Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीरमध्ये आतंकवाद्याच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा, संघांना आतंकवाद्यांची नावे !

स्पर्धा आयोजित होईपर्यंत शासन झोपले होते का ? देशद्रोह्यांना पाठीशी 
घालणारी काँग्रेस सत्ताच्युत झाल्यानंतरही काश्मीरमध्ये देशद्रोह्यांवर 
कारवाई होत नसेल, तर काश्मीर सैन्याच्या कह्यातच दिलेले बरे ! पाकसमवेत
 क्रिकेट खेळून मैत्रीचे संबंध निर्माण करण्याचा हा दुष्परिणाम तर नव्हे ?
       श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या त्राल या संवेदनशील भागात काही दिवसांपूर्वी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जवळपास २ मास चालू असलेल्या या स्पर्धेचा समारोप २७ एप्रिलला झाला. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांची नावे आतंकवाद्यांची होती, ही संतापजनक गोष्ट आता समोर आली आहे. आतंकवाद्यांच्या नावाने सहभागी संघांविषयी विचारण्यात आले असता या ठिकाणी ही गोष्ट सामान्य असल्याचे आयोजकांनी सांगितले, तसेच ही स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी स्पर्धा चालू असलेल्या ईदगाह मैदानापासून पोलीस आणि भारतीय सैन्य यांना २ मासासाठी दूर ठेवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. (२ मास स्पर्धेच्या मैदानापासून दूर ठेवण्यात आले, तरी पोलिसांना त्यांच्या गुप्तचरांकडून काहीच माहिती मिळाली नाही आणि माहिती मिळाली असूनही पोलीस निष्क्रीय राहिले असतील, तर अशा पोलिसांवर पीडीपी-भाजप शासनाने कारवाई केली पाहिजे ! तसेच स्पर्धेच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! - संपादक)

देहली विद्यापिठाने क्रांतीकारक भगतसिंह यांना आतंकवादी ठरवले !

काँग्रेसच्या काळात अशा पद्धतीने क्रांतीकारकांना आतंकवादी 
म्हणणारे अभ्यासक्रम होते, त्याचीच पुनरावृत्ती आताच्या 
शासनाच्या काळात होत असेल, तर दोन्ही शासनांत भेद तो काय ?
       नवी देहली - हुतात्मा क्रांतीकारक भगतसिंह यांचा देहली विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात आतंकवादी असा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर इतिहासकारांनी संबंधितांना ही चूक सुधारण्यास सांगितले आहे.
१. भारताचा स्वातंत्र्यसंघर्ष (Indias Struggle for Independence) नावाच्या पुस्तकामध्ये क्रांतीकारकांनी ब्रिटिशांना ठार करण्याच्या कृतीला आतंकवादी कृत्य म्हटले आहे. याच पुस्तकातील २० व्या प्रकरणात हुतात्मा भगतसिंह यांना क्रांतीकारक आतंकवादी असे म्हटले आहे. भगतसिंह यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्या सेन यांनाही क्रांतीकारक आतंकवादी संबोधण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये इस्लामचा अपमान करणार्‍या हिंदु शिक्षकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा

कुठे इस्लामचा अवमान करणार्‍यांवर तात्काळ कारवाई 
करून शिक्षा ठोठवणारा बांगलादेश, तर कुठे हिंदूंच्या देवतांचा 
अवमान करणार्‍यांच्या विरोधात गुन्हाही दाखल न करणारा भारत !
      ढाका - इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपांतर्गत बांगलादेशमधील २ हिंदु शिक्षकांना येथील न्यायालयाने २७ एप्रिलला कारावासाची शिक्षा ठोठावली.
१. बगेरहाट जिल्ह्यातील हिजला उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकवणार्‍या या हिंदु शिक्षकांनी कुराणात सांगितल्याप्रमाणे स्वर्ग नसतो, असे सांगितल्याचा आरोप केला होता.
२. यामुळे मुसलमान विद्यार्थी, पालक आणि गावकरी यांचा समावेश असलेल्या संतप्त जमावाने या शिक्षकांना हॉकी स्टिक्सच्या साहाय्याने मारहाण केली आणि त्यांना खोलीमध्ये कोंडून ठेवले. पोलिसांनी या शिक्षकांची सुटका केली.
३. इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

रामजन्मभूमीमध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी !

बल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांची मागणी
राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना विविध
हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
      बल्लभगड (हरियाणा) - रामजन्मभूमीमध्ये श्रीरामाचे मंदिर असल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे हिंदूंना तेथे पूजाअचार्र् करण्याची अनुमती मिळावी, तसेच केवळ अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कर्नाटक शासनाने अंदाजपत्रकामध्ये केलेली जादा तरतूद रहित करावी, या मागण्यांसाठी येथील सिटी पार्क येथे २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
     या आंदोलनामध्ये राजीव दीक्षित स्वदेशी रक्षा मंचाचे श्री. प्रवीण गुप्ता, गोमानव सेवा ट्रस्टचे श्री. बालकिशन ठाकूर, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. भूपेश शर्मा, सर्वश्री अभय किंगर, अरविंद गुप्ता, सुरेश मुंजाल, सौ. संदीप कौर, तसेच वैदिक उपासना पिठाच्या पू. तनुजा ठाकूर, सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी, पूनम किंगर, राहुल यांनी आंदोलकांना संबोधित केले.

अमृत (शाही) स्नानातील आखाड्यांच्या समस्या न सोडवल्यास सिंहस्थपर्वातून निघून जाऊ ! - १३ आखाड्यांची शासनाला सज्जड चेतावणी

  • संत-महंतांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे मध्यप्रदेश शासनाला लज्जास्पद !
  • कोट्यवधी रुपये खर्चूनही सिंहस्थपर्वाचे सुयोग्य नियोजन करू न शकणे, हे शासनाचे अपयश !
       उज्जैन - अमृत स्नानाचे सुयोग्य नियोजन करून आखाड्यांच्या समस्या न सोडवल्यास सिंहस्थपर्वातून निघून जाऊ, अशी सज्जड चेतावणी अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या झालेल्या बैठकीत १३ प्रमुख आखाड्यांनी मध्यप्रदेश शासनाला दिली. ही बैठक श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याच्या रामघाट येथील छावणीत पार पडली. या बैठकीची माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज आणि महामंत्री महामंडलेश्‍वर हरि गिरीजी महाराज यांनी पत्रकारांना दिली.
       श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज म्हणाले, या बैठकीस शैैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मिळून एकूण १३ आखाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. तब्बल २ घंटे चाललेल्या या बैठकीत सर्व आखाड्यांनी आपासांतील मतभेद विसरून एकत्रित येत शासनाला २ दिवसांचा अवधी दिला. या २ दिवसांत शासनाने अमृत स्नानातील आखाड्यांच्या समस्या न सोडवल्यास सर्व आखाडे स्नानावर बहिष्कार घालून निघून जातील.

देहली येथे ज्योतिष समाधानपिठाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन

ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतांना
ज्योतिषी आणि मान्यवर
      नवी देहली - येथील महाराजा अग्रसेन भवन, विकासपुरीमध्ये २४ एप्रिल २०१६ या दिवशी ज्योतिष समाधानपिठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेले प्रसिद्ध ज्योतिषी आणि अन्य मान्यवर यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.
१. वैदिक ज्ञान आणि ज्योतिष विद्या यांविषयी समाजात जागृती व्हावी, ज्योतिष विद्येचा लाभ करून घेऊन जीवनात येणार्‍या समस्या सुटाव्यात, विविध रोग निवारण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा वापर कसा करावा, नक्षत्र, ग्रह यांचा मनुष्यजीवनावर कसा परिणाम होतो, त्याविषयी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, आदींविषयी या कार्यक्रमामध्ये प्रबोधन करण्यात आले.

बिकानेर (राजस्थान) येथे भावपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी

     बिकानेर - श्री हनुमान जयंतीनिमित्त येथील सर्व प्रमुख हनुमान मंदिरांमध्ये भावपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी सकाळी ५ वाजल्यापासूनच दर्शनासाठी आलेल्या लक्षावधी भक्तांनी पूजा, दर्शन, हनुमान चालिसा पठण, सुंदरकाण्ड पठण, अखण्ड रामायण पठण, भजन संध्या, महाप्रसाद यांचा लाभ घेतला. 
  ग्रॅज्युएट हनुमान मंदिरातील आरास आणि रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरली. पुजारी म्हणाले, मंदिराशेजारी वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. कालांतराने मंदिराचे नाव ग्रॅज्युएट हनुमान मंदिर पडले. आजही देश-विदेशात रहाणारे हनुमानभक्त त्यांच्या इच्छा टपालाने येथे पाठवतात.भारतीय आस्थापनांनी बनवलेल्या सुट्या भागांचा इसिसकडून स्फोटके बनवण्यासाठी वापर !

       नवी देहली - इसिसया आतंकवादी संघटनेने धोकादायक स्फोटके बनवण्यासाठी भारतीय आस्थापनांनी बनवलेल्या सुट्या भागांचा वापर केल्याचे कॉनफ्लिक्ट आर्मामेंट रिसर्चच्या अहवालातून उघड झाले आहे. या संदर्भात लोकसभेत सूत्र उपस्थित झाले असता गृहराज्यमंत्री हरिभाई पारथीभाई चौधरी म्हणाले की, कॉनफ्लिक्ट आर्मामेंट रिसर्चकडून ज्या सुट्या भागांचा उल्लेख करण्यात आला आहे, ते भारताने लेबेनॉन आणि तुर्की यांसारख्या देशांना निर्यात केले होते, तसेच तो संपूर्ण व्यापार कायद्याच्या चौकटीतून झाला होता. कॉनफ्लिक्ट आर्मामेंट रिसर्च या संस्थेला युरोपीय संघाची मान्यता असून सदर खुलासा ऑनलाईन अहवालातून केला आहे. कानफलिक्टने वर्ष २०१४ ते २०१६ या काळात इसिसकडून स्फोटके बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या अनुमाने ७०० सुट्या भागांचा अभ्यास केला होता. या सुट्या भागांमध्ये डेटोनेटर, डेटोनेटिंग काडर्स आणि सेफ्टी फ्यूज यांचा समावेश आहे. हे सर्व सुटे भाग दुसर्‍या देशांशिवाय भारतातील ७ आस्थापनांमध्येही निर्माण करण्यात आले होते, असेही गृहराज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले.

गोवा राज्यातील ४२ किल्ल्यांपैकी ३५ किल्ले दुर्लक्षित !

गोव्याच्या इतिहासाकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणारे राज्यकर्ते आणि प्रशासन इतिहासद्रोहीच होत ! 
इतिहास त्यांची नोंद अशीच ठेवील ! 
     पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) - इतिहासाचे साक्षीदार असलेले राज्यातील ४२ छोट्या मोठ्या किल्ल्यांपैकी ३५ किल्ले दुर्लक्षित आहेत. यात बेतूल येथील छत्रपती शिवाजी महाराजांशी नाते असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचा समावेश आहे. बहुतांश किल्ले पालापाचोळ्यांनी वेढलेल्या आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहेत, अशी खंत इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी व्यक्त केली.

भारतात प्रतिदिन कर्करोगामुळे ५० मुलांचा मृत्यू !

     मुंबई - कर्करोगाच्या संदर्भात कॅनडातील टोरंटो विश्‍वविद्यालय आणि मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्न असलेल्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून काही माहिती समोर आली. यात भारतात कर्करोगामुळे १४ वयापर्यंतच्या ५० मुलांचा प्रतिदिन मृत्यू होतो. यासह आजारामुळे येणारा आर्थिक ताण आणि अधिक चांगल्या उपचारांच्या पर्यायांची न्यूनता यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. 
    अभ्यास करतांना १ कोटी ४० लाख लोकांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. वर्ष २०१४ च्या एका अहवालानुसार भारतात प्रत्येक वर्षी नवीन १० लाख लोकांना कर्करोग झाल्याचे निदान होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, वर्ष २०२५ पर्यंत भारतात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत पाच पटींनी वाढ होईल.

उच्च न्यायालयाने डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांतील खटल्याची सुनावणी थांबवण्याची विनंती फेटाळली !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे 
यांच्या अधिवक्त्यांना फटकारले !
      मुंबई, २७ एप्रिल (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी थांबवण्याची त्यांच्या नातेवाइकांनी केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाने २७ एप्रिलला फेटाळली. तसेच दाभोलकर-पानसरे यांच्या अधिवक्त्यांना फटकारले. न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायाधीश श्रीमती फणसळकर-जोशी यांच्या खंडपिठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
१. या वेळी पानसरे आणि दाभोलकर कुटुंबियांचे अधिवक्ता नेवगी यांनी कनिष्ठ न्यायालयात २९ तारखेला आरोप निश्‍चिती होणार आहे, ती थांबवली जावी, अशी मागणी केली.
२. त्याला संशयित आरोपी समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी कडाडून विरोध केला. पुनाळेकर म्हणाले की, पानसरे कुटुंबियांची मागणी अन्वेषणाविषयीची आहे, असे असतांना न्यायालयातील प्रक्रिया थांबवण्याची मागणी कशी करता येईल ? यांना हा अधिकार नाही. म्हणजे एकीकडे जामीन मिळू द्यायला विरोध करायचा आणि दुसरीकडे खटलाही चालू द्यायचा नाही, हा अन्याय आहे.

भारतीय चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांच्या विरोधात कराचीत निदर्शने !

पाकिस्तानच्या विरोधात 
चित्रपट बनवत असल्याचा आरोप
       कराची - एका परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी येथे आलेले बजरंगी भाईजान या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्या विरोधात येथील विमानतळावर निदर्शने करण्यात आली. कबीर खान हे लाहोरला जाण्यासाठी जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले असताना काही जणांनी त्यांना घेराव घातला आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. कबीर खान हे पाकिस्तानविरोधात चित्रपट बनवत असल्याचा आरोप निदर्शने करणार्‍यांनी केला आहे. निदर्शने करणार्‍यांपैकी एकाने त्यांना बूट दाखवला. निदर्शने करणार्‍यांपैकी काही जणांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. कबीर खान यांच्या फॅण्टम आणि एक था टायगर या चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती.

धर्मांधांच्या तक्रारीवरून गोरक्षण करणार्याध बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट !

गोरक्षकांना न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! 
     वणी (जिल्हा यवतमाळ) - वणी-घोन्सा मार्गावरून नुकतीच पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणार्यास आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात केल्यावर पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे प्रविष्ट केले. (धर्मांधांचा कावेबाजपणा ! आधी गुन्हा करायचा आणि नंतर तो उघड करणार्यां्विरुद्धच खोटेनाटे आरोप करत पोलीस तक्रार करायची. शासनाने गोरक्षकांचे हित जपावे अशी अपेक्षा ! - संपादक) 

राज्यातील धरणांमध्ये केवळ १७ प्रतिशतच पाणीसाठा

* पाणीबाणीची गंभीर स्थिती 
* मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठला 
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । 
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति 
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल. 

आळंदी (जिल्हा पुणे) येथे विधवेवर बळजोरी करणार्या- धर्मांधाला अटक

धर्मांधांची वासनांधता जाणा ! 
     आळंदी (जिल्हा पुणे), २७ एप्रिल (वार्ता.) - येथील एका महाराजांच्या विधवा बहिणीवर बळजोरी करणारा धर्मांध मोहसीन शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. धर्मांधाने २० एप्रिलला दुचाकीवरून तिचा पाठलाग करून बळजोरी केली. तो गेल्या १ मासापासून तिचा पाठलाग करत होता. या प्रकरणी आळंदी येथील धर्मजागरणचे पश्चिाम महाराष्ट्र प्रांतप्रमुख श्री. माधवराव देशपांडे, ह.भ.प. नवल महाराज, ह.भ.प. ढगे महाराज यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. धर्मांधांच्या छळाविषयी पीडित महिलेने कुटुंबियांना सांगितल्यावर ५० ते ६० हिंदूही तक्रार देण्यासाठी जमले. (यासाठीच महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अपरिहार्य आहे ! - संपादक) 

प्रदर्शनास अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज आणि सिंहस्थ मेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. दिवाकर नातू यांची भेट !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन !
डावीकडून पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, मध्यभागी अनंत श्री दण्डीस्वामी
हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज आणि प्रदर्शन दाखवतांना श्री. विनय पानवळकर
सिंहस्थ मेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. दिवाकर नातू (१ क्रमांक)
यांना प्रदर्शन दाखवतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (२ क्रमांक)

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड घोटाळ्याचा तपास दोन मासांनंतरही ठप्प

     संभाजीनगर, २७ एप्रिल - महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डातील १ कोटी रुपयांचा साहित्य घोटाळा २ मासांपूर्वी उघडकीस आला होता. हा तपास छावणी पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आल्यानंतरही या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नसल्याचे दिसून येत आहे. (हिंदूंचे संत आणि हिंदुत्ववादी यांच्या मागे ससेमिरा लावणारे पोलीस या प्रकरणी गप्प का ? या प्रकरणाचा तपास पुढे न जाण्यामागे कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त झाल्यास वावगे काय ? या प्रकरणी शासन लक्ष घालून कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार का ? - संपादक) 

हाजी अली दर्ग्यात घुसलात, तर काळे फासू !

तृप्ती देसाई यांना एम्आयएमची  चेतावणी 
     मुंबई - २८ एप्रिलला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई मुंबईतील हाजी अली दर्ग्याबाहेर जाऊन धरणे आंदोलन करणार आहेत. या वेळी त्यांनी दर्ग्यातील कबरीपर्यंत घुसण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी चेतावणी एम्आयएमचे  नेते हाजी रफत हुसेन यांनी दिली आहे. यापूर्वी शिवसेनेचे नेते हाजी अराफत शेख यांनी चपलेचा प्रसाद देऊ अशी चेतावणी दिली होती.

तृप्ती देसाईंच्या श्री महालक्ष्मी मंदिर प्रवेशनाट्याची चौकशी करा ! - ज्येष्ठ नागरिकांची मागणी

ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीची नोंद शासन घेणार का ? 
     कोल्हापूर - महिलांना श्री महालक्ष्मी मंदिरात प्रवेश देऊनही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई मंदिर प्रवेशाच्या निमित्ताने 'स्टंटबाजी' करत असून दुष्काळ निवारणाच्या कामात पूर्णपणे अपयशी ठरलेले शासन त्यांना छुपे पाठबळ देत आहे. हा सर्व प्रकार निषेधार्ह असून येथील श्री महालक्ष्मी मंदिरात घडलेला 'स्टंटबाजी'चा प्रकारही कोल्हापूरकरांना रुचलेला नाही. त्यामुळे या प्रवेशनाट्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी पत्रकार परिषदेतून केली. 

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कराचीमधून करतो भारतातील राजकीय नेत्यांना दूरध्वनी !

महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्याशी करतो संभाषण ! 
लोकहो, या नेत्यांची नावे उघड करण्याची मागणी केंद्रशासनाकडे करा ! 
     नवी देहली - पाकमध्ये लपलेला कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कराचीतून भारतातील राजकीय नेत्यांना दूरभाष करतो, असे भारतीय 'हॅकर्स'ने पाकच्या दूरसंचार यंत्रणेचे संकेतस्थळ हॅक करून उघड केले आहे. 

ठाणे येथे डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ३ दिवसीय व्याख्यानमाला

     ठाणे - २९ एप्रिल, ३० एप्रिल आणि १ मे असे तिन्ही दिवस डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ठाणे पश्‍चिम येथील सहयोग मंदिर सभागृह, २ रा मजला येथे व्याख्यानमाला होणार आहे. १ मे या दिवशी त्यांचे ४ सहस्रावे व्याख्यान आहे. तिन्ही दिवशी ते नेताजी सुभाषचंद्र बोस हा विषय मांडणार आहेत. ३० एप्रिल या दिवशी फाळणीवर आधारित रक्तलांच्छन या त्यांच्या कादंबरीच्या ८ व्या आवृत्तीचे प्रकाशनही आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कादंबरीला शिवसेनाप्रमुखांची प्रस्तावना लाभली असून डॉ. शेवडे यांचे गुरु प.पू. स्वामी वरदानंदभारती यांचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

श्री दुर्गादेवीचे चित्र विडंबनात्मकरित्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी मडगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करावी म्हणजे
पुन्हा अशी कृत्ये करण्यास कुणी धजावणार नाही !
     हे छायाचित्र कोणच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी प्रसिद्ध केलेले नसून धर्मद्रोही फर्नांडिस यांनी कशा प्रकारे देवतेचे विडंबन केले आहे हे वाचकांना समजावे, यासाठी हे प्रसिद्ध करत आहोत. - संपादक

    मडगाव - धर्मद्रोही वरुण फर्नांडिस यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या श्री दुर्गादेवीचे चित्र सबकॉन्टीनेंटल व्हॉल्युम २च्या म्युझिक लेबलवर विडंबनात्मकरित्या प्रसिद्ध केले आहे. (हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्यामुळेच ख्रिस्ती हिंदू देवतांचे विडंबन करण्याचे धाडस करतात ! हेच ख्रिस्ती त्यांच्या येशूचे विडंबन का करत नाहीत ? जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी ते सतत कारणे शोधत असतात आणि हिंदू मात्र सर्वधर्मसमानतेच्या गोष्टी करतात ! - संपादक) यासंबंधी मडगाव येथील हिंदु धर्माभिमानी नागरिक श्री. अरुण परूळेकर यांनी २६ एप्रिल या दिवशी मडगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून या प्रकरणी धर्मद्रोही फर्नांडिस यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद करण्याची मागणी केली आहे.

दांडा, शिवोली (गोवा) येथील सद्गुरु जीवनमुक्त महाराजांच्या आश्रमातील राष्ट्रधर्म जागरण सभेत हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

डॉ. मनोज सोलंकी (डावीकडून तिसरे) यांचा सत्कार 
करतांना (डावीकडून पहिले) पू. मुकुंदराज महाराज 
आणि बाजूला अन्य मान्यवर
     शिवोली, २७ एप्रिल (वार्ता.) - दांडा, शिवोली येथील सद्गुरु जीवनमुक्त महाराज मठात २३ एप्रिल या दिवशी झालेल्या राष्ट्रधर्म जागरण सभेत हिंदु राष्ट्रासाठी अविरतपणे कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी हा सत्कार स्वीकारला. त्याचसमवेत गोव्यात गोरक्षणाचे कार्य करणारे श्री. हनुमंत परब, तसेच मंत्र, तंत्र या माध्यमाने रोग-व्याधी निवारण करणारे पुणे येथील डॉ. मोहन फडके, कोल्हापूर येथील पंचांगविद्यातज्ञ श्री. सतीश सहस्रबुद्धे, आध्यात्मिक कार्य करणारे नगर येथील श्री शीतल महाराज, मुंबई येथील श्री मनोहरानंद स्वामी यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच ज्ञानदीप प्रतिष्ठान गोवा आणि दोन स्थानिक पत्रकार यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

गोवा कॅसिनोमुक्त करून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा ! - रणरागिणीची शासनाकडे मागणी

     पणजी - देवभूमी असलेल्या गोव्यात काँग्रेस शासनाने कॅसिनो विकृती आणली. परंपरावादी म्हणवणार्‍या आणि सत्तेवर येण्यापूर्वी कॅसिनोविरोधी धोरण अवलंबणार्‍या भाजप शासनाने ही विदेशी विकृती गोव्यात रुजवली, असे आता खेदाने म्हणावे लागत आहे. भारतातील गोव्याचे मकाऊ (विदेशातील जुगारी शहर) करण्याचे हे कॅसिनोच्या समर्थकांचे षड्यंत्र आहे. कॅसिनोमुळे गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आले असून, याला आताच अटकाव न केल्यास पुढे याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. गोवा राज्य कॅसिनोमुक्त करून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करणे, ही आज काळाची आवश्यकता आहे, अशी मागणी रणरागिणीच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच सागरी सुरक्षा अभेद्य आहे ! - कॅप्टन आनंद मुकुंदन्

मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा : शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
     मालवण - छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी नौदलाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच सागरी सुरक्षा अभेद्य आहे. भारतीय नौदलाच्या वतीने आम्हाला ३५० व्या वर्धापनदिनात सहभागी होता आले, हे आमचे भाग्य आहे, अशा भावना भारतीय नौदलाच्या निर्भिक युद्धनौकेचे कॅप्टन आनंद मुकुंदन् यांनी व्यक्त केल्या. या महोत्सवाच्या निमित्ताने संरक्षण मंत्रालयाच्या वतीने येथे दाखल झालेल्या निर्भिक युद्धनौकेने सिंधुदुर्ग किल्ल्याला मानवंदना (सलामी) दिली.

आय.पी.एल्.चे क्रिकेट सामने महाराष्ट्राच्या बाहेरच घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

     नवी देहली - पाण्याच्या भीषण दुष्काळामुळे 'इंडियन प्रिमियर लीग' अर्थात् आय.पी.एल्. आयोजित १ मे नंतरचे क्रिकेटचे सामने महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्रात होणारे १३ सामने इतर राज्यांत खेळवण्यात यावेत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. 'मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'ने या निर्णयास एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत ११ मेपर्यंत वाढ

     मुंबई - ८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहाराच्या प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या कोठडीत ११ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि अन्य ३४ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी सोनिया गांधी यांचा संबंध ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

* काँग्रेसच्या खासदारांचा राज्यसभेत गदारोळ 
* सभागृहाचे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित 
शासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, ही जनतेची अपेक्षा ! 
     नवी देहली - संयुक्त पुरोगामी आघाडीच्या शासनकाळात अतीमहनीय व्यक्तींसाठी करण्यात आलेल्या 'ऑगस्टा वेस्टलॅण्ड' आस्थापनाच्या हेलिकॉप्टर खरेदीतील घोटाळ्याशी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी राज्यसभेत केला. यावर काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अर्ध्या घंट्यासाठी स्थगित करण्यात आले. 

ठाणे येथे डॉ. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात दलित आणि आदिवासी यांच्यात मारामारी

दलितांनी आदिवासी महिलांवर आक्रमण केल्याचे निमित्त
आपल्या समाजातील स्त्रियांच्या रक्षणासाठी अशा कार्यक्रमांना
उपस्थित रहायचे किनाही, हे आदिवासींनीही वेळीच ठरवावे !
     ठाणे - येथील कोकणीपाडा भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोकळ्या पटांगणात साजरी करण्यावरून शेकडो आदिवासी आणि दलित यांच्यात मारामारी झाली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या पटांगणात आंबेडकर जयंतीची सिद्धता चालू असतांना स्थानिक कोकणीपाडा वनहक्क समितीचे शेकडो आदिवासी आणि दलित यांच्यात वाद झाला. यात अनेक जण घायाळ झाले.
१. जयंतीच्या कार्यक्रमात दलितांनी आदिवासींच्या काही महिलांवर आक्रमण केल्याने २००-३०० जणांच्या दलितांच्या जमावाने त्यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि हत्यारे घेऊन आक्रमण केले. (दलितांचे खरे स्वरूप जाणा ! - संपादक)
२. या वेळी आंबेडकर जयंतीचा फलक आणि पंचशीलचा ध्वजही उखडून फेकण्यात आला.
३. पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा प्रयत्नही जमावाकडून करण्यात आला; मात्र प्रकरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.

महालक्ष्मी पुरातत्व वास्तू संवर्धनाचे दायित्व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्वतः उचलावे ! - विभागीय आयुक्तांचा आदेश

    कोल्हापूर, २७ एप्रिल (वार्ता.) - श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याविषयी अद्याप मान्यतेची अधिकृत घोषणा झाली नाही. तरी पहिल्या टप्प्यातील कामे मार्गी लावण्यासाठी हालचाली चालू झाल्या आहेत. शासकीय पातळीवर महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या झालेल्या बैठकीत महालक्ष्मी पुरातत्व वास्तू संवर्धनाचे दायित्व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्वतः उचलावे, असा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला असून देवस्थान समितीने ते मान्य केल्याचे समजते. याचसमवेत करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी कोल्हापूर महापालिकेने पाठवलेला सुधारित २५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नगरविकास खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबा !
    दक्षिण काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी संघांना आतंकवाद्यांची नावे देण्यात आली होती, तसेच स्पर्धेच्या ईदगाह मैदानापासून पोलीस आणि सैन्य यांना २ मासांसाठी दूर ठेवण्यात आले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Dakshin kashmirme hui cricket pratiyogitame sahabhagi
teamonko atankvadionke nam diye gaye the.
- kya es deshdrohapar khiladionko Kadi saja hogi ?
जागो !
    दक्षिण कश्मीर में हुई क्रिकेट प्रतियोगिता में सहभागी टीमों को आतंकवादिआें के नाम
दिए गए थे. - क्या इस देशद्रोह पर खिलाडिआें को कडी सजा होगी ?

कुराण वाचा असे घटनेत लिहिले आहे का ? - योगऋषी रामदेवबाबा

       नवी देहली - द्वेषयुक्त भाषण करणे चुकीचे आहे. इस्लाम धर्माचे पालन करा आणि कुराण वाचा, असे घटनेमध्ये लिहिले आहे का ? असा प्रश्‍न योगऋषी रामदेवबाबा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना उपस्थित केला. भारतमाता की जय असे घटनेत लिहिले आहे का, या एम्आयएम्चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्‍नावर रामदेवबाबा यांनी वरील उत्तर दिले.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा शासनाचा प्रस्तावच अवैध ! - उच्च न्यायालय

      मुंबई - एम्.आर्.टी.पी. कायदा, तसेच अन्य संबंधित कायद्यांचा विचार करता अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा राज्यशासनाचा प्रस्तावच अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे धोरण आखण्यापूर्वी शासनाने इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट स्टडी केला आहे का ? शहरांच्या नागरी सुविधांवर याचा किती परिणाम होईल, याचा विचार केला का ? असे प्रश्‍न उच्च न्यायालयाने उपस्थित केले. यामुळे राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा राज्यशासनाचा प्रस्ताव बासनात गुंडाळला जाईल, अशी चिन्हे आहेत.

उद्या स्त्री आणि पुरुष यांच्यात भेद का केला ?, असे सर्वोच्च न्यायालयाने देवाला विचारले, तर आश्‍चर्य वाटणार नाही !

    हिंदु धर्मात महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगळेपण नाही. हिंदू केवळ हिंदू आहेत. हिंदु धर्म जर मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला अनुमती देतो, तर महिलांच्या मंदिर प्रवेशावर बंदी
का ? - सर्वोच्च न्यायालय                                
     (जिज्ञासेपोटी हा प्रश्‍न विचारला असता, तर कोणी धर्माचार्यांनी उत्तर दिले असते. अहंकारापोटी प्रश्‍न विचारणार्‍यांना कोण उत्तर देईल ? मुसलमानांना असे प्रश्‍न विचारण्याचे धाडस सर्वोच्च न्यायालय दाखवील का ? - संपादक)

अयोध्या येथे ३ मासांत भव्य श्रीराम मंदिराचे काम पूर्ण होऊ शकेल, असे म्हणणे ही हिंदूंची शुद्ध फसवणूक आहे ! ३ मासांत मोठ्या मंदिराचे बांधकाम तरी होऊ शकेल का ?

    अयोध्या येथे राममंदिर व्हावे, यासाठी आतापर्यंत ६०० लढाया झाल्या आहेत. लक्षावधी हिंदूंनी प्राण दिले आहेत. या वर्षाअखेर श्रीराम मंदिराच्या कामाला प्रारंभ होईल. ३ मासांत भव्य मंदिर बांधण्याचे काम पूर्ण होऊ शकेल. - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, ज्येष्ठ नेते, भाजप

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

कारागृहातील जीवन जगतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. चौकशीपासूनच पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते.    
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

वर्धा येथील सौ. विजया बरडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

उज्जैन येथील सिंहस्थामध्ये तीव्र उन्हाळा असतांना गुरुमेघातून कृपेची वर्षा चालूच !
सौ. विजय बरडेकाकू यांचा सत्कार
करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     उज्जैन (मध्यप्रदेश), २७ एप्रिल (वार्ता.) - येथील सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने कडक उन्हाळ्यामुळे तापमान ४० अंशांवर पोहोचल्याने सर्वत्र उष्णतेच्या तीव्र झळा लागत आहेत; मात्र या कडक उन्हाळ्यातही गुरुमेघांतून कृपेचा थंडगार वर्षावर साधकांवर होत असून श्रीगुरुकृपेमुळे आणखीन एक साधिका जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली. सेवेची तळमळ, देव ठेवेल ती परिस्थिती स्वीकारणे, समर्पित होऊन शांतपणे साधना करणार्‍या विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील सौ. विजया बरडे (वय ६२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे पू.(कु.) स्वाती खाडये यांनी घोषित केले.

पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यामुळे अध्यात्मशास्त्र विज्ञानापेक्षा श्रेष्ठ असल्याची आलेली अनुभूती !

१. हृदयाची धडधड वाढून अस्वस्थता जाणवल्याने 
काढलेल्या हृदयस्पंदनाच्या आलेखाचा (ईसीजी) 
अहवाल सामान्य येणे आणि तो त्रास आपोआप नाहीसा होणे
         साधारण वर्षभरापूर्वी माझ्या हृदयाची धडधड वाढून अस्वस्थता वाढल्यावर मी आमच्या कौटुंबिक वैद्यांकडे गेलो होतो. त्यांनी हृदयस्पंदनाचा आलेख (ईसीजी) काढून काही शारीरिक चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्यानुसार केलेल्या चाचण्यांचे सर्व अहवाल सामान्य आले. कालांतराने कोणत्याही उपचाराविना माझ्या हृदयाची धडधड आपोआप थांबली.
पू. डॉ. मुकुल गाडगीळ
२. तो त्रास पुन्हा जाणवून त्रासाची तीव्रता वाढणे 
आणि पुन्हा काढलेला ईसीजीचा अहवालही सामान्य येणे
         १५.१०.२०१५ या दिवसापासून माझ्या हृदयाची धडधड वाढून मला पुन्हा त्रास जाणवू लागला. पूर्वी मला असा त्रास क्वचित् प्रसंगी होत होता. आता मात्र हृदय धडधडण्याचा कालावधी दिवसेंदिवस वाढल्याने अस्वस्थताही वाढली होती. २२.१०.२०१५ या दिवशी हृदयाची धडधड आणि त्यामुळे होणारा त्रास प्रचंड वाढल्यामुळे काहीतरी गंभीर आजार असावा, अशी भीती मनात निर्माण झाली. २३.१०.२०१५ या दिवशी पुन्हा हृदयस्पंदनाचा आलेख (ईसीजी) काढला आणि या वेळीही त्याचा अहवाल सामान्यच आला. आधुनिक वैद्यांनी मला काही दिवस निरीक्षण करायला सांगून त्रासाची तीव्रता वाढल्यास पुन्हा इको कार्डियोग्राफी काढायला आणि आवश्यकता भासल्यास ताण चाचणी(स्ट्रेस टेस्ट) करायला सांगितली. आधुनिक वैद्यांनी तुमच्या जीवनात काही ताण-तणाव आहे का ?, असे विचारल्यावर अर्थातच मी नाही, असे उत्तर दिले.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. दिवाकर आगवणे
१. पू. काकूंना त्यांच्या बहिणीची आध्यात्मिक 
पातळी ६१ टक्के झाल्याचे सूक्ष्मातून एका दृश्याद्बारे दिसणे
        पू. काकूंना दोन बहिणी आहेत. सर्वांत लहान सौ. शीतल गोगटे (पूर्वाश्रमीची सुवर्णा.) याही साधनेत असून त्यांचाही पुष्कळ भाव आहे आणि प.पू. डॉक्टरांवर अपार श्रद्धा आहे. एके दिवशी सकाळी पू. काकूंना एक दृश्य दिसले. त्यात सुवर्णाताईच्या घरी सर्व ठिकाणी सुवर्णाताईवर दैवी कणांचा वर्षाव होत आहे, असे दिसले. त्या वर्षावामध्ये देवाने एक दृश्य पू. काकूंना दाखवले. ते ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याविषयीचे होते !
       सुवर्णाताईची देवाविषयीची धडपड आणि भाव यांमुळे ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून पार पडली. या अनुभूतीवरून असेही शिकायला मिळते की, एखाद्याचा आध्यात्मिक स्तर वाढला, तर त्याला प्रत्यक्ष पाहूनच नव्हे, तर पू. काकूंसारख्या संतांना ते सूक्ष्मातूनही लगेच कळते.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेले साधनेविषयीचे अनमोल दृष्टीकोन

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. समाजात संगीत, नृत्य इत्यादी कलांमध्ये 
मुलांनी पारंगत असणे, यामागील पू. काकूंनी 
सांगितलेले कारण आणि स्पष्ट केलेले साधनेचे महत्त्व
        सध्या समाजात अशी बरीच प्रतिभावान मुले-मुली आहेत, ज्यांना कोणतेही शिक्षण न घेेताच ती कला अगदी पारंगत असल्यासारखी येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजकाल दूरदर्शनवर जे गाण्याचे आणि नृत्याचे कार्यक्रम होतात, त्यात असे दिसते की, वर्षोनुवर्षे सराव केल्यावरही, असा गळा सिद्ध होत नाही आणि आजची ही मुले सहजपणे गाणे गातात, मग ते शास्त्रीय किंवा सुगम संगीत असो. याविषयी पू. (सौ.) गाडगीळकाकूंना विचारले असता त्या म्हणाल्या, ही मुले गंधर्वलोकातून, काही उच्च, तर काही महर्लोकातून आलेली असतात. त्यांचे संगीताचे शिक्षण पूर्वीच झालेले असते. त्यापुढेही साधना करून मोक्षप्राप्तीसाठी हे जीव पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात; पण येथे त्यांना योग्य साधनामार्ग न सापडल्याने त्यांचे आई-वडील, कलाक्षेत्रातील शिक्षक त्यांना पुन्हा तेच शिक्षण देतात आणि त्या मुलांचे आयुष्य पुन्हा वाया जाते. ती मुले लोकेषणा आणि माया यांत अडकून जातात. सनातन संस्थेत अशी बरीच मुले आहेत आणि ही मुले संगीत, नृत्य, अभिनय, चित्रकला अशा अनेक कलांमध्ये पारंगत आहेत; पण सनातन त्यांना पुढची साधना शिकवते. त्यामुळे या मुलांची खरी आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना मोक्षप्राप्ती होते. हीच त्यांची साधना आहे. समाजातही अशी दैवी मुले असल्यास वेळेतच त्यांना योेग्य साधनामार्ग दाखवणे आवश्यक आहे. याचे मुखत्वे दायित्व आई-वडील आणि शिक्षक यांचे आहे.

प्रगल्भतेने उत्तरे देणारा आणि श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. विश्‍व आय्या (वय ९ वर्षे) !

कु. विश्‍व आय्या
       २८.४.२०१६ या दिवशी कु. विश्‍व आय्या (वय ९ वर्षे) याचा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात व्रतबंध आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. विश्‍व आय्या याला व्रतबंधानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सूक्ष्मातील मित्र श्रीकृष्ण आणि 
प.पू. डॉक्टर असल्याचे सांगणारा कु. विश्‍व !
        एकदा पू. बिंदाताईंसमवेत बोलण्याचा योग आला. तेव्हा त्या आणि कु. विश्‍व यांच्यात पुढील संभाषण झाले.
पू. बिंदाताई : विश्‍व, तुझा मित्र कोण ?
विश्‍व : श्रीकृष्ण !
पू. बिंदाताई : सगुणातील मित्र कोण ?
विश्‍व : प.पू. डॉक्टर !
पू. बिंदाताई : अरे ! पण प.पू. डॉक्टर स्थुलातून कधी भेटतात आणि तू कुणाशी बोलतो ?
विश्‍व : तुमच्याशीच !
पू. बिंदाताई : बघितले ना, कसे पुढचे आहे ते !

स्वतःच्या विवाहाच्या सिद्धतेसाठी अनावश्यक वेळ न घालवता सेवेला प्राधान्य देणारे आणि विवाहाच्या दिवशीच ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठणारे श्री. विनायक शानभाग !

       मागील एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून (वर्ष २०१५ पासून) श्री. विनायक शानभाग हे (पू.) सौ. अंजली गाडगीळकाकूंसमवेत महर्षींनी सांगितल्याप्रमाणे दैवी प्रवासाच्या सेवेत आहेत. या प्रवासाच्या वेळी आम्हाला महर्षींच्या आदेशाप्रमाणे भारतातील विविध मंदिरे, देवस्थाने आणि धार्मिक स्थळे या ठिकाणी जावे लागते. नुकताच विनायकदादांचा रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधिका सौ. विद्या शानभाग (पूर्वाश्रमीच्या कु. शिल्पा करी) यांच्याशी विवाह झाला.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली साधनेविषयी अमूल्य सूत्रे !

१. अध्यात्म जगतांना वैचारिक 
स्तरावर लक्षात घ्यायची सूत्रे 
कु. अक्षता रेणके
 अ. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. ते अनुभवायला हवे. अध्यात्म जगायला शिकले पाहिजे.
आ. कसलाही ताण न घेता साधना करायला हवी : अध्यात्म जगतांना, साधना करतांना ताण घेऊ नये. चुका, कार्यपद्धती, बैठका इत्यादींचा ताण न घेता साधना करायला हवी. ईश्‍वर ब्रह्मांडात, चराचरात व्यापला आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे आहे. त्यामुळे लहान गोष्टींत अडकू नका. सतत शिकत रहायचे आणि पुढे जायचे. इतरांनी चूक सांगितल्यावर देवाची प्रीती अनुभवा. ईश्‍वर किंवा गुरु आपली माऊली आहे. ती आपल्याला मोक्षप्राप्ती होईपर्यंत हात धरून पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे ती सांगत आहे, बाळा, आता इथे चढ. इथून वर ये. हे पार करून चल. त्याप्रमाणेे ईश्‍वरापर्यंत जाण्यासाठी देवच मला चुका लक्षात आणून देत आहे. दायित्व देत आहे आणि शिकवून पुढे घेऊन जात आहे, असा भाव मनात ठेवला पाहिजे.

साधकांनो, क्षमायाचना करतांना वृत्ती अंतर्मुख झाल्यासच त्यातून आपली ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होते !

       घरी एका कार्यक्रमाचे नियोजन झाले. त्या वेळी एकमेकांच्या स्वभावांमुळे येणार्‍या अडचणींवर चर्चा चालू होती. एक जण दुसर्‍याला म्हणाला, क्षमायाचना करायला नको. क्षमायाचना करतात आणि नंतर मनात त्याविषयी संघर्ष चालू असतो. त्यापेक्षा आपल्या चुका स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणीत लिहा अन् प्रायश्‍चित्त घ्या ! कारण दुसर्‍याची क्षमा मागतांनाही त्याच्या चुकीविषयी मनात प्रतिक्रिया आलेली असते आणि क्षमा मागतांना ती प्रतिक्रिया सांगून बहिर्मुखतेने दुसर्‍याचीच चूक लक्षात आणून दिलेली असते.
       (स्वतःकडून झालेल्या चुकीमुळे दुसर्‍या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक क्लेश झाले आणि त्यात स्वतःची साधना व्यय (खर्च) झाली आहे, याविषयी मनाला तीव्रतेने जाणीव झाल्यावर मन अंतर्मुख होते. नंतर तिला पश्‍चात्ताप होऊन ती ईश्‍वर आणि संबंधित व्यक्ती यांच्याकडे स्वतःची चूक मनापासून मान्य करते अन् त्यांच्याकडे स्वतःच्या अपराधासंबंधी क्षमा करावी, अशी याचना करते. यालाच क्षमायाचना असे म्हणतात.

काटकसरी, परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि ईश्‍वराप्रती भाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला रामनाथी, गोवा येथील कु. शिवानंद विशाल देशपांडे (वय ८ वर्षे) !

       कु. शिवानंद विशाल देशपांडे हा सनातनच्या रामनाथी आश्रमात त्याच्या आई-वडिलांसमवेत रहातो. त्याचा उपनयन संस्कार २८.४.२०१६ या दिवशी यवतमाळ येथे होणार आहे. यानिमित्त त्याची आई, आजी आणि मावशी यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
कु. शिवानंद देशपांडे याला व्रतबंधानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. सर्व भार देवावर सोपवणारा कु. शिवानंद !
        एकदा शिवानंद खोलीत डोक्याला हात लावून बसला होता. मी त्याला विचारले, शिवानंद कसली काळजी करतोस ? त्यावर तो उत्तरला, आई, चिंता करतो विश्‍वाची ! (जांबचा नारायण, म्हणजे समर्थ रामदासस्वामी, यांचे हे वाक्य आहे.) मी म्हणतो, चिंता करू मी कशाला ? माझी काळजी देवाला । माझा मायबाप हरि । सारा भार त्याच्यावरी । त्या वेळी मला आश्‍चर्य वाटले आणि देवाप्रती कृतज्ञताही वाटली; कारण देवाने त्याच्या माध्यमातून त्या ओळी माझ्यासाठीच म्हटल्या होत्या. - सौ. अमृता देशपांडे (शिवानंदची आई)

मंगळुरू (कर्नाटक) येथील साधक श्री. प्रभाकर नायक यांनी ६३ टक्के, सौ. भारती शेणै यांनी ६२ टक्के, तर श्री. विवेक पै यांनी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

डावीकडून श्री. विवेक पै (वय ४० वर्षे), पू. सत्यवान कदम (यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.), प्रभाकर नायक (वय ६३ वर्षे) आणि सौ. भारती शेणै (वय ६१ वर्षे)


      हिंदुस्थानात भाषा, प्रांत, जात, स्त्री, पुरुष, कामगार, शेतकरी, विशिष्ट पक्ष अथवा विचारसरणी म्हणून जगण्याची प्रवृत्ती वाढत असतांना आपण हिंदुस्थानी म्हणून जगायला विसरत आहोत, ही शोकांतिका आहे !
- श्री. भारतकुमार राऊत, खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
       धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरण आणि धार्मिकता म्हणजे काय, हेही हिंदू विसरले. त्यामुळे बहुतेक सर्व केवळ जन्महिंदू झाले. कर्महिंदू फारच थोडे उरले. परिणामी हिंदु धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला.

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, १.५.२०१६ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
    संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून १.५.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी. प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहोत.

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून टी.डी.एस्.
कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर पुढील प्रक्रिया करा !
    आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती
    प्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो.

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

गणेश चतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास
इच्छुक असल्यास रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करा !
    प्रवासाच्या दिनांकाच्या १२० दिवस आधीपासूनच तिकीट आरक्षण चालू होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी काही मासांपूर्वी घोषित केले होते. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणार्‍यांनी ४ मास अगोदरच आरक्षण करण्यास आरंभ केला आणि ३ दिवसांत सर्व तिकीटे आरक्षित झाली. त्यामुळे नंतर आरक्षण करणार्‍यांची असुविधा (गैरसोय) झाली.
    ५.९.२०१६ या दिवसापासून गणेशोत्सवाला आरंभ होत असून त्यासाठीचे आगाऊ आरक्षण (अ‍ॅडव्हान्स् बूकिंग) चालू झाले आहे. सणासुदीच्या काळात रेल्वेची सर्व तिकीटे आरक्षित झाल्यानंतर बसच्या तिकीटदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली जात असल्याने प्रवाशांना अधिक मूल्य देऊन तिकीट काढावे लागते. त्यामुळे ज्यांना गणेश चतुर्थीच्या कालावधीत गावाला जायचे असेल, त्यांनी त्वरित रेल्वे तिकिट आरक्षित करून घ्यावे. अन्यथा नंतर आरक्षण मिळण्यात अडचण येऊ शकते.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. मुसलमान आणि ख्रिश्‍चनांसाठी त्यांचे स्वतंत्र निधी असताना मंदिर निधी त्यांचेसाठी का वापरले जातात?
२. शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य केले असताना सर्व धर्मीय नागरिकांना समान दिवाणी कायदा का नाही?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रसिद्धीचे नियोजन करा !

सनातन संस्थेचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांना सूचना !
     १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत गोवा येथे नियोजित असलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची व्यापक प्रसिद्धी करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात पुढील सेवांचे नियोजन करायचे आहे. 
१. जिल्हास्तरावर प्रसिद्धीमाध्यम संपर्क समन्वयक 
आणि अधिवेशन प्रसिद्धीसेवक यांची नियुक्ती करणे
     अधिवेशन प्रसिद्धीच्या सेवेसाठी पहिल्या टप्प्यात विविध प्रसिद्धीमाध्यमांच्या संपादकांना संपर्क करण्याचे नियोजन जिल्हास्तरावर करायचे आहे. या संदर्भात संपर्काला जाणार्‍या दोन-तीन गटांचा समन्वय ठेवणे, संपर्क नियोजित कालावधीत पूर्ण करणे, संपर्क परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याचा आढावा देणे, या सर्व सेवांच्या अनुषंगाने प्रसिद्धीमाध्यम संपर्क समन्वयासाठी एका साधकाची नियुक्ती करावी. प्रमुख आणि छोटी दैनिके अन् अन्य नियतकालिके (साप्ताहिक, पाक्षिक, मासिक) यांमध्ये अधिवेशनाच्या बातम्या, लेख, पत्रलेखन या माध्यमातून प्रसिद्धी होण्यासाठी प्रसिद्धीसेवकाची नियुक्ती करावी. स्थानिक परिस्थितीनुसार दोन्ही सेवांसाठी एका साधकाची निवड करता येईल. सध्या ही सेवा करणार्‍या साधकांना प्राधान्याने या सेवांचे दायित्व द्यावे, तसेच दोन्ही सेवांसाठी निवडलेल्या उत्तरदायी साधकांची माहिती (नाव, संपर्क क्रमांक, इ-मेल पत्ता, तसेच जिल्ह्याचा इ-मेल पत्ता) Sheet 1_Media Co-ordinator Details (hindu convention16) या गूगल शीटमध्ये १.५.२०१६ पर्यंत भरायची आहे. या दोन्ही सेवांची व्याप्ती पुढे दिली आहे.

कोल्हापूर सेवाकेंद्रातील गंमत

उपवासाचे फळ
        एका साधकाने एकादशीचा उपवास केला होता; म्हणून त्याने त्याच्या ताटातील फळ श्री. वेसणेकरकाकांना दिले. तेव्हा वेसणेकरकाका म्हणाले, काका, उपवास तुम्ही करता आणि त्याचे फळ आम्हाला मिळते. (फळाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे झाडावरील फळ आणि दुसरे म्हणजे उपवास केल्याचे आध्यात्मिक फळ (प्रसाद) मिळतो.)
- श्री. संजय माने, कोल्हापूर आश्रम
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       दारू आवडणारे दारूगुत्त्यात जातात; पण देवाधर्माला न मानणारे बुद्धीप्रामाण्यवादी मात्र देवळाचे पावित्र्य भंग करायला देवळात जातात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

इच्छांवर मर्यादा हवी ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तरच मानसिक शांतीचा लाभ होईल ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र,

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

केंद्रशासनाची दोन वर्षे !

 संपादकीय 
     केंद्रातील भाजप शासन पुढील मासात त्याच्या कार्यकालाची दोन वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने दोन वर्षांतील कर्तृत्वाचा लेखाजोगा जनतेसमोर मांडण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यात पठाणकोट प्रकरणाचा उल्लेख असणार का ? असा प्रश्‍न शिवसेनेने विचारला आहे. पठाणकोट प्रकरण पाकमधून आलेल्या आतंकवाद्यांमुळे घडले. त्यांनी पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर आक्रमण करून भारतीय व्यवस्थेला वेठीस धरले. देशाच्या वायूदलाला आव्हान द्यायला आलेल्या शत्रूराष्ट्राच्या आतंकवाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार मारले, हा भाग वेगळा; परंतु आतंकवाद्यांशी देशाच्या अधिकृत सैनिकांना दोन हात करावे लागतात, हा जिव्हारी लागणारा भाग आहे.

देशाची न्यायपालिका !

संपादकीय
नुकतीच राजधानी देहली येथे राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सरन्यायाधीश ठाकूर यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती उघड केली. न्यायाधिशांची उणीव, या सूत्रावर त्यांनी भर दिला. खटल्यांचे वाढते प्रमाण आणि न्यायाधिशांची अपुरी संख्या या कारणांमुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे. न्यायव्यवस्था प्रचंड दबावाखाली आहे. तेव्हा न्यायाधिशांची संख्या वाढवण्याच्या संदर्भात योग्य ते पाऊल उचला, अशी विनंती सरन्यायाधीश ठाकूर यांनी पंतप्रधान मोदी यांना केली. पंतप्रधानांना हे विनवतांना सरन्यायाधीश भावूक झाले होते; त्यांच्या डोळ्यांतून अश्रू निघाले, ही गोष्ट प्रसिद्धीमाध्यमांनी उचलून धरली. बैठकीत सरन्यायाधिशांच्या डोळ्यांतून निघालेले अश्रू कि न्यायव्यवस्थेची केविलवाणी स्थिती ? काय पहायचे ? वर्ष २०१४ च्या अखेरीस देशात तीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे घोषित झाले होते. आजच्या घटकेला हा आकडा सवा तीन कोटी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn