Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भाग्यनगर येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत हिंदूसंघटनाचा आविष्कार !

भाजपचे आमदार टी. राजासिंह यांच्या नेतृत्वाखालील
शोभायात्रेत १ लाखाहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग ! 
शोभायात्रेत सहभागी झालेला हिंदु जनसमुदाय
      भाग्यनगर (हैद्राबाद) - प्रतिवर्षीप्रमाणे १५ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त येथील जुन्या शहरातून हिंदूंची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत १ लाख हिंदूंनी सहभाग घेऊन हिंदुसंघटनाचा आविष्कारच घडवला. प्रखर हिंदुत्ववादी तथा तेलंगणाचे भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्रीराम युवासेनेने या शोभायात्रेचे आयोजन केले होते.
     या वेळी मुख्य अतिथींच्या रूपात उत्तरप्रदेशचे भाजपचे खासदार साक्षी महाराज आणि साध्वी प्राची उपस्थित होत्या. शोभायात्रेच्या आरंभी टी. राजासिंह म्हणाले, आपल्याला एक ना एक दिवस मरायचेच आहे; परंतु आपल्याला हे निश्‍चित करावे लागेल की, भारताच्या सीमेवर मरायचे, राष्ट्रासाठी मरायचे कि धर्मासाठी मरायचे ?
१. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही शोभायात्रेच्या मार्गावर येणार्‍या ३ मशिदींना कोणती हानी पोहोचू नये, या उद्देशाने कडक बंदोबस्तात त्यांना झाकून ठेवण्यात आले होते.
२. शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी तंबू लावण्यात आले.

(म्हणे) राष्ट्रीय कला केंद्राची पुनर्रचना हे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे पाऊल !

रशिया आणि चीन यांच्याप्रमाणे देशात साम्यवादी विचारांचे क्रूर 
शासन आणण्याचा प्रयत्न करणार्‍या साम्यवाद्यांचा थयथयाट !
साम्यवादी नेते सीताराम येच्युरी यांचा हिंदुद्वेष
     कोलकाता - केंद्रशासनाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राची पुनर्रचना करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे, अशी टीका माकपचे महासचिव सीताराम येच्युरी यांनी केली आहे. (केंद्र अथवा राज्य शासनात पालट झाल्यावर नवीन शासनाने त्यांच्या आधिपत्याखालील सर्व समित्यांची पुनर्रचना करणे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे येच्युरी यांना ज्ञात नाही का ? - संपादक)      येच्युरी म्हणाले की, विविध समित्यांची पुनर्रचना करणे म्हणजे मोदी शासन आणि संघ यांनी लोकशाहीचा ढाचा पालटून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केलेले कृत्य आहे. त्यांना हिंदु धर्माचे पौराणिक आणि धार्मिक तत्त्वज्ञान देशावर थोपवायचे आहे. (देशातील विस्कटलेली सामाजिक घडी बसवण्यासाठी पंतप्रधान काही योजना आखत असतील, तर त्यावर एवढा पोटशूळ का उठतो ? - संपादक) मोदी शासनाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राची पुनर्रचना करून त्यावर माजी राजदूत चिन्मय घरेखान यांच्याऐवजी प्रख्यात पत्रकार रामबहादूर राय यांची नेमणूक केली आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! - भवानीसिंह राजावत, आमदार, भाजप

यासाठी राजावत हे स्वतःच्या पक्षावर दबाव निर्माण करतील का ?
      नवी देहली - राज्यघटना बनवतांना चूक करण्यात आली आहे. त्या वेळेस भारताला हिंदु राष्ट्र घोषित करायला हवे होते, असे विधान राजस्थानच्या लाडपुरा येथील भाजपचे आमदार भवानीसिंह राजावत यांनी केले आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य कृष्ण, तर राहुल गांधी अन् आझम खान कौरव !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या फलकातून भगवान श्रीकृष्णाचे विडंबन
      नवी देहली / लक्ष्मणपुरी (लखनौ) - भाजपचे वाराणसी येथील नेते राहुल पांडे यांनी राज्याचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांच्या पहिल्या वाराणसी दौर्‍याच्या निमित्ताने फलक लावला आहे. यात स्वतःच्या छायाचित्रासह महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग रेखाटला आहे. यात उत्तरप्रदेशला द्रौपदी दाखवण्यात आले आहे, तर राहुल गांधी, आझम खान, अखिलेश यादव, मायावती आणि ओवैसी यांना कौरव दाखवण्यात आले आहे. या वेळी केवश प्रसाद मौर्य उत्तप्रदेशरूपी द्रौपदीचे रक्षण करणारे कृष्ण दाखवण्यात आले आहे. या फलकामुळे वाद निर्माण झाला आहे. सामाजिक संकेतस्थळांवरून यावर टीका होत आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी या फलकाशी त्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. (मौर्य यांनी फलकाशी त्यांचा संबंध नाही, असे म्हटले असले, तरी त्यांच्या पक्षाच्या नेत्याने तो लावला असल्याने आणि मौर्य स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक)

पठाणकोट आक्रमणाचा बदला घेऊ ! - संरक्षणमंत्री

संरक्षणमंत्र्यांनी याविषयी केवळ भाष्य न करता कृती करणे अपेक्षित !
      पनवेल - पठाणकोटचा बदला योग्य वेळी घेतला जाईल, अशी चेतावणी केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांनी दिली. पनवेल येथे माजी सैनिकांनी आयोजित केलेेल्या कृतज्ञता सोहळ्यात श्री. पर्रीकर बोलत होते. माजी सैनिकांसाठी असलेल्या एक श्रेणी एक निवृत्तीवेतन (वन रँक वन पेन्शन) या ४२ वर्षांपासून रखडलेल्या योजनेची शासनाने कार्यवाही केल्याने माजी सैनिकांनी संरक्षणमंत्र्यांचा सत्कार केला. नेहमी राष्ट्रविरोधी बोलणार्‍यांवर सामाजिक दबाव निर्माण करणे आवश्यक असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.


...तर साधू-संत रस्त्यावर उतरतील ! - महंत डॉ. बिंदु महाराज

मंदिरातील गाभार्‍यात महिलांना प्रवेश देण्याचे प्रकरण
     नाशिक - तृप्ती देसाई या मनोरुग्ण असून त्यांना उपचारांची आवश्यकता आहे. त्या करत असलेले आंदोलन हे स्टंटबाजी आणि खोट्या प्रसिद्धीसाठी आहे. धर्मापेक्षा कायदा मोठा नाही. देसाई यांनी जर असेच आंदोलन चालू ठेवले, तर साधू- संत रस्त्यावर उतरतील. देसाई आणि वनिता गुट्टे यांच्यामध्ये धाडस असेल, तर त्यांनी कुंभमेळ्यात येऊन दाखवावे, असे आव्हान महंत डॉ. बिंदु महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले.

(म्हणे) डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येतील संशयित हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मला मारहाण करत होते !

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा धादांत खोटा आरोप !
      कोल्हापूर - उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच मी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. माझा पेहरावही भारतीय होता. उच्च न्यायालयाच्या आदेशात कुठेही साडी परिधान करून गाभार्‍यात जाऊन दर्शन घ्या, असा उल्लेख नाही. माझ्यावर जाणीवपूर्वक आक्रमण केले गेले. मंदिरात भाविक नव्हते, तर आक्रमणकर्तेच होते. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येतील संशयित हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मला मारहाण करत होते. (डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने हिंदुत्ववादी संघटनांचे नाव घेतलेले नसतांना या हत्यांचे खापर नाहक हिंदुत्ववादी संघटनांवर फोडू पहाणार्‍या कांगावखोर तृप्ती देसाई ! - संपादक) त्या दिवशी झालेल्या गोंधळाला पोलीस प्रशासन आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारे आक्रमणकर्तेच उत्तरदायी आहेत, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला. (संदर्भ : पुढारी आणि महाराष्ट्र टाइम्स)

कोल्हापूर येथे तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची चौकशी होणार ! - भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील

धर्मपरंपरा मोडणार्‍या आणि कोल्हापूरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्‍या
तृप्ती देसाई यांच्यावरही शासनाने कठोर कारवाई करावी, अशी सश्रद्ध हिंदूंची मागणी आहे !
     कोल्हापूर - उच्च न्यायालयाने महिलांच्या मंदिर प्रवेशप्रकरणी राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यानुसार श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना १३ एप्रिल या दिवशी मारहाण झाली होती. या मारहाणप्रकरणी चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी एका स्वतंत्र अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
    तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १४ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक घेतली. या बैठकीत संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर उपरोक्त आदेश देण्यात आला.
पाटील पुढे म्हणाले की,
१. मंदिरामध्ये क्लोज सर्कीट टीव्हीचे चित्रक (कॅमेरे) असून त्यात मंदिरात घडलेल्या प्रत्येक घटनेचे चित्रीकरण झाले आहे. त्याची ध्वनीचित्र-चकती (सीडी) सिद्ध करण्यात आली आहे. त्याद्वारे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
२. महिलांना गाभाराप्रवेश आहे, त्याकरिता श्रीपूजक, देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाईल.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघराचे दायित्व लीलया सांभाळणार्‍या कु. रेखा काणकोणकर संतपदी विराजमान !

पू. (कु.) रेखाताई ठरल्या सनातनच्या ६० व्या संत 
पू. (कु.) रेखा काणकोणकर (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ

 

सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघराचे दायित्व लीलया सांभाळणार्‍या कु. रेखा काणकोणकर संतपदी विराजमान !

पू. (कु.) रेखा काणकोणकर
        रामनाथी (गोवा), १५ एप्रिल (वार्ता.) - श्रीराम नवमी हा दिवस साक्षात प्रभु श्रीराम भूतलावर अवतरले तो दिवस. त्यामुळे आजच्या पवित्र दिनी भगवंत सनातनच्या साधकांना कोणती अमूल्य भेट देणार आहे, याची प्रत्येक साधकालाच उत्कंठा लागली होती. त्याप्रमाणे रामनाथी आश्रमातील संपूर्ण अन्नपूर्णा विभाग (स्वयंपाकघर) सांभाळत असतांनाच साधकांनाही साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करणार्‍या आणि सतत देवाच्या अनुसंधानात राहून साधकांपुढे आदर्श ठेवणार्‍या कु. रेखा काणकोणकर (वय ३८ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले आणि पू. (कु.) रेखाताई सनातनच्या ६० व्या संत ठरल्या. 

देहलीमध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर एक वर्षांसाठी बंदी ?

      नवी देहली - तंबाखू, गुटखा, पान मसाला, खैनी आणि जर्दा यांचे उत्पादन, विक्री, खरेदी आणि साठा यांवर राजधानी देहलीमध्ये एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. देहली राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाने ही माहिती दिली आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देहलीतील आरोग्य विभागाने गुटख्यावर बंदी आणली होती; मात्र तंबाखू व्यापार्‍यांनी गुटख्यातील घटकांचा समावेश असणार्‍या उत्पादनांची विक्री चालूच ठेवून या आदेशाचा भंग केला होता.

यापुढे विधीमंडळाच्या सभागृहात राष्ट्रध्वज फडकावण्यास बंदी !

      मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सत्ताधार्‍यांचा विरोध करण्यासाठी सभागृहात कापडी राष्ट्रध्वज फडकावला. या घटनेच्या विरोधात सत्ताधारी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला; कारण विरोधकांकडून राष्ट्रध्वज हाताळतांना त्याचा अवमान झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला होता. यानंतर करण्यात आलेल्या निवेदनात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यापुढे सभागृहात कुणालाही राष्ट्रध्वज फडकावता येणार नाही, असे निर्देश दिले.
     ते म्हणाले, ४ एप्रिल २०१६ या दिवशी सभागृहात विरोधकांच्या काही सदस्यांनी कापडी राष्ट्रध्वज फडकावला. या संदर्भातील चित्रफीत पाहिली आणि राष्ट्रध्वज संहितेचा अभ्यास केला. त्यावरून सभागृहात विरोधकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र सभागृहात राष्ट्र्रध्वज फडकावला जाणे, ही घटना पहिली आणि शेवटची ठरावी; कारण यापूर्वी अशी घटना कधी घडली नव्हती. म्हणून यापुढे सभागृहात राष्ट्रध्वज फडकावता येणार नाही.

त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिराचे विश्‍वस्त, पुजारी, ग्रामस्थ यांच्यासह २५० जणांवर गुन्हा नोंद

 • धर्मद्रोह्यांवर नव्हे, तर धर्मपरंपरांचे रक्षण करणार्‍यांवर गुन्हे नोंद केले जातात, हे संतापजनक ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
 • त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिराच्या गाभार्‍यात जाण्यास धर्मद्रोही महिलांना रोखल्याचे प्रकरण
      त्र्यंबकेश्‍वर, १५ एप्रिल - स्वराज्य महिला संघटनेच्या वनिता गुट्टे, तसेच अन्य महिला येथील शिवमंदिराच्या गाभार्‍यात घुसू पहाण्यासाठी आग्रही होत्या. गाभार्‍यामध्ये महिलांनी प्रवेश न करण्याची या मंदिराची परंपरा आहे. ती परंपरा मोडत १३ आणि १४ एप्रिल या दिवशी आंदोलक महिलांनी गाभार्‍यात घुसण्याचा प्रयत्न केला; पण तेथील श्रद्धाळू भाविकांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. या प्रकरणी गाभार्‍यात प्रवेशाला मज्जाव केल्याच्या प्रकरणी, तसेच महिलांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र हिंदु सार्वजनिक प्रार्थनास्थळे प्रवेशमान्यता अधिनियम १९५६ सेक्शन ४ (अ), (ब), ५ अन्वये मंदिराचे विश्‍वस्त, पुरोहित, पुजारी, ग्रामस्थ महिला-पुरुष आणि नगरसेवक, अशा एकूण २५० जणांच्या विरोधात त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोद करण्यात आला आहे. (धर्मपरंपरांचे रक्षण करणार्‍यांवर गुन्हे नोंदवणारे पोलीस धर्मपरंपरेला छेद देत गावातील वातावरण कलुषित करू पहाणार्‍या प्रसिद्धीलोलुप धर्मद्रोही महिला आंदोलकांवर गुन्हे नोंद करतील का ? - संपादक)

सनातन धर्मातील जिवंत जागरूक देव म्हणजे साक्षात हनुमानच ! - महामंडलेश्‍वर १००८ प.पू. संत बालयोगीजी महाराज

जीर्णोद्धारप्रसंगी पूजन करतांना महामंडलेश्‍वर १००८ प.पू. संत बालयोगीजी महाराज
      चोपडा - देशात राम आणि श्रीकृष्ण यांच्या मंदिरांपेक्षा हनुमानाची मंदिरे अधिक पटींनी आहेत. सनातन धर्मात जिवंत जागरूक देव म्हणजे साक्षात हनुमानच आहे, असे प्रतिपादन चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर संत बालयोगीजी महाराज यांनी येथील बालवीर हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी केले. शिवकालीन इतिहासात नोंद असलेले ३५० वर्षांपूर्वीचे ग्रामदैवत बालवीर हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार विधीवत पूजनाद्वारे पार पडला. महामंडलेश्‍वर १००८ प.पू. संत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते बालवीर हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, तसेच त्यांच्या अमृतवाणीतील कीर्तन, तसेच भंडारा यांचे आयोजन करण्यात आले.
     १३ एप्रिलला चोपडा येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला हिंदु बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहनही महामंडलेश्‍वर १००८ प.पू. संत बालयोगीजी महाराज यांनी या वेळी केले.

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी ! - पू. राजूदास महाराज रामदासी

आंदोलनात सहभागी धर्माभिमानी हिंदू आणि आंदोलनाला
संबोधित करतांना पू. राजूदास महाराज रामदासी (डावीकडे)
     सातारा - गोमातेला हिंदु धर्मात मातेचा दर्जा दिला आहे. गोमाता हिंदूंना पूजनीय असून तिच्यामुळे समाजात समृद्धी नांदते. अशा गोमातेचे पशूवधगृहांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्राणार्पणाची सिद्धता ठेवली पाहिजे. फडणवीस शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा केला. हे अभिनंदनीय असले, तरी राज्यामध्ये अजूनही गोहत्या आणि गोतस्करी चालूच आहे. शासनाने गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन पू. राजूदास महाराज रामदासी यांनी केले.
     वडूज येथील तहसील कार्यालय, एस.टी. स्टॅण्ड परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी सर्वश्री विजय काळे, अशोक गाडवे, सतीश शेटे, दीपक तुपे, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे २५ हून अधिक कार्यकर्ते आणि धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
पू. राजूदास महाराज रामदासी पुढे म्हणाले की...
१. राज्यात मुंबई, नाशिक, पुणे, धुळे, मिरज यांसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमांस तस्करी होत असल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत.
२. विद्यमान कायद्यात शिक्षेसाठी कठोर तरतुदी नसल्याने बहुतांश ठिकाणी अटक केलेल्या आरोपींना एका दिवसांत जामिनावर मुक्त केले जाते.

श्रीराम नवमीनिमित्त काढलेल्या भगव्या पदफेरीने सांगोलकरांचे लक्ष वेधले !

जय श्रीराम च्या जयघोषाने सांगोल्यात 
(जिल्हा सोलापूर) हिंदुत्वाचा आविष्कार ! 
       सांगोला (जिल्हा सोलापूर), १५ एप्रिल (वार्ता.) - जय श्रीराम !, आर्य सनातन वैदिक धर्माचा विजय असो ! , यांसारख्या जयघोषांत सांगोल्यात हिंदुत्वाचा आविष्कार घडला. श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके आणि प्रा. विलास वांगीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ झालेली पदफेरी शहरातील प्रमुख मार्गावरून येऊन पुन्हा श्रीराम मंदिर येथे पदफेरीची सांगता झाली.

मुख्यमंत्र्यांनी चेंगराचेंगरीच्या कारणाऐवजी हिंदूंची धार्मिक प्रथा असल्यामुळे चौथर्‍यावर प्रवेश नाही, असे म्हणणे हिंदूंना अपेक्षित होते !

    शनिशिंगणापूर येथील शनिमंदिरात सर्व स्त्री-पुरुषांना प्रवेश मोकळा असून चौथर्‍यावर जाण्यास बंदी आहे. तसा ठराव वर्ष २०११ मध्ये देवस्थान समितीने केला आहे. चौथर्‍यावर गर्दी झाल्यास संभाव्य चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी चौथर्‍यावर प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे शनैश्‍वर देवस्थान समितीवर कारवाई करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दैनिक सनातन प्रभात, ७.४.२०१६)

श्री अंबाबाईच्या गाभार्‍यात कुणालाच प्रवेश न देण्यासाठी याचिका प्रविष्ट

 • जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना १६ एप्रिलला न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश  
 • श्री अंबाबाई मंदिरामध्ये तृप्ती देसाई यांना प्रवेश दिल्याचे प्रकरण
        कोल्हापूर, १५ एप्रिल - करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये सर्व प्रथा, परंपरा पायदळी तुडवत आणि खास पोलीस संरक्षण देऊन तृप्ती देसाई यांना पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी दर्शन घडवले. या आंदोलनाच्या वेळी लोकहित लक्षात घेऊन देसाई यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना आपले बळ पुरवून दोन्ही पदाधिकार्‍यांनी त्यांना पाठीशी घातले. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला. त्यामुळे श्री अंबाबाईच्या गाभार्‍यात स्त्री अथवा पुरुष अशा कुणालाच प्रवेश देऊ नये, अशा आशयाची मागणी करणारा दावा हक्कदार श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर आणि श्री. शिवकुमार शिंदे यांनी दिवाणी न्यायालयात १४ एप्रिल या दिवशी प्रविष्ट केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत दुसरे साहाय्यक दिवाणी न्यायाधीश प्रेमकुमार शर्मा यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना १६ एप्रिलला न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे.
      १४ एप्रिल या दिवशी शासकीय सुट्टी असतांनाही श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये झालेल्या एकूण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने याचिका प्रविष्ट करून घेतल्याचे श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांनी सांगितले आहे.

राजकारण्यांचा पोरखेळ ! महाराष्ट्राच्या विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून हिंदीत घोषणा ! हे आहे सर्व आमदारांचे मराठी भाषाप्रेम !

    भारतमाता की जय या विषयावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गोंधळ चालू होता. तेव्हा सत्ताधारी आमदारांकडून इशरतजहाँ के लालों को, जुते मारो सालोंको, तर विरोधी पक्षाच्या आमदारांकडून नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, या घोषणा दिल्या जात होत्या.


न्यायाधिशांची कमतरता एकाही राजकीय पक्षाच्या राज्यकर्त्यांनी भरून का काढली नाही ? त्यांना न्याय नको आहे, असा त्याचा अर्थ होत नाही का ?

    न्यायाधिशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब या पार्श्‍वभूमीवर बेंंगळुरूस्थित दक्षा या स्वयंसेवी संस्थेने न्यायदान यंत्रणेवरील दबावाचा अभ्यास केला. त्या अभ्यासानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी केवळ ५-६ मिनिटांचा वेळ मिळतो, असा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. जानेवारी २०१५ पासून देशातील २१ उच्च न्यायालयांतील १९ लाख खटल्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. अखिल भारतीय न्यायाधीश संघटनेच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २००२ या दिवशी १० लाख भारतियांमागे न्यूनतम ५० न्यायाधीश असले पाहिजेत, असा निर्देश दिला होता. तथापि वर्ष २०११ मधील लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार, १० लाख भारतियांमागे आवश्यक संख्येच्या सरासरी १६.८ टक्के एवढेच न्यायाधीश कार्यरत आहेत.

भाजपने राममंदिराचे राजकारण कधीच केले नाही, ही थाप आहे कि विनोद याचा खुलासा आता व्हायलाच हवा ! - शिवसेना

भाजपचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष केशव मौर्य यांनी 
उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत भाजप राममंदिराच्या विषयाचे 
राजकारण करणार नाही, असे विधान केल्याचे प्रकरण
      मुंबई - प्रभु श्रीरामाचे मंदिर अयोध्येत निर्माण करणे, हे राष्ट्रीय कार्य आहे आणि त्यासाठी पाकिस्तान किंवा ओबामांची अनुमती घेण्याची आवश्यकता नाही. ज्या अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपने केले, अयोध्या यात्रेवर स्वार होऊन देशातील वातावरण तापले, रामभक्तांच्या, करसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली, ते सर्व काय होते ? राममंदिर हे भाजपसाठी राजकारणाचे सूत्र नाही, हा विचार आता चमकला असेल, तर राममंदिराचे तेव्हाचे आंदोलन आणि त्यातील बलीदाने ही काय चोर-लफंग्यांची होती ? भाजपने राममंदिराचे राजकारण कधीच केले नाही, ही थाप आहे कि विनोद याचा खुलासा आता व्हायलाच हवा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

हिंदुद्रोही लेखक भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात टाका ! - अभय वर्तक, सनातन संस्था

तासगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेला २ 
सहस्र ५०० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती 
डावीकडून कु. प्रतिभा तावरे, श्री. अभय वर्तक
आणि दीपप्रज्वलन करतांना श्री. अभिजीत देशमुख
       तासगाव (जिल्हा सांगली), १४ एप्रिल (वार्ता.) - भारतातील पुरोगामी वारंवार हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करत आहेत. हिंदूंच्या देवता, संत यांना अपकीर्त करत आहेत. अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांना नावे ठेवणारे, तसेच हिंदु धर्माला अडगळ म्हणणारे तथाकथित साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना देशातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे दुर्दैवी आहेे. नेमाडे यांनी श्रीकृष्णाची व्यभिचारी ड्रायव्हर अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचा अवमान करणारे भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात डांबावे, ही आताच्या भाजप शासनाकडून आमची सर्व हिंदूंच्या वतीने अपेक्षा आहे, असे मनोगत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केले. ते १३ एप्रिल या दिवशी चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिराच्या मैदानावर झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते.

फलक प्रसिद्धीकरता

पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच !
     पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी भारत पुढेच येत नसून त्यांच्या या हेकेखोर वृत्तीमुळे दोन्ही देशांमधील चर्चेला खीळ बसली आहे, असा कांगावा पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pakse charcha karneke liye Bharat aagehi nahi aa raha. Uski yah neeti sambandh sudhaar nahi sakti - Pak
Chalak Pakki yah kutil neeti Bharat kab samjhega?
जागो ! : पाक से चर्चा करने के लिए भारत आगे ही नहीं आ रहा. उसकी यह नीती संबंध सुधार नहीं सकती. - पाकिस्तान
चालाक पाक की यह कुटिल नीती भारत कब समझेगा ?

(म्हणे), भारताच्या हेकेखोर वृत्तीमुळेच द्विपक्षीय चर्चेला खीळ !

पाकच्या उलट्या बोंबा !
       नवी देहली - पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी भारत पुढेच येत नसून त्यांच्या या हेकेखोर वृत्तीमुळे दोन्ही देशांमधील चर्चेला खीळ बसली आहे, असा कांगावा पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी म्हटले आहे. लोधी यांनी भारत आणि पाकमधील स्थगित झालेल्या चर्चेला संपूर्णपणे भारतालाच उत्तरदायी ठरवले आहे.

गहुंजे क्रिकेट स्टेडियमसाठी प्रति दिवशी पवना नदीतील २ लक्ष लिटर पाण्याचा वापर

        पिंपरी (पुणे), १५ एप्रिल - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ३० एप्रिलनंतरचे इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल्) सर्व क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर न्यावे लागणार आहेत. त्यामुळे येथील गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर २२ एप्रिल या दिवशी क्रिकेटचा सामना होणार आहे. पुण्याच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियमच्या पंटागणासाठी तेथून जवळच असलेल्या पवना नदीतून वर्षाला ०.०७८ दशलक्ष घनमीटर पाणी, म्हणजेच दिवसाला २ लक्ष लिटर पिण्याचे पाणी उचलण्याची अनुमती महाराष्ट्र जलसिंचन विभागाने यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दिले जाणारे पिण्याचे पाणी पटांगणासाठी वापरले जाते. (पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे नागरिकांना एका दिवसाआड पाणी दिले जात असतांना, तसेच जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना महाराष्ट्र जलसिंचन विभागाचा हा निर्णय समाजद्रोही आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. - संपादक)

बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी केलेल्या एका हिंदूच्या नियुक्तीवर धर्मांधांचा आक्षेप !

हिंदूंना सर्वच पातळीवर उघड विरोध दर्शवणे, 
हा जणू धर्मांधांचा जन्मसिद्ध अधिकारच !
       ढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुरेंद्र कुमार सिन्हा यांची नियुक्ती केल्याच्या प्रकरणी सत्ताधारी अवामी लीग पक्षाशी संलग्न असलेल्या उलेमा लीग या संघटनेने आक्षेप घेतला आहे. देशात ९८ टक्के मुसलमान असतांना एका हिंदूची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती होणे हे, दुर्दैवी आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे.
१. संघटनेने मानवी साखळी करून या दोन्ही सूत्रांचा निषेध करत सिन्हा यांना मुख्य न्यायाधीश पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

पाकमध्ये ॐ लिखित टॅग असणार्‍या पादत्राणांची विक्री

 • भारतात मुसलमानाचे पवित्र चिन्ह असलेली पादत्राणे विक्री करण्याची कल्पनाही कोणी करू शकते का ?
 • दुकानदाराने तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई नाही !
 • भारत शासन हे रोखण्यासाठी काय पावले उचलणार ?
       नवी देहली - पाकिस्तान भारत किंवा हिंदू यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडत नाही. कराचीमध्ये पार्क टावर या मॉलमधील स्टॅप शू स्टोर या दुकानातून लाल, तसेच काळ्या रंगात ओम लिखित टॅग असलेली महिलांची पादत्राणे विक्री करण्यात येत आहेत. याविषयी माहिती मिळताच पाकिस्तान हिंदु पंचायत या संघटनेच्या सदस्यांनी दुकान मालकाला सदर पादत्राणांची विक्री थांबवण्याची मागणी केली; परंतु दुकान मालकाने या सदस्यांनाच धमकावत शोरूमच्या बाहेर काढले. याप्रकरणी पंचायतच्या सदस्यांनी तेथील अल्पसंख्यांकमंत्री ज्ञान चंद इसरानी यांना भेटून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतरही दुकानमालकाला अटक करण्यात आली नाही. सदर पादत्राणे चिनी बनावटीची असल्याचे समजते. यापूर्वी शिखांचे धार्मिक चिन्ह असलेल्या पादत्राणांची पाकिस्तानच्या बाजारपेठेत विक्री करण्यात आली होती.

धर्माभिमानी गुरुनाथ मुंबईकर यांच्या पुढाकार नावडे गाव (जिल्हा रायगड) येथे धर्मकार्यासाठी तरुणांची बैठक

       पनवेल - स्वराज्य मावळा सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर यांच्या पुढाकाराने नावडे गाव, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे तरुणांची बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीला ५८ तरुणांची उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. राष्ट्र आणि धर्मासाठी सर्वांनी वेळोवेळी संघटित होण्यास होकार दिला.
        कार्यक्रमाला बजरंग दलाचे स्थानिक कार्यकर्ते श्री. विशाल खानावकरसुद्धा उपस्थित होते. धर्माभिमानी श्री. राजेश म्हात्रे यांनी आपल्या गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करावा अशी मागणी केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शनसुद्धा लावण्यात आले होते.

डॉ. झाकीर नाईक यांना विरोध करणारे मलेशियातील पेनांग राज्याचे उपमुख्यमंत्री पी. रामासामी यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बद्वारे आक्रमण !

हिंदूंनो, अशा बातम्या भारतातील ढोंगी निधर्मीवादी 
प्रसारमाध्यमे दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
       क्वालालंपूर - फेसबूकवर डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात लिखाण केल्याच्या कारणावरून मलेशियातील पेनांग राज्याचे उपमुख्यमंत्री पी. रामासामी यांच्या कार्यालयावर धर्मांधांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. सुदैवाने यात कुणीही घायाळ झाले नाही. या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना रामासामी म्हणाले, मी केलेले विधान हे इस्लाम अथवा मुसलमान यांच्या विरोधात नसून एका विशिष्ट व्यक्तीविषयी होती. डॉ. झाकीर यांची भाषणे अन्य धर्मियांच्या विरोधात द्वेष पसरवणारी असतात.

९/११च्या आक्रमणानंतर आतापर्यंत अमेरिकेकडून पाकला १३ अब्ज डॉलरचे साहाय्य !

 • पाकने आतंकवादाच्या विरोधात हे पैसे खर्च करण्याऐवजी भारतात आतंकवादी कारवायांसाठीच ते खर्च केले, हे अमेरिकेला ज्ञात असूनही ती पाकला साहाय्य करते.  
 • अमेरिकेचा दुटप्पीपणा भारताला समजेल तो सुदिन !
       इस्लामाबाद - अमेरिकेकडून पाकिस्तानला ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ८६ सहस्र ४९२ कोटी ८५ लाख रुपये (१३ अब्ज डॉलर) देण्यात आले होते. अमेरिकेकडून आतंकवादाच्या विरोधात चालू असलेल्या लढाईत पाकिस्तानचे साहाय्य मिळवण्यासाठी आणि अन्य साहाय्यासाठी हे पैसे पाकला देण्यात आले होते. पाकिस्तानचे संरक्षण विभागाचे सचिव आलम खट्टक यांनी ही माहिती सेनेट सुरक्षा समितीला दिली.

ब्रिटनमध्ये हिंदु परंपरावर आधारित संस्कृत विद्यालयाची स्थापना !

भारतात संस्कृत विद्यालय स्थापन करण्याला 
भगवेकरण म्हणतात, तर ब्रिटनसारख्या ख्रिस्ती देशात 
मात्र संस्कृत आणि हिंदु विद्यालये उघडण्यात येतात !
       लंडन - हैरो शहरात पूर्णपणे हिंदु परंपरांवर आधारित संस्कृत विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या विद्यालयाचे नाव अवंती हाऊस स्कूल आहे. या विद्यालयातील सर्व नियम हिंदु परंपरांवर आधारित आहेत. येथील सर्व विद्यार्थ्यांनी शाकाहार करावा, यासाठी विद्यालयाकडून विशेष काळजी घेतली जाते. या विद्यालयात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी, त्यांचे नातेवाईक आणि शिक्षक यांचे हिंदु परंपरा आणि संस्कृत यांच्या प्रति विशेष प्रेम आहे.

इसिसचा नवा आदेश : काफिरांच्या इमामांची हत्या करा !

इसिसचा विरोध करणार्‍या 
मुसलमान धर्मगुरूंच्या संख्येत वाढ !
       सिरिया - जिहादी आतंकवादी संघटना इसिसने (इस्लामिक स्टेटने) एक नवीन आदेश काढत इसिसच्या आतंकवाद्यांना उद्देशून म्हटले आहे की, जे मुसलमान धर्मगुरु इसिसच्या विचारधारेला मानत नाहीत, त्यांची हत्या करा ! इसिसने अशा धर्मगुरूंचे काफिरांचे इमाम असे नामकरण केले आहे. इसिसने अशा आतंकवाद्यांची एक सूचीही बनवली असून इंघटनेच्या समर्थकांनी या इमामांची हत्या करावी, असा आदेश काढला आहे. (इसिसमध्ये सुन्नी पंथियांचा भरणा आहे. इसिस मुसलमानेतर लोकांबरोबरच प्रामुख्याने शिया मुसलमानांना ठार करते. त्यामुळे जे इमाम इसिसचा विरोध करत आहेत, ते शिया पंथीय आहेत का ?, हे पहाणे आवश्यक आहे. कारण तसे असल्यास, सुन्नी धर्मगुरूंचा इसिसच्या विचारधारेला समर्थन आहे, हे म्हणण्यास वाव रहातो. तसेच इसिसची विचारधारा इस्लामला धरूनच आहे, असे कोणी म्हटल्यास सकृतदर्शनी आणि किमान सुन्नी पंथीय धर्मगुरूंच्या दृष्टीने तरी त्यात काही चूक वाटत नाही. - संपादक)

सांगलीत अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान !

       सांगली, १५ एप्रिल (वार्ता.) - रविवार, १७ एप्रिल या दिवशी सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे सत्यवेध फाऊंडेशनच्या वतीने चला नाती जपूया या विषयावर लोकमान्य टिळक स्मारक येथे सायंकाळी ५ वाजता व्याख्यात आयोजित केले आहे. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्यवेधचे श्री. राहुल कुलकर्णी यांनी केले आहे.

अमेरिकेत ६० लक्ष रुपयांच्या हिंदूंच्या देवतेच्या मूर्तीची चोरी !

       मॅनहॅटन (अमेरिका) - गेल्या मासात येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनात अठराव्या शतकातील हिंदूंच्या देवतेच्या मूर्तीची चोरी झाल्याची माहिती न्यूयॉर्क पोलिसांनी दिली आहे. नॅन्सी वीनर या ६० वर्षीय महिलेने तिच्या घरातील वस्तूंचा लिलाव करण्यासाठी एका प्रदर्शनाचे आयोजन केले होते, तेव्हा या मूर्तीची चोरी झाली. या मूर्तीचे मूल्य ६० लक्ष रुपये (९० सहस्र अमेरिकी डॉलर) इतके आहे. (हिंदूंच्या देवतेची मूर्ती वीनर यांच्याकडे कशी आली ? भारतातून हिंदूंच्या देवतांच्या अमूल्य मूर्ती चोरून विदेशात विकल्या जातात. हा तसाच प्रकार नव्हे ना ? भारतातील या अमूल्य वारशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्व खाते काही पावले उचलणार कि नाही ? - संपादक)

(म्हणे) हिंदू कट्टरपंथीय देशासाठी धोकादायकच !

 • हिंदू कट्टर असते, तर इस्लामी कट्टरपंथियांचा धोका देशाला जाणवला तरी असता का ? सारे जग इस्लामी आतंकवादाने होरपळत असतांना हिंदूंना धोकादायक ठरवणे कोणत्या इतिहासात लिहिले आहे ?
 • ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र गुहा यांचा जावईशोध
       पणजी - जगभरात इस्लामी आतंकवाद्यांचा धोका असला, तरी हिंदू कट्टरपंथीय देशासाठी धोकादायकच आहेत. हिंदू कट्टरपंथियांनी जे काही चालवले आहे, ते भीती निर्माण करण्यासारखेच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी येथे केले. (हिंदू सहिष्णू आहेत. हिंदु धर्माने कधीही कट्टरवाद शिकवला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु इस्लामी कट्टरवादाचे बळी आहेत ! असे असतांना त्यांना कट्टरपंथीय म्हणून हिणवण्याचे काय कारण ? - संपादक) गोवा विद्यापिठात डी.डी. कोसंबी अध्यासनाच्या वतीने आयोजित केलेल्या भारतात समाजजीवनासमोरील आव्हाने या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी डॉ. माधव गाडगीळ, तसेच कुलगुरु डॉ. सतीश शेट्ये उपस्थित होते.

पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिस्ती आणि शिया मुसलमान यांच्यावर प्रतिदिन आक्रमणे ! - पाकिस्तानी लेखिका फराहनाझ इस्पाहनी

        वॉशिंग्टन - पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिस्ती आणि शिया मुसलमान यांच्यावर प्रतिदिन आक्रमणे होतात, असे वॉशिंग्टन डीसीस्थित पाकिस्तानी लेखिका फराहनाझ इस्पाहनी यांनी म्हटले आहे. नुकतेच त्यांचे प्युरिफाईंग द लॅन्ड ऑफ द प्युअर : पाकिस्तान्स रिलिजिअस मॉयनॉरिटीस या नविन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्त महंमद अकबर नोटेझाई यांनी लेखिकेशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हे भाष्य केले.

निरपराध्यांचा जीव घेणार्‍यांना मुसलमान म्हटले जाऊ शकत नाही !

 • असे आहे, तर इसिसचे जिहादी आतंकवादी कुराणचे वास्तविक आचरण करत असल्याचा दावा का करतात, हे इमाम तालिब यांनी स्पष्ट करावे !
 • सौदी अरबच्या इमामाने भारतीय मुसलमानांना केला आतंकवादाविषयी उपदेश
       देवबंद (उत्तरप्रदेश) - इस्लामला शांती आवडते. त्याचा आतंकवाद्यांशी काहीच संबंध नाही. आतंकवाद आणि इस्लाम ही वेगवेगळी सूत्रे आहेत. निरपराध्यांचा जीव घेणार्‍यांना मुसलमान म्हटले जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन सौदी अरबमधील मक्का मुकर्रमाचे इमाम-ए-हरम डॉ. सालेह बिन महंमद अल तालिब यांनी केले. देवबंद येथील रशिदिया मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जमियत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इमाम तालिब पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर फोफावत चाललेल्या आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. सौदी अरबने आतंकवाद नष्ट करण्यासाठी मुसलमान देशांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. आम्ही सातत्याने या दिशेने प्रयत्न करत आहोत.

पाकिस्तानातून आश्रयासाठी भारतात आलेल्या हिंदूंचे जीवन येथेही हालाखीचेच !

देशात कोणाचेही शासन आले, तरी भारतातीलच नव्हे, 
तर अन्य देशांतून आलेल्या हिंदूंची स्थितीही दयनीयच 
रहाते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
      नवी देहली - ४ महिन्याआधी पाकिस्तानातून पर्यटन व्हिसा घेऊन आलेले काही हिंदू येथील भाटी खाण परिसरात १०-१२ झोपड्यांत अत्यंत हलाखीचे जीवन कंठत आहेत. त्यांना भारतीय नागरिकत्व तर दूरच, अत्यावश्यक सोयी-सुविधाही पुरवण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या परिसराला भारतीय हिंदूंकडून पाकिस्तानी मोहल्ला या नावाने हिणवण्यात येते, तर पाकिस्तानात अशाच हिंदूंच्या झोपड्यांना हिंदू कॉलनी म्हणतात, असे या शरणार्थी हिंदूंनी सांगितले.

नागवे-करंजे रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा अधिकार्‍यांचा निर्वाळा !

 • जनतेने नेहमीच सतर्क राहून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार उघड करावा !
 • सिंधुदुर्गच्या मनसेच्या जिल्हाध्यक्षांवर खंडणीचा आरोप करणार्‍या शासकीय ठेकेदाराचे काम निकृष्ट
 • २०० मीटरपर्यंतचे काम पुन्हा करण्याचे आदेश
       कणकवली - नागवे-करंजे रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हे काम बंद पाडले होते. १२ एप्रिल या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वटकर यांनी पाहणी केली आणि काम निकृष्ट झाले असल्याचा निर्वाळा दिला, तसेच रस्त्याचे २०० मीटर अंतरापर्यंतचे काम पुन्हा करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता वटकर यांनी दिले आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी खंडणी मागितल्याचा आरोप करणारा शासकीय ठेकेदार रामदास विखाळे यांच्या नावावर या रस्त्याचे काम घेण्यात आले असून ते काम अजय सावंत नावाची दुसरीच व्यक्ती करत असल्याचे या वेळी उघड झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आल्याचेे प्रदीप वटकर यांनी सांगितले.

मालवण भागात पाणीटंचाईची समस्या !

मालवणसारख्या समुद्रकिनारी भागात 
पाणीसमस्या निर्माण होणे, हे पाण्याचे 
योग्य नियोजन न केल्याचेच द्योतक !
       मालवण - सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी अल्प पावसामुळे आणि वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. यावर त्वरित उपाययोजना न काढल्यास येत्या एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याच्या भीषण टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. समुद्रकिनारपट्टी भागातील ग्रामस्थांना मचूळ आणि क्षारयुक्त पाणी वापरावे लागत आहे. किनारपट्टी भागातील तळाशील-तोंडवळी येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने या वर्षी या गावास टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

कर्णावती येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने मंदिर स्वच्छता आणि प्रश्‍नमंजुषा उपक्रम

राममंदिराची स्वच्छता करतांना संतप्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्या
      कर्णावती (अहमदाबाद) - प्रतिवर्षीप्रमाणे रामनवमीच्या निमित्त संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने येथील श्री फडणीस राम मंदिरामध्ये नुकतेच मंदिर स्वच्छता आणि प्रश्‍नमंजुषा हे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमध्ये प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह मंदिरातील ५ भाविकांनीही लाभ घेतला. या प्रश्‍नमंजुषेमध्ये विविध धर्मशास्त्र विषयक माहिती, देवतांची उपासना आणि त्यांची विविध नावे आदींचा समावेश होता. या वेळी अनेक प्रश्‍नांची उत्तरे देणार्‍यांना मंदिर न्यासाच्या वतीने सनातन निर्मित सात्त्विक उत्पादने भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये परिसरातील २० हून अधिक स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला.

आत्मबल वाढवण्यासासाठी साधना अपरिहार्य !

       अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी यांनी आत्महत्या केल्याने सध्या त्याविषयी सर्वत्र चर्चा आणि बातम्या प्रसारित होत आहेत. चित्रपट जगतातील म्हणजेच मायानगरीतील दुसरी अंधःकारमय बाजू अशा घटनांमुळे पुढे येते. प्रसिद्धी आणि भरघोस (अमाप) पैसे यांचे वलय असलेल्या या मायाजगताविषयी युवक-युवतींना आकर्षण असते. या चित्रपटजगतात चढ-उतार होत असतात. त्या वेळी बाळगलेले स्वप्न भंग झाल्यावर स्वत:ला कसे सांभाळायचे, हे माहिती नसल्याने अनेक नवोदित तारकांनी आत्महत्या करून मृत्यूला जवळ केले आहे. आत्महत्येचा हा मार्ग आजकाल केवळ चित्रपटक्षेत्रातीलच नव्हे, तर समाजातील प्रत्येक क्षेत्र आणि वयोगट यामध्ये आढळून येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आत्महत्या हा मोठी समस्या झाली असून तो दखलपात्र गुन्हाही नोंदवला जात आहे.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म (तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

उत्साही आणि आनंदी असणारे अन् इतरांशी जवळीक करणारे चि. केदार नाईक अन् नेतृत्वगुण आणि विविध कौशल्ये असणार्‍या चि.सौ.कां. वैष्णवी सारंगधर !

      चैत्र शुक्ल पक्ष एकादशी (१७.४.२०१६) या दिवशी पंढरपूर येथील श्री. केदार नाईक आणि कोपरगाव येथील चि.सौ.कां. वैष्णवी सारंगधर हे विवाहबद्ध होत आहेत. ते दोघेही सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून साधना करतात. आश्रमातील साधकांना जाणवलेली या दोघांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. केदार नाईक आणि चि.सौ.कां. वैष्णवी सारंगधर यांना
सनातन परिवाराच्या वतीने शुभविवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
चि. केदार नाईक यांची 
साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये ! 
अ. हसतमुख : कोणत्याही विषयावर चर्चा होत असतांना केदारदादा सतत हसतमुख असतो. त्याच्या तोंडवळ्यावर कधीच चिडचीड नसते. 
- श्री. व्यंकटेश अय्यंगार
आ. नम्रता : दादाकडे छायाचित्रे काढण्याची सेवा आहे. तो प.पू. डॉक्टर आणि संत यांची छायाचित्रे काढतो. तेव्हा त्याच्यातील नम्रता पहायला मिळते. तो नेहमी समोरचा साधक काय सांगतो, तेे पूर्ण ऐकून घेऊन नंतरच बोलतो. 
- श्री. वाल्मिक भुकन

एका प्रसंगातील साधनेविषयीच्या उच्च दृष्टीकोनामुळे २ टक्क्यांनी आध्यात्मिक स्तर वाढून ६४ टक्के पातळी गाठलेल्या सौ. सुप्रिया माथूर !

सौ. सुप्रिया माथूर
      सौ. सुप्रिया माथूर हिला आरंभीपासूनच तीव्र आध्यात्मिक त्रास असतांनाही सतत सेवारत राहून तिने सर्व साधकांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे.
       रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षाचे दायित्व सांभाळण्यासह स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी भारतभरातून येेणार्‍या साधकांना ती योग्य दिशादर्शन करते. सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनामुळे मनातील अयोग्य विचारप्रक्रियेच्या मुळापर्यंत आम्हाला जाता आले, इतकी वर्षे साधना करूनही आमची प्रगती न होण्यामागील कारण आता उमगले, असे प्रक्रिया करून गेलेले साधक कृतज्ञतापूर्वक सांगतात.
       साधनेतील जलद प्रगती दर्शवणार्‍या एका व्यक्तीगत प्रसंगातही तिने साधनेविषयीचा उच्च दृष्टीकोन ठेवल्याने तिचा आध्यात्मिक स्तर २ टक्क्यांनी वाढला असून आता तो ६४ टक्के झाला आहे.
       तत्त्वनिष्ठता, सेवेची तळमळ, नेतृत्व गुण आदी गुण असणार्‍या सौ. सुप्रिया माथूर हिची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी या रामनवमीच्या शुभदिनी प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मेक्सिको येथील कु. मारियेला देल्सोल यांना कार्यशाळेसाठी भारतात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर आलेल्या अनुभूती अन् साधना केल्याने स्वतःत जाणवलेले पालट

१. आलेल्या अनुभूती 
कु. मारियेला देल्सोल
१अ. माहितीजालावर एस्.एस्,आर्.एफ्.च्या कार्यशाळेत सहभागी होण्याचा प्रवेश अर्ज मिळणे आणि तो वाचल्यावर त्यात पुष्कळ रुची वाटणे : माझ्या साधनेच्या प्रवासात मला आलेली पहिली अनुभूती ही एस्.एस्.आर्.एफ्.विषयी आहे. एका रात्री मी शक्ती या विषयाशी संबंधित एक ग्रंथ वाचत होते. त्यातील एका शब्दाचा अर्थ मला लक्षात न आल्याने तो मी माहितीजालावर (इंटरनेटवर) शोधत असतांना माझ्यासमोर एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेत सहभागी होण्याचा प्रवेश अर्ज आला. तोे वाचल्यावर मला त्यात पुष्कळ रुची वाटली; पण बरीच रात्र झाल्याने तोे अर्ज मी संरक्षित (सेव्ह) करून ठेवला.
१ आ. प्रवेश अर्ज भरायला हवा, असा विचार मनात आल्याने बूकमार्कच्या साहाय्याने अर्ज केल्याने उत्साही वाटू लागणे आणि अर्ज स्वीकारला जाईल का ?, याची उत्सुकता वाटणे : दुसर्‍या दिवशी सकाळी तो अर्ज उघडून पहाण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला; परंतु केवळ एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाचे मुख्य पान उघडत होते. या प्रसंगामागे काहीतरी अर्थ आहे, असे मला वाटू लागले. गूगलवरून माहिती मिळवण्याइतके हे सोपे नाही, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी प्रवेश अर्ज भरायला हवा, असा विचार मनात आल्याने मी बूकमार्कच्या साहाय्याने अर्ज केला. यामुळे मला पुष्कळ उत्साही वाटू लागले. माझी मुलाखत कधी होते ? माझा अर्ज स्वीकारला जाईल का ?, याची उत्सुकता मला वाटत होती.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या जिज्ञासूंविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

सौ. श्‍वेता क्लार्क
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने 
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १२ ते १६ 
एप्रिल २०१६ या कालावधीत आयोजित केलेली कार्यशाळा !
       गेल्या काही वर्षांपासून जगभरातील जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. त्याअंतर्गत १२ ते १६ एप्रिल २०१६ या कालावधीत आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या जिज्ञासूंमधे ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ दिसून आली. त्यांच्याशी बोलतांना त्यांची गुणवैशिष्ट्ये टिपता आली आणि त्यांच्याकडून शिकताही आले. जगभरातील साधकांना ईश्‍वरच शोधून काढत असल्याने आम्ही प्रसार करतो किंवा आम्ही साधकांना मार्गदर्शन करतो, हा कर्तेपणाच जणू त्याने नष्ट केला. अध्यात्मात प्रगती करण्याची आणि ईश्‍वराविषयीची तीव्र ओढ असलेल्या या जिज्ञासूंना भेटल्यानंतर आमच्यातील कृतज्ञताभाव वाढला. पुढील कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या जिज्ञासूंना शिकता यावे आणि त्यांना अधिकाधिक आध्यात्मिक लाभ करून घेता यावा, यासाठी या गटातील जिज्ञासूंची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

ध्यानमंदिरात नामजप करतांना त्रास जाणवू लागल्यावरही तेथे नामजप चालूच ठेवल्यावर सतत जाणवणारा जडपणा नाहीसा होऊन मोकळे वाटू लागणे आणि ईश्‍वराच्या प्रेमाच्या अनुभूतीने स्वतःमधील साधकत्वाची जाणीव झाल्याने भावजागृती होणे

अमेरिका येथील कु. अ‍ॅना 
अ‍ॅल्मरॉडिस यांना आलेली अनुभूती
       १४.४.२०१६ या दिवशी मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले होते. मला पूर्वी नैराश्य (डिप्रेशन) या मानसिक आजाराचा त्रास झाला होता; पण त्यातून मी बाहेर पडले. आश्रमात आल्यावर वाईट शक्तींमुळे होणारे त्रास आणि त्यावर मात करण्याचे उपाय यांची मला माहिती मिळाली. ध्यानमंदिरात जाण्यापूर्वी मला भीती वाटत होती. यामुळे देवाला प्रार्थना करूनच मी ध्यानमंदिरात गेले. तेथे बसून नामजप करतांना मला त्रास जाणवू लागल्याने येथून बाहेर पडावे, असे मला वाटू लागले; पण तरीही मी तेथून उठले नाही. गेले वर्षभर मला माझ्या हृदयावर कुणीतरी बसले आहे, असे जाणवते. यामुळे मला दाब जाणवतो आणि ईश्‍वराचे अस्तित्व जाणवत नाही. मी नामजप करू शकत नाही. मला सतत गुदमरल्यासारखे होणेेे, एकटे राहावे आणि कुणात मिसळू नये, असे वाटणे अशा प्रकारचे त्रासही पुष्कळदा होतात.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या कु. सर्वमंगला मेदी यांनी रामनवमी निमित्त काढलेली भावचित्रे

रामसेतू उभारणीच्या कार्यात आपला चिमुकला वाटा
उचलून प्रभु श्रीरामाच्या कृपाप्रसादास प्राप्त झालेल्या
खारूताईच्या पाठीवरून कौतुकभरले हात फिरवतांना प्रभु श्रीराम !
व्यष्टी साधनेकडून समष्टी साधनेकडे
वाटचाल होण्यासाठी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना !
रामरक्षेतील श्‍लोक म्हणतांना स्मितहास्य
करणार्‍या प.पू. गुरुदेवांचे दर्शन होऊन भावाश्रू येणे
कु. सर्वमंगला मेदी
हे प.पू. डॉ. श्रीजयंत,
      हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये मला (आम्हा सर्वांना) शक्ती, बुद्धी देऊन आपल्याला अपेक्षित सेवा करवून घ्या आणि या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या इतिहासात आम्हालाही सहभागी करवून घेण्याची कृपा करा ! (चित्र क्र. २ चे लिखाण)
- कु. सर्वमंगला मेदि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०१६)

महर्षींनी सांगितलेला नवीन जप करतांना आलेल्या अनुभूती

१. मन स्थिर आणि निर्विचार होणे : जप करतांना हा जप नवीन आहे, असे वाटले नाही आणि जुना जप मध्ये-मध्ये जराही आठवला नाही. जप करतांना मला पुष्कळ शांत वाटते. जपाने मन स्थिर आणि निर्विचार होते.
२. स्वतःच्या आवाजात सूक्ष्मातून जप सतत ऐकू येणे : मला हा जप माझ्याच आवाजात सूक्ष्मातून सारखा ऐकू येतो आणि तो सतत ऐकत रहावा, असे वाटते. मी तो भ्रमणभाष संचामध्ये माझ्या आवाजात मुद्रित केला आहे. अधूनमधून कामात असतांना मी तो लावते; पण थोडे शांत बसल्यावर किंवा झोपत असतांना ऐकू येणारा सूक्ष्मातील जप मला जास्त चांगला आणि ऐकत रहावा, असे वाटते. एवढा चांगला जप दिल्याबद्दल महर्षि आणि प.पू. गुरुदेव यांच्याप्रती माझे मन कृतज्ञतेने भरून येते.
- सौ. कुंदा डहाळे, नागपूर (मार्च २०१६)
महर्षींनी सांगितलेल्या जपाची वैशिष्ट्ये
१. ॐ निसर्गदेवो भव । या जपात व्यापकता जाणवते.
२. ॐ वेदं प्रमाणम् हा जप अंतर्मुख करणारा आहे.
३. हरि ॐ जयमे जयम् यात श्रीकृष्णाप्रती भक्तीभाव आणि कृतज्ञता जाणवते.
४. जय गुरुदेव या ओळीने गुरूंप्रती पूर्ण शरणागती होते.

व्यष्टी साधना गांभीर्याने आणि तळमळीने करून स्वतःत आमूलाग्र पालट घडवून आणणारे बोकारो, झारखंड येथील श्री. प्रियेशरंजन वर्मा (वय ७० वर्षे) !

श्री. प्रियेशरंजन वर्मा
      श्री. प्रियेशरंजन वर्मा हे बोकारो, झारखंड येथील असून ते तीन मासांसाठी (महिन्यांसाठी) रामनाथी आश्रमातील हिंदी विभागात सेवा करण्यासाठी आले आहेत. या काळात विभागातील आणि अन्य साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट येथे देत आहोत.
१. उत्तम आकलनक्षमता आणि शिकण्याची वृत्ती : काका आधी अक्षर प्रणालीमध्ये श्रीलिपीतील हिंदी टंकलेखन करत असत. विभागातून त्यांना मोड्यूलर प्रणाली शिकल्यास लाभ होईल, असे सांगितल्यावर त्यांनी ते स्वीकारून लगेच सरावास प्रारंभ केला. थोड्याच दिवसांत त्यांना मोड्यूलरमधील टंकलेखन जमू लागले. वयाच्या ७० व्या वर्षीही त्यांची शिकण्याची वृत्ती आणि आकलनक्षमता अतिशय चांगली आहे. त्यामुळे त्यांनी हिंदी आणि गुजराती ब्लॉगवर लेख अपलोड करण्याची सेवा अल्पावधीत शिकून घेतली अन् चिकाटीने पूर्ण केली. काकांचे तांत्रिक ज्ञान चांगले आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !


 साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !
      पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे
४. अन्य : आश्रमात येणार्‍यांचे आदरातिथ्य करणे आणि महाराज मौनव्रतात आहेत, याची त्यांना कल्पना देणे,
     प.पू. दास महाराजांना वेळेवर औषधे देणे, भोजन देणे, मर्दन (मालिश) करणे, पू. (सौ.) माईंना स्वयंपाकघरात साहाय्य करणे, मंडईत जाऊन आवश्यक साहित्य आणणे
     साधक स्वतःच्या सोयीनुसार शक्य तेवढे दिवस सेवेत सहभागी होऊ शकतात.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

 साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
      देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.


आतंकवादविरोध विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : १७ एप्रिल २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
या विशेषांकात काय वाचाल ?
१. इसिसची व्याप्ती आणि तिचे क्रौर्य
२. इसिसची प्रतिदिनची मिळकत किती ?
३. इसिसची क्रूरता दर्शवणार्‍या छळाच्या पद्धती ! (छायाचित्रांसह)
४. आतंकवादाला विरोध करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या आयएआयएस्चे कार्य आणि वैशिष्ट्ये
५. इसिसला अन्य देशांनी केलेला विरोध
        विशेषांक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ एप्रिलला
दुपारी १२ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी
     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे !
       नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ?
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।
भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे दुष्काळावर वरवरचे उपाय करणारी आतापर्यंतची शासने,
 तर कुठे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी !
     दुष्काळ का होतो, हे समजून न घेता, टँकरने आणि आगगाडीने पाणी पाठवू !, असे शासन म्हणते. अवर्षणग्रस्त भागातील साहाय्यातही भ्रष्टाचार केला जातो. मानवाच्या पापाचे भोग त्याला भोगावे लागत आहेत. ते अल्प करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे एकही राजकारणी सांगत नाही. याउलट बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळे यांच्यासारखे संत निसर्गदेवतेची कृपा व्हावी; म्हणून लाखो रुपये खर्च करून १२ सोमयाग करत आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

काय साध्य केले ?

      आपला देश लोकराज्य प्रधान आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्या त्याच्या स्वातंत्र्याची दखल घेण्याचे आणि त्या स्वातंत्र्याची जपणूक करण्याचेे दायित्व देशाच्या शासनाचे आहे. देहलीच्या जेएन्यू विश्‍वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई ही दोन व्यक्तीमत्त्वे दूरचित्रवाहिन्यांवर चमकत आहेत, त्याचे मूळ आपल्या प्रचलित राज्यव्यवस्थेत म्हणजे लोकराज्य व्यवस्थेत आहे. जेएन्यू विश्‍वविद्यालयात कन्हैय्या कुमारने देशविरोधी घोषणा दिल्या. त्याच्या इतरही काही कृत्यांमुळे तो देशद्रोही ठरला. पुरोगामी, निधर्मी आणि साम्यवादी यांनी त्याला बळ पुरवले आणि त्याची कृती देशद्रोही नाही, त्याचे व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, त्याचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका या मंडळीने केली आणि देशभर फिरून विशेषकरून महाविद्यालयांचे दौरे काढण्यास कन्हैय्याला उद्युक्त करण्यात आले. त्याप्रमाणे तो परवा नागपूर येथे आला असता, त्याच्या वाहनावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. असाच प्रकार भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या संदर्भातही आहे. मंदिरांच्या गर्भग्रहात जाऊन देवदर्शन घेण्याचा त्यांचा अट्टाहास आहे. त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील मोठ्या प्रसिद्ध देवळांच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. या दोन व्यक्तींच्या कार्यक्रमांकडे भारतीय जनता अवाक् होऊन पहात आहे. एक व्यक्ती देशप्रेमी जनतेसमोर देशद्रोही कृती करत आहे, तर दुसरी व्यक्ती हिंदूंच्या धर्मपरंपरा मोडीत काढून देवदर्शन घेण्याच्या ईर्षेने पेटलेली आहे. एकाच वेळी चालू असलेले हे दोघांचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहेत, याहून वेगळे असे काही कुणी म्हणत नाही. काय साध्य करायचे या दोघांना ? कीर्ती नाहीच नाही उलट अपकीर्तीच ! हिंदूंच्या धर्मपरंपरा जपणारा श्रद्धाळूंचा मोठा गट अस्तित्वात आहे. शनिशिंगणापूर येथे तृप्ती देसाई यांनी पोलिसांच्या सुरक्षेत चौथर्‍यावर जाऊन शनिदेवांचे दर्शन घेतले खरे; पण तो प्रसंग इतरांसाठी काही आदर्श ठरला नाही. श्रद्धाळू महिलांनी स्वतःचा निर्धार घोषित केला की, धर्मपरंपरा राखण्यासाठी त्या चौथर्‍यावर कधीच जाणार नाहीत. कन्हैय्या कुमार याने देहलीच्या जेएन्यूमध्ये देशविघातक अशी ज्या गोष्टी केल्या, त्या जगासमोर अगोदरच आल्या आहेत. सगळा देश एकात्मभावाने ढवळून निघाला असतांना देशद्रोह्याचा देशप्रेमींच्या समोर कसा निभाव लागेल ?

मेहबुबा मुफ्तीचे नक्राश्रू !

      श्रीनगरमधील एन्आयटीमध्ये दोन सहस्र विद्यार्थ्यांनी विश्‍वविद्यालयाचा परिसर सोडून इतरत्र प्रयाण केले, असे वृत्त नुकतेच झळकले. कोण होते हे विद्यार्थी ? एन्आयटीमध्ये शिक्षण घेणारे जम्मू-काश्मीर राज्याव्यतिरिक्त अन्य राज्यांतील ते विद्यार्थी होते. या एन्आयटीमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये जेमतेम ३५ टक्के विद्यार्थी स्थानिक आहेत. उरलेले सर्व देशातील अन्य राज्यांतून आलेले विद्यार्थी आहेत. म्हणजे श्रीनगरमधील एन्आयटी देशातील अन्य राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे चालली आहे, हे सूत्र पक्के होते. जम्मू-काश्मीरच्या शासनाला एरव्ही देशातील इतर राज्यांशी काही देणेघेणे नसते, किंबहुना त्यांना ते नको असते. ३७० कलम रद्दबातल ठरवण्यासाठी या राज्याचा जो विरोध आहे, त्यात सर्वकाही आले. या कलमामुळे राज्याला मिळालेला विशेष अधिकार या राज्याच्या अधोगतीला कारणीभूत आहे. एन्आयटीसारख्या प्रतिष्ठेच्या संस्थेत शिक्षण घ्यायला स्थानिक विद्यार्थी नाहीत. तरीही राज्यात ही महागडी संस्था आहे. केवळ दिखाऊपणा करण्याचा राज्याचा हा खेळ आहे. तेथील फुटीरतावाद्यांनी अलीकडेच सांगून टाकले की, ही संस्था राज्यातून दुसरीकडे हालवा. इतर राज्यांतील विद्यार्थ्यांचे भविष्य बिघडवण्याची चेतावणी या संस्थेतील कर्मचार्‍यांनी दिली. संस्थेतील इतर राज्यांतून आलेल्या विद्यार्थिनींवर बलात्कार करण्याची धमकीही दिली गेली. एकूणच या संस्थेतील इतर राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता वाटत नाही. ज्यांना संस्थेत सुरक्षितता वाटत नाही, असे दोन सहस्र विद्यार्थी बाहेर पडले आहेत. म्हणजे विद्येचे घर रिकामे झाले आहे, अशा राज्यात शांती आणि सौख्य कसे नांदणार ? बाहेर पडलेले विद्यार्थी देशप्रेमी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतमाता की जय म्हणत एक मिरवणूक काढली. पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला. त्यात काही विद्यार्थी घायाळ झाले. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणत आहेत, हे सर्व विद्यार्थी आमची मुले आहेत आणि आमच्यावर त्यांचे दायित्व आहे. काश्मीर त्यांचे घर आहे आणि ते परत येतील, अशी शासनाला खात्री आहे. राजकारण्यांचा दुतोंडीपणा असा उघड होत असतो. राज्याबाहेरून आलेली व्यक्ती ३७० कलमामुळे काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकत नाही. मग काश्मीरमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे काश्मीर हे घर कसे होऊ शकते ? मुख्यमंत्र्यांना विद्यार्थी परत येतील, अशी जी खात्री वाटते, त्यात काही तथ्य नाही. विद्यार्थ्यांनी हे जाणले आणि त्यांनी काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांवर अत्याचार करणार्‍यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. काश्मीरचा मुख्यमंत्री काश्मिरी लोकांवर कधी कारवाई करील का ? आणि तेसुद्धा परराज्यांतील विद्यार्थ्यांच्या संदर्भात ? मग ३७० व्या कलमावरील त्यांच्या श्रद्धेचे काय ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn