Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या संत पू. श्रीमती राधा प्रभु यांचा आज वाढदिवस
------------------------------------------

सनातनचे संत पू. वैद्य विनय भावे यांचा आज वाढदिवस

तृप्ती देसाई यांच्यामागे काँग्रेस ! - विहिंपचा आरोप

तृप्ती देसाई यांचे खरे स्वरूप ! तृप्ती देसाई यांना 
रोखण्यासाठी विहिंपने कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
       नाशिक, २५ एप्रिल - मंदिर प्रवेशाच्या सूत्रावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मागे राजकीय वलय असून अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्ष सक्रीय असल्याचा आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष एकनाथ शेटे यांनी केला आहे, तसेच प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का केले जाते, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात सध्या मंदिर प्रवेशाच्या संदर्भात चालू असलेल्या सूत्राच्या पार्श्‍वभूमीवर विहिंप आणि बजरंग दल यांनी एकत्रितरित्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेटे बोलत होते. या वेळी विहिंपचे जिल्हामंत्री गणेश सपकाळ, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक देविदास वारूंगसे आदी उपस्थित होते.
शेटे पुढे म्हणाले की,
१. देसाई यांच्या कृतीने जनरोष उफाळून काही विघातक घडले, तर शासनावर दबाव आणता येईल, असे षड्यंत्र काही राजकीय पक्षांकडून चालू आहे.

पाकिस्तानचा गळा दाबण्याचे धाडस भाजपवाले करणार का ? - शिवसेनेचा प्रश्‍न

      मुंबई - कन्हैया कुमारचा गळा दाबणारे लोक भारत माता की जय म्हणणार नाही, अशी उद्दाम भाषा करणार्‍या ओवैसीचा गळा दाबण्याचे धाडस दाखवणार का ?, पठाणकोटचा सूड घेऊ, असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात; पण पाकिस्तानचा गळा दाबण्याचे धाडस दाखवणार आहात का ? असे अनेक प्रश्‍न देशात विचारले जात आहेत; तेच प्रश्‍न शिवसेनेने भाजपला विचारले आहेत. जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्यावर पुण्याला जात असतांना विमानात झालेल्या आक्रमणाच्या कथित घटनेवर शिवसेनेने त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनातील संपादकीयातून हे प्रश्‍न विचारले आहेत.
संपादकीयातील काही सूत्रे
१. पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्‍न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही.

वर्ष २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ९ मुसलमान आरोपींची निर्दोष मुक्तता !

९ वर्षांनी निकाल देणारी 
कूर्मगतीने चालणारी न्याययंत्रणा !
        मुंबई - मालेगाव येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बहुचर्चित बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाने ९ आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यांपैकी एका आरोपीचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. ८ सप्टेंबर २००६ मध्ये मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये ३५ जण ठार, तर शेकडो लोक घायाळ झाले होते. एकूण १३ आरोपींपैकी या ९ जणांना २००६ मध्ये अटक करण्यात आली होती, तर २०११ मध्ये त्यांना जामीन मिळाला. उर्वरित आरोपी फरार आहेत.

इस्रायलच्या विरोधात युद्ध न करण्याच्या इसिसच्या धोरणाचा काश्मीरमधील धर्मांधांकडून निषेध !

     श्रीनगर - २२ एप्रिल या दिवशी जामिया मशिदीच्या बाहेर नमाजपठणानंतर धर्मांधांकडून भारताविरुद्ध हिंसक निदर्शने करण्यासह पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले होते. या वेळी काश्मीरमध्ये प्रथमच देशद्रोही धर्मांधांनी इसिस या आतंकवादी संघटनेच्या विरोधात भीत्तीपत्रके आणि कापडी फलक झळकवले. 
१. अल्लाने इस्रायलच्या विरोधात जिहाद करण्याचा आदेश दिलेला नाही, तर मुसलमानांची हत्या करणे, मशिदींमध्ये स्फोट घडवणे हा कुठल्या खुदाचा आदेश आहे, असे या कापडी फलकांवर लिहिले आहे. इसिसने इस्रायलच्या विरोधात युद्ध न करण्याच्या धोरणाचा या फलकाद्वारे निषेध करण्यात आला. 
२. निदर्शन करणार्‍यांमध्ये आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली. 
३. यासंदर्भात तेथील पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, शुक्रवारच्या दिवशी दगडफेक होण्याची शक्यता अल्प होती. परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणता आली. जामिया मशिदीच्या बाहेर काश्मीरमध्ये जिहादला योग्य ठरवणार्‍या लोकांच्या हातात इसिस या आतंकवादी संघटनेच्या विरोधातील फलक होते.

मोडी लिपीतील एक लक्ष कागदपत्रे प्रतिवर्षी नष्ट !

प्राचीन ठेव्याच्या जतनाकडे दुर्लक्ष करणारे राज्यकर्ते !
     मुंबई - महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विविध ठिकाणी सुमारे ३० कोटी एवढ्या महाप्रचंड संख्येत मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. ऐतिहासिक आणि अमूल्य ठेवा असलेल्या मोडी लिपीतील या कोट्यवधी कागदपत्रांतील सुमारे एक लक्ष कागदपत्रे प्रतिवर्षी नष्ट होत असल्याचा इतिहासकार आणि अभ्यासक यांचा अंदाज आहे.
१. मोडी भाषेतील ही कागदपत्रे अत्यंत जीर्ण झाली असून त्यावरील शाई पुसली जात आहे. या कागदपत्रांना वाळवी लागत असून कागदांचे पापुद्रे निघत आहेत. उंदीर, झुरळे यांच्याकडूनही ती कुरतडली जात आहेत, अशी माहिती मोडी भाषेचे अभ्यासक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे अध्यक्ष राजेश खिलारी यांनी दिली.
२. भारतात तंजावर, बिकानेर, बेळगाव, बंगळूर, म्हैसूर, भाग्यनगर येथे, तसेच महाराष्ट्रात पुण्यासह जिथे जिथे संस्थाने होती, तेथे पेशवेकालीन, शिवकालीन, आंग्लकालीन आणि बहामनीकालीन अशा चार प्रकारांत मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत.

अमेरिकेचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी इस्रोचा वापर करण्यास अमेरिकेतील खाजगी आस्थापनांचा विरोध

     वॉशिंग्टन - अवकाश क्षेत्रामध्ये भारताबरोबरच्या सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारताच्या इस्रो या अवकाशयानाचा वापर चालू केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला अमेरिकेच्या खाजगी आस्थापनांनी विरोध दर्शवला आहे. अमेरिकेतील खाजगी अवकाश आस्थापनांच्या अधिकार्‍यांनी राज्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या आस्थापनांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली असून भारतीय अवकाश संशोधन केंद्राशी स्पर्धा करणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रोच्या अवकाश उड्डाणांना भारत शासनाकडून अनुदान मिळते. इस्रोच्या अवकाश यानावरून अल्प किमतीत अवकाश उड्डाणे आयोजित केली जातात. त्यामुळे इस्रोशी स्पर्धा करणे कठीण होते, असे स्पेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलियट पुलहम यांनी म्हटले आहे.

चीनसमवेतच्या बैठकीत भारताकडून मसूद अझरचे सूत्र उपस्थित !

चीन आणि पाक यांच्याकडून भारताच्या विरोधात केल्या जाणार्‍या कोणत्याही घटनेच्या विरोधात 
भारताने कितीही वेळा सूत्र उपस्थित केले, तरी ते पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखे आहे ! 
     बीजिंग - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत-चीन सीमा चर्चेच्या १९ व्या बैठकीत जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझर याच्यावर संयुक्त राष्ट्र संघात मांडलेल्या बंदीच्या प्रस्तावाला चीनने विरोध केल्याचे सूत्र मांडल्याची माहिती डोभाल यांनी स्वतः दिली. यापूर्वी रशियामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ली यांच्या घेतलेल्या भेटीच्या वेळीही हे सूत्र उपस्थित केले होते.

शक्तीमान या घोड्याच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्यांना अटक करा ! - केंद्रीयमंत्री मनेका गांधी यांची मागणी

देशात प्रतिदिन लाखोंच्या संख्येने गोहत्या होत असतांना त्या 
थांबवण्याचीही मागणी मेनका गांधी यांनी करावी ! 
     नवी देहली - शक्तीमानच्या (शक्तीमान नावाचा घोडा) मृत्यूमुळे मला अतिशय दु:ख झाले आहे. ही एक दुर्दैवी घटना असून यापुढे पोलिसांकडून घोड्यांचा वापर करण्यात येऊ नये, तसेच या हत्येला कारणीभूत असलेल्या उत्तरदायींना अटक करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीयमंत्री मेनका गांधी यांनी केली. उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश जोशी यांनी त्यांच्या समर्थकांसह १४ मार्च या दिवशी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या विरोधात आंदोलन केले होते. या वेळी आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांकडून घोड्यांचा वापर करण्यात आला. तेव्हा आंदोलकांच्या झटापटीत शक्तीमान नावाच्या घोड्याचा एक पाय निकामी झाला होता. त्यावर अनेक उपचार करण्यात आले; मात्र ते अयशस्वी ठरून या घोड्याचा नुकताच मृत्यू झाला.

वॉशिंग्टनमधील मेट्रो रेल्वेस्थानकावर स्फोट : जीवितहानी नाही

    वॉशिंग्टन - येथील टेनलेटाऊन मेट्रो रेल्वेस्थानकावर स्फोट होऊन आग लागली. या स्फोटात जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, त्यांनी स्फोटांचा आवाज ऐकला आणि आगीचे लोळ उठतांना पाहिले. या घटनेनंतर मेट्रोच्या रेड लाईनवरील रेल्वेस्थानके बंद करण्यात आली, तसेच प्रशासनाने परिसराची नाकाबंदी केली.

गोव्यातील अविश्‍वासू भाजप नेत्यांना निवडणुकीच्या वेळी दारासमोर उभेही करू नका !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा राज्यप्रमुख सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन !
     मांद्रे (गोवा) - शाळांमध्ये प्रादेशिक भाषेतूनच शिकवण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यामुळेच २०१२ मध्ये लोकांनी भाजपला निवडून दिले होते; पण या नेत्यांनी लोकांचा विश्‍वासघात केला. पुढील निवडणुकीच्या वेळी त्यांना दारासमोर उभेही करू नका, असे आवाहन गोव्याचे रा.स्व. संघाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी एका कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघातच हा कार्यक्रम घेण्यात आला. 
     गोव्यात शाळांच्या माध्यमावरून गेल्या काही मासांपासून वाद चालू आहे. यात सत्ताधारी भाजप आणि भाषाप्रेमी असे दोन तट पडले आहेत. त्यातच रा.स्व. संघाचे स्थानिक नेते भाषेच्या बाजूने असल्याने त्यांचे आणि भाजपचे खटके उडू लागले आहेत.

आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाला करण्यात येणार्‍या वज्रलेपामुळे तेथे नैसर्गिकरित्या येणारे पाणी बंद झाल्याने संत संतप्त !

धर्मकार्यात धर्माचे ज्ञान नसणार्‍यांकडून 
ढवळाढवळ करण्याच्या घटना वाढत असून या 
रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य झाली आहे !
        खांडवा (मध्यप्रदेश), २५ एप्रिल - १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आेंकारेश्‍वर येथील ज्योतिर्लिंगाची होणारी झीज थांबवण्यासाठी वज्रलेप करण्याची प्रक्रिया चालू आहे. वज्रलेप करण्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या चारही बाजूंनी पाणी भरलेले रहाण्याची नैसर्गिक प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे येथील संतांनी संताप व्यक्त केला आहे. हे सूत्र धार्मिक व्यासपिठावर उपस्थित करण्याची सिद्धता चालवली आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी केवळ दोनच ठिकाणी अशा प्रकारे पाणी भरलेले रहात होते. एक आेंकारेश्‍वर आणि दुसरे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग होय. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाची नैसर्गिक विशेषता संपुष्टात आली आहे.
१. आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाची झीज थांबवण्यासाठी वज्रलेप करण्याची ही दुसरी वेळ असून यामुळे पुन्हा वाद उफाळून आला आहे.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया मन निर्मळ बनवते ! - श्री. वैभव आफळे

कर्णावती येथे शांतता समितीच्या बैठकीत संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने मार्गदर्शन
     कर्णावती (अहमदाबाद) - येथील बापूनगर पोलीस ठाण्यामध्ये नुकतीच शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने श्री. वैभव आफळे यांनी आपापसांत प्रेमभाव वृद्धींगत करण्यासाठी स्वत: स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया किती आवश्यक आहे, याविषयी उपस्थितांना माहिती दिली. ही प्रक्रिया आपल्या मनात शांती निर्माण करून आनंद देते, तसेच आपले मन निर्मळ बनवते. ही प्रक्रिया सनातन संस्था आणि संतकृपा प्रतिष्ठान यांच्या वतीने नि:शुल्क शिकवण्यात येते, असेही श्री. आफळे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस अधिकारी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने देहली येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना कु. मनीषा माहूर
     देहली - येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने संगम विहारच्या आस्था पब्लिक स्कूलमध्ये नैतिक मुल्यांचे संवर्धन कसे करावे, याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करतांना प्रतिष्ठानच्या कु. मनीषा माहूर यांनी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?, तसेच आदर्श मुलगा आणि विद्यार्थी कसे बनावे आणि राष्ट्राप्रती आपले कर्तव्य काय आहे ? या संदर्भात उपस्थितांना माहिती दिली.
पाकिस्तानी हिंदू सिंधू नदीचे पाणी क्षिप्रा नदीत मिसळणार !

     उज्जैन - सिंहस्थपर्वातील अमृत (शाही) स्नानाचा लाभ घेण्यासाठी पाकिस्तानातून हिंदूंच्या सिंध समाजातील २०० जणांचा एक गट आला आहे. त्यांनी क्षिप्रा नदीमध्ये मिसळण्यासाठी पाकिस्तानमधील सिंधू नदीचे पाणी आणले आहे. ज्याप्रमाणे मुसलमानांसाठी हज यात्रा महत्त्वाची आहे, त्याप्रमाणे आमच्यासाठी सिंहस्थपर्व महत्त्वपूर्ण आहे, असे या हिंदूंनी सांगितले.

चौकशी समितीकडून कन्हैया कुमार, उमर खालिदसह १४ विद्यार्थ्यांना दंड

जेएन्यूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण
        नवी देहली - जेएन्यूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी चौकशी समितीने उमर खालिद याला एका सत्रासाठी निलंबित करत २० सहस्र रुपयांचा दंड ठोठवला, तर विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार यालाही १० सहस्र रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. चौकशी समितीने एकूण १४ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. (देशविरोधी घोषणा देणार्‍यांचे केवळ निलंबन नको, तर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे ! - संपादक)
१. मुजीब गट्टो याला दोन सत्रांसाठी निलंबित करून २० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. सौरभ शर्मा याला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.
२. आशुतोष याला एक वर्ष विद्यापिठाच्या वसतीगृहात येण्यास बंदी घालून २० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.
३. अनिर्बान भट्टाचार्य याला १५ जुलैपर्यंत निलंबित करण्यात आले, तसेच तो २३ जुलैनंतर पुढील ५ वर्षे जेएन्यूच्या कोणत्याच अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकणार नाही. या विद्यार्थ्यांशिवाय रामा नागा, अनंथ कुमार, श्‍वेता राज, रुबिना आणि चिंटू कुमारी यांनाही प्रत्येकी २० सहस्र रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
४. बनोज्योत्सना लहरी आणि द्रौपदी घोष यांना ५ वर्षांसाठी जेएन्यूतून निलंबित करण्यात आले आहे.

रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना 'भगिनी पुरस्कार २०१६' प्रदान !

कोल्हापूर येथे भगिनी पुरस्कार २०१६ वितरण सोहळा 
पुरस्कार स्वीकारतांना कु. प्रतीक्षा कोरगावकर (उजवीकडे), तर डावीकडून महापौर
अश्विकनी रामाणे, श्री. राजू शेट्टी, श्री. राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली क्षीरसागर
 
     कोल्हापूर, २५ एप्रिल (वार्ता.) - हिंदु धर्माच्या उत्कृष्ट महिला धर्मप्रसारक म्हणून रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना 'भगिनी पुरस्कार २०१६' देऊन २४ एप्रिल या दिवशी गौरवण्यात आले. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात भगिनी मंचाद्वारे आयोजित 'भगिनी महोत्सव सोहळा - २०१६' चा सांगता समारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळा झाला. या वेळी हा पुरस्कार देण्यात आला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत गुणवत्ता प्राप्त केलेल्या भगिनींचाही यानंतर सत्कार करण्यात आला. रोख रक्कम ११ सहस्र रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी अभिनेत्री मधुताई कांबीकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', सामाजिक कार्यकर्त्या शालन शेळके, मनीषा तोकले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना 'भगिनी पुरस्कार २०१६' देऊन गौरवण्यात आले. 

पुणे येथे आढळलेले आंबेविक्रेते नव्हे, संशयित बांगलादेशी घुसखोर !

* मुसलमान फळविक्रेत्यांच्या आधारकार्डवर १ जानेवारी हा समान जन्मदिनांक 
* बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याची मनसेची मागणी 
* कारवाईप्रकरणी पोलीस सुस्त 
     पुणे, २५ एप्रिल (वार्ता.) - पुणे शहरात १ जानेवारी हा समान जन्मदिनांक असलेल्या मुसलमान फळविक्रेत्यांची टोळी निदर्शनास आली आहे. आधारकार्डवरील त्यांंचा पत्ता झारखंड येथील साहिबगंज जिल्ह्यातील आहे. हा जिल्हा भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर आहे. सर्व जणांचा जन्मदिनांक समान कसा असू शकतो, असा रास्त प्रश्न उपस्थित करत मनसेने या संशयित बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. (देशाच्या कानाकोपर्यागत घुसून सुखेनैव रहाणारे बांगलादेशी घुसखोर ! बांगलादेशी घुसखोरीकडे तातडीने लक्ष देऊन पोलीस-प्रशासन यांनी घुसखोरांना कठोर शिक्षा देऊन त्यांनी हकालपट्टी करायला हवी. - संपादक) 

उज्जैन येथे आखाड्यातील साधूवर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक आक्रमण

  • जेथे साधूच असुरक्षित असतील, तेथे सर्वसामान्य जनतेचे रक्षण कसे होणार ?  
  • शासनाने या प्रकरणाचे निष्पक्ष अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करावी !
       उज्जैन (मध्यप्रदेश) - उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्‍वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली. या आक्रमणात त्यांच्या मानेवर वार करण्यात आले असून त्यांच्यावर इंदूर येथील एम्.वाय. रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.
      साधू तपेश्‍वरी हे गुजरातमधील सावरकुंडला या गावातील महंत गंगागिरी महाराज यांच्यासमवेत सिंहस्थपर्वासाठी आले आहेत. येथील दत्त आखाडा क्षेत्रात त्यांचा आश्रम आहे. गंगागिरी महाराज यांनी सांगितले की, सकाळी ते आश्रमातील अन्नक्षेत्रातील भोजनाची व्यवस्था पहात होते. त्या वेळी एका शिष्याने तपेश्‍वरी महाराज यांच्या मुखातून रक्त येत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांच्या मानेवर खोलवर घाव असल्याचे लक्षात आले. त्यांना तात्काळ इंदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणारे सनातन प्रभात एकमेव ! - गो.रा. ढवळीकर, अध्यक्ष, मराठी राजभाषा समिती

८०० हून अधिक वाचक उपस्थित !
दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा १७ वा, साप्ताहिक सनातन प्रभातचा 
१८ वा, इंग्रजी मासिक (आताचे पाक्षिक) सनातन प्रभातचा १० वा, तर सनातन साधक 
पुरोहित पाठशाळेचा ८ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा !
डावीकडून आमदार श्री. लवू मामलेदार, पू. सीताराम 
देसाई (दीपप्रज्वलन करतांना), श्री. गो.रा. ढवळीकर 
आणि श्री. शशिकांत राणे
     सनातन आश्रम, रामनाथी, २५ एप्रिल (वार्ता.) - हिंदूंवर अत्याचार झाले, तर सर्व वृत्तपत्रे मूग गिळून गप्प बसतात; मात्र मुसलमानांवर अत्याचार झाल्यास त्याला चांगली प्रसिद्धी देतात. आज समाजात असहिष्णुता असल्याचा आरोप केलो जातो. तथापि तमिळनाडू आणि केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रतिदिन हत्या होत आहे आणि प्रसारमाध्यमे त्याचा साधा उल्लेखही करत नाहीत. याउलट सनातन प्रभातमध्ये मात्र अशा बातम्यांना प्राधान्य असते. म्हणूनच हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारे सनातन प्रभात हे एक एकमेव दैनिक असून हेच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन मराठी राजभाषा समितीचे श्री. गोपाळ रामचंद्र ढवळीकर यांनी येथे काढले. सनातनच्या रामनाथी आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीच्या १७व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून फोंडा मतदारसंघाचे आमदार श्री. लवू मामलेदार तसेच सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे संपादक श्री. शशिकांत राणे उपस्थित होते. या सोहळ्यास ८००हून अधिक वाचक उपस्थित होते. या वेळी साप्ताहिक सनातन प्रभातचा १८ वा, इंग्रजी मासिक (आताचे पाक्षिक) सनातन प्रभातचा १० वा, तर सनातन साधक-पुरोहित पाठशाळेचा ८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

अतिक्रमण काढून पादचार्‍यांसाठी पदपथ मोकळे करून द्यावेत - जितेंद्र वाडेकर, विश्‍व हिंदू परिषद

सातारा येथे पदपथाची समस्या दूर होण्यासाठी निवेदन
पालकमंत्री श्री. विजय शिवतारे यांच्याशी
चर्चा करतांना श्री. जितेंद्र वाडेकर
     सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) - मोळाचा ओढा ते चेतना हॉटेल आणि माने रुग्णालय ते कृष्णानगर कालवा येथील अवैध अतिक्रमणे काढून येथील पदपथ पादचार्‍यांसाठी मोकळे करून द्यावेत, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर यांनी निवेदनाद्वारे केली. पालकमंत्री श्री. विजय शिवतारे यांनी हे निवेदन स्वीकारले. 
    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून मोळाचा ओढा ते चेतना हॉटेल आणि माने रुग्णालय ते कृष्णानगर कालवा येथे रस्ता डांबरीकरण आणि पूलाचे नूतनीकरण करण्याचे काम चालू आहे. तत्पूर्वी संबंधित अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली येथे असलेले अतिक्रमण काढण्यात आले होते; मात्र तेथे पुन्हा अवैध टपर्‍या, दुकाने, कापड विक्रेते, तसेच इतर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचार्‍यांना नाहक त्रास भोगावा लागतो. गावगुंडांमुळे हे अतिक्रमण होत आहे. ही समस्या दूर होण्यासाठी निवेदन देण्यात आले.

मंदिर प्रवेश ही स्टंटबाजी ! - एकनाथ शेटे, विश्‍व हिंदू परिषद

    नाशिक - महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे, हाच विश्‍व हिंदू परिषदेचा दृष्टीकोन आहे. सध्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी जो काही प्रकार चालू आहे, तो केवळ प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी आहे, अशी टीका विश्‍व हिंदू परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष श्री. एकनाथ शेटे यांनी केली.
    ते पुढे म्हणाले की, हे आंदोलन करणार्‍या महिलांनी इतर धर्मांतील महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्धही आवाज उठवावा. मुसलमान धर्मातील महिलांची तलाक आणि बुरखा या सूत्रांवरून होणारी पिळवणूक पहाता या आंदोलनकर्त्या महिलांनी त्या विरोधातही आंदोलन उभारावे. हे प्रकरण म्हणजे डाव्या पक्षांनी विरोधकांच्या साहाय्याने एकत्रितपणे रचलेले षड्यंत्र आहे. तृप्ती देसाई यासुद्धा काँग्रेसच्याच असून त्यांनी २०११ आणि २०१३ मध्ये काँग्रेसच्या वतीने निवडणुका लढवल्या आहेत. 
    भाजपचे शासन आल्यापासून कुठेही हिंदु-मुसलमान दंगली घडल्या नाहीत; मात्र काँग्रेसच्या काळातच अशा सर्वाधिक दंगलीच्या घटना घडल्या, असेही शेटे यांनी या वेळी सांगितले.

पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीच्या चरणांवर सोन्या-चांदीचे कवच बसवण्यास विरोध ! - ह.भ.प. ज्ञानेश्वसर महाराज जळगावकर

     पंढरपूर, २५ एप्रिल - श्री विठुरायाच्या मूर्तीच्या चरणांवर ज्ञानोबा-तुकोबा यांच्यासह अनेक संतांनी डोके टेकवून दर्शन घेतले होते. पदस्पर्श दर्शन हे पंढरपूरचे वैशिष्ट्य आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन झाले पाहिजे; पण त्या जोडीला वारकर्यां च्या भावनांचाही विचार झाला पाहिजे. विठुरायाच्या चरणांवर मस्तक टेकवल्याने जे आत्मिक समाधान मिळते, ते समाधान देवाच्या चरणांवर सोन्या-चांदीचे कवच बसवल्यावर मिळणार नाही, असे सांगत ह.भ.प. ज्ञानेश्वार महाराज जळगावकर यांनी विठ्ठलमूर्तीच्या चरणांवर कवच बसवण्यास विरोध केला आहे. पुरातत्व विभागाकडून या संदर्भात यापूर्वी करण्यात आलेल्या सूचनांनाही वारकरी संप्रदायाकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कन्हैया कुमारने सभेत व्यासपिठावरून खाली उतरण्यास सांगितले !

प्रसिद्धीलोलूप आव्हाडांच्या लाळघोटेपणाचा कहर ! 
     पुणे - जेएनयूच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला पाठिंबा देणारे आणि मुंबई-पुण्यातील सभेच्या वेळी त्याला सुरक्षा व्यवस्था पुरवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कन्हैयानेच व्यासपिठावरून खाली उतरण्यास सांगितल्याचे कळते. एका खाजगी वाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे आव्हाड यांना मुंबई आणि पुणे येथील सभेत प्रेक्षकांमध्येच बसून सारा कार्यक्रम पहावा लागला. 

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वातील छायाचित्रात्मक क्षणचित्रे !

२२.४.२०१६ या दिवशी झालेल्या अमृत (शाही) स्नान सोहळ्यात
पवित्र क्षिप्रा नदीत स्नान करतांना संत-महंत. 
सिंहस्थपर्वाच्या स्थळी जागोजागी सनातनकडून लावण्यात आलेले
स्वागतफलक लक्षवेधी ठरत आहेत.

अंनिसविरोधातील मोर्च्याला ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांना पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली

     पुणे, २५ एप्रिल (वार्ता.) - येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा मानणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोंदूगिरीच्या विरोधात लढत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. आव्हान स्वीकारण्यास सिद्ध असूनही अंनिसचे कार्यकर्ते माझ्यासमवेत येत नाहीत, असे प्रतिपादन श्री. छाजेड यांनी केले आहे. (हा आहे अंनिसचा पळपुटेपणा ! - संपादक) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या भोंदूगिरीच्या विरोधात श्री. छाजेड यांनी १० एप्रिल या दिवशी पुणे स्थानकापासून विधानभवनापर्यंत सर्वपक्षीय निषेध मोर्च्याचे आयोजन केले होते; पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत मोर्च्याला अनुमती नाकारली, तसेच श्री. छाजेड यांना कलम १४९ अन्वये नोटीसही बजावली. (पोलिसांचा दुटप्पीपणा ! - संपादक)

कन्हैया कुमारवर विमानात आक्रमण झालेच नाही ! - मुंबई पोलीस

     मुंबई, २५ एप्रिल - २४ एप्रिलला पुणे येथे होणार्याच सभेला मुंबई विमानतळावरून येतांना जेट एअरवेजच्या विमानात गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारने केला होता. या संदर्भात कन्हैया कुमारवर आक्रमणाचा प्रयत्न झालाच नाही. त्याने केलेले आरोप चुकीचे आहेत, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (कन्हैया कुमार आणि समर्थक पुन्हा तोंडघशी ! प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पराचा कावळा करून आरोप करणार्यां्च्या वृत्तीचा जनतेला या निमित्ताने पुन्हा परिचय - संपादक) 

(म्हणे) 'दुबळा देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही !'

विद्या बाळ बरळल्या ! 
     पुणे, २५ एप्रिल - मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा केवळ महिलांनी समानतेसाठी दिलेला लढा होता. (यातूनच बाळ यांची हिंदूंच्या प्रथा मोडण्याची, तसेच प्रसिद्धीस पावण्याची वृत्ती दिसून येते. ज्यांना मुळात देवच मान्य नाही, त्यांनी देवाच्या दर्शनाच्या संदर्भात बोलणे ही श्रद्धाळू हिंदूंना ठोकरण्यासाठी केलेली नसती उठाठेवच आहे. - संपादक) त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे, तो दुबळा असून स्वतःचे रक्षण करू शकत नाही. स्त्री ही शक्ती आणि निर्मिती यांचे केंद्र असल्याने ती अपवित्र समजली जाते, अशी श्रद्धाळू नागरिकांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये कथित सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केली. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (थकून जायला देव म्हणजे काही माणूस नाही. ईश्वणर हे युगानुयुगे विश्वी चालवणारे चिरंतर, अविनाशी तत्त्व आहे. त्यामुळे देवाला स्वतःचे रक्षण करण्याची आवश्यकताच नाही. अशाप्रकारची वक्तव्ये करणे, हा समाजाला देव आणि धर्म यांपासून दूर नेण्याचाच डाव आहे. - संपादक) 

कर्नाळा (जिल्हा रायगड) येथे राज्य परिवहन महामंडळाची चालती बस जळून खाक

     कर्नाळा - मुरुडहून मुंबईला जाणार्यार राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीने अचानक पेट घेतल्याची घटना २५ एप्रिल या दिवशी सकाळी घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणार्याट मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागली त्या वेळी बसमध्ये ५१ प्रवासी होते. त्यात तीन लहान मुलांचाही समावेश होता. बसच्या इंजिनमध्ये प्रथम आवाज होऊन आग लागली, तेव्हा वाहकाच्या साहाय्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर काही वेळातच बस जळून खाक झाली, असे चालकाने सांगितले. गेल्या आठवड्यातच खोपोली येथे अशीच चालती बस पेटली होती. सुदैवाने त्यातही कोणती जीवितहानी झाली नव्हती; मात्र अशा घटना वारंवार होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वारंवार घडणार्याा अशा घटनांविषयी राज्य परिवहनाच्या प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत कि नाही ? - संपादक)

भीक मागण्यापेक्षा डान्सबार बरा ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली, २५ एप्रिल - नृत्य करणे हा व्यवसाय आहे. त्यामध्ये अश्लीहलता असल्यासच ते अवैध ठरण्याची शक्यता आहे; मात्र डान्सबारच्या संदर्भातील शासकीय नियमावली ही अंतिमत: डान्सबारवर प्रतिबंध आणणारी ठरणे योग्य नाही. रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा किंवा अवैध कृत्यांमध्ये सहभागी होण्यापेक्षा डान्सबारमध्ये नृत्य करणे केव्हाही चांगलेच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती करणारा आतंकवादी महंमद शफी ठार !

     मोसूल (इराक) - भारतीय तरुणांना इसिसकडे आकर्षित करून त्यांची भरती करणारा महंमद शफी अरमार हा आतंकवादी अमेरिकेने केलेल्या आक्रमणात ठार झाल्याचे वृत्त आहे. 
     महंमद शफी हा मूळचा कर्नाटकमधील भटकळ येथील रहिवासी आहे. भारतातील तरुणांना इसिसमध्ये भरती करण्याचे दायित्व त्याच्याकडे होते. त्याने आतापर्यंत ३० भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती केल्याचा अंदाज आहे. भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती करण्यासाठी ऑनलाईन व्यवहार आणि हवाला यांच्या माध्यमातून शफी पैसे जमवत होता. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून त्याने ५०० हून अधिक तरुणांशी संपर्क साधला होता.

राज्यातील सराफ संघटना पुन्हा तीन दिवसांच्या संपावर

     पुणे - वाढीव एक टक्का अबकारी कराविरोधात राज्यातील सराफ संघटना २५ एप्रिलपासून पुन्हा एकदा संपावर गेल्या आहेत. मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्याचे सांगत सराफ संघटनांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मोठ्या शहरांमधील सराफ संघटना संपामध्ये सहभागी होणार आहेत. चर्चेचे आश्वावसन मिळाल्यानंतर सराफांनी एक मासानंतर संप मागे घेतला होता. आता सराफांच्या मागणीवर शासन कोणता निर्णय घेणार, हे पहाणे महत्त्वाचे आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या धार्मिक परंपरा पायदळी तुडवण्यामागे राजकीय षड्यंत्र ! 
      मंदिर प्रवेशाच्या सूत्रावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मागे राजकीय वलय असून अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्ष सक्रीय असल्याचा आरोप विश्‍व हिंदु परिषदेने केला आहे. हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Mandirpraveshke mudde par Bhumata Briged ki Trupti Desai ke pichhe apratayksha Congress parti. - VHP 
Hinduo, Dharmaraksha hetu yek ho !
जागो ! 
मंदिरप्रवेश के मुद्दे पर भूमाता ब्रिगेड की तृप्ती देसाई के पिछे अप्रत्यक्ष काँग्रेस पार्टी. - विश्‍व हिन्दू परिषद 
हिंदूंओ, धर्मरक्षा हेतु एक हो !

सोलापूरचे कृषीभूषण गणेश कुलकर्णी हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष

     सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या बहुचर्चित गणेश कुलकर्णी यांच्या हत्याकांडातील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. हत्या प्रकरणातील सर्व आरोपी हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे उपसरपंच गणेश कुलकर्णी यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा प्रविष्ट केला होता. 

नगर जिल्ह्यात पाण्याअभावी शस्त्रक्रिया बंद

     कर्जत (जिल्हा नगर) - कर्जत शहरामध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. कर्जतमधील पाणीटंचाईमुळे उपजिल्हा रुग्णालय अडचणीत आले असून शस्त्रक्रिया करण्यास पाणी मिळत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी हतबल झाले आहेत. पाण्याअभावी रुग्णालये बंद ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे

     पुणे, २५ एप्रिल - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड करण्यात आली आहे, तर परिषदेत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संशोधन विभागाच्या प्रमुखपदी कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बंडखोर चिनी नेत्याचा व्हिसा केला रहित !

केंद्रशासनाने चीनच्या विरोधासमोर शेपूट घातले !
     नवी देहली - चीनमधील उइघूर जमातीचे बंडखोर नेते दोलकुन ईसा यांना भारताने व्हिसा दिल्याचा चीनने निषेध नोंदवल्यानंतर भारताने अखेर त्यांचा व्हिसा रहित केला आहे. धरमशाला येथे लोकशाहीवर आयोजित एका परिषदेला ते उपस्थित रहाणार होते. उइघूर प्रांतातील स्थानिक नागरिक आणि चीनी सैन्य यांमध्ये वारंवार संघर्ष होत असतात. चीनमधून हद्दपार केलेले ईसा हे सध्या जर्मनीमध्ये रहात असून ते उइघूरमध्ये आतंकवादी कारवाया करत असल्याचा चीनचा आरोप आहे. 

महाराष्ट्र राज्यात वनविभागाच्या वतीने २ कोटी वृक्षांची लागवड होणार

पावसाळ्यापूर्वी सर्व सिद्धता करण्याची वनमंत्र्यांची सूचना 
    मालवण - वनविभागाच्या वतीने जुलै २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वनविभागाने पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे प्रभावीपणे करावीत, अशी सूचना वित्त नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिली. देवबाग, मालवण येथे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र येथे चालू असलेल्या वन विभागाच्या कार्यशाळेत मुनगंटीवार बोलत होते. 
     या वेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते वन विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच वन विषयक १४ पुस्तके आणि ४ ध्वनीचित्र-चकत्या यांचे प्रकाशन करण्यात आले.

उज्जैनमध्ये सिंहस्थपर्वात चोरीच्या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी सोडल्यामुळे साधूंचे पोलिसांवर आक्रमण

  • हिंदूंच्या उत्सवांतील चोर्‍या रोखू न शकणारे पोलीस काय कामाचे ? 
  • चोरांना मोकळीक देणार्‍या पोलिसांची शासनाने चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे !
       उज्जैन, २५ एप्रिल - येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात जुना आखाड्यातील साधूंच्या वस्तीत चोर्‍या होत असल्याची तक्रार येथील साधूंनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या साधूंनी चोरीचा संशय असलेल्या काही जणांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले होते (जे काम पोलिसांनी करायला हवे, ते साधूंना करावे लागत असेल, तर पोलीस हवेच कशाला ? - संपादक); परंतु त्यांची चौकशी न करता पोलिसांनी त्यांना सोडून दिले. त्यामुळे जुना आखाड्यातील काही साधू आणि भक्त यांनी पोलिसांवर २४ एप्रिल या दिवशी आक्रमण करत मारहाण केली.
        एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, सिंहस्थपर्वातील हिंसाचार आणि चोरी, अशा घटनांच्या निषेधार्थ साधूंच्या एका गटाने २४ एप्रिल या दिवशी मोर्चा काढून उज्जैनमधील रस्ते बंद केले होते. (उज्जैनमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नी साधूंना मोर्चा काढावा लागणे, हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने लज्जास्पद आहे ! - संपादक)

सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी रायगड जिल्ह्यातील दौर्‍यात घेतलेल्या अधिवक्त्यांच्या भेटी

अधिवक्ता रामदास
केसरकर
१. संतांच्या भेटीमुळे उत्साह वाढणे आणि 
चिपळूणपर्यंतचा प्रवास आनंदात होणे
     जानेवारी २०१६ या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वैयक्तिक कामानिमित्त मला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यांमध्ये जाणे आवश्यक होते. त्या वेळी देवाने विचार दिला, चिपळूण, संगमेश्‍वरपर्यंत वैयक्तिक कामानिमित्त प्रवास करणारच आहोत, तर रायगड जिल्ह्यातील काही राष्ट्र अन् धर्मप्रेमी अधिवक्त्यांना भेटावे. त्याप्रमाणे तेथील अधिवक्त्यांना भ्रमणभाष करून नियोजन केले आणि १.१.२०१६ या दिवशी प्रवासाला आरंभ केला. 
     जातांना देवाने सुचवले, दौर्‍याला जातांना बांदा येथील प.पू. दास महाराज अन् त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) माई यांची भेट घ्यावी. त्याप्रमाणे भ्रमणभाषवर प.पू. दास महाराज यांना संपर्क केला अन् माझा मानस व्यक्त केला. तेव्हा त्यांनी सांगितले, भेटीसाठी अवश्य या. त्याप्रमाणे दुपारी महाराजांच्या आश्रमात त्यांची भेट घेतली. भेटीनंतर मला पुष्कळ उत्साह वाटू लागला. त्यानंतर प्रवास करतांना कुडाळ सेवाकेंद्रात जाऊन पू. रेडकरआजी यांचीही भेट घेतली. संतांच्या भेटीमुळे माझा उत्साह वाढला आणि पुढील चिपळूणपर्यंतचा प्रवास आनंदात झाला.

स्वच्छता राखा !

     गेल्या वर्षीपासून पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला आरंभ केला. काही प्रमाणात ते यशस्वी झाले; मात्र आता आरंभीचा उत्साह अल्प झाला आहे. परत येरे माझ्या मागल्या झाले आहे. रस्त्यावर कचरा, गुटख्याच्या पुड्या, कार्यालयात घाण, जिन्यात थुंकीच्या पिचकार्‍या असे चित्र अद्यापही सर्वत्र दिसते. नगरपालिकेच्या गाड्या कचरा टाकत जातात. नाले तुंबलेले असतात. गटारांची स्वच्छता होत नाही. शासनाने अशा प्रकारे अभियान चालू करूनही अजून नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याची मानसिकता पालटत नाही. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने त्यांच्या अनुयायांनी स्वच्छता अभियान चालू केले. लाखो सेवकांनी अतिशय निष्ठेने सहस्रो गावांत जाऊन अभियान राबवले. कचरा गोळा केला. खरे तर तो त्यांचा समर्पण भाव होता. खरा प्रश्‍न आहे की, आपण कचरा, घाण करायची आणि ती सेवेकर्‍यांनी स्वच्छ करायची, हे कितपत योग्य आहे ? हा निर्लज्जपणा म्हणावा लागेल. एक प्रकारे ते पापच म्हणावे लागेल. सेवेकरी करतील ही वाट न बघता प्रत्येकांनी त्यांचा सहभाग नोंदवायला हवा. प्रत्येकाने त्यासाठी आपल्यापासून आरंभ करायला हवा.

तृप्ती देसाई नामक कलंकित महिलेला प्रसिद्धी देणे थांबवा !

   मंदिरातील महिला प्रवेशाच्या संदर्भातील घटनांना ऊत आणणार्‍या आणि स्वतःला फुकटची प्रसिद्धी मिळवून घेण्याचा अट्टाहास करणार्‍या स्त्री शक्तीला कलंक ठरलेल्या अज्ञानी तृप्ती देसाई यांचा सर्व धर्मप्रेमी अन् भाविक महिला यांच्या वतीने जाहीर निषेध ! हिंदु धर्म, शास्त्र, रुढी, परंपरा, धार्मिक कृती, अध्यात्मशास्त्र या संदर्भात काडीचाही अभ्यास नसणार्‍या या बिनडोक महिलेने आमच्या धार्मिक भावना दुखावून देवळांचे पावित्र्य भंग केले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना कारागृहात टाकावे, अशी मागणी जागरूक महिलांनी केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी तृप्ती देसाई या तथाकथित महिलेला खडसवावे ! 
      प्रसारमाध्यमे, दूरचित्रवाणी यांच्याकडून घेतल्या जाणार्‍या या संदर्भातील चर्चासत्रांनाही लगाम घालावा. अन्यथा वाहिन्यांचीच नोंद महिलांना घ्यावी लागेल. प्रसारमाध्यमांच्या विरोधातच महिलांना प्रथम समानता आणि असमानता यांचे धडे द्यावे लागतील. तृप्ती देसाई यांच्यासारख्या फालतु महिलेला अवास्तव महत्त्व देऊ नका. तिला डोक्यावर घेऊन नाचणे थांबवा ! 
- श्री. श्रीकांत भट, अकोला

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना नम्र विनंती !
    सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे. 
     जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा ख्रिस्तीधार्जिणेपणा !

     अनुदान देण्यास नेहमी उत्सुक असणारे आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी ख्रिस्त्यांना इस्रायलमधील धार्मिक शहरांना जाण्यासाठी अनुदान घोषित केले होते. अल्पसंख्यांकांचे तळवे चाटण्यासाठी ख्रिस्ती मुख्यमंत्र्याने ख्रिस्त्यांसाठी अशी योजना घोषित करून पुढील वर्षीच्या निवडणुकांची सोय करून ठेवली. त्या वेळी विरोधी पक्षनेते म्हणाले, हजला संपूर्ण जगातून यात्रेकरू जातात, तर इस्रायलमधील जेरूसलेम हे युद्धकेंद्र असून जगातील आणि भारतातील अत्यल्प, तर आंध्रप्रदेशातील केवळ दीड टक्का ख्रिस्ती तेथे भेट देतात. (त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)

राष्ट्र्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही !

     जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. - समर्थ रामदासस्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)
     हिंदुस्थानात सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची कल्पना अतीप्राचीन आहे; परंतु राजनैतिक चेतनेची उणीव होती आणि आजही आहे. त्याचे दुष्परिणाम हिंदूंना वेळोवेळी भोगावे लागले आहेत. (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

चौकशीच्या वेळी पोलिसांनी केलेला अतोनात छळ आणि त्यातून दिसून आलेली त्यांची आसुरी मनोवृत्ती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. चौकशीपासूनच पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते. 
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

देवाची आवड आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा रत्नागिरी जिल्ह्यातील चि. पार्थ राजू जंगम (वय २ वर्षे) !

       चैत्र कृष्ण पक्ष द्वितीया (२४.४.२०१६) या दिवशी चि. पार्थ राजू जंगम याचा दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याच्या कुटुंबियांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. पार्थ जंगम
१. पार्थच्या जन्मापूर्वी साधना करणारे 
मूल जन्माला येऊ दे, अशी प्रार्थना करणे
       पत्नी गरोदर असतांना माझी प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना सारखी प्रार्थना व्हायची, मला एकच मुलगा किंवा मुलगी हवी आहे. ते मूल आई-वडिलांचे ऐकून साधना करणारे, असेच जन्माला येऊ दे. हे मूल प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करणारे, त्यांच्या नावाचे सार्थक करणारे आणि त्यांना आवडणारे हवे, असे मला वाटायचे.
२. देवाची आवड
२ अ. देवाला साष्टांग नमस्कार करणे आणि वडिलांनाही साष्टांग नमस्कार करायला सांगणे : पार्थला देवाची पुष्कळ आवड आहे. अंघोळ झाल्यावर तो धावत देवघराजवळ जातो. डोके टेकवून स्वतःच पाया पडतो. इतरांना लावण्यासाठी विभूती घेऊन येतो आणि स्वतःही लावतो. मी अंघोळ केल्यावर देवाला नमस्कार करतो. तेव्हा तोही येऊन माझा हात धरून मला खाली ओढतो आणि साष्टांग नमस्कार करा, असे सांगतो अन् तोही करतो.

देवद आश्रमात काही दिवसांसाठी सेवेला आलेल्या साधिकेचे आत्मपरीक्षण !

       मुंबई येथील सनातनच्या साधिका सौ. मीना महाडीक २७.१.२०१५ ते ३.२.२०१५ या कालावधीत सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात सेवेसाठी आल्या होत्या. आश्रमातील वास्तव्यात त्यांनी केलेले आत्मपरीक्षण पुढे दिले आहे.
१. आश्रमातील शिस्त पाहून हिंदु राष्ट्रात शिस्त कशी 
असेल, याची जाणीव होणे आणि तसे प्रयत्न करण्याचे ठरवणे
       माझे आश्रमात असतांना प्रतिदिन २ घंटे आध्यात्मिक उपाय करणे आणि ८ - ९ घंटे सेवा करणे, असे नियोजन होते. ते पूर्ण करतांना दिवस अपुरा वाटत होता. आश्रमातील ८ दिवस कधी संपले, ते कळलेच नाही. मला आश्रमातील शिस्त पाहून हिंदु राष्ट्रात शिस्तप्रिय लोक कसे असतील, याचा अनुभव घेता आला. बेशिस्तपणा हा माझा स्वभावदोष असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे यापुढे मी शिस्त अंगी बाणवण्याचा प्रयत्न करीन.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

प.पू. पांडे महाराज यांनी भगवंताच्या परिपूर्ण नियोजनाविषयी केलेले मार्गदर्शन

      भगवंताचे नियोजन किती परिपूर्ण आहे ! मानव, पशू-पक्षी आणि वृक्ष-वेली यांचे निरीक्षण केल्यास मानवाव्यतिरिक्त सर्वजण भगवंताच्या नियोजनानुसार आचरण करत असल्याचे आढळून येते. भगवंताच्या नियोजनानुसार आचरण करून आनंदी असणारे पशू-पक्षी, वनस्पती आणि त्यानुसार आचरण न केल्याने सतत तणावग्रस्त असलेला बुद्धीवादी मानव यांच्या जीवनातील भेद पुढीलप्रमाणे आहे.
प.पू. पांडे महाराज
१. अन्नाचा साठा न करता मिळेल त्या अन्नावर 
उदरनिर्वाह करणारे पशू-पक्षी, तर उद्याच्या 
अन्नाची चिंता करून त्याचा साठा करणारे मानवप्राणी !
       पशू-पक्ष्यांना अन्न, पाणी, निवारा असे काहीही कायमस्वरूपाचे मिळत नसते. त्यांना अन्नपाणी मिळवण्यासाठी भटकावे लागते आणि जेवढे मिळेल, तेवढ्यावर समाधान मानावे लागते; परंतु मानवाचे तसे नसते. मानव बुद्धीच्या जोरावर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो; पण वृत्तीच्या स्तरावर तो पशू-पक्षी आणि वृक्ष-वेली यांच्यापेक्षाही खालच्या स्तरावर आहे. पशू-पक्षी अन्न, पाणी, निवारा, संपत्ती यांचा साठा करत नाहीत; परंतु हे केल्याविना आपले पुढील आयुष्य कसे जाईल ?, या भविष्याच्या चिंतेने मानव मात्र प्रत्येक गोष्टीचा संग्रह करत रहातो. त्याला उद्याची चिंता असते. पशू-पक्ष्यांना मात्र उद्या मला अन्न, पाणी मिळेल कि नाही, याची चिंता नसते.

पिढीजात उच्च आध्यात्मिक वारसा लाभलेले पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कुटुंब !

श्री. दिवाकर आगावणे
     पू. गाडगीळकाका, पू. (सौ.) गाडगीळकाकू आणि त्यांचे नातलग यांच्या माध्यमातून आम्हाला या देवमाणसांचा सत्संग अनुभवायला मिळाला. कोल्हापूर, सांगली आणि मिरज या भागांत आमचा दौरा चालू असतांना देवाच्या कृपेने पू. (सौ.) गाडगीळकाकूंच्या अनेक नातलगांशी आमच्या भेटीगाठी झाल्या. पू. काकू साधनेत आल्यापासून गेली अनेक वर्षे आवर्जून कधी सणावारांसाठी कुणाच्या घरी किंवा नातलगांकडे गेल्या नाहीत; पण या भागात दौर्‍यासाठी भ्रमण करत असल्यामुळे सेवेनिमित्त त्यांच्या काही नातलगांचे साहाय्य व्हायचे आणि त्या वेळी त्यांना भेटणेही झाले. माझे माहेर माहेर, जणू आईचा पदर । माझे सासर सासर, मायेचे हे घर, या पंक्तीप्रमाणे पू. काकूंच्या माहेरचे आणि सासरचे, दोन्हीकडील सर्वच नातलग उच्चशिक्षित आहेत. या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या मार्गाने अध्यात्माशी जोडलेला आहे. निर्मळता, मनमोकळेपणा, आपुलकी, प्रेमभाव, आदरातिथ्य आणि निरपेक्षता अशा अनेक दैवी गुणांचा संचय असलेली, म्हणजे एका शब्दात म्हणायचे झाले, तर ही सर्व देवमाणसे आहेत. यांच्याविषयी येथे जाणून घेऊया.

चि. सिद्धेश यांना भावी पत्नी चि.सौ.कां. सायली यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. साधेपणा : सायलीला नेहमी साधी माणसे आवडतात. तिचे राहणीमान साधेच आहे. फॅशन करणे किंवा महागड्या वस्तू खरेदी करून चैन करणे, तिला आवडत नाही.
२. आनंदी : ती नेहमी हसत-खेळत असते आणि सभोवतालचे वातावरणही आनंदी ठेवते. त्यामुळे मनाची मरगळ निघून जाते.
३. देवाप्रतीचा भाव : ती भावजागृतीच्या प्रयत्नांमध्ये देवाला आत्मनिवेदन लिहिते. त्या लिखाणाचा आशय असा असतो, गुरुराया, मी असमर्थ आहे, तुम्हीच साधना करवून घ्या.
४. ती गाणे शिकलेली नसूनही एखाद्या शिकलेल्या गायिकेप्रमाणे गाणे म्हणते.
       देवा, सायलीकडून असे अनेक गुण शिकण्याची तू संधी दिली आहेस, यासाठी तुझ्या चरणी कृतज्ञता !
- श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.४.२०१६)
        (हे लिखाण सौ. सायली सिद्धेश करंदीकर (पूर्वाश्रमीची चि. सायली गाडगीळ) यांच्या विवाहापूर्वीचा असल्याने त्यांचा उल्लेख कु. सायली असा आला आहे. - संपादक)

वधूवरांना विवाहानिमित्त प्राप्त झालेले देवतांचे आशीर्वाद म्हणजे अनमोल भेट असून त्यांच्याकडून हिंदु राष्ट्रात अनेक जिवांचा उद्धार होण्यासाठी देवतांनी ते प्रदान केलेले असणे

        आतापर्यंत रामनाथी आश्रमात अनेक विवाहसोहळे झाले. त्यासाठी बाहेरगावहून अनेक पाहुणे यायचे. बरेच वेळा येणारे पाहुणे साधना न करणारे असायचे; परंतु या लग्नसोहळ्याला येणारा प्रत्येक जीव साधना करणाराच आहे. पू. गाडगीळकाका आणि पू. (सौ.) अंजलीताई या दोघांकडील पाहुणे अन् घरची मंडळी यांचे आगमन होऊन या सर्वांच्या माध्यमातून देवता येऊन नव वधूवरांवर पुष्पवृष्टी करणार आहेत. सर्व देवतांचे आशीर्वाद म्हणजे एक अनमोल भेट असून पुढे हिंदु राष्ट्रात वधूवरांकडून अनेक जिवांचा उद्धार होण्यासाठी त्या त्यांना आशीर्वाद देत आहेत, असे वाटले. हा सोहळा विष्णुलोकात होत असून विवाह मंडपात देवतांचे अस्तित्व असल्यामुळे आश्रमाभोवती सुगंध दरवळत आहे, असे दृश्य अनुभवलेे.
       हे गुरुदेवा, हा विवाहसोहळा आम्हा दोघांना घरी बसल्या ठिकाणी अनुभवता आला आणि पुष्कळ आनंद दिला. यासाठी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
- सौ. सुजाता रेणके, गडहिंग्लज (२२.४.२०१६)

चि. सिद्धेश करंदीकर यांना विवाह सुनिश्‍चित होण्यापूर्वी मिळालेल्या पूर्वसूचना

१. आमचा विवाह सुनिश्‍चित होण्यापूर्वी काही वेळा विवाहाच्या संदर्भात मनात विचार यायचे. त्या वेळी मला तू तुझ्या प्रपंचाची चिंता करू नकोस, तू साधना कर. योग्य वेळ आल्यावर आम्ही तुझा प्रपंचही करून देऊ, असे आतून कुणीतरी सांगत असल्याचे स्पष्टपणे जाणवायचे.
२. १.२.२०१६ या दिवशी विचार आला, तुझ्या आयुष्याला पुढील ९० दिवसांत एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे. प्रत्यक्षात २२.३.२०१६ या दिवशी म्हणजे ५२ व्या दिवशी माझा विवाह सुनिश्‍चित झाला.
विवाह निश्‍चित झाल्यावर व्यक्त 
झालेली कृतज्ञता आणि केलेली प्रार्थना !
        माझी काहीच पात्रता नसतांना देवाने मला संतकन्येशी विवाह करण्याची संधी दिली, यासाठी मनात केवळ कृतज्ञता इतकेच आहे. पूर्वी असे ऐकले होते, गुरु आपल्या शिष्याची सर्वतोपरी काळजी घेतात. मी शिष्य नाही; पण गुरु समर्थ आहेत. तेच प्रत्येक क्षणी आम्हा साधकांची काळजी घेतात. आमच्यावर कृपा करतात. त्यामुळे परात्पर गुरूंच्या कोमल चरणी एकच प्रार्थना आहे, आम्ही (मी आणि सायली) विवाहाच्या (मायेच्या) बंधनात जात असलो, तरी आम्हाला तुमचे चरण हवेत. संसारात राहून साधना हे पूर्वी ऐकले होते. आता आम्हाला आपल्या कृपेमुळे संसारात राहून साधना करता येऊ दे. 
- श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर (२१.४.२०१६)

नाडीज्योतिष हे शास्त्र सत्य असल्याची प्रचीती देणारा, तसेच संत आणि ज्योतिषाचा अभ्यास असणारे वेदमूर्ती यांनी वर्तविलेले भविष्य सत्य असल्याचे सिद्ध करणारा श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांचा विवाह !

हिंदु धर्म त्याज्य असल्याची बोंब ठोकणार्‍या 
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सणसणीत चपराक !
१. सांताक्रूझ, मुंबई येथे कौशिक नाडीपट्टीच्या वाचनाच्या वेळी 
श्री. सिद्धेश करंदीकर यांच्या विवाहासंदर्भात नाडीपट्टीत असलेला उल्लेख
        ३०.१०.२०१३ या दिवशी सांताक्रूझ, मुंबई येथे कौशिक नाडीपट्टी वाचन केंद्रात श्री. सिद्धेश करंदीकर यांच्या नावाच्या नाडीपट्टीचे वाचन झाले. त्या वेळी त्यांच्या विवाहाविषयी केलेला उल्लेख याप्रमाणे आहे - तुमचा विवाह वयाच्या २५ ते २८ या वयात होईल. (विवाह ठरला तेव्हाचे वय २५ वर्षे - श्री. सिद्धेश) मुलगी ब्राह्मण कुळातील असेल. तिला सख्खे भाऊ-बहिण नसतील. तुमच्या पत्नीला डोकेदुखीचा त्रास असल्याने ती चष्मा घालत असेल. तिच्या नावाचे आद्याक्षर स आणि अंतीम अक्षर ल असेल. (श्री. सिद्धेश यांच्या पत्नीचे नाव कु. सायली गाडगीळ असे आहे. वरील विवरण कु. सायली यांच्याशी मिळतेजुळते आहे. - संकलक)

श्री. सिद्धेश आणि चि.सौ.कां. सायली यांचा विवाह विष्णुलोकात संपन्न होत असून या विवाहास देवता उपस्थित असल्याचे जाणवणे

       २५.४.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात श्री. सिद्धेश करंदीकर आणि चि.सौ.कां. सायली गाडगीळ यांचा विवाहसोहळा संपन्न होत आहे. आज सकाळी या विवाहाची आठवण झाली. या विवाह सोहळ्याला देवतांचीही उपस्थिती लाभणार असून त्या वधूवरांना आशीर्वाद देत आहेत, असे दिसले. यानंतर प्रत्येक जिवाची लग्नगाठ आधीच बांधलेली असते. देवाच्या दरबारात हे लग्नबंधन झालेले असते, याची जाणीव होऊन पुढील दृश्य दिसले, श्री. सिद्धेश आणि चि.सौ.कां. सायली दोघेही महान जीव आहेत. सिद्धेश एक सिद्धपुरुष असून एका महान ऋषींचा पुत्र आहे आणि त्याचा विवाह कार्तिकीपुत्रींची महान सुपुत्री सायली हिच्याशी होत आहे. हे दोघेही देवलोकातून आलेले असून त्यांच्या विवाहासाठी सर्व देवताही उपस्थित आहेत. साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश आपल्या देवगण परिवारासह वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यास उपस्थित आहे. हा लग्नसोहळा विष्णुलोकात आयोजित केला आहे. याचे उत्तम नियोजन झाले असून सर्व देवतांच्या आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी आश्रमातील सर्व साधक अत्यंत नम्रतेने त्यांना भावपूर्णपणे आसन ग्रहण करण्याची विनंती करत आहेत. सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे, असे दिसले.
- श्री. अशोक रेणके, गडहिंग्लज (२२.४.२०१६)

संतकन्या चि.सौ.कां. सायली आणि चि. सिद्धेश यांचा कलियुगांतर्गत कलियुगातील न भूतो न भविष्यति ।, असा एकमेवाद्वितीय दैवी विवाह !

श्री. सिद्धेश करंदीकर आणि सौ. सायली सिद्धेश करंदीकर
कु. तृप्ती कुलकर्णी
      विवाह ठरल्यावर वधू आणि वर या दोन्ही बाजूंची होणारी धावपळ डोळ्यांसमोर येते. विवाहाला येणारे अनेक पाहुणे, अनावश्यक गप्पा मारणे, वर/वधू यांना चिडवणे, पूर्वसिद्धता नीट न केल्याने ऐन वेळी आवश्यक वस्तू न सापडल्याने शोधाशोध करावी लागणे, सामान अस्ताव्यस्त होणे, आवश्यक साहित्य न मिळाल्यास पर्यायी साहित्याचा वापर करणे, एकमेकांवर ओरडणे इत्यादी अनेक गोष्टी घडतांना दिसतात. विवाह करायचा, म्हणजे उपरोल्लेखित घटना घडणारच, असे सर्वसामान्यपणे गृहीत धरलेले असते; पण याला अपवाद म्हणजे आज २५ एप्रिलला सनातनच्या आश्रमात संपन्न झालेला पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची कन्या कु. सायली हिचा विवाह ! गोवा येथील रामनाथी आश्रमात नियमितपणे ४०० - ४५० साधक रहातात. कु. सायलीच्या विवाहाच्या निमित्ताने वधू आणि वर या दोन्हीकडचे मिळून १३० - १३५ पाहुणे आले होते, तरीही आश्रमात नेहमी जाणवणारे चैतन्य आणि शांतता विवाहाच्या दिवशीही जाणवत होती. महर्षींनी या वेळी सर्व देवता आणि सर्व ऋषिमुनी आकाशमंडलात उपस्थित असणार असून या साधक जोडप्याला अन् सर्व साधकांना आशीर्वाद देणार, असे सांगितले होते. विवाहप्रसंगी अनेक साधकांना तशा अनुभूतीही आल्या.

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना 
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले आमची प्रिय सायली ।

आमची प्रिय कु. सायली गाडगीळ ।
उद्या सौ. करंदीकर होशील ॥ १ ॥
सप्तपदी चालत समवेत त्याच्या ।
जा पलीकडे सप्तलोकांच्या ॥ २ ॥
गुरूंमुळे तुझा सत्संग मिळाला ।
व्यक्त करतो कृतज्ञता त्यांना ॥ ३ ॥
सिद्धेशवर तुझे प्रेम असे ।
कि तुला त्याच्यात कृष्ण दिसे ॥ ४ ॥
आई-बाबा तुझे संत असती
त्यांच्यात तुला गुरुदेव दिसती ॥ ५ ॥
वाटत असे आकाशातील त्या देवाला ।
सोहळा असा नाही आम्ही पाहिला ॥ ६ ॥
- श्री. विनायक शानभाग, चेन्नई (२४.४.२०१६)
अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे
www.sanatan.org

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

        हिंदु ८५ टक्के आहेत. हिंदु असहिष्णु असते, तर मशिदी आणि मदरसे फोफावले असते का ? मुसलमान रस्त्यावर नमाज करू शकले असते का ? दिवसांतून पाच वेळा ध्वनीवधर्र्कातून अल्ला शिवाय दुसरा परमेश्‍वर नाही अशा घोषणा करू शकले असते का ?
- पी. देवमथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस
        हिंदु धर्माचे महत्त्व बुद्धीमंतांनी सनातन हिंदु धर्माच्या स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सनातन वैदिक हिंदु धर्म स्थिर होताच सगळेच स्थिर होईल. सर्व ऐश्‍वर्यशाली होईल !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्‍वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
     बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जीवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संयमाची आवश्यकता !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     संस्कृती हा केवळ विद्वत्तापूर्ण चर्चा करण्याचा विषय नसून नित्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, हीच खरी संस्कृती ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सरन्यायाधिशांचे अश्रू !

संपादकीय
     न्यायाधीश म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभे रहाते ते कणखर आणि करारी व्यक्तीमत्त्व; पण या प्रतिमेला छेद देणारी घटना घडली. अलीकडेच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची संयुक्त परिषद आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते. त्या वेळी देशाचे सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांना न्यायव्यवस्थेतील अडचणी मांडतांना अश्रू अनावर झाले. त्यांना त्यांची सूत्रे मांडण्यासाठी केवळ १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता; मात्र मनातील ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ३५ मिनिटे घेतली. लोकशाहीचा महत्त्वाचा खांब म्हणजे न्यायव्यवस्था. भारतातील न्यायव्यवस्था ही कूर्मगतीने चालते, यात शंका नाही. प्रश्‍न हा आहे की, हा कलंक पुसण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत कि नाही ? सरन्यायाधिशांनी मांडलेले हे प्रश्‍न या आधीही बर्‍याच व्यासपिठांवरून चर्चिले गेले आहेत; पण फलनिष्पत्ती मात्र शून्य. न्यायव्यवस्था कुपोषित आहे आणि तिचे तातडीने पोषण करणे आवश्यक आहे. सरन्यायाधिशांचे अश्रू आपल्याला हेच सांगत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn