Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अयोध्येत राममंदिरच व्हावे ! - मुस्लिम राष्ट्रीय मंच

मुस्लिम राष्ट्रीय मंचाप्रमाणे अन्य मुसलमान संघटना बोलतील का ?
     लक्ष्मणपुरी (लखनौ) / अयोध्या - राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचने अयोध्येत राम मंदिरच उभे व्हावे, अशी मागणी केली आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंच न्यायालयाच्या बाहेरच या समस्येवर चर्चेद्वारे उपाय काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मंचचे नेते महंमद अफझल यांनी म्हटले आहे की,
१. राममंदिर उभारणीचे मुसलमानांनी समर्थन केले पाहिजे.
२. आता राममंदिराच्या प्रश्‍नावर वाट पाहू शकत नाही. विचार करा की, ज्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्या देशात भगवान श्रीराम तंबूमध्ये आहेत.
३. आम्हाला वाद नको आहे. अयोध्येत अनेक मशिदी आणि दर्गे आहेत; मात्र हिंदूंनी कधीही त्यावर अधिकार सांगितलेला नाही. केवळ रामजन्मभूमीवर ते अधिकार सांगत आहेत. यासाठी आम्हाला सहमतीने राममंदिर बनवायला दिले पाहिजे.
४. इस्लाममध्ये मशीद बांधायची असेल, तर ती भूमी मुसलमानाची असावी लागते किंवा वक्फ बोर्डाची; मात्र अयोध्येत या दोन्ही गोष्टी नाहीत. मुसलमानांचा अधिकार त्या भूमीवर नाही जेथे गर्भगृह आहे.
५. आम्हा भारतीय मुसलमानांचे नाते रामाशी आहे, बाबरशी नाही.

पाककडून भारताच्या सीमेमध्ये १८० बंकर्सची निर्मिती

भारताच्या सीमेमध्ये पाकचे इतके बंकर्स निर्माण होईपर्यंत भारताची सुरक्षा यंत्रणा काय करत होती ?
     जयपूर - भारताच्या राजस्थान सीमेवरील संवेदनशील भागांमध्ये पाककडून अनुमाने १८० बंकर्स बनवण्यात आल्याचे आढळून आले आहे. पाकने हे बांधकाम केवळ मागील १ मासात केले असून पुन्हा १०० बंकर्स बनवण्याची त्यांची सिद्धता चालू आहे. हे बंकर्स डेझर्ट वॉरफेअर तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात आले असून ते जैसलमेर, बीकानेर, बाडमेर आणि श्रीगंगानगर या शहरांच्या दीड किलोमीटरच्या परिसरात निर्माण करण्यात आले आहेत. संरक्षणतज्ञांच्या मते, हे बंकर्स बनवण्यामागे युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याला पाकमध्ये जाण्यापासून रोखण्याचा हेतू आहे.
     पाक केवळ बंकर्स बनवून थांबला नाही, तर त्याने एम्यूशन डंप, हेलीपॅड, वॉटर टॅन्क, सीमा चौकी आणि इतरही काही बांधकामे केली आहेत. चिंतेची गोष्ट म्हणजे याकरता पाकला चीनचेही साहाय्य मिळत आहे. या भागात चिनी आस्थापनांच्या सॅटेलाईट दूरध्वनींचे सिग्नल आढळले असून त्यांच्या सुरक्षेसाठी चीनी सैनिकांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (पाकिस्तान चुकून त्यांच्या सागरी हद्दीत गेलेल्या भारतीय मासेमार्‍यांनाही सोडत नाही, तर भारत त्याच्या सीमेत पाकिस्तानची बांधकामेही होऊ देतो, हे लक्षात घ्या ! - संपादक)

इसिसने श्री श्री रविशंकर यांचा शांतीचर्चेचा प्रस्ताव धुडकावतांना शिरच्छेद केलेल्या व्यक्तीचे छायाचित्र पाठवले !

इस्लाम म्हणजे शांती असे म्हटले जाते; मात्र इसिसला शांतीशी काहीही देणेघेणे 
नाही, हे जगाने लक्षात घेऊन त्यांच्यावर सैनिकी कारवाईच केली पाहिजे !
    आगरतळा (त्रिपुरा) - आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा सिरिया आणि इराक या देशांमध्ये निर्घृण अत्याचार करत दहशत पसरवणार्‍या इस्लामिक स्टेट (इसिस) या जिहादी आतंकवादी संघटनेशी शांततेची चर्चा करण्याचा प्रस्ताव इसिसने धुडकावून लावला आहे. प्रस्ताव धुडकावतांना इसिसने श्री श्री रविशंकर यांना शिरच्छेद केलेल्या एका ओलिसाच्या मृतदेहाचे छायाचित्र पाठवले आहे.
श्री श्री रविशंकर म्हणाले,
१. काही दिवसांपूर्वीच मी इसिसशी शांततेची चर्चा करण्याचा प्रयत्न केला; पण एका व्यक्तीचे शिरच्छेद केल्यानंतरचे छायाचित्र त्यांनी मला पाठवले. त्यामुळे इसिसशी शांततेची चर्चा करण्याचे माझे प्रयत्न बारगळले.
२. माझ्या मते, इसिसला कोणत्याही प्रकारे शांततेची चर्चा नकोच आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर सैनिकी कारवाईच करावी लागेल. (श्री श्री रविशंकर यांनाही इसिसला सैन्य कारवाईने धडा शिकवावा, असेच वाटत आहे; मात्र भारतात इसिसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना समुपदेशन दिले जात आहे. याकडेही श्री श्री रविशंकर यांनी लक्ष द्यावे ! - संपादक) ३. सर्व धर्म, संस्कृती तसेच भिन्न मते आणि विचारधारा यांना एका धाग्यात गुंफण्याचा माझा उद्देश आहे.

कन्हैया कुमारसारख्या दुष्प्रवृत्तींना चालना देणारे देशविरोधीच ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या कन्हैया कुमारला पुणे
 प्रवेशबंदी करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
डावीकडून सर्वश्री मंगेश कुलकर्णी, पराग गोखले, अभय वर्तक, राहुल कौल, नितीन वाटकर
      पुणे - ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी आतंकवादी महंमद अफझलच्या फाशीला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देहलीतील जेएन्यूत (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) त्याच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जेएन्यूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने भाषण केले. तसेच अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, कश्मीरकी आझादीतक जंग रहेगी जंग रहेगी, भारतकी बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी यांसारख्या देशविरोधी घोषणाही या वेळी देण्यात आल्या होत्या. हे लक्षात घेऊन कन्हैया कुमार याच्या कार्यक्रमास अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस आणि प्रशासन यांना विनंती केली आहे. त्याचा विचार करून पोलीस प्रशासनाने कन्हैया कुमार यास जिल्हा प्रवेशबंदी करावी, कन्हैया कुमारसारख्या दुष्प्रवृत्तींना जे चालना देत आहेत, तेही देशविरोधीच आहेत. अशा देशविरोधी शक्तींवरही कारवाई करण्यात यावी, तसेच कन्हैया कुमारच्या दौर्‍यांसाठी कुठून पैसा येत आहे, याचीही शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केली. कन्हैया कुमार २४ एप्रिल या दिवशी पुणे येथे येत आहे. याच्या निषेधार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
    कन्हैया कुमारच्या कार्यक्रमास अनुमती दिल्यास त्याला हिंदुत्ववादी संघटनांचा शेवटच्या क्षणापर्यंत विरोध कायम राहील आणि हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करण्यात येईल, अशी चेतावणीही श्री. अभय वर्तक यांनी दिली.

कन्हैया कुमारच्या वरळीतील सभेला अनुमती नाकारली !

देशद्रोहाचे आरोप असणार्‍यांच्या सभा आयोजित केल्या जातात, हे संतापजनक !
     मुंबई - जेएन्यूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या वरळीत होणार्‍या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. आता ही सभा चेंबूर येथील टिळकनगरमधील सभागृहात २३ एप्रिल या दिवशी होणार आहे.

श्री महाकालेश्‍वराच्या नगरीतील मोक्षदायीनी क्षिप्रा नदीत संत आणि भाविक यांनी अमृत स्नान केले !

क्षिप्रा नदीच्या तिरावर जमलेल्या साधू-संतांच्या मेळाव्यात सनातनचा अध्यात्मप्रसार
उज्जैन सिंहस्थपर्वातील पहिले अमृत (शाही) स्नान !
अमृत स्नानाला एकही शंकराचार्य नाही !
संतांच्या आधीच भाविकांनी स्नान केले !
महाकाल सरिक्षिप्रा गतिस्कवा सुनिर्मला ।
उज्जैनियम विशालाक्षी वसाह कस्या नरोचते ॥ - स्कंदपुराण
अर्थ : येथे महाकालाचे देवस्थान आहे. येथे क्षिप्रा नदी आहे आणि हे निश्‍चित आहे की येथे मोक्ष मिळेल. अशा स्थानावर विशालाक्षी प्रिय पत्नी, कोण निवास करू इच्छिणार नाही ?
     उज्जैन (मध्य प्रदेश) - जिथे श्री महाकालेश्‍वर आणि क्षिप्रा नदी आहे, तेथे निश्‍चित मोक्ष मिळेल, असे ब्रह्मर्षी वसिष्ठ ऋषींनी आपल्या पत्नीला (अरुंधतीला) सांगितल्याचा स्कंदपुराणात श्‍लोक आहे. उज्जैन या मोक्षदायिनी क्षेत्री २२ एप्रिल या दिवशी सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने जगभरातून आलेल्या कोट्यवधी श्रद्धाळू भाविक अन् संत-महंत यांनी पहिले अमृत (शाही) स्नान करून अमृततुल्य तृप्ती अनुभवली. संतांच्या पदस्पर्शाने क्षिप्रा नदीही कृतार्थ झाली. या वेळी देशभरातून आलेले विविध आखाडे, खालसे, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचे महंत, महामंडलेश्‍वर, संत, साधू, नागा साधू आणि श्रद्धाळू भाविक यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विनम्रपणे स्वागत करण्यात आले.
कडक उन्हाळ्यामुळे भाविकांची संख्या घटली !
     उज्जैन येथील सिंहस्थपर्वाच्या कालावधीत कडक उन्हाळ्यामुळे साधू-संत, तसेच भाविक यांची संख्या अपेक्षेपेक्षा अल्प झाल्याची माहिती उपस्थित पोलिसांनी दिली. कडक उन्हाळा नसता, तर कितीतरी पटीने भाविकांची संख्या वाढली असती.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     हिंदुविरोधकांनी इस्लाम, ख्रिस्ती, साम्यवाद इत्यादी हिंदुविरोधी धर्मपंथांच्या व्यतिरिक्त सर्वधर्मसमानता हा आणखी एक हिंदुविरोधी धर्मपंथ निर्माण केला आहे. या पंथाचे अनुयायी स्वत:ला सर्वधर्मसमानतावादी म्हणतात; परंतु काही सर्वधर्मसमानतावादी वस्तूस्थितीविषयी खरोखरच अज्ञानी आहेत. व्यवहारातील वस्तूस्थितीची जाणीव करून देणारा यथार्थ देखावा जर त्यांना दाखवला, तर ते राष्ट्रवादीत्वामध्ये पालटतील. अशांपैकी तुम्ही असाल, तर या चौकटींची प्रबोधनमालिका खरोखरच आपणासाठी आहे. या प्रबोधनातून व्यवहारातही सर्वधर्मसमानता कशी पक्षपातीपणे आचरली जात आहे आणि ही सर्वधर्मसमानता दांभिक कशी आहे, याची जाणीव होईल.
१. जगात एकूण ५२ मुसलमान राष्ट्रे आहेत. एकतरी मुसलमान राष्ट्र हज यात्रेसाठी द्रव्यसाहाय्य देते का ?
२. एकातरी मुसलमान देशामध्ये बिगर मुसलमान राष्ट्राध्यक्ष किंवा मुख्य प्रधान आहे का ?
- पी. देवमथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस- (क्रमश:)

भाविकांना वेठीस धरत पोलीस बंदोबस्तात धर्मद्रोही तृप्ती देसाई यांचा त्र्यंबकेश्‍वराच्या गाभार्‍यात थेट प्रवेश !

  • शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचा चौथरा, कोल्हापूरातील श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभारा आणि त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गाभारा या ठिकाणी प्रवेशाच्या संदर्भात पोलीस बळ वापरणारे शासन न्यायालयाचा प्रतिबंध असूनही भारतभरातील मशिदींमधून सकाळी ६ पूर्वी भोग्यांवरून कर्णकर्कश आवाजात होणार्‍या अजानवर कोणतीच कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • देशात धर्मांतर, लव्ह जिहाद, संस्कृतीचे अध:पतन, गोहत्या, बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी यांसारख्या समस्यांनी उग्र रूप धारण केले असतांना गाभारा प्रवेशासारख्या विषयासंदर्भात आंदोलन करणारे धर्मद्रोहीच होत !
  • जाणीवपूर्वक धर्मपरंपरांना छेद देणार्‍यांना ग्रामस्थांनी दाखवले काळे झेंडे !
  • दर्शन रांगेतून नव्हे, तर देवदर्शनासाठी आलेल्या उपस्थित भाविकांना वेठीस धरत थेट गाभार्‍यात प्रवेश दिल्याने भाविक संतप्त !
  • शेकडो वर्षांची परंपरा मोडली गेल्याने ग्रामस्थांना अश्रू अनावर !
       त्र्यंबकेश्‍वर, २२ एप्रिल (वार्ता.) - प्रसिद्धीच्या हव्यासापोटी धर्मशास्त्र अमान्य करून, भाविकांच्या धर्मभावनांशी खेळत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अन्य ३ महिला यांनी २२ एप्रिल या दिवशी आद्य ज्योतिर्लिंग असणार्‍या त्र्यंबकेश्‍वराच्या गाभार्‍यात प्रवेश केला. विशेष म्हणजे या दांभिक भक्तांनी दर्शन रांगेतून नव्हे, तर भाविकांना वेठीस धरत थेट गर्भगृहात प्रवेश केला. या वेळी देसाई आणि अन्य ३ महिला यांनी साडी परिधान केली होती. गर्भगृहात प्रवेश करून शेकडो वर्षांची परंपरा जाणीवपूर्वक मोडणार्‍या देसाई यांच्या विरोधात या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये असलेला रोष अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळेच त्यांच्या गाभारा प्रवेशाचा निषेध म्हणून गावात काळे झेंडे लावण्यात आले. धर्मद्रोही महिलांनी गाभार्‍यात केलेल्या प्रवेशाच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्‍वराशी मनातून जोडले गेलेले अनेक ग्रामस्थ भाविक यांना अश्रू अनावर झाले. (हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर राखला जावा, अशी हिंदूंची शासनाकडे तीव्र मागणी आहे. शासनाने तृप्ती देसाई यांच्या धर्मद्रोही हटवादीपणाला बळी पडू नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक)

गोव्यातील अमली पदार्थ व्यवहाराला आळा घालण्यासाठी विशेष योजना आखणार ! - मुक्तेश चंदर, पोलीस महासंचालक

   पणजी - गोव्यातील अमली पदार्थ व्यवहाराला आळा घालण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिली आहे. 
   मुक्तेश चंदर पुढे म्हणाले, गोव्यातील अमली पदार्थ व्यवहारासंबंधी विश्‍लेषण करण्याचे आदेश गोवा पोलीस खात्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाला देण्यात आले आहेत. पोलिसांनी कह्यात घेतलेले अमली पदार्थ कोणत्या प्रकारचे आहेत ? कोणत्या वर्षी अधिक प्रमाणात अमली पदार्थ कह्यात घेण्यात पोलिसांना यश आले ? अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांची माहिती, अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेले आरोपी पुन्हा याच व्यवहारात गुंतले आहेत का ? ही समस्या किती जटील आणि किती आव्हानात्मक आहे ? यासंबंधी माहिती मागवली आहे. या सर्व माहितीच्या आधारे राज्यातील अमली पदार्थ व्यवहारावर आळा घालण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे.

शुभविवाह

  आज चैत्र कृष्ण पक्ष प्रतिपदा (२३.४.२०१६) या दिवशी आंध्रप्रदेश येथील साधक चि. प्रसन्ना वेंकटापुर आणि चि.सौ.कां. तेजस्वी माडभूषी हे मंगळुरू येथे विवाहबद्ध होत आहेत.
चि. प्रसन्ना वेंकटापुर आणि चि.सौ.कां. तेजस्वी माडभूषी यांना सनातन परिवाराच्या वतीने शुभविवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा !


राजस्थानमध्येही पाणीप्रश्‍न असतांना महाराष्ट्रातून हलवलेले सामने जयपूरमध्ये का ? - राजस्थान उच्च न्यायालय

     जयपूर - राजस्थानमधील पाण्याची स्थिती देशातील इतर अनेक राज्यांपेक्षा भीषण असतांना महाराष्ट्रातील दुष्काळामुळे तेथून बाहेर हालवण्यात आलेले आयपीएल्चे सामने जयपूरमध्ये का, असा प्रश्‍न राजस्थान उच्च न्यायालयाने उपस्थित केला. याविषयी बाजू मांडण्याचा आदेश राजस्थान शासन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांना दिला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे मुंबई आणि पुणे येथून बाहेर हालवण्यात आलेले काही सामने जयपूरमध्ये खेळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावर जयपूरमधील मुक्त पत्रकार महेश परीक यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर निर्णय येत नाही, तोपर्यंत हे सामने खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

महेंद्रसिंह धोनी यांच्या घरी तरणतलावासाठी प्रतिदिन १५ सहस्र लिटर पाण्याचा पुरवठा

     रांची (झारखंड) - येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या घरात तरणतलाव बांधण्यात आला असून त्यासाठी प्रतिदिन १५ सहस्र लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. (भारतात सामान्यांसाठी एक आणि सेलिब्रिटींसाठी वेगळा न्याय असतो, हेच खरे ! - संपादक) येथील नागरिकांनी याची तक्रार राज्याचे महसूलमंत्री अमरकुमार बाऊरी यांच्याकडे केली आहे. धोनी यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, जेव्हा धोनी येथे असतात, तेव्हाच या तरणतलावात पाणी भरले जाते.तासगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याच्या चबुतर्‍याचे भूमीपूजन !

       तासगाव (जिल्हा सांगली), २२ एप्रिल (वार्ता.) - तासगाव शहरात बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यासाठीच्या चबुतर्‍याचे भूमीपूजन २२ एप्रिल या दिवशी करण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे-पाटील, जलसंपदामंत्री श्री. गिरीष महाजन, सहकारमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्री. संजयकाका पाटील, नगराध्यक्ष श्री. बाबासो पाटील, पुतळा समितीचे सचिव श्री. सिद्धेश्‍वर लांब, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(म्हणे) जातीय मानसिकतेतून रोहित वेमुलाचा बळी घेतला गेला !

प्रा. कॉ. दिलीप चव्हाण यांचा जावईशोध !
रोहित वेमुला याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघड असतांना चव्हाण यांनी केलेला 
हा आरोपच जातीय मानसिकतेतून केला आहे, असे म्हणावे लागेल !
     कणकवली - भारतीय शिक्षणक्षेत्रात पराकोटीची जातीय मानसिकता आजही आहे. केंद्रीय विद्यापिठेही त्याला अपवाद नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून याच जातीय मानसिकतेतून हैद्राबाद केंद्रीय विद्यापिठात शिकणारा रोहित वेमुला याचा बळी घेतला गेला, असे प्रतिपादन नांदेड विद्यापिठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख तथा प्रा. कॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. (खोटे बोल; पण रेटून बोल ही अशा जात्यंधांची मानसिकताच असते ! भारतीय शिक्षणक्षेत्रात जातीय मानसिकता खरे तर अशा जातीयवाद्यांनीच पसरवली आहे ! - संपादक) सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे दोन दिवसीय जिल्हास्तरीय अधिवेशन येथील अमित मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यातील खैरलांजी ते रोहित वेमुला - जेएन्यू-सत्ताधार्‍यांची जातवर्गीय मानसिकता, या परिसंवादात कॉ. चव्हाण बोलत होते.

दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीर नकाशात स्वतंत्रपणे दर्शवले !

पाठ्यपुस्तकेही योग्य प्रकारे 
सिद्ध करू न शकणारे शिक्षण मंडळ !
       मुंबई - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीर नकाशात स्वतंत्रपणे दर्शवले आहे. या भूभागाची लोकसंख्याही दिलेली नाही. मागील आवृत्तीमधील ही मोठी चूक नव्या आवृत्तीमध्येही कायमच आहे. या पुस्तकात अनेक चुका असल्याचे आढळून आले आहे. नव्या शैक्षणिक वर्षासाठी आलेल्या नव्या आवृत्तीत चुकांची पुनरावृत्ती झाली आहे. व्याकरणाच्या चुका, चुकीचे संदर्भ आणि नव्या चुका अशा एकूण ५५ चुका या पुस्तकात आहेत.
काही चुका पुढीलप्रमाणे आहेत.
१. पान क्र. ३० वर बिकानेर हा आशियातील सर्वांत मोठा लोकरीचा बाजार आहे, असे म्हटले आहे; तर दुसर्‍या पानावर जगातील सर्वांत मोठा बाजार असल्याचे नमूद आहे.

जळगाव येथील राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट

हे आहे राष्ट्र्रवादी काँग्रेसचे खरे स्वरूप !
     जळगाव - येथील राष्ट्र्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यावर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. ३०० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जेटी महाजन सूतगिरणी विक्री प्रकरणात हा अपहार केल्याचे सांगण्यात येते. सतीश पाटील यांच्यासह ८ जणांवर गुन्हा प्रविष्ट झाला आहे.

लातूरमध्ये पाच रुपयांना एक लिटर पाणी

दुष्काळाची भीषणता !
     लातूर - टंचाई निवारणासाठी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीच्या उपाययोजना करून रेल्वेने प्रतिदिन २५ लक्ष लिटर पाणी लातूरमध्ये येत आहे; मात्र महापालिकेची बेफिकिरी आणि काही नागरिक यांंमुळे पाण्याचे दर आकाशाला भिडले आहेत. प्रशासनाने ३५० रुपयांना सहा सहस्र लिटरचे टँकर देण्याची घोषणा केली; मात्र त्यासाठी एक सहस्र रुपये मोजावे लागत आहेत. शहरात प्यायलाही पाणी मिळत नसल्याने बाटलीभर पाणी ओतून घ्यायला पाच रुपये द्यावे लागत आहेत.

शस्त्र अनुज्ञप्ती (परवाना) मिळण्यासाठी मुसलमान तरुणाचा हिंदु धर्मात प्रवेश !

  • हिंदूंनो, आमिषाला बळी पडून किंवा धर्मात सन्मान मिळत नाही, असा आरोप करून नाही, तर शस्त्र अनुज्ञप्ती मिळण्यासाठी मुसलमान धर्मांतर करतात, हे लक्षात घ्या ! 
  • घरवापसीवर आकांडतांडव करणारे ढोंगी निधर्मीवादी यावर काही बोलणार नाहीत ! 
     बागपत (उत्तरप्रदेश) - शस्त्र बाळगण्याची अनुज्ञप्ती (परवाना) सहज मिळावी म्हणून एका मुसलमान तरुणाने हिंदु धर्म स्वीकारला आहे. फुरकान अहमद या मुसलमान तरुणाने हिंदु धर्मांत प्रवेश करून स्वतःचे नाव फूल सिंह ठेवले आहे. त्याने आता कपाळावर टिळा लावायला आणि टक्कल करून केवळ शेंडी ठेवायला देखील प्रारंभ केला आहे.

पुण्यात वाहनांचे पुन्हा जळीतकांड

पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा !
       पुणे, २२ एप्रिल - कोणत्याही कारणांशिवाय वाहनांना आग लावून देण्याच्या अनेक घटना शहरात गेल्या काही मासांमध्ये घडल्या आहेत. अशाच प्रकारे वाहन जळीतकांडाच्या २ घटना २१ एप्रिलच्या मध्यरात्री पुण्यात घडल्या. वाघोली येथील बाबूभाई गॅरजेमधील सहा ट्रक, तर शुक्रवार पेठेत सहा दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. शुक्रवार पेठेत तर पोलीस चौकीच्या समोरच हे जळीतकांड घडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजले नसून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (याआधीही विकृत मनोवृत्तीतून गाड्या पेटवून देण्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोषी शोधून काढून त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली, तरच अशा घटनांना आळा बसेल. - संपादक)

डॉ. सुभाष देसाई यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी अद्याप धागेदोरे नाहीत

        कोल्हापूर - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. सुभाष देसाई यांना दूरभाषवरून धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांना अद्याप धागेदोरे हाती लागले नाहीत. या प्रकरणी बीएस्एन्एल्च्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात येत असून या प्रकरणातील दूरध्वनी क्रमांकाचा छडा लावण्याचे काम चालू असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक भरतकुमार राणे यांनी सांगितले. डॉ. सुभाष देसाई यांना शार्प शूटर रवि पुजारी नावाच्या अनोळखी व्यक्तीने पुजार्‍याच्या जिवावर उठण्याचा प्रयत्न झाल्यास जिवाची किंमत मोजावी लागेल, अशी धमकी २० एप्रिल या दिवशी दूरभाषवरून दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. देसाई यांना सायंकाळी तातडीने शस्त्रधारी पोलिसांचे संरक्षण पुरवण्यात आले.

पंचांग अखंड कालापर्यंत अबाधित राहणार ! - नितीन घाटपांडे, इस्रोचे माजी अधिकारी

    नाशिक - हिंदु पंचाग हे ऋषिमुनींच्या दिव्यदृष्टीची प्रचीती आहे. खगोलाचे ज्ञान आत्मसात करून त्याआधारे पूर्वजांनी पंचांगाची रचना केली आहे. हिंदु पंचांग न मानणे, ही सध्याची फॅशनच झाली आहे; मात्र पंचांग हे अखंड कालापर्यंत अबाधित राहणार असल्याचे प्रतिपादन इस्रो सॅटेलाइट सेंटरच्या पॉवर सिस्टिम ग्रुपचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांनी केले.
    दि प्रेडिक्शन स्कूल ऑफ वेदीक अ‍ॅस्ट्रॉलॉजीच्या वतीने गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात आयोजित हिंदु पंचांगाला खगोलीय आधार या विषयावर बोलतांना घाटपांडे म्हणाले की, प्राचीन काळात मानवी दृष्टी ग्रहांपर्यंत पोचलेली नसतांनाही वेळ आणि ग्रहांच्या हालचालीचा अचूक अंदाज पंचांगात घेतलेला आहे. ज्या प्रमाणात ग्रह त्यांची जागा पालटतील, त्याचेच परिमाण आधार मानून त्याची रचना करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे पंचांगातील दिवसांच्या विभागणीला खगोलशास्त्राचा मोठा आधार आहे. पंचागांमधून अनेक गोष्टींची माहिती नागरिकांना मिळते. जगात सर्वच संस्कृतीत सात वार आणि २४ तासांचा दिवस असतो. प्राचीन असलेल्या हिंदु संस्कृतीने ही जगाला दिलेली देणगी आहे. याप्रसंगी व्यासपिठावर सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन दाते उपस्थित होते.

भुताच्या आक्रमणानंतर मलेशियातील एक शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद !

मलेशियात अंनिस नसल्यामुळे शाळा बंद ठेवावी लागली आहे. अंनिस असती, 
तर तिने असे होऊ दिले नसते आणि मुलांचा जीव धोक्यात आला असता !
     कुआलालंपूर - उत्तर मलेशियामधील एका शाळेत भुताची सावली दिसल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्या शाळेला अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले. भुताच्या अफवेनंतर संपूर्ण शाळेत भीतीचे वातावरण आहे. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी शाळेत काळे कपडे परिधान केलेले भूत पाहिल्याचा दावा केला आहे. या भुताची आकृती शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये आढळून आली आहे. 
१. शाळेच्या मुख्याध्यापिका सीती हवा मात म्हणाल्या, शाळेत एक आठवड्यापासून या घटना चालू आहेत. पहिल्या दिवशी २५ मुलांवर आक्रमणे झाली. त्यानंतर ५० मुलांवर आक्रमणे झाली. एवढेच नव्हे, तर ११ शिक्षकांवरही आक्रमणे झाली. 
२. शिक्षक कामराह इब्राहिम म्हणाले, मी एक काळी सावली पाहिली. ती सावली माझ्या शरिरात घुसण्याचा प्रयत्न करत होती. माझे सहकारी चारही बाजूने उभे राहून कुराणचे आयते म्हणत होते. 
३. इस्लामचे तज्ञ, विद्वान आणि तंत्र-मंत्राच्या साहाय्याने ही बाधा दूर करणार्‍यांना शांतीची प्रार्थना करण्यासाठी शाळेच्या परिसरात बोलावण्यात आले. तथापि प्रार्थना केल्यानंतरही ८ मुलांवर आक्रमण करण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

भारतीय सीमेत पाकचे बंकर्स निर्माण होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा काय करत होती ?
     भारताच्या राजस्थान सीमेवरील संवेदनशील भागांमध्ये पाककडून अनुमाने १८० बंकर्स बनवण्यात आल्याचे आढळून आले आहे. पाकने हे बांधकाम केवळ मागील १ मासात केले असून पुन्हा १०० बंकर्स बनवण्याची त्यांची सिद्धता चालू आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharatiya seemake bheetar Rajasthanme Pakne 180 bunkers banaye. Aur 100 bunkers bananeki siddhata shuru hai
Akramak Pakki mansikta hum kab samjhenge ?

जागो ! : भारतीय सीमा के भीतर राजस्थान में पाक ने १८० बंकर्स बनाएं । और १०० बंकर्स बनाने की सिद्धता शुरु है ।
आक्रमक पाक की मानसिकता हम कब समझेंगे ?


८ मे यादिवशी अमृतनगर येथे अमृत कुंभाभिषेक सोहळा !

        अमृतनगर (जिल्हा कोल्हापूर), २२ एप्रिल (वार्ता.) - महासिद्धगुरु शिवगुरु आश्रम, श्रीक्षेत्र अमृतनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ६ मे या दिवशी सकाळी ९ वाजता श्री हनुमंतरुद्रसूक्त यज्ञयाग, ७ मे या दिवशी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० पर्यंत श्री दत्तयाग होईल. रविवार, ८ मे या दिवशी अमृत कुंभाभिषेक सोहळा होत आहे. यात सकाळी ९.३० वाजता पादुका पूजा, सकाळी १० वाजता श्री चरणांवर अमृत कुंभाभिषेक आणि दर्शन सोहळा, सकाळी ११.३० वाजता संतांचे मार्गदर्शन, दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल.

संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने कर्णावती येथे व्यक्तीमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन

शारदा विद्या मंदिरामधील शिक्षकांना 
मार्गदर्शन करतांना सौ. स्मिता नवलकर
   कर्णावती (अहमदाबाद) - संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने येथील शारदा विद्या मंदिरामध्ये नुकतेच व्यक्तीमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
     या वेळी विद्यार्थ्यांकडून आदर्श आणि योग्य कृती होण्यासाठी गुण संवर्धन प्रक्रिया कशी राबवावी आणि त्यासाठी आपल्यापासूनच कसा प्रारंभ करू शकतो, याविषयी प्रतिष्ठानच्या सौ. स्मिता नवलकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे संचालक श्री. व्यास यांच्यासह ३५ हून अधिक शिक्षक उपस्थित होते.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कारवाईची इसिसला भीती

     नवी देहली - देशात इसिसच्या आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा करत असलेल्या कठोर कारवाईमुळे इसिसने तिच्या भारतातील आतंकवाद्यांना काही कालावधीसाठी शांत रहाण्याचा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. इसिसच्या सिरियातील प्रमुखाने हा आदेश दिल्याचे म्हटले जात आहे. 
१. इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याचे दायित्व शफी अरमार उर्फ युसूफवर आहे. इंटरनेट तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असणार्‍या भारतियांना शफी अरमारने ऑनलाइन वापर मर्यादित करण्याचा आदेश दिला आहे. 
२. शफी अरमारने आदेश दिल्यापासून इसीस आणि संपर्कात असणार्‍या भारतीय तरुणांमधील ऑनलाइन संपर्क न्यून झाला असल्याचे गुप्तचर खात्यातील सूत्रांनी सांगितले आहे. 
३. जानेवारीमध्ये एन्आयएने कारवाई करत जवळपास २४ लोकांना अटक केली होती. यात शफी हाताळत असलेल्या इसिसच्या १६ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. 
४. गेल्या काही महिन्यांपासून इसिसने संपर्क जरी अल्प केला असला तरी याचा अर्थ इसीस पूर्णपणे शांत झाले आहे असा नाही, अशी चेतावणी गुप्तचर खात्याने दिली आहे.


मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍याने इस्लाम धर्म स्वीकारला !

     नवी देहली - मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील खतौली गावातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुशीलकुमार जैन यांनी इस्लाम धर्मात प्रवेश केला आहे. त्यांनी महंमद अब्दुल समद, हे नाव धारण केले आहे. (धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे ! - संपादक) जैन यांनी स्वतः प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे. जैन यांनी सांगितले की, जैन समाज, नगरपालिका आणि महसूल विभाग यांच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून स्वतःच्या इच्छेने, कोणाच्याही आमिषाला किंवा दवाबावला बळी न पडता धर्मपरिर्वतन करत आहे. (समस्या केवळ हिंदूंना भेडसवतात असे नाही, तर मुसलमानांनाही भेडसावतात. असे असले, तरी ते धर्मांतर करतात का ? हिंदूंच्या हे लक्षात येत नाही, हे दुर्दैवी होय ! - संपादक) जैन यांनी दोन महिन्यांपूर्वी धर्मपरिवर्तन केल्याचे म्हटले आहे. आता तेे मशिदीत जाऊन नमाज पठणही करू लागले आहेत. (बाटग्याची बांग मोठी, अशी म्हण आहे. त्यानुसार उद्या हे बाटगे हिंदूंच्या मुळावर उठल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! - संपादक)रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या कु. सर्वमंगला मेदी यांनी हनुमान जयंती निमित्त काढलेले भावचित्र !


कु. सर्वमंगला मेदि


चौकशीच्या वेळी पोलिसांनी केलेला अतोनात छळ आणि त्यातून दिसून आलेली त्यांची आसुरी मनोवृत्ती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. चौकशीपासूनच पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते. 
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

या देशात हिंदु राष्ट्राची स्थापना अत्यावश्यक ! - राजश्री तिवारी , हिंदु जनजागृती समिती

गावकर्‍यांच्या मागणीवरून मसला 
(तालुका तुळजापूर) गावात हिंदु धर्मजागृती सभा
          तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २२ एप्रिल (वार्ता.) - आज देशात एकीकडे लव्ह जिहाद, धर्मांतर यांसारखी षड्यंत्र करून हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर दुसरीकडे इसीससारखी आतंकवादी संघटना हिंदुस्थानला खुरासान नावाचे इस्लामिक राष्ट्र बनवू पहात आहे, हे सर्व थांबवून हिंदूंचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर या देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी व्यक्त केले.

शंकराचार्यांशी चर्चा न करता मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणे, हा तृप्ती देसाई यांचा आततायीपणा ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक
     मुंबई - हिंदु मंदिर किंवा हिंदु धर्म हा स्त्रीला पूर्णपणे सन्मान देणारा धर्म आहे. आज इस्लाममध्ये बुरखा, खतना, मशिदीमध्ये प्रवेश नसणे, तलाक यांसारख्या वाईट प्रथा आहेत; मात्र तृप्ती देसाई त्याच्याविरुद्ध काहीच करत नाहीत. हिंदूंच्या मंदिरात जर तृप्ती देसाईंना प्रवेश हवा होता, तर त्यांना तीन पर्याय उपलब्ध होते. त्या तेथील स्थानिक किंवा मान्यवरांना घेऊन धर्मसभा बोलवू शकत होत्या. काशी विद्वत परिषदेला हिंदु धर्मातील परंपरा पालटण्याचा अधिकार आहे, तसेच हिंदु धर्मातील जे शंकराचार्य आहेत, त्यांच्याकडे त्या निवेदन देऊ शकत होत्या. शंकराचार्यांना विनंती न करता त्या ज्याप्रकारे मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, तो त्यांचा आततायीपणा आहे आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्या जी काही विजययात्रा काढत आहेत, तो त्यांच्या अहंकाराचा विजय आहे. हा त्यांचा विजय नाही, तर पराजय आहे; कारण शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर त्या गावातील महिला प्रवेश करत नाहीत, असे परखड मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी मी मराठी या वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात मांडले.

भरकटलेली आणि दिशाहीन आंदोलने !

     स्वयंघोषित स्त्रीजातीच्या कैवारी (?) भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा गेल्या तीन मासांपासून शनीशिंगणापूर येथील शनीदेवाच्या चौथर्‍यावर, कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीच्या आणि त्र्यंबकेश्‍वरच्या गाभार्र्‍यात प्रवेशासाठी थयथयाट चालू आहे. सामान्य जनता आणि शासन यांना त्यांनी वेठीला धरले आहे. एक युवती शनीशिंगणापूर येथे सुरक्षारक्षकाची दृष्टी चुकवून चौथर्‍यावर प्रवेश करते, काय आणि त्यामुळे पुरोगामी (?)आणि स्त्रीमुक्तीवादी संघटनांना जणू काही जीवनदान मिळाल्यागत आंदोलन करायला विषय सापडतो काय ? स्वसंस्कृतीचे सत्व नसलेल्या प्रसारमाध्यमांनी या सूत्राला नको तितके उचलून धरले आणि धर्माची कावीळ झालेल्या राजकारण्यांची वक्रदृष्टी त्यावर पडली.

पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत असहिष्णूतेवरील परिसंवादात सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांचा सहभाग !

      पुणे येथे वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे १४२ वे वर्ष आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या या व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात २५ एप्रिल या दिवशी असहिष्णुता आणि आमचा पंथ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक सहभागी होणार आहेत.
      राजकीय विश्‍लेषक प्रा.डॉ. सुहास पळशीकर आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हेही या परिसंवादात विचार मांडतील. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होईल.

राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५० व्या वर्धापन महोत्सवानिमित्ताने...
     सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने २२ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग महोत्सव चालू आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, मालवण यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने...
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी
बांधलेला अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला
भारताला सहस्रो मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. १ सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी त्यांच्या शक्तीशाली नौदलाच्या साहाय्याने पूर्व आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांवर वर्चस्व निर्माण करून भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला होता. कंबोडियातील अकोरवाट येथील जगातील सर्वांत भव्य हिंदु मंदिर आजही त्याची साक्ष देत उभे आहे; मात्र नंतरच्या काळात निर्माण झालेल्या समुद्रबंदीसारख्या अत्यंत घातक रूढीमुळे सागराशी नाते तोडलेल्या भारतियांनी समुद्रावरील वर्चस्व गमावले. त्याचाच परिणाम नंतरच्या काळात याच समुद्रावरून आलेल्या परकीय सागरी सत्तांनी या देशालाच गुलाम केले.

सेनापती तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व !

सेनापती तात्या टोपे यांच्या बलीदानदिनानिमित्त...
ब्रिटीश सैन्याला सळो कि पळो करून सोडणारे तात्या टोपे !
      वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे मर्म जाणून घ्यायचे असेल, तर तात्या टोपे यांच्या चरित्रातील एका पैलूकडे सूक्ष्म दृष्टीने आपण बघितले पाहिजे. हे स्वातंत्र्यसमर आपण हरल्यानंतर पुढचे १० मास तात्या टोपे वृकयुद्ध पद्धतीने म्हणजे गनिमी काव्याने हुलकावण्या देत आणि अचानक धाडी घालत ब्रिटिश सैन्यास सळो कि पळो करून सोडत होते. काही वेळा ते शत्रूच्या मार्‍यात येत आणि त्यांच्या सैन्याची दाणादाण उडे. तात्या तेथून निसटत आणि दुसर्‍या ठिकाणी जाऊन नवे सैन्य उभे करत. तात्या टोपे हवे तेव्हा आणि हव्या त्या ठिकाणी नवे सैन्य उभे करू शकत असत, याचा अर्थ लोकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध इतका असंतोष साचला होता आणि त्यांना मुक्तीचा इतका ध्यास लागला होता की, मारत मारत मरण स्वीकारणार्‍या वृत्तीची माणसे सहज उभी करता येत. हेही तेवढेच खरे आहे की, लोकांचा तात्यांच्या रणधुरंधरपणावर विश्‍वास होता. हा माणूस दम न तोडता शेवटपर्यंत शक्ती-युक्ती एकवटून लढत राहील, हे निश्‍चितपणे लोकांना ज्ञात होते. तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व ! 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

देशद्रोही कन्हैया कुमारच्या सभेला धर्मांतरित रोहित वेमुलाची आईही येणार

समानशिले व्यसनेषु सख्यम् । 
ही उक्ती सार्थ करणारे देशद्रोही
       पुणे, २२ एप्रिल - देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार याची पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष संघटनेच्या वतीने २४ एप्रिल या दिवशी सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. आता ही सभा बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या सभेला रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला याही उपस्थित रहाणार आहेत.
       आतंकवादाचे समर्थन करणार्‍या कन्हैया कुमारच्या पुण्यात येण्यास अनेक राष्ट्रप्रेमी संघटना, नागरिक यांचा विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर कन्हैया कुमार याच्या सुरक्षिततेचे कारण देत पोलिसांनी राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात सभा घेण्यास अनुमती नाकारली होती.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

     आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. स्त्रिया आणि मुली यांवर बलात्कार ओळखीच्या माध्यमातूनच होतात. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मुलींना मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य
२. मुलामुलींची अतिरेकी मैत्री
३. मुलींची संख्या अल्प झाल्याने अनेक मुलांचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे ते असे चुकीचे मार्ग शोधतात.
(संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, एप्रिल २०१३)

हनुमान जयंतीच्या दिवशी सौ. रंजना गडेकर यांना आलेल्या अनुभूती

सौ. रंजना गडेकर
१. पहाटे झोपेतून उठण्यापूर्वी वाईट 
शक्तीचे डोळे स्वतःच्या डोळ्यांशी एकरूप झाल्याचे 
जाणवणे आणि युद्ध संपल्यावर उठल्याप्रमाणे वाटणे
       ४.४.२०१५ या दिवशी हनुमान जयंती होती. पहाटे ४.४५ वाजता मला जाग आली. झोपेतून उठण्यापूर्वी एक क्षणभर एका वाईट शक्तीचे डोळे माझ्या डोळ्यांशी एकरूप झाल्यासारखे वाटले. यामुळे काही क्षण डोळ्यांसमोर एकदम काळोख आला. त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोरील काळोख नाहीसा झाला आणि परत डोळ्यांसमोर प्रकाश आला आणि युद्ध संपल्यावर जसे आपण जागे होऊन लगेच उठतो, त्याप्रमाणे उठल्याचे जाणवले.
२. आदल्या रात्री प्रार्थना केल्याने 
नेहमी सकाळी उठतांना होणारा त्रास न होणे
       सकाळी उठल्यावर कुठलाही त्रास जाणवत नव्हता. एरव्ही मला सकाळी लवकर उठता येत नाही. मला लवकर उठण्यास आध्यात्मिक त्रास होतो; पण या हनुमान जयंतीच्या दिवशी मात्र मला सहजतेने उठता आले. ही सकाळ मी त्रासविरहित अनुभवत होते. आदल्या दिवशी मी माझा त्रास न्यून होण्यासाठी प्रार्थना केली होती. त्याची दुसर्‍याच दिवशी सकाळी प्रचीती आली.

भावपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणारा आणि नेहमी कृतज्ञताभावात रहाणारा चि. सिद्धेश प्रकाश करंदीकर !

      २५.४.२०१६ या दिवशी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील चि. सिद्धेश प्रकाश करंदीकर आणि चि.सौ. कां. सायली मुकुल गाडगीळ यांचा शुभविवाह रामनाथी आश्रमात होत आहे. यानिमित्ताने चि. सिद्धेश याचे आई-वडील आणि बहीण यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. उत्तम स्मरणशक्ती
       सिद्धेशची स्मरणशक्ती उत्तम आहे. त्याला अनेक प्रसंग दिनांक, वेळ आणि मास (महिना) यांनुसार लक्षात असतात. - सौ. छाया करंदीकर (चि. सिद्धेशची आई)
२. निर्मळ
       सिद्धेश मनाने अत्यंत साधा आणि निर्मळ आहे. त्याच्या बोलण्यातून कधीच कुणी नातेवाईक, सहसाधक, मित्रपरिवार यांविषयी राग, द्वेष असल्याचे जाणवत नाही.

सनातन साधक पुरोहित पाठशाळेतील वेदब्राह्मण चि. सिद्धेश करंदीकर आणि गुरुकुलातील शिष्या चि.सौ.कां. सायली गाडगीळ गृहस्थाश्रमी होणार !

     चैत्र कृष्ण पक्ष तृतीया (२५.४.२०१६) या दिवशी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील चि. सिद्धेश प्रकाश करंदीकर आणि रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात पूर्णवेळ सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सायली मुकुल गाडगीळ हे विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्ताने चि. सिद्धेश यांच्या कुटुंबियांनी आणि चि.सौ.कां. सायली यांच्याविषयी स्वयंपाकघरातील साधिकांंनी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. सिद्धेश करंदीकर आणि
चि.सौ.कां. सायली गाडगीळ
यांना शुभविवाहानिमित्त सनातन
परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
साधनेमुळे स्वतःत आमूलाग्र पालट
 घडवून आणणारा आणि प.पू. डॉक्टरांप्रती 
अपार भाव असणारा चि. सिद्धेश करंदीकर !
१. आसक्ती अल्प असणे
      श्री. सिद्धेश याचे घर मुंबईला होते. तो घरून आश्रमात येतांना नेहमी सगळ्यांना खाऊ आणत असे. एकदा आम्ही दोघे घरून आश्रमात येत होतो. (आम्ही मुंबईत जवळच रहात होतो.) तेव्हा त्याने त्याच्या जवळील सगळा खाऊ माझ्याजवळ सहसाधकांना वाटण्यास दिला. स्वतःसाठी खाऊ काढून ठेवला नाही. (मी असतो, तर स्वतःसाठी थोडा खाऊ काढून ठेवला असता.)
     काही दिवसांपूर्वी सौ. करंदीकरकाकूंनी नारळाच्या वड्या बनवल्या होत्या. त्या वेळीही वड्यांचा पूर्ण डबा त्याने गुरुजींकडे साधकांना वाटण्यासाठी दिला.

वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

१. वाल्मीकि रामायणातील मारुतीच्या जन्माची कथा
       वाल्मीकि रामायणातील किष्किंधा कांड, सर्ग ६६ मध्ये मारुतीच्या जन्माची वर्णन केलेली कथा पुढे दिली आहे.
१ अ. मरुत् दैवतेच्या आशीर्वादाने अंजनाला वीर्यवान्, बुद्धीसंपन्न आणि महातेजस्वी असा पुत्र होणे : पूर्वी पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. काही शापामुळे ती वानरी रूपाला पावली होती. तिचे नाव अंजना असे होते. ती एकदा मनुष्यरूप धारण करून उत्तम वस्त्रे आणि अलंकार धारण करून पर्वताग्रावर फिरत होती. त्या वेळी मरुत् दैवताने तिचे वस्त्र उडवले. तिचे सुंदर अवयव त्याच्या दृष्टीस पडले. तो मोहित झाला आणि त्याने तिला आलिंगन दिले. ती घाबरून म्हणाली, एकपत्नीव्रतम् इदं को नाशयितुम् इच्छति । म्हणजे माझे हे पातीव्रत्य कोण नष्ट करत आहे ? - (संदर्भ : वाल्मीकी रामायण, कांड ४, सर्ग ६५, श्‍लोक १६) त्यावर मरुत् म्हणतो, मी तुझे पातिव्रत्य भंग करत नाही. भिऊ नकोस ! मी मनानेच तुला आलिंगन दिले आहे. मरुत् दैवताने सांगितले, तुला वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी असा पुत्र होईल. पुढे अंजनीस तसाच पुत्र झाला.

पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचा सायलीच्या लग्नाकडे पहाण्याचा एकमेवाद्वितीय भावात्मक दृष्टीकोन

१. महर्षींवरील गाढ श्रद्धेमुळे स्थळ आपोआप येईल, 
असे साधकाला सांगून मुलगा शोधण्यासाठी नकार देणे
       ११.४.२०१६ या दिवशी सकाळी पू. गाडगीळकाकू माझी आई रहात असलेल्या खोलीत आल्या होत्या. त्यांच्याशी बोलतांना सायलीच्या लग्नाचा विषय निघाला. तेव्हा पू. काकू म्हणाल्या, महर्षीनी जीवनाडीपट्टीच्या वाचनात १५ दिवसांत सायलीचे लग्न ठरेल, असे सांगितले. तेव्हा श्री. विनायक शानभाग यांनी मला त्या दृष्टीने मुलगा शोधण्यासाठी प्रयत्न करूया का ?, असे विचारले. तेव्हा मी सांगितले, नको. स्थळ आपोआप येईल.

सौ. शुभांगी अनित पिंपळे यांना मारुतीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. आध्यात्मिक त्रास वाढल्याने दृष्ट काढतांना मारुतिराया दृष्ट काढत आहे, असे जाणवणे आणि त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन भावाची स्थिती अनुभवता येणे : ११.७.२०१५ या दिवशी माझा आध्यात्मिक त्रास वाढला होता. त्या दिवशी दृष्ट काढतांना मारुतिराया दृष्ट काढत आहे, असे जाणवले. मारुतिरायाप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना माझे त्याच्याशी सूक्ष्मातून संभाषण झाले. या दोन्ही गोष्टींमुळे माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन मला भावाची स्थिती अनुभवायला येऊ लागली.
२. पू. गाडगीळकाकांनी सांगितलेले उपाय केल्यावर त्रास उणावणे : त्यापूर्वी मी पू. गाडगीळकाकांना उपाय विचारले होते. वरील प्रसंगानंतर मला पू. काकांनी जप, न्यास आणि मुद्रा कळवली. त्या वेळी त्यांनी मला वायूतत्त्वाचे उपाय सांगितलेे. वायूतत्त्वाचे सगुण रूप म्हणजे मारुति ! त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर त्रास उणावला.

श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांच्या विवाहनिश्‍चितीची मिळालेली पूर्वसूचना

      दिवसातून २ - ३ वेळा सिद्धेश-सायली ही नावे आणि त्यानंतर महर्षि हा शब्द काही क्षण मनात येणे अन् त्यानंतर श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांचा विवाह सुनिश्‍चित झाला असून त्याला महर्षींचे आशीर्वाद लाभले असल्याचे समजणे : मार्च २०१६ मध्ये एकदा दिवसातून २ - ३ वेळा सिद्धेश-सायली ही नावे काही क्षण माझ्या मनात आली. दुसर्‍या दिवशी पुन्हा तसेच झाले. एकदा महर्षि हा शब्द काही क्षण मनात आला. तिसर्‍या दिवशी सकाळी फलकावर सूचना वाचली, श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांचा विवाह सुनिश्‍चित झाला आहे. त्यानंतर महर्षींचेही आशीर्वाद या विवाहास लाभले आहेत, असे सायलीच्या बोलण्यातून कळले. दोन दिवस आधी मनात येणारी नावे ही श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांच्या विवाह सुनिश्‍चितीची पूर्वसूचना होती, हे लक्षात आले.
- एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०१६)

प.पू. डॉक्टरांची कन्या आज सासरला चालली गं !

       चि.सौ.कां. सायली गाडगीळ हिच्या लग्नात ओव्या म्हणायला हव्यात, असे मला वाटले. देवाने ओव्यांसदृश कविता सुचवून माझी हौस पुरवली.
        कन्यादान आणि सप्तपदी हे विवाह विधीतील दोन हृद्य विधी आहेत. पू. गाडगीळकाका आणि पू. (सौ.) काकू सायलीचे कन्यादान करतील, म्हणजेच सायलीच्या पालकत्वाचे हस्तांतरण करतील अन् सायलीचे पालकत्व श्री. करंदीकर काका-काकूंकडे जाईल. सायली केवळ सिद्धेशची पत्नीच नव्हे, तर करंदीकर कुटुंबियांशी विविध नात्यांनी जोडली जाईल. या नव्या कुटुंबात आज्ञापालन, सेवा आणि निरपेक्ष प्रीतीने सायली एकरूप होईल, सर्वांचे दायित्व हसतमुखाने घेईल आणि ग्रहस्थाश्रम सफल, सुलभ करील, हा विचार देऊन देवाने पुढील कविता सुचवली.
गाडगिळांची सायली झाली, करंदीकरांची सून गं ।
लाडकी कन्या अंजली-मुकुल यांची, सासरला चालली गं ।
सिद्धेश झाला श्रीकृष्ण आणि सायली झाली रुक्मिणी गं ॥
गाडगीळ अन् परांजपे यांची (नात) पौत्री, सासरला चालली गं ।

मारुतिराया, घे चरणी आता !

सौ. शुभांगी पिंपळे
      ११.७.२०१५ या सायंकाळी एका साधकाने माझी नारळाने दृष्ट काढली. दृष्ट काढण्यापूर्वी मी मारुतिरायाला माझी दृष्ट काढण्यासाठी प्रार्थना केली होती. दृष्ट काढून झाल्यावर मारुतिरायाला कृतज्ञता व्यक्त करून मी उपायांना गेले. तेथे गेल्यावर मला मारुतिरायाची पुन्हा आठवण झाली. मी पुन्हा मारुतिरायाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि तो माझ्यासाठी उभा राहिला, चालला, दृष्ट काढली; म्हणून त्याचे हात-पाय चेपून द्यावे, असे वाटले. मी त्याच्या चरणांना हात लावताच मारुतिराया मला म्हणाला,
मी तर दासांचा दास । सेवा माझी तू का करी ? ।
माझ्यातून सांभाळत आहे तुला । तोच तुझा अन् माझा हरि ॥
       त्या वेळी मारुतिरायाची दास्यभक्ती पाहून मला अंतर्मनात स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव झाली आणि मी मारुतिरायाला पुढील प्रार्थना केली.

श्रीरामासाठी जीवही ओवाळून टाकण्याची सिद्धता असणारा रामभक्त हनुमान !

        महाबली हनुमान हा तुमचा आदर्श असला पाहिजे. श्रीरामचंद्रांची आज्ञा होताच त्याने सागर पार केला ! त्याला जीविताची लेशमात्र तरी चिंता होती का ? जितेंद्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्, असे त्याचे वर्णन आहे. त्याने पूर्ण इंद्रियजय केला होता आणि तो विलक्षण प्रज्ञावंत होता. स्वामीसेवेचा हा आदर्श तुम्ही स्वतःपुढे ठेवला पाहिजे. मग त्यातूनच जीवनातील इतर आदर्शांचा आविष्कार होईल. गुरूंच्या आज्ञेचे निःशंक पालन आणि कठोर ब्रह्मचर्याचे आचरण हेच यशस्वीतेचे रहस्य आहे.
        महावीर हनुमान हा एका बाजूने सेवेचा आदर्श आहे, तर दुसरीकडून भूमंडळ हलवील, अशा मृगेंद्रतुल्य शौर्य-धैर्याचाही आदर्श आहे. श्रीरामाचे इष्ट व्हावे; म्हणून प्राणसुद्धा ओवाळून टाकण्याची त्याची सिद्धता आहे. रामसेवेपुढे त्याला सारे तुच्छ होते. अगदी शिवपद अथवा ब्रह्मपदसुद्धा ! असे सर्व अंतःकरणपूर्वक समर्पण हवे.
- स्वामी विवेकानंद (संदर्भ : विवेक विचार, एप्रिल २०१५)

पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी काढलेले गौरवोद्गार !

प.पू. परशराम पांडे
१. प.पू. डॉक्टरांनी केलेल्या कौतुकाला कृतज्ञतेने प्रतिसाद देणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ ! : पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये असलेल्या सद्गुणांविषयीचा श्री. मधुसूदन कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचनात आला. पू. गाडगीळ यांच्यातील गुणांचे परात्पर गुरु श्रीजयंत आठवले यांनीही कौतुक केले. वरील लिखाणात प.पू. डॉक्टरांनी केलेल्या कौतुकाला प्रतिसाद देतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले लिखाण २.३.२०१६ या दिवशीच्या दैनिकात वाचले. या लेखात पू. गाडगीळ यांनी प.पू. डॉक्टरांच्या सान्निध्यात आपण सर्व असल्यामुळे आपले भाग्य उजळलेच आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.
२. पू. डॉ. गाडगीळ हे उच्च विद्याविभूषित असूनही त्यांच्यातील शालीनता, प्रसिद्धीपराङ्मुखता, विनम्रता आणि विनयशीलता हे गुण कौतुकास्पद आहेत.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले हे प्रत्यक्ष भगवंत आहेत, हे ओळखून, ध्यानी-मनी-चित्ती त्यांना ठेवून आणि साधनेद्वारे प्रसन्न करून त्यांची प्राप्ती करून घ्यावी, या दृष्टीने ते कर्तव्यरत असतात.

निर्मळ मनाची माझी सखी सायली खरी ।

कु. कनकमहालक्ष्मी देवकर
निर्मळ मनाची माझी सखी खरी ।
शरणागतीची कळी निर्माण करी अंतरी ॥ १ ॥
राहूनी आनंदी इतरांनाही आनंद देई ।
साधनेची ओढ असे तिच्या ठायी ॥ २ ॥
सात फेर्‍यांतूनी सात लोक पार करण्यास ।
धरला हात तिने सिद्धेशदादाचा ॥ ३ ॥
देवा हीच प्रार्थना तुझ्या चरणी ।
लवकरात लवकर एकरूप करवून घे रे तुझ्या चरणाशी ॥ ४ ॥
- कु. कनकमहालक्ष्मी देवकर, भाग्यनगर, तेलंगण. (२१.४.२०१६)

मागणी-पुरवठा अंतर्गत साहित्य देवाण-घेवाणीसाठी आवश्यक असणारी खोकी आणि प्लास्टिक अर्पण म्हणून किंवा अत्यल्प दरात देऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचलावा !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     विविध जिल्ह्यांना सनातन-निर्मित ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचा मागणीनुसार पुरवठा करण्याची सेवा सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात, तसेच मंगळुरू सेवाकेंद्रात चालते. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील राज्यांना देवदहून, तर दक्षिण भारतातील राज्यांना मंगळुरूहून साहित्य पाठवले जाते. ते पाठवण्यासाठी पुढील प्रकारची खोकी आणि प्लास्टिक यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे.
१. ग्रंथ आणि प्रसारसाहित्य अन्य राज्यात पाठवण्यासाठी खोक्यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता !
२. पावसाळ्यात साहित्य अन्यत्र पाठवतांना ते भिजू नये, यासाठी देवद येथे एच्डीपी वोव्हन फॅब्रिक प्लास्टिकची आवश्यकता !
एच्डीपी वोव्हन फॅब्रिक प्लास्टिकचा तपशील खाली देत आहे.
१. प्लास्टिकचा पन्हा : ४४ आणि ५२ इंच
२. प्लास्टिकच्या प्रत्येक बंडलचे वजन : ९ किलो
३. एका बंडलचे माप : ३८ मीटर ३६ इंच
४. सहा मासांसाठी आवश्यक असणारा प्लास्टिकचा साठा : १८ रोल
५. प्लास्टिकची एकूण किंमत : ३२,५०० रुपये
     जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण म्हणून किंवा अत्यल्प दरात देऊन धर्मकार्यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी देवद आश्रमात कु. नलिनी राऊत ९४०४९५६०३१ किंवा मंगळुरू येथे श्री. विनोद कामत यांच्याशी ०९३४२५९९२९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
       आश्रमातील भिंती, आरसे, काचा इत्यादी निर्जिव वस्तूही प्रगती करत आहेत, म्हणजे त्यांच्यातील पृथ्वीतत्त्व न्यून होऊन आप आणि तेज ही तत्त्वे वाढत आहेत. असे असतांना आश्रमातील साधकांची प्रगती झाली नाही, तर ते एक आश्‍चर्य होईल ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या
     देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ :
येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलीस, प्रशासनातील व्यक्ती आणि राजकारणी एकदा तरी क्षमा मागतात का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


दर्शन नव्हे प्रसिद्धी !

संपादकीय 
      महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सध्या स्त्रियांचा मंदिर प्रवेश, हा विषय ऐरणीवर आहे. काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर येथील शनिमंदिरातील चौथर्‍यावर चढून दर्शन घेण्याची मुभा स्त्रियांना हवी, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेड या संस्थेने आंदोलन केले. या संस्थेच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यांना त्या आंदोलनात यश आले नाही. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने मंदिर प्रवेशाच्या संदर्भात भेदभाव करता येणार नाही, असा निर्वाळा दिल्यानंतर स्त्रियांच्या भूमाता ब्रिगेड आणि समविचारी संघटना पुढे आल्या आणि कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, त्र्यंबकेश्‍वरचे शिवमंदिर येथील गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्याचा सपाटा लागला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn