Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज क्रांतीकारक दामोदर चापेकर बलीदानदिन
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर एकट्याने ब्रिटीश माणसाचे रक्त
सांडण्याचा प्रयत्न करण्याचा पहिला मान दामोदर चापेकरांकडे जातो.

सैनिकांनी छेडछाड केलीच नाही ! - पीडित मुलीची न्यायालयात साक्ष

हंदवाडा (काश्मीर) येथील हिंसाचाराचे प्रकरण
सैनिकांवर जाणूनबुजून हीन आरोप करून त्यांचे खच्चीकरण
करणार्‍या काश्मीरमधील देशद्रोह्यांना सणसणीत चपराक !
अशा देशद्रोह्यांवर शासनाने कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित !
      श्रीनगर - देशद्रोही नागरिकांकडून हंदवाडा येथे एका मुलीच्या करण्यात आलेल्या छेडछाडीचे खापर सैन्यावर फोडून सैन्याला लक्ष्य केले जात असतांना दुसरीकडे मात्र सदर पीडित मुलीने सैनिकांनी छेडछाड केलीच नसून ते निर्दोषच आहेत, अशी साक्ष जम्मू-काश्मीर न्यायालयात नोंदवली. त्यामुळे सैन्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍याचे पितळ उघडे पडले आहे. पीडित युवती म्हणाली, १४ एप्रिलला मी शाळेतून घरी चालले होते. या वेळी रस्त्यातील एका सार्वजनिक स्वच्छतागृहात मी गेले. बाहेर आल्यानंतर २ मुलांनी मला पकडले. आमच्यात झटापटी झाली. त्या मुलांनी माझे दप्तरही हिसकावून घेतले. यातील एक मुलगा शालेय गणवेशात होता. २ दिवसांपूर्वीही पीडित मुलीने तिच्या करण्यात आलेल्या छेडछाडीत सैन्याचा हात नसल्याचा खुलासा केला होता.
सैन्यावर होणारे आरोप निराधार ! - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
     नवी देहली - हंदवाडा येथे सैन्यावर होणारे आरोप निराधार असून नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर केले आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा चालू असून केंद्रशासनाकडून राज्यशासनाला सर्व प्रकारचे साहाय्य केले जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

पाकिस्तानी हिंदूंना भारतात मालमत्ता खरेदी आणि अधिकोषात खाते उघडण्यास मुभा !

यासह शासनाने पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवर होणारे अत्याचार
रोखण्यासाठीही त्वरित पावले उचलावीत, ही हिंदूंची अपेक्षा !
      नवी देहली - दीर्घकालीन पारपत्रावर भारतात वास्तव्य करणार्‍या पाकिस्तानी हिंदूंना आता देशात मालमत्ता खरेदी, तसेच अधिकोषात खाते उघडण्याची मुभा देण्याचा निर्णय मोदी शासनाने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काढलेल्या अधीसूचनेनुसार पाकिस्तानी हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून भारतीय नागरिकत्वाच्या नोंदणी शुल्कातही मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे. नागरिकत्वाच्या नोंदणी शुल्काकरता १५ सहस्र रुपये आकारण्यात येतात. त्याऐवजी पाकिस्तानी हिंदूंकडून केवळ १०० रुपये घेण्यात येणार आहेत.
       पाकमधून भारतात आलेल्या स्थलांतरितांची संख्या अनुमाने २ लाख असून त्यात बहुतांश हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे. यांपैकी ४०० पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जयपूर, कर्णावती, राजकोट, भोपाळ, इंदूर, मुंबई, नागपूर, पुणे, देहली आणि लक्ष्मणपुरी (लखनौ) या शहरांमध्ये वास्तव्य करत आहेत. पाकमधून आलेल्या हिंदूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना दिलासा देण्यासाठी या सुविधा देण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली.

जर्मनीमध्ये गुरुद्वारात स्फोट, ३ घायाळ

      एस्सेन (जर्मनी) - शहराच्या पश्‍चिम भागातील एका गुरुद्वारामध्ये १६ एप्रिलच्या सायंकाळी बैसाखी हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीख एकत्र आले असतांना त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. या स्फोटात ३ जण घायाळ झाले. यातील एकाची स्थिती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या प्रकरणी जर्मन पोलीस तपास करत आहेत. या स्फोटात आतंकवाद्यांचा हात असल्याचे पुरावे अद्याप मिळाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

न्यायालयाचा आदेश म्हणजे शरीयत कायद्यामध्ये ढवळाढवळ ! - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

      लक्ष्मणपुरी (लखनौ) - शरीयत कायद्यानुसार ३ वेळा तलाक म्हटल्यावर होणारा घटस्फोट योग्य असून याविषयी न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे शरीयत कायद्यामध्ये ढवळाढवळ आहे, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. (हिंदूंच्या रूढी, प्रथा, परंपरा आणि धर्मशास्त्र यांवर राज्यघटनेच्या हवाल्याने न्याय देणारे न्यायालय यावर काय निर्णय घेणार, याकडे हिंदूंचे लक्ष असेल ! - संपादक) याविषयी १६ एप्रिलला बोर्डाची बैठक होऊन त्यात उत्तराखंड येथील सायरा बानो आणि आणखी एका प्रकरणात न्यायालयात बाजू मांडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. ३ वेळा तलाक म्हणून होणारा घटस्फोट हा सामाजिक न्यायाच्या विरोधात तर नाही ना?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने बोर्डाला केला आहे. या प्रकरणीही न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतला आहे.

बांकेबिहारी मंदिर शासनाच्या कह्यात जाऊ देणार नाही ! - सरसंघचालक

      वृंदावन - हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले बांकेबिहारी मंदिर शासनाच्या कह्यात जाऊ देणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्यासमवेत आहे, असे आश्‍वासन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथील बांकेबिहारी मंदिरातील पुजार्‍यांना दिले. वृदांवन दौर्‍यावर असतांना सरसंघचालकांनी बांकेबिहारी मंदिराला भेट दिली. या वेळी येथील पुजार्‍यांनी त्यांना बांकेबिहारी मंदिर अधिग्रहण प्रस्तावाविषयी अवगत केले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी भागवत यांनी मंदिरात पूजा केली आणि राधे राधे यांच्या जयघोषासह भगवान श्रीकृष्णाकडे विश्‍वशांतीसाठी प्रार्थना केली.

इक्वाडोर (अमेरिका) येथील शक्तीशाली भूकंपात ७७ ठार : आणीबाणी घोषित

      क्विटो - दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरला १७ एप्रिलला पहाटे भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपात ७७ लोक ठार झाले असून मालमत्तेची प्रचंड हानी झाली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी नोंदवली गेली असून त्सुनामी वादळ येण्याची चेतावणीही देण्यात आली आहे. गेल्या १० वर्षांतील हा सर्वांत शक्तीशाली भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपानंतर इक्वाडोरमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. इक्वाडोरचे राष्ट्र्रपती राफेल कोरिया यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. इक्वाडोरच्या आग्नेय दिशेला असलेल्या समुद्र किनार्‍याजवळच्या म्युज्न येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे अमेरिकेच्या पुरातत्व विभागाने सांगितले. इक्वाडोरची राजधानी क्विटो येथे तब्बल ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते. यामुळे अनेक घरे कोसळली. एक उड्डाणपूलही कोसळला. नॅशनल गार्डस्च्या माध्यमातून युद्धपातळीवर साहाय्यकार्य हाती घेण्यात आले आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (१७ एप्रिलला इक्वाडोरमध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती सत्य आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

तृप्ती देसाई यांच्यावर सांगलीत अदखलपात्र गुन्हा नोंद !

अवामी विकास पार्टीचे अश्रफ वांकर यांना धमकी दिल्याचे प्रकरण
      सांगली - अवामी विकास पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अश्रफ वांकर (रहाणार बुधगाव) यांना भ्रमणभाषवरून धमकी दिल्याच्या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अदलखपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अश्रफ वांकर यांनी १६ एपिल या दिवशी देसाई यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्र्रार दिली आहे. (तृप्ती देसाई यांनी आजपर्यंत अनेक वेळा जमावबंदी मोडणे, तसेच अन्य कायदे तोडलेले आहेत, असे असतांना त्यांच्यावर आजपर्यंत एकादाही अटकेची कारवाई का झाली नाही ? भारतातील कायदे जर सर्वांसाठी समान आहेत, तर तृप्ती देसाई यांना त्यातून सवलत का ? - संपादक)
     तृप्ती देसाई यांनी नुकतेच हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचे घोषित केले होते. त्यावर वांकर यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर एक पोस्ट टाकली होती. त्यात तुम्ही धार्मिकवाद वाढवण्याचे काम करत आहात. राज्यात महिलांचे इतर अनेक प्रश्‍न असतांना तुम्ही मंदिर आणि दर्गा प्रवेशाच्या मागे का लागला आहात ? मुस्लीम लॉ वेगळा आहे. महिलांविषयी तुम्हाला काम करण्यासाठी मद्यबंदी, स्त्री भ्रूणहत्या थांबवणे यांसारख्या विषयांवर आंदोलन करता येऊ शकते. तुम्ही दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला कोठेही फिरू देणार नाही. कोल्हापुरात मंदिरात प्रवेश करतांना तुम्हाला मारहाण झाल्याचे समजते.

न्यायालयांनी हिंदीत निर्णय लिहिणे आवश्यक ! - खासदार हुकमदेव नारायण यादव

      रेवाडी (हरियाणा) - पंतप्रधान विदेशातही हिंदीत भाषण करून हिंदीचा सन्मान वाढवत आहेत; परंतु मंत्रालये आणि इतर शासकीय विभाग यांचे कामकाज अजूनही पूर्णपणे हिंदीत होऊ शकलेले नाही. अद्याप सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनीही हिंदी स्वीकारलेली नाही. स्वतंत्र भारतातील न्यायालयांनी त्यांचे निर्णय हिंदीत लिहिणे आवश्यक आहे, असे संसदीय राजभाषा समितीच्या तिसर्‍या उपसमितीचे संयोजक खासदार हुकमदेव नारायण यादव यांनी म्हटले आहे. खासदार हुकमदेव यादव हे संसदीय समितीचे उपाध्यक्ष खासदार सत्यनारायण जटिया, शादीलाल बतरा, जयप्रकाश नारायण यादव यांच्यासह रेवाडी येथे निरीक्षणाकरता आले होते. या वेळी एका हिंदी वृत्तपत्राशी बोलतांना यादव म्हणाले, केवळ शासनामध्येच नाही, तर सुशिक्षित भारतियांकडूनही हिंदीची उपेक्षा होत आहे. जयप्रकाश नारायण यादव म्हणाले, इतर देश त्यांच्या मातृभाषेच्या प्रती अतिशय संवेदनशील असतात. हिंदी सर्वसामान्यांची भाषा होण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

पुढच्या श्रीरामनवमीला अयोध्येत भव्य राममंदिरात पूजा करू ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
      मुंबई - अयोध्या येथे राममंदिर व्हावे, यासाठी आतातपर्यंत ६०० लढाया झाल्या आहेत. लक्षावधी हिंदूंनी प्राण दिले आहेत. या वर्षाअखेर श्रीराम मंदिराच्या कामाला प्रारंभ होईल. ३ मासांत भव्य मंदिर बांधण्याचे काम पूर्ण होऊ शकेल. पुढच्या श्रीरामनवमीला अयोध्येत भव्य राममंदिरात पूजा करू, असे प्रतिपादन विराट हिंदुस्थान संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.
     १७ एप्रिल या दिवशी दादर येथील योगी सभागृहात अयोध्येत श्रीराम मंदिर का आणि कसे ? या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर विराट हिंदुस्थान संगमचे राष्ट्रीय संचालक श्री. जगदीश शेट्टी, तमिळनाडू राज्याचे अध्यक्ष श्री. अजय जग्गा, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अजय शंखे, केरळचे अध्यक्ष श्री. मोहनदास, आमदार सरदार श्री. तारासिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी पुढे म्हणाले,
१. रामजन्मस्थळी श्रीरामाचे मंदिर आणि शरयु नदीच्या पलीकडे मशीद बांधण्याचा प्रस्ताव घेऊन माझी मुसलमानांच्या काही नेत्यांसोबत चर्चा झाली. मुसलमान नेत्यांनी हे मान्य केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांचे प्रतिनिधी पाठवले; मात्र न्यायाधिशांसमोर कुणीही तोंड उघडले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांची लिखित संमती घेऊन येण्यास सांगितले आहे. येत्या एक मासात हा विषय पूर्ण करू.

राममंदिर निवडणुकीपुरते नव्हे, तर भाजपच्या घोषणापत्रावरील सूत्र ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
      मुंबई - आता उत्तरप्रदेशची निवडणूक येत आहे. त्यानंतर लोकसभेची निवडणूक येईल. निवडणुका प्रतिवर्षी येतात. त्यासाठी आम्ही राममंदिर बांधायचे थांबवायचे का ? राममंदिर हे निवडणुकीपुरते नव्हे, तर भाजपच्या घोषणापत्रावरील सूत्र आहे, असे स्पष्ट मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी १७ एप्रिल या दिवशी दादर येथे पत्रकार परिषदेत मांडले.
     ते पुढे म्हणाले, उत्तम प्रशासन, भ्रष्टाचाराला विरोध आणि हिंदुत्व या ३ सूत्रांवर आम्ही निवडणूक लढवली. हिंदुत्व ही एक संस्कृती आहे. जो या देशाला स्वत:ची मातृभूमी मानतो, तो हिंदू आहे.
     पत्रकारांनी काळा पैसा देशात परत आणण्याला होत असलेल्या विलंबाविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते म्हणाले, काळा पैसा आणण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे विलंब होत आहे. शासनाची अजून ३ वर्षे शिल्लक आहेत. या कालावधीत आम्ही हे काम पूर्ण करू. इजिप्त, लिब्रेन आदी राष्ट्रांनी काळा पैसा देशात आणण्यासाठी स्वतंत्र कायदा केला. असा कायदा केल्यास आपल्या राष्ट्राचा ७० देशांमध्ये असलेल्या काळ्या पैशांचे राष्ट्रीयीकरण करता येईल.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांनी कायदा-सुव्यवस्था राखावी ! - न्यायालयाचा आदेश

श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश 
मनाईची मागणी न्यायालयाने फेटाळली
       कोल्हापूर, १७ एप्रिल - श्री अंबाबाई मंदिरातील गाभार्‍यात सर्वच भाविकांना मनाई करावी, अशी मागणी दुसरे सहदिवाणी न्यायाधीश पी.पी. शर्मा यांनी १६ एप्रिल या दिवशी फेटाळून लावली, तसेच करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेशप्रकरणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांनी कायदा-सुव्यवस्था राखावी, असे आदेशही दिले. हक्कदार श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर आणि शिवकुमार शिंदे यांनी १४ एप्रिल या दिवशी गाभार्‍यात स्त्री-पुरुष भाविकांना प्रवेश देऊ नये, अशी याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याचसमवेत न्यायालयाने या प्रकरणी कोणाला म्हणणे प्रविष्ट करायचे असल्यास त्यांनी आपले म्हणणे पुढील सुनावणीपर्यंत मांडावे, असे सांगितले. या याचिकेची पुढील सुनावणी २५ एप्रिल या दिवशी होणार आहे.

सनातन संस्थेचे कार्य हे अवतारी कार्य ! - पू. मकरंदबुवा रामदासी

श्रीरामदेव मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला
श्री. अभय वर्तक यांचा सत्कार करतांना पू. मकरंदबुवा रामदासी (डावीकडे)
      तासगाव - सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक हिंदुत्वाची बाजू धडाडीने वृत्तवाहिन्यांमध्ये मांडतात, याचा आम्हाला अभिमान आहे. सनातन संस्थेचे कार्य हे अवतारी कार्य आहे, असे गौरवोद्गार सज्जनगड येथील समर्थभक्त पू. मकरंदबुवा रामदासी यांनी काढले. येथील वन्दे मातरम् चौकात असणार्‍या श्रीरामदेव मंदिरात १५ एप्रिल या दिवशी श्रीराम नवमीचा उत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी आयोजित कार्यक्रमात वरील उद्गार पू. मकरंदबुवा रामदासी यांनी काढले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, तसेच सर्वश्री किरण पोळ आणि पुरण मलमे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
     येथील श्रीराम मंदिरात १८२ वर्षांची श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आहे. पू. मकरंदबुवा रामदासी यांच्या कीर्तनाने श्रीराम नवमीच्या उत्सवाची सांगता झाली. दुपारी १२ वाजता प्रभु श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी सांगली जिल्ह्याचे भाजप खासदार श्री. संजयकाका पाटील, तासगावचे नगराध्यक्ष श्री. बाबासो पाटील, अन्य काही मान्यवर आणि नगरसेवक यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

हवेली (जिल्हा पुणे) येथील शासकीय कार्यालयांतील खाजगी साहाय्यकांना हटवणार !

श्री. चंद्रकांत वारघडे
माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांच्या प्रयत्नांना यश
      हवेली (पुणे) - येथील तलाठी कार्यालयांत काम करणार्‍या खाजगी साहाय्यकांच्या अडवणुकीमुळे कंटाळून नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. माहिती सेवा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांनी याविषयी सविस्तर तक्रार हवेलीच्या तहसीलदारांकडे केली होती. त्यानंतर तलाठी कार्यालयांत काम करणार्‍या खाजगी साहाय्यकांना त्वरित हटवण्याचे आदेश हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे या साहाय्यकांचा कामातील हस्तक्षेप थांबून त्यांच्या दुकानदारीला आळा बसणार आहे.
     खाजगी साहाय्यक बिनदिक्कतपणे शासकीय दप्तर हाताळतात. महत्त्वपूर्ण धारिकांची ने-आण करतात. शासकीय महसूल अधिकार्‍यांविना या व्यक्ती सर्व देवाण-घेवाणीची कामे पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अधिकार्‍यांची विशेष मर्जी असते. सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी हे खाजगी तलाठी आर्थिक लूट करतात. अवेळी कार्यालय उघडून विशेष लोकांना विशेष सेवा पुरवतात. याविषयी श्री. वारघडे यांनी सांगितले की, सात-बारा आणि आठ अ उतार्‍यासाठी खाजगी व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून पैशांची मागणी करतात. नियमबाह्य काम न थांबल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात येतील, असे श्री. वारघडे यांनी सांगितले.


चीनविरुद्धच्या पराभवाला तत्कालीन राज्यकर्त्यांची रणनीती कारणीभूत !

  • हे होते काँग्रेसच्या युद्धनीतीचे खरे स्वरूप ! अशा पराभवांना कारणीभूत असणार्‍या काँग्रेसवाल्यांना प्रायश्‍चित्त घेण्यास राष्ट्रप्रेमी जनतेने भाग पाडले पाहिजे !
  • (निवृत्त) मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचा घणाघात
      पुणे, १७ एप्रिल - चीनसमवेतच्या युद्धात भारतीय सैन्याला आवश्यक शस्त्रसाठा आणि साधनसामग्री देण्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. तरीही जवानांनी प्राणपणाने लढा दिला; परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांच्या तर्कनिष्ठतेचे अधःपतन आणि रणनीतीच्या नीचांकामुळेच त्या युद्धात पराभव पत्करावा लागला, अशी टीका (निवृत्त) मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा इतिहास संशोधक शं.ना. जोशी स्मृती पुरस्कार पित्रे यांना त्यांच्या न सांगण्याजोगी गोष्ट या पुस्तकासाठी देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव डॉ. श्री.मा. भावे, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, इतिहास अभ्यासक मंदार लवाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

(म्हणे) कन्हैया कुमारला चप्पल फेकून मारणे, ही आपली संस्कृती आहे का ?

कायम टगेगिरीची 
भाषा करणारे अजित पवार
       पिंपरी (पुणे), १७ एप्रिल - नागपूरमध्ये कार्यक्रम चालू असतांना जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा (जेएन्यु) विद्यार्थी कन्हैया कुमार याला व्यासपिठावर चप्पल फेकून मारणे, ही आपली संस्कृती आहे का, असा प्रश्‍न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. (अजित पवार यांनी शेतकर्‍यांसमोर भाषण करतांना धरणात पाणी नाही, तर आम्ही लघुशंका करायची का ? अशी अश्‍लाघ्य भाषा वापरली होती. पवार यांची ही कोणती संस्कती ? अशी अश्‍लाघ्य भाषा वापरणार्‍या अजित पवार यांना संस्कृतीविषयी बोलण्याचा अधिकार तरी आहे का ?)
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सौ. शकुंतला धराडे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर धर्मांधांकडून दगडफेक !

हिंदूंनो, अशा घटना रोखण्यासाठी धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करा !
     रांची (झारखंड) - राज्यातील हजारीबाग जिल्ह्यातील केरादारी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या पांडु चौकातून जात असलेल्या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. यानंतर उसळलेल्या दंगलीत १२ जण घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 
१. पोलीस उपायुक्त अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मिरवणूक ठरलेल्या मार्गावरून जात असतांना अचानकपणे धर्मांधांनी त्यावर दगडफेक केली. यानंतर २ वाहनांना आग लावण्यात आली. दगडफेक करणार्‍या लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या मागण्यांचे निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना कार्यकर्ते
      पुणे - हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी कोथरूड येथे रामनवमीच्या दिवशी हिंदूंना अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी, यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. या वेळी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कर्नाटक अर्थसंकल्पामध्ये अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद रहित करावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. १२ एप्रिल या दिवशी निवासी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री बाळकृष्ण तागडे, कृष्णा पाटील, विनायक बागवडे उपस्थित होते.

पिंपरी येथे खोट्या नोटा वटवणार्‍या धर्मांधांना अटक

पश्‍चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून बनावट नोटांचे वितरण
      पुणे - बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांना पिंपरी पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांनी या बनावट नोटा पश्‍चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून आणल्याची स्वीकृती दिली आहे. पिंपरीतील पवनेश्‍वर मंदिराजवळ कापसे चाळीत रहाणारा शमशुद्दीन रहमान शेख (वय ३० वर्षे) हा ज्यूस सेंटर चालवणारा आरोपी ग्रामीण भागातील आठवडी बाजारात जाऊन खरेदी करण्याच्या बहाण्याने खोट्या नोटा वटवत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख आणि त्याची सासू जोहरा यांच्याकडून सहस्रांच्या ६१ आणि पाचशे रुपयांच्या २ बनावट नोटा अशा जप्त करण्यात आल्या, तसेच शंभर रुपयांच्या २३ चलनी नोटा जप्त केल्या. आरोपी शमशुद्दीन आणि त्याची सासू जोहरा हे मूळचे पश्‍चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील आहेत. सासू जोहरा हिने काही दिवसांपूर्वी मालदामधून बनावट नोटा आणल्या, अशी कबुली शमशुद्दीन याने पोलिसांना दिली. मालदामधील एका ओळखीच्या व्यक्तीने बनावट नोटा दिल्याचे जोहरा हिने पोलिसांना सांगितले.


ब्रुसेल्सवर आक्रमण झाले, तेव्हा देशातील काही मुसलमान आनंदाने नाचत होते ! - बेल्जियमचे गृहमंत्री जॅन जाम्बोन

भारत शासन आणि ढोंगी प्रसारमाध्यमे 
अशी वस्तूस्थिती जनतेला कधी सांगतील का ?
       ब्रुसेल्स - बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सवर आक्रमण झाले, तेव्हा देशातील काही मुसलमान आनंदाने नाचत होते, असे विधान बेल्जियमचे गृहमंत्री जॅन जाम्बोन यांनी केले आहे. दि स्टॅण्डर्ड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जम्बोन यांनी हे विधान केले आहे.
जॅन जाम्बोन यांनी पुढे म्हटले आहे की,
१. पॅरिसवरील आक्रमणाचा प्रमुख आतंकवादी सलाह अब्देसलाम हा बेल्जियमचा होता. त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पोलिसांवरही मुसलमानांनी आक्रमण केले. पोलिसांवर दगड आणि बाटल्यांचा मारा करण्यात आला होता. (जे भारतात एखाद्या मोहल्ल्यात पोलिसांच्या संदर्भात होते तेच बेल्जियममध्येही होते. यावर भारतातील प्रसारमाध्यमे तोंड उघडतील का ? - संपादक)

सीमेवरील सैनिकांनी मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करू नये !

शत्रूराष्ट्राच्या नीतीला भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर द्यावे !
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाचे सैनिकांना आदेश
    नवी देहली - पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे हॅकर्स फ्रेंड रिक्वेस्टच्या माध्यमातून भारतीय सैनिकांच्या मोबाईलमधील डाटा (माहिती) हॅक करू शकतात. हे देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक असल्यामुळे संवेदनशील क्षेत्रामध्ये तैनात असलेल्या सैनिकांनी कोणत्याही प्रकारच्या मोबाईल अ‍ॅप्स चा वापर करू नये, असा आदेश इंडो तिबेट सीमा पोलीस दलाने सैनिकांना दिले आहे. 
     इंडो तिबेट सीमा दलाचे संचालक जनरल कृष्णा चौधरी आदेश देतांना म्हणाले, सैनिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा मुलीच्या फ्रेन्ड रिक्वेस्टला स्वीकारू नये. त्याचबरोबर स्मॅश अ‍ॅप्स सारख्या अ‍ॅपचाही वापर करू नये; कारण हा अ‍ॅप तुमच्या ठिकाणासह इतरही माहिती हॅक करण्यास सहाय्यक ठरू शकते. काही दिवसांपूर्वी सैन्याने गूगल प्लेस्टोअरमधून वीचैट, स्मॅश आणि लाईन अ‍ॅप्स डाऊनलोड न करण्याची सूचना सैनिकांना दिली होती. हे अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यास चीन आणि पाकिस्तान यांच्या गुप्तचर संस्था भारतीय सैनिकांनच्या मोबाईलमधील माहिती हॅक करू शकतात.

काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचे झेंडे असलेल्या वह्या होली क्रॉस कॉन्व्हेंट विद्यालय मागे घेणार !

मुलांचे वैचारिक धर्मांतर करणार्‍या कॉन्व्हेंट शाळा आता देशद्रोही कृत्यातही पुढे !
पालक आणि स्थानिक यांच्या विरोधाचा परिणाम !
     जम्मू - आर्.एस्.पुरा सेक्टर येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल या ख्रिस्ती विद्यालयाने त्याच्या वह्यांवर भारत आणि पाकिस्तान यांचे झेंडे छापून त्यांचे वितरण केले होते; परंतु पालक आणि स्थानिक नागरिक यांंनी केलेल्या विरोधानंतर विद्यालयाने या वह्या मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी हरजीत सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली की, विद्यालय प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान यांचे झेंडे असलेल्या वह्या प्रकाशित करून त्यांचे वाटप केले आहे, अशी तक्रार आमच्याकडे स्थानिकांनी केली होती. 
     सिंह पुढे म्हणाले की, विद्यालयाच्या मुख्यध्यापकांनी आम्हाला कळवले आहे की, त्यांचा हेतू लोकांच्या भावना दुखावण्याचा नव्हता, तर या भागात शांतता प्रस्थापित करण्यास साहाय्य करण्याचा होता. आम्ही त्यांना सांगितले की शांतता प्रस्थापित करण्याचा हा मार्ग नाही. शाळेच्या मुख्याध्यांपकांनी त्यांची चूक मान्य केली असून या वह्यांचे प्रकाशन आणि वितरण त्वरित थांबवणार असल्याचे सांगितले आहे. (पोलिसांनी विद्यालयावर कारवाई करणेही अपेक्षित आहे. - संपादक)ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! (साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)हिंदूंनो, देश अराजकाच्या उंबरठ्यावर असतांना दिवाळी साधेपणाने साजरी करून पैसे धर्मजागृती व धर्मरक्षण यांसाठी वापरा !डॉ. आंबेडकर जयंतीची बळजोरीने वर्गणी मागणार्‍यावर गुन्हा नोंद

      सोलापूर - व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश पाठवून डॉ. आंबेडकर जयंतीची वर्गणी मागणार्‍यां विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी मंदा जोशी या महिलेने तक्रार नोंदवली केली आहे. मंदा जोशी यांचे तुळजापूर वेसमध्ये दुकान आहे. या दुकानात ७ ते ८ दिवसांपूर्वी एका तरुणाने येऊन तक्रार केली होती. त्यानंतर त्याच व्यक्तीने त्याच्याकडील भ्रमणभाषवरून जोशी यांचा मुलगा चेतन याच्या व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश पाठवून शिवीगाळ केली आणि आणि डॉ. आंबेडकर जयंतीची वर्गणी मागितली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घ्यावी लागणे लज्जास्पद ! - पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर

       पुणे, १७ एप्रिल (वार्ता.) - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे आपल्याला गणेशोत्सव, रामनवमी आदी आपले सण सार्वजनिकरित्या साजरे करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. अशा स्वातंत्र्यवीराला भारतरत्न मिळावा, यासाठी स्वाक्षरी मोहीम घ्यावी लागणे, हे आपल्यासाठी लज्जास्पद आहे. काँग्रेस शासनाकडून त्या संदर्भात अपेक्षा नव्हतीच; पण मोदी शासनसुद्धा त्याविषयी प्रयत्नशील नसल्याचे पाहून वाईट वाटते असा रोष ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केला. ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित पाडवा महोत्सव सांगता समारंभात बोलत होते.
कोल्हापूरला जे घडत आहे, 
ते चुकीचे आहे ! - हृदयनाथ मंगेशकर
      मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळावा, यासाठी तृप्ती देसाई यांच्याकडून केल्या जाणार्‍या आंदोलनाच्या संदर्भात ते म्हणाले, कोल्हापूरला जे घडत आहे, तेसुद्धा चुकीचे आहे. सर्व काही प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केले जात आहे. आतापर्यंत ज्या परंपरा पाळल्या जात होत्या त्या चांगल्या आणि योग्य आहेत. या वेळी त्यांनी भावसरगम हा गीतांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाची सांगता समर्थांनी लिहिलेल्या शिव-स्तुतीने झाली.

भित्तीचित्रातून होणारा श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीचा चुकीचा प्रसार थांबवला !

श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते 
करण परब यांची अभिनंदनीय कृती !
       मुंबई - काही दिवसांपूर्वी येथील अरेना अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूटच्या बाहेरील भिंतीवर क्राईम पॉल्युशन ही संकल्पना घेऊन भित्तीचित्र काढले होते. त्यात त्यांनी विविध माध्यमांतून प्रदूषण कसे होते हे दाखवले होते. त्या चित्रातील एका भागात पाण्याचे प्रदूषण हे गणेशमूर्तींच्या विसर्जनाने होते, असे दाखवण्यात आले होते.
        हे गणेशाचे होणारे विडंबन श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. करण परब यांनी कामावर जातांना पाहिले आणि त्याने त्वरित त्याच दिवशी अरेना अ‍ॅनिमेशन इनस्टिट्यूटमध्ये जाऊन हे तुम्ही काढलेले भित्तीचित्र चुकीचे आहे. श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा आणि पाण्याच्या प्रदूषणाचा काही संबंध नाही, असे सांगितले. तेव्हा तेथील कर्मचार्‍यांनी आमचे जे प्रमुख आहेत, ते आज उपस्थित नाहीत. त्यामुळे तुम्ही २ दिवसांनी या, असे त्याला सांगितले.

पाकचे बिनकामाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना विकण्याचे संकेतस्थळावर विज्ञापन !

भारतात अशा प्रकारचे विज्ञापन करायचे झाल्यास बिनकामाचे म्हणून 
बहुतांश राजकीय नेत्यांची नावे द्यावी लागतील !
     मुंबई - बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना विकणे आहे, असे विज्ञापन इबे या संकेतस्थळावर ऑनलाईन खरेदीसाठी ठेवण्यात आले आहे. नवाज शरीफ यांना ६२ लक्ष ४० सहस्त्र रुपयांना (६६ सहस्र २०० पौंड) विकणे आहे, असे या विज्ञापनात म्हटले आहे. तसेच शरीफ यांना विकत घेतल्यावर त्याचे वितरण भारतात करण्यात येणार नाही, असेही या विज्ञापनात म्हटले आहे. या विज्ञापनाची १० जणांकडून माहिती देखील मागवण्यात आली आहे. सध्या समाजिक संकेतस्थळावर या विज्ञापनाची चर्चा चालू आहे.मद्य आस्थापनांचे पाणी बंद करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे यांनी फेटाळली !

     बीड - दुष्काळग्रस्त मराठवाडा पाणीटंचाईचे हाल भोगत असतांना मद्य उद्योगांना केला जाणारा पाणीपुरवठा बंद करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात केली; मात्र त्यांच्या या मागणीचा ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे यांनी विरोध केला. त्या म्हणाल्या की, मद्य उद्योगधंद्यांना देण्यात येणारे पाणी हे आरक्षित केलेले असते. त्यांना दिले जाणारे पाणी जर पिण्याचे असेल, तर ते बंद करावे. मद्य उद्योग बंद पडले, तर उद्योजकांचे काही होणार नाही; पण आस्थापनातील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हे पाणी बंद करणे चुकीचे ठरेल.

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव (कर्नाटक), चेन्नई (तमिळनाडू) आणि कर्णावती (गुजरात) येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीनिमित्त बेळगाव येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेत ४ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी !
बेळगाव (कर्नाटक) 
शोभायात्रेत सहभागी झालेले हिंदू
    बेळगाव - शहरात रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन असणार्‍या या शोभायात्रेत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
    शोभायात्रेला बेळगावचे उपमहापौर श्री. संजय पाटील आणि नगरसेवक श्री. विजय भोसले हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच भाजपचे सर्वश्री किरण जाधव, अनिल बेनके, बजरंग दलाचे सर्वश्री विजय जाधव, हेमंत हावळ, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर आणि हरीष शानभाग उपस्थित होते.
     शोभायात्रेसाठी बेळगावातील होलसेल भाजी मार्केट युनियनच्या व्यापार्‍यांनी श्रीरामाची भव्य मूर्ती अर्पण केली.

फलक प्रसिद्धीकरता

सैन्यावर खोटे आरोप करणार्‍यांवर आता कारवाई होणार का ?
     काही नागरिकांनी हंदवाडा (काश्मीर) येथे एका मुलीच्या करण्यात आलेल्या छेडछाडीचे खापर भारतियांचे रक्षण करण्यास अहोरात्र झटणार्‍या सैन्यावर फोडले; परंतु पीडित मुलीने सैनिकांनी छेडछाड केलीच नसून ते निर्दोषच आहेत, अशी साक्ष न्यायालयात नोंदवली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmirme ladkiki chedkhani ke prakran me nyayalayme piditane aropi sainikoko nirdosh bataya.
Sainikopar jhoothe aarop laganewalopar kathor karvai ho !

जागो ! : कश्मीर में लडकी की छेडखानी के प्रकरण में न्यायालय में पीडिता ने आरोपी सैनिकों को निर्दोष बताया.
सैनिकों पर झूठे आरोप लगानेवालों पर कठोर कारवाई हो !


अयोध्येत राम मंदिराऐवजी श्रीराम मानवता भवन उभारण्याची आश्‍चर्यकारक मागणी !

अशी मागणी करणार्‍यांनी धर्मशास्त्र जाणून 
घ्यावे, धर्माचार्यांचे मार्गदर्शन घ्यावे ही अपेक्षा !
      पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १७ एप्रिल - भारतात हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, शीख, पारशी, बौद्ध, जैन या विविध धर्मियांमध्ये परस्पर सामंजस्य, प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना, शांती रहावी या उद्देशाने अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद येथील जागेवर राम मंदिराऐवजी सर्वधर्मसमावेशक विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यात यावे, अशी आश्‍चर्यकारक मागणी विश्‍वशांती गुरुकुलाचे प्रमुख डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी श्रीराम नवमीला केली. याविषयी पत्रकार परिषद पंढरपूर विश्रामगृह येथे पार पडली. सर्व माहिती डॉ. कराड यांचे प्रतिनिधी श्रीकांत देशमुख यांनी दिली. विश्‍वशांती आणि मानवी कल्याणासाठी समर्पित असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या वतीने ऑक्टोबर २०१० या वर्षी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाच्या अयोध्येतील श्ररामजन्मभूमी- बाबरी मशिदीच्या विषयाविषयी दिलेल्या निर्णयानंतर अयोध्या येथे एक सर्वमान्य आणि सर्वसमावेशक अशा विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाची उभारणी करावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, तसेच विश्‍व हिंदु परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल, शाही इमाम बुखारी आणि इतर पक्ष आणि संघटनांचे प्रमुख यांंच्या समोर हा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला होता.

गयाना येथील हिंदु विद्यालयाची धर्माचरण करण्याची शिकवण !

कुठे आपली हिंदु ओळख टिकवण्यासाठी कटीबद्ध असणारे सातासमुद्रापलीकडील विद्यालय, 
तर कुठे निधर्मी शिक्षणपद्धती अवलंबणारी लक्षावधी भारतीय विद्यालये !
     जॉर्जटाऊन (गयाना) - येथील पश्‍चिम किनारपट्टीपर असलेल्या डेमेरारा शहरातील सरस्वती विद्या निकेतन या हिंदु विद्यालयाचे ब्रिद वाक्य आहे - सत्यं वद । धर्मं चर अर्थात खरे बोला, धर्माचरण करा ! या विद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाचे दिवाळी, रामनवमी, व्यास पौर्णिमा आणि ग्रीष्म या ४ भागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. हे विद्यालय १५ मुख्य विषयांव्यतिरिक्त हिंदु संस्कृती, भरतनाट्यम्, कथ्थक आणि वेद हे विषयही शिकवते. या विद्यालयाची स्थापना वर्ष १९९८ मध्ये करण्यात आली होती. 
     स्वामी अक्षरानंद हे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासोबतच हे विद्यालय विद्यार्थ्यांना करुणा, निर्भयता, सत्य आणि क्षमाशीलता ही मानवी मूल्ये आत्मसात करायला शिकवते.

इस्लाममध्ये महिलांची स्थिती पादत्राणांसारखी !

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचे वक्तव्य
     उन्नाव - इस्लाममध्ये महिलांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचा पादत्राणांसारखा वापर केला जातो. आवश्यक असेल, तेव्हा घालायच्या आणि नंतर बाहेर काढून ठेवायच्या, अशी त्यांची स्थिती आहे. याकडेही शासन आणि न्यायालय यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी केवळ हिदूंनाच लक्ष्य केले जाणे योग्य नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.
     खासदार साक्षी महाराज म्हणाले, इस्लाममध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार मिळाले पाहिजे. केवळ हिंदूंच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणार्‍या न्यायालयाने इस्लामच्या प्रकरणांमध्येही थोडे लक्ष घातले पाहिजे. हा देश राज्यघटनेनुसार चालेल, कोणाच्या फतव्यांनी चालणार नाही. आता गुडगाव गुरुग्राम म्हणून, तर मेवात नूंह म्हणून ओळखले जाणार !

हरियाणा शासनाप्रमाणे इतरही राज्यांनी त्यांच्या शहरांची असलेली वादग्रस्त 
नावे त्यागून मूळ नावे धारण करण्यास पावले उचलावी !
हरियाणा शासनाकडून दोन शहरांचे नामकरण
     चंदीगढ - हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर शासनाने गुडगाव जिल्ह्याचे नाव पालटून गुरुग्राम केले असून मेवात या शहराचे नावही पालटण्याच्या निर्णयालाही संमती दिली आहे. त्यामुळे आता मेवात हे नूंह या नावाने ओळखले जाणार आहे. गुरुग्रामसाठी खट्टर शासनाने महाभारताचा संदर्भ दिला. गुडगावचे नाव गुरुग्राम करण्याची मागणी फार पूर्वीपासून लोक करत आले आहेत.

मेहसाणा (गुजरात) येथे पाटीदार आंदोलनाला हिंसक वळण : संचारबंदी लागू

      मेहसाणा (गुजरात) - राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात असणारे पाटीदार आंदोलनाचा प्रमुख हार्दीक पटेल यांच्या सुटकेची मागणी करत १७ एप्रिलला पाटीदार समाजाने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर मेहसाणा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी आतापर्यंत ४३५ हून अधिक आंदोलकांना अटक केली आहे. पुढील २४ घंट्यांसाठी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कर्णावती आणि सूरत येथेही पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हार्दीक पटेल यांच्या सुटकेसाठी पाटीदार समाजाने जेल भरो आंदोलन चालू केले आहे.

धर्मांधाशी विवाह केल्यानंतर हिंदु युवतीचा घरातील धर्मांधांकडून छळ, पोलिसांकडे तक्रार

       नांदेड, १७ एप्रिल - येथील एका धर्मांधाशी लग्न झालेल्या हिंदु युवतीने घरातील धर्मांधांकडून हुंडा मागून छळ केला जात असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांकडे प्रविष्ट केली आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदु युवती धर्मांधांच्या आमिषाला बळी पडतात. अशा धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) ही युवती सध्या तिच्या आई-वडिलांसमवेत रहाते.
१. त्या हिंदु युवतीने आदील अब्दुल कादर या युवकाशी लग्न केले.
२. लग्न करतांना युवतीकडून उर्दूमध्ये लिहिलेल्या अनेक कागदपत्रांवर आणि कोर्‍या कागदांवर स्वाक्षर्‍या घेतल्या. तिचे त्या धर्मांधाशी असलेले प्रेमप्रकरण सर्वांना माहिती झालेले असल्याने तिला वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात होत्या.
३. पोलीस आणि न्यायालय यांच्यासमक्ष काही म्हटलीस, तर तुझ्या आई-वडिलांचे तुकडे पाडू, अशी धमकी दिली.

समीर गायकवाड यांची सी.बी.आय.कडून दुसर्‍यांदा चौकशी !

      कोल्हापूर, १७ एप्रिल - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय.च्या) पथकाने कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणातील संशयित सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांची १५ एप्रिल या दिवशी कळंबा कारागृहात दुसर्‍यांदा चौकशी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कर्नाटक येथील साहित्यिक कलबुर्गी आणि कॉ. पानसरे या तिघांच्याही हत्येत साम्य असल्याचा कयास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर समीर यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते.

तमिळनाडू जिहादी आतंकवादाच्या विळख्यात !

हिंदू मुन्नानीकडून आतंकवादाच्या विरोधात अनुबोधपटाची निर्मिती
     तमिळनाडू राज्यात गेली ३० वर्षे इस्लामी आतंकवाद्यांचा हैदोस चालू आहे. गेल्या काही वर्षांत तर त्याला बरेच उधाण आले आहे. आतापर्यंत १३४ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर शेकडो हिंदू आक्रमणात घायाळ झाले आहेत. तमिळनाडूतील हिंदू मुन्नानी या हिंदुत्ववादी संघटनेने आतापर्यंत २१ जिल्ह्यांत घडलेल्या ३०० घटनांवर एका अनुबोधपटाची निर्मिती केली आहे.
      या बोधपटात जिहाद्यांनी केलेल्या हत्या आणि आक्रमणे, मंदिरांवरील आक्रमणे, लव्ह जिहादद्वारे हिंदु युवतींची करण्यात येणारी फसवणूक, हिंदूंच्या व्यवसायांवर करण्यात येणारे आघात, हिंदूंच्या उत्सवात आणि धार्मिक मिरवणुकीत अडथळे निर्माण करणे, गोहत्या, राष्ट्रीय चिन्हांचा केला जाणारा अवमान, पाकिस्तानधार्जिण्या मोहिमा, इसिससारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध, शस्त्रास्त्रांची तस्करी, बनावट चलनाचे वितरण, विदेशी नागरिकांच्या घुसखोरीला साहाय्य, पोलीस ठाणे आणि अधिकारी यांच्यावरील आक्रमणे इत्यादींचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे.

बस्स झाले मंदिर प्रवेशाचे वाद !

     गेल्या काही मासांपासून राज्यात मंदिर प्रवेशाचे वाद विनाकारण चालू आहेत. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्‍वर, कोल्हापूरची महालक्ष्मी यांपैकी सर्वच मंदिरात महिलांना दर्शनासाठी प्रवेश आहे. कुठेही बंदी नाही. महाराष्ट्रात सर्वच मंदिरात महिलांना दर्शनासाठी प्रवेश आहे. अमुक एका मंदिरात महिलांना दर्शनासाठी प्रवेश नाही, असे ऐकिवात नाही. देवस्थान समित्यांनीही महिलांना दर्शनासाठी प्रवेश नाकारलेला नाही. मग कधी नव्हे ते वाद आताच का उपस्थित व्हावेत ? महिलांच्या प्रवेशाचे निमित्त करून काही महिला प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडत आहेत, तर काही राजकीय पक्ष त्याचे राजकारण करून राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करतांना दिसत आहेत. शासनही ठामपणे भूमिका मांडतांना दिसत नाही.

धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांनी साकारलेल्या लव्ह जिहादच्या देखाव्याला प्रथम पारितोषिक

      यवतमाळ - येथील रामजन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण वर्गातील कृतीशील धर्माभिमान्यांनी लव्ह जिहादचा प्रबोधनात्मक देखावा सादर केला. या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला. या देखाव्यात लव्ह जिहादपासून स्वत:ला वाचवायचे असेल, तर हिंदु तरुणीने रणरागिणी झाशीची राणी बनावे असा संदेश देण्यात आला. रामनवमी उत्सव मंडळ, शारदा चौक, यवतमाळच्या वतीने हा देखावा सादर करण्यात आला होता. या शोभायात्रेत शंभराहून अधिक मंडळे प्रबोधनात्मक देखावे सादर करतात.

संभाजीनगर येथील मद्यनिर्मिती उद्योगांना २० प्रतिशत पाणीकपात

उशिरा सुचलेले शहाणपण !
       संभाजीनगर, १७ एप्रिल - मराठवाड्यातील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत येथील औद्योगिक वसाहतींमधील मद्य आणि बिअर यांच्या निर्मितीसाठी कारखान्यांना दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी १६ एप्रिल या दिवशी केली होती. ही मागणी होताच विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी तातडीची बैठक बोलावून मद्यनिर्मिती उद्योगांसाठी २० प्रतिशत पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्याचसमवेत सर्वच उद्योगांनाही १० प्रतिशत पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. (राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतांना हा निर्णय इतका उशिरा का घेतला ? प्यायला पाणी नाही; पण मद्य जरूर प्या, असे करून जनतेला मद्यपी बनवायचे आहे का ? जनतेला पाण्याची आवश्यकता आहे कि मद्याची, हे प्रशासनाच्या लक्षात येत नाही का ? - संपादक)

योगी अरविंद यांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र !

योगी अरविंद
     डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी संशोधन केंद्राचे अध्यक्ष श्री. आनिर्बन गांगुली यांनी पायोनिअर वृत्तपत्राच्या १३ एप्रिल २०१६ च्या अंकात योगी अरविंद यांच्यावर एक प्रदीर्घ लेख लिहून त्यांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र कसे असायला हवे, याचे मार्मिक विश्‍लेषण केले आहे. त्यातील काही अंश संक्षिप्त स्वरूपात देत आहोत.
आंतरराष्ट्रीयवाद हा निराधार नसून त्याला 
सनातन धर्माने व्यापले आहे !
    योगी अरविंद यांच्या संकल्पनेतील भारतात तथाकथित धर्मनिरपेक्षता, मतपेटीचे राजकारण आणि भारतीय संस्कृतीचा परित्याग यांना थारा नव्हता. योगी अरविंद तात्त्विकदृष्ट्या अंतरराष्ट्रीयवादाचे पुरस्कर्ते होते; मात्र त्यांच्या दृष्टीने अंतरराष्ट्रीयवाद हा पोकळ विश्‍वबंधुत्वाचा नव्हे तर सनातन धर्मानुसार होता.

दुष्काळग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी प्रेरणा देण्याची आवश्यकता !

श्री. भाऊ तोरसेकर
     गेले दोन-चार दिवस सतत लातूरच्या पाणी टंचाईने राष्ट्रीय माध्यमांचा आसमंत गुंजतो आहे; पण यापैकी किती जणांना लातूर नेमके कुठे आहे आणि तिथे नागरिक आजवर कसे पाणी मिळवतात, याची माहिती आहे ? आज असा कल्लोळ चालू आहे की, जणू दोन मासांपूर्वी तिथे छानपैकी पाणी मिळत असावे आणि आताच अकस्मात तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळा सोडला, तर कधी आठवड्यात प्रतिदिन पाणीपुरवठा होत नाही, असे बहुधा देशातील हे एकमेव महानगर असावे. ज्याला कायद्याने महानगर म्हणून घोषित केले आहे; पण व्यवहारात एक गाववजा विस्तारलेली बकाल वस्ती अशी लातूरची अवस्था आहे. शहर म्हणायला तिथे कुठला उद्योग नाही कि मोठी बाजारपेठ नाही. गेल्या काही वर्षांत शिक्षणाची एक मोठी बाजारपेठ इथे उभी राहिली आहे. लातूर म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे गाव आहे. तेच लातूर म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला होय. अशा या महानगराची अवस्था अकस्मात अशी झालेली नाही किंवा मराठवाड्याचे दुर्दैव कुणाच्या शापवाणीने आडवे आलेले नाही. कायम दुष्काळाच्या आणि मागासलेपणाच्या फेर्‍यांत फसलेल्या प्रदेशाला मराठवाडा म्हणतात. ज्याने राज्याला चार मुख्यमंत्री दिले, तोच हा मराठवाडा !

देहली येथील भूकंपाच्या वेळी आलेला अनुभव

      देहली येथे १० एप्रिल २०१६ या दिवशी दुपारी ४ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्या वेळी सेवाकेंद्रामध्ये असलेली ग्रंथांची लोखंडी मांडणी (रॅक), पंखे आणि स्टॅण्ड हलत होते. ध्यानमंदिराच्या आगाशीमध्ये उभे राहिल्यावर संपूर्ण इमारतच हलत असल्याचे लक्षात आले. प्रारंभी ३० सेकंदामध्ये धक्के अतिशय तीव्र होते; मात्र नंतर ते हळूहळू न्यून झाले. जवळपास ५ मिनिटापर्यंत सर्व हलत होते. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे साधक स्थिर होते. या वेळी मनात निसर्गदेवतेचा नामजप चालू होता. भूकंपाचे धक्के बसायचे थांबल्यावर कृतज्ञता व्यक्त झाली.
देहली सेवाकेंद्रातील ३ साधिकांना भूकंपाविषयी पूर्वसूचना मिळणे 
१. एका साधिकेला २-३ दिवसांपूर्वी भूकंप होेत असल्याचे स्वप्न पडले होते.
२. एका साधिकेला भूकंपाच्या १ दिवसापूर्वीच भूकंप होत असल्याचे वाटले.
३. एका साधिकेला १० एप्रिल २०१६ या दिवशी आधीच भूकंप होत आहे, असे वाटले आणि त्याच दिवशी दुपारी ४ वाजता भूकंप झाला. 
- कु. मनिषा माहूर, देहली

हिंदु समाजाने अंकुशाप्रमाणे काम करून योग्य काम करण्यासाठी शासनावरही दबाव आणणे आवश्यक !

     काही लोक शासनावर दबाव आणतात. हिंदु समाजात एवढी शक्ती नाही का की, ते नरेंद्र मोदींवर दबाव आणू शकतील ? भाजपवर दबाव आणू शकतील ? हिंदु समाजाला एका अंकुशाप्रमाणे काम करावे लागेल. अंकुश अगदी लहानसा असतो; पण त्याने हत्तीला २ वेळा टोचल्यास तो व्यवस्थित चालू लागतो. याच पद्धतीने समाजाने अंकुश बनून या शासनावर दबाव आणला पाहिजे, तरच हे नरेंद्र मोदी शासन, भाजपचे शासन योग्य काम करू शकेल; अन्यथा ते धर्मनिरपेक्ष (निधर्मी) लोकांच्या दबावाखाली येऊन भरकटेल.
गाय खाणार्‍या व्यक्तीची देशात सगळीकडे चर्चा; पण गाय वाचवणार्‍याची हत्या ! 
     कर्नाटकात प्रशांत पुजारी यांची हत्या झाली. ते गोरक्षक होते. कुठल्या प्रसारमाध्यमाने ही बातमी दाखवली ? कोणीच दाखवत नाही. त्याच वेळी दादरी येथे अकलाखची हत्या झाली होती. एक होता गाय वाचवणारा आणि दुसरा होता गाय खाणारा ! गाय खाणार्‍या व्यक्तीची संपूर्ण देशात चर्चा होते; पण गाय वाचवणार्‍याची कोणी साधी नोंदही घेतली नाही. 
- श्री. विष्णु गुप्ता, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु सेना.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षाचे दायित्व लीलया सांभाळणार्‍या कु. रेखा काणकोणकर संतपदी विराजमान !

श्रीरामनवमी दिवशी 
मिळाली ना तुम्हाला गोड बातमी ?
       या अपूर्व क्षणांचे आणि ते अनुभवतांना साधकांच्या झालेल्या भावस्थितीचे वर्णन !
आयुष्यरेखेतून भाग्योदय झाला ।
तिच्या जीवनाला गुरूंचा परिसस्पर्श झाला ॥ १ ॥
अन्नपूर्णादेवीच्या आशीर्वादातून ।
जीवनरस चैतन्यमय झाला ॥ २ ॥
आणि या रसातूनच ।
मिष्टान्न सेवण्याचा दिवस तो आज आला ॥ ३ ॥
पू. (कु.) रेखाताईंच्या गोड बातमीने रसना मधाळ झाली ।
सर्वांचीच नयनांची कोंदणे भावआसवांनी भिजली ॥ ४ ॥
- पू. (सौ.) अंजली गाडगीळ (१५.४.२०१६)
-------------------------------
पू. रेखाताईमधूनी 
अन्नपूर्णा देवीतत्त्व विलसते ! 
कु. दीपाली मतकर
       सध्या सोलापूर येथे सेवारत असणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर हिने पू. रेखाताई संतपदी आरुढ झाल्यावर केलेले हृद्य काव्य पुढे देत आहे.
पू. रेखाताईंच्या रूपे भर पडली संतांच्या मांदियाळीत ।
अन् सनातन गोकुळातील गोप-गोपी भिजले भावानंदात ॥

रामनाथीतील आनंद सागराच्या लाटा सोलापूरातही आल्या ।
अन् या वाळवंट भूमीला आनंदे भिजवूनी गेल्या ॥ १ ॥
रामनाथी आश्रमी पू. बिंदाताईंच्या (टीप १) रूपे महालक्ष्मी वसत असे ।
पू. गाडगीळकाकू (टीप २) म्हणजे साक्षात् सरस्वती देवीचेच रूप भासे ।
पू. रेखाताईमधूनी अन्नपूर्णा देवीतत्त्व विलसत असे ॥ २ ॥
अन्नपूर्णा कक्षातील प्रेमळ आमची ताई ।
संतपदी विराजमान जाहली ॥ ३ ॥
टीप १ - सनातनच्या ३० व्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
टीप २ - सनातनच्या ३३ व्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ
- कु. दीपाली मतकर (१५.४.२०१६)
-------------------------------
कु. रेखा काणकोणकर (रेखाताई) 
संत होण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना
तोंडवळ्यावर तेज जाणवून लवकरच 
रेखाताई संतपद गाठणार, असे मनात येणे
        जून २०१५ पासून मला रामनाथी आश्रमात कु. रेखाताईंसमवेत त्यांच्या खोलीत रहाण्याची संधी मिळाली. गेल्या दोन मासांपासून कु. रेखाताईंकडे पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडवळ्यावर तेज जाणवायचे. त्यांच्याशी बोलतांना किंवा त्यांच्यासमवेत खोलीत वावरतांना लवकरच त्या संतपद गाठणार, असे वाटायचे.
       काल १४.४.२०१६ च्या रात्री आम्ही दोघी खोलीत बोलत असतांना त्यांची एक सुंदरशी साडी दोरीवर दिसली. मी त्यांना म्हटले, या वेळी तुमची रामनवमीची सिद्धता आधीच झालेली दिसते. यावर काही न बोलता ताई केवळ हसल्या. आज सकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास ध्वनीचित्रीकरण विभागात सेवा करणारी एक साधिका कु. रेखाताईंच्या साड्यांची पिशवी घेऊन आली आणि चित्रीकरणासाठी त्या नेल्या होत्या, असे म्हणाली. त्या वेळी श्रीरामाने त्या साधिकेच्या माध्यमातून कु. रेखाताईंच्या प्रगतीविषयी माझ्या मनात येणार्‍या विचारांवर शिक्कामोर्तब केले.
- श्रीमती वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०१६)

प.पू. डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने 
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १२ ते 
१६ एप्रिल २०१६ या कालावधीत आयोजित केलेली कार्यशाळा !
    महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेतील साधकांसाठी १५.४.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांची भेट आयोजित करण्यात आली. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. श्री. आन्द्रियस क्लिरॉनमस, न्यूयॉर्क
१ अ. ताणामुळे घट्ट असलेल्या मुठी आश्रमाच्या ३ दिवसांच्या वास्तव्यात काही प्रमाणात उघडणे आणि प.पू. डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी मुठी पूर्णपणे उघडून आतून मोकळे झाल्याप्रमाणे वाटणे : श्री. आन्द्रियस क्लिरॉनमस कायरो या उपचार पद्धतीचे व्यावसायिक आहेत. त्यांना देवाकडे जाण्याची ओढ होती; परंतु त्यांना आतून बंद असल्याप्रमाणे वाटत असल्याने ते मानसिक ताणाखाली असत. ताणामुळे त्यांच्या मुठी घट्ट आवळलेल्या असायच्या. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्यांना जडपणा जाणवून काहीच सुचत नसे. आश्रमातील ३ दिवसांच्या वास्तव्यात त्यांना स्वतःमध्ये काही प्रमाणात पालट झाल्याचे जाणवले. हळूहळू त्यांना आरामदायी जाणवू लागले आणि त्यांच्या मुठीही काही प्रमाणात उघडल्या. प.पू. डॉक्टरांची भेट झाल्यावर त्यांच्या मुठी पूर्णपणे उघडल्या आणि त्यांना आतून मोकळे झाल्याप्रमाणेही वाटले.
१ आ. तोंडवळ्यात पालट झाल्याचे जाणवणे : कार्यशाळेत सहभागी असलेले इतर साधक आणि कार्यशाळा घेणारे साधक यांनाही श्री. आन्द्रियस यांच्या तोंडवळ्यात पालट झाल्याचे जाणवले. पूर्वीच्या तुलनेत त्यांचा तोंडवळा कोमल झाला होता.

स्वतःचा साधनामार्ग ओळखून त्याप्रमाणे मार्गक्रमण करून आनंद मिळवण्यासाठी ईश्‍वराने पदोपदी साहाय्य केल्याची आलेली अनुभूती

सौ. मधुरा कर्वे
१. आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करण्याची संधी मिळाल्यावरही शारीरिक त्रासांमुळे घरी जावे लागणे : गुरुकृपेने २०१२ ते २०१४ या ३ वर्षांच्या कालावधीत मला तीन वेळा रामनाथी आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करण्याची सुसंधी मिळाली; परंतु प्रत्येक वेळी साधारण १ ते दीड मासाने (महिन्याने) माझी शारीरिक स्थिती इतकी बिघडायची की, मला नाइलाजाने पुण्याला घरी परतावे लागे. तेव्हा वाईट वाटत असे. असे का होत आहे ?, ते समजणे बुद्धीपलीकडील आहे, हे लक्षात आले.
२. आश्रमात रहात असतांना यजमानांच्या काळजीमुळे आजारी पडत असल्याने गुरुसेवा न करता पतीसेवा करण्यास नाडीपट्टीत सांगितलेले असणे : एक दिवस काही सेवेनिमित्त यजमानांसह नाडीकेंद्रात जायचा योग आला. त्या वेळी मनात एकाएकी महर्षींना प्रश्‍न विचारूया, असा विचार आला. त्याप्रमाणे सेवा पूर्ण झाल्यानंतर मी नाडीपट्टीवाचक श्री. मुदलियारगुरुजी यांना माझी अडचण सांगितली आणि मी प्रश्‍न विचारू का ?, असे त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ताई, ही देवाचीच इच्छा आहे. तुम्ही प्रश्‍न विचारा. मी कवड्या टाकून माझा प्रश्‍न विचारला. तेव्हा गुरुजींनी पट्टी बघून माझ्या प्रश्‍नाचे उत्तर वाचण्यास आरंभ केला. त्यात महर्षींनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे, आश्रमात रहावे, गुरूंची सेवा करावी, चांगली साधना करावी, असे तुमच्या मनात आहे; परंतु तुम्ही आश्रमात गेला की, तुम्हाला यजमानांची काळजी वाटते आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडता. प्रत्येक वेळी तुम्ही आश्रमात गेलात की, तुमचे यजमानही आजारी पडतात. त्यामुळे तुम्ही पतीसेवा करा. गुरुसेवा करू नका. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि काय करावे ?, हे मला कळेना. पतीला गुरु मानून साधना चालू ठेवूया कि अजून काही करूया ?, हे काही कळेना. मी तिसर्‍यांदा पुण्याला परत आले होते आणि त्यामुळे मला कळून चुकले की, मी पतीला सोडून साधना करू शकत नाही.

साधकांनो, प.पू. गुरुदेवांनी सांगितलेले उपाय म्हणजे संभाव्य आपत्काळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

       सध्या आपत्काळ अतिशय समीप आला आहे. असे असतांनाही प्रसार, तसेच आश्रम यांमधील बरेच साधक आध्यात्मिक उपाय पूर्ण करत नाहीत, असे लक्षात आले आहे. उपायांच्या संदर्भात साधकांकडून होणार्‍या चुका, उपाय न केल्याने वाढणारे साधकांचे त्रास, तसेच उपायांचे अनन्यसाधारण महत्त्व यांविषयीची माहिती पुढे देत आहे.
१. साधकांमध्ये उपायांविषयी गांभीर्य 
नसल्याने त्यांच्याकडून होणार्‍या चुका
अ. प्रतिदिन काही घंटे बसून नामजप करण्यास सांगितले असल्यास तो न करणे
आ. उपायांचा वेळ अनावश्यक काहीतरी करण्यामध्ये वाया घालवणे आणि त्यामुळे साधनेतील वेळही वाया जाणे
इ. आपल्याला आध्यात्मिक त्रास होत आहे, हे लक्षात येऊनही त्यावर त्वरित आध्यात्मिक उपाय न करणे
ई. आध्यात्मिक कारणांनी होणार्‍या त्रासामुळे मनात नकारात्मक विचार आल्यास अधिकाधिक उपाय न करता झोपून रहाणे

प.पू. पांडे महाराज यांचे मार्गदर्शन

प.पू. पांडे महाराज
लेपन आणि रासायनिक प्रक्रिया यांमुळे त्वचा दूषित 
होण्याचा संभव असतो अन् चैतन्यापासून वंचित रहातो !
       माझा चेहरा कसा आहे ? तो स्वच्छ करण्यासाठी मी सौंदर्यवर्धनालयात (ब्युटीपार्लर) मध्ये जातो. म्हणजे माझे विचार हे आवरणाशी लिप्त झाल्याने मी चैतन्यापासून वंचित होतो. या कातडीवर जे जिवंतपणाचे लक्षण दिसते, तसेच या डोळ्यांत जो जिवंतपणा दिसतो, तो माझ्यातील चैतन्याचा आविष्कारच आहे. ते चैतन्य साधनेद्वारे वाढवल्यास त्याचा परिणाम बाहेरील त्वचेवर दिसेल आणि ती त्वचा तेजःपुंज होऊन सर्वांना आकर्षित करील. असे असतांना आम्ही पैसे देऊन सौंदर्यवर्धनालयात जाऊन लेपन करून घेणे, त्यावर दुसर्‍यांना आकर्षित करण्यासाठी रंगरंगोटी करणे, याला शहाणपणा म्हणता येईल का ? कारण अशा लेपनामुळे आणि रासायनिक प्रक्रियेमुळे त्वचा उलट दूषित होऊन निरनिराळ्या व्याधी जडण्याचा संभव अधिक असतो.

साधकांनो, स्वतःभोवती मानस नामजपाची पेटी बनवून त्या पेटीत झोपा !

पू. राजेंद्र शिंदे
       बर्‍याच साधकांना सकाळी झोपेतून उठल्यावर विविध प्रकारचे त्रास होतात. अशा प्रकारचे त्रास होत असलेल्या साधकांनी आणि अन्य साधकांनीही रात्री झोपण्यापूर्वी मानस नामजपाची पेटी बनवून त्या पेटीत झोपल्यावर त्यांच्या विविध प्रकारच्या त्रासांचे प्रमाण बरेच उणावत असल्याचे लक्षात आले आहे.
१. मानस नामजपाची 
पेटी बनवण्याची पद्धत
अ. अंथरुणावर पडल्यावर आपण एका पेटीत आहोत आणि ही पेटी अंथरुणाच्या लांबी-रूंदीची अन् २ - ३ फूट उंचीची आहे, अशी कल्पना करावी.
आ. आरंभी या पेटीच्या खालच्या बाजूवर, म्हणजे अंथरुणावर डोक्यापासून आरंभ करून पायांपर्यंत मानस नामजप लिहावा.
इ. नंतर पेटीच्या डोक्याकडील बाजूवर वरून खालपर्यंत (अंथरुणाच्या दिशेने) नामजप लिहीत यावे.
ई. पेटीच्या पायांकडील बाजूवर डोक्याकडील बाजूवर लिहिल्याप्रमाणेच नामजप लिहावा.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !

साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !
     पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे
४. अन्य : आश्रमात येणार्‍यांचे आदरातिथ्य करणे आणि महाराज मौनव्रतात आहेत, याची त्यांना कल्पना देणे, प.पू. दास महाराजांना वेळेवर औषधे देणे, भोजन देणे, मर्दन (मालिश) करणे, पू. (सौ.) माईंना स्वयंपाकघरात साहाय्य करणे, मंडईत जाऊन आवश्यक साहित्य आणणे
     साधक स्वतःच्या सोयीनुसार शक्य तेवढे दिवस सेवेत सहभागी होऊ शकतात. जे साधक ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पुढील माहिती पाठवावी.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
      देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

साधकांना सूचना

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
      सनातन-निर्मित ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
      समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे एका लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
      जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
--------------------------------
विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात 
साधकांची तातडीने आवश्यकता !
        वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
      जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

संत आणि गुरु यांतील भेद

१. संत : संत व्यष्टी साधना करतात, म्हणजे स्वतःच्या साधनेकडे लक्ष देतात आणि भक्तांच्या व्यावहारिक समस्या सोडवतात.
२. गुरु : गुरु समष्टी साधना करतात, म्हणजे स्वतःच्या साधनेसमवेत आणि इतरांकडूनही आध्यात्मिक प्रगती व्हावी; म्हणून साधना करवून घेतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरा शिष्य
रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच 
शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
भावार्थ :
शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     एका कपाटात किती सामान मावेल, याचा विचार सर्वसाधारण व्यक्ती करते; पण देशात किती कोटी मानव सुखाने राहू शकतील, त्यांना पुरेसे अन्न-पाणी मिळेल, याचा विचार न करणार्‍या आतापर्यंतच्या शासनांमुळे देशाची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी ३५ कोटी होती. ती आता १२५ कोटींहून अधिक झाली आहे. हे सर्व सुधारण्यासाठी आता हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावरील श्रद्धा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वरावरील श्रद्धा म्हणते, हे कार्य देवच करू शकतो. त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, देव हे करीलच !; पण परमेश्‍वरावरील परमश्रद्धा म्हणते, हे काम झालेच आहे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

झळा या लागल्या जिवा !

     देशात वैशाख वणव्याचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील २५ पेक्षा अधिक शहरांत तापमानाने चाळीशी पार केली आहे. उष्णतेच्या झळांनी आतापर्यंत देशात ७५ जणांचा बळी गेला आहे. उन्हाळ्याचे अजून पावणे दोन मास (महिने) बाकी आहेत. मान्सून देशात सर्वत्र वेळेत चालू होतोच, असेही नाही. त्यामुळे या कालावधीत वाढ होऊ शकते. ही स्थिती आजची नाही, तर गेली अनेक वर्षे देशात उन्हाळा तापू लागला आहे. अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती नेहमीची झाली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn