Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात ७ धर्मद्रोही महिलांनी प्रवेश केला !

हिंदूंच्या धर्मश्रद्धेचा झालेला हा अवमान विसरू नका !
अंनिस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या महिलांचा सहभाग 
कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांचा महिलांना पाठिंबा
      कोल्हापूर - शेकडो वर्षांची शास्रसंमत परंपरा खंडित करत ११ एप्रिल या दिवशी ७ धर्मद्रोही महिलांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन देवीचे दर्शन घेतले. शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या पाठोपाठ महिलांना महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळावा, यासाठी कोल्हापुरातही आंदोलन चालू करण्यात आले होते. येथील अवनि या संस्थेच्या पदाधिकारी अनुराधा भोसले आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आंदोलन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी मंदिरातील श्रीपूजक आणि पश्‍चिम महाराष्ट्र्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांसमवेत एक बैठक घेतली होती. महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात महिलांना प्रवेश देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे, असे जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी या वेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. (निधर्मी प्रशासनाकडून केवळ हिंदूंच्याच धर्मश्रद्धांमध्ये हस्तक्षेप का ? त्यांनी असा हस्तक्षेप कधी एखादी मशीद वा चर्च यांमध्ये केला आहे का ? हिंदूंनो, यावरून मंदिरे भक्तांच्याच कह्यात असण्याचे महत्त्व लक्षात घ्या ! - संपादक) सदर बैठकीनंतर ७ महिलांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश देण्यात आलेल्या या ७ महिलांपैकी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील यांच्यासहित कम्युनिस्ट पक्षाच्या महिलाही आहेत.

शनिमंदिरातील महिलांच्या प्रवेशामुळेच केरळमध्ये झाली दुर्घटना ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

शंकराचार्यांनी जे म्हटले आहे, त्यावर तथाकथित बुद्धीवादी कधीही
विश्‍वास ठेवणार नाहीत. अशा संकटांची मालिका चालू राहू नये, 
म्हणून शनिभक्त महिलांनी कृतीशील झाले पाहिजे !
     हरिद्वार - शनि पापग्रह आहे. त्यामुळे शनीची पूजा केल्यास महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढतील, त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांमध्येही वाढ होईल, अशी चेतावणी द्वारका-शारदा पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी दिली आहे. (शंकराचार्य यांची ही चेतावणी तथाकथित बुद्धीवादी हसण्यावारी नेतील यात शंका नाही. खरे भक्त शंकराचार्य, संत आदी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीच्या आज्ञेद्वारे साधना आणि भक्ती करतात; मात्र जे तथाकथित पुरोगामी भक्त आहेत, ते त्यांना महत्त्व देत नाहीत ! - संपादक) तसेच त्यांनी हेही सांगितले की, शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश केल्यामुळेच केरळच्या पुत्तिंगल मंदिरात भयानक दुर्घटना झाली.
     महाराष्ट्रातील दुष्काळाविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना शंकराचार्य म्हणाले की, पूजेस अपात्र असलेल्यांची पूजा केली जाते तिथे संकटे थडकतात. दुष्काळ, पूर, मृत्यू किंवा भय अशा स्वरूपाची ही संकटे असतात. महाराष्ट्र या सर्व प्रकारच्या संकटांना सामोरे जात आहे.

गर्भकुंडीत महिलांना प्रवेश देण्याविषयीच्या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीचा कायम विरोध राहील ! - श्री. सुनील घनवट, राज्य संघटक

पुरोगाम्यांची वेगाने अधोगतीकडे घोडदौड !
     कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराची धर्मपरंपरा मोडून गर्भकुंडीत महिलांना प्रवेश देण्याच्या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते. मंदिराचे विश्‍वस्त असलेले जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हेच या धर्मद्रोही निर्णयाचे खरे सूत्रधार आहेत. गर्भकुंडीत महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. हिंदुत्ववादी, सामाजिक आणि पुरोगामी संघटनांची झालेली एकत्रित बैठक हा केवळ फार्स होता. हिंदु जनजागृती समितीने या बैठकीत धर्मपरंपरांच्या रक्षणाची भूमिका मांडली; मात्र जुना राजवाडा पोलीस स्थानकात पार पडलेल्या अंतीम बैठकीत जिल्हाधिकार्‍यांच्या प्रभावाखाली असलेल्या पोलीस प्रशासनाने महिलांना मंदिराच्या गर्भकुंडीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर शासकीय अधिकारी हिंदूंच्या धर्मपरंपरा कशाप्रकारे मोडीत काढतात, याचे हे ठळक उदाहरण आहे, अशा शब्दांत हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या निर्णयाचा विरोध केला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरांमध्ये चर्चेद्वारे काही पालट करण्याचे कार्य छत्रपतींच्या गादीनेही कधी केले नाही, त्यांनी या धर्मपरंपरेत कधीही हस्तक्षेप केला नव्हता. एक सर्वसाधारण सनदी नोकर या परंपरा नष्ट करत आहे.

धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात शेकडो हिंदुत्ववादी महिला एकवटल्या !

      मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने महिलांच्या मंदिर प्रवेशाचा निर्णय नुकताच दिला आहे. मंदिराच्या गाभार्‍यात वा चौथर्‍यावर प्रवेश करण्याचा निर्णय दिलेला नाही. असे असतांना शनिशिंगणापूर नंतर श्रीमहालक्ष्मी आणि श्री त्र्यंबकेश्‍वर देवस्थानाच्या गाभार्‍यात महिलांसह घुसणार असल्याचे सांगितले जात आहे; मात्र या धर्मद्रोही महिलांना रोखून आम्ही शेकडो वर्षांच्या धर्मपरंपरेचे रक्षण करणार, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीप्रणीत महिला शाखा रणरागिणी, शनिशिंगणापूर येथील महिला आणि अन्य धर्माभिमानी महिलांनी दिली. हिंदु धर्म अपकीर्त करणार्‍यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने ११ एप्रिलला दुपारी २ ते सायं. ५ या वेळेत मुंबई येथील आझाद मैदानात धर्मपरंपरा रक्षण चळवळीच्या अंतर्गत पहिले आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ३५० धर्माभिमानी महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. या आंदोलनाला सनातनच्या संत पू. अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
आंदोलनात घोषणा देतांना धर्माभिमानी महिला
तृप्ती देसाई यांना क्षमा मागायला लावू ! - श्री शनिशिंगणापूर येथील शनिभक्त महिलांची चेतावणी
     ज्या दिवशी तृप्ती देसाई यांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश केला, त्या दिवशी आम्ही आणि घरांतील मुलांनी भाकरीचा तुकडाही खाल्ला नाही. श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नाही, ही ५०० वर्षांपासूनची धर्मपरंपरा आहे. तृप्ती देसाई यांनी या चौथर्‍यावर चढून या धर्मपरंपरेचा अवमान केला आहे.

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच ! - करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

धार्मिक विषयांत शासन आणि न्यायालय यांचा हस्तक्षेप अमान्य !
यावरून तरी श्री शनैश्‍वर देवस्थान त्यांचा निर्णय पालटेल का ?
      नगर - श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच आहे. या अधर्माचे फळ ज्याचे त्याला मिळेल, असे मार्गदर्शनपर उद्गार करवीरपिठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी येथे काढले. नगरमधील एका कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी श्री शनिशिंगणापूरच्या प्रकरणाविषयी पत्रकारांशी बोलतांना उपरोक्त मार्गदर्शन केले.
     शंकराचार्य पुढे म्हणाले की, केवळ अधर्म वाढवण्यासाठी असे काही होत असेल, तर ते चुकीचे आहे. धार्मिक विषयांवर निर्णय घेण्यास धर्मपिठे असतांना शासन वा न्यायालय यांनी त्यात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. (राज्यशासनाला सणसणीत चपराक ! यावरून तरी राज्यशासन आपली भूमिका पालटून ती नव्याने उच्च न्यायालयात मांडेल का ? - संपादक) अर्थमंत्र्यांच्या धनादेशावर महसूल मंत्र्यांची स्वाक्षरी असेल, तर धनादेश वटेल का ? धर्मात हस्तक्षेप नसावा; पण राजावर धर्माचा अंकुश असावा, धर्मात राजकारण नसले पाहिजे.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

पुत्तिंगल मंदिराजवळ आढळल्या स्फोटकांनी भरलेल्या ३ चारचाकी गाड्या !

      कोल्लम - केरळच्या पुत्तिंगल मंदिरात ९ एप्रिलच्या रात्री आग लागून झालेल्या घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना कह्यात घेतले आहे. ११ एप्रिलला या मंदिराजवळ स्फोटकांनी भरलेल्या ३ चारचाकी गाड्या आढळल्या. बॉम्बशोध पथक घटनास्थळावर पोचून त्यांचा तपास करत आहे. एस्.एस्. तुषार, सुरेंद्रन् के.एल्. आणि स्टॅलिन अलमेडा अशी या चारचाकीच्या मालकांची नावे आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. या दुर्घटनेची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे.
     या घटनेनंतर पोलिसांनी पुत्तिंगल मंदिर व्यवस्थापनाच्या वरिष्ठांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित लोक फरार झाले आहेत. केरळमध्ये निवडणुकीचे वारे असून भाजपसह सर्वच पक्षांनी प्रचारसभा रहित केल्या आहेत. या दुर्घटनेच्या संदर्भात पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांना दूरभाष करून दुःख व्यक्त केले.

माकप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

बंगाल विधानसभा निवडणूक
हिंसा करणार्‍या राजकीय पक्षांचा भरणा असलेली भारतीय लोकशाही आता पुरे !
बांकुरा येथे मतदानाच्या वेळी देशी बॉम्बचा स्फोट, तर जमुरिया येथे २ बॅग भरून बॉम्ब सापडले !
      कोलकाता - बंगालमधील आसनसोल जिल्ह्याच्या जमुरिया येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात ४ जण घायाळ झाले असून एकाची स्थिती गंभीर आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास आरंभ केला आहे. (अशा कार्यकर्त्यांचा भरणा असलेले राजकीय पक्ष जनतेला कायद्याचे राज्य कधीतरी देऊ शकतील का ? - संपादक) या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन बॉम्बही जप्त केले. हाणामारीच्या या घटनेच्या आधी जमुरिया बायपासजवळ पोलिसांना २ बॅगा भरून बॉम्ब सापडल्याने येथील वातावरण आधीच तणावपूर्ण झाले होते. एका अन्य घटनेत राज्यातील बांकुरा येथे मतदानाच्या वेळी एका देशी बॉम्बद्वारे स्फोट घडवण्यात आला. ११ एप्रिल या दिवशी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचे मतदान झाले.

आसाममध्ये भाजपचे शासन आल्यास शरणार्थी हिंदूंना ३ मासांत नागरिकत्व देणार ! - केंद्रीय गृहमंत्री

केंद्रात सत्तेत येऊन २ वर्षे होत आली असतांना हिंदूंना नागरिकत्व
का दिले नाही, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी दिले पाहिजे !
      नवी देहली - आसामध्ये जर भाजपचे शासन आले, तर बांगलादेशातून आलेले अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध आणि शीख आदी शरणार्थींना ३ मासांच्या आत नागरिकत्व देण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी होजई विधानसभा क्षेत्रातील एका प्रचारसभेत दिले.
     सिंह पुढे म्हणाले, शरणार्थींच्या शिबिरामध्ये रहात असलेल्या अल्पसंख्यांकांच्या दुर्दशेसाठी केंद्राची अधिसूचना लागू न करणारे आसामचे शासन उत्तरदायी असून ते बांगलादेशी अल्पसंख्यांकांवर अन्याय करत आहेत. या अधिसूचनेमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तान येथील हिंदू, बौद्ध, शीख आदी शरणार्थींना दीर्घकालीन व्हिसा देण्याच्या सवलतीसह नागरिकत्व देण्याचीही तरतूद आहे. (जर शासन आले नाही, तर हिंदूना कुणीच वाली नसणार का ? - संपादक)

ख्रिस्त्यांच्या रहित केलेल्या कार्यक्रमाला ऐनवेळी अनुमती दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून बरनाला (पंजाब) बंद !

हिंदुबहुल भारतात हिंदूंचा विश्‍वासघात ! प्रशासनाने अशी अनुमती हिंदूंना दिली असती का ? 
ख्रिस्त्यांच्या रहित केलेल्या कार्यक्रमाला ऐनवेळी अनुमती देणार्‍या ख्रिस्तीधार्जिण्या 
अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !
     बरनाला - येथे आयोजित ख्रिस्त्यांच्या मसीहा चेतना सभेचा कार्यक्रम रहित करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी शासनाने मान्य केली होती. चेतना सभेच्या आयोजकांकडे लिखित अनुमती नसल्याचे प्रशासनाने सांगितल्याने हा कार्यक्रम रहित झाला होता; मात्र त्यानंतर काही वेळात मसीहा चेतना सभेच्या आयोजकांनी प्रशासनाकडून फेरीला अनुमती दिल्याचे पत्र आणले आणि कार्यक्रमाला प्रारंभ केला. यावरून वाद निर्माण झाल्याने २ जमावांमध्ये चकमक झाली. यामुळे दुसर्‍या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाचा निषेध करत बरनाला बंद केला.

धर्मांधाकडून हिंदु विद्यार्थिनीवर आम्ल टाकण्याची धमकी !

लव्ह जिहाद पासून वाचण्यासाठी हिंदु मुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक !
मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहाद !
     जबलपूर (मध्यप्रदेश) - येथील तनवीर या धर्मांधाने स्वत:चे नाव पालटून एका हिंदु विद्यार्थिनीशी मैत्री करून धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव आणला. त्याचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर विद्यार्थिनीने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतर धर्मांधाने तिच्या महाविद्यालयाच्या बाहेर गोंधळ घातला, तसेच तिच्यावर आम्ल (अ‍ॅसिड) फेकण्याची धमकी दिली. या धमकीच्या विरोधात विद्यार्थिनीने हिंदु धर्मसेनेच्या पदाधिकार्‍यांसह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या वेळी विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यातच आरोपीच्या कानफटात मारली.
     या संदर्भात हिंदु धर्मसेनेचे योगेश अग्रवाल म्हणाले, उत्तरप्रदेशातून शिकण्यास आलेली एक विद्यार्थिनी येथे विद्यार्थीगृहामध्ये रहात आहे. तिच्याशी आधारताल येथील तनवीर खान याने नाव पालटून मैत्री केली. अनेक दिवस दोघांमध्ये बोलणे चालू होते. कालांतराने त्याची खरी वास्तविकता तिच्या लक्षात आल्यावर विद्यार्थिनीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर त्याने तिच्या महाविद्यालयाच्या बाहेर गोंधळ घातला, तसेच या विद्यार्थिनीला त्याच्या दुचाकीवर बसण्यासाठी बळजोरी केली. सर्व प्रयत्न फसल्यावर त्याने निकाह न केल्यास तिला आम्लाने आंघोळ घालण्याची धमकी दिली.

वेळेच्या नियोजनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ६ दिवसांचा दौरा ५ दिवसांत पूर्ण !

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा दिवसांचा विदेश दौरा पाच दिवसांत पूर्ण केला. त्यांनी रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये विश्रांती घेण्यापेक्षा विमानामध्येच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि सकाळपासून कामाचे नियोजन केले. यामुळे ते कमी कालावधीत अधिक लोकांची भेट घेऊ शकले. ५ दिवसीय दौर्‍यामध्ये मोदी केवळ ३ रात्रीच झोपले. विमानामध्ये विश्रांती घेण्याऐवजी त्यांनी अधिकार्‍यांना पुढील कामांची माहिती दिली. मोदींच्या वेळेच्या नियोजनाच्या पद्धतीमुळे अधिकारी आश्‍चर्यचकित झाले आहेत.१६ वर्षांखालील मुलीशी संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच ! - पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय

     चंदीगढ - १६ वर्षांखालील मुलीशी सहमतीने ठेवलेला शारीरिक संबंध हाही बलात्कारच आहे, असा निकाल पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिला आहे. न्यायमूर्ती अनिता चौधरी म्हणाल्या, अल्पवयीन मुलीला कसल्याही प्रकारची अमिषे दाखवून शारीरिक संबंधासाठी सहज सिद्ध केले जाऊ शकते. अशी संमती देणार्‍या मुलीला चांगल्या-वाईट परिणामांची जाणीव असतेच, असे नाही. त्यामुळे ती जाणतेपणाने दिलेली संमती होत नाही. अशा संमतीचा अपलाभ घेणे, हे गुन्हेगारी कृत्यच आहे. त्यामुळे कोणत्याही कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीची संमती ग्राह्य धरली जाऊ शकत नाही.www.sanatan.org वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !


गुजरातमध्ये दारूबंदी कागदोपत्रीच !

दारूबंदी असूनही गुजरातमध्ये दारूची तस्करी करणार्‍या टोळ्या 
कार्यरत असणे, हे तेथील शासनकर्त्यांचे अपयशच !
परवानाधारक आणि परवाने नसलेल्यांनाही घरपोच उपलब्ध होते दारू !
     कर्णावती (अहमदाबाद) - गुजरात राज्याच्या पाठोपाठ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतीच त्यांच्या राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केली आहे. तथापि दारूबंदी असूनही गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध होते. त्यामुळे गुजरातमधील दारूबंदी केवळ कागदोपत्रीच असते का ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
१. गुजरात हे गांधींचे जन्मस्थळ असल्यामुळे येथे वर्ष १९४८ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. 
२. पर्यटनाच्या नावावर फेब्रुवारी २०१५ ते मार्च २०१६ या काळात राज्यशासनाने स्वत: दारूची दुकाने उघडण्यासाठी १६ परवाने दिली आहेत. आता ही संख्या ५२ झाली आहे.

कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या हत्यांचा सूड उगवणार ! - माकपचे खासदार महंमद सलीम यांची धमकी

असे गुंड प्रवृत्तीचे नेते असणार्‍या पक्षाच्या हातात सत्ता गेल्यास 
राज्यात अराजक माजले नाही, तरच नवल !
     कोलकाता - मागील ५ वर्षांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जेवढ्या हत्या झाल्या, त्यांचा आम्ही सूड उगवू, असे विधान या पक्षाचे खासदार महंमद सलीम यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर सर्वत्र टीका होत आहे. बंगालमध्ये सध्या निवडणुकांचे वारे असून प्रचाराच्या रणधुमाळीत विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणावरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा स्थगित

विरोधकांनी कागदपत्रे उधळली ! 
 मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधक शांत ! 
विशेष प्रतिनिधी : श्री. संतोष पाटणे 
     मुंबई, ११ एप्रिल (वार्ता.) गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल यांना भाजपचे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा यांनी मारहाण केल्याच्या प्रकरणावरून विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटे, २० मिनिटे आणि नंतर १५ मिनिटांसाठी असे ३ वेळा स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर निवेदन केल्यानंतर विरोधक शांत झाले.
     शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान
मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त हिंदूंचे संघटन !

बोईसर
बोईसर येथील शोभायात्रेत सहभागी महिला
     येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक धर्माभिमानी फेरीत सहभागी होते. फेरीत विविध प्रकारचे चित्ररथ उभारण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. 
                                                                      डहाणू 
     नववर्ष स्वागत समिती डहाणूच्या वतीने भव्य नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वागतयात्रेत ३०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी होते. यात विविध चित्ररथ, ढोल-ताशा पथक यांचे विशेष आकर्षण होते. चित्ररथाच्या माध्यमातून गुढीपाडवा साजरा करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले.

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील भाजप जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार

यावरून नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था 
मोडली आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! 
     श्रीरामपूर, ११ एप्रिल (वार्ता.) - येथील भाजप जिल्हा सरचिटणीस आणि हिंदुत्ववादी श्री. प्रकाश चित्ते यांच्या घरावर १० एप्रिल या दिवशी रात्री १ वाजता अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. श्री. चित्ते हे हिंदुत्वाचे कार्य पुढाकार घेऊन करत असतात. यापूर्वीही चित्ते यांच्यावर अशा प्रकारचे प्राणघातक आक्रमण २ वेळा झाले आहे. (एक-एक करून हिंदुत्ववाद्यांना संपवू पहाणार्‍यांना पोलीस प्रशासन आळा घालेल का ? - संपादक) 

सर्वधर्मसमभाव म्हणजे हिंदुस्थानाच्या भवितव्याशी केलेला व्यभिचार आहे. तो आम्ही कदापी चालू देणार नाही. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान


सतीश शेट्टी खूनप्रकरणी आणखी एका साहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक

पोलीस दलातील गुन्हेगार ! अशा पोलिसांकडून कायद्याचे राज्य अस्तित्वात येईल का ? 
     पुणे, ११ एप्रिल - माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खूनप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ११ एप्रिल या दिवशी तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव कौठाळे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत अन्वेषण विभागाची कोठडी दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेली ही दुसरी अटक आहे. गेल्याच आठवड्यात निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांनाही १६ एप्रिलपर्यंत कोठडी दिली आहे. आंधळकर आणि कौठाळे या दोघांनीही सतीश शेट्टी यांच्या खूनप्रकरणात तपास केला होता.

अफझलचे समर्थन करणारे वाघनखे विसरलेत का ? - श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथे हिंदूसंघटन मेळावा
      जळगाव - आज जेएन्यूसारख्या विद्यापिठांमध्ये देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या. संपूर्ण देशातून याला विरोध झाला, तरी काही जणांनी या प्रकाराचे समर्थन केले. या देशामध्ये अफझलचे समर्थन करणारे वाघनखे विसरलेत का, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी पाचोरा येथील हिंदूसंघटन मेळाव्यात केला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पांचाळेश्‍वर मंदिर, पाचोरा येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला समितीचे श्री. पंकज बागुल हेही सुद्धा उपस्थित होते. मेळाव्याला २५० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्वश्री संदीप पाटील, तुषार जगताप, सौरभ चंद्रात्रे, विनोद जगताप आणि दीपक पाटील यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे तालुकाध्यक्ष श्री. मनीष काबरा हेही उपस्थित होते.
     येथील श्री भवानीमाता आणि पांचाळेश्‍वर महादेव यांचेे वक्त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्री. श्रेयस पिसोळकर यांचा सत्कार समाजसेवक श्री. मंगेश देवरे यांनी केला, तर श्री. पंकज बागुल यांचा सत्कार श्री. तात्यासाहेब नगरे यांनी केला. यानंतर समितीचे श्री. पंकज बागुल यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली.

हिंदु राष्ट्राची स्थापना हीच धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली ठरेल ! - योगेश शिर्के

भांडुप येथे धर्मवीर संभाजी महाराज बलीदान मासानिमित्त पदयात्रा 
     
     भांडुप, ११ एप्रिल (वार्ता.) - धर्मवीर संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्याग आणि संघर्ष करून हिंदवी स्वराज्य वाढवले. ही प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच धर्मवीर संभाजी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता आणि श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज बलीदान मासानिमित्त नुकतीच भांडुप येथे खडी मशिन (सह्याद्रीनगर) ते टेंभीपाडा (रामनगर) अशी मूक पदयात्रा काढण्यात आली. या वेळी श्री. शिर्के यांनी उपस्थितांना संबोधित केले. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला. या वेळी शिवरायांच्या ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्राचे पठण करण्यात आले. या पदयात्रेत २५ हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

दोन मासांत अधिक तपास काय झाला ? - न्यायाधिशांचा शासकीय अधिवक्त्यांना प्रश्‍न

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
* समीर गायकवाड न्यायालयात उपस्थित 
* पुढील सुनावणी २९ एप्रिलला 
     कोल्हापूर, ११ एप्रिल (वार्ता.) - उच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी आणि येथील सुनावणी याचा प्रत्यक्ष काही संबंध नाही. अधिक तपास चालू आहे, या नावाखाली शासकीय पक्ष आरोपपत्र निश्‍चित करण्यात येऊ नये, यांसाठी वारंवार कालावधी मागत आहे; मात्र दोन मासांत काय तपास काय झाला ? अशा शब्दांत जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी विशेष शासकीय अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांना खडसावले. न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. गतवेळी न्यायाधिशांनी केलेल्या आदेशाप्रमाणे समीर गायकवाड यांना ११ एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल, असे न्यायाधिशांनी घोषित केले. या वेळी समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता समीर पटवर्धन आणि संजय धर्माधिकारी उपस्थित होते. 

धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे ! - कु. प्रियांका लोणे

रांजणगाव पोळ (जिल्हा संभाजीनगर) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
     संभाजीनगर, ११ एप्रिल (वार्ता.) - गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिकवादी तृप्ती देसाई यांनी ४०० वर्षे चालत आलेली धार्मिक परंपरा मोडली. आमच्या परंपरा तोडण्याचा यांचा अट्टाहास कशासाठी ? यामागे हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे आणि हिंदु स्त्रियांना धर्मापासून दूर नेण्याचे हे षड्यंत्र आहे, हेच सिद्ध होते. या संपूर्ण प्रकरणात शासन, प्रशासन किंवा पोलीस यंत्रणा हे आम्हा हिंदूंच्या प्रथा परंपरांचे रक्षण करणार नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. आज आता आई जिजाऊ, अहिल्याबाई होळकर या हिंदूंच्या तेजस्वी स्त्रियांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून समस्त धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी आपल्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. धर्मयोद्धा संघटना आणि रांजणगाव पोळ ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेमध्ये त्या बोलत होत्या. (हिंदूंमध्ये धर्मजागृती व्हावी, यासाठी धर्मजागृती सभा आयोजन करणार्‍या धर्मयोद्धा संघटना आणि रांजणगाव पोळ ग्रामस्थ यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या ग्रामस्थांनी रांजणगाव पोळ ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा ! - संपादक) ही सभा १० एप्रिल या दिवशी होळी मैदान, रांजणगाव पोळ येथे रात्री ८.३० वाजता झाली.

आवाहन आखाड्याच्या पेशवाईचे उज्जैनवासियांकडून उत्स्फूर्त स्वागत !

सिंहस्थपर्व उज्जैन २०१६ 
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग
     उज्जैन - आवाहन आखाड्याची (आवाहन आखाडा हा जुना आखाड्याचा सहयोगी आखाडा आहे.) दुसरी पेशवाई (मिरवणूक) १० एप्रिल या दिवशी उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात निघाली. 
     सकाळी १० वाजता नीलगंगा चौकापासून प्रारंभ झालेल्या या पेशवाईमध्ये आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराज, कृष्णानंदपुरी महाराज, मेळा समितीचे पदाधिकारी यांच्यासह पिठाधिश्‍वर, महामंडलेश्‍वर, महंत तसेच नागा साधूंचे विविध समूह सहभागी झाले होते. हत्ती, घोडे, उंट तसेच विविध वाद्यपथकांनी सुशोभित पेशवाईचे उज्जैनवासियांनी विविध चौकांमध्ये स्वागत केले, तसेच त्यांनी साधू-संतांवर पुष्पवृष्टी करून त्यांना वंदन केले. या पेशवाईची दुपारी रामघाट येथे सांगता झाली.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 'इस्लामिक स्टेट'चा आतंकवाद विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १७ एप्रिल २०१६
पृष्ठ संख्या : १० 
मूल्य : ५ रुपये 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
१६ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी ! 

मुंबईत गोमांस तस्करीचे जाळे उद्ध्वस्त !

गोमांस तस्करी करणार्‍या अजून किती टोळ्या कार्यरत आहेत, 
याचा शासनाने छडा लावून संबंधितांना दंडित करावे !
     मुंबई - मुंबई पोलिसांनी धारावी येथून गोवंशांच्या मासांची परदेशात तस्करी करणारे एक जाळे उद्ध्वस्त केले आहे. गोमांस बंदी असूनही देशातील विविध ठिकाणांहून हे मांस रेल्वेने मुंबईतील धारावी येथे आणण्यात येत होते. धारावीतून समुद्रमार्गे पूर्वेकडील देशांना हे मांस पाठवण्यात येत होते. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने एका गोदामावर केलेल्या कारवाईत ६.५ टन मांस आणि अवयव सापडले. त्यांची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. मांस तस्करीचे एक मोठे जाळे देशात कार्यरत आहे. (संपूर्ण जाळे नष्ट करण्यासाठी केंद्रशासन आणि सर्व राज्यांचे शासन एकत्रित कारवाई का करत नाही ? - संपादक) पोलिसांनी गोदामचा मालक शमशाद आझाद कुरेशी, अश्रफअली मियाँ आणि महंमद सरताज कुरेशई या धर्मांधांना अटक केली आहे.

इंग्लंडच्या कह्यात असलेला भारताचा जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा परत येण्याची शक्यता धूसर !

     नवी देहली - भारताच्या ऐश्‍वर्याचे प्रतीक समजला जाणारा जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा पुन्हा भारतात आणण्याविषयी केंद्रशासनाने असमर्थता व्यक्त केली आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारताबाहेर नेण्यात आलेला पुरातन आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या वस्तू देशात परत आणण्यासंदर्भातील कायद्याच्या मर्यादेमुळे कोहिनूर हिरा परत आणणे कठीण आहे, असे केंद्रशासनाने म्हटले आहे. वर्ष १९७२ मध्ये संमत करण्यात आलेल्या या कायद्यानुसार भारताबाहेर केवळ अवैधरित्या नेण्यात आलेल्या पुरातन वस्तूच देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा पुरातत्त्व खात्याला अधिकार आहे, अशी भूमिका सांस्कृतिक मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. (मग शासन हा कायदा पालटत का नाही ? - संपादक)
     सध्या कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या शिरपेचात मिरवत आहे. तो परत आणण्याच्या संदर्भात भारत शासनाकडून कोणते प्रयत्न करण्यात येत आहेत ? याविषयी परराष्ट्र मंत्रालयाकडे माहिती मागवण्यात आली होती. त्यासह कोहिनूर हिर्‍याच्या संदर्भात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने कोहिनूर हिर्‍याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.

हिंदूंनी स्वतःकडे आणि अन्य धर्मांकडे त्यांनी दिलेल्या डोळ्यांनी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पहायला शिकायला हवे ! - कै. राम स्वरूप गर्ग


फलक प्रसिद्धीकरता

हिंसाचार करणारे राजकीय पक्ष जनतेला कायद्याचे राज्य कधीतरी देऊ शकतील का ?
      बंगालमध्ये मतदानाच्या वेळी जमुरिया येथे माकप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्या क्षेत्रात २ बॅग भरून बॉम्बही सापडले. अन्य एका घटनेत बांकुरा येथे मतदानाच्या वेळी एका देशी बॉम्बने स्फोट घडवण्यात आला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangal chunavoke samay Jamuriame CPM aur TMCke karyakartayome marpeet. 2 bag bharkar bambhi mile.
Kya aise rajnitik dal janatako kanoonka rajya denge?

जागो ! : 
बंगाल चुनावों के समय जमुरिया में सीपीएम् और तृणमूल काँग्रेस के कार्यकर्ताआें में मारपीट. २ बैग भरकर बम भी मिले.
क्या ऐसे राजनीतिक दल जनता को कानून का राज्य देंगे ?

संभाजीनगर येथे हिंदु नववर्ष स्वागत समितीकडून गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा

शोभायात्रेत सहभागी खासदार श्री. चंद्रकांत खैरे (वर्तुळात) आणि अन्य मान्यवर
     संभाजीनगर, ११ एप्रिल - हिंदु नववर्ष स्वागत समितीने गुढीपाडव्यानिमित्त ८ एप्रिल या दिवशी शहरामध्ये नववर्ष स्वागतासाठी भव्य शोभायात्रा काढली होती. संस्थान गणपतीची आरती करून समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजवंदनेने शोभायात्रेस प्रारंभ झाला. या वेळी समितीचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, चित्रकूट संस्थानचे विद्यमान अधिपती डॉ. मंगलनाथ महाराज, आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल आदींसह अनेक मान्यवर आणि सहस्रो हिंदू सहभागी झाले होते. सदर शोभायात्रेमध्ये विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, युवा सेना, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

वीर (जिल्हा पुणे) येथील माता श्री जोगेश्‍वरी मंदिर आणि श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर येथे महिलांना गाभार्‍यात प्रवेशाची अनुमती !

यावरून जन्महिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हेच स्पष्ट होते ! 
     पुरंदर (जिल्हा पुणे), ११ एप्रिल - येथील वीर गावातील माता श्री जोगेश्‍वरी आणि श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर या मंदिरांच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय येथे झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या मंदिरांच्या गाभार्‍यामध्ये यापूर्वी केवळ यात्रा आणि नवरात्रोत्सव या दिवशीच महिलांना प्रवेश देण्यात येत असे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी दिली. 

(म्हणे) माझा विवाह झाल्यानंतर मी माझ्या पत्नीचे आणि मुलांचे नाव भारतमाता की जय ठेवणार आहे !

कन्हैया कुमारची भाजपवर उपरोधिक टीका 
     नवी देहली - जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याने विवाहानंतर त्याची पत्नी आणि मुले यांची नावे भारतमाता की जय ठेवणार असल्याची उपरोधिक टीका भाजपवर केली आहे. (देशाविषयी अशा पद्धतीने बोलणारे कधीतरी देशभक्त होऊ शकतात का ? - संपादक)सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच पर्याय ! - श्री. मनोज खाडये

दापोली येथे हिंदु धर्मजागृती सभा
प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या 
विकारांवरील उपाय या ग्रंथाचे सभेमध्ये प्रकाशन
८ सहस्र धर्माभिमान्यांची उपस्थिती
     दापोली, ११ एप्रिल (वार्ता.) - निधर्मीवाद्यांच्या बेगडी सर्वधर्मसमभावाच्या पोपटपंचीचे गंभीर परिणाम म्हणून देशात आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोहत्या, भ्रष्टाचार, अनाचार, महागाई या समस्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. या समस्यांचे निराकरण करण्याचा एकच पर्याय असून तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना हा होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले.

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती वर्ष १९७२ पेक्षा बिकट !

श्री. नित्यानंद भिसे
दुष्काळाचे संकट, योजना आणि अधिवेशन !
    अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होतांना या अर्थसंकल्पावर राज्यातील दुष्काळी परिस्थितीची छटा उमटणार, अशी स्थिती होती. कारण अधिवेशनाच्या आधीचे ३ दिवस याच सूत्रावर विरोधकांनी विधीमंडळ दणाणून सोडले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन या विषयावरील शासनाची भूमिका मांडल्यानंतर विरोधकांचा संभ्रम झाला आणि अधिवेशनातील अन्य विषयाच्या कामकाजाला आरंभ झाला; मात्र त्यातून राज्यातील दुष्काळी परिस्थितीत काही सुधारणा होईल, अशी शक्यता निर्माण झाली नाही. राज्यातील दुष्काळाची समस्या कधी नव्हे, इतकी बिकट बनत असतांना राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय आरंभी ३ दिवस चर्चेला आला, त्यानंतर या विषयावर ना विरोधकांकडून चर्चा घडवण्यात आली, ना सत्ताधार्‍यांकडून हा विषय मांडण्यात आला.

हिंदु धर्माच्या संदर्भातील खटल्यांमध्ये धर्माचार्यांचे मत का घेतले जात नाही ?

      मुंबई उच्च न्यायलयाने नुकताच कोणत्याही महिलेला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखू नये, असा आदेश महाराष्ट्र शासनाला दिला. या संपूर्ण प्रकरणातील एक गोष्ट मला खटकली. 
    वैद्यकीय विषयीचा एखादा खटला आल्यास न्यायाधीश किंवा अधिवक्ते त्याविषयातील तज्ञांकडून सल्ला घेतात. बांधकामामध्ये घोटाळा झाल्यास तज्ञ वास्तूविशारदाचे मत घेतले जाते; तसेच अन्य क्षेत्रातील खटल्यांच्या संदर्भात त्या त्या विषयातील तज्ञांची मते विचारात घेतली जातात; मात्र जेव्हा हिंदूंची मंदिरे आणि परंपरांचा विषय येतो, तेव्हा ज्यांना धर्माविषयी प्राथमिक माहितीसुद्धा ठाऊक नाही, असे लोक युक्तीवाद करतात आणि त्यानुसार न्यायालय आदेश देतो.

भारतातील दुर्गम भागांमध्ये राज्य नक्षलवाद्यांचे कि भारत शासनाचे ?

     खंडणी गोळा करण्यासाठी प्रतिदिन नवनवे फतवे काढणार्‍या नक्षलवाद्यांनी दुर्गम भागांतील विकासकामांचे दायित्व (जबाबदारी) असलेल्या शासकीय अधिकार्‍यांना मोजमाप पुस्तिका घेऊन जनतेच्या दरबारात बोलावणे चालू केले आहे. परिणामी घाबरलेल्या अधिकार्‍यांनी कार्यक्षेत्रात फिरणेच बंद केल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत.
  लोकप्रतिनिधींनंतर नक्षलवाद्यांनी विकासकामांची अंमलबजावणी आणि देेखरेख करण्याचे दायित्व असलेल्या शासकीय अधिकार्‍यांकडे मोर्चा वळवला आहे. दुर्गम भागांत रस्ते, लहान आणि मोठे पूल, शेततळे, तसेच खडीचे रस्ते कंत्राटदारांच्या माध्यमातून बनवून घेण्याचे दायित्व असलेल्या शासकीय अधिकार्‍यांना नक्षलवाद्यांनी आता जनतेच्या दरबारात बोलावणे चालू केले आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
    ज्या देशात विद्वानांना त्रास दिला जातो, तो देश तुटलेली नौका जशी पाण्यात नष्ट होते, त्याचप्रमाणे नष्ट होतो. - अथर्ववेद (मासिक अभय भारत, १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०१०)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात प्रतिदिन कामगार म्हणून सेवा करतांना स्वतःमध्ये साधकत्व अंगी बाणवून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक-कामगार सर्वश्री बाबूलाल चौधरी आणि बसू ठाणेद !

१. पूर्वसूचना 
श्री. बाबूलाल चौधरी
        बाबूलाल आणि बसूदादा या दोघांनाही भावसत्संगाला बोलावले होते. त्या दिवशी मला या दोघांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणार, असे वाटले होते. मी जेवतांना तसे एका साधकालाही बोललो आणि ते सत्यही झाले.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. नम्रता : साधक समोर आले की, त्यांना हात जोडून नमस्कार केल्याविना ते दोघेही पुढे जात नाहीत.
२ आ. सेवाभाव : ते प्रत्येक सेवा करण्यापूर्वी प्रार्थना करतात आणि सेवा झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करतात. ते सर्व सेवा नेहमी मनापासून आणि देवाला आवडेल, अशा प्रकारे करतात. त्यांना सांगितलेल्या सेवेला ते कधी नाही म्हणत नाहीत. काही सेवा तर त्यांना सांगाव्याच लागत नाहीत. ते आश्रम आपला आहे, असे समजून स्वतःच त्या करतात. तसेच बाहेरून आलेल्यांनाही हे कामगार आहेत, असे वाटत नाही.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

देवाच्या अनुसंधानात राहून कठोर प्रारब्ध सहनशीलतेने भोगणार्‍या आणि देवावर अतूट श्रद्धा असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सावित्री कामत (वय ६५ वर्षे) आणि त्यांचे कुटुंबीय !

        माझी आई श्रीमती सावित्री कामत यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. ती आमच्याकडे केमोथेरपीच्या उपचारासाठी काही दिवस वास्तव्याला होती. त्या काळात लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
१. सहनशील
    आईने लहानपणापासून पुष्कळ कष्ट सोसले आहेत. आताही तिला कर्करोग असल्याचे निदान झाल्यापासून ती सर्वकाही त्रयस्थपणे सोसते. तिच्या बोलण्यात मला त्रास होतो, असे कुठेही नसते. ती सर्व औषधे वेळेवर घेते. तिला न आवडणारे औषध ती धन्वंतरीदेवतेला प्रार्थना करून प्रसाद म्हणून घेते.
२. देवाच्या अनुसंधानात रहाणे
      आई नामजप, आध्यात्मिक उपाय, प्रार्थना आणि कृतज्ञता नियमितपणे करत असल्यामुळे सतत देवाच्या अनुसंधानात असते. तिचा स्वभाव मितभाषी असल्यामुळे ती अंतर्मुख असते. ती आम्हाला प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेली प्रार्थना करायला तीनही वेळा आठवण करून देते. तिचे मला साधनेत पुष्कळ साहाय्य होते.

उज्जैन येथील सिंहस्थपर्वामध्ये धर्मप्रसाराच्या सेवेसाठी गेलेल्या साधकाला शौचाच्या वेळी रक्त पडण्याचा त्रास आरंभ होणे आणि देवाने त्याला पहाटे स्वप्नात चांगली अनुभूती देऊन त्यानंतर त्याचा तो त्रास दूर करणे

१. शौचाच्या वेळी रक्त पडू लागणे
अ. मी २२.४.२०१६ पासून उज्जैन येथे आरंभ होणार असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये सनातन संस्थेच्या वतीने करायच्या धर्मप्रसाराच्या सेवेसाठी तेथे गेलो आहे. तेथे १९.३.२०१६ पासून मला शौचाच्या वेळी रक्त पडण्याचा त्रास आरंभ झाला. शरिरातील उष्णता वाढल्याने मला अधून-मधून असा त्रास होतो. त्यावर मी तूप आणि पाणी घेणे आदी उपाय चालू केले.
आ. २२.३.२०१६ या रात्री, म्हणजे होळीच्या आदल्या रात्री मला व्यवस्थित झोप येत नव्हती. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास माझ्या पोटात दुखू लागले आणि शौचाला गेल्यावर रक्त पडले.

शरणागत भावाने केलेल्या प्रार्थनेने सर्व त्रास दूर होऊन सेवा निर्विघ्नपणेे होणे

१. सेवेला जातांना नकारात्मक विचार येणे आणि कुणीतरी मागे खेचत आहे, असे वाटणे : जवळच्या नातेवाइकांकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते. घरी यायला ४.३० वाजले. साप्ताहिकाची वाढीव रक्कम घेणे आणि वर्गणीदारांच्या सह्या घेणे या सेवा करायच्या होत्या. घरातून निघाल्यावर मला सेवेेला जाऊ नये, असा नकारात्मक विचार आला. आज सकाळी १ घंटाच नामजप झाला आहे, तर सेवेला न जाता नामजपाला बसावे, असा आणखीन एक विचार आल्यामुळे मी ५ मिनिटे नामजप केला आणि परत सेवेला जाण्यासाठी निघाले. २ मिनिटे चालून गेल्यावर माझे दोन्ही पाय पुढे जातच नाहीत, तेथेच रेंगाळत आहेत, असेेे वाटले. मला कुणीतरी खेचत आहे, असे वाटले. वाटेतच एक वर्गणीदार भेटले त्यांना नमस्कार करून पुढे चालू लागले, तर पाऊल पुढे पडतच नव्हते. कमरेपासून तळपायापर्यंत सर्व भाग पूर्णपणे बधीर झाल्यासारखा वाटत होता. तेव्हा रस्त्यातच मला काही झाले, तर काय होईल ? असा विचार आला.

जिवावरचे संकट गुरुकृपेने छोट्याश्या दुखापतीवर निभावून मनाची अंतर्मुखता कशी वाढली, हे सांगणारे साधिकेचे अनुभव !

१. दुचाकीवरून जातांना अपघात होणे 
सौ. अभया उपाध्ये
         मी आणि एक साधिका पळस्पे येथून पनवेलला दुचाकीवरून येत होतो. त्या मार्गावर पुष्कळच वाहतूक असते. त्या वेळी दुचाकी वाहन बाजूच्या एका कच्च्या मार्गावरून पक्या मार्गावर आणतांना तोल गेला. नदीवरील पुलावरच हा अपघात घडला. सहसाधिकेने तेथे दांड्याला पकडल्याने आम्ही नदीत पडण्यापासून वाचलो; पण पायाच्या करंगळीजवळचे हाड मोडले. देवानेच जिवावरचे संकट छोट्याश्या दुखापतीवर भागवले.
१ अ. पायाला प्लॅस्टर घालावे लागणे : नंतर पायाला सूज आली. त्या वेळी वाटले, स्नायू दुखावले असतील; म्हणून घरी उपाय केले. २६ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा होती. शेवटचे २ दिवस राहिले होते; म्हणून सेवा करत राहिले. नंतर आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर ते म्हणाले, पुष्कळ फिरलात ! फिरल्यामुळे पायाची हालचाल झाली होती. नंतर त्या पावलाला आणि घोट्याच्या वरपर्यंत प्लास्टर घालावे लागले होते.
१ आ. पती आणि मुलगा यांनी पुष्कळ काळजी घेणे : घरी पतीही सेवा आणि साधना करतात. पती आणि मुलगा यांनी माझी पुष्कळ सेवा केली. मुलाने घरातील सर्व सेवा, उदा. कपडे धुणे, वाळत घालणे, पाणी भरणे, खोल्या आवरणे, सामान, भाजी आणणे आदी व्यवस्थित केले. या प्रसंगी मला त्याचे गुण अनुभवता आले. त्यामुळे गुरुदेवा, आपल्या चरणी कशी कृतज्ञता व्यक्त करावी, हे लक्षात येत नाही.

समाजातील बरेच जण साधकांना विचारत असलेला प्रश्‍न - तुम्ही सर्व इतके आनंदी कसे ? आणि त्याचे उत्तर

१. प.पू. डॉक्टरांनी साधकांना नामाबरोबरच मनाच्या शुद्धीसाठी 
स्वभावदोष-निर्मूलन, तर बुद्धीच्या शुद्धीसाठी अहं-निर्मूलन यांसारखे 
महामंत्र दिल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होतांना दिसून येणे
       अनेक संप्रदायांत गुरुमंत्र दिला जातो. गुरुमंत्र म्हणजे साधकाला सांप्रदायिक नाम घेण्यास सांगितले जाते. केवळ नामाने प्रगती होत नाही, तर नामाबरोबरच मन आणि बुद्धी शुद्ध होण्यासाठीही उपाय योजावे लागतात. प.पू. डॉक्टरांनी मात्र मनाच्या शुद्धीसाठी स्वभावदोष-निर्मूलन, तर बुद्धीच्या शुद्धीसाठी अहं-निर्मूलन यांसारखे महामंत्र दिले आहेत.
२. मुखाने नाम आणि कृतीने 
भगवंताचे काम केल्यासच प्रगती !
       गुरुमंत्र जपायचा असतो, तर महामंत्र कृतीत आणायचा असतो. मुखाने नाम आणि कृतीने भगवंताचे काम केल्यास प्रगती होते.

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन यांच्या विरुद्धच्या युद्धात साधकांसमवेत भावाची ऊर्जा अन् संतांचे आशीर्वाद असल्याने साधक विजयी होत असणे

श्री. राम होनप
       शत्रूला हरवण्यासाठी प्रथम सीमेबाहेर युद्ध करावे लागते आणि त्यानंतर शत्रूच्या राज्यात जाऊन युद्ध करावे लागते. शत्रूचे एक एक बलस्थान नष्ट केले की, परत राजाशी युद्ध करावे लागत नाही; कारण तो शक्तीहीन झाल्यामुळे स्वतःच शरण येतो. त्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहंच्या पैलूंना हरवत मुख्य शत्रू अहं अन् वाईट शक्ती यांच्यापर्यंत साधक पोचतो. त्यानंतर या शत्रूंचा जोर हळूहळू न्यून होऊ लागतो. या युद्धात साधकांसमवेत भावाची ऊर्जा आणि संतांचे आशीर्वाद असल्याने साधक आज ना उद्या निश्‍चितच विजयी होतो. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०१६)

तीव्र शारीरिक त्रासातही अविरत प्रवास करून गुरुकार्य करणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

१. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी २ लक्ष ७५ 
सहस्र कि.मी. प्रवास करणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
        गेल्या ५ वर्षांपासून पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू दौर्‍यावर असतांना अखंड प्रवासात आणि रात्रंदिवस सेवेत आहेत. एवढा प्रवास करूनही त्यांच्या मुखमंडलावर त्याचा लवलेश किंवा ताण दिसत नाही. भारतभरातील २३ राज्ये, जवळजवळ तीन वेळा भारतभ्रमण पूर्ण करून त्या नेपाळलाही जाऊन आल्या आहेत. असा २ लक्ष ७५ सहस्र कि.मी. चा प्रवास त्यांनी केला आहे. हे सर्व त्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी करत आहेत.
२. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना 
होत असलेले विविध शारीरिक त्रास
       पू. काकूंना होणारा शारीरिक त्रासही तेवढ्याच प्रमाणात आहे. त्यांची हाडे ठिसूळ आणि नाजूक झाली आहेत. हाताच्या हाडांना थोडेसे दाबून स्पर्श केला, तर बोट आत जाते. ठिसूळपणा जाणवतो. त्यांच्या अंगाला सतत सूज असते. त्यांना सायटिकाचा प्रचंड त्रास आहे. प्रवासात सतत बसून आणि गड-किल्ले अन् डोंगर चढून-उतरून त्यांच्या कमरेपासून संपूर्ण डाव्या पायाची नस दबली गेली आहे. त्यामुळे शरिराचा हा भाग सतत दुखत असतो. पाठ, खांदे, हात-पाय यांमध्येही अन्य दुखणे चालूच असते. सायनसचाही त्रास आहे. त्यांचे जेवण एवढे अल्प आहे की, संपूर्ण दिवसभरात केवळ एका पोळी-भाजीवरही त्या रहातात.

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

अध्यात्मप्रसारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या
प्रवासाकरता चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊन या कार्यात हातभार लावा !
१. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी 
पू. अंजली गाडगीळ करत असलेले महान कार्य !
        मागील ४ वर्षांपासून सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, तसेच सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षींनी नाडीवाचनातून सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशा २३ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम, संशोधन केंद्रे यांना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत.

साधिकांच्या आध्यात्मिक नावांमुळे झालेली गंमत

       काही दिवसांपूर्वी आम्ही काही साधिका भगवतीकृपा अपार्टमेंटमध्ये एका गाडीतून जात होतो. त्यामध्ये सौ. साधना सुतार, सौ. विद्या शानभाग, मी (सौ. साक्षी ताकभाते), कु. कल्पिता गडेकर, कु. गार्गी दिघे, श्री. राजू सुतार असे होतो. त्या वेळी सौ. साधना सुतार गाडी चालवत होत्या. गाडी आश्रमापासून काही अंतरावर गेल्यावर सौ. विद्या शानबाग म्हणाल्या, साधना आपल्याला पुढे घेऊन जात आहे. त्यावर मी म्हणाले, विद्येमुळे आम्हाला याचे ज्ञान झाले. यावर कु. गार्गी म्हणाली, याचे आम्ही साक्षी आहोत. तेव्हा सर्व जण हसले. त्याच वेळी पुन्हा सौ. विद्या म्हणाल्या, अरे, याची आम्हाला कल्पना नव्हती. या सर्व संवादातून सर्वांना आनंद वाटून शिकायलाही मिळाले. या प्रसंगातून आम्हाला आनंद दिला; म्हणून श्रीगुरुचरणी कृतज्ञता !
- सौ. साक्षी ताकभाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.२.२०१६)

साधका, तू सत्यनीती सोडू नको रे !

साधका, तू सत्यनीती सोडू नको रे ।
आई-बाप, गुरुसेवा सोडू नको रे ॥ १ ॥
आई-बाप, गुरुआज्ञा तू मोडू नको रे ।
गुरुमंत्राला तू विसरू नको रे ॥ २ ॥
जरी आले संकट, तरी तू भिऊ नको रे ।
गुरु-आशीर्वादाची आस तू सोडू नको रे ॥ ३ ॥
रामनाथी, मिरज आणि देवद येथील आश्रमांना विसरू नको रे ।
राम-कृष्ण-हरि आणि गुरुतत्त्व यांना सोडू नको रे ॥ ४ ॥
गुरुचरणांचा स्पर्श सोडू नको रे ।
विठ्ठल, गुरुचरण मनी आठव रे ॥ ५ ॥
- श्री. यशवंत पाटील, उरुण-ईश्‍वरपूर, जिल्हा सांगली. (२०.४.२०१४)

साधकांकडे अथवा जिल्हासाठ्यात चांगल्या स्थितीतील संस्था किंवा समितीच्या टोप्या असतील, तर त्या उज्जैन सिंहस्थपर्वासाठी पाठवा !

सर्व जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना
     २२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सिंहस्थपर्व असणार आहे. विविध जिल्ह्यांतील अनेक साधक तेथे सेवारत आहेत. उज्जैन येथे कडक उन्हाळा असल्याने सेवेत सहभागी साधकांना उष्णतेचा तीव्र त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोप्यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.
     ज्या साधकांकडे संस्था अथवा समितीच्या चांगल्या स्थितीतील टोप्या असतील, तर त्यांनी त्या उज्जैनला जाणार्‍या साधकांसमवेत श्री. निषाद देशमुख यांच्या नावे पाठवाव्यात. जिल्हासाठ्यात विक्रीयोग्य टोप्यांचा साठा असेल, तर जिल्हासेवक त्या टोप्याही पाठवू शकतात. हिंदी भाषेतील टोप्या असल्यास त्या प्राधान्याने पाठवाव्यात.
     आपल्या जिल्ह्यातील साधकांकडून अथवा जिल्हासाठ्यातून भाषांनुरूप किती टोप्या पाठवू शकतो, याविषयी १५.४.२०१६ या दिवसापर्यंत श्री. निषाद यांना ९८२६७४२८३९ या क्रमांकावर कळवावे.
टोप्या पाठवण्याच्या संदर्भातील सूचना
१. साधकांकडील टोप्या पाठवत असतांना टोप्यांच्या आतील बाजूला संबंधित साधकाचे नाव, केंद्र आणि जिल्हा आदी माहिती पर्मनंट मार्करने लिहावी.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

वयोमानानुसार विविध शारीरिक अडचणींमुळे सेवा करणे शक्य नसलेल्या साधकांनी भावावस्थेत रहाण्याचा प्रयत्न करावा !

        सनातन संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या २६ वर्षांत अनेक जण सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. या साधकांपैकी काही साधक आता वृद्धावस्थेला पोहोचले आहेत. त्यांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना शरिराने सेवा करणे जमत नाही. वयोमानानुसार काही साधकांना वैयक्तिक गोष्टींसाठी कुटुंबियांवर किंवा सहसाधकांवर अवलंबून रहावे लागते. हे स्वीकारणे त्यांना कठीण जात आहे. अशा साधकांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्या.
१. मी (प.पू. डॉक्टर) गेली १० वर्षे आजारपणामुळे खोलीतून बाहेर जाऊ शकलो नाही. त्यामुळे मला पूर्वीप्रमाणे अध्यात्मप्रसारासाठी जाता येत नाही. प्रकृतीला सांभाळून मी ग्रंथलिखाणाची सेवा करतो. आपणही शरीरस्वास्थ्यानुसार जमेल ती सेवा करत रहावी आणि इतर वेळी भावावस्थेत रहावे. त्यातून शब्दातीत भगवंताला अनुभवण्याचा आनंद मिळतो.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
तीर्थयात्रा
     पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ :
इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     स्त्रियांना पुरुषांप्रमाणे सर्व हक्क हवे असतील, तर त्यांनी केवळ मंदिरांच्या संदर्भात नव्हे, तर लष्करात भरती होण्याचा पुरुषांइतकाच हक्क स्त्रियांना हवा, यासाठी चळवळ करावी ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ईश्‍वर सर्वत्र आहे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जी गोष्ट उघडपणे करणे अयोग्य वाटते, ती लपून करण्याचा प्रयत्न करणेही अयोग्यच; कारण एखादी अहितकारक गोष्टच उघडपणे करायची टाळली जाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आतिषबाजीचे बळी आणि देशभक्ती !

संपादकीय
    भारतात फटाके आणि आतंकवाद्यांकडून फोडण्यात येणारे बॉम्ब यांत जनतेचे बळी जाण्याचे प्रमाण सारखेच आहे, असे कोणी म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. या संदर्भात एखाद्या संस्थेने सर्वेक्षण केल्यास ते अधिक स्पष्ट होऊ शकते. फटाक्यांमुळे बळी जाणार्‍यांची संख्या दिवाळीच्या काळात अधिक असू शकते. भारतीय जनता उत्सवप्रिय आहे, त्यामुळे बहुतेक उत्सवांत फटाके न फोडण्यात आले, तरच नवल. याव्यतिरिक्त क्रिकेट सामन्यांच्या वेळी भारताचा विजय झाल्यास फुटणारे फटाके आणि राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात फुटणारे फटाके हे वेगळेच.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn