Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिराच्या गाभार्‍यात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलांना रोखले !

  • श्रद्धाळू भाविक आणि महिला आंदोलक यांच्यात झटापट
  • महिला आंदोलकाच्या फिर्यादीवरून माजी नगराध्यक्षांसह २०० जणांवर गुन्हा नोंद
     प्राधान्य न कळणारे कथित समानतावादी महिला ! आज देशासमोर धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, भ्रष्टाचार यांसारख्या समस्या आ वासून उभ्या असतांना महिला कार्यकर्त्यांकडून मात्र मंदिराच्या गाभारा प्रवेशासारख्या सूत्रावर आंदोलन केले जात आहे !
      त्र्यंबकेश्‍वर - न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत कथित समानतेसाठी स्वराज्य महिला संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी २० एप्रिलला सकाळी पुन्हा त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिराच्या गाभार्‍यात घुसण्याचा प्रयत्न केला. गाभार्‍यात जाण्याची वेळ सकाळी ६ ते ७ अशी एक घंट्याचीच असूनही महिला आंदोलकांनी ७ वाजल्यानंतर गाभार्‍यात जाण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या प्रथा, परंपरा, तसेच नियम मोडून गाभार्‍यात घुसू पहाणार्‍या या महिला आंदोलकांना उपस्थित श्रद्धाळू भाविक, तसेच पुरोहित यांनी रोखले. या आधीही १४ एप्रिलला महिला कार्यकर्त्यांकडून गाभार्‍यात घुसण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी स्वराज्य महिला संघटनेच्या वनिता गुट्टे यांनी तक्रार नोंदवली आहे.
     त्या आधारे चार माजी नगराध्यक्षांसह, इतर सुमारे २०० पुरोहितांच्या विरोधात त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र हिंदु सार्वजनिक प्रार्थनास्थळे प्रवेशमान्यता अधिनियम १९५६ चे कलम ४ (१), (अ), (ब) आणि ५ प्रमाणे, तसेच भा.दं.वि. कलम ३५४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याच्या संदर्भातील मुस्लीम संघटना आणि तृप्ती देसाई यांची पत्रकार परिषद मुस्लीम पत्रकाराकडून उधळण्याचा प्रयत्न

     मुंबई - भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश नाकारण्याची बाब भारतीय संविधानापुढे टिकणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने हाजी अली दर्ग्याचे दरवाजे महिलांसाठी उघडतील. येत्या ३-४ दिवसांत आम्ही हाजी अली दर्गाच्या ट्रस्टीला भेटणार आहोत. यानंतर हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देण्यास दर्ग्याचा ट्रस्ट नक्कीच सिद्ध होईल. अन्यथा २८ एप्रिल या दिवशी हाजी अली दर्गा आणि मशिदीमध्ये महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी हाजी अली दर्ग्याच्या जवळ आम्ही शांततामार्गाने धरणे आंदोलन करणार आहोत, असे प्रतिपादन मुस्लिम सेक्युलर डेमोक्रसीचे जावेद आनंद यांनी २० एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले. हाजी अली दर्ग्यात मुस्लिम महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी हाजी अली सबके लिए या संघटनेच्या वतीने २० एप्रिल या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जावेद आनंद बोलत होते.
     या पत्रकार परिषदेला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, भारत बचाओ आंदोलनाचे फिरोज मिठीबोरवाला, मृणाल गोरे इंटरअ‍ॅक्टीव्ह सेंटरच्या नसरीन कॉन्ट्रॅक्टर, वाघिणी संघटनेच्या ज्योती बडेकर, मुंबई सर्वोदय मंडळाचे शेख हुसेन आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
     पत्रकार परिषद चालू असतांना अखिल भारतीय पत्रकार संघाचे सरचिटणीस जावेद लुमिया हे मधेच उठून थेट व्यासपिठाजवळ गेले. शरीयतनुसार महिलांनी मशिदीमध्ये प्रवेश करणे निषिद्ध असल्याचे ठासून सांगत त्यांनी पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित समझौता एक्स्प्रेस स्फोटात आरोपी नव्हते ! - एन्आयएची स्पष्टोक्ती

निरपराध्यांना खोट्या आरोपांमध्ये ९ वर्षे नाहक गोवणार्‍या पोलिसांवर भाजप 
शासनाने कठोर कारवाई करून या निरपराध्यांना हानीभरपाई दिली पाहिजे !
      नवी देहली - राष्ट्र्रीय अन्वेषण यंत्रणेचे (एन्आयएचे) संचालक शरद कुमार यांनी स्पष्ट केले की, वर्ष २००७ मध्ये हरियाणातील समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. मला आश्‍चर्य वाटते की, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांचे नाव समझौता प्रकरणी का घेतले जाते ? यात ते कधीही आरोपी नव्हते; परंतु २००८ च्या मालेगाव स्फोटाच्या प्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून याप्रकरणीचे अन्वेषण चालू आहे. समझौता प्रकरणी ८ हिंदूंच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. १८ जानेवारी २००७ ला हरियाणाच्या पानीपतजवळ या एक्स्प्रेसमध्ये हा स्फोट झाला होता. यात ६८ ठार, तर १२ जण घायाळ झाले होते.

राष्ट्रपतींचा निर्णयही चुकू शकतो !

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती शासन लावणार्‍या केंद्रशासनाला
 उत्तराखंड उच्च न्यायालयाने फटकारले !
      नैनीताल (उत्तराखंड) - उत्तराखंड उच्च न्यायालयाने २० एप्रिलला झालेल्या सुनावणीच्या वेळी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीवरून केंद्रशासनाला फटकारले. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाची न्यायालय समीक्षा करू शकत नाही, असे केंद्रशासनाने युक्तीवाद करतांना सांगितल्यावर न्यायालयाने म्हटले की, राष्ट्रपतींचा निर्णयही चुकीचा असू शकतो. राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाची समीक्षा न व्हायला तो काही एखाद्या राजाने घेतलेला निर्णय नाही. राष्ट्रपतींच्या हेतूविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही; मात्र त्याच वेळी न्यायालयालाही कोणत्याही गोष्टीची समीक्षा करण्याचा अधिकार आहे. उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीला काँग्रेसने न्यायालयात आव्हान दिले आहे. १९ एप्रिलला झालेल्या सुनावणीच्या वेळीही न्यायालयाने केंद्रशासनाला फटकारले होते.


पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने आकारला ७५० कोटी रुपयांचा कर !

संतांची संपत्ती जप्त करण्याची तत्परता दाखवणार्‍या आयकर विभागाने 
राजकारण्यांच्या अवैध संपत्तीकडे दुर्लक्ष करू नये, असे जनता म्हणते !
      सूरत - आयकर विभागाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संपत्तीच्या संदर्भातील अहवाल सिद्ध केला आहे. या अहवालानुसार पूज्यपाद बापू यांच्याकडे २ सहस्र ५०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपत्तीवर आयकर विभागाकडून ७५० कोटी रुपयांच्या कराची आकारणी करण्यात येणार आहे. (पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या अनुपस्थितीत सिद्ध करण्यात आलेल्या अहवालाची सत्यता कधीतरी उघड होईलच. अशाच प्रकारची तत्परता राजकारण्यांच्या संदर्भात दाखवली, तर परदेशात जाणारा काळा पैसा त्वरित थांबेल ! - संपादक) कथित बलात्कार प्रकरणात अटकेत असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या कर्णावती (अहमदाबाद) येथील एका भक्ताच्या घरून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मिळाली. त्याचबरोबर काही संगणक आणि भ्रमणसंगणक जप्त करण्यात आले.
     ही कागदपत्रे आणि संगणक यांच्या साहाय्याने पू. बापू यांच्याकडे २ सहस्र ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा आयकर विभागाकडून दावा करण्यात आला. त्यानंतर विभागाकडून एक अहवाल सिद्ध करण्यात येऊन सीबीडीटीकडे (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनकडे) पाठवण्यात आला.

एका दंगलीमुळे मोदी मुसलमानांचे शत्रू होतात, तर ४५७ दंगलींच्या नंतरही मुलायमसिंह यादव मुसलमानांचे रक्षणकर्ते कसे ?

राष्ट्रीय उलेमा काऊन्सिलचे अध्यक्ष मौलाना आमीर राशिद मदनी यांचा प्रश्‍न !
  • जो प्रश्‍न मदनी यांनी विचारला, तो मोदीद्वेषी प्रसारमाध्यमांना कधीही पडणार नाही !
  • गुजरातमधील दंगलीनंतर देशात शेकडो दंगली झाल्या. यात हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली. त्यांच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंना ठार करण्यात आले; मात्र त्यावर कोणत्याही ढोंगी निधर्मीवाद्याने तोंड उघडले नाही !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - गुजरातमध्ये एक दंगल झाल्यावर नरेंद्र मोदी यांना मुसलमानांचे शत्रू म्हटले जाते; मात्र मुलायमसिंह यादव आणि त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्या उत्तरप्रदेश राज्यात ४५७ मोठ्या दंगली झाल्या आहेत. एवढ्या दंगलीनंतरही मुल्ला मुलायम स्वतःला मुसलमानांचे रक्षणकर्ते असल्याचे सिद्ध करू पहात आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय उलेमा काऊन्सिलचे अध्यक्ष मौलाना आमिर राशिद मदनी यांनी केली आहे. मदनी यांनी सर्व राजकीय पक्षांनी निधर्मीवादाच्या नावाखाली मुसलमानांची फसवणूकच केली, असा आरोपही केला.
     मदनी पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पक्ष केवळ भाजपच्या नावावरून मुसलमानांमध्ये भीती निर्माण करत आहेत आणि त्यातून ते त्यांची मतपेढी निर्माण करत आहेत. यापुढे मुसलमान दरबारात नाही, तर सरकारमध्ये असेल. संधीसाधू राजकीय पक्षांच्या आमिषांना फसून त्यांची मतपेढी सिद्ध होणार नाही. असे राजकीय पक्ष कधीही मुसलमानांचे खरे हितचिंतक होऊ शकत नाहीत. (ना घर का ना घाट का.. अशी स्थिती झालेले राजकीय पक्ष ! - संपादक)


पाकमधील भारतीय कैदी किरपाल सिंह यांचे हृदय आणि जठर बेपत्ता असलेला मृतदेह भारताच्या स्वाधीन !

शवविच्छेदनातून धक्कादायक माहिती उघड
पाकचे अमानवी कृत्य !
      अटारी (पंजाब) - पाकिस्तानच्या कारागृहात संशयास्पदरित्या मृत्यू झालेले भारतीय कैदी किरपाल सिंह यांचा मृतदेह भारतीय सैन्याधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला. त्यानंतर अमृतसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किरपाल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले; मात्र त्यात हृदय आणि जठर नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
     याविषयी माहिती देतांना या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस्. बल म्हणाले, किरपाल सिंह यांच्या शरिरावर कुठल्याही प्रकारचे घाव नव्हते; मात्र त्यांचे हृदय आणि जठर बेपत्ता होते. त्यांचे मूत्रपिंड आणि आतडे यांचे नमुने अधिक तपासणीसाठी अमृतसरच्या बाहेरील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण कळू शकेल. किरपाल यांच्या मृतदेहाचे पाकिस्तानातही शवविच्छेदन करण्यात आले होते; परंतु त्याचा अहवाल अद्याप भारताला प्राप्त झालेला नाही.
     गुरुदासपूर जिल्ह्यातील मुस्तफाबाद सैंदा येथील किरपाल सिंह वर्ष १९९१ मध्ये अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पत्रावरून ते पाकिस्तानच्या कारागृहात असल्याचे समजले.

अवैधरित्या उभारलेली धार्मिक स्थळे हा देवाचाच अवमान ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या बांधण्यात आलेली धार्मिक स्थळे हा देवाचाच अपमान आहे. रस्ता अडवून धार्मिक स्थळे उभी राहावीत, असे देवाला देखील कधी वाटत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने १९ एप्रिलला व्यक्त केले. रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांसह सर्व बांधकामे पाडून टाकावीत, असा आदेश वर्ष २००६ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने दिला होता. केंद्रशासनाने या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला होता; मात्र त्यानंतर अवैध धार्मिक स्थळांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (सर्वोच्च न्यायालयाच्याही आदेशाचे पालन न करणार्‍यांवरती कारवाई का होत नाही ? - संपादक) येत्या दोन आठवड्यांत याविषयी सर्व राज्यांनी शपथपत्र दाखल करावे, असा आदेश न्यायालयाने पुन्हा दिला आहे.


श्री पंचायती बडा उदासीन निर्वाणी आखाड्याची भव्य पेशवाई !

 
उज्जैन सिंहस्थ पर्व
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार
      उज्जैन - उज्जैन सिंहस्थ पर्वात २० एप्रिलला श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याच्या वतीने हत्ती, घोडे आणि उंट यांवर साधूंना बसवून भव्य पेशवाई (मिरवणुक) काढली. पेशवाई पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कापडी फलक लावून पेशवाईचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पेशवाईच्या सर्वात शेवटी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने फेरी काढून धर्मप्रसार करण्यात आला. उज्जैनमध्ये ३९ अंश इतके तापमान होते. कडक उन्हातही साधू-संतांचे दर्शन घेण्यासाठी महिला पुढे येत होत्या.
     २० एप्रिलला सकाळी ११ वाजता पेशवाईला इंदूर मार्गावरून प्रारंभ झाला. उज्जैन शहरात ठिकठिकाणी पेशवाईवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. श्री पंचायती बडा उदासीन निर्वाणी आखाड्याचे महंत महामंडलेश्‍वर महेश्‍वरदासजी महाराज, महामंडलेश्‍वर डॉ. बिंदूजी महाराज, अन्य महामंडलेश्‍वर, संत आणि महंत पायी चालत होते, तर रथामध्ये महामंडलेश्‍वर आणि महंत यांच्यापेक्षा भगवान गणेश, श्रीदुर्गादेवी, श्रीविष्णु, शिव आणि श्री चंद्रदेव भगवान यांच्या मूर्ती ठेवून त्यांची भव्य पेशवाई काढण्यात आली.

शासनाने संमती दिल्यास देशात योग्य वेळेत पाऊस पाडून दाखवू अन्यथा देश सोडून जाऊ ! - महामंडलेश्‍वर भवानी नंदन यति महाराज यांचे आव्हान

      गाजीपूर (उत्तरप्रदेश) - देशभरात दुष्काळाची स्थिती आहे. पाण्यासाठी हाणामारीची स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. अशा वेळी काशीच्या सिद्धपीठ हथियाराम मठाचे महामंडलेश्‍वर भवानी नंदन यति महाराज यांनी शासनाला आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, जर देशात आमच्यासारख्या साधूसंतांचे एक पथक बनवून त्यांच्यावर देशात वेळेवर पाऊस पाडण्याचे दायित्व सोपवले, तर आम्ही ते करून दाखवून. जर तसे करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो, तर आम्ही देश सोडून निघून जाऊ. येथील कालीधाममध्ये चालू असणार्‍या महायज्ञाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलतांना महामंडलेश्‍वर भवानी नंदन यति महाराज बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,
१. आपल्या मंत्रांमध्ये मोठी शक्ती आहे. श्रीमद्भगवद् गीतेतही याचा उल्लेख आहे. यज्ञ केल्यानंतर पाऊस पडला नाही, असे कधीच होऊ शकत नाही.
२. देशातील गोहत्या बंद करण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे.
३. पर्यावरणाचा असमतोल हा चिंतेचा विषय आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही.
४. नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. यासाठी मनुष्यही तितकाच उत्तरदायी आहे. त्यामुळे सर्वत्र अशांती आहे. हवन, यज्ञ यांमुळे वातावरण शुद्ध रहाते आणि योग्य वेळी पाऊस पडतो.
     महामंडलेश्‍वर यांनी पाण्याच्या संरक्षणासाठीही सतर्क केले. यासाठी बुद्धीवंतांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदु राष्ट्राची स्थापना हा ईश्‍वरसंकल्पित विचार असला, तरी त्यासाठी आपण भगीरथ प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे ! - श्री. मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदू जनजागृती समिती.


अक्कलकोटच्या (जिल्हा सोलापूर) अन्नछत्रात दुष्काळामुळे पत्रावळ्यांचा वापर !

हक्काचे किमान पाणी देण्यास तहसीलदारांचा नकार, 
पाणीटंचाईअभावी गेल्या ८ दिवसांपासून यात्रीभुवन आणि यात्री निवास बंद ! 
मद्य आस्थापनांचे पाणी रोखण्यास विरोध करणारे राज्यकर्ते 
अक्कलकोटच्या भाविकांचे पाणी मात्र रोखतात, हे त्यांना निवडून देणार्या हिंदूंना लज्जास्पद ! 
     अक्कलकोट (जिल्हा सोलापूर), २० एप्रिल येथील श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने गेली २७ वर्षे प्रतिदिन सहस्रो स्वामीभक्तांना विनामूल्य महाप्रसादाचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून अन्नछत्रातील ताटे बंद झाली आहेत आणि त्याजागी पत्रावळ्या आल्या आहेत. अर्थात दुष्काळामुळे ही वेळ आली असल्याचे खरे असले, तरी अक्कलकोटच्या तहसीलदारांनी अन्नछत्र मंडळाला किमान हक्काचे पाणी देण्यास नकार दिल्यानेच ही स्थिती ओढवल्याची गोष्टही प्रकाशात आली आहे. तहसीलदारांचे हे आडमुठे धोरण असेच राहिले, तर स्वामी दर्शनाला येणार्याे सहस्रो भक्तांना महाप्रसादाविनाच घरी परतावे लागेल हेच खरे. 

अजिंठा-वेरुळ लेण्यांकडे केंद्रीय पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !

देशातील सर्वच पुरातन ठेव्यांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे 
केंद्रशासनाने या ठेव्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना काढली पाहिजे !
     संभाजीनगर - भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या अजिंठा आणि वेरुळ लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे; मात्र केंद्रीय पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे गेल्या काही वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अजिंठा आणि वेरुळ लेणीची दुरवस्था झाली आहे. 
१. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या या लेण्यांच्या कोरीव कामांच्या सुरक्षेसाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसून यांचा सांभाळ आणि दुरुस्ती यांकडे पुरातत्व विभागाकडून थोडेही लक्ष दिले जात नाही. 
२. लेणी परिसरातील एका अवैध उपाहारगृहात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे लेण्यांना तडा गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

आता मुसलमानांच्या घरांसमोर दिसणार तुळस !

सध्या हिंदूंवर चोहोबाजूंनी आक्रमणे होत आहेत. अशा वेळी संघाने पुढाकार 
घेऊन हिंदूंना संघटित करावे, अशी हिंदु बांधवांना अपेक्षा आहे !
मुसलमान कुटुंबांमध्ये तुळस लावण्याचा राष्ट्रीय मुस्लिम मंचाचा निर्णय !
     नागपूर - आता मुसलमान घरांसमोरही तुळशीचे रोप लावण्याची मोहीम येणार्‍या काळात राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. रमजानचा मास हा मुसलमानांच्या दृष्टीने अतिशय पवित्र काळ समजला जातो. या काळात मुसलमान कुटुंबांमध्ये तुळशीचे रोप लावण्याचा निर्णय नागपूर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी संघाचे नेते आणि मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार उपस्थित होते.
    या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती असलेल्या मंचाकडून रमजान मासाकरता इतरही कार्यक्रमांचे आयोजन करणयात आले आहे. प्रत्येक लोकवस्तीत सर्वधर्मियांसह रोजा सोडण्यात यावा, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 
जन्नतचा मार्ग दाखवणारी तुळस !
      जन्नतचा (स्वर्गाचा) मार्ग दाखवणारे झाड म्हणून कुराणामध्ये रेहान या अरबी नावाने तुळशीचा उल्लेख आहे. त्यामुळे मुसलमानांसाठी तुळस हा आस्थेचा विषय आहे. याशिवाय तुळशीमध्ये असणार्‍या औषधी उपयोगांमुळेही त्याला कुराणात महत्त्व देण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ विश्रामबाग यांच्या वतीने ९० शाळांना ई-लर्निंगच्या साहित्याचे वितरण !

      मिरज - येथील बालगंधर्व नाट्यगृहात रोटरी क्लब ऑफ विश्रामबाग यांच्या वतीने ९० शाळांना ई-लर्निंगच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. हा प्रकल्प अमेरिकेच्या रोटरी क्लब ऑफ लिओमिन्स्टर आणि संजय घोडावत इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने पूर्ण झाला. कार्यक्रमात प्रास्ताविक विश्रामबाग रोटरी क्लबचे प्रेसिडंट सदानंद गाडगीळ यांनी केले. प्राथमिक शिक्षण अधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना ई-लर्निंग साहित्याचा उत्तम उपयोग होईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी रोटरीचे अभिनंदन करून गरजू शाळांना वेगवेगळ्या स्तरावर साहाय्याची आवश्यकता असते. ती रोटरीने पूर्ण केली, असे सांगितले. सांगली जिल्ह्यातील अनेक लाभार्थी शाळांचे शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर 'भगिनी पुरस्कार २०१६' च्या मानकरी

भगिनी मंचाच्या वतीने 'भगिनी महोत्सव २०१६'चे आयोजन - सौ. वैशाली राजेश क्षीरसागर 
   
कु. प्रतीक्षा कोरगावकर
कोल्हापूर,
२० एप्रिल (वार्ता.) - जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून भगिनी मंचच्या वतीने सलग सहाव्या वर्षी २२ ते २४ एप्रिल या कालावधीत 'भगिनी महोत्सव २०१६'चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव प्रायव्हेट हायस्कूल मैदान, मंगळवार पेठ येथे होईल. या महोत्सवात २४ एप्रिल या दिवशी ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर, सामाजिक कार्यकर्त्या शालन शेळके, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्म्रिती मानधना, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा टोकले आणि रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर (हिंदु धर्मप्रसारक) यांना 'भगिनी पुरस्कार २०१६' देण्यात येणार आहे, अशी माहिती भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली. या वेळी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर उपस्थित होते. 

उज्जैनमधील पेशवाईत (मिरवणुकीत) विदेशी नागरिकांचा सहभाग !

     उज्जैन, २० एप्रिल (वार्ता.) - श्री महाकालेश्वेराची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले उज्जैन आता सिंहस्थपर्वामुळे साधूसंतांची झाल्याचे दृश्य निघणार्या- पेशवाईमुळे दिसत आहे. प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या आखाड्याची, खालशाची वा संप्रदायाची पेशवाई उज्जैन शहरात निघत आहे. १९ एप्रिल या दिवशी राजस्थान पाली येथील श्री अखलपुरी सिद्धपिठाचे श्री विश्वयगुरु महामंडलेश्वशर श्री स्वामी महेश्वअरनंदपुरीजी महाराज यांच्या पेशवाईमध्ये विदेशी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ३९ अंश (डिग्री) एवढे कडक ऊन असतांनाही भक्त आणि साधू पेशवाईत सहभागी झालेले होते. अत्यंत कडक उन्हातही नागा साधू अनवाणी चालत होते. त्यांचे पाय उन्हाने भाजू नयेत; म्हणून पेशवाईच्या पुढे पाण्याच्या टँकरमधून रस्त्यावर पाणी शिंपडण्यात येत होते; मात्र काही वेळेतच रस्त्यावरचे पाणी उन्हामुळे शोषले जाऊन रस्ता कोरडा होत होता. 

'मॅपल ग्रुप'चे सचिन अग्रवाल पसार !

५ लाखांत पुण्यात घर देण्याच्या आमिषाने 'मॅपल ग्रुप'ने ग्राहकांच्या केलेल्या फसवणुकीचे प्रकरण
     पुणे, २० एप्रिल (वार्ता.) - पुण्यात ५ लाख रुपयांत आपलं घर देण्याचे आमिष दाखवून, तसेच पंतप्रधानांच्या छायाचित्राचा वापर करून सहस्रो ग्राहकांना फसवणारे 'मॅपल ग्रुप'चे संचालक सचिन अग्रवाल पसार झाले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा अजामीनपात्र गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या प्रकरणाच्या संदर्भात एका वाहिनीवरील चर्चेत सहभागी होण्यासाठी अग्रवाल वाहिनीच्या कार्यालयात आले होते. त्यांना पकडण्यासाठी पोलीस वाहिनीच्या कार्यालयाच्या बाहेर आले; मात्र वाहिनीवरील कार्यक्रम संपताच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस यांच्यासमोरच अग्रवाल एका दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी २० एप्रिलला मनसेच्या वतीने गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. 

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करत चंद्रभागा नदीपात्रात वाहनांची स्वच्छता

हिंदूंच्या उत्सवामुळे चंद्रभागेचे प्रदूषण होत असल्याचा कांगावा 
करणार्यान प्रशासनाचे वाहनांच्या स्वच्छतेकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष ! 
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २० एप्रिल (वार्ता.) - येथे चैत्री एकादशीचा सोहळा एकीकडे मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात असतांना दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात छोट्या आणि मोठ्या वाहनांची नदीच्या पात्रात स्वच्छता केली जात होती. (या वेळी प्रशासन आणि पोलीस काय करत होते ? - संपादक) नदीपात्राच्या कडेला पाणी प्रदूषित न होण्यासाठी न्यायालयाचा आदेश असल्याचा फलक लावण्यात आलेला आहे. तरीही तेथे प्रतिदिन शेकडो पशूंना धुण्यासाठी नदीपात्रात आणली जातात, याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केलेले दिसते. हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये मात्र सातत्याने आडकाठी आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो.

शंकराचार्यांनी एखाद्या घटनेविषयी विचारपूर्वक मत व्यक्त करावे !

संघप्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांचे मत
     नागपूर - शनिशिंगणापूर वगळता इतर ठिकाणी असलेल्या शनीच्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जातो, तसेच मंदिरातील महिलांचा प्रवेश हा वाद सामंजस्यपूर्ण चर्चेतून सुटू शकतो. त्यामुळे शंकराचार्यांनी एखाद्या घटनेविषयी विचारपूर्वक मत व्यक्त करतांनाच त्यासंदर्भातील पार्श्‍वभूमीही विचारात घ्यावी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 
    मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नागपूर येथे आले असता इंद्रेशकुमार यांनी पत्रकारांशी चर्चा केली. शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या चौथर्‍यावरमहिलांनी प्रवेश केल्यामुळेच केरळच्या पुत्तिंगल मंदिरात भयानक दुर्घटना झाली, असे विधान शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले होते.

बलात्काराच्या प्रकरणी बंगाली बाबास जन्मठेप

     कल्याण - येथील आठ मुलींवर बलात्कार करणारा बंगाली भोंदूबाबा मेहंदी कासीम हुसैन शेख याला सहा वर्षांनी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी एक कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात घेतली. या बाबाने बंगाली तंत्राच्या साहाय्याने उपचार करण्याचे आमिष दाखवून सहा मुलींवर दोन वर्षे बलात्कार केला. जेजे परिसरात राहणार्‍या तक्रारदार मुलींचा चुलत भाऊ जन्मापासूनच मतीमंद होता. अनेक ठिकाणी उपचार करूनसुद्धा काही फरक पडला नसल्याने मुलाच्या वडिलांनी उपचारासाठी बंगाली बाबाची भेट घेतली. या वेळी बाबाने या मुलासह त्यांच्या मुलींना मतीमंद मुले जन्माला येऊ नयेत यासाठी तंत्रमंत्र करावे लागतील, यासाठी लाखो रुपये खर्च होतील आणि काही महिने उपचार करावे लागतील, असे सांगितले.

देशाचा प्रत्येक विद्यार्थी वीर सैनिकांसारखा असला पाहिजे ! - पंडित कमल किशोर शर्मा, अध्यक्ष, जस्टिस फॉर काश्मिरी पंडित अ‍ॅण्ड शीख

     नवी देहली - देशाचा प्रत्येक विद्यार्थी पंपोरमध्ये वीरमरण आलेले कॅप्टन पवन सिंह आणि तुषार महाजन यांच्यासारखा असला पाहिजे. भारतीय सैनिक देश तसेच देशवासी यांच्या रक्षणासाठी प्रणाचे बलीदान देतात. देशातील जनता अशा हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबासमवेत आहे आणि त्यांच्या बलीदानाला वंदन करते, असे प्रतिपादन जस्टिस फॉर काश्मिरी पंडित अ‍ॅन्ड शीख या संघटनेचे अध्यक्ष पंडित कमल किशोर शर्मा यांनी केले.
     पंपोरमध्ये आतंकवाद्यांशी उडालेल्या चकमकीत सैनिक जेथे हुतात्मा झाले, त्या ठिकाणची रक्तरंजित माती पंडित शर्मा घेऊन आले आहेत. या हुतात्म्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी जस्टिस फॉर काश्मिरी पंडित अ‍ॅन्ड शीख या संघटनेने जंतरमंतर येथे एका कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. २० फेब्रुवारी २०१६ या दिवशी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांनी पंपोरमध्ये एका इमारतीमध्ये १२० नागरिकांना बंदी बनवले होते. त्यांच्या सुटकेसाठी उडालेल्या चकमकीत या दौन सैनिकांना वीरमरण आले.पत्रकार सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीची निष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करा ! - सनातन संस्था

     कोल्हापूर - येथील पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची कोल्हापूर पोलिसांनी निष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेच्या वतीने प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

आयएन्एस् निरीक्षक युद्धनौकेवर सिलिंडरचा स्फोट : ३ नौसैनिक घायाळ

शांतताकाळात युद्धनौकांवर वारंवार अपघात होणे लज्जास्पद ! 
     मुंबई - नौदलाच्या आयएन्एस् निरीक्षक युद्धनौकेवर झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन नौसैनिक जखमी झाले आहे. एका पाणबुड्याला आपला पाय गमवावा लागला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार चालू आहेत.

बीड येथे दुष्काळी परिस्थितीत पाणी भरतांना उष्माघाताने मुलीचा मृत्यू

 दुष्काळाची भीषणता ! 
     बीड - दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्यासाठी विहिरीच्या खेपा मारून दमलेल्या एका पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. बीड येथील सबलखेड येथे ही घटना घडली. १९ एप्रिल या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने योगिताला घरी पाणी भरण्यास सांगण्यात आले होते. गेल्या महिन्यात बीडमधील पिंपळगाव येथे पाणी भरत असतांना १० वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रात गुन्हेगारीमध्ये महिलांच्या संख्येत वाढ !

* पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून गुन्हेगारी क्षेत्रातही पुरुषांना मागे टाकणार्‍या महिलांचे परिवर्तन करण्यासाठी तृप्ती देसाई काही करणार कि स्त्री समानता म्हणून गप्प बसणार ? 
* ज्या महिलांकडून देशाचे भावी नागरिक असणार्‍या मुलांवर संस्कार करणे अपेक्षित आहे, त्याच जर गुन्हेगारी करू लागल्या, तर देश अधोगतीकडेच जाणार ! 
* महिलांचा समानतेचा असाही प्रयत्न !
     मुंबई - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या अहवालानुसार मुंबईमध्ये महिला आरोपींच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वर्ष २०१३ मध्ये ३ सहस्र ११५, तर २०१४ मध्ये ३ सहस्र ८३४ महिलांना विविध गुन्ह्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या अहवालानुसार महिला गुन्हेगारांच्या संख्येत २३.१ टक्क्यांनी, तर पुरुष गुन्हेगारांच्या संख्येत २२.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या काही वर्षांत विविध गुन्ह्यांसाठी पुरुषांपेक्षा महिलांनाच मोठ्या प्रमाणात अटक केली आहे. चोरी, पाठलाग करणे, गंभीर दुखापत करणे, अपहरण आणि फसवणूक अशा गुन्ह्यांसाठी या महिलांना अटक करण्यात आली आहे. महिला गुन्हेगारांना अटक करण्यात देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येतो. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात एकून ९५ सहस्त्र १७४ महिलांना अटक करण्यात आली आहे.

दंगलीला कोणी एक नाही, तर संपूर्ण जमाव उत्तरदायी असतो ! - गुजरात उच्च न्यायालय

     कर्णावती - दंगलीला कोणी एक नाही, तर संपूर्ण जमाव उत्तरदायी असतो, असे गुजरात उच्च न्यायालयाने १३ वर्षांपूर्वी शाह-ए-आलम भागात घडलेल्या लूट आणि दंगल प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी म्हटले आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये गुजरात येथील दंगलीत सहभागी असणार्‍या लोकांनी प्रवाशांना लुटून त्यातील एकाची हत्या केली होती. या प्रकरणी १२ आरोपींपैकी स्थानिक न्यायालयाने ६ जणांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला गुजरात उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने म्हटले की, कायदा अतिशय स्पष्ट आहे. जर अवैधपणे एकत्र जमून जमावाचे लक्ष्य जर एकच असेल, तर त्यांपैकी एकाने जरी गुन्हा केला, तरी त्या गुन्ह्याला जमावातील प्रत्येक जण उत्तरदायी असतो.
       यामुळे न्यायालयाने दोषींची जन्मठेपीची शिक्षा न्यून करून त्यांना १० वर्षांची शिक्षा ठोठावली.

सगळीच कामे न्यायालय करणार असेल, तर शासनाने करायचे काय ? - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा प्रश्‍न

शासनाने प्रामाणिकपणे कामे केली, तर न्यायालयांना शासनाची कामे करावी लागणार नाहीत !
    नागपूर - शासनाने डॉक्टरांचे स्थानांतर (बदली) केल्यास ते न्यायालयात दाद मागतात. एकीकडे शासन डॉक्टरांचे स्थानांतर करते, तर दुसरीकडे न्यायालय त्या रहित करण्याचा आदेश देते. अशी सगळीच कामे न्यायालयच करणार असेल, तर शासनाने करायचे काय ?, असा प्रश्‍न केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात उपस्थित केला. 
   सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या डॉक्टरांना पुरस्कृत करण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या वतीने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीयमंत्री गडकरी पुढे म्हणाले, अनेक आदिवासी भागात उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत. पर्यायाने आरोग्यसेवेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. तेव्हा न्यायालयाने वैद्यकीय क्षेत्रातील परिस्थती पाहून निर्णय द्यावेत. (लहानपणापासून मुलांना राष्ट्र आणि धर्म यांचे शिक्षण दिले आणि त्यांच्यावर नीतीमूल्यांचे संस्कार केले, तर मोठेपणी डॉक्टर झाल्यावर ते पैशांपेक्षा रुग्णसेवेला अधिक प्राधान्य देतील ! - सपादक)

कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा संघटित हिंदूंचे सामर्थ्य खूप जास्त आहे. हे लक्षात ठेवून देशाला रसातळाला नेणार्‍या राजकीय पक्षांपासून देशाचे रक्षण करा !


फलक प्रसिद्धीकरता

भारत आतातरी पाकला धडा शिकवील का ?
     पाकच्या कारागृहात ११ एप्रिलला संशयास्पदरित्या मृत्यू झालेले भारतीय कैदी किरपाल सिंह यांच्या मृतदेहाचे भारतात शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा त्यात हृदय आणि जठर नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. यापूर्वीही पाकने २ भारतीय सैनिकांचे शिर कापले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pakke karagarme mrutyu hue Kirpal Singhka hriday aur pet nikalkar Pakne Bharatko unki mritdeh soupi
Kya ab to Bharat kroor Pakko paath padhayega?
जागो ! : पाक के कारागार में मृत्यु हुए किरपाल सिंह का हृदय और पेट निकालकर पाक ने भारत को उनकी मृतदेह सौंपी.
क्या अब तो भारत क्रूर पाक को पाठ पढाएगा ?

साहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच घेतांना अटक !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा करणे अपेक्षित ! 
     धाराशिव, २० एप्रिल (वार्ता.) लोहारा येथील एका शैक्षणिक संस्थेविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज भिमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अश्विानी भोसले यांच्या पथकाने १९ एप्रिल या दिवशी अटक केली. या लाचप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड हेसुद्धा सहआरोपी असल्याची सूत्रांची माहिती असून संशयित संतोष गायकवाड हे सध्या फरार आहेत.

पुण्यातील आबेदा महाविद्यालयाचे संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

मुरुड येथे समुद्रात पोहतांना १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
     रायगड, २० एप्रिल - रायगड जिल्ह्यातील मुरूडच्या समुद्रकिनार्यादवर सहलीसाठी गेले असतांना समुद्रात पोहत असतांना आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू होण्याची दुर्घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस प्रारंभी गुन्हे प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ करत होते. 

पुण्यात चार जणांनी मद्य पाजून युवतीवर केला सामूहिक बलात्कार !

देशाची रसातळाला जाणारी तरुण पिढी !
     पुणे, २० एप्रिल - येथील एका खाजगी आस्थापनात काम करणार्याु २३ वर्षीय तरुणीवर तिच्या २ मित्रांसह ४ जणांनी बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. (युवतींनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हा आणि वाकड्या नजरेने पहाणार्यां ना धडा शिकवा ! - संपादक) पीडित युवतीला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. संबंधित तरुणी ही मूळची अमरावतीची असून गेल्या दीड वर्षापासून पुण्यात राहते.

भुजबळ यांना दाढदुखीच्या उपचाराची अनुमती असतांना छातीतील दुखण्यासाठी नेल्याने चौकशी

     मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आणि त्यांच्यामुळे आर्थर रोड कारागृहाचे अधिकारी आणि काही आधुनिक वैद्य यांना आता एका वेगळ्याच चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. दाढदुखीवरील उपचारांसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची अनुमती मिळाली असतांना, भुजबळ शासकीय दंत महाविद्यालयात जाण्याऐवजी थेट सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये कसे पोहोचले, अचानक त्यांच्या छातीत कसे दुखू लागले आणि जर त्यांच्या छातीत दुखत होते, तर कार्डिओलॉजी विभाग नसलेल्या सेंट जॉर्जमध्ये त्यांना का ठेवण्यात आले, या प्रश्नांकची उत्तरे शोधण्याचे काम आता तुरुंग महानिरीक्षक बिपीन कुमार सिंह करणार आहेत. तुरुंग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी.के. उपाध्याय यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आर्थर रोड जेलमधील वैद्यकीय अधिकारी राहुल घुले यांनीच भुजबळांना उपचारासाठी जेलबाहेर पाठवण्याची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांचेही कामकाज पडताळण्यात येणार आहे.

रांची येथे रामनवमीच्या भव्य कार्यक्रमाला प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. तपन घोष यांची उपस्थिती !

कार्यक्रमाला उपस्थित श्री. तपन घोष (१)
आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ
     रांची (झारखंड) - बंगालमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संहतीचे (हिंदु एकतेचे) नेते श्री. तपन घोष हे मेसरा, रांची येथे रामनवमीच्या निमित्ताने १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात मुख्य अतिथीच्या म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात सहस्रो युवक आणि सामान्य धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. या वेळी हिंदु तरुणांकडून शहरात ठिकठिकाणी पराक्रमी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. 
    श्रीराम सेनेच्या ३६ आखाड्यांचे सहस्रो युवक पारंपरिक शस्त्रास्त्रे चालवतांना पाहून मी खूप प्रभावित झालो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया श्री. तपन घोष यांनी या वेळी दिली.

पालगडचे तलाठी संजय गावकर यांना २० सहस्र रुपयांची लाच घेताना अटक

अशा लाचखोरांना कायमचे कारागृहात पाठवा !
     दापोली (जिल्हा रत्नागिरी), २० एप्रिल - तालुक्यातील पालगडचे तलाठी संजय नारायण गावकर यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभाग रत्नागिरीच्या पथकाने १८ एप्रिलला अटक केले आहे. खेड तालुक्यातील धामणी येथील एका शेतकर्‍याने गावकर यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ एप्रिलला या तक्रारीविषयी खात्री केली असता शेतकर्‍याकडून करण्यात आलेल्या तक्रारीप्रमाणे गावकर तलाठ्यांनी लाच मागितल्याचे निदर्शनास आले होते. १८ एप्रिलला सापळा रचून तलाठी गावकर यांना कह्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २० सहस्र रुपयांची रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. सातबार्‍यावर असलेली अतिरिक्त नावे रेकॉर्डवरून काढून टाकण्यासाठी गावकर यांनी लाच मागितली होती. ही रक्कम स्वीकारताना गावकर यांना कह्यात घेण्यात आले.
     याच विभागाने दोन दिवसांपूर्वी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण यांना आरोपपत्र दाखल करण्यास विलंब लावण्याच्या कारणासाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेताना पकडले होते. 
     लाचलुचपत विभागाचे जिल्हा अधीक्षक सतीश गुरव, साहाय्यक अधीक्षक दीपक बर्गे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.२२ गावांना आता ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा

गावागावांत कोकाकोला, पेप्सी पोहोचवणारे शासन जनतेला मात्र 
पाण्यासाठी वणवण फिरायला लावते, हे लक्षात घ्या !
रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई 
     रत्नागिरी, २० एप्रिल - जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसागणिक अधिक तीव्र होऊ लागली आहे. एक आठवड्यापूर्वी टंचाईग्रस्त १३ गावांची संख्या आता २२ पर्यंत पोहोचली आहे. या पाणीटंचाईमुळे ३ सहस्र ७४ लोकांसाठी प्रशासनने ७ टँकरने पाणीपुरवठा चालू केला आहे.
      सध्या देशभरात दुष्काळाने भीषण रूप धारण केले आहे. अजून पाऊस चालू होण्यास किमान दोन मास शिल्लक आहेत. त्यामुळे पाणी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यासमोर आहे. जिल्ह्यातील धरणांनीही आता खालची पातळी गाठली आहे. नद्या-नालेही कोरडे पडले आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असणार्‍या पाणीयोजनांवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्यावर्षी पाऊस पुरेसा न झाल्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहणाचा मार्ग प्रशासनस्तरावरून स्वीकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पाराही कमालीचा वर चढला असून तापमान ३२ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

स्वामी विवेकानंदाचे स्मारक संस्कारक्षम पिढी घडवण्यास उपयुक्त ठरेल ! - भाजपचे आमदार संजय केळकर

   दापोली, २० एप्रिल - विश्‍वबंधुत्वाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंदाचे आणि संस्कृत पंडित सीताराम देसाई यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीचे स्मारक संस्कारक्षम पिढी घडवण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले. तालुक्यातील आडे येथे समुद्रकिनारी डॉ. मेधा मेहेंदळे आणि कुटुंबियांनी बांधलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. 
     आमदार केळकर पुढे म्हणाले, आडे येथे उभे राहिलेले विवेकानंदांचे स्मारक पर्यटन उद्योगाला चालना देईल. त्याशिवाय येथील विद्यार्थी, अभ्यासू व्यक्तींना येथील वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. दुर्गम भागात अशा प्रकारचे ज्ञानकेंद्र उभारण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे.

चौकशीच्या वेळी पोलिसांनी केलेला अतोनात छळ आणि त्यातून दिसून आलेली त्यांची आसुरी मनोवृत्ती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. कारागृहात पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते. 
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

करमणुकीसमवेत सर्वांगीण विकास साधणारे देशी खेळ आणि सर्वस्वाचा र्‍हास करणारे क्रिकेटसारखे पाश्‍चात्त्य खेळ !

श्री. राकेश पाध्ये
१. भारतीय खेळ 
     आपली भारतीय संस्कृती विज्ञानवादी आणि सखोल असून लहान मुलांचा करमणुकीच्या खेळांमधूनही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साधणारी आहे. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१ अ. शारीरिक विकास साधणारे खेळ
१ अ १. कबड्डी आणि खो-खो : या खेळांमध्ये खेळाडूंना प्रतिस्पर्ध्याला शिवणे, पकडणे, ताकदीने धरून ठेवणे, चपळतेने उठणे, सरकणे यांसारख्या कृती कराव्या लागतात. यांतून सलग धावणे, कृतीशील रहाणे यांमुळे शरिरातील पेशीन्पेशी उत्तेजित होणे, घाम येणे इत्यादी शरिराला आरोग्यदृष्ट्या लाभदायक गोष्टी आपोआप घडतात. काही वेळा खेळता खेळता पडायला होते. त्याने इजाही होते; पण ती लाभदायक कशी ? तर खेळाडू शरिराला इजा झाली तर ?, या भीतीपासून दूर जातो. त्याचे शरीर किरकोळ मार सहन करण्यास खंबीर बनते.

भूगर्भशास्त्रज्ञांना चिंता : पृथ्वी भूकंपप्रवण होत आहे का ?

  जगातील विशिष्ट हाय रिस्क झोन्सचे (अतिसंवेदनशील भूकंपनाच्या पट्ट्यांचे ) बारीक निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे मत जगातील विविध भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. जगातील काही देशांमध्ये नुकतेच तीव्र क्षमतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पृथ्वी पुन्हा एकदा भूकंप प्रवण तर होत नाही आहे ना ?, अशी चिंता भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 
      गेल्या दोन मासांमध्ये पृथ्वीच्या गर्भात असाधारण भूकंपनाच्या हालचाली झाल्याने भूकंपाच्या काही भयावह घटना घडल्या.

झगा झुगारा !

      समजा एखाद्या व्यक्तीने आपला अतोनात छळ केला आहे, आपले घरदार लुटले आहे आणि आपण मात्र ती व्यक्ती गेल्यावर तिचे गुणगान गात तिची कृती, आचार, वेषभूषा आणि परंपरा यांचे कौतुकाने पालन करत आहोत; एवढेच नव्हे, तर ती बंधने झुगारणार्‍यालाच वेड्यात काढत आहोत, असे कधी घडू शकते का ? वैयक्तिक स्तरावर अशक्य असणारी ही गोष्ट आपल्याकडे मात्र राष्ट्र्रीय स्तरावर स्वातंत्र्योत्तर ६८ वर्षांच्या काळात घडत आली आहे आणि आपण अजूनही त्याच गोष्टींचे पालन करत आहोत, हे खेदजनक आहे. न्यायाधिशाला माय लॉर्ड संबोधणे, मेकॉले शिक्षणपद्धतीचा अंगीकार चालूच ठेवणे अथवा पदवीदान समारंभात लाल आणि काळ्या रंगांचा झगा आणि काळ्या रंगाची टोपी परिधान करणे, अशा अनेक दास्यत्व दर्शवणार्‍या प्रथांची सूची करता येईल.

महत्त्व कशाला द्यायचे, हेही न कळणारे पत्रकार !

श्री. भाऊ तोरसेकर
       गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, असे एकेकाळी मूर्खांना म्हटले जाई; कारण गीतेमध्ये जे अध्यात्म वा तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते उमजण्याची बुद्धी नसेल, तर ती गीता अशा अर्धवटांसमोर वाचून उपयोग नसतो. त्याच्या लेखी गावातला गोंधळ आणि गीता यांत भेद नसतो. अर्थात आजकाल अशा म्हणी-वाक्प्रचार फारसे चलनात नाहीत. मग त्यांचा आशय तरी आजच्या शहाण्यांना कसा ठाऊक असावा ? साहजिकच त्यांनी गीता ऐकावी आणि गोंधळ घालायला प्रारंभ करावा, यात नवल उरलेले नाही. दोन आठवड्यांपूर्वी नाशिक येथे भाजपच्या प्रदेश अधिवेशनाचा गाजावाजा झालेला होता; कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात भारतमाता की जय म्हणावेच लागेल, असा आग्रही सूर लावला होता. मग मुख्यमंत्री हे पद घटनात्मक असून त्यात संयमाने बोलावे, वगैरे प्रवचनांचा मोसम चालू राहिला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशु1द्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदूसंघटक विक्रमराव सावरकर यांचे जाज्वल्य विचार !

समान सामाजिक कायदा लागू करण्यासाठी हिंदूंनी आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे ! 
     समान सामाजिक कायदा लागू करण्याची सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची सूचना आणि राष्ट्रपतींनी केलेली समान नागरी कायद्याची अपरिहार्यता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, हिंदूंनीच आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे.सिद्धेशची तळमळ, सायलीची भावपूर्ण सेवा । दे देवा दोघांना श्रीकृष्णकृपेचा मेवा ॥

      चैत्र कृष्ण पक्ष तृतीया (२५.४.२०१६) या दिवशी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील चि. सिद्धेश प्रकाश करंदीकर आणि रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात पूर्णवेळ सेवा करणारी चि.सौ.कां. सायली मुकुल गाडगीळ हे विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्ताने साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि श्री. सिद्धेश यांनी प.पू. डॉक्टरांना लिहिलेले पत्र अन् त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
चि. सिद्धेश करंदीकर
आणि चि.सौ.कां. सायली गाडगीळ
यांना शुभविवाहानिमित्त सनातन
परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सेवेची तीव्र तळमळ आणि शिकण्याची 
वृत्ती असलेले चि. सिद्धेश करंदीकर !
१ अ. नम्रता : समोरच्या प्रत्येक साधकाशी सिद्धेश नम्रपणे आणि प्रेमाने बोलतो. यामुळे तो अजातशत्रूही आहे.
१ आ. शिकण्याची वृत्ती : सिद्धेशला तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्याने याज्ञिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो सर्व विधी शिकून ते पुढाकार घेऊन करत आहे.
१ इ. सेवेची तीव्र तळमळ : आश्रमात अनेकदा होणार्‍या यज्ञांच्या कालावधीत सिद्धेश देहभान हरपून सेवा करतो. तेव्हा त्याला झोप आणि जेवण यांचेही भान नसते.

प.पू. डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर स्वतःच्या दोन्ही मुलांना साधना करण्याची अनुमती देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बेळगाव जिल्ह्यातील सौ. उज्ज्वला उत्तम गुरव !

१. गुरुकृपायोगानुसार साधनेला केलेला आरंभ 
सौ. उज्ज्वला गुरव
        उज्ज्वलाताई आधी कलावती आईंच्या संप्रदायानुसार साधना करायच्या. २०१२ या वर्षी त्यांच्या घरी सत्संग चालू झाल्यावर त्यांना गुरुकृपायोगानुसार साधना समजली. त्याच वेळी दैनिक सनातन प्रभातमधूनही त्यांना माहिती मिळू लागली. त्यांना वेगवेगळ्या अनुभूती येऊ लागल्या आणि आनंद मिळू लागला. पुढे सत्संगातून आणि दैनिकातून त्यांना जे काही शिकायला मिळत होते, ते त्या आचरणात आणू लागल्या. त्यांची साधनेची तळमळ वाढली. - श्री. रमेश लोंढे, नंदीहळ्ळी, बेळगाव.
२. ताई प्रतिदिन न चुकता दैनिक सनातन प्रभात वाचतात आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करतात. 
- श्री. शंकर मारुति लोंढे आणि श्री. रमेश लोंढे, नंदीहळ्ळी, बेळगाव.
३. घरातील आणि शेतातील कामे एकटीने 
करत असूनही आनंदी अन् उत्साही असणे
        ताई घरातील कामे करतांना कधी कंटाळत नाहीत. त्या नेहमी आनंदी आणि उत्साही राहून कामे करतात. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आश्रमात पूर्णवेळ सेवेसाठी पाठवले आहे. त्या घरातील आणि शेतातील कामे एकट्याच करतात, तरीही त्यांचा तोंडवळा नेहमी आनंदी असतो.
- श्री. शंकर मारुति लोंढे आणि श्री. भरमाणी दत्तू बाळेकुंद्री

श्री. सिद्धेश करंदीकर यांनी प.पू. डॉक्टरांना पाठवलेले भावपूर्ण कृतज्ञतापत्र

१. प.पू. डॉक्टरांचे सगुणातून दर्शन होणार 
नाही, या विचाराने मन दुःखी होणे आणि ते सगुणातून 
निर्गुणाकडे नेत आहेत, असे देवाने सांगितल्यावर आनंद होणे
       गुरुराया, आज असे कळले की, यापुढे शनैश्‍वर जप करायचा नाही. तेव्हा क्षणभर विचार आला की, यापुढे तुमचे दर्शन होणार नाही; पण देवाने लगेच सांगितले, अरे, तुला ते सगुणातून निर्गुणाकडे नेत आहेत. इतके दिवस सगुणातून तुमच्या खोलीत येत होतो. आता सूक्ष्मातून खोलीत जाऊया, या विचाराने मन एकदम आनंदी झाले.
२. प.पू. डॉक्टरांनी काही न बोलता सूक्ष्मातून 
काहीतरी दिल्याचे जाणवून समाधान वाटणे
        देवा, मी १२.१२.२०१४ या दिवशी तीर्थ देण्यासाठी येण्यापूर्वी तुम्हाला आज काय सांगायचे, हे ठरवून आलो होतो; पण प्रत्यक्ष खोलीत येऊन तुम्हाला तीर्थ दिले, तेव्हा काहीच सांगावे किंवा विचारावेसे वाटले नाही आणि तुम्हीसुद्धा माझ्याकडे केवळ पहात होतात. मला तुमच्याकडे पहाता येत नव्हते. खोलीतून बाहेर आल्यावर माझ्याकडून काही सांगून झाले नाही, याची रुखरुख लागण्यापेक्षा तुम्ही न बोलताच सूक्ष्मातून काही तरी दिले, याचेच आज आतून समाधान होते. ३ - ४ दिवसांपासून तीर्थ देण्यासाठी आल्यावर तुम्ही काहीच बोलला नाहीत, तेव्हा तुम्ही सूक्ष्मातून काहीतरी दिले, असे वाटत नव्हते; पण आज तसे वाटले आणि समाधान मिळाले. गुरुराया, आता मी सतत तुमचे एक लहान बाळ बनून सूक्ष्मातून तुमच्या खोलीत येईन आणि तुमची सेवा करीन.

सेवाभाव आणि प्रेमभाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजू सुतार !

     
श्री. राजू सुतार
श्री. राजू सुतार हे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. १७.२.१०१६ या दिवशी त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्याविषयी नातेवाइक आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. इतरांचा विचार करणे
अ. मी कधी निराश झाल्यास किंवा नकारात्मक मनःस्थितीत असल्यास ते मला समजावून त्यातून लगेच बाहेर काढतात.
आ. ते खाऊ सर्वांना वाटून मगच स्वतः खातात. अशा प्रकारे ते नेहमी इतरांचा विचार अधिक करतात.
इ. मी किंवा इतर कुणीही चुकत असेल, तर निरपेक्षपणे चुका सांगतात.

आश्रमात रहाण्याची आणि सेवा करण्याची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अलोरे, चिपळूण, रत्नागिरी येथील कु. वेदांत उमेश लांजेकर (वय १४ वर्षे) !

१. जन्मापूर्वी 
कु. वेदांत लांजेकर
 १ अ. प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्या दर्शनाचा लाभ होणे : गरोदर असतांना सांगलीच्या गुरुपौर्णिमेला जाण्याची संधी मिळाली. तेथे प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्या दर्शनाचा लाभ झाला. तेथे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या भजनाचाही आनंद मिळाला. त्या गुरुपौर्णिमेला मला माझे डोहाळे पूर्ण झाले, असे वाटले; कारण तेथे अवर्णनीय असा महाप्रसादाचा लाभ मिळाला.
१ आ. सामूहिक नामजपाला जाणे आणि रामरक्षा म्हणणे : त्या कालावधीत मी सामूहिक नामजपाला जायचे. त्यामुळे तेव्हापासूनच बाळावर नामजपाचे संस्कार होत आहेत, असे वाटायचे, तसेच प्रतिदिन तिन्ही सांजेला मी रामरक्षा म्हणायचे.
१ इ. प्रसूतीच्या वेळी मला १८ घंटे त्रास सहन करावा लागला; पण शस्त्रक्रिया न होता नैसर्गिक प्रसूती झाली, ही ईश्‍वराचीच कृपा !

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

गुरुकार्याच्या आत्यंतिक तळमळीचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू !

      २२.३.२०१६ या दिवशी पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांची कन्या कु. सायली गाडगीळ हिचा विवाह सुनिश्‍चित झाल्याची आनंदवार्ता मिळाली. गेल्या दीड वर्षांपासून पू. (सौ.) गाडगीळकाकू महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीमध्ये सांगितल्याप्रमाणे दैवी प्रवास करत आहेत. हा प्रवास दिवस-रात्र अखंड चालू आहे. येणार्‍या आपत्काळात साधकांच्या रक्षणासाठी विविध देवस्थानांना आणि तीर्थक्षेत्रांना भेटी देणे, यज्ञ-याग आणि पूजाविधी करणे, महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परिहार (उपाय) करणे, असे गुरूंनी दिलेले कार्य त्या या दैवी प्रवासात करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी भारताच्या २३ राज्यांत जवळ जवळ २ लक्ष ७५ सहस्र कि.मी. पेक्षा अधिक प्रवास केला आहे. शारीरिक त्रास होत असूनही त्या सतत प्रवास करत आहेत. या सर्व व्यस्ततेमुळे त्यांना कु. सायलीजवळ प्रत्यक्ष रहायला मिळतच नाही. त्यांना सायलीला वेळही देता येत नाही. सायलीनेही ते समजूतदारपणे स्वीकारले आहे.

वाईट शक्तींनी तीन वेळा पाडण्याचा आणि गंभीर इजा करण्याचा प्रयत्न करूनही श्रीगुरुकृपेने विशेष न लागणे

१. बाह्यतः कोणतेही कारण नसतांना आश्रमाच्या परिसरात पडणे आणि प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे गंभीर दुखापत न होणे : १५.१.२०१५ या दिवशी मी देवद आश्रमात स्वागतकक्षात सेवेसाठी जात असतांना ध्यानमंदिराच्या खिडकीच्या थोडे पुढे गेल्यावर अचानक पडले. माझ्या हातातील पिशवी, उपनेत्र (चष्मा) कुठे पडले, ते मला समजले नाही. मी ज्या ठिकाणी पडले, तेथे काहीच अडगळ किंवा दगड नव्हते. माझा कशातही पाय अडकला नव्हता कि घसरला नव्हता, तरीही मी कशी पडले, ते माझे मलाच समजले नाही.
       मला तेथे असलेल्या साधकांनी उचलून आसंदीवर बसवले. तेथे असलेल्या संतांच्या सान्निध्याने मी सावरले. माझ्या उपनेत्राला चरे पडले होते; पण माझ्या डोळ्यांना काही लागले नव्हते. मी कुशीवर पडल्याने गालाला मार लागला; पण दात पडले नाहीत. कपाळाला लहानशी दुखापत झाली. माझ्या डाव्या हाताच्या मनगटाचे हाड मोडले. त्यामुळे प्लास्टर घालावे लागले. प.पू. डॉक्टर आणि सर्व संत यांच्या कृपेने थोडक्यात निभावले.

संत संकटात असतांना त्यांच्या साहाय्याला जे येतील त्यांना बापूजी काही कमी पडू देणार नाहीत - रेखा दीदी, श्री योग वेदांत सेवा समिती

      ठाणे - केवळ संतांनाच फसवले गेले असे नाही, तर देवांनाही फसवले गेले आहे. भस्मासुर राक्षसानेसुद्धा शंकराला फसवले होते. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा विष बाहेर पडले आणि ते शंकराने ग्रहण केले. कलियुगात संतांची स्तिथीही तीच आहे. आज संत संकटात आहेत, बापूजी संकटात आहेत. त्यांच्या साहाय्याला जे येतील, त्यांना संत काही न्यून पडू देणार नाहीत, असे मार्गदर्शन श्री योग वेदांत सेवा समिती आयोजित संत संमेलन मेळाव्याच्या वेळी श्री योग वेदांत सेवा समितीच्या रेखा दीदी यांनी उपस्थित भक्तांना केले. गोल मैदान, उल्हासनगर गुढीपाडव्याच्या निमिताने सदर मेळावा घेण्यात आला होता. बापूजींच्या सहस्रो भक्तांनी या मेळाव्याचा लाभ घेतला.
मुलांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवले असते, तर संतांना अपकीर्त
करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती ! - प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती
     ही भूमी संतांची भूमी आहे; परंतु धर्मद्रोही हिंदूंनी धर्म संपवण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. या आवेशात संतांनाच बदनाम करण्याचे महापाप करत आहेत. संतांचे काम आहे क्षमा करणे; परंतु जर आपल्या गुरुदेवांवर अन्याय होत असेल, तर त्या संतांच्या भक्तांचे काम आहे संघर्ष करणे.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

रामनाथी गोकुळात असे भगवंत !

रामनाथीरूपी गोकुळात आहे प्रत्यक्ष भगवंत ।
साधक झाले कृतार्थ, भगवंतची आहे अनंत ॥ १ ॥
तो भगवंत जरा खोडकर असे ।
स्वत:चे देवपण त्याला मान्य नसे ।
भगवंताच्याच लीला तो साधकांना दाखवत असे ॥ २ ॥
जयंत रूपाने असे सदा सर्वकाळ तो समवेत ।
अशा भगवंताला माझा त्रिवार प्रणाम ॥ ३ ॥
॥ श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
- श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०१५)
       (साधकाचा पू. डॉक्टरांप्रती भाव असल्याने त्याला प.पू. डॉक्टर म्हणजे साक्षात् देव आहे, असे वाटते. ही त्याची वैयक्तिक अनुभूती आहे. - संकलक)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !

साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !
      पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे
४. अन्य : आश्रमात येणार्‍यांचे आदरातिथ्य करणे आणि महाराज मौनव्रतात आहेत, याची त्यांना कल्पना देणे, प.पू. दास महाराजांना वेळेवर औषधे देणे, भोजन देणे, मर्दन (मालिश) करणे, पू. (सौ.) माईंना स्वयंपाकघरात साहाय्य करणे, मंडईत जाऊन आवश्यक साहित्य आणणे
     साधक स्वतःच्या सोयीनुसार शक्य तेवढे दिवस सेवेत सहभागी होऊ शकतात. जे साधक ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पुढील माहिती पाठवावी. साधकत्व आणि सेवाभाव असलेल्या साधकांना या सेवेसाठी पाठवण्याचे जिल्हासेवकांनी नियोजन करावे.
      साधकांनो, संतसेवेच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करण्याची अमूल्य संधी गुरुकृपेमुळे लाभत असल्याविषयी कृतज्ञता बाळगा !

आम्हा सर्वांच्या शुभेच्छा लाडक्या सायलीला ।

लहानपणापासून अनुभवले आश्रमजीवन ।
तिच्या संपूर्ण कुटुंबानेच केले सर्वस्व गुरुचरणी अर्पण ॥ १ ॥
सदैव उत्साही अन् मनाने निर्मळ ।
गुरूंना अपेक्षित असे सर्व करण्याची तिची तळमळ ॥ २ ॥
गायन आहे तिचे भावपूर्ण ।
ऐकतांना ते आठवतात गुरुचरण ॥ ३ ॥
लाभले तिला संत माता-पिता ।
अन् जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून
मुक्त झालेले आजी-आजोबा ॥ ४ ॥
होणार आहे नवीन आरंभ जिच्या आयुष्याला ।
आहेत आम्हा सर्वांच्या शुभेच्छा लाडक्या सायलीला ॥ ५ ॥
- देवाची स्वराली (सौ. स्वराली आेंकार पाध्ये) (७.४.२०१५)

साधकांना सूचना

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
       सनातन-निर्मित ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
       समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे एका लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
      जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
-------------------------------------
        पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - चैत्र शुक्ल पक्ष चतुर्दशी (२१.४.२०१६) स. ८.२१ वाजता
समाप्ती - चैत्र पौर्णिमा (२२.४.२०१६) स. १०.५४ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर मी शिष्य आहे एवढाच विचार मनात येतो; म्हणूनच माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      परमेश्‍वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही, याची नेहमी काळजी घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकचा भारतद्वेष !

संपादकीय 
     पाक भारताला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. पाकिस्तानी कारागृहात संशयास्पदरित्या मृत्यू झालेले भारतीय कैदी कृपाल सिंह यांचा मृतदेह पाकिस्तानने भारताकडे सुपुर्द केला. भारतात त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर सिंह यांच्या मृतदेहातील हृदय आणि जठर गायब असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले. पाकने असे केल्याचे हे पहिलेच उदाहरण नव्हे. यापूर्वी तर त्याने भारतीय सैनिकांचे शीर कापले होते, तसेच नखे उखडली होती. पाकने वेळोवेळी भारतद्वेष प्रकट केला आहे. कधी भारतीय सैनिकांवर थेट गोळीबार करणे, कधी भारतात आतंकवादी घुसवून घातपात घडवून आणणे, कधी भारतात चलनी नोटा घुसवून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे, कधी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना हाताशी धरून भारताला वाकुल्या दाखवणे, अशा एक ना अनेक कुरघोड्या पाक सातत्याने करत आहे. पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या सर्वांत मोठ्या तळावर आक्रमण करून तर पाकने भारताचे नाक कापले. एवढे होऊनही भारत शांतच ! पाकवर सूड उगवणे तर सोडाच; पण उलट त्याच्याशी मैत्रीचा पुढे करण्यात भारताने कायमच धन्यता मानली आहे. भारताने मैत्रीचा हात पुढे करायचा आणि पाकने लाथ घालायची, असा संतापजनक खेळ गेल्या कित्येक दशकांपासून चालू आहे. भारताच्या जागी जर इस्रायल असता, तर एव्हाना पाकिस्तान हे राष्ट्र जगाच्या नकाशावरून केव्हाच पुसले गेले असते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि धमक हवी ! शासन असे पाऊल उचलण्याची आजतरी कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे केवळ अपेक्षा करण्याशिवाय आपल्या हातात उरते तरी काय ?

खोटारड्यांना फासावर लटकवा !

संपादकीय
     सत्य कधीही लपून रहात नाही, हे काँग्रेसी बहुधा विसरले असावेत अथवा हिंदुद्वेषापायी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे. मोगल आणि इंग्रज यांनी हिंदूंना जितके अपकीर्त अन् अपमानित केले त्याहीपेक्षा सहस्रोपटींनी काँग्रेसने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी काम केले. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीवरून हे अधोरेखित झाले. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याची माहिती या प्रकरणाचे अन्वेषण करणारे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे प्रमुख शरद कुमार यांनी दिली. मुळात आडातच नाही, तर पोहर्‍यात येणार कुठून ? हे तमाम हिंदू गेल्या अनेक वर्षांपासून ओरडून सांगतच होते. शरद कुमार यांच्या वरील विधानामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले इतकेच. शरद कुमार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुरोहित यांचे नाव या प्रकरणात का गोवण्यात आले, हेच कळत नाही, असे गंभीर विधान केले. हे विधान काँग्रेसचे पूरते वस्त्रहरण करणारे ठरले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn