Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज हनुमान जयंती

विनम्र अभिवादन !

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी


त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात स्वराज्य महिला संघटनेच्या धर्मद्रोही महिलांचा प्रवेश

  • ग्रामस्थांकडून फलक लिहून त्र्यंबकेश्‍वराची क्षमायाचना !
  • गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून त्र्यंबकेश्‍वर बंद !
अधर्माचरण रोखून धर्मपरंपरांचे रक्षण होण्यासाठी धर्माचरण करणार्‍यांचे हिंदु राष्ट्रच हवे !
      नाशिक - स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा वनिता गुट्टे यांच्यासह तीन महिला कार्यकर्त्यांनी नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात २१ एप्रिल या दिवशी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा मोडली आहे. (हिंदूंची शेकडो वर्षांची परंपरा मोडून पुरो(अधो)गामी महिलांनी भावी पिढीसमोर कोणता आदर्श ठेवला आहे ? परंपरा मोडण्यासाठी नव्हे, तर पालन करण्यासाठी असतात, याचेही ज्ञान नसलेल्यांना अट्टाहासाने त्र्यंबकेश्‍वराच्या घेतलेल्या दर्शनाचा लाभ होणार कि त्याची अवकृपा होणार ?- संपादक) याविषयी त्र्यंबकेश्‍वर येथील ग्रामस्थांकडून त्र्यंबकेश्‍वराची क्षमा मागणारा फलक लिहिण्यात आला आहे.
     गाभारा प्रवेशाच्या सूत्रावरून स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांची त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त आणि २०० ग्रामस्थ यांच्यासमवेत वादावादी झाली होती. १९ एप्रिल या दिवशी वनिता गुट्टे यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना भेटून गाभारा प्रवेशासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती

त्र्यंबकेश्‍वरप्रमाणे बळाचा वापर करून महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे धारिष्ट्य शासन दाखवणार का ? - कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र संघटक, रणरागिणी शाखा

      नाशिक - त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी २१ एप्रिलला बळाचा वापर करून धर्मपरंपरांच्या बाजूने उभे रहाणार्‍या ग्रामस्थांवर अत्याचार केला. महिलांना मंदिरात जाण्यापासून कोणी रोखू नये; म्हणून पोलिसांनी मध्यरात्रीच त्र्यंबकेश्‍वरमधील काही ग्रामस्थांना अवैधपणे कह्यात घेतले, तसेच काही ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. भाविकांना गाभार्‍यातून दर्शन देण्याविषयीचे सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने देवस्थान समितीला दिले असतांना पोलिसांनी परंपरांच्या विरोधात जाऊन महिलांना गाभार्‍यात प्रवेश देण्याविषयी केलेला खटाटोप लाजिरवाणा आहे. पोलिसांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. पोलीस बळाचा वापर करून मशिदी आणि दर्गे यांमध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्याची इच्छाशक्ती शासन दाखवणार आहे का ?, असा प्रश्‍न रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगांवकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
     या वेळी नगराध्यक्षा सौ. विजया लढ्ढा, पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. प्रशांत गायधनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मंगेश धारणे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
     त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभारा प्रवेशाच्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. परंपरांचे रक्षण करणार्‍या ग्रामस्थांमध्ये धाक निर्माण करण्याच्या हेतूनेच पोलिसांनी ग्रामस्थांना अवैधरित्या कह्यात घेणे किंवा त्यांच्यावर खोटे खटले दाखल करणे, ही पोलिसांची कृती मानवाधिकाराचे हनन करणारी आहे

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने आकारला ७५० कोटी रुपयांचा कर !

संतांची संपत्ती जप्त करण्याची तत्परता दाखवणार्‍या आयकर विभागाने 
राजकारण्यांच्या अवैध संपत्तीकडे दुर्लक्ष करू नये, असे जनता म्हणते !
      सूरत - आयकर विभागाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संपत्तीच्या संदर्भातील अहवाल सिद्ध केला आहे. या अहवालानुसार पूज्यपाद बापू यांच्याकडे २ सहस्र ५०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपत्तीवर आयकर विभागाकडून ७५० कोटी रुपयांच्या कराची आकारणी करण्यात येणार आहे. (पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या अनुपस्थितीत सिद्ध करण्यात आलेल्या अहवालाची सत्यता कधीतरी उघड होईलच. अशाच प्रकारची तत्परता राजकारण्यांच्या संदर्भात दाखवली, तर परदेशात जाणारा काळा पैसा त्वरित थांबेल ! - संपादक) कथित बलात्कार प्रकरणात अटकेत असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या कर्णावती (अहमदाबाद) येथील एका भक्ताच्या घरून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मिळाली. त्याचबरोबर काही संगणक आणि भ्रमणसंगणक जप्त करण्यात आले.
     ही कागदपत्रे आणि संगणक यांच्या साहाय्याने पू. बापू यांच्याकडे २ सहस्र ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा आयकर विभागाकडून दावा करण्यात आला. त्यानंतर विभागाकडून एक अहवाल सिद्ध करण्यात येऊन सीबीडीटीकडे (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनकडे) पाठवण्यात आला.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org


जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ आतंकवादी ठार

भारताचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरमध्ये शासन अजून
किती दिवस आतंकवादी कारवाया होऊ देणार ?
     कुपवाडा - जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब येथे भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत २ आतंकवादी ठार झाले.

जळगाव येथे वनकर्मचार्‍यांनी अनुमतीविना हनुमान मंदिर पाडले !

आदिवासींनी वनकर्मचार्‍यांना चोपले
  • न्यायालयाच्या आदेशानंतरही अन्य धर्मियांच्या अवैध प्रार्थनास्थळांवर कारवाई न करणारे प्रशासन हिंदूंच्या मंदिरांवर मात्र अनुमती नसतांनाही कारवाई करते, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • अनुमतीविना कारवाई करणार्‍यांवर शासनाने कारवाई करावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, ही हिंदूंची अपेक्षा !
      जळगाव - येथील सातपुडा पर्वतातील मोहरद शिवारात आदिवासी बांधवांनी बांधलेले हनुमान मंदिर वनकर्मचारी के.आर्. साळुंखे यांनी वनविभागाची अनुमती न घेता कर्मचार्‍यांसह पाडले. (हिंदूंनो, तुम्ही असंघटित असल्यानेच मंदिर पाडण्याच्या अशा घटना वारंवार घडत आहेत, हे जाणा ! - संपादक) या वेळी ३०० ते ५००च्या जमावाने आलेल्या आदिवासींनी वनकर्मचार्‍यांना चोपले. वनकर्मचारी मंदिर पाडत असतांना काही भाविक रडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (भाविकांनो, रडण्यापेक्षा लढल्यासच मंदिराचे रक्षण होईल ! - संपादक) २२ एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी तेथे भंडाराही ठेवला होता; मात्र मंदिरच पाडले गेल्याने भंडार्‍याचे काय होणार, असा प्रश्‍न भाविकांसमोर आहे.
वनाधिकारी काझी यांचा उद्दामपणा !
      या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि वनविभाग अधिकारी काझी यांच्यात पुष्कळ वाद झाला. काझी संतप्त आणि आक्रमक झाले होते. कोण माझे काय वाकडे करणार आहे, असे ते संघाच्या कार्यकर्त्यांना म्हणाले. (अशा उद्दामांवर शासन कारवाई करणार का ? - संपादक)

देशविरोधी घोषणा देणार्‍या कन्हैया कुमारला मुंबईत प्रवेश नको ! - समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना

डावीकडून सर्वश्री निरंजन पाल, अधिवक्ता जयेश तिखे,वैभव राऊत, लक्ष्मीकांत भोसले, सुशील तिवारी
    मुंबई -
९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी देशद्रोही महंमद अफझल याच्या फाशीला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देहलीतील जेएन्यूत (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) त्याचा स्मृतीदिन साजरा केला गेला. या वेळी अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है ।, भारत तेरे तुकडे होंगे, इंशाल्लाह, इंशाल्लाह, पाकिस्तान झिंदाबाद, कश्मीरकी आझादीतक जंग रहेगी जंग रहेगी, भारतकी बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी आदी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला उपस्थित जेएन्यूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने भाषणही केले. कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट असून त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. हाच कन्हैया कुमार २३ एप्रिल या दिवशी मुंबईत येत आहे. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. या कार्यक्रमाला हिंदु धर्माविरोधात गरळओक करणारे माजी न्यायमूर्ती डॉ. कोळसे पाटील, डॉ. राम पुनीयानी, तसेच गुजरात दंगलीची खोटी माहिती देणार्‍या कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांसह अन्य वादग्रस्त व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत.

www.sanatan.org वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !


आजपासून उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या किनारी चालू होणार सिंहस्थपर्व !

     उज्जैन (मध्य प्रदेश) - मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये २२ एप्रिलपासून चालू होणार्‍या सिंहस्थपर्वाची सिद्धता जवळजवळ पूर्ण झाली आहे. २२ एप्रिल या दिवशी क्षिप्रा नदीच्या रामघाटावर पहिले अमृत (शाही) स्नान होणार आहे. यासाठी अनेक संत, महंत आणि महामंडलेश्‍वर यांचे आगमन झाले आहे. २१ मेपर्यंत चालणार्‍या या पर्वात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक सहभागी होणार आहेत. येथील श्री महाकालेश्‍वर मंदिर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून येथे प्रत्येक १२ वर्षांनंतर सिंहस्थपर्व भरतो. सिंहस्थपर्वाच्या सिद्धतेसाठी ५ सहस्र कोटी रुपये व्यय होण्याची शक्यता असल्याचे राज्याचे मंत्री भूपेंद्रसिंह यांनी सांगितले.सिंहस्थपर्वाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ७० सहस्र पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सिंहस्थपर्वाच्या या पर्वात पहिले अमृत स्नान २२ एप्रिल, त्यानंतर दुसरे ९ मे, तर तिसरे अमृत स्नान २१ मे या दिवशी होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सिंहस्थपर्वामध्ये पहिल्यांदा २०० भाविक पाकिस्तानातून सहभागी होणार आहेत.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता काय ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     हिंदुविरोधकांनी इस्लाम, ख्रिस्ती, साम्यवाद इत्यादी हिंदुविरोधी धर्मपंथांच्या व्यतिरिक्त सर्वधर्मसमानता हा आणखी एक हिंदुविरोधी धर्मपंथ निर्माण केला आहे. या पंथाचे अनुयायी स्वत:ला सर्वधर्मसमानतावादी म्हणतात; परंतु काही सर्वधर्मसमानतावादी वस्तूस्थितीविषयी खरोखरच अज्ञानी आहेत. व्यवहारातील वस्तूस्थितीची जाणीव करून देणारा यथार्थ देखावा जर त्यांना दाखवला, तर ते राष्ट्रवादीत्वामध्ये पालटतील. अशांपैकी तुम्ही असाल, तर या चौकटींची प्रबोधनमालिका खरोखरच आपणासाठी आहे. या प्रबोधनातून व्यवहारातही सर्वधर्मसमानता कशी पक्षपातीपणे आचरली जात आहे आणि ही सर्वधर्मसमानता दांभिक कशी आहे, याची जाणीव होईल.
     मुसलमानांना भारतात जे विशेष हक्क दिले गेले आहेत, तशा तर्‍हेचे विशेष हक्क कोणत्या एकातरी मुसलमान देशांत हिंदूंना दिले गेले आहेत का ? भारतात हिंदु, मुसलमान वगैरे सर्व धर्मियांसाठी समान दिवाणी कायदा (सिव्हील कोड) का नाही ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)
     शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान


व्हॉट्स अ‍ॅपवरून अफवांचा प्रसार थांबवण्यासाठी गट तयार करण्यास अनुज्ञप्ती (परवाना) काढण्याचा काश्मीर प्रशासनाचा आदेश !

     श्रीनगर - व्हॉट्स अ‍ॅपवरून पसरत असलेल्या अफवा थांबवण्यासाठी येथून पुढे व्हॉट्स अ‍ॅपवर गट तयार करण्यासाठी अनुज्ञप्ती (परवाना) घ्यावी लागणार आहे, असा निर्णय जम्मू-काश्मीर प्रशासनाने १९ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये घेतला. राज्यातील शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे. 
     या वेळी व्हॉट्स अ‍ॅप न्यूज ग्रुपला, तसेच राज्यातील व्हॉट्सअ‍ॅप गटाच्या ऍडमिनला नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. व्हॉट्स अ‍ॅप गटामध्ये एखादा चुकीचा मजकूर प्रसारित झाला, तर गटाच्या अ‍ॅडमिनच्या विरोधात कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे. पुणे येथे प्रशासनाचा हातोडा केवळ हिंदूंच्याच मंदिरांवर !

अनधिकृत मशिदींच्या संदर्भात कानाडोळा 
आणि मंदिरावर  हातोडा, हिंदुद्वेष्ट्या प्रशासनाचा हाच आहे का नारा ? 
     पुणे, २१ एप्रिल (वार्ता.) - सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडून टाकण्याच्या संदर्भात दिलेल्या आदेशाच्या आधारे पुणे महानगरपालिकेने स्वत:च्या हद्दीतील प्रार्थनास्थळे नियमित, निष्कासित अथवा स्थलांतरित करणे या संदर्भात प्रकटन जाहीर केले आहे; मात्र ते केवळ एकाच वर्तमानपत्रामध्ये देऊन नागरिकांना या संदर्भात अनभिज्ञ ठेवले असल्याचा आरोप मंदिरांच्या पदाधिकार्यांमकडून करण्यात येत आहे. अनधिकृत प्रार्थनास्थळांमध्ये ९९ प्रतिशतहून अधिक केवळ हिंदूंच्या मंदिरांचा भरणा असलेली प्रशासनाची ही यादी अत्यंत सदोष, तसेच मुसलमानांचा अनुनय करणारी आहे, त्यामुळे ती त्वरित रहित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (अनेक मजली झालेल्या अनधिकृत मशिदींच्या संदर्भात सुस्त असणारे पालिका-प्रशासन केवळ हिंदूंच्या मंदिरांना अनधिकृत ठरवून त्यांवर कारवाई करण्यास उतावीळ का ? - संपादक) 

पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी !

कोल्हापूर येथे हिंदुत्ववादी संघटनांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी 
पोलीस निरीक्षकांशी चर्चा करतांना हिंदुत्ववादी
     कोल्हापूर- पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या  धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी असणारे निवेदन सनातन संस्थेच्या वतीने येथील पोलीस निरीक्षक श्री. अत्तार यांना देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. हिंदु महासभेच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा श्रीमती रेखा दुधाणे, हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी, हिंदु महासभा शहर अध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु एकता आंदोलनचे श्री. शिवाजीराव ससे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधकही उपस्थित होते. या वेळी श्री. अत्तार यांनी आश्वारसन दिले की, वरिष्ठांना कळवतो. या प्रकरणाच्या संदर्भात निःष्पक्षपणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

(म्हणे) सनातन संस्थेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार ! - तृप्ती देसाई

स्वत: हिंदु धर्मियांच्या श्रद्धा पायदळी तुडवायच्या आणि त्याला विरोध करणार्‍यांवर 
बंदीची मागणी करायची, हा पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा होय !
     मुंबई - भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्या मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील सनातन संस्थेसारख्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याचा आग्रह धरणार आहेत, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. कोल्हापूर येथील पत्रकार सुभाष देसाई यांना एका निनावी पत्राद्वारे गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्या बोलत होत्या.
     तृप्ती देसाई यांनाही १२ फेब्रुवारीला एका निनावी पत्राद्वारे शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याविषयी बोलतांना देसाई म्हणाल्या, मी पोलीस संरक्षण मागितले नाही. पोलिसांना माझ्या जीवाला धोका असल्याचे वाटले, तर त्यांनी संरक्षण पुरवावे. आम्ही दोन दिवसानंतर त्र्यंबकेश्‍वर मंदिरात जाऊन सन्मानाने दर्शन घेणार आहोत. यावेळी रांग अथवा उशीर सहन करणार नाही.चिदंबरम् चक्रव्यूहामध्ये सापडले आहेत ! - भाजपचा आरोप

इशरतजहाँ प्रकरण
     नवी देहली - इशरतजहाँच्या संबंधित प्रतिज्ञापत्रात पालट केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम् चक्रव्युहात सापडले आहेत. काँग्रेसच्या तत्कालीन आघाडी शासनाने अमिश शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोवण्याचे षड्यंत्र रचले होते; परंतु संबंधित प्रतिज्ञापत्रात पालट केल्यासंबंधी चिदंबरम् यांच्या हस्ताक्षराचे पुरावे मिळाल्यामुळे ते रंगेहाथ पकडले गेले आहेत, असा आरोप भाजपने एका पत्रकार परिषदेत केला आहे. 
     या वेळी भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले, तत्कालीन काँग्रेसचे आघाडी शासन नरेंद्र मोदी यांच्यावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या आतंकवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. हे केवळ राजकीय वैमनस्याचे प्रकरण नाही, तर राजकारणात पुढे जाण्यासाठी एका मुख्यमंत्र्यांचे (गुजरातचे तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे) जीवनच पणाला लावण्याचा हा प्रयत्न होता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा काटा काढण्यासाठी प्रतिज्ञापत्रातून इशरतजहाँचे नाव पुसण्यात आले अणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्यात आली. चिदंबरम् यांच्या या कृतीमागे कोण होते ? हे जनतेला कळले पाहिजे. जे शासन आतंकवाद्यांना आसरा देते, अशा शासनापासून लोकांना कोण वाचवणार ? मला काँग्रेसला सांगायचे आहे की, त्यांनी हिंदुस्थानच्या लोकांशी खेळ केला आहे, त्यांचे वाईट दिवस आले आहेत. (देशाला संकटात टाकणार्‍या काँग्रसचे या देशावर अधिकाधिक काळ राज्य असणे, हे या देशातील लोकांचे दुदैव ! - संपादक)

मुंबई महापालिकेचे नगरसेवक अकार्यक्षम असल्याचे अशासकीय संस्थेचे सर्वेक्षण

लोकप्रतिनिधींची दु:स्थिती !
      मुंबई - प्रजा फाउंडेशन या अशासकीय संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक सिद्ध करण्यात येते. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सिद्धता करणार्‍या नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकावर प्रजा फाउंडेशनने लाल शेरे मारले आहेत. गेल्या चार वर्षांत ९१ टक्के नगरसेवकांनी नागरी समस्यांवर दहापेक्षा अल्प प्रश्‍नांवर प्रशासनाला खडसावले आहे. त्यातही प्रतिवर्षीप्रमाणे रस्त्यांचे नामकरण हेच सूत्र या लोकप्रतिनिधींसाठी जिव्हाळ्याचे ठरले आहे, असे सर्वेक्षणातून उजेडात आले आहे. (जनतेशी संबंधित शेकडो समस्यांवर आवाज न उठवता निरर्थक गोष्टींवर वेळ वाया घालवणार्‍या लोकप्रतिनिधींना जनतेनेच खडसावावे ! - संपादक) नागरिकांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी प्रभावी माध्यम असलेल्या प्रभाग समितीमधील माहिती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
     यामध्ये नगरसेवकांची उपस्थिती, विचारलेले प्रश्‍न, सोडवलेल्या नागरी समस्या, त्यांसाठी लागलेला वेळ यांचा समावेश आहे. या माहितीच्या आधारे महापालिकेचा कारभार ढासळत असल्याचे चित्र आहे. प्रभाग समित्यांमध्ये नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढली, उदा. २०१४ मध्ये १०९, तर २०१५ मध्ये १६१ प्रश्‍न विचारण्यात आले; मात्र सर्वाधिक प्रश्‍न हे रस्त्यांच्या नामकरणासाठीच असल्याचे उघड झाले आहे.

कन्हैय्या कुमारच्या सभेच्या संदर्भात पोलिसांकडून प्रश्नतचिन्ह

प्रश्न्चिन्ह उपस्थित करणारे नको, तर देशविरोधी मानसिकता
 असणाऱ्यांच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारणारे पोलीस हवेत ! 
     पुणे, २१ एप्रिल - पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने येथील सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी सभागृहात देशद्रोहाचे आरोप असलेल्या कन्हैय्या कुमारच्या सभेच्या संदर्भात पुणे पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव प्रश्नमचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आयोजक, तसेच सभागृह उपलब्ध करून देणार्यान संस्थेस या संदर्भात पुनर्विचार करण्याचा पोलिसांना सल्ला दिला आहे. 'रोहित अॅक्ट ' आणि संविधान परिषद या कार्यक्रमाच्या अंतर्गत २४ एप्रिल या दिवशी दुपारी १ वाजता कन्हैय्या कुमारची सभा आयोजित करण्यात आली आहे.

आर्थर रोड कारागृहात पैशांच्या मोबदल्यात कैद्यांना विशेष सुविधा, लाचखोरीचे आरोप

कारागृहे म्हणजे नरक झाले असल्यामुळे त्यांच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     मुंबई - माजी मंत्री छगन भुजबळ यांना दंतचिकित्सेसाठी बाह्योपचाराची अनुमती देणारे आणि त्यामुळे चौकशीच्या फेर्याात अडकलेले आर्थर रोड कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी ६ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कारागृह अधीक्षक बी.एम्. भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. 'अंडा सेल'मध्ये टाकण्याची धमकी देऊन भोसले मोठ्या राजकीय आरोपींकडून लाखो रुपये उकळतात. तसेच काही बंदीवानांची कारागृहात 'शाही बडदास्त' ठेवली जाते. समीर भुजबळांकडून १० लक्ष रुपयांची लाचही घेतली, असा गौप्यस्फोटही केला. भोसले यांच्या दबावामुळेच आपल्याला राजकीय कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे द्यावी लागतात, असा आरोपही डॉ. घुले यांनी केला आहे. बंदीवानांकडून पैशाची मागणी करण्यासाठी आपल्यावरही भोसले यांनी दबाव टाकल्याचे घुले यांचे म्हणणे आहे. 

अमेरिकेच्या विमानतळावर एका शीख युवकाची बळजबरीने पगड उतरवली !

भारताला धार्मिक सहिष्णुतेविषयी उपदेशाचे डोस देणारी अमेरिका 
तेथील शिखांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणते, हे लक्षात घ्या ! 
     सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेत करनवीर सिंह पन्नू या १८ वर्षीय शीख युवकाला कॅलिफोर्निया विमानतळावर बलपूर्वक पकडी उतरवण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या कृतीला त्याने विरोध केल्यावर त्याला विमानातून उतरवून देण्याचीही चेतावणी देण्यात आली.
     पन्नू याने सांगितले, मेटल डिटेक्टरमधून गेल्यावर मला पगडी तपासण्यासाठी एक्स्प्लोझिव्ह मॅटेरिअलची एक रासायनिक चाचणी घेण्यास सांगितले. ही चाचणी सकारात्मक आल्यावर मला पूर्ण तपासणी करण्यासाठी सेकंड्री स्क्रीनिंग खोलीत नेण्यात आले. तेथे मला पगडी काढण्यास सांगितले. याला मी विरोध केला, तेव्हा मला प्रवास करू न देण्याची चेतावणी देण्यात आली. त्यानंतर मी पगडी काढण्यास राजी झालो.  
      पन्नू न्यूजर्सीमध्ये एका माध्यमिक शाळेत विद्यार्थी असून स्वत: एक लेखकही आहे. या अनुभवामुळे त्याला अपमानास्पद वाटत आहे, असे पन्नू याने सांगितले. या संदर्भात विमानतळ प्रशासनाने काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

स्त्रीप्रती आदर आणि कृतज्ञतेचा भाव ठेवल्यास उन्नती होते ! - स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज

     बीकानेर (राजस्थान) - येथील शिवबाडी क्षेत्रात असलेल्या शिवमठातील श्रीलालेश्‍वर महादेव मंदिरामध्ये स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत नवरात्री कन्या पूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. १६ एप्रिल या दिवशी मंदिर परिसरात मातृ-शक्तीकडून देवीस्वरूप १४० मुलींचे शास्रोक्त पद्धतीने उत्साहात पूजन करण्यात आले. 
     या वेळी आपल्या आशीर्वादपर भाषणात स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज म्हणाले, सनातन संस्कृतीत नवरात्र मातृ-पूजन पर्वाच्या रूपात साजरी केली जाते. गृहस्थाला प्रतिदिन स्त्रीप्रती आदर आणि कृतज्ञतेचा भाव ठेवायला हवा. जेथे स्त्रीचा आदर करण्यात येतो, तेथे समृद्धी नांदते, जेथे तिचा अपमान करण्यात येतो, तेथे सर्व कार्ये निष्फळ ठरतात. आपल्याला हिंदु संस्कृतीतील मूलभूत तत्त्वांचे आचरण करायला हवे. भ्रूण-हत्या, हुंड्याची प्रथा इत्यादी कुरीतींना दूर करायला हवे.
     या कार्यक्रमाला स्वामी ओमकारानंद, स्वामी राजेश्‍वरगिरीजी इत्यादी संतांसहित अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी कन्या कल्याण कोषाची स्थापना करण्यात आली.हिंदूंच्या नुसत्या सभा घेणारे हिंदुत्ववादी नकोत, 
 तर हिंदुत्वासाठी प्रत्यक्ष कृती करणारे हिंदुत्ववादी हवेत !

पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत असहिष्णूतेवरील परिसंवादात सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांचा सहभाग !

     पुणे येथे वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे १४२ वे वर्ष आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्यान या व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात २५ एप्रिल या दिवशी 'असहिष्णुता आणि आमचा पंथ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक सहभागी होणार आहेत. 

हिंदू आणि मुसलमान यांनी केवळ दोन मुलांना जन्म दिला पाहिजे ! - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

     पाटलीपुत्र (पाटणा) - भारतामध्ये जर 'दोन अपत्यां'चे धोरण लागू केले नाही, तर आपल्या मुली असुरक्षित होतील. पाकिस्तानप्रमाणे आपल्यालाही मुलींना बुरख्यामागे ठेवण्याची वेळ येईल. यासाठी सर्वधर्मियांना दोन अपत्यांचे बंधन घातले पाहिजे आणि जो याचे पालन करणार नाही, त्याचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पश्चिाम चंपारण येथे केले.

नाशिकमधील गंगापूर धरणातील पुरातन मूर्ती अजूनही सुस्थितीत !

अनेक पुरानंतरही मूर्ती टिकून !
     नाशिक - दुष्काळी परिस्थितीमुळे येथील गंगापूर धरणात सध्या अत्यल्प जलसाठा असल्यामुळे येथील खडकाळ भाग आणि भूमी उघडी पडली असून या धरणाच्या निर्माण काळात सापडलेल्या प्राचीन मूर्ती अनेक वेळा आलेल्या पुरानंतरही सुस्थितीत आहेत. या मूर्ती येथे असल्याने धरणाला काहीही धोका नाही, अशी भावना परिसरातील नागरिकांची आहे.
     ५० वर्षांपूर्वी काही मजूर गंगापूर धरणाचे खोदकाम करतांना त्यांना येथे प्राचीन काळातील विष्णूच्या वराह अवतारातील हत्तीवर आरूढ मूर्ती, शंकराची पिंड आणि नंदी आदी मूर्ती गवसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी या मूर्तींची धरणाच्या दाराजवळ स्थापना केली होती. कालांतराने धरणात पाणीसाठा वाढल्याने या मूर्ती पाण्याखाली गेल्या होत्या. 
     या वर्षी धरण कोरडे पडल्याने पुन्हा या सर्व मूर्तींचे दर्शन झाले असून स्थानिक कारागिरांनी मूर्तीला रंगरंगोटी करण्याचे काम चालू केले आहे. याच ठिकाणी श्री गणेशाची अडीच फुटांची मूर्तीही आढळली असून ती कोठून आली, ते ठाऊक नाही.


पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या झोपेचा कालावधी होतो अल्प ! - सर्वेक्षणाचा निष्कर्ष

ग्रहांचा मनुष्यावर परिणाम होत नाही, असे म्हणणार्‍या 
अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     टोरांटो - भारतासह १२ देशांमधील मुलांच्या संदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे की, पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या झोपेचा कालावधी काही मिनिटे अल्प असण्याची शक्यता असते; मात्र पौर्णिमेच्या दिवशी मुले अतिसक्रीय असतात, असे मानले जात असले, तरी पौर्णिमा असणे आणि मुलांच्या कार्यकलापाचा स्तर (अ‍ॅक्टिव्हिटी लेव्हल) यांचा संबंध या अभ्यासात सिद्ध होऊ शकला नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष फ्रंटियर इन पीडियाट्रिक्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी वाईट शक्तींचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. त्याचा परिणाम मानवी देहावर होत असतो. हिंदु धर्म परिपूर्ण असल्यामुळे ऋषीमुनींनी हे याआधीच सांगितले होते. विज्ञान अपूर्ण असल्याने टप्प्याटप्प्याने याविषयी संशोधन होईल ! - संपादक)

ब्रह्मध्वज (गुढी) उभारून नववर्षाचे स्वागत करण्याच्या हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमास कर्नाटकातील धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

     बेंगळुरू - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकात अनुमाने १६० पेक्षा अधिक ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात. नववर्षाच्या १५ दिवस आधीपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये धर्मशिक्षण वर्गातून गुढीपाडव्याच्या (युगादीच्या) दिवशी ब्रह्मध्वज कसा उभारायचा, त्याचा उद्देश काय आहे, हे सविस्तर सांगून याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. हे पाहून अनेक धर्माभिमान्यांनी पाडव्याच्या दिवशी घरापुढे शास्त्रोेक्त पद्धतीने ब्रह्मध्वज उभा करून आनंदाची अनुभूती घेतली. 
१. चिक्कमगळुरू, हासन, तुमकूरू आदी ठिकाणी एकूण १२ सार्वजनिक ठिकाणी गुढीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. 

फलक प्रसिद्धीकरता

भ्रष्ट राजकारण्यांवर एवढ्या तत्परतेने कृती का केली जात नाही ?
     आयकर विभागाने सिद्ध केलेल्या अहवालानुसार, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याकडे २ सहस्र ५०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार पूज्यपाद बापू यांच्या संपत्तीवर विभागाने ७५० कोटी रुपयांचा कर आकारला आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Aykar vibhagne Pujyapad Santshri Asaramji Bapuki sampattipar 750 karod rupayonka tax lagaya hai
Phir bhrashta rajnetayonpar karvai honeme dhilai kyon ?
जागो ! : आयकर विभाग ने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू की संपत्ती पर ७५० करोड रुपयों का टॅक्स लगाया है.
 फिर भ्रष्ट राजनेताआें पर कारवाई होने में ढिलाई क्यों ?

सनातनच्या २ साधकांच्या 'बीईओएस्' चाचणीसाठी न्यायालयाची अनुमती

     पुणे - अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी येथील सनातनचे साधक हेमंत शरद शिंदे आणि नीलेश मधुकर शिंदे यांची 'ब्रेन इलेक्ट्रिकल ऑस्लीशन' (बीईओएस्) चाचणी घेण्याकरिता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अनुमती दिलेली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात दोघांची पॉलीग्राफ चाचणी घेण्यास न्यायालयाने अनुमती दिल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांची पॉलीग्राफ चाचणी घेतली आहे. 

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रहित

     नैनीताल (उत्तराखंड) - उत्तराखंडमध्ये २७ मार्च २०१६ पासून लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट रहित करण्याचा आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने काँग्रेस शासनाला २९ एप्रिलला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. तसेच बंडखोरी करणार्याच काँग्रेसच्या ९ आमदारांचे सदस्यत्व रहित केले आहे. मुख्यमंत्री हरीश रावत आणि काँग्रेस पक्ष यांनी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीविरुद्ध न्यायालयात आव्हान दिले होते. केंद्रशासन उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

तृप्ती देसाई यांना मारहाण करणाऱ्या ७ जणांना अटक


     कोल्हापूर - येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या गाभार्या त प्रवेश करण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात मंदिरातील ५ श्रीपूजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या पेशवाईत परमहंस स्वामी नित्यानंद महाराजांच्या ४७ देशांतील भक्तांचा सहभाग !

* स्थानिक वर्तमानपत्रांत स्वामी नित्यानंद महाराज यांच्यावर टीकात्मक लेखन
* मिरवणुकीत विदेशी महामंडलेश्‍वर स्वामी अलखपुरीजी महाराजांचा सहभाग
पेशवाईचे स्वागत करणारे फलक लावून
प्रसार करणारे सनातनचे साधक
      उज्जैन, २१ एप्रिल (वार्ता.) - येथील सिंहस्थातील पहिले राजयोगी (शाही) स्नान २२ एप्रिल असल्याने त्यापूर्वी प्रत्येक आखाडे आणि खालसे स्वतःची वाजत-गाजत पेशवाई (मिरवणूक) काढत आहेत. अशात सर्वांत लक्षवेधी ठरली ती श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची पेशवाई. यात दक्षिण भारतातील आखाड्याचे महामंडलेश्‍वर परमहंस स्वामी नित्यानंद महाराज यांच्या ४७ देशांतून आलेल्या विदेशी भक्तांनी सहभाग घेतला. यात ब्रिटन, जर्मनी, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, तैवान, फ्रान्स, अमेरिका, मॉरिशस आदी देशांतील भक्तमंडळी सहभागी झाली होती. या संदर्भातील वृत्त देतांना एका राष्ट्रीय वर्तमानपत्राने विवादो के नित्यानंद को ४७ देशों के भक्तों का साथ असे पहिल्या पानावर वृत्त देऊन त्यांची मानहानी केली. तसेच वृत्तात स्वामी नित्यानंद महाराज ५० दिवस कारागृहात राहून आल्याचे म्हटले आहे; मात्र त्यांच्या विरोधात प्रसिद्धीमाध्यमांनी खोट्या बातम्या दिल्यामुळे न्यायालयाने प्रसिद्धीमाध्यमांना खुलासा छापण्याचे निर्देश दिल्याची माहिती दडवून ठेवण्यात आली. (हिंदु संतांच्या अपकीर्तीचे षड्यंत्र रचल्याचा हा पुरावा आहे. अशा प्रसारमाध्यमांवर हिंदूंनी बहिष्कार घालणे आवश्यक ! - संपादक)

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उभारलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन

उज्जैन येथील सिंहस्थ कुंभमेळा
* महर्षींनी सांगितलेल्या वेळेत गुरुपूजन करून वास्तूप्रवेश
* संतांची वंदनीय उपस्थिती
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे
पूजन करतांना पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे
     उज्जैन, २१ एप्रिल (वार्ता.) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ एप्रिल या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर प्रदर्शनाच्या ठिकाणी वास्तूप्रवेश करण्यात आला. या वेळी सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. 
     परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या पूजनानंतर सद्गुरूंची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित साधकांनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् आणि जय गुरुदेव असा जयघोष केला. या वेळी पू. (कु.) स्वातीताई यांनी सर्व साधकांसाठी भावजागृतीचा प्रयोग घेतला. या वेळी अनेक साधकांची भावजागृती झाली. कुंभमेळ्यात करण्यात आलेले पूजन महर्षींच्या सूचनेनुसार सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत पार पडले.

बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयता प्रदान करणारा पंचमुखी हनुमान !

श्री हनुमान जयंतीनिमित्त...
     हनुमंताचे एकमुखी, पंचमुखी आणि एकादशमुखी स्वरूप जगप्रसिद्ध आहे. 
      बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्भयत्वमरोगता ।
      अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणाद्भवेत् ॥ 
- पराशरसंहिता, पटल ७६, श्‍लोक १५
अर्थ : हनुमानाची आराधना केल्याने बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य, निर्भयता, आरोग्य, चपळता आणि वाक्शक्ती इत्यादी गुण प्रसादाच्या रूपाने उपासकाला प्राप्त होतात. 
१. पंचमुखी हनुमानाचे ध्यान
   पंचमुखहनुमत्कवच स्तोत्रात पंचमुखी हनुमंताचे ध्यान पुढीलप्रमाणे सांगितले आहे.
     पञ्चवक्त्रं महाभीमं त्रिपञ्चनयनैर्युतम् ।
     बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम् ॥ 
- पंचमुखहनुमत्कवच स्तोत्र, श्‍लोक २
अर्थ : विराट स्वरूपाचा हनुमान पाच मुख, पंधरा नेत्र आणि दहा भुजा यांनी सुशोभित आहे अन् तो सर्व प्रकारच्या अभिष्ट सिद्धी प्रदान करणारा आहे.
     पञ्चवक्त्रं महाभीमं त्रिपञ्चनयनैर्युतम् ।
     बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम् ॥ 
- पंचमुखहनुमत्कवच स्तोत्र, श्‍लोक २

छत्रपती शिवाजी महाराज यांची युुद्धनीती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
१. सेनानींनी गौरवलेले शिवाजी महाराज 
१ अ. छत्रपती शिवाजी महाराज हे महान सेनानी ! - औरंगजेब
     प्रत्यक्ष औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार, ते एक महान सेनानी होते. त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि शौर्याने एक नवीन राज्य निर्माण केले. हिंदुस्थानातील प्राचीन राज्यांचे उरलेसुरले अस्तित्व मी माझ्या प्रचंड सेनादलांच्या साहाय्याने गेली १९ वर्षे न करण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांचे बळ मात्र वाढतच होते.
१ आ. हुशार आणि लष्करी डावपेचात निष्णात ! - गोव्याचा गव्हर्नर
     गोव्याचा गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल अंतोनियो पाइश द सांद याने शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील युद्धाचा एक अहवाल पोर्तुगालच्या सागरोत्तर मंडळाला पाठवला आहे. त्यात तो म्हणतो, शिवाजीराजे यांनी गोव्यापासून दमणपर्यंतच्या आमच्या सीमेला (सरहद्दीला) लागून असलेला प्रदेश घेतला असून सांप्रत ते मोगलांशी युद्धात गुंतलेले आहेत. हा हिंदुस्थानचा नवा राजा इतका हुशार आणि लष्करी डावपेचात इतका निष्णात आहे की, तो बचावाचे आणि चढाईचे युद्धही तितक्याच कुशलतेने खेळतो. तो मोगल प्रदेशात घोडदळ पाठवून प्रदेश जाळून बेचिराख करत आहे.

भ्रमिष्टांचा (?) देश !

    जेएन्यूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला महाराष्ट्राच्या विविध भागांत पाचारण करण्यास पुरोगामी संघटना सरसावल्या आहेत. राज्यातील पुरोगामी संघटनांनी येत्या २३ आणि २४ एप्रिलला मुंबई अन् पुणे येथे त्याच्या जाहीर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच मे २०१६ मध्ये पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथेही जाहीर सभांचे आयोजन केले जाणार आहे. जेएनयूमधील अयोग्य विचारांचा देशभर प्रसार करण्यासाठी कन्हैया कुमार नामक बांडगूळ स्वतःच्या विचारांना उचलून धरणार्‍या संघटनांच्या साहाय्याने देशात भ्रमंती करण्याच्या विचाराधीन असल्याचे त्याच्या वर्तमान स्थितीवरून समोर येत आहे. कन्हैया कुमारच्या सभा, त्याच्या प्रवासाचा व्यय कोण करते, हा प्रश्‍न सामान्यांनाही पडला आहे; मात्र याची चौकशी कधी होणार आहे का ? या कार्यक्रमांमुळे राज्यात कायदा-सुुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याचे दायित्व कन्हैया कुमारसहित आयोजकांचेही असेल ! बुद्धीस गंज चढलेले महाराष्ट्राच्या विविध भागांत कन्हैया कुमारसाठी पायघड्या अंथरण्यास आतूर झाले आहेत. शिक्षणाने माणसाला बुद्धी येत नाही, तर त्यासाठी माणसाला योग्य-योग्याचा चौकस विचार करून पावले टाकावी लागतात; मात्र जेएनयूतील कन्हैया कुमारसारखे अपवादच !

उज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

२२ एप्रिल २०१६ या दिवशी उज्जैन येथे सिंहस्थपर्वातील पहिल्या 
अमृत स्नानाच्या (शाही स्नानाच्या) निमित्ताने...
     उज्जैन येथील धार्मिक आणि आध्यात्मिक स्थानांची माहिती पुढे दिली आहे. 
१. रत्नसागर तीर्थ 
देव आणि दैत्य यांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून ज्या वस्तू बाहेर आल्या, त्यांची वाटणी उज्जैनमध्येच केली गेली आणि ती ज्या ठिकाणी केली गेली, त्याला रत्नसागर तीर्थ या नावाने ओळखण्यात येते.
   समुद्रमंथनातून पुढील गोष्टी बाहेर आल्या.
अ. विष 
आ. धन (रत्ने, मोती) 
इ. माता लक्ष्मी 
ई. धनुष्य 
उ. मणी 
ऊ. शंख 
ए. कामधेनू गाय

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     भारतात सांस्कृतिक सूत्राच्या आधारावर राष्ट्राची निर्मिती ही कल्पना अतीप्राचीन आहे; परंतु राजनैतिक चेतनेची उणीव होती आणि आजही आहे. त्याचे दुष्परिणाम हिंदूंना वेळोवेळी भोगावे लागले आहेत. (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)चिरंजीव हनुमानाच्या उपासनेने शूरवीर मावळ्यांप्रमाणे तन-मन-धन अर्पण करण्याची सिद्धता करून हिंदु राष्ट्राची पहाट लवकर येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा ! - प.पू. पांडे महाराज

श्री हनुमान जयंतीनिमित्त... 
 प.पू. पांडे महाराज
१. समर्थ रामदास स्वामी यांनी ठिकठिकाणी 
मारुतीची स्थापना करण्याचे कारण आणि त्याचे झालेले लाभ
१ अ. हनुमानाचे गुण सर्वसामान्यांच्या मनात आणि आचरणात यावेत ! : हनुमान हा चिरंजीव आहे. तो क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी युक्त आहे, तसेच त्याच्यात दास्यभावही आहे. मारुति हा दुष्ट शक्तींचा संहारक आहे. हनुमानाचे हे गुण सर्वसामान्यांच्या मनात आणि आचरणात यावेत; म्हणून समर्थ रामदास स्वामी यांनी ठिकठिकाणी मारुतीची स्थापना केली. खेड्यापाड्यांत गावाच्या सीमेवर मारुतीची स्थापना केली. गावाच्या सीमेवर स्थापित केलेल्या हनुमंताच्या मूर्तीमुळे 'देवता आपले संरक्षण करत आहे', असा भाव जनतेच्या मनात निर्माण झाला. 

भावजागृती, चैतन्य आणि शक्ती यांची अनुभूती देणारी पंचधातूची पंचमुखी हनुमानाची मूर्ती !

पंचधातूची पंचमुखी हनुमानाची मूर्ती
प.पू. गुरुमाऊली,
तुझ्या चरणी आम्हा सर्व साधकांचा शिरसाष्टांग नमस्कार.
       हे गुरुमाऊली, तुझ्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही. तुझ्या इच्छेविना काहीही शक्य नाही. यासाठी हे गुरुमाऊली, आम्ही तुझ्या चरणी अनन्य शरण आलेलो आहोत. तुला अपेक्षित असे हे अनुभूतीचे लिखाण तूच करवून घे.
१. मूर्तींचे प्रदर्शन पहाण्यास गेल्यावर 
पंचधातूची हनुमानाची मूर्ती आवडणे
      नोव्हेंबर २०१५ मध्ये मी आणि माझी पत्नी सौ. पूजा राजस्थान, मध्यप्रदेश आणि इतर राज्ये यांतील काही वस्तूंचे प्रदर्शन पहाण्यासाठी रवींद्र भवन, मडगाव येथे गेलो होतो. तेव्हा तेथे मूर्तींचेे प्रदर्शन भरले होते. प्रदर्शनाची माहिती देणारी व्यक्ती सांगत होती, या मूर्ती जुन्या काळातल्या आहेत. शासनाने त्या विकण्यासाठी ठेवल्या आहेत. आम्हाला त्यात पंचधातूची पंचमुखी हनुमानाची एक मूर्ती पुष्कळ आवडली. ती ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची असल्याचे समजले; पण मूर्ती घरी आणावी कि नको ?, असा विचार करून उद्या पैसे घेऊन येतो; म्हणून परत आलो.

मनमिळाऊ, निरपेक्ष आणि सतत देवाच्या अनुसंधानात असणारी कु. सायली गाडगीळ !

कु. वैष्णवी वेसणेकर
१. मनमिळाऊ
      सायलीताई ही माझी सर्वांत जवळची सखी आहे. मी आश्रमात आले, तेव्हापासून मला तिच्याविषयी वेगळीच ओढ वाटायची; पण माझा स्वभाव अबोल असल्याने मी तिच्याशी बोलायचे नाही. तेव्हा तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तिनेच माझ्याशी बोलून जवळीक साधली. त्या पहिल्या भेटीतच आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी झालो. ती माझ्यापेक्षा मोठी असली, तरी माझ्याशी बोलतांना माझ्याएवढेच होऊन बोलते. त्यामुळे मला कधीच मी तिच्यापेक्षा लहान असल्याचे भासले नाही.
२. कशाचीही आसक्ती नसणे
       सायलीला कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. तिच्याकडे असलेल्या चांगल्या वस्तूही ती साधकांना देऊन टाकते. तिच्याकडे असलेली एक सुंदर बाळकृष्णाची मूर्ती तिने माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून मला दिली.

संत माता-पित्यांच्या पोटी जन्म घेतलेली, प्रत्यक्ष ईश्‍वराच्या मांडीवर लहानाची मोठी झालेली चि. सायली गाडगीळ आता महर्षींच्या कृपेने वेदशास्त्रसंपन्न चि. सिद्धेश करंदीकर यांची पत्नी होणार !

       चैत्र कृष्ण पक्ष तृतीया (२५.४.२०१६) या दिवशी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील चि. सिद्धेश प्रकाश करंदीकर आणि रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात पूर्णवेळ सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सायली मुकुल गाडगीळ हे विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्ताने चि.सौ.कां. सायली यांच्याविषयी त्यांच्या आजी सौ. शैलजा परांजपे यांनी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये आणि अन्य लिखाण येथे देत आहोत.
चि. सिद्धेश करंदीकर आणि
चि.सौ.कां. सायली गाडगीळ
यांना शुभविवाहानिमित्त सनातन
परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सायली 
यांच्या विवाहानिमित्त त्यांच्या आजींनी व्यक्त केलेले मनोगत
       खरोखरच आमचा विश्‍वासच बसत नाही की, सायलीचा विवाह ठरला आहे; कारण आम्हाला ती अजून छोटीच वाटते. इतक्या लहान वयात अलीकडे विवाह होतच नाहीत. मुला-मुलींचे शिक्षण होणे, त्यांना नोकर्‍या लागणे, मग परदेशात जाऊन तिथला अनुभव घेणे, हे सर्व करण्यात वयाची २७ ते २८ वर्षे उलटून जातात. नंतर स्थळे बघायला लागल्यावर अनंत अटी असणे इत्यादी होते; पण आमच्या सायलू बाळाचे सगळेच आगळे-वेगळे !

महर्षींच्या आज्ञेने मार्च २०१६ मध्येेच श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांचा साखरपुडा होणे अन् महर्षींनी पंचांगात नसलेली विवाहाची तिथी आणि मुहूर्त सांगणे

      
श्री. विनायक शानभाग
महर्षींच्या आज्ञेने २४.३.२०१६ या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांचा साखरपुडा पार पडला. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे वेदमंत्रांच्या पठणात याच वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी चेन्नई येथे बसून सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन केले. विधी पूर्ण झाल्यावर महर्षींनी विवाहाची तिथी आणि मुहूर्त दिला. तो म्हणजे सोमवार, २५.४.२०१६ सकाळी ६.१५ ते ७.१५ वाजता. याविषयी महर्षि म्हणाले, सकाळी ६.१५ ते ७.१५ ही वेळ कृष्णवेळ आहे. या वेळी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे हा विवाह म्हणजे राधा-कृष्ण यांचा विवाह, असेच असणार. या वेळी सर्व देवता आणि सर्व ऋषिमुनी आकाशमंडलात उपस्थित असणार असून या साधक जोडप्याला अन् सर्व साधकांना आशीर्वाद देणार.
- श्री. विनायक शानभाग (१२.४.२०१६)

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. सिद्धेश करंदीकर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्री गुरुकृपेने मला खरोखर 
उच्चशिक्षित जावई मिळाला आहे ! 
        २२.३.२०१६ या दिवशी दौर्‍यातील साधकांशी बोलतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, श्री. सिद्धेश करंदीकर हे रामनाथी आश्रमातील वेदपाठशाळेतील वेदब्राह्मण आहेत. वेदांपेक्षा उच्च शिक्षण आणखी कोणतेही नाही. श्री गुरुकृपेने मला खरोखर उच्चशिक्षित जावई मिळाला आहे.
- श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०१६)

मी सायलीची केवळ जन्म देणारी आई आहे, तर रामनाथी आश्रमच तिला घडवणारी तिची खरी आई आहे, असे सांगणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

       
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
पू. (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, सायली लहान असतांनाच आम्ही तिच्यासह आश्रमात रहायला आलो. आश्रमाजवळील मराठी माध्यमाच्या शाळेत ती शिकू लागली. पुढे सायली आठवीत असतांना तिनेे शिक्षण सोडल्यावर मी तिला पूर्णवेळ सेवेसाठी आश्रमातच ठेवले. हे सर्व प.पू. डॉक्टरांमुळेच शक्य झाले. इतक्या वर्षांत सेवेमुळे मला तिला वेळ देता आला नाही, तरी ती घडली. याचे कारण म्हणजे रामनाथी आश्रम ! मी सायलीची केवळ जन्म देणारी आई आहे, तर रामनाथी आश्रमच तिची खरी आई आहे. आश्रमातील वातावरणानेच तिच्यावर संस्कार केले. रामनाथी आश्रमाच्या वास्तूत चैतन्यरूपी प्राण ओतणारे श्रीमत्नारायणस्वरूप गुरुदेव प.पू. डॉक्टर यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
- श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०१६)

चि. सिद्धेश आणि चि.सौ.कां. सायली यांच्या विवाहाविषयी प.पू. डॉक्टरांनी काढलेले उद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले
कलियुगात वधू-वर यांचे जुळण्याचे अधिकाधिक प्रमाण हे ८ ते १० टक्के एवढेच असतांना चि. सिद्धेश आणि चि.सौ.कां. सायली यांचे ३० टक्के एवढे जुळते ! : श्री. सिद्धेश करंदीकर आणि कु. सायली गाडगीळ यांचा विवाह निश्‍चित करण्यासाठी २२.३.२०१६ या दिवशी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प.पू. डॉक्टरांना भ्रमणभाषवर संपर्क केला. त्या वेळी ते म्हणाले, कलियुगातील या काळात वधू-वर यांचे जुळण्याचे अधिकाधिक प्रमाण हे अधिकाधिक ८ ते १० टक्के एवढे आहे; पण सिद्धेश आणि सायली यांचे ३० टक्के एवढे जुळते !
- श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०१६)

चि. सिद्धेश करंदीकर आणि चि.सौ.कां. सायली गाडगीळ यांच्याविषयी महर्षींनी काढलेले गौरवोद्गार !

१. कार्तिकपुत्री (पू. (सौ.) अंजली गाडगीळ) आणि तिचे पती (पू. मुकुल गाडगीळ) यांच्यामुळेच त्यांची मुलगी कु. सायली हिला मोत्यासारखा दोषरहित पती मिळाला आहे ! : कार्तिकपुत्री (पू. (सौ.) अंजली गाडगीळ) आणि तिचे पती (पू. मुकुल गाडगीळ) यांच्यामुळेच त्यांची मुलगी कु. सायली हिला चांगला वर मिळाला आहे. स्वाती नक्षत्राच्या दिवशी समुद्रातील शिंपल्यात मोती सिद्ध होतो. स्वाती नक्षत्रात जन्म घेतलेले श्री. सिद्धेश करंदीकर हे मोत्यासारखे आहेत. नवग्रहांमध्येे गुरु आणि चंद्र या ग्रहांना दोष नाही. नवरत्नांमध्ये मोती आणि पोवळे यांना दोष नाही. जसे स्वाती नक्षत्रात निर्माण होणारा मोती दोषरहित आहे, तसेच स्वाती नक्षत्रात जन्म घेतलेले श्री. सिद्धेश करंदीकर दोषरहित आहेत.
२. कार्तिकपुत्रीची मुलगी कु. सायली येणार्‍या काळात अध्यात्मात पुढे जाईल आणि ती ज्या नवीन कुटुंबात जाईल, त्या कुटुंबाचाही ती उद्धार करील.
- श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०१६)

सिद्धेश-सायली बांधले प्रीतीत ।

सुनिश्‍चिततेचा फलक झळकला । आणि काय आश्‍चर्य !
आश्रमच आनंदाने डुलू लागला ॥ १ ॥
अहो, काय घडले असे आक्रित ?।
सिद्धेश-सायली बांधले प्रीतीत ॥ २ ॥
कोकीळकंठी विद्युल्लता ।
झाली कटीबद्ध सिद्धेशकरिता ॥ ३ ॥
वाटले होते दोघे साधे-भोळे ।
सर्व साधकांचे विस्फारले डोळे ॥ ४ ॥ 

सनातन प्रभात नियतकालिकांच्या हस्ते, तसेच पोस्टाच्या सर्व वाचकांना अंक मिळत असल्याची निश्‍चिती करण्याची सेवा ३०.४.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

जिल्हासेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     बाहेरचे वितरक, नियतकालिकांचे वितरण करणारे संस्थेचे कार्यकर्ते यांच्याकडून होणार्‍या अक्षम्य चुका किंवा पोस्टाच्या अडचणी यांमुळे काही वाचकांना नियतकालिक नियमितपणे मिळण्यात विविध अडचणी येत असल्याचे समजले आहे. बर्‍याच वाचकांनी वर्गणीचे पैसे वेळेत भरूनही त्यांना लगेचच नियतकालिक चालू केले जात नाही अथवा त्यांना वेळोवेळी अंक न देता एकत्रित दिले जातात, आदी अडचणी येत असल्याचे लक्षात आले आहे.
     या अडचणींवर उपाययोजना काढण्याच्या दृष्टीने सर्व वाचकांना सनातन प्रभातची नियतकालिके मिळतात का, याची निश्‍चिती ३०.४.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करायची आहे. या संदर्भातील सूचनापत्र या अगोदरच जिल्ह्यांना पाठवले आहे. त्याविषयीच्या महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहोत.
१. साधक पुढील तीन प्रकारे वाचकांना अंक मिळत असल्याची निश्‍चिती करू शकतात !
      साधकांनी वाचकांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करून नियतकालिक मिळते का, याची विचारणा करावी. आपल्याकडे त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष भेटून अंक मिळत असल्याची निश्‍चिती करावी. एखाद्या वाचकाच्या संदर्भात वरील दोन्हीही कृती करणे शक्य नसेल, तर त्यांना पोस्टकार्ड पाठवून निश्‍चिती करावी. निश्‍चिती करतांना जेथे शक्य असेल, तेथे वाचकाची स्वाक्षरी घ्यावी; परंतु जेथे तसे शक्य नसेल, तेथे ज्या साधकाने वाचकाकडून निश्‍चिती करून घेतली आहे,

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना
प्रारंभ - चैत्र शुक्ल पक्ष चतुर्दशी (२१.४.२०१६) स. ८.२१ वाजता
समाप्ती - चैत्र पौर्णिमा (२२.४.२०१६) स. १०.५४ वाजता
आज पौर्णिमा आहे.


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास
गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. 
गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
भावार्थ : गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे, यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे, यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवलेयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसून व्यक्तीचे आचार, विचार आणि वागणे यालाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

देवांचा अवमान !

संपादकीय
    सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या बांधण्यात आलेली धार्मिक स्थळे हा देवाचाच अपमान आहे. रस्ता अडवून धार्मिक स्थळे उभी रहावीत, असे देवालाही कधी वाटत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या या मतानंतर हिंदूंच्या मनात काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. हे प्रश्‍न न्यायालयाचा अवमान किंवा त्याला विरोध म्हणून नव्हे, तर एका जिज्ञासेतून निर्माण झाले आहेत. न्यायालयाने हे मत व्यक्त करतांना कुठल्याही धर्माचे नाव घेतलेले नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn