Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रायचूर (कर्नाटक) येथे रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी मशीद अंशत: पाडल्यावर मंदिराचे अवशेष सापडले !

  • धर्मांध आणि नगरपरिषदेचे अधिकारी यांच्यात वादावादी 
  • धर्मांधांकडून प्रशासनावर दगडफेक 
  • पोलिसांकडून सौम्य लाठीमार
प्रसिद्ध इतिहासतज्ञ पू.ना. ओक यांच्या भारतातील प्रत्येक मशीद ही
मूलत: हिंदूंचे मंदिर होते, या संशोधनाला आता बळकटी देणारी घटना ! 
एक मिनार की मस्जिद अंशत: पाडल्यानंतर तेथे प्राचीन हिंदु मंदिराचे
खांब असल्याचे दिसून आले. (बाजुला वर्तुळात मोठा करून दाखवला 
आहे.) (सौजन्य : हिंदु एक्झिस्टन्स संकेतस्थळ)

      रायचूर (कर्नाटक) - येथील नगरपरिषदेने रस्ता रुंदीकरण्याच्या आड येणार्‍या एका मंदिरासह दोन मशिदी अंशत: पाडल्यावर एका मशिदीच्या आत हिंदूंच्या प्राचीन मंदिराचे खांब सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. पब्लिक टीव्ही या कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध वृत्तवाहिनीवर हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.
     प्रशासनाने सदर मशिदी पाडू नयेत, म्हणून धर्मांधांनी नगरपरिषद अधिकार्‍यांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. (धर्मांधांनी केलेले आक्रमण प्रशासन निमूटपणे सहन करत असल्यानेच धर्मांध मुजोर बनत चालल्याचे हे द्योतक नव्हे का ? - संपादक)
संपूर्ण वृत्तांत पुढीलप्रमाणे

१. द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रायचूर शहरातील झाकीर हुसेन चौक आणि सुपरमार्केट चौक यांमधील रस्ता रुंदीकरणासाठी नगरपरिषदेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिक आणि धार्मिक इमारती पाडण्याचा निर्णय घेतला होता.
२. त्यासाठी व्यावसायिकांना, तसेच एक मंदिर अन् दोन मशिदी यांच्या व्यवस्थापनांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. याशिवाय त्यांच्याशी चर्चाही झाली होती. सदर दोन मशिदींपैकी एक मिनार की मस्जिद नावाची शहरातील प्रसिद्ध मशीद आहे.

इसिसची शीख महिला हस्तक देहलीत आक्रमण करू शकते ! - गुप्तचर विभागाची चेतावणी

      देहली - इसिसची हस्तक असणारी कॅनडामधील ३५ वर्षीय शीख महिला देहलीत बॉम्बस्फोट घडवून आणू शकते, अशी चेतावणी गुप्तचर विभागाने दिली आहे. आतंकवाद्यांचे हस्तक देहलीत घुसले असल्याचेही गुप्तचर विभागाने सांगितले आहे.


परंपरा घटनेपेक्षा मोठी आहे का ? - सर्वोच्च न्यायालय

परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत, तर राज्यघटना अवघ्या
६७ वर्षांपासून कार्यरत आहे. घटनेचे श्रेष्ठत्व वादातीत असून जनतेच्या
धार्मिक भावनांशी निगडित परंपरांचे महत्त्वही जपले गेले पाहिजे.
      नवी देहली - परंपरा ही घटनेपेक्षाही मोठी आहे का, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने १२ एप्रिल या दिवशी शबरीमला मंदिर न्यायाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अधिवक्त्यांना विचारला.
१. मासिक पाळी चालू असलेल्या महिलांना केरळमधील शबरीमला मंदिरात प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर न्या. पिनाकी चंद्र घोष आणि न्या. एन्.व्ही. रमण यांच्या पिठासमोर सुनावणी चालू आहे.
२. १२ एप्रिलला सुनावणी चालू असतांना न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणात लिंगभेद करणे अस्वीकारार्ह आहे.
३. महिलांना देवतांची पूजा करण्यास मनाई करण्याचा काय अधिकार आहे ? कोणीही देवाची पूजा करू शकतो, तो सर्वव्यापी आहे. (धर्मशास्त्रातील अधिकार धर्माचार्यच जाणतात. त्यामुळे धार्मिकतेमधील अधिकारांविषयी त्यांचेच मत विचारणे सयुक्तिक ठरते. - संपादक)


कन्हैय्या कुमारने नागपूरमध्ये पाय ठेवला, तर त्याचे पाय तोडू ! - बजरंग दलाची चेतावणी

      नागपूर - जेएन्यूतील विद्यार्थी कन्हैय्या कुमारच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन येत्या १४ एप्रिल या दिवशी धनवटे नॅशनल कॉलेज येथे करण्यात आले आहे; परंतु कन्हैय्या हा देशद्रोही असून आमचा त्याच्या भाषणाला आणि त्यालाही विरोध आहे. जो देशाचे तुकडे करा, अशी वक्तव्ये करतो, जो भारतीय सैनिकांना बलात्कारी म्हणतो, त्याला आम्ही नागपुरात पायसुद्धा ठेवू देणार नाही. त्याने शहरात पाय ठेवला, तर त्याचे पाय तोडू, अशी चेतावणी बजरंग दलाचे शहर संयोजक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे. ते दलाने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. शर्मा म्हणाले की, शहरातील काही लोक स्वार्थाकरिता कन्हैय्यासारख्यांना प्रोत्साहन देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. त्याला शहरात प्रवेश नाकारावा, असे निवेदन आम्ही शहर पोलिसांना देणार आहोत. तसेच हा कार्यक्रम धनवटे नॅशनल कॉलजने रहित करावा, असेही निवेदन आम्ही या महाविद्यालयाच्या प्रशासनाला देणार आहोत. असे करूनही हा कार्यक्रम झाल्यास शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल आणि त्याला पोलीसच उत्तरदायी असतील.

अंधेरी येथील शोभायात्रेत हिंदु राष्ट्राच्या घोषणा देण्यास पोलिसांचा विरोध

अशा देशद्रोही पोलिसांना घरी बसवा !
      मुंबई - गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा समितीकडून अंधेरी पश्‍चिम येथील अंबोली ते जीवन नगर अशा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात ३५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. या फेरीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सिमीत सरमळकर आणि हिंदुत्ववादी श्री. संतोष शिंदे हिंदु राष्ट्राच्या समर्थनार्थ लाना होगा लाना होगा हिंदू राष्ट्र लाना होगा । आतंकवाद को मिटाने हिंदू राष्ट्र लाना होगा, अशा घोषणा देत होते. यास पोलिसांनी विरोध केला.

कच्छ (गुजरात) मध्ये २० ते २५ धर्मांध युवकांकडून राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर आक्रमण !

संघाच्या शाखेकडे डोळे वर करून बघण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही, 
असा दरारा संघाने निर्माण करावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
      कच्छ - कच्छच्या जिकडी गावात रा.स्व. संघाच्या शाखेत भारतमाता की जय घोषणा चालू असतांना २० ते २५ सशस्त्र धर्मांध युवकांनी आक्रमण केले आणि भगवा ध्वज फाडला. या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी ३ धर्मांधांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. जिकडी पंचायतचे सरपंच भीमजी राव खासा यांनी धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

सनातनच्या साधकांच्या तपश्‍चर्र्येमुळे पुढे हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल, याची खात्री वाटत आहे ! - ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.
शनिशिंगणापूर येथील ४०० वर्षांच्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्याची मुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष यांच्याकडे मागणी : शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (बसलेले) यांना निवेदन देतांना रणरागिणी 
शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर (१) आणि शनिशिंगणापूर येथील महिला
       मुंबई - श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे चौथर्‍याखालून दर्शन घेण्याची ४०० वर्षांची परंपरा मोडल्याने गावातील वयोवृद्ध माणसे जेवण घेत नाहीत. गाव दु:खात आहेत. स्थानिक आणि आजूबाजूची गावातील एकही महिला चौथर्‍यावर चढलेली नाही. शासनाने काहीही करून पूर्वापार चालत आलेली चौथर्‍याखालून शनिदेवाचे दर्शन घेण्याची धार्मिक प्रथा पुन्हा चालू करावी अन्यथा लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, अशी आग्रही मागणी शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थ महिला आणि रणरागिणी या हिंदु जनजागृती समितीच्या महिला शाखेने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री श्री. एकथान खडसे आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून केली.
नेवासा येथील भाजपचे आमदार श्री. मुरुकटे 
यांच्याशी चर्चा करतांना कार्यकर्ते
     या वेळी रणरागिणी शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देवस्थानातील धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी शासनाने केरळ शासनाप्रमाणे भूमिका घ्यावी, या मागणीचे निवेदन दिले.

महालक्ष्मी मंदिरातील गर्भकुंडीत महिला आणि पुरुष यांना प्रवेश बंदी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा दिवाणी न्यायालयात याचिका

      कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मंदिर प्रवेशावरील निर्णयाचा हवा तसा अर्थ काढून मंदिर प्रवेशाचा निर्णय घेतला जात आहे. यासंदर्भात कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरातील गर्भकुंडीत महिला आणि पुरुष यांना प्रवेश करण्यास बंदी करावी, अशी मागणी करणारी याचिका येथील हक्कदार अन् श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्‍वर आणि श्री महालक्ष्मी देवीचे भक्त श्री. शिवकुमार शिंदे यांनी दाखल केली आहे. याची माहिती १२ एप्रिल या दिवशी येथे एका पत्रकार परिषदेत श्री. मुनीश्‍वर यांनी दिली. या वेळी अधिवक्ता प्रसन्न मालेकर, अधिवक्ता ओमकार गांधी आदी उपस्थित होते. या व्यतिरिक्त ऑगस्ट २०१५ मध्ये पुरातत्व खात्याने अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन केल्यावर मूर्तीवर अल्प वजनाचे दागिने आणि फुले घालण्यासह गर्भकुंडीत ५ पेक्षा अधिक व्यक्तींचा वावर नसल्याचे आदेश दिले होते; मात्र ८ महिन्यांनंतरही त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष, करवीरनिवासीनी हक्कदार श्रीपूजक मंडळ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र शासन, तसेच पुरातत्व खात्याचे साहाय्यक संचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. तसेच या सदंर्भात कुणीही बाजू मांडू शकतो, असे मुनीश्‍वर यांनी सांगितले.

माता अमृतानंदमयी मठाकडून व्यापक स्तरावर साहाय्य घोषित

अशा प्रकारे अन्य धर्मीय संघटना शुद्ध हेतूने (धर्मांतर करण्याच्या कुटील हेतूने नव्हे) 
साहाय्य करत असल्याचे कधी ऐकिवात नाही !
केरळच्या प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात आग लागल्याचे प्रकरण
     कोल्लम (केरळ), १२ एप्रिल - परावूर येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात ११ एप्रिल या दिवशी लागलेल्या भीषण आगीत ११० भाविकांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनुमाने ३०० भाविक घायाळ झाले. या दुर्दैवी घटनेविषयी तीव्र दु:ख व्यक्त करून प्रसिद्ध समाजसेवी आणि संत माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) म्हणाल्या, शासन आणि मंदिर समित्यांनी एक तर फटाक्यांचा मंदिरातील वापरावर संपूर्ण बंदी आणावी अथवा त्यांच्या वापरावर कठोर नियम लावायला हवेत. अम्मांनी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि घायाळ झालेल्यांना अर्थसाहाय्यही घोषित केले.

केरळ येथे झालेल्या महाभारतम् धर्मरक्षा संगमाला (धर्मसभेला) लक्षावधी हिंदूंची उपस्थिती

     कोझिकोड (केरळ) - केरळच्या कोझिकोड शहरात हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी महाभारतम् धर्मरक्षा संगम या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेला लक्षावधी हिंदू सहभागी झाले होते. कोझिकोड शहरातील समुद्रकिनार्‍यावर भरलेल्या या भव्य धर्मसभेने जगाला हिंदूंची शक्ती आणि ऐक्याचे दर्शन करून दिलेे. त्यामुळे केरळमधील हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही धर्मसभा महत्त्वाची ठरली आहे. 
१. चिन्मय मिशन, श्री रामकृष्ण मिशन, माता अमृतानंदमयी मठ, कोलाथूर अद्वैत आश्रम यांसारख्या आध्यात्मिक संघटना, तसेच धर्मरक्षा वेदी, हिंदु मुन्नानी, धर्मजागरण मंच, विहिंप यांसारख्या हिंदुत्ववादी संघटना यांनी या धर्मसभेचे आयोजन केले होते.

तिरुपती येथील अनधिकृत इस्लामिक विश्‍वविद्यालयाच्या बांधकामाच्या विरोधात कारवाई करावी ! - हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषदेत मागणी

पत्रकारांना संबोधित करतांना (डावीकडून दुसरे)
श्री. चेतन जनार्दन आणि अन्य हिंदुत्ववादी
     तिरुपती - तिरुपती येथील पवित्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात इस्लामिक विश्‍वविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. या परिषदेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुब्बा रेड्डी आणि उपजिल्हाधिकारी हिमांशु शुक्ला यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु चैतन्य समितीचे श्री ओमकार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन, हिंदु धर्मं रक्षा समन्वय समितीचे श्री. दुर्गा प्रसाद आणि हिंदु सेवा समितीचे श्री. राधा मनोहर दास उपस्थित होते.

भारतमाता की जय हा राजकारण्यांनी निर्माण केलेला वाद ! - भाजप नेते एम्.जे. अकबर

     तिरूवनंतपुरम् - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांकडून भारतमाता की जय घोषणेवरून जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्यात आला आहे. देशातील दारिद्य्र आणि उपासमार दूर करण्यासाठी आणि विकासासाठी प्रयत्नशील असणार्‍या शासनाचे लक्ष्य विचलित करण्यासाठी हे केले जात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ता एम्.जे. अकबर यांनी ८ एप्रिल या दिवशी तिरूवनंतपुरम् येथे केले. ते भाजपच्या एका कार्यक्रमात असहिष्णुता आणि प्रसिद्धीमाध्यमे या विषयावर बोलत होते. असहिष्णुतेवरील वाद हा राजकारण्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केला असल्याचेही त्यांनी सांगितले.पाकमध्ये आतंकवाद्यांचे शासन ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

पाकशी मैत्री करू पहाणार्‍या सर्वपक्षीय शासनांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     नवी देहली - पाकिस्तानमधील तथाकथित लोकशाही शासन बनावट आहे. तेथे सैन्य आणि आतंकवादी यांचे शासन आहे, अशी टीका भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनी केली आहे. भारताबरोबरील शांतता प्रक्रिया तूर्त स्थगित असल्याचे वक्तव्य पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले होते. पठाणकोट प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी भारतीय अन्वेषण पथकाला पाकिस्तान दौर्‍याची अनुमती देण्याची शक्यताही फेटाळून लावली होती. या पार्श्‍वभूमीवर डॉ. स्वामी बोलत होते.

हिंदूंनी संघटना आणि जातीपातीची वल्कले काढून एकत्र आल्यास हिंदु राष्ट्र जवळ ! - अभय वर्तक

श्री. अभय वर्तक मार्गदर्शन करतांना, व्यासपिठावर डाव्या बाजूने
श्री. प्रशांत बेल्हेकर, ह.भ.प. कल्याणजी महाराज, श्री. सचिन कामकाटे
     

भाजप राममंदिराच्या सूत्रावर उत्तरप्रदेशची निवडणूक लढणार नाही ! - केशव प्रसाद मौर्य, भाजप प्रदेशाध्यक्ष

हिंदूंनी आता साधना करून आत्मबळ वाढवण्याच्या प्रयत्नांस लागावे. तसे करून
राजकीय पक्ष नव्हे, तर ईश्‍वरच श्रद्धेचे प्रश्‍न सोडवतो, याची प्रचीती येईल !
  • राममंदिराच्या सूत्रावर निवडणूक न लढवल्याने हिंदूंची पुन्हा फसवणूक होण्यापासून सुटका झाली, असेच म्हणावे लागेल !
  •  राममंदिराचे सूत्र घेऊन निवडणूक लढवणार्‍यांनी आतापर्यंत मंदिराची पुनर्उभारणी का केली नाही, याचे हिंदूंना उत्तर द्यावे !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - राम आणि राममंदिर हे राजकारणाचे सूत्र नसून, श्रद्धेचा विषय आहे. २०१७ मध्ये होणार्‍या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आमचे विकास हेच सूत्र असेल. राम मंदिराच्या सूत्रावर आम्ही लढणार नाही, असे विधान उत्तरप्रदेश भाजपचे दायित्व सांभाळल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करतांना केशव प्रसाद मौर्य यांनी केले. मौर्य पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये परिवारवादी शासन आहे. तसेच बसप जातीवाद पसरवणारा व्यक्तिनिष्ठ पक्ष आहे. त्यामुळे आता आम्हाला उत्तरप्रदेशला या दोन्ही पक्षांपासून मुक्त करावे लागेल.

हिंदूंनी स्वाक्षरीच्या माध्यमातून संघटित व्हावे ! - शरद गवळी, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान

कल्याण (पूर्व) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

      ठाणे -
आपण हिंदु आहोत. आपल्या हिंदूंचे मंदिर अयोध्या येथे आहे. तेथे आपल्याला एकत्रित येऊन पूजन करण्याची संधी मिळावी, ही एकच मागणी आहे. श्रीराम मंदिराला कायदा असूनही संमती मिळत नाही. त्यामुळे हिंदूंनो स्वाक्षरीच्या माध्यमातून संघटित होऊया. एकत्र आल्यासच देश घडेल, असे प्रतिपादन श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे श्री. शरद गवळी यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनात अनेक हिंदुत्ववाद्यांचा सहभाग होता. सहभागी हिंदुत्ववादी संघटनांनी, श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीराम जन्मभूमीच्या स्थानावर श्रीरामाची पूजा करण्यास अनुमती मिळावी आणि महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कर्नाटक शासनाने अर्थसंकल्पात केवळ अल्पसंख्यांसाठी केलेली आर्थिक तरतूद बंद करावी, अशा मागण्या केल्या.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
निधर्मी राममंदिराला चुकीचे ठरवत आहेत ! - डॉ. उपेंद्र डहाके, अध्यक्ष, भाजप
     रामनवमीला संपूर्ण हिंदूंसाठी श्रीराम मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात यावे. वाल्मिकी कांडातही रामजन्माचा उल्लेख आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेत सनातनचा बालसाधक कु. यशराज देशमुख सातारा जिल्ह्यात प्रथम !

कु. यशराज देशमुख
या सुयशाविषयी कु. यशराज देशमुख याचे अभिनंदन !
      सातारा - येथील सनातनचा बालसाधक कु. यशराज सूर्यकांत देशमुख (वय ७ वर्षे) याने जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तो इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून त्याने या परीक्षेत १०० पैकी ९६ गुण प्राप्त केले आहेत. या यशामुळे त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. यशराजने या यशाचे सर्व श्रेय सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिले आहे. मिळोल्या यशाविषयी श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत त्याने पुष्कळ साधना करून संत होण्याचा मानसही व्यक्त केला.


नगर येथील काँग्रेसचे निलंबित जिल्हाध्यक्ष आणि त्यांची मुले यांना खून प्रकरणात जन्मठेप

गुन्हेगारांचा भरणा असलेला काँग्रेस पक्ष ! घटनेमुळे काँग्रेसवर बंदीची मागणी का करू नये ?
     नगर, १२ एप्रिल - शहरात बहुचर्चित ठरलेल्या अशोक लांडे खूनप्रकरणी येथील न्यायालयाने काँग्रेसचे निलंबित जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर आणि अमोल कोतकर या ३ मुलांना दोषी ठरवले आहे. या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्नील पवार आणि वैभव अडसूळ यांना न्यायालयाने २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली, तर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. 

साखर कारखान्यांना पाणी दिल्यानेच लातूरमध्ये पाणी समस्या ! - सुभाष देसाई

लातूर येथे पाण्याअभावी ७९ उद्योग बंद, ३ सहस्र ७४१ कामगारांवर उपासमारीची वेळ 
     मुंबई, १२ एप्रिल (वार्ता.) - भीषण पाणीटंचाईच्या काळात लातूरचे उद्योग अंशत: बंद झाले असून ३ सहस्रांहून अधिक कामगार रोजगारविहीन झाले आहेत. सध्या पिण्याचे पाणी जिल्ह्यातील १२ ते १४ साखर कारखान्यांना दिल्यानेच लातूरकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला. 

हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या मलेशिया दौर्‍यावर बंदी घालण्याची तेथील हिंदूंची मागणी !

      कुआलालंपूर (मलेशिया) - मलेशियातील हिंदुत्वनिष्ठ आणि सेवाभावी संस्था हिंदराफ मक्कल सक्थी या संघटनेने मलेशियाच्या शासनास पत्र पाठवून डॉ. झाकीर नाईक या हिंदुद्वेषी विचारवंत मलेशियामध्ये प्रवेश करू देऊ नये, अशी मागणी केली आहे. (मलेशियासारख्या मुसलमानबहुल देशात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात सतर्क असणार्‍या हिंदराफ मक्कल सक्थी या संघटनेचे अभिनंदन ! - संपादक)
     या संघटनेचे अध्यक्ष श्री. पी. वायथामूर्ती यांनी सदर पत्रात लिहिले आहे की, 
१. धर्मांध झाकीर नाईक हे सर्वसमावेशक समाजाला लागलेली विषारी लागण असून त्यांची तुलना प्लेग रोगाशीच करता येईल. 
२. झाकीर नाईक यांची मलेशियातील तेरेन्ग्गानु या राज्यात प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.

हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! - किरण दुसे

डावीकडून श्री. किरण दुसे आणि आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे
पीरानावाडी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा
      बेळगाव - हिंदूंवर अनेक संकटे येत आहेत. हिंदु धर्मावर होणारे आक्रमण वाढतच चालले आहे, तसेच हिंदूंमधील असंघटितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. हिंदूंचे सक्षम संघटन झाले, तर हिंदु धर्म टिकून राहील आणि त्यासाठी धर्मशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे. आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्र, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी १० एप्रिल या दिवशी पीरानावाडी, बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत केले. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे याही उपस्थित होत्या.
     पीरानावाडी या गावातील धर्माभिमानी युवकांनी सभेचे सर्वतोपरी दायित्व घेऊन सभेसाठी अथक परिश्रम केले. २५० हून अधिक धर्माभिमानी या सभेसाठी एकत्रित केले. सभेची सर्व व्यवस्था याच युवकांनी पुढाकार घेऊन केली.
     आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी धर्मांतर, गो-हत्या, लव्ह जिहाद या धर्मावरील संकटांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

धर्मांतरासारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात लढण्यासाठी गोव्यात भारतीय संस्कृती रक्षा समितीची स्थापना !

       पणजी - ख्रिस्त्यांकडून विशेषत: बिलिव्हर्स पंथियांकडून गोव्यातील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. अशा पद्धतीचे भारतीय संस्कृतीवर सतत होणारे आघात लक्षात घेऊन भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी राज्यातील धर्माभिमानी युवकांनी भारतीय संस्कृती रक्षा समिती या संघटनेची स्थापना केली आहे, अशी माहिती या समितीचे अध्यक्ष श्री. विनय तळेकर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी या समितीचे श्री. माधव विर्डिकर आणि श्री. शैलेंद्र वेलिंगकर, धर्माभिमानी सौ. राजश्री गडेकर उपस्थित होत्या.
     श्री. विनय तळेकर म्हणाले, बिलिव्हर्सपंथियांनी राज्यात उच्छाद मांडला आहे. बांबोळी आणि अन्य ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांत धर्मांतराचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. हे प्रकार रोखणे हे भारतीय संस्कृती रक्षा समितीचे मुख्य ध्येय असेल. अन्य समविचारी संघटनांच्या साहाय्याने बिलिव्हर्सवाल्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत.

९७ कोटींच्या औषध खरेदी घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अन्वेषण करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

विशेष प्रतिनिधी श्री. संतोष पाटणे 
     मुंबई, १२ एप्रिल (वार्ता.) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या रुग्णालयांसाठी करण्यात येत असलेल्या औषधांच्या खरेदीत २९७ कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अन्वेषण करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. या वेळी मुंडे यांनी खरेदीतील साबण, तेल, पावडर यांसारख्या वस्तू सदनात प्रत्यक्ष सादर केल्या. अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना त्यांनी वरील मागणी केली. मुंडे पुढे म्हणाले, ही सर्व खरेदी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने होत असल्याने या सर्वांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

पंतप्रधानांना देण्यासाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतून प्रशासनाकडे ९ सहस्र ७५० स्वाक्षर्‍यांचे निवेदन सादर

श्रीरामनवमीला श्रीरामजन्मभूमीवर पूजेसाठी हिंदूंना विशेष अनुमती द्या !
भुसावळ येथील तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी
नंदुरबार येथे अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदू

     जळगाव, १२ एप्रिल (वार्ता.) - श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार हिंदूंना नाकारला जात आहे. केंद्रशासनाने विशेषाधिकार वापरून येत्या रामनवमीला म्हणजे १५ एप्रिल २०१६ या दिवशी श्रीरामजन्मस्थळी पूजा करण्याची अनुमती हिंदूंना द्यावी, अशी मागणी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील ९ सहस्र ७५० धर्माभिमानी हिंदूंनी स्वाक्षर्‍या केलेल्या निवेदनासह पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. मुंबईला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद पानसरे यांनी ४८ सहस्र २४० धर्माभिमानी हिंदूंच्या स्वाक्षर्‍या केलेले निवेदन नुकतेच सुपुर्द केले होते. संपूर्ण देशभरातून यंदा लाखो रामभक्त हिंदूंनी शासनाकडे ही मागणी केली आहे. 

(म्हणे), '(अंध)श्रद्धा निर्मूलन समिती महिलांच्या मंदिर प्रवेशाचा लढा देणार !'

मुळातच ज्यांना देवच मान्य नाही, त्यांनी मंदिर प्रवेशाचे 
आंदोलन करणे, हे हास्यास्पद आणि बौद्धिक दिवाळखोरीचेच लक्षण ! 
स्वतःचे विचार आणि धोरणे यांचा गोंधळ असलेल्या (अंध)श्रद्धा निर्मूलन समितीचे नवे आंदोलन ! 
     पुणे, १२ एप्रिल - महिलांना मंदिरात प्रवेश देणे, हा त्यांना धर्मश्रद्धेकडे नेण्याचा प्रकार अथवा वैचारिक गोंधळ नसून समता आणि संवैधानिक यांचा लढा आहे. सर्व धर्मातील प्रार्थना स्थळांवर महिलांना प्रवेश मिळायला हवा. त्यासाठी (अंध)श्रद्धा निर्मूलन समिती मंदिर प्रवेशाचा लढा देणार असल्याची माहिती समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी ११ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. 

गरिबी नव्हे, तर इस्लामची विचारसरणीच तरुणांना कट्टरवादी बनवते ! - माजी जिहाद्याची स्पष्टोक्ती

गरिबीमुळे मुसलमान आतंकवाद्याकडे वळतात, असे म्हणणार्‍यांना चपराक !
     लंडन - कट्टरवादी मुल्ला-मौलवींनी प्रसारित केलेली इस्लामची जिहादी विचारसरणीच तरुणांना कट्टरवादी बनवते. कट्टरवादी बनण्यात गरिबी निरक्षरता इत्यादी सूत्रे लागू पडत नाहीत, अशी स्पष्टोक्ती आदम दीन या माजी जिहादी तरुणाने एका वृत्तपत्रास दिली आहे. आदम दीन हा अल-मुहाजीरौन या आतंकवादी संघटनेचा सदस्य होता. या संघटनेने इंग्लंडमध्ये ७७ आतंकवादी कारवाया केल्या असून त्यांतील २० घटनांत आदमचा सहभाग होता.

इसिसच्या आतंकवाद्यांची युरोपमध्ये घुसखोरी !

     लंडन - युरोपमध्ये लक्षावधीच्या संख्येने येणार्‍या मुसलमान निर्वासितांसमवेत इसिसचे आतंकवादीही प्रवेश करत असल्याचे युरोपियन युनियनच्या सीमा सुरक्षेच्या संदर्भातील संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या युरोपमध्ये सिरिया तसेच पश्‍चिम आशियातून मोठ्या संख्येने येत असलेल्या मुसलमान निर्वासितांना सामावून घेण्यासाठी तुलनात्मकदृष्ट्या सीमारेषेवरील पडताळणीचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्याचा अपलाभ हे आतंकवादी घेत आहेत. पॅरिसमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणातील आतंकवादी अशा प्रकारे घुसले होते, हे यात नमूद करण्यात आले आहे.

युरोपमधील जिहाद्यांची राजधानी समजल्या जाणार्‍या मोलेनबीकमध्ये इस्लामविरोधी मोर्च्याला पोलिसांनी अनुमती नाकारली !

     ब्रुसेल्स (बेल्जियम) - ब्रुसेल्सच्या राजधानी क्षेत्रात असलेल्या वादग्रस्त मोलेनबीक परिसरात इस्लामविरोधी मोर्च्याला पोलिसांनी नुकतीच अनुमती नाकारली. त्यामुळे आंदोलक हिंसक होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे तेथे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. 
      मोर्च्यावरील बंदीचा निषेध करण्यासाठी शेकडो लोक मोलेनबीकमध्ये जमा झाले होते. पोलिसांनी मोर्च्याच्या जवळपास १०० समर्थकांना अटक करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. युरोपमधील जिहाद्यांची राजधानी अशी सध्या मोलेनबीकची ओळख झाली आहे. ब्रुसेल्स आणि पॅरिस येथील आक्रमणातील आरोपींचा मोलेनबीकशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. पॅरिसवरील आक्रमणातील एकमेव जिवंत आतंकवादी सलाह आब्देस्लाम याला २२ मार्च या दिवशी झालेल्या ब्रुसेल्स बॉम्बस्फोटांच्या ४ दिवसांपूर्वी मोलेनबीक येथूनच अटक करण्यात आली होती.

चोपडा (जळगाव) येथे १३ एप्रिलला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विराट धर्मसभा

पत्रकार परिषदेत माहिती
      चोपडा - आज संपूर्ण भारतात आतंकवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, महागाई, बलात्कार, धर्मांतर, गो-हत्या, पाकिस्तान-बांगलादेश यांची घुसखोरी इत्यादी समस्या भेडसावत असून देशाला आतंकवादाचा धोका निर्माण झाला आहे. हिंदूंमध्ये धर्मभिमान वाढावा, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ एप्रिल या दिवशी सायंकाळी पाच वाजता यावल रोडवरील शबरी धाम या ठिकाणी विराट हिंदु धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे, याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्रेयस पिसोळकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी चोपडा येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. यशवंत चौधरी, श्री. अनिल पाटील, ह.भ.प. प्रसाद महाराज उपस्थित होते.

पुण्यातील बहुतांश मंदिरे फायर ऑडिटविना

      पुणे - शहरातील इस्कॉन मंदिर वगळता अन्य कोणत्याही मंदिराचे फायर ऑडिट झालेले नाही. हे ऑडिट कायद्यान्वये बंधनकारक असूनही एकाही मंदिराचे व्यवस्थापन किंवा मालक यांनी ते करवून घेतल्याचे प्रमाणपत्र अग्नीशमन दलाकडे सादर केलेले नाही. त्यामुळे केरळ येथे मंदिरामध्ये लागलेल्या आगीप्रमाणे एखादी दुर्घटना घडल्यास त्या वेळी पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसेल, अशी स्थिती आहे. पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, शहरातील सर्व मंदिरे, मठ यांच्या व्यवस्थापनाने हे ऑडिट करवून घेण्याचे आवाहन केले आहे, तसेच ते अनुज्ञप्तीधारक (परवाना) एजन्सीद्वारे करवून अग्नीशमन यंत्रणेची व्यवस्था आणि कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी, असे सांगितले आहे.


सुधारित 'डान्सबार विधेयक' विधानसभेत एकमताने संमत !

अश्‍लील नृत्यास प्रोत्साहन दिल्यास ५ वर्षे कारावास आणि २५ लक्ष रुपयांचा दंड 
     मुंबई, १२ एप्रिल (वार्ता.)- राज्य मंत्रीमंडळाने संमत केलेले सुधारित 'डान्सबार विधेयक' ११ एप्रिल या दिवशी विधान परिषदेत संमत झाल्यानंतर हे विधेयक विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकावर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीने आपला अहवाल शासनाला दिला होता. त्यानंतर शासनाने हा अहवाल मंत्रीमंडळासमोर ठेवला. मंत्रीमंडळाने शेवटी सुधारित विधेयकाला संमती दिल्यावर ते दोन्हीकडे संमत करण्यात आले. त्यामुळे त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या सुधारित विधेयकात मद्यालयातील नृत्यावरील अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. 

चोपडा येथे छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन साजरा !

बलीदान दिन साजरा करतांना कार्यकर्ते
     चोपडा - येथील शिवाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिन साजरा करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यापर्ण बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष प्रवीण जैन यांच्या हस्ते करण्यात आले. समितीचे श्री. अनिल पाटील यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले. या वेळी शिवसेना युवा शहराध्यक्ष प्रदीप बारी, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष दिव्यांक सावंत, स्वराज्य निर्माण सेनेचे सुनील सोनगिरे, समितीचे कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते. 

बांगलादेशी घुसखोरास कुडाळ येथे अटक : पोलीस कोठडीत रवानगी

  • लाच देऊन सीमेवरून केला भारतात प्रवेश 
  •  दोन साथीदार फरार 
     कुडाळ - कुडाळ रेल्वेस्थानक परिसरात फिरणारा जोई सॅम्युअल अब्राहम (वय २२ वर्षे, रा. नॉर्थ ढाका, बांगलादेश) या तरुणास पोलिसांनी १० एप्रिल या दिवशी अटक केली. त्याच्या विरोधात विनाअनुमती देशात घुसखोरी केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. अब्राहम याला न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार नोकरीच्या शोधात तो भारतात आल्याचे समजते. त्याचे दोन साथीदार मात्र फरार आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून घुसखोरीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आवश्यक ती सर्व चौकशी चालू केली आहे. या तरुणाने भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षायंत्रणेला दलालांमार्फत पैसे देऊन भारतात प्रवेश केल्यामुळे आपली सुरक्षायंत्रणा किती ढिसाळ आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

पनवेल येथील पेट्रोल पंपाला आग

     पनवेल - पनवेलमधील आसूडगाव येथील व्हिक्टोरिया पेट्रोल पंपाला १२ एप्रिल या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आग लागली. पेट्रोल पंपावर दोन गाड्यांमधून टँकमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्याचे काम चालू असतांना ही दुर्घटना घडली. 

हिंदूंनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी धर्मरक्षण करणे अत्यावश्यक ! - महर्षि श्री श्री आनंद गुरुजी

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभा
व्यासपिठावर उपस्थित डावीकडून कु. भव्या गौडा, अधिवक्ता अमृतेश
एन्.पी., सभेला संबोधित करताना महर्षि श्री श्री आनंद गुरुजी आणि
हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर
      बेंगळुरु, १२ एप्रिल (वार्ता.) - राष्ट्रीय समस्या आपल्याला आपल्या वाटल्या पाहिजेत. केवळ मनोरंजनात रममाण होणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय नाही. प्रत्येक हिंदूने धर्माचरण करण्यास प्रारंभ करायला हवा. त्यानेच धर्मरक्षण होणे संभव आहे. जर आपण राष्ट्र आणि धर्म यांकडे दुर्लक्ष करत राहिलो, तर पुढील २ पिढ्यांना आपल्याला भारत माता की जयचा जयघोष करणे ही अशक्य होईल. आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी धर्मरक्षण करणे अत्यावश्यक झाले आहे, असे प्रतिपादन महर्षि श्री श्री आनंद गुरुजी यांनी केले. बेंगळुरूमध्ये हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला संबोधित करतांना गुरुजी बोलत होते. शहरातील अच्चुकट्टू क्षेत्रात असलेल्या चेन्नम्माकेरे येथे अन्नपूर्णा कल्याण मंडपात या धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

वाद्यांच्या गजरांत श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मार्गस्थ !

उज्जैन सिंहस्थपर्व
पेशवाईचे स्वागत करतांना भाविक
    उज्जैन, १२ एप्रिल - उज्जैन सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये ११ एप्रिलला श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची तिसरी पेशवाई मिरवणूक भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. 
१. सकाळी १० वाजता हरसिद्धी मार्गावरील चारधाम मंदिर परिसरापासून श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मिरवणूक वाद्यांच्या गजरात आणि उपस्थित संतमहंतांवर पुष्पवृष्टी होत आरंभ झाली.

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकमध्ये एका मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे उघड !
     रायचूर (कर्नाटक) येथील नगरपरिषदेने रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी एक मिनार की मस्जिद नावाच्या मशिदीचा काही भाग पाडला. तेव्हा मशिदीच्या भिंतींचा गिलावा निघाल्यावर त्यावर हिंदूंच्या देवतांची, तसेच हिंदूंची धार्मिक चिन्हे चित्रित करण्यात आली असल्याचे उघड झाले.
हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :  Raichur (Karnatak)ki Ek minarki masjidko anshatah giranepar vaha mandirke avshesh mile
Mandir girakar masjid bananeka kya yah pratinidhik udaharan hai ?

जागो ! : 
रायचूर (कर्नाटक) की एक मीनार की मस्जिद को अंशत: गिराने पर वहां मंदिर के अवशेष मिले !
मंदिर गिराकर मस्जिद बनाने का क्या यह प्रातिनिधिक उदाहरण है ?
     'ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव !'
(साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वार व वेळ : बुधवार, १३ एप्रिल २०१६, सायं. ५.३० वाजता
स्थळ : श्री दत्तमंदिर-कल्याणफाटा प्रवेशद्वारासमोर, 
मुंब्रा-पनवेल मार्ग, कल्याणफाटा, ठाणे. 
संपर्क : ९२२१०६७७७७/९८२०५५७३७६/ ९८२१८४७७२८ 
 हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! 

आंदोलनातील मागण्या 
  • श्रीराम नवमीच्या दिवशी (१५ एप्रिल २०१६) श्रीराम जन्मभूमीस्थानावर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती मिळावी !
  •  महाराष्ट्रात लागू झालेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी ! 

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 'इस्लामिक स्टेट'चा आतंकवाद विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १७ एप्रिल २०१६ 
पृष्ठ संख्या : १० 
मूल्य : ५ रुपये 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
१६ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

हरियाणा आणि राजस्थान येथे हिंदु नववर्षाच्या निमित्ताने हिंदुत्ववाद्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

गुढीचे पूजन करतांना आसंदीवर बसलेल्या डावीकडून
सनातनचे संत पू. (सौ.) सूर्यकांता मेनराय
आणि पू. भगवंतराय मेनराय
फरीदाबाद (हरियाणा)
हिंदु जनजागृती समितीच्या 
वतीने गुढीपूजन
     फरीदाबाद (हरियाणा) - हिंदु नव वर्षानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शिव शक्ति मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्ष साजरे करण्याचे महत्त्व, गुढी उभारण्याचे महत्त्व इत्यादी माहिती देण्यात आली. या वेळी सनातनचे पू. भगवंतराय मेनराय आणि पू. (सौ.) सूर्यकांता मेनराय यांच्या शुभहस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.

रामजन्मभूमीच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती मिळावी ! - धर्माभिमानी हिंदू

जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
जंतरमंतर येथे आंदोलन करताना हिंदू 
     नवी देहली - ३० सप्टेंबर २०१० या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये अयोध्येत वादग्रस्त ठिकाणी रामजन्मभूमी असून तेथे श्रीराम मंदिर असल्याचे म्हटले होते; मात्र अजूनही हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती मिळालेली नाही. येत्या १५ एप्रिल या दिवशी श्रीराम नवमी आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व हिंदूंना पूजन करण्याची विशेष अनुमती मिळावी, तसेच कर्नाटक शासनाकडून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद रहित करावी या मागण्यांसाठी ९ एप्रिल या दिवशी येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये हिंदु लीगल सेल, हिंदू महासभा, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह अनेक धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.

तृप्ती देसाई यांनी मुसलमान महिलांना मशिदीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा !

प्रसिद्ध चित्रपट गायक अभिजीत यांचे तृप्ती देसाईला आवाहन
     मुंबई - मुसलमान महिलांनाही मशिदीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन प्रसिद्ध चित्रपट गायक अभिजीत यांनी तृप्ती देसाई यांना केले आहे. 
    गायक अभिजीत म्हणाले, एकतर तिने नौटंकी (नाटक) करणे सोडावे किंवा मुसलमान महिलांसाठी संघर्ष करावा. ज्यांना बलपूर्वक बुरखा घालावा लागतो. अनेक दर्गे आणि मशिदी यांठिकाणी महिलांना प्रवेश निशिद्ध आहे. जर तृप्ती देसाई मुसलमान महिलांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार असतील, तर मीही त्यांना या कामी साहाय्य करण्यास सिद्ध आहे, असेही अभिजीत म्हणाले.

त्यांच्या नशिबी पोस्टाचे तिकीटही नाही !

हिंदुस्थानचा एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे !
श्री. संजय राऊत
       सध्या नागरी पुरस्कार कुणालाही मिळतात. केंद्रातील शासन पालटले की, त्यांच्या विचारांचे लोक पुरस्कारांच्या सूचीत सहज शिरकाव करतात आणि गुणवंत अंधारात ढकलले जातात. हा अनुभव नेहमीच येतो. टपाल तिकिटांच्या संदर्भात तेच घडते. टपाल खाते, रेडिओ यांचे वैभवाचे दिवस गेले; पण एखाद्या व्यक्तीवर टपाल तिकीट निघणे ही आजही सन्मानाची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत अशा टपाल तिकिटांचा सुकाळ झाला; पण हिंदुस्थानचे एडिसन म्हणून ज्यांची ख्याती झाली, त्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे टपाल तिकीट अद्यापी निघू शकले नाही. डॉ. भिसे यांची ओळख नव्या पिढीस नाही; पण विज्ञान आणि संशोधन मधील नोबेल पुरस्कार मिळावा, अशा तोडीचा हा माणूस होता. तो महाराष्ट्रात जन्माला आला. देशभरात गाजला. २९ एप्रिल १८६७ या दिवशी मुंबईत जन्मला आणि ७ एप्रिल १९३५ या दिवशी न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले. भिसे यांनी दोनशेहून अधिक शोध लावले. त्यांच्या संशोधनांचा डंका जगभरात वाजला. इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि हिंदुस्थानात ४० शोधांची त्यांनी पेटंट घेतली.

दुष्काळाचे संकट !

     पाणी हे जीवन आहे, असे म्हटले जाते; मात्र या पाण्यासाठीच आज महाराष्ट्रात लोकांना वणवण करावी लागत आहे. राज्यात कधी नव्हे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतीला पाणी नाही, गुरे-ढोरे पाण्यापासून तडफडत आहेत. परिणामी आज महाराष्ट्रावर पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात महिला पाच-सहा मैल दूरहून चालत जाऊन डोक्यावर तीन-चार हंडे पाण्याचे भरून घेऊन येतांनाचे चित्र पहायला मिळते.

१३ एप्रिल २०१६ या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने...

अमृतसर, पंजाब येथील जालियनवाला उद्यान
जालियनवाला उद्यानात गोळीबाराच्या वेळी काही भारतियांनी
या विहिरीत जिवाच्या आकांताने उड्या मारल्या !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
     सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

कन्येकडे सद्गुरु म्हणून पहाणार्‍या आणि साधकांना साधनेत साहाय्य करणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती नलंदा खाडयेआजी (वय ७५ वर्षे) !

श्रीमती खाडयेआजी
       श्रीकृष्णाच्या कृपेने मला श्रीमती नलंदा खाडयेआजींच्या (सनातनच्या संत पू. (कु.)स्वातीताई यांच्या आईच्या) खोलीत रहायची संधी मिळाली. त्यांना जवळून अनुभवतांना आजी गुणरत्नांची खाण आहेत, हे लक्षात आले. त्यांची अनेक गुणरत्ने पहायला मिळाली. त्यांचे गुण पाहून खळखळणारे (नादयुक्त) निरागस हास्य, साधनेची तळमळ आणि प्रीती हे गुण पू. स्वातीताईंनी आपल्या आईकडूनच घेतले आहेत आणि विकसित केले आहेत, असा विचार माझ्या मनात आला. आजींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांतील काही मोजकी गुणरत्ने येथे देत आहे. आजी, तुम्ही आम्हा साधकांवर जे भरभरून प्रेम केलेत, ते अनमोल आहे. त्याची आठवण ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न गोड मानून घ्याल ना ? चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी (१३ एप्रिल ) या दिवशी श्रीमती नलंदा खाडये आजींची पंच्याहत्तरी आहे त्यानिमित्त ही गुणवैशिष्टये देत आहोत.
श्रीमती नलंदा खाडयेआजींना पंच्याहत्तरी 
निमित्ताने सनातन परिवाराकडून नमस्कार !
१. नीटनेटकेपणा : आजींचा पोशाख स्वच्छ आणि नीटनेटका असतो.
२. निरागस आणि निर्मळ हास्य : आजी खळखळून हसतात. त्यांचे हास्य निरागस आणि निर्मळ आहे. कधी कधी ते मिस्कील अन् खट्याळही असते. त्यांचे वागणे सहज, सुंदर आणि प्रीतीने ओथंबलेले असतेे, तसेच बोलणे मनमोकळे असते. त्यामुळे त्यांच्या सहवासात प्रसन्न वाटते आणि साधना करायला स्फूर्ती मिळते.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

गुरुमाऊलीच्या चरणांची प्राप्ती व्हावी, यासाठी तळमळणार्‍या साधकाने (६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे दीपक आगावणे) प.पू. डॉक्टरांना केलेले पत्ररूपी आत्मनिवेदन !

श्री. दीपक आगवणे
माझी परात्पर गुरुमाऊली,
तुमच्या कोमल चरणी या तुच्छ जिवाचा साष्टांग दंडवत !
       माझ्या गुरुराया, आपण सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधनेचे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत. मी आपला अपराधी आहे. या अपराधासाठी मी आपल्या चरणांवर नाक घासून आपली क्षमा मागतो. मी आपला अपराधी असूनही तुम्ही माझ्यावर सतत चैतन्यानंदाचा वर्षाव करत आहात.
१. भगवंताचे दर्शन सहजपणे 
झाल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !
       परम पूज्य, आपणच माझ्याकडून साधनेचे आणि सेवेचे प्रयत्न करवून घेत आहात. ज्या भगवंताच्या भेटीसाठी ॠषिमुनींना सहस्रो वर्षे तपश्‍चर्या करावी लागली, ती कठोर तपश्‍चर्या, साधना काहीही न करता आपण मला साक्षात् दर्शन दिले.
२. उघड्या डोळ्यांनी गुरूंचे 
मुखमंडल सूक्ष्मातून कुठेही पहाता येणे
      माझी भक्तवत्सल गुरुमाऊली, याआधी तुम्हाला आठवण्यासाठी मला डोळे बंद करून प्रयत्न करावे लागत होते; पण तुमच्या अगाध कृपेमुळे मला आता तुमचे मुखमंडल कुठेही असलो तरी उघड्या डोळ्यांनीही पहाता येते. तुम्हीच माझ्याकडून व्यष्टीचे आणि समष्टीचेे प्रयत्न करवून घेत आहात. माझ्या अंतर्मनातून तुमच्या गोड आणि दिव्य नामाचा नामजप तुम्हीच करवून घेऊन सतत माझ्यासमवेत रहात आहात.

गृहीत धरणे आणि अभ्यासपूर्वक नियोजनाचा अभाव यांमुळे गुरुधन अन् वेळ यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्याविषयी झालेली गंभीर चूक !

        १३ ते २२ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम् येथे महामगम् (दक्षिण कुंभमेळा) होता. त्यामध्ये काही दिवस सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे, तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात येणार होते. त्या सेवेत श्री. श्रीराम लुकतुके यांच्याकडून झालेल्या चुका पुढे देत आहे.
१. पदाधिकार्‍यांनी प्रदर्शनासाठी स्वतःच्या कक्षावर जागा उपलब्ध करून देतो, असे सांगितल्यावर त्यांना लेखी अनुमती मिळाल्याची निश्‍चिती न करणे : एका हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आमच्या कक्षामध्ये तुमचे प्रदर्शन लावण्यास जागा उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. तेव्हा त्यांना लेखी अनुमती मिळाली आहे का ? याची निश्‍चिती श्री. लुकतुके यांनी केली नाही. परिणामी त्यांना अनुमती मिळालेली नसल्याने पोलिसांनी त्यांचे प्रदर्शन काढण्यास सांगितले.
       प्रत्यक्ष कुंभस्थळी कोणत्याही प्रदर्शनकक्षासाठी पोलिसांनी अनुमती दिलेली नव्हती, असे नंतर लक्षात आले.

नाशिक येथील सिंहस्थपर्वातील सेवेच्या कालावधीत श्रीमती सुनिता बापट यांना आलेल्या अनुभूती, त्यांच्यात झालेले पालट आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. फिरत्या प्रदर्शनाच्या सेवेत अनेक व्यक्तींच्या प्रकृती अन् प्रवृत्ती यांचा अभ्यास करायला मिळणे : नाशिक येथील फिरत्या प्रदर्शनात सेवा करतांना अनेक व्यक्तींशी संपर्क आला. त्यांच्या प्रकृती अन् प्रवृत्ती यांचा अभ्यास करायला मिळाला, उदा. काही साधू साहित्य विनामूल्य घेण्याचा प्रयत्न करायचे, तर काही प्रांजळपणे पूर्ण पैसे देऊन घ्यायचे अन् इतरांनाही साहित्य घेण्यासाठी प्रवृत्त करायचे.
२. श्रीकृष्णाला प्रार्थना करत गेल्याने संपर्कात योग्य तेच बोलणे होऊन आनंद मिळणे : एका संपर्कात सनातनचे कार्य आणि तन, मन अन् धन यांच्या त्यागाचे महत्त्व सांगितल्यावर एका हॉटेल मालकाने तेल आणि ३० किलो तांदूळ अर्पण दिले. अनेकांनी आम्ही साहाय्य करू, असे सांगितले. संपर्काच्या वेळी माझ्या मुखातून तूच बोल, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना होत होती. कर्तेपण देवाच्या चरणी अर्पण केल्यावर उत्तरोत्तर आनंद वाढायचा आणि उत्साह टिकून असायचा.

खरा धनवान कोण ? याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

प.पू. पांडे महाराज
      मागील ४ - ५ दिवसांपासून मी थोडी जरी सेवा केली, तरी मला लगेचच थकवा येत होता. त्यामुळे मला काही काळ विश्रांती घेऊनच पुढील सेवा करायला जाता येत होते. वैद्यकीय विभागातील साधकांंनी मला एक घंटा उपाय करायला सांगितले. त्यानुसार मी एक घंटा उपाय केल्यानंतर मला ५० टक्के बरे वाटून मी पुढील सेवा केल्या. त्यानंतर २ दिवस अखंड सेवा चालू होती. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सेवा करत असतांना मला पुष्कळ थकवा आणि निरुत्साह वाटत होता. त्यामुळे सेवेची गतीही न्यून झाली होती. त्याच वेळी प.पू. पांडे महाराज आश्रम परिसरात फेरी मारून खोलीत जात असतांना त्यांनी आम्हाला सेवा करतांना पाहिले आणि खरा धनवान कोण ?, असा प्रश्‍न आम्हाला विचारला आणि त्या विषयी विवेचन केले. ते पुढे देत आहे.
१. खरे धन, म्हणजे चैतन्य !
       खरे धन, म्हणजे आपल्यातील चैतन्य होय. या धनाच्या बळावरच माणूस जिवंत आहे. अन्यथा मनुष्याचे शरीर म्हणजे मृतदेह (डेड बॉडी) आहे. आपण आपल्याजवळ असणारे चैतन्य काटकसरीने वापरले की, ते चैतन्य जमा होते. या चैतन्याचा निरर्थक गोष्टींसाठी वापर झाला, तर व्यक्ती चेतनाहीन (डिसचार्ज) होते. मग तिला थकवा, कंटाळा, निरुत्साह आणि निराशा असे त्रास होतात. जसे भ्रमणभाष वापरल्यानंतर तो काही वेळाने कार्यशक्तीहीन (डिसचार्ज) होतो आणि त्याला पुन्हा भारित (चार्ज) करावे लागते, तसे आपल्यातील चैतन्यात आपण ईश्‍वरी अनुसंधानाद्वारे वाढ करू शकतो. आपले श्रीगुरूंशी आणि श्रीकृष्णाशी अनुसंधान वाढले की, त्याद्वारे आपणास चैतन्य प्राप्त होते.

महालक्ष्मीदेवीला प्रार्थना केल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

कु. कनकमहालक्ष्मी
१. महालक्ष्मीदेवीला प्रार्थना केल्यावर स्वतःच्या ठिकाणी महालक्ष्मीदेवी बसून पठण करत आहे आणि महालक्ष्मीदेवी (मी) कमळामध्ये बसून (माझ्या) एका हातातून सोन्याची नाणी बाहेर पडत असून ती श्री गुरुदत्तांच्या चरणी पोचल्यावर त्यांचे फुलांत रूपांतर होत आहे, असे जाणवणे : मला महालक्ष्मीदेवी पुष्कळ आवडते; म्हणून एकदा मी देवीला तूच ये आणि माझे अस्तित्व नष्ट कर, अशी प्रार्थना केली. तेव्हा माझ्या ठिकाणी महालक्ष्मीदेवी बसून पठण करत आहे आणि मी (महालक्ष्मीदेवी) कमळामध्ये बसले आहे. माझ्या एका हातातून सोन्याची नाणी बाहेर पडत असून ती श्री गुरुदत्तांच्या चरणी पोचल्यावर त्यांचे फुलांत रूपांतर होत आहे, असे दिसले.
२. मंत्रपठण करतांना कागदाची आवश्यकता न वाटणे आणि मधे अनावश्यक विचार आल्यावर प्रार्थना केल्यानंतर श्रीगणेशाने त्या विचारांना बांधून टाकणेे, असे दिसणे : माझे मंत्र पाठ नाहीत; पण वरील प्रसंगी मला मंत्र लिहिलेल्या कागदाची आवश्यकता वाटली नाही. देवीला सर्व येत असल्याने तीच मंत्र म्हणत होती. मला मधे माझे अस्तित्व जाणवत असल्यामुळे अनावश्यक आणि काही वेळा सेवेचे विचार येत होते. तेव्हा देवा, तूच हे विचार दूर कर, अशी प्रार्थना केल्यावर मला श्रीगणेशाचे दर्शन होऊन त्यांनी त्या विचारांना बांधून टाकले, असे मला दिसले.

सौ. वैशाली मुद्गल यांनी पू. स्वातीताईंचे केलेले गद्य-पद्यात्मक वर्णन

पू. (कु.) स्वाती खाडये
सर्वांची लाडकी पू. स्वातीताई !
जशा समुद्राच्या लाटा, तसे पू. स्वातीताईंचे खळखळून हसणे ! खळखळून, भरभरून !
या हसण्यातून आम्हाला सेवेला उत्साह, बळ, आणि शक्ती मिळत असे.
सतत प.पू. डॉक्टरांना आनंद देण्यासाठी धडपडणारी, आमची सर्वांची लाडकी पू. स्वातीताई !
साधकांची व्यष्टी, समष्टी साधना चांगली होण्यासाठी तळमळणारी गुरुमाऊली !
रात्रंदिवस एकच ध्यास, सर्व साधकांची प्रगती व्हावी !
आम्हाला रागावून अहं नि दोषांची जाणीव करून देई ही माऊली.
ऊन, पाऊस, थंडी वारा याची तिला भीती नसे ।
सतत उंच उंच भरारी घेई ती रणरागिणी, पू. स्वातीताई ।
तहान-भूक विसरून हिंदु राष्ट्र आणण्यासाठी लढणारी ।
स्वतः उपाशी राहून साधकांना पोटभर जेवण देणारी माऊली ।

हिंदूंची, हिंदु धर्माची, भारताची, जगाची, थोडक्यात समष्टीची साडेसाती चालू असून त्याची झळ साधकांना पोहोचू नये, यासाठी महर्षि सांगत असलेल्या उपासनेचे शास्त्र

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
(प.पू.) डॉ. आठवले : हिंदूंची, हिंदु धर्माची, भारताची, जगाची, थोडक्यात समष्टीची साडेसाती चालू आहे का ? तिचा कालावधी कोणता ? २०२३ या वर्षी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, म्हणजे तेव्हा साडेसाती संपणार का ? महर्षि हल्ली जी उपासना सांगतात, तिच्यामुळे साडेसातीमुळे होणारे त्रास अल्प होणार, असे वाटते. (१३.३.२०१६)
पू. (सौ.) अंजली गाडगीळ : हो, असेच आहे.
१. जशी व्यक्तीला साडेसाती लागते, तशी समष्टीलाही 
लागतेे आणि ती दूर करणे केवळ देवाच्याच हाती असणे
       जशी व्यक्तीला साडेसाती लागते, तशी समष्टीलाही लागते. एखाद्या व्यक्तीला तिचे साडेसातीचे त्रास दूर करण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात, तर समष्टी प्रारब्धातील साडेसातीचे त्रास दूर करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील ? समष्टी प्रारब्धात असणारे त्रास दूर करण्यासाठी म्हणूनच सप्तर्षि आणि प.पू. डॉक्टर अतोनात कष्ट घेत आहेत. प.पू. डॉक्टर घेत असलेले कष्ट तर त्यांच्या देहावर प्रत्यक्ष दिसत आहेत.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

आई आणि वडील यांच्यातील भेद दर्शवणारे आई गं ! आणि बाप रे ! हे उद्गार !

१. आई गं ! : व्यक्ती वयाने कितीही मोठी असली, तरी तीव्र वेदना होत असल्यास ती आई गं ! असे म्हणते. म्हणजे त्या व्यक्तीला कठीण समय येता कोण कामास येते ? याचे उत्तर आई आहे, हे ज्ञात असते.
२. बाप रे ! : हे शब्द एखादे आश्‍चर्य व्यक्त करायला वापरतात.
         या उद्गारांवरून आई आणि वडील यांच्यातील भेद आपल्या मनात किती मुरलेला असतो, हे लक्षात येते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
     भांडे स्वच्छ हवे तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे.
भावार्थ :
तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा, याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     धर्मद्रोही, पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये इत्यादी फतवे काढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! याकरिता पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्नेही निर्धन असला तरी चालेल पण सदाचारी असावा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्‍वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


अधर्माचरणाचा उद्रेक !

संपादकीय
     शनिशिंगणापूर मंदिराच्या विश्‍वस्तांनी अचानक महिलांना चौथर्‍यावर येऊ देण्याचा आणि त्यापाठोपाठ मंदिर सरकारीकरण झालेल्या श्री महालक्ष्मी देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाने महिलांना गाभार्‍यात येऊ देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी याविरोधात असणार्‍या स्वराज्य महिला संघटनेच्या महिलांनी त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बीडमध्ये शनिदेवाचे अर्धपीठ असणार्‍या मंदिरातील चौथर्‍यावर महिलांनी चढून धर्मपरंपरा खंडित केली आणि पुणे जिल्ह्यातील वीर गावातील देवळांमध्येही महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. जणू काही अधर्माचरणाचे हे लोणच आता सर्वत्र पसरत चालले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn