. या कागदाला विभूती लावून तो कागद नारळाच्या करवंटीमध्ये घेऊन किंवा बाहेर नेऊन त्यात कापूर घालून जाळावा. कागद जळतांना कधी कधी दुर्गंध येतो किंवा जळतांना अग्नी हिरवट रंगाचा दिसतो. कधी कधी हा उपाय करतांना प्रकटीकरणही होते. वाईट शक्तींनी देहात निर्माण केलेले विचारांचे स्थान अशा तर्‍हेने नष्ट होण्यास साहाय्य होते आणि मन शांत होते. मनात अति प्रमाणात येणारे कामवासनेचे विचार साधारणतः अशा प्रकारच्या बाह्य शक्तींमुळे आलेले असतात. या विचारांना आध्यात्मिक उपायांनी नष्ट करावे लागते.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (१.३.२०१६, सकाळी ९.२०)

समोरच्या साधकाशी त्याच्या प्रकृतीनुसार वागून त्याला आनंद देणारे प.पू. डॉक्टर !

      प.पू. डॉक्टर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याची काळजी घेतात. समोरच्या साधकाला काय आवडते ? त्याच्यासमवेत कसे वागले पाहिजे, जेणेकरून त्याला आनंद मिळेल आणि तो त्या आनंदाने साधना करील, असा त्यांचा विचार असतो; म्हणूनच सर्वांना त्यांचा सत्संग आवडतो. ते साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार एकच सांगत नाहीत. त्यांना नवीन नवीन सांगतात. समोरच्या साधकाला आनंद कसा देता येेेईल ?, हे पहातात.
        एकदा गुरुकुलातील एका बालसाधिकेने भडक रंगाचे परकर-पोलके घातले होते आणि बर्‍याच साधकांनी तिला हे काय घातले ?, असे विचारले; पण जेव्हा ती प.पू. डॉक्टरांना ते दाखवायला गेली, तेव्हा ते म्हणाले, अरे वा ! किती छान !! मला फिरूनही दाखव, तुझे परकर-पोलके. याला मॅचिंग केसातील पीन नाही का तुझ्याकडे ? आपण तुला छान-छान मॅचिंग केसातील पीनही आणू हां ! हे ऐकून त्या गुरुकुलातील साधिकेचा आनंद द्विगुणीत झाला.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना मिळालेले ज्ञान

त्रिकोणी आकाराच्या 
खणाने ओटी भरण्याचे कारण
       गोल आकार हा ज्ञानाचा, चौकोन हा क्रियेचा आणि त्रिकोेेण हा इच्छाशक्तीचा आहे; म्हणून त्रिकोणी आकाराच्या खणाने ओेेटी भरतात. त्यामुळे देवाचा आशीर्वाद मिळून स्त्रियांच्या गर्भात उत्पत्ती होते. (१०.३.२०१५)
स्थानमाहात्म्याचे महत्त्व
       एखाद्या ठिकाणी स्थानमाहात्म्य असेल, म्हणजे पूर्वी काही दैवी घटना घडली असेल आणि तिथे देवाची नवीन मूर्ती स्थापन केली, तर भूगर्भातील त्या देवतेची तेथे असलेली शक्ती त्या मूर्तीत येते. त्या वेळी मूर्ती जरी नवीन असली, तरी तिच्यातील तत्त्व, शक्ती तेवढीच असते. अशा वेळी मूर्ती स्वयंभू आहे कि नाही ?, याला महत्त्व रहात नाही. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ (१२.३.२०१५) 

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या अन् ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेपोटी रामनाथी आश्रमातील स्वयंपाक विभागाचे मोठे दायित्वही सहजतेने निभावत संतपद प्राप्त करणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर !

पू. (कु.) रेखा काणकोणकर
       फेब्रुवारी २००८ पासून मला रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून पू. रेखाताईंचा या ना त्या निमित्ताने अनेकदा संपर्क आला. जून २०१५ पासून भगवंताच्या कृपेने ताईंच्या खोलीत त्यांच्या सहवासात रहाण्याचीही संधी मिळाली. या काळात त्यांच्याकडून अनेक सूत्रे शिकायला मिळाली.
१. तत्त्वनिष्ठता आणि 
प्रेमभाव यांचा सुरेख संगम !
         स्वयंपाकघरातील एखादी वस्तू अथवा पदार्थ हवा असला आणि त्याविषयी ताईंना विचारले, तर त्या कधीच नाही म्हणत नाहीत. नेहमीच साहाय्य करतात. त्यांच्या खोलीत रहाणार्‍या आणि त्यांच्याच विभागात सेवा करणार्‍या; परंतु वयाने लहान असणार्‍या साधिकांना त्या रात्री झोपण्यापूर्वी चुकांचे लिखाण झाले का ? सत्रे पूर्ण केली का ?, असे विचारतात, तसेच व्यष्टी साधना पूर्ण करण्याची आठवण करून देतात. साधिकांकडून एखादी चूक झाल्यास तत्त्वनिष्ठ राहून त्या संबंधित साधकाला चुकीची जाणीव करून देतात; मात्र दुसर्‍याच क्षणी पुन्हा प्रेमाने आणि इतक्या सहजतेने बोलतात की, थोड्या वेळापूर्वी बोलणार्‍या ताई याच का ? असा प्रश्‍न पडावा. ताईंच्या सहवासातून हा भाग शिकायला मिळाला. त्यामुळे माझ्याकडूनही साधकांना प्रेम देण्याचे आणि त्यांच्याशी सहजतेने वागण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत.

सतत आनंदी आणि हसतमुख राहून झोकून देऊन अन् भावपूर्ण सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. जयमाला पडवळ !

सौ. जयमाला पडवळ
       काही वेळा मला धान्य निवडण्याची सेवा करण्याची संधी मिळते. एक दिवस सौ. पडवळकाकूंच्या शेजारी बसून मी धान्य निवडत होते. तेव्हा माझ्या मनातले सर्व अनावश्यक विचार बंद झाले. माझे मन निर्विचार होऊन माझा नामजप एका लयीत होऊ लागला. मला हलके वाटू लागले. माझी ही स्थिती दिवसभर टिकून होती आणि मला सेवेतून आनंद मिळत होता.
       मला काकूंच्या सहवासात एवढे चांगले कसे काय वाटले ?, असा विचार मनात आला. तेव्हा काकूंचे गुण डोळ्यांसमोर आले. काकूंचा स्वभाव मनमोकळा आहे. त्या सतत आनंदी आणि हसतमुख राहून उत्साहाने सेवा करतात. काकूंची सेवा नियोजनबद्ध असते.

उपजतच साधनेची गोडी असलेला गियासपुरा (लुधियाना, पंजाब) येथील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला चि. पारस कश्यप (वय ३ वर्षे) !

चि. पारस कश्यप
१. जन्माच्या प्रसंगी - 
बाळाच्या दोन्ही हातांवर ॐ उमटणे
       जन्माच्या वेळी चि. कश्यपच्या दोन्ही हातांवर ॐ उमटले होते.
२. एक वर्ष
२ अ. हातांद्वारे विविध मुद्रा करणे : वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत पारस कश्यप हा दिवसभर आपोआपच हातांच्या वेगवेगळ्या मुद्रा करत होता.
२ आ. रडतांना पारस कश्यपला चैतन्यमय खोलीत नेल्यावर तो रडायचा थांबणे : घरातील सर्व जण एका खोलीत (साधना कक्षामध्ये) प्रार्थना आणि नामजप करत असत, तसेच संतांच्या निवासासाठीही त्या खोलीचा वापर केला जातो. त्यामुळे त्या खोलीत पुष्कळ चैतन्य जाणवते. बालपणी चि. पारस कश्यप हा रडायला लागला की, त्याला त्या खोलीत नेल्यावर तो शांत होत असे.

सेवेची तळमळ आणि इतरांना साहाय्य करणे हे गुण असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचेे श्री. प्रकाश सुतार !

श्री. प्रकाश सुतार
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. सेवेची तळमळ असणे
१ अ १. नेहमी कुठलीही सेवा अल्प वेळेत, भावपूर्ण आणि परिपूर्ण कशी करता येईल ?, याचा ते अभ्यास करतात अन् त्यांना गुरुदेवांना आवडेल अशी सेवा व्हावी, अशी तळमळ असते.
- सौ. प्रचीती प्रकाश सुतार (पत्नी), श्री. दत्तात्रेय लोहार आणि श्री. संजय पडेलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ २. देहभान हरपून सेवा करणे : दादा कुठलीही सेवा लगेच आत्मसात् करतात. त्यामुळे ती सेवा लवकर पूर्ण होते. ते तळमळीने सेवा करतात. सेवा पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. त्यांना सेवा करतांना खाण्या-पिण्याचीही आठवण नसते.
- श्री. संजय पडेलकर
१ अ ३. आश्रमातील खिडक्या आणि दारे व्यवस्थित बसवली जावीत; म्हणून प्रकाशदादांनी पुष्कळ प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी बाहेर गावी जाऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या कड्या, शॉकअप्स, इंजिन हॅन्डल, स्क्रू इत्यादी साहित्य अभ्यास करून विकत आणले. - श्री. दत्तात्रेय लोहार

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर पुढील प्रक्रिया करा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
     आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती
     प्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो.
     एखाद्याला १२,००० रुपये व्याज मिळत असेल, तर १२,००० रुपयांंवर १० टक्के म्हणजे १,२०० रुपये टी.डी.एस्. कापून घेतला जातो. (एखाद्या खातेधारकाला १०,००० रुपयांपर्यंत व्याज मिळत असेल, तर टी.डी.एस्. कापला जात नाही.)
     टी.डी.एस्. कापल्यानंतर तो खातेधारकाच्या नावे आयकर विभागात भरला जातो आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी 16A या पत्रकामध्ये त्याविषयी माहिती दिली जाते.
२. टी.डी.एस्. कपात होऊ नये, याकरिता पुढील आर्थिक 
वर्षासाठी 15G किंवा 15H यांपैकी एक फॉर्म भरून देणे
२ अ. 15G फॉर्म : ज्यांचे वय ६० वर्षांपर्यंत आहे आणि आर्थिक वर्षातील अंदाजित (एस्टीमेटेड टोटल इनकम) एकूण उत्पन्न करमाफ मर्यादेपर्यंत असेल, तसेच अधिकोषाकडून मिळणार्‍या कायम ठेवीच्या व्याजाचे उत्पन्न २,५०,००० रुपयांपर्यंत असेल, त्यांनी हा फॉर्म भरावा.
२ आ. 15H फॉर्म : ज्यांचे वय ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक आहे अन् अंदाजित एकूण उत्पन्न करमाफ मर्यादेपर्यंत असेल, तसेच अधिकोषाकडून मिळणार्‍या कायम ठेवीच्या व्याजासह उत्पन्न ३,००,००० रुपयांपर्यंत आहे, त्यांनी हा फॉर्म भरावा.
२ इ. दोन्ही फॉर्मविषयी सामायिक माहिती : हे दोन्ही फॉर्म अधिकोष अथवा पोस्टात उपलब्ध असतात. खातेधारकाला प्रत्येक फॉर्मच्या २ अथवा ३ प्रती (कॉपीज्) भरून अधिकोषात जमा कराव्या लागतात. एक प्रत अधिकोषाच्या संदर्भासाठी ठेवून दुसरी प्रत आयकर विभागाला पाठवण्यात येते. प्रत्येक अधिकोषाने स्वतःच्या नियमावलींच्या दृष्टीने दोन्ही फॉर्ममध्ये थोडेफार पालट केलेले असल्याने खातेधारकाचे ज्या अधिकोषात खाते आहे, तेथूनच फॉर्म आणून ते भरावे लागतात.
३. टी.डी.एस्. कपात झाल्यास करावयाची कृती
     कापण्यात आलेल्या टी.डी.एस्.ची रक्कम खातेधारकाला परत हवी असल्यास ज्या आर्थिक वर्षात करकपात झाली, त्या वर्षाचे आयकर विवरणपत्रक आयकर विभागाला सादर करावे लागते. आयकर विभाग खातेधारकाची माहिती पडताळून घेतो आणि कापलेला टी.डी.एस्. व्याजासहित परत देतो.
     ही सूत्रे लक्षात घेऊन टी.डी.एस्. कपात होऊ नये, याकरिता संबंधितांनी लवकरात लवकर वरील प्रक्रिया पूर्ण करावी.

धारवाड (कर्नाटक) येथील साधिका सौ. जयश्री शिरोडकर आणि सौ. रत्ना नंदीकोलमथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

धारवाड (कर्नाटक) येथील साधिका सौ. जयश्री शिरोडकर
आणि सौ. रत्ना नंदीकोलमथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

अशीच गुरुकृपा होऊ दे सर्व साधकांवर निरंतर !

कालच मनात आले की,
सौ. पडवळवहिनींची ६१ टक्के पातळी ।
अद्याप का नाही झाली ? ।
आणि आजच ती आनंदाची वार्ता
सनातन प्रभातमधून वाचावयास मिळाली ॥ १ ॥
पडवळवहिनी म्हणजे साधे-भोळेपणाचे मूर्तीमंत उदाहरण ।
तद्वत त्यांचे ठायी आहे नम्रता अन् कष्टाळूपण ॥ २ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु धर्म आणि भारत यांची काहीच माहिती नसलेले धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही होतात, तर हिंदु धर्म आणि भारत यांच्या संदर्भात माहिती असलेले त्यांच्यापुढे नतमस्तक होतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदा प्रयत्नरत रहाण्याचे महत्त्व !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     निष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा येतो आणि अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कचखाऊ धोरणे पालटा !

संपादकीय
     दक्षिण काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची नावे असलेल्या संघांचे आणि त्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट सामने खेळले गेल्याचे वृत्त प्रत्येक खर्‍या राष्ट्रभक्ताला प्रचंड अस्वस्थ करणारे आणि त्याची झोप उडवणारे आहे. त्यातही कहर म्हणजे त्या पटांगणापासून पोलीस आणि सैन्य यांना थोडेथोडके दिवस नव्हे, तर २ मासांसाठी दूर ठेवण्यात आले. या स्पर्धेला १ सहस्र देशद्रोही प्रेक्षक उपस्थित होते. एवढेच नव्हे, तर या कार्यक्रमात स्वतंत्र काश्मीरची गाणी गाण्यात आली. या तीनही गोष्टी म्हणजे स्वतंत्र भारतापासून काश्मीर किती तुटले आहे, याची प्रत्यक्ष उदाहरणे आहेत. काश्मीरमधील आतंकवाद्यांचा धुडगूस, त्यांना स्थानिक धर्मांधांची मिळालेली साथ आणि भारतविरोधी ते करत असलेल्या कारवाया हे मुळातच अत्यंत संवेदनशील सूत्र झालेले आहे. वरील घटनेने त्यात आणखी एक भर टाकून त्यांनी राष्ट्रभक्तांच्या हृदयावर नंगा नाच केला आहे. या घटनेमुळे स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणारे शासन काय करत आहे, असा अत्यंत गंभीर प्रश्‍न जनता विचारत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn